Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

...या नभाने या भुईला दान द्यावे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'या नभाने या भुईला दान द्यावे', 'मी रात टाकली', 'मन चिंब पावसाळी', 'जांभूळ वनात' अशा एकाहून एक सरस, ग्रामीण समाजजीवनाचे वास्तव मांडणाऱ्या कविता, गीतांचे अभिवाचन आणि त्यावरील आधारित नृत्यसंगीताच्या कार्यक्रमात शनिवारी रसिक चिंब झाले.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सहकार्याने नवचेतना फाउंडेशन - अनुनाद कलाविष्कारतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदभाई श्रॉफ सभागृहात ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला औरंगाबादमधील रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संहितालेखन व निवेदन वृषाली श्रीकांत यांनी केले. रूपाली पाटील, वृषाली श्रीकांत, श्रीकांत उमरीकर यांनी अभिवाचन केले. निरंजन भालेरावच्या सुरेल बासरीने आणि राजश्री पोहेकर-कुलकर्णी यांच्या नृत्य दिग्दर्शनाने रंगत भरली. महानोरांच्या विविध आशयाच्या कविता कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. तर, नृत्य सादरीकरणातून गीतेही सादर करण्यात आली. श्रावणी पाटील, शर्वरी कुलकर्णी, अपूर्वा कुर्डीकर, शीतल गलांडे, समीक्षा आचार्य, प्रेरणा शेळके, साक्षी पिसाळ, सिद्धी सदावर्ते, सानिका घोडके, शिवाली गायकवाड, केतन हराळे, ईशान महाजन यांनी ना.धों.च्या कवितांवर बहारदार नृत्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी महानोर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, 'तुम्ही सर्व कवी रसिकांनी कवितेवर केलेल्या प्रेमामुळे मी आहे. पुणे, मुबंईच्या कलाकारांपेक्षा काकणभर छान सादरीकरण या कलाकारांनी केले आहे आणि ते माझ्या मराठवाड्याने केले. यापेक्षा स्वर्गीय सुखाचा आनंद नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एलआयसी सुरू करणार चार सॅटेलाइट ऑफिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) औरंगाबाद विभागात चार नवे सॅटेलाइट ऑफिस सुरू करणार आहे,' अशी माहिती वरिष्ठ विभागीय अधिकारी कुलभूषण शर्मा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

महामंडळाच्या स्थापनेला एक सप्टेंबर रोजी ६२ वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत कुलभूषण शर्मा माहिती देत होते. शर्मा म्हणाले, 'एलआयसीच्या औरंगाबाद विभागात औरंगाबाद, लातूर, बीड व उस्मानाबाद हे जिल्हे येतात. या जिल्ह्यांत १७ शाखा, सहा सॅटेलाइट ऑफिस तर सहा मिनी ऑफिस आहेत. आगामी वर्षात औसा, पैठण, भूम, तुळजापूर या सॅटेलाइट ऑफिस सुरू केले जाणार आहेत. विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत १७ लाख ३ हजार पॉलिसी होल्डर्स आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून आतापर्यंत ७५५ कोटी रुपयांचे क्लेम देण्यात आले असून, वर्षभरात १६९३ डेथक्लेम दिले आहेत. चालू आर्थिक वर्षात २७० कोटी रुपये प्रिमीयमचे टार्गेट असून एक लाख ३६ हजार नवीन पॉलिसी करायच्या आहेत. एलआयसीने यंदा २७ ऑगस्ट रोजीच बोनस जाहीर केला आहे,' असा उल्लेखही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला विभागीय अधिकारी संगीता शर्मा, मार्केटिंग मॅनेजर सुजॉय दत्ता यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

\B२८.४५ लाख कोटींची संपत्ती

\Bएलआयसीच्या एकूण वाटचालीबद्दल माहिती देताना शर्मा म्हणाले, '२०१७-१८ या आर्थिक वर्षात एलआयसीने प्रीमियमच्या बाबतीत नवीन व्यवसायामध्ये ८.१२ टक्के वाढ केली आहे. २६६.०६ लाख दाव्याच्या अंतर्गत १, ११, ८६०.४१ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. एलआयसीची स्थापना १९५६ मध्ये झाली. वेळी प्रारंभिक गुंतवणूक पाच कोटी रुपये हो. ज एलआयसीकडे २८.४५ लाख कोटींची संपत्ती आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरळे बंधूंवर संशयाची सुई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरेसह त्याचे मेहुणे शुभम सुरळे व अजिंक्य सुरळे यांच्यासह त्यांचा मित्र रोहित रेगे याला अटक करण्यात आली. यातल्या शुभम सुरळे गौरी लंकेश हत्या प्रकरणात सहभागी असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुरळे बंधूंना कर्नाटक विशेष पथकाकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याची शक्यता एटीएसच्या सूत्रांनी व्यक्त केली.

दाभोलकरांचा मारेकरी म्हणून संशयित सचिन अंदुरेला ताब्यात घेण्यात आले आहे. अंदुरेच्या मेहुण्यांकडून पिस्तुलासह तलवार, कुकरी, चाकू, एअरगन जप्त करण्यात आली़ या पिस्तुलानेच दाभोलकरांसह गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी सुरळे आणि रेगे यांना कर्नाटक एसआयटी ताब्यात घेणार आहे. यासाठी औरंगाबाद न्यायलायाकडे अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्नाटक एटीएसला शुभम सुरळेवर दाट संशय असून, तो गौरी लंकेश हत्या प्रकरणात सहभागी असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबतचे मत कर्नाटक पोलिस न्यायालयात मांडणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. …अंदुरेला एटीएसने उचलल्यानंतर त्याने सासरी ठेवलेले लकी पिस्तुल एटीएसच्या हाती लागले़ हे पिस्तुल अंदुरेने मेहुणा शुभम सुरळे, अजिंक्य सुरळेकडे सोपवले होते. त्यांनी ते रेगेकडे लपविले होते़ या तिघांचा कटामध्ये मोठा सहभाग आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी कर्नाटक एटीएस चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेणार आहे. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

\Bन्याय वैदयकीय अहवालाची प्रतीक्षा

\Bरेगेकडून जप्त केलेले पिस्तूल तांत्रिक अहवालासाठी न्याय वैद्यकीय विभागाकडे पाठविण्यात आले आहे. हा अहवाल तातडीने मिळावा यासाठी एटीएसने पत्रव्यवहार केला आहे. या अहवालानंतर तपासाची दिशा ठरणार आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दाभोलकर हत्या: सुरळे बंधूंवर संशयाची सुई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरेसह त्याचे मेहुणे शुभम सुरळे व अजिंक्य सुरळे यांच्यासह त्यांचा मित्र रोहित रेगे याला अटक करण्यात आली. यातल्या शुभम सुरळे गौरी लंकेश हत्या प्रकरणात सहभागी असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुरळे बंधूंना कर्नाटक विशेष पथकाकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याची शक्यता 'एटीएस'च्या सूत्रांनी व्यक्त केली.

दाभोलकरांचा मारेकरी म्हणून संशयित सचिन अंदुरेला ताब्यात घेण्यात आले आहे. अंदुरेच्या मेहुण्यांकडून पिस्तुलासह तलवार, कुकरी, चाकू, एअरगन जप्त करण्यात आली़ या पिस्तुलानेच दाभोलकरांसह गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी सुरळे आणि रेगे यांना कर्नाटक एसआयटी ताब्यात घेणार आहे. यासाठी औरंगाबाद न्यायलायाकडे अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्नाटक एटीएसला शुभम सुरळेवर दाट संशय असून, तो गौरी लंकेश हत्या प्रकरणात सहभागी असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबतचे मत कर्नाटक पोलिस न्यायालयात मांडणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

अंदुरेला 'एटीएस'ने उचलल्यानंतर त्याने सासरी ठेवलेले लकी पिस्तुल 'एटीएस'च्या हाती लागले़ हे पिस्तुल अंदुरेने मेहुणा शुभम सुरळे, अजिंक्य सुरळेकडे सोपवले होते. त्यांनी ते रेगेकडे लपविले होते़ या तिघांचा कटामध्ये मोठा सहभाग आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी कर्नाटक 'एटीएस' चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेणार आहे. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, केसापुरी येथे शनिवारी शरद कळसकरच्या घरी जाऊन 'एटीएस'च्या पथकाने तपासणी केल्याचे समजते.

न्याय वैदयकीय अहवालाची प्रतीक्षा

रेगेकडून जप्त केलेले पिस्तूल तांत्रिक अहवालासाठी न्याय वैद्यकीय विभागाकडे पाठविण्यात आले आहे. हा अहवाल तातडीने मिळावा यासाठी एटीएसने पत्रव्यवहार केला आहे. या अहवालानंतर तपासाची दिशा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त तुकड्यांना मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित पाच महाविद्यालयांच्या अतिरिक्‍त तुकड्यांच्या प्रस्तावाला उच्च शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाला बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाची अतिरिक्‍त तुकडी मिळाली आहे.

विद्यार्थी इच्छित शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून उच्च शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन संबंधित विद्याशाखेच्या नवीन अतिरिक्‍त तुकड्यांना मान्यता देत आहे. ही नियमित प्रक्रिया दरवर्षी राबविण्यात येते. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी अतिरिक्‍त तुकड्यांसाठी विद्यापीठामार्फत उच्च शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. पाच प्रस्ताव मंजूर झाले आहेत. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाला बी. एस्सी. कॉम्प्यूटर सायन्स, तर इतर चार महाविद्यालयांना बी. एस्सी. अतिरिक्‍त तुकडी मिळाली आहे. कन्नड येथील शिवाजी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, देवगाव रंगारी येथील आसारामजी भांडवलदार कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, परळी (जि. बीड) येथील वैद्यनाथ महाविद्यालय, घाटनांदूर (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील वसुंधरा महाविद्यालयाचे अतिरिक्‍त तुकडीचे प्रस्ताव मान्य झाले. या तुकड्यांना कायम विनाअनुदान तत्त्वावर मान्यता देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालबाह्य माल देत कंपनीची अठरा लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कालबाह्य माल देत फार्मासुटीकल कंपनीची साडेअठरा लाखांची फसवणूक करण्यात आली. नोव्हेंबर २०१५ ते जुन २०१६ या कालावधीत हा प्रकार चिकलठाणा एमआयडीसीत घडला. या प्रकरणी मुंबई येथील सर्व्हायव्हल टेक्नॉलॉजीच्या मालकाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुमेध काकासाहेब गंगावणे (वय ४५, रा. हडको, एन ११, नवजीवन कॉलनी) यांनी तक्रार दिली. गंगावणे यांची चिकलठाणा एमआयडीसी भागातील कन्सेप्ट फार्मासुटीकल कंपनीत कामाला आहे. गंगावणे यांनी औषधी तयार करण्यासाठी लागणारा माईम पावडरचा कच्चा माल सर्व्हायव्हल कंपनीकडून खरेदी केला होता. या कंपनीने दुसऱ्याचे माईम लेबल लावून १८ नोव्हेंबर २०१५ रोजी साडेतेराशे किलोचा साठा गंगावणे यांना दिला होता. या मालाची तपासणी करण्यात आली असता हा कच्चा माल बनावट व कालबाह्य झाला असल्याचे निष्पन्न झाले. एकूण अठरा लाख ६६ हजाराचा हा माल आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गंगावणे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत चौकशी केल्यानंतर गंगावणे यांच्या कंपनीची फसवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी शनिवारी पोलिस ठाण्यात मुंबई, सेनापती बापट मार्ग येथील सव्हाव्हल टेक्नॉलॉजीसचे मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक दर्जा एजन्सीच्या हाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकार व्यावसायिक संस्थेची मदत घेणार आहे. कर्नाटक राज्याच्या धर्तीवर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. मात्र, दर्जा उंचावण्यासाठी व्यावसायिक संस्था करीत असलेल्या कामाबाबत साशंकता आहे. एजन्सीच्या कामात सूसुत्रता आणि पारदर्शकता राहील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठाच्या कुलगुरुंची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उच्च शिक्षणाच्या समस्यांवर चर्चा झाली आणि विद्यापीठांच्या कामगिरीचा आढावा घेऊन उच्च शिक्षणाचा व शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढविण्यासाठी उपाययोजना ठरविण्यात आली. याबाबत सहा ऑगस्टला उच्च व तंत्र शिक्षण सचिवांनी बैठक घेतली. कर्नाटकात विद्यापीठांच्या मानांकनात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दर्जा वाढवण्यात विद्यापीठांना मदत करण्यासाठी व उच्च नामांकनासाठी मदत करणाऱ्या रेटींग एजन्सीची नेमणूक करण्याचा शासन विचार करीत होते. अखेर याबाबत व्यावसायिक संस्थेची निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली समितीत मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, उच्च शिक्षण विभागाचे संचालक आणि 'रुसा'चे सहसंचालक यांचा समावेश आहे. समिती राज्यातील १३ विद्यापीठे व शंभर महाविद्यालयांची या पायलट प्रोजेक्टसाठी निवड करणार आहे. मानांकन उंचावण्यासाठी व्यावसायिक संस्थेची निवड करण्यासाठी लागणारी निविदा प्रक्रिया राज्य प्रकल्प संचालनालय (रुसा) पार पाडणार आहे. निविदा आल्यानंतर योग्य संस्थेची निवड समिती करणार आहे. सर्व विद्यापीठांसाठी एकसमान सामजंस्य कराराचा मसुदा तयार करण्यात येईल. सर्व विद्यापीठे संस्थेला अटी व शर्तीनुसार शुल्क देणार आहे. या समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असून समिती दर तीन महिन्यांनी कामाचा अहवाल सादर करणार आहे.

दरम्यान, मागील काही वर्षांपासून विद्यापीठ व शैक्षणिक संस्थात प्राध्यापक व कर्मचारी भरती झाली नाही. संशोधन करण्यासाठी पुरेसा निधी नाही. या प्राथमिक अडचणी दूर केल्यास दर्जा उंचावण्यास मदत होईल. मात्र, उच्च शिक्षण विभाग इतर राज्याप्रमाणे प्रयोग कशासाठी करीत आहे असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळात विचारण्यात येत आहे.

विद्यापीठाची घसरण

राष्ट्रीय मानांकनात राज्यातील विद्यापीठांचा दर्जा घसरणीला लागला आहे. या समितीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दर्जा चर्चेत आला आहे. शैक्षणिक, प्रशासकीय स्तरावर विद्यापीठाचा सावळागोंधळ नेहमी चव्हाट्यावर आला आहे. याबाबत राज्य सरकारने चौकशी समिती नेमली असून समितीने अहवाल नुकताच सादर केला आहे. राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी नसताना विभागीय स्तरावरही 'बामू'ची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनीच पाठ फिरवल्यामुळे शैक्षणिक दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे एखादी एजन्सी विद्यापीठाचा दर्जा कसा उंचावणार हा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात सर्वात महाग डिझेल औरंगाबादेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरात २०१८मध्ये दुसऱ्यांदा पेट्रोलच्या दराने ८७ रुपये प्रतिलिटरचा पल्ला गाठला. डिझेलचे शहरातील दर प्रथमच ७५ रुपये ६४ पैशांपर्यंत पोचले आहेत. महागड्या दरात डिझेलची विक्री करणाऱ्या शहरांमध्ये औरंगाबादचा मराठवाड्यात पहिला आणि राज्यात दुसरा क्रमांक आहे. महाग पेट्रोल विक्रीमध्ये शहराचा राज्यात पाचवा क्रमांक आहे.

राज्यात परभणीचे पेट्रोल सर्वात महाग आहे. दुसऱ्या स्थानी मराठवाड्यातील नांदेडचा क्रमांक असून, तेथे ८७ रुपये ५७ पैसे प्रतीलिटर दराने पेट्रोलची विक्री करण्यात आली. विदर्भातील अमरावतीला ८७.२३ रुपडे आणि बुलडाणा ८७.१४ रुपये प्रतीलिटर दराने पेट्रोल विकण्यात आले आहे. औरंगाबादचा महागड्या पेट्रोल दरात राज्यात चौथा क्रमांक लागत असून, येथे पेट्रोलचे दर ८७.०३ रुपयांपर्यंत पोचले आहेत. औरंगाबादकरांना २९ मे २०१८ रोजी सर्वाधिक ८७.२६ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची खरेदी करावी लागली होती. वर्षभरात दुसऱ्याला पेट्रोलचे दर ८७ रुपयांवर पोचले आहेत.

डिझेलच्या दराबाबत औरंगाबाद शहर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. एक लिटर डिझेलसाठी औरंगाबादच्या तुलनेत अमरावतीला २३ पैसे जास्त द्यावे लागतात. अमरावतीला सर्वाधिक ७५ रुपये ७८ रुपये प्रतीलिटर दर आहेत. औरंगाबादला ७५ रुपये ६४ पैसे प्रतीलिटर दराने डिझेलची विक्री होत आहे. औरंगाबादनंतर सोलापूरचा क्रमांक लागतो. तेथे ७५ रुपये २२ पैसे, तर परभणीत ७५ रुपये १६ पैसे आणि नांदेडला ७५ रुपये प्रति दराने डिझेलची विक्री होत आहे.

\Bआठ महिन्यांत आठ रुपयांची वाढ\B

एक जानेवारी २०१८ रोदी पेट्रोलचे दर ७८.८९ रुपये प्रतिलिटर होते. सप्टेंबरच्या सुरवातीला हे दर ८७.०३ रुपयांपर्यंत पोचले. आठ महिन्यांत आठ रुपये १४ पैसे रुपये प्रतिलिटर महाग झाल्याची नोंद आहे. २९ मे २०१८ रोजी ८७.२६ प्रतिलिटर पेट्रोल विक्री करण्यात आली होती. २९ मे २०१८च्या तुलनेत २३ पैसे कमी दराने पेट्रोलची विक्री होत आहे.

…………

\Bडिझेल ११ रुपयांनी महाग\B

एक जानेवारी २०१८ रोजी पेट्रोलचे दर ६४ रुपये ३९ पैसे प्रतिलिटर दराने विकण्यात येत होते. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला शहरात डिझेलचे दर ७५.६४ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोचले. २९ मे २०१८ रोजी डिझेलचे दर ७४ रुपये ८२ पैसे होते. या तुलनेत सध्या शहरात मिळणारे डिझेल हे प्रतिलिटर ८२ पैशांनी महाग झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपूर्व उत्साहात श्रीकृष्ण जन्मोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेगवेगळे धार्मिक विधी, सनई, चौघड्यांच्या मंगलध्वनीत तसेच पूजा-आरतीसह दिवसभरात झालेले रक्तदान शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, भजन गायन, फुले वाटप, प्रसाद वाटप यासारख्या कार्यक्रमांनी पैठण रोडवरील महानुभाव आश्रमात श्रीकृष्ण जन्मोत्सवाला प्रारंभ झाला. त्याच अपूर्व उत्साहात रात्री साडेअकरा वाजता मंगल अभिषेक, जन्मस्तोत्र पठण व मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. साक्षीला होते महानुभाव संप्रदायातील आचार्य, संत-महंत, साहित्यिक, प्रवचनकार, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रविवारी (२ सप्टेंबर) पहाटे पाचपासूनच विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. वेगवेगळ्या कार्यक्रम-उपक्रमांसह विविध स्पर्धेतील गुणवंतांनाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. रात्री उशिरा 'गीत बहार' या संगीत मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. राजेंद्र बन्सवालद्वारा संचलित 'भजन संध्या'ही वेधक ठरली. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त ट्रस्टच्या वतीने मंदिराची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंदिर व परिसर उजळला आहे. याच श्रृंखलेत सोमवारी (३ सप्टेंबर) सकाळच्या सत्रात साई वृंदावन कॉलनीतून श्रीकृष्ण मूर्तीची शोभायात्रा निघेल. या शोभायात्रेत श्रीकृष्ण विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य, बँड पथक सहभागी होईल. दुपारी बारा वाजता मंदिरात महाप्रसाद ठेवण्यात आला असून सायंकाळी सहा वाजता दहीहंडीचा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन महानुभाव ट्रस्टच्या अध्यक्षा महंत सुभद्राबाई शास्त्री कपाटे, सचिव व साहित्याचार्य महंत संतोषमुनी शास्त्री कपाटे, सुदर्शन महाराज कपाटे यांनी केले आहे.

\Bवर्षभर कार्यक्रमांची रेलचेल\B

महानुभाव आश्रमामध्ये वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रामुख्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व मंदिराच्या वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परमपूज्य नागराज बाबा यांनी श्रीकृष्ण चक्रवर्तींचे उपदेश, तत्त्व, मूल्य, शिकवणूक, कर्मफलात आसक्ती न ठेवता कर्तव्य कर्म करण्याची दिलेली शिकवण आदींचा प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने पैठण रोडवर महानुभाव आश्रमाची स्थापना करून श्रीकृष्ण मंदिराची स्थापना १९६४ मध्ये केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातनवरील बंदीच्या निषेधार्थ हिंदूत्ववादी संघटनांचा मोर्चा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सनातन संस्थेच्या संभाव्यबंदीच्या निषेधार्थ तसेच सनातनच्या साधकांचा छळ बंद करा, अशी मागणी करीत रविवारी दुपारी सनातन संस्था तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. समर्थनगर सावरकर चौकातून निघालेल्या या मोर्चाचा पैठणगेट, गुलमंडी मार्गे औरंगपुरा येथील बाळकृष्ण महाराज मंदिराच्या परिसरात समारोप करण्यात आला.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी पकडण्यात आलेले आरोपी सनातनचे साधक नाहीत, सनातनवरील बंदीची मागणी चुकीची आहे. सनातनच्या निर्दोष साधकांना छळू नका, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. सावरकर चौकातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, हिंदू विधिज्ञ परिषद, वारकरी संप्रदाय बजरंग दल, शिवप्रतिष्ठाण, रणरागिणी शाखा, राजमुद्रा ग्रुप, स्वराज्य मित्र मंडळ आदी सहभागी झाले होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या मोर्चामध्ये हजेरी लावली. निराला बाजार, पैठणगेट, टिळकपथ, औरंगपुरामार्गे बाळकृष्ण महाराज मंदिरात या मोर्चाचा समारोप झाला. यावेळी सनातनचे नंदकुमार जाधव यांचे भाषण झाले. सनातनचे सुरेश कुलकर्णी, शरद चावडा, प्रियंका लोणे यांच्यासह इतरांची यावेळी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांकडून बंदीचे स्वागत

$
0
0

औरंगाबाद : बीड बायपासवर शहर वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या जड वाहनबंदीच्या अमलबजावणीच्या पहिल्या दिवशी सातारा, देवळाई भागातील नागरिकांना सहा तासांसाठी दिलासा मिळाला. या कार्यवाहीचे सातारा, देवळाई परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. सातारा भागातील रहिवासी संजय कुलकर्णी म्हणाले, पोलिस आयुक्तांच्या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. 'एका आठवड्यासाठी का होईना? हा प्रयोग सर्वसामान्याच्या हिताचा आहे. यामुळे निश्चितच अपघाताच्या संख्येत घट होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो,' असे सोमनाथ शिराने यांनी सांगितले. सौरभ कुलकर्णी व जमील पठाण यांनीही या निर्णयाचे स्वागत करत हा आदेश कायमस्वरुपी लागू करावा, अशी सूचना केली. जमील पठाण म्हणाले, बीड बायपासच्या दोन्ही बाजुने सर्व्हिस रोड तयार झाल्यास या पद्धतीच्या बंदीची गरज पडणार नाही. मात्र, ही कार्यवाही दिलासादायक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच सप्टेंबरपर्यंत ट्रू जेटचे विमान रद्द

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद ते हैदराबाददरम्यानची ट्रू जेट कंपनीची हवाई वाहतूक सेवा पाच सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. तांत्रिक कारणामुळे ट्रू जेटचे विमान २६ ऑगस्टपासून रद्द करण्यात आले आहे. एक सप्टेंबरपासून ट्रू जेट विमान पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात होती, मात्र एक सप्टेंबरपासून पाच सप्टेंबरपर्यंत ट्रू जेट विमान सेवा रद्द असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ट्रू जेट कंपनीने हैदराबाद ते शिर्डी हे विमान सुरू केले आहे. त्यामुळे औरंगाबादला विमान नसल्याने हे विमान रद्द करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही विमान सेवा सुरू राहिल किंवा नाही, याबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिनी घाटी’त डे-केअर सेंटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील मिनी घाटी अर्थात जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारपासून (तीन सप्टेंबर) 'डे केअर सेंटर' सुरू होत आहे. या सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील हिमोफिलिया, सिकलसेल व थॅलेसिमेयाच्या रुग्णांवर उपचार; तसेच रुग्णांना रक्तघटक मिळणार आहेत. पहिल्या दिवशी नोंदणी केलेल्या ७२ रुग्णांना हे रक्‍तघटक देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुबेला, गोवर लसीकरण मोहीम नोव्हेंबरमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोवर या रोगाचे निर्मूलन व रुबेला या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात नोव्हेंबरमध्ये गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, सामाजिक संस्था प्रतिनिधी, चित्रपट गृहप्रतिनिधी, खासगी रुग्णालय प्रतिनिधीसह वैद्यकीय संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात नुकतीच घेण्यात आली.

या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डॉ. सय्यद मुजीब, आयएमएचे अध्यक्ष डॉ. कुलदीप राऊळ, डॉ. हिमांशू गुप्ता, प्रियाराणी पाटील, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ़ हर्षा देशमुख, डॉ. मेघा जोगदंड उपस्थित होते.

डॉ. मुजीब म्हणाले, की गोवर झाला की प्रतिकारशक्ती झपाट्याने कमी होते. त्यामुळे मुलांच्या शरिरात व्हिटामिन-ए ची कमतरता जाणवते. परिणामी बालकांची दृष्टी जाण्याची भीती असते. त्या व्यतिरिक्त डायरिया, न्यूमोनिया आदी आजार होण्याची शक्यता असते. रुबेला असलेल्या गर्भवती स्त्रीचे बाळ अनेक व्याधींनी ग्रस्त असते. नऊ महिने ते १५ वर्षे या वयोगटात रुबेलाचे रुग्ण आढळून येतात. रुबेला लसीकरणाच्या एका इंजेक्शनमुळे भावी पिढी आपण वाचवू शकतो. गोवर-रुबेलाचा समूळ नायनाट करण्यासाठी १४ नोव्हेंबरपासून मोहिमेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे प्रथमच १५ वर्षे वयोगटापर्यंतच्या बालकांना हे लसीकरण केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हार्ट फेल्युअर’मुळे सर्व अवयव प्रभावीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'हार्ट फेल्युअर'मध्ये हृदयाचे पंपिंग खूप कमी होते. त्यामुळे रक्तपुरवठा घटून बहुतांश अवयवांच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होतो आणि रुग्णाची एकूणच प्रकृती खालावत जाते. हे टाळण्यासाठीच अशा रुग्णांच्या हृदयाचे पंपिंग चांगले राहील, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. अलीकडेच उपलब्ध झालेले 'अर्नी' हे बहुमोल औषध 'हार्ट फेल्युअर'च्या रुग्णांसाठी एक उत्तम औषध म्हणून सिद्ध झाले आहे. या औषधामुळे रुग्णांचे आयुष्य किमान दोन वर्षांनी वाढते आणि त्याचवेळी जगण्याचा दर्जाही नक्कीच सुधारतो. त्यामुळे 'अर्नी'चा जरुर उपयोग करा, असे आवाहन बर्लिनचे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कार्सेन शोफे यांनी रविवारी (२ सप्टेंबर) कपकॉर्न परिषदेत केले.

'रोपळेकर हेल्थ केअर सेंटर', 'इंडियन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी' व 'फिजिशिअन्स असोसिएशन ऑफ औरंगाबाद'च्या वतीने शनिवारपासून (१ सप्टेंबर) सुरू झालेल्या दोन दिवसीय कपकॉर्न परिषदेचा रविवारी समारोप झाला. याच परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. शोफे यांनी 'हार्ट फेल्युअर'संबंधी महत्वपूर्ण बाबींकडे लक्ष वेधले. 'हार्ट फेलुअर'च्या रुग्णांमध्ये पंपिंग कमी होऊन रक्तपुरवठा कमी-कमी होत जातो. त्यामुळे हृदयावर मोठा परिणाम होतोच; पण बहुतांश इतर अवयवांच्या कार्यक्षमतेवरही गंभीर परिणाम होतो. अशा रुग्णांसाठी 'हार्ट ट्रान्स्प्लान्ट' हा सर्वोत्तम मार्ग असला तरी हृदय प्रत्यारोपण होईपर्यंत 'अर्नी' या औषधाचा वापर महत्वपूर्ण असल्याचे सिद्ध झाले आहे. सद्यस्थितीत या औषधाची किंमत जास्त असली तरी त्याचा उपयोग होणे अशा रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकते, असेही डॉ. शोफे म्हणाले. कोलेस्ट्रोल जेवढे कमी राहील तेवढे हृदय चांगले राहण्यासाठी उपयुक्त ठरते आणि कोलेस्ट्रोलची पातळी कमीत कमी ठेवण्यासाठी अलीकडेच 'पीसीएसके ९ इनहिबिटर' हे औषध खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे, असे भोपाळ येथील डॉ. पी. सी. मनोरिया यांनी परिषदेत सांगितले. 'पेसमेकर'विषयी पुणे येथील डॉ. आर. धोपेश्वरकर यांनी, तर 'पल्मोनरी आर्टरी हायपरटेन्शन'विषयी दिल्ली येथील डॉ. अनिल ढाल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याच परिषदेत डॉ. सतीश रोपळेकर यांचे गुरू डॉ. अशोक तुळपुळे यांच्या समरणार्थ मुंबई येथील शेखर अंबरडेकर यांनी ओरेशन सादर केले.

हवी २४ तास 'एबीपीएम' तपासणी

काहीजणांचा घरात, कामाच्या ठिकाणी रक्तदाब वाढलेला असता; पण डॉक्टरांनी तपासल्यावर तो सामान्य (नॉर्मल) आढळ‍ून येतो. त्याचवेळी काहीजणांचा कामाच्या ठिकाणी व दैनंदिन व्यवहारात रक्तदाब सामान्य असतो; पण डॉक्टरांकडून तपासताना तो वाढलेला असतो. त्यामुळे अशा दोन्ही प्रकारच्या केसेसमध्ये २४ तास 'अॅम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग' (एबीपीएम) महत्वाचे ठरते. यात विशिष्ट उपकरणाद्वारे संबंधित रुग्णाच्या रक्तदाबाची २४ तासांपर्यंतची नोंद घेतली जाते आणि त्याद्वारे अशा रुग्णांवर उपचार केले जातात. अशा केसेसमध्ये याच पद्धतीने उपचार व्हावेत, या नवीन युरोपियन मार्गदर्शक तत्वांची माहिती डॉ. सतीश रोपळेकर यांनी परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रान्सपोर्टचा आठ लाखांचा माल परस्पर लांबवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरात ट्रान्सपोर्टने लांबवलेला सव्वा आठ लाखांचा माल दोघांनी परस्पर लंपास केला. १८ ऑगस्ट रोजी कटकटगेट भागात हा प्रकार घडला. जिन्सी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणत संशयित आरोपीला अटक करून हा माल जप्त केला.

अकोला येथील सय्यद शकील सय्यद बिस्मिला यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. शकील यांनी शनिवारी जिन्सी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती. शकील यांनी १८ ऑगस्ट रोजी अकोल्यावरून महिंद्रा पिकअप या गाडीमध्ये शेतीच्या औषधाचे १२३ बॉक्स विविध ठिकाणी देण्यासाठी टाकले होते. वाहन चालक शेख सालेह चाऊस (वय ३५ रा. इंदिरानगर, बायजीपुरा) आणि अब्दुला अमोदी सईद आमोदी (वय ५३ रा. इंदिरानगर) या दोघांनी यापूर्वी त्यांचा माल नेल्याने त्यांना यांच्यावर विश्वास होता. शहरात विविध ठिकाणी या बॉक्सची डिलेव्हरी द्यायची होती. दरम्यान, या दोघांनी या मालाची डिलेव्हरी न करता कटकटगेट रोडवरील वॉशिंग सेंटरसमोर दुसऱ्या वाहनात हा माल परस्पर लोड करून घेऊन गेले. माल पोहचला नसल्याने व्यापाऱ्यांनी शकील यांच्याशी संपर्क साधला. शकील यांनी या दोघांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी अखेर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. जिन्सी पोलिसांनी तपास करीत संशयित आरोपी अब्दुला आमोदी सईद आमोदी याला अटक करीत हा माल जप्त केला. ही कामगिरी उपायुक्त निकेश घाटमोडे, एसीपी गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता शेळके, शेख रफीक, जमादार शेख हारुन, भगवान पटाईत, संजय गावंडे, गणेश नागरे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रदा मारोती संस्थानात गर्दीत पाकीटमारी करणारी टोळी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खुलताबाद येथील भद्रा मारोती संस्थानात गर्दीमध्ये पाकीटमारी करणाऱ्या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. पकडलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून औरंगाबाद शहरातील जयभवानीनगर भागातील रहिवासी आहेत.

शनिवारी खुलताबाद पोलिस ठाण्यात भाऊसाहेब रामकिसन पुनगळे वय ३८ रा. जयभवानीनगर या वकिलांनी तक्रार दाखल केली. पुनगळे शनिवारी खुलताबाद येथील भद्रा मारोती मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी पाकीटमारांनी ते दर्शन घेऊन बाहेर पडत असताना गेटजवळ त्यांचे पाकीट लांबवले होते. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी तीन संशयित व्यक्ती पुनगळे यांच्या पाठीमागे संशयास्पद हालचाली करीत असल्याचे दिसून आले. या तिघांना पाळत ठेवून रविवारी पकडण्यात आले. यामध्ये साहेबराव भिकाजी डुकले, ज्ञानेश्वर मनोहर यादव व ज्ञानेश्वर खैसराम रोकडे (सर्व रा. मुकुंदवाडी) यांचा समावेश आहे. पकडलेले आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाइल व रोख रक्कम असा एक लाख ३४ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधिक्षक उज्वला वनकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय सचिन कापुरे, नवनाथ कोल्हे, गणेश मुळे, बाळू पाथरीकर, शेख नदीम, रमेश सोनुने व बाबासाहेब नवले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला काँग्रेसच्या ध्वजाचे शहरात अनावरण

$
0
0

औरंगाबाद: महिला काँग्रेसचा ध्वज प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस अॅड. जयश्री शेळके यांच्या हस्ते महिला आघाडी शहराध्यक्ष सरोज मसलगे यांना नुकताच सुपूर्द करण्यात आला. हा कार्यक्रम शहागंज येथील गांधी भवनमध्ये घेण्यात आला.

या कार्यक्रमात, २०१९च्या लोकसभा निवडणूक जाहीरनामा समितीमध्ये सुस्मिता देव यांचे ठरावाद्वारे अभिनंदन करण्यात आले. राहुल गांधी यांनी राजकारणात महिलांना स्वतंत्र ओळख व महिला काँग्रेसला न्याय दिला आहे. त्यामुळे सर्व महिलांनी एकजुटीने पक्षकार्य करावे, असे आवाहन अॅड. शेळके यांनी केले. यावेळी महिला आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनीता तायडे, जिल्हाध्यक्ष सुरेखा पानकडे, छाया मोडेकर, सोशल मीडिया प्रमुख किरण कांबळे, संजीवनी महापुरे, ताहीर शेख, शशिकला मगरे, योगिता भिंगारे, वैशाली तायडे, मंगल लोखंडे, ललिता साळवे, अनुसया दणके, शकुंतला खरात, रंजना खरात आदींसह कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज शहरात दहीहंडीचा थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात रविवारी रात्री गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, सोमवारी सायंकाळी शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने गोविंदा पथकांचा थरार नागरिकांना अनुभवता येणार आहे.

श्रावण महिन्यात गोविंदा पथकांना दहीहंडी महोत्सवाचे वेध लागतात. यंदाही शहरात मोजक्याच दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुलमंडी चौकात अष्टविनायक गणेश मंडळ प्रस्तुत देवकीनंदन दहीहंडी, बाराभाई ताजिया चौकात तनवाणी मित्र मंडळाचा गोपाला दहीहंडी महोत्सव, टीव्ही सेंटर चौकात वंदे मातरम् दहीहंडी महोत्सव, पुंडलिकनगर चौकात प्रथमच आयोजित दयावान दहीहंडी, भाजपतर्फे बजरंग चौक व गजानन महाराज चौकातील दहीहंडी महोत्सव, निराला बाजार परिसरात समर्थ युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून गोविंदा पथक दहीहंडी फोडण्याचा सराव करत आहेत. त्यांना सोमवारी आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. दहीहंडीनिमित्त पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवतावाद जपण्याची गरज

$
0
0

औरंगाबाद - 'मानवतावादी मूल्य हाच खरा सामाजिकशास्त्राचा आत्मा आहे. महात्मा गांधींचे राजकीय वारसदार आपण झालो. पण, त्यांचे वैचारिक आणि व्यावहारिक वारसदार झालो नाही' असे प्रतिपादन डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी केले. ते सत्कार समारंभात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने पीएच. डी. आणि सेट- नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. विभागात शनिवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. प्रशांत अमृतकर, प्रा. शुजा शाकीर उपस्थित होते. 'सामाजिकशास्त्राचे सर्वात महत्त्वाचे मूल्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी झाली पाहिजे. हेच मूल्य व्यक्तीला श्रमशक्तीची दिशा देतात. कोणत्याही वादापेक्षा मानवतावाद महत्त्वाचा आहे. मानवतेच्या मूल्यांचा विकास सामाजिकशास्त्रात असतो. ते मूल्य जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे' असे ठोंबरे म्हणाले. नीता गडलिंग यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रियंका लाड यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images