Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

माजी पंतप्रधान वाजपेयी यांना श्रद्धांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना भाजप पश्‍चिम विभागातर्फे सोमवारी बन्सीलालनगरमधील सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी महापौर गजानन बारवाल, भाजप शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी वाजपेयी यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाजपेयी यांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प केला. वेदांतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल आडे यांच्यासह भाजपचे बबन नरवडे, दीपक ढाकणे, मंगलसिंग धिल्लन, ज्ञानू नगरे, योगेश कोटगिरे, समीर शेख, दीपक कुमावत, अदित्य दहिवाल, योगेश वाणी, मुकुंद कुलकर्णी, सचिन जीवनवाल, प्रशांत जैस्वाल, हरीश गोयल, सुरेश देवमाळी, समाधान ढेपे, अजय बन्सवाल, चंद्रकांत बन्सवाल, सुनील सोनवणे, कवलसिंग बिंद्रा, उमेश हिवाळे, चंदू कटारे, आदित्य जैस्वाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमपीडीए’खाली नगरसेवक मतीन स्थानबद्ध

$
0
0

औरंगाबाद : वाढती गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची दखल घेऊन पोलिस प्रशासनाने एमपीडीए कायद्यानुसार एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याच्यावर मंगळवारी स्थानबद्धतेची कारवाई केली. सय्यद मतीन याच्याविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवणे, जाळपोळ करून नुकसान करणे, दोन जाती-धर्मात तेढ निर्माण करणे असे गुन्हे सिटी चौक, क्रांतीचौक, जिन्सी या पोलिस ठाण्यात दाखल आहेत. मतीनच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये हद्दपारीची कारवाई करण्यासाठी पोलिस उपआयुक्त परिमंडळ एक यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, प्रक्रिया चालू असतानाच मतीनच्या गुन्ह्यात वाढ झाली. त्यामुळे अखेर मध्यवर्ती कारागृहात त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा इम्पॅक्ट - नियमित तासिकांसाठी परिपत्रक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नियमित तासिका घेण्यासाठी विभागप्रमुखांनी अतिथी प्राध्यापक नेमावे आणि तासिकांचे काटेकोर नियोजन करावे असे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने काढले आहे. विद्यापीठातील अनेक विभागात नियमित तासिका होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी विभागप्रमुखांना सूचना केल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या ४० रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया नियमात अडकली आहे. त्यामुळे अनेक विभागात प्राध्यापक नसल्यामुळे नियमित तासिका घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूर्णवेळ प्राध्यापकांचे विषय व तासिका वगळून इतर विषयांसाठी प्राध्यापकांची गरज आहे. या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'विद्यापीठात तासिकांचा बोजवारा' हे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी नवीन परिपत्रक काढले. आपल्या अधिकारात अतिथी प्राध्यापक बोलावून तासिकांची समस्या सोडवावी, अशी सूचना यापूर्वी केली होती. तरीसुद्धा काही विभागप्रमुखांनी नियुक्त्या केल्या नाहीत. येत्या चार दिवसांत पदव्युत्तर वर्गासाठी अतिथी प्राध्यापकांची नियुक्ती करण्याची सूचना परिपत्रकात करण्यात आली आहे. या नियुक्त्यांबाबत दोन दिवसांनी पुन्हा आढावा घेण्यात येईल असे तेजनकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीच्या विकासाचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगबाद

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जून १९९०पासून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विकास आराखड्यास सोमवारी अखेर मंजुरी मिळाली. प्रशासकीय स्तरावरून महापालिकेने विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. यामुळे बाजार समितीच्या विकास कामांना गती येईल, अशी माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

बाजार समितीने सादर केलेल्या विकास आराखड्यास २१ जून १९९० मध्ये तत्वत: मान्यता दिली. त्यानंतर सुधारित विकास आराखडा २००७ मध्ये महापालिकेकडे पाठविण्यात आला होता, पण या ना त्या कारणांमुळे आराखड्यास मंजुरी मिळाली नव्हती. परिणामी, विकासकामांवर परिणाम होत होता. महपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करण्याबरोबरच समिती संचालकांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे धाव घेतली. विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणी वरिष्ठस्तरावर बैठक घेत हा प्रश्न मार्गी लावल्याचे सभापती पठाडे यांनी सांगितले.

सुधारित आराखड्यास मंजुरी मिळाल्यामुळे बाजार समितीत शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, किराणा, व्यापारी संकुल, कोल्ड स्टोरेजसह विकासकामांना गती येईल, असा विश्वास पठाडे यांनी व्यक्त केला. खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, रचनाकार विभागाच्या सहकार्याने हा बहुप्रतीक्षित असलेला सुधारित विकास आराखडा मंजूर झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

\B२८ लाखांचा भरणा

\Bजमीन विकास, शहर विकास निधी, छाननी शुल्क, जोत्याचे प्रमाणपत्र, दंड असे मिळून नऊ कोटी ६४ लाख रुपयांची मागणी महापालिकेने आराखडा मंजुरीसाठी केली होती. महापालिका लाइट, ड्रेनेजसह कुठल्याही प्रकारची सुविधा देत नाही. बाजार समित्याकडून विकास बांधकामाचे शुल्कावर शुल्क आकारण्यात येऊ नये, असे राजपत्रात नमूद आहे. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने शुल्क कमी केले आणि २८ लाख १८ हजार रुपयांचा भरणा केला आहे, अशी माहिती सभापती पठाडे यांनी दिली.

\Bप्लॉट विक्री जोमाने\B

बाजार समिती आवारातील प्लॉट पहिल्या टप्प्यात विक्रीस काढण्यात आले आहेत. तीन टप्प्यांत मिळून प्लॉटची विक्री होणार असून, आतापर्यंत ६० व्यापाऱ्यांनी पूर्ण रक्कम भरली आहे. काही व्यापाऱ्यांनी थोडीफार रक्कम अदा केली आहे. त्यांनी तातडीने सर्व रक्कम भरावी, असे आ‌वाहन सभापती पठाडे यांनी केले असून, प्लॉटसाठी जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. जालन्यासह इतर भागातील व्यापाऱ्यांनीही प्लॉट खरेदीसाठी पसंती दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अनिवासी’ वैद्यकीय प्रवेश; याचिकेचा निकाल राखीव

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

अनिवासी भारतीयांच्या कोट्यातून 'एमबीबीएसस'करीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याची विनंती करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी मंगळवारी औरंगाबाद खंडपीठात पूर्ण झाली. न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी सर्व याचिका निकालासाठी राखून ठेवल्या आहेत. या याचिकांवरील निकाल २३ ऑगस्ट रोजी अपेक्षित आहे.

सीईटी सेलने 'एमबीबीएस' प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १२ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट होती. निवड झालेल्या कोट्यातून प्रवेश घेतले नाही, तर विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार होते. वरील गुणवत्ता यादीत ज्यांची निवड अनिवासी भारतीयांच्या कोट्यातून झाली आहे. त्यांनी औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल करून त्यांना राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याची विनंती केली आहे. राज्य शासनातर्फे सिद्धार्थ यावलकर, सीईटी सेलतर्फे मृगेश नरवाडकर आणि सुजीत कार्लेकर, केंद्र शासनातर्फे संजीव देशपांडे, तर याचिकाकर्त्यांतर्फे विजय शर्मा, गजानन क्षीरसागर,शिरीष कांबळे, आर. आर. सूर्यवंशी, अरुण राख, गौतम पहिलवान, प्रीती वानखेडे, रवींद्र गोरे, अभय राठोड, जफर पठाण, एस. एस. काझी आदींनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजचोरांना जामीन नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आसेगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील वीज चोरीविरुद्ध कारवाई करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिविगाळ, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणारे मकसूद खान मकबूल खान पठाण, मौसिन पठाण मकबूल खान पठाण व हरिभाऊ पंढरीनाथ राजगुरू या आरोपींचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने आठ ऑगस्टला फेटाळला होता. त्यानंतर आरोपींनी जिल्हा कोर्टात नियमित जामीन अर्ज दाखल केला असता, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी तो फेटाळळा.

याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता श्रीकांत बाळासाहेब गोरे (२७) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सहा ऑगस्ट २०१८ रोजी आसेगाव येथे फिर्यादी व त्याच्या सहकाऱ्यांनी वीज चोरांच्या शेधार्थ तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी तंत्रज्ञ विशाल बनसोडे याने आरोपीच्या गच्चीवर जाऊन पाहणी केली असता, वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी वीज चोरीविरुद्ध कारवाई करत असताना आरोपी मकसूद खान मकबूल खान पठाण (३८), आरोपी मौसिन पठाण मकबुल खान पठाण (२५) व आरोपी हरिभाऊ पंढरीनाथ राजगुरू (३३, सर्व रा. आसेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी फिर्यादीसह प्रिती कुदळे, विशाल बनसोडे, सुरेश पुरी, बाबहासाहेब जाधव आदी अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली. त्याचबरोबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तिघांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. आरोपींनी नियमित जामिनासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात अर्ज सादर केला असता, तो फेटाळ‍ण्यात आला होता.

\B...तर आरोपींचे मनोधैर्य वाढेल\B

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने आरोपींचा जामीन फेटाळल्यानंतर जिल्हा कोर्टात अर्ज सादर केला असता, या घटनेत आरोपी हे महिला कर्मचाऱ्याच्या अंगावरदेखील धावून गेले होते. आरोपींना जामीन मंजूर केला तर आरोपींचे मनोधैर्य वाढेल व कारवाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होईल. त्यामुळे आरोपींचा नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामसेवक मारहाणप्रकरणी जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

म्हारोळा (ता. पैठण, जि. औरंगाबाद) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामसेवकाला शिविगाळ, मारहाण करुन त्याची कागदपत्रे फेकून देणारे गजानन रमेश गडकर व दादासाहेब जनार्दन जाधव या आरोपींचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. गिरधारी यांनी मंगळवारी (२१ ऑगस्ट) फेटाळला.

याप्रकरणी म्हारोळा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक राहुल गोकुळ वाघ (२६) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १३ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादी हा म्हारोळा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे कामासाठी आला असता, तेथे आरोपी गजानन रमेश गडकर (३०) व आरोपी दादासाहेब जनार्दन जाधव (३२, दोघे रा. म्हारोळा) हे तिथे आधीच आलेले होते. त्यावेळी आरोपी हे फिर्यादीला, 'नमुना आठचा उतारा आत्ताच्या आत्ता द्या,' असे म्हणाले असता, 'अर्ज द्या, उतारा देतो,' असे फिर्यादी त्यांना म्हणाला. त्यावर संतप्त झालेल्या आरोपींनी फिर्यादीची कॉलर पकडून त्याला खाली पाडले व त्याची कागदपत्रे फेकून देत फिर्यादीला मारहाण केली.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून आरोपींना अटक करुन त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

\Bतपासात आणू शकतात अडथळा\B

आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. यापूर्वीही आरोपींनी गुन्हा केला असण्याची शक्यता नाकारता येत नसून, याबाबत तपास करणे बाकी आहे; तसेच आरोपींना जामीन मंजूर केल्यास ते तपासात अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोघांचा जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायनांन्स कंपनीला साडेनऊ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट कागदपत्र तयार करीत शहरातील आयकेएफ फायनांन्स कंपनीला साडेनऊ लाखांचा गंडा घालण्यात आला. सेव्हन हिल परिसरात २०१५ ते २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी फायनांस कंपनीच्या तत्कालीन दोन अधिकाऱ्यांसह चार जणांविरुद्ध पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी फायनांस कंपनीचे किरण बाळू गायकवाड रा. अशोकनगर, मसनतपुर यांनी तक्रार दाखल केली. आयकेएफ फायनांस कंपनीचे सेव्हनहील भागात कार्यालया आहे. जालना येथील अमोल अशोक लोखंडे व अजय अशोक लोखंडे (रा. कचेरी रोड) यांनी दोन वाहनांवर अनुक्रमे पाच लाख व साडेचार लाख रुपये कर्ज उचलले होते. यासाठी त्यांनी जालना आरटीओ कार्यालयात आरसी बुकमध्ये स्वत:ची नावे नमूद करीत बनावट शिक्के मारले. ही कागदपत्रे कंपनीकडे तारण ठेवून कर्ज उचलले. हे कर्ज मंजूर करण्यासाठी बँकेचे पूर्वीचे मॅनेजर अन्वर महेबूब शेख (रा. मोतीवालानगर) आणि सेल्स मॅनेजर रत्नाकर सखाराम काळवणे (रा. स्वामी विवेकानंद नगर, एन बारा) यांनी कागदपत्राची कोणतीही शहानिशा न करता लोखंडी बंधूंना मदत केली. नुकताच हा प्रकार कंपनीच्या निदर्शनास आला. याप्रकरणी गायकवाड यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीएसआय कापसे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिल्डर, उद्योजकावर प्राप्तिकर विभागाचे छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकासह एक उद्योग समूह, तसेच ऑइल मिल मालकाच्या कार्यालयावर मंगळवारी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. सकाळी आठपासून सुरू असलेली कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

शहर परिसरात एका धाब्याचालकावर आठ महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईनंतर प्राप्तिकर विभागाने पुन्हा जोमाने कारवाईसत्र हाती घेतले आहे. अदालत रोडवर असलेल्या एका बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण विंगच्या पथकाने सकाळी आठ वाजता छापा टाकला. कार्यालयाचा दरवाजा आतून बंद करत अधिकाऱ्यांची तेथील कागदपत्राची तपासणी सुरू केली. पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय इतर कोणालाही संबंधित कार्यालयात प्रवेश दिला जात नव्हता. रात्री उशीरापर्यंत पथकाची तपासणी सुरू होती. शहरातील एका बड्या उद्योग समहूाचे याच परिसरात कार्यालय आहे. त्या कार्यालयावरही पथकाने धाड टाकत कागदपत्राची तपासणी केली. यासह अन्य एका बांधकाम व्यावसायिकावर तसेच एका आइल कंपनीच्या मालकावर कारवाई झाल्याचे समजते.

\Bअधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार

\Bअहमदनगरहून एक पथक सकाळी सहा वाजता निघाले. औरंगाबाद येईपर्यंत नेमके कुठे जायचे आहे, हे कर्मचाऱ्यासह चालकासही माहिती नव्हते. स्थानिक अधिकाऱ्यांनाही याबाबत कल्पना नसल्याचे समोर आले असून, येथील २५हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश असल्याचे समजते. मात्र, कारवाईबाबत शेवटाच्या क्षणापर्यंत वरिष्ठांनी खात्याअंतर्गतही कमालीची गुप्तता पाळली. याबाबत प्राप्तिकर विभागाच्या औरंगाबाद तसेच पुणे येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कारवाई कोण कोणत्या बांधकाम व्यावसायिक, उद्योग समूहावर झाली, तपासादरम्यान काय महत्त्वाचे दस्तावेज हाती लागले, याचा अधिकृत तपशील समजू शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज महानगरात तीन ठिकाणी बंद असलेले घरे फोडली. यामध्ये रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चारी केल्याची घटना मंगळवारी (२१ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली़

राजू तुकाराम सोनवणे व शिवाजी सोनवणे (रा़ सीतानगर, बजाजनगर) या दोन भावाची बंद असलेली घरे चोरट्यांनी फोडली. त्यात लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. वाळूज महानगर परिसरात चोरीचे सत्र पुन्हा सुरू सीतानगर भागातील सोनवणे या दोन सख्या भावांची घरे फोडून चोरट्यांनी हात साफ केला़ हे दोघे भाऊ काकांच्या अंत्यविधीसाठी आपले मूळ गाव हिसोडा (ता़ भोकरदन) येथे २० ऑगस्ट रोजी दुपारी गेले होते़ रात्री घराला कुलूप असल्याची संधी साधून कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यात राजू सोनवणे यांच्या घरातील कपाटातून सोन्याची दोन तोळ्यांची पोत अर्धा ग्रामची अंगठी व रोख रक्कम ९० हजार रुपये असा अंदाजे एक लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला़; तसेच शिवाजी सोनवणे यांच्या घराचे कुलूप तोडून रोख २० हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने चोरले.

दुसरी घटना सिडको वाळूज महानगरातील साई नगर येथे घडली. राजू बडक हे आजीच्या अंत्यविधीसाठी बाहेर गावी गेले होते़ त्यांचे भाडेकरू अंकुश गागंर्डे यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये असल्याने ते सुद्धा घरी नव्हते. ही संधी साधून चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून रोख दहा हजार रुपये लंपास केले. या चोरीची माहिती मिळाल्यावर वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोचले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होत़े अनेक दिवसापासून वाळूज महानगरात ही टोळी सक्रिय असून, बंद असलेल्या घरावंर नजर ठेवून चोरी करतात. आतापर्यंत झालेल्या सर्व घरफोड्या या बंद असलेल्या घरातच झाल्या आहेत़

\Bलासूर येथे किराणा दुकानात चोरी

\Bगंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे किराणा दुकाणाचे शटर उचकटुन २६ हजार रुपयाची चोरी केल्याची घटना २१ ऑगस्ट सकाळी उघडकीस आली. येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात दोन अनोळखी चोरांचे चित्रिकरण झाले आहे.

अक्षय अशोक कोठारी (रा़ गीताबन लासूर स्टेशन) यांचे सावंगी चौकात अभिनंदन प्रोव्हिजन हे दुकान आहे. दुकानाचे शटर उचकटून सीसीटीव्ही कॅमेरे, टीव्ही संच फोडून व दुकानातील सामान अस्तव्यस्त करून २६ हजार रोख चोरून नेल्याची घटना घडली आहे. दुकानातील नोकर रमेश म्हस्के व कोठारी यांनी सोमवारी संध्याकाळी दुकान बंद केले होते. सहा शटर असेलेल्या दुकानावर राहत असल्याने ते शटरला नटबोल्ट लावून आतून बंद केले होते़ सकाळी दुकान उघडताना दोन शटरला नटबोल्ट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा सगळीकडे बघितले असता काउंटरवरील टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरा व इतर सामान तुटलेल्या अवस्थेत दिसून आले़ चोरी करत असताना दुकानात कॅमेरे लावलेले असल्याचे चोरट्यांचा लक्षात आल्याने त्यानी त्याची तोडफोड केली, परंतु 'डीव्हीआर'मध्ये त्यांचे चित्रिकरण उपलब्ध आहे.

लासूर स्टेशन येथे यापूर्वीही अशा प्रकारच्या घरफोड्या झाल्या यात रोख रक्कम चोरीसह खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा तपास करण्यासाठी व खुन्याचा शोध लावण्यासाठी येथील व्यापाऱ्यानी बंद पाळून 'रस्ता रोको' अंदोलन केले होते. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी,'यापुढे असे प्रकार होणार नाहीत,' असे आंदोलकाना सांगितले होते़ या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशतीचे वातापरण निर्माण झाले असून, कोठारी परिवारही दुकानाच्या वरच्या मजल्यावरच रहातात. चोरट्यांनी वरच्या मजल्यावर प्रवेश केला असता, तर चोरीसह काही अनुचित प्रकार घडला असता़ येथील व्यापाऱयांनाच चोर लक्ष्य करत आहेत. लासूर स्टेशन हे शिल्लेगाव पोलिस ठाण्यांतर्गत येते. याठिकाणी एक पोलिस चौकी आहे़ या घटनेची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेचे ठसे तज्ज्ञ व श्वान पथकासह शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय सोणवने, उपनिरीक्षक संदीप काळे, प्रशांत मुंडे यानी घटनास्थळाची पाहणी केली़

\Bपोलिस ठाण्याची मागणी\B

लासूर स्टेशन येथे मोठी बाजारपेठ असल्याने येथे स्वतंत्र पोलिस ठाणे असावे, यासाठी व्यापाऱ्यांनी आंदोलन केले होते; तसेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना काही दिवसापूर्वी लासूर येथे आले असताना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. त्याचा पाठपुरावा करून लवकर पोलीस ठाणे उभारावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख दिनेश मुथा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम रकमेत अपहार; दोघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल साडेबारा लाखांचा अपहार केल्याच्या प्रकरणात 'एटीएम'मध्ये रक्कम भरण्याचे कंत्राट असलेले अर्जून उत्तमराव वराडे व सूरज गंगाधर अंभोरे या आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत (२२ ऑगस्ट) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी मंगळवारी (२१ ऑगस्ट) दिले.

या प्रकरणी सुशील भिमराव धुळे (३१, रा. बौद्धनगर, जवाहर कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा 'इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट अँड सर्व्हिसेस प्रा. लि' या कंपनीत चॅनेल मॅनेजर असून, एटीएम मशीन बसवणे, देखभाल करणे व रक्कम भरणा करण्याचे काम कंपनी करते. या कंपनीकडे राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएम मशीनमध्ये रक्कम भरण्याचे काम आहे. या कंपनीने 'एटीएम'मध्ये रक्कम भरण्याचे काम 'अॅक्टिव्ह सिक्युअर मॅनेजमेंट प्रा. लि.'ला दिले होते व याबाबत करार करण्यात आला होता. फिर्यादी हा शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या सुमारे १५० 'एटीएम'चे काम पाहतो. त्याने 'एसबीआय'च्या 'एटीएम'मध्ये पैसे भरण्याचे कामदेखील 'अॅक्टिव्ह'ला दिले होते. हा करार जून २०१४ मध्ये संपला होता. मात्र 'अॅक्टिव्ह'चा व्यवस्थापकीय संचालक व आरोपी अर्जून उत्तमराव वराडे (४२, रा. राजनगर, गारखेडा) याने बँक गॅरेंटीची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादीच्या कंपनीने रक्कम भरणा करण्याचा 'अॅक्टिव्ह'शी असलेला करार रद्द केला. दरम्यान, हा करार असताना आरोपी वराडे व आरोपी सूरज गंगाधर अंभोरे (३०, रा. म्हाडा कॉलनी, सिडको एन-दोन) यांनी संगनमत करून वेगवेगळ्या 'एमटीएम'मध्ये १२ लाख ५३ हजार १०० रुपये कमी भरल्याचे ऑडिटमध्ये आढळले.

\Bतपास अजून बाकी\B

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ४२०, ४०९, ४०६, ३४ कलमान्वये सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून आरोपींना १८ ऑगस्ट रोजी अटक करून मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, तपास बाकी असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रेन डेड बाळंतिणीकडून तिघांना जीवनदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रसुतीनंतर तीन आठवड्यांनी मेंदूत रक्तस्त्राव होऊन ब्रेन डेड झालेल्या अवघ्या २६ वर्षीय बाळंतिणीकडून बुधवारी (२२ ऑगस्ट) शहरातील माणिक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अवयवदानामुळे तिघांना नवे आयुष्य मिळाले. ही बाळंतीण वरणगाव (ता. भुसावळ, जि. जळगाव) येथील असून, तिची प्रसूती शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये झाली होती; परंतु त्यानंतर तिच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने उपचारांची शर्थ लढवण्यात आली. मात्र उपचारादरम्यान बाळंतीण ब्रेन डेड झाली आणि तिच्या पतीसह इतर नातेवाईकांनी तिच्या अवयवदानाचा निर्णय अत्यंत अवघड प्रसंगी घेतला. त्यामुळेच ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला, तर २२ वर्षीय तरुणीला मूत्रपिंड मिळून नवे आयुष्य मिळाले. तसेच तिचे यकृतही प्रत्यारोपणासाठी नागपूरला बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पाठवण्यात आले.

याच विवाहितेच्या अवयवदानातून हृदय तसेच फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणासाठीही प्रयत्न झाले. मात्र, प्रत्यारोपणासाठी रुग्ण (रेसिपिएंट) उपलब्ध होऊ शकले नाही. तसेच इतरही अडचणी आल्या. त्यामुळे हृदय व फुफ्फुसांचे दान होऊ शकले नाही. संबंधित विवाहिता ब्रेन डेड झाली असली तरी मुदतपूर्व प्रसुतीनंतर जन्मलेले तिचे बाळ सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले.

गुंतागुंतीच्या प्रसुतीच्या केसमुळे व वैद्यकीय सल्ल्यानुसार वरणगाव येथील या विवाहितेला शहरात ३० जुलै रोजी डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी तिची मुदतपूर्व; पण नैसर्गिक प्रसुती झाली होती. साधारणतः आठव्या महिन्यांत तिची प्रसुती झाली होती व दोन-तीन दिवसांनी सुटी घेऊन ती नातेवाईकांसह शहरात खोली भाड्याने घेऊन राहिली होती. त्यानंतर तब्येत बिघडल्याने तिला पुन्हा १४ ऑगस्ट रोजी डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिटी स्कॅन व एमआरआय तपासणीत मेंदूमध्ये गाठ आढळून आली. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी विवाहितेला माणिक हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिच्या मेंदूतील सूज वाढत गेली व रक्तस्त्राव वाढून उपचारादरम्यान ती ब्रेन डेड झाली. त्यानंतर पतीसह सासर व माहेच्या नातेवाईकांनी तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला आणि वैद्यकीय चाचण्यांनंतर व सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आल्यानंतर मंगळवारी तिच्या अवयवदानासाठी हालचाली सुरू झाल्या. दात्या महिलेचा 'एबी पॉझिटिव्ह' हा काहीसा दुर्मिळ रक्तगट असल्याने 'रेसिपिएंट'चा शोध झेडटीसीसी-रोटो-सोटोमार्फत संपूर्ण देशभरात झाला. दोन्ही मूत्रपिंडांसाठी शहरातच रेसिपिएंट मिळाले व नागपूरच्या न्यू एरा हॉस्पिटलमध्ये यकृतासाठी रेसिपिएंट मिळाला. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये हृदय व फुफ्फुसासाठीही रेसिपिएंट मिळाले; पण वेगवेगळ्या अडचणींमुळे ते प्रत्यारोपणासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे हृदय-फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणाची शक्यता मावळली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी साडेआठपासून अवयवदानाची शस्त्रक्रिया माणिक हॉस्पिटलमध्ये सुरू झाली. दुपारी बारापर्यंत ही शस्त्रक्रिया पूर्ण होऊन 'ग्रीन कॉरिडॉर'द्वारे नागपूरला रुग्णवाहिकेतून यकृत प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. तसेच एक मूत्रपिंडाचे शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये, तर दुसऱ्या मूत्रपिंडाचे शहरातील कमलनयन बजाज रुग्णालयात प्रत्यारोपण झाले, असे 'झेडटीसीसी'चे समन्वयक मनोज गाडेकर व जयेश ढबाळे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. दोन्ही प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया बुधवारी सायंकाळपर्यंत पूर्ण झाल्या.

२२ वर्षीय तरुणीचे आयुष्य पालटणार

याच अवयवदानातून एका मूत्रपिंडाचे औरंगाबाद जिल्ह्यातील ५२ वर्षीय पुरुष रुग्णावर प्रत्यारोपण झाले, तर दुसऱ्या मूत्रपिंडाचे नगर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणीवर प्रत्यारोपण होऊन दोघांना नवीन जीवन मिळाले. दोन्ही रुग्ण काही वर्षांपासून डायलिसिसवर होते, तर संबंधित तरुणी तर वयाच्या किमान १९-२० व्या वर्षापासून गंभीर मूत्रपिंडविकाराने त्रस्त होती, असेही दोन्ही रुग्णालयांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचेही कळविण्यात आले आहे.

बारा वेळा होऊ शकले नाही हृदयदान

१५ जानेवारी २०१६ रोजी शहरात पहिल्यांदा ऐतिहासिक अवयवदान झाले आणि त्यानंतर आतापर्यंत मराठवाड्यात २१ दात्यांकडून निरनिरा‍ळ्या ६८ अवयवांचे दान झाले. मात्र यामध्ये केवळ ९ वेळा म्हणजे निम्म्यापेक्षा कमी वेळेला हृदयाचे दान होऊ शकले. याचाच अर्थ १२ वेळा हृदयाचे दान होऊ शकले नाही आणि याला एअर अॅब्युलन्स उपलब्ध न होणे हे एक अतिशय महत्त्वाचे कारण ठरले. मुळात अवयवदानाच्या शस्त्रक्रियेनंतर (रिट्रायव्हल) केवळ चार ते साडेचार तासांत हृदयाचे प्रत्यारोपण सुरू होणे आवश्यक असते. त्यामुळेच हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी एअर अॅम्बुलन्सशिवाय पर्याय राहात नाही आणि एअर अॅब्युलन्सचा खर्च कित्येक लाखांमध्ये असतो आणि तो प्रत्येकवेळी शक्य होईल असे नाही. त्यामुळे राज्य किंवा केंद्र सरकारने अवयवदानासाठी स्वतंत्र एअर अॅब्युलन्सची सोय केली पाहिजे, असे मत माणिक हॉस्पिटलचे संचालक डॉ. उल्हास कोंडपल्ले यांनी व्यक्त केले.

शहरात आता पाच ट्रान्स्प्लान्ट सेंटर झाले आहेत, तर केवळ अवयवदानाच्या शस्त्रक्रियेसाठी एक 'एनटीओआरसी' सेंटरही सज्ज झाले आहे. आणखी एक हॉस्पिटल हे 'एनटीओआरसी' सेंटर होणार असून, त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अवयवदानासाठी काहीसे सकारात्मक वातावरण तयार होत आहे, ही आशादायी बाब म्हटली पाहिजे. - डॉ. सुधीर कुलकर्णी, झेडटीसीसी अध्यक्ष

प्रसूतीपश्चात मेंदूत रक्त गोठण्याची प्रक्रिया होऊ शकते. त्याला 'कोर्टिकल व्हिनस थ्रोंबोसिस' म्हटले जाते. मात्र योग्य वेळी प्रसूतीपूर्व तपासणी केली व सर्व प्रकारची खबरदारी बाळगून उपचार अचूकपणे घेतले तर अशा अधिकाधिक रुग्णांना वाचवता येऊ शकते. 'नॉर्मल' केसेसमध्ये एक हजारात एक, तर 'हाय रिस्क' केसेसमध्ये शंभरात एखादी अशी केस असू शकते. - डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास ठप्प; भाजप आमदाराला मारहाण

$
0
0

बीड :

बीड जिल्ह्यातील माजलगाव माजलगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे.

देशमुख राजेवाडी येथील एका कार्यक्रमावरून परतत असताना “चार वर्षात विकास कामे का केली नाहीत” असा जाब विचारत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांना गाडीतून बाहेर खेचून मारहाण केली. यावेळी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला देखील मारहाण करून त्याचा मोबाइल हल्लेखोरांनी फोडला. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. अखेर पोलिसांच्या गाडीतून त्यांना पोलीस संरक्षणात रवाना करण्यात आले.

65504010

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० टक्के मराठवाडा कोरडाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आठवड्याभरात दोन वेळेस दमदार पावसाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना दमदार पावसाने धुऊन काढले असले, तरी अद्यापही ३० टक्के मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आठ जिल्ह्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी तब्बल १२५ मंडळांमध्ये अपेक्षित सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे.

यंदा जूनमध्ये वेळेवर सुरू झालेल्या पावसाने जुलै महिन्यात दडी मारली. पावसाळ्याच्या अडीच महिन्यांनंतरही आतापर्यंत नांदेड आणि हिंगोली वगळता इतर एकाही जिल्ह्याने पावसाची अपेक्षित सरासरी गाठली नाही. दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मराठवाड्यात तब्बल महिन्याभराच्या खंडानंतर १६ आणि २० ऑगस्ट रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे दुष्काळाचे संकट तूर्त टळले आहे. प्रारंभी लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत दमदार सरी बरसल्या. अने‌क ठिकाणी अतिवृष्टीही झाली. जुलै महिन्यामध्ये लातूर, उस्मानाबादसह काही प्रमाणात परभणी, बीड, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत मोठा पाऊस झाला, मात्र हा पाऊस पुरेसा ठरला नाही. एकीकडे निम्म्या मराठवाड्यात दमदार पाऊस होत असताना औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले होते, मात्र आता ‌ऑगस्ट महिन्यातील पावसानंतर चित्र पालटले असून, आता औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत पावसाने जोरदार कमबॅक केले आहे, मात्र लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील गावांना आता मोठ्या पावसाची गरज असल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यात जून महिन्यामध्ये १६, जुलैमध्ये १३, तर ऑगस्ट महिन्याच्या २२ दिवसांपैकी केवळ आठ दिवसच पाऊस झाला आहे. दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, खुलताबाद, जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बीड जिल्ह्यातील गेवराई, शिरूर कासार, धारूर आणि परळी, लातूर जिल्ह्यातील जळकोट, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा, भूम व परंडा तालुक्यांमधील अनेक गावांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्हानिहाय पाऊस

जिल्हा.................आतापर्यंत पाऊस............. वार्षिक टक्केवारी

औरंगाबाद..................७९.८२............................४९.३८

जालना......................९३.७१............................५८.३६

परभणी......................९२.९७............................५७.८३

हिंगोली......................१०७.०५.........................७२.६०

नांदेड........................११४.६९.........................७३.६९

बीड..........................७७.६७..........................४५.१८

लातूर........................९५.६६...........................५६.४३

उस्मानाबाद................८१.५९...........................४८.५६

एकूण.......................९४.७१...........................५८.८३

(पाऊस टक्केवारीमध्ये, २२ ऑगस्टपर्यंत)

मंडळनिहाय पाऊस

५ टक्क्यांपेक्षा कमी : १

२५ ते ५० टक्के : १७

५० ते ७५ टक्के : १०७

७५ ते १०० टक्के : १३२

१०० टक्क्यांपेक्षा अधिक : १६४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालखेड’चे पाणी ‘नारंगी’त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून सोडलेले ओव्हर-फ्लोचे पाणी नारंगी तलावात पोचले. नारंगी तलावात पाणी पोचल्यानंतर जलपूजन करण्यात आले. वैजापूर शहरासह परिसरातील दहा ते पंधरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सोबत सिंचनासाठीही नारंगीच्या पाण्याचा फायदा होणार असल्याने नांदगाव, चांडगाव, पानवसह अन्य गावातील शेतकरी आनंदीत झाले आहेत.

जलपूजन कार्यक्रमाला गुलाबगिरी महाराज, कॅप्टन जवाहर कोठारी, सुधाकर डगळे, प्रभाकर गुंजाळ, संदिप गायकवाड, मंजाहरी गाढे, गोविंद गायकवाड, नगरसेवक गणेश खैरे, मोहन साळुंके, नारायण कवडे, ज्ञानेश्वर इंगळे, शंकर मुळे, आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, भाजपचे नेते मोहन आहेर व पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारंगी धरण कोरडे पडले होते, मात्र पालखेडची आवक वाढल्याने धरणाच्या मृतसाठ्यात वाढ होऊन त्याचा फायदा शहरवासीयांना होणार आहे. वैजापूर तालुक्यातील मन्याड व कोल्ही हे दोन मध्यम प्रकल्प वगळता अन्य सर्व प्रकल्प पुरेसा पाऊस न झाल्याने कोरडे पडले होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी प्रकल्पात पाण्याचा थेंब नसल्याने पालखेडचे पाणी डाव्या कालव्याद्वारे सोडण्यासाठी या भागातील रहिवासी व भाजपचे जिल्हा सरचिटणिस मोहन आहेर यांनी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष जाधव व माजी नगराध्यक्ष डॉ. परदेशी यांना सोबत घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पालखेडचे पाणी नारंगीत सोडण्यासाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

गेल्या महिन्याभरापासून पालखेड धरणाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे येवला तालुक्यातील गावांना पुरवले जात होते, मात्र नारंगीत पाणी सोडण्यात न आल्याने वैजापूर तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याचे आहेर यांच्या शिष्टमंडळाने शासनाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती आहेर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिपाइं डेमोक्रॅटिकची उद्या राज्य बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाची राज्यस्तरीय बैठक मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे येत्या शुक्रवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी दिली.

पक्षाचे तीन ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. त्याची तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुकांची तयारी, पक्षाची संघटनात्मक बांधणी, शेतकरी कर्जमाफी, गायरान व वन खात्याच्या जमिनी कसणऱ्याच्या नावे करा, आरक्षण प्रश्न यासह अन्य विषयांवर बैठकीत चर्चा करून पुढील भूमिका घेण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले. या बैठकीला राज्यातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या चर्चेतून पक्षाला नवीन उर्जा मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांचे इंसेटिव्हचे कोट्यवधी थकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा विभागात उद्योग उभारताना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने सबसिडी (इंसेटिव्ह) योजना जाहीर केली. दोन टप्प्यात जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घेताना अनेक उद्योगांनी विस्तार केला. मशीन तसेच पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीवर लाभ दिला जातो. मात्र काही वर्षांपासून ही रक्कमच मिळत नसल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत.

राज्य सरकारच्या उद्योग विभागाने मराठवाड्यात उद्योगांचा विस्तार वाढावा, यासाठी २००७ मध्ये पॅकेज स्किम ऑफ इंसेटिव्ह ही योजना जाहीर केली. त्यानुसार उद्योग थाटल्यानंतर त्यांनी पायाभूत सुविधा व मशीनरीसाठी जी गुंतवणूक केली आहे त्यावर ८० टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्याचे जाहीर केले. दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने याचा परतावा देण्याचे योजनेत जाहीर केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये ही योजना जाहीर केली गेली. उद्योगांनी दरवर्षी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज दाखल केले की स्थानिक पातळीवर त्याची मंजुरी देऊन हा प्रस्ताव मुंबईला अंतिम मंजुरीसाठी पाठविला जातो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षांपासून या योजनेंतर्गत बोटावर मोजण्याइतकेच प्रस्ताव मंजूर करण्यात आले. अनेक उद्योगांनी वारंवार पाठपुरावा करून सबसिडी मिळण्याबाबत मागणी केली, पण त्यासाठी स्थानिक कार्यालयातील यंत्रणा आजवर कमी पडल्याचे या सूत्रांनी सांगितले. हे प्रमाण अत्यंत हळू असल्याबद्दल उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर उपाययोजना म्हणून काही महिन्यांपूर्वी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ) सभागृहात कँपचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १८ उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काही उद्योगांची ५ ते ३५ लाखापर्यंतची सबसिडी मिळणे बाकी आहे. सातत्याने असे कँप आयोजित करण्याबाबत स्थानिक कार्यालयाने सकारात्मकता दाखविली होती.

दरम्यान, पूर्वी सादर केलेल्या काही प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळल्याने ते प्रस्ताव बाजूला ठेवले गेले. २००७ मध्ये सादर केलेले प्रस्ताव ऑफलाइन होते. २०१३ मध्ये ऑनलाइन प्रस्ताव सादर केले गेले. आता जुनी देणी देताना वेळेची मर्यादा पाहिली गेली तर अनेक उद्योगांची रक्कम कापून घेतली जाण्याची भीती आहे. या सर्व अडचणींवर वरिष्ठ कार्यालयाने दखल घ्यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

'मराठवाड्यात उद्योगांच्या वाढीसाठी जाहीर केलेल्या योजनांचा लाभ त्वरित देणे आवश्यक आहे. लघुउद्योजकांची विशेष अडचण आहे. सरकारने याची दखल घेतली तर निश्चितपणे उद्योजकांना फायदा होणार आहे.'

-किशोर राठी, अध्यक्ष मासिआ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विभागात पावणेपाचशे जागा रिकाम्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कामाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असतानाच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागाचा आलेख भरती प्रक्रिया केली जात नसल्याचे वाढत जात असल्याचे चित्र कृषी विभागात आहे. औरंगाबाद कृषी सहसंचालक विभागात तब्बल पावणेपाचशे जागा रिक्त असून, परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे काही कर्मचाऱ्यांना मर्जीप्रमाणे प्रतिनियुक्ती देण्यात आल्या होत्या. हा प्रकार आयुक्ताच्या लक्षात येताच त्यांनी प्रतिनियुक्त्याचे आदेश रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबासह, जालना, बीड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यासह एकूण एक हजार ८१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पदे या जिल्ह्यासाठी मंजूर आहेत, पण त्यापैकी केवळ एक हजार ३४० पदे भरण्यात आली असून, ४७४ पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने कृषी सहायकांची २०६, कार्यालयीन लिपिकांची १७४, तालुका कृषी अधिकाऱ्यांची २२ व कृषी पर्यवेक्षकांची ४१ पदे रिक्त आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. रिक्त पदामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर बोजा पडत असून, रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, एकीकडे अनेक पदे रिक्त असतानाच काही कर्मचाऱ्यांना बदलीच्या नावाखाली मर्जीप्रमाणे औरंगाबाद कार्यालयात प्रतिनियुक्त्या देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. विभागीय कृषी सहायक संचालक कार्यालयांतर्गत काही महिन्यापूर्वी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात ३४ जणांची औरंगाबाद कार्यालयात बदली करण्यात आली होती. यात अनियमितता झाल्याची ओरड काहींनी केली होती. राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यात ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. आयुक्तांनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रतिनियुक्तीचे आदेश रद्द केलेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकर विभागाची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील एक प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक; तसेच उद्योग समूहाच्या कार्यालयावर मंगळवारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पथकाची पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरु होती. कारवाईबाबत कमालीची गोपनियता बाळगली जात असून, पथकाच्या हाती कोणते महत्त्वाचे दस्ताऐवज लागले, यासंदर्भात कोणताही तपशील समजू शकला नाही.

अदालत रोडवर असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकासह अन्य एका बड्या उद्योग समूहाच्या कार्यालयात हा छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नगर, नाशिकसह औरंगाबादेतील प्राप्तिकर विभागाचे २५हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. मंगळवारी सकाळी आठपासून संबंधित कार्यायातील सर्व व्यवहारासंबंधी कागदपत्रे, दस्तावेज यांची तपासणी केली जात असल्याचे समजते.

पथकाने मागणी केल्याप्रमाणे या कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून, पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नाही. या कारवाईसंदर्भात बोलण्यास प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने ही नियमित तपासणी आहे किंवा काय? हे समजू शकले नाही. दरम्यान, अन्य एका बांधकाम व्यावसायिकावर; तसेच एका आइल कंपनीच्या मालकावर कारवाई झाल्याचीही चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुंडकर फळ योजनेसाठी ५० हजार अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तब्बल ५० हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत, अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली.

राज्यात १९९०पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविल्यामुळे सुमारे १६ लाख हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आलेले आहे. केंद्र सरकारने २००५पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केल्यानंतर त्यातून राज्य सरकारने फळबाग लागवडीसाठी अर्थसाह्य देण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जॉब कार्डधारक अल्प व अत्यअल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीसाठी दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. केवळ जॉब कार्ड नसल्याने अनेक शेतकरी योजनेसाठी पात्र ठरत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन अशा शेतकऱ्यांसाठी नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय २० जून २०१८ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फळबाग लागवड योजना या खरीप हंगामापासून सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ मिळावा यासाठी औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून १५ हजार १२७, बीड जिल्ह्यातून दहा हजार ७७७, तर जालन्यातून २४ हजार १२७ असे एकूण ५० हजार ७९ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

\Bअनुदान वितरण तीन वर्षांत\B

आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंचेच्या विकसित जाती, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजिर, नारळ रोपे बाणावली, नार‌ळ रोपे टी-डी आदी फळ लागवडीचा समावेश या योजनेत आहेत. फळबाग लागवडीसाठी तीन वर्षांच्या कालावधीत प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षी अनुक्रमे ५०, ३० आणि २० टक्के अर्थसाह्य दिले जाते. फळबाग लागवडीसाठी कोकणात कमाल दहा, तर उर्वरित महाराष्ट्रात कमाल सहा हेक्टरपर्यंत लाभ दिला जातो. दरम्यान, आलेल्या अर्जाची छाननी करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images