Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ७७ गुन्हेगारांची धरपकड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध भागात मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत ७७ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांच्या हाती काही हद्दपार, वाँटेड आरोपीही लागले आहेत. काही गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर काही जणांना तंबी देऊन सोडण्यात आले. गुन्हे शाखा तसेच सबंधित पोलिस ठाण्याच्या पथकांनी ही कारवाई केली.

पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या आदेशाने मंगळवारी रात्री साडे दहापासून पहाटे साडे चारपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. शहरातील सतरा पोलिस ठाण्याच्या पथकांसह गुन्हे शाखा, विशेष शाखा यांनी संयुक्तपणे ही शोधमोहीम राबवली. यामध्ये रेकॉर्डवर असलेल्या हिस्ट्रीशीटर तसेच सराईत गुन्हेगारांची घरातून उचलबांगडी करण्यात आली. तसेच हॉटेल, लॉज, ढाबे व वाहनधारकांचीही तपासणी करण्यात आली. पोलिसांनी एकूण ७७ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. या सर्वांना बुधवारी सकाळी पोलिस आयुक्तालयात आणले होते. पोलिस आयुक्तांसमोर हजर केल्यानंतर उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांच्यासमोर प्रत्येक गुन्हेगाराला वैयक्तिकरित्या हजर करण्यात आले. त्यांची चौकशी करीत उपायुक्तांनी काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले असून काही जणांची तंबी देत सुटका करण्यात आली.

\Bकुख्यात गुन्हेगार ताब्यात \B

या कारवाईमध्ये सात हद्दपार, पाच फरार गुन्हेगार, अजामीनपात्र वॉरंट मधील नऊ आरोपी, जामीनपात्र वॉरंटमधील दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. कुख्यात घरफोड्या कलीमखान उर्फ कल्या, संतोष तारासिंग कल्याणी, शिवानंद ठकसेन काळे, धीरज खाकोरडिया, ठकसेन काळे, सचिन त्रिभुवन, शेख हाफीज यांचा कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे.

गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी हे कोम्बिंग ऑपरेशन अचानक करण्यात आले. यामध्ये सापडलेल्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे देखील शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी सातत्याने या प्रकारच्या कारवाया करण्यात येतील.

डॉ. दीपाली धाटे घाडगे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौधर यांची यवतमाळला बदली

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद,

कार पार्क करण्याच्या कारणावरून तहसीलदार, तसेच सुरक्षारक्षकाला मारहाण करणारे विभागीय आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्त मनोज चौधर यांची यवतमाळ येथे बदली करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली.

चौधर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या विभागीय आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्‍त (विकास) जागेवर रोहयोतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौधर यांनी ८ मे रोजी तहसीलदार विजय राऊत आणि सुरक्षारक्षक राठोड यांना कार पार्किंगच्या किरकोळ वादानंतर मारहाण केली होती. या घटनेनंतर महसूल अधिकारी-कर्मचारी संघटनेने विभागीय आयुक्‍त डॉ. भापकर यांची भेट घेऊन चौधर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. डॉ. भापकर यांनी या घटनेबाबत तत्काळ उपायुक्‍तांची समिती नेमून अहवाल मागवला होता. या समितीने चौधर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची तसेच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचा शिफारस करणारा अहवाल दिला होता. त्याआधारे डॉ. भापकर यांनी चौधर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच चौधर यांच्या निलंबनाचा प्रस्तावही शासनाला पाठवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९८ वी जयंती शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासून विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जयंतीचा सकाळपासूनच जल्लोष होता, शहराच्या विविध भागातील तरुणांनी वाहनफेरी, मिरवणूक काढून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.

सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. सकाळी झालेल्या कार्यक्रमामध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, माजी आमदार कल्याण काळे आदींची भाषणे झाली. यावेळी संजय ठोकळ यांनी मातंग समाजाच्या विविध मागण्या मान्यवरांसमोर मांडल्या. यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावे भव्य स्मारक उभारण्यात यावे, लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, अण्णाभाऊ साठे महामंडळास ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, भव्य संशोधन केंद्र उभारण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील, असे आश्वासन हरिभाऊ बागडे यांनी दिले. उपस्थितांचे आभार विजय मगरे यांनी मानले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, मिलिंद अण्णा शेळके, दौलत खरात, अरविंद औचरमल, आशा निकाळजे, कीर्ती ‌शिंदे, सुनील नाडे, सुभाष वाघुले, पंडित गाडे, डॉ. डी. बी. भालेराव, डॉ. ऋषिकेश कांबळे, दिनकर ओंकार, याावेळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद व आमदार सुभाष झांबडे यांनी कार्यक्रमस्थळी येऊन सदिच्छा भेट दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमलेश चांदणे, विलास सौदागर, पुंजाराम जाधव, महेंद्र तुपे, रवि चांदणे, रमेश चांदणे, सुनील अहिरे, मनोज कासारे, भास्कर पारधे, अंबादास हिवाळे, सुधाकर चांदणे, अण्णा वाघुले, किशोर तुपे, सुमीत भटकर, नितीन दाभाडे आदींनी परिश्रम घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल

मुकुंदवाडी - जे सेक्टर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच सद्भावना मित्रमंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष काशिनाथ कोकाटे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सुरजितसिंग खुंगर यांनी परिसरातील सुशोभिकरण व स्वच्छता करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले व उपस्थितांना अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक मोतीलाल जगताप यांनी मान्यवरांसोबत अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरामध्ये वृक्षारोपण केले. यावेळी रुपचंद ठाले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मातंग समाज सद्भावना मित्रमंडळाचे अध्यक्ष दशरथ मानवतकर यांनी केले. प्रमुख उपस्थितांचे स्वागत बाबुराव खरात यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय डिघोळे, उत्तम आसबे, अय्युब खान, संदीपान काळे, दत्तात्रय खजिनदार, फुलचंद जाधव, पवन मुर्शदपुरे, बाबासाहेब शिंदे, हरिश्चंद्र जाधव, ज्ञानेश्वर पगारे, पप्पु गाडेकर, जी.एन. राजेकर, जयदेव म्हस्के, बाबुराव थोरात, बाबुराव थोरात, अभय मानवतकर आदींनी परिश्रम घेतले.

अ.भा. धनगर समाज महासंघ

अखिल भारतीय धनगर समाज महासंघाच्या वतीने जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी मल्हारराव नाचण डांणगावकर, विजय मगरे, सिद्धार्थ दाभाडे, कैलास राजहंस यांच्या हस्ते पुष्पअर्पण करुन अभिवादन केले. यावेळी के.ओ. गोऱ्हे, अॅड. कैलास जामकर, शेषराव दाणे, साहेब लांडे, बळीराम नाचण, अप्पासाहेब साखरे, पंडित डोंगरे, संजय साळवे, सचिन काकडे, आकाश मिसाळ आदींची उपस्थिती होती.

राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किसन सोनवणे, सचिव शेषराव सातपुते यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सोनवणे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर विचार मांडले. या कार्यक्रमास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आडगाव खुर्द येथे जयंती साजरी

तालुक्यातील आडगाव खुर्द येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्तही प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शालेय विद्याथ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, राजकुमार गाजरे यांनी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यर्थ्यांनी आण्णा भाऊ साठे यांचा आदर्श घेतला पाहिजे, त्यांनी दीड दिवस शाळेत जाऊन आपले नाव सातासमुद्रापार नेले. वंचित घटकाचे प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास ठोंबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, माजी सरपंच बाबासाहेब ठोंबरे, आप्पासाहेब ठोंबरे, श्रीधर केदार, जे.के. ठोंबरे, आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौंदर्यवतींसाठी ‘मटा श्रावणक्वीन’चे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हिरव्यागार फुललेल्या वेरूळच्या डोंगररांगा, साद घालणारं म्हैसमाळ...या मनमोहक निसर्गाने आत्ताच श्रावणाचे वेध लागले आहेत...या काळात सौंदर्य कसं फुलून येतं...निसर्गाचं काय घेऊन बसलात, इतक्या रम्य वातावरणात आपल्यालाही आपलं सौंदर्य खुलल्यासारखं वाटतंच....नुकतंच तारुण्यात पाऊल टाकलेल्या तरुणींना तर नक्कीच वाटत असणार...तुमच्या याच सौंदर्याला आणखी खुलविण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' घेऊन आलाय 'मटा श्रावणक्वीन' ही अनोखी स्पर्धा.

मैत्रिणींनो, तुमच्या सौंदर्याचा तुम्ही अभिमान नक्कीच बाळगत असणार. तर मग तुमचे हेच सौंदर्य आणि कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी...अभिनय, मॉडेलिंग जगताची दारे तुमच्यासाठी खुली करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने खास तुमच्यासाठी आणलीय 'मटा श्रावणक्वीन' स्पर्धा. औरंगाबादमध्ये होत असलेल्या या स्पर्धेचं यंदा तिसरं वर्ष आहे. श्रावणाच्या या आनंदी, उत्साहाच्या वातावरणात या मैत्रिणींनो, 'मटा श्रावणक्वीन' मध्ये सहभागी व्हा आणि तुमचे सौंदर्य अन् बुद्धीमत्तेच्या जोरावर बना औरंगाबादची 'मटा श्रावणक्वीन'. स्पर्धेत भाग घेण्यासाठी http://www.mtshravanqueen.com या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करता येईल. सहभागी होण्यासाठी अट एकच आहे ती म्हणजे तुमचे वय १८ ते २५ (अविवाहित) या वयोगटातील असावं. थोडक्यात काय तर कॉलेज तरुणींसाठी ही अनोखी स्पर्धा आहे. चला तर मग, लागा तयारीला.

\Bअधिक माहितीसाठी

\Bस्पर्धेच्या सहभागासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही ९८२२६३०५५५ या क्रमांकावर संपर्कही करू शकता. अथवा 'महाराष्ट्र टाइम्स'च्या साई स्वेअर, दुसरा मजला, उस्मानपुरा सर्कल, औरंगाबाद येथील कार्यालयात येऊनही नोंदणी करू शकता. तर मग वाट कशाची बघत आहात, चला तयारीला लागा...'मटा श्रावणक्वीन' होण्यासाठी एक पाऊल पुढे टाका, मटा तुमचे स्वागत करायला तयार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

मराठा आरक्षणाचा तालुक्यातील वडोद बाजार येथे पहिला बळी प्रदीप हरिदास म्हस्के ठरला. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पिंपळगाव गंगादेव येथे फुलंब्री-राजूर महामार्गावर सुमारे दोन तास, तर औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बिल्डा येथे बुधवारी एक तास रास्ता रोको करून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

वडोद बाजार येथील प्रदीप म्हस्के या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने पिंपळगाव गंगादेव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन संपताच बिल्डा येथे ग्रामस्थांनी एक तास चक्का जाम केला. या दोन्ही ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवून तहसीलदार संगीता चव्हाण व पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. म्हस्के यांच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत द्यावी, मराठा आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, आरक्षणाचा निर्णय तत्काळ घ्यावा, वडोद बाजार येथील सरस्वती भुवन शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा नोंदवावा, या मागण्या करण्यात आल्या. दोन्ही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे बस खरेदीत घोटाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणाऱ्या दीडशे बस खरेदीत घोटाळा झाला असून, हे टेंडर 'टाटा'ला मिळावे यासाठी महापालिकेने प्रयत्न केले आहेत,' असा आरोप बुधवारी 'एमआयएम'चे आमदार इम्तीयाज जलील यांनी केला.

विरोधी पक्षनेता निवडीनंतर साधलेल्या संवादात ते म्हणाले, 'महापालिकेत जंगलराज सुरू असून, ती भ्रष्टाचाराचा अड्डा झाली आहे. दीडशे शहर बससाठी टेंडर मागविले. देशभरात बस निर्मिती करणाऱ्या पाच-सहा मोठ्या कंपन्या आहेत. मात्र, टाटा कंपनीला कंत्राट मिळावे यासाठी निविदा मागविताना 'टाटा'च्या सोयीच्या बाजूने नियम व अटी टाकल्या. त्यात 'एफओएच'(फ्रंट ओव्हर हँग) ही अट घातली. 'एफओएच' असे विशिष्ट सुटे भाग निर्माण करणारी टाटा ही एकमेव कंâपनी आहे. अशोक लिलँड, महेंद्रा, आयशर आदी कंपन्या असे सुटे भाग निर्माण करत नाहीत. या कंपन्यांना निविदा प्रक्रियेत भागच घेऊ दिला नाही. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड होते. योजना चांगली असली तरी पालिका अशा योजना फक्त ठराविक कंत्राटदारांना समोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविते. यामध्ये कोणाचा फायदा होणार हे लक्षात घ्यायला हवे. नागरिकांसाठी या योजनेबाबत कोर्टातही जाऊ. आताही आयुक्तांनी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा त्यांनाही कोर्टात खेचू,' असा इशारा जलील यांनी दिला आहे.

\B

दीडशे कोटीच्या कामांसाठी तीन कंत्राटदार

\Bशहरातील रस्त्यासाठी शंभर कोटी रुपये आले. मात्र, वर्ष होऊनही याची प्रक्रिया राबविली गेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष, आमदारांसमोर पदाधिकारी, प्रशासनाला सुनावले. असे असतानाही प्रक्रिया होऊ शकली नाही. या कामांचे वाटप ही ठराविक कंत्राटदारांनाच मिळावे यासाठी पालिका प्रयत्न करते आहे. त्यांची नावेही जाहीर करू,' असे जलील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीला केंद्रीय विद्यालय

$
0
0

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील वाशीम आणि परभणी जिल्ह्यात दोन नवीन केंद्रीय विद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील २ केंद्रीय विद्यालयांसह सहा राज्यात १३ केंद्रीय विद्यालयांना आज मंजुरी मिळाली. देशभरात १२ लाख विद्यार्थी केंद्रीय विद्यालयातून शिक्षण घेत आहेत. १३ नवीन शाळांमुळे १३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थांना याचा लाभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षारोपन करून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली

$
0
0

औरंगाबाद: मराठा आरक्षणाची मागणी करत जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे यांना जिजाऊ ब्रिगेड व साई फाउंडेशनकडून बीड बायपास परिसरातील अलोकनगर येथील जिजाऊ उद्यानात वृक्षारोपण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा हेमा पाटील व साई फाउंडेशनच्या अध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षा अॅड. वैशाली कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पेरू, पारिजातक, ‌लिंब, कन्हेर अशा वेगवेगळी झाडे लावण्यात आली. या झाडांना संरक्षक जाळ्याही बसवण्यात आल्या. नव्यानेच लावण्यात आलेल्या झाडांना परिसरातील महिलांकडून दत्तक घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या संगीता भुजंग, मेघा थोरात, मनीषा यादव, सिंधू काकडे, रंजना लोखंडे, ज्योती कदम, छाया पाटील, मनीषा थोरात यांच्यासह परिसरातील महिलांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपयशाला ‘अभया’चा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून आणि त्यांच्याच आशीर्वादाने अधिकृत नळधारकांपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्या अनधिकृत नळधारकांची जोडणी अधिकृत करण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा अभय योजना जाहीर केली आहे. त्यात केवळ एक हजार रुपये दंड आकारून ही नळजोडणी अधिकृत करून देण्यात येईल. १५ ऑगस्टपासून ही मोहीम सुरू केली जाणार आहे.

महापालिका प्रशासनाचा उदासीन कारभार, त्यात कर्तबगार नेते मंडळीमुळे अनधिकृत नळजोडणीवर नियंत्रण ठेवता आले नाही. शहरात सुमारे दीड लाख बेकायदा नळजोडण्या आहेत, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली. त्यामुळे पाण्यासह पाणीपट्टी वसुलीची होणारी गळती थांबविण्यासाठी महापालिकेने यापूर्वीही अभय योजना राबविली. मात्र, नागरिकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे केवळ ८०० नळ नियमित करून देण्यात आले. अनधिकृत नळजोडणीमुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे हे सारे अपयश झाकण्यासाठी पुन्हा एकदा अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात सर्वसाधारण सभेत ५०० रुपये दंड आकारून बेकायदा नळजोडणी नियमित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तांना पत्र देण्यात आले. आयुक्तांनी या संबंधी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एक हजार रुपये दंड आकारणीचे सूचित केले आहे. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

\Bअधिकारी, पुढारी कर्ते करविते

\Bशहरात अनधिकृत नळजोडणीची संख्या तब्बल दीड लाखांच्या घरात आहे. अनेक कुटुंबाकडे एक, दोन किंवा त्यापेक्षाही अधिक अनधिकृत नळजोडणी आहे. स्थानिक अधिकारी, पुढाऱ्यांना हाताशी धरून अशा प्रकारच्या अनधिकृत नळ जोडण्या सर्रास घेतल्या जातात अशी चर्चा आहे. महापालिकेने अशा अनधिकृत नळजोडणीचा आकडा समोर आल्यानंतरही अद्याप कोणती कारवाई केलेली नाही.

शहरातील अनधिकृत नळजोडणीधारकांची संख्या लक्षात घेत त्यांना अधिकृत करण्याची संधी म्हणून अभय योजना लागू करण्यात आली आहे. त्यात एक हजार रुपये भरून आपली नळजोडणी अधिकृत करून घेता येईल.

- नंदकुमार घोडेले, महापौर

\Bनळपुराण

\B- १,२५,००० अधिकृत नळ

- १,५०००० अनधिकृत नळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी अधिवेशनात ठराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला विनाविलंब आरक्षण देण्याचा निर्णय घ्या. शेतकऱ्यांचे संपूर्ण व सरसकट कर्ज त्वरित माफ करा यासह ११ ठराव 'शेकाप' अधिवेशनात मांडण्यात आले.

अधिवेशनातील पहिला ठरावच मराठा समाजाला विनाविलंब आरक्षण द्या, असा पारित करण्यात आला. याप्रकरणी शासनाने वेळकाढू धोरणा अवलंबल्यामुळे संयमी जनभावनेचे रुपांतर जनक्षोभात झाले आहे. विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावून मराठा आरक्षण अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रमाचा निर्णय घ्यावा, आंदोलन काळाततील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावे, असा ठराव पारित करण्यात आला. शेतकरी, शेतमजुरांचे सरसकट कर्ज माफ करा, शेतकरी, शेतमजूरांना पेन्शन द्या, बियाणे, खते, अवजारे वाजवी दरात द्या. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे किफायतशीर किमतीची हमी द्यावी. विधिमंडळ, लोकसभेत महिलांना एस. सी, एसटी, एनटी आदी वर्गवारीप्रमाणे त्या प्रमाणात ३३ टक्के आरक्षण द्यावे, असे ठराव पारित करण्यात आले.

\Bसमन्यायी पाणी वाटप

\Bसमन्यायी पाणी वाटपाच्या धोरणाची अंमलबजावणी करावी. गोदावरी खोऱ्यातून ८१ अब्ज घनफूट पाणी जायकवाडी प्रकल्पात सोडण्याच्या कायदेशीर व न्याय तत्वाची अंमलबजावणी व्हावी. गोदावरी-पूर्णा-पैनगंगा स्थैरीकरण प्रकल्पाचे काम त्वरित हाती घ्यावे. नार-पार प्रकल्पाचे काम विनाविलंब सुरू करून यातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात परिवहन करण्यात आले पाहिजे. दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पाचे काम हाती घ्यावे. या प्रकल्पाद्वारे मराठवाड्यात पाणी परिवहन करून मराठवाड्याच्या पाण्याची गरज पूर्ण करावी. अपुरे व नियोजित सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करा. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा, असे ठरावही मंजूर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाकपची ‘भाजप हटाव, देश बचाव’ मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 'भाजप हटाव, देश बचाव' मोहिमेला बुधवारी सुरुवात करण्यात आली. पक्षातर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करत सरकारचा निधेष करण्यात आला. यासह यावेळी जिल्हाव्यापी जथ्थाला सुरुवात करण्यात आली.

भाकपने देशभरात याप्रकारची मोहीम आखली आहे. त्याची सुरुवात बुधवारपासून करण्यात आली. अनेक आश्वासने देऊन २०१४मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपने आश्वासन पाळले नाही. पूर्वीपेक्षा आज वाईट दिवस आणल्याचा आरोप करण्यात आला. या मोहिमेचा भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रश्नावर गंगापूर, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, खुलताबाद, पैठण, औरंगाबाद तालुक्यातील गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीमधील प्रश्न, समस्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या समोर मांडल्या. पक्षाच्या प्रत्येक तालुका कौन्सिलने स्वतंत्र निवेदन दिले. विविध मागण्यांचे निवेदन देत जिल्हाव्यापी जथ्था गंगापूरकडे निघाला. यावेळी भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य प्रा. राम बाहेती, जिल्हा सचिव अश्फाक सलामी, अॅड. अभय टाकसाळ, कैलास कांबळे, गणेश कसबे, अशोक जाधव, गुलाम महंमद, भास्कर लहाने, इब्राहीम पटेल, रतन गायकवाड, सोनाजी जंगले, काकासाहेब तायडे, शेख नूर, राजाराम आव्हाड, सुलेमान शेख, रामेश्वर मालकर, संग्राम कोरडे, अॅड्. अय्यास शेख, कपिल गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने विविध गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनाचे सावट; महसूल दिन कोरडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्‍ह्यात आंदोलनाचे सावट असल्यामुळे यंदा महसूल दिनी (१ ऑगस्ट) कोणताही कार्यक्रम घेण्यात आला नाही. यामुळे कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत कोणताही कार्यक्रम घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रत्येकवर्षी महसूल विभागातर्फे १ ऑगस्ट रोजी महसूल दिन उत्साहात साजरा केला जातो. या कार्यक्रमात वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांचा उत्साह वाढवण्यात येतो. मात्र यंदा महसूल दिनाचा कोणताही कार्यक्रम घेण्यात आला नाही. महसूल विभागातील सेवानिवृत्‍त अधिकारी, तज्ज्ञांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. त्यातून महसुली कामात होणाऱ्या चुका, त्रुटींवर बोट ठेवले जात असल्याने सुधारणा होण्याच्या अपेक्षाही वाढतात. मात्र यंदा कार्यक्रम न घेतल्याने प्रशासनाकडूनही कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली नाही.

\Bवर्षभरापासून मरगळ \B

गेल्या वर्षभरापासून महसूल विभागात मरगळ आहे. ऑनलाइन सातबाऱ्याचे ‌भिजत घोंगडे कायम आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच ठरला आहे. कर्जमाफीचा घोळ तसेच शासनाकडून नुकसान भरपाई मिळाल्यानंतरही बोंडअळी अनुदानाचे टप्प्या-टप्‍प्‍याने वाटपामुळे होणारा विलंब चर्चेचा राहिला. तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांचाही प्रशसनाबाबतीत नाराजीचा सूर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांच्या चौकशीचा निर्णय सादर करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सिमेंट रस्त्यांची २४ कोटींची कामे करताना झालेल्या निविदेतील अनियमिततेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत सरकारी वकीलांनी शासनाशी सल्लामसलत करून त्यांचा निर्णय खंडपीठात सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. व्ही.के. जाधव यांनी दिले आहेत.

खंडपीठाच्या २६ एप्रिलच्या आदेशनुसार नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने निविदा प्रक्रियेतील अनियमितेसंदर्भात चौकशी करून खंडपीठात अहवाल दाखल केला. त्यानुसार निविदा प्रक्रिया, प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती, कंत्राटदाराची निवड, पालिका आणि कंत्राटदारामधील करारनामा नोंदणीसाठीचे अपुर्ण मुद्रांक शुल्क या सर्व प्रक्रियेत पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. विशिष्ट प्रकारच्या अटी ठेवल्यामुळे निविदेला कंत्राटदारांकडून कमी प्रतिसाद मिळाला. कायद्यानुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीवेळी स्वतंत्र निविदा काढली नाही, असे अहवालात म्हटले आहे.

शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्या निलंबनाच्या काळात खंडपीठात शपथपत्र दाखल करून पालिका आयुक्तांच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेण्याचा प्रयत्न केला, ही बाब आक्षेपार्ह असल्यामुळे खंडपीठाने आयुक्तांना काही निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ही बाब गंभीर असल्यामुळे स्वतंत्र विभागीय चौकशीचा प्रस्ताव नगरविकास सचिव आणि महापौर यांच्याकडे दिला होता. २२ मे २०१८ रोजी विनाचर्चा सभागृहाने प्रस्ताव फेटाळल्याचे सांगण्यात आले. याचिकाकर्ता नगरसेवक विकास एडके यांनी बुधवारी विशेष अर्ज सादर केला. पालिका गैरकृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करू इच्छित नाही. पालिका कायद्यातील तरतुदीनुसार औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी. प्रधान सचिवांनी केलेल्या चौकशी आधारे संबंधीतांविरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे बी. एल. सगर किल्लारीकर यांनी काम पाहिले. त्यांना नितीन त्रिभुवन यांनी सहकार्य केले. महापालिकेतर्फे संजीव देशपांडे यांनी काम पाहिले.

\B१३ ऑगस्टला सुनावणी

\Bतत्कालीन पालिका आयुक्त प्रकाश महाजन यांची चौकशी शासनाने करावी, असे पत्र आयुक्तांनी २४ जुलै रोजी शासनाला पाठविले आहे. याबाबत सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी सुनावणीवेळी आक्षेप घेतला असता राज्य शसनाने स्वत:च्या अधिकारात हे काम स्वत:कडे वर्ग करून घेणे योग्य राहील, असे मत व्यक्त करीत याविषयी राज्य शसनासोबत चर्चेकरिता वेळ दिला. या याचिकेची सुनावणी १३ ऑगस्टला होणार आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरुच राहणार

$
0
0

बीड :

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने ७ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. ठिय्या देऊन तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात यावे. कुणीही हिंसेचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

परळी येथे आज मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, अशा मागण्यांचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद: आणखी एका मराठा तरुणाची आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद

'बीएससी होऊनही नोकरी मिळत नाही, मी मराठा आहे म्हणून मला नोकरी मिळत नाही का?', असा सवाल करत निराश झालेल्या २१ वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले. औरंगाबाद शहरातील चौधरी कॉलनीत आज ही घटना घडली. उमेश इंडाईत असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने हे कारण नमूद केले आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तो म्हणतो की, 'मी माझ्या मम्मी- पप्पांची क्षमा मागतो, मला त्यांनी शिकवले; पण मी त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. माझे शिक्षण अपूर्णच राहिले, बीएससी होऊनही नोकरी मिळत नाही, मी मराठा आहे म्हणून कि काय ?'

मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या मराठी क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी आंदोलनादरम्यान आतापर्यंत उमेश इंडाईतसह एकूण ६ मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकलव्य संघटनेचा नऊ ऑगस्ट रोजी टिकोरा मोर्चा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध मागण्यांसाठी एकलव्य संघटनेच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी टिकोरा मोर्चा काढण्यात येणार आहे. टिव्ही सेंटर येथील संभाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चााला प्रारंभ होणार असून एन आठ येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयावर याचा समारोप करण्यात येणार आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

एकलव्य संघटनेच्या वतीने २७ नोव्हेंबर २०१७ रोजी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाच्या मागणीसंदर्भात ३ जुलै २०१८ रोजी या विभागाने लेखी उत्तर दिले असून यामध्ये उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोपी करण्यात आला आहे. या मागण्यासंदर्भात नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या दिवशी एकलव्य संघटनेच्या वतीने टिकोरा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या मागण्यामध्ये आश्रम शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढिसाठी विशेष मोहीम राबवावी. जाणता राजा प्रशिक्षण संस्थेतील भ्रष्ट प्रकरणाची पूर्ण चौकशी करावी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील हेरगिरी व दलाली बंद करावी या मागण्यासोबतच इतर मागण्याचा समावेश आहे. या मोर्चाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, अशोक बडे, पवन राजे सोनवणे, किरण नाईक, प्रकाश गांगुर्डे आदी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणाच्या मागणीसाठी कॉँग्रेसचे साखळी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा समाजबरोबरच मुस्लिम, धनगर व कोळी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शहर व जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी साखळी उपोषण सुरू करण्यात आले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली.

सध्याच्या भाजप सरकारने मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही. या निषेधार्थ सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी जाहीर केली. आरक्षण देण्याबाबत सत्ताधारी भाजप सरकारने चार वर्षे विलंब लावला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि सामाजिक आरक्षणाच्या लढाईसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात आमदार अब्दुल सत्तार, काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्यासह माजी आमदार डॉ. कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहुल सावंत, काँग्रेस सेवादलाचे राज्य प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जि. प. गटनेते श्रीराम महाजन, किरण डोणगावकर, रामूकाका शेळके, जगन्नाथ काळे, देविदास लोखंडे, संदीप बोरसे, बाबासाहेब मोहिते, महापालिका गटनेते भाऊसाहेब जगताप, इब्राहिम पठाण, प्रभाकर आबा काळे, रामदास पालोदकर, अब्दुल समीर, खालेद पठाण, राजेश्वर आरके उपस्थित होते.

सध्याच्या केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारने सत्तेवर येताच मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी बांधवांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळण्यात आले नाही. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही.

- अब्दुल सत्तार, आमदार, कॉँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचा कुलगुरुंना घेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध मागण्यांसाठी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) मोर्चा काढला. 'कमवा व शिका योजने'चे मानधन वाढवा, नवीन वसतिगृहे बांधा आणि विद्यावेतन सुरू करा या प्रमुख मागण्या करीत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिले.

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एसएफआयने गुरुवारी विद्यापीठात मोर्चा काढला. मराठा आरक्षणासाठी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांना श्रद्धांजली वाहून मोर्चाची सुरुवात झाली. घोषणाबाजी करीत मोर्चा मुख्य प्रशासकीय इमारतीवर धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. कमवा व शिका योजनेचे मानधन संशोधक विद्यार्थ्यांसाठी अडीच हजार आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दोन हजार रुपये करा, सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा द्यावी, एक हजार विद्यार्थी क्षमतेचे नवीन वसतीगृह तातडीने बांधा, विद्यापीठ निधीतून पाचशे विद्यार्थी क्षमतेच्या प्रस्तावित वसतीगृहाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे, एम. फिल, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू करावे, विद्यापीठात प्रत्येक ठिकाणी शुद्ध पाणी उपलब्ध करा, कँटीन रात्री नऊपर्यंत सुरू करावी, विद्यापीठाच्या रस्त्यांवर पथदिवे लावा, वसतिगृहाचे शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सवलत द्यावी, वसतीगृहातील नळ दुरुस्त करा, वसतीगृहात पाण्याचा नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा, प्राध्यापक भरती करावी, पीएचडी आरआरसी प्रक्रिया लवकर घेऊन गाइड उपलब्ध करुन द्यावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी एसएफआयच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन देण्यात आले. या मागण्या व्यवस्थापन परिषदेत मंजूर करुन घेण्यात येईल असे आश्वासन कुलगुरुंनी दिले. यावेळी कॉम्रेड सुनील राठोड, नितीन वावळे, सत्यजित मस्के, लोकेश कांबळे, स्टॅलिन आडे, प्राजक्ता शेटे, मारुती राऊत, विवेक कांबळे, समाधान बारगळ यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

'सम्यक'चे निवेदन

विद्यापीठात सांस्कृतिक अधिकारी नेमा, विद्यार्थ्यांना वसतीगृह उपलब्ध करा, कमवा व शिका योजनेचे मानधन वाढवा अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनने केली. याबाबत प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रकाश इंगळे, अमोल घुगे, मंगेश गवई, राहुल खंदारे, अमरदीप वानखडे, राहुल पंडित, डॉ. कुणाल खरात आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुवाद पदविका अभ्यासक्रम सुरू

$
0
0

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागात अनुवाद पदविका हा एक वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती हिंदी विभागप्रमुख डॉ. सुधाकर शेंडगे यांनी दिली. पारंपारिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला असून विद्यार्थी कौशल्याधारीत अभ्यासक्रमांना प्राध्यान्य देत आहे. विद्यार्थ्यांची गरज ओळखून हिंदी विभागाने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. वर्तमानपत्रे, जाहीरात क्षेत्रे, सिनेमा यासारख्या माध्यमात रोजगार उपलब्ध होईल. तसेच बँका, रेल्वे, केंद्रीय कार्यालये, विमा कंपन्या या क्षेत्रात अनुवादक, हिंदी अधिकारी पदाच्या संधी आहेत. या अभ्याक्रमासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार पात्र असून तीस जागा उपलब्ध आहेत. पदविकेच्या तासिका शनिवारी व रविवारी होतील. अधिक माहितीसाठी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन विभागप्रमुख डॉ. सुधाकर शेंडगे व समन्वयक डॉ. भगवान गव्हाडे यांनी केले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेकाप’ची दोन्ही कॉँग्रेससोबत आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मनुवादी घटना आणू पाहणाऱ्या भाजपविरोधी लढाईला बळ देण्यासाठी आपण सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणू. कॉँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने आपले नुकसान होईल. मात्र, लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठी आपण ते सहन करू,' असा निर्धार व्यक्त करत गुरुवारी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

भाई उद्धवराव पाटील नगर, कर्णपुरा देवी मंदिर मैदान येथे बुधवारपासून सुरु असलेल्या 'शेकाप'च्या १७व्या अधिवेशनाचा समारोप गुरुवारी झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख होते. यावेळी पक्षनेते पंडीत पाटील, धैर्यशील पाटील, प्रवीण गायकवाड, विवेकानंद पाटील, राहुल पोकळे, मीनाक्षी पाटील, चित्रलेखा पाटील, स्वागताध्यक्ष विकास शिंदे उपस्थित होते.

समारोपात पाटील म्हणाले, 'भाजपचे राज्यघटना बदण्याचे षडयंत्र असून, मनुवादाचे समर्थन करणाऱ्यांविरोधात बिग्रेड रस्त्यावर येईल. देशभरात लोकशाही मानणारे आणि फुले-शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे समविचारी पक्ष, संघटनांना एकत्रित आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 'शेकाप'ची त्यात महत्त्वाची भूमिका आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आपले मतभेद निश्चितच आहे, पण ते बाजूला ठेवत लोकशाही आणि संविधान जिंवत ठेवण्यासाठी आघाडी करण्याचे काम करावेच लागेल,' असे आवाहन पाटील यांनी केले. 'ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख मंत्री असतानाच देशातील पहिले शेततळे बांधले गेले. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात सिंचनाचा प्रश्न आधी सोडावावा, त्यानंतर 'समुद्धी'चे काम हाती घ्यावे. मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण द्यावे. भाजप सरकार डळमळीत झाले आहे. केव्हाही कोसळेल. त्यासाठी तलवारी धारदार करा,' असे आवाहन त्यांनी केले.

'पक्षात नवीन नेतृत्व निर्माण करण्यात अपयश आले आहे. मात्र, पुन्हा पक्षाला गतवैभव प्राप्त करून देऊ. पक्षात युवकांना प्राधान्य दिले जाईल. कार्यकर्त्यांसाठी खास प्रशिक्षण देऊ. संघटनात्मक बदल केले जातील. यात कामाची फुटपट्टी लावली जाईल. बुथ बांधणीवर कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच भर द्यावा,' असे आवाहनही पाटील यांनी केले.

\Bसरचिटणीसपदी पाटील

\Bप्रवीण गायकवाड यांनी 'पंढरपूर येथे साप सोडण्यात येणार होते, असे विधान करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अहवाल सादर करावा किंवा माफी मागावी,' असे आव्हान दिले. दरम्यान, शेकाप मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली. यात सरचिटणीसपदी आमदार जयंत पाटील, सह चिटणीसपदी प्रवीण गायकवाड, कोषाध्यक्ष म्हणून राहुल पोकळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करण्यात आली.

\B'भाजप' सरकार मनुवादी

\Bगणपतराव देशमुख म्हणाले, 'भाजप सरकार मनुवादी आहे. सरसकट कर्जमाफी, दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ यासह निवडणुकीत भाजपने दिलेली आश्वासन कुठे गेली. शेतकऱ्यांचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. त्यासाठी निर्णायक लढा दिल्याशिवाय पर्याय नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपने केवळ चालढकल केली आहे. अधिवेशनात मांडलेल्या ठरावांसाठी सर्वांनी तीव्र लढा द्यावा,' असे आवाहनही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images