Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औरंगाबाद-नगर मार्ग आज राहणार बंद

$
0
0

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे यांचा दशक्रियाविधी बुधवारी (१ ऑगस्ट) कायगाव टोका येथे जुन्या घाटावर होणार आहे. त्यामुळे अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत ठेवण्याचा निर्णय ग्रामीण पोलिसांनी घेतला आहे. यामुळे औरंगाबाद-पुणे मार्गावरील बस बुधवारी सकाळी रद्द करण्यात आल्याचे एस. टी. महामंडळाने कळवले आहे. दशक्रियाविधीला जिल्ह्यातून गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अहमदनगरकडे जाणारी सर्व वाहने बिडकीन- ढोरकीन-पैठण-शेवगाव-पांढरीपूल मार्गे वळवली आहेत. अहमदनगरकडून औरंगाबादकडे येणारी सर्व वाहने पांढरीपूल, शेवगाव, पैठण, ढोरकीन, बिडकीन मार्गे येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पळसवाडीतल्या विस्तापितांची पुनर्वसनासाठी निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद-धुळे महामार्गात खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावातील शेकडो कुटुंब विस्थापित होणार असून, या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी मंगळवारी (३१ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ आणि स्वराज अभियान-स्वराज इंडिया संघटनेने निदर्शने केली.

पळसवाडीतील सरकारी झोपडपट्टीतून हा महामार्ग जात असल्यामुळे येथील ३५ घरे बाधित होणार आहेत. ही झोपडपट्टी सरकारनेच १९७५ साली वसवली होती. सरकारने येथील जमीन संपादित करुन २६० घरकुले बांधून दिली. आता महामार्गामुळे येथील घरकुले, ग्रामपंचायत कार्यालय, दवाखाना, शाळा, बुद्धपुतळा, समाज मंदिर आदी विस्थापित होणार आहे. या सर्वांचे पुनर्वसन करावे. सरकारने घरकुले बांधून दिलेल्या जमिनीवर आता मूळ मालकाचे वारसदार हक्क सांगत असून, या लोकांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही निदर्शकांनी केली आहे. आंदोलनात स्वराज इंडियाचे सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, कासमभाई, मराठवाडा लेबर युनियनचे देविदास कीर्तीशाही, देवचंद अल्हाट, पळसवाडीच्या सरपंच चंद्रकला ठेंगडे, उपसरपंच इंदू गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सोमनाथ ठेंगडे, गौतम भालेराव, शिवाजी गायकवाड, लक्ष्मी भालेराव, केसर पवार यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांच्या राजीनाम्याची महापालिकेत चर्चा

$
0
0

औरंगाबाद : मराठा क्रांती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काही नगरसेवक राजीनामा देणार असल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर महापालिकेत होती, पण सायंकाळ पर्यंत कुणीच राजीनामा देण्यासाठी फिरकले नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा क्रांती आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत काही आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्याचे लोण स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिवसभर महापालिकेत मराठा समाजातील काही नगरसेवकांच्या राजीनाम्याची चर्चा होती. महापौर नंदकुमार घोडेले यांनाही त्या संदर्भात फोन आले होते. त्यामुळे नगरसेवक राजीनामा देण्यासाठी येतील असे मानून महापौर सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कार्यालयात होते, पण कुणीच आले नाही. त्यामुळे नगरसेवकांच्या राजीनाम्याची चर्चा ही केवळ चर्चाच राहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकलीवर बलात्कार, सात वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मामा म्हणणाऱ्या घराजवळच्या सहा वर्षीय चिमुकलीला मंदिरात फिरवून आणतो, असे सांगून घेऊन जाणारा आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी तुकाराम प्रेमदास पवार याला सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी मंगळवारी (३१ जुलै) ठोठावली.

याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. त्यानुसार, २७ फेब्रुवारी २०१६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी तुकाराम प्रेमदास पवार (वय २१, रा. औरंगाबाद) हा मंदिरात फिरवून आणतो, असे सांगत मुलीला घेऊन गेला आणि रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास तिला घरी आणून सोडले. त्यावेळी पीडित मुलगी भेदरलेली दिसली, ती घाबरून रडत होती. त्यामुळे आईने विश्वासात घेऊन विचारले असता, 'मामाने घरी नेले, आतून कडी लावून घेतली व लैंगिक अत्याचार केला व खूप पोट दुखत आहे' असे सांगितले. या घटनेनंतर आरोपीने पीडित मुलीला चॉकलेट घेऊन दिले व 'मंदिरात गेल्याचेच घरी सांग', असेही बजावले होते. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी घराजवळ राहणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोस्को) ३ सह ४ कलमान्वये जवाहर कॉलनी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावे‍ळी, सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये पीडित मुलगी, तिची आई व डॉक्टरांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरुन आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच पीडित मुलीला योग्य नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही कोर्टाने जिल्हा न्याय व विधी प्राधिकरणाला दिले.

\Bसीए रिपोर्ट ठरला महत्त्वाचा\B

खटल्यावेळी, वैद्यकीय अहवालाबरोबरच केमिकल अॅनॅलिसिस (सीए) रिपोर्टही महत्त्वपूर्ण ठरला. पीडित मुलीच्या फ्रॉकवर तसेच घटनेवेळी खाली अंथरलेल्या गोधडीवर आरोपीचे वीर्य आढळून आले व त्याची नोंद 'सीए रिपोर्ट'मध्ये झाली. याचीही दखल कोर्टाने निकाल देताना घेतली7/31/2018 8:22:44 PM.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या चौघांनाही लहुचा १५ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भागीदाराला गंडा घालणारा ठेकेदार लहू जाधव याने कोल्हापूरच्या वाहनधारक व मशीन सप्लायर्सची देखील पंधरा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या चौघांनी कोल्हापूर येथील शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या चौघांनी मंगळवारी गुन्हे शाखेत येऊन कैफियत मांडली.

कोल्हापूर येथील जगन रामचंद्र सुळेकर, चंद्रकांत बाबुराव चौगले, अशोक महादेव चौगले व सुजाता सुरेश रावळ या चौघांचा अर्थ मुव्हर्सचा व्यवसाय आहे. २०१५ मध्ये संशयित आरोपी लहू जाधव, भरत जाधव व संजय सानप (सर्व रा. बीड बायपास) या चौघांकडे आले होते. सिडको कॅनाट गार्डन येथे एस. एन. कन्स्ट्रक्शन कंपनी असून आम्हाला वाहने व मशीन भाड्याने देण्याबाबत करार करावयाचा असल्याचे सांगितले. विजापूर येथील एनटीपीसी पॉवर प्लँट येथे रेल्वे मार्गाच्या कामासाठी मशीनरी व डंपर भाड्याने नेले. ही मशीनरी व डंपरचा वापर करीत काम करून घेतले. मात्र ठरलेल्या कालावधीचे भाडे चौघांना दिले नाही. भाड्यासाठी ते औरंगाबादेत हेलपाटे मारत होते. मात्र लहू जाधव इतरांनी त्यांना भेटणे टाळले. लहू जाधवला १८ जुलै रोजी अटक केल्याची माहिती समजल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली. सुळेकर, चौगले व रावळ यांनी वाहनांच्या बिलाच्या पुराव्यासह शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर मंगळवारी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांची भेट घेतली. याप्रकरणी पीएसआय अमोल देशमुख यांनी या चौघांचे जबाब नोंदवले आहेत.

\Bआतापर्यंत सव्वा कोटीचा गंडा \B

आरोपी लहू जाधव व साथीदारांविरुद्ध अनेक तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. यामध्ये अंकित मुथियान या भागीदाराला ६१ लाखांचा गंडा, तसेच शहरातील तीन जण, मुंबईचे दोघे व कोल्हापूरचे चौघे असे मिळून दहा तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. यामध्ये फसवणुकीचा एकूण आकडा एक कोटीच्यावर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्ट मागणाऱ्याने पळवली दुचाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनोळखी व्यक्तिला लिफ्ट देणे एका तरुणाला चांगलेच अंगलट आले. पाच मिनिटात येतो, असे सांगत त्याने चक्क तरुणाची अॅक्टिव्हा घेऊन पोबारा केला. हा प्रकार रविवारी रात्री साडेनऊ वाजता त्रिमुर्ती चौकात घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर शरद सावजी (वय २४ रा. एसटी सोसायटी, जाधववाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. सागर हे शहागंजमधील राज साडी सेंटरमध्ये कामगार आहेत. ते रविवारी रात्री नऊ वाजता औरंगपुऱ्यात पुस्तक खरेदीला आले होते. परंतु, पुस्तकाचे दुकान बंद असल्याने औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानासमोरून घरी जात होते. त्यावेळी त्यांना एका अनोळखी व्यक्तिने लिफ्ट मागितली. सागर यांनी त्यांना लिफ्ट दिल्यानंतर त्याला दुचाकी त्रिमुर्ती चौकाकडे वाहन घेण्यास सांगितले. त्यानुसार, सागरने त्रिमुर्ती चौकातील मराठा हॉटेलसमोर दुचाकी थांबवली. यावेळी त्याने माझे थोडे काम आहे, तुझी गाडी दे, मी थोड्या वेळात परत येतो, असे सांगत सागरची दुचाकी घेऊन गेला. बराच वेळ उलटला तरी तो दुचाकी घेऊन परतला नाही. त्याने दुचाकी पळवून नेल्याचे लक्षात आल्यानंतर सागरने सोमवारी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहाय्यक फौजदार थोरात हे तपास करीत आहेत.

\Bपोलिसांनाही संभ्रम \B

तक्रारदार सागर हा जाधववाडी परीसरातील रहिवासी आहे. कोणतीही व्यक्ती लिफ्ट सहसा स्वत: जात असलेल्या मार्गावर देते. असे असताना सागरने त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्रिमुर्ती चौकाकडे दुचाकी कशी काय नेली, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रिया कामांची निविदा मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा प्रक्रिया केंद्रांवर विकास कामांसह स्थापत्य विषयक कामे करण्यासाठीचा महापालिका प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला असून, या कामाची निविदा स्थायी समितीने मंजूर केली आहे.

कचरा प्रक्रिया केंद्र ठरविण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठीत केली आहे. समितीने कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी पडेगाव, हर्सूल - सावंगी, चिकलठाणा आणि कांचनवाडी या चार जागा निश्चित केल्या आहेत. यापैकी कांचनवाडी वगळता तीन ठिकाणी प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे यंत्र बसवण्यात येणार आहे. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. पडेगाव, हर्सूल - सावंगी व चिकलठाणा येथे प्रकल्प उभारण्यापूर्वी या तिन्हीही ठिकाणी स्थापत्य विषयक (सिव्हिल वर्क) कामे करण्यासाठी एन. के. कन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली. या कामावर २६ कोटी ६८ लाख १ हजार १४८ रुपये खर्च केले जाणार आहेत. पडेगाव व चिकलठाणा येथे विंड्रो प्रोसेसिंग युनिट उभारले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम आरक्षणासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासोबत मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय आठ दिवसांत घ्या. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जनजागरण महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष मोहसिन अहेमद यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिला.

शहरातील व्हीआयपी फंक्शन हॉल येथे मुस्लिम समाजातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला मुस्लिम अवामी कमिटीचे अध्यक्ष इलियास किरमानी, माजी महापौर रशिदमामू, माजी नगरसेवक इब्राहिम पटेल, माजी नगरसेवक आबेदा बेगम, माजी नगरसेवक मुष्ताक अहेमद, इसाक अंडेवाला, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अॅड सय्यद अक्रम, माजी नगरसेवक फजलउल्लाह खान उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अहेमद म्हणाले, 'मुस्लिम आरक्षण आंदोलनाची दखल शासनाने अजूनही घेतलेली नाही. कोर्टाने पाच टक्के मुस्लिम आरक्षणाला वैध ठरविले. मात्र, पुढील कारवाई होत नाही. लोकप्रतिनिधी हा प्रश्न उचलून धरत नाहीत. त्यामुळे विविध पक्षाचे कार्यकर्ते, सेवाभावी संस्था हा लढा सुरू करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, त्यानंतर विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करू,' असा इशारा त्यांनी दिला. 'शिवसेनेने मुस्लिम आरक्षणाचे समर्थन केले. त्यामुळे भाजपला आरक्षण जाहीर करण्यात काय अडचण आहे,' असा प्रश्न माजी महापौर रशिद मामू यांनी उपस्थितीत केला.

\Bदोन्ही कॉँग्रेस उदासीन

\Bअहेमद म्हणाले, 'रियाजोद्दीन अन्सारी रा. रोषन गेट आणि शेख सुफियान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मुस्लिम आरक्षणाबाबत पत्र लिहिले. मात्र, दोन्ही पक्षांची भूमिका या प्रश्नाबाबत उदासीन आहेत,' असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद-पुणे बससेवा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या दशक्रिया विधीसाठी कायगाव टोका मार्गावरील वाहतूक बुधवारी बंद करण्यात आली होती. त्यासह विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनामुळे औरंगाबाद - पुणे मार्गावरील एसटी वाहतूक दिवसभर बंद ठेवण्यात आली. सायंकाळी तणाव निवळल्याने या मार्गावरची बससेवा सुरू झाली.

औरंगाबाद-पुणे मार्गावरच्या सर्व बस बंद असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून नगर मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता देण्यात आला होता. मध्यवर्ती बसस्थानकातून शिवनेरीच्या १२ फेऱ्या, ४० निमआराम बससह साधी बस सेवाही रद्द करण्यात आली. याशिवाय सिल्लोड, जळगाव, सिडकोसह अन्य बस स्थानकातून औरंगाबाद मार्गे नगर आणि पुण्याकडे जाणाऱ्या बस रद्द करण्यात आल्या होत्या. दुपारी तीननंतर कायगाव टोका पुलावरून वाहतूक सूरू झाली. मात्र अहमदनगरच्या पुढे शिरूर येथे आंदोलन सुरू असल्यामुळे सायंकाळपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे दिवसभरात मध्यवर्ती बसस्थानकाच्या ३७०० किलोमीटरपेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्या. सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत शिर्डीला जाणारी बस सेवाही बंद ठेवण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी बंगल्यातील चंदनचोरांना अखेर अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हाधिकाऱ्याच्या बंगल्यातून चंदनाची झाडे चोरून थेट शासनालाच आव्हान देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. यासाठी पथकाने पिसादेवीच्या पलिकडील आडगाव माऊली येथे बुधवारी पहाटे कोम्बिंग ऑपरेशन केले. एक संशयित आरोपी पसार झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींच्या ताब्यातून चोरीचे पावणे दोन लाखांचे ७० किलो चंदन जप्त केले.

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या किलेअर्क येथील शासकीय बंगल्याच्या आवारात शिरून २७ जुलै रोजी पहाटे चंदनाची तीन झाडे कापून नेण्यात आली होती. या घटनेने पोलिसांत खळबळ माजली होती. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्याच्या बंगल्यातून चोरी झाल्याने गुन्हा उघडकीस आणणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. या चंदन चोरीमागे आडगाव माऊली येथील सराईत चंदनचोरांचा हात असल्याची माहिती खबऱ्याकडून गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली होती. त्यावरून मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे आडगाव माऊली येथे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या कारवाईत संशयित आरोपी मुनीर रशीदखान उर्फ कुऱ्या (वय ३३) व आसीफ जमादार जोनवाल (वय २६ रा. आडगाव माऊली) यांच्या घरावर छापा मारून अटक करण्यात आली. या दोघांनी जिल्हाधिकाऱ्याच्या बंगल्यातून चंदनाची झाडे चोरल्याची कबुली दिली आहे. मुनीर व आसीफ हे दोघेही चंदनचोर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अफरोज शेख, विजय पवार, सहाय्यक फौजदार नजीरखान, तुकाराम राठोड, नवाब शेख, विरेश बने, ज्ञानेश्वर ठाकूर, बबन इप्पर, प्रमोद चव्हाण, अप्पासाहेब खिल्लारे, मच्छिंद्र ससाणे, विजय पिंपळे, गोविंद पचरंडे, किरण गावंडे, हिरासिंग राजपूत व जयश्री फुके यांनी केली.

\Bपावणेदोन लाखांचे चंदन जप्त

\Bसंशयित आरोपी मुनीर व आसीफ हे चंदनाची झाडे चोरून त्याचे खोड आडगाव माऊली येथील ईलीयाजखान नजीरखान याला विकत होते. कोम्बिंग ऑपरेशनवेळी पोलिसांना पाहून ईलीयाज मागच्या दाराने पळून गेला. पोलिसांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पंचांसमक्ष त्याच्या घराची झडती घेतली. त्यात पावणेदोन लाख रुपयांचे ७० किलो चंदन सापडले. हे चंदन पोलिसांनी जप्त केले.

\Bकिर्र अंधारात शोधमोहीम

\B

गुन्हे शाखेने फौजफाट्यासह मध्यरात्री आडगाव माऊली गाव गाठले. पोलिसांची मोहिम सुरू असताना कोणीतरी गावातील विद्युत पुरवठा बंद केला. तरी देखील पोलिसांनी बॅटरीच्या उजेडात पहाटेपर्यंत मोहीम सुरू ठेवत आरोपींना मुद्देमालासह अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीईओं’च्या सिल्लोड भेटीत कर्मचारी गैरहजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी मंगळवारी सकाळी सिल्लोड पंचायत समितीस भेट दिली. यावेळी दहा वाजून गेल्यानंतरही अनेक कर्मचारी गैरहजर आढळले. कौर यांनी हजेरी रजिस्टर ताब्यात घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

मुख्य कार्यकारी अधिकारी कौर या सोयगाव तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार होत्या. तत्पूर्वी त्यांनी सिल्लोड पंचायत समितीस भेट दिली. त्यावेळी अनेक कर्मचारी वेळेवर आले नसल्याचे दिसून आले. काही कर्मचारी औरंगाबादेत कार्यशाळेसाठी गेले होते. पण तीन कर्मचारी दहा वाजून दहा मिनिटांनंतर आल्याचे उघड झाले. कौर यांनी हजेरी रजिस्टर ताब्यात घेऊन स्वाक्षऱ्यांची तपासणी केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर सोयगाव पंचायत समितीमध्ये एमआरएइजीएस, घरकुल योजनेचा आढावा घेतला. अपुरी कामे १५ दिवसांत पूर्ण करा, अशी तंबी त्यांनी ग्रामसेवकांना दिली.

\Bदेवारीत उद्घाटन \B

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते देवारी (ता. सोयगाव) येथे ग्रामपंचायतीने बसविलेल्या आरओ प्लांटचे उद्‌घाटन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या ताब्यातील सहा एकर जागेत वृक्षारोपण करण्यात आले. पाटोदा पॅटर्ननुसार देवारी ग्रामपंचायतीने पीठ गिरणी सुरू केली आहे. आगाऊ कर भरणाऱ्या कुटुंबांना मोफत दळून दिले जाणार आहे. कौर यांनी जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बियाणे तंत्रज्ञान चोरीचा गुन्हा रद्दची याचिका मागे

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

'ग्रीन गोल्ड सीड'चे तंत्रज्ञान चोरून त्यांची 'ग्रीन प्राइड इंडिया ट्रेडर्स' नावाने विक्री करणाऱ्या विजय भानुदास चौधरी व सौरभ विजय यांनी बनावट बियाणे तयार करून बेकायदा विक्री केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. के. एल. वडणे यांनी नकार दिला. त्यानंतर या पिता-पुत्रांनी आपली याचिका मागे घेतली.

विजय चौधरी हे 'ग्रीन गोल्ड'मध्ये संचालक पदावर कार्यरत होते, तर सौरभ चौधरी एचआर विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. याचा फायदा घेत त्यांनी 'ग्रीन गोल्ड'चे तंत्रज्ञान चोरी केले. ग्रीन प्राइड इंडिया ट्रेडर्स प्रा. लि. कंपनी स्थापन करून सदर कंपनीशी 'ग्रीन गोल्ड'चा करार केल्याचे दाखविले. यासंबंधीची फिर्याद वाळूज पोलिस ठाण्यात 'ग्रीन गोल्ड'तर्फे दिल्यानंतर दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दोघांनी मजल मारली. परंतु, त्यांना जामीन मिळाला नाही. दोषारोपपत्र दाखल करण्यास यापूर्वी खंडपीठाकडून दिलासा मिळाला होता. मात्र हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली असता त्यावर प्रदीर्घ सुनावणीअंती खंडपीठाने गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. यानंतर चौधरी यांनी याचिका मागे घेण्याची विनंती केली. खंडपीठाने त्यांना परवानगी दिली. 'ग्रीन गोल्ड'तर्फे रामेश्वर तोतला यांनी काम पाहिले. त्यांना रामानंद करवा, बद्रीनाथ काटे, गणेश यादव यांनी सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोशींना प्रगल्भ विचारांचा वारसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स. भु. शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष अ‍ॅड्. रामकृष्ण जोशी यांना प्रगल्भ विचारांचा वारसा मिळाला होता. त्यांनी ज. रा. बर्दापूरकर, गोविंदभाई श्रॉफ व अनंतराव भालेराव, स. मा. गर्गे यांच्यासोबत काम केले होते. या व्यक्तिंचे गुण त्यांच्यात पुरेपूर उतरले होते. संस्थेचे कोषाध्यक्ष म्हणूनही जोशी यांनी अतिशय सचोटी, प्रामाणिक व निर्भयपणे काम केले,' असे प्रतिपादन न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले.

जोशी यांना संस्थेच्या व शहरातील नागरिकांतर्फे स. भु शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सभेचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर होते. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे सरचिटणीस अॅड्. दिनेश वकील म्हणाले की, रामकृष्ण जोशी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. अत्यंत सुस्वभावी, सुसंस्कृत, शांत, मृदू, कर्तव्यकठोर, काटेकोर, संगीतात रस असलेले आणि राम आणि कृष्ण या दोन्ही नावांना सार्थ ठरविणारे व्यक्तिमत्त्व होते, असे त्यांनी सांगितले. शिस्तबद्ध नियोजनातून काम, मुद्रण संघ भवन अधिवेशनामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. मुद्रक संघाला सशक्त करण्यामागे त्यांनी भूमिका निभावली असल्याचे नंदकिशोर मुळे यांनी सांगितले. यावेळी राम भाले यांनी स. भु.च्या जालना शाखेतर्फे आदरांजली वाहिली. स्नेहशीलता, अहंकारशून्यता, शिस्त, संयम, शांतता व एक चांगला मार्गदर्शक, असे जोशी काका होते. त्यांनी मुद्रण, शिक्षण, सहकार इत्यादी क्षेत्रात मोलाचे कार्य केले, असे स. भु.चे सहचिटणीस ज्ञानप्रकाश मोदाणी म्हणाले. यावेळी शहरातील नागरिक, संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदा जोशी-देशपांडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाचे कार्य पवित्रच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'वैद्यकीय सेवेबरोबरच वैद्यकीय शिक्षणाचे कार्य हे नक्कीच पवित्र आहे. गेली ३२ वर्षे हे कार्य केल्याचे मोठे समाधान आहे आणि हे पवित्र कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल मी रोज देवाला धन्यवाद देते आणि ही संधी रोज मिळो अशी प्रार्थनाही करते. ज्या घाटीने मला गेली ३२ वर्षे लाखो रुग्णांना सेवा देण्याची आणि हजारो विद्यार्थी घडवण्याची संधी दिली त्या घाटीला मी हा पुरस्कार अर्पण करते,' अशा शब्दांत सामाजिक कृतज्ञता पुरस्कारप्राप्त घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य व प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. शांतीलाल देसरडा यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री डॉ. कंचन शांतीलाल देसरडा महाविद्यालयाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलेल्या महनीय व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन बुधवारी (१ ऑगस्ट) गौरविण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. आर. ए. माने व सहाय्यक कुलसचिव डॉ. कैलास बोरसे, डॉ. पी. वाय. कुलकर्णी, अॅड. मनोहर टाकसाळ, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, डॉ. अविनाश ये‍ळीकर, स. सो. खंडाळकर, डॉ. शांतीलाल देसरडा, डॉ. कांचन देसरडा आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमात वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड, डॉ. कानन ये‍ळीकर, 'मटा'चे वरिष्ठ सहसंपादक प्रमोद माने, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या वेळी डॉ. येळीकर म्हणाल्या, 'अभियांत्रिकी शिक्षणापेक्षाही वैद्यकीय शिक्षण अत्यंत निराळे व आव्हानात्मक आहे. या क्षेत्रात अनेक धोके पत्करुन जिवंत रुग्णाला सेवा देतानाच विद्यार्थ्याना रुग्णसेवेचे, उपचारांचे धडे द्यावे लागतात आणि विद्यार्थ्यामधून डॉक्टर घडवावा लागतो. अलीकडे तर घाटीसह बहुतांश शासकीय रुग्णालयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे; तरीही 'कम व्हॉट मे, आय विल प्रुव्ह' अशा जिद्दीने अधिष्ठाता म्हणून दुसरी इनिंग सुरू केली आहे,' असेही त्या म्हणाल्या. त्याचवेळी 'एमबीबीएस' नव्हे आयुर्वेद व होमिओपॅथीचे डॉक्टर हेच ग्रामीण भागांत अधिकतर वैद्यकीय सेवा देत आहे, हे मान्य केले पाहिजे आणि संपूर्ण देशाला केवळ एमबीबीएस डॉक्टर पुरणार नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे,' असेही मत डॉ. येळीकरांनी नोंदविले. 'मनी इज युवर्स, रिसोर्सेस आर सोशल' अशी सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारा किस्सा सांगून, प्रशासनाममध्ये राहून जनतेची कामे करुन आशिर्वाद घेण्याची संधी व समाधान मिळवते, असे मत धानोरकर यांनी व्यक्त केले.' तसेच प्राचार्य राठोड यांनीही आपल्या जीवन प्रवासातील विविध अनुभव विषद करून सामाजिक बांधिलकीचे महत्त्व आपल्या भाषणातून अधोरेखित केले. न्या. देशमुख यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव त्यांच्या मातांसोबत करण्यात आला. तसेच डॉ. देसरडा यांच्यावरील पुस्तिकेचे प्रकाशनही यानिमित्ताने करण्यात आले. हसन इनामदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महसूल प्रबोधिनी सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजप’ला रोखण्यासाठी एकत्र या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अच्छे दिनाचे आमिष दाखवून सत्तेत आलेल्या भाजपने शेतकरी, कामगारांपासून सर्वांची फसवणूक केली. त्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज आहे,' असे आवाहन बुधवारी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कर्णपुरा मैदानावर सुरू झालेल्या १७ व्या अधिवेशनात विविध वक्त्यांनी केले.

धैर्यशील पाटील यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यासह पक्षनेते आमदार जयंत पाटील, प्रवीण गायकवाड, विवेकानंद पाटील, मीनाक्षी पाटील, स्वागताध्यक्ष विकास शिंदे, निवृत्त न्या. बी. एन. देशमुख, माकप नेते नरसय्या आडम, अशोक ढवळे, भाकप नेते प्रा. राम बाहेती उपस्थित होते. यावेळी धैर्यशील पाटील म्हणाले, 'शेकापची ताकद निवडणुकीला फुटपट्टी लावून मोजाता येणार नाही तर पक्षाने आतापर्यंत केलेली चळ‌वळ, लढे यावरून ठरते. शेकाप निवडणुकीतील व्यापार करत नाही तर शेतकरी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी रक्त सांडतो. कसणाऱ्यांच्या नावे शेती करा, यासाठी शिवसेना, मनसे यांनी लढा दिला नाही. त्यासाठी शेकापने संघर्ष केला. विकासाचा हिस्सा शेतकऱ्यांनाच मिळालाच पाहिजे. त्या लढ्यासाठी शेकाप सज्ज आहे,' असा इशारा त्यांनी दिला.

नरसय्या आडम म्हणाले, 'पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन एका व्यक्तीला बारा किलोमीटर पायी जावे लागले. मदत मागूनही सरकारी यंत्रणांनी मदत केली नाही. हेच का मोदी यांचे अच्छे दिन ? कर्जमाफीसह निवडणुकीत दिलेले कोणतेही आश्वासन मोदी सरकारने पूर्ण केले नाही. या विरोधात सर्व पक्षांनी यावे,' असे आवाहनही त्यांनी केले. किसान सभेचे अशोक ढवळे यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, नोटबंदी आदी मुद्यावरून भाजपचा समाचार घेतला. प्रा. बाहेती यांनीही 'रेशीमबागच्या भगव्यापासून सावध राहा,' म्हणत संघावर टीका केली. अधिवेशनाच्या उद्घाटननंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून मांडलेल्या 'शेकाप'च्या वाटचालीच्या संघर्षमय इतिहासाला उपस्थितांची दाद मिळाली.

\Bपवारासह अन्य नेते लवकरच एका व्यासपीठावर

\B'अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून माकपचे सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आदींना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, पोलिस व शासकीय यंत्रणांनी केलेल्या विनंतीमुळे ते येऊ शकले नाही. ही सर्व नेतेमंडळी लवकरच शेकापच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत,' अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा कोटीचा गंडा घालणारा ‘गरिमा’चा संचालक जेरबंद

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन हजार गुंतवणूकदारांना अंदाजे आठ ते दहा कोटींचा गंडा घालणाऱ्या गरिमा रियल इस्टेट अँड अलाईड लिमिटेड कंपनीचा संचालक व बसपाचे माजी आमदार बनवारीलाल कुशवाह याला आर्थिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. धौलपूर, राजस्थान येथील कारागृहातून पथकाने त्याला ताब्यात घेत बुधवारी औरंगाबादला आणले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात २२ जानेवारी २०१८ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वर्ष २०१० मध्ये बन्सीलालनगर येथील विशाल मेगा मार्ट जवळ कंपनीच्या संचालकांनी गरिमा रियल इस्टेट अँड अलाईड लिमिटेड, गरिमा होम्स, साथी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी कंपनी या नावाने विविध कंपन्याची स्थापना केली होती. औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यात देखील या कंपन्याचे कार्यालय उघडले. कंपनीच्या नावाने जाहीर कार्यक्रम, बैठका घेण्यात आल्या. यामध्ये ओळख वाढवून गुंतवणूकदारांना संपर्क करून बोलावून घेतले. आकषर्क परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना मोठ्या मोठ्या रक्कमा गुंतवण्यास भाग पाडण्यात आले. यानंतर कंपनीने कार्यालय गुंडाळून पोबारा केला. याप्रकरणी फसवणूक झालेले गुंतवणूकदार अशोक बापुराव कुऱ्हे रा. बीड बायपास यांनी दिलेल्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात कंपनीचे चेअरमन व बसपाचा माजी आमदार बनवारीलाल माधवसिंह कुशवाह, शिवराम माधवसिंह कुशवाह व बालाकिशन माधवसिंह कुशवाह सर्व रा. जि. धौलपूर राजस्थान तसेच इतर संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धौलपूर कारागृहातून ताब्यात

या प्रकरणातील मुख्य आरोपी बनवारीलाल कुशवाह हा धौलपूर येथील कारागृहात एका प्रकरणात न्यायलयीन कोठडीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी राजस्थान येथे पथक पाठवून आरोपीला कारागृहातून हस्तांतरित करून अटक करण्याची परवानगी दिली. पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर, जमादार कडुबा पुंगळे, महेश उगले, सचिन संपाळ, योगेश तळवंदे, दादासाहेब झारगड यांच्या पथकाने धौलपूर गाठून बनवारीलाल माधवसिंह कुशवाह (वय ३७, रा. धौलपूर) याला ताब्यात घेतले. या प्रकरणी निरीक्षक श्रीकांत नवले तसेच जमादार गणेश शिंदे व कारभारी गाडेकर तपास करीत आहेत.

आतापर्यंत साडेतीनशे तक्रारी प्राप्त

गरिमा प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ३४९ गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधत त्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी जबाब नोंदवले आहेत. तसेच तक्रार अर्जही दिले आहेत. यामध्ये या कंपनीने तब्बल ३ कोटी ४२ लाख ३ हजार ९२७ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्या गुंतवणूकदारांची गरिमा कंपनीकडून फसवणूक झाली आहे. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीचा वर्धापनदिन उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा ५६ वा वर्धापनदिन बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता सुभाष तुपे, अधीक्षक अभियंता, प्रादेशिक अदिकारी सोहम वायाळ, कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, सीएमआयए अध्यक्ष राम भोगले, एमइसीसी अध्यक्ष बी. एस. खोसे, मासिआ अध्यक्ष किशोर राठी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोहम वायाळ यांनी केले. गेल्या ५६ वर्षांत एमआयडीसीने औरंगाबादसह राज्यात आश्वासक वाटचाल केली आहे. कन्नड आणि सटाणा येथे एमआयडीसीसाठी जागा संपादित केली आहे. बदलत्या युगाला अनुसरून आम्हीसुद्धा बदल केले. संगणकीकरण, नवीन पद्धतींचा वापर, उद्योजकांशी सल्लामसलत करून प्लॉटवाटपासह अन्य योजनांमध्ये केलेल्या बदलांचा सर्वत्र फायदा दिसून आला आहे. एमआयडीसीने औद्योगिक विकासासह सामाजिक जडणघडणीमध्येही महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राम भोगले यांनी औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्राच्या ५० वर्षांचा आढावा घेतला. रेल्वेस्टेशन परिसरात ३४ हेक्टरमध्ये सुरू झालेल्या एमआयडीसीने चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा परिसरात विस्तार घडवून शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मासिआचे किशोर राठी म्हणाले, की एमआयडीसीने जागा उपलब्ध करून देण्यापासून विविध पातळीवर सहकार्य केल्याने अनेक कामगारांना उद्योजक होण्याची संधी उपलब्ध झाली. खोसे यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात तुपे यांनी एमआयडीसीने औरंगाबादेत उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे नमूद केले. श्रीखंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर सुधीर सुत्रावे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे यांचा दशक्रिया विधी शांततेत

$
0
0

वाळूज महानगर: मराठा आरक्षण आंदोलनात जलसमाधी देणारे काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी बुधवारी (१ ऑगस्ट) पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कायगाव टोका येथे शांततेत पार पडला. यावेळी कायगाव टोका येथील पुलाचे हुतात्मा स्व. काकासाहेब दत्तात्रय शिंदे, असे नामकरण करून पाटी बसवण्यात आली.

काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन भडकले आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवारी सकाळी दहा वाजता करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातून शेकडो नागरिक उपस्थित होते. विधीनंतर अनूचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुलावरील वाहतूक दुसऱ्या मार्गे वळवण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी घेतला होता़

\Bतगडा बंदोबस्त \B

यावेळी डीवायएसपी अविनाश सोनवणे, पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव, पोलिस निरक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, प्रशांत मुंडे, नेवासा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद गोर्डे यांच्यासह ३० पोलिस अधिकारी, २७८ एसआरपी जवान, ९५ होमगार्ड यांना तैनात केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, वाचविणाऱ्याचेही गेले प्राण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हिंगोली

पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा खदाणीत मृत्यू झाल्याची घटना कवडी तालुका कळमनुरी येथे घडली. या चिमुकल्यांना वाचविण्यासाठी गेलेल्याचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आखाडा-बाळापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कवडी शिवारात बुधवारी सायंकाळी पाच वाजता सुखदेव सुभाष राऊत (वय १४) संभाजी प्रकाश पतंगे (वय १३) ही मुले शाळेतून घरी परतत असताना गावाच्या जवळील खदाणीत पोहण्यासाठी उतरली, पण पोहता येत नसल्याने दोघेही खदाणीत बुडू लागले. या रस्त्यावरून जात असलेले दत्तराव नामदेव पतंगे (वय ४९) यांच्या हे लक्षात येताच त्यांनी मुलांना वाचविण्यासाठी खदाणीत उडी मारली, पण बुडणाऱ्या मुलांनी त्यांना घट्ट मिठी मारल्याने त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेची नोंद आखाडा-बाळापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागीराची हातसफाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कासारी बाजार येथील दोन सराफा व्यापाऱ्यांना सोनसाखळी तयार करून देणाऱ्या कारागीराने फसवणूक करत सात लाखांचे २५० ग्रॅम सोने लंपास केले. हा प्रकार ९ मार्च ते जुलै २०१८ या काळात घडला. याप्रकरणी पसार आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कल्पेश यज्ञेश्वर कपाळे (वय ३५ रा. नगारखाना गल्ली) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, कपाळे याचे कासारी बाजारातील झवेरी कॉम्पलेक्समध्ये प्रल्हाद ज्वेलरी वर्कशॉप आहे. येथे सोन्याचे दागिने तयार केली जातात. शहर व जिल्ह्यातून इतर सराफा व्यापाऱ्यांकडून २४ कॅरेट सोन्याचे तुकडे घेऊन कपाळ‌े कमीशन घेऊन इतर कारागीरांकडून दागिने तयार करून देतात. कपाळे यांच्या कॉम्पलेक्समध्ये राहुल सिद्धेश्वर कदम (रा. घुमटमाळ, विटा, ता, खानापूर, जि. सांगली, सध्या रा. सिटी चौक मशीद समोर) याचे श्री चैन हे दुकान आहे. कदम हे कमीशन तत्वावर सोन्याच्या होलो साखळी तयार करून देतात. कदम यांच्याशी चांगली ओळख असल्याने ९ मार्च रोजी कपाळे यांनी त्यांना वैजापूर येथील सागर उदावंत या व्यापाऱ्यांचे २४ कॅरेटचे १०० ग्रॅम सोने साखळी तयार करण्यासाठी दिले होते. त्यानंतर तीन दिवसांनी सिल्लोड येथील व्यापारी राजू सराफ यांचे ८५ ग्रॅम सोने दुकानातील नोकरासमक्ष दिले होते. नेहमीप्रमाणे दहा ते बारा दिवसानंतर कदम सोन्याच्या साखळ्या करून देणार होते. मात्र, त्यांनी दागिने न दिल्याने कपाळे यांनी मोबाइलवर संपर्क साधला असता दोन ते तीन दिवसात सोनसाखळ्या देतो, असे कदम याने सांगितले. त्यावर कपाळे यांनी विश्वास ठेवला, मात्र पाच दिवसांनंतही दागिने न दिल्याने पुन्हा संपर्क केला. प्रत्येक वेळी त्याने दिल्ली, सातारा येथे असल्याची थाप मारत उडवाउडवीची उत्तरे दिली. कपाळे यांच्याप्रमाणेच त्यांच्या शेजारील सराफा व्यापारी धनंजय जगन्नाथ वडनेरे यांनी देखील कदमला ३५ ग्रॅम सोने साखळी तयार करण्यासाठी दिले होते. त्यांचेही सोने घेऊन कदम पसार झाला. वडनेरे यांना देखील तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. याप्रकरणी कपाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी राहुल कदम विरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक सतीश पंडित हे तपास करत आहेत.

\Bअनेकांची फसवणूक

\B

व्यापारी कल्पेश कपाळे व धनंजय वडनेरे यांचे मोबाइल क्रमांक राहुल कदम याने ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहेत. या दोघांनी त्याच्या श्री चैन दुकानापाशी जाऊन चौकशी केली. तसेच त्याच्या मित्राकडे देखील त्याच्याबाबत विचारणा केली. यावेळी गेल्या काही महिन्यापासून तो दुकानावर आले नसल्याची माहिती मिळाली. तसेच त्याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचे देखील समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images