Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हद्दपार आरोपीकडून शहरात दुचाकी चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हद्दपार केले असताना शहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला जिन्सी पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी व तीन मोबाइल हस्तगत करण्यात आले.

पोलिस आयुक्तांनी शहरात रात्री अकरानंतर दुकाने बंद करण्यासाठी पोलिसांची गस्त सुरू केली आहे. त्यानुसार, जिन्सी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध प्रकरटीकरण पथक गस्त घालताना एक जण पळून गेला. पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले असता तो शहरातून हद्दपार केलेला कुख्यात गुन्हेगार सय्यद हनीफ सय्यद हबीब उर्फ बा (वय २०, रा. शरीफ कॉलनी, किराडपुरा) असल्याचे निष्पन्न झाले. त्याची चौकशी केली असता त्याने जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या तीन गुन्ह्याची कबुली दिली. त्याने बारा तासांपूर्वी जुना मोंढा भागातून चोरलेली दुचाकी, तसेच आणखी एक दुचाकी व घरात शिरून चोरलेले तीन मोबाइल पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, रफीक शेख, जमादार शेख हारुण, संपत राठोड, संजय गावंडे, गणेश नागरे व सुनील जाधव यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आणखी दोन संशयित जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुख्यात गुन्हेगार इम्रान मेहंदी याला पळवून घेऊन जाण्यासाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या टोळीतील पळून गेलेल्या दोघांना गुन्हे शाखेने बुधवारी रात्री हर्सूल भागात अटक केली. यामध्ये एक उत्तरप्रदेशातील कुख्यात गुन्हेगार आहे. या दोघांच्या ताब्यातून एक पिस्तुल व दहा जीवंत काडतूस जप्त करण्यात आली. याप्रकरणी अकरा जणांना सोमवारी अटक केली आहे.

जिल्हा न्यायालयात सोमवारी सुपारी किलर इम्रान मेहंदी याची अंतिम सुनावणी होती. सुनावणीपूर्वी पोलिसांवर गोळीबार करून त्याची सुटका करण्यासाठी आलेल्या सात जणांच्या टोळीचा कट गुन्हे शाखेने वेळीच उघड केला. पोलिसांनी सात जणांसह स्थानिक चौघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ताब्यातून एक पिस्तुल व आठ काडतूस जप्त करण्यात आले आहेत. या टोळीसोबत असलेला आफताब हा पळून गेला होता. त्याच्याजवळ एक पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती. तो बुधवारी रात्री हर्सूल परिसरातील कोलठाणवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपी विजयकुमार रामप्रसाद चौधरी उर्फ आफताब (वय ३६ रा. बालकेश्वरी, ता. करावली, जि. आग्रा, उत्तरप्रदेश), अबु चाऊस सालेह चाऊस उर्फ मुसा (वय २६ रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड) या दोघांना अटक केली. आफताबची झडती घेतली असता एक पिस्तुल व सहा काडतूस, तसेच मुसाच्या झडतीत चार जीवंत काडतूस सापडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अनिल वाघ, अमोल देशमुख, जमादार शिवाजी झिने, सुनील धात्रक, राजेंद्र सांळुके, भगवान शिलोटे, दत्तात्रय गढेकर, अफसर शहा, विशाल सोनवणे, गजानन मांटे, प्रभाकर राऊत, हकीम पटेल, संतोष सूर्यवंशी, शेख नवाब, विरेश बने, शिवाजी भोसले, संजय जाधव, भरत बहुरे व शेख सुलताना यांनी केली.

\Bखुनाचे गुन्हे दाखल\B

आफताब हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आग्रा व मुंबई येथे खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने शिक्षा देखील भोगल्या आहेत. त्याला या विशेष कामगिरीसाठी शहरात बोलावले होते. २५ ऑगस्ट रोजी आफताब आग्रा येथून रेल्वेने निघाला व २६ ऑगस्ट रोजी शहरात आला. २७ ऑगस्ट रोजी त्यांना मेहंदीची सुटका करायची होती. हे सगळे नारेगावात एकत्र आले. पोलिसांनी मध्यप्रदेशच्या टोळीला पकडले त्यावेळी आफताब पिस्तुलासह पळून गेला होता.

\Bमुसाकडे होती आरोपींची व्यवस्था\B

आफताबसोबत पोलिसांनी अबु सालेह चाऊस उर्फ मुसा याला अटक केली आहे. मुसा मेहंदीचा साथीदार खालेद चाऊस याचा मावस भाऊ आहे. खालेद या कटाचा सूत्रधार आहे. मुसाकडे बाहेरून आलेल्या गुन्हेगारांची सर्व प्रकारची व्यवस्था बघण्याचे काम होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करून लुटले, तिघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी परिसरात मारहाण करून मोबाइलसह रोख रक्कम, असा ४५ हजारांचा मुद्देमाल लूटणारे राहुल दिवेकर, राजू डेरे व विक्की लोखंडे या तिघांना बुधवारी (२९ ऑगस्ट) अटक करून गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना शनिवारपर्यंत (१ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांनी दिले.

याप्रकरणी हितेश हिरालाल टेंभुर्णे (मूळ रा. गोंदिया) यांनी फिर्याद दिली होती. ते मंगळवारी (२८ ऑगस्ट) राखी पौर्णिमेनिमित्त रामनगर येथे बहिणीकडे आले होते. त्यावेळी चौकात नाष्टा करताना त्यांची ओळख राहुल राजू दिवेकर (वय २७), राजू रमेश डेरे (वय २१) व विक्की रमेश लोखंडे (वय २१, सर्व रा. संजयनगर, मुकुंदवाडी) यांच्यासोबत झाली. त्यानंतर टेंभुर्णे हे या तिघांसोबत फिरायला गेले. परत येताना मुकुंदवाडी परिसरात तिघांनी टेंभुर्णे यांना मारहाण करत २५ हजार रुपयांचा मोबाइल व रोख २० हजार रुपये, असा ४५ हजार रुपयांचा ऐवज लुटला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपींकडून मुद्देमाल जप्त करणे व साथीदारांचा शोध घेणे बाकी असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. एल. दास-जोशी यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल रस्त्याचे मार्किंग सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून मार्किंग सुरू करण्यात आले आहे. मार्किंगच्या सोबतच वळू संगोपन केंद्राच्या जागेवर ले आऊट पाडण्याचे काम देखील केले जाणार आहे.

हर्सूल गावातून जळगावकडे जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आखत्यारित आहे. सध्या या रस्त्याची रुंदी ३० फूट आहे. शंभर फूट रुंदीचा रस्ता करण्याचे नियोजन आहे, परंतु नागरिकांच्या मागणीनुसार ८० ते ८५ फूट रुंदीचा रस्ता केला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उपमहापौर विजय औताडे यांच्या पुढाकाराने यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात हर्सूलच्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत बैठका झाल्या. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देखील लक्ष घातले आहे. त्यांच्या आदेशानुसारच रस्त्याचे मार्किंग आणि वळू संगोपन केंद्राच्या परिसरात ले आऊटचे काम केले जात आहे.

गुरुवारपासून भूमिअभिलेख कार्यालयाने रस्त्याच्या मार्किंगचे काम सुरू केले असल्याची माहिती विजय औताडे यांनी दिली. ४ सप्टेबरपर्यंत मार्किंगचे काम पूर्ण होणार आहे. मार्किंग झाल्यावर रस्त्याच्या रुंदीकरणाचा नकाशा विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. वळू संगोपन केंद्राच्या परिसरात दोन एकर जागेवर ले आऊट पाडण्याचे काम देखील सोबतच सुरू केले जाणार आहे. रस्ता रुंदीकरणात बाधीत असलेल्यांना त्या ले आऊटमध्ये जागा दिली जाणार आहे. रस्त्याचा आणि ले आऊटचा नकाशा १० सप्टेबर रोजी मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर हरिभाऊ बागडे यांच्या पुढाकाराने दोन्हीही नकाशे मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे औताडे म्हणाले. रस्ता रुंदीकरणात १२३ मालमत्ता बाधीत होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रिणीकडूनच अश्लिल छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाद झाल्यानंतर मैत्रिणीनेच बदनामी करण्याच्या उद्देशाने तिच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अश्लिल छायाचित्रे पोस्ट केल्याचा प्रकार समोर आला आहे. छायाचित्रे पोस्ट करणाऱ्या मुलीला सायबर क्राइम पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही मुली वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनी असून त्या शहरातील एका खासगी महाविद्यालयात शिकतात.

या संदर्भात सायबर क्राइम विभागाकडे २३ ऑगस्ट रोजी एका १८ वर्षीय मुलीने तक्रार केली आहे. या मुलीचे फेसबुकवर दुसरे अकाउंट तयार होऊन त्यावर अश्लिल छायाचित्र व मजकूर पोस्ट झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. आक्षेपार्ह फोटोमुळे बदनामी होत असल्याने या मुलीने पोलिसांत धाव घेतली. तक्रार आल्यानंतर सायबर क्राइम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक तपास केला. तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. हा प्रकार तक्रारदार मुलीची ओळख असलेल्या दुसऱ्या मुलीनेच केल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशी केली असता या मुलीसोबत तक्रारदार मुलीचा वाद झाला होता. त्यामुळे चिडून तिने हा प्रकार केला असल्याची शक्यता आहे. बनावट अकांउट तयार करून फोटो अपलोड करणाऱ्या मुलीला अटक करम्यात आली आहे. ही कारवाई उपनिरीक्षक हेमंत तोडकर, संजयकुमार साबळे, नितीन देशमुख, सुदर्शन एखंडे, छाया लांडगे, ज्योती भोरे, शिल्पा तेलोरे यांनी पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सचिन’ ला अर्धांगवायूचा झटका

$
0
0

Unmesh.deshpande@timesgroup.com

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील सचिन या पांढऱ्या वाघाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनकच आहे. त्याच्यावर सुरू असलेल्या उपचाराची पद्धत बदलण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती डॉ. राजकुमार जाधव यांनी 'मटा' शी बोलताना दिली.

प्राणिसंग्रहालयातील सचिन हा पांढरा वाघ २० ऑगस्टपासून आजारी आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. पशूवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने त्याच्यावर महापालिकेतर्फे उपचार केले जात आहेत. उपचाराला उचित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पुणे येथील प्राणिसंग्रहालयातील डॉ. राजकुमार जाधव यांना सचिनच्या तपासणीसाठी बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. जाधव गुरुवारी सायंकाळी शहरात आले. प्राणिसंग्रहालयात जाऊन त्यांनी सुमारे दीड तास सचिनची तपासणी केली, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्याशी चर्चा केली. 'मटा' प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'सचिनच्या मागच्या दोन पायांना आणि कंबरेला अर्धांगवायूचा झटका आला आहे आणि ही चिंतेची बाब आहे. बॅक्टेरियल इनफेक्शनमुळे किंवा पाठीचा कणा दुखावला गेल्यामुळे अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. हा झटका नेमका कोणत्या कारणामुळे आला याची तपासणी करण्यास सांगितले आहे. तपासणीचा अहवाल उद्या (शुक्रवारी) प्राप्त होईल. इनफेक्शनमुळे अर्धांगवायूचा झटका आला असेल तर आवश्यक ते उपचार करता येऊ शकतात, असा उल्लेख त्यांनी केला.

सचिनवर करण्यात येत असलेल्या उपचाराची पद्धत बदलली असल्याचे त्यांनी सांगितले. उपचाराची पद्धत बदलल्यामुळे त्याच्या खाण्यातही फरक पडला आहे. एक ते दीड किलो खाद्य तो सध्या घेत आहे. असे असले तरी त्याची प्रकृती चिंताजनकच आहे, असा उल्लेख डॉ. जाधव यांनी केला.

प्राणिसंग्रहालयात सचिन आणि वीर हे दोनच पांढरे वाघ शिल्लक आहेत. त्याशिवाय सात पिवळे वाघ आहेत. महापालिकेने ओरिसा येथील नंदनकानन या अभयारण्यातून प्रमोद आणि भानुप्रिया ही पांढऱ्या वाघाची जोडी आणली होती. प्रमोद-नुप्रियाची सचिन ही तिसरी पिढी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजनगरात सापडले कुजलेले धड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी परिसरातील राजनगर भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये कुजलेल्या अवस्थेत अर्धवट मृतदेह सापडला. हा कुजलेला मृतदेह शुक्रवारी सकाळी आठ वाजता कुत्र्याने बाहेर आणल्याने हा प्रकार उघडकीस आला. हे धड स्त्रीचे की पुरुषाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा घातपाताचा प्रकार असल्याची शंका असून मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

राजनगर भागात तेजबहादूर यादव (रा. जयभवानीनगर) यांच्या मालकीचे पत्र्याचे रिकामे शेड आहे. या शेडच्या एका बाजुचा पत्रा गंजल्याने तूटला आहे. या शेडमध्ये गेल्या काही दिवसापासून एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला होता. शुक्रवारी सकाळी कुत्र्यांनी हे धड ओढत शेडबाहेर आणले. यामुळे याची दुर्गंध सगळीकडे पसरली. परिसरातील आनंद म्हस्के यांनी मुकुंदवाडी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक नाथा जाधव व सहकाऱ्यानी घटनास्थळी भेट दिली. कुत्र्यांनी लचके तोडल्याने या मृतदेहाचा खालचा व चेहऱ्याचा भाग पूर्णपणे नष्ट झाला आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घाटी हॉस्पिटलमध्ये मृतदेहाची पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 'डीएनए' चाचणी करण्यात येणार आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निपुणांचे विमान जोरात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून शहर विकासात हातभार लावण्यासाठी सोळा 'मेअर्स फेलो'ची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. या फेलोंना मानधन देण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र इनव्हारमेंटल केअर क्लस्टर (एमईसीसी) बरोबर, तर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महात्मा गांधी मिशनबरोबर (एमजीएम) सामंजस्य करार करण्यात आला.

महापालिकेच्या कारभाराची प्रतिमा सुधारावी, शहर विकासात हातभार लागावा या उद्देशाने 'सीएमस् फेलो'च्या धर्तीवर 'मेअर्स फेलो' ची नियुक्ती करण्याची कल्पना पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मांडली. या कल्पनेला महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह उद्योजकांनी प्रतिसाद दिला. त्यात उच्चशिक्षित विद्यार्थ्यांची 'मेअर्स फेलो' म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती जाहीर करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात झाला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, सभागृहनेता विकास जैन, विरोधीपक्षनेता जमीर कादरी यांच्यासह एमईसीसीचे राम भोगले, डॉ. सुनील देशपांडे, एन. श्रीराम, मुनीश शर्मा, ऋषी बागला, उल्हास गवळी, प्रशांत देशपांडे, हेमंत लांडगे, रणजित कक्कड, पालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयुक्तांनी 'मेअर्स फेलो' मागची संकल्पना स्पष्ट केली. महापालिकेच्या विविध उपक्रमात 'मेअर्स फेलो' सहकार्य करतील व शहराची प्रतिमा सुधारण्यासाठी हातभार लावतील. मेअर्स फेलोसाठी २२५ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून १६ विद्यार्थी निवडण्यात आले. हे विद्यार्थी महापालिकेसोबत विविध क्षेत्रात एक वर्ष काम करतील. या विद्यार्थ्यांना एमईसीसीकडून मानधन दिले जाणार आहे. त्यांच्या खर्चाचा बोजा पालिकेवर पडणार नाही. यासंदर्भात एमईसीसीबरोबर सामंजस्य करार केला जात आहे. एमजीएमच्या सहकार्याने मध्यवर्ती जकात नाका येथे साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. अशाच प्रकारची प्रक्रिया त्यांनी पडेगाव, चिकलठाणा, कांचनवाडी व हर्सूल येथील कचऱ्यावर देखील करावी यासाठी एमजीएमबरोबर देखील सामंजस्य करार करण्यात येत आहे,' असे आयुक्तांनी नमूद केले. यावेळी राम भोगले, मुनीष शर्मा, उल्हास गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. मेअर्स फेलोच्यावतीने आवेश पठाण, आशीन गडप्पा, राजेश जाधव, जयश्री भोगले यांनी प्रातिनिधीकस्वरुपात मनोगत व्यक्त केले.

\B

हे आहेत मेअर्स फेलो\B

- राजेश जाधव (आपत्ती व्यवस्थापन)

- प्रणाली घोरपडे (आरोग्य)

- ललित जाधव (रस्ते)

- प्रतीक मानवतकर (घनकचरा व्यवस्थापन)

- शेख करीम (शिक्षण)

- शिल्पा खरात (महिला बाल कल्याण)

- आशित गडप्पा (विद्युत, उद्यान)

- जयश्री मोगल (ई - गव्हर्नन्स)

- शुभम पानगावकर (क्रीडा)

- ऋषिकेश इंगळे ( प्राणिसंग्रहालय)

- स्नेहा देशमुख ( हेरिटेज)

- किरण आढे (पाणीपुरवठा)

- दीपा इंचेकर ( एनयुएलएम)

- आवेश पठाण (सिव्हरेज)

- अभिषेक सोळुंके ( नगररचना)

- शुभम गिरी ( आयुक्त दालन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षा विभाग वाऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संथ कामाचा फटका फार्मसी व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे परीक्षा व मूल्यमापन संचालकपदाचा कार्यभार सांभाळत असल्या तरी नवीन संचालकाचा शोध सुरू आहे. काही अनुभवी प्राध्यापक व अधिकाऱ्यांनी पद घेण्यास नकार दिल्यामुळे अजून काही दिवस परीक्षा विभाग वाऱ्यावर आहे.

विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. दिगंबर नेटके यांना पदमुक्त केल्यानंतर प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्याकडे पदभार देण्यात आला. विधी विभागप्रमुख, कुलसचिव असलेल्या पांडे यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, प्रभारी संचालकाचा शोध सुरू असून काही दिवस पद घेण्यास कुलगुरुंनी विनंती केली होती. फक्त पंधरा दिवसांसाठी पदभार घेत असल्याचे पांडे यांनी प्रशासनाला सांगितले होते. मात्र, एक महिना होऊनही या पदासाठी संचालक मिळाला नाही. मागील आठवड्यात प्राणीशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सी. जे. हिवरे यांना विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी पद घेण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. यापूर्वी काही वरिष्ठ प्राध्यापक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली होती. प्रभारी संचालक होण्यास तयार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षा व मूल्यमापन संचालक पद अत्यंत जोखमीचे असून अधिसभा सदस्यांचा मोठा हस्तक्षेप असतो. प्रत्येक वेळी संचालकाला अपमानास्पद पद्धतीने पदमुक्त करण्यात येते. त्यामुळे पद घेण्यास कुणी इच्छुक नसल्याचे खरे कारण समोर आले. सद्यस्थितीत विद्यापीठ प्रशासन संचालक पदासाठी पात्र अधिकाऱ्याचा शोध घेत आहे. तातडीने निर्णय घेतला नसल्यामुळे परीक्षा विभाग तूर्तास वाऱ्यावर आहे.

दरम्यान, फक्त पंधरा दिवसांसाठी पदभार घेत असल्याचे सांगितले होते. मात्र, अजूनतरी पर्याय नसल्यामुळे हा पदभार सांभाळत आहे. कुलसचिवाच्या कामाचा आवाका मोठा असल्याने परीक्षा विभागाकडे पूर्ण लक्ष देता येत नाही. तरीसुद्धा नियमित आढावा घेऊन कामकाज सुरळीत ठेवले असे डॉ. साधना पांडे यांनी सांगितले.

निकाल रखडले

अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाचा निकाल रखडला आहे. जुलै महिन्यात निकाल जाहीर होणे अपेक्षित असताना सप्टेंबर महिन्यापर्यंत निकाल जाहीर झाला नाही. तसेच फार्मसी शाखेचे निकालसुद्धा रखडले आहेत. विद्यार्थ्यांचा संताप वाढत असताना प्रशासन उदासीन आहे. तसेच सत्र परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी बैठक घेणे अपेक्षित आहे. प्रशासकीय रचना मोडकळीस आल्यामुळे परीक्षेच्या नियोजनावर परिणाम झाला आहे.

अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाचे निकाल वगळता इतर निकाल जाहीर झाले. फार्मसीच्या निकालाबाबत त्वरित निर्णय घेतला जाईल. तांत्रिक कारणामुळे अडचणी आल्या आहेत.

डॉ. साधना पांडे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्तावाच्या प्रतिक्षेत गाइड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी. मार्गदर्शक नेमण्यासाठी नवीन प्रस्ताव राज्यपाल कार्यालयाकडे पाठवला आहे. राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतर गाइडची नियुक्ती होणार आहे. या खबरदारीमुळे अपात्र गाइडशिप मोडीत निघणार आहे. सध्या विविध मार्गांनी गाइडशिप मिळवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वशिलेबाजी सुरू आहे.

विद्यापीठातील एम. फिल व पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची (युजीसी) नियमावली आहे. या नियमानुसार गाइड (मार्गदर्शक) नेमणे अपेक्षित असते. विद्यापीठ प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करीत पदवी स्तरावरील शिक्षकांना गाइड नेमले. शिवाय विद्यापीठाअंतर्गत फक्त १६ महाविद्यालयांना संशोधन केंद्राची मान्यता आहे. मान्यता नसलेल्या महाविद्यालयातील शिक्षकांनाही संशोधन मार्गदर्शक (गाइड) म्हणून मान्यता देण्यात आली. हा प्रकार संशोधक विद्यार्थ्यांसाठी नुकसानीचा ठरण्याची शक्यता आहे. 'युजीसी'ने गाइडशिपबाबत पडताळणी केल्यास अपात्र गाइडचा मुद्दा चव्हाट्यावर येऊ शकतो. या नियुक्त्या कुणाच्या कार्यकाळात झाल्या आणि नियम कुणी मोडले याची चौकशी होण्याची शक्यता आहे. नवीन नियुक्त्यांबाबत प्रशासनाने राज्यपाल कार्यालयाला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पात्र गाइडची नियुक्ती केली जाईल, असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले. पदवी स्तरावरील प्राध्यापकांना गाइड करण्याबाबत प्रस्तावानुसार निर्णय अपेक्षित आहे. पदव्युत्तर विभागात पूर्णवेळ कार्यरत व पदव्युत्तर महाविद्यालयाने संशोधन केंद्रास मान्यता घेतलेली असेल तरच संशोधन मार्गदर्शक होता येते. विद्यापीठाने नियमात तडजोड करुन गाइड नेमण्याचा पायंडा पाडला होता. केवळ पदवी अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयातील शिक्षकही संशोधन मार्गदर्शक (गाइड) झाले. प्रशासनाच्या शिथिल नियमामुळे जुजबी अनुभवाच्या शिक्षकांना गाइड होण्याची संधी मिळाली. परिणामी, या मान्यतेचा संशोधनाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. नवीन प्रस्तावात त्रुटी दूर करुन पात्र गाइड नेमण्यावर विद्यापीठाने भर दिला असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन अभ्यासक्रमाला मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'बायोमेडिकल इमेज प्रोसेसिंग' या ऑनलाइन अभ्यासक्रमाला मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (एचआरडी) शुक्रवारी मान्यता दिली. तसेच अभ्यासक्रमाला २० लाख रुपये निधी मंजूर केला. हा अभ्यासक्रम एक ऑक्टोबरपासून राबविण्यात येणार आहे अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.

देशभरातील नामांकीत संस्थांनी ऑनलाइन अभ्यासक्रमांचे प्रस्ताव एचआरडीला पाठवले होते. प्रस्तावांवर चर्चेसाठी मंत्रालयाने शुक्रवारी 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग' ठेवली होती. प्र-कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर यांनी चर्चेत प्रतिनिधित्व केले. तेजनकर यांनी प्रस्तावाचे महत्व सांगितले. त्यानंतर प्रस्ताव मान्य करण्यात आला. हा ऑनलाइन अभ्यासक्रम ४० तासांचा असून २० तास व्हिडिओ आणि २० तास अध्यापन करण्यात येणार आहे. सरकारने कौशल्य विकासाच्या उद्देशाने ऑनलाइन शिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमांची निवड केली आहे. संगणकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. प्रकाश भांडवलदार यांना महात्मा फुले समाज गौरव पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद,

लोककलावंत सांस्कृतिक मंच, मुंबई शाखा वैजापूर व समता जागृती कलामंच, वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा महात्मा फुले समाज गौरव पुरस्कार डॉ.प्रकाश भांडवलदार यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना लोककलावंत सांस्कृतिक मंचच्यावतीने दरवर्षी महात्मा फुले समाज गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येते. गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. प्रकाश भांडवलदार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच सामाजिक कार्याची दखल घेवून महाकवी वामनदादा कर्डक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वैजापूर येथे हा पुरस्कार देवून सन्माणीत करण्यात आले. यावेळी लोककलावंत सांस्कृतिक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु शिंदे, समता जागृती कलामंचचे संस्थापक अध्यक्ष शाहीर अशोक बागुल, रविंद्रअप्पा साखरे, आबासाहेब जेजूरकर, प्रा. प्रमोद पठारे, शैलेश नन्नवरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सचिन’वर मसाज थेरपी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील सचिन या पांढऱ्या वाघाला अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्याच्यावर मसाज थेरपीच्या माध्यमातून उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याला अपचनाचा त्रास देखील होत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून सचिन आजारी आहे. खडकेश्वर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने त्याच्यावर उपचार केले जात होते. परंतु तो उपचाराला योग्य प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे पुणे येथील प्राणिसंग्रहालयाचे डॉ. राजकुमार जाधव यांना सचिनवर उपचार करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. डॉ. जाधव गुरुवारी सायंकाळी आले. त्यांनी सचिनची प्रकृती तपासली तेव्हा त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचे लक्षात आले. सचिनचे मागचे दोन्हीही पाय आणि कंबर अर्धांगवायूमुळे बधीर झाली आहे. सचिनच्या प्रकृतीची तपासणी केल्यावर डॉ. जाधव यांनी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्याकडे उपचाराची पद्धत लिहून दिली. त्यांनी सांगितल्यानुसार उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. नाईकवाडे यांनी दिली.

\Bकिडनी, लिव्हरवर परिणाम

\Bडॉ. बी. एस. नाईकवाडे म्हणाले, 'अर्धांगवायू झालेला असल्यामुळे मसाज थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत. सचिनला अन्नाचे पचन होत नाही. दर तीन दिवसांनी रक्ताचे नमुने घेत त्याचा तपासणी अहवाल पाठवा असे डॉ. जाधव यांनी सांगितले आहे. त्यानुसार रक्ताचे नमुने घेतले जातील. सचिनच्या किडनी आणि लिव्हरवर परिणाम झाला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेच्या फडासाठी बागडे, रहाटकरांची चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासून जोरात तयारी सुरू केली असून, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात कमळ फुलविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. अन्य इच्छुकांनीही गेल्या काही महिन्यांपासून उमेदवारीसाठी कंबर कसली आहे.

युतीत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर सत्ता मिळविण्यासाठी भाजप सक्रिय झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव, उत्तरप्रदेशचे मंत्री महेंद्र सिंह यांनी तीन ते चार वेळा बैठका घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कानमंत्र देत कामालाही लावले आहे. बूथ बांधणीवर भर देत एक बूथ २५ यूथ, पेज प्रमुख यासह म्रायको प्लॅनिंग करण्यात येत आहे. लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती झाली नाही, तर खासदार चंद्रकांत खैरे यांचा सामना कोण करणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेविरोधात प्रबळ उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची नावे प्रामुख्याने आघाडीवर आहेत.

फुलंब्री विधानसभा मतदार संघातून अनेक टर्मपासून प्रतिनिधीत्व करणारे बागडे यांनी यापूर्वीही राज्यात मंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. साखर कारखाना, दूध संघ त्यापाठोपाठ सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही त्यांचे कार्य भरीव आहे. बागडे यांचा असलेला तगडा जनसंपर्क, अनुभव आणि स्वच्छ प्रतिमेचा अधिक लाभ लोकसभेसाठी होईल, असे मानले जाते. तर माजी महापौर म्हणून काम पाहिलेल्या रहाटकर यांनी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ठसा उमटवला आहे. त्यांच्यावरील विश्वासामुळे श्रेष्ठींनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही दिली. अभ्यासू, अजातशत्रू अशी प्रतिमा असलेल्या रहाटकर यांच्या रूपाने एक सक्षम महिला उमेदवार देत येईल, अशी चर्चा आहे.

\Bगायकवाड, कराड यांचे दौरे जोमात

\Bमाजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब यांचीही नावे लोकसभेसाठी चर्चेत आहेत. मात्र, जिल्ह्यात गायकवाड व कराड हे दौरे करण्यात आघाडीवर आहेत. नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या औचित्य साधत भेटीगाठीवर भर दिल्यानंतर गायकवाड यांनी चार मार्च पासून मतदारसंघात खास दौरे सुरू केले आहेत. २१ ऑक्टोबरपर्यंत ९११ गावाचे दौरा पूर्ण करण्याचे त्यांचे नियोजन आहे. गायकवाड जय्यत तयारी करत असतानाच डॉ. कराड यांनीही जिल्ह्यात ठिक-ठिकाणी कार्यक्रम घेण्यावर भर दिला आहे. कन्नड, वैजापूरसह अनेक गावात आयोजित कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती वाढली असून त्यांच्या पैठण गेट रोडवरील संपर्क कार्यालयातही कार्यकर्त्यांची उठबैस वाढल्याचे चित्र आहे.

निवडणुकीसाठी संघटनात्मक पातळीवर जोमाने तयारी सुरू आहे. सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत, पण उमेदवार कोण असेल याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य वेळी निर्णय घेतील.

- शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवकीनंदन दहीहंडी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ऋषीकेश जैस्वाल

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुलमंडी येथील अष्टविनायक गणेश मंडळ प्रणित देवकीनंदन दहीहंडी महोत्सव उत्सव समिती २०१८ च्या अध्यक्षपदी ऋषीकेश प्रदीप जैस्वाल यांची निवड करण्यात आली आहे. गुलमंडी येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैस्वाल व माजी अध्यक्ष सुभाष कच्छवाह यांनी नविन कार्यकारिणी जाहीर केली. समितीची उर्वरित कार्यकारिणी पुढीप्रमाणे आहे.

स्वागताध्यक्ष : शगुन पाटणी, संदीप लिंगायत, राजेश कसुरे, आनंद बोरखडे, उपाध्यक्ष - परेश झिरपे, सागर पाटील,आशिष, घोडेले, अभिषेक सलामपुरे, लुमेश बाखरीया, प्रकाश ध्रुवे, आकाश हरसुलकर, कार्याध्यक्ष निखिल चव्हाण, राजू मन्सुरी, आदित्य शर्मा, कोषाध्यक्ष - गणेश शर्मा, संकेत डोईफोडे, विनायक विन्नम, सचिव - धनंजय मिसाळ, रविकांत गवळी, जयवंत ओक, सहसचिव - नारायण सुरे, रोहीत आहुजा, धिरज गुज्जर, सागर खरगे, प्रसिद्धीप्रमुख - धीरज पवार, सन्नी पारसवार, संजय राखुंडे, रवि देशमुख, सदस्य - भावेश सराफ, चिंतन शहा, नरेंद्र अग्रवाल, विकास जैन, राजू वैद्य, सचिन मुळे, गोपी घोडेले, सुगंधकुमार गडवे, किशोर तुळशीबागवाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर काँग्रेसची माघार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा, मुस्लिम, धनगर व कोळी समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे तीन दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील लेखी पत्रानंतर मागे घेण्यात आले. दरम्यान, जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील यांच्यासह १४ जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपोषणस्थळीच सलाइन लावण्यात आले. यामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत उपोषणस्थळी तणाव होता. मुख्यमंत्री कार्यालयाचे पत्र घेऊन जिल्हाधिकारी उदय चौधरी, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपोषणस्थळी आले. सोबत आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरही होते. पत्राची प्रत दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे दोन ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू होते. २८ दिवसांच्या हे उपोषणानंतर सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणारी नाही, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी जाहीर केली होती. दरम्यान, बुधवारपासून आमरण उपोषण करण्यात आले. आमदार सत्तार व झांबड, शहराध्यक्ष पवार, माजी आमदार डॉ. काळे व नितीन पाटील, डॉ. जितेंद्र देहाडे, आतिश पितळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे यांच्यासह इतर उपोषणार्थींची प्रकृती शुक्रवारी खालावली. मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याने अनेकांना सलाइन लावण्याचा निर्णय शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने घेतला.

दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांची रुग्णालयात दाखल होण्याची विनंती आमदार सत्तार यांनी अमान्य केल्याने दुपारी तीननंतर परिस्थिती चिघळली. काँग्रेसचे प्रमुख नेते उपोषणात सहभागी झाल्याने जिल्हाभरातील काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी झाली. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना सायंकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून लेखी पत्र प्राप्त झाले. जिल्हाधिकारी, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी उपोषणस्थळी जाऊन त्या पत्राची प्रत सुपूर्द केली. 'सरकार आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे. निश्चितपणे अंमलबजावणी केली जाईल,' असे बागडे म्हणाले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

\Bप्रधान सचिवांचे पत्र \B

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की मराठा समाजास आरक्षण देण्याबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त होताच मराठा आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिन्याच्या आता विधानमंडळाचे अधिवेशन बोलावण्यात येईल. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणी, छत्रपती राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, मराठा क्रांती मोर्चाच्या विविध आंदोलनांदरम्यान झालेल्या हिंसाचार, जाळपोळ घटनांमध्ये गंभीर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत 'टीस' संस्थेला परिपूर्ण अहवाल बनविण्यास सांगिकले आहे. मुस्लिम व कोळी समाजाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून त्यांच्या विकासासाठी योजना हाती घेतल्या आहेत, असे पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसाठी ‘बामुक्टो’ चे धरणे आंदोलन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन ( एमफुक्टो) तर्फे सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाच्या साखळीतील 'बामुक्टो' या संघटनेने शुक्रवारी उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले.

महाविद्यालयीन व विद्यापीठातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लवकर लागू करावा, रिक्त पदांची भरती करावी, २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, उच्चशिक्षणातील बाजारीकरण थांबवा, तासिका तत्वावरील शिक्षकांना समान काम, समान वेतन द्या आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात बामुक्टोचे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन) या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात बामुक्टाचे विभागीय अध्यक्ष डॉ. बप्पासाहेब म्हस्के, सचिव विक्रम खिल्लारे, जिल्हाध्यक्ष डॉ. उमाकांत राठोड, जिल्हा सचिव डॉ. दिलीप बिरुटे यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

मंगळवारी मुंबईत जेलभरो आंदोलन

एमफुक्टोने सुरू केलेल्या या आंदोलनाची सांगता मंगळवारी मुंबईत आझाद मैदानावर करण्यात येणार आहे. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा डॉ. ताप्ती मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ साठी हमी पत्राची अटीची गरज नव्हती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या कामासाठी २८९ कोटी रुपये देण्याची हमी देणारे पत्र शासनाने द्यावे, अशी अट घालण्याची गरज नव्हती, असे मत महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले.

डॉ. निपुण विनायक यांनी काही पत्रकारांबरोबर अनौपचारिक चर्चा केली. यावेळी विविध विषयांवर त्यांनी आपली मते व्यक्त केली. समांतर जलवाहिनीच्या कामाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या कामासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे, त्यामुळे हमी पत्र आल्यावर समांतर जलवाहिनीच्या कराराबद्दल निर्णय घेण्याच्या भूमिकेची काही गरज नव्हती. २८९ कोटी रुपये ही रक्कम एकूण प्रकल्पाच्या किंमतीच्या दहा टक्के आहे आणि ही रक्कम लगेच लागणार होती, असेही नाही असा उल्लेख त्यांनी केला. 'समांतर'बद्दल कोर्टात काहीतरी निर्णय होणे गरजेचे आहे. निर्णय झाल्यावर पुढील दिशा ठरवता येईल, असे ते म्हणाले.

भूमिगत गटार योजनेच्या रखडलेल्या कामाबद्दल डॉ. विनायक यांना विचारले असता ते म्हणाले, या कामासाठी खरोखरच कर्ज काढावे लागेल का हे तपासून पहावे लागेल. या योजनेअंतर्गत कोणते काम झाले, कोणते काम राहिले याची माहिती मागवली आहे. ६६ किलोमीटर मुख्य ड्रेनेज लाइनचे काम झाले आहे. उपलाइनचे ५० किलोमीटर काम झाले आहे. ६७ किलोमीटर अंतर्गत काम झाले आहे. त्याशिवाय ८० किलोमीटर अंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम बाकी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

शहरातील ११५ वॉर्डांपैकी ३३ वॉर्ड कचरामुक्तीच्या मार्गावर आहेत, असे सांगताना डॉ. विनायक म्हणाले, आपल्या शहराची प्रतिमा फार काही वाईट नाही. फक्त विश्वासार्हतेचे आव्हान आमच्यासमोर आहे. कचराकोंडी फोडण्याचे काम आता सुरू झाले आहे. दोन महिन्यात खूप टेंडर काढले. आता नगररचना विभागात बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टिम २ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या सिस्टिममुळे बांधकाम परवानगी ऑनलाइन मिळेल, असा दावा त्यांनी केला. जीआयएस मॅपिंग प्रणालीच्या माध्यमातून देखील काम सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी केला. २० व २१ सप्टेंबर रोजी शहरातील वारसास्थळांच्या जागेवरची अतिक्रमणे काढणे, स्वच्छता करणे, वारसास्थळांवर उगवलेली झाडे काढणे आणि माहिती फलक लावणे हे काम केले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. स्मार्टसिटी योजनेतून हेरिटेज, पर्यावरण, पाण्याचा फेर वापर ही कामे करण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

…तो तीर खाने पडेंगे

काम करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या नंतर औरंगाबाद शहर टफ आहे, असे डॉ. निपुण विनायक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. रायगडला मानसिक त्रास खूप होता. स्वाभीमानावर घाला येत असेल तर ते योग्य नाही, आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी 'काम करना है तो तीर खाने पडेंगे' असा उल्लेख केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोसंबी बहार व्यवस्थापन: आज कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण रोड येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच उपक्रमात आज जिल्ह्यातील फळबाग शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील हे मोसंबी बहार व्यवस्थापन व मधुमक्षिका पालनावर मार्गदर्शन करणार आहेत. केव्हीकेच्या एनएआरपी हॉलमध्ये सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम सुरू होणार असून कार्यशाळेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्नामृत फाउंडेशनमध्ये आयुक्तांनी केला स्वयंपाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशनमध्ये शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या हस्ते पोषण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी चक्क स्वयंपाक केला आणि उपस्थितही चकित झाले.

एक ते सात सप्टेंबर हा सप्ताह देशभर पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या पोषण सप्ताहाची मध्यवर्ती कल्पना 'फर्दर विथ फूड' अशी आहे. संपूर्ण आठवडाभर बालके, विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्ती यांना आहार आणि पोषणाचे महत्त्व याबद्दल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. पोषण सप्ताहाची सुरुवात डॉ. निपुण विनायक यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी स्वयंपाक करण्यातही अन्नामृतच्या स्वयंसेवकांना मदत केली. विद्यार्थ्यांना देखील जेवू घातले. या कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्याला आयुक्तांनी फळ खाऊ घातले. यावेळी अन्नामृत फाउंडेशनचे सुदर्शन पोटभरे व अन्य सहकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images