Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नगरपालिका सेवा भरतीत चुका ,याचिकेत तंत्रमंडळाला नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील नगरपालिका व नगर पंचायतीमधील सेवा भरतीत चुकीच्या पद्धतीचा अवलंब केल्याचा आक्षेप घेऊन या विरोधात याचिका करण्यात आली आहे.

नगरपालिका व नगर पंचायतीचे रिक्त पदे भरण्यासाठी ऑन लाईन पूर्व परीक्षा २३ मे २०१८ रोजी घेण्यात आली. परीक्षेनंतर उमेदवारांना रिस्पॉन्स शीट न पुरवताच यादी प्रसिद्ध करण्यात आली. याबद्दल परीक्षार्थींनी आक्षेप नोंदवले. त्यानंतर महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळाने काही प्रश्‍न रद्द केले. मात्र, चुकीच्या प्रश्‍नांची उत्तरे तशीच ठेवली व अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करून गुणांकन यादी प्रसिद्ध केली. उमेदवारांनी चुकीच्या घोषित उत्तराबद्दल आक्षेप नोंदवूनही त्याची दखल घेण्यात आली नाही, म्हणून याचिका करण्यात आली आहे. सुनावणीनंतर खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावल्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे नितीन कदराळे यांनी बाजू मांडली. याचिकेची सुनावणी १६ ऑगस्टला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरक्षणासाठी कॉँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या समर्थनार्थ शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. आंदोलकांच्या वतीने

तहसीलदार संतोष गोरड यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

राज्यात इतर समाजाच्या ५२ टक्के आरक्षणाला हात न लावता मराठा - मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, धनगर समाजाचा आदिवासीमध्ये समावेश करावा, समस्त कोळी समाज बांधवांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, प्रमाणे मराठा-मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व उच्चशिक्षणातील शैक्षणिक सवलती तसेच आर्थिक विकास महामंडळाला अखंडित वाढीव आर्थिक तरतूद करून निधी देण्यात यावा, धनगर व कोळी समाजाच्या मागण्या मान्य कराव्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, माजी अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन, नगराध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे (सिल्लोड), प्रभाकर आबा काळे (सोयगाव), प्रदेश प्रतिनिधी रवींद्र काळे, विक्रांत दौड, काँग्रेस शहराध्यक्ष प्रा.मन्सूर कादरी, बाबासाहेब तायडे, हरिभाऊ राठोड, सोयगाव पं. स. सभापती धरमसिंग चव्हाण, बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी फुलंब्रीत हल्लाबोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी समाजाच्या आरक्षणासाठी शुक्रवारी तालुका कॉँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून दोन तास निदर्शने करण्यात आली.

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, रवींद्र काळे, जगन्नाथ काळे, गौतम माळकरी, संदीप बोरसे, रज्जाक सेठ आदींची यावेळी उपस्थिती होती. 'उभ्या महाराष्ट्र कडकडीत बंद झाला. लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे निघाले, सतत आंदोलने होत आहे. या शासनाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला. तरी सरकारला पाझर फुटत नाही,' असा हल्लाबोल यावेळी डॉ. कल्याण काळे यांनी केला. तर सत्तार म्हणाले, 'केंद्रात हिटलर शाही आहे. राज्यात आपले आमदार आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉँग्रेसने जे आरक्षण दिले, तेच कायम करावे. मात्र, सरकार ते करत नाही. मी मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

वैजापूरमध्ये आंदोलन

मुस्लिम समाजला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाच टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जमियत उलमा ए हिंद व मुस्लिम समाजातर्फे शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

मुस्लिम समाजाने स्वातंत्र्यासाठी मोठ्या प्रमाणावर बलिदान दिले आहे, पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात या समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती झाली नाही. त्यामुळे हा समाज आजही मागासलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाची शासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याने मुस्लिमांना शिक्षण व नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून आरक्षच द्यावे असे निवेदनात म्हटले आहे. माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ आदींनी आंदोलकांची भेट घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचा आवाज

$
0
0

\Bउद्योगांवरील हल्ले विकासासाठी मारक

वाळूज औद्योगिक वसाहतीत नऊ ऑगस्ट रोजी कारखान्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उद्योग क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा प्रकारच्या घटना विकासाला मारक आहेत, अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केल्या.\B

---

आंदोलन शांततेच्या मार्गानेच झाले पाहिजे. कंपन्यांनी देखील आंदोलनामागची भावना लक्षात घेतली पाहिजे. तोडफोडीची घटना निषेधार्ह आहे. तोडफोड करणारे आंदोलनकर्तेच होते की दुसरे कोण होते याचा तपास सक्षम यंत्रणेने केला पाहिजे. तोडफोडीसारख्या घटनांमुळे विकासावर परिणाम होईल. पोलिसांनी खऱ्या आरोपींचा तात्काळ तपास करून त्यांना कायद्याने शिक्षा करावी.

- समीर राजूरकर

आंदोलन करणाऱ्यांनी शांतपणे आंदोलन केले पाहिजे. तोडफोडीसारख्या घटनांमुळे सामान्य नागरिक वेठीस धरला जाऊ शकतो. तोडफोड करणारे आंदोलन करणारेच होते का, या बद्दल शंका वाटते. पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे. औद्योगिकक्षेत्रावर अनेक कुटुंब अवलंबून असतात. अशा घटनांमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

- उत्तमराव मनसुटे

लोकशाहीत आंदोलनाचा मार्ग शांततापूर्ण असेल तर तो मान्य आहे. हाच मार्ग हिंसक झाला तर तो लोकशाहीला अमान्य आहे. आपल्या देशात झुंडशाहीला उत आला आहे. हे थांबवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या विरुद्ध कायद्याची कठोर अंमलबजावणी करून निकसानभरपाई करून घेतली पाहिजे.

- अॅड. बी. एल. सगर किल्लारीकर

शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवला जाऊ शकतो. तोडफोड करून, उद्योगांना टार्गेट करून काहीच साध्य होणार नाही. उलट त्यात आपल्या विभागाचेच नुकसान आहे. शहराची प्रतिमा डागाळली जाईल. उद्योगांनी स्थलांतर केले, रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला तर तो फार भयावह असेल. त्याचा परिणाम रोजीरोटीवर, विकासावर होईल.

- राहुल मोतीयळे

उद्योगांवर हल्ला करून मोडतोड करण्याचे काम स्थानिकांचे नाही असे वाटते. अंतर्गत वादातून ही घटना घडली असावी असे वाटते. अशा घटनांमुळे उद्योगधंद्यांवर परिणाम होईल. शहराची प्रतिमा मलीन होईल. याच उद्योगांनी आपल्याला नोकऱ्या दिल्या. आता त्यांच्यावर हल्ले करून आपण नेमके काय साधले. उद्योगांचे स्थलांतर झाले तर अवघड होईल.

- मनोज उबाळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंच, पोलिस पाटील परिषद शनिवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ग्रामीण व्यवस्थेचे आधारस्तंभ असलेले सरपंच आणि पोलिस पाटील यांच्या प्रमुख मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या मागण्यांवर साधकबाधक चर्चा करून सरकारला निवेदन देण्यासाठी औरंगाबाद जिल्हा सरपंच, पोलिस पाटील संकल्प परिषद होणार आहे' अशी माहिती संयोजक मिलिंद पाटील यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दिल्ली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी आणि औरंगाबादेतील लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठान यांच्यातर्फे औरंगाबाद जिल्हा सरपंच, पोलिस पाटील संकल्प परिषद घेण्यात येणार आहे. संत तुकाराम नाट्यगृहात शनिवारी (१८ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता परिषद होईल. या परिषदेला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार राजीव सातव, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदर्श गावाचे ३० सरपंच व पोलिस पाटील यांच्यासह प्राचार्य सूर्यकांता गाडे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. या पत्रकार परिषदेला उद्योग क्रांती संघटनेचे महेश गुजर आणि पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष जब्बार पठाण उपस्थित होते.

\Bसरपंच, पोलिस पाटलांचा मागण्या\B

- पोलिस पाटलांचे मानधन दरमहा तीन हजार रुपयांवरून साडेसात हजार रुपये करावे

- सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना दरमहा ग्रामसेवकाच्या वेतनाएवढे सरकारी मानधन व पेन्शन द्यावी

- ग्रामपंचायतीच्या कामासाठी रेल्वे, बसचा मोफत प्रवास द्यावा

- ग्रामपंचायतीला कायमस्वरुपी मोबाइल व फोन बिल द्यावे

- कमी उत्पन्नाच्या ग्रामपंचायतीच्या ऑपरेटरचा पगार व दैनंदिन खर्च शासनाने करावा

- पोलिस पाटलांना निवृत्तीनंतर तीन लाख रुपये व पेन्शन द्यावी

- हंगामी पोलिस पाटलांना सेवेत कायम करा

- पोलिस पाटलांना ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र कक्ष देण्यात यावा

- निवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे

\Bसत्यपाल महाराजांचे कीर्तन

\Bया परिषदेनिमित्त प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे कीर्तन होणार आहे. जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात ८२३ पोलिस पाटील आहेत. गावांशी संपर्क साधला असून सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर हिशेब जुळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नीकरण शुल्काचा १३ वर्षांचा हिशेब अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या शैक्षणिक विभाग शेवटच्या वर्षाचा हिशेब जुळवत असून पुढील आठवड्यात संबंधित अहवाल वित्त व लेखा विभागाला सादर करणार आहे. दहा वर्षे संलग्नीकरण शुल्क बुडवणाऱ्या महाविद्यालयांचे प्रताप तपासात उघड झाले आहेत.

उच्च शिक्षण विभागाने मार्च महिन्यात विद्यापीठाचा आर्थिक ताळेबंद मांडला होता. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आर्थिक पाहणीत धक्कादायक प्रकार समोर आले. काही महाविद्यालयांनी तब्बल १३ वर्षे संलग्नीकरण शुल्क दिले नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष मांडण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताशेरे ओढल्यानंतर संलग्नीकरण शुल्काचे हिशेब जुळवून अहवाल सादर करण्यात येईल असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले होते. एका महिन्यात संबंधित अहवाल देणे अपेक्षित होते. मात्र, पाच महिन्यानंतरही प्रशासन अहवाल पूर्ण करू शकले नाही. शैक्षणिक विभाग प्रत्येक वर्षीच्या संलग्नीकरण शुल्काची नोंद पाहून स्वतंत्र अहवाल तयार करीत आहेत. या कामासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमले नसल्यामुळे कामाला प्रचंड विलंब झाला आहे. संलग्नीकरणासाठी महाविद्यालये विद्यापीठ प्रशासनाकडे दरवर्षी संलग्नीकरण शुल्क भरतात. अनेक महाविद्यालयांनी शुल्कापोटी डिमांड ड्राफ्ट जमा केले, मात्र ड्राफ्ट न वटवता पुन्हा परत घेण्यात आले. विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनेक वर्षे हा प्रकार सुरू होता असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. संलग्नीकरण प्रक्रिया करताना शुल्काचा डिमांड ड्राफ्ट असला तरी विद्यापीठाकडे रक्कम जमा होत नव्हती. प्रशासकीय स्तरावर शुल्क जमा केल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात शुल्क विद्यापीठाकडे जमा नाही. हा गैरप्रकार कोणत्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे. शैक्षणिक विभागाने १९९९ ते २०१२ या तेरा वर्षांचा हिशेब जुळ‌वला आहे. विभागाचे दैनंदिन काम सांभाळून कर्मचारी संलग्नीकरण शुल्काचा तपास करीत आहेत. हा अहवाल लेखा व वित्त विभागाला पुढील आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. लेखा विभाग शुल्काची तूट शोधून प्रशासनाला अंतिम अहवाल देणार आहे. या अहवालानुसार दोषी महाविद्यालयांकडून शुल्क वसूल करणे आणि कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. महाविद्यालयांना नोटीस बजावून शुल्क वसूल करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासकीय स्तरावर अहवाल तयार झाला असून महाविद्यालये कात्रीत सापडली आहेत.

३० महाविद्यालयांना मुभा?

महाविद्यालयांनी शुल्क जमा केल्याची नोंद असून, प्रत्यक्षात 'डीडी' वटवले नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. जवळपास ३० महाविद्यालयांनी १३ वर्षे शुल्क न भरता संलग्नीकरण मिळवल्याची चर्चा आहे. या महाविद्यालयांवर प्रशासन कठोर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत सावता महाराज दर्शनासाठी गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी शहर व परिसरात भजन, किर्तन, महाप्रसाद यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. औरंगपुऱ्यातील संत सावता महाराज मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. सकाळी मंदिर परिसरातून टाळ मृदंगाच्या गजरात महाराजांची पालखी काढण्यात आली.

औरंगपुऱ्यातील संत सावता महाराज मंदिर येथे पहाटे धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते पादुका व प्रतिमापूजन केल्यानंतर मोठ्या भक्तीभावाने, टाळ मृदंगाच्या गजरात सकाळी पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. नगरसेवक सचिन खैरे, ट्रस्टचे प्रमुख रामभाऊ पेरकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजी मंडई, कुंभारवाडा, रंगारगल्ली, सिटी चौक, मच्छली खडक, सुपारी हनुमान मंदिर, गुलमंडीमार्गे निघालेल्या या पालखी मिरवणुकीची सांगता संत सावता महाराज मंदिरात येथे झाली. त्यानंतर आमदार अतुल सावे यांच्या हस्ते मंदिरात महाआरती झाली. उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, पोलिस उपाधीक्षक सोमनाथ मालकर, अंकुश रेंधे, गौतम लांडगे, एकनाथ वाघचौरे, डॉ. संजय गव्हाणे, डॉ. राजेंद्र धनवई, शशीकला खोबरे, डॉ. वि.दा. बुलबले, विठ्ठलराव ठाणगे, पांडुरंग जमधडे, संतोष घोडके, किशोर पुंड आदी उपस्थित होते. महाआरती नंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कुसुम राऊत, अनिता देव्हतकर, संगीता पवार, सविता पुंड, राम मगर, किशोर पुंड, फकीरराव राऊत, शिवाजी गाडेकर आदी उपस्थित होते.

सावता परिषद

संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथीनिमित्त विष्णुनगर येथील विश्वशंकर मंगल कार्यालयात सावता परिषदेतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प विठ्ठल महाराज चनघटे यांचे कीर्तन झाले. आमदारअतुल सावे, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष अभिमन्यु उबाळे , इंजि.जयवंतराव गायकवाड़, जिल्हाध्यक्ष प्रवीण गाडेकर, अशोक जगधने रामचंद्र जाधव, सोमनाथ जाधव, एकनाथराव वाघ, चंद्रभान जगधने, नागोराव जैवळ, रामभाऊ गाडेकर, रावसाहेब गायकवाड़, अंकुश चेडे, बबनराव शिंदे, डॉ. रत्नाकर जाधव, अविनाश उबाळे, रामदास मैंद, पोपट ढंगारे, घाटे महाराज मलोदे महाराज आदी उपस्थित होते. यारप्रसंगी विष्णुनगर भजनी मंडळाने 'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, 'आमची माळियाची जात, शेत लावू बागायती' यासह संत शिरोमणी सावता माळी यांचे अन्य अभंग सादर केले.

अर्जुन महाराज यांचे किर्तन

संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त मुकुंदवाडी परिसरातून संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. आमदार अतुल सावे, भगवान घडमोडे, जनार्धन कापुरे, अशोक राऊत, बाळू सोनवणे, प्रवीण गाडेकर, किसन कोल्हे, संगिता पवार यांच्या भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर येथील हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात अर्जुन महाराज होलिया (सेलू) यांचे कीर्तन झाले. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायोमेट्रिक हजेरीच्या अहवालाचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरू करून त्याचा अहवाल तात्काळ पाठवा, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत.

अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याचे आदेश शासनाने यापूर्वीच उपसंचालकांच्या कार्यालयाच्या मार्फत शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. हजेरी सुरू कराण्याबाबत अहवाल ३० जुलैपर्यंत सादर करा, असे आदेशही देण्यात आले होते. दीड महिना उलटला तरी या संबंधिचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे उरसंचालकांनी दहा ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकाऱ्याच्या नावे पत्र पाठवले. बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल खास दुताच्या माध्यमातून १६ ऑगस्टपर्यंत न चुकता सादर करा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांकडून बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल मिळवण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाची धावपळ सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहराला डेंगीचा धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराला कचऱ्यापाठोपाठ आता डेंगीचा धोका निर्माण झाला आहे. महिनाभरात डेंगीचे दहा रुग्ण आढळले आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागातील हे रुग्ण असले तरी महापालिकेने दक्षता घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील १९९ विभाग अतिजोखमीचे जाहीर करण्यात आले आहेत.

जिल्हा हिवताप कार्यालयाकडून महापालिकेला डेंगीच्या रुग्णांची यादी प्राप्त झाली आहे. या यादीमध्ये २३ रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी दहा रुग्ण औरंगाबाद शहरातील आहेत. कटकटगेट, मकसूद कॉलनी, जयभीम नगर, शहाबाजार, शहागंज, औरंगपुरा, जयसिंगपुरा, सादातनगर, रोकडिया हनुमान कॉलनी या भागातील हे दहा रुग्ण आहेत. या संदर्भात माहिती देताना महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, 'एकाच भागात जास्त रुग्ण आढळले तर त्याला साथ संबोधले जाते. हिवताप कार्यालयाच्या यादीत ज्या रुग्णांची नावे आहेत ते रुग्ण शहराच्या विविध भागातील आहेत. त्यामुळे डेंगीची साथ निर्माण झाली किंवा डेंगीची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे, असे म्हणता येणार नाही. असे असले तरी आम्ही योग्य ती दक्षता घेत आहोत. पाऊस नसल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन औषध फवारणीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. स्वच्छ पाण्यात डेंगीचे आणि चिकुन गुणीयाचे डास तयार होतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातील माठ, रांजण रिकामे करून नंतर ते भरले पाहिजेत. वापरण्याच्या पाण्यासाठी हौद असेल तर त्यात गप्पी मासे सोडले पाहिजेत. महापालिकेने प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात गप्पी मासे पैदास केंद्र सुरू केले आहे. याशिवाय डेंगी, चिकुनगुनिया यासह साथींच्या आजारांसाठी शहरातील १९९ विभाग अतिजोखमीचे विभाग म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या विभागांवर विशेष लक्ष दिले जात असल्याचा दावा डॉ. पाडळकर यांनी केला आहे.

डेंगी, चिकुनगुणीया यासह साथीच्या आजारांसाठीचे अतिजोखमीचे विभाग : १९९

या विभागातील घरांची संख्या : ९९ हजार ९९२

लोकसंख्या : ४ लाख ९९ हजार ९८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ साठी आज पालिकेची सभा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

समांतर जलवाहिनीच्या संदर्भातील कराराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावावर या प्रस्तावाच्या अनुशंगाने महापालिका आयुक्तांनी तयार केलेल्या प्रस्तावावर विचार करून निर्णय घेण्याबद्दल महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी ( ११ ऑगस्ट) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. यापूर्वी याच विषयावरची सर्वसाधारण सभा दोनवेळा तहकूब करावी लागली होती. उद्या शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेला आयुक्त डॉ. निपुण विनायक उपस्थित राहणार नाहीत. रजा घेऊन ते आपल्या गावी चंदीगडला रवाना झाले आहेत. आयुक्तच सभेला नसल्यामुळे या विशेष सर्वसाधारण सभेसमोर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रोन कॅमेऱ्याने सर्वेक्षण करण्याच्या कामाचा शुभारंभ

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

सातारा - देवळाई परिसरात जलवाहिनी व ड्रेनेज लाइनच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार महापालिकेतर्फे तयार करण्यात येणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य, नगरसेविका सायली जमादार, अप्पासाहेब हिवाळे, सिध्दांत शिरसाट यांच्यासह नागरिक उपस्थित होते. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत सातारा - देवळाई भागात जलवाहिनी व ड्रेनेज लाइनचे काम केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग हल्ल्याची ‘सीआयडी’ चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या शहर बंदला वाळूज औद्योगिक परिसरात हिंसक वळण लागले, मात्र या घटनेमध्ये मराठा क्रांती मोर्चाला विनाकारण गोवण्यात येत असून, आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. या कंपन्यांमध्ये झालेल्या तोडफोडीची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.

मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत उद्योगांवरील हल्ल्याचा निषेध करून समाजकंटकांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. विनोद पाटील म्हणाले, उद्योगांवर झालेल्या हल्ल्याचे आम्हाला मोठे दु:ख आहे. पोलिस प्रशासनाने कंपनीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून, या प्रकरणाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून समाजकंटकांविरुद्ध कारवाई करावी. शहरात उद्योगांवर झालेला हल्ला भूषणावह नाही. तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी शहरात मोठे उद्योग आले पाहिजे अशीच आमचीही अपेक्षा आहे. उद्योगांवर झालेला हल्ला हा शहराच्या अस्मितेवर झालेला हल्ला असून मराठा क्रांती मोर्चा अशा वृत्तीला कधीही थारा देणार नाही. चाकण, नवी मुंबईमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात पोलिसांना गुन्हेगारी रेकॉर्डवर असलेले लोक सापडले. ज्यांचा मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजाशी संबंध नाही. वाळूजमध्ये झालेल्या घटनेमध्येही असेच लोक सापडतील. सीआयडी चौकशी झाली तर या तिन्ही प्रकरणांचा परस्पर संबंध आहे काय, हेही पुढे येईल. क्रांती मोर्चाकडून वाळूजमध्ये शांततेत बंद पाळण्यात आला. संध्याकाळी राष्ट्रगीत म्हणून बंदची सांगता करण्यात आली. वाळूज येथील घटनेनंतर जी धरपकड झाली त्यात आमचा कार्यकर्ता सापडलेला नाही. आम्ही उद्योजकांच्या दुखात सहभागी आहोत. त्यांची भेट घेणार असून सहकार्य लागले तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असेही पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी राजेंद्र जंजाळ, किशोर चव्हाण, सुरेश वाकडे, रवींद्र काळे, राजेंद्र दाते पाटील यांच्यासह इतर समन्वयकांची उपस्थिती होती.

\B१५ ऑगस्टपासून चूलबंद आंदोलन

\Bआंदोलनानंतर आजही आमचे प्रश्न जैसे थे आहेत. आमची एकही मागण्या मान्य केली नाही. त्यामुळे आता सरकारला जाग यावी म्हणून आम्ही स्वत:लाच त्रास करून घेण्यास सुरुवात करणार आहोत. यासाठी १५ ऑगस्टपासून एक वेळ चूलबंद आंदोलन करणार आहोत. ही मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाची पुढील दिशा राहणार असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात ‘समांतर’चे काम मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या वर्षभराच्या काळात समांतर जलवाहिनीचे काम मार्गी लागेल आणि जायकवाडीहून औरंगाबादपर्यंत या जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी येईल, अशी ग्वाही राज्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी शुक्रवारी दिली.

'क्रेडाई'च्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी परदेशी शहरात आले होते. या कार्यक्रमात महापौर नंदकुमार घोडेले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी परदेशी यांच्याकडे दोन मागण्या केल्या. पहिली मागणी नगररचना विभागाच्या संचालकांकडे असलेल्या 'टीडीआर'च्या फाइल परत मिळाव्यात, अशी होती आणि दुसरी मागणी समांतर जलवाहिनीसंदर्भातील होती. महापौर म्हणाले,'समांतर जलवाहिनीचा प्रश्न प्रलंबित आहे. समांतर जलवाहिनी शहराची गरज असून, या प्रकल्पाला शासनाने चालना दिली पाहिजे.'

महापौरांच्या भाषणाचा हाच धागा पकडून परदेशी म्हणाले,'समांतर जलवाहिनी योजनेबद्दल येत्या दोन महिन्यांत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण होईल आणि जायकवाडीचे पाणी औरंगाबादला मिळेल.'

\Bयोजनेचा एक तपाचा प्रवास\B

समांतर जलवाहिनी योजनेचा प्रस्ताव सर्वप्रथम २००६-२००७मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. २००९मध्ये शासनाच्या स्तरावर या योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेच्या कामासाठी २०१०मध्ये महापालिकेला शासनाकडून १४४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला. समांतर जलवाहिनीचे काम 'पीपीपी'तत्वावर करण्यासाठी महापालिकेने २०१२मध्ये कंपनीबरोबर करार केला. औरंगाबाद शहराची पाणीपुरवठा योजना २०१३मध्ये महापालिकेने कंपनीकडे हस्तांतरित केली. त्यानंतर सात दिवसांतच ती परत घेतली. एक सप्टेबर २०१४ रोजी पाणीपुरवठा योजना पुन्हा कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. एक ऑक्टोबर २०१६ रोजी महापालिकेने कंपनीबरोबरचा 'पीपीपी' तत्वावरील करार रद्द केला. त्यानंतर समांतर जलवाहिनीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ ची बैठक चौथ्यांदा तहकूब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या कराराचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेली विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी चौथ्यांदा तहकूब झाली. महापौरांनी १७ ऑगस्ट रोजी या विशेष सभेचे आयोजन केले आहे.

आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान रजा घेतली आणि ते बाहेरगावी गेले. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना सर्वसाधारण सभेत आयुक्तांच्या जागी बसण्याचे अधिकार दिले. सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी व गटनेत्यांनी आयुक्त नसल्यामुळे सभा तहकूब करण्याची मागणी केली. उपमहापौर विजय औताडे यांनी तर भाजपतर्फे महापौरांना पत्र देवून सभा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी देखील हीच भूमिका मांडली. एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी, विरोधीपक्षनेता जमीर कादरी, अब्दुल नाईकवाडी, काँग्रसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेविका कीर्ती शिंदे, अॅड. माधुरी अदवंत यांच्यासह सभागृहनेता विकास जैन यांनीही सभा तहकूब करण्याची मागणी केली.

\B'समांतर'चा ठराव मंजूर करून पाठवा : परदेशी

\B'समांतर'चा ठराव मंजूर करून पाठवा, शासन मदत करायला तयार आहे, असे आश्वासन राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहे, माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. महापौर म्हणाले, 'परदेशी क्रेडाईच्या कार्यक्रमासाठी होते. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी 'समांतर' योजना व्हावी अशी शासनाची इच्छा आहे. कंपनीची देखील काम करण्याची तयारी आहे. अशा स्थितीत महापालिकेने ठराव करून पाठवला आणि मदत करण्याची विनंती केली तर या विनंतीचा शासन निश्चितपणे विचार करील असे सांगितले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रात महापालिकेसह सिडको आणि एमआयडीसी हे दोन नियोजन प्राधिकरण आहेत. वास्तविक पाहता महापालिका हे एकच नियोजन प्राधिकरण असले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. याबद्दलही परदेशी यांच्याशी चर्चा झाली. महापालिकेच्या २३० 'टीडीआर' फाईल चौकशीसाठी संचालकांच्या ताब्यात आहेत. या फाइल परत मिळाव्यात अशी मागणी देखील परदेशी यांच्याकडे केली आहे,' असे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस उपायुक्तपदी खाटमोडे रुजू

$
0
0

औरंगाबाद : शहर पोलिस उपायुक्त पदाचा पदभार नीलेश खाटमोडे यांनी शनिवारी स्वीकारला. ते यापूर्वी 'एटीएस' पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांची बदली मुंबई पोलिस विभागाच्या शहराच्या उपायुक्तपदी झाली होती. मुंबई पोलिस उपायुक्त पदी रूजू न झाल्याने त्यांची बदली औरंगाबाद शहरात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे वाळूज एमआयडीसी परिसरात नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या तोडफोडीचा तपास देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मांडुळाला सहा पिल्ले

$
0
0

औरंगाबाद : सापाच्या मांडूळ जातीच्या मादीने सहा पिल्लांना जन्म दिला. शेंद्र्यातील माळरानावर एका कर्मचाऱ्याने मांडूळ जातीचा साप सुस्त पडलेला पाहिला. त्याने लगेचच डॉ. किशोर पाठक यांच्याशी संपर्क साधला. डॉ. पाठक यांनी सर्पमित्र नीलेश जाधव यांना पाठवून तो साप ताब्यात घेतला. आठ ऑगस्ट रोजी या मांडूळ जातीच्या मादी सापाने सहा पिल्लांना जन्म दिला. यापैकी पिल्लू लगेचच दगावले. उर्वरीत पाच पिल्लांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना तात्काळ सोडून देण्यात येणार आहे. मांडूळ वनखात्याच्या ताब्यात दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिकांनी जागवल्या देवळीच्या आठवणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्रातील वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या देवळीची नानाविध रूपे पाहताना रसिकांचे भान हरपले. निमित्त होते, प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या 'देवळी' या छायाचित्र प्रदर्शनाचे. वेगवेगळ्या भागात फिरून टिपलेली छायाचित्रे मराठी संस्कृतीचा आविष्कार दाखवणारी आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्रपत्रविद्या महाविद्यालय यांच्या वतीने प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांचे 'देवळी' छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. एमजीएम कलादीर्घा आर्ट गॅलरीत शनिवारी सायंकाळी प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावेळी विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, संदेश भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. एका मित्राच्या घरी कोनाड्यात ठेवलेली वर्तमानपत्रे पाहिली आणि फोटो काढला. देवळी हा विषय होऊ शकतो असे लक्षात आल्यानंतर राज्यभर फिरून छायाचित्रे काढली असे भंडारे यांनी सांगितले. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बोराडे यांचा सत्कार करण्यात आला. जुन्या घरात 'कोनाडा' अविभाज्य भाग होता. हेच वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्य भंडारे यांनी टिपले आहे. देवळीत तेलाचा दिवा, घरातील देव, गरजेच्या वस्तू असत. काळानुरूप बदल होऊनही कोनाड्यांची गरज संपली नाही. नवीन बांधकाम पद्धतीत भिंतींची जाडी कमी होऊन खोलवर कोरले जाणारे कोनाडे कायमचे संपले. पुस्तके, वर्तमानपत्रे, खतावण्या, दूरध्वनी, विद्युत मीटर यांना कोनाड्याने जागा दिली. भंडारे यांनी कॅमेऱ्याच्या सहाय्याने 'देवळी' छायाचित्र प्रदर्शनाला मूर्त स्वरूप दिले. नानाविध आकाराची आणि नक्षीची देवळी पाहताना रसिकांना मनस्वी आनंद झाला. हे प्रदर्शन येत्या १९ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री आठपर्यंत खुले राहणार आहे. श्रीकांत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. रेखा शेळके, प्रा. आशा देशपांडे, आर. डी. देशपांडे, सुबोध जाधव, गणेश घुले, उमेश राऊत यांच्यासह विद्यार्थी व रसिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमांचे वर्तमान अस्वस्थ करते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ज्वलंत प्रश्नांवर प्रसारमाध्यमे सडेतोड भूमिका घेण्याऐवजी मध्यममार्ग निवडतात. जागतिकीकरणानंतर सर्व गोष्टींचे सपाटीकरण झाले. सद्यस्थितीत एकाच पठडीतील माध्यमे पाहिल्यानंतर त्याची प्रचिती येते. माहिती व ज्ञानप्रसारावर अंकुश निर्माण झाल्यामुळे प्रसारमाध्यमांचे वर्तमान अस्वस्थ करणारे आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी केले. ते व्याख्यानात बोलत होते.

मराठवाडा साहित्य परिषदेची ना. गो. नांदापूरकर व्याख्यानमाला शनिवारी सुरू झाली. पहिल्या दिवशी 'प्रसारमाध्यमांचे वर्तमान' या विषयावर प्रा. जयदेव डोळे यांनी विचार मांडले. यावेळी मंचावर 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील उपस्थित होते. सद्यस्थितीत देशात वर्तमानपत्रे-टीव्ही यांचे भवितव्य धूसर असल्याचे डोळे यांनी नमूद केले. 'जेम्स ऑगस्ट हिकीने भारतात वर्तमानपत्राचा पाया घातला. तेव्हाचे प्रश्न आजही कायम आहेत. सध्या माध्यमांचे तंत्रज्ञान बदलले आणि आशय हरवला आहे. पत्रकारांचे महत्त्व कमी होऊन भांडवलदारांचे महत्त्व वाढले. विशेषत: १९९१ नंतर पत्रकार, संपादक यांचा ऱ्हास झाला. मार्केटिंग मॅनेजर, ब्रँडींग मॅनेजर यांचा दबदबा वाढला आणि संपादकाचा घटला. अक्षरश: शब्द बिचकू लागले. मंडल आयोगानंतर साक्षरता वाढल्याने वाचकसुद्धा वाढले. वर्तमानपत्र लठ्ठ झाले आणि आशय हडकुळा झाला. अवाजवी कर, वशिलेबाजी, भ्रष्टाचार याविरोधात पत्रकार कमी बोलत आहेत. शोषकाविरुद्ध आवाज उठवणारी शोध पत्रकारिता दुरापास्त झाली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून वातावरण गरम होते. पण, प्रकाश निर्माण होत नाही' असे प्रा. डोळे म्हणाले. कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले आणि डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी, साहित्य रसिक उपस्थित होते.

\Bराजसत्तेशी लढा संपला

\B'पूर्वी वर्तमानपत्रांची संपादकाच्या नावाने ओळख होती. आता मालकाच्या नावाने ओळख आहे. राजसत्तेशी भांडल्याने नोकरी गमावल्याच्या घटना अलीकडे टीव्ही माध्यमात घडल्या आहेत. धर्मसत्तेशी भांडलात, तर एका महाराजाच्या उत्पादनाच्या जाहिराती बंद होतात. या परिस्थितीतही वृत्तपत्रे ज्ञान निर्मितीचा गाभा टिकवून आहेत. पण, खर्चिक टीव्ही माध्यमाला कातडीबचावू भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही' अशी टीका डोळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे मास्टर्सचे उपाशीपोटी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे मास्टर पदावर असलेल्या जवळपास ३५ हजार कर्मचाऱ्यांची रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या ११ मागण्यांच्या पूर्ततेसाठी शनिवारी देशभरात उपोशीपोटी २४ तास नोकरी केली. या आंदोलनात औरंगाबाद येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर रेल्वे मास्टर पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी दररोज सोबत आणलेला जेवणाचा डबाही शनिवारी आणला नव्हता. त्यांनी सकाळपासून उपाशीपोटी रेल्वे वाहतूक सुरळीत राहावी यासाठी परिश्रम घेतले. तिसरी पदोन्नती लवकर मिळावी, रेल्वे मास्टर्सची ड्युटी १२ वरून आठ तासांची करावी. स्टेशन मास्टरला रेल्वेची सुरक्षित वाहतूक करण्याबाबत निर्देश द्यावे लागतात. या कामाचा ताण मास्टरवर वाढत चालला आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा व ताणतणाव भत्ता द्यावा. ज्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी सहाय्यक रेल्वे मास्टर नेमावा. ज्या रेल्वे स्टेशनवर शैक्षणीक आणि वैद्यकीय सुविधा नाही, अशा रेल्वे मास्टर्सच्या कुटुंबीयांना जवळच्या ज्या स्टेशनवर या सुविधा आहेत, अशा ठिकाणी राहण्याची परवानगी देण्यात यावी. विश्रांती कक्षात राहण्याची सुविधा दयावी. नवीन पेन्शन योजना रद्द करून त्या जागी जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदार्थ बल’चे आज प्रकाशन

$
0
0

औरंगाबाद : 'पदार्थ बल' या डॉ. वसंत आचवल लिखित पुस्तकाचे प्रकाशन रविवारी होणार आहे. भानुदास चव्हाण सभागृहात सायंकाळी सहा वाजता जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत. यावेळी महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्रा. प्रतापराव बोराडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रोग्रेसिव्ह एक्स्पर्ट कन्सल्टिंगच्या परिमल मराठे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images