Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हर्सूलमध्ये कचराबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्याला हर्सूल-सावंगी येथील नो एन्ट्री कायमच आहे. पडेगाव येथील साइट देखील गुरुवारी बंद होती. त्यामुळे फक्त रमानगरात विकेंद्रिकरणाच्या साइटवरच कचरा टाकण्यात आला. शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरचा कचरा उचलण्यात आला, पण बहुतेक ठिकाणी कचरा साचलेला दिसून येत होता.

कचऱ्याचे वर्गीकरण करून तो टाकण्यासाठी व प्रक्रिया करण्यासाठी संनियंत्रण समितीने शहराच्या विविध भागात चार जागा निश्चित केल्या आहेत. याशिवाय देशमुखनगर आणि रमानगर येथे विकेंद्रीकरणातून प्रकल्प उभारले जाणार आहेत. संनियंत्रण समितीने निश्चित केलेल्या जागेपैकी हर्सूल-सावंगी येथील जागेवर नागरिकांनी कचरा टाकण्यास परवानगी दिली नाही. कचऱ्यावरच्या प्रक्रियेचे काय, मशीन केव्हा बसवणार ते सांगा, अशी भूमिका घेत कचऱ्याच्या गाड्यांना विरोध केला. त्यामुळे आजही हर्सूल-सावंगीच्या जागेवर कचरा टाकण्यास बंदी आहे. पडेगाव येथील जागेवर कचरा टाकण्यात येत होता, पण चार दिवसांपासून या ठिकाणी देखील कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. नागरिकांच्या विरोधामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला, आता पोलिस बंदोबस्तात या ठिकाणी कचरा टाकण्यात येणार आहे.

दरम्यान, गुरुवारी फक्त रमानगर येथील जागेवरच कचरा टाकण्यात आला. पडेगाव येथील जागेवर कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात आली आहे. निर्माण करण्यात आलेले खत शेतकऱ्यांना मोफत दिले जात आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वत:च्या शेतासाठी हे खत नेण्याची तयारी दर्शवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बावन्न हजार विद्यार्थ्यांनी रंगवले चित्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी शिवसेनेतर्फे चित्र रंगवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल ५२ हजार ५०० स्पर्धकांनी भाग घेतला. ही स्पर्धा विश्वविक्रमी झाल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे.

विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर ही स्पर्धा घेण्यात आली. सुमारे १७५ शाळांचे विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी उद्धव ठाकरे यांचेच चित्र रंगवले. स्पर्धेचे उदघाटन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षणतज्ज्ञ एस. पी. जवळकर, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांची विशेष उपस्थिती होती. मैदानावर नऊ विभागात विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. शिवसेनेच्या ३६० कार्यकर्त्यांनी या व्यवस्थेसाठी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याचा मुखवटा भेट देण्यात आला. यावेळी सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, कला शिक्षक यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, राजू राठोड, कृष्णा डोणगावकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, सभागृहनेता विकास जैन, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटक सुनीता आउलवार, रंजना कुलकर्णी, प्रतिभा जगताप, सुनीता देव, गोपाळ कुलकर्णी, चंद्रकांत इंगळे, संजय हरणे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा, देवळाईच्या ‘डीपीआर’साठी एजन्सी निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

सातारा-देवळाई भागात पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्थेसह अन्य सुविधा पुरविण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी महापालिकेने यश इंजिनीअरिंग या एजन्सीची नेमणूक केली आहे. या एजन्सीला कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. कार्यारंभ आदेश दिल्यामुळे 'डीपीआर' तयार करण्याचे काम आता सुरू होईल, दोन-तीन महिन्यांत 'डीपीआर' तयार होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणाचा जिल्हा परिषदेत ठराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा गुरुवारी (२६ जुलै) रोजी गाजला. मराठा समाजाच्या आरक्षणाची आग्रही मागणी सदस्यांनी केली. त्याचवेळी एका सदस्यांने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतलेल्या दिवंगत काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेल्या असल्याने उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेला डोणगावकर उशिरा उपस्थित झाल्या. यावेळी बांधकाम सभापती विलास भुमरे, धनराज बेडवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे आदींची उपस्थिती होती.

सभेच्या प्रारंभी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मराठा आरक्षणच्या मुद्यावरून सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. दिशाभूल करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे किशोर बलांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आरक्षण जाहीर होईपर्यंत नोकर भरती रद्द करण्याचीही मागणी त्यांनी केली. भाजपचे सदस्य मधुकर वालतुरे आरक्षण मिळालेच पाहिजे, परंतु याप्रश्नी राजकारण होता कामा नये, गेल्या ३५ वर्षांपासून या मागणीवर केवळ झुलवत ठेवल्याचा आरोप केला. रिपाइं (डेमोक्रेटिक)चे रमेश गायकवाड यांनी मराठा, तसेच मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, त्यासाठी घटनेच्या अनुसूची नऊमध्ये या समाजाचा समावेश करावा, असे मत व्यक्त केले. आरक्षणसंदर्भातील ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

\Bभत्ते पगारातून देणार मदत \B

आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. यावर जिल्हा परिषेदेच्या कॅफो यांनी असा कोणताही निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात नसल्याचे मत व्यक्त केले. त्यावर जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पगार, भत्त्यातून हा निधी उभारण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीची गुणवत्ता यादी लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी अभ्यासक्रमाची तिसरी गुणवत्ता यादी लांबणीवर जाणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर शिक्षण विभागाने यादी सद्यस्थितीत जाहीर करू नका, अशा सूचना उपसंचालकांना दिल्या आहेत. इनहाऊस कोट्याबाबत जागांबाबत काहीजन कोर्टात गेले होते. यादी जाहीर होणार असल्याने गुरुवारी शहरातील कॉलेजांमध्ये विद्यार्थी, पालकांची गर्दी केली होती.

औरंगाबाद महापालिका हद्दितील कॉलेजांमधील अकरावी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे. त्यामध्ये तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. मात्र, त्यास आता काही दिवस विलंब होणार आहे. अल्पसंख्यांक महाविद्यालयांमधील इनहाऊस कोट्याचा प्रश्न न्यायालयात गेला होता. त्यावर न्यायालयाने कोट्यामधील प्रत्यार्पित जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून भराव्या, असे निर्देश दिले. त्यामुळे हे बदल करण्यासाठी सद्यस्थितीत तिसऱ्या फेरीची यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. यासह अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांना त्याच्याकडे इनहाऊस कोट्यामध्ये शिल्लक असणाऱ्या काही जागा प्रत्यार्पित करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इनहाऊस कोट्यातील जागा प्रत्यार्पित केल्यानंतर त्या जागा रिक्त जागांमध्ये समाविष्ट होतील. त्यानंतर रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे. रिक्त यादी त्यामुळे दोन दिवसांचा कालावधी ही विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात येणार आहे. इनहाऊस कोटा म्हणजे ज्या संस्थेचे ज्युनिअर कॉलेज आहे. त्यांच्याकडे शाळा असेल, तर अशा संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठवेण्यात येतात. याला इनहाऊस कोटा आहे. जो २० टक्के असतो.

\Bप्रक्रिया लांबणार\B

अकरावीची प्रवेशाची फेरी मे पासून सुरू आहे. त्यात प्रत्यक्ष प्रवेशाची फेरी जुलैमध्ये सुरू झाली. ऑनलाइन प्रवेशाच्या दोन फेरी पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. आता हे बदल झाल्यामुळे प्रवेश प्रक्रिया आणखी पुढे लांबणार आहे. प्रवेशाच्या फेरी लक्षात घेता प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिना पूर्ण घेण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किराणा मालाची आवक ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

मालवाहतूकदारांच्या संपामुळे मोंढ्यातील किराणा मालाची आवक थांबली आहे. संपाचा गुरुवारी सातवा दिवस होता; उद्योगासह संपाचा व्यवसायिकांवरही परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत तोडगा निघाला नाही, तर वस्तुंचा तुटवडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑल इंडिया मोटार काँग्रेसने देशव्यापी मालवाहतूकदारांचा संप पुकारला आहे. सात दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाची केंद्र शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. संपामुळे शहरातील उद्योगांतील उत्पादकता २० ते ३० टक्क्यांपर्यंत आली आहे. संपाचा परिणाम होऊन मोंढ्यात होणारा किराणा मालाचा पुरवठा बंद झाला आहे. शिवाय अन्य वस्तुंचाही पुरवठा थांबल्याने दरवाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. संपामुळे रिफाईन ऑईल, तांदूळ, डाळी, मैदा, साखरेचा पुरवठा बंद झाला आहे. ………… दरम्यान, औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सचिव एम. जी. इरफानी, असद अहेमद, जयकुमार थानवी, विनोद कासलीवाल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी वाळूज-पंढरपूर भागात उभ्या असलेल्या ट्रकचे चालक, क्लिनर व इतर व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

…………

\Bट्रक कंपनीबाहेर \B

वाळूज एमआय़डीसीमधील काही कंपन्यांमध्ये त्यांच्याकडील उत्पादनाची वाहतूक करणाऱ्या मालमोटारी पार्क करण्यात आल्या होत्या. मात्र, मालवाहतूक होत नसल्याने त्या कंपनीबाहेर काढण्यात आल्या. लोडिंग न झाल्याने कंपन्यांमध्ये उत्पादन पडून आहे, असा दावा असोसिएशच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

……………

\Bसमितीच्या बैठकीची प्रतीक्षा \B

२०१५ मध्ये झालेल्या संपानंतर मालवाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवहन व वित्त विभागाचे अधिकारी आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी अशी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीची आतापर्यंत एकही बैठक झाली नाही, अशी माहिती औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैय्याज खान यांनी दिली.

……………

आधी संप मागे घ्या, त्यानंतरच चर्चा करू, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारच्या ताठरपणामुळे संप सुरू आहे. सध्या देशभरात ९० लाख मालमोटारी थांबून आहेत. त्यानंतरही शासन चर्चा करण्यासाठी तयार नसल्याने संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-एम. जी. इरफानी, सचिव औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन

……………

किराणा मालाची आवक थांबली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. मालवाहतूकदारांच्या संपाला औरंगाबाद व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. केंद्र शासनाने मालवाहतूकदारांसोबत चर्चा करून संपातून तोडगा काढावा. शासनाने जनतेला दिलासा द्यावा.

-जगन्नाथ काळे, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराप्रश्नी अवमान याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात दाखल अवमान याचिकेच्याअनुषंगाने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्याची विनंती शासनातर्फे सरकरी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी आणि महापालिकेतर्फे राजेंद्र एस. देशमुख यांनी केली. त्याचप्रमाणे औरंगाबाद महापालिका बरखास्त करुन प्रशासक नेमण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने सुद्धा उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्याची विनंती शासनातर्फे करण्यात आली. या दोन्ही याचिकांवर न्या. संभाजी शिंदे आणि न्या. व्ही.के. जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली.

सात मार्च २०१८ रोजी खंडपीठाने जनहित याचिका मंजूर करून महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार शहरात साचलेला कचरा त्वरित गोळा करून, योग्य त्या जागी न्यावा व तेथे त्यावर प्रक्रिया करावी, असे आदेश दिले होते. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव मलिक यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन कचरा व्यवस्थापनासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम सादर केला होता. त्याआधारे खंडपीठाने जनहित याचिका निकाली काढली होती. महापालिकेने प्रतिज्ञापत्र दाखल करून यंत्रे त्वरित खरेदी करून त्याद्वारे कचऱ्यांवर प्रक्रिया करून शहर कचरामुक्त करण्याची वेळोवेळी हमी दिली होती.

सात मार्चनंतर आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही, म्हणून मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णी यांनी अवमान याचिका दाखल केली होती.या सुनावणीवेळी महापौर नंदकुमार घोडेले खंडपीठात उपस्थित होते. याचिकाकर्त्यातर्फे देवदत्त पालोदकर यांनी बाजू मांडली. पालिकेच्या जयंत शहा आणि महापौरांतर्फे संभाजी टोपे हे काम पाहत आहेत.

\Bमुख्यसचिवही प्रतिवादी\B

या याचिकेची गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी राज्याचे नवीन मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, नवनियुक्त जिल्हाधिकावरी उदय चौधरी आणि महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना प्रतिवादी करण्याची परवानगी देण्याची विनंती मूळ याचिकाकर्त्याने दिवाणी अर्जाद्वारे केली असता खंडपीठाने त्यांचा अर्ज मंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा हिशेब हायकोर्टात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

जायकवाडीच्या पाण्याची चोरी झाल्यासंबंधीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे कार्यकारी अभियंता चारिदत्त रामराव बनसोड यांनी न्या. संभाजी शिंदे व न्या. व्ही. के. जाधव यांच्यासमोर उत्तर दाखल केले. खंडपीठाने मुख्य लेखा परीक्षक (जल व सिंचन महाराष्ट्र राज्य, वाल्मी) यांना प्रतिवादी करण्याचे आदेश दिले आहेत.

जायकवाडी धरणातील १५ ऑक्टोंबर २०१६ ते एक जुलै २०१७ यादरम्यान पाणी स्थिती काय होती, यासंबंधीचा अहवाल सादर करण्यात आला. पिण्यासाठी, सिंचनासाठी, कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी, औद्योगिक वापर यासंबंधीचा हिशेब मुख्य लेखा परीक्षकांनी दिलेला आहे. याचिकाकर्त्याने यासंबंधी दिलेली माहिती केवळ एका उपविभागाची होती, असे स्पष्ट करून हा उपविभाग क्रमांक पाच जायकवाडी होता. अहवालात १३ उपविभागांची माहिती सादर करण्यात आली. उपरोक्त उपविभाग तीन विभागात अंतर्भूत असून, यात जायकवाडी पाटबंधारे विभाग पैठण, परभणी आणि बीड असे तीन विभाग आहेत. याचिकेत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे पी. आर. सुरवसे यांनी काम पाहिले. शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मंजुषा देशपांडे यांनी बाजू मांडली .

\B'जायकवाडी'चा पाणीवापर\B

डावा कालवा : ५३६.७९५

उजवा कालवा : २१८.०३४

बॅक वाटर : ३१०.३८५

नदीत सोडलेले पाणी : २५.८५६

सिंचनासाठी : १०९१.०७०

पिण्यासाठी : ६१.७१८

औद्योगिक वापर : ११.६०६ द.ल.घ.मि. ,

बाष्पीभवन : २७०. २४४ द.ल.घ.मि.

एकूण :१४३७.१८७

(पाणीवापर दशलक्ष घनमीटरमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुख्यात गुंड आदील चौथ्यांदा स्थानबद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आदील चाऊस हमीद चाऊस (वय २८ रा. चाऊस कॉलनी शहाबाजार) याला एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात झोपडपट्टी दादा कायद्यानुसार स्थानबद्ध करण्यात आले. आदीलवर एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याची ही चौथ्यांदा कारवाई करण्यात आली आहे.

आदील चाऊस याच्यावर चोरी, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, शस्त्र बाळगणे, दादागिरी करणे, खंडणी वसूली आदी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला २००९मध्ये शहरातून हद्दपार करण्यात आले होते; तसेच त्याच्यावर यापूर्वी २०११, २०१३, व २०१५मध्ये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या गुन्हेगारी कारवाया कायमस्वरुपी सुरूच होत्या. आदीलला सध्या सिटीचौक पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे.

त्याच्या गुन्हेगारी कारवायाला प्रतिबंध बसावा यासाठी त्याला पुन्हा एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, दादाराव शिनगारे, जमादार द्वारकादास भांगे, प्रभाकर शेवरे व अमर चौधरी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंड भरा ई-चलानद्वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना आता पोस्ट ऑफिसमार्फत दंडाची नोटीस तामील करण्यात येणार आहे. ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर वाहनधारकाला दंडाची रक्कम ई-चालानद्वारे पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अॅक्सिस बँकेच्या शाखेत भरता येणार आहे. या नोटीसकडे काणाडोळा करणाऱ्यांवर नंतर मात्र वाहतूक शाखेकडून प्रत्यक्ष कारवाई करण्यात येणार असून, नोटीसमध्ये नमूद केलेल्या रक्कमेवर वेगळा दंड देखील आकारण्यात येणार आहे.

शहरात सध्या सेफ सिटी प्रोजेक्टच्या माध्यमातून विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांचे फोटो या कॅमेऱ्याद्वारे सध्या टिपण्यात येतात. या वाहनधारकांची माहिती काढून वाहतूक शाखेकडून त्यांना दंडाची नोटीस सध्या घरी पाठविण्यात येत आहे. या पद्धतीत आता बदल करण्यात आला आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता पोस्ट ऑफिसमार्फत ही नोटीस घरी पाठविली जाणार आहे. ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर दिलेल्या कालावधीमध्ये वाहनधारकाला ही दंडाची रक्कम पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत किंवा अॅक्सिस बँकेच्या शाखेत ई-पेमेंटद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त एच. एस. भापकर यांनी ही माहिती एका कळविली आहे.

\Bनियम मोडणाऱ्यांची सुटका नाही\B

शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या ठिकाणी वाहतूक कर्मचारी नसल्यास वाहनधारक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवतात. अशा बेशिस्त वाहनधारकांवर आता सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. नियम तोडला म्हणजे आपण सुटलो अशी वाहनधारकांची अपेक्षा चुकीची ठरणार आहे. पोस्ट ऑफिसमधून आलेल्या नोटीस घेण्यास टाळाटाळ केल्यास किंवा अशा नोटिसीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांवर देखील वाहतूक शाखेची नजर असणार आहे. अशा वाहनधारकाकडे जाऊन वाहतूक शाखेचे पोलिस प्रत्यक्ष कारवाई करणार आहेत. मूळ दंडाच्या रक्कमेसोबतच त्याला वाढीव दंडाची रक्कम देखील भरावी लागणार आहे.

नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष असणार आहे. नियम तोडून पुढे निघून गेलो म्हणजे आपण सुटलो, असे त्याला वाटत असेल, तर ते चुकीचे ठरणार आहे. पोस्ट ऑफिसमार्फत पाठविलेल्या नोटिसीला प्रतिसाद मिळाला नाही, तर वाहतूक शाखेकडून त्या वाहनधारकांवर प्रत्यक्ष कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांनी अशी अप्रिय कारवाई टाळण्याऐवजी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतूक करावी.

- डॉ. दीपाली धाटे घाडगे, पोलिस उपायुक्त, मुख्यालय, औरंगाबाद शहर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलकांची धरपकड; आठ जण ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अहमदनगर रोडवरील कायगाव टोका येथे मंगळवारी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरू केली असून गुरुवारी आठ संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी (२३ जुलै) काकासाहेब शिंदे यांनी कायगाव टोका येथे पुलावरून उडी मारून जलसमाधी घेतली. शिंदे यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर संतप्त जमावाकडून दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. खासदार चंद्रकांत खैरे व आमदार सुभाष झांबड यांना देखील जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आंदोलकांची ओळख पटवत धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दंगेखोरांचा शोध घेऊन अटक करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्टसिटीच्या एसपीव्हीची तत्काळ बैठक घ्या’

$
0
0

औरंगाबाद: स्मार्टसिटी प्रकल्पाच्या एसपीव्हीची (स्पेशल पर्पज व्हेकल) बैठक तत्काळ घ्या, असे पत्र महापालिका पदाधिकाऱ्यांनी एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिले आहे. एसपीव्हीची बैठक साडेचार महिन्यांपूर्वी झाली होती. त्या बैठकीत घेतलेले निर्णय व त्याची अंमलबजावणी याचा आढावा घेणे व नवीन निर्णय घेण्यासाठी एसपीव्हीची बैठक होणे गरजेचे आहे, असे पदाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे. आयुक्तांना दिलेल्या पत्रावर महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती रेणुकादास वैद्य, सभागृह नेता विकास जैन यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी बसची सेवा पूर्वपदावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी उसळलेल्या आंदोलनामुळे सोमवारपासून (२३ जुलै) बंद राहिलेली एस. टी. महामंडळाची सेवा गुरुवारी सुरळीत होण्यास सुरुवात झाली. येथून पुणे, नाशिक, जळगाव, धुळ्यासह इतर मार्गावर बस सोडण्यात आल्या. मात्र, तणाव कायम असल्याने जालना मार्गे जाणाऱ्या बस बंद ठेवण्यात आल्या. सद्यस्थिती ८० टक्के बस धावत आहेत.

कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्यानंतर सोमवारी दुपारपासून औरंगाबाद-नगर मार्गावरील वाहतूक बंद झाली. महाराष्ट्र बंदमुळे बस बुधवारी रात्रीपर्यंत रस्त्यावर धावल्या नाहीत. मध्यवर्ती बस स्थानकातून गुरुवारी सकाळी पुणे, नाशिक, धुळे, जळगाव आदी, तर सिडको बस स्थानकाहून शिर्डी, लातूर, गेवराईसह इतर ठिकाणी बस सोडण्यात आल्या. जालना मार्गावर तणाव असल्याने विदर्भात जाणाऱ्या बस बंद राहिल्या. दरम्यान, बस सुरू झाल्याने प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

………

\Bवारकऱ्यांच्या बस परतणे सुरू \B

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांच्या बस परत येण्यास सुरुवात झाली आहे. वारकऱ्यांना घेऊन बुधवारी (२५ जुलै) बारा बस पंढरपूरहून आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड: मराठा आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक

$
0
0

नांदेड

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले असता नांदेड लगतच्या आमदुरा येथे संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेचे पडसाद लगतच्या पुणे गावात उमटले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून नंतर पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूर आणि रबरी गोळयाचा पाच वेळा गोळीबार केला. या दगडफेकीत १३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या चार वाहनांचीही तोडफोड केली. त्याबरोबर तहसीलदारांच्या वाहनासह इतर २० ते २२ दुचाकी वाहनांचीही तोडफोड केली.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज अमदुरा येथे काही आंदोलक तरूणांनी गोदावरी नदीत जलसमाधी घेण्याची घोषणा केल्यानंतर अमदुरा येछे प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज सकाळी ११ च्या सुमारास काही तरूण जलसमाधी घेण्यासाठी निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. पोलिसांनी अडवल्यानंतर तेथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस आणि आंदोलक आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने वाद वाढला. त्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी सुरूवातीला लाठीमार केला. परंतु त्यानंतरही जमाव आक्रमक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडया फोडल्या. तसेच रबरी गोळ्यांचा गोळीबार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा तीन दिवसाआड पाणीपुरवठा

$
0
0

औरंगाबाद : शहरात पुन्हा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी शुक्रवारी आंदोलन केल्यावर महापालिकेच्या आयुक्तांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे शहरवासीयांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळेल.

शिवसेनेचे रेणुकादास (राजू) वैद्य जून महिन्यात स्थायी समितीचे सभापती झाले आणि त्यांनी दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा 'टास्क' हाती घेतला. आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेवून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. टप्प्या टप्प्याने संपूर्ण शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचेही जाहीर करण्यात आले. मात्र, शुक्रवारी 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनामुळे पुन्हा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरक्षणासाठी फुलंब्रीत दोन ठिकाणी ‘रास्ता रोको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

मराठा समाजास त्वरित आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद येथे, तर देवगिरी कारखाना पिशोर रस्त्यावरील निधोना येथे शुक्रवारी 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. यावेळी येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले, तर फुलंब्री येथे मुंडण आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे व जगन्नाथ सोनवणे यांचा बळी गेला असून, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आळंद येथे 'रास्ता रोको' आंदोलन सुरुवात करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सकल मराठा समाज बाधंवाच्या वतीने राज्य भर आंदोलन करण्यात येत आहे. फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील सकल मराठा समाजाच्या वतीने 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले; तसेच निधोना येथेही टायर जाळून 'रास्ता रोको' करण्यात आला.

आळंद येथे आंदोलनात तहसीलदार संगीता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात काही प्रमुख मागण्या मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्यात यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम द्यावा, मेगा भरती थांबवावी आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी आळंद येथे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले व वडोद बाजार पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध होर्डिंगविरोधी आजपासून कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील अनाधिकृत होर्डिंग हटाव मोहिम आज शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. 'स्वच्छ शहर सुंदर शहरा'साठी पोलिस व पालिकेने पुढाकार घेतला असून या संदर्भात शुक्रवारी पोलिस आयुक्तालयात पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, पालिका आयुक्त डॉ. विनायक निपुण, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी हनुमंत भापकर, पालिका उपायुक्त महावीर पाटणी, मंजुषा मुथा यांच्यासह पोलिस व पालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शहरातील अवैध होर्डिंग हटवण्यासाठी दिलेली २७ जुलैची मुदत संपल्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी पोलिस व पालिका अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्यानऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यापुढे कोणतेही धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, जयंती, उत्सवाचे होर्डिंग लावण्यासाठी मनपाकडून एकाच ठिकाणी परवानगी घ्यावी लागणार आहे. अवैध होर्डिंग लावणाऱ्यांवर पालिका प्रशासनाकडून तक्रार आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएमचा शिवसेनेवर ‘पाणी बाण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्याच्या आडून एमआयएमने शुक्रवारी शिवसेनेवर कुरघोडी केली. आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगत नगरसेवकांनी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांसह शुक्रवारी (२७ जुलै) शहागंज येथील जलकुंभावर 'ओव्हरफ्लो' आंदोलन केले. त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात अडचण येत असेल, तर पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी यांनी सांगितले.

उन्हाळ्यात तीन दिवसाआड करण्यात आलेला पाणीपुरवठा महापौर नंदकुमार घोडेले आणि स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य यांच्या पाठपुराव्यामुळे दोन दिवसाआड करण्यात आला आहे. दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास एमआयएमच्या नगरसेवकांचा विरोध होता. जुन्या शहरात चार-पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे संपूर्ण शहरात समान पाणीपुरवठा करा, अशी मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी लावून धरली होती.

आंदोलनानंतर एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी आणि शहराध्यक्ष डॉ. गफार कादरी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या चर्चेची माहिती सिद्दिकी यांनी दिली. 'आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अडचणींबद्दल विचारणा केली असता दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचा लेखी अहवाल कार्यकारी अभियंत्यांनी दिला, तर तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले,' अशी माहिती सिद्दिकी यांनी दिली. आयुक्तांनी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यास एमआयएमने शिवसेनेवर कुरघोडी केल्यासारखे होईल, असे पालिका वर्तुळात बोलले जात आहे.

\Bपाणी गेले वाहून \B

शहागंज येथील जलकुंभावरून १८ वॉर्डांना पाणीपुरवठा केला जातो. यापैकी बहुतेक वॉर्डांत आठ-आठ दिवसांपासून पाणी आले नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. दुपारी दोन वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. आंदोलकांनी लाइनमनला जलकुंभाचा व्हॉल्व्ह बंद करू दिला नाही. त्यामुळे जलकुंभ परिसरातील भूमिगत टाकी (सम्प) ओव्हरफ्लो झाला. या टाकीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. शहागंजमधून निघालेले पाण्याचे लोट फाजलपुरा येथील नाल्यातून वाहून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजंदारी कामगारांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कामगारांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात भिमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनने गुरुवारी निदर्शने केली. या कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत १४ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात येणार आहे, असे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी सांगितले.

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठातील रोजंदारी कामगारांनी निदर्शने केली. मागण्यांबाबत युनियनच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे यांची भेट घेतली. रोजंदारी कामगारांना महागाई भत्त्यासह वेतन देण्यात येईल, कपात केलेला दोन वर्षांचा भविष्य निर्वाह निधी दोन महिन्यात देण्यात येईल, नोकर भरतीवेळी रोजंदारी कामगारांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन कुलगुरू डॉ. चोपडे यांनी दिले. इतर कामगारांना विद्यापीठ फंडातून कायम करण्यात आले. या धर्तीवर रोजंदारी कामगारांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे फंडातून नियुक्त करण्याच्या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा करु, असे कुलगुरुंनी सांगितले. प्रलंबित मागण्यांबाबत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा न झाल्यास पुढील महिन्यात बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा शिष्टमंडळाने दिला. यावेळी युनियनचे अध्यक्ष किरणराज पंडित, गौतम सोनवणे, भगवान निकाळजे, किशोर भिंगारे, विजय भिंगारे, अनिल केदारे, नितिन ठोसर आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुपौर्णिमेनिमित्त बोंडअळीवर मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील सरलाबेट संस्थान येथे गुरुपोर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनावरशेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

संस्थानचे प्रमुख रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन याविषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, 'नॉन बीटी कापूस बीटी कापसाच्या भोवती लावा. गुलाबी बोंडअळीच्या पंतगापासून पुढे १०० ते २०० अळया निर्माण होत असल्याने अळी अवस्थेपेक्षा पंतग मारल्यास तेवढया अळया निर्माणच होणार नाहीत. पंतग हे कामगंध सापळा किंवा प्रकाश सापळयाने मारणे सहज शक्य आहे. तथापी अळी पात्यात किंवा सरंक्षक आवरणात गेली की ती मारणे कठीण जाते म्हणून फुलोरा येण्यापूर्वी तत्काळ आजच प्रकाश व कामगंध सापळा लावावा. गोळा झालेले पंतग नष्ट केल्यास या किडीवर वेळेवर मात होऊन पुढे किडीची संख्या कमी होईल.' यावेळी अधिकारी संजय व्यास, विस्तार अधिकारी गजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images