Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बी. रघुनाथ स्मृतिसंध्येचे शुक्रवारी आयोजन

$
0
0

औरंगाबाद: साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त बी. रघुनाथ स्मृतिसंध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तापडिया नाट्यमंदिरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी रेखा बैजल यांना 'प्रलयंकार' या कादंबरीसाठी प्रसिद्ध साहित्यिक मिलिंद बोकील यांच्या हस्ते बी. रघुनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 'साहित्याची लोकनीती' या विषयावर बोकील विचार मांडतील. त्यानंतर सामाजिक अस्वस्थतेवर भाष्य करणाऱ्या उत्कृष्ट कवितांचा 'आज या देशामध्ये' कार्यक्रम होईल. चंद्रकांत काळे दिग्दर्शित या कार्यक्रमात विभावरी देशपांडे, अमित वझे, अपूर्व व चंद्रकांत काळे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल, प्रा. अजित दळवी आणि डॉ. आनंद निकाळजे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’च्या विरोधात आज सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराला संकटात लोटणारा समांतर जलवाहिनी प्रकल्प महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी औरंगाबाद पाणीपुरवठा खासगीकरण विरोधी नागरी कृती समितीने सोमवारी विशेष सभा आयोजित केली आहे. ही सभा स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेत सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत एक नवी, तिसरी समांतर जलवाहिनी सुरू करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा वीस वर्षांसाठी खासगी कंपनीच्या ताब्यात देण्याचा करार करण्यात आला. २०१२ मध्ये जलवाहिनीचे काम एसपीएमएल कंपनीला दिले. या कंपनीने २०१४ पर्यंत काम केले नाही. तरीसुद्धा करार रद्द न करता पालिका कंपनीला नोटीस देत राहिली. तब्बल दोन वर्षांनी एमपीएमएल कंपनीने 'औरंगाबाद वॉटर युटिलिटी' नावाची उपकंपनी स्थापन करून शहराचा पाणीपुरवठा ताब्यात घेतला. २०१४ ते २०१६ या काळात कंपनीने अत्यल्प काम केले. मात्र, साधन-सामुग्रीची खरेदी, करारानुसार करावयाच्या कामाची अंमलबजावणी, कराराच्या अटींची पूर्तता याबाबत चालढकल, अनियमितता, गैरव्यवहार, अवैध कारवाया आणि नियमबाह्य गोष्टी केल्याचे स्पष्ट झाले. चाळीस किलोमिटरपैकी फक्त चार किलोमिटर जलवाहिनीचे काम झाले. या जनहितविरोधी कंपनीच्या विरोधात नागरिकांनी पत्रे, निवेदने दिली. या योजनेच्या विरोधात काही नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या सभेला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कृष्णा भोगे, विजय दिवाण, प्रदीप पुरंदरे, कलीम अख्तर, एच. आर. ठोलिया, राजेंद्र दाते पाटील, विजय शिरसाट, अनंत आचार्य यांनी केले आहे.

\B...तर पुन्हा डाव सफल होईल \B

तत्कालीन महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर आणि ओमप्रकाश बकोरिया यांनी योजनेची सखोल चौकशी केली. योजना लोकहितविरोधी असल्याचा सडेतोड अहवाल देऊन ३० एप्रिल २०१६ रोजी करार रद्द केला. पालिकेच्या मंगळवारी (४ सप्टेंबर) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत करारावर पुन्हा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. संधीसाधू नेते आणि अधिकाऱ्याचा डाव सफल होऊ नये म्हणून सभा होणार असल्याचे समितीने निवेदनाद्वारे कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाच्या खंड खरिपाच्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असतानाही बोंडअळीमुळे खरिपाचे संपूर्ण गणित कोलमडले होते. यंदा पाऊसही नाही आणि उगवलेल्या पिकांवर बोंडअळी, खोड किडीने हल्ला केल्याने कापूस, मका व इतर पिकांच्या उत्पादनात सरासरी ३० ते ३५ टक्के घट येणार असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांमध्ये उत्पादनाला सर्वाधिक फटका बसणार आहे. मराठवाड्यातील पाऊस, पिकांच्या ३१ ऑगस्टपर्यंतच्या स्थितीबाबत कृषी विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अहवाल दिली आहे.

मराठवाड्यात मोठ्या क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात येते. यंदा तब्बल १५ लाख क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी केली, मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. कापूस उत्पादनात ३० ते ३५ टक्‍के घट येण्याचा अंदाज आहे. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत पावसाचे संकट कायम असताना दोन्ही जिल्ह्यांमध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा; तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यासह जालना, उस्‍मानाबाद, परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात काही जिल्ह्यांमध्ये रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून आले आहे. यंदा चार लाख ४६ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या तुरीची ऑगस्ट महिन्यातील पावसामुळे वाढ होत असल्याचे कृषी विभाग म्हणत असले तरी उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्के, तर सोयाबीनच्या उत्पादनात २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश घट ही औरंगाबाद जिल्ह्यातील आहे.

मराठवाड्यात पावसाच्या सरासरी ७९९ मिलिमीटरच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४७२.५० मिलिमीटर पाऊस बरसला असून आतापर्यंत पावसाळ्याच्या ९२ दिवसांपैकी ५० दिवस कोरडे गेले आहेत.

\Bऔरंगाबाद, बीड दुष्काळाच्या उंबरठ्यावर\B

औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने हे दोन्ही जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ७३ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सध्या दीडशेवर टँकर सुरू आहेत. पावसाच्या खंडामुळे कापूस उत्पादनात ३० ते ३५ टक्के, तर मूग पिकाची तब्बल ५० ते ६० टक्के घट होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. बीड जिल्ह्यातही कमी पावसामुळे जिरायत क्षेत्रावरील कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. ओलीताखालील कापसावर शेंदरी बोंडअळी, मावा, तुडतुडे व फूलकिडे या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड होता, मात्र १६, आणि १७ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. अनेक‌ ठिकाणच्या पिकांनी तग धरला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदानच मिळाले असले तरी पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिकांमध्ये घट होईल.

- डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रियांच्या संघर्षात पाठबळाची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ग्रामीण भागातील महिलांना पायाभूत सुविधा मिळत नाही. पाणी, स्वच्छतागृह, रोजगार, वेतन, शिक्षणासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. या परिस्थितीत आशादायक मार्ग काढण्याची गरज आहे' असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी डॉ. टी. पी. पाटील यांनी केले. ते चर्चासत्रात बोलत होते.

चिंचोली (लिंबाजी) येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचा गृहविज्ञान विभाग आणि होम सायन्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने 'भारतीय महिला - संधी आणि आव्हाने' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. मौलाना आझाद संशोधन केंद्रात चर्चासत्र झाले. यावेळी प्र-कुलगुरू प्रोफेसर अशोक तेजनकर, ग्राम रिसोर्स फॉर वुमनच्या कार्यकारी संचालक डॉ. रुक्मिणी राव, वत्सलाताई पाटील, रिना पाटील, शिल्पा पवार, डॉ. सुनंदा चांदे आणि पी. पी. सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी हिंदू कोड बिलात हक्क व अधिकार दिले. त्यामुळे महिलांना विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करता आली. तरीसुद्धा काही प्रमाणात हुंडा प्रथा, घरगुती हिंसा, रुढी-परंपरा या समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांची शिक्षणाची सरासरी कमी असल्यामुळे परिवर्तन आवश्यक आहे' असे तेजनकर म्हणाले. समाजातील विषमतेवर डॉ. रुक्मिणी राव यांनी भाष्य केले. 'जगणे हिच महिलांसाठी मोठी समस्या आहे. प्रत्येक क्षेत्रात मर्यादित संधी आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी वेतन मिळते. कारण त्यांच्या कार्याला ओळख व अस्तित्व नाही. हेच त्यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे. समाजाला विभागून महिलांची प्रगती होणार नाही. सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे' असे राव म्हणाल्या. चर्चासत्र समारोपाला डॉ. मंजुषा मोळवणे, प्रा. माया वंजारी, डॉ. बी. व्ही. मुरलीधरन, डॉ. विक्रमसिंह पवार, डॉ. वंदना बनकर, प्रतिभा आघार्डे उपस्थित होते. प्रा. भीमराज दळवी यांनी सूत्रसंचालन केले. या चर्चासत्रात २१५ संशोधकांनी शोधनिबंध सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंकरोडवर अवजड वाहनांच्या रांगा

$
0
0

वाळूज महानगर: बीड बायपासवरील मर्यादित काळांसाठी अवजड वाहनांच्या वाहतूक बंदीमुळे रविवारी ए एस क्लब ते पैठण लिंक रोडवर एका बाजुने रस्त्यावर जड वाहने उभी करण्यात आली. परिणामी या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने इतर चारचाकी व दुचाकी वाहनांनी राँगसाइड प्रवास केला.

या रस्त्यावर आधीच मोठे खड्डे असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या खड्ड्यामुळे गेल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. आता जड वाहने रस्त्यावरच उभी राहिल्याने इतर चारचाकी व दुचाकी वाहने राँगसाइडने प्रवास करत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. बंदीकाळात अवजड वाहने थांबवण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. लिंक रोडचा वापर वाळूज एमआयडीसीतील कामगार, उद्योजक, व्यावसायिक, नागरिक करतात. त्यांना नियोजित वेळेत कारखान्यात हजर राहावे लागते. या वाहतूक कोंडीचा परिणाम त्यांच्या वेळेवर होत आहे.

\Bघटनास्थळीच माहिती \B

मुंबई, नाशिक, धुळे या मार्गावरून येणाऱ्या अवजड वाहनचालकांना बंदीची माहिती नव्हती. ए. एस. क्लबपर्यंत आल्यानंतर पुढील मार्ग बंद असल्याचे पोलिसांकडून समजल्यानंतर त्यांनी रविवारी येथेच वाहने थांबवली. दरम्यान, बंदी काळात पैठण-पाचोड मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हरे कृष्णा, हरे रामा’चा गजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'हरे कृष्णा, हरे कृष्णा', 'हरे कृष्णा, हरे रामा'चा जयघोष, भजन आणि कीर्तन अशा उत्साही वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सिडकोतील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाला सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५० हजारांपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतील, असे महोत्सव आयोजकांनी 'मटा'ला सांगितले.

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघतर्फे (इस्कॉन) सिडकोतील राधा-कृष्ण मंदिरात रविवारी सायंकाळी सहा वाजता विविध वाद्यांच्या साथीने कीर्तनाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री आठ वाजता पंचामृत अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भजन, कीर्तनात भक्तगण तल्लीन झाले. हरे कृष्णा, हरे रामाचा महामंत्र हृदयाला वेगळीच अनुभुती देणारा होता. त्यानंतर साडेनऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. अकरा वाजता कीर्तन झाले. रात्री ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्णाची महाआरती करण्यात आली. रात्रीपर्यंत हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी एका हजार जोडप्यांनी पंचामृताने अभिषेक केला. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह राजपाल, उपाध्यक्ष संजय मंत्री, सचिव डॉ. यशवंत गाडे, स्वागताध्यक्ष अनिल गोयल, कार्याध्यक्ष राजेश भारुका, कोषाध्यक्ष राजेश भट यांच्यासह डॉ. सतीश उपाध्याय, दीपक अग्रवाल, सतीश वैष्णव, डॉ. शांतीलाल सिंगी, विजय अग्रवाल, किशोर राठी, पंकज भारसाखळे, डॉ. शशिकांत सहस्रबुद्धे, शरद अग्रवाल, दिलीप अग्रहारकर, रवींद्र करवंदे, गजानन देशमुख, राजेंद्र लोहिया, राजेश जाधव, विनोद चौधरी, सुभाष शेळके, राजेश गुप्ता, श्रीकांत जोगदंड, डॉ. प्रेमप्रभू उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात सोमवारी 'जन्माष्टमी' मंगळवारी 'नंदोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थापक आचार्य अभय चरणारवींद भक्तीवेदांत स्वामी प्रभुदास यांच्या जन्मदिनानिमित्त 'नंदोत्सव'चे आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींनीही दर्शनासाठी हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्रवाल युवा मंचतर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात

$
0
0

औरंगाबाद : अग्रवाल सभा व अग्रवाल युवा मंचतर्फे रविवारी अग्रसेन भवन येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मुलांनी श्रीकृष्ण व राधेची वेषभूषा केली. अग्रवाल सभेचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष रतनलाल अग्रवाल, सचिव ओमप्रकाश अग्रवाल, सहसचिव जगदीश अग्रवाल, कोषाध्यक्ष प्रदीप बगडिया यांनी दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. लहान मुलांनी केलेल्या आकर्षक वेशभूषेमुळे कार्यक्रमात रंगत आली. उपस्थित तरुणांनी दहीहंडी फोडली. यावेळी अग्रवाल महिला समिती अध्यक्षा सुनीता अग्रवाल, सचिव कविता आग्रवाल अग्रवाल, युवा मंच अध्यक्ष दीपक अग्रवाल, सचिव अनुप अग्रवाल अग्रवाल, बहु-बेटी मंडळ अध्यक्ष नीतू अग्रवाल, सचिव पूजा अग्रवाल, अग्रसेन भवनचे अध्यक्ष संजय टिबडीवाला, सचिव विजय अग्रवाल यांच्यासह मान्यवर व नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवोदितांच्या गायकीला रसिकांची दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शारदाबाई गोविंदराव देशमुख प्रतिष्ठानची विभागीय सुगम गायन स्पर्धा रंगली. दोन फेरीत नवोदित गायकांनी गायन कौशल्य दाखवत परीक्षकांची दाद मिळवली. चुरशीच्या अंतिम फेरीत स्पर्धकांनी गायकीचे कसब दाखवले.

कै. सौ. शारदाबाई गोविंदराव देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाडा विभागीय स्तरावर सुगम गायन स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या फेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या फेरीतून अंतिम फेरीसाठी तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली. अंतिम फेरी आणि संगीत महोत्सव एमजीएम कॅम्पसमधील आइन्स्टाइन सभागृहात झाला. या महोत्सवात विजय धोंडगे व विश्वनाथ दाशरथे यांचे शास्त्रीय गायन झाले. शास्त्रीय रागदारीतून दाशरथे यांनी महोत्सवाची रंगत वाढवली. त्यांना सुधांशू परळीकर, धनंजय जळगावकर, केदार देशमुख यांनी संगीत साथसंगत केली.

दरम्यान, सुगम गायन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बाळासाहेब पाथ्रीकर, प्रा. राजेश सरकटे, पं. विजय देशमुख, विश्वनाथ दाशरथे, डॉ. वैशाली देशमुख यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी देशमुख प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मीनल देशमुख यांची उपस्थिती होती. या स्पर्धेचे परीक्षण अतुल दिवे, मनीषा फणसळकर, अरविंद पिंगळे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक आणि रसिक उपस्थित होते.

\Bस्पर्धेतील विजेते

\Bलहान गट

प्रथम : रोहन देशपांडे

द्वितीय : युगंधरा केचे

तृतीय : इंद्रायणी जोशी

उत्तेजनार्थ : केतकी जोशी, स्वरांजली जगताप

मोठा गट

प्रथम : कैवल्य धुतेकर

द्वितीय : मनोज थोरे

तृतीय : अपूर्वा कुलकर्णी

उत्तेजनार्थ : चैती दीक्षित, प्रज्ञा वानखेडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’ ची सभा पुढे ढकला: एमआयएम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एमआयएम' पक्षाचे शिबिर चार सप्टेबर रोजी हैदराबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी महापालिकेत समांतर जलवाहिनीबद्दल विशेष सर्वसाधारण सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. 'एमआयएम'च्या शिबिराला उपस्थित राहण्यासाठी नगरसेवक जाणार आहेत. यामुळे समांतर जलवाहिनीची विषेश सर्वसाधारण सभा पुढे ढकावी, ही सभा सात सप्टेंबर रोजी घ्यावी, अशी विनंती करणारे पत्र विरोधी पक्षनेते जमीर कादरी यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले आहे. चार सप्टेंबरच्या सभेत नागरिकांच्या हिताचा निर्णय न झाल्यास कोर्टात धाव घेतली जाईल, असेही कादरी यांनी या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, समांतर जलवाहिनीकरिता यापूर्वी झालेल्या सभांत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या सभेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंगीच्या औषधांसह तीन तलवारी जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे पोलिसांनी गुंगीच्या औषधाचा साठा आणि तीन तलवारी जप्त केल्या. स्थानिक दहशतवाद विरोधी पथक व विशेष शाखेच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव शेणपुंजी भागातील एका व्यक्तीकडे अवैधरित्या विक्रीसाठी गुंगी व नशा आणणाऱ्या गोळ्यांचा मोठा साठा असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी औषध निरीक्षक वर्षा प्रवीण महाजन व राजगोपाल बजाज यांना बोलावून घेत सापळ्याचे नियोजन केले. पथकाने संशयित व्यक्ती सय्यद नबी उर्फ सय्यद लाल (वय ३२ रा. भारतनगर, रांजणगाव) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी गुंगीच्या गोळ्यांचा २६ बॉक्सचा साठा त्यांना आढळला. हा साठा एकूण २८ हजार ८९६ रुपयांचा आहे. तीन प्राणघातक तलवारी देखील घरामध्ये आढळल्या.

याप्रकरणी पोलिस ठाण्यात सहायक फौजदार गौतम गंगावणे यांच्या तक्रारीवरून औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शेषराव उदार, पीएसआय धोंडे, पीएसआय रेश्मा सौदागर, गोरख चव्हाण, युनूस पठाण, गौतम गंगावणे, दीपक इंगळे, अंबादास दौंड; तसेच औषध निरीक्षक वर्षा महाजन व राजगोपाल बजाज यांनी केली.

\Bमोठ्या प्रमाणात विक्री\B

शहरात गुंगीच्या व नशेच्या गोळ्याचे सेवन करणारे अनेक तरुण आहेत. रांजणगावसारख्या भागात मोठ्या प्रमाणात साठा आढळल्याने याची विक्री एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. सय्यद नबीने हा साठा कोठून आणला; तसेच तलवारी कशासाठी बाळगल्या याची चौकशी पोलिस करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीहंडी उत्सवासाठी जंबो पोलिस बंदोबस्त

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहीहंडी उत्सव शहरात सोमवारी सर्वत्र जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शहरात एकूण १४ सार्वजनिक दहीहंडी; तसेच विविध ठिकाणी ४८ लहान दहीहंडींचा यावेळी समावेश होता.

औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिकरित्या दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. या उत्सवानिमीत्त तरुणांची मोठी गर्दी जमा होते. यंदाच्या वर्षी देखील १४ मोठ्या मंडळांनी; तसेच लहान ४८ मंडळांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी पोलिसांकडे मागितली होती. शहरात दहीहंडी उत्सवादरम्यान काही अनुचित प्रकार होऊ नयेत म्हणून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये २७ पोलिस निरीक्षक, ३७ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, ८२५ कॉन्सटेबल, २२ महिला कॉन्सटेबल, गुन्हे शाखा व विशेष शाखेचे साध्या वेशातील कर्मचारी, आठ स्ट्रायकिंग फोर्स, राज्य राखीव दलाच्या दोन कंपनी, क्विक रिसपाँस टिमची दोन पथके, तसेच ३९ ठिकाणी फिक्स पॉइंट तैनात करण्यात आले होते. या पॉइंटवर एक अधिकारी व तीन कर्मचारी देण्यात आले होते. सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबससाठी टाटा कंपनीने बँक गॅरंटी भरली, आता प्रतीक्षा वर्क ऑर्डरची

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटीबसचा पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीने स्मार्टसिटीच्या एसपीव्हीच्या नावे बँक गॅरंटी भरली आहे. त्यामुळे आता या कंपनीला वर्क ऑर्डर देण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान येत्या एक महिन्याच्या काळात कंपनी एक सँपल बस उपलब्ध करून देणार आहे.

स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून सिटीबस सेवा सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पेरेशन या एसपीव्हीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार निविदा प्रक्रिया देखील करण्यात आली. तीनवेळा निविदा काढल्यानंतर टाटा कंपनीच्या निविदेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. या कंपनीबरोबर वाटाघाटी देखील करण्यात आल्या. वाटाघाटीच्या नंतर कंपनीने एका बसची किंमत २५ हजार रुपयांनी कमी केली. ३६ लाख ६५ हजार रुपयांना मिळणारी बस आता ३६ लाख ४० हजार रुपयांना मिळणार आहे. १०० बसेस टाटा कंपनीकडून पुरविण्यात येणार आहेत.

स्मार्टसिटी प्रकल्पाच्या अंतर्गत टाटा कंपनीला ९ कोटी १० लाख रुपयांचा मोबलायझेशन अॅडव्हान्स एसपीव्हीच्या माध्यमातून द्यावा लागणार आहे. या अॅडव्हानसाठी कंपनीने एसपीव्हीला स्टेट बँक ऑफ इंडियाची ९ कोटी १० लाख रुपयांची गॅरंटी दिली आहे. त्याशिवाय एक कोटी ४२ लाखांची सुरक्षा अनामत देखील कंपनीने भरली आहे. कंपनीने बँक गॅरंटी व सुरक्षा अनामत दिल्यामुळे आता या कंपनीला १०० सिटीबस पुरवठा करण्याची वर्क ऑर्डर द्यावी लागणार आहे. दरम्यानच्या काळात एक सँपल बस कंपनी एक महिन्याच्या आत उपलब्ध करून देणार आहे. सँपल बस आल्यावर वर्कऑर्डर दिली जाते की त्या अगोदर वर्कऑर्डर दिली जाते या बद्दल उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाची संपर्क भाषा एक असावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशातील प्रादेशिक भाषांची परंपरा आणि साहित्य अलौकिक आहे, मात्र प्रादेशिक भाषांमध्ये जवळीकता नाही. सर्वांना समजेल आणि व्यवहार करता येईल अशी देशासाठी एक संपर्क भाषा असावी. ती भाषा हिंदी असावी असे नाही. मात्र, कधीतरी देशाच्या भाषेसाठी आग्रही रहावे लागेल' असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर गिरीश्वर मिश्र यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी विशेष कार्यक्रम झाला. महात्मा फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ हिंदी कवी डॉ. अरुण कमल, कुलगुरू डॉ. गिरीश्वर मिश्र, साहित्यिक डॉ. दामोदर खडसे, कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे व विभागप्रमुख डॉ. सुधाकर शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदी भाषेच्या सद्यस्थितीवर मिश्र यांनी भाष्य केले. 'हिंदी भाषेशी अनेक लोकभाषा निगडीत आहेत. भारतात आणि बाहेरील देशातही हिंदी स्वीकारली गेली असून, संधी निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक भाषा अभिजात दर्जासाठी भांडत आहे, मात्र, दुर्दैवाने देशाची एक संपर्क भाषा नाही. संसद आणि सडक यांची एक भाषा असावी,' असे मिश्र म्हणाले.

हिंदी विभागाच्या योगदानावर कवी डॉ. अरुण कमल यांनी विचार मांडले. 'कोणत्याही भाषेचा शैक्षणिक विभाग कवींना जपतो. पण, कवी कवी आपल्याच भाषेतील विभागावर टीका करतात. संत तुलसीदास, मिराबाई, रोहिदास यांच्या रचना भक्तिपंथ असेपर्यंत टिकणार आहेत. इतर कवींच्या कविता फक्त हिंदी विभागांनी जपल्या. रामचरितमानस, कबीर भजन, मिराबाईचे भजनाच्या गायनाची स्वतंत्र शैली होती. दोहा व चौपाईची परंपरा नामशेष होत आहे. हिंदी विभागांनी डॉक्युमेंटेशनद्वारे परंपरा जतन करावी. विभागाचे समकालीन लेखकांवर संशोधन व लेखन करण्याचे काम महत्त्वाचे आहे,' असे डॉ. कमल म्हणाले.

प्रसारमाध्यमातील मोठ्या संधी असून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे असे डॉ. दामोदर खडसे म्हणाले. हिंदी विभागाच्या वाटचालीचे डॉक्युमेंटेशन करुन आगामी वाटचालीचे व्हिजन ठरवा असे आवाहन कुलगुरू डॉ. चोपडे यांनी केले. प्रास्ताविकात डॉ. सुधाकर शेंडगे यांनी विभागाची नेत्रदीपक कामगिरी सांगितली. लेखन व विचारांची परंपरा असलेला विभाग आहे. महनीय व्यक्तींनी योगदान दिले असून, या मार्गावरच वाटचाल सुरू आहे असे शेंडगे म्हणाले. डॉ. भारती गोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. संजय नवले, डॉ. संजय राठोड, डॉ. भगवान गव्हाडे यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

\Bमाजी विभागप्रमुखांचा सत्कार\B

हिंदी विभागाच्या ५० वर्षांच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या माजी विभागप्रमुखांचा विशेष सत्कार करण्यात आला. यात भगतसिंग राजूरकर यांच्या पत्नी अनिता राजूरकर, चंद्रदेव कवडे, नारायण शर्मा, कमलाकर गंगावणे, अंबादास देशमुख, गणेशराज सोनाळे, माधव सोनटक्के यांचा समावेश होता. एम. ए. परीक्षेत विशेष यश मिळवलेले मारुती शिंपले, अजय पाटोळे व शिल्पा खराबे या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नलवर पुन्हा अवतरले भिकारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौक, महावीर चौक व सिग्नल हे शहरातील महत्त्वाचे भाग आहे. या चौकात भिकारी महिला, बालकांची संख्या वाढली आहे. वाहनांच्या गराड्यात ते जीव धोक्यात घालून भीक मागतात. त्यांच्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत असून 'मुस्कान' योजना कागदावरच असल्याचे दिसत आहे.

क्रांतीचौक, महावीर चौक हे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचे चौक आहेत. पोलिसांनी मध्यंतरी केलेल्या कारवाईमुळे या चौकातील भिकारी येथून लुप्त झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा अवतरले आहेत. यामध्ये महिला, पुरूष व बालकांचा समावेश आहे. सिग्रलवर लाल दिवा लागताच ते वाहनांच्या गर्दीत घुसून भीक मागतात. काही जण वाहनांच्या काचा पुसून नंतर पैसे मागतात. या धोकादायक पद्धतीमुळे वाहनधारक देखील गांगरतो. हिरवा दिवा लागल्यानंतरही हे भिकारी रस्त्याच थांबत असल्याने वाहने पुढे काढण्याची कसरत करावी लागते. यामुळे मोठी दुर्घटना होऊन जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

\Bपोलिसांचे दुर्लक्ष\B

शहरातील भिकारी, अनाथ मुले, बालकामगार यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनाने मुस्कान योजना सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही मोहीम थंडावली आहे. पोलिसांसमोर अनेकजण भीक मागताना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिटेक्निकच्या साठ टक्के जागा रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असून मराठवाड्यात केवळ ४० टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत. विभागातील १९ हजार ४४५ जागांपैकी १२ हजार ४४५ जागा रिकाम्या आहेत. यामुळे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या भवितव्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

पॉलिटेक्निकल अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया २१ जून पासून सुरू झाली आहे. २० जुलैपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश फेरी प्रक्रिया पूर्ण होऊन ३१ ऑगस्टला पूर्ण प्रक्रिया संपली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेशाचे प्रमाण कमी आहे. मराठवाड्यातील तब्बल ६० टक्के जागा रिक्त आहेत. शासकीय कॉलेजांमधील जागाही रिक्त राहिल्या असून त्या कॉलेजांची वेगळी माहिती जमविण्याचे काम तंत्रशिक्षण विभागात सुरू आहे. याचा अहवाल राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने त्या जागांचे काय, याचा विचार तंत्रशिक्षण विभाग करत आहे. मराठवाड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्के जागा जास्तीच्या रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षी ५० टक्के जागा रिक्त होत्या. राज्यातील सर्व विभागांमध्ये कमी, अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. राज्यात यंदा एक लाख ३४ हजार ८०० जागांसाठी ५७ हजार ७७४ अर्ज सादर झाले. प्रत्यक्षात ५४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी कॉलेज रिकामे राहण्याची शक्यता आहे.

\Bजवळच्या संस्थेत समायोजन?\B

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने त्यांचा गंभीर विचार शासन व प्रशासकीय पातळीवर केला जात आहे. अनेक कॉलेजांमधील काही शाखांत दोन आकडी संख्येतही प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे या शाखांचे काय करायचे, त्या विद्यार्थ्यांना इतरत्र सामाऊन घ्यायचे का, यावर विचार केला जात आहे. रिक्त जागांमध्ये अनेक शासकीय तंत्रनिकेतनचा समावेश आहे. राज्यात ४३ शासकीय संस्था असून त्यापैकी दहा मराठवाड्यात आहेत. औरंगाबाद येथील शासकीय पॉलिटेक्निक संस्थेत प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या अधिक होती. शासकीयसह खासगी पॉलिटेक्निकमधील रिक्त जागांचा आढावा घेतला जात आहे.

..

मराठवाड्यात संस्था.. ६३

प्रवेश क्षमता ............१९ हजार ४९५

प्रवेश......................७ हजार

..

राज्यातील जागा १ लाख ३४ हजार ८००

अर्ज सादर ५७ हजार ७७४

प्रत्यक्ष प्रवेश ५४ हजार

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यायाधीशास धमकावणारा वकील तुरुंगात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

आरोपीविरुद्ध शिक्षेचा आदेश न देण्याबद्दल न्यायाधीशास धमकावणाऱ्या रामचंद्र किसनराव कागणे या ६७ वर्षांच्या वकिलास एका आठवड्याची साधी कैद व पाच हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले. दंड न भरल्यास कागणे यास आणखी दोन दिवस तुरुंगात राहावे लागेल.

परभणी जिल्हा न्यायालयातील वकील कागणे यास फौजदारी स्वरूपाच्या न्यायालयीन बेअदबीबद्दल (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालय प्रशासनात हस्तक्षेप हा एक गंभीर प्रकार आहे. वकिलाद्वारे असे कृत्य सहन केले जाऊ शकत नाही, असे मत कोर्टाने व्यक्त केले. हा निकाल लागताच न्यायालयात हजर व जामिनावर असलेल्या कागणेना लगेच ताब्यात घेऊन तुरुंगात रवानगी करण्यात आली. धमकी देऊन स्टेनो डायरी फेकणे, मोठ्या आवाजात न्यायालयीन अधिकाऱ्यास संबोधित करून न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करणे, हे निश्चितपणे गंभीर कृत्य आहे. वकील न्यायालयाचा शिष्टाचार राखण्यासाठी असले पाहिजेत, त्यांनी न्यायालयात हजर असलेल्यांसमोर आदर्श घालून दिला पाहिजे, असेही मत कोर्टाने व्यक्त केले

अ‍ॅड. कागणे हा गंगाखेड तालुक्यातील कागणेवाडीचा रहिवासी असून ३० वर्षांपासून परभणी जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करतो. परभणीचे त्यावेळचे हंगामी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक गोविंदराव बिलोलीकर यांनी कागणे विरुद्धचे हे प्रकरण २००६ मध्ये उच्च न्यायालयाकडे पाठविले होते. त्याचा आता १२ वर्षांनी निकाल लागला.

कागणे यांनी घडलेल्या घटनेचा जराही इन्कार केला नाही. उलट न्यायाधीशांनी प्रस्थापित न्यायालयीन प्रक्रियांचा भंग केल्याने आपण आपल्या अशिलाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे वर्तन केले, असा बचाव होता. हा बचाव अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की, वकिलानेच न्यायालयात असे वर्तन करणे कोणत्याही सबबीखाली क्षम्य नाही. न्यायालयाने दिलेला निकाल मान्य नसेल तर त्याविरुद्ध दाद मागण्याचे अन्य वैध मार्ग आहेत.

\Bस्टेनोची वही भिरकावली\B

न्यायाधीश बिलोलीकर यांनी ७ ऑक्टोबर २००५ रोजी कागणे यांच्या अशिलास बलात्काराबद्दल दोषी ठरविले. शिक्षेविषयी आरोपीचे म्हणणे ते ऐकून घेत असताना कागणे एकदम आरडा-ओरडा करू लागला. तो न्यायासनाकडे धावत गेला व स्टेनोची शॉर्टहँडची वही हिसकावून घेऊन भिरकावली. ती पब्लिक प्रॉसिक्युटरच्या डोक्यावर आदळली. कोर्टाच्या शिपायाने ती वही उचलून स्टेनोला दिली. पण कागणे यांनी ती हिसकावून घेत पुन्हा भिरकावून दिली. 'कोर्ट निकाल कसे देते तेच पाहतो. कोर्टाची दादागिरी चालू देणार नाही. इडियट मॅजिस्ट्रेट', असे रागाने ओरडत त्याने न्यायाधीश बिलोलीकर यांना धमकावले. या याचिकेत सरकारची बाजू महेंद्र नेरलीकर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बुक क्लब’द्वारे अवांतर वाचनाची गोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, पुस्तकांद्वारे सामाजिक-राजकीय मंथन घडावे, समाजभान यावे, तसेच सामाजिक जाणीव जागृती निर्माण होऊन डॉक्टरदेखील समाजाप्रती काही देणे लागतो, अशी विचारसणी विकसित व्हावी, या दृष्टिकोनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या 'उमंग' संघटनेमार्फत विद्यार्थ्यांसाठी 'बुक क्लब' हा उपक्रम सुरू आहे.

याच उपक्रमाचे आठवे पुष्प रविवारी (२ सप्टेंबर) गुंफले गेले व चार पुस्तकांवर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा रंगली. पुस्तकांवर विद्यार्थी बोलते झाले. शिवाय विषयांमधून डोकावणाऱ्या अनेक प्रश्न-उपप्रश्नांवरही विद्यार्थी बोलते झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात हा छोटेखानी उपक्रम घेण्यात आला. 'यश, अपयश आणि मी' या पुस्तकावर आकांक्षा डुकरे, 'पारधी' पुस्तकावर ज्ञानेश्वर काजळे, 'टर्निंग पॉईंट'वर धरती कुलकर्णी, तर 'प्राईड अँड प्रीज्युडाईज्ड'वर सोनल माहेश्वरी या विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी 'एमबीबीएस'च्या प्रथम वर्षापासून, आंतरवासिता सेवा देणारे ११० विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येक पुस्तकाची माहिती घेतल्यानंतर चे पुस्तक व त्यातील सामाजिक मुद्द्यांवर साधक-बाधक चर्चा झाली. वैद्यकीय विद्यार्थ्यांचे भावविश्व जाणून घेण्यासाठी सेवांकुर परिवारातील डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर व डॉ. सारंग माळी यांची उपस्थिती होती. यानिमित्त देशातील उपेक्षित आणि वंचित घटक यांच्यावर चर्चा झाली. डॉक्टर म्हणून आपण काय करू शकतो, यावरही विद्यार्थ्यांनी मते व्यक्त केली. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे 'व्हीजन २०२०' अपयशी ठरणार का आणि ते आजच्या तरुणाईचे अपयश आहे का, यावर बरीच चर्चा झाली. केवळ पुस्तकी शिक्षणाने माणसाचा सर्वांगीण विकास होत नाही, हेदेखील काही विद्यार्थ्यानी अधोरेखित केले. 'प्राईड अँड प्रीज्युडाईज्ड' या पुस्तकाच्या निमित्ताने लग्न आणि लग्नसंस्था यावर विद्यार्थ्यांनी मते मांडली. जीवनाच्या विविध टप्प्यांवरील प्रश्न आणि आव्हाने तसेच समाजातील विविध घटक आणि त्यांच्या समस्या यावर विद्यार्थ्यांनी आपसात संवाद साधला.

\Bवृद्धाश्रमाची गरज का?\B

'यश, अपयश आणि मी' या पुस्तकाच्या अनुषंगाने, आज आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याची गरज का पडत आहे, असा प्रश्न आकांक्षा डुकरे हिने उपस्थित केला, त्यावर मतमतांतरे व्यक्त झाली. आपल्या पालकांच्या प्रती स्वतःच्या जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने असेल, तर ही वेळच कधी येणार नाही आणि म्हणूनच ही जाणीव एकमेकांना करुन देणे, ही आजच्या काळाची गरज आहे, यावर विद्यार्थी भरभरुन बोलते झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोविंदा रे गोपाळा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'तुझ्या घरात नाही घागर उताणी रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा' असा जोरदार जल्लोष करीत सोमवारी जुन्या शहरात दहीहंडीचा उत्सव जोरदार साजरा झाला. गुलमंडी, बाराभाई ताजिया चौक, औरंगपुरा, निराला बाजार येथे तरुणाईने दहीहंडीच्या गाण्यावर थिरकत जल्लोष साजरा केला; तसेच मानाची दहीहंडी असलेल्या गांधी पुतळा येथे नवसार्वजनिक गणेश मंडळाने उत्तर प्रदेश, मथुरा येथून आलेल्या कला पथकाने आपली कला सादर केली.

शहागंज, गांधी पुतळा चौकात नवसार्वजनिक गणेश मंडळाने दहीहंडी उत्सव साजरा केला. मानाची समजल्या जाणाऱ्या या दहीहंडीला ४८ वर्षे पूर्ण झाले आहेत. मंडळाचे अध्यक्ष आनंद भारुका व कार्याध्यक्ष कैलास माने यांनी यावेळी मथुरा येथील कला पथकाला पाचारण केले होते. या पथकाने हिंदी, मराठी धार्मिक, ऐतिहासिक गाणी व नृत्य सादर करीत उपस्थीतांची मने जिंकली.

\Bदेवकीनंदन दहीहंडी महोत्सव

\Bशहराचे ह्रदयस्थान असलेल्या गुलमंडी चौकात अष्टविनायक गणेश मंडळप्रणित देवकीनंदन दहीहंडी महोत्सव समितीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. डीजेवर सैराट; तसेच दहीहंडीच्या पारंपारिक गाण्यावर तरुणाईने ठेका धरला होता. क्रेनवर लावलेली दहीहंडी व त्याभोवती गोलाकार पद्धतीने लावण्यात आलेले फ्लॅश लाइट यंदाचे आकर्षण ठरले. या लाइटच्या माध्यमातून चमकी सोडण्यात येत असल्याने हे दृष्य मनोहारी दिसत होते. अनेक दहीहंडी पथकांनी या ठिकाणी सलामी दिली. सलामी देणाऱ्या मंडळाना रोख रक्कम; तसेच स्मृतीचिन्ह देण्यात येत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैस्वाल, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, विकास जैन, उत्सव समिती अध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

\Bगोपाला दहीहंडी महोत्सव\B

गुलमंडीच्या अलीकडे असलेल्या बाराभाई ताजिया चौकात माजी आमदार किशनचंद तनवाणी मित्र मंडळाने गोपाला दहीहंडी महोत्सव साजरा केला. या ठिकाणी देखील क्रेन व फ्लॅश लाइटची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी देखील अनेक पथकांनी चार ते पाच थर लावत सलामी दिली. सलामी देणाऱ्या पथकांचे स्वागत करण्यात येत होते. या चौकात देखील हजारो तरुणांनी डीजेच्या गाण्यावर ठेका धरला होता. यावेळी व्यासपिठावर भाजपाचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, नगरसेवक राजू तनवाणी, बंटी तनवाणी, सचिन झवेरी, उत्सव समिती अध्यक्ष निलेश गट्टाणी आदींची उपस्थिती होती.

\Bअश्वमेध दहीहंडी महोत्सव\B

औरंगपुरा महात्मा फुले चौकात अश्वमेध क्रीडा मंडळातर्फे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सिने अभिनेत्री माधवी निमकर या दहीहंडीचे आकर्षण ठरली. यावेळी व्यासपिठावर अध्यक्ष अनिल मकरीये, विशाल पांडे, अॅड. राजू बनकर, बबलू घोषके, पंकज तांबोळी आदींची उपस्थीती होती.

\Bसमर्थ युवा प्रतिष्ठान\B

निराला बाजार एमपी लॉ कॉलेजच्या चौकात समर्थ युवा प्रतिष्ठाणच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे १२वे वर्ष आहे. या ठिकाणी गीत गुंजन ऑर्केस्ट्रा तरुणांचे आकर्षण ठरला. सुमधूर गीतावर यावेळी तरुणाईने ठेका धरला होता. यावेळी दहीहंडीचे संस्थापक अध्यक्ष अमित भांगे, आयोजक अॅड. निनाद खोचे, उत्सव समितीचे अध्यक्ष बिपीन नाईक, उपाध्यक्ष विश्वास खरवडे, डॉ. संकेत देशमुख, मनसेचे दिलीप चितलांगे, सुमीत खांबेकर, सतनामसिंग गुलाटी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टसिटी प्रकल्पासाठी अधिकारी नियुक्तीच्या मुलाखती, तीन पदांसाठी आले ४३ उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्टसिटी प्रकल्पाच्या एसपीव्हीसाठी तीन वरिष्ठ पदावर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याकरण्यासाठी महापालिकेत सोमवारी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी ४३ उमेदवारांनी हजेरी लावली.

स्मार्टसिटीसाठी औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही कंपनी एसपीव्ही म्हणून स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीसाठी संयुक्त मुख्याधिकारी ( जॉइंट सीईओ ), मुख्य वित्त अधिकारी आणि कंपनी सेक्रेटरी या पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी मुलाखती घेण्यात आल्या. जॉइंट सीईओ पदासाठी ३० उमेदवार मुलाखती देण्यासाठी आले होते, मुख्य वित्त अधिकारी पदासाठी ११ तर कंपनी सेक्रेटरीपदासाठी दोन उमेदवार मुलाखती देण्यासाठी आले होते.

मुलाखतीच्या पॅनलमध्ये एसपीव्हीचे मुख्याधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक, नोडल ऑफिसर सय्यद सिकंदर अली, मुख्य लेखाधिकारी एम.आर. साळुंके, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त मंजुषा मुथा यांचा समावेश होता. निवडण्यात आलेल्या उमेदवारांची नावे चोवीस तासात निश्चित केली जातील अशी माहिती सुत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेने बांधकाम परवानग्या थांबवल्या

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

घनकचरा व्यवस्थापनाचे काम असमाधानकारक असल्यामुळे नव्याने देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्या थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हे आदेश महाराष्ट्रासह तीन राज्यांसाठी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची दखल घेवून औरंगाबाद महापालिकेने सोमवारपासून नवीन बांधकाम परवानग्या देण्याचे थांबवले आहे. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी माहिती दिली. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून बांधकाम परवानग्या नव्याने न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जात आहे. बांधकाम परवानग्या तयार असतील तर त्यांची नोंद जावक रजिस्टरमध्ये करू नका, अशा सूचना नगररचना विभागाला देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images