Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

झोक्यावरून ढकलले; जटवाड्यात तरुणीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झोका खेळणाऱ्या ढळलल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सोळा वर्षांच्या तरुणीचा उपचार सुरू घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. राणी भानुदास हिवराळे (रा. एकतानगर, जटवाडा), असे या मुलीचे नाव आहे. तिला झोक्यावरून ढकळणाऱ्या तरुणाविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात मृत्युस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत राणी ही आई व बहिणीसोबत राहत होती. त्यांच्या घरासमोरील चिंचेच्या झाडाला सोमवारी आनंद अनिल बोर्डे उर्फ गट्ट्या (वय १८, रा. एकतानगर) याने झोका बांधला होता. तेथे ती झोका खेळत असताना आनंद आला. त्याने राणीला माझा झोका खेळू नको, खाली उतर असे म्हणत हाताला धक्का दिला. त्यावेळी हवेतील झोक्यावरून राणी ही जवळच्या मंदिराचे घुमट व त्यानंतर दगडावर आदळली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आई व बहिणीने तिला तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचे अतिदक्षता विभागात बुधवारी दुपारी निधन झाले. राणीची बहीण मंदा योगेश तुपे हिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आनंद बोर्डे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक भागिले हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनाखाली चिरडून महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकी घसरून रस्त्यावर पडलेल्या एम. डी. मेडिसीनच्या विद्यार्थिनीचा अज्ञात वाहनाने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पैठण रोडवरील माँ-बाप का दर्ग्याजवळ झाला. सारिका महेश तांदळे-गरकल (वय २७ रा. शिवाजीनगर, समर्थ गार्डन), असे या विवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे हेल्मेट घातलेले असतानाही त्यांचा जीव वाचला नाही.

सारिका तांदळे या पैठण रोडवरील छत्रपती शाहू आयुर्वेदिक महाविद्यालयात एम. डी. मेडिसीनच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी होत्या. त्या गुरुवारी सकाळी दुचाकीवरून कॉलेजला जात होत्या. पाऊस असल्याने त्यांनी रेनकोट व हेल्मेट घातलेले होते. माँ-बाप का दर्ग्याजवळून जाताना पावसामुळे पाणी साचल्याने रस्त्यावरील खड्डा लक्षात आला आहे. त्यात दुचाकी आदळून सारिका तांदळे रस्त्यावर कोसळल्या. यावेळी मागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाखाली त्या चिरडल्या केल्या. त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. तांदळे यांचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला. अपघातानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी पसार वाहनचालकाविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

\Bचार वर्षांचा मुलगा \B

सारिका तांदळे यांचे पती महेश तांदळे हे बदनापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या निधनाने समर्थ गार्डन भागात शोकाकुल वातावरण पसरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे विभागात स्वातंत्र्यदिन

$
0
0

औरंगाबाद: नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात बुधवारी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक विश्वनाथ इर्या यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर रेल्वे सुरक्षा बलचे जवान, केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थी, स्काउट गाइड यांनी पथसंचलन केले. शालेय परीक्षांतील गुणवंतांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. रवींद्र शर्मा, डॉ. मंजुल माथूर, सुधीर कुमार, डी. डी. नागपुरे, बी. के. पांडे यांच्यासह विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गिरिजा’मध्ये पाण्याची आवक सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

खुलताबाद तालुक्यात गुरुवारी सर्वदूर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गिरिजा, निरगुडी या प्रकल्पांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खुलताबाद शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

खुलताबाद तालुक्यात वेरूळ ६० मिलिमीटर, सुलतानपूर ११० मिलिमीटर पाऊस झाला. बाजारसावंगीला सर्वाधिक २१७ मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी रिमझिम पाऊस पडत होता. संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला. रात्री त्यात वाढ झाली. यामुळे शेतीची तहान भागली असून, पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे तालुक्यातील मोठी धरणे असलेल्या गिरिजा, निरगुडी प्रकल्पांत पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे खुलताबाद शहरासह तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. अन्य छोट्या, मोठ्या नदी-नाल्यांनाही पूर आले आहेत. दरम्यान, तालुक्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्यास आलेल्या पुरामुळे सालूखेडा गावाला जोडणारे दोन पूल वाहून गेले. तालुक्यात सुलतानपूर, बाजारसावंगी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तब्बल २२ दिवसांच्या खंडानंतर पावसाचे आगमन झाले. गुरुवारी पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. संध्याकाळनंतर मात्र पावसाचा जोर वाढला. वेरूळ घाटात झाडे उन्मळून पडल्याने खुलताबादचा वीजपुरवठा खंडित झाला होता. खुलताबाद शहर अंधारात बुडाले होते. शुक्रवारी दुपारी वीजपुरवठा सुरू झाला. तालुक्यातील येळगंगा, गिरिजा या नद्यांना रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला आहे. या शिवाय अनेक नाल्यांनाही पूर आला. तालुक्यात आलेल्या पुरामुळे सालुखेडा गावचे दोन पूल वाहून गेले.

या पावसामुळे सर्व खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे, मात्र मूग, उडीद ही पिके पावसाच्या मोठ्या खंडामुळे वाया गेली आहेत. कपाशीला या पावसाचा थोडाफार फायदा होणार असून, मका, ज्वारी व बाजरी यांच्या उत्पादनात घट होणार आहे. रब्बी हंगामासाठी मात्र या पावसाचा फायदा होईल, असे कृषीतज्ज्ञांचे मत आहे. भीज पावसामुळे खुलताबाद शहरातील अनेक घरांची पडझड झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. खुलताबाद शहरातील जयहिंद हॉटेलसमोरच्या सखल भागात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोंडअळी बाधितांच्या अर्जावर सुनावणी पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बोंडअळीबाधित शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात आलेल्या तक्रार अर्जांवर सुनावणी पूर्ण झाली असून, त्यावर पुढील कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. खरीप हंगाम आढावा बैठकीनिमित्त ते गुरुवारी शहरात आले असता पत्रकारांशी बोलत होते

गेल्या खरीप हंगामात बोंडअळी प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. भरपाई देण्यासाठी शासनाने कापूस उत्पादकांकडून तक्रार अर्ज घेतले. औरंगाबाद कृषी सहसंचालक विभागात औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतून चार लाख ३८ हजार ५९७ शेतकऱ्यांनी 'जी' तक्रार अर्ज सादर केले होते. त्यापैकी विविध त्रुटीमुळे ५२ हजार ४२३ अर्ज रद्द झाले. एकूण तीन लाख ८६ हजार १७४ 'जी' अर्ज कृषी खात्याने स्वीकारलेत. यात बाधित क्षेत्र सुमारे दोन लाख ४६ हजार ३५५ हेक्टर आहे. दरम्यान, कृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रक, संचालक विभागाकडे प्राप्त अर्जांवर सुनावणी पूर्ण झाली असून, नुकसान भरपाईसंदर्भात कार्यवाहीसाठी पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेडकर शाळेवर कारवाई करू नये: कोर्ट

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

डॉ. वाय. एस. खेडकर इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा येईल, अशी कुठलीही दंडात्मक वा इतर कारवाई करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालायच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना बी. वराळे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी दिले.

संदीप कानडे यांच्यासह ५८ पालकांनी शाळेच्या शुल्कवाढी विरोधात याचिका केली आहे. पालकांनी संस्था, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांकडे शुल्कवाढ, क्रमिक पुस्तके, वह्या, शालेय गणवेश व कॅन्टीनमधील जेवण सक्ती विरोधात तक्रार दिली होती. शैक्षणिक अर्हताधारक शिक्षकाची नेमणूक न करणे, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ व महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनियम अधिनियम २०११ मधील नियम १२ नुसार याविरोधात कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही व प्रशासनाकडून दिलासा मिळाला नाही. त्यामुळे पालक खंडपीठात आले आहेत.याचिकाकर्त्यांची बाजू गजानन क्षीरसागर यांनी मांडली. त्यांना अमोल मुळे व अविनाश औटे यांनी सहकार्य केले.

याचिकेतील विनंती

शाळेने आवाजवी शुल्कवाढ मागे घ्यावी व ७ ऑगस्ट रोजी दिलेल्या नोटीसनुसार कार्यवाहीला स्थगिती द्यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड तालुक्यात सरासरी गाठली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड तालुक्यात गुरुवारी दिवसा व रात्रभर झालेल्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला आहे. मका, कापूस पिकांना या पावासामुळे फायदा होणार आहे. पावसाची ३१ टक्के तूट भरून काढत वार्षिक सरासरी गाठली आहे असून, २४ तासांमध्ये तालुक्यात १४४.७५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यातील बहुतेक मार्गावर वृक्ष पडल्याने वाहतूक कोलमडली होती, तर काही ठिकाणी रात्रभर वीज गुल झालेली होती, तालुक्यातील आठपैकी सात मंडळात अतिवृष्टी झाली असून, तहसील कार्यालयामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे. तालुक्यातील शिवना, गांधारी, पूर्णा, अंजना, अंबाडी नद्यांना पूर आला असून, शिवना-टाकळी, पूर्णा-नेवपूर, अंजना-पळशी, अंबाडी प्रकल्पात पाण्याचा ओघ सुरू झाला आहे. तालुक्यात १४४.७५ मिलीमिटर पाऊस झाला असून, सर्वाधिक २०४ मिलीमीटर करंजखेड महसूल मंडळात, सर्वात कमी पाऊस पिशोर मंडळात ५२ मिलीमिटर झाला आहे.

\Bप्रकल्पातून पाणी वाया\B

दुपारपर्यंत शिवना-टाकळी प्रकल्पात दोन टक्के, तर अंजना-पळशी प्रकल्पात सात टक्के पाणीसाठा झाला आहे. कोळवाडी लघू सिंचन प्रकल्प कालव्याचे दरवाजे उघडे असल्याने या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. शिवना-टाकळी प्रकल्पात विस्थापित झालेल्या अंतापूर स्मशानभूमीकडे जाणारा पूल नाल्याला आलेल्या पूरात वाहून गेला असून, बहुतांश घराभोवती पाण्याने वेढा दिला होता.

मंडळनिहाय पाऊस

देवगाव (रंगारी) १६१

चापानेर १४६

चिकलठाण १९२

कन्नड १६५

चिंचोली (लिंबाजी) १२०

नाचनवेल ११८

(पाऊस मिलीमीटरमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठ्यात आज राष्ट्रीय कविता महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उर्मी या वाड़मयीन नियतकालिकातर्फे शनिवार व रविवारी (१८ व १९ ऑगस्‍ट) 'राष्ट्रीय कविता महोत्सव २०१८: अजिंठा' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात दोनशे कवी-कवयित्रींच्या उपस्थितीत चर्चा, मुलाखत, परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शुक्रवारी (१७ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत देण्यात आली. महोत्सवाच्या अध्यक्षपदी डॉ. कविता मुरुमकर या आहेत.

महोत्सवाचे उद्घाटन रंगनाथराव काळे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या डॉ. संध्या दुधगावकर उपस्थित राहणार आहेत. प्रा. डॉ. पी. विठ्ठल व प्रा. सत्यजित साळवे यांच्या उपस्थितीत मराठी कवितेचे वर्तमान या विषयावर चर्चा होईल. उर्मी या नियतकालिकाने या निमित्त पावसाळी कविता विषेशांक प्रकाशन सोहळा आयोजित केल्याचे प्रा. जयराम खेडेकर, व्यवस्थापक डॉ. एकनाथ पांडवे व ईश्वर बोराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी डॉ. हनुमंत चोपडेकर (गोवा) व दुर्गेश सोनार (मुंबई) यांना कविता क्षेत्राताली योगदानाबद्दल 'उर्मी राज्य काव्य पुरस्कार' देऊन गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, असे आहे.

\Bजगताप, तांगडे, डॉ. माने यांची मुलाखत \B

महोत्सवात पटकथा लेखक अरविंद जगताप आणि चित्रपट दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांच्याशी मुक्त चर्चा, तर गुणीजन साहित्य संमेलन संस्थापक डॉ. सुभाष माने यांची प्रकट मुलाखत प्रा. पृथ्वीराज तौर व सुनीता राठोड या घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन ल्पवयीन मुलींचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन विविध घटनांत अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग करण्यात आला. या घटना एक ऑगस्ट व १५ ऑगस्ट रोजी सिडको आणि मुकुंदवाडी परिसरात घडल्या. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायदा व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विनयभंगाची पहिली घटना एक ऑगस्ट रोजी सिडको एन ७ परिसरात घडली. संशयित आरोपी राहुल गुलाबराव भगुरे हा अल्पवयीन मुलगीचा शाळेत जाताना १५ दिवसांपासून पाठलाग करत होता. त्याने तिला अडवून हात पकडत विनयभंग केला. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भगुरे याच्या विरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता प्रकाशनगर, मुकुंदवाडीत घडली. अल्पवयीन मुलगी दुकानात बसलेली असताना संशयित आरोपी आकाश गवई (रा. प्रकाशनगर) तेथे आला. त्याने मुलीला चिठ्ठीवर मोबाइल क्रमांक लिहून दिला. मुलीने याचा जाब विचारला असता तिचा विनयभंग केला. मुलीने हा प्रकार वडिलांना सांगीतला. वडिलांनी आकाशला जाब विचारला असता त्यांना देखील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा चिकलठाण्यातील प्लॉट हडपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका महिलेचा चिकलठाण्यातील प्लॉट बनावट कागदपत्र तयार करून हडपल्याचा गुन्हा सातारा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे २०१७ मध्ये बीड बायपास रोडवरील दुय्यम निबंधक कार्यालयात घडला. या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विजयनगर, गारखेडा येथील एका २९ वर्षांच्या महिलेचा चिकलठाण्यातील बजरंगनगर भागात ६०० चौरस फुटाचा प्लॉट असून त्यावर बांधकाम केले आहे. या प्लॉटची संशयित आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केली. लिहून देणाराच्या ठिकाणी महिलेचे नाव व लिहून घेणाऱ्याच्या नावापुढे प्रकाश विष्णुपंत दौंड यांचे नाव नमूद करण्यात आले. तसेच महिलेच्या आधार कार्डच्या झेरॉक्स व बनावट कागदपत्राचा वापर करीत बनावट नोंदणीकृत खरेदीखत करण्यात आले. याची माहिती मिळाल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रकाश विष्णुपंत दौंड, श्रीपत अशोकराव जाधव, राजाभाऊ केशव भुतेकर व एक महिला आरोपी (सर्व रा. अंबड, जि. जालना) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद शहरात पावसाचा नवा विक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या महिन्याभरापासून गायब झालेल्या पावसाने गुरुवारी सकाळपासून दमदार हजेरी लावली. अवघ्या २४ तासांत शहरामध्ये तब्बल १५६.७ मिलिमीटर, असा विक्रमी पाऊस पडला. हा पाऊस आतापर्यंतचा सर्वकालीन विक्रमी ठरला आहे. शहरात बारा वर्षांपूर्वी ६ ऑगस्ट २००६ रोजी १२४. २ मिलिमीटर पाऊस पडला होता.

दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या औरंगाबाद शहरासह जिल्ह्याला गुरुवारी संपूर्ण दिवस तसेच शुक्रवार सकाळपर्यंत पावसाने चिंब केले. औरंगाबाद शहरात असलेल्या औरंगाबाद मंडळात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १५८ मिलिमीटर, उस्मानपुरा मंडळात १५६, भावसिंगपुरा १८२, तर चिकलठाणा महसुली मंडळात तब्बल १४५ मिलिमीटर पाऊस झाला. शहरात सलग १८ तास बरसलेला हा पाऊस यंदाच्या हंगामातील सर्वात दमदार पाऊस ठरला आहे. केवळ शहरातच नव्हे, तर शहर परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरात असलेल्या चितेपिंपळगाव ११६ मिलिमीटर, चौका १२८, लाडसावंगी १४०, करमाड १३९, कांचनवाडी १५६, हर्सूल ६२ या ग्रामीण भागातील महसुली मंडळांमध्येही दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. या पावसाचा शहर परिसरातील खरीप पिकांना निश्चित फायदा होणार आहे. मराठवाड्याच्या तुलनेत सर्वाधिक टंचाईच्या झळा औरंगाबाद जिल्हा सहन करत असून या पावसामुळे येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्याचे चित्र बदलण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील ६५ महसुली मंडळांपैकी तब्बल ५४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

\Bतालुकानिहाय पाऊस\B

तालुका................. पाऊस (मिमी)

औरंगाबाद................१३८.२०

फुलंब्री.......................११५.७५

पैठण.........................९७.६०

सिल्लोड.....................७६.२५

सोयगाव.......................८१.६७

कन्नड..........................१४४.७५

वैजापूर..........................८५.१०

गंगापूर...........................७१.३३

खुलताबाद....................१२९.००

------------------------------------.

एकूण सरासरी ............................१०४.६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धाजली सभेला विरोध करणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना हद्दपार करण्याचा ठराव महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर भाजपचे नगरसेवक दिलीप थोरात यांनी मनोगत व्यक्त केले व श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सभागृहात वाजपेयी यांच्या जीवनकार्याबद्दलची चित्रफित दाखवण्यात आली. चित्रफित संपल्यावर शिवसेनेचे नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती रेणुकादास वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्य यांच्या मनोगतानंतर सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली सभेला विरोध केला. त्यामुळे त्यांना मारहाण झाली. मारहाणीच्या घटनेनंतर सर्वसाधारण सभा पुन्हा सुरू झाली. त्यानंतर वैद्य म्हणाले,'सय्यद मतीन यांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करा, पोलिस आयुक्तांना भेटून मतीन यांना हद्दपार करण्याची विनंती करा.'

अॅड. माधुरी अदवंत यांनी देखील हीच मागणी केली. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी कडक कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. गजानन बारवाल, मोहन मेघावाले, सीमा खरात, शिल्पाराणी वाडकर, सुनीता आवुलवार, किर्ती शिंदे, गजानन मनगटे, राजगौरव वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त करून मतीन यांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याची मागणी केली. शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी, सय्यद मतीन यांनी स्वातंत्र्यसैनिकाचा अपनाम केला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी केली व पालिकेच्या सभागृहात वाजपेयी यांचे तैलचित्र लावण्यात यावे, असा ठराव त्यांनी मांडला.

महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीही मनोगत व्यक्त केले. उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन यांनी मनोगत व्यक्त केल्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील प्रकरण दोनच्या अनुसूची 'ड' मधील कलम दोनमधील तरतूदीनुसार, कलम १० ( १-१-अ) नुसार सय्यद मतीन यांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्यात येत आहे, असे जाहीर केले. मतीन यांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात येत आहे.

\Bसंघटनमंत्रींची कार फोडली\B

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या सय्यद मतीन यांना मारहाण झाल्यावर या घटनेची माहिती भाजपचे स्थानिक नेते व पदाधिकऱ्यांना कळाली. त्यामुळे आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने महापालिकेत जमा झाले. भाजपचे संघटनमंत्री भाऊराव देशमुख देखील यावेळी उपस्थित होते. त्यांची स्कॉर्पिओ कार (एमएच २० बीवाय ३९३५) महापालिका इमारतीच्या बाहेर मुख्य रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आली होती. सभा संपल्यावर शिवसेना - भाजपचे पदाधिकारी मतीनच्या विरोधात निवेदन देण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात जाण्यास निघाले. देशमुख यांची गाडी मागे होती. मतीन समर्थकांनी देशमुख यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. गाडीत बसलेले चालक विलास गोरळे यांना मतीन समर्थकांनी बाहेर काढून बेदम मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून गोरळे यांची सुटका केली.

मटा भूमिका

शरमेची बाब

मान खाली घालणारी घटना औरंगाबाद पालिकेच्या सभागृहात घडली. सय्यद मतीन या एमआयएमच्या नगरसेवकाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी कायदा हातात घेऊन मतीन यांना बेदम चोपले. भाजपच्या नगरसेवकांचेही चुकलेच. सभागृहाची मानमर्यादा सोडून ते वागले. मतीन यांनी केलेला विरोध हा निषेधार्यच, पण भाजप नगरसेवकांनी केलेल्या मारहाणीचे समर्थन होऊ शकत नाही. मतीन हे वादग्रस्त नगरसेवक आहेत. त्यांनी यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध केला होता. वंदे मातरम् गीत म्हणण्यासही नकार दिला होता. स्टटबाजी करण्याची त्यांची खेळी महागात पडली. पक्षाची भूमिका नसतनाही मतीन यांनी विरोध केला. त्यांच्यावर एमआयएम कारवाई करणार की नाही? अशा नगरसेवकावर कारवाई झाली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगपुऱ्यात भिंत पडली, जयभवानीनगरात नाल्यात पडला मुलगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संततधार पावसामुळे औरंगपुऱ्यातील एका जुन्या इमारतीची भिंत कोसळली. जयभवानीनगरमध्ये नाल्यात पडलेल्या मुलाला नागरिकांनी वाचवले.

औरंगपुरा पोलिस चौकीसमोरील भागात नंदकुमार मुळे यांची जुनी इमारत आहे. या इमारतीची भिंत शुक्रवारी पहाटे पडली. गुरुवारी दिवसभरचा संततधार पाऊस भिंतीत मुरल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. जुनी इमारत असल्यामुळे तेथे कोणीही रहात नव्हते. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. भिंत पडल्यावर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी रस्त्यावर पडलेला मलबा बाजुला केला. जयभवानीनगरात पावसामुळे नाल्याला पूर आला होता. नाल्याच्या काठी असलेल्या घरातून अनमोल रणजीत गवळी (वय ८) हा शिकवणीला जात असताना नाल्यात पडला. नाल्यात दोन ते अडीच फूट पाणी होते. अनमोल हा नाल्यात पडल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी धावाधाव करून त्याला नाल्यातून बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटलजींसारखा नेता होणे नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

असा नेता पुन्हा होणे नाही, अशी भावना व्यक्त करत भाजप कार्यकर्त्यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रंसगी भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते.

उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी श्रद्धाजंली सभेचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत कार्यकर्त्यांनी श्रद्धाजंली वाहिली. संघटक भाऊराव देशमुख यांनी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. 'त्यांची अनेक भाषणे, कविता आपण ऐकल्या आहेत. अतिशय परखड आणि नेमक्या शब्दांत व्यक्त होण्याची विलक्षण शैली त्यांच्याकडे होती,' असे ते म्हणाले. बहुआयामी असलेल्या वाजपेयी यांचा जीवनप्रवास मांडताना देशमुख यांनी, असा नेता पुन्हा होणे नाही, अशा भावना व्यक्त करत श्रद्धाजंली अर्पण केली.

शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, बाल हक्क सरंक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, अनिल मकरिये, प्रा. गोविंद केंद्रे, साधना सुरडकर, प्रा. राम बुधवंत, मनोज पांगारकर, प्रमोद राठोड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, भाजप सिडको, राजामंडळातर्फे सिडको एन ६ येथे माजी पंतप्रधान वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मनीषा भन्साली, अॅड. अरविंद डोणगावकर, रेखा पाटील, नगरसेवक शिवाजी दांडगे, दिंगबर खरात, सागर पाले, मयूर वंजारी, अनंत बोरकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेच्या स्थलांतराला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

पीरबावडा (ता. फुलंब्री) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा स्थलांतराचा अध्यक्ष व संचालक मंडळाने मंजूर केलेला ठराव रद्द करून गावकऱ्यांना देत नाही तोपर्यंत टाकळी कोलते, धानोरा, रांजणगाव, पीरबावडा, गेवराई गुंगी, गिरसावळी, मारसावळी आदी गावातील गावकरी, खातेधारक २० ऑगस्टपासून (सोमवार) बेमुदत उपोषण करणार आहेत. या उपोषणादरम्यान आंदोलकांना काही झाल्यास त्याला बँक प्रशासन जबाबदार राहील, असे तहसीलदारांना गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यासाठी संबंधित गावातील खातेधरक, वयोवृद्ध, अपंग, निराधार यांनी १८ जुलै रोजी हजारोंच्या संख्येने तीन तास 'रास्ता रोको' आंदोलन केलेॉ होते. बँक आहे त्याच ठिकाणी राहील, असे बँकेच्या व्यवस्थापकांनी लेखी पत्र दिले, मात्र काही दिवसांनंतर पुन्हा बँक स्थलांतराच्या हालचालींना वेग आला. त्यानंतर संबंधित गावातील शिष्टमंडळाने अध्यक्ष व बँक प्रशासनाची भेट घेतली. अध्यक्षांनी गावात येऊन निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनतर त्यांनी गावात येण्यास नकार दिला व परत परस्पर निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सजग खातेदार व काही संचालकांनी हा डाव हणून पाडला, परंतु एवढे सारे झाल्यानंतरही अध्यक्ष व बँक प्रशांसनाने स्थलांतराचा ठराव रद्द केला नाही. त्यामुळं संबधित गावकरी, खातेधारक सोमवारपासून आमरण उपोषण करणार असून, बँक स्थलांतराचा ठराव रद्द करून लेखी देत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेऊ, असा इशारा देण्यात आला आहे.

बैंकेच्या शाखेला पिरबावडा येथे कुठलीच अडचण नसताना नाहक स्थलांतर करण्याचेे जे षड्यंत्र रचले जात आहे ते आम्ही वेळोवेळी हाणून पाडले आहे यापुढेही आम्ही ही बैंकेची शाखा कदापि स्थलांतर होऊ देणार नाही जो पर्यंत लेखी मिळत नाही आता तोपर्यंत माघार नाही.

- शामराव साळुंके, सरपंच, धानोरा

'रास्ता रोको'दरम्यान बँक प्रशासनाने लेखी दिले होते. ते आश्वासनही टिकले नाही. बँक नफ्यात असताना, सर्वं खातेधाारकाना सोईस्कर असताना नाहक स्थलांतर करण्याचा डाव आम्ही वेळोवेळी हाणून पाडला. त्यानंतर गावात येऊन निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले गेले, परंतु ते आश्वासन ही पाळण्यात आले नाही. त्यांची मनमानी थांबेना म्हमून आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत.

- दिलीप कोलते, सोसायटी चेअरमन, टाकळी कोलते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यावर पर्जन्यकृपा; १८९ मंडळांत अतिवृष्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल एक महिन्यांपासून दडी मारलेल्या वरुणराजाने मराठवाड्यात दमदार पुनरागमन केले आहे. मराठवाड्यात गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवार सकाळपर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली. या पावसामुळे कोमेजलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या २४ तासांत मराठवाड्यातील ४२१ महसुली मंडळांपैकी १८९ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच मराठवाड्यात सर्वदूर पाऊस पडला.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात उत्तम पाऊस झाला, तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यावर पाऊस रुसला होता. परंतु, गुरुवारी दिवसभर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या १८९ मंडळांपैकी सर्वाधिक ५४ महसुली मंडळे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. मराठवाड्यात ६५.४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात १०४.४१ मिलिमीटर, जालना ११३.६२, परभणी ७२.८६, हिंगोली ६५.९९, नांदेड ७१.८६, बीड ४३.१५, लातूर २६.९८, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २४.९५ मिलिमीटर पाऊस पडला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत मराठवाड्यात केवळ ५०.९७ एवढा निम्माच पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४२.५४ टक्के, जालना ५०.७६, परभणी ४९.०८, हिंगोली ६२.८३, नांदेड ६०.३२, बीड ३९.६८, लातूर ५१.५२, तर उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४४.७४ टक्के पाऊस पडला आहे.

\B८५ मंडळांमध्ये १००, तर ४ मंडळांमध्ये २०० मिमी \B

मराठवाड्यातील ८४ महसुली मंडळांमध्ये शंभर मिमीपेक्षा जास्त, तर औरंगाबाद जिल्ह्यातील करंजखेडा (ता. कन्नड) २०४ मिमी, बाजारसावंगी (ता. खुलताबाद) २१७, जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील श्रीष्टी मंडळात २११ आणि नांदेडमधील माहूर मंडळात २३२ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील ७६ पैकी १४ तालुक्यांमध्ये सरासरी शंभर मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, कन्नड, खुलताबाद, जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, परतूर, मंठा आणि घनसावंगी, परभणी जिल्ह्यातील पाथ्री, आणि नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, नांदेड, किनवट आणि माहूर या तालुक्यांचा समावेश आहे.

\Bघरात पाणी शिरले\B

माहूर तालुक्यातील (जि. नांदेड) हर्दप गावामधील नाल्याला पूर आल्यामुळे परिसरातील १५ ते १६ घरांमध्ये नाल्याचे पाणी ‌शिरले. तहसील प्रशासनाने घरांमधील लोकांना बाहेर काढून त्यांची राहण्याची सोय गावातील शाळेत केली, तर रेशन दुकानदारांनी या नागरिकांच्या जेवणाची सोय केली असल्याची माहिती विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

\Bजिल्हानिहाय अतिवृष्टी\B

\Bजिल्हा.............मंडळे\B

औरंगाबाद.............५४

जालना..................४५

परभणी..................२४

हिंगोली.................१६

नांदेड..................४१

बीड.....................०९

लातूर....................००

उस्मानाबाद..............००

--------------------------.

एकूण......................१८९

----.

\Bजिल्हानिहाय मंडळांची स्थिती (अपेक्षित पावसाशी)\B

जिल्हा.................एकूण मंडळे........५० टक्क्यांपेक्षा कमी..........५० ते ७५ टक्के..............१०० टक्क्यांपेक्षा जास्त औरंगाबाद...............६५............................०६..........................३०.............................१२

जालना..................४९.............................०२..........................१३.............................११

परभणी..................३९.............................०१...........................१८.............................१२

हिंगोली..................३०.............................०१...........................०६.............................१५

नांदेड....................८०.............................०५..........................१७.............................४३

बीड......................६३.............................०९..........................२८.............................०८

लातूर...................५३..............................००..........................१०.............................१९

उस्मानाबाद............४२.............................०३........................१५.............................०८

-----------------------------------------------------------------------------------.

एकूण...................४२१.........................२७............................१३७.........................१२८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध, एमआयएम नगरसेवकाला बुकलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी चोप दिला. हा प्रकार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घडला.

समांतर जलवाहिनीच्या प्रस्तावाबद्दल चर्चा करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. परंतु, माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे ही सभा रद्द करून वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची भूमिका महापौरांनी मांडली. त्यानुसार, श्रद्धांजली सभेला करण्यात आली. भाजपचे नगरसेवक दिलीप थोरात यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन हे बोलण्यासाठी उभे राहिले, पण महापौरांनी त्यांना खाली बसवले. वाजपेयी यांच्या कार्यावरील चित्रफित दाखवली जाणार आहे, ती पाहा, त्यानंतर बोला, असे महापौरांनी मतीन यांना सांगितले. ही चित्रफित सुमारे २० मिनिटे दाखवण्यात आली. त्यानंतर सय्यद मतीन हे बोलण्यास उभे राहिले. ते म्हणाले, 'बाबरी मशिदीचे प्रकरण आम्ही अद्याप विसरलो नाही, त्यामुळे वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास आमचा विरोध आहे.' हे ऐकताच भाजपचे नगरसेवक दिलीप थोरात हे मतीन यांच्या दिशेने धावून गेले. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे गटनेते प्रमोद राठोड देखील मतीन यांच्यावर धावून गेले, त्यांनी मतीन यांच्या कानाखाली लगावली. त्यानंतर भाजपचे नगरसेवक मतीन यांच्यावर तुटून पडले. नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी मतीन यांना चपलेने झोडपले. अदवंत यांच्या पाठोपाठ उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक रामेश्वर भादवे, शिवाजी दांडगे, शिवसेनेचे सभागृहनेते विकास जैन, स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य, मोहन मेघावाले आदी नगरसेवक मतीन यांच्या दिशेने धावून गेले. सर्वांनी मतीन यांना मारहाण केली. यावेळी सभागृहातील एमआयएमचे अन्य नगरसेवक शांत राहिले, त्यांनी प्रतिकार केला नाही. नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी लाथ मारून मतीन यांना खाली पाडले, त्यामुळे मतीन यांच्या डोक्याला मार लागला. सुरक्षा रक्षकांनीकडे करून मतीन यांना सभागृहाच्या बाहेर नेले. मतीन यांच्या पाठोपाठ एमआयएमचे नगरसेवकही सभागृहाच्या बाहेर गेले.

\B'वंदेमातरम्' ला केला होता विरोध\B

सय्यद मतीन यांनी यापूर्वी पालिका सभागृहात वंदेमातरम् म्हणण्यास विरोध केला होता. त्यावेळीही पालिकेच्या सभागृहात धिंगाणा झाला होता. मतीन यांच्यासोबत जफर बिल्डर या एमआयएमच्या नगरसेवकाने सभागृहात खुर्च्या फेकल्या होत्या. त्यापैकी एक खुर्ची तत्कालीन महापौर भगवान घडमोडे यांना लागली होती. 'वंदेमातरम्'ला विरोध केल्यामुळे घडमोडे यांनी मतीन यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस आयुक्तांना केली होती. आयुक्तांनी तसा प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतर्फी प्रेमामुळे मुलीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

खेडा (ता. कन्नड) येथील एका तरुणाच्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासला कंटाळून एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या तरुणाविरोधात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील खेडा येथील सागर ज्ञानेश्वर वाळुंजे हा तरुण गावातील एका अल्पवयीन मुलीची, माझ्याशी लग्न कर, असे म्हणून काही महिन्यांपासून सतत छेड काढत होता. या त्रासाला कंटाळून मुलीचे आई, वडील खेडा गाव सोडून लगतच्या चापानेर गावात वास्तव्यास गेले. त्यानंतरही सागर चापानेर गावात गेला. तेथे मुलगी शाळेत जात असताना तिची छेड काढत होता. मुलगी अल्पवयीन आसल्याचे माहिती असूनही अरोपीने जाणीव पूर्वक एकतर्फी प्रेमातून मुलीस त्रास देणे सुरू ठेवले. दहा ऑगस्ट रोजी मुलीने या त्रासला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी तिचे वडील घरी नव्हते. तिला नातेवाइकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी घेऊन गेले. उपचार सुरू आसतना १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. १४ रोजी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. १७ ऑगस्ट रोजी मुलीच्या वडिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपी सागर वाळुंजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे हे करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे पडला मिटमिट्यात वड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव

मिटमिटा येथील ४० वर्ष जुने वडाचे झाड दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवारी पहाटे चार वाजता उन्मळून पडले. दरम्यान, पावसामुळे शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परिसरातील विहिरी व कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तूर्त दिलासा मिळाला आहे.

मिटमिटा येथील उन्मळून पडलेले झाड औरंगाबाद-नाशिक महामार्गावर आहे. ते रस्त्याच्या डाव्याबाजूला पडल्याने व त्यावेळी कमी रहदारी असल्याने जीवितहानी झाली नाही. ही झाडे औरंगाबाद येथे छावणीची स्थापना करताना लागवड करण्यात आली आहेत. त्यांची जोपासना लष्कराने केली आहे. नाशिक महामार्गावरील अनेक वडाची झाडे आतून पोखरली गेली आहेत. या झाडांचे सर्वेक्षण करून धोकादायक झाडे तोडावीत, अशी मागणी पडेगाव व परिसरातील नागरिकांची आहे. एक वठलेले झाड कादरी यांच्या मानसिक आरोग्य केंद्रासमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यविक्री बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी फुलंब्री

पीरबावडा (ता. फुलंब्री) येथील तरूण, महिला व ग्रामस्थांनी गावातील दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांनी गावातील दारू विक्रेत्यांना दारू विक्री न करण्याचे आवाहन केले. यासंदर्भात वडोदबाजार पोलिस ठाण्यास निवेदन देण्यात आले आहे.

पीरबावडा येथे होत असलेली अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी. त्यामुळे गावात शांतता प्रस्थापित होऊन, कौटुंबिक कलह, बस स्थानकांवर मद्यपींचा प्रवाशांना, दुकानदारांना होणार त्रास थांबेल. गेल्या महिन्याभरात गावातील अनेकांचा दारू प्यायल्यामुळे अपघात झाला. त्यात काहींना आपला जीव गमवावा लागला, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले.

१५ ऑगस्ट २०१६ रोजी पीरबावडा ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव घेत व वडोदबाजार पोलिस स्टेशन, पोलिस अधीक्षक ग्रामीण औरंगाबाद, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना निवेदन देऊन दारूबंदी करावी, अशी विनंती केली, परंतु अद्याप पीरबावडा गावात अवैध दारू विक्री बंद झालेली नाही. गावात दारू सहज उपलब्ध होत असल्याने तरुण व्यसनांच्या आहारी जात आहे. गावात सणासुदीच्या काळात मद्यपींमुळे अशांतता निर्माण होते. बस स्थानकांवर मद्यपींचा उपद्रव नेहमी पाहायला मिळतो. प्रवासी, दुकानदार यांनाही मद्यपींचा त्रास सहन करावा लागतो. दारूच्या बेकायदा विक्रेत्यांकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष असून, त्यामुळे अनेक गैरप्रकार घडत आहे, असे माजी सरपंच हिराबाई मुळे यांनी सांगितले.

आम्ही १५ ऑगस्ट २०१८ रोजी वडोदबाजार पोलिस स्टेशनला निवेदन दिले. गावात अनेक दिवसांपासून होणारी अवैध दारू विक्री त्वरित बंद व्हावी. त्यामुळे गावात शांतता प्रस्थापित होईल. आम्ही गावात स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत. लवकरच दारूबंदीसाठी ग्रामसभा घ्यावी, अशी मागणी गावात महिला, युवक व ग्रामस्थ करीत आहेत. लवकरच ग्रामसभा घेऊन दारू बंद नसता आम्ही लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन निर्माण करू याकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने बघावे.

- लिलाबाई काळे सरपंच

गावात सहज दारू उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण दारूच्या व्यसनांच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होत आहेत. गेल्या महिन्याभरात गावात अनेक अशा घटना घडल्या. गावाीतील तरुणांना जीव गमवावा लागला. अनेक जण जखमी झाले. गावातील दारू बंद होईपर्यंत आता शांत बसणार नाही, पोलिस प्रशासनानेही आम्हाला सहकार्य करावे.

- संतोष उमके, सामाजिक कार्यकर्ते, पीरबावडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images