Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कर्मचा-यांच्या तपासणीसाठी स्क्वॅड नेमा

$
0
0
शिक्षक, ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रशासनाने वेळोवेळी उपाययोजना करूनही त्याचा उपयोग झाला नाही. यापुढील काळात मुख्यालयी न राहणा-या कर्मचा-यांच्या तपासणीसाठी स्क्वॅड नेमा, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष नाहिदाबानो पठाण यांनी दिला.

पंढरपूरच्या यात्रेकरूंसाठी १२० बस सोडणार

$
0
0
आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकला जात असतात. विठ्ठल रूख्मीणीच्या दर्शनला जाणा-या भाविकांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध आगारातून १२० एसटी बस सोडल्या जाणार आहेत.

निवडणुकीच्या खर्चात प्रशासनाची कोटींची उड्डाणे

$
0
0
निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चासाठी मर्यादा घातली असली तरी प्रशासनाला मात्र कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत.

आमदार बंब यांच्यावर गुन्हा दाखल

$
0
0
नागपूर- मुंबई महामार्गावरील भानवाडी टोलनाका तोडफोड प्रकरणी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्यासह ६० जणांविरुद्ध शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रक्तनमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

$
0
0
शहर व परिसरात डेंगीचे रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य विभागांतर्गत संशयित तापाचे २३ रुग्ण आढळून आले होते. त्यांच्या रक्तनमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

वाहेगाव मुधलवाडी शिवारात दरोडा

$
0
0
पैठण तालुक्यातील वाहेगाव मुधलवाडी शिवारातील शेतवस्तीत रविवारी रात्री चार अज्ञात चोरट्यांनी हल्ला करत शेतवस्तीवरील महिलांना मारहाण करत ४३ हजाराचा ऐवज चोरून नेला.

MGM मध्ये हृदयरोगावर MCH अभ्यासक्रम

$
0
0
महात्मा गांधी मिशन (एमजीएम) वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अत्याधुनिक सेवा सुविधा आणि यशस्वी उपचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) एमसीएच या हृदयशस्त्रक्रियेतील (कार्डियो थोरासिक सर्जरी) अतिविशेषतज्ज्ञ अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे.

समांतर जलवाहिनी याचिका

$
0
0
औरंगाबाद शहराच्या समांतर जलवाहिनीमध्ये अनियमितता आहे असा आक्षेप घेणाऱ्या जनहित याचिकेत हायकोर्टाने नोडल एजन्सी नियुक्तीबाबत राज्य शासनाला विचारणा केली आहे.

निवडणुकीला आता बँक, LIC कर्मचारीही

$
0
0
येत्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला राष्ट्रीयकृत बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

मंडळ अधिकारी होणार तहसीलदार

$
0
0
मंडळ अधिकारी संवर्गाला नायब तहसीलदार पदावर प्रमोशन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नागपूर व कोकण विभागात मंडळ अधिका-यांचा प्रमोशनमध्ये २५ टक्के तर, उर्वरित महसूल विभागात ३३ टक्के वाटा असेल.

RSS चे मधुकरराव जोशी यांचे निधन

$
0
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुकरराव नरसिंहराव जोशी यांचे आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक असलेले मधुकरराव जोशी मुळचे ठाण्याचे रहिवासी होते.

रस्त्याच्या नुतनीकरणाला मंजुरी

$
0
0
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ए. एस. क्लब ते लासूर स्टेशन या मार्गाच्या नुतनीकरणाची निविदा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कार्यकारी अभियंता डी. एल. ताडे यांनी दिली.

पोस्टमन करणार आज उपोषण

$
0
0
एन.एफ.पी.ई आणि एफ.एन.पी.ओ या दोन टपाल खात्यातील मान्यता प्राप्त संघटनानी पोस्टमन व ग्रुप डी या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी देशभरातील पोस्टमन प्रधान पोस्ट कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन केले जाणार आहे.

आता पदाशिवाय काम करा

$
0
0
नव्या कार्यकारिणीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू असलेली धुसफूस संपलेली नाही. पद गेलेले नाराज पदाधिकारी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत 'कृष्णकुंज'वर धडकले आहेत.

पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्नशील

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रयत्नशील असून पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्याकरिता विविध उपक्रमांच्या माध्यमातून औरंगाबादेतील पर्यटन स्थळांची प्रसिद्धी व प्रचलनासाठी काम करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या मदतफेरीत ३४ हजार रुपये जमा

$
0
0
उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्तांसाठी तालुका काँग्रेसने काढलेल्या मदतफेरीत ३४ हजार ९४ रुपयांची मदत जमा झाली. माजी आमदार नितीन पाटील यांनी ही रक्कम जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कर्मचा-यांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार

$
0
0
जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन प्राधान्याने पुढाकार घेईल, असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या सेवाविषय प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.

गजानन महाराजांची पालखी उस्मानाबादच्या अंगणी

$
0
0
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या 'शेगाव' (जि. बुलढाणा) येथील संत श्री गजानन महाराजांची पालखी 'गण गण गणात बोते'बरोबरच विठूनामाच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात कळंब, ढोळी, उपळामार्गे उस्मानाबाद शहरात दाखल झाली.

नांदेडमध्ये २९.७८ टक्के पाणीसाठा

$
0
0
नांदेडमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील दोन मोठ्या, नऊ मध्यम व ८० लघु प्रकल्पात २९.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील आठवडयात तो २३.७७ टक्के होता.

विकासाच्या कामांसाठी सरकार कटिबद्ध

$
0
0
विकासाची कामे गावामध्ये पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे; पण ग्रामस्थांनीही सरकारच्या उपक्रमांना हातभार लावला पाहिजे,' असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, विशेष सहाय्य व अपारंपारिक ऊर्जा राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images