Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सिल्लोडमध्ये चक्री उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड - सोयगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत व शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षांची नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह मागण्यांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर चक्री उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या चक्री उपोषणाला सिल्लोड - सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालाच पाहिजे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आदी मागण्यांच्या घोषणांसह सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत आंदोलन केले. या चक्री उपोषणात काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व सलग्न संघटनांच्या कार्यकर्त्यांसह पीडित शेतकरी सहभागी झाले. यादरम्यान दोन-तीन वेळा पावसाचे फटकारे पडले, परंतु उपोषणार्थींचा जोष कमी झाला नाही.

सिल्लोड - सोयगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली. शेतीची सर्व मशागत करण्यात आली. बी - बियाणे, खते यांवर पैसे खर्च करण्यात आले. मध्यंतरी अचानक एक महिना पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांची मेहनत व पैसे वाया गेले आहेत. यामुळे शेतकरी खुपच हवालदिल झाला असून, आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या बी - बियाणे, खतांसह एका वर्षासाठी एकरी २५ हजार रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी या मागणीसह सिल्लोड - सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचीही मागणी केली आहे.

यावेळी आमदार अब्दुल सत्तार, तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, प्रभाकर काळे, बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, प्रा. मन्सूर कादरी, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतला बन्सोड, पंचायत समिती सभापती धरमसिंह चव्हाण, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, अली चाऊस, शेख सलीम, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, कौतिकराव बडक, सलीम हुसेन, रुपेश जैस्वाल, अक्षय काळे, नगरसेवक रईस मुजावर पठाण, राजरत्न निकम, सत्तार हुसेन, राजू गौर, लड्डू पटेल, कैसर आझाद, शेख बाबर,

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश ताठे, अब्दुल रहीम, दामोधर गव्हाणे, दारासिंह चव्हाण, हनिफ मुल्तानी, मनोज झंवर, राजूमिया देशमुख, पंजाबराव चव्हाण, अनिस पठाण आदीची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कथित कार्यकर्त्यांकडून वन कर्मचाऱ्यांना त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खोटे तक्रारदार, गुंड प्रवृत्ती लोकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. कथित कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून आरेरावी केल्याची घटना ताजी असतानाच काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास होत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. या दहशतीमुळे काम करणे अवघड झाल्याची व्यथा मांडण्यात आली आहे.

वनजमिनीचे संरक्षण करणे, अवैध लाकूड वाहतुकीस पायबंद घालणे यासह इतर शासकीय कर्तव्ये पार पाडताना काही गुंड प्रवृत्तीचे लोक व कथित कार्यकर्त्यांकडून गेल्या काही महिन्यांपासून त्रास होत आहे. त्यांच्याकडून आरेरावी केली जाते, असे कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. खोट्या तक्रार करणे, निलंबीत करण्याची धमकी देणे, बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करणे आदी प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे कर्मचारी दहशतीखाली असून असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. या कथित कार्यकर्त्यांचा, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करा, कर्मचाऱ्यांना सुरक्षेचा विश्वास द्यावा, अशी मागणी कास्ट्राईब वन विभाग कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे वरिष्ठांकडे केली आहे. मनोज कांबळे, एस. आर. मोरे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फॅशनिष्टा’प्रदर्शनास थाटात सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फॅशनिष्टा फॅशन अँड लाइफस्टाइल प्रदर्शनाला शुक्रवारपासून थाटात सुरुवात झाली. रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये हे प्रदर्शन १९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचे यंदा आठवे वर्ष आहे.

फॅशनिष्टा फॅशन अँड लाइफस्टाइलचे औरंगाबादमध्ये १९३ वे प्रदर्शन असणार आहे. यात ५० पेक्षा जास्त डिझायनर्सचे स्टॉल असतील. त्यात इंडो वेस्टन, फॅशनेबल कलेक्शन, कुर्ती, लेगिन्स, सूट्स, सारीज, लखनवी सूट, प्रिंसिजन ज्वेलरी, फॅशन ज्वेलरी, फॅशन ऍक्सेसरीज, गिफ्ट आर्टिकल्स यासह होम डेकोरसाठी विशाल श्रेणी याठिकाणी उपलब्ध असणार आहे. लखनौ, कोलकाता, मुंबई, हैदराबाद, दिल्ली, पुणे यासारख्या शहरातील नामवंत व्यावसायिकांचे स्टॉल येथे लावण्यात आलेले आहेत. या प्रदर्शनाला एक्झिबिशन एक्सलन्स अवॉर्डने देखील सन्मानीत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीत गिरिजेला पूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी फुलंब्री

महिनाभरापासून तालुक्याकडे पाठ फिरविलेल्या पावसाने अखेर श्रावणात तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली होती. हा पाऊस दिवसभर सुरू होता. त्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. चार वर्षांनंतर तालुक्यातील सर्वात मोठी असलेली गिरिजा नदी दुथडी भरून वाहत असून या नदीवर असलेले कोल्हापुरी बंधारे तुडूंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मागील महिनाभरापासून तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम धोक्यात आला होता. पावसाअभावी पिके हातून जाण्याची भिती व्यक्त केली जात होती, मात्र गुरुवारी पहाटेपासुन तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी आठपर्यंत तालुक्यात फुलंब्री मंडळात १४७, आळंद मंडळात ९०, वडोदबाजार मंडळात १०५, पिरबावडा मंडळात १२१ मिलीमीटर पाऊस झाला. तालुक्यात सरासरी ११५.७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

\Bचाऱ्याचा प्रश्न मिटला\B

महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या. त्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. चारा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीस काढली होती, मात्र जनावरांच्या किमती कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. गुरुवारी झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न मिटला आहे.

\Bदुकानात शिरले पाणी

\Bफुलंब्री येथील टी पॉइंट व खुलताबाद रस्त्यावरील काही दुकानात तीन ते पाच फुटांपर्यंत पाणी शिरले. यात दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुकानदारांनी संपूर्ण रात्र जागून काढली. ऑटोमोबाइल, कापड दुकान, किराणा दुकान, हॉटेल या दुकानाचा यात समावेश आहे. खुलताबाद रस्त्यावर असणाऱ्या नाल्यातून येणारे पाणी वाहते. या रस्त्यावरील हा नालाच नाहीसा झालेला आहे. यामुळे खुलताबाद रस्त्यास नदीचे स्वरूप येते.

\Bबीएसएनएल कार्यालयात पाणी\B

बीएसएनएल कार्यालयात जवळपास पाच फूट पाणी होते. यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत मोबाइलला रेंज बंद होती. हे कार्यालय देखील खुलताबाद रस्त्यावरच आहे. फुलंब्री बृहत प्रकल्प, सांजुळ, वाकोद, गणोरी, जातेगाव येथील तलावांत समाधानकारक पाणी साचले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीबीएसला प्रवेश: सीईटी सेलला नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याच्या कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश देण्याची विनंती करणाऱ्या याचिकेत सीईटी सेलसह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. व्ही. के. जाधव यांनी दिले. याचिकेची सुनावणी २० ऑगस्ट रोजी होणार आहे.

सीईटी सेलने एमबीबीएस प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १२ ऑगस्ट रोजी जाहीर केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट आहे. विद्यार्थ्यांनी या दिवशी प्रवेश घेतले नाही, तर ते पुढील प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार आहेत. गुणवत्ता यादीत अनिवासी भारतीय कोट्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी खंडपीठात विविध याचिका दाखल करून राज्याच्या कोट्यातून प्रवेश व पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्याची विनंती केली आहे.

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना कॉलेजचा सांकेतांक आणि पुढे 'एस' अथवा 'एन' कोटा याची निवड करणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांनी 'नॉन गव्हर्मेंट कॉलेज' असे गृहीत धरून 'एस' ऐवजी 'एन' वर क्लिक केले. त्यामुळे त्यांची एनआरआय कोट्यातून निवड झाली आहे. राज्य आणि अनिवासी भारतीय कोट्यातील विद्यार्थ्यांच्या शुल्कात ढोबळमानाने चार ते पाच पट फरक आहे.

याचिकाकर्ते ऋतुजा राहाटे, प्रतिभा सानप, निलेश चव्हाण व इतर विद्यार्थ्यांनी याचिका केली आहे. त्यांची बाजू गजानन के. क्षीरसागर, शिरीष कांबळे, आर. आर. सूर्यवंशी आणि अरुण व्ही. राख यांनी मांडली. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील एस. डब्ल्यू. मुंडे आणि प्रतिवादी सीईटी सेलतर्फे सुजित कार्लेकर हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चा प्रस्ताव पाचव्यांदा बारगळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा कंपनी आणि महापालिका प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव शुक्रवारी पाचव्यांदा बारगळला. 'समांतर' बद्दलच्या सर्वसाधारण सभेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे महापौर म्हणाले.

न्यायालयाबाहेर तडजोड करण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात महापालिकेच्या प्रतिनिधीकडे 'पीपीपी' (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्वावरील कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव दिला. कंपनीने दिलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सर्वसाधारण सभेत ठेवण्यासाठी प्रस्ताव तयार केला. कंपनीचा प्रस्ताव व आयुक्तांचा प्रस्ताव यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले. विविध कारणांमुळे चार सभा महापौरांना तहकूब कराव्या लागल्या. शुक्रवारी (१७ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेली विशेष सभा देखील तहकूब करावी लागली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे 'समांतर'च्या सभेचे रुपांतर श्रद्धांजलीसभेत झाले. आता सभेची नवीन तारीख नंतर जाहीर करू, असे महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्टमंडळानी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या शुक्रवारी सर्वसाधारण सभेत एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजप नगरसेवकांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर शिवसेना, भाजप; तसेच एमआयएमच्या शिष्टमंडळानी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची भेट घेतली. दोन्ही गटांनी विरोधी गटातील दोषींवर कारवाईची मागणी केली. यावेळी आयुक्तालयात बंदोबस्त वाढवल्याने छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

दुपारी पावणेतीनच्या सुमारास शिवसेना, भाजपच्या शिष्टमंडळाचा वाहनांचा ताफाच आयुक्तालयात दाखल झाला. यामध्ये महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, राजेंद्र जंजाळ, प्रमोद राठोड, डॉ. भागवत कराड,राज वानखेडे, रामेश्वर भादवे यांच्यासह इतरांचा समावेश होता. आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्याशी या शिष्टमंडळाने २० मिनिटे चर्चा केली. शिवसेना, भाजपचे शिष्टमंडळ गेल्यानंतर अर्ध्या तासाने एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, गफार कादरी, नगरसेवकांचे शिष्टमंडळ आयुक्तालयात दाखल झाले. त्यांनी देखील पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याशी चर्चा केली. दोन्ही शिष्टमंडळाना दोषींवर ठोस कारवाईचे आश्वासन आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दिले.

नगरसेवक मतीन यांनी सभागृहात केलेला प्रकार त्यांचा वैयक्तिक आहे. पक्ष त्यांची याबाबतीत पाठराखण करीत नाही. ही बाब चुकीची आहे; तसेच भाजपच्या नगरसेवकांनी केलेल्या गुंडगिरीचेही समर्थन होऊ शकत नाही. यातून 'मॉबलिचिंग'ची मानसिकता यातून दिसून येते. याप्रकरणी दोषींवर पोलिसांनी कारवाई केली पाहीजे.

- इम्तियाज जलील, आमदार, औरंगाबाद मध्य

एकट्या नगरसेवक सय्यद मतीनमुळे महापालिकेतील वातावरण खराब होत आहे. यापूर्वी देखील 'वंदे मातरम्'च्या मुद्यावरून त्यांनी गोंधळ घातला होता. मतीन यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर 'एमपीडीए अॅक्ट'नुसार स्थानबद्धतेची कारवाई करावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

- किशनचंद तनवाणी, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

घडलेल्या घटनेबाबत तक्रारी आल्यानंतर चौकशी करण्यात येईल. सीसीटीव्ही चित्रिकरण; तसेच पुरावे पाहिल्यानंतर याप्रकरणी येत्या दोन दिवसांत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त, औरंगाबाद शहर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Syed Matin: एमआयएमच्या नगरसेवकाला अटक

$
0
0

औरंगाबाद:

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनावरील शोक प्रस्तावाला विरोध करणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. उपमहापौर विजय औताडे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. मतीन यांनी त्यास विरोध केला. त्यामुळं खवळलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी त्यांना मारहाण केली होती. त्यात जखमी झालेल्या मतीन यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर वार्ड क्र. १७ मध्ये उपचार सुरू होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना कैद्यांसाठी असलेल्या वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. डिस्चार्जनंतर त्यांना सिटी चौक पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. उपमहापौर विजय औताडे यांच्या तक्रारीवरून मतीन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितलं.

स्कार्पिओ तोडफोड: तिघे ताब्यात

मतीन यांना मारहाण झाल्यानंतर काही लोकांनी महापालिका परिसरातील स्कॉर्पिओ गाड्यांची तोडफोड केली होती. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील इतर नऊ जणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाभोलकरांच्या मारेकऱ्याला पाच वर्षानंतर अटक

$
0
0

औरंगाबाद:

ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी औरंगाबाद येथून एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणानेच दाभोलकरांवर गोळ्या घातल्याचा दावा एटीएस सूत्रांनी केला असून तब्बल पाच वर्षानंतर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात एटीएस आणि सीबीआयला यश आले आहे.

सचिन अणदूरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून सीबीआयने एटीएसच्या मदतीने त्याला औरंगाबादच्या निराला बाजारमधून अटक केली आहे. नालासोपारा येथे सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शरद कळसकरने दिलेल्या माहितीवरून सीबीआयने अणदूरेला अटक केली आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. तो पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह कुंवारफल्ली येथे राहतो. तो निराला बाजारमध्ये कापडाच्या दुकानात काम करतो. एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकर याच्या मित्रांच्या यादीत सचिन अणदुरेचे नाव समोर आले होते. त्यामुळे कळसकरसोबत सचिनचा काय सबंध आहे, याची चौकशी करण्यासाठी त्याला मुंबईला नेण्यात आले असता त्यानेच दाभोलकर यांच्यावर गोळी घातल्याचं तपासातून निष्पन्न झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. सचिनचे शिक्षण औरंगाबादमध्येच झाले आहे. त्याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर सातत्याने हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या पोस्ट अपलोड केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जालन्यातून आणखी एक ताब्यात

जालन्यामधूनही श्रीकांत नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याचाही दाभोलकर यांच्या हत्याकांडाशी संबंध असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, काळसकर, अणदूरे आणि श्रीकांत यांची चौकशी सुरू असून या तिघांचा कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येशी काही संबंध आहे का? याची चौकशी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.


तिघांना अटक: एटीएस

दरम्यान, दाभोलकर हत्येप्रकरणी आतापर्यंत तिघा जणांना अटक करण्यात आल्याचं एटीएसने म्हटलं आहे. या तिघांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याचंही एटीएसने स्पष्ट केलं. दाभोलकरांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने दिल्याचं एटीएसने म्हटलं आहे. या हत्येवेळी मोटारसायकलचा वापर करण्यात आल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. दाभोलकर हत्येचा तपास सीबीआय करत असल्याने सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आल्याचं एटीएसने म्हटलं आहे.

65455882

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीनफिल्डचा पैसा हेरिटेजसाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्टसिटी प्रकल्पातील ग्रीनफिल्डचा काही पैसा शहरातील वारसास्थळांच्या संवर्धनासाठी वळविण्यात येणार आहे. सुमारे दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव या कामासाठी तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाशी संपर्क साधून वारसास्थळांसाठी निधी वळविण्यासाठी महापालिकेचे आयुक्त पुढाकार घेणार आहेत.

औरंगाबादची ओळख वारसास्थळांचे शहर अशी आहे, परंतु वारसास्थळांची स्थिती फारच नाजूक झाली आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेकडे निधी नाही. त्यामुळे अनेक कामे रखडली आहेत. औरंगाबादचा स्मार्टसिटी प्रकल्पात समावेश झाल्यानंतर सुमारे साडेतेराशे कोटी रुपयांचा ग्रीनफिल्ड प्रकल्प आणि साडेतीनशे कोटी रुपयांचा पॅनसिटी प्रकल्प तयार करण्यात आला आहे. पॅनसिटी प्रकल्पातील काही कामांची सुरुवात झाली आहे. दरम्यान स्मार्टसिटी प्रकल्पात विविध कामांसाठी ठेवलेला निधी अन्य कामासाठी वळता करायचा असेल तर त्यासाठी शासनाने १० सप्टेंबर ही शेवटची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे ग्रीनफिल्ड प्रकल्पातील सुमारे दोनशे कोटींचा निधी वारसास्थळांची देखभाल, दुरुस्ती व संवर्धनासाठी वळता करावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

वारसास्थळांच्या संवर्धनासाठी आयुक्तांनी विशेष लक्ष घातले आहे. स्मार्टसिटीमधील काही कामांचा निधी वळविण्याबद्दल त्यांच्याशी चर्चा झाली, तेव्हा त्यांनी दोनशे कोटींचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करण्याची तयारी दर्शवली आहे.

- नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराप्रकरणी उपकरातून सूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जे मालमत्ताधारक स्वत:च्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावतील त्या मालमत्ताधारकांना कचरा संकलन व वाहतुकीसाठीच्या उपकरातून सूट दिली जाणार आहे. या बद्दलचा प्रस्ताव पालिकेचे प्रशासन तयार करीत आहे.

कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करण्यासाठी वेगळ्या उपकराची आकारणी करण्यात येणार असल्याचे निवेदन महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात करण्यात आले होते. निवासी मालमत्तांसाठी एक रुपया, व्यावसायिक मालमत्तांसाठी दोन रुपये आणि मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी दहा रुपये प्रतिदिवस या प्रमाणे उपकर आकारला जाईल, अशी मांडणी महापालिकेतर्फे कोर्टात करण्यात आली होती. उपकर आकारणीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली होती. या संदर्भात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी माहिती देताना सांगितले की, 'जे मालमत्ताधारक स्वत:च्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावतील त्यांना उपकरातून सूट दिली जाणार आहे. कचऱ्याचे संकलन व वाहतुकीचे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशीपासून उपकर आकारणी सुरू केली जाणार आहे. कर आकारणीबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. कचरा संकलन व वाहतुकीच्या कामाची निविदा सादर करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट निश्चित केली आहे. तीन सप्टेंबर ही कचऱ्यापासून बायोमिथेन तयार करण्याच्या कामाची निविदा सादर करण्याची अंतिम तारीख आहे. चिकलठाणा - पडेगाव येथील जागांवर सिव्हिल वर्क करण्यासाठी कंत्राटदाराला कार्यादेश दिले आहेत.'

\Bस्वच्छ सर्वेक्षण फेब्रुवारीत

\Bभोंबे म्हणाले, 'नागरिकांच्या विरोधामुळे प्रभाग क्रमांक तीनमध्ये सुमारे १५० टन कचरा पडून आहे. चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल - सावंगी आणि कांचनवाडी या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी प्रत्येकी तीन यंत्रे २५ ऑगस्ट रोजी बसवण्यात येतील. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरात या उपक्रमांतर्गत फेब्रुवारी महिन्यात सर्वेक्षण होणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेने आतापासून तयारी सुरू केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ नगरसेवकांचे पद रद्द करा

$
0
0

औरंगाबाद : महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी 'एमआयएम' नगरसेवक सय्यद मतीनला भाजप नगरसेवक विजय औताडे, प्रमोद राठोड, दिलीप थोरात, रामेश्वर भादवे, अॅड. माधुरी अदवंत यांनी मारहाण केली. महाराष्ट्र महापालिका अधिनियम मधील तरतूद १३ (१) (अ) नुसार या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करा, या सर्वांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्ष नेते जमीर अहेमद कादरी यांनी आयुक्तांकडे एका पत्राव्दारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसूर करणारे कर्मचारी रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात वन विभागाच्या वरिष्ठांनी कारवाईचा बडगा उगारला असून, आतापर्यंत तिघांचे पगार रोखण्यात आले आहेत, अन्य काही अधिकाऱ्यांचे पगार रोखण्यासाठी जिल्हा कोषागार विभागाला लेखी पत्र पाठविण्यात आले आहे.

उस्मानपुरा येथील उप वन सरंक्षक विभागाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना या जिल्ह्याचा समावेश येतो. वन संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन करणे, वन्यजींवाचे सरंक्षण, अवैध लाकूडतोड, शिकार यांना पायबंद घालणे आदी कर्तव्य व जबाबदारी या वन कर्मचाऱ्यांवर आहे. शिस्तीचा भाग म्हणून विशेष: फिल्डावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना केलेल्या कामाची दैनदिन नोंदवही महिना संपताच आठवड्याभराच्या आता वरिष्ठांना सादर करणे बंधनकारक आहे. शासनाच्या निर्देशानुसार क्षेत्राय अधिकाऱ्यांनी ही माहिती दोन महिने न दिल्यास वेतन रोखण्याची कारवाई केली जाते. औरंगाबाद उप वन संरक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनेक अधिकारी दैनदिन नियमित देत नसल्याचे, तर काही महाभागांनी गेल्या चार ते सहा महिन्यापासून त्यासंबंधी पूर्तता न केल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी सज्जड दम भरल्यानंतर अनेकांनी त्यावर तातडीने कार्यवाही केली पण, सूचना देऊनही तीन सहायक वन सरंक्षक अधिकाऱ्यांनी दैनदिन माहिती पुस्तिका सादर न केल्याने जी. एम. शिंदे, ए. एम. सोनवणे, पी. पी. वरुडे यांचे वेतन रोखण्यात आले आहे. तसे पत्र जिल्हा कोषागार विभागाला पत्र देण्यात आले आहे.

जी. एम. शिंदे, ए. एम. सोनवणे, पी. पी. वरुडे यांनी दैनंदिन माहिती पुस्तिका सादर न केल्याने त्यांचे वेतन रोखले आहे. तसे पत्र कोषागार विभागाला दिले आहे.

- सतीश वडस्कर, उप वन संरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार कल्याण मंडळातर्फे प्रशिक्षण शिबिर

$
0
0

औरंगाबाद : कामगार कल्याण मंडळातर्फे पैठण येथे २३ ऑगस्टपासून चार दिवसीय निवासी भजन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योगधंद्यातील आस्थापनेतील कामगारांचे भजन संघ तयार व्हावेत, या भजन संघातील कलाकरांना शास्त्रोक्त मार्गदर्शन व्हावे, नवीन भजन संघ तयार व्हावेत, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पितांबरी मंगल कार्यालय आयोजित या शिबिराचे उद्घाटन गुरुवारी सकाळी दहा वाजता पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या हस्ते होणार आहे. रावसाहेब महाराज गोसावी, कल्याण मंडळाचे आयुक्त सतीश दाभाडे आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतीनला बेड्या; उपमहापौरांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास विरोध करणारा एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याला शनिवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मतीनला मारहाण केल्याप्रकरणी उपमहापौरांसह भाजप नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

सहाय्यक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमहापौर विजय औताडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सय्यद मतीन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मतीनला सभागृहात झालेल्या मारहाणीनंतर महापालिकेतून बाहेर जाणाऱ्या गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पालिका परिसरात एका स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड केली. या प्रकरणातही मतीनवर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका परिसरात स्कार्पिओच्या तोडफोडप्रकरणी तिघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात नऊ जणांची ओळख पटली असून त्यांचाही शोध सुरू आहे. शुक्रवारी तोडफोडीची घटना झाल्यानंतर पोलिसांनी रात्रभर या तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेतला. या प्रकरणात मोहम्मद आवेज (रा. रोहिल्ला गल्ली) याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मतीनच्या तक्रारीवरून मारहाण केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात उपमहापौर विजय औताडे, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, नगरसेवक राजगौरव वानखेडे यांच्यासह अन्य दोघांवर शुक्रवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी दिली. या सर्वांवर जमाव करून मारहाण केल्याप्रकरणी कलम ३२३, ५०६, १४३, १४७ आणि १४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\B

'नुमाईंदा' मतीनच्या पाठिशी

\Bमतीनवर हल्ला करणाऱ्यांवर जमावाने हल्ला करून खून केल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करा, मतीनवरचे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी नुमाईंदा कॉन्सीलच्या वतीने शनिवारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली. पोलिसांनी जावेद कुरेशी यांना खोट्या गुन्ह्यात गोवले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे व हल्लेखोरांवर ३०७ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी जियाओद्दीन सिद्दीकी यांनी केली आहे.

\Bओवेसी मतीनवर नाराज

\Bनगरसेवक मतीनने केलेल्या थयथयाटावर 'एमआयएम'चे पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 'मतीनला वारंवार सांगून तो पक्षाच्या वरिष्ठांसोबत चर्चा न करता सभागृहात वाद निर्माण करतो. त्यामुळे पक्षाची बदनाम होत आहे. लोकशाहीच्या चौकटीत राहून कोणत्या मुद्द्यांना विरोध करावा याची आधी पक्षात चर्चा व्हावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४० हजारांची लाच; तलाठी अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११साठी शेत जमिनीचा मोबदला मिळून देण्यासाठी मदत केली म्हणून एका शेतकऱ्याकडून बक्षीस स्वरुपात चाळीस हजारांची लाच स्वीकारताना वेरूळ सज्जाच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी बेड्या ठोकल्या. नामदेव बाबूराव कुसनुरे (रा. कासलीवाल तारांगण, फ्लॅट व इमारत क्रमांक सहा, मिटमिटा) असे या तलाठ्याचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहात सापडलेल्या नामदेव कनसुरे याच्याकडे वेरूळ येथील सजाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तो सध्या खिर्डीच्या सजात तलाठी म्हणून कार्यरत आहे. तक्रारदाराची जमीन धुळे - सोलापूर महामार्गात संपादित झाल्याने दोन कोटी ९६ लाखांचा मोबदला मिळाला होता. हा मोबदला मिळवून देण्यासाठी मदत केली. त्यासाठी बक्षीस म्हणून एक टक्का रक्कम दोन लाख ९६ हजारांची मागणी कसनुरेने केली होती. तडजोडी अंती ४० हजार द्या, नाही तर पुढचा मोबदला मिळू देणार नसल्याचे धमकावले होते.

\B...अन् सापळा रचला

\Bतक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्याअनुषंगाने शनिवारी वेरूळ येथे सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष ४० हजारांची रक्कम घेताना कुनसुरेला रंगेहात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले. पोलिस उपाधीक्षक नितीन देशमुख, रवींद्र देशमुख, रवींद्र अंबेकर, सुनील पाटील, मिलिंग इपर, राजपूत यांनी ही कारवाई केली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव आयुक्तांच्या कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एमआयएम' नगरसेवक सय्यद मतीनवरील कारवाईचा ठराव आयुक्तांच्या कोर्टात गेला आहे. सर्वसाधारण सभेचा ठराव, सभेचा कारणापुरता उतारा महापौरांनी शनिवारी आयुक्तांनाकडे सादर केला.

महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास 'एमआयएम' नगरसेवक सय्यद मतीनने विरोध केला. त्यामुळे पालिकेच्या सभागृहात रणकंदन माजले. मतीनचे गरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. त्याला पालिका सभागृहात बंदी देखील करण्यात आली. पालिका सभेने घेतलेल्या या ठरावाची प्रत, कारणापुरता उतारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी सायंकाळी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला. या आधारे मतीनचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याच्या कारवाईची शिफारस आयुक्तांनी शासनाकडे करावी असे महापौरांनी आयुक्तांच्या नावे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

\Bभाजप नगरसेवकांकडून मारहाण नाही

\Bदरम्यान पत्रकारांशी बोलताना महापौर म्हणाले, 'सर्वसाधारण सभेत 'भाजप' नगरसेवकांनी मतीनला मारहाण केली नाही. श्रद्धांजली सभेला विरोध करून मतीन यांनी स्वत:हून भाजपच्या नगरसेवकांनी अंगावर ओढून घेतले. प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंट करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मतीन यांचे सभागृहातील कृत्य लांछनास्पद होते. त्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश द्यायचा नाही असे धोरण महापौर म्हणून आपण ठरवले आहे. या संबंधीचे आदेश प्रत्येक सर्वसाधारण सभेत द्यावे लागतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्थिव शिवपूजनाला उत्साहात सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गंगाखेड येथील यज्ञेश्वर सेलुकर महाराज यांच्या हस्ते येथील अग्रसेन भवनमध्ये पार्थिव शिवपूजन कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली. या धार्मिक सोहळ्यात भाविकांना सहभागी होता येणार आहे.

धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रशांद जमदडे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर सेलूकर महाराजांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. यात सुमारे शंभर भाविक सहभागी झाले होते. अग्रसेन भवनात हा कार्यक्रम महिनाभर चालणार आहे. कार्यक्रमात संगीत देवी भागवत, संगीत हनुमान चालिसा, अनंतशास्त्री गोंदेकर यांच्या संगीत महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ऑगस्टपासून आनंदशास्त्री गुंजीकर महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा आठवडाभर चालणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळात शिवपुराण कथा होईल. सायंकाळी साडेचार ते सात वाजेच्या दरम्यान मातीची शिवपिंड तयार करून त्यावर रुद्राभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर आरती होवून प्रसादाचे वाटपाने पुजनाची सांगता होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविकांत दिग्रसकर, विजय कुलकर्णी, ए. एम. कुलकर्णी, मिलिंद काटकर, भानुदास कुलकर्णी, संजय पांडे, विजय चाटोरीकर, बाळकृष्ण बाभुळगावकर आदी सहकुटुंब परिश्रम घेत आहेत.

\Bमहिनाभर कार्यक्रम

\Bएक महिना नित्य षोडोपचार पूजा, नैवेद्य, आरती व संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमासाठी अन्नदान अथवा उपासना करावयाची असल्यास इच्छुकांनी सुधीर बाभुळगावकर, ए. एम. कुलकर्णी, विजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंचाना हवे वाढीव मानधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामसेवकाच्या पगाराइतके मानधन द्या, पंचायतीसह जिल्हा परिषद आणि मंत्रालयात होणाऱ्या बैठकांना निमंत्रित करा, मानधन वाढवून पोलिस पाटलांना विधान परिषदेत प्रतिनिधीत्व द्या अशा मागण्या शनिवारी झालेल्या संकल्प परिषदेमध्ये करण्यात आल्या.

श्री. छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी व लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठान यांच्या वतीने शनिवारी येथील संत तुकाराम नाट्यगृहात औरंगाबाद जिल्हा सरपंच, पोलिस पाटील संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या हस्ते झाले. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी मंत्री गंगाधर गाडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास पाटील, सरपंच संघटनेचे नेते किशोर पवार, पोलिस पाटील संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष जब्बार पठाण, महासचिव श्रीकृष्ण साळुंखे, कृषीभूषण भाऊसाहेब थोरात, प्राचार्य सूर्यकांत गाडे, संयोजक मिलिंद पाटील, महेश गुजर उपस्थित होते. यावेळी भापकर म्हणाले, 'कॉलेज, नॉलेज, व्हिलेज उपक्रमाद्वारे विविध शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्यांनी याबाबत आपापल्या गावपातळीवर त्याचा प्रचार, प्रसार करून गामविकासात हातभार लावावा असे नियोजन केले आहे. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न होत असून सरपंच, पोलिस पाटील यांनीही याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगार, स्वंयरोजगारांच्या अधिकाधिक संधी निर्माण व्हाव्यात यासाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमही हाती घेतला आहे. सरपंच, पोलिस पाटील यांनी उपस्थित केलेल्या विभागीय स्तरावरील प्रश्नांची तातडीने सोडवणूक करू व अन्य प्रश्नांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू,' असे आश्वासन भापकर यांनी दिले.

\Bपरीक्षेला कडाडून विरोध

\Bसरंपचासाठी परीक्षा घेण्याचे सुतोवाच शासनाने केले आहे. त्यास या परिषदेत कडाडून विरोध झाला. सरपंच हा आधीच जनतेच्या परीक्षेतून पास होऊनच येतो. शासनाच्या सरपंच परीक्षेत नापास झाल्यास अशा सरपंचांना स्वाक्षरीचे अधिकार राहणार नाहीत असे समजते. असे सांगत विकास शिंदे यांनी हेच निकष आमदार, खासदारांना का लागू केले जात नाही ? असा सवाल केला.

\Bअशा आहेत मागण्या

\B'सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दरमहा ग्रामसेवकाच्या पगाराइतके सरकारी मानधन द्यावे, ग्रामपंचायत कामानिमित्त प्रवास करताना बस, रेल्वे प्रवास मोफत असावे, राखीव सीट असावे. ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीत जनसंपर्क अधिकारी द्यावा. ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल न घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई करा यासह १७ मागण्या,' अशा मागण्या विकास शिंदे यांनी केल्या. 'साडेसात हजार वेतन द्यावे, निवृत्तीनंतर तीन लाख व निवृत्ती वेतन द्यावे, नूतनीकरण कायमाचे बंद करा, पोलिस पाटील विमा योजना सुरू करा, सरंक्षणासाठी शस्त्र परवाना द्यावा, पोलिस पाटील यांचा एक प्रतिनिधी विधान परिषदेवर घ्या,' अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा रस्ताप्रकरणी कंत्राटदाराला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा - देवळाईतील रस्त्याचे काम बंद केल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या प्रकरणी महापालिकेतर्फे कंत्राटदाराला नोटीस दिली जाणार आहे.

सिडकोने सातारा - देवळाईभागातून विकास कराच्या रुपाने शुल्क वसुल केले होते. सातारा - देवळाईचे महापालिकेत हस्तांतरण झाल्यावर विकास करापोटी जमा केलेल्या शुल्कापैकी साडेआठ कोटी रुपये सिडकोने महापालिकेला परत केले. या निधीतून सातारा - देवळाई भागातून बीडबायपास रस्त्याला मिळणाऱ्या प्रमुख पाच रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. रस्त्यांच्या कामाची निविदा काढून कंत्राटदारही नियुक्त करण्यात आला. परंतु कंत्राटदाराने रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद केले. त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. या संदर्भात महापौर व अधिकारी यांची शनिवारी बैठक झाली. रस्त्याचे काम कंत्राटदारानी बंद केल्याचे स्पष्ट झाल्यावर कंत्राटदाराला नोटीस बजावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images