Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

धनगर समाजाचे निदर्शने

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी धनगर समाज संघर्ष समितीने सोमवारी (१३ ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. धनगर समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्ह्याभरात आंदोलन केले असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही निदर्शने केली. यावेळी धनगर व धनगड हे एकच आहेत. अशी शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, मेंढपालांना वनक्षेत्रात चखराईची पवानगी देण्यात यावी, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असे नाव देण्यात यावे आदी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


असंतुष्ट लोकांचे कृत्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या बंदला वाळूज एमआयडीसी भागात हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी अनेक कंपन्यांना लक्ष्य करीत करोडोंचे नुकसान केले. पोलिस तपासात या धुडगुसामागे केवळ मराठा आरक्षण हा मुद्दा नसून अनेक असंतुष्टांनी हा हल्ला केल्याचे समोर येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

शहरात बंद शांततेत सुरू असताना वाळूज एमआयडीसी भागात दुपारनंतर या बंदला अचानक हिंसक वळण लागले. जमावाकडून अचानक कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले. पोलिसांवर देखील या वेळी तुफान दगडफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत दंगेखोरांची धरपकड सुरू केली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांसोबतच गुन्हे शाखेचे निरीक्षक, त्यांचे तीन अधिकारी व २० कर्मचारी, सायबर पोलिस ठाण्याचे पथक, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आदींना वेगवेगळी जबाबदारी पोलिस आयुक्तांनी सोपवली आहे. दंगेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत ३६ दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे. आणखी सुमारे शंभरावर दंगेखोरांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीमध्ये इतर समाजाच्या तसेच परप्रांतीय नागरिकांचा देखील समावेश आहे. या दंगलीमध्ये कंपन्याचे नुकसान करण्याऱ्यामध्ये कंपनीतून काढलेले कामगार, कंपनीचे लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळाले नसल्याचा राग, युनियन लावण्यावरून झालेले वाद या सर्व कारणांचा समावेश असल्याचे देखील समोर आले आहे.

स्थानिक नेत्यांनी पुढे येण्याची मागणी

वाळूज एमआयडीसी दंगल प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाइल क्लिपद्वारे दंगेखोरांचे पुरावे मिळवण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिक नेत्यांनी पोलिसांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच जे दंगेखोर बाहेरील आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स.भु. संस्थेची नव्या शतकाला साद; नवीन इमारतीचे उद्या भूमिपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शतकपूर्ती केलेली श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था आता नवीन शतकाला साद घालण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या अस्तित्वात असलेली इमारत पाडून तेथे पूर्ण गोलाकार इमारत बांधण्यात येणार आहे. बांधकामाच्या पहिल्या टप्प्यात अर्धगोलाकार बांधकाम केले जाणार आहे. त्यात अत्याधुनिक सभागृहाचा समावेश आहे. इमारतीच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाचे भूमिपूजन स्वातंत्र्यदिनी केले जाणार आहे.

श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रात जसे महत्त्व आहे तसेच या संस्थेचे महत्त्व ऐतिहासिक संस्था म्हणून देखील आहे. शंभरवर्ष पूर्ण करणाऱ्या या संस्थेची नवीन इमारत असावी, असा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार आर्किटेक्ट अजय कुलकर्णी यांच्या मदतीने नवीन इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन बुधवारी, स्वातंत्र्यदिनी केले जाणार आहे.

गोलाकार पद्धतीने नवीन इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्धगोलाकार बांधकाम केले जाणार आहे. त्यात एक हॉल आणि ३० वर्ग खोल्या असतील. त्याशिवाय कार्यालय, स्टाफरुमची व्यवस्था देखील केली जाणार आहे. शाळेचे संपूर्ण बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण असावे असा प्रयत्न केला जाणार आहे. स. भु. शिक्षण संस्थेची सध्याची इमारत एका अर्थाने वारसास्थळच आहे. नवीन इमारतीला देखील वारसास्थळाचाच दर्जा असावा, असा प्रयत्न केला जाणार आहे. नवीन इमारत नवीन शतकाला साद घालणाची असेल. नवीन शतक कसे असेल, त्याचा वेग कसा असेल याचा विचार करून बांधकाम केले जाणार आहे.

अर्धगोलाकार इमारत ही स. भु. शिक्षण संस्थेची ओळख आहे. ही ओळख कायम रहावी म्हणून अर्धगोलाकार इमारतीचे बांधकाम पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस दिनेश वकील यांनी दिली.

संपूर्ण इमारतीच्या बांधकामाचा खर्च खूप आहे. खर्चाची उभारणी संस्थेचे माजी विद्यार्थी, माजी शिक्षक-कर्मचारी यांच्या मदतीतून उभारण्यात येणार आहे. या सर्वांनी संस्थेसाठी मदत करावी, असे आवाहन दिनेश वकील यांनी केले. पहिल्या टप्प्यातील बांधकाम सुमारे तीन हजार चौरस मीटर क्षेत्रात केले जाणार असून बांधकामाला दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

\Bसभागृहांच्या भिंतीवर शंभर वर्षांचा इतिहास \B

पहिल्या टप्प्यातील इमारतीत सभागृहाचे बांधकाम देखील केले जाणार आहे. सध्या ज्या ठिकाणी जालान सभागृह आहे त्याच ठिकाणी नवीन सभागृह असेल. सभागृहाची आसनक्षमता १४०० राहणार आहे. संस्थेचा शंभर वर्षाचा इतिहात चित्र आणि पेटिंगच्या माध्यमातून या सभागृहाच्या भिंतीवर रेखाटण्यात येणार आहे. 'मल्टीपर्पज हॉल' या संकल्पनेतून सभागृहाचे बांधकाम केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेमुद दरवाज्याला ट्रकची धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणचक्कीजवळील ऐतिहासिक महेमुद दरवाजाला रविवारी रात्री एका ट्रकने धडक दिल्यामुळे या दरवाजाचे दगड खिळखिळे झाले आहेत. दगड कोसळून अपघाताची शक्यता असल्याने महापालिकेने दरवाजातून होणारी वाहतूक बंद केली आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली दरवाजाच्या डागडुजीचे काम केले जाणार आहे.

महेमुद दरवाज्यातून विद्यापीठ, छावणी, नंदनवन कॉलनी या भागात वाहतूक होते. परंतु, हा दरवाजा धोकादायक स्थितीत आल्यामुळे काही वर्षांपासून महापालिकेने त्यातून जड वाहनांची वाहतूक बंद केली होती. रविवारी रात्री एका ट्रक चालकाने महेमुद दरवाजातून ट्रक नेण्याचा प्रयत्न केला असता त्याची धडक बसली. त्यामुळे दरवाजाच्या वरच्या भागातील दगड खिळखिळे झाले. काही दगड खाली पडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पालिकेने दरवाजातून होणारी वाहतूक बंद केली. धडक देणारा ट्रक पालिकेच्या हाती लागला नाही. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली डागडुजी करण्यासाठी पालिकेता हेरिटेज सेल सक्रीय झाला आहे.

\Bनिधीची प्रतीक्षा \B

बारापुल्ला गेट, महेमुद दरवाजा आणि मकईगेट या तीन ऐतिहासिक दरवाज्यांची देखभाल दुरुस्ती व दरवाज्यांशेजारून नवीन रस्ता करण्यासाठी पालिकेने शासनाकडे निधी मागितला आहे. या संदर्भात तत्कालीन आमदार प्रदीप जैस्वाल यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिन्ही दरवाजांसाठी ११ कोटी रुपये मंजूर केले, पण अद्याप ते प्राप्त झाले नाहीत. दरम्यान या कामाची किंमत २५ कोटींवर पोचली आहे. शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे हे काम रखडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चास नेता नाही हीच ताकद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शैक्षणिक शुल्कातील भेदभाव, पुढाऱ्यांविरुद्धचा राग, मराठा समाजातील तरुणांच्या मनातील खदखत मोर्चाच्या रुपाने उफाळून आली आहे. संपूर्ण राज्यात अत्यंत शिस्‍तबद्ध आणि लाखोंच्या संख्येने आदर्श मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाच्या कोणत्याही मोर्चाला नेता नाही हीच मोर्चाची मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्रा. प्रदीप सोळुंके यांनी केले.

विचार व कल्पनांचे आदानप्रदान व्यासपीठ असलेल्या मंथन सहविचार सभेमध्ये सोमवारी (१३ ऑगस्ट) मराठा आरक्षणावर प्रा. प्रदीप सोळुंके यांनी मांडणी केली. यावेळी ते म्हणाले, आज मराठा समाजातील तरुणांची अवस्था 'निसर्ग पिकू देईना आणि सरकार शिकू देईना' अशी झाली आहे. खेड्यांतील सर्वसामान्यांच्या घरातील मुला-मुलींचे प्रचंड हाल आहेत, हे भयंकर आहे. आर्थिक दर्जा घसरल्यानंतर सामाजिक दर्जाही घसरतो, मराठा समाजाचा परंपरागत धंदा शेती असल्याने इतर व्यवसाय करू शकत नाही. अनेक लोक म्हणतात की मराठ्यांकडे 'वावर आणि पॉवर' आहे मग आरक्षणाची काय गरज? मात्र आज दिवसेंदिवस पिढ्यानुसार शेती मोठ्याप्रमाणवर कमी झाली, तर 'पॉवर' हा केवळ लोकसंख्येचा परिणाम आहे, असे ते म्हणाले.

आरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी मराठा समाजाच्या मोर्चाची सुरुवात औरंगाबादमधून झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी पहिली आत्महत्याही औरंगाबाद जिल्ह्यातच झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. समाजाची मोठी लोकसंख्या, अनेक संघटना, उपजाती, ज्या नेत्याने मराठा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला तो नेता स्वत:चाच फायदा करुन घेत असल्याचे निदर्शनास आल्याने मराठा समाज एकत्र होऊ शकला नाही. मात्र आता आरक्षणाच्या मागणीसाठी समाज एकत्र आला आहे. हा आकोश दूर करावयाचा असेल, तर शैक्षणिक शुल्कात सवलत, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, आर्थिक विकास मंडळाला निधी, व रोजगार मिळवून दिला पाहिजे, असे मत प्रा. सोळुंके यांनी व्यक्त केले.

यावेळी ज्ञानप्रकाश मोदानी, प्रा. भारत शिरसाट, किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील, सुभाष लोमटे, कॉ. मनोहर टाकसाळ, अण्‍णा खंदारे, उद्धव भवलकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्रीय आंदोलकाची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेल्या मजुराने हलाखीच्या परिस्थीला कंटाळून गळफास घेत आपली सोमवारी जीवनयात्रा संपवली. हा प्रकार सोमवारी दुपारी न्यु हनुमाननगर गल्ली क्रमांक तीनमध्ये घडला. केशव साहेबराव चौधरी (वय ५२), असे या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी प्रशासनाने या कुटुंबाला दहा लाखांची आर्थिक मदत व कुटुंबातील सदस्याला नोकरी देणार असल्याचे लेखी पत्र दिले.

चौधरी हे बांधकाम मजूर होते. ते मूळ सेलूद चारठा ता. औरंगाबाद येथील रहिवासी असून घरची परिस्थीती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांची मोलकरणीचे काम करत होती. केशव चौधरी सोमवारी कामावर गेले होते. त्यांचा मुलगा रवी सुद्धा कामानिमित्त घराबाहेर पडला, तर पत्नी धुणीभांड्याच्या कामाला गेली. त्यांची मुलगीही घरी नव्हती. यावेळी चौधरी यांनी छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा रवी दुपारी घरी आला असता दरवाजा उघडताच वडिलांनी गळफास घेतलेले दिसले. त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांना फोनवरून ही माहिती दिली. पोलिसांचे वाहन आल्यानंतर परिसरातील नागरिकांना हा प्रकार समजला. चौधरी यांचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.

\Bपत्‍नीचा क्रांतीचौकात ठिय्या\B

मराठा आरक्षणासाठी केशव चौधरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीने मुलगा, मुलगी, संपूर्ण कुटुंबासह क्रांतीचौकात ठिय्या आंदोलनस्थळी येऊन आक्रोश केला. चौधरी कुटुंब अत्यंत हालाखीत जगत होते. केशव यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. या दु:खातच संपूर्ण कुटुंब क्रांतीचौकातील ‌ठिय्या आंदोलनात येऊन बसले. दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी त्यांची समजूत काढून घरी पाठवले. या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी समन्वयकांनी तत्काळ जिल्हा प्रशासनासोबत संपर्क करून आर्थिक मदत व कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीची मागणी केली. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाल करत कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत, कुटुंबातील सदस्याला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्याचे पत्र दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवकाल प्रतिष्ठानचा वाद्यपूजन सोहळा थाटात

$
0
0

औरंगाबाद : महाकाल प्रतिष्ठानच्या ढोल, ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा थाटात पार पडला. जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार प्रदीप जैस्वाल, शिरीष बोराळकर, राजेंद्र जंजाळ, अनिल मकरिये, लक्ष्मीनारायण बाखरिया, समीर राजूरकर, अनिल पैठणकर, आनंद तांदुळवाडीकर, अनिल खंडाळकर, लक्ष्मीकांत थेटे, संदीप लिंगायत, ऋषिकेश जैस्वाल, अभिजीत जीवनवाल, विवेक बापते, सुमित पवार आदी उपस्थित होते. महाकाल प्रतिष्ठानच्या वाद्य पथकाची सर्व व्यवस्था सौरभ यादव, केदार एकबोटे, तेजस महाराज, योगेश काळे पाटील, अभिषेक कादी, अमेय एकबोटे, श्रीनिवास देव, हर्षल दुबे, भूषण दुबे, नचिकेत इंगळे आदी कार्यकर्ते सांभाळत आहेत. गणेशोत्सवातील मिरवणूकीचे महाकाल ढोल ताशा पथक मुख्य आकर्षण असते. पथकात यावर्षी सजीव देखावे, शिवकालीन क्रीडा प्रकार, ध्वजपथक याचा समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबस पुर‌वठादारास वाटाघाटीचे निमंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटीबसचा पुरवठा करण्यासाठी नियुक्त करायच्या टाटा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत महापालिका वाटाघाटी करणार आहे. त्याकरिता कंपनीच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. दरम्यान, टाटा कंपनीला सिटीबस पुरविण्याचे कंत्राट दिल्यास कोर्टात जाण्याचा इशारा आमदार इम्तियाज जलील यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.

स्मार्टसिटी प्रकल्पातून शहरात सिटीबस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता एकूण दीडशे बस खरेदी करून सुरू करण्याचे ठरवले आहे. पहिल्या टप्प्यात शंभर सिटीबस खरेदी करण्यासाठी औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेकलच्या माध्यमातून निविदा काढण्यात आली. टाटा कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आसून कार्यादेश (वर्कऑर्डर) देण्यापूर्वी कंपनीसोबत वाटाघाटी केल्या जाणार आहेत. कंपनीच्या प्रतिनिधींना येत्या आठवड्यात महापालिकेत वाटाघाटीसाठी निमंत्रित केले आहे. वाटाघाटीच्या औपराचिकतेनंतर बस पुरवठा करण्यासाठी कंपनीला कार्यादेश दिले जातील. नोव्हेंबर महिन्यात शंभर पैकी तीस बस प्राप्त होण्याची शक्यता आहे.

\Bआयुक्तांना पत्र \B

आमदार जलील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सिटीबस पुरविण्याच्या संदर्भात पुरवठादारांनी पालिकेशी केलेला पत्रव्यवहार व मेलद्वारे प्राप्त प्रस्तावांची प्रत, निविदा प्रक्रियेची माहिती द्यावी. याशिवाय प्री-बीड बैठकीच्या इतिवृत्ताची प्रतही आमदार जलील यांनी मागितली आहे. सिटीबस खरेदी व्यवहार चुकीच्या पद्धतीने होऊ नये यासाठी आयुक्तांनी स्वत: लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने व्यवहार होण्याची शक्यता आहे, असे झाल्यास कोर्टात दाद मागणार आहोत, असे पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय राज्यघटनेची प्रत दहन केल्याची घटना काही दिवसांपूर्वी दिल्लीत घडली. या दोषींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, त्यांना फाशी द्यावी या मागणी मागणीसाठी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निदर्शनाचे नेतृत्व शहराध्यक्ष बाबा तायडे यांनी केले.

भारतीय राज्यघटनेचा संपूर्ण जगात मानाचे स्थान आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास करून मोठ्या परिश्रमाने दोन वर्षे ११ महिने १८ दिवसात भारतीय राज्यघटना तयार केली. जगात आदर्श असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रतीचे दहन दिल्लीत नऊ ऑगस्ट रोजी काही समाजकंटकांनी पोलिसांसमोर केले. या दोषींविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, त्यांना फासावर लटकवावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. निदर्शनात जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, काँग्रेस सेवा दल प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, खालेद पठाण, सरोज मसलगे, जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप, जयपाल दवणे, उत्तम दणके, अशोक चक्रे, रेखा जैस्वाल, गौतम माळकरी, राहुल सावंत, छाया मोडेकर, इकबालसिंग गिल, महेबूब बागवान, डॉ. सरताज पठाण, वसंतराज वक्ते आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल घटला, कारवाईचा धडाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

एप्रिल ते जुलै या काळात आरटीओ कार्यालयाचा महसूल घटला आहे. तो वाढविण्यासाठी आरटीओ विभागाने अवैध वाहतूक करणाऱ्या तसेच नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत ५८ वाहनांवर जप्तीची कारवाई आरटीओने नियुक्त केलेल्या वायुवेग पथकाकडून करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये आरटीओ कार्यालयाची वसुली चालु वर्षाच्या उद्दिष्टापेक्षा फक्त ७० टक्केच झाली आहे. त्यामुळे आरटीओने अवैध वाहतुकीवर कारवाईचा धडाका लावला आहे. १० ऑगस्टपासून ही कारवाई सुरू झाली आहे. औरंगाबाद जिल्हा आणि शहराच्या रस्त्यांवर आठ वायुवेग पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. यात रिक्षा, जिप, ट्रॅव्हल्स बस, टिप्पर, ट्रक आणि अन्य वाहनांचा समावेश आहे. मागील तीन दिवसांत ५८ वाहने जप्त करण्यात आली असून २८३ वाहनांना मेमो देण्यात आला आहे. आणखी काही दिवस ही कारवाई सुरूच राहण्याचे संकेत आरटीओकडून मिळाले आहेत.

………

आरटीओत वाहनांची गर्दी

१० ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान झालेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेली अनेक वाहने आरटीओमध्ये उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे कार्यालयात वाहनांची गर्दी झाली आहे.

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात आरटीओ वायुवेग पथकाच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. बीड आणि जालना या मार्गावरही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी आरटीओ कार्यालयाच्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी अन्यथा कडक कारवाई केली जाईल.

सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

दृष्टिक्षेपात कारवाई

कारवाईचे सुरू : १० ऑगस्ट

कारवाई झालेले दिवस : ३

जप्त वाहने : ५८

मेमो दिलेली वाहने : २८३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोडमध्ये वाहतूक विस्कळीत

$
0
0

सिल्लोड : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सिल्लोड धनगर समाजाने 'रास्ता रोको' आंदोलन केल्यामुळे सिल्लोड शहरातील वाहतुक विस्कळीत झाली होती.

सिल्लोड येथील अहल्यादेवी होळकर चौकात एक ते दीड तास 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सिल्लोड तालुक्यातील सर्वच गावांतील समाजबाधव आंदोलनात सहभागी झाले होते. धनगर समाजाच्या तरुणानी हजारोंच्या संखेने सहभाग घेऊन एक ते दीड तास आंदोलन शांततेत पार पाडले. या वेळी तहसीलदार संतोष गोड, नायब तहसीलदार दत्तात्रय सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिरादार यांना निवेदन देऊन आंदोलन थांबविले. या आंदोलनामुळे औरंगाबाद - जळगाव रस्त्यावरील वाहतूक एक ते दीड तास रखडली होती. त्याचबरोबर धनगर समाजातर्फे मंगळवारी (१४ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता सिल्लोड तहसिलवर निर्दशने करणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यदिनी घेणार समाधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असून, या मागणीसाठी आतापर्यंत राज्यभरात ३१ बळी गेले आहेत. तरीही प्रशासनाला जाग आली नाही. कुठलाही अध्यादेश काढला नाही, असे म्हणत गेल्या २४ दिवसांपासून क्रांतीचौकात भगवा ध्वज घेऊन उपोषणाला बसलेल्या पांडुरंग सवने पाटील यांनी, आपण १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी जीवंत समाधी घेणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशसनाला दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (१३ ऑगस्ट) यासंदर्भात पत्र देण्यात आले. पांडुरंग पाटील हे गेल्या २४ दिवसांपासून क्रांतीचौकात मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी भगवा ध्वज घेऊन बसले आहेत. मराठा आरक्षणासाठी पहिला बळी औरंगाबाद जिल्ह्यात गेला. त्यानंतर राज्यभरात ३१ तरुणांचे बळी गेले आहेत. असे असताना प्रशासनाला जाग आली नाही, शासनाने कुठलाही अध्यादेश काढला नाही, की मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली नाही. क्रांतीचौकात सुरू असलेल्या अनेक राजकीय लोकांनी आपली पोळी भाजण्याच्या हेतूने या ठिकाणी येऊन वाद निर्माण करून ठिय्या आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत क्रांतीचौकातून उठणार नाही; तसेच मराठा क्रांती मोर्चाचे क्रांतीचौक येथील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सुरू राहील, असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकेत कुलकर्णी खूनप्रकरण, आरोपीचा जामीन फेटा‍ळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील युवक संकेत कुलकर्णी याच्या खून प्रकरणातील आरोपी उमर अफसर पटेल याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी सोमवारी (१३ ऑगस्ट) फेटाळला. शहरामध्ये २३ मार्च २०१८ रोजी ही घटना घडली होती.

या प्रकरणी विजय कडुबा वाघ (२०, रा. जयभवानीनगर, जिजामाता कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मुलीच्या मैत्रीवरुन २३ मार्च २०१८ रोजी संकेत कुलकर्णी याच्या अंगावर अनेकवेळा कार घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात संकेत प्रल्हाद जायभाये (२३, रा. जयभवानीनगर), विजय नारायण जौक (२४, बाळापूर बीड बायपास), संकेत संजय मचे (२२, रा. देवळाई परिसर) व उमर अफसर पटेल (१९, रा. देवळाई चौक) या आरोपींना अटक करुन त्यांची आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयालीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. सद्यस्थितीत चौघे आरोपी हर्सूल येथील कारागृहात असून, यापैकी आरोपी उमर याने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता. त्याच्या सुनावणीवेळी, आरोपीविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध असून, त्याला जामीन मंजूर केल्यास तो साक्षीदार व फिर्यादीवर दबाव आणू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपी उमरचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर हर महादेव...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रावणातील पहिल्या सोमवारी मंदिर भाविकांनी फुलले होते. महादेवाला बेल, दूध, शिवमूठ वाहण्यासाठी गर्दी झाली होती. मराठवाड्यावर रुसलेल्या पावसासाठी मंदिरांमध्ये अभिषेक व यज्ञ करण्यात आले.

'शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा...' म्हणत भाविकांनी शिवपिंडीवर तांदूळ अर्पण केले. जवळपास प्रत्येकच मंदिरात भजनी मंडळाच्या सूरांनी ऐकायला मिळाले. श्रावणातल्या विविध सणांची लगबग मंदिर परिसरात होती. फुलांची दुकाने व पूजेचे साहित्य घेण्यासाठी वर्दळ होती. पहिला श्रावण सोमवार, मंगळागौर व बुधवारी लागलीच नागपंचमी असे लागोपाठ सण आले आहेत.

सकाळपासूनच अभिषेक, लघुरुद्र पठण, अथर्वशीर्ष पठण व अन्य धार्मिक कार्यांना सुरुवात झाली होती.

मंदिर प्रशासनही सकाळपासूनच तयारीला लागले होती. माहेश्वरी समाजाचा श्रावण महिना गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो. त्यामुळे आज त्यांचा तिसरा श्रावण सोमवार होता. आज विवाहितांची 'झूला तीज' घरोघरी साजरी करण्यात आली. शिवभक्त माहेश्वरी समाजातर्फे सामूहिक व्रत उद्यापन कार्यक्रमही घेण्यात आले. व्रतवैकल्यांचा सण सुरू झाल्याने पुरोहित मंडळी सध्या अतिशय व्यस्त असून, घरगुती कार्यक्रम, मंदिरांमध्ये अभिषेक व पूजेसाठी चारही सोमवारचे बुकिंग झाले असल्याचे पुरोहित केदार कुलकर्णी म्हणाले. यंदा अधिक मास आल्याने श्रावणाचे अधिक महत्त्व असून, दान कार्य व धार्मिक कार्यासाठी पुरोहित अधिकच व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या डोक्यात घातला स्टंप, पतीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्षुल्लक कारणावरुन संतप्त पतीने दुसऱ्या पत्नीच्या डोक्यात स्टम्प मारुन तिला गंभीर जखमी केल्याप्रकरणी पती व आरोपी नितीन एकनाथ पाटील याला एक वर्ष सक्तमजुरी व चार हजार रुये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी सुनावली.

या प्रकरणी ललिता राकेश माने (३०, रा. द्वारकापुरी, उस्मानपुरा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचे लग्न आरोपी नितीन एकनाथ पाटील (४२, रा. शिरगाव, ता. वसई. जि. पालघर) याच्याशी २०११ मध्ये झाले होते आणि आरोपी हा फिर्यादी व पहिल्या पत्नीसह एकत्र राहात होता. दरम्यान, १६ ऑगस्ट २०१५ रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी भांडे घासत असताना किरकोळ वादातून मद्यपान केलेल्या आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागून स्टम्पने वार केला. यात फिर्यादी ललीता गंभीर जखमी झाली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या अरिहंत या मुलालाही आरोपीने बेदम मारहाण केल्याचे ललिताने तक्रारीत म्हटले होते. त्यावरुन भादंवि ३२४, ३२३ कलमान्वये उस्मानपुरा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील बी. एम. राठोड व सूर्यकांत सोनटक्के यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला भादंवि ३२४ कलामान्वे १ वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास, तर भादंवि ३२३ कलमान्वये ६ महिने सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठवली. तसेच ठोठावलेल्या दंडाची रक्कम फिर्यादीला नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेशही कोर्टाने बजावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भावाने काढला भावाचा काटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगर येथील खुनाचे गूढ उलगडण्यास मुकुंदवाडी पोलिसांना यश आले आहे. मृत व्यक्ती सखाराम उत्तम सत्तुके (वय ४० रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा) याचा खून त्याच्या भावानेच केल्याचे उघडकीस आले आहे. मालमत्तेवरील ताब्याच्या वादातून हा प्रकार घडला आहे.

सोमवारी सकाळी जयभवानीनगरातील रेल्वे पटरीजवळ सखारामचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळला होता. याप्रकरणी त्याच्या पत्नीने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पती आपल्यापासून विभक्त राहत असून गेल्या काही दिवसांपासून जयभवानीनगरातील त्याचा भाऊ सुखदेव सत्तुकेकडे राहत होता अशी माहिती दिली. पोलिसांनी सुखदेवचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यानेच आपण भावाला केलेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृत सखारामने त्याची गावाकडील एक एकर शेती विकली होती. त्याला दारुचे व्यसन होते. स्वत:ची शेती विकल्यानंतर तो भावाच्या प्लॉटवर ताबा घेण्याच्या प्रयत्नात होता. यावरून दोघांमध्ये वाद झाले. यावेळी झालेल्या हाणामारीत सखारामचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. पोलिसांनी सुखदेव उत्तम सत्तुके (वय ४० रा. जयभवानीनगर) याला अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक नाथा जाधव, पीएसआय बनसोड, हारुण शेख, जमादार कौतीक गोरे, प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, कैलास काकड, शेख अस्लम, सुनील पवार, सोमकांत भालेराव, लक्ष्मण राठोड आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगमंत्री देसाई शुक्रवारी वाळूजमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र बंद नऊ ऑगस्ट रोजी वाळूज औद्योगिक वसाहतीतील समाजकंटकांनी हल्ला करून अनेक उद्योगांचे मोठे नुकसान केले. याची पाहणी करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई शुक्रवारी (१७ ऑगस्ट) वाळूज दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वाळूज औद्योगिक वसाहतीत गेल्या गुरुवारी झालेल्या हल्लात ६० ते ७० कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. हल्लेखोरांनी काही उद्योगांना लक्ष्य करत मोठे नुकसान केले. या घटनेनंतर उद्योगजगत हादरून गेले आहे. पोलिसांनी काही संशयितांना याप्रकरणी अटक केली आहे. या घटनेने दुर्घटनाग्रस्त उद्योगांसह वाळूजमधील उद्योगाची चाके थांबल्याने १५० कोटींपर्यंत नुकसानीचा फटका बसला आहे. या भागाची पाहणी करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई शुक्रवारी (१७ ऑगस्ट) औरंगाबादला येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नऊ ऑगस्टच्या घटनेनंतर काही उद्योग दुसऱ्या राज्यात जात असल्याचे मॅसेज सोशल मिडियावर फिरले होते. सिमेन्स कंपनी गुजरातमध्ये जाणार असल्याच्या मॅसेजमुळे खळबळ उडाली होती. त्याचे एमआयडीसीने खंडन केले आहे.

\Bउद्योग जाणार नाहीत \B

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ म्हणाले की, वाळूज औद्योगिक वसाहतीत घडलेली घटना चुकीची आहे. त्या मेसेजबद्दल सिमेन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, असे काही नाही. कोणताही उद्योग औरंगाबाद सोडून जाणार नाही. उद्योजकांना आवश्यक त्या सुविधा एमआयडीसी व इतर यंत्रणांकडून पुरवल्या जातील, असा निर्वाळा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी एका पोलिस ठाण्याची वाळूज परिसरात गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज औद्योगिक वसाहत व या परिसरातील नागरी वसाहतींचा गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. वाळूज, पंढरपूर, रांजणगाव, करोडी, साजापूर परिसरात तीन हजारांहून अधिक छोटे मोठे उद्योग आहेत. त्यामुळे वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याव्यतिरिक्त आणखी एक स्वतंत्र पोलिस ठाणे हवे, अशी मागणी होत आहे.

वाळूजमध्ये नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या उद्योगांवरील हल्ल्यानंतर उद्योगजगतात घबराट पसरली आहे. उद्योगांवरील हल्ल्याची घटना कित्येक वर्षांपूर्वी पैठण एमआयडीसीत झाली होती. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये व्यवस्थापन व कामगार संघटनांचे वाद उद्भवले. त्यातून एखाद्या कंपनीमध्ये अस्वस्थता होती. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तोडफोड, नुकसानीची पहिलीच घटना आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीच्या आजूबाजूला असलेल्या १८हून अधिक खेड्यांपर्यंत वसाहती व उद्योग वाढले आहेत. साधारणपणे दीड ते दोन लाखांची वसाहत औद्योगिक क्षेत्राशी निगडित आहे. या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे आहे. वाढलेल्या वसाहती आणि उद्योगांच्या तुलनेत पोलिस ठाण्याचे बळ कमी पडत असल्याचे मत उद्योजक, नागरिकांनी व्यक्त केले. वाळूज औद्योगिक वसाहतीत शांतता राहावी, यासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे आवश्यक आहे. गृहखात्याने याची दखल घेऊन तत्काळ अंमलबजावणीच्या दृष्टीने पावले उचलली तर उद्योजक, नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीची वाढती व्याप्ती पाहता स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करणे योग्य राहील. गेल्या काही वर्षांत उद्योग व नागरी वसाहतही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

-अशोक चौरे, माजी अध्यक्ष वाळूज इंडस्ट्रिज असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ रेल्वे स्टेशनांत औरंगाबादची घसरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या स्वच्छ रेल्वे स्टेशन तपासणीत औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा क्रमांक यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरला आहे. गेल्या वर्षी औरंगाबाद रेल्वे स्टेशन १७९ क्रमांकावर होते, यंदा ते ३२१ वर पोहोचले आहे. देशातील अ दर्जाच्या ३३२ रेल्वे स्टेशनची यादी जाहीर करण्यात आली. त्यात औरंगाबादचा क्रमांक शेवटून बारावा लागला.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वे स्टेशनचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येते. यामध्ये स्टेशनवरील सुविधा, स्वच्छतेबद्दल जनजागृती, प्रवाशांच्या प्रतिक्रिया, स्वच्छतेसाठीचे उपक्रम, नियमित केली जाणारी स्वच्छता आदी निकषांवर मानांकन ठरवण्यात आले. अ १ वर्ग व अ वर्ग अशा दोन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. अ १ वर्गवारीत दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा, हैदराबादचा समावेश आहे. या वर्गात एकूण ७५ व अ वर्गात एकूण ३३२ स्टेशनचा समावेश आहे.

या यादीत रेल्वेच्या नांदेड विभागातील पाच रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. त्यानुसार नांदेड रेल्वे स्टेशन १६१, जालना १८३, नगरसोल २६०, परभणी २८२ व औरंगाबाद विभागात सर्वात शेवटी पाचव्या व यादीत ३२१ व्या क्रमांकावर आहे.

एक रुपया जीएसटीचा परिणाम

औरंगाबाद रेल्वे स्टेशनची पाहणीसाठी आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना रेल्वे स्टेशनच्या पार्किंग परिसरात अनेक जण लघवी करताना दिसले होते. यामुळे हा परिसर अत्यंत गलिच्छ होता. जीएसटी लागू झाल्यानंतर सार्वजनिक शौचालयात लघवी करण्यासाठी आलेल्या प्रवाशांकडून एक रुपया जीएसटी वसूल केला जात आहे. त्यामुळे एक रुपये देण्याची इच्छा नसलेले प्रवासी मोकळ्या जागेत जात होते. याचा फटका सर्वेक्षणात बसला.

यामुळे घसरले मानांकन

- पार्किंग परिसरात शौचालय नसणे

- उंदीर, झुरळे मारण्यासाठी दोन वर्षांपासून कंत्राट न देणे

- महिलांसाठी सेनेटरी नॅपकिनची सुविधा नसणे

- स्टेशनच्या जुन्या इमारतीमधील फलाटाची फरशी न बदलणे

- स्वच्छतेसाठी खासगी कंत्राटदाराकडून ५० कर्मचाऱ्यांची गरज असताना २७ कर्मचारी कार्यरत

- रेल्वे अधिकारी, सुरक्षा दलाकडून फलाटावर घाण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष

- पिण्याच्या पाण्याच्या नळाचा परिसर अस्वच्छ

- जुन्या इमारतीसमोरील ड्रेनेज वारंवार चोकअप

- पार्किंग कंत्राटदाराकडून त्याच्या परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष

मिळालेले गुण

रेल्वे स्टेशन स्वच्छता पद्धत पाहणी गुण प्रवासी प्रतिक्रिया एकूण गुण क्रमवारी

नांदेड २३०.९६ २५३.२३ २६८.९९ ७५३.१७ १६१

जालना २४०.२१ १८८.८९ २८३.८० ७३३.५० १८३

नगरसोल १८७.६३ २०४.९३ २६३.३७ ६५५.९२ २६०

परभणी १९९.०४ २०८.१५ २१५.८५ ६२०.४६ २८२

औरंगाबाद ११५.५६ १८८.९३ १९८.३० ५०२.७९ ३२१

(स्त्रोत: स्वच्छ भारत संकेतस्थळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता करवाढी विरोधात मनसेचे जनआक्रोश आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महानगरपालिकेने स्वच्छता कर म्हणून नविन कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही करवाढ तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी करीत परिसर दणाणून सोडला. यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालचंद्र यांना मागण्याचे निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने दिले.

या स्वच्छता करापोटी प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी ३६५ रुपयाचा वाढीव कर भरावा लागणार आहे. तसेच व्यवसायिकांवर वर्षाकाठी ३६५० रुपयाचा भार पडणार आहे. मनपाने चीन तसेच भारतातील इतर शहरात स्वच्छता अभ्यास दौऱ्याच्या पोटी कोट्यावधी रुपये खर्ची घातल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. खर्ची झालेली ही रक्कम मनपा नागरीकांकडून वसूल करीत असून मनपाकडून कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. मनपाच्या प्रवेशद्वारावर मनपाच्या नावाने हल्लाबोल करीत निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, गौतम आमराव, जिल्हा संघटक बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी, वैभव मिटकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, प्रविण मोहिते, चेतन पाटील, किशोर पांडे, विशाल आहेर, इम्रान शेख, संतोष पवार, अॅड. निनाद खोचे, अमोल खडसे, राजीव जावळीकर, संकेत शेटे, मंगेश साळवे, मनीष जोगदंडे, अॅड. नुतन जैस्वाल, लीला राजपूत, लीला देशमुख, संगीता जाधव व सपना ढगे यांच्यासह इतरांचा समावेश होता.

चौकट

हिटलरचा आंदोलनात समावेश

या जनआक्रोश आंदोलनात जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी हे हिटलरच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. मनपाची शहरातील नागरिकांवर हिटलरसारखी जुलूमशाही सुरू असून त्याचा निषेध करण्यासाठी ही वेशभूषा धारण केल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images