Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पुरुषी मानसिकतेमुळेच महिलांवर अत्याचार

$
0
0
आसारामबापू, तरुण तेजपाल प्रकरणे ही महिला अत्याचारच्या हिमनगाचे टोक आहे. प्राचीन काळापासून महिलांवर अत्याचार होत असून, त्याला पुरुषी मानसिकता कारणीभूत आहे.

कायद्याच्या बदलांमुळे गुन्ह्यांत वाढ

$
0
0
गेल्या वर्षापेक्षा शहरात या वर्षी ४४३ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. यामध्ये विनयभंग, दुचाकी, मोबाईल, जानवर चोरी आदींचा समावेश आहे. कायद्याच्या बदलामुळे गुन्हे दाखल होण्यामध्ये वाढ झाली असल्याचे स्पष्टीकरण पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दिले.

कच-यापासून वीजनिर्मितीचा संकल्प

$
0
0
कच-यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्धार पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या प्रकल्पासाठीची एजन्सी येत्या शंभर दिवसात निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘टीईटी’ नको ‘सीईटी’ हवी

$
0
0
‘टीईटी’ रद्द करून ‘सीईटी’ घ्या, डीटीएड, बीएडधारकांना न्याय द्या अशा घोषणा देऊन शेकडो डीटीएडधारकांनी सायंकाळी कँडल मार्च काढला. या वेळी सरकारी धोरणांचा, परीक्षा परिषदेचा निषेधाच्या घोषणांनी औरंगपुरा दणालला.

४७६ फायलींचा अहवाल सादर

$
0
0
स्थानिक संस्थाकर विभागात (एलबीटी) सादर झालेल्या ना हरकत प्रमाणपत्रांसाठीच्या तब्बल ४७६ फाइलचा अहवाल उपायुक्त सुरेश पेडगावकर यांनी आयुक्तांच्या नावे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एलबीटी अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी पेंडिंग फाइल निकाली काढण्याचे आदेश दिले.

रेडी रेकनर: रजिस्ट्रीसाठी गर्दी

$
0
0
जमिनीच्या सरकारी मूल्यात (रेडी रेकनर) येत्या एक जानेवारीपासून वाढ करण्यात येणार असल्यामुळे सोमवारी (३० डिसेंबर) दिवसभरात मुद्रांक व नोंदणी कार्यालयात रजिस्ट्रीसाठी मोठी गर्दी होती. दिवसभरात सुमारे अडीचशे मालमत्तांची रजिस्ट्री करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

घरफोड्या रंगेहाथ ताब्यात

$
0
0
घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहाथ पकडून चोप दिल्याची घटना सोमवारी पहाटे तीन वाजता सिडको एन ४ भागात घडली. या चोराला मुकूंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तैवान पपई बाजारात दाखल

$
0
0
फळाचा राजा आंबा बाजारात दाखल झाला आहे. त्यापाठोपाठ द्राक्षांची आवक वाढत असतानाच गेल्या काही दिवसांपासून तैवान पपईची आवकही बाजारात सुरू झाली आहे. ठोक बाजारात पपई ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलला मिळत असून येत्या काही दिवसात कर्नाटक, आंध्रची पपईही बाजारात दाखल होईल, अशी माहिती बाजार समितीने दिली आहे.

एव्हरेस्टच्या आधी आर्थिक अडचणींचे शिखर

$
0
0
माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वांत मोठे शिखर सर करण्यासाठी त्याने मोठी तयारी केली होती. मात्र, त्यापूर्वी आर्थिक अडचणींचे शिखर त्याला सर करावे लागत आहे.

लातूर शहर बससेवेसाठी केंद्र सरकारचे ३८ कोटी मंजूर

$
0
0
महापालिका निर्माण झाल्यापासून लातूर शहराच्या विकासासाठी पहिलाच प्रकल्प शहर वाहतुकीसाठी बसचा मंजूर झाला आहे. आमदार अमित देशमुख आणि महापालिका आयुक्त यांनी गेली चार महिन्यांपासून शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

विमानसेवा वाढविण्यासाठी हवी प्रवासी संख्येची हमी

$
0
0
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील विमानसेवेत वाढ करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने विमान कंपन्यांना केली, मात्र किमान ७० टक्के प्रवासी मिळण्याची हमी असल्याशिवाय विमानसेवेत वाढ करणे शक्य नाही, असे विमान कंपन्यांनी स्पष्ट केले.

रेडी रेकनर दरामध्ये ३५ टक्क्यांपर्यंत वाढ

$
0
0
शहर आणि परिसरातील रेडी रेकनर दरांमध्ये सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रेडी रेकनर दरांची माहिती प्राप्त झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांची पडताळणी सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. यंदा शहराजवळच्या बारा गावांचाही रेडी रेकनरमध्ये समावेश करण्यात आला आहे.

हॅपी न्यू इयर

$
0
0
नवे वर्ष म्हटले की आपण काहीतरी संकल्प करायचे ठरवितो. तो पुढेचे ३६५ दिवस टिकतो की नाही देव जाणे, पण काही चांगले करायचेच म्हटले तर रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच स्वतःला विचारा मी आज दुसऱ्यासाठी काय (चांगले) केले?

विद्यार्थ्यांचा प्रवास होणार ‘लोकल टू ग्लोबल’

$
0
0
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ई - लर्निंगच्या माध्यमातून धडे गिरवता यावेत यासाठी पालिका प्रशासनातर्फे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बारा शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

‘रिलायन्स’वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

$
0
0
पालिकेने जेवढी परवानगी दिली आहे त्यापेक्षा जास्त खोदकाम रिलायन्स या कंपनीने केले असेल तर या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश महापौर कला ओझा यांनी पालिका प्रशासनाला दिले.

डाव्या कालव्याची दुरवस्था

$
0
0
जायकवाडी धरणात या वर्षी समाधानकारक पाणीसाठा झाल्याने, धरणाच्या डाव्या कालव्यातून मंगळवारपासून सिंचनासाठी एक रोटेशन देण्यात येणार आहे. मात्र, डाव्या कालव्याची झालेल्या दुरवस्थेमुळे बहुतांश पाण्याचा अपव्यय होऊन लाभधारक शेतकरी पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘चुकीच्या प्रश्नांना पूर्ण गुण द्या’

$
0
0
परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आले. यामुळे गोंधळ निर्माण झाला असून चुकीच्या सर्वच प्रश्नांसाठी पूर्ण गुण द्या, अशी मागणी वाढत आहे.

चोर-पोलिसांचा लपंडाव

$
0
0
लेबरकॉलनीमध्ये मंगळवारी पहाटे चोर आणि नागरिक व पोलिसांचा लपंडाव रंगला होता. घराच्या छताचे पत्रे उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न या चोरट्याने केला होता. पोलिसांनी व नागरिकांनी तीन ते चार तास त्याची शोध मोहीम घेऊनही या चोरट्याला पकडण्यामध्ये यश आले नाही.

रस्त्यांसाठी महापौरांना घरचा आहेर

$
0
0
जुन्या शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात केला नाही, तर उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी सर्वसाधारण सभेत महापौर कला ओझा यांना दिला. या घरच्या आहेरामुळे महापौरही काही वेळ स्तब्ध झाल्या.

‘कचरा डेपो’ रद्द करा

$
0
0
मिटमिटा शिवारात कचरा डेपो करण्याचा विचार रद्द करा अशी मागणी या भागातील नागरिकांनी महापौर कला ओझा यांच्याकडे केली. कचरा डेपो करण्याचा विचार रद्द केला नाही, तर लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images