Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सर्व वॉर्डांमध्ये महिलांसाठी जीम

$
0
0

औरंगाबाद: शहरातील सर्वच्या सर्व म्हणजे ११५ वॉर्डांमध्ये महिलांसाठी जीम सुरू करण्याचा निर्णय सोमवारी महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी जाहीर केला. या उपक्रमाची सुरूवात महापौर नंदकुमार घोडेले यांच्या ईटखेडा वॉर्डातून १५ ऑगस्ट रोजी केली जाणार आहे. आयुक्त आणि पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत महिलांसाठीच्या जीमबद्दल चर्चा झाली. तेव्हा एखाद्या वॉर्डात जीम तयार करण्यापेक्षा सर्वच वॉर्डात महिलांसाठी जीम तयार करू, असे आयुक्तांनी सांगितले. ही कामे महापालिका फंडातून केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आरईसी’ संचालकपदी डॉ. कराड यांची नियुक्ती

$
0
0

औरंगाबाद: भारत सरकारच्या ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाच्या (आरईसी) अशासकीय संचालकपदी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. आरईसी हे ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा करते. या महामंडळाची स्थापना ६० वर्षांपूर्वी स्थापना झाली असून मंडळातर्फे राज्य व खासगी कंपन्यांना अर्थसहाय दिले जाते. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून आंध्रप्रदेशचे माजी मुख्य सचिव डॉ. पी.व्ही. रमेश असून डॉ. कराड यांच्या नियुक्तीनंतर आता महामंडळावर अध्यक्षासह एकूण आठ सदस्य झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको काही काळ एसटी सेवा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी येथे मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने जीव दिल्याच्या घटनेनंतर परिसरात सोमवारी तणाव निर्माण झाला. चिकलठाणा येथे एक एसटी फोडण्यात आली. यानंतर सिडको भागातून मराठवाड्यातील विविध शहरांसह विदर्भाकडे जाणाऱ्या सर्व बस रोखण्यात आल्या होत्या. तणाव निवळल्यानंतर वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली.

मुकुंदवाडी येथे तणाव निर्माण झाल्यानंतर चिकलठाणा ते जोगेश्वरी जाणाऱ्या बसवर (एमएच २० बीएल १५०२) बसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत शहर बसच्या खिडकीच्या काचा फुटल्या. त्यानंतर जालना रोडसह बीड रोडवरील एसटी बस सेवा बंद करण्यात आली. दुपारी दोनच्या दरम्यान तणाव निवळल्यानंतर पुन्हा एसटी बस सुरू करण्यात आली. सिडको बस स्थानकावरून जालना, परभणी आणि सोलापूर वगळता इतर शहरांकडे बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सोलापूरला जाण्यासाठीही सायंकाळी उशिरा गाड्या सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड :

मराठा आरक्षणच्याच्या समर्थनार्थ काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अब्दुल सत्तार यांनी आज (सोमवारी) मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा केली. हे शासन मराठा समाजसोबतच सर्वांवर अन्याय करत असल्याने आपण विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी साांगितले.

मराठा आरक्षणचा मुद्दा ऐरणीवर आला असून भाजप सरकार मराठा आरक्षणला बगल देत असल्याची भावना निर्माण झाली आहे. सत्तेवर येताच १०० दिवसांत मराठा आरक्षण लागू करू, असे आश्वासन सत्तारूढ भाजप सरकारने दिले होते. मात्र, चार वर्ष उलटूनही हे सरकार मराठा आरक्षणासह इतर सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भाजप सरकारच्या अन्यायाला कंटाळून विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाभा ट्रॉन’ आठवड्यात सेवेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'टाटा मेमोरियल हॉस्पिटल'कडून देणगी स्वरुपात प्राप्त झालेले तब्बल तीन कोटी रुपयांचे 'भाभा ट्रॉन २' हे किरणोपचारांसाठीचे खास उपकरण वापरण्यास 'अॅटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड'ने (एईआरबी) परवानगी दिली असून, या उपकरणाच्या 'ट्रायल'ला नुकतीच सुरुवातदेखील झाली आहे. येत्या एक किंवा दोन आठवड्यात हे उपकरण पूर्णपणे रुग्णसेवेत दाखल होणार असल्याचे घाटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे दीड वर्षापासून धुळखात पडलेल्या उपकरणाचा यापुढील काळात उपयोग होऊन किरणोपचारासांठीचे वेटिंग घटेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

शासकीय विभागीय कर्करुग्णालयाला अलीकडेच राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आणि त्याच दरम्यान 'टाटा मेमोरियल हॉस्पिटल'ने कर्करुग्णालयाला आपले उपकेंद्र म्हणून जाहीर करीत 'भाभा ट्रॉन २' हे खास भारतीय बनावटीचे रेडिएशन मशीन देणगीस्वरुपात रुग्णालयाला दिले. मात्र आधी बंकरसाठी, तर नंतर 'एईआरबी'च्या परवानगीसाठी हे उपकरण सुमारे दीड वर्ष धुळखात पडून होते. विशेष म्हणजे या उपकरणाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते फेब्रुवारीमध्ये मोठ्या थाटात झाले होते. त्यानंतरही उपकरणासाठी स्वतंत्र किरणोपचार तंत्रज्ञ नसल्याची त्रुटी 'एईआरबी'च्या वतीने काढण्यात आली होती. दरम्यान, या उपकरणासाठी सहा स्वतंत्र तंत्रज्ञांच्या नियुक्तीसह इतरही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर 'एईआरबी'कडून नुकतीच परवानगी मिळाली असून, उपकरणाच्या चाचणीला सुरुवातही झाली आहे.

पहिल्या टप्प्यात १५ रुग्णांवर उपचार

'भाभा ट्रॉन'च्या चाचणीला सुरुवात झाली असून, येत्या आठवड्यात किंवा दोन आठवड्यात हे उपकरण पूर्णपणे सेवेत येईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात दररोज १० ते १५ रुग्णांवर किरणोपचार होतील आणि हळूहळू किरणोपचारांचे प्रमाण वाढेल. त्याचवेळी 'लिनॅक' हे किरणोपचारासांठीचे उपकरण दिवसातून दोन टप्प्यात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत रुग्णांची किरणोपचारांसाठीचे प्रतीक्षा निम्म्यावर येईल, असे रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

'एईआरबी'ची परवानगी मिळाली असून, उपकरणाचे 'ट्रायल'ही सुरू झाले आहेत. येत्या आठवड्यात हे उपकरण पूर्णपणे रुग्णसेवेत दाखल होईल. ही कर्करुग्णांसाठी मोठी सोय असणार आहे.

- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलकांवरील गुन्हे रद्द करा

$
0
0

औरंगाबाद - रिपब्लिकन सेनेने विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या थकीत शिष्यवृत्तीचे वाटप करून महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती वाढवावी आणि महाराष्ट्र बंदमधील आंबेडकरी आंदोलकांवरील गुन्हे रद्द करा अशी मागणी करण्यात आली. प्रमुख मागण्यात भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना अटक करावी, अॅट्रोसिटी कायद्याला बळकट करा, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, मराठा-धनगर-मुस्लिम आरक्षणाचा तिढा सोडवा, भटके, मुस्लिम व दलितांवरील सामूहिक हल्ल्याची चौकशी करा या मागणीचा समावेश आहे. भाजपप्रणित मोदी -फडणवीस सरकारने अघोषित आणीबाणी लादल्याची टीका आंदोलकांनी केली. एकूण १६ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनात दादाराव राऊत, रुपचंद गाडेकर, सचिन निकम, मिलिंद बनसोडे, चंद्रकांत रूपेकर, अॅड. अतुल कांबळे, अविनाश कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई-मुलाचा अपघातात मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

आईला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाताना दुचाकीला जीपने धडक दिल्याने आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजता गंगापूर रस्त्यावर घडली. अंजनाबाई पवार (वय ६०) व अशोक पवार (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. शहराजवळच्या वैजापूर ग्रामीण एक पवार कुटुंब रहिवासी आहे. अंजनाबाईंना शेतात काम करतांना विंचू चावला होता. त्यांना अशोक पवार हे उपचारासाठी दुचाकीवर (एम एच २० २१६५) वैजापुरला घेऊन जात होते. गंगापूर रस्त्यावर चिंतामणी ट्रेडर्ससमोर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने (एम एच २० सीएस ०४०९) दुचाकीला जोराची धडक दिली. या आपघातात अंजनाबाई व अशोक हे मायलेक गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोघांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जीपचालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रतिपसिंह बहुरे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात कोंडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रमोद होरे-पाटील यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच प्रक्षुब्ध आंदोलकांनी मुकुंदवाडी परिसर बंद करत रास्तारोको आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याला भेट दिली. मात्र, आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यातच रोखून धरत बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर मृताच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची शासकीय मदत तसेच सरकारी नोकरीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरात गेल्या नऊ दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चासाठी क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन सुरू असून, आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत चार जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे शहरात तसेच जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. आरक्षणासाठी प्रमोद होरे यांनी केलेल्या आत्महत्येची माहिती सोमवारी पसरताच संतप्त झालेल्या तरुणांनी मुकुंदवाडी परिसरातील पूर्ण बाजारपेठ बंद करत दहा वाजता रस्ता रोको आंदोलनास सुरुवात केली. यानंतर तब्बल दोन तासांनंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मुकुंदवाडी परिसराला भेट दिली. यावेळी पोलिस ठाण्यामध्ये त्यांनी समन्वयक तसेच आंदोलकांसोबत चर्चा करून रस्तारोको मागे घेण्याची विनंती केली. आंदोलकांनी रेल्वेखाली आत्महत्या केलेले होरे यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत द्यावी, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. लेखी आश्वासन देईपर्यंत पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिलेले लेखी आश्वासन पोलिस ठाण्याबाहेर बसलेल्या आंदोलकांना वाचून दाखवले व त्यानंतर आंदोलकांना रस्तारोको मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, होरे यांच्या कुटुंबीयांच्या शासकीय मदतीबाबत स्पष्ट उल्लेख केलेला नसल्यामुळे आंदोलकांनी मदत देण्याची मागणी केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासनामध्ये पुन्हा बदल करत दहा लाख रुपयांची मदत तसेच कुटुंबातील सदस्याला नोकरीमध्ये प्राधान्य देण्याचे जाहीर केले. या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

\Bआत्महत्या नको; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\B

पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, 'युवकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये. झालेली घटना अत्यंत दुर्देवी आणि गंभीर स्वरुपाची आहे. या घटनेची चौकशी पोलिस करत आहेत. निवेदनाद्वारे आंदोलकांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या संदर्भात लेखी आश्वासन दिले असून, स्थानिक स्तरावरील मागण्या येथे पूर्ण करण्यात येतील. शासनस्तरावरील मागण्या सरकारकडे पाठवण्यात येतील.'

\Bआंदोलकांच्या मागण्या

\B- प्रमोद होरे यांना हुतात्मा जाहीर करा

- होरे कुटुंबास ५० लाखांची मदत द्या

- कुटुंबातील एकास नोकरी द्यावी

- मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या

- प्रशासन, मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

- आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगाभरती स्थगित ठेवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका घेणार जीएसटी विभागाचे मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जीएसटीमुळे शहराच्या विविध वॉर्डांमधील विकास कामांच्या सुमारे तीनशेवर फाईल रखडल्या आहेत. त्यातून मार्ग काढणे महापालिका प्रशासनाला अद्याप शक्य झाले नाही. या फाईलसंदर्भात जीएसटी विभागाचे मार्गदर्शन घेण्याचे पालिकेने ठरविले आहे.

प्रत्येक कामाच्या बिलावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. हा कर कोणी भरायचा यावरून पालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे विकासाची कामे रखडल्याने नगरसेवक त्रस्त आहेत. या रखडलेल्या फाईलवर निर्णय घेण्यासाठी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त, मुख्यलेखाधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांची समिती स्थापन केली. या समितीची अद्याप एकही बैठक झाली नसल्याने काहीच निर्णय झाल्याचे वृत्त 'मटा' ने २७ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते. जीएसटी संदर्भात ३० जुलै रोजी बैठक घेवून निर्णय करून असे महापौरांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत त्यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही. जीएसटी विभागाकडून मार्गदर्शन मागवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

नांदेड : सततची नापिकी व एसबीआय बँकेने पीक कर्ज देण्यास नकार दिल्याने हतबल झालेल्या ४० वर्षीय शेतकऱ्याने औषध प्राशन करून मृत्यूला कवटाळले. माहूर तालुक्यातल्या माळवाडी येथे ही घटना घडली.

माळवाडी येथील सुभाष भोपा जाधव यांच्याकडे अल्प शेती आहे. गेल्या तीन वर्षांपासून अपेक्षेइतकी उत्पन्न न झाल्याने ते अस्वस्थ होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी पीक कर्जासाठी माहूरच्या एसबीआय बँकेकडे अर्ज केला होता, परंतु बँकेने कर्ज देण्यास टोलवाटोलवी केली. त्यामुळे हतबल झालेल्या सुभाष जाधव यांनी रविवारी रात्री आपल्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याविरोधात ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव

भावसिंगपुरा येथील कचराप्रश्न अधिक बिकट होत आहे. पडेगाव येथील जागेवर कचरा टाकण्यास विरोध करण्यासाठी भावसिंगपुरा येथील नागरिकांनी सोमवारी ठिय्या दिला. हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी सायंकाळी अखेर ५० ते ६० जणांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात केली. दरम्यान, सोमवारी सकाळी दहा वाजता येथील जागेवर कचरा आणून टाकण्यात आला.

संनियंत्रण समितीने निवडलेल्या पडेगाव येथील जागेवर कचरा टाकण्यास रविवारी तीव्र विरोध करण्यात आला. पालिकेची वाहने कचरा टाकत असल्याचे लक्षात आल्याने सोमवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आमच्या पाच वॉर्डातील कचरा येथे येऊ देऊ परंतु, शहरातील इतर वॉर्डांचा कचरा येऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. यामुळे पालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. सकाळपासून पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. आंदोलन तीव्र होत असल्याने या परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. एसआररपीएफच्या दोन तुकड्या हत्यारासह तैनात करण्यात आल्या होत्या. सहाय्यक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, दौलताबाद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत सराफ, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे हे घटनास्थळी हजर होते.

\Bताब्यात घेतलेल्यांना सोडेपर्यंत आंदोलन

\B

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये नगरसेविका मनीषा लोखंडे यांचे दीर गणेश लोखंडे यांचा समावेश आहे. आमच्या माणसांना सोडणार नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. नगरसेविका लोखंडे यांनी आंदोलनात सहभाग घेत पाठिंबा दिला आहे. 'मी कचरा आंदोलनातील सर्व महिला, नागरिकांसोबत आहे. प्रसंगी नगरसेवक पदाचा राजीनामाही देण्यास तयार आहे,' असे त्यांनी सांगितले. आंदोलकांनी सायंकाळी हरिपाठ, भजने,आरती गात ठिय्या दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुपचूप मुंबईच्या बैठकीला गेल्याने समन्वयकांत हमरीतुमरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गद्दारांचा बंदोबस्त करू,' अशी ठिय्या आंदोलनात शपथ घेऊन चोवीस तास होत नाही तोच औरंगाबाद येथील दोन समन्वयक मुंबई येथील बैठकीत सहभागी झाल्याचा आरोप करत सोमवारी (३० जुलै) ठिय्या आंदोलनातील महिला व युवकांनी त्या समन्वयकांना जाब विचारला. यावेळी दोन गटांमध्ये झालेल्या हमरीतुमरीमध्ये एकच गोंधळ झाल्याने शेवटी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केली.

मराठा आरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून क्रांतीचौकात मराठा क्रांतीमोर्चा समन्वय समितीचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. सरकार आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रारंभीपासून होत आहे. दरम्यानच्या काळात रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समन्वयकांची बैठक घेतली. मुंबई झालेल्या या बैठकीला औरंगाबादहून दोन समन्वयक मराठा क्रांतीमोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता सहभागी झाले आहेत, अशी चर्चा शनिवारपासून इतर कार्यकर्त्यांमध्ये होती. दरम्यान मुंबईला गेलेले समन्वयक सोमवारी दुपारी क्रांतीचौकात आल्यानंतर आंदोलकांनी एकच गोंधळ सुरू केला. यावेळी त्या दोन समन्वयकांच्या समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलकांनीही घोषणाबाजी केली. या घटनेनंतर क्रांतीचौकात एकच गोंधळ उडाला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ दोन गटांमधील कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे प्रकरण शांत झाले. दोन गटामध्ये झालेल्या धक्काबुक्कीमध्ये घटनेत ठिय्या आंदोलनात सहभागी दोन महिलाही जखमी झाल्या. यातील एक महिला अत्यवस्थ असून, त्या महिलेस खासगी रुग्‍णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराप्रश्नी सुनावणी सात ऑगस्ट रोजी

$
0
0

औरंगाबाद : शहरातील कचरा नारेगाव येथे टाकण्यास औरंगाबाद खंडपीठाने कायमची बंदी केली होती. तसेच खंडपीठाच्या २००३च्या आदेशाची पूर्तता न केल्यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या आदेश दिला होता. या आदेशाच्या पूर्ततेसंदर्भात आता सात ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने वरील आदेशाचा कार्यपूर्ती अहवाल मुख्य सचिवांकडे पाठविला आहे. तो सादर करण्यास वेळ देण्याची विनंती सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी केली. मूळ याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर , केंद्र शासनातर्फे असिस्टन्ट सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळा उंच करण्याची निविदा दोन दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासंदर्भात दोन दिवसांत निविदा काढण्यात येणार आहे. लेबरकॉलनी येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या नुतनीकरणाचे काम देखील लगेच सुरू केले जाणार आहे. संग्रहालय परिसरात २५ ते ५० आसनाचे सभागृह बांधण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याबद्दल जिल्हा शिवजयंती उत्सव समितीने महापालिकेला निर्वाणीचा इशारा दिला होता. पालिकेने पुतळ्याची उंची न वाढवल्यास उत्सव समिती हे काम करील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे महापालिकेने यै कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचे एक डिझाईन अंतिम करून पदाधिकाऱ्यांतर्फे प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे दोन दिवसात निविदा काढली जाणार आहे.

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या नुतनीकरणाच्या कामाचा प्रस्ताव त्र्यंबक तुपे महापौर असताना मंजूर करण्यात आला होता. पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाबरोबरच संग्रहालयाचे नुतनीकरण केले जाईल, असे संकेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समितीची आज बैठक

$
0
0

औरंगाबाद: महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. या बैठकीत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या यंत्राचा निर्णय लागणार आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात बेलिंग, श्रेडिंग आणि स्क्रिनिंग यंत्र खरेदी करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. एका झोन कार्यालयात तीन या प्रमाणे नऊ झोन कार्यालयात २७ यंत्र खरेदी केले जाणार आहेत. खरेदीच्या निवीदा पालिका प्रशासनाने अंतिम केल्या असून त्या मंजुरीसाठी स्थायी समितीच्या समोर ठेवल्या आहेत. स्थायी समितीने निविदा मंजूर केल्यास पुढील पंधरा दिवसात यंत्र खरेदीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बायपास झालेल्या वडिलांनी पाय तुटेपर्यंत शोधले

$
0
0

विजय देऊळगावकर, औरंगाबाद

'सकाळी मामाकडे जातो म्हणून घराबाहेर पडला. संध्याकाळी पाच वाजता त्याने फेसबुकवर पोस्ट टाकल्याचे मित्रांनी सांगितले. त्याच्या आईने व मी रात्री अकरापर्यंत खूप-खूप शोधले, पण तो सापडला नाही. रात्री बारा वाजता पोलिस घरी आले आणि त्यांच्याकडून खरा प्रकार समजला. परवाच (२७ जुलै) त्याचा वाढदिवस झाला. आई कपडे घेऊन देते म्हणाली. त्यालाही त्याने नकार दिला. त्याला आम्ही काहीच कमी पडू दिले नाही हो,' वाक्य संपताच प्रमोद यांचे वडील जयसिंग पाटील यांनी हंबरडा फोडला. सगळे घर पुन्हा दु:खाच्या न संपणाऱ्या खाईत लोटले. त्यांना बोलतानाही पुढे विचारणार काय, कसे, अशा नाना प्रश्नाने डोक्यात थैमान माजले होते. हे दु:ख शब्दांमध्ये सांधणारे नव्हतेच.

'प्रमोद पाटील यांच्या घरी वृद्ध आई वडील, मोठा भोळसर भाऊ, वहिनी, पत्नी व दोन मुले असा परिवार. त्यांचे वडील जयसिंग होरे-पाटील हे मूळ अंबुलगा (ता. निलंगा, जि. लातूर) येथील रहिवासी. ३८ वर्षांपूर्वी ते शहरात नोकरीसाठी आले. चिकलठाणा एमआयडीसी भागातील एवरेस्ट केंट नावाच्या कंपनीत ते कामाला होते. मात्र दहा वर्षांपूर्वी कंपनी बंद पडल्याने ते घरीच आहेत. त्यांना दोन वेळेस ह्रद्यविकाराचा झटका आला. दोन्ही वेळेस बायपास शस्त्रक्रिया देखील झाली. प्रमोद यांना नोकरी लागत नसल्याने वडिलांनी त्यांना घराच्या खाली दुकान टाकून देण्याची तयारी दर्शवली. मात्र प्रमोद यांना व्यवसायात रस नव्हता. गेल्या काही दिवसांपासून ते मामाकडे कामाला जात होते. रविवारी सकाळी देखील ते बाहेर जाऊन येतो असे सांगत घराबाहेर पडले. मात्र ते मामाकडे गेलेच नाहीत. सायंकाळी पाच वाजता त्यांच्या वडिलांना त्यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट त्यांच्या मित्राकडून समजली. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी दोन ते तीन तास शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. चार दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस झाला. त्यांना फेसबुक वॉलवर अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आई नवीन कपडे घेऊन देते म्हणाली, तेव्हा त्यांनी नकार दिला. आम्ही लहानपणापासून कोणत्याच गोष्टीची कमी ठेवली नव्हती,' असे म्हणून इतका वेळ पाझरणाऱ्या होरे-पाटील यांच्या अश्रूचा बांध आता फुटला होता. तो कधीही न थांबण्यासाठीच...

\Bआईने केला जेवणासाठी फोन

\Bप्रमोद घराबाहेर पडले, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा मोबाइल होता. रात्री नऊ वाजता त्यांच्या आईने त्याला फोन करून जेवणासाठी घरी बोलावले. यावेळी त्यांनी 'तुम्ही जेवण करून घ्या,' असा निरोप दिला. यामुळे त्यांच्या आई - वडिलांनी त्यांचा सिडको बसस्थानकापर्यंत पायी फिरत शोध घेतला. अखेर अकरा वाजता कंटाळून ते घरी परतले. एका तासाने बाराच्या सुमारास पोलिस त्यांच्या घरी आल्यानंतर प्रमोदने या जगाचा निरोप घेतल्याचे समजले.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुकुंदवाडी भागातील एका तरुणाने रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केली. रविवारी रात्री साडेनऊ ते बारा वाजेच्या दरम्यान हा प्रकार मुकुंदवाडी परिसरात घडला. प्रमोद जयसिंग होरे पाटील (वय ३१, रा. ज्ञानेश्वर कॉलनी) असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर दोन वेळेस पोस्ट अपलोड करीत रेल्वे रुळावर सेल्फी घेतलेला फोटो देखील अपलोड केला होता. सोमवारी दुपारी मुकुंदवाडी स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात प्रमोदवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, प्रमोदच्या मृत्यूनंतर मुकुंदवाडी चौकात संतप्त नागरिकांनी दगडफेक करीत तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रमोद पाटील हा रविवारी सकाळी मामाच्या कंपनीत कामाला जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. दरम्यान, केंब्रीज चौकात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. दुपारी दोन वाजून ३२ मिनिटांनी प्रमोदने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट अपलोड केली. यामध्ये 'चला आज एक मराठा जातोय,… पण काहीतरी मराठा आरक्षणसाठी करा…, जय जिजाऊ…, आपला प्रमोद पाटील', असा उल्लेख आहे. यानंतर प्रमोदने ४ वाजून ५० मिनिटांनी आणखी एक पोस्ट फेसबुकवर अपलोड केली. यामध्ये त्याने रेल्वे रुळावर सेल्फी घेत वरती फक्त 'मराठा आरक्षण जिव जाणार' असा मजकूर टाकला होता. दुसरी पोस्ट अपलोड झाल्यानंतर त्याच्या फ्रेंडलीस्टमध्ये असलेल्या मित्रांनी ती पाहिली, यानंतर खळबळ उडाली. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही. रात्रीच्या सुमारास त्याने रेल्वे समोर उडी मारत आत्महत्या केली. पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर त्याची ओळख पटविण्यात आली. मध्यरात्री पोलिसांनी त्याचे घर गाठून ही माहिती दिली. सोमवारी सकाळी घाटी हॉस्पिटलमध्ये प्रमोदच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दुपारी चार वाजता मुकुंदवाडी स्मशानभूमीत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यावेळी होती.

ग्रामसेवक होण्याची इच्छा अपूर्ण

प्रमोदचे शिक्षण बीएससीपर्यंत झाले होते. त्याने ग्रामसेवकाचा कोर्स पूर्ण पुर्ण केला होता. मात्र, सात वेळा परीक्षा देऊनही त्याला यश प्राप्त झाले नव्हते. प्रमोद हा विवाहित असून त्याची पत्नी बीड जिल्ह्यात ग्रामसेविका आहे. त्याच्या मागे वृद्ध आई वडील, पत्नी सुषमा, मुले स्वप्नगंधा (वय १२) आणि मुलगा अथर्व (वय ५) असा परिवार आहे. प्रमोदला एक मोठा भाऊ असून तो भोळसर आहे. प्रमोदला व्यवसाय करण्यामध्ये रस नव्हता. गेल्या काही दिवसांपासून तो वाळूज एमआयडीसीत मामाच्या कंपनीत कामासाठी जात असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स. भु. चे कोषाध्यक्ष अॅड्. जोशी यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष अॅड. रामकृष्ण लक्ष्मणराव जोशी (वय ८२) यांचे सोमवारी ( ३० जुलै) रोजी सकाळी साडेसात वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी दुपारी पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामकृष्ण जोशी १९९२ पासून स. भु. शिक्षण संस्थेचे आजीव सभासद होते. २००३ ते २०१३ या कालावधीत सहकोषाध्यक्ष, तर २०१३ ते २०१८ कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिले. जयहिंद कॉलनीतील साकार मुद्रणालयाचे संस्थापक असलेले रामकृष्ण जोशी यांनी १९७१ ते ८१ या काळात भारत मुद्रक प्रकाशक-जयहिंद प्रिंटींग प्रेसचे सहव्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यापूर्वी ते हैदराबाद येथे याच प्रेसमध्ये काम पाहात होते.

महाराष्ट्र मुद्रण परिषदेत दोन वेळा अध्यक्ष, दोन वेळा उपाध्यक्ष, तर दोन वेळा विभागीय चिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. औरंगाबाद मुद्रक संघात ३७ वर्षे ते कार्यरत होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे ते आजीव सभासद होते. महाराष्ट्र राज्य सहकारी संघात ते विविध पदांवर कार्यरत होते.

\Bआज शोकसभा

\B

अॅड. रामकृष्ण जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. स. भु. शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात ही शोकसभा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचा औरंगाबाद पुणे रूट पुन्हा बंद

$
0
0

औरंगाबाद : सोमवारी (३० जुलै) पुण्यात येथे मराठा आरक्षण आंदोलन चिघळले. हे आंदोलन चिघळल्याने दुपारी चार वाजेपासून औरंगाबाद ते पुणे जाणाऱ्या निमआराम एसटी बस तसेच शिवनेरी बस बंद करण्यात आल्या. तीन वाजेच्या दरम्यान शिवनेरी पुण्याकडे पाठविण्यात आली होती. मात्र, ही शिवनेरी बस नगर येथे थांबविण्यात आली. एसटीवर दगडफेक होऊन नुकसान होऊ नये यासाठी बस बंद करण्यात आली असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजच कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत आता चर्चा नको, कृती हवी आहे, यासाठी शासनाने मंगळवारी (३१ जुलै) संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी सोमवारी (३० जुलै) मराठा क्रांती मोर्चाच्या समन्यकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनोद पाटील यांनी केली.

ते म्हणाले की, कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यासाठी सरकारला सात प्रश्नांचा फॉर्म्युला मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने राज्य सरकारला इमेलद्वारे पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तत्काळ निर्णय घेऊन वैयक्तिकरित्या न सांगता प्रसार माध्यमातून जाहीर करावे. सरकारला समाजाच्या संपूर्ण मागण्या समजल्या आहेत. त्यामुळे आता चर्चा नको कृती आवश्यक आहे. यासाठी आम्ही सरकारला सात प्रश्नांचा पर्याय दिला आहे. सरकारने या संदर्भात निर्णय दिल्यानंतर तसेच मागण्या मान्य झाल्यानंतर समन्वय समिती सदस्यांसोबत चर्चा करून आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगत जोपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत ठिकठिकाणी सुरू असलेले ठिय्या आंदोलन सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत चार तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत, ही समाजाची मोठी हानी आहे. आरक्षणाची ही लढाई युवकांच्याच भविष्यासाठी आहे, त्यामुळे त्यांनी असे कृत्य करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला अभिजित देशमुख, बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात, सुरेश वाकडे, अप्पासाहेब कुढेकर, रवींद्र काळे, रमेश केरे पाटील, चंद्रकांत भराट, मनोज गायके यांच्यासह इतर समन्वयकांची उपस्थिती होती.

कालबद्ध कार्यक्रमातील मुद्दे

कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यासाठी क्रांतीमोर्चाकडून थेट प्रश्नावली, मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. या फॉर्म्युलामध्ये तारखेनिहाय रचना केली असून यामध्ये राज्य सरकारने मागासवर्गीय अहवाल देणेबाबत विनंतीपत्र, अध्यादेश काढण्याची तारीख, अध्यादेश काढताना मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी पूर्णत: स्वीकारणार का?, विशेष अधिवेशनाची तारीख, अध्यादेश काढल्यानंतर अंमलबजावणी त्वरित करणार का? यासह मेगाभरतीमधील जागा त्वरित भरणार का?, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात भरीव तरतूद काय करणार? आंदोलकांवरील गुन्हे, फी माफ सवलत, आंदोलनात मयत झालेल्यांना हुतात्मा जाहीर करावे, अशा मागण्या सरकारला पाठवण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images