Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लाचखोर हवालदाराचा जामीन अर्ज फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी १५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेला बिकडीन पोलिस ठाण्याचा पोलिस हवालदार राजेंद्र धन्नू कीर्तीकर याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. गोसावी यांनी गुरुवारी (२३ ऑगस्ट) फेटाळला.

याप्रकरणी एका व्यापाऱ्याने फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये भांडण झाले होते व दोन्ही पक्षांविरुद्ध बिडकीन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. यात फिर्यादीची आई, बहीण, भाचा आदींवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी आरोपी व पोलिस हवालदार राजेंद्र धन्नू कीर्तीकर (५३) याने फिर्यादीला दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर लाचेची रक्कम १५०० रुपये ठरली होती.

याप्रकरणी फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने सापळा रचला होता आणि १५०० रुपयांची लाच स्वीकारताना बिडकीन पोलिस ठाण्यामध्ये आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी आरोपीला १९ ऑगस्ट रोजी अटक होऊन त्याची आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, कोर्टाने तो गुरुवारी फेटाळला. सहाय्यक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वरूड काजी येथे जनावरांची अवैध कत्तल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीतील वरूड काजी येथे अवैधरित्या गोवंशाची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. चिकलठाणा पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. यावेळी कत्तल करणारे तीन आरोपी पसार झाले असून, मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरूड काजी येथे संशयित आरोपी संशयित आरोपी नासेर मन्नू कुरेशी, रऊफ कुरेशी व फकीर महम्मद कुरेशी (सर्व रा. वरूड काजी) हे गुरुवारी सकाळी गोवंशाची बेकायदा कत्तल करीत असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्याचे एपीआय सत्यजीत ताईतवाले व पथकाने या ठिकाणी छापा मारला. यावेळी बैलांची कत्तल केलेले मास, मृतदेह, कत्तलीचे साहित्य व एक अॅपेरिक्षा आदी मुद्देमाल पोलिसांना आढळला. पोलिसांना पाहून कत्तल करणारे तिन्ही आरोपी पसार झाले.

याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात जमादार दिनकर थोरे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी सरंक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर, डीवायएसपी अशोक आमले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सत्यजीत ताईतवाले, पीएसआय संदीप सोळुंके, गोपाळ देशमुख, दिनकर थोरे, बादलसिंग कवाल, लहू थोटे, सोपान डकले, सुनील गोरे, भाऊसाहेब ठोकळ, दीपक इंगळे, रमेश खरात, सचिन जाधव, दिनेश पांढरे, राजू गुंजाळ, संतोष टिमकीकर व पशू वैद्यकीय अधिकारी बनसोडे यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल योजनेच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरकुल योजनेमध्ये घर बांधून देतो, असे सांगत तरुणाची ११ लाखांची फसवणूक करण्यात आली. जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१७ यादरम्यान ब्रिजवाडी भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणूक व अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र जनार्धन जाधव (वय ३३, रा. ब्रिजवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. यामध्ये जाधव यांना तिघांनी घरकुल योजनेत पक्के घर बांधून देतो, असे सांगत शंभर रुपयांच्या बाँडपेपरवर एशियन कंन्स्ट्रक्शनच्या नावाने करारनामा करून घेतला. यानंतर या योजनेसाठी मंजूर झालेले नऊ लाख पाच हजारांची रक्कम स्वत: ठेवून घेतली. या रक्कमे व्यतिरिक्त एक लाख ९५ हजारांची रक्कम त्यांनी जाधव यांच्याकडून घेतली. दोन महिन्यांत घराचे काम पूर्ण करतो, असे आश्वासन जाधव याना देण्यात आले.

दहा महिने उलटल्यानंतरही जाधव यांच्या घराचे काम अर्धवटच राहिले. जाधव यानी त्यांना विचारणा केली असता जाधव व त्यांच्या आईला अश्लील शिवीगाळ करीत हातपाय तोडण्याची धमकी आरोपींनी दिली. याप्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी काझी नूर मोहियोद्दिन (वय ५०), काझी गोहर मोहियोद्दिन (वय ४५) आणि सय्यद रफीकलाल (वय ५३, सर्व रा. आरेफ कॉलनी, टाउन हॉल) यांच्याविरुद्ध फसवणूक व अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक आयुक्त गुणाजी सावंत तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील कंत्राटी कामगारांची निदर्शने

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेळेत व पूर्ण वेतन मिळत नाही, भविष्य निर्वाह निधी जमा केला जात नाही, बँकेत वेतन न होता केवळ रोख पाच हजार रुपये वेतन दिले जाते आदी तक्रारी करीत घाटीतील सुमारे ६० कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (२३ ऑगस्ट) घाटी परिसरात निदर्शने केली. तसेच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

करारात नमूद केलेले कोणतेही नियम ठेकेदाराकडून पाळले जात नाहीत. कामगारांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा न होता रोख पाच हजार रुपये एवढेच वेतन दिले जाते. तसेच कामगारांकडून कोऱ्या चेकवर, बॉन्डपेपरवर सह्या व अंगठे घेतले जातात. याविरुद्ध कोणी आवाज उठविला तर त्याला कामावरुन काढले जाते. कामगारांना पीएफ, इएसआयसी आदींच्या सुविधा दिल्या जात नाहीत. या प्रकरणी २८ जून २०१८ रोजी कामगार आयुक्‍तांनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही कंत्राटी कामगारांनी निवेदनावर केली आहे. या निवेदनावर सर्व कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासंदर्भात, संबंधित कंत्राटदाराला काही दिवसांपूर्वी ७ लाख ९९ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आलेला आहे. त्यामुळ‍े कामगारांना त्यांचे वेतन लवकरच मिळेल. अर्थात, वेतनाची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची आहे. या विषयी कामगारांची समजूत काढल्यानंतर सर्व कामगार कामावर रुजू झाले, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्स्टाग्रामवर तरुणीचे अश्लील फोटो अपलोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर तरुणीचे बनावट खाते उघडून तिचे अश्लील फोटो अपलोड केल्याचा प्रकार १६ ते २६ जून दरम्यान घडला. याप्रकरणी सायबर सेलच्या पथकाने जालना येथील सीए करणारा मोहित मुरली मनोहर जाखोटिया याला अटक केली आहे.

सिडको भागातील तेवीस वर्षांच्या विद्यार्थिनीचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. १६ जून रोजी तिच्या अकाउंटवर एका दुसऱ्या अकाऊंटवरून अश्लील मेसेज येत होते. त्यामुळे तरुणीने हे अकाउंट ब्लॉक केले. यानंतर दुसऱ्या अकाउंटवरून तरुणीला अश्लील स्वरुपाचे मेसेज सातत्याने येऊ लागले. या तरुणीने हे अकाउंट चेक केले असता, तिच्या नातेवाईकाचा मोबाइल क्रमांक वापरून हे बनावट अकाउंट बनावट उघडल्याचे समजले. याप्रकरणी तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तांत्रिक पुराव्याआधारे मोहित मुरली मनोहर जाखोटिया (वय २३, मूळ रा. रधम सेंटर, कॅनाल रोड, वन टाऊन, आंध्रप्रदेश) याला जालना येथील महिको कॉलनीतून अटक केली. ही कामगिरी सायबर सेलचे पीएसआय हेमंत तोडकर, जमादार संजयकुमार साबळे, धुडकू खरे, विवेक औटी, नितीन देशमुख व गोकुळ कुत्तरवाडे यांनी केली.… दरम्यान, जाखोटियाला गुरुवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीच्या इस्टाग्राम अकाउंटची माहिती घेणे बाकी आहे. त्यामुळे पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सरकारी पक्षाने केली. ही विनंती मान्य करून आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद चाळीसगाव रेल्वे मार्गाची मागणी

0
0

औरंगाबाद : औरंगाबाद - कन्नड - चाळीसगाव रेल्वे मार्ग टाकण्यासंदर्भात गुरुवारी वाणी मंगल कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये कन्नड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२च्या विस्तारीकरणाबाबत चर्चा झाली.

बैठकीला नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, चंद्रकांत मेने, गटनेते संतोष कोल्हे, किशोर पवार, संजय खंबायते, डॉ. सीताराम जाधव, वर्धमान जैन, राजेंद्र गव्हाणे, प्रा. आर.जी. लहाने, गोपीनाथ वाघ, अॅड. सावकारे, डॉ. गव्हाणे, पांडुरंग घुगे, युवराज बनकर, रवींद्र राठोड, दीपक ताठे, संदीप बागुल, प्रणव पाटील, प्रवीण आहेरराव, जितेंद्र नरवडे यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांच्या उपस्थितीत मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तर भारताशी जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रेल्वे मार्गासाठी कन्नड येथील नागरिक लोकवर्गणीचा हिस्सा देखील देण्यास तयार असून, मराठवाडा विकास मंडळाच्या वतीने रेल्वे मार्गाची मागणी करावी अशी विनंती करण्यात आली. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना भेटून आपण मागणी मान्य करून घेऊ, असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात किलोमीटरचा मृत्यूचा सापळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

…बीड बायपास रोडवरील देवळाई चौक ते लिंक रोड हा मार्ग दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा मार्ग ठरत आहे. हा सात किलोमीटर अंतराचा मार्ग आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बीड बायपासवरील अवजड वाहनांची वाहतूक दिवसा बंद केली होती. यामुळे अपघाताचे प्रमाण बरेच कमी झाले होते, मात्र ही बंदी उठवल्यामुळे पुन्हा या मार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.

…गेल्या काही महिन्यांपासून अपघातांमुळे बीड बायपास रोड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या रस्त्यावर २०१८मध्ये अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली, मात्र बायपासलगत 'सर्व्हिस रोड' करण्याचे काम सुरू झालेले नाही. एमआयटी महाविद्यालयासमोरील बाजूला बायपासलगत सर्व्हिस रोड आहे. अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर सर्व्हिस रोडची मागणी जोरकसपणे करण्यात आली, मात्र मालमत्तांचे संपादन, अतिक्रमणे हटविणे ही कामे महापालिकेने केलेली नाहीत. त्यामुळे सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे बीड बायपासवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्याची तूर्त चिन्हे नाहीत.

\Bलिंक रोडमुळे वाहनांच्या संख्येत वाढ\B

बीड बायपास रोडवर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. दोन वर्षांपूर्वी पैठण रोडला अहमदनगरकडे जाणारा लिंक रोड जोडण्यात आला. यामुळे मार्गावर वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या जास्तीच्या वाहनांचा भार बीड बायपास रोडवर आला. वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षभरात या रोडवर अपघाताच्या संख्येत वाढ झाली असल्याचे दिसत आहे.

\Bसात किलोमीटर धोकादायक

\Bबीड बायपासवर आतापर्यत झालेल्या अपघातामध्ये वाहधारकाचा मृत्यू झाल्याच्या घटना देवळाई चौक ते महानुभाव आश्रम चौक या पाच किलोमीटरच्या मार्गावर घडले आहेत. आता लिंक रोड जोडल्यामुळे महानुभाव आश्रम चौकाच्या पुढचा दोन किलोमीटरचा मार्ग देखील धोकादायक ठरत आहे.

\Bतत्कालीन पोलिस आयुक्तांची यशस्वी चाचणी\B

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पदभार घेतल्यानंतर बीड बायपास रोडवरील अपघातबाबत गांर्भीयाने मनावर घेतले होते. अपघाताचे मुख्य कारण असलेल्या अवजड वाहनांवर अंकुश ठेवल्यास प्राणांतिक अपघात कमी होतील, असे त्यांच्या लक्षात आले. दिवसा अवजड वाहनांची वाहतूकच त्यांनी सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी बंद ठेवली. याचा चांगलाच परिणाम जाणवून आला. अपघाताच्या संख्येमध्ये २०१५ आणि २०१६ या कालावधीत अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येते.

\Bचार वर्षांतील अपघाती मृत्यू\B

पोलिस आयुक्त अमितेशकुमार असताना त्यांनी अवजड वाहतूक बंद केली होती. त्यांच्या कार्यकाळात अपघातात २०१५मध्ये सहा, तर २०१६मध्ये आठ बळी गेले. त्यांच्या बदलीनंतर अवजड वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू झाली. त्यानंतर २०१७मध्ये या मार्गावर अपघातात तब्बल १७ बळी गेलेले आहेत.

वर्ष.........अपघातातील मृत्यू

२०१५...........६

२०१६...........८

२०१७...........१७

२०१८...........९

(ऑगस्टपर्यंत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठ्यासाठी प्रशासकीय सल्लागाराच्या नियुक्तीला ‘स्थायी’ ची मंजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचा पाणी पुरवठा सुधारण्यासाठी प्रशासकीय सल्लागार नियुक्त करण्याच्या महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने गुरूवारी मंजुरी दिली. नांदेड महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केलेले रत्नाकर वाघमारे यांची प्रशासकीय सल्लागार म्हणून आता नियुक्ती केली जाणार आहे.

औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी ५६ आणि १०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या दोन मुख्य योजना तयार करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून पाणी उचल करून पाणी पुरवठा केला जातो. उचल केले जाणारे पाणी लोकसंख्येच्या प्रमाणात तोकडे आहे. शहराच्या १५ लाख लोकसंख्येसाठी मागणी व अत्यंत कमी उपलब्धता, अपुऱ्या जलकुंभांमुळे असलेली कमी साठवण क्षमता यामुळे ६० ते ७० टक्के परिसराला बायपासव्दारे पाणी पुरवठा होतो. त्याचा परिणाम म्हणून सहर व सिडको परिसराच्या पाणी वितरणामध्ये असमतोल व विस्कळीतपणा निर्माण होतो. या बाबी लक्षात घेता पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासकीय तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला. त्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवण्यात आले. नांदेड येथील रत्नाकर वाघमारे आणि पुणे येथील युनिटी आय.ई. वर्ल्डचे संचालक महेश पाठक या दोघांनी प्रतिसाद दिला. २० ऑगस्ट रोजी झालेल्या मुलाखतीस हे दोघेही उपस्थित राहिले. त्यापैकी वाघमारे यांची निवड करण्यात आली. वाघमारे यांना ७५ हजार रुपये मानधन सर्व करासह देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडला होता. त्याला मंजुरी देण्यात आली. शिवसेनेच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी मानधनाबद्दल आक्षेप घेतला. मानधन कमी करता येते का याचा विचार झाला पाहिजे, असे त्या म्हणाल्या, यावर सभापती रेणुकादास वैद्य यांनी मानधना संदर्भात आयुक्तांनी वाटाघाटी करून स्वत:च्या अधिकारात निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.

'त्या' कर्मचाऱ्यांनी वसुलीचेच काम करावे

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी खासगी एजन्सीच्या मार्फत काही कर्मचारी कंत्राटी पध्दतीने नियुक्त केले आहेत. परंतु त्यांच्यापैकी अनेकजण विविध विभागात लिपिकाचे किंवा सहाय्यकाचे काम करतात. ज्या कारणासाठी त्यांना कंत्राटी पध्दतीवर महापालिकेत नियुक्त करण्यात आले आहे, तेच काम त्या कर्मचाऱ्यांनी केले पाहिजे अशी मागणी शिल्पाराणी वाडकर यांनी केली. सभापतींनी देखील प्रशासनाला तसे आदेश दिले. मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे वसुलीसाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांकडून वसुलीचेच काम करून घ्या, असे ते म्हणाले.

रेकॉर्डब्रेक वेळेत संपली बैठक

स्थायी समितीची बैठक गुरूवारी रेकॉर्डब्रेक वेळेत संपली. दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी बैठक सुरू झाली आणि चार वाजून बारा मिनिटांनी बैठक संपली. स्मार्टसिटी प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बैठक आयोजित केली आहे, त्यामुळे स्थायी समितीची बैठक लवकर संपवत आहोत असे सभापती म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हर्सूलकरांनी कचऱ्याने भरलेल्या गाड्या परत पाठवल्या प्रक्रिया केंद्राची जागा बदलण्याची मागणी

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ओला आणि सुका कचरा एकत्र आणला जात असल्यामुळे व त्यापासून दुर्गंधी निर्माण होत असल्यामुळे हर्सूलमधील नागरिकांनी कचऱ्याने भरलेल्या गाड्या परत पाठवल्या. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जागा बदला अशी मागणी त्यांनी केली आहे.

हर्सूल परिसरात सावंगी तलावाच्या पायथ्याशी संनियंत्रण समितीने कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा निश्चित केली आहे. या जागेवर महापालिकेतर्फे कचरा आणून टाकण्यात येत आहे. या जागेवर केवल ओला कचरा आणून त्यावर प्रक्रिया केली जाईल, असे नागरिकांना सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्षात ओला आणि सुका कचरा एकत्र करून त्या जागेवर आणला जात आहे. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून कचऱ्यातून निघणाऱ्या घाण पाण्यामुळे भूगर्भातील पाणी दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूगर्भातील पाणी विहिरींमध्ये व बोअरमध्ये जात असल्यामुळे ते पाणी देखील दूषित होत आहे, असा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे म्हणत नागिरकांनी गुरुवारी कचऱ्याने भरलेल्या गाड्या अडविल्या आणि त्या परत पाठवल्या. अय्युब पटेल, सय्यद पटेल, इरफान पटेल यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. कचऱ्यातून निघणारे घाण पाणी नहरींच्या पाण्यात आणि विहिरींच्या पाण्यात मिसळत असल्याचा आरोप या सर्वांनी केला आहे. कचरा टाकण्यात येतो त्यापासून जवळच फुलेनगर आहे. तीन विहिरींचे पाणी एका विहिरीत घेऊन ते फुलेनगरला दिले जाते. विहिरीचेच पाणी दूषित होत असल्यामुळे नागरिकांना चांगले पाणी कसे मिळणार, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जी जागा निश्चत करण्यात आली आहे ती जागा बदलावी, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. संनियंत्रण समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी या ठिकाणाला भेट द्यावी म्हणजे त्यांना वस्तूस्थिती लक्षात येईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजपेयी यांच्या अस्थीकलश दर्शनासाठी रिघ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे दर्शनासाठी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी रिघ लागली होती. दर्शन घेताना अनेकांना अश्रू आवरता आले नाही. 'अटलजींसारखा नेता पुन्हा होणे नाही', अशा भावना याप्रसंगी अनेकांनी व्यक्त केल्या.

दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी सकाळी ८ वाजेदरम्यान उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला. देशभरातील कोट्यवधी लोकांना अटलजींबद्दल प्रेम, आपुलकी, आस्था, जिव्हाळा होता. त्या प्रत्येक व्यक्तीला अटलजीच्या अतिंम दर्शनासाठी दिल्ली येथे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे अटलजींच्या अस्थीकलशाचे अंतिम दर्शन घेता यावे, तसेच नदी संगमावर अस्थी विसर्जन व्हावे, असे नियोजन भाजपकडून करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मुंबईहून हा अस्थीकलश भाजप कार्यकर्त्यांनी आणला होता.

वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन व्हावे, यासाठी पहाटेपासूनच कार्यकर्त्यांसह नागरिकांनी येथील कार्यालय परिसरात गर्दी केली होती. महापौर नंदकुमार घोडले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीष चव्हाण, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार भाऊसाहेब थोरात, रामभाऊ गांवडे, संघटक भाऊराव देशमुख, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शिवसेना नेते प्रदीप जैस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, बाल हक्क व संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, अनिल मकरिये, बाळासाहेब गायकवाड, कचरु घोडके, मनोज पांगारकर, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी मंत्री नामदेव गाडेकर, प्रा. राम बुधवंत, सुधीर नाईक, सुरेंद्र कुलकर्णी आदी नेत्यांसह विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

आज नांदेडमध्ये

येथील भाजप कार्यालयात अस्थीकलश अकरा वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर सजविलेल्या रथातून अस्थीकलश जालना शहर व तेथून पुढे नेण्यात आला. आज (२४ ऑगस्ट) नांदेड शहरामध्ये नागरिकांसाठी अस्थीकलश अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर गोदावरी नदीच्या घाटावर अस्थीकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष तनवाणी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकर विभागाचे देशभरात ८० ठिकाणी छापे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील एक प्रतिष्ठित उद्योग समूह, एक बांधकाम व्यावसायिकासह एका आइल उद्योजक व त्यांच्याशी संबंधित असलेले कार्यालय, संस्था अशांवर प्राप्तिकर विभागातर्फे कारवाई सुरू असून, देशभरात एकूण देशभरात ८० ठिकाणी तपास केला जात आहे. औरंगाबाद, मुंबई, जयपूर, हैदराबाद, खामगावसह दहा शहरात एकाच वेळी ही कारवाई सुरू असून, या 'सर्च अँड सर्व्हे ऑपरेशन'साठी पथकामध्ये ३००हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली. अघोषित संपत्तीच्या संशयावरून प्राप्तिकर विभागानने ही कारवाई सुरू असल्याचे समजते.

अघोषित संपत्तीच्या शोधसाठी, करचुकवेगिरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी प्राप्तिकर विभागाने पुन्हा एकवार कंबर कसली आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी बीड बायपास येथे कारवाई केल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून प्राप्तिकर विभागाने शहरातील अदालत रोड, अपना बाजार, बन्सीलाल नगर यासह एकूण १५ ठिकाणी छापे टाकले. शहरातील एका प्रतिष्ठित उद्योग समूह, एक प्रख्यात बांधकाम व्यावसायिकासह ऑइल उद्योजक यांचे कार्यालयासह संबंधित संस्था, निवासस्थाने आदी ठिकाणी तपास केला जात आहे. औरंगाबादेतील कारवाईसाठी नगर, औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणाचे १००हून अधिक अधिकारी,कर्मचारी सहभागी झाले आहेत. या उद्योगपती, बिल्डर यांच्याशी संबंधित मुंबई, सूरत, हैदराबाद, पुणे, रत्नागिरी, खामगाव, हिंगोली, जयपूर आदी दहा शहरांत एकूण ८० ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. या तपास पथकात ३००हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

\Bअहवाल चार महिन्यांनंतर\B

बेहिशोबी मालमत्तेच्या संशयावरून ही कारवाई केली जात असून अहवालासाठी आणखीन तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागले, असेही सूत्रांनी नमूद केले. दरम्यान, कोण-कोणत्या उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई सुरू आहे. तपासात महत्वाचे कोणते दस्तावेज सापडले, रोकड काही जप्त केली आहे किंवा नाही याबाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामु‌ळे तपशील समजू शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध विक्रेत्याने दिली सात लाखांची औषधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातील औषध विक्रेत्याने मदतीचा हात पुढे करत सात लाख रुपयांची औषधी पाठविली आहे. औरंगपुऱ्यातील आशा ट्रेडर्सचे मालक हरिशचंद्र मित्तल यांनी गुरुवारी ही औषधी शिव अर्थ फाऊडेशनकडे सुपूर्द केली.

केरळमध्ये आलेल्या पूर आता ओसरत आला असून आता रोगराईची पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बाब लक्षात घेत औषध विक्रेता मित्तल परिवाराने सामाजिक दातृत्व दाखवत संसर्जजन्य रोगांवर लागणाऱ्या तसेच अँटी बायोटिकसह विविध प्रकारची सात लाख रुपयांची औषधी केरळ पुरग्रस्तांसाठी दिली. एफडीएचे सहायक आयुक्त संजय काळे, औषध निरीक्षक राजगोपाळ बजाज, निखिल मित्तल, दीपिका, निर्मला, नीलेश मित्तल, आशिष अग्रवाल, नितीन भरुका आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबांना मदत द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी औरंगाबादसह मराठवाड्यात तसेच राज्यामध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या. आत्महत्यांच्या प्रत्येक प्रकरणांमध्ये कुटुंबियांना १० लाख रुपये तसेच एका सदस्याला शासकीय नोकरीचे पत्र देण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी गुरुवारी (२३ ऑगस्ट) विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. तसेच मराठा क्रांतीमोर्चादरम्यान ज्या निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, हे गुन्हे परत घेण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावर त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा मराठा क्रांतीमोर्चाच्या वतीने पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.मोर्चाच्या समन्वयकांनी उपायुक्त वर्षा ठाकूर यांना निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत महिला ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपास रोडवर ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, मुलगी किरकोळ जखमी झाली. गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास गोदावरी टी पॉइंट येथे ही घटना घडली. लता श्रीरंग लोलेवार (वय ४२, रा. नारायणनगर, सातारा परिसर) असे या मृत महिलेचे नाव आहे. गेल्या महिन्याभरात या रोडवर अपघातात गेलेला हा तिसरा बळी आहे.

गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता लता लोलेवार व त्यांची मुलगी अंजली (वय १९) या दुचाकीवर गोदावरी टी पॉइंटकडून संग्रामनगर उड‌्डाणपुलाकडे येत होत्या. यावेळी गोदावरी टी पॉइंटच्या चौकातच त्यांच्या दुचाकीला देवळाईकडून महानुभाव आश्रम चौकाकडे जात असलेल्या एक भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये लता लोलेवार यांच्या पोटावरून ट्रकचे चाक गेले, तर अंजली दूर फेकल्या गेल्याने किरकोळ जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी वाहतूक ठप्प होती. पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. धडक देणाऱ्या ट्रकचालकाला जागीच पकडण्यात आले. पोलिसांनी लोलेवार यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये हलवला, तर अंजलीला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. लता यांचे पती रेल्वेस्टेशन भागातील एका खासगी कंपनीत कामगार आहेत. त्यांना अकरा वर्षांचा एक मुलगा व एक मुलगी आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाव्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्हचे आज आयोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महाराष्ट्रातील महत्त्वाची बौद्ध वारसास्थळे आणि तीर्थस्थळे यांना चालना देण्यासाठी शुक्रवारी (२४ ऑगस्ट) अजिंठा लेणीच्या परिसरात सहाव्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या कॉन्क्लेव्हचे उद्घाटन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी बौद्ध अभ्यासक, भिक्खु आणि १२ ते १५ बौद्ध राष्ट्रांमधील महावाणिज्यदूत सहभागी होणार आहेत. त्यांच्यात आणि स्थानिक सहल आयोजकांमध्ये बैठका होणार आहेत. विदेशातून सुमारे दोनशे प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी येणार असून त्यांच्यासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन्यथा दहा वर्ष पाणी नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समांतर जलवाहिनी प्रकल्पाचा महापालिकेने सत्यानाश केला आहे. आता काम सुरू करा, नाहीतर दहा वर्ष पाणी मिळणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिला. महापालिकेच्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबंधितांशी चर्चा केली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये आयुक्तांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली. ते म्हणाले, 'समांतर जलवाहिनीच्या कराराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कंपनीने प्रस्ताव दिला आहे. त्याचा अभ्यास करून प्रशासनाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. २७ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा होणार आहे. प्रस्तावात कंपनीने पंधरा-सोळा मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी कामाचे माइलस्टोन देखील दिले आहेत. 'हेड टू टेल' काम करण्याची त्यांची तयारी आहे, पण त्यांचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तपासून घ्यावा लागेल. कामाची मुदत वाढवा, पाइप बदला अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागेल. ६० कोटींच्या थकबाकीच्या मागणी त्यांनी केली आहे. अगोदर काम सुरू करा त्यानंतर थकबाकी देण्याचा विचार करू, असे आमचे म्हणणे आहे,' अशी भूमिका आयुक्तांनी स्पष्ट केली.

त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, 'समांतर जलवाहिनीचा प्रकल्प रखडला ही वस्तुस्थिती आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. चार सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. महापालिकेपुढे मुख्य मुद्दा आर्थिक विषयाचा आहे. २८९ कोटींची जास्तीची रक्कम लागणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता शासनाने मदत करावी, तरच ही योजना मार्गी लागेल. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनीचे काम पहिल्या टप्प्यात करणे हा महत्वाचा मुद्दा आहे.' आमदार अतुल सावे व इम्तियाज जलील यांनी या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'समांतर जलवाहिनीचे प्रकरण न्यायालयात आले. असे असताना दुसऱ्या एजन्सीला काम करण्यास सांगितले, तर न्यायालयात ज्यांनी धाव घेतली आहे ते या एजन्सीला काम करू देण्याची शक्यता नाही. त्यामुळे वस्तूस्थिती लक्षात घेता विचार केला पाहिजे. समांतर जलवाहिनी प्रकल्पाचा महापालिकेने सत्यानाश केला आहे. आता या योजनेचे काम झाले नाहीतर पुढील दहा वर्ष औरंगाबादला पाणी मिळणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. पहिली अट जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याची आहे. काम सुरू करा. चांगले काम करा. योग्य तो मार्ग काढा. शासन महापालिकेला पूर्णपणे मदत करेल,' असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

न्यायालयाबाहेर तडजोड नको

मुख्यमंत्र्यांकडे भूमिका मांडताना आयुक्त डॉ. निपुण विनायक म्हणाले, 'न्यायालयाबाहेर तडजोड नको. लवादासमोर हे प्रकरण निकाली निघावे. जेणेकरून दोन्हीही बाजूला ते बंधनकारक राहील. आर्बिट्रेशन अवॉर्ड करून घेतला पाहिजे.'. दरम्यान, सोमवारी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर महापौरांना सर्व गटनेत्यांना पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 'समांतर'चा विषय महत्त्वाचा आणि गंभीर आहे. वेळ व विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून आपापल्या गटातील बोलणाऱ्या नगरसेवकांची नावे सभेपूर्वी एक दिवस कळवावे. त्यामुळे सभा चालवणे सोपे जाईल.'

समांतर जलवाहिनी प्रकल्पाचा महापालिकेने सत्यानाश केला आहे. आता समांतर प्रकल्पाचे काम झाले नाही, तर पुढील दहा वर्ष औरंगाबादला पाणी मिळणार नाही. त्यामुळे काम सुरू करा. ते चांगले करा. योग्य तो मार्ग काढा. शासन महापालिकेला पूर्णपणे मदत करेल.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्स्टाग्रामवर तरुणीचे अश्लील फोटो अपलोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर तरुणीचे बनावट खाते उघडून तिचे अश्लील फोटो अपलोड केल्याचा प्रकार १६ ते २६ जून दरम्यान घडला. याप्रकरणी सायबर सेलच्या पथकाने जालना येथील सीए करणारा मोहित मुरली मनोहर जाखोटीया याला अटक केली आहे.

सिडको भागातील तेवीस वर्षांच्या विद्यार्थिनीचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. १६ जून रोजी तिच्या अकाउंटवर एका दुसऱ्या अकाऊंटवरून अश्लील मेसेज येत होते. त्यामुळे तरुणीने हे अकाउंट ब्लॉक केले. यानंतर दुसऱ्या अकाउंटवरून तरुणीला अश्लील स्वरुपाचे मेसेज सातत्याने येऊ लागले. या तरुणीने हे अकाउंट चेक केले असता, तिच्या नातेवाईकाचा मोबाइल क्रमांक वापरून हे बनावट अकाउंट बनावट उघडल्याचे समजले. याप्रकरणी तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तांत्रिक पुराव्याआधारे मोहित मुरली मनोहर जाखोटीया (वय २३, मूळ रा. रधम सेंटर, कॅनाल रोड, वन टाऊन, आंध्रप्रदेश) याला जालना येथील महिको कॉलनीतून अटक केली. ही कामगिरी सायबर सेलचे पीएसआय हेमंत तोडकर, जमादार संजयकुमार साबळे, धुडकू खरे, विवेक औटी, नितीन देशमुख व गोकुळ कुत्तरवाडे यांनी केली.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी धोरण उच्चशिक्षणाच्या विरोधात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सरकारी धोरण हे उच्च शिक्षणाच्या पूर्णत: विरोधात असून, त्याचे परिणाम विद्यापीठस्तरावरील प्राध्यापकांसह छोट्यातील छोटा घटकांवर होत आहेत,' असे प्रतिपादन 'एमफुक्टो'च्या अध्यक्ष डॉ. ताप्ती मुखोपाध्याय यांनी गुरुवारी केले. त्या देवगिरी कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित प्राध्यापकांच्या मेळाव्यात बोलत होत्या.

व्यासपीठावर एक्झिक्युटिव्ह कौन्सिल सदस्य मधू परांजपे, डॉ. बप्पासाहेब मस्के, डॉ. विक्रम खिलारे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. मुखोपाध्याय म्हणाल्या, 'रिक्तपदे न भरता कंत्राटीपदावर शिक्षक नेमणे, 'यूजीसी' बंद करणे, अंशदायी पेन्शन योजना अशी सरकारी धोरणे उच्च शिक्षणाला मारक ठरता आहेत. राज्यातील कॉलेज, विद्यापीठांमधील रिक्त जागा न भरता सरकारने कंत्राटी, तासिका तत्वाचा उपाय शोधला हा पूर्णपणे चुकीचा आहे. समान काम समान वेतन हे कोर्टाने सांगितले, पंरतु त्याला पायदळी तुडवले जाते आहे. कंत्राटीपदावर नेमणूक करण्यापेक्षा पूर्णपणे जागा भरा, तेव्हाच गुणवत्तेच्या गप्पा सरकारने माराव्यात. प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारी पातळीवरून दुर्लक्ष केले जाते आहे. त्यासाठी सर्वांना संघटित होऊन लढा उभारावा लागेल तरच चुकीच्या धोरणांना रोखता येईल. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासही सरकार विलंब करते आहे. केंद्राने सातवा वेतन आयोग लागू केला मात्र, राज्यसरकार हा वेतन आयोग लागू करण्यास उदासीन आहे,' असा आरोप त्यांनी केला.एक्झिक्युटिव्ह कौन्सिल सदस्य मधू परांजपे यांनी आपल्या भाषणात विविध प्रलंबित प्रश्न, सरकारची आलेली, येऊ घातलेल्या धोरणांमध्ये संघटनात्मक पातळीवर काय लढा उभारला जातो आहे, हे सांगितले. मेळावा यशस्वीतेसाठी डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. शफी शेख, डॉ. अत्ताउल्ला जहागीरदार, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. मदन शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर वैद्य, डॉ. संजय कांबळे, डॉ. गजानन मुळे यांनी परिश्रम घेतले.

\Bचार सप्टेंबर रोजी 'जेल भरो'

\Bप्राध्यापकांच्या प्रश्नांवर सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने येत्या चार सप्टेंबर रोजी 'एमफुक्टो'तर्फे मुंबईत आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरातील सुमारे दहा हजार प्राध्यापक यात सहभागी होतील असे सांगण्यात आले. सातवा वेतन आयोग लागू करावा यासह कंत्राटी, तासिकातत्वारील प्राध्यापकांना समान काम समान वेतन द्यावे, तक्रार निवारण समिती अशा विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय महामार्गालगत लोहमार्गाची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर शरणापूर ते चाळीसगाव यादरम्यानच्या महामार्गालगत लोहमार्गासाठी पाठपुरावा करण्याची मागणी कन्नडचे माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्याकडे केली आहे.

औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरणाच्या कामास सुरुवात होणार आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याबरोबरच गौताळा अभयारण्यातून होणाऱ्या बोगद्यातून लोहमार्ग करण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे कन्नड शहर रेल्वेच्या नकाशावर येणार होते. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नुकत्याच झालेल्या औरंगाबाद दौऱ्यात केंद्रीय दळणवळण खात्याने हा नियोजित रेल्वे मार्ग टाळल्याचे दिसून आले आहे. औरंगाबाद शहर, जिल्ह्यात यामुळे नाराजी आहे. या रेल्वे मार्गासाठी कन्नड शहरातील नागरिक लोकवर्गणीचा हिस्सा भरण्यास तयार आहेत. यासाठी मराठवाडा विकास महामंडळाच्या माध्यमातून केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी व रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना विनंती करून बैठक घ्यावी, अशी विनंती निवेदन देऊन करण्यात आली आहे. या निवेदनावर नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, डॉ. सिताराम जाधव, चंद्रकांत मेने,आकाश बोलधने, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, नगरसेवक युवराज बनकर आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाची बालस्थुलतेत पहिल्या स्थानी वाटचाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बालस्थुलतेमध्ये भारत २०१५मध्ये जगात तिसऱ्या स्थानी होता. आता तो लवकरच पहिल्या स्थानावर येण्याची भीती आहे. पौगंडावस्थेतील स्थुलतेत पाच वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. सरळसरळ तिघांमध्ये एक व्यक्ती स्थूल आहे. याच स्थुलतेमुळे कमी वयात उच्च रक्तदाब, मधुमेह व इतर अनेक व्याधींनी नागरिक ग्रस्त होत आहे. तरीही स्थुलतेविषयी अत्यल्प जनजागृती असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सात ते नऊ सप्टेंबरदरम्यान स्थुलतेविषयी राष्ट्रीय परिषद आयोजित केल्याचे गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

अखिल भारतीय स्थुलताविषयक प्रगत संशोधन संस्थेची १३ वी राष्ट्रीय स्थुलता निवारण वैद्यकीय परिषद शहरातील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे सात सप्टेंबरपासून होणार असून, उद्घाटन आठ सप्टेंबर रोजी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान परिषदेचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी जागतिक स्थुलता संस्थेचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. डोना रियान, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, अखिल भारतीय स्थुलताविषयक प्रगत संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. बन्सी साबू आदींची उपस्थिती राहणार आहे. यात मिनसोटा विद्यापीठातील विख्यात तज्ज्ञ प्रा. डॉ. क्लॉडिया फॉक्स, आहार तज्ज्ञ प्रा. डॉ. लु. की., आंतर्ग्रंथीतज्ज्ञ प्रा. डॉ. राजाराम कर्णे, जॅकसनविले येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ बाबू बालागोपाल, डॉ. वानम खांडीलकर, डॉ. तुषार गोडबोले, डॉ. अमोल अन्नदाते, डॉ. नवनिहान सिंग, डॉ. अजित भागवत, डॉ. शशांक शहा, डॉ. सेहला शेख, डॉ. शैलजा माने, डॉ. अल्तमाश शेख, डॉ. मल्हार गानला, डॉ. राकेश सहाय, डॉ. मिलिंद पटवर्धन, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. सुनील गुप्ता, डॉ. अमेय जोशी, डॉ. शैलेश पितळे, शिल्पा जोशी, डॉ. गीता धर्मट्टी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सात सप्टेंबर रोजी सर्व शाखेतील 'फ्रॉम बेसिक टू क्लिनिकल प्रॅक्टिस'वर डॉक्टरांसाठी कार्यशाळा होईल व कार्यशाळेला 'स्कोप'तर्फे २.५ गुणांकन प्राप्त झाले आहे. आठ सप्टेंबरला बाल व पौगंडावस्थेतील स्थुलताविषयक चर्चा होईल. नऊ सप्टेंबरला आहार पोषण, महिलांची स्थुलता व हेल्थ तसेच बॅरियाट्रिक सर्जरी संदर्भात परिसंवाद होईल. त्याशिवाय परिषदेत इतर अनेक कार्यक्रम-उपक्रम होणार आहेत, असे स्थानिक संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. हेमंत फटाले, सचिव डॉ. प्रीती फटाले, कोषाध्यक्ष डॉ. अमित नघाटे, आयएमए शहराध्यक्ष डॉ. कुलदिपसिंह राऊ‍ळ, डॉ. संजय पाटणे, डॉ. अजय रोटे, डॉ. अनंत कुलकर्णी आदींनी पत्रकार परिषदेत सांगितले.

\Bऔरंगाबादेत १० लाख व्यक्ती स्थूल

\Bतिघांत एक व्यक्ती स्थूल असल्याचे स्पष्ट झाले असून, शहर-जिल्ह्यात सरळसरळ १० लाख व्यक्ती स्थूल व्यक्ती आहेत, असे निरीक्षण डॉ. राऊळ यांनी नोंदविले, तर सिडकोतील मिश्र स्वरुपाचे विद्यार्थी असलेल्या शाळेत पाच हजार विद्यार्थ्यांची पाहणी केली असता, १६ ते १७ टक्के विद्यार्थी स्थूल आढळून आले. सुस्थितीतील विद्यार्थ्यांच्या शाळेत हेच प्रमाण १८ ते २० टक्क्यांपर्यंत असू शकते, असे डॉ. प्रीती फटाले म्हणाल्या. भारतीयांमधील पोटाभोवतीची स्थुलता (सेंट्रल ओबेसेटी) व जनुकीय जडणघडण ही हृदयरोगाला आमंत्रण देणारी आहे, असे डॉ. पाटणे म्हणाले. ४० टक्के गुणसुत्रे, तर ६० टक्के जीवनशैली स्थुलतेला कारणीभूत आहे. तसेच थायरॉइड व इतर काही आजारांमध्येही स्थुलता वाढते. प्रौढांमध्ये २३ पुढील 'बीएमआय' स्थुलता म्हटली जाते, तर १८ वर्षांखालील मुलांमध्ये 'बीएमआय सेंटाईल' ८५ पुढे असेल तर ती स्थुलता मानली जाते, असेही डॉ. हेमंत फटाले यानिमित्ताने 'मटा'शी बोलताना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images