Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अनधिकृत होर्डिंग; चौघांवर गुन्हे दाखल

$
0
0

औरंगाबाद: अनधिकृतपणे होर्डिंग व बॅनर्स लावणाऱ्या चौघांविरोधात महापालिकेने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारे गुन्हे दाखल करण्याची कारवाई पालिकेने गुरुवारपासून सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक एक मध्ये एक्स्पर्ट कॉमर्स क्लासेस व प्रशांत कॉमर्स क्लासेसच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. खडकेश्वर येथील महापालिका वाचनालयाच्या इमारतीवर या क्लासचालकांनी जाहिरात रंगवली होती. त्यांच्यावर वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. प्रभाग क्रमांक आठ मधील अॅक्टिव्ह इंजिनीअरिंग क्लासेस व सर्कस व्यवस्थापकाविरुद्ध वॉर्ड अधिकारी मनोहर सुरे यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळूजमधील हल्ल्याची महिन्यात चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज एमआयडीसीमध्ये नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी एक महिन्यात करून सविस्तर अहवाल शासनाला सादर करा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

मुख्य ध्वजारोहणानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्र्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. या बैठकीत आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी नऊ ऑगस्ट रोजी महसूल, पोलिस प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्र्यांना दिली. पोलिसांनी संयम ठेऊन कौशल्याने परिस्थिती हाताळली. मात्र, वाळूज मधील घटनेमुळे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असे डॉ. सावंत यांनी पोलिस विभागाला बजावले. वाळूज एमआयडीसीमधअये पोलिस चौकी स्थापन करावी, असे निर्देश दिले. उद्योजकांच्या सूचनांचे स्वागत करावे, वाळूज एमआयडीसीत अग्निसुरक्षेची अंमलबजावणी करावी, शासन उद्योगांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी दिला.

\Bकचरा, बोंडअळीचा आढावा

\B

सहा महिन्यांपासून तीव्र झालेल्या शहरातील कचरा समस्येचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. महापौर नंदकुमार घोडेले, पालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी उपाययोजनांची माहिती दिली. बोंडअळी व्यवस्थापनाबाबत कृषी विभागाच्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योजनांच्या अंमलबजावणीत औरंगाबाद जिल्हा प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत मराठवाडा आघाडीवर असून औरंगाबाद जिल्हा त्यात प्रथमस्थानी आहे. याच वेगाने जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी कृतीशील राहून योजना अंमलबजावणीत प्रथम स्थान कायम ठेवावे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी शासन तत्पर आहे,' असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त बुधवारी (१५ ऑगस्ट) त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जलयुक्त शिवार अभियान, छत्रपती ‌शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, रोजगार हमी योजना, पीककर्ज वाटप स्थिती, तुती लागवड, रेशीम उद्योग, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, ई-ऑफिस प्रणालीत औरंगाबाद जिल्ह्याची प्रगती आदी मुद्द्यांचा उल्लेख त्यांना भाषणात केला.

'या वर्षी मराठवाड्यातील ६६ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यात एक लाख ६६ हजार शेतकऱ्यांना ५८१ कोटींचा लाभ मिळाला. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील सर्व बँकांमार्फत ६३ हजार ७२४ शेतकऱ्यांना ४७७ कोटी रुपयांचे पीक कर्ज देण्यात आले. मराठवाड्याने वृक्षारोपणात १८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. राज्यात लागवड झालेल्या झाडांपैकी ३५ टक्‍के लागवड फक्त मराठवाडात आहे. राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांत मराठवाड्यातील सात जिल्हे आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतून २०१७-१८मध्ये १९३ गावात तीन हजार ८५५ कामे पूर्ण करण्यात आली. अभियानात यंदा २६४ गावांचा समावेश केला आहे. मागेल त्याला शेततळे योजनेत दहा हजार १६१ कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी नऊ हजार ७४० शेततळी पूर्ण झाली आहेत. या योजनेत औरंगाबाद जिल्हा प्रथमस्थानी आहे. तुती लागवडीसाठी जिल्ह्यात तीन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत ११०० एकरवर लागवड करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. रोहयो मजुरांचे वेतन देण्याचे प्रमाण ९६ टक्के आहे,' असे डॉ. सावंत यांनी सांगितले. ध्वजवंदनानंतर त्यांच्या हस्ते उल्लेखनिय कार्य केलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

\B११२ कोटींचा विकास आराखडा \B

घृष्‍णेश्वर-वेरूळ विकास आरखड्याच्या ११२ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. येत्या वर्षात ही कामे पूर्ण होऊन भाविकांना भक्तनिवास, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी सुविधांसह ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती देखील साकारण्यात येणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी भाषणात सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्या आठवणीतील अटलजी

$
0
0

(नानांसोबतचा मजुरांसोबतचा फोटो वापरावा)

हरिभाऊ बागडे, विधानसभा अधक्ष

१९६० च्या दशकात आमचे ग्रामीण भागातून शहरी म्हणजे औरंगाबाद शहरात संघाच्या व इतर कामासाठी येणे जाणे वाढले. त्यापूर्वी शाळेत असताना आलो होतोच. स्वत: शहरात आल्यावरच वृत्तपत्राचे दर्शन होत असे. त्यावेळी लोकसभेचे अधिवेशन असेल किंवा पुढे अटलजींची सभा असेल तर त्या बातमीत त्यांचा नाव वाचायला मिळायचे अथवा रेडिओवरून त्यांचे नाव ऐकायला मिळत असे. शहरी मित्रांकडूनही अटलजींबद्दलची माहिती ऐकत असू. पुढे मला साप्ताहिक विवेकमध्ये नोकरी मिळाली. त्यावेळी विवेकचे व्यवस्थापक जयवंत भीमराव देशपांडे (आम्ही त्यांना अण्णा देशपांडे म्हणत असू.) ते संघाचे कार्यकर्ते होते. ते आम्हाला सांगत असत की, अटलजी व आम्ही एकाच वेळी तृतीय वर्षाचे शिक्षण घेतले आहे.

अटलजी हे संघाचे पूर्णवेळ प्रचारक राहिले. १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाली. त्यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना सहकारी म्हणून संघाचे पूर्णवेळ असलेल्या प्रचारकांपैकी दीनदयाळजी उपाध्याय, अटलजी, नानाजी देशमुख, सुंदरसिंह भंडारी यांना जनसंघाचे काम सांगण्यात आले. डॉ. श्यामाप्रसादजींच्या सोबत हे सर्व जनसंघाचे संस्थापक आहेत. त्याशिवाय राज्याराज्यात अनेक संघ प्रचारकही जनसंघाच्या कामाला आले होते. महाराष्ट्रात रामभाऊ गोडबोले यांना जनसंघाचे पूर्णवेळ काम दिले गेले. याच रामभाऊ गोडबोलेंनी कै. उत्तमराव पाटील यांना १९५२-५३ मध्ये जनसंघात पूर्णवेळ काम करण्यासाठी आणले. पुढे ते महाराष्ट्रात महसूल मंत्री, जनसंघ, भाजप प्रदेशाध्यक्ष झाले व अटलजींसोबत काम केले.

आम्हालाही अटलजींच्या भाषणाचे आकर्षण होते, पण त्यांच्या अधिक जवळ जाण्याचा योग आला तो मी औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्याचा १९८० मध्ये सरचिटणीस झाल्यावर. त्या अगोदर त्यांची भाषणे ऐकली होती. इतकेच नव्हे तर १९६७ मध्ये लॉ कॉलेज मैदानावर जनसंघाचे अधिवेशन झाले होते. त्यावेळी निराला बाजार झाले नव्हते. त्या ठिकाणी पटांगण होते. रात्रीची सभा सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या समोरच्या रस्त्यावर झाली होती. त्या सभेत काहीतरी गडबड होणार असल्याची कल्पना अगोदरच आलेली होती. काही तरुण कार्यकर्त्यांना त्याची कल्पना दिली होती. कुणी गडबड केली तर त्याला जागेवर धरून ठेवण्याचे सांगण्यात आले होते. अटलजींचे भाषण रंगात आले आणि पाच ते सहा लोकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. ही गडबड पाहून सभेसाठी आलेले काही लोक उठायला लागले. इतक्यात अटलजींनी 'भारत माता की जय', अशा घोषणा दिल्या. ते पाहून उपस्थितांनीही या घोषणा दिल्या. नंतर अटलजी म्हणाले, 'कुछ हुआ नही, बैठो, बैठो नीचे बैठो.' आणि लोक बसायला लागताच अटलजीं म्हणाले, 'कुछ हुआ नही, बैल आया था.' त्यावेळी काँग्रेसची निवडणुकीची निशाणी बैलजोडी होती. लोकांत हशा पिकला. अटलजीं यांनी पुन्हा जोमाने भाषण करून सभा जिंकली. आम्ही व्यवस्थेमधील कार्यकर्ते म्हणून व्यासपीठाच्या जवळच उभे होतो.

या अधिवेशनात दीनदयाल उपाध्याय, अखिल भारतीय जनसंघाचे महामंत्री म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय अध्यक्ष पं. बच्छराज व्यास देखील उपस्थित होते. दीनदयाल यांच्या हत्येनंतर अटलजी जनसंघाचे अध्यक्ष झाले. पं. दीनदयाल उपाध्याय यांची हत्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. या हत्येचा बदला जनसंघाचे काम वाढवूनच घेऊ, असा निर्धार करण्यात आला. देशातील, महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते नोकरी, व्यवसाय सोडून पूर्ण वेळ काम करण्यासाठी घराबाहेर पडले होते. अटलजींनी तर जिल्ह्याजिल्ह्यात दौरे काढून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रवास केला. जिथे जातील तेथे अटलजी यांची सभा होत असे.

अटलजींना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अर्बन बँकेच्या इमारतीचे उद्घाटनासाठी निमंत्रित केले होते. ते दिल्लीहून औरंगाबादेत आले. त्यांना येथून खामगावला घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी व डॉ. मेहर व अटलजी अॅबेसिडर गाडीने निघालो. पावसाळी दिवस होते. चिखलीच्या पुढे निघाल्यावर एका ओढ्याला पाणी आले होते. पूल नव्हता, त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत नंतर गाडी ओढ्यातून वर काढली. बँकेच्या इमारतीत जात असतानाच अटलजी यांनी बँकेचे चेअरमनला प्रश्न केला होता की, बँक पार्टी को कर्ज देगी? यावर चेअरमन क्षणभर थांबले आणि नाही म्हणून उत्तर दिले. अटलजी लगेच म्हणाले, 'बरोबर आहे, आपले म्हणणे.' तेथे अटलजी भैय्याजी सहस्त्रबुद्धे यांच्या घरीही नंतर गेले होते.

३ सप्टेंबर १९८३ ला आम्ही परत औरंगाबादला आलो. तेथून पुढे अटलजी दिल्लीला रवाना झाले. पुढे अटलजींना आम्ही एक लाखांची थैली देण्याचा कार्यक्रम योजला होता. खडकेश्वर मैदानावर जाहीर सभा झाली. दुसऱ्या दिवशी त्यांना नाशिकला जाणे होते. त्यांना सोडण्यासाठी मी, शालीग्राम बसैय्ये त्यांच्यासोबत गाडीने गेलो. एकच गाडी होती. त्यांनी तिथे बंडोपंत जोशी यांच्याकडे सोडून आम्ही जेवण करून परतलो.

१९८५ मध्ये मी आमदार झालो. १९८६ मध्ये मराठवाड्यात पाऊस फारच कमी पडला. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी अटलजींनी या भागाचा दौरा करण्याचे ठरविले. जळगावहून ते औरंगाबादला

येणार होते. अटलजींना प्रत्यक्ष मजूर जिथे काम करीत असतील तिथे घेऊन या, असा निरोप आम्हाला पक्षाच्या कार्यालयाकडून होता. औरंगाबादनजिकच्या सांवगीच्या बाजुला असलेल्या नायगावची आम्ही निवड केली. तिथे एका पाझर तलावावर ३००, ४०० मजूर काम करीत होते. जवळजवळ सर्वच मुस्लिम महिला पुरुष असे काम करत होते. तिथंपर्यंत अॅम्बेसिडर गाडी जाणार नव्हती. मी आमदार असलो तरी मला माझी स्वत:ची जीप नव्हती. शासनामार्फत महिन्यातून १५ दिवस सरकारी गाडी मिळत होती. ती गटविकास अधिकारी, तहसीलदार किंवा एखाद्या उपअभियंत्याची काढून दिली जात असे. ती फार चांगली असूच शकत नव्हती. अशा एका गाडीतून आम्ही त्या कामावर जाण्यासाठी निघालो. सरकारी चालकास मागे बसण्यास सांगून मी गाडी चालवायला बसलो. अटलजी शेजारी बसले. आम्ही सरळ त्या कामाच्या ठिकाणी गेलो. छायाचित्रकारला बरोबर नेले नव्हते. अटलजीं हिंदीतून सर्व मजुरांशी मनमोकळेपणाने बोलले. सर्वांना हिंदी चांगली समजत होती. मजुरीचा वा धान्याचा विषय त्यांना मांडला. नमुन्यासाठी कसा निकृष्ट गहू मिळतो, हे ही त्यांना त्यांनी दाखविले. तोच गव्हाचा नमुना घेऊन अटलजींनी औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दाखविला. दुसऱ्या दि‌वशी प्रशासनाने दखल घेतली. काही गहू बदलून दिला गेला. अटलजींनी पक्षासाठी प्रचंड कष्ट केले. त्यांच्यासोबत असलेल्या कार्तकर्त्यांच्या परिश्रमाच्या घामातून भारतीय जनता पक्षाला हे यश प्राप्त झाले. हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. शेवटी अटलजींची एक काव्यपंक्ती सांगाविशी वाटते.

क्या हार मे, क्या जीत मे

किंचित नहीं भयभीत मैं

कर्तव्य पथ पर जो भी मिला

यह भी सही वो भी सही

वरदान नहीं मांगूंगा

हो कुछ पर हार नहीं मानूंगा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटलजीं : प्रतिक्रिया, जयसिंगराव गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री

$
0
0

कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता -

अटलजी हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारे, प्रोत्साहित करणारे महान नेते होत. १९९८ मध्ये पदवीधर मतदारसंघाचा आमदार असताना राज्यात मी सहकार राज्यमंत्री होतो. त्यावेळी बीड जिल्ह्यातील रजनी पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडत काँग्रेसमध्ये गेल्या. त्यावेळी अटलजी यांनी बीडमधून निवडणूक लढा, पार्टीचा आदेश आहे, असे माना बाकी मी पाहतो, असे निर्देश दिले. वातावरण तसे भाजपला अनुकुल नव्हते. असे असतानाही त्यावेळी विजय मिळाला. भाजप सरकार १३ महिने होते. मंत्रीमंडळ विस्तारही होऊ शकला नाही. पुढे १९९९ मोठ्या मतांनी विजयी झालो आणि अटलजी यांनी खास आठवण ठेवत माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील युवकास केंद्रात शिक्षण राज्यमंत्री काम करण्याची संधी दिली.

जयसिंगराव गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटलजीं : आमदार अतुल सावे

$
0
0

विरोधकांनाही त्यांचा नेहमी आदर वाटायचा. असा नेता होणे पुन्हा नाही. अटलजी हे भाजपचे आधारस्तंभ होत. त्यांच्या जाण्याने एक महान नेता हरपला. आपल्या वकृत्वाने ते सभा असो की सभागृह जिंकत असत. कवी मनाच्या अटलजी यांनी युवापिढीला दिशा देण्याचे व प्रेरणा देणे कार्य केले. औरंगाबादचा शहराध्यक्ष असताना त्यांच्यासोबत बीडला जाण्याचे भाग्य लाभले.

- अतुल सावे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटलजीं – प्रतिक्रिया: विवेक देशपांडे, उद्योजक

$
0
0

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देशाने महान नेता गमावला. दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे अनेकदा अटलजीं यांच्या सोबत प्रवास करण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा आणि त्यांचे थेट मार्गदर्शन घेण्याचा योग आला, हे माझे भाग्य. १९९६ मध्ये जालन्यात सभेनिमित्त अटलजीं जाणार होते. विमानाने ते औरंगाबादला आले. तेथून हेलिकॉप्टरने जालन्याला जाणार होते, पण तांत्रिक अडचणीमुळे हेलिकॉप्टरने जाणे शक्य नसल्याने वाहनाने जाण्याचा निर्णय झाला. त्यावेळी कार चालविण्याची संधी मला मिळाली. अवघड गोष्टही ते अगदी सोप्या भाषेत सहजरित्या समजावून सांगत. एकदा औरंगाबादेत आले असता मी पत्नीसमवेत त्यांची भेट घेतली. त्यांनी आमची आस्थेवाईक विचारपूस केली. माझी पत्नी इंजिनिअर असल्याचे समजताच त्यांनी कौतुकाची थाप देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

- विवेक देशपांडे, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा क्रांती मोर्चातर्फे २१ जुलैपासून क्रांती चौकात सुरू झालेले ठिय्या आंदोलन २६ दिवसांनंतर स्थगित करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या बुधवारी (१५ ऑगस्ट) झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

मराठा समाजाने लोकशाही मार्गाने ५८ क्रांती मोर्चे काढून आरक्षणाची मागणी केली. मात्र सरकारने दखल घेतली नसल्याने क्रांती चौकात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. राज्य सरकारने आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, मेगाभरती रद्द करावी, आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, या मागण्या आहेत. दरम्यानच्या काळात या मागण्यांबद्दल राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी क्रांती चौकात आंदोलनस्थळी येऊन लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे बुधवारी दुपारी समन्वयकांची बैठक घेऊन चर्चेअंती आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती क्रांती चौक पोलिस ठाण्याला कळवण्यात आली आहे.

या बैठकीला शिवानंद भानुसे, विजय काकडे पाटील, रवींद्र काळे, चंद्रकांत भराट, किशोर चव्हाण, सुरेश वाकडे, रमेश गायकवाड, सतीश वेताळ, सचिन मिसाळ, रेख वाहटुळे, श्रद्धा पवार, रेणुका सोमवंशी, सागर देवकर, सखाराम काळे, अशोक मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रशांत इंगळे, शिवा शेजूळ, गिरीश गायकवाड, गजानन पाटील, अमोल साळुंके, सचिन मगर, रवी तांगडे, तातेराव देवरे यांच्यासह समिती सदस्यांची मोठी उपस्थिती होती.

\B१० सप्टेबरनंतर राज्यव्यापी बैठक\B

आंदोलनादरम्यान सरकारने मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या. त्याची अंमलबजावणी येत्या २० ते २५ दिवसात करावी, मराठा आरक्षणासंदर्भात विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाची तारीख निश्चित करावी, सरकारने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अन्यथा १० सप्टेबरनंतर मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक बोलावून पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल, असे समन्वय समितीने कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छ अपार्टमेंट, कॉलनी, वॉर्डासाठी स्पर्धा जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात महापौर नंदकुमार घोडेले यांनी शहरासाठी पाच टप्प्यातील स्वच्छता स्पर्धा जाहीर केली. स्पर्धेचे बक्षीस वितरण गांधी जयंती रोजी (२ ऑक्टोबर) केले जाणार आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिकेत महापौरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शहर स्वच्छता स्पर्धा जाहीर केली. अपार्टमेंट, कॉलनी, वॉर्ड, प्रभाग आणि शहर अशा पाच टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. पालिकेतील अधिकारी मोठ्या संख्येने निवृत्त होत असल्याने कामकाजावर परिणाम होणार आहे. हे लक्षात घेवून निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा मानधनातत्त्वावर पालिका सेवेत सामावून घ्यावे, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. कचराकोंडीच्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. 'मीट द मेअर', 'मेअर फेलो' या उपक्रमाबद्दल त्यांनी आयुक्तांचे अभिनंदन केले.

\Bकाटकसर करा \B

खर्चात काटकसर करा आणि पालिकेचे उत्पन्न वाढवा, असे आवाहन महापौरांनी केले. अनधिकृत नळजोडण्या एक हजार रुपये भरून अधिकृत करण्याची योजना जाहीर केली. शहरात शंभर कोटी रुपयांचे डिफर्ड पेमेंटचे रस्ते तयार करण्याती घोषणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील तरुण एटीएसच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निरालाबाजार येथील एका दुकानातील तरुण नोकरला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चौकशीसाठी नोटीस बजावून मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. नालासोपारा येथे नुकत्याच पकडलेल्या शस्त्रसाठाप्रकरणी त्याची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन अणदुरे (रा. राजाबाजार), असे या तरुणाचे नाव आहे.

सचिन अणदुरे हा निराला बाजारातील एका कापड दुकानात नोकर आहे. एटीएसने गेल्या आठवड्यात नालासोपारा येथे वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली होती. हे तिघे हिंदुत्ववादी संघटनेसाठी कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या त्याब्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या तिघांशी सबंधित १३ जणांची राज्यातील इतर शहरातून उचलबांगडी करण्यात आली होती. मंगळवारी रात्री एटीएसच्या पथकाने निरालाबाजारातील दुकानातून सचिनला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यापूर्वी त्याला चौकशीसाठी बोलावल्याची रितसर नोटीस कुटुंबीयांना बजावण्यात आली. सचिनसोबत त्याचा भाऊ मुंबईला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

\Bकळसकरचा मित्र \B

एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकर याच्या मित्रांच्या यादीत सचिन अणदुरेचे नाव समोर आले आहे. कळसकरसोबत सचिनचा काय सबंध आहे, याची चौकशी करण्यासाठी त्याला मुंबईला नेण्यात आले आहे. सचिनचे शिक्षण शहरातीलच शाळा व महाविद्यालयात झाले आहे. त्याच्या फेसबुक अकाउंटवर मात्र सातत्याने हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या पोस्ट त्याने अपलोड केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद शहराला अतिवृष्‍टीने झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल एक महिन्यानंतर शहरात पावसाने गुरुवारी (१६ ऑगस्ट) पुनरागमन केले. शहरात गुरुवारी धो-धो पाऊस पडला. सकाळी आठ वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. दरम्यान, शहरात अतिवृष्‍टीची नोंद करण्यात आली आहे. चिकलठाणा वेधशाळेत ६६.३ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.

शहराच्या बहुतांश भागात सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास भुरभूर पावसाला सुरुवात झाली. मात्र तासभरात मोठा पाऊस सुरू झाला. हा जोर दिवसभर कायम राहिला. तासभरही विश्रांती न घेता दिवसभर पाऊस कोसळत होता. शहर परिसरात झालेल्या या दमदार पावसाचा फायदा कोमेजलेल्या पिकांना होणार आहे.

दिवसभर पाऊस सुरू असल्यामुळे शहरातील सलीम अली सरोवराजवळ, गणेश कॉलनी, टाउन हॉल उड्डाणपूल, महावीर चौक, सरस्वती भुवन बसथांबा, आझाद चौक परिसर आदी भागातील रस्त्यांवर पाणी साचले. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. दुपारनंतर विद्यापीठ व औरंगाबाद लेणी परिसरात खास भिजण्यासाठी गर्दी झाली. दिवसभरच्या पावसाचा शासकीय कार्यालयातील उपस्थितीवर परिणाम जाणवला.

पुढील चार दिवस पाऊस

मराठवाड्यात १७ ते २० ऑगस्ट दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. औरंगाबाद शहरात या चार दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

पारिजातनगरात साचले पाणी

वॉर्ड क्रमांक ८०, सिडको एन ३, एन ४ येथील पारिजातनगर मध्ये पावसानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या भागात थोडा पाऊस पडला तरी तळे साचते. पाऊस पडल्यानंतर या भागातून नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या भागातील नागरिकांनी या संदर्भात सतत पाठपुरावा करूनही समस्या कायम आहे. चार महिन्यांपासून येथील कामासाठी पाइप आणून टाकले आहेत. पण, महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या रहिवाशांना पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागते. हे काम तत्काळ करावे, अशी मागणी येथील रहिवासी राहुल इंगळे यांनी केली आहे.

शहरातील पावसाचे दिवस

महिना...... दिवस

जून.............१०

जुलै.............०८

ऑगस्ट..........०१

क्षणचित्रे

० दिवसभर पावसामुळे सूर्यदर्शन नाही

० ‌पावसानंतर संपूर्ण शहरात पाणीच पाणी

० जालना रस्त्यावर साचले तळे

० पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद शहराला अतिवृष्‍टीने झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल एक महिन्यानंतर शहरात पावसाने गुरुवारी (१६ ऑगस्ट) पुनरागमन केले. शहरात गुरुवारी धो-धो पाऊस पडला. सकाळी आठ वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. दरम्यान, शहरात अतिवृष्‍टीची नोंद करण्यात आली आहे. चिकलठाणा वेधशाळेत ६६.३ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.

शहराच्या बहुतांश भागात सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास भुरभूर पावसाला सुरुवात झाली. मात्र तासभरात मोठा पाऊस सुरू झाला. हा जोर दिवसभर कायम राहिला. तासभरही विश्रांती न घेता दिवसभर पाऊस कोसळत होता. शहर परिसरात झालेल्या या दमदार पावसाचा फायदा कोमेजलेल्या पिकांना होणार आहे.

दिवसभर पाऊस सुरू असल्यामुळे शहरातील सलीम अली सरोवराजवळ, गणेश कॉलनी, टाउन हॉल उड्डाणपूल, महावीर चौक, सरस्वती भुवन बसथांबा, आझाद चौक परिसर आदी भागातील रस्त्यांवर पाणी साचले. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. दुपारनंतर विद्यापीठ व औरंगाबाद लेणी परिसरात खास भिजण्यासाठी गर्दी झाली. दिवसभरच्या पावसाचा शासकीय कार्यालयातील उपस्थितीवर परिणाम जाणवला.

\Bपुढील चार दिवस पाऊस \B

मराठवाड्यात १७ ते २० ऑगस्ट दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. औरंगाबाद शहरात या चार दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

\Bपारिजातनगरात साचले पाणी\B

वॉर्ड क्रमांक ८०, सिडको एन ३, एन ४ येथील पारिजातनगर मध्ये पावसानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या भागात थोडा पाऊस पडला तरी तळे साचते. पाऊस पडल्यानंतर या भागातून नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या भागातील नागरिकांनी या संदर्भात सतत पाठपुरावा करूनही समस्या कायम आहे. चार महिन्यांपासून येथील कामासाठी पाइप आणून टाकले आहेत. पण, महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या रहिवाशांना पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागते. हे काम तत्काळ करावे, अशी मागणी येथील रहिवासी राहुल इंगळे यांनी केली आहे.

\Bशहरातील पावसाचे दिवस\B

महिना...... दिवस

जून.............१०

जुलै.............०८

ऑगस्ट..........०१

\Bक्षणचित्रे\B

० दिवसभर पावसामुळे सूर्यदर्शन नाही

० ‌पावसानंतर संपूर्ण शहरात पाणीच पाणी

० जालना रस्त्यावर साचले तळे

० पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोक्यावरून ढकलले; जटवाड्यात तरुणीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झोका खेळणाऱ्या ढळलल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सोळा वर्षांच्या तरुणीचा उपचार सुरू घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. राणी भानुदास हिवराळे (रा. एकतानगर, जटवाडा), असे या मुलीचे नाव आहे. तिला झोक्यावरून ढकळणाऱ्या तरुणाविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात मृत्युस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत राणी ही आई व बहिणीसोबत राहत होती. त्यांच्या घरासमोरील चिंचेच्या झाडाला सोमवारी आनंद अनिल बोर्डे उर्फ गट्ट्या (वय १८, रा. एकतानगर) याने झोका बांधला होता. तेथे ती झोका खेळत असताना आनंद आला. त्याने राणीला माझा झोका खेळू नको, खाली उतर असे म्हणत हाताला धक्का दिला. त्यावेळी हवेतील झोक्यावरून राणी ही जवळच्या मंदिराचे घुमट व त्यानंतर दगडावर आदळली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आई व बहिणीने तिला तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचे अतिदक्षता विभागात बुधवारी दुपारी निधन झाले. राणीची बहीण मंदा योगेश तुपे हिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आनंद बोर्डे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक भागिले हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत होर्डिंग; चौघांवर गुन्हे दाखल

$
0
0

औरंगाबाद: अनधिकृतपणे होर्डिंग व बॅनर्स लावणाऱ्या चौघांविरोधात महापालिकेने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारे गुन्हे दाखल करण्याची कारवाई पालिकेने गुरुवारपासून सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक एक मध्ये एक्स्पर्ट कॉमर्स क्लासेस व प्रशांत कॉमर्स क्लासेसच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. खडकेश्वर येथील महापालिका वाचनालयाच्या इमारतीवर या क्लासचालकांनी जाहिरात रंगवली होती. त्यांच्यावर वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. प्रभाग क्रमांक आठ मधील अॅक्टिव्ह इंजिनीअरिंग क्लासेस व सर्कस व्यवस्थापकाविरुद्ध वॉर्ड अधिकारी मनोहर सुरे यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आहिर क्षत्रिय शिंपी समाजाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी(१७ ऑगस्ट) टिव्ही सेंटर रोडवरील गुलाब विश्व हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ वाजता हॉलपासून शोभायात्रा निघेल. यानंतर समाजाचा मुख्य कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे आयोजन नऊ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते, मात्र बंद मुळे कोणता अनुचित प्रकार होऊ नये याची काळजी घेऊन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे शहराध्यक्ष संदीप दत्तात्रय शिंपी यांनी सांगितले. नवीन नियोजनात सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि उत्साह वाढवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंपी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोंडअळी नियंत्रणात; कृषी आयुक्तांचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बोंडअळी नियंत्रणात आहे, असा दावा राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केला आहे. बोंडअळी नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना आखत तशी अंमलबजाणी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

गत हंगामात कापसावर बोंडअळीचा झालेल्या प्रादुर्भावमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही बोंडअळीने डोके वर काढले आहे. यापार्श्वभूमीवर कृषी आयुक्त सिंह यांनी गुरुवारी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिंह यांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याचे नमूद केले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियमित पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. त्यानूसार सर्वस्तरावर काम सुरु असून आर्थिक नुकसानीच्या वर प्रादुर्भाव आढळून येतातच तातडीने किटकनाशक फवारणी केली जाते. यासह गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या जनजागृती अभियानामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याचा दावा त्यांना केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटलजीं- अॅड. प्रदीप देशमुख,अध्यक्ष : मराठवाडा जनता विकास परिषद

$
0
0

"अटल" युगाचा अस्त

राजकारणातील सौहार्द कायम राखून तत्व निष्ठा जपणाऱ्या थोर लोकशाहीचा खंदा समर्थक नेता आज आपल्यात नाही ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे. माझा भारतीय जनता पक्षातला प्रवेश खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते सन १९९९ साली औरंगाबाद येथे झाला. त्यांच्या कार्यकिर्दीत काम केल्याचा आनंद आणि सौभाग्य माला लाभले याचा मला अभिमान वाटतो. संसदेच्या कार्यालयात कार्यरत असताना मला त्यांचा सहवास लाभला.

- प्रदीप देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ

अध्यक्ष : मराठवाडा जनता विकास परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटलजीं, विजया रहाटकर, अध्यक्ष,राज्य महिला आयोग

$
0
0

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने एक महान नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने समाजाची, राष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या काळात खऱ्याअर्थाने सुशासनपर्व सुरू झाले. 'अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. आज ती भविष्यवाणी खरी ठरली आहे.

- विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यों लगा जिंदगी से बडी हो गई।

$
0
0

-प्रमोद माने

pramod.mane@timesgroup.com

Tweet : pramodmaneMT

औरंगाबाद :

\Bठन गई!

मौंत से ठन गई!

जूझने का मेरा इरादा न था,

मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,

रास्ता रोक कर वह खडी हो गई,

यों लगा ज़िन्दगी से बडी हो गई।\B

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा मी त्यांच्या मराठवाडा दौऱ्यात असताना मृत्यूसंदर्भातील कविता त्यांनी वाचून दाखविल्या होत्या. आज या कवितेची आठवण येत आहे. आपल्या वाणीने करोडो लोकांना मंत्रमुग्ध करणारे अटलबिहारी वाजपेयी हे नेहमीच औरंगाबाद, जालना, बीड येथे येत होते. कधी प्रचारसभेच्या निमित्ताने तर कधी दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने. आजही त्यांचे भाषण म्हणजे जनतेसाठी प्रेरणादायी होते. राज्यकर्त्यांसाठी त्यांचे भाषण म्हणजे दीपस्तंभच म्हणावे लागेल.

१९९८ मध्ये अटलजींच्या सभांचे वार्तांकन मी केले होते. राजकीय कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद नेहमीच व्हायचा. प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलताना कुटूंबात कोण आहे, घरी कोण आहे, उदरनिर्वाह कसा चालतो याची ते विचारपूस करायचे. प्रत्येक कार्यकर्त्यांना आपल्या वाणीने बळ देण्याचे काम त्यांनी केले आहे. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून जनता पार्टीचे उमेदवार म्हणून बापूसाहेब काळदाते उभे होते. या प्रचारसभेत वाजपेयींची सभा पहाटे अडीच वाजता मी स्वत: अनुभवली आहे. या निवडणुकीत बापूसाहेब काळदाते मोठ्या फरकाने निवडून आले होते. १९९८ च्या निवडणुकीमध्ये ज्या गावांमध्ये त्यांना सभा घ्यायची आहे त्या गावाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सकाळी त्यांची पत्रकार परिषद होत होती आणि या पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कधी परराष्ट्रनीती सांगितली, तर कधी आरोग्यामध्ये भारत कसा पिछाडीवर आहे, याची माहिती ते देत होते. शिक्षण, रोजगार यावरही ते प्रकाश टाकत होते. दररोज एक वेगळा प्रश्न घेऊन त्यावरची ते भूमिका मांडत होते. १९९८ मध्येच खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रचार सभेसाठी अटलबिहारी वाजपेयी आले होते. या सभेमुळेच जयसिंगराव गायकवाड हे निवडून येणार हे निश्चित झाले होते, नव्हे ही सभा भाजपच्या विजयाची नांदी ठरली होती. अशीच एक आठवण १९९८च्या निवडणुकीची आहे. जालना हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. गेल्या सात निवडणुकांमध्ये तब्बल सहावेळा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे निवडणूक आणि जालन्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींची सभा हे एक समीकरणच बनले होते. १९९८ च्या प्रचार सभेमध्ये जालन्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाच्या वेळीच पावसाने जोर पकडला होता. त्यावेळी आझाद मैदानावर तब्बल ५० हजार समुदाय होता. भरपावसामध्ये डोक्यावर छत्री घेऊन किंवा ताटकळत उभे राहून तासभरापेक्षा अधिक वेळ अटल बिहारी वाजपेयी यांचे भाषण लोकांनी ऐकले होते.

परळीमध्ये बीएसएनएल मोबाइल सेवेचा प्रारंभ झाला होता. त्याचवेळी लखनौमध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही सेवा सुरू केली होती. त्यावेळी बीएसएनएलचे सिमकार्ड वापरून त्यावेळचे दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांनी वाजपेयी यांना कॉल केला होता. गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहावरून मोबाइल सेवेचा प्रारंभ हा परळीत झाला होता. त्याआधी दोन ते तीनवेळा अटलबिहारी वाजपेयी यांनी बीडचा दौरा केला होता. २००३ ते २००४ च्या काळात जेम्स लेनच्या पुस्तकाचा वाद सुरू होता. २००४ च्या निवडणुकीत बीडमध्ये प्रचारसभेसाठी अटल बिहारी वाजपेयी आले होते. या सभेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सभेत उभे राहून काळे झेंडे दाखवले होते. सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. या सभेतच अटलबिहारी वाजपेयी यांनी या पुस्तकावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते. गोंधळ घालणारे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते या आश्वासनामुळे शांत झाले आणि त्यांनी या सभेत बसून अटलबिहारी वाजपेयी यांची सभा पूर्णपणे ऐकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा रिक्षात विनयभंग; ३५ हजारांचा ऐवज लंपास

$
0
0

औरंगाबाद: रिक्षातील महिलेचा विनयभंग करीत ३५ हजारांचा ऐवज बुधवारी सायंकाळी सात वाजता जिन्सी भागात लुबाडण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध जबरी चोरी व विनयभंगाचा गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. जिन्सी भागातील रहिवासी महिला रिक्षात बसली असता रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने अश्लिल बोलत विनयभंग केला. त्यामुळे तिने रिक्षा थांबवून उतरवून देण्यास सांगतिले असता त्यांनी धमकी देत रिक्षातच बसण्यास बजावले. पण, तिने आरडाओरड केल्यानंतर रिक्षातून उतरवण्यात आले. आरोपींनी तिचा जवळील ३५ हजारांचा ऐवज असलेली पर्स हिसकावून रिक्षासह पसार झाले. महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी फारूख व अक्तरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहाय्यक फौजदार बावस्कर हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images