Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

फ्लॅट व्यवहारात सात लाखांचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलीच्या लग्नात सात लाखांची आर्थिक मदत केल्याच्या मोबदल्यात, एका सोसायटीमधील फ्लॅट नावावर करण्याचा निर्णय झाला. मात्र, संबंधिताने नोटरी करूनही फ्लॅट नावावर केला नाही, तसेच घेतलेले पैसेही बुडवले. याप्रकरणी तिघांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११च्या एप्रिलमध्ये सुनील लक्ष्मण सोमवंशी (रा. ए १/११, भोसले पॅराडाइज ऑफ रेंज पुणे) यांनी त्यांचे सहकारी विनायक पांडुरंग गोरे (रा. बनसारोळा, ता. केज) यांच्या सांगण्यावरून शिवाजी मंचक पवार याला मुलीच्या लग्नासाठी सात लाख रुपयांची मदत केली. या पैशाच्या मोबदल्यात शिवाजी पवार यांच्या भगिरथ सहकारी गृहनिर्माण संस्था जाधववाडी येथील फ्लॅट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सोमवंशी यांनी स्वत:जवळचे चार लाख रुपये, तसेच सहकाऱ्याकडून तीन लाख रुपये असे एकूण सात लाख रुपये पवार याला दिले. त्यानंतर मंचक बापूराव पवार, प्रशात मंचक पवार, शिवाजी मंचक पवार (रा. दत्त नगर, जिंतूर रोड, परभणी) यांनी सुनील सोमवंशी यांच्या सहकाऱ्यांच्या नावावर सदर फ्लॅट नोटरी करून दिला. मात्र, हा फ्लॅट अजूनही त्यांच्या ताब्यात दिला नाही. तसेच सोमवंशी यांचे पैसेही दिले नाहीत. त्यामुळे सोमवंशी यांच्या फिर्यादीवरून मंचक पवार, प्रशांत प्रवास आणि शिवाजी पवार यांच्या विरोधात तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापूर विभागातील मराठवाडा रेल्वे रद्द

0
0

औरंगाबाद : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दौंड-मनमाड दरम्यान सुरू असलेल्या दुरुस्ती कामामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पुणे - निझामाबाद पॅसेंजर (दोन ऑगस्ट ते ते ३० सप्टेंबर),

निझामाबाद - पुणे पॅसेंजर (चार ऑगस्ट ते दोन ऑक्टोबर), निझामाबाद - पंढरपूर पॅसेंजर, (तीन ऑगस्ट ते एक ऑक्टोबर), पंढरपूर - निझामाबाद पॅसेंजर(चार ऑगस्ट ते दोन ऑक्टोबर) यांचा समावेश आहे. अंशतः रद्द केलेल्या रेल्वेंमध्ये नांदेड - दौंड पॅसेंजर (एक ऑगस्ट ते २९ सप्टेंबर, कोपरगाव - दौंड दरम्यान रद्द), दौंड - नांदेड पॅसेंजर (दोन ऑगस्ट ते ३० सप्टेंबर, दौंड ते कोपरगाव दरम्यान रद्द) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Maratha Protest: परभणीत तरुणाची आत्महत्या

0
0

परभणी:

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणानं आज आत्महत्या केल्याची घटना घडली. अनंत लेवडे-पाटील (ता. सेलू, परभणी) असं त्याचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं फेसबुकवर पोस्ट टाकली होती. मराठा आरक्षणासाठी बलिदान देत आहे, असं त्यात म्हटलं होतं.

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळावं यासाठी समाजातील तरुण आत्महत्याही करत आहेत. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहन विविध स्तरांतून करण्यात येत असलं तरी, आत्महत्यांचं सत्र अजून थांबलेलं नाही. सेलू तालुक्यातील अनंत लेवडे-पाटील या तरुणानं आज, रविवारी सकाळी ११ वाजता एका शेतात जाऊन अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. आत्महत्येपूर्वी त्यानं फेसबुकवर पोस्ट टाकली होती. 'मराठा समाजासाठी बलिदान देत आहे. देशासाठी काही करता आलं नाही. मात्र, मराठा समाजासाठी बलिदान देत आहे,' असं त्यानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. या घटनेनंतर संतप्त समाजबांधवांनी अनंतचा मृतदेह सेलू पोलीस ठाण्यात नेला आणि तिथे ठिय्या मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागडेंच्या घरासमोर थाळी नाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मराठा क्रांतीमोर्चा समन्वयकांकडून थाळी नाद आंदोलन करणे सुरू असून रविवारी (५ ऑगस्ट) सकाळी समन्वयकांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उस्मानपुरा येथील घरासमोर प्रचंड घोषणाबाजी करत थाळीनाद आंदोलन केले. 'हरिभाऊ बागडे हाय हाय, मुख्यमंत्री हाय हाय, भाजप सरकारचे कारायचे काय, खाली मुंडके वर पाय, एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा देत तब्बल तीन तास आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आलेल्या बागडे यांना 'भाषणबाजी नको आरक्षण कधी मिळणार', असा सवाल संतप्त आंदोलनकर्त्यांनी करताच बागडे यांनी 'आरक्षण आम्हीच देऊ' असे म्हणत घरासमोरून काढता पाय घेतला.

रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मराठा क्रांतीमोर्चा समन्वयकांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उस्मानपुरा येथील घरासमोर थाळीनाद आंदोलनास सुरुवात करण्यात आली. बागडे घरी नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी घराबाहेरच बसून थाळी नाद करत प्रचंड घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तब्बल अडीच ते तीन तासांनंतर बागडे घरी आल्यावर त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी आरक्षणाची मागणी, आरक्षणाचा न्यायालयीन प्रवास तसेच सध्याचे स्टेटस काय आहे याबाबत बागडे यांनी आंदोलकांना तारखेसह माहिती दिली. यावर 'आम्हाला भाषणबाजी नको, मराठा आरक्षणाबद्दल आम्हाला आत्ताचे काय ते सांगा, विषेश अधिवेशन कधी बोलावणार' यासह इतर सवाल केले. यावर बागडे यांनी आमच्याच कार्यकाळात मराठा आरक्षणाचा कायदा होणार आहे असे आश्वासन देत पोलिस बंदोबस्तात घरासमोरून काढता पाय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवती भवती: हवेवर गाडी चालते की का?

0
0

एका कामासाठी दोन मित्र चालले होते. ज्या मित्राची मोटारसायकल होती त्याला दुसऱ्या मित्राने विचारले, 'भावा तुझ्या गाडीत पेट्रोल आहे का?,' त्या मित्राने उत्तर दिले,'भाऊ ३३ रुपयांचे पेट्रोल सकाळीच टाकलं आहे.' हे ऐकताच मागे बसलेल्या मित्राने पेट्रोल संपणार नाही का? असं विचारताच गाडीने जीव सोडला; तिच्यातील पेट्रोल संपले. दोघांनी मोटारसायकल कशीतरी ढकलत एका वस्तीपर्यंत आणली. तेथे एक ओळखीचा माणूस भेटला. त्याच्या दुचाकीतून पेट्रोल काढून घेऊन स्वत:च्या वाहनात टाकून घरापर्यंत आले. खूप वेळेपासून शांत असलेल्या मित्राचा राग अचानक उफाळून आला. 'अबे, गधड्या ३३ रुपयांत पूर्ण शहर फिरतो का? तुझी मोटारसायकल हवेवर चालते का? जर तो भेटला नसत तर मोटारसायकलवर मी बसलो असतो अन् ती तुला ढकलावी लागली असती.' मोटारसायकलच्या मालकाने ते ऐकून घेतले. मित्राचे घर आले. तेथे त्याच्या वडिलांची गाडी उभी होती. पंपावर जाईपर्यंत तिच्यातील पेट्रोल दे, असे सांगताच मित्र आणखी भडकला. तो भडकल्याचे पाहून मोटारसायकल मालक हसत शांतपणे निघून गेला.

- अब्दुल वाजेद

.......

_______________________________________________________________________

सांगा, प्रस्ताव कसा द्यायचा

विवेकानंद महाविद्यालयातील प्राचार्यांचे दालन. प्राचार्य, प्राध्यापक हे माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधत होते. तेवढ्यात प्राचार्यांना फोन आला. सर, ते विद्यापीठाचे पत्र आले आहे, त्यानुसार कौशल्याधारित अभ्यासक्रम कोणते सुरू करता येतील ते पहावे लागेल, तसा प्रस्ताव पाठवायचा आहे. प्राचार्यांनी समोरच्यांना होकार दिला. पत्र वाचून दाखवत म्हणाले,'अहो सर, पत्रात सांगितले दोन ऑगस्टपर्यंत प्रस्ताव द्या, आज तर चार तारीख आहे. पत्र लिहले ३१ जुलैला. सांगा कसा प्रस्ताव द्यायचे,' असे सांगताच सर्वांना हसू आवरता आले नाही. फोन ठेवल्यानंतर प्राचार्यही म्हणाले 'काय करावे.. अभ्यासक्रम काय, असा तयार होतो का, थोडा वेळ तर द्यावा लागेल आणि कारभार बघा.. मागितले कधी आले कधी.'

-आशिष चौधरी

_______________________________________________________________________

त्याला काय फरक पडणार

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी दिल्लीहून काँग्रेसचे दोन श्रेष्ठी दोन दिवस औरंगाबादेत आले होते. त्यांनी आठही जिल्ह्यांचा आढावा घेताना नेत्यांची मते जाणून घेतली. या समितीसमोर जाताना मागविलेली कागदपत्रे तपासली जात होती. बूथ कमिटी सदस्य करताना एक छापील फॉर्म भरणे आवश्यक होते. त्यावर फोटो आणि मतदान ओळखपत्र क्रमांक अत्यावश्यक होता. एका जिल्ह्याचे काम अर्धवट राहिले होते. गांधीभवनात हे कार्यकर्ते फॉर्म भरत होते. एका कार्यकर्त्याकडे मतदान कार्ड नव्हते. त्यामुळे नंबर आठवेना. दुसऱ्या कार्यकर्त्याने हे पाहिले अन् म्हणाला की, मोबाइलमधून शोध घे. त्यावर तिसरा म्हणाला, अहो त्याला काय फरक पडतो. तीन इंग्रजी शब्द लिहा आणि आकडा टाका की कुठला तरी? ही मंडळी कुठे तपासणार आहेत. त्यावर पहिला कार्यकर्ता म्हणाला, याआधीच्या जिल्ह्याच्या आढाव्यात असेच केले होते. त्यावर आक्षेप घेतला होता. कशासाठी अडचण करून घेता. आता तर सुरवात आहे. यावेळी फार सूक्ष्म नोंदी ठेवाव्या लागणार आहेत. नाहीतर आपले काही खरे नाही. त्यावर कार्यकर्त्यांना घरी संपर्क साधून मतदान कार्ड क्रमांक मिळवून फॉर्मवर लिहिला.

-मकरंद कुलकर्णी

_______________________________________________________________________

असाही प्रादुर्भाव...!

अलीकडे आंदोलनाचे कल्पनातीत प्रकार पुढे आले आहेत. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून आंदोलकांची कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते हे प्रत्यक्ष कृतीवरून समोर येत आहे. अशा आंदोलनांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. याचा प्रत्यय छावणी परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत आला. यंदाची परिषदेची सभा वादळी ठरली ती बंद दरवाजाआड चर्चेमुळे. सभेत सदस्यांव्यतिरिक्त कोणालाही बोलायचा अधिकारी नसला तरी सभेला उपस्थित राहण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि नियमानुसार बंद दरवाजाआड चर्चा करता येत नाही. तरीही तासभर बंद दरवाजाआड चर्चा सुरू असल्यामुळे बाहेर उभ्या असलेल्या वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा संयम संपला होता; म्हणूनच काही कार्यकर्ते बंद दरवाजासमोर निषेधाचा सूर लावत मांडी घालून बसले होते, तर दरवाजा काही केल्या उघडेनात म्हणून एक ज्येष्ठ कार्यकर्ते चक्क रेलिंगवरुन एक पाय टाकून 'दार उघडा, नाहीतर उडी मारतो' असे म्हणून गेला. त्याला काहींनी सावरले, तर भर सभेमध्ये एक ज्येष्ठ नगरसेवक आपली मागणी तावातावाने मांडत होता आणि मागणी मान्य झाली नाही तर मी वरतून उडी मारेन, असा धमकीवजा इशारा देऊन गेला. नेहमीच तावातावात बोलणाऱ्या त्या ज्येष्ठ नगरसेवकाला लागलीच शांत करण्यात आले खरे; पण आंदोलनाचा प्रादुर्भाव पाहून अनेकांना हसू काही आवरले नाही.

- निखिल निरखी

.....

_______________________________________________________________________

मी भांडी परत करायचो

लातूर येथील बाबासाहेब परांजपे फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त औरंगाबाद शहरात रविवारी कार्यक्रम झाला. हैदराबाद मुक्तिसंग्रामाला उजाळा देणारी अभ्यासपूर्ण भाषणे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. दिवंगत स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेब परांजपे यांच्या 'साधू वृत्ती'च्या काही आठवणींना माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी उजाळा दिला. 'या लढ्यातील नेते पांढरे कपडे घालत असले तरी आतून भगवे वस्त्र नेसत असावे. कारण संसाराचा फारसा विचार न करता त्यागी वृत्तीने ते जगले. मी लातूरला परांजपे यांच्या घराशेजारी राहत होतो. मित्राच्या मुलाच्या घरात काय कमी आहे याकडे परांजपे यांचे लक्ष असायचे. मी नुकताच प्राध्यापक झालो होतो आणि पगार २०० रुपये होता. तुझ्या घरात एवढे लोक येतात आणि फक्त दोन कपबशा आहेत, असे त्यांनी विचारले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वत:च्या घरातील कपबशा आणून माझ्या घरात ठेवल्या. बादली, कळशी, वाट्या असे बरेच सामान आणून टाकत. सौ. परांजपे नोकरीनिमित्त बाहेरगावी असायच्या. पंधरा दिवसांनी परतल्यानंतर आपले घर बरेचसे रिकामे झाल्याचे त्यांच्या लक्षात येई. मग परांजपे घरी नसताना मी सगळी भांडी आणि वस्तू परत करायचो. पण, पुन्हा तोच प्रकार घडायचा' अशी आठवण चपळगावकर यांनी सांगताच सभागृहात हशा उसळला.

-तुषार बोडखे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याच्या मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

शिवना येथील खटकाळी शिवारात बुधवारी रात्री बिबट्याने पुन्हा एका कुत्र्याचा फडशा पाडला यामुळे परिसरातील शेतकऱ्यात पुन्हा एकदा दहशत पसरली आहे. मागच्या महिन्यात नागझरी व किन्ही परिसरात जयकिरण बुलबुले यांच्या शेतात एक पाळीव कुत्रा व एका काळविटाचा बिबट्याने फडशा पाडला होता. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या ठिकाणी १५ दिवसांपासून पिंजराही लावण्यात आला आहे, मात्र त्यात बिबट्या अडकला नाही. त्याने आता आपला मोर्चा खटकाळी परिसरात वळविला आहे. येथील शेतकरी अनिल काळे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बैलांना पाणी पाजत असताना सुबाभळीच्या झाडावर बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत झेप घेतली. काळे यांनी आरडाओरड करीत तेथून पळ काढला. यावेळी आजुबाजुचे शेतकरी हे लाठ्या-काठ्या घेऊन मदतीसाठी आले व त्यांनी बिबट्याला हुसकावून लावले. दरम्यान, शेतकरी शेख मुजाहीद यांचा कुत्रा ठार झालेला दिसला. या घटनेची माहिती दिल्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगदरे, आर. एस. बलांडे, विजया सपकाळ, के. जी. जाधव यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारंगी धरणासाठी ‘पालखेड’चे पाणी सोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाचे पाणी नारंगी तलावात सोडण्यात यावे, शेतकऱ्यांना बोंड अळीचे पैसे त्वरित मिळावेत व मका, कपाशी, तूर, मूग ही खरीप पिके पाण्याअभावी वाया जाण्याची शक्यता असल्याने महसूल विभागाने पंचनामे करावेत आदी मागण्या चांडगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे केल्या आहेत.

चांडगावचे माजी सरपंच मोहन साळुंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपविभागिय अधिकारी डॉ. संदिपान सानप व तहसिलदार सुमन मोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. मागील दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने पेरणी झालेली मका, कपाशी, तूर, मूग आदी पिके वाया जाण्याची भिती आहे. नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून नारंगी धरणात पाणी सोडल्यास चांडगावसह परिसरातील आठ ते दहा गावांना सिंचनासाठी व पिण्यासाठी फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना अद्याप बोंड अळीचे पैसे मिळाले नसल्याने आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे हैराण असलेला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान त्वरित द्यावे व पिकांचे पंचनामे करावेत व झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवावा, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर गणेश राहणे, प्रमोद गायकवाड, लक्ष्मण हगवणे, रामेश्वर राहणे, नवनाथ गायकवाड, रामु राहणे, प्रदीप गायकवाड, संदीप गायकवाड, रामेश्वर हगवणे, जनार्धन मोकळे, गोकुळ तुपे, वाल्मिक राहणे आदींसह आघूर सर्कलमधील दहा गावांतील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्याने म्हैस मृत्युमुखी

0
0

वाळूज महानगर : औरंगाबाद तालुक्यातील साजापूर शिवारात उघड्या डीपी जवळील लोखंडी खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (पाच ऑगस्ट) दुपारी १२च्या सुमारास घडली.

परमेश्वर साळे (रा. वडगाव कोल्हाटी) यांच्या मालकीची म्हैस साजापूर शिवारातील शेतात 'डीपी'जवळ हिरवे गवत खाण्यासाठी गेली होती. 'डीपी'जवळील लोखंडी खांबात विद्युत प्रवाह होता. त्याला स्पर्श झाल्याने तिचा मृत्यू झाला़ जवळ असलेल्या नागरिकानी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानाही विजेचा धक्का लागल्याने त्यांनी वायर तोडून वीजपुरवठा खंडित केला. तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता़ या उघड्या डीपीमुळे जनावरांच्या व नागरिकांच्या जीवितास धोका असल्याने डीपीला संरक्षण जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी नागरीकानी केली आहे़ यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यानी घटनास्थळी पंचनामा केला. महावितरणने याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी साळे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज बिलांची छपाई राज्यात एकाच छताखाली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूक वीज बिल मिळावे, ग्राहकांना बिल भरण्यासाठी अधिक काळ मिळावा यासाठी महावितरणने शनिवारपासून बिल छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली. देशातील वीज वितरण क्षेत्रात असा प्रयोग प्रथमच होत आहे.

सध्याच्या व्यवस्थेमुळे ग्राहकांपर्यंत बिल पोहोचण्यासाठी सुमारे सात ते आठ दिवसांचा काळ लागतो. वेळेत बिल न मिळाल्यामुळे ग्राहकांना त्वरित देयक प्रदान सुटचा लाभ मिळत नाही. वेगवेगळ्या एजन्सीजद्वारे छपाई व वितरण होत असल्यामुळे नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. त्यावर उतारा म्हणून केंद्रीय पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन, छपाई व वितरण खर्चात मोठी बचत होणार आहे, असा दावा महावितरणने केला आहे.

\Bवितरणासाठी मुदत \B

महावितरणच्या मुख्यालयातील सर्व्हरवर बिल तयार करून ते परिमंडळ स्तरावर वितरणासाठी एजन्सीकडे २४ तासांत पाठविण्यात येणार आहे. एजन्सीने शहरी भागात ४८ तास व ग्रामीण भागात ७२ तासांत बिल वितरण करावे, अशा सूचना आहेत. या मुदतीत वितरण न करणाऱ्या एजन्सीला दंड आकारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संत एकनाथ’चा वाद भडकण्याची चिन्हे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

सचिन घायाळ कंपनी व संत एकनाथच्या संचालक मंडळात तडजोड झाल्याची माहिती समोर आली आहे, मात्र 'माझा करार मोडून घायाळ कंपनी व संचालकात कोणताही समझोता झाल्यास आम्ही कोर्टात जाणार, अशा इशारा शीला अतुल शुगर टेक कंपनीला दिला आहे. यामुळे संत एकनाथ साखर कारखान्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सचिन घायाळ कंपनीसोबत असलेला १८ वर्षांचा भागीदारी कराराचे उल्लंघन करत संत एकनाथचे चेअरमन तुषार शिसोदे व संचालकांनी नाशिक येथील शीला अतुल शुगर टेक कंपनीला संत एकनाथ साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिला आहे. विशेष म्हणजे शीला अतुल कंपनीने मागच्या वर्षीचा गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. करार व कारखाना ताब्यात देण्याच्या मुद्द्यारून सचिन घायाळ कंपनी व संत एकनाथ यांच्यातील वाद साखर आयुक्त, न्यायालयात पोचला आहे.

दरम्यान, सचिन घायाळ कंपनी व संत एकनाथचे चेअरमन तुषार शिसोदे यांच्यात तडजोड झाली असून, घायाळ कंपनी पुढील आठवड्यात संत एकनाथ साखर कारखाना ताब्यात घेणाची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर येताच, शीला अतुल शुगर टेक कंपनीने संत एकनाथच्या चेअरमनच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी माहिती देताना शीला अतुल शुगर कंपनीचे गोपाळ आरखडे म्हणाले, 'तालुक्यात लाखो टन उस उभा असताना व संत एकनाथ अडचणीत असताना आम्ही मोठी हिम्मत करून कारखाना चालवण्यासाठी घेतला. पहिला गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसाची देणी वेळेवर दिली. यासाठी आमच्या कंपनीने कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक केली आहे.'

आता सर्व काही सुरळीत होत असताना चेअरमन यांनी आम्हाला विश्वासात न घेता घायाळ कंपनीसोबत समझोता केला असल्याची माहिती मिळत आहे. संत एकनाथ भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेण्यापूर्वी आम्ही संत एकनाथच्या संचालक मंडळासोबत करार केला आहे. हा करार मोडण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आमची कंपनी कोर्टात जाणार असल्याचा इशारा शीला अतुल कंपनीचे गोपाळ आरखडे यांनी दिली.

सचिन घायाळ कंपनीसोबत सुरू असलेला वाद व आता शीला अतुल कंपनीसोबत नव्याने सुरू होणारा वाद यामुळे संत एकनाथ साखर कारखान्यासमोरील अडचणी अधिक वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अडचणीत असताना आम्ही कारखाना यशस्वीपणे चालवला. सर्व देणी दिल्यानंतर कारखान्यात जवळपास नऊ कोटी रुपयाची साखर शिल्लक आहे. आमचा करार मोडण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही कोर्टाचा जाणार.

- गोपाळ आरखडे, संचालक, शीला अतुल शुगर टेक कंपनी

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासंबंधी सध्या अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेबबात आम्ही लवकरच खुलासा करणार आहे.

- तुषार शिसोदे, चेअरमन, संत एकनाथ साखर कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसीच्या रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी अतिरिक्त प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ही प्रक्रिया शनिवारी सुरू झाली असून ती ११ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राबवण्यात येत असलेल्या औषध निर्माणशास्त्र प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. रिक्त जागांसाठी चौथी अतिरिक्त फेरी सुरू झाली आहे. इतर अभ्यासक्रमाच्या तुलनेत फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश इच्छुकांची संख्या मोठी आहे. शासकीय कॉलेजांमधील रिक्त जागांची संख्या बोटावर मोजण्या एवढीच असून खासगी कॉलेजांमधील रिक्त जागांची संख्या जास्त आहे. या बाबतची माहिती विद्यार्थ्यांना सात ऑगस्ट रोजी वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. त्यानंतर राज्यातील रिक्त जागांची स्थिती स्पष्ट होईल. त्यामधून विद्यार्थ्यांना कॉलेजांचे पर्याय निवडण्याकरिता दोन दिवस दिले आहेत. त्यानंतर निवड यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

\Bरिक्त जागांची माहिती.... ७ ऑगस्ट

पर्याय अर्ज भरणे...........७ ते ८ ऑगस्ट

जागा वाटप जाहीर.................९ ऑगस्ट

प्रत्यक्ष प्रवेश.................. १० ते ११ ऑगस्ट\B

फेरीबाबत सूचना

- अतिरिक्त प्रवेश फेरीत प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादीतील उमेदवार पात्र

- रिक्त जागांची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध होणार

- अतिरिक्त फेरीत भाग घेण्यासाठी ऑनलाइन पर्याय अर्ज भरणे आवश्यक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज बिल, वीज बंदची माहिती ‘एसएमएस’वर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीज बिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी आदी माहिती मोबाइलवर 'एसएमएस'द्वारे पाठविण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केली आहे. या प्रक्रियेसाठी नऊ लाख २६ हजार १८३ ग्राहकांच्या क्रमांकाची नोंदणी करण्यात आली आहे.

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक, उद्योग आदी वर्गवारीमधील सात लाख ६५ हजार ७८५ ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदवले आहेत. कृषीपंप वर्गवारीतील फक्त एक लाख ६० हजार ३९८ ग्राहकांनी क्रमांकाची नोंदणी केली आहे. क्रमांक नोंदवलेल्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती 'एसएमएस'द्वारे पाठवली जात आहे.

शंभर टक्के वीज ग्राहकांच्या मोबाइल क्रमांक नोंदणीची मोहीम सुरू आहे.

\Bअसा नोंदवा मोबाइल क्रमांक \B

९२२५५९२२५५ या क्रमांकावर MREG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) टाइप करून एसएमएस करावा. MREG व ग्राहक क्रमांक यात स्पेस द्यावा. २४ तास सुरू असलेल्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांकावर क्रमांक नोंदवता येईल. तसेच महावितरणच्या वेबसाइटवरही नोंदणीची सोय आहे. मराठीतून 'एसएमएस' मिळविण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी ग्राहकांना पर्यायाची प्रक्रिया करावी लागणार आहे.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाज विकासासाठी शिक्षण आवश्यक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समाजाचा आर्थिक, शैक्षणिक तसेच सामाजिक विकास करावयाचा असेल, तर शिक्षण महत्त्वाचे आहे, त्यामुळे ‌शिक्षणाकडे लक्ष द्या, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

ते रविवारी (५ ऑगस्ट) मातंग समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उत्तमराव कांबळे, ज्योती नाडे, डॉ. संजय सांभाळकर, डी. आर. शेळके, प्रा. बी. डी. खोतकर, डॉ. शेषराव नाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बागडे पुढे म्हणाले की, मातंग समाजाने देशाला अण्णा भाऊ साठे, लहुजी साळवे यांच्यासारखे महापुरुष दिले आहेत. त्यांचे योगदान मोठे आहे, समाजाचा विकास करावयाचा असेल, तर शिक्षण महत्त्वाचे आहे; त्याकडे समाजाने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्मारकाने प्रेरणा मिळते, क्रांतीचौकातील स्मारक आपण राजभवन येथे गेल्यावर कळाली, शहरात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक, सभागृह बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मातंग समाजाला सहा टक्के आरक्षण वर्गीकरण करून द्यावे, अशी मागणी सरकारकडे आली असून त्याचाही विचार करण्यात येणार असल्याचेही यावेळी बागडे यांनी सांगितले. यावेळी इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन संदीप मानकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आरक्षण मिळेल, आत्महत्या करू नका'

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरुण आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत, मात्र आपल्याला आरक्षण मिळेल तरुणांनी आत्महत्या करू नये, असा संदेश रविवारी (५ ऑगस्ट) पथनाट्य तसेच कीर्तनाच्या माध्यमातून देण्यात आला. क्रांतीचौकात मराठा क्रांतीमोर्चा समन्वय समितीच्या ठिय्या आंदोलनात पथनाट्य तसेच कीर्तनाच्या माध्यमातून देण्यात आला.

क्रांतीचौकमध्ये सकाळी रांजणगाव शेनपुंजी येथील ज्ञानाई वारकरी शिक्षणसंस्थेची ह. भ. प. साक्षी महाराज आरखडे हिने उपदेशात्मक अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. 'करणे ते हेची करा' या उपदेशात्मक अभंगाच्या माध्यमातून चांगले काम करा, आत्महत्या करणे हे पुण्याचे काम नाही, आत्महत्या केल्याने आरक्षण मिळणार नाही, आपल्याला थोडे लढावे लागेल, जे काही करायचे ते चांगले करा, असे सांगत साक्षी यांनी उपदेश दिला. यावेळी टाळ, मृदंगाच्या गजराने क्रांतीचौक दुमदुमून गेले होते.

यावेळी रमेश महाराज जाधव, भगवान महाराज ढोकणे, सोपान कोलते महाराज, सुनील गवारे महाराज, समाधान वाघ महाराज, बळीराम महाराज, पांचाळ महाराज, संजय पाठे, संजय विचारे, आबासाहेब कवडे, आत्माराम आगलावे, दीपक तौर, अप्पासाहेब तिडके, राज आरखडे, दत्ता तौर तसेच २५ बालवारकऱ्यांनी या प्रबोधनात्मक कीर्तनामध्ये सहभाग घेतला.

'मी विठ्ठलाचा वारकरी, मी शेतकरी.. मी मराठा'

संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्‍त्र विभाग तसेच इतर विद्यार्थ्यांनी क्रांतीचौकात आरक्षण का व कशासाठी? तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आत्महत्या होऊ नये म्हणून पथनाट्य सादर करून संदेश दिला. डफावर थाप देऊन मी विठ्ठलाचा वारकरी, मी शेतकरी, मी मराठा... या बोलावर उपस्थितांनीही ठेका धरला होता. यावेळी आपल्याला आरक्षण मिळेलच, पण तरुणांनो आत्महत्या करू नका, सरकार झोपेत आहे, आता नाही तर कधीच नाही, असा संदेश यावेळी देण्यात आला. या पथनाट्यामध्ये भारतभूषण पंडित, संदीप कणके, हर्षल पवार, पवन बिरादार, रामा पाडोळे, रतन सोमवारे, आकाश थोरात, सागर धस, रमेश मैंद यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्तिसंग्रामाचे इतिहास लेखन करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भारतीय स्वातंत्र्यलढा राजकीय स्वातंत्र्यासाठी असल्यामुळे एकपदरी होता. हैदराबाद मुक्तिसंग्राम सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि भाषिक असा बहुपदरी होता. या लढ्याचे महत्त्व ओळखून समग्र इतिहास लेखन करणे आवश्यक आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले.

बाबासाहेब परांजपे फाउंडेशन, लातूर संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आयोजित व्याख्यानात बोलत होते. भानुदास चव्हाण सभागृहात रविवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर, सूर्यकांत वैद्य, विजय धबडगावकर आणि अॅड. व्ही. बी. गुणाले यांची प्रमुख परिस्थिती होती.

दिवंगत स्वातंत्र्यसेनानी परांजपे यांच्या कर्तृत्वाला उजाळा देत वाघमारे यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास उलगडला. 'हिप्परगा येथील शाळेत बाबासाहेब परांजपे विज्ञानाचे शिक्षक होते. राष्ट्रीय प्रवृत्तीचे शिक्षक असलेल्या परांजपे यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती निर्माण केली. त्यागी वृत्तीच्या परांजपे यांना अमोघ वक्तृत्त्वाची देण होती. हैदराबाद मुक्तिसंग्राम बहुस्तरीय होता. सव्वादोनशे वर्षे निजामाचे राज्य होते. त्या काळात गणेशोत्सवावर बंदी होती. मंदिर जिर्णोध्दारासाठी परवानगी नव्हती आणि मशिदीसमोर बाजा वाजवण्यास बंदी होती. धार्मिक बंधने आल्यामुळे आर्य समाजाने लढा सुरू केला. संस्थानात हिंदू बहुसंख्य आणि मुस्लिम अल्पसंख्य असल्यामुळे मुस्लिमांची संख्या वाढवण्यासाठी निजामाने प्रयत्न केले. बाहेरच्या राज्यातील मुस्लिमांना बोलावले. धर्मांतरासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. मात्र, त्याचे प्रयत्न फलद्रूप झाले नव्हते. स्टेट काँग्रेसवर बंदी घातल्यानंतर महाराष्ट्र परिषद, आंध्र परिषद आणि कर्नाटक परिषदेच्या माध्यमातून लढा तीव्र झाला. दुर्दैवाने, हा इतिहास दुर्लक्षित राहिला. इतिहासाचे आपल्याला वावडे आहे. इतिहास लिहिण्याऐवजी आपण पुराणे लिहीत बसलो. मराठवाड्यातील संस्था आणि विद्यापीठांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा समग्र इतिहास लिहिण्याची गरज आहे' असे वाघमारे म्हणाले.

'बाबासाहेब परांजपे यांनी सामान्य कुटुंबातील मुले शिक्षणासाठी अंबाजोगाईला आणली. बहुजन समाजाची पहिली पिढी त्यांच्यामुळे शिकली. स्वातंत्र्याची प्रेरणा सर्वांना देतानाच परांजपे यांनी साधू वृत्तीने कार्य केले' असे चपळगावकर म्हणाले. दरम्यान, यावेळी भाऊसाहेब उमाटे दिग्दर्शित गोरटा गावावरील लघुपट दाखवण्यात आला. तसेच परांजपे यांच्या कन्या ऋता बोरगावकर यांचा सत्कार करण्यात आला विजय धबडगावकर यांनी प्रास्ताविक केले आणि श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले.

\Bइतिहास लेखन का रखडले?\B

'कुलगुरू असताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी १८ सदस्यांची समिती नेमली होती. महत्त्वाचे पुरावे, संदर्भ साधने गोळा केली. मात्र, सध्या काम रखडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंनाही विनंती केली. अनेक कुलगुरू आले आणि गेले. कुलगुरू बाहेरचे असल्यामुळे त्यांना मराठवाड्याविषयी प्रेम वाटत नाही. मुक्तिसंग्रामाचा समग्र इतिहास लिहावा' असे आवाहन डॉ. वाघमारे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलगुरू स्पेन दौऱ्यावर

0
0

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आठ दिवसांच्या स्पेन दौऱ्यावर शनिवारी रवाना झाले. गुणवत्ता वाढ आणि शैक्षणिक देवाणघेवाण योजनेअंतर्गत हा दौरा आहे. कुलगुरू १२ ऑगस्टपर्यंत दौऱ्यावर असल्यामुळे कुलगुरूपदाचा कार्यभार प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ध्यास’च्या महोत्सवाची दिमाखदार सांगता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नेवपूरकर फाऊंडेशन संचलित 'ध्यास परफॉर्मिंग आर्टस्'च्या स्वरोत्सवाची तापडिया नाट्यमंदिरात नुकतीच दिमाखदार सांगता झाली. यानिमित्त १९९० ते २००० या दशकातील हिंदी गीते तब्बल ७० विद्यार्थ्यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली.

मेरा दिल भी कितना पागल है, दीदी तेरा देवर दिवाना, ये काली काली आँखे, सोना कितना सोना है, कोई मिल गया, वादा रहा सनम, चुराके दिल मेरा, रुक जा ओ दिल दिवाने, मेरे खाँबो मे जो आये, मैने पायल है छनकाई, तू शायर है, बहोत प्यार करते है तुमको सनम, तू मेरी जिंदगी है,आवारा भवरे अशी एकल आणि द्वंद्व गाणी सादर करून 'ध्यास'च्या विद्यार्थ्यांनी श्रोत्यांना ९० च्या दशकाची रसिली भेट दिली. अद्वैत कुलकर्णी याने 'कीबोर्ड'वर 'दिल ले गायी गुजरात की' आणि 'कुडिया छेड दिया' ही गाणी पेश करून प्रेक्षकांना ताल धरण्यास भाग पाडले. नृत्य विभागाच्या विद्यर्थिनींनी सादर केलेले विनोदी नाट्यप्रवेश लाजवाब ठरले. कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक उमेश दाशरथी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्रावणी तीर्थपुरीकर-सिंसियॅरिटी अवॉर्ड, गार्गी पाटील-अटेंडन्स अवॉर्ड, तन्वी पुरी-बेस्ट परफॉर्मर आणि स्नेहल देशमुख हिला पॅरेंट्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. याशिवाय वर्षभर विविध स्पर्धांमधील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

\Bयांचे परिश्रम \B

कार्यक्रमाचे निवेदन वासंती देशपांडे, निशा झोळगीकर, स्मिता कुलकर्णी, स्मिता देवळाणकर, जयश्री खोत, अपूर्वा उस्मानपूरकर, पौर्णिमा पाटील यांनी केले. नी व प्रकाश योजना अविनाश ठिगळे यांची होती. मुकुंद गोल्हटगावकर यांनी व्यासपीठावर राजवाडा साकारला होता. कार्यक्रमासाठी सचिन नेवपूरकर, केतकी नेवपूरकर, सुजित नेवपूरकर, अभिजीत कुलकर्णी आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज बिल वसुलीत औरंगाबाद राज्यात दुसरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद परिमंडळातून वीज बिलाची वसुली नीट केली जात नाही, अशी ओरड होती. मात्र, जुलैमध्ये महावितरणच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी राज्यात दुसऱ्या क्रमांकाची वसुली केली आहे. जुलैमध्ये औरंगाबाद परिमंडळाने २९८ कोटी रुपये वीज बिल वसूल केले आहे. पहिला क्रमांक नागपूरने पटकावला.

औरंगाबाद परिमंडळात औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण आणि जालना या तीन भागांचा समावेश असून सुमारे सात लाखांपेक्षा जास्त वीज ग्राहक आहेत. जुलैमध्ये औरंगाबाद परिमंडळाला ३०७ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी २९८ कोटी २९ लाख रुपये वसूल करण्यात आले. औरंगाबाद परिमंडळाने जुलैमध्ये पुणे, नाशिकलाही मागे टाकले आहे. वीज बिल वसूल करण्यात राज्यात नागपूर पहिल्या क्रमांकावर असून औरंगाबादने दुसरा क्रमांक मिळवला आहे.

………

सध्याची वीज बिल वसुली उत्तम आहे. मात्र अजून लक्ष देण्याची गरज आहे. वीज बिल वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सध्या वीज चोरी आणि गळती थांबविण्यासाठी विशेष कारवाई सुरू आहे.

-सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, औरंगाबाद परिमंडळ

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहेरा येथे एकाला दोन किलो गांजासह अटक

0
0

वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील एकलेहरा झोपडपट्टी येथील शनिवारी (तीन ऑगस्ट) सांयकाळी एका घरावर छापा मारून दोन किलो गांजा जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे़ दीपक अरूण चव्हाण (१९. रा़ एकलहेरा झोपडपट्टी, ता. गंगापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो अनेक दिवसांपासून गांजा विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली असता तेथे दोन किलो गांजा आढळून आला. गांजा व रोख रक्कम दोन हजार ८६० असा एकूण २२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, हेड कॉन्स्टेबल वसंत शेळके, रामदास गाडेकर, प्रकाश गायकवाड, सुधाकर केंद्रे, फकीरचंद फडे, बाळासाहेब आंधळे, मनमोहन कोलिमी, राजकुमार सुर्यवंशी, महिला कर्मचारी जयश्री म्हस्के यांनी पार पाडली. आरोपी चव्हाण याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक उंबरे हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मजविप’च्या अध्यक्षपदी प्रताप बोराडे

0
0

औरंगाबाद - मराठवाडा जनता विकास परिषदेच्या औरंगाबाद शहर शाखेच्या अध्यक्षपदी प्राचार्य प्रताप बोराडे यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिवपदी प्रा. मोहन फुले, सहसचिवपदी महेश देशमुख व कोषाध्यक्षपदी सारंग टाकळकर यांची निवड झाली. या कार्यकारिणीत डॉ. मनोरमा शर्मा, अॅड. प्रदीप देशमुख, सुरेश देशपांडे, भरत राठोड, डॉ. रश्मी बोरीकर, समीर राजूरकर आणि प्रमोद देव यांचा समावेश आहे. निमंत्रित सदस्यात ज्येष्ठ सदस्य ना. वि. देशपांडे, डॉ. सु. भि. वराडे, श्रीराम वरुडकर व डॉ. शरद अदवंत यांना सहभागी करुन घेण्यात आले. अभ्यास गट प्रमुख म्हमून प्राचार्य जीवन देसाई काम पाहतील. तर अनंत आचार्य, प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे व काशिनाथ थिगळे सहकार्य करतील. मराठवाडा विभागाचे हित जपणारी चळवळ म्हणून मराठवाडा जनता विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात व तालुका स्तरावर संस्थेचे कार्य सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images