Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हसनखेडा येथील वृद्ध जोडप्याच्या खुनाचे गूढ उलगडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हसनखेडा ता. कन्नड येथील शेतवस्तीवर झालेल्या वृद्ध जोडप्याच्या खुनाचे गूढ उलगडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ५ ऑगस्ट २०१८ रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणी शेजारील शेतकऱ्याच्या पूर्वीच्या सालगड्याला या प्रकरणी साथीदारासह अटक करण्यात आली आहे. ५० हजारांसाठी हे कृत्य केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली.

हसनखेडा शिवारातील शेतवस्तीवर ५ ऑगस्ट रोजी पहाटे कारभारी रामचंद्र शिनगारे (वय ७०) आणि यमुनाबाई कारभारी शिनगारे (वय ६५) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांचा मुलगा अशोक शिनगारे यांनी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करीत मुंबईतील काही जणांवर संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात येत होता. तपासादरम्यान या खुनामागे राधाकिसन विश्वनाथ साळूंके (वय ४९ रा. शिवूर ता. वैजापूर) याचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी राधाकिसन याला अटक केली. अधिक चौकशीत त्याने त्याचा साथीदार साहेबराव उत्तम पवार (वय ४० रा.शिवूर) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी साहेबरावला देखील अटक केली. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी डिवायएसपी अविनाश सोनवणे यांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधिक्षक उज्वला वनकर, डिवायएसपी अविनाश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, एपीआय शहापूरकर, पीएसआय एस.बी. कापुरे, जमादार रतन वारे, विठ्ठल राख, रमेश अपसनवाड, आशिष जमधडे, संजय भोसले, शेख जावेद, चेळेकर, खुळे, श्रीखंडे, रामेश्वर धापसे, विनोद तांगडे, योगेश तरमळे, झिया, संजय तांदळे आदींनी केली.

चौकट

पन्नास हजारांसाठी खून

आरोपी राधाकिसन हा मृत कारभारी शिनगारे यांच्या शेजारील शेतकरी मनोहर घुले यांच्या शेतात काही वर्षांपूर्वी सालगडी म्हणून कामाला होता. शिनगारे यांच्याशी त्याची ओळख होती. शिनगारे यांनी काही दिवसापुर्वी त्यांची गाय ५० हजार रुपयाला विकली होती. ही रक्कम लुटण्यासाठी राधाकिसन याने साहेबरावच्या मदतीने शिनगारे पतीपत्नीचा खून केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रवण-वाचा-भाषा तपासणी शिबिराला मिळाला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐकू कमी येणे, बोबडे बोलणे, नवजात शिशुंच्या कानाची तपासणी, वयानुसार उशिरा बोलणे, अडखळत, तोतरे बोलणे, स्वमग्नता, अतिचंचलता आणि आवाजाशी निगडित समस्यांचे निदान आणि उपचारांसाठी नुकत्याच झालेल्या मोफत श्रवण व वाचा-भाषा तपासणी शिबिरास प्रतिसाद मिळाला. नूतन कॉलनी येथील 'साद स्पीच अँड हिअरिंग क्‍लिनिक'तर्फे शिबिर घेण्यात आले. यात ३० पेक्षा जास्त मुलांची तपासणी करण्यात आली. शिबिरात श्रवणयंत्राबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी बारामतीहून अक्षय कांबळे, पुण्याहून लक्ष्मण मोरे, तर मुंबईहून आलेल्या ताम्राई कोणार या तज्ज्ञांनी शिबिरातील मुलांची तपासणी केली. श्रवण व वाचा-भाषातज्ज्ञ सुचिता कुलकर्णी यांनी पुढील थेरपीसाठी मार्गदर्शन केले. शिबिरात पोहचू न शकलेल्या मुलांची रविवारपर्यंत (१९ ऑगस्ट) मोफत तपासणी करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. लहान मुलांमध्ये आढळणारे ऐकण्या-बोलण्यातील व भाषेतील दोष वेळीच उपचार केल्यास बरे करता येतात. पालकांनी मुलांशी बोलतांना स्पष्ट उचारात बोलणे गरजेचे असते. तसेच त्यांच्या बदलत्या हलचालीवर लक्ष ठेऊन पालकांनी जागरुक राहण्याची गरज आहे, असा सल्लाही कुलकर्णी यांनी यानिमित्ताने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानपुरा परिसरात राहत असलेल्या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. सोनल भीमराव गायकवाड (वय २३, मूळ रा. भोकर, जि. नांदेड, सध्या रा. उस्मानपुरा) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सोनलच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोनल ही गेल्या काही वर्षापासून शहरात शिक्षणासाठी आली होती. छावणी परिसरातील मिलिंद कॉलेजमध्ये ती एमएचे शिक्षण घेत होती. उस्मानपुरा परिसरात काही मैत्रीणीसोबत ती खोली करून राहत होती. सोमवारी सायंकाळी तिच्या सर्व मैत्रीणी बाहेर गेल्या होत्या. यावेळी सोनल खोलीवर एकटी होती. सोनलने छताला दोरीचा वापर करीत गळफास घेत आत्महत्या केली. मैत्रीणी खोलीवर परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. उस्मानपुरा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून घाटीमध्ये नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुले रिक्षा परमिट तूर्तास राहणार सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'तूर्तास खुले परमिट बंद करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. नवीन रिक्षा परमिट देणे बंद करण्यासाठी राज्य परिवहन विभागाने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना अहवाल मागितला आहे,' अशी महिती आरटीओ सतीश सदामते यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, यासाठी राज्यात रिक्षा परमिट खुले करण्यात आले. मात्र, हे रिक्षा परमिट बंद करा अशी मागणी रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आली. याशिवाय विधानसभेच्या एका आमदारांनीही परमिट बंद करण्याबाबत मागणी केली. या मागणीवरून १६ ऑगस्ट रोजी परिवहन उपायुक्त यांनी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना त्यांच्या भागात किती परमिट देण्यात आले, या परमिटची आवश्यकता आहे किंवा नाही? याची माहिती द्या, असे आदेश देण्यात आले होते. या सूचनेप्रमाणे औरंगाबादच्या आरटीओ विभागाकडून एक अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. या अहवालाबाबत अजूनही संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. यामुळे सध्या 'आरटीओ' विभागाकडून खुले रिक्षा परमिटचे वाटप सुरू आहे.

\Bभीती दाखवून एजंटांचा धंदा तेजीत

\Bऑगस्ट महिन्याच्या अखेरीस खुले रिक्षा परमिट बंद होणार असल्याची अफवाही एजंटांकडून पसरवली जात आहे. यामुळे लवकरात लवकर काम करून देतो, अशी थाप मारून एजंट सर्वसामान्य रिक्षा चालकांकडून या परमिटसाठी प्रत्येकी दीड ते दोन हजारांची वसुली करत आहेत. यामुळे आरटीओ कार्यालयात रिक्षा परमिट घेण्यासाठी गर्दी वाढली आहे.

………

\B...अशी आहे रिक्षांची संख्या

\Bशहर - १८००० परमिट रिक्षा

जिल्हा - ५००० परमिट रिक्षा

एकूण - २३ हजार रिक्षा

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानामध्ये चोरी, आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किराणा दुकानातून १८ हजारांच्या ऐवजाची चोरी केल्याप्रकरणात आरोपी शेख इरफान उर्फ घोचू शेख अब्दुल रशीद याला मंगळवारी (१४ ऑगस्ट) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला गुरुवारपर्यंत (१६ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजला अल अमोदी यांनी दिले.

या प्रकरणी व्यापारी अब्दुल वाहिद जैनोद्दीन शेख (४८, रा. हर्षनगर, लेबर कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आठ ऑगस्ट रोजी फिर्यादीच्या दुकानातून मोबाईल, सिगारेटची पाकिटे असा १८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार फिर्यादीने दिली होती. त्यावरुन सिटीचौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन आरोपी शेख इरफान उर्फ घोचू शेख अब्दुल रशीद (२२, रा. हर्षनगर) याला मंगळवारी अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानपुरा परिसरात राहत असलेल्या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. सोनल भीमराव गायकवाड (वय २३, मूळ रा. भोकर, जि. नांदेड, सध्या रा. उस्मानपुरा) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सोनलच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोनल ही गेल्या काही वर्षापासून शहरात शिक्षणासाठी आली होती. छावणी परिसरातील मिलिंद कॉलेजमध्ये ती एमएचे शिक्षण घेत होती. उस्मानपुरा परिसरात काही मैत्रीणीसोबत ती खोली करून राहत होती. सोमवारी सायंकाळी तिच्या सर्व मैत्रीणी बाहेर गेल्या होत्या. यावेळी सोनल खोलीवर एकटी होती. सोनलने छताला दोरीचा वापर करीत गळफास घेत आत्महत्या केली. मैत्रीणी खोलीवर परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. उस्मानपुरा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून घाटीमध्ये नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खेळताना दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने दोन वर्षांची चिमुकली गंभीर जखमी होऊन मरण पावली. ही घटना सोमवारी रविवारी सिडको एन ६ भागातील चिश्तिया कॉलनी चौकात घडली. या मुलीचा घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. उमेरा अकबर शेख, असे या मुलीचे नाव असून सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

उमेराचे वडील अकबर शेख यांनी या संदर्भात माहिती दिली. उमेरा ही इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत असताना तिचा कठड्यावरून तोल गेला. खाली पडताच तिने मारलेल्या किंकाळीमुळे घरकाम करत असलेल्या आईने तिकडे धाव घेतली. उमेरा घराखाली उभ्या असलेल्या रिक्षाच्या टपावर आदळून त्यावरून उडून जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. गंभीर जखमी उमेराला आधी खासगी हॉस्पिटल व नंतर घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्राणज्योत मंगळवारी पहाटे मालवली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक डी. आर. नलावडे हे पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्ली येथे संविधान जाळाणाऱ्या देशद्रोही घटकांचा व त्यांना छुपा पाठिंबा देणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मंगळवारी (१४ ऑगस्ट) पैठणगेट येथे निदर्शने करण्यात आली.

प्रदेश सचिव अक्षय पाटील, शहराध्यक्ष मयूर सोणवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निदर्शने करण्यात आली.

सध्या देशभरात घडत असलेल्या घटनांमुळे सामान्य नागरिक, दुर्बल घटक, महिला, विद्यार्थी, तरुण भीतीच्या वातावरणात जगत आहेत. त्यातच दिल्लीत मनुवाद्यांनी भारतीय संविधान जाळून केलेला प्रकार म्हणजे लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे, या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात व संविधान सन्मानार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. देशद्रोही व्यक्तीवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधांच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन घेऊन निदर्शनाचा समारोप करण्यात आला.

यावेळी डॉ. कपिल झोटिंग, दीपक बहीर, सागर नलावडे,सचिन उसरे, सुनील घारे, सुदर्शन बोडखे, सनी पाटील, सौरभ मेहता,नंदकुमार पवार, विकास ठाले, अमान काटे, योगेश वराडे, गणेश ढवळे, हर्षवर्धन पारेकर, पंकज म्हस्के, हर्शल पाटील, तन्मय मुंगसे, वृषभ नरवडे, हृषीकेश डुकरे, शुभम बोरुडे, आदित्य निंबाळकर सुमीत बढे आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’ ची सभा रद्द करा; विरोधी पक्ष नेत्याची मागणी

$
0
0

औरंगाबाद: समांतर जलवाहिनीबद्दल शुक्रवारी (१७ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा रद्द करा व ही सभा पुढे ढकला, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्ष नेते जमीर कादरी यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे केली आहे. नगरसेवक कैलास गायकवाड यांनी देखील याच आशयाचे पत्र महापौरांना दिले आहे. महापौर मात्र शुक्रवारी सभा घेण्याच्या मुद्दावर ठाम आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज्यघटना जाळणे ही शोकांतिका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भारतीय राज्यघटना हा सकल समाजघटकांचा आत्मा असून ऐतिहासिक ठेवा आहे. धर्मग्रंथ जाळला असता तर लोकांनी रान पेटवले असते. पण, राज्यघटना जाळण्याची घटना घडूनही भारतीयांनी प्रखर विरोध किंवा निषेध केला नाही ही शोकांतिका आहे' असे प्रतिपादन डॉ. उमेश बगाडे यांनी केले. ते विद्यापीठात निर्धार सभेत बोलत होते.

दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यघटना जाळल्याच्या घटनेचे पडसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उमटले. विद्यापीठात एसएफआय विद्यार्थी व प्राध्यापकांनी 'संविधान बचाव निर्धार सभा' घेतली. सामाजिकशास्त्र इमारतीत मंगळवारी दुपारी कार्यक्रम झाला. या सभेला डॉ. उमेश बगाडे, डॉ. दासू वैद्य, डॉ. राम चव्हाण, प्रा. उमाकांत राठोड, प्रा. स्मिता अवचार, डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ. सतीश दांडगे, प्रा. प्रकाश शिरसट, प्रा. उत्तम अंभोरे, डॉ. शुजा शाकिर, डॉ. कैलास अंभुरे, प्रा. अशोक पवार, प्रा. उत्तम अंभोरे, डॉ. मेहरुन्निसा पठाण, डॉ. गीता पाटील व शहाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यघटना देशाचा आधार आहे. सकल समाजघटकांचा आत्मा असून अनमोल ठेवा आहे. त्याचा अवमान चिंताजनक बाब आहे असे प्रा. उमेश बगाडे म्हणाले. 'राज्यघटना जाळणे ही भौतिक घटना असली तरी घटनाविरोधी गोष्टी दररोज सुरू आहेत. व्यापक लढा उभारण्यासाठी जनजागृती करणे सर्वांची जबाबदारी आहे' असे प्रा. सतीश दांडगे म्हणाले. डॉ. राम चव्हाण यांनी मनुवादी मानसिकतेचा निषेध करीत या प्रवृत्तीला आळा घालून घटनात्मक मूल्य जपण्याचे आवाहन केले. विद्यार्थी प्रतिनिधी अमित कुटे आणि कुमारी पठाण यांनी मनोगत मांडले. 'तू जिंदा है' या गीताने सभेची सांगता झाली. यावेळी नितीन वाव्हळे, सत्यजित मस्के, लोकेश कांबळे, प्राजक्ता शेटे, स्टॅलिन आडे, समाधान बारगळ, मारुती राऊत यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन

$
0
0

औरंगाबाद: भारतीय स्वांत्र्याच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (१५ ऑगस्ट) पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी ध्वजवंदन करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर तसेच जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीला पळवले; चौघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी बाजीराव धोंडीराम राठोड, व्यंकटेश सदाशिव पाटील, प्रणय रमेश काळे व सुमित सुधाकर पोकळे या आरोपींना मंगळवारी (१४ ऑगस्ट) अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना गुरुवारपर्यंत (१६ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणी शहरातील मुलीच्या मामाने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १२ ऑगस्ट रोजी फिर्यादी बाहेरगावी गेला होता व त्याच रात्री पावणेदहाच्या सुमारास फिर्यादीची १७ वर्षीय भाची घरातून न सांगता निघून गेली. शोध घेऊनही ती सापडली नाही; परंतु मुलीच्या मोबाईलमधील व्हॉटस्अॅपवर आरोपी बाजीराव धोंडीराम राठोड व आरोपी व्यंकटेश उर्फ व्यंकू यांच्याशी झालेल्या चॅटिंगवरुन तिचे अपहरण झाल्याचे समोर आले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन बाजीराव राठोड (५७, रा. सिडको एन सात), व्यंकटेश सदाशिव पाटील (२०, रा. हडको एन ११), प्रणय रमेश काळे (१९, रा. भावसिंगपुरा) व सुमित सुधाकर पोकळे (१९, रा. श्रीवस्ती कॉलनी) या आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, अजूनही पीडित मुलीचा शोध लागलेला नाही व तिचा शोध घेणे बाकी आहे. तसेच फरार आरोपी मधुसूदन बाजीराव राठोड याला अटक करावयाची असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळसदृश परिस्थिती, मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा

$
0
0

सत्कारप्रसंगी डॉ. भागवत कराड यांनी दिली माहिती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असून शासनाने तातडीने मदत द्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मदत त्वरित मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली. मराठवाडा विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. कराड यांचा स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था आणि मराठवाडा जनता विकास परिषदतर्फे स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील संस्थेच्या सभागृहात सोमवारी (१३ ऑगस्ट) संस्थेचे अध्यक्ष सु. बी. वराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रंसगी बोलताना डॉ. कराड यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी कसोशीने प्रयत्नशील असून त्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणीही करणार असल्याचे सांगितले. मंडळात अपेक्षित कर्मचारी नाही. जे आहेत ते काम करत नाही. त्यामुळे कडक शिस्त लावण्याचे काम हाती घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पावसाचे दडी मारल्याने मराठवाड्यातील पाणी प्रश्न बिकट आहे. टंचाईसदृश परिस्थिती असून तातडीने मदत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. मंत्री मंडळाची औरंगाबादेत बैठक व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील पाणी पुरवठा प्रश्न तातडीने सुटणे आवश्यक आहे. समांतर योजना खासगी कंपनीमार्फत न होता ती महापालिकेमार्फत व्हावी, असेही त्यांनी नमूद करत योजना त्वरीत पूर्ण व्हावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास अॅड. प्रदीप देशमुख, डॉ. मोहन फुले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश कॉलनी वॉर्ड कचरामुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर मंगळवारी गणेश कॉलनी वॉर्ड कचरामुक्त वॉर्ड म्हणून जाहीर करण्यात आला. यापूर्वी जलाल कॉलनी वॉर्ड कचरामुक्त जाहीर करण्यात आला आहे. गणेश कॉलनी वॉर्ड कचरामुक्त झाल्याबद्दल मंगळवारी एका छोट्याशा समारंभात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक व नगरसेवक, एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगरसेवक नासेर सिद्दिकी यांनी यावेळी कचरामुक्त वॉर्डाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, वॉर्डातून निघणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी ३० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण घरातच केले जाते. कचरामुक्त वॉर्ड करण्याकरिता नॉलेज लिंक या संस्थेबरोबर काम करण्यात येत आहे. या संस्थेचे प्रतिनिधी अजमल व ब्रिजेश यांच्या मदतीने व महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, जवान यांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची विनंती केली. वॉर्डातील महापालिकेच्या खुल्या जागेत पीट तयार केले आहेत. पीट तयार करताना काही नागरिकांचा विरोध होता, पण त्यांची समजूत काढण्यात आली. आता त्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जात आहे. सुका कचरा प्रक्रिया करण्यासाठी महपालिकेच्या माध्यमातून खासगी कंपनीकडे पाठवण्यात येत आहे.

\Bकचराकुंड्या काढल्या \B

वॉर्डात सात ठिकाणी कचराकुंड्या होत्या. आता त्या काढून टाकण्यात आल्या आहेत. गणेश कॉलनी वॉर्डात अलमगीर कॉलनी, गणेश कॉलनी, रशीदपुरा, हिनानगर या वसाहती असून वॉर्डाची लोकसंख्या वीस हजार आहे. कचरामुक्त वॉर्डाची घोषणा करण्यासाठी पालिका आयुक्त वॉर्डात आले असता शालेय विद्यार्थी व नागरिकांनी फेरी काढली. 'अलग करो, अलग करो: गिला-सुका अलग करो' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्याचे सामर्थ्य ठरलेल्या रणगाड्याचे लोकार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

१९७१ मधील ऐतिहासिक भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय सैनिकांचे सामर्थ्य ठरलेल्या टी-५५ या रणगाड्यांपैकी एक रणगाडा शहातील छावणी परिसरातील लोखंडी पुलावर सुशोभित केलेल्या खास जागेवर बसविण्यात आला असून, या रणगाड्याचे लोकार्पण ७१व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (१४ ऑगस्ट) थाटात झाले. हा रणगाडा शहराच्या वैभवात भर पाडणारा आहेच; शिवाय जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत देशप्रेमाचा अंगार चेतवणारा व भारतीय सैन्याविषयीचा आदर वृद्धींगत करणाराही ठरणार आहे.

गेल्या किमान सहा महिन्यांपासून या रणगाड्याचे लोकार्पण रखडले होते. या सोहळ्याला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महापौर नंदकुमार घोडेले, औरंगाबाद मिलिटरी स्टेशनचे ब्रिगेडिअर डी. के. पात्रा, कर्नल रामेश्वर शर्मा, कर्नल (निवृत्त) रमेश वाघमारे, छावणी परिषदेचे उपाध्यक्ष प्रशांत तारगे, नगरसेवक किशोर कच्छवाह, नगरसेवक संजय गारोल आदींची प्रमुख उपस्थिती होती. हा रणगाडा आता शहरातील दुसरा आकर्षण बिंदू ठरला असून, यापूर्वी नगर नाका परिसरात बसविण्यात आलेला पहिला रणगाडा नागरिकांसाठी लक्षवेधी ठरला आहे. एका छोटेखानी कार्यक्रमात असंख्य फुग्यांनी आकर्षकरित्या सजवण्यात आलेल्या रणगाड्याचे पडदा उघडून लोकार्पण झाले. या प्रसंगी पात्रा म्हणाले, या रणगाड्याचे लोकार्पण करताना खूप आनंद होत आहे. आता या रणगाड्याची देखभाल घेण्याची जबाबदारी शहरवासियांची आहे. हा रणगाडा सर्वांचा लक्ष वेधून घेईल आणि सदैव देशप्रेमाची प्रेरणा देत राहील, असेही पात्रा म्हणाले.

दोन-अडीच वर्षांपूर्वी याच जागेवर कचराकुंडी होती. या जागेची स्वच्छता करून व दीडशे झाडे लावून ही जागा सुशोभित करण्यात आली. आता या जागेवर रणगाडा बसविण्यात आल्यामुळे तो सर्वांनाच देशसेवेची प्रेरणा देत राहील, अशी भावना कर्नल वाघमारे यांनी व्यक्त केली. हा रणगाडा निश्चितच शहराच्या वैभवात भर टाकणार आहे. मात्र या ठिकाणी दिव्यांची व्यवस्था नाही. ही व्यवस्था झाली पाहिजे, अशी अपेक्षा घोडेले यांनी व्यक्त केली. मेजर एस. के. रहमतअली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

\B७१५ रणगाड्यांनी दिली ४३ वर्षे सेवा

\Bसोव्हियत युनियनकडून भारताला १९६८मध्ये तब्बल ७१५ टी-५५ रणगाडे मिळाले होते आणि या सर्व रणगाड्यांची सेवा २०११ पर्यंत सैन्यात घेण्यात आली; म्हणजेच ४३ वर्षे हे रणगाडे देशाच्या सेवेत होते. भारत-पाकिस्तानच्या युद्धासह अनेकविध मोहिमांमध्ये या रणगाड्यांची फार मोठी व महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. ३६ टन वजन असलेल्या रणगाड्यांची मारक क्षमता दहा किलोमीटरपर्यंत आहे. ३८ किलोमीटर प्रतितास धावण्याची क्षमता असणाऱ्या या रणगाड्यांवर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनगनहीही व्यवस्था आहे. देशाच्या सैन्यात स्वनिर्मित अर्जून रणगाड्यांचा वापर सुरू होईपर्यंत टी-५५ रणगाड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, असेही कर्नल शर्मा, मेजर रहमतअली यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...माझा कचरा, माझी जबाबदारी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आपला कचरा, आपल्या डोक्यावर...माझा कचरा...माझी जबाबदारी,' असे आश्वासकपणे मनोगत मांडणाऱ्या नागरिकांच्या अनुभवकथनातून औरंगाबादला कचरामुक्तीची शाश्वती मिळाल्याचे मानले जात आहे.

शहर स्वच्छतेसाठी आपापल्या वॉर्डात काम करणाऱ्या नागरिकांच्या अनुभवकथनाचा कार्यक्रम महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. शहर स्वच्छतेच्या कामातील सहभागाबद्दल महापौरांनी सर्व उपस्थितांचे अभिनंदन केले व भविष्यातही सहकार्य करण्याचे आवाहन केले. महापौरांच्या मनोगतानंतर नागरिकांनी मनोगत व्यक्त केले. ज्या नागरिकांनी आपल्या वॉर्डात, आपल्या कॉलनीत कचरामुक्तीचे काम केले आहे त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. यावेळी निर्मला कुलकर्णी, विवेक कलाडखेडकर, मिलिंद भीते, महेश गरड, सुरेशा कोल्हाळकर यांच्यासह अनेक नागरिकांनी मनोगत व्यक्त केले. आशा थोरात यांनी सादर केलेली कचरामुक्तीच्या ओवीने दाद मिळवली.

---

अन् सुरुवात झाली...

---

आम्ही आमच्या घरापासून कचरामुक्तीची सुरुवात केली. त्यानंतर आमच्या कॉलनीत व वॉर्डातील कचऱ्याची विल्हेवाट लावली. ज्या ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येत होता, त्या त्या ठिकाणी आम्ही रात्री बारापर्यंत जागून कचरा टाकणाऱ्यांना विरोध करत होतो. पहाटे चार वाजता उठून पुन्हा हेच काम आमच्याकडून केले जायचे.

- अमोल जांबुदे, साईनगर

आमच्या गल्लीत जागोजागी कचरा असायचा. दिल्लीच्या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते आमच्याकडे आले. कचरामुक्तीचे महत्त्व त्यांनी आम्हाला वारंवार सांगितले. त्यांच्यापासून प्रेरणा घेवून आम्ही आमची कॉलनी कचरामुक्त केली.

- सुजाता सोनकांबळे, प्रगतीकॉलनी

कचराप्रश्न आता मार्गी लागत आहे. एक-एक वॉर्ड कचरामुक्त होत आहे. संपूर्ण शहर कचरामुक्त होईपर्यंत आयुक्त डॉ. निपुण विनायक तुम्ही हे शहर सोडू नका. तुम्ही आल्यापासून फरक पडत आहे, पन्नास टक्के शहर कचरामुक्त झाले आहे. कचरा प्रश्नात जसे तुम्ही लक्ष घातले तसेच समांतर जलवाहिनीच्या प्रश्नात लक्ष घाला.

- कृष्णा भोसले

आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षांनी पुढाकार घेतला. घरोघरी जावून आम्ही कचरामुक्तीचे महत्व सांगितले. पाच - सहा गल्ल्यांमध्ये गांडुळ खत केले आहे. आम्ही सुधरलो, आमचा वॉर्ड सुधारला, आता आम्हाला आमचे शहर सुधारायचे आहे.

- आशा थोरात, प्रगतीकॉलनी

कचरा प्रश्नात अनेकांना गांभीर्य नव्हते. महापालिकेच्या पुढाकाराने व स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने आम्ही काम केले. आरेफ कॉलनी वॉर्ड कचरामुक्त केला. आम्ही महापालिकेचे आभारी आहोत. आमच्या वॉर्डाप्रमाणेच सर्व वॉर्ड कचरामुक्त व्हावेत.

- अब्रार मौलाना, आरेफ कॉलनी

जलाल कॉलनी ही पहाडावरची कॉलनी आहे. स्वच्छतेसाठी गेल्या वीस वर्षांत आमच्याकडे कुणीही आले नाही. आता आम्हाला कचरामुक्तीचे महत्व लक्षात आले आहे. आपला कचरा आपल्या डोक्यावर घेऊन आम्ही कचरामुक्तीसाठी काम केले. त्यासाठी २५० विद्यार्थ्यांची मदत घेतली. आमच्यासह त्यांच्या डोक्यावर कचराकुंड्या दिल्या.

- शेख सुलेमान, जलाल कॉलनी

नागेश्वरवाडी वॉर्डात २२ ठिकाणी कचराकुंड्या होत्या. आता एकही कचराकुंडी वॉर्डात नाही. नागरिकांचे यात सहकार्य लाभले आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मेहनत देखील खूप आहे. महापालिकेत विविध योजना आल्या, पण स्वार्थापोटी त्या योजनांची वाट लावण्यात आली. आयुक्त म्हणून तुम्ही यात लक्ष घाला.

- महेंद्र शिंदे, नागेश्वरवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद: ध्वजारोहण कार्यक्रमात आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

औरंगाबाद:

राज्यासह देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात असताना औरंगाबादमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्र्याच्या उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

सध्या सरकारविरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्यावेळी सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती. पालकमंत्री सावंत यांचे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आगमन झाल्यानंतर बदनापुर तालुक्यातील कंडारी येथील सरपंच सुरेखा दाभाड़े, पती मुकुंद दाभाडे यांनी कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर त्यांनी अंगावर रॉकेल ओतुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर, दुसऱ्या एका घटनेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कन्नड तालुक्यातील भगवान वारे या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची चौकशी पोलीस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य ध्वजारोहणप्रसंगी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा सुरू असताना आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास विभागीय आयुक्तालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडला. वैयक्तिक कारणावरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र पोलिस सावध असल्याने मोठा अनर्थ टळला.

पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते बुधवारी सकाळी ध्वजारोहण असल्याने पोलिसांनी विभागीय आयुक्तालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व परिसरात बंदोबस्त लावला होता. पालकमंत्र्याचे विभागीय आयुक्तालयात आगमन झाल्यानंतर मुकुंद दाभाडे याने कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने रॉकेल ओतून घेतले. पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. दाभाडे हा कंडारी ता. बदनापुर येथील सरपंच सुरेखा दाभाडे यांचा पती आहे. त्याने हा प्रकार का केला याचा शोध पोलिस घेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान शेषराव वारे (रा. औराळा ता. कन्नड) या शेतकऱ्याला विष घेण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. वाटणीनंतर शेती नावावर होत नसल्याने वारे हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करणार होता. मात्र त्यापूर्वीच सिटी चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक तायडे, गोकुळ चव्हाण, मनोज पाटील, समाधान सुरडकर व फाळके यांनी ताब्यात घेतले. या दोन्ही घटनांची नोंद सिटी चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील तरुण एटीएसच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निरालाबाजार येथील एका दुकानातील तरुण नोकरला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चौकशीसाठी नोटीस बजावून मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. नालासोपारा येथे नुकत्याच पकडलेल्या शस्त्रसाठाप्रकरणी त्याची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन अणदुरे (रा. राजाबाजार), असे या तरुणाचे नाव आहे.

सचिन अणदुरे हा निराला बाजारातील एका कापड दुकानात नोकर आहे. एटीएसने गेल्या आठवड्यात नालासोपारा येथे वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली होती. हे तिघे हिंदुत्ववादी संघटनेसाठी कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या त्याब्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या तिघांशी सबंधित १३ जणांची राज्यातील इतर शहरातून उचलबांगडी करण्यात आली होती. मंगळवारी रात्री एटीएसच्या पथकाने निरालाबाजारातील दुकानातून सचिनला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यापूर्वी त्याला चौकशीसाठी बोलावल्याची रितसर नोटीस कुटुंबीयांना बजावण्यात आली. सचिनसोबत त्याचा भाऊ मुंबईला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

\Bकळसकरचा मित्र \B

एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकर याच्या मित्रांच्या यादीत सचिन अणदुरेचे नाव समोर आले आहे. कळसकरसोबत सचिनचा काय सबंध आहे, याची चौकशी करण्यासाठी त्याला मुंबईला नेण्यात आले आहे. सचिनचे शिक्षण शहरातीलच शाळा व महाविद्यालयात झाले आहे. त्याच्या फेसबुक अकाउंटवर मात्र सातत्याने हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या पोस्ट त्याने अपलोड केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ अपार्टमेंट, कॉलनी, वॉर्डासाठी स्पर्धा जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात महापौर नंदकुमार घोडेले यांनी शहरासाठी पाच टप्प्यातील स्वच्छता स्पर्धा जाहीर केली. स्पर्धेचे बक्षीस वितरण गांधी जयंती रोजी (२ ऑक्टोबर) केले जाणार आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिकेत महापौरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शहर स्वच्छता स्पर्धा जाहीर केली. अपार्टमेंट, कॉलनी, वॉर्ड, प्रभाग आणि शहर अशा पाच टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. पालिकेतील अधिकारी मोठ्या संख्येने निवृत्त होत असल्याने कामकाजावर परिणाम होणार आहे. हे लक्षात घेवून निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा मानधनातत्त्वावर पालिका सेवेत सामावून घ्यावे, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. कचराकोंडीच्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. 'मीट द मेअर', 'मेअर फेलो' या उपक्रमाबद्दल त्यांनी आयुक्तांचे अभिनंदन केले.

\Bकाटकसर करा \B

खर्चात काटकसर करा आणि पालिकेचे उत्पन्न वाढवा, असे आवाहन महापौरांनी केले. अनधिकृत नळजोडण्या एक हजार रुपये भरून अधिकृत करण्याची योजना जाहीर केली. शहरात शंभर कोटी रुपयांचे डिफर्ड पेमेंटचे रस्ते तयार करण्याती घोषणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images