Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विधी शाखेच्या विदयार्थ्यांवर अन्याय

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

विधी शाखेच्या विदयार्थ्यांनी केलेल्या याचिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. मंगेश एस. पाटील यांनी दिले.

नवनाथ देवकत्ते, राम टकले, विश्वजित बडे, सिद्धेश्वर बिराजदार, रवी गिते, प्रदीप तोडकर, मनोहर जाधव, सुमेध अवचारे, मनिषा हाडे, प्रद्युम्न डिक्कर, शेख नदीम, शुभम काहिते या विद्यार्थ्यांनी याचिका केली आहे. विधी शाखेला प्रवेश घेण्यासाठी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात २१ मे २०१७ रोजी सीईटी घेण्यात आली. तर महाविद्यालयात डिसेंबर २०१७ अखेर प्रवेश देण्यात आले. १ ते ५ फेब्रुवारी २०१८ दरम्यान विद्यापीठाने प्रथम सत्राची परीक्षा घेतली. त्यानंतर द्वितीय सत्राची परीक्षा घेतली. जीसी व बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार सरकारी सुट्या वगळता कमीत कमी ९० दिवसांचे प्रत्येक सत्रात अध्यापन होणे गरजेचे आहे. पण विद्यापीठाने या नियमांचे पालन केले नाही. केवळ २२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे जवळपास ७८ टक्के विदयार्थी नापास झाल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेला पात्र ठरायचे असेल, तर पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक असते. मात्र, या बदलत्या वेळापत्रकामुळे अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास कमी कालावधी मिळतो. विद्यापीठाकडे विचारणा केली असता विद्यापीठ सीईटी सेलकडे बोट दाखविते . सीईटी सेल विद्यापीठाकडे विचारणा करण्याचे सांगतात, या गोंधळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. नोकरीच्या संधीवर पाणी सोडावे लागते असा आक्षेपही याचिकेत घेण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेविरोधात विदयार्थींनी दाद मागितली आहे. या प्रकरणात विद्यापीठाला नोटीस बजावली आहे. याचिकाकर्त्याची बाजू गिरीष नाईक-थिगळे व सुषमा दौंड यांनी मांडली. या याचिकेवर ३१ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलीस अधिक्षक कार्यालयातील हॉल जळून खाक

$
0
0

औरंगाबाद:
ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयातील मिटींग हॉल शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत खाक झाला. रविवारी पहाटे तीन वाजता हा प्रकार घडला. या घटनेमध्ये अंदाजे बारा लाखांचे नुकसान झाले आहे.

औरंगाबादमधील टीव्ही सेंटर भागात ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय आहे. कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मिटींग हॉल आहे. या हॉलमध्ये पहाटे तीन वाजता धूर येण्यास सुरुवात झाली. अधिक्षक कार्यालयातील कंट्रोल रुमच्या कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने अग्निशमन दल व सिडको पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका बंबासह घटनास्थळी धाव घेतली. एका तासात ही आग आटोक्यात आणण्यामध्ये यश आले.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र, हॉलमधील ए.सी, फर्नीचर, स्पीकर सिस्टीम,वायर असे सर्व साहित्य जळल्याने सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील ‘डीएम’ला पहिली विद्यार्थिनी रुजू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नवजात शिशुशास्त्र विषयातील 'डीएम' या अतिविशेषोपचार अभ्यासक्रमासाठी पहिली विद्यार्थिनी म्हणून डॉ. सुकेना जूजर ही रविवारी (२६ ऑगस्ट) रुजू झाली. यानिमित्त अधिष्ठाता डॉ. कानन येळ‍ीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, विभागप्रमुख डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. शिराज बेग, डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे यांच्या उपस्थितीत डॉ. सुकेना हिला नियुक्तीपत्र देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिद्दीतून ‘हार्ट ट्रान्स्प्लान्ट’पर्यंत आलो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मँचेस्टरमध्ये किंवा 'फोर्टिस'मध्ये होते ते आपल्या औरंगाबादमध्ये का नाही होत, त्यांना जमते ते आपल्या का नाही जमत, ते कुठल्याही स्थितीत जमायलाच पाहिजे, याच जिद्द-चिकाटीतून मुंबईनंतरचे पहिले 'हार्ट ट्रान्स्प्लान्ट' औरंगाबादेत अवघ्या दीड वर्षात झाले. आज ज्यांना देशात कुठेही हृदय शस्त्रक्रिया करुन घेणे शक्य आहे, ते औरंगाबादमध्ये हृदय शस्त्रक्रिया करुन घेत आहेत, हा उलटा बदल घडवून आणता आला तो याच 'आपल्या शहरात का नाही' मानसिकतेतून. याच मानसिकतेमुळे २००२ मध्ये प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा ४४ शस्त्रक्रिया झाल्या होत्या, तर २०१८ मध्ये ३००० शस्त्रक्रिया होत आहेत आणि आठव्या महिन्यातील १.४ किलोच्या बाळापासून ते ९४ वर्षांच्या आजीबाईंपर्यंत सर्ववयीन व्यक्तींवर यशस्वी शस्त्रक्रिया होत आहेत. देशातील सातवी 'होमोग्राफ्ट बँक', शस्त्रक्रियेशिवाय 'व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट'ही याच मानसिकतेतून करण्याचा मनोदय प्रख्यात हृदयशल्यचिकित्सक डॉ. आनंद देवधर यांनी सत्काराराप्रसंगी व्यक्त केला.

चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने डॉ. देवधर यांचा त्यांच्या कुटुंबियांसह रविवारी (२६ ऑगस्ट) भानुदास चव्हाण सभागृहात हृदय सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते 'या हृदयी ते त्या हृदयी' मनसोक्त बोलते झाले. याच कार्यक्रमात इंदौर येथे स्थायिक होत असलेले जगविख्यात जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, मराठवाडा विकास मंडळाचे नूतन अध्यक्ष डॉ. भारगवत कराड, स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य, बालहक्क आयोगाचे नूतन अध्यक्ष प्रवीण घुगे, 'स्ट्रेंथ्स ऑफ मटेरियल' हे अभियांत्रिकीचे पुस्तक मराठीत'पदार्थबल' या नावाने पहिल्यांदा आणणारे विख्यात प्राध्यापक डॉ. वसंत आचवल यांचाही मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. विशेष मानपत्र देऊन गौरविण्यात आलेले डॉ. देवधर म्हणाले, एमबीबीएस होऊन आर्मीत जायचे ठरले होते, पण कोणताही सर्जन व्हायचे ठरलेले नव्हते. चांगले मार्क घे म्हणजे लष्करात चांगली पोस्ट मिळेल, असे सांगितल्यानेच दुसरा आलो. त्यामुळे सहजच सर्जरीला नंबर लागला, तरीही सर्जरी करुन आर्मीत जायचे ठरले. सर्जरीतही पहिला आलो; पण कार्डियाक सर्जन असूनही तुझ्यापेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या कमाडिंग ऑफिसरला तुला रोज सॅल्यूट मारावा लागेल, ही तयारी असेल तर खुशाल आर्मीत जा, असे एका कर्नलने सांगितले व आर्मीचे भूत उतरले. त्यानंतर डॉ. काळबांडे यांच्याकडे हृदय शस्त्रक्रियेचे धडे गिरवले, इंग्लंडमध्ये सहा वर्षे समृद्ध अनुभव घेतला आणि भारतात परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा राम भोगले यांनी औरंगाबादला बोलावून घेतले. इतर कोणत्याही शहरात जाण्यापेक्षा औरंगाबाद का नको म्हणून औरंगाबादला आलो व 'कमलनयन'मध्ये रुजू झालो. मात्र त्याकाळ‍ी औरंगाबादेत हार्ट सर्जरी करुन घेण्यास कोणीही तयार नव्हते व हार्ट सर्जरी करण्यातही अनंत अडचणी होत्या. मात्र जगात हार्ट सर्जरी होते, मग शहरात का नाही होत, याच जिद्दीतून १७ वर्षांत औरंगाबादचे चित्र पार पालटून टाकण्यात व अवयवदानाला सुरुवात करण्यात यश मिळाल्याचे देवधर म्हणाले.

पुरुषार्थ पुढच्या पिढीत संक्रमित तरा

राज्याच्या तसेच देशाच्या ज्ञात इतिहासामध्ये चित्तपावन ब्राह्मणांनी पराक्रम व पुरुषार्थातून मोठ्या प्रमाणावर कर्तृत्व गाजवले आहे व ते नक्कीच अभिमानास्पद आहे. हाच पराक्रम व पुरुषार्थ पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करा, असे आवाहनही डॉ. चितळे यांनी निरोप समारंभाप्रसंगी केले. राम भोगले यांनी अध्यक्षीय समोराप केला. इतरही सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. विकास गोंधळेकर यांनी प्रास्ताविक, अरविंद जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय, अरविंद फाळके यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातींनी देश अराजक झाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मी देश अराजकाच्या उंबरठ्यावर आहे असे पूर्वी म्हणायचो. आता देश अराजक झाला असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. राजकारण जातीधिष्ठीत झाल्यानंतर जातीने जीवनाची सर्व क्षेत्रे प्रभावित केली आहेत. जाती नावाची संस्था हीच समाजाचे वास्तव आहे' असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

अॅड. विष्णू ढोबळे लिखित 'जाती निर्मूलन - राष्ट्रीय गरज' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. महसूल प्रबोधिनी सभागृहात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. जयदेव डोळे, साथी सुभाष लोमटे, प्रकाशक प्रा. विलास वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. जातीचा उगम आणि सद्यस्थिती यावर कसबे यांनी भाष्य केले. 'जातीय भावना उग्र झाल्यामुळे देशाचे भवितव्य काय असा प्रश्न पडू शकतो. तुमची जात कशी यावर तुमचे भवितव्य अवलंबून आहे. वंशपरंपरेने चालत आलेला व्यवसाय चालू ठेवणे म्हणजे ता आहे. जाती मोडायच्या असतील तर हे व्यवसाय सोडा. खेडेगावात राहत आहात तोपर्यंत जात कायम राहील. झोपडपट्टीत रहा पण शहरात रहायला या आणि मुलांना शिकवा. आपण समाजवाद, लोकशाही, मानवतावाद हे सगळे स्वीकारले असले तरी माणसाची ओळख जातीच्या आधारावर ठरते' अशी टीका कसबे यांनी केली. भेदकारण हे जातगणनेचे प्रमुख कारण आहे असे प्रा. जयदेव डोळे म्हणाले. 'जातगणना जाहीर झाल्यास प्रत्येक जात संख्येच्या प्रमाणात आरक्षण आणि राजकीय हक्क मागेल. त्यातून देश अस्थिर होईल. मतदार जात पाहून मतदान करतात हा दावा म्हणजे मतदाराच्या विवेकाचा अपमान आहे. मतदार आपल्या स्वार्थाला पूरक अशा घटकाला मतदान करतात हे सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे पक्ष आणि जातीचा संबंध नाही. हिंदुत्ववादी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विषमतेचे उदात्तीकरण केले. कारण त्यांना समता अभिप्रेत नाही. म्हणूनच ते समरसता शब्द वापरतात. समरसता म्हणजे आहे त्या ठिकाणी समरस होऊन रहा' असे प्रा. डोळे म्हणाले. 'जातीव्यवस्थेवर लिहिण्याची व बोलण्याची गरज आहे. जातीवर आधारीत राजकारण व समाजकारण उभे करणे योग्य नाही. यातून सव्वाशे कोटी जनतेला असंतोषात ढकलले जात आहे' असे अॅड. ढोबळे म्हणाले. रंजन दाणी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औरंगाबादची आठवलेंची राजधानी

'तुघलकानंतर औरंगाबाद ही 'सनातन'च्या जयंत आठवलेंची राजधानी झाल्यासारखी स्थिती आहे. पुन्हा पकडलेल्या तरुणांना दहशतवादी म्हणू नका असे म्हणत मोर्चे निघतात. दहशतवादविरोधी पथकाने पकडले ते दहशतवादी असतात. फार तर संशयित दहशतवादी म्हणता येईल. एकीकडे शरियतला विरोध करायचा आणि हिंदू न्यायालयाचे समर्थन करायचे हा दुटप्पीपणा आहे' अशी टीका प्रा. डोळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर लोकार्पण होऊनही चार वर्षांपासून सुरू झाले नाही. हे केंद्र सुरू करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सिल्लोड येथे उपजिल्हा रुग्णालयाची झाडाझडती घेण्यासाठी आलेल्या विभागीय पथकातील सदस्य व आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व विभागाची या पथकाने कसून पाहणी केली. रुग्णालयाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सूचना देण्यात आल्या. यावेळी पथकासमोर नागरिकांनी समस्याचा पाढा वाचला. समितीने पाहणी केली असता जुन्या रुग्णालयातील शौचालय व बाधरूममध्ये एक हजार मीटर हिरवे कापड वापराविना पडून असल्याचे आढळले. या कापडापासून बेडसीट, पडदे व प्रसूतीसाठी लागणारे साहित्य बनविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

डॉ. लाळे म्हणाले की, येथे ड्रेनेज लाइनचे काम करण्याची गरज आहे. तशा सूचना देण्यात आल्या आहेत. या शिवाय येथे सोलर वॉटर हिटरप्रणाली बसविण्यात आली आहे, मात्र ती कार्यान्वित नसल्यामुळे रुग्णांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे तातडीने ही सुविधा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोनोग्राफी मशीन टेक्निशियन नसल्याने पडून आहे. त्यासाठी करार तत्वावर कर्मचारी नेमणण्यात येणार आहे.

या विभागीय पथकामध्ये डॉ. लाळे, डॉ. लोचना घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. विनायक भटकर, डॉ. सुनिता गोलाईत, डॉ. अंकुर साळुंके, डॉ. वासेफ इकबाल, डॉ. प्रशांत खेत्री यांचा सामावेश होता. यावेळी नगराध्यक्ष समीर सत्तार, रुग्णकल्याण समितीचे सदस्य डॉ. भाऊसाहेब तायडे, हाजी मोहंमद हानीफ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, डॉ. काशीनाथ कोष्टी डॉ. महेश विसपुते, डॉ. उमेश विसपुते, डॉ. गायकवाड यांची उपस्थिती होती.

\B

मुख्यालयी राहण्याचे बंधन\B

रुग्णालयातील चार रुग्णवाहिकांपैकी दोन रुग्णवाहिका तातडीने दुरुस्त करून रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय येथे पूर्वी करण्यात येत असलेल्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया बंद आहेत. त्या पुन्हा सुरू करण्यात येमार आहेत. या बरोबरच रात्रीच्या वेळी येथे सिझर होण्याचे प्रमाण वाढविले जाणार आहे. प्रत्येक वॉर्डात नर्सिंग स्टेशन कार्यन्वित केले जाईल. स्टाफ क्वार्टरची दुरुस्ती करून कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे बंधन घातले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज महानगरात राखी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम

$
0
0

वाळूज महानगर : भाऊ-बहिणीचे अतूट नाते जोपासणारा राखी पौर्णिमेचा वाळूज महानगरात सण विविध उपक्रमानांनी घरोघरी, शाळा-कॉलेज; तसेच विविध संस्थांकडून रविवारी साजरा करण्यात आला़

वाळूज महानगर भारतीय जनता पक्षातर्फे आर. आर. बाहेती अंध मुलींच्या व्यवसाय प्रशिक्षण प्रकल्पात राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, नगरसेवक राजू शिंदे, गोकुळ मलके, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी कराड यांनी येथील मुलींना भविष्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण मदत करू; तसेच या प्रकल्पातील समस्या सोडवण्यासाठी शासनाकडे समस्या मांडून लवकरच सोडवून राखी पौर्णिमेची अनोखी भेट देऊ, असे सांगितले. यावेळी विष्णूपंत खेडकर, राजेंद्र अवतारे, अमित चोरडिया, मदन काळे, संगीता निकम, धर्मेंद्र दुसाने, विश्वंबर सगने, कैलाश नागरगोजे, सुनील गोरे, यमराज गिरे, प्रकल्प व्यवस्थापक सोपान वडकर, ज्ञानेश्वर वडकर, महादेव गुरव आदिंची उपस्थिति होती. पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मधुकर सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. पाटील यांनी आभार मानले.

\Bखाऊच्या पैशातून बहिणीला ओवाळणी\B

बजाज नगर येथील ज्ञान भवन इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यानी आर. आर. बाहेती अंध मुलींच्या व्यवसाय प्रशिक्षण प्रकल्पातील मुलींकडून राख्या बांधून घेतल्या आई-वडिलांनी दिलेल्या खाऊचे पैसे जमा केले व तेथील मुलींना भेट म्हणून जेवणाची ताटे, कंपास पेटी भेट दिली. यासाठी उद्योजक हनुमान भोंडवे यांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवले जात असल्याचे सांगितले. शालेय शिक्षणाबरोबरच त्यांना नैतिक शिक्षण गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तेथील मुलींसाठी घरून जेवणाचे डबे आणले होते. त्यांच्या सोबत जेवण करून राखी पौर्णिमेचा आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी वैभव पवार, श्रीराम पोतदार,पायल पोतदार, शारदा पगारे, प्रदीप माळी, केशव कानिटकर, बाळू देवढे यानी परिश्रम घेतले़

\Bविद्यार्थिनींनी बनवल्या राख्या\B

बाजारात विविध प्रकारांमध्ये राखी उपलब्ध असते, मात्र स्वतःच्या हाताने बनविलेली राखी भावाच्या हातावर प्रेमाने बांधताना बहिणीला मिळणारे समाधान शब्दात व्यक्त न करण्यासारखे असते. हेच समाधान मिळावे म्हणून शाळेतील मुलींनी मोठ्या उत्साहाने स्वतः राख्या बनवल्या. राखी कशी बनवायची ते कार्यानुभव शिक्षिका अनिता धोंडकर यांच्याकडून शिकून घेतले अन् स्वतः बनविलेली राखी भावाला बांधली़ यावेळी केंद्रप्रमुख मधुकर सुरडकर, मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, शिक्षक राजेश हिवाळे, सुशीला घोडके, मधुकर इंगळे, परसराम धनेधर, कैलास गायके, रावसाहेब गवळी, गीतांजली साळुंके, उमा खोचरे, ज्योती जाधव, शीतल जाधव, अनिता धोंडकर, अमोल पल्हाळ आदींसह विद्यार्थी उपस्थित होते़

\Bसैनिकांना बांधल्या राख्या\B

सिडको महानगरातील तुळजाई शिक्षण संस्थेचे त्रिमूर्ती स्कूलच्या विद्यार्थ्यिनींनी छावणी येथील सैनिकांना राख्या बांधल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षिकांनी सैन्यातील ४६० बटालीयनच्या सैनिकांना राख्या बांधून सण साजरा केला़ यावेळी कल्याणी भोयर, पूजा मरकड, अश्विनी माकडे, नयना ककाणी, पूजा सोळके, सुप्रिया कस्तुरे, स्वाती शिंदे, वृषाली कडू, मुख्यध्यापक प्रभाकर आठवले, संजय काळे, मिलिंद म्हस्के, जब्बार पठाण, दादासाहेब पगारे, सागर घुगे आदिंची उपस्थिती होती़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्गाचे ८६ टक्के भूसंपादन पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात परिवहन क्रांती घडवू शकणारा राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्येही भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच निवाडे घोषित करण्यात येणार आहेत. आतापर्यंत दहा जिल्ह्यांमध्ये ८६.१४ टक्के भूसंपादन झाले असून ९० टक्के जमिनीचा ताबा शासनाकडे आल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या बांधकामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण सिमेंटचा सहा पदरी रस्ता ३० महिन्यांत बांधण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत सर्वाधिक ९५.७४ टक्के भूसंपादन करून नागपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर, तर नाशिक जिल्हा ८२.४२ टक्के भूसंपादन होऊन दहाव्या क्रमांकावर आहे. सध्या दहा जिल्ह्यांमधून खासगी आणि शासकीय अशी एकूण सात हजार १६९ हेक्टरचे (८६.१४ टक्के) भूसंपादन करण्यात आले आहे. रस्ता बांधण्यासाठी पाच कंपन्या स्थापन झाल्या आहेत. समृद्धी महामार्गाचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक महसुली विभागानुसार एक पॅकेज तयार करण्यात आले आहे. त्यानुसार नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक व कोकण विभागात बांधकामाच्या नियोजनानुसार पॅकेज राहणार आहेत. समृद्धी महामार्गाला असलेला सर्वात मोठा असलेला भूसंपादनाचा विरोध आता मावळल्याचे दिसत आहे. कलम १५.२ अधिसूचनेनुसार शासनाला शेतकऱ्यांकडून सक्तीने भूसंपादन करता येणार आहे. सक्तीच्या भूसंपादन प्रक्रियेत कमी मोबदला मिळण्याच्या भीतीने व संभाव्य आर्थिक तोट्यामुळे विरोधातील शेतकरी आता जादा लाभदायी सरळ खरेदी प्रक्रियेनुसार जमीन देण्यास संमती देत आहेत. सद्यस्थितीत घरगुती भांडण, न्यायालयीन प्रकरणे तसेच मालकी हक्कांसदर्भातील किरकोळ अडचणी आहेत, त्या काही दिवसांत दूर करण्यात येतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात एक ऑगस्टपासून खरेदी प्रक्रिया बंद असून निवाड्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ दिवसांत निवाडे घोषित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

----.

\Bजिल्हानिहाय भूसंपादन\B

जिल्हा................... टक्केवारी

नागपूर.........................९५.७४

वर्धा..............................९०.२५

अमरावती.......................८३.५९

वाशिम...........................८९.०४

बुलडाणा.......................८८.९२

जालना..........................८२.७३

औरंगाबाद........................८२.७४

अहमदनगर.......................८९.२७

नाशिक.............................८२.४२

ठाणे..................................८५.७७

--------------------------------.

एकूण.............................८६.१४ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याचे खासगीकरण रोखण्याचा केला प्रामाणिक प्रयत्न - आमदार जलील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शहराच्या हक्काच्या पाण्यावर एका कंपनीकडून खासगीकरण करण्याचा होत असलेल्या प्रयत्नाला आम्ही प्रामाणिकपणाने रोखण्याचा प्रयत्न केला. सोमवारी जेव्हा महापालिकेचे सत्ताधारी आपल्या फायद्यासाठी पाण्याच्या खासगीकरणाची योजना मंजूर करतील तेव्हा आम्हाला शहरवासीयांसाठी लढल्याचे समाधान राहील, असे मत आमदार इम्तियाज जलील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

आमदार जलील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, 'पाण्याच्या खासगीकरणाच्या विरोधात जनआंदोलन उभे करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. विजय दिवाण, राजेंद्र दाते पाटील, कृ.भि. भोगे, कलीम अख्तर, विजय शिरसाठ यांच्यासह अनेकांनी या विरोधामध्ये सहभाग नोंदविला. त्यांचे प्रयत्न सोमवारी (२६ ऑगस्ट) व्यर्थ ठरतील. या खासगीकरणाला विरोध करताना अनेकदा, अनेकांनी विरोध टाळण्याचे संकेत दिले.

पाण्याच्या खासगीकरणाचा हा विरोध जनतेवर टाकण्यात येणाऱ्या अवाजवी आर्थिक ओझ्याच्या विरोधात आहे. महापालिकेचे सत्ताधारी नेते आणि महापौर यांच्याशी चर्चा करताना, ही योजना अचानक कशी चांगली झाली? ही कंपनी आली तर औरंगाबादची पाण्याची समस्या पूर्णत: सुटणार का? याबाबत वारंवार विचारणा केली आहे. समांतर जलवाहिनीच्या नावाखाली शहरात येणारी खासगी कंपनी फक्त नफा कमविण्यासाठी येणार आहे. यामुळे नफेखोरीसाठी हे काहीही करू शकतात. सोमवारी (२७ ऑगस्ट) जेव्हा सभागृहात सत्ताधारी नगरसेवक 'कटिंग आणि शेअरिंग' घेऊन या खासगीकरणाच्या प्रस्तावाचे समर्थन करतील तेव्हा आपण आपल्या शहरवासींयावर लादलेल्या या पाण्याच्या खासगीकरणाच्या विरोधासाठी शेवटपर्यंत लढलो याचे समाधान आपल्याला राहणार असल्याची माहितीही आमदार जलील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात गाई, नऊ वासरांना विनापरवाना नेताना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा आयशर टेम्पो शुक्रवारी मध्यरात्री औरंगाबाद रस्त्यावर खंडाळा येथे रायगड हॉटेलजवळ पकडला. या कारवाईत सात गायी व नऊ वासरांसह वाहन जप्त करण्यात आले असून यातील एक गाय मृत व तिन वासरे जखमी झाली आहेत. त्यांची किंमत एक लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी वाहनचालक संतोष पुंडलिक म्हस्के (रा. नूतन कॉलनी वसाहत, जालना) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. सर्व जनावरे घायगाव (ता. वैजापूर) येथील गुरमिश्री गोपालन सेवा संघाच्या ताब्यात देण्यात आली असून, त्यांच्या चारापाण्याच्या सूचना करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव, हेड कॉन्स्टेबल हरिश्चंद्र शिरसाठ व चालक हे सर्व शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालत असताना खंडाळा रस्त्यावर रायगड हॉटेलजवळ एक टेम्पो (क्रमांक एमएच १२ एचडी १२१८) संशयास्पद अवस्थेत आढळला. पोलिसांनी टेम्पो थांबवून चालक म्हस्के याच्याकडे विचारणा केली असता त्याने, गाडीत जनावरे असल्याचे सांगितले, पण त्याच्याकडे जनावरे वाहतुकीचा परवाना नव्हता. गाडीमध्ये चारापाण्याची व्यवस्था न करता अतिशय निर्दयीपणे मुक्या जनावरांना कोंबण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी जप्तीचा पंचनामा करून चालक संतोष म्हस्केविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल महादेव केरबा करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना होर्डिंगची जप्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

फुलंब्री शहरात विनापरवाना लावण्यात आलेले डिजिटल बॅनर व होर्डिंग नगर पंचायत प्रशासनाने काढून जप्त केले आहेत. बॅनर होर्डिंग लावण्यासाठी नगर पंचायतने नियमावली तयार केली असून, त्यासाठी नगर पंचायत कार्यालयाकडे शुल्कसुद्धा जमा करावे लागणार आहे. फुलंब्री नगर पंचायतच्या नवीन धोरणामुळे चमकोगिरी करणाऱ्या 'पोस्टर पुढाऱ्यां'ना लगाम लागणार आहे.

फुलंब्री शहरातील विविध चौक, मोक्याचे रस्ते, रस्त्यावरील खांब आदी ठिकाणी डिजिटल पोस्टर, बॅनर, होर्डिंग लावून स्वत:ची जाहिरात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होती. यामुळेच शहराचे विद्रुपीकरण तर होतेच, शिवाय विद्युत खांबांवर लावण्यात आलेल्या होर्डिंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. गैरलागू होणारे मजकूर टाकून वाढदिवस, सण उत्सवाच्या शुभेच्छा या डिजिटल होर्डिंगद्वारे देण्यात येत होत्या. यामुळे नगर पंचायत प्रशासनाने याबाबत नियमावली तयार केली आहे.

मुख्याधिकारी योगेश पाटील, कार्यलयीन अधीक्षक संतोष रोकडे, कर निरीक्षक भगवान होनमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी रविवारी शहरातील विनापरवाना लावण्यात आलेले डिजिटल बॅनर व होर्डिंग काढून जप्त केले आहेत. या कारवाईमुळे शहराचे विद्रुपीकरण थांबेल, असे मानले जात आहे.

होर्डिंग, बॅनरसाठी नियमावली

होर्डिंग लावण्यासाठी पंचायत प्रशासनाची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. शिवाय संबंधित जागेच्या मालकाची लेखी अनुमती घ्यावी लागणार आहे. यासाठी नगर पंचायतीने. शुल्क लागू केले असून, जितक्या दिवस होर्डिंग ठेवायचे तितक्या दिवसाचे शुल्क परवानगीच्या वेळेस भरावे लागणार आहे. या बॅनरवर नगर पंचायतीने दिलेल्या परवानगीचे स्टीकर लावणे बंधनकारक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोराला पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत दुचाकी चोराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून निवृत्त सहायक फौजदाराची चोरलेली बुलेट व अन्यर दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. आरोपीच्या ताब्यातून दुचाकी चोरीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

निवृत्त सहायक फौजदार अशोक महादू ससाणे (रा. हडको) यांची बुलेट दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली होती. ही चोरलेली दुचाकी विक्री करण्यासाठी संशयित आरोपी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचला. गरमपाणी रोडवर क्रमांक नसलेली बुलेट घेऊन आलेला आरोपी शेख रशीद शेख यासीन (वय ४५, रा. कन्नड) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये त्याने, ही बुलेट चोरीची असून, दोन साथीदारांनी विक्री करण्यासाठी दिल्याची कबुली दिली; तसेच इतर दोन युनिकॉर्न दुचाकी देखील चोरल्याची माहिती त्याने दिली.

गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड येथील रशीदच्या घराजवळून या दोन दुचाकी हस्तगत केल्या. किशोर श्रीमंत चौधरी (रा. दुधड) आणि श्रीनाथ बाळासाहेब दांडगे यांच्या मालकीच्या या दुचाकी आहेत. रशीदला पुढील तपासासाठी चिकलठाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे घाडगे, एसीपी नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय घनश्याम सोनवणे, जमादार सुभाष शेवाळे, गजेंद्र शिंगणे, सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, अय्युब पठाण, अशरफ सय्यद, सिध्दार्थ थोरात व नितीन धुळे यांनी केली.

\Bसराईत गुन्हेगार

\Bआरोपी शेख रशीद हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. अडीच महिन्यांपूर्वी त्याला खुलताबाद पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. गुन्हे शाखेने देखील यापूर्वी शेख रशीदला दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधीक्षक कार्यालयातील हॉल आगीत भस्मसात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील मिटिंग हॉल शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाला. हा प्रकार रविवारी पहाटे तीन वाजता घडला. या घटनेमध्ये अंदाजे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टीव्ही सेंटर भागात ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय आहे. कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मिटिंग हॉल आहे. या हॉलमध्ये पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. हॉलमधून धूर येणे सुरू झाले. हा प्रकार अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ अग्निशमन दल व सिडको पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका बंबासह घटनास्थळी धाव घेतली. एका तासात ही आग आटोक्यात आणण्यामध्ये यश आले, मात्र या आगीमध्ये हॉलमधील वातानुकूलन यंत्रणा, फर्नीचर, स्पीकर सिस्टिम, वायर आदी साहित्य जळून सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले. या घटनेप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाथरूममध्ये आंघोळ करीत असताना शॉक लागल्याने विद्यार्थ्याचा काकाच्या घरी मृत्यू झाला. शिवाजीनगर भागात रविवारी सकाळी हा प्रकार घडला. आदेश अजयराव सोनवणे (वय २१, रा. शेरा, ता. रेणापूर, जि. लातूर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. बीएचएमएसच्या द्वितीय वर्षात आदेश शिक्षण घेत होता.

आदेश हा काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर भागात राहणारे त्याचे काका मोहन संग्राम सोनवणे (रा. सह्याद्री हिल्स) यांच्याकडे आला होता. रविवारी सकाळी आठ वाजता तो आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला होता. बाहेरील हॉलमध्ये त्याचे आजोबा व चुलत बहिणी बसल्या होत्या. बाथरूममधून पडल्याचा आवाज आल्याने घरातील सदस्यांनी तिकडे धाव घेतली. दरवाजा उघडला असता आदेश हा जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत दिसला. त्याला सुरुवातीला खासगी हॉस्पिटलमध्ये व नंतर घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदेश हा लातूर येथील बीएसएमएस महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. याप्रकरणी सहायक फौजदार कावरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीच्या सावटाखाली होणार ‘समांतर’ ची आजची सर्वसाधारण सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीच्या सावटाखाली सोमवारी समांतर जलवाहिनीबद्दलची विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यामुळे महापालिकेने कंपनीबरोबर केलेल्या पीपीपी तत्तावरच्या कराराचे पुनरुज्जीवन होईल, असे मानले जात आहे.

समांतर जलवाहिनीच्या कराराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करून समांतर जलवाहिनीचे काम त्याच कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच विषयावरील सर्वसाधारण सभा यापूर्वी पाच वेळा महापौरांना विविध कारणांमुळे तहकूब करावी लागली. उद्या सोमवारी (२७ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेली सभा निश्चितपणे होईल, असे मानले जात आहे. जलवाहिनीच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी व्हीसी घेतली. या व्हीसीमध्ये त्यांनी त्याच कंपनीकडून काम करून घ्या, असे स्पष्टपणे सांगितले नसले तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून काम करून घेणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. समांतर जलवाहिनी प्रकल्पाचे काम आता झाले नाही तर पुढील दहा वर्ष औरंगाबाद शहराला पाणी मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले व या प्रकल्पाचा सत्यानाश महापालिकेने केला आहे, असे म्हणत त्यांनी महापालिकेवर खापर फोडले आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनीचे काम प्राधान्याने झाले पाहिजे, तुम्ही काम सुरू करा शासन त्याला मदत करेल, अशी भूमिका देखील मुख्यमंत्र्यांनी व्हीसीच्या माध्यमातून जाहीर केली.

या पार्श्वभूमीवर सोमवारची विशेष सर्वसाधारण सभा व्यवस्थितपणे होईल, असे मानले जात आहे. पीपीपी तत्वावर या प्रकल्पाचे काम करण्यास एमआयएम व काँग्रेसचा विरोध आहे. त्यांचा विरोध नोंदवून घेऊन कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत होऊ शकतो, असे मानले जात आहे. समांतर जलवाहिनीबद्दलची विशेष सभा योग्य प्रकारे चालावी, अन्य विषय त्यात चर्चिले जाऊ नयेत यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्व पक्षाच्या गटप्रमुखांना पत्र देऊन समांतर जलवाहिनी विषयात बोलणाऱ्या नगरसेवकांची नावे द्या, असे आवाहन केले आहे. शनिवारपर्यंत त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी गटनेत्यांनी महापौरांना पत्र दिल्यास मोजकेच नगरसेवक समांतर जलवाहिनी संदर्भात बोलू शकणार आहेत.

'मातोश्री' हून आदेश नाहीत

समांतर जलवाहिनीच्या कराराचे पुनरुज्जीवन करण्याबाबत महापौर किंवा सभागृहनेत्यांना 'मातोश्री' हून कोणत्याही प्रकारचे आदेश आले नाहीत, महापौरांनीच ही माहिती दिली. सोमवारी सभा सुरू होईपर्यंत आदेश येतील. असे ते म्हणाले. दरम्यानच्या काळात संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर व खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी चर्चा करून भूमिका ठरवू, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवयवदान केंद्रांसाठी हॉस्पिटल उदासीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा-खान्देशातील पहिले ऐतिहासिक अवयवदान शहरात १५ जानेवारी २०१६ रोजी झाले व आतापर्यंत २१ दात्यांकडून ६८ वेगवेगळ्या अवयवांचे दान झाले. शहरात अवयवदान सुरू असले तरी त्याचे प्रमाण गरजेच्या तुलनेत नगण्यच आहे. अजूनही ग्रामीण भागात किंवा औरंगाबाद, नांदेड, लातूर वगळला इतर जिल्ह्यांमध्ये अवयवदान झालेले नाही. अवयवदानच काय, अवयवदानाची शस्त्रक्रिया होण्यासाठी आवश्यक असलेल्या 'एनटीओआरसी' केंद्राची संख्यादेखील संपूर्ण मराठावाडा विभागात केवळ चार ते पाच इतकीच आहे. अवयवदान सुरू झाल्यापासून म्हणजेच मागच्या अडीच वर्षांत बोटावर मोजण्याइतक्याच रुग्णालयांनी आपापल्या रुग्णालयांमध्ये अवयवदान केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हे तर 'ब्रेन डेथ रिपोर्टिंग'देखील शून्यच आहे. ही रुग्णालयांची उदासीनतादेखील अवयवदान वाढीसाठी मोठा अडथळा ठरत आहे.

संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये पन्नासपेक्षा जास्त मोठी व मध्य रुग्णालये आहे, जिथे हमखास अवयवदानाची शस्त्रक्रिया होऊ शकते. मात्र विभागात केवळ सहा 'ट्रान्स्प्लान्ट सेंटर' आहेत, जिथे अवयवदानासह अवयव प्रत्यारोपण होऊ शकते, तर 'नॉन ट्रान्स्प्लान्ट ऑर्गन रिट्रायव्हल सेंटर' (एनटीओआरसी) म्हणजेच अवयवदानाची शस्त्रक्रिया होऊ शकते असे केवळ पाच केंद्र विभागात आहेत. या अवयवदान केंद्रांमध्ये विभागातील चारही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह अलीकडेच शहरातील 'एमआयटी हॉस्पिटल'चा समावेश झाला आहे. तसेच 'एनटीओआरसी' केंद्र म्हणून नोंदणी होण्यासाठी शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयानेही प्रक्रिया सुरू केली आहे. अर्थात, तशी मान्यता 'हेडगेवार'ला मिळणे बाकी आहे, असेही सूत्रांकडून समजते. त्यामु‍ळे या पाच रुग्णालयांव्यतिरिक्त विभागातील एकाही रुग्णालयाने अवयवदान केंद्राच्या नोंदणीसाठी अद्याप पुढाकार घेतलेला नाही. वस्तुतः मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा सामान्य रुग्णायांमध्ये व अनेक उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्येही अवयवदानाची शस्त्रक्रिया होऊ शकते अशा पायाभूत सोयी-सुविधा या रुग्णालयांमध्ये नक्कीच आहेत. त्याचवेळी राज्यात अवयवदान चळवळ वाढावी व रुजावी या हेतुने राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांनी 'एनटीओआरसी' केंद्र व्हावे, असे लेखी आवाहनदेखील 'औरंगाबाद झेडटीसीसी'ने राज्य सरकारला मागेच केले होते व पाठपुरावाही केला होता. मात्र त्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला ही वस्तुस्थिती कायम आहे. याच उदासीनतेमुळे औरंगाबाद, नांदेड व लातूर जिल्हावगळला कुठेही अवयवदान झालेले नाही. ग्रामीण भागात तर अवयवदानाचा श्रीगणेशाच झालेला नाही.

घाटीत वर्षभरात अवयवदान नाहीच

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्येही (घाटी) मागच्या वर्षभरात एकही ब्रेन डेड रुग्णाकडून अवयवदान झालेले नाही. अवयवदान सोडाच, घाटीसह कोणत्याच रुग्णालयाकडून 'ब्रेन डेथ रिपोर्टिंग'ही होत नाही. कोणत्याही रुग्णालयात जेव्हा केव्हा रुग्ण हा 'ब्रेन डेड' होतो, तेव्हा त्या त्या रुग्णालयातील 'ब्रेन डेथ कमिटी'ने संबंधित रुग्ण 'ब्रेन डेड' झाल्याचे जाहीर करणे व 'झेडटीसीसी'ला कळविणे बंधनकारक आहे. मात्र या रिपोर्टिंगलाही बहुतेकवेळा फाटा दिला जातो, असेही वारंवार समोर येत आहे.

शहरातील ज्या ज्या रुग्णालयांमध्ये 'एनटीओआरसी' केंद्र होऊ शकते अशा सर्व रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट देऊन व लेखी पत्राद्वारे आवाहन करण्यात आलेले आहे. अशी रुग्णालये शहरात व विभागात नक्कीच लक्षणीय प्रमाणात आहेत. मात्र अवयवदान केंद्र होण्यासाठी रुग्णालये इच्छुक नसल्याचे वारंवार दिसून येत आहे.

- मनोज गाडेकर, झेडटीसीसी समन्वयक

एकतर सर्वच पात्र रुग्णालयांनी 'एनटीओरआसी' केंद्र होण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, राज्य सरकारदेखील ही प्रक्रिया बंधनकारक केली पाहिजे आणि अवयवदानासाठी सर्वांकडून प्रयत्न व्हायला हवेत. तेव्हाच अवयवदानाचे प्रमाण काही अंशी गरजेच्या प्रमाणाजवळ जाऊ शकेल.

- डॉ. सुधीर कुलकर्णी, झेडटीसीसी अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जीवनात यश मिळवायचे असेल, तर सर्वप्रथम ध्येय निश्चित करा. आपल्याला काय करायचे आहे हे ठरवा आणि मग कठोर मेहनत करा,' असा मोलाचा सल्ला मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) समाजातर्फे रविवारी (२६ ऑगस्ट) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात मान्यवरांनी दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेतील गुणवंतांना प्रा. अनिल रोकडे, राधिका राऊत तसेच गणेश राऊत यांनी मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी कार्तिकी मोरे, आदिती खंडागळे, साक्षी वाघ, अनुराग मोरे, सर्वेश हजारे, प्रतीक्षा राऊत, कोमल जाधव, मयुर हजारे, अनिकेत राऊत, सोनाली शिरसाठ यांच्यासह ४८ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सचिव कचरू पाचंरगे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रदेश सचिव रामनाथ बोरुडे, जिल्हाध्यक्ष कैलास निकम तसेच किरण जाधव, कृष्‍णा ढोबळे, बाळासाहेब शिंदे, रामेश्वर वाघ, सुनील रोकडे, आबा शिरसाठ, राकेश खंडागळे, नारायण भागवत, हनुमान राऊत, अंबादास जाधव, कांता वाघ, जनार्धन घोडके, अरविंद राऊत, विजय धोंगडे यांच्यासह पालक, समाजबांधवांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साईनाथ हजारे यांनी केले, तर गणेश पैठणकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयडीसी’पेक्षा पालिकेचे पाणी पाचपट महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील घरगुती वापराचे पाणी एवढे महाग आहे की महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) उद्योगांना देत असलेले पाणीही त्यापेक्षा स्वस्त आहे. 'एमआयडीसी'च्या घरगुती वापराच्या दरापेक्षा महापालिकेचे घरगुती वापराचे पाणी तब्बल पाचपट महाग आहे. समांतर जलवाहिनी योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणीपट्टीत पुन्हा दहा टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे पुढील काळात शहरातील पाणी किती महाग असेल याची कल्पना यावी.

'पीपीपी'तत्वावरील समांतर जलवाहिनीला प्रकल्पातील जाचक अटींमुळे नागरिकांचा विरोध आहे. त्यापैकी पहिली अट ही पाणीपट्टीची आहे. समांतर जलवाहिनी टाकणाऱ्या कंपनीला महापालिका दरवर्षी वार्षिक देखभाल अनुदानापोटी (अॅन्युअल ऑपरेशन सपोर्ट ग्रँट) सुमारे ६४ कोटी रुपये देणार आहे. त्याशिवाय वसूल केलेल्या पाणीपट्टीपैकी किमान ५० टक्के रक्कम कंपनीला कमिशनपोटी देण्याची तरतूद आहे. शिवाय दरवर्षी पाणीपट्टीत दहा टक्के वाढ करण्याचा करार कंपनीसोबत केलेला आहे. हा करार जाचक असल्याची भावना व्यक्त होत असताना कराराचे पुनरुज्जीवन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी दिला जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर अडीच वर्षांनी पाणीपट्टीत वाढ करण्याची तरतूद केली जाणार आहे. म्हणजेच समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाल्यापासून साडेचार वर्षांनी पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ होण्यास सुरुवात होईल, असे मानले जात आहे.

'एमआयडीसी'ची पाणीपट्टी आणि महापालिकेची पाणीपट्टी याची तुलना केली असता पालिकेचे पाणी पाचपट महाग असल्याचे दिसून येते. एमआयडीसीने एक मार्च २०१३ पासून पाणी पुरवठ्याचे सुधारित दर लागू केले असून ते राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतींना लागू आहेत. औरंगाबादेतील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये औद्योगिक वापरासाठीच्या पाण्याचे दर २८ रुपये ५० पैसे प्रति हजार लिटर, तर घरगुती वापराचे दर नऊ रुपये ७५ पैसे प्रति हजार लिटर आहेत. सध्या याच दराने 'एमआयडीसी'कडून पाणीपट्टी वसूल केली जाते. औरंगाबाद महापालिकेने मात्र २०१८-१९ या वर्षासाठी घरगुती वापरासाठी ५० रुपये प्रति हजार लिटर, तर व्यावसायिक वापरासाठी ९७ रुपये प्रति हजार लिटर, असा दर निश्चित केला आहे.

\Bएमआयडीसीचे दर (प्रति हजार लिटर) \B

\Bचिकलठाणा एमआयडीसी \B

औद्योगिक वापर १९ रुपये

घरगुती वापर ७ रुपये

\Bऔद्योगिक क्षेत्राबाहेरील दर \B

औद्योगिक वापर २८.५० रुपये

घरगुती वापर ९.७५ रुपये

\Bमहापालिकेचे दर (प्रति हजार लिटर)\B

घरगुती वापर ५० रुपये

व्यावसायिक वापर ९७ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रिपाइं’ची समविचारी पक्षाशी युती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गेल्या चार वर्षात देश व राज्य देशोधडीला लागले असून भाजपची आश्वासने वल्गना ठरल्या आहेत. संविधानविरोधी सरकारमुळे देशाला धोका निर्माण झाला आहे. राज्यात स्वच्छ व कृतिशील सरकार आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) समविचारी पक्षांसोबत युती करणार आहे,' असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश कांबळे यांनी केले. ते पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (डेमोक्रॅटिक) राज्यस्तरीय बैठक घेतली. मौलाना आझाद संशोधन केंद्रात शनिवारी झालेल्या बैठकीला सरचिटणीस प्रकाश कांबळे, प्रदेशाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, विलास सूर्यवंशी, नगरसेवक कैलास गायकवाड, सुनील जाधव, नरसिंग कांबळे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, बाळासाहेब गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर चर्चा करून समविचारी पक्षांशी युती करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'जीएसटी व नोटबंदीच्या धोरणामुळे रोजगारात प्रचंड घट झाली. भाजप सरकारच्या धोरणांमुळे तीन वर्षात रोजगार निर्मितीला खिळ बसली. विविध क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या,' असे रमेश गायकवाड म्हणाले. वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा करणारे सरकार तोंडावर आपटले. भविष्यात खासगीकरण करुन आणखी नोकऱ्या कमी करण्याची शक्यता आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. 'भाजपाविरोधात जनक्षोभ वाढला असून आगामी निवडणुकीत रिपाइं समविचारी पक्षांसोबत युती करील,' असे प्रकाश कांबळे यांनी जाहीर केले. तसेच तीन ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे निर्धार सभा घेण्याचा निर्णय झाला. सचिन गंगावणे यांनी प्रास्ताविक आणि के. व्ही. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीच्या यशस्वितेसाठी शिवा नरवडे, महेश रगडे, अजय गंगावणे, मन्साराम आमराव, रवी गायकवाड, सूरत खाजेकर, विशाल नावकर, साहेबराव दाभाडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

\Bप्रमुख ठराव

\B

राज्यस्तरीय बैठकीत प्रमुख ठराव संमत करण्यात आले. मागासवर्गीय महामंडळांनी लाभार्थ्यांना १०० टक्के कर्जमाफी द्यावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बंद शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी, कोरेगाव भीमा दंगलीनंतर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे त्वरित मागे घ्यावे, मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी समाजाला आरक्षण देण्यात यावे, राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या प्रमुख ठरावांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूचोरांवर बडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

टाकली अंबड (ता. पैठण) येथील नदीपात्रातून वाळू चोरून केलेल्या अवैध साठ्यावर महसूलच्या पथकाने छापा मारून २० लाखाची वाळू व एक ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत दिली.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील वडवाळी, टाकली अंबड, आपेगाव, हिरडपुरी या गावांतील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी असल्याची अनेक तक्रारी महसूल विभागाला प्राप्त होत्या. तक्रारीची गंभीर दखल घेऊन तहसीलदार महेश सावंत यांनी महसूलच्या पथकासोबत टाकली अंबडच्या नदीपात्रात धाड मारली. या कारवाईत महसूल विभागाच्या पथकाने २० लाख किमतीचा २५० ब्रास वाळूसाठा व एक ट्रॅक्टर जप्त केला.

वाळू चोरांनी १५ ऑगस्टनंतर आलेल्या सलग सुट्ट्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली. या वाळूचा साठा करून ठेवण्यात आला होता. टाकली अंबड येथे असलेल्या साठ्यावर महसूल विभागाने छापा टाकला. तेथे सुमारे २० लाख रुपये किंमतीचा २५० ब्रास वाळूसाठा व एक ट्रॅक्टर जप्त केला, मात्र वाळू चोरांच्या दहशतीमुळे गावकरी वाळूचोरांविषयी माहिती देण्यास घाबरत आहेत. वाळूचोरांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई करणार असल्याची माहिती तहसीलदार सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images