Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्राणिसंग्रहालयप्रश्नी आयुक्त लक्ष घालणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

असुविधांमुळे सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याबाबत केद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्याला प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे या प्रकरात आयुक्त स्वत: लक्ष घालणार आहेत.

निकषानुसार पिंजरे व आवश्यक सुविधा, प्राण्यांना मोकळेपणाने फिरण्यासाठी जागा, किमान २५ एकर क्षेत्रफळ, मिनी ट्रेनद्वारे होणारे प्रदुषण, खाद्य पदार्थाची दुकाने आदीबाबत आक्षेप घेत तीन महिन्यांपूर्वी सूचना करण्यात आल्या होत्या. त्याची पूर्तता न केल्यास प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मास्टरप्लानची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. सोमवारी महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत त्याचा आढावा घेण्यात आला. तीन महिन्यात काहीच काम झाले नसल्याने आयुक्त व महापौरांनी नाराजी व्यक्त केली. प्राणिसंग्रहालयाच्या प्रकरणात आपण स्वत: लक्ष घालू असे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. त्यानुसार चार ऑगस्ट रोजी ते प्राणिसंग्रहालयाची पाहणी करणार आहेत. मिटमिटा भागात पालिकेतर्फे सफारी पार्कचे काम केले जाणार आहे. यासाठी उपअभियंता शेख खमर यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

\Bपिवळे वाघ मागितले\B

मुंबईच्या वीर माता जिजाऊ प्राणिसंग्रहालयाने महापालिकेला पत्र पाठवून दोन पिवळ्या वाघांची (बेंगॉल टायगर) मागणी केली आहे. त्या बदल्यात सांबर, नील गाय, माकड हे प्राणी देण्याची तयारी दाखवली आहे. वाघ देणार असू वाघाच्याच तोलामोलाचा प्राणी घ्या, अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागरी सुविधेसाठी सातारकरांचे निवेदन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी करणारे निवेदन या भागातील नागरिकांनी सोमवारी महापौरांना दिले. सातारा-देवळाईतील सोईसुविधांच्या डीपीआरसाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. डीपीआरच्या कामाचा प्रारंभ दोन दिवसात होईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.

भाजप महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस सविता कुलकर्णी यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. समांतर जलवाहिनीचे पाणी द्या, रस्त्यांची कामे प्राधान्याने करा, पथदिव्यांची संख्या वाढवावी, बंद पथदिवे सुरू करा, भटक्या कुत्र्यांना आवर घाला, डास निर्मूलनासाठी सर्वत्र औषध फवारणी करा, समस्या सोडवण्याकरिता कृती कार्यक्रम तयार करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षण: आणखी एका तरुणाची आत्महत्या

0
0

बीड :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. केज तालुक्यातील विडा गावातील ही घटना असून अभिजीत बाळासाहेब देशमुख (३५) या तरुणाने चिठ्ठी लिहून ठेवत झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी विडातील ग्रामस्थांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

अभिजीतने सोमवारी रात्री आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. अभिजीत विज्ञान शाखेचा पदवीधर (BSc.) होता. मात्र, नोकरी नसल्याने त्याला नैराश्य आले होते. त्यात त्याची घरची परिस्थितीही नाजूक होती. या सर्वाला कंटाळून त्याने चिठ्ठी लिहून ठेवत आत्महत्या केली. मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज तसेच औषधोपचारांचा खर्च यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे.

अभिजीतच्या आत्महत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह स्वीकारण्यात येणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेली ही पाचवी आत्महत्या आहे. २२ जुलै रोजी औरंगाबादमधील कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर जगन्नाथ सोनवणे (गंगापूर-औरंगाबाद), कचरू दिगंबर कल्याणे (नांदेड), प्रमोद होरे पाटील (औरंगाबाद) अशा आणखी तिघांनी आपली जीवनयात्रा संपवली. अभिजीतच्या आत्महत्येने मराठा आरक्षणासाठी पाचवा बळी गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुलतानपूर येथे दीड तास रास्ता रोको आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी खुलताबाद-फुलंब्री रोडवरील सुलतानपुरात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. बाजारसावंगी येथे बसवर दगडफेक केल्याप्रकरणी पाच ते सात मराठा समाजातील युवकांवर खुलताबाद पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे यासह विविध मागण्या आंदोलकांनी निवेदनात केल्या आहेत. प्रभारी तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. सुलतानपूरसह भांडेगाव, माटरगाव, वडोद कन्होबा, वडोद खुर्द, खांडीपिपंळगाव, कानडगाव, देवळाण्यातील मराठा समाजाने एकत्र येऊन रास्ता रोको केला. अचानक सुरू झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहणधारकांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मन्याड तलावातील जलसमाधी रोखली

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील पारळा येथील मन्याड साठवण तलावात जलसमाधी घेण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न मंगळवारी फसला. जीवरक्षकदलाच्या जवानांनी पाण्यातून चौघांना बाहेर काढले. मन्याड येथील साठवण तलावावर मंगळवारी मराठा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशाने महसूल, पोलिस, आरोग्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, जीवरक्षक दल, रुग्णवाहिका, अग्निशामन दल, बोटी आदी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. कायगाव टोका येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार सुमन मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्वरित उपाययोजना केल्या. जिल्हाधिकारी घटनास्थळी येईपर्यंत तलावाजवळून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानंतर डॉ. सानप यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील चिकटगावकर यांच्यासोबत व्हीडिओ कॉलद्वारे संवाद घडवून आणला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भागिनाथ मगर, राजेंद्र मगर, संतोष सूर्यवंशी, अमोल निकम उपस्थित होते. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी उदय चौधरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारून मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

\Bतलावातून काढले बाहेर \B

सकाळी अकरा वाजता अजय साळुंके, चंद्रशेखर साळुंके, संतोष निकम, सोमनाथ मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तलावाजवळ जलसमाधी घेण्यासाठी दाखल झाले. चिकटगाव येथील रहिवासी देविदास निकम या तरुणाने पाण्यात उडी मारली. त्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर काही तरुणांनीसुद्धा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ झोन मध्ये होणार कचऱ्यावर प्रक्रिया, २७ मशीन्स खेरदीच्या निवीदेला मंजूरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील नऊ झोनमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २७ मशीन्स खरेदी करण्याच्या निविदेला मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. येत्या १५ दिवसांत मशीन्स प्राप्त होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत नऊ स्क्रिनिंग मशीन्स, नऊ श्रेडींग मशीन आणि नऊ बेलिंग मशीन अशा एकूण २७ मशीन्सचा पुरवठा करण्यासाठी व प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी महापालिकेने निविदा काढली होती. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार तीन निविदा न आल्यामुळे पालिका प्रशासनाला मशीन्सचा पुरवठा करण्यासाठीची निविदा तिसऱ्यांदा काढावी लागली. तिसऱ्यांदा निविदा काढल्यानंतर दोन निविदा प्राप्त झाल्या. यापैकी नागपूर येथील मे. वेस्ट बिन सोल्युशन्स या कंपनीची निविदा प्रशासनाने मान्य करून ती अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीच्या समोर ठेवली. मंगळवारी स्थायी समितीने या निविदेला मंजुरी दिली. प्रक्रिया प्रकल्प उभारून तो दहा वर्षांपर्यंत चालवणे व सांभळणे हे काम देखील या कंपनीला करावे लागणार आहे.

मशीन्सचा पुरवठा करणे, देखभाल दुरूस्तीसह त्याचा सांभाळ करणे यासाठी महापालिका कंपनीला पेमेंट करणार आहे. मशीन्स खरेदीसाठी दोन कोटी ७५ लाख ६ हजार २५० रुपये कंपनीला दिले जाणार आहेत तर देखभाल दुरूस्तीसह मशीन्सचा सांभाळ करण्यासाठी दर महिन्याला तीन लाख ७६ हजार २०० रुपये महापालिका कंपनीला देणार आहे. निविदा मंजूर झाल्यावर कंपनीला कार्यादेश देण्यात येतील. त्यानंतर १५ दिवसात मशीन्स उपलब्ध होतील, असे घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले.

शेडचा उल्लेख नाही

मशीन्स खरेदी करून प्रक्रिया प्रकल्प उभारणे या कामासाठी मे. वेस्ट बिन सोल्युशन्स या कंपनीची निविदा मंजूर केल्यानंतर नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी मशीन्सवर शेड बांधण्याचा विषय काढला. शेड बांधण्यासह स्थापत्य विषयक कामांचा उल्लेख निवीदेत आहे का, असे त्या म्हणाल्या. यावर अधिकारी म्हणाले, या कामाचा उल्लेख करावा लागणार आहे. अधिकाऱ्याच्या अशा खुलाशामुळे नगरसेवक आश्चर्यचकित झाले. वाडकर म्हणाल्या, अगोदर मशीन खरेदी आणि नंतर शेडच्या बांधकामाची निविदा, असे कसे काम करता. सभापतींनी अगोदर शेडचे बांधकाम करा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत धार्मिक स्थळ याचिकेवर २८ ऑगस्टला सुनावणी

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना याचिकेत प्रतिवादी करण्याची विनंती करणारा दिवाणी अर्ज औरंगाबाद खंडपीठात सादर केला. या अर्जात उत्तर दाखल करण्यासाठी प्रतिवाद्यांना २४ ऑगस्टपर्यंत शेवटची संधी दिली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याबाबतच्या याचिकेत विद्यापीठाने अर्ज दाखल केला.

शहराच्या विकास आराखड्यावर परिणाम करणारी अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने सर्वप्रथम २० फेब्रुवारी २०१४ रोजी दिला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश २१ जुलै २०१७ रोजी देण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांची यादीही तयार केली होती. दुसऱ्या दिवशी २२ जुलै २०१७ पासून अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्याची घोषणा केली होती. यासाठी महापालिकेला सहकार्य करण्यास पोलिस यंत्रणा तयार असल्याचे तत्कालीन पोलिस आयुक्तांनी निवेदन केले होते. मात्र, कुठलीही कार्यवाही झाली नाही. म्हणून १२ जुलै २०१७ च्या आदेशाची अंमलबजावणी करा अन्यथा न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस बजावण्यात येईल, असे खंडपीठाने सूचित केले होते.

दरम्यान, औरंगाबाद महापालिकेने ३१ जुलै २०१७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नोटीस बजावून विद्यापीठ परिसरातील गणपती मंदिर, चव्हाण विहिरीजवळची कबर, बॉटॅनिकल गार्डन जवळचे छोटे मंदिर, नाट्य विभागाजवळचे मारोती मंदिर, गेस्ट हाऊस जवळचे मारुती मंदिर आणि हॉस्टेलजवळचे बंगाली बाबा मंदिर अशी सहा अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याची नोटीस दिली होती. त्याअनुषंगाने विद्यापीठाने दिवाणी अर्ज खंडपीठात करून याचिकेत त्यांना प्रतिवादी करण्याची विनंती केली आहे.

याचिकाकर्त्यातर्फे प्रदीप देशमुख, विद्यापीठातर्फे अनिल बजाज, इतर याचिकाकर्त्यांतर्फे आनंद भंडारी, खिजर पटेल, गुलाम दस्तगीर, विक्रम धोर्डे, शिवानंद जायभाये, वक्फ बोर्डतर्फे आर. आर. शेख, प्रतिवाद्यांतर्फे अतुल कराड, राजेंद्र देशमुख, एस. व्ही. अदवंत, एस. एस. काझी, एस. एन. पगारे आणि आर. आर. चंदनसे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात पेटलेले आंदोलन आवाक्याबाहेर गेले असून समाजाचा संयम सुटला आहे. त्यामुळे आता सरकारने सकारात्मक पाऊल उचलून कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, तसेच शांततेच्या मार्गाने लढा देण्यासाठी लवकरच राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय सेवानिवृत्त न्यायमुर्ती बी. एन. देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त न्या. देशमुख यांच्या निवासस्थानी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या मार्गदर्शक समन्वयकांची बैठक घेण्यात आली. समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नयेत. तसेच तरुणांनी जाळपोळ, हिंसाचार करू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच राज्यातील ज्येष्ठ मान्यवर व संघटनांच्या नेत्यांना बोलावून त्या बैठकीत सरकार व समाजाला मार्गदर्शन करणारा व्यापक विचार पुढे यावा, असेही या बैठकीत ठरले. यावेळी न्या. देशमुख म्हणाले की, आतापर्यंत अहिंसेच्या मार्गानेच आंदोलने सुरू होती. गेल्या दोन वर्षांत काढण्यात आलेल्या मोर्चामध्येही समाजाने शांततेचा संदेश दिला. असे असतांना सरकार काहीही निर्णय घेत नसल्यामुळे समाजाच्या शांततेचा संयम आता सुटला आहे. त्यामुळे समाजाला शांततेचे आवाहन करणे आवाक्याबाहेर झाले आहे. यासाठी सरकारने तातडीने आरक्षण व इतर मागण्यांबाबत सकारात्मक पाऊल उचलून कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. शहरातील मे महिन्यात झालेली दंगल तसेच कचराप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनानंतर आता आरक्षणाच्या प्रश्नासाठी शहर धुमसत आहे. या सर्व घटनांचा परिणाम उद्योग, शहर, समाज आणि विभागाच्या विकासावर होत आहे, अशी चिंता न्या. देशमुख यांनी व्यक्त केली.

यावेळी आंदोलकांनी जाळपोळ, हिंसेऐवजी अहिंसेने आंदोलन पुढे न्यावे असे आवाहन मानसिंह पवार यांनी केले. या बैठकीसाठी प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, रमेश गायकवाड, प्रमोद खैरनार, प्रदीप पाटील, साकेत भांड, विवेक भोसले यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दंगलप्रकरणातील दहा जणांना जामीन मंजूर

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात ११ मे रोजी उसळलेल्या दंगलीदरम्यान पानदरिबा परिसरातील मालमत्तांची नासधूस करून एका दुकानाला जाळल्याप्रकरणात दहा दंगलखोरांचा नियमित जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव पाटील यांनी २० हजार रुपयांच्या बंधपत्रावर मंजूर केला.

जुन्या शहरात भडकलेल्या दंगलीत दोन्ही गट एकमेकांसमोर लाठ्या-काठ्यांसह भिडले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करून जातीय तणाव निर्माण निर्माण केल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेचे अरुण वाघ यांनी दिली होती. त्याआधारे आरोपींविरोधात जाळपोळ करणे, कट रचणे यासह मालमत्तांची नासधूस केल्याप्रकरणात १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमित इंगळे, करण भानुशाली, राजू क्षीरसागर, देवेश दीक्षित, सुरेश नलावडे, सोमनाथ पाटील, विशाल येसके, नरेंद्र इंगळे, नितेश खंडेलवाल, अमित पावरेकर या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दंगलखोरांनी नियमित जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला असता त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती. या सुनावणीदरम्यान खंडपीठाने २० हजार रुपयांच्या बंधपत्रावर दंगलखोरांचा जामीन मंजूर केला. आरोपींतर्फे राजेंद्र देशमुख, सिद्धेश्‍वर ठोंबरे, झेड. यु. काझी, देवांग देशमुख, आनंद कुलकर्णी, अश्‍विनी सहस्त्रबुद्धे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या नगरसेवकांची नावे जाहीर करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या नगरसेवकांची नावे जाहीर करा, अन्यथा नगरसेवक भ्रष्टाचाराला खतपाणी घालत नाहीत असे जाहीर करा,' असे आदेश महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी प्रशासनाला दिले.

आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी पालिकेतील कर्मचाऱ्यांची व्यापक बैठक घेतली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी पालिकेतील कार्यपद्धचीचा भांडाफोड केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जाणारा छळ, नगरसेवकांकडून उलट्या सुलट्या कामांची केली जाणारी अपेक्षा, त्यासाठी टाकण्यात येणारा दबाव याबद्दल कर्मचारी आयुक्तांशी बोलले. कर्मचाऱ्यांच्या या बैठकीचा उल्लेख भाजपच्या नगरसेविका राखी देसरडा यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. त्या म्हणाल्या, 'किड्याबरोबर गहू रगडले जात आहेत. नगरसेवकांची बदनामी केली जात आहे. ही गंभीर बाब आहे.' यावर सभापती प्रशासनाला उद्देशून म्हणाले, 'भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या नगरसेवकांची नावे जाहीर करा, अन्यथा नगरसेवक असे करीत नाहीत हे जाहीर करा. दोन दिवसात याबद्दलचा खुलासा करा,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावेंची आमदारकी कायम; डॉ. कादरींकडून माघार

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मतदान यंत्रात घोळ करून निवडणूक जिंकल्याचा आक्षेप घेत औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अतुल सावे यांच्या विरूद्ध दाखल केलेली निवडणूक याचिका एमआयएमचे पराभूत उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांनी मागे घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव पाटील यांनी याचिका मागे घेण्यास परवानगी दिली. याचिकाकर्ते कादरी यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगास याचिकेतून वगळले होते.

विधानसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अतुल सावे आणि एमआयएमचे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांच्यात रंगतदार लढत झाली. अत्यंत निसटत्या फरकाने डॉ. कादरी निवडणुकीत पराभूत झाले, केवळ साडेचार हजार मतांनी आमदार सावे जिंकले. निवडणूक निकालानंतर डॉ. कादरी यांनी निवडणूक याचिका दाखल करून सावे यांच्या निवडीस आव्हान दिले. आमदार सावे यांनी ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करून विजय मिळविला, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला होता. प्रारंभी त्यांनी निवडणूक आयोगास प्रतिवादी केले होते. आमदार सावे यांनी आपले उत्तर लिखित स्वरूपात दाखल केले होते. मध्यंतरीच्या काळात डॉ. कादरी यांनी निवडणूक आयोगास प्रतिवादी म्हणून वगळले होते.

मतदान यंत्रात कुठल्याच प्रकारे घोळ करता येत नसल्याचा युक्तीवाद सावे यांचे वकील रामेश्वर तोतला यांनी केला. ज्यांच्यावर मतदान यंत्रात घोळ केल्याचा आक्षेप आहे त्यांनाच प्रतिवादी म्हणून वगळण्यात आले. यामुळे प्राथमिक अवस्थेतच याचिका फेटाळली पाहिजे, असा युक्तीवाद त्यांनी केला. याचिकेत साक्षी पुरावे घेण्याचे काम शिल्लक होते. याचिका मागे घेण्याचे शपथपत्र डॉ. कादरींच्या वतीने खंडपीठात दाखल करण्यात आले. न्यायालयाने यास परवानगी दिली. याचिकाकर्त्यातर्फे एस. एस. काझी, तर प्रतिवादी आमदार सावेंच्या वतीने रामेश्वर तोतला यांनी काम पाहिले. तोतला यांना जी. एस. यादव यांनी सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघुशंका केली म्हणून चाकूने वार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लघुशंका केली म्हणून तरुणाच्या छातीवर चाकूने गंभीर वार करणारा संशयित आरोपी राहुल बाजीराव सोळुंखे याला सोमवारी (३० जुलै) अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी कोर्टात हजर केले असता, शुक्रवारपर्यंत (३ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

याप्रकरणी गजानन मुरलीधर वाखोरे (वय ३३, रा. गजानननगर, औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ जुलै २०१८ रोजी ते विजयनगरकडे जात होते. त्यावेळी उद्यानातील मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी गेले. तेव्हा 'लघवी करण्याची ही जागा आहे का, आता दंड द्यावा लागेल' असे राहुल बाजीराव सोळुंखे (वय १९, रा. भारतनगर, गारखेडा) म्हणाला. त्यावरून दोघांमध्ये वाद होऊन राहुलने वाखोरे यांच्या छातीवर चाकूने गंभीर वार केला. या तक्रारीवरुन भादंवि ३२६ कलमान्वये पुंडलिकनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून संशयिताला सोमवारी अटक करण्यात आली. त्याला मंग‍ळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, गुन्हा करतेवेळी आरोपीने वापरलेले कपडे जप्त करणे तसेच आरोपीच्या साथीदारांचा शोध घेणे बाकी आहे. तसेच फिर्यादीवर अजूनही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत व आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत (३ ऑगस्ट) पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांततेसाठी पोलिस आयुक्तांची शिष्टाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी मंगळवारी सकाळी शहरातील विविध मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. आगामी काळात शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. यानंतर विशेष शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्याची बैठक बोलावत त्यांना पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी मार्गदर्शन केले.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाचा भडका उडाला आहे. शहरातील क्रांती चौकात देखील २१ जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. कायगाव टोका येते २३ जुलै रोजी काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतल्यानंतर २४ जुलै रोजी शहर व जिल्ह्यात हिंसक उमटले होते. त्यावेळी शहरातही तणाव निर्माण झाला होता. तसेच ३० जुलै रोजी मुकुंदवाडीमध्ये प्रमोद पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी रेल्वेसमोर आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुकुंदवाडी परिसरात तीन तास संतप्त जमावाने 'रास्ता रोको' केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी विविध मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. या सर्वांची आयुक्तांनी स्वतंत्र भेट घेतली. यामध्ये मराठा क्रांती मोर्चाची समन्वयक समितीसह इतर मराठा संघटनांचा समावेश होता. शहरात आंदोलन सध्या शांततेत सुरू असल्याने पोलिस आयुक्तांनी याबाबत चर्चेत समाधान व्यक्त केले.

\Bविशेष शाखेच्या बैठकीत मार्गदर्शन\B

पोलिस आयुक्तांनी आयुक्तालय तसेच विविध पोलिस ठाण्यात कार्यरत विशेष व गोपनीय शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. शहरात सध्या सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन, आगामी काळात होणारी आंदोलने यावर चर्चा करीत सूचना केल्या. यावेळी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांआड पाण्याचे नियोजन करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'दोन दिवसांआड पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा, नगरसेवकांना चुकीची माहिती देत पदाधिकाऱ्यांना बदनाम करू नका,' अशा शब्दांत स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

नगरसेविका सत्यभामा शिंदे यांनी पाणीपुरवठ्याचा मुद्दा मांडला. त्या म्हणाल्या, 'माझ्या वॉर्डात सहा-सहा दिवस पाणी येत नाही. असे कसे नियोजन करता.' एमआयएमचे सय्यद मतीन यांनी देखील 'जुन्या शहरात सहा दिवसांआड पाणी पुरवठा होतो, त्यातून मार्ग काढा,' अशी मागणी केली. सभापतींनी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना खुलासा करण्यास सांगितले. मात्र, त्यामुळे नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सभापती कोल्हे यांना उद्देशून म्हणाले, 'पाणी पुरवठ्याबद्दल अधिकारी नगरसेवकांना चुकीची माहिती देतात आणि पदाधिकाऱ्यांना बदनाम करतात. पदाधिकाऱ्यांना बदनाम करणे थांबवा. दोन दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचे आयुक्तांचे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन करा. संबंधित कर्मचाऱ्यांना देखील या संदर्भात योग्य त्या सूचना द्या.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉग स्कॉडवर वृद्ध कर्मचारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'डॉग स्कॉडवरील कर्मचारी वयोवृद्ध झाले आहेत. त्यांच्या बदल्यात दुसरे कर्मचारी द्या अशी मागणी केली आहे, पण कर्मचारी मिळालेच नाहीत,' असे उत्तर देत महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी हतबलता व्यक्त केली. नगरसेविका शिल्पाराणी वाडकर आणि स्वाती नागरे यांनी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मांडला. 'कुत्रे पकडण्यासाठी कर्मचारी येत नाहीत. फोन केला तर उचलत नाहीत,' असे त्या म्हणाल्या. सभापती राजू वैद्य यांनी याबद्दल डॉ. नाईकवाडे यांना खुलासा करण्यास सांगितले. डॉ. नाईकवाडे म्हणाले, 'डॉग स्कॉडमधील तीन कर्मचारी वयोवृद्ध झाले आहेत. त्यांना कुत्रे पकडण्याचे काम आता जमत नाही. त्यांच्या जागी दुसरे कर्मचारी द्या अशी मागणी केली आहे, पण अद्याप दुसरे कर्मचारी देण्यात आले नाहीत.' डॉग स्कॉडसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश सभापतींनी दिले. अधिकारी - कर्मचारी नगरसेवकांनी केलेल्या फोनला प्रतिसाद देत नसतील आणि फोन बंद करून ठेवत असतील, तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही सभापतींनी दिला. शिल्पाराणी वाडकर यांनी क्रांतीचौक वॉर्डातील सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न मांडला. वॉर्ड अधिकारी व नगरसेवकाला न सांगता सफाई कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. रमानगर येथे कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात भेट देण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे येणार होते. तीन वेळा आश्वासन देवूनही ते आले नाहीत, अशी तक्रार वाडकर यांनी केली. सभापतींनी या संदर्भात योग्य ती दखल घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामाजिक विषमतेवर शिक्षणच प्रभावी माध्यम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आता आपले स्वप्न देशातील निरक्षरता, सामाजिक विषमता सामाजिक व आर्थिक बदल दूर करणे हे असायला हवे, असे महात्मा गांधी म्हणाले होते. सामाजिक बदलांसाठी एकमेव माध्यम म्हणजे शिक्षण. दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षातही आपण सामाजिक विषमतेच्या जोखडातून बाहेर पडलो नाही. आता तुम्हा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. सदैव जिज्ञासू बनून सत्याचा शोध घ्या आणि सदैव पुस्तकाची श्रीमंती बाळगा, असे आवाहन यूजीसीचे माजी अध्यक्ष प्रा. वेद प्रकाश यांनी केले. मंगळवारी (३१ जुलै) एमजीएमच्या रूक्मिणी सभागृहात महात्मा गांधी मिशनच्या इन्स्टिट्यूट (एमजीएम) ऑफ हेल्थ सायन्स अभिमत विद्यापीठाचा नववा पदवीदान समारंभ पार पडला. त्यावेळी प्रा. वेद प्रकाश मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

व्यासपीठावर एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, कुलपती डॉ. नारायण खेडकर, कुलगुरू डॉ. शशांक दळवी, परीक्षा नियंत्रक डॉ. नितीन कदम, प्रबंधक डॉ. राजेश गोयल, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, अधिष्ठाता जी.एस. नरशेट्टी, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुश कदम, विश्वस्त प्रताप बोराडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या नवी मुंबई व औरंगाबाद येथील हेल्थ सायन्सच्या ५५१ पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये मेडिकल, नर्सिंग, फिजिओथेरपी व अप्लाइड सायन्स शाखेतील ४७७ विद्यार्थी उपस्थित होते. अतिशय शिस्तपूर्ण सोहळ्यास विद्यार्थांसह पालकही उपस्थित असल्याने कँम्पसमध्ये प्रोजेक्टर लावण्यात आले होते.

प्रा. वेद प्रकाश यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत एमजीएम संस्थेचे अभिनंदन केले. ते म्हणाले, 'शैक्षणिक संस्था सुरू करणारे विचार दूरगामी असतात. शिक्षण हा विचार आहे. शिक्षणानेच व्यक्तीच्या जीवनात सुसूत्रता येते. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम इथे होते. पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात मर्यादित संसाधने असूनही आपली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. तरीही प्रत्येक शैक्षणिक संस्थेने, शिक्षकांनी स्वतःचे सातत्याने परीक्षण करायला हवे. आपल्याकडचे अभ्यासक्रम, त्याची उपयोगिता पहायला हवी. कोणतेच विद्यापीठ कधीच सर्वोत्तम असूच शकत नाही. गुणवत्ता, सातत्य व नाविण्याचा शोध घेण्याचे कार्य विद्यापीठाने करायलाच हवे, पण आपल्याला एक सवय जडली आहे. जी गोष्ट किचकट वाटते आपण ती आपण सोडून देतो. अवघड आहे पण करून पाहू हा विचार करणे शिका.'

पदवीदान कार्यक्रम नवी मुंबई व औरंगाबाद असा क्रमाक्रमाने घेतला जातो. यावेळी १ सुपरस्पेशॅलिटी, १६ पीएचडी, २७ एम.एस., ६६ एम.डी., २१५ एमबीबीएस आदी पदवी प्रदान करण्यात आल्या. मुख्य कार्यक्रम संपल्याची घोषणा होताच संपूर्ण कॅम्पसमध्ये एकच गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांवर पालक व शिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत होता. मुलांसोब फोटो काढताना तर अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले होते. यावेळी उपाधिष्ठा डॉ. प्रवीण सूर्यवंशी, प्रा. डॉ. एस .एच. तालिब, डॉ. शिल्पा देशमुख, डॉ. एस. एन. कदम, अशोक पाटील आदी उपस्थित होते. डॉ. अनुप्रिया महर्षी यांनी सूत्रसंचालन केले.

आयुष्यभर विद्यार्थी बनून रहा

प्रा. वेद प्रकाश यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे अॅडिक्ट होऊ नका, असे आवाहन केले. नको त्या गोष्टीचा ताण घेण्यापेक्षा स्वतःचा स्ट्रेस मॅनेज करणे शिका. आयुष्यभर विद्यार्थी रहा. पुस्तकांना तुमचे मित्र करा. एक वेळ चैनीच्या गोष्टी बाजूला करा, पण पुस्तकांचा खजिना तर हवाच. कामाच्या ठिकाणी तुमचे ग्रंथालय हवे. आयुष्यात यशापेक्षा अपयश कदाचित जास्त येते, पण यशाचा मार्ग हा कठीण परिश्रमातून जातो. यासाठी तुमचा अॅटिट्यूड विकसित करा. अॅटिट्यूडसाठी स्वयंशिस्त व नम्रता हवी. आपल्याला दुसर्यांविषयी खूप जास्त माहिती असते, पण अंतर्मनात डोकवा आणि सर्वप्रथम स्वतःची ओळख करून घ्या, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय महामार्गावर मुरमा फाटा येथे रास्ता रोको

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंगळवारी सकल मराठा समाजातर्फे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतूक एक तास ठप्प झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. नायब तहसीलदार फोलाने व पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि अभिजित मोरे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात राजू भुमरे, जिजा भुमरे, एकनाथ फंटांगडे, बप्पा चावरे, दिनकर मापारी, अतुल देशमुख, राजू मापारी, पवन गटकाळ, शिवदीप भुमरे, सत्यनारायण नरवडे, आप्पासाहेब साबळकर, आप्पासाहेब शेळके, ऋषी काटे, मनोज गायकवाड, एकनाथ मापारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार सांवगी येथे बस जाळण्याचा प्रयत्न

0
0

म. टा.प्रतिनिधी, खुलताबाद

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता खुलताबाद तालुक्यातील बाजारसांवगी येथील ज्ञानकुंज महाविद्यालयासमोर एस. टी. बसची तोडफोड करून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी बस विझवली. बसचालक देवराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सहा आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद ते दरेगाव बसमधील (एम. एच. २० डी. ८४८६) ३१ प्रवाशांना उतरवून दिले. बसच्या काचा, हेडलाइट फोडला. काही आंदोलकांनी टायर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याची चाहूल लागताच आंदोलकांनी मोटारसायकलवरून कन्नड रोडने पळ काढला. युवराज अंबादास नलावडे, कृष्णा अशोक घुले, योगेश प्रभाकर गायकवाड, दादासाहेब उत्तम निकम, अमोल कैलास दहातोंडे, रमेश कारभारी नलावडे, बापू बबन नलावडे यांच्यासह पाच ते सहा जणांवर संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सवेरा’ला दंड भरावाच लागणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणीतील टोलनाक्यांवर अतिरिक्त शुल्क वसुली करणाऱ्या 'सवेरा प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स'ला सव्वा लाखाचा दंड भरावाच लागणार असल्याचा निर्णय छावणी परिषदेच्या मंगळवारी (३१ जुलै) झालेल्या सर्वसाधारण सभेत झाला. विशेष म्हणजे एक ते दीड तास बंद दरवाजाआड आणि माध्यमांना दूर ठेऊन झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर यांनी नंतर स्पष्ट केले.

तब्बल एक ते दीड तास बंद दरवाजाआड व माध्यमांना बाहेर ठेऊन टोलनाक्यासंबंधी कंत्राटदाराला आकारलेल्या दंडाविषयी बैठकीत चर्चा सुरू होती. माध्यमांच्या प्रतिनिधींनी आत जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर काही नगरसेवकांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी वारंवार फोन केल्यानंतर बैठकीसाठी आतमध्ये बोलावण्यात आले. या संदर्भात परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पात्रा यांना छेडले असता, त्यांनी छावणीसंबंधित कोणतीही बाब लपवून ठेवली जाणार नाही, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माहिती देण्याची सूचना केली. त्यानंतर सीईओ नायर म्हणाले, टोलनाक्याच्या कंत्राटदाराला 'बंद' काळातील सात दिवसांची ७५ टक्के करमाफी देण्यात आली आहे. मात्र अतिरिक्त शुल्क वसुलीसंदर्भात कंत्राटदाराला एक लाख २० हजार ८०० रुपयांचा दंड भरावाच लागेल, असा निर्णय परिषदेने घेतला आहे आणि आतापर्यंत कंत्राटदाराने हा दंड भरलेला नाही, असेही नायर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

\Bक्लिनिक नोंदणीबद्दल मत घेणार \B

छावणी परिसरातील अनधिकृत क्लिनिक तसेच रुग्णालयांवर तसेच कारखाने व दारुच्या दुकानांबाबत 'चेंज ऑफ पर्पज'संदर्भात कारवाई करण्यासाठी प्रिन्सिपल डायरेक्टरचे मत घेतले जाणार आहे. त्याचवेळी कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाबाबत महापालिका आयुक्तांशी छावणी परिषदेचे अध्यक्ष बोलणी करणार असल्याचेही सीईओंनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षारोपन करून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली

0
0

औरंगाबाद: मराठा आरक्षणाची मागणी करत जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे यांना जिजाऊ ब्रिगेड व साई फाउंडेशनकडून बीड बायपास परिसरातील अलोकनगर येथील जिजाऊ उद्यानात वृक्षारोपण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा हेमा पाटील व साई फाउंडेशनच्या अध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षा अॅड. वैशाली कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पेरू, पारिजातक, ‌लिंब, कन्हेर अशा वेगवेगळी झाडे लावण्यात आली. या झाडांना संरक्षक जाळ्याही बसवण्यात आल्या. नव्यानेच लावण्यात आलेल्या झाडांना परिसरातील महिलांकडून दत्तक घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या संगीता भुजंग, मेघा थोरात, मनीषा यादव, सिंधू काकडे, रंजना लोखंडे, ज्योती कदम, छाया पाटील, मनीषा थोरात यांच्यासह परिसरातील महिलांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images