Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘सचिन’च्या प्रकृतीत सुधारणा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्राणिसंग्रहालयातील पांढरा वाघ 'सचिन' च्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून सचिन आजारी आहे. त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचे निदान झाले आहे. त्याशिवाय त्याला किडनीचा आजार देखील आहे. पुणे येथील डॉ. राजकुमार जाधव यांनी त्याची तपासणी केली होती. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी महापौरांनी प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन सचिनच्या प्रकृतीची चौकशी केली. डॉ. नीता सिंग सचिनवर उपचार करीत आहेत, सचिनची प्रकृती सुधारत आहे असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‌‌वाढदिवस...शिऊरकर

भाडे तत्त्वावर दिलेले वाहन केले लंपास

$
0
0

औरंगाबाद : किरायावर चालवण्यासाठी दिलेले वाहन घेऊन बाळराजे आवारे हा चालक पसार झाला आहे. तसेच २२ जुलै २०१७ ते ३ सप्टेंबर २०१८ या काळातील पैसेही त्याने दिले नाहीत. याप्रकरणी अंबडच्या आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष रामभाऊ जुमडे (वय ४०, रा. राजमाता जिजाऊ चौक, रेल्वे रुळाजवळ, मुकुंदवाडी) यांच्या मालकीची स्कॉर्पिओ व स्वीफ्ट कार ही दोन वाहने आहेत. एका वर्षापूर्वी जुमडे यांचा चालक विकास शिर्के यांच्या ओळखीचा बाळराजे रामराव आवारे (रा. महाकाळा, ता. अंबड) याने जुमडे यांची भेट घेतली. जुमडे यांची स्कॉर्पिओ त्याने महिना पंचवीस हजार रुपये भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेतली. एका महिन्यानंतर पंचवीस हजार रुपये किराया देत त्याने विश्वास संपादन करीत दुसरे वाहन हवे असे सांगितले. यामुळे जुमडे यांनी त्यांची कार दररोज बाराशे रुपये भाडेतत्वावर फेब्रुवारी महिन्यापासून दिली. या दोन्ही वाहनांच्या किरायाची रक्कम त्याने नंतर दिलीच नाही. तीन महिन्यानंतर त्याने कार वापस आणून दिली. तसेच पैसे आणून देतो असे सांगत स्कॉर्पिओ घेऊन तो पसार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनविसे’ मराठवाडा अध्यक्ष बडवेंचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षबांधणीचे सध्या जोरात प्रयत्न सुरू असताना पक्षातील एकनिष्ठ पदाधिकारी व 'मनविसे'चे मराठवाडा अध्यक्ष संज्योग बडवे यांनी आपला राजीनामा अचानकपणे 'मनविसे'चे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्याकडे पाठवला आहे. पक्षातील अंतर्गत घुसमटीला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

बडवे हे गेल्या बारा वर्षांपासून पक्ष स्थापनेपासून कार्यरत आहेत. पक्षामध्ये त्यांनी जिल्हा सचिव, शहर सचिव, रस्ते आस्थापना या आघाडीच्या पदावर काम केले. मनसेच्या वतीने शहरातील पहिल्या राजयोग दहीहंडीचे आयोजन २००८साली बडवे यांनी केले होते. २०१०मध्ये त्यांनी समर्थनगर प्रभागातून स्वत:च्या सासूविरुद्ध पालिका निवडणूक लढवली होती. २०१४पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मराठवाडा अध्यक्ष म्हणून बडवे कार्यरत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून 'मनसे'च्या पक्ष बांधणीला गती आली आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे एकाच महिन्यात दोन वेळेस शहरात दौऱ्यावर आले होते. पक्षातून बाहेर पडलेल्या नाराजांची भेट घेत त्यांना पक्षात पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या पूर्ण प्रकरणात पक्षात कार्यरत असलेल्या बडवे यांना अलिप्त ठेवण्यात आले असल्याचे दिसून आले. या राजीनाम्यात वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, पक्षातील वरिष्ठांकडून घुसमट होत असल्याने बडवे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगत आहे.

\Bविद्यमान पदाधिकाऱ्यांत नाराजी

\Bबडवे हे पक्ष स्थापनेपासून कार्यरत आहेत. त्यांना मानणारा मोठा गट मनसेमध्ये कार्यरत आहे. यामध्ये मनविसेच्या काही विद्यामान पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. बडवेच्या राजीनाम्यामुळे काही विद्यामान पदाधिकारी देखील पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी सध्या पदाला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे, आदित्यजी शिरोडकर साहेब यांचे मला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांचा मी ऋणी आहे.

- संज्योग बडवे

संज्योग बडवे यांच्या राजीनाम्याबाबत मला जास्त माहित नाही. मात्र, त्यांनी जर राजीनामा दिला असेल, तर त्याची कारणे नेमकी काय आहेत यााबाबत चर्चा करण्यात येईल. पक्षाबाबत काही नाराजी असेल, तर ती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

- जावेद शेख, राज्य उपाध्यक्ष, मराठवाडा निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंगीच्या औषधांची विक्री, आरोपीला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नशा व गुंगी आणणाऱ्या औषधींची अवैध विक्री करणारा आरोपी शेख सलीम उर्फ काला शेख यासीन याला मंगळवारी (४ सप्टेंबर) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपीला गुरुवारपर्यंत (६ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले.

या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल राजेंद्र देशमुख यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, तीन सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊला नेहरुनगर परिसरातील मोकळ्या जागेत नशेची औषधविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरुन फिर्यादी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, आरोपी शेख सलीम उर्फ काला शेख यासीन (३५, रा. नेहरुनगर, कटकटगेट) हा कारमध्ये प्रतिबंधक औषधांची विक्री करीत असल्याचे आढळून आले. या वेळी आरोपीकडून वेग‍वेगळ्या प्रकारच्या औषधी गोळ्या, चाकू, कार जप्त करण्यात आली व त्याच्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला मंगळ‍वारी अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीने गुंगीची औषधे कुठून, कोणाकडून आणली, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का, जप्त करण्यात आलेल्या कारचा मालक कोण आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीतून स्टीलचे जॉब पळवणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा एमआयडीसी भागातील कंपनीतून स्टीलचे जॉब पळवणाऱ्या आरोपीला सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. १९ ऑगस्ट रोत्री रात्री तेथील न्यू माकास्ट आर्यन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये हा प्रकार घडला.

क्षितीज प्रकाश अग्रवाल (वय ४०, रा. एन तीन, सिडको) यांची चिकलठाणा एमआयडीसी भागात न्यू माकास्ट आर्यन प्रा. लि. कंपनी आहे. १९ ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात चोरट्याने उघड्या शेडमधून स्टेनलेस स्टीलचे दोन जॉब व भंगार सामान असा तेरा हजारांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास केला असता हा गुन्हा ब्रीजवाडी येथील संशयित रवी रमेश गायकवाड (वय ३०) याने केल्याचे निष्पन्न झाले. रवीला अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुन्हेगार चावरिया ‘एमपीडीए’खाली स्थानबध्द

$
0
0

औरंगाबाद : गांधीनगर भागातील सराईत गुन्हेगार पवन राजकिरण चावरिया (वय २७) याला 'एमपीडीए' कायद्याअंतर्गत एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. मंगळवारी क्रांतीचौक व गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पवनवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात घातक शस्त्राने दुखापत करणे, अतिक्रमण करणे, खुनाचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ला, दंगल करणे, शस्त्र बाळगणे आदी कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी देखील त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. यामुळे त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी जारी केले. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी नागनाथ कोडे, एसीपी ज्ञानोबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, अनिल गायकवाड, जमादार द्वारकादास भांगे, इसाक पठाण, नंदकुमार संघवी, अनिल सातदिवे, अजय आवले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यासन केंद्रांची धूळ झटकणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अध्यासन केंद्राला गतिमान करण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. राजेश करपे यांच्या अध्यक्षतेखालील समिती अध्यासन केंद्राचा आढावा घेऊन शिफारशी करणार आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंगळवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

विद्यापीठातील अध्यासन केंद्रांची दूरवस्था चिंतेचा विषय ठरला आहे. निधी, जागा आणि कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे अध्यासन केंद्र अडगळीत पडली आहेत. अध्यासन केंद्रांसाठी स्वतंत्र जागा नसून उपक्रमांसाठी अत्यंत तुटपुंजी तरतूद असते. या निधीत फक्त महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतला जातो. संशोधन आणि व्यापक उपक्रमाला पूर्णविराम मिळाल्यामुळे अध्यासन केंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अध्यासन केंद्राला गतिमान करण्यासाठी त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. अध्यासन केंद्राचे स्वरुप कसे असावे, संचालकासाठी पात्रता काय असावी, संबंधित महापुरुषाच्या कार्याबद्दल संचालक किती जागरुक आहेत, संशोधनाचे स्वरुप काय असावे, याबाबत समिती आढावा घेणार आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे असून, डॉ. शंकर अंभोरे व डॉ. नरेंद्र काळे सदस्य आहेत. लवकरच ही समिती कामाला सुरुवात करणार आहे. उस्मानाबाद उपकेंद्रात विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शंभर मुलींची प्रवेश क्षमता असलेल्या वसतिगृहाला बैठकीत मान्यता देण्यात आली. परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिगंबर नेटके यांना निलंबित करण्याच्या मागणीवर काही सदस्य ठाम होते. मात्र, निलंबित करण्यासारखी चूक नेटके यांनी केली नाही. त्यामुळे निलंबनाची कारवाई योग्य ठरणार नाही असे कुलगुरू चोपडे यांनी सांगितले. किमान उस्मानाबाद उपकेंद्रात त्यांची बदली करा असा आग्रह सदस्यांनी केला. मात्र, सध्या परीक्षा विभागाचे काम वाढले असून नेटके यांची बदली केल्यास कामकाज कोलमडेल असे चोपडे यांनी सांगितले. त्यामुळे नेटके यांच्या बदलीच्या प्रकरणावर पडदा पडला. या बैठकीला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, लेखाधिकारी राजेंद्र मडके यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते.

\Bपुतळ्याचे भूमिपूजन लांबणीवर\B

विद्यापीठाच्या इतिहास वस्तूसंग्रहालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याबाबत ठराव घेण्यात आला आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी भूमिपूजन कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय मान्यता घेतल्या नसल्यामुळे भूमिपूजन कार्यक्रम लांबवणीर पडला आहे. आवश्यक मंजुरीसाठी शासकीय विभागांना पत्र पाठवण्यात येणार असून त्यानंतरच पुतळा उभारणीचे काम सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंगी औषध साठा; अजून एकास बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुंगी आणणाऱ्या औषधी गोळ्यांचा साठा विकणाऱ्या आणखी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सोमवारी कटकटगेट भागात ही कारवाई करण्यात आली. या आरोपीच्या ताब्यातून एकशेसाठ गोळया, एक चाकू व इंडिका कार जप्त करण्यात आली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कटकटगेट, नेहरूनगर भागात एक तरुण गुंगीच्या औषधाच्या गोळ्या अवैधरित्या विकत असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली होती. या माहितीवरून नेहरूनगर भागात सापळा रचण्यात आला. यावेळी तेथील मोकळ्या मैदानात इंडिका कारमध्ये संशयित आरोपी सलीम शेख यासीन उर्फ काला (वय ३५, रा. नेहरूनगर, कटकटगेट) हा आढळून आला. सलीमच्या कारची झडती घेतली असता कारच्या डॅशबोर्डमध्ये नायट्रोसन व स्पास्मो या गुंगीच्या गोळ्याच्या पावणेसातशे रुपयांच्या स्ट्रीप तसेच एक धारदार चाकू मिळाला. आरोपी यासीनला अटक करण्यात आली असून पीएसआय अमोल देशमुख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, औषधी निरीक्षक राजगोपाल बजाज, पीएसआय अमोल देशमुख, मारुती दसरे, नजीर शेख, नंदकुमार भंडारे, नसीमखान आदींनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहंदी टोळीची रवानगी हर्सूल कारागृहामध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुख्यात गँगस्टर इम्रान मेहंदी याला पळवून नेण्यासाठी आलेल्या टोळीची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना मंगळवारी (४ सप्टेंबर) कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपी टोळीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

इम्रान मेहंदीला कोर्टातून पळ‍वून नेण्यासाठी आलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. यामध्ये सरूफ खान शवूâर खान (वय ५०), नफीस खान उर्फâ मेवाती मकसूद खान (वय ४०, दोघे रा. मध्य प्रदेश), सय्यद फैâसल सय्यद एजाज (वय १८, रा. काला दरवाजा, किलेअर्कâ), मोहम्मद नासेर मोहम्मद फारूख (वय २६, रा. चंपाचौक, मुजीब कॉलनी), अबू चाऊस उर्फ मुसा चाऊस सालेह चाऊस (वय २६, रा. जटवाडा रोड), विजयकुमार उर्फ आफताब रामप्रसाद चौधरी (वय ३६, रा. बालकेश्वर, उत्तर प्रदेश), शेख रिजवान शेख जहीर (वय ३६, रा. आसेफिया कॉलनी) या आरोपींचा समावेश असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिसाला अश्लील शिविगाळ, जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस नियंत्रण कक्षात 'फोन ड्युटी₨'वर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याशी फोनवर अश्लील भाषेत शिविगाळ करून तिचा विनयभंग करणारा आरोपी चंद्रकांत विठ्ठल मगरे याचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी मंगळवारी (४ सप्टेंबर) फेटाळला.

या प्रकरणी पीडित पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २२ जुलै २०१८ रोजी सायंकाळी सात ते आठ दरम्यान फिर्यादी महिला पोलिस नियंत्रण कक्षात 'फोन ड्युटी'वर असताना आरोपी चंद्रकांत विठ्ठल मगरे (वय ४०, रा. पेठेनगर, भावसिंगपुरा) याने त्याच्या मोबाइलवरून नियंत्रण कक्षात फोन करून फिर्यादीला अश्लील भाषेत शिविगाळ केली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंवि ३५४ (ड) कलमान्वये गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, आरोपीचा फोन जप्त करावयाचा असून, गुन्हा करण्यामागे काय उद्देश होता, कोणी साथीदार आहे का, आणखी काही गुन्हे केले आहेत आदी बाबींचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे पाटील यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक प्रतिभा सन्मान सोहळा आज

$
0
0

औरंगाबाद : शिक्षक दिनाच्या निमित्ताने महापालिकेतर्फे बुधवारी ( ५ सप्टेंबर) शिक्षक प्रतिभा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पालिकेच्या शिक्षकांनी नवनिर्मितीच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांसाठी कथासंग्रह तयार केला आहे. 'मूठभर गोष्टी' या नावाने तयार केलेल्या कथासंग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार असून, कथा लिहिणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. सिडको एन ५ येथील संत तुकाराम नाट्यगृहात सकाळी दहा वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदकुमार घोडेले असतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस हजारांची लाच; पोलिस पाटील गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बोलठाण (ता. गंगापूर) येथील पोलिस पाटलाला वीस हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी हडको कॉर्नर येथे ही कारवाई केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच प्रकरण मिटवण्यासाठी या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराच्या बहिणीच्या पतीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद शिल्लेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तक्रारदार व त्याच्या बहिणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच पोलिसांना सांगून प्रकरण मिटवण्यासाठी पोलिस पाटील जब्बार सत्तार पठाण (वय ४४, रा. बोलठाण) याने तीस हजारांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी लाच मागितल्याची पडताळणी केली. यामध्ये तडजोडीअंती वीस हजार रक्कम घेऊन मंगळवारी तक्रारदाराला हडको कॉर्नर येथील चहाच्या टपरीजवळ जब्बार पठाणने बोलावले होते. या ठिकाणी पथकाने सापळा रचला. लाचेची रक्कम घेतल्यानंतर जब्बार पठाणला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक शंकर जिरगे, उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक नितीन देशमुख, निरीक्षण गणेश ढोकरट, विजय बाह्मंदे, रवींद्र देशमुख, सुनील पाटील व चालक राजपूत यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणशास्त्राच्या विद्यार्थ्यांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्वोच्च न्यायालयाने शाळा व महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र विषय शिकवण्यासाठी पूर्णवेळ शिक्षक नेमण्याचे आदेश देऊनही अंमलबजावणी झाली नाही. शेकडो विद्यार्थी नोकरी नसल्यामुळे बेरोजगार आहेत. हक्काच्या संधीसाठी विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

पर्यावरणशास्त्र विषयात पदवी-पदव्युत्तर, नेट-सेट, पीएच. डी. असलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एसएफआय संलग्नित पर्यावरण विद्यार्थी संघर्ष मंचने निदर्शने केली. शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर पर्यावरणशास्त्रासाठी पूर्णवेळ पात्र शिक्षकांची भरती करावी, इतर विषयाच्या शिक्षकांना पर्यावरणशास्त्र विषय शिकवण्यापासून परावृत्त करावे, पर्यावरणशास्त्र पदवीधारकांवरील अन्याय दूर करावा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त जागा भराव्यात, पर्यावरणशास्त्र विषय एका सत्राचा न ठेवता दोन सत्रांचा करावा, कनिष्ठ महाविद्यालयांतील ५० गुणांचा पर्यावरणशास्त्राचा विषय १०० गुणांचा करावा, शासकीय वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये पर्यावरणशास्त्र विषय ऐच्छिक स्वरुपात सुरू करावा या मागण्या करण्यात आल्या. वन विभागाच्या परीक्षेत पर्यावरणशास्त्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पात्र ठरवावे, नगरपरिषदेतील पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक या परीक्षेसाठी केवळ पर्यावरणशास्त्र पदवीधारकांना पात्र समजण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.

दरम्यान, याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात समन्वयक स्टॅलिन आडे, मारुती राऊत, विनोद खवचट, रामेश्वर घेतले, रवी खंदारे, रमेश परमेश्वर, ज्ञानेश्वर वाघ, विवेक कांबळे, ओंकार जोगदंड, प्रा. योगेश खोसरे, सत्यजित म्हस्के, लोकेश कांबळे, नितीन वावळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

\Bप्रमुख मागण्या

\B- महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन अधिकारी पदासाठी पर्यावरणशास्त्र विषयातील पदव्युत्तर उमेदवाराला पात्र समजावे

- महापालिकेतील पर्यावरण संवर्धन अधिकारी आरोग्य निरीक्षक आणि पर्यावरण निगडित पदांसाठी पर्यावरणशास्त्रातील पदव्युत्तरांना पात्र समजावे

- पर्यावरणीय प्रयोगशाळेचा परवाना फक्त पर्यावरणशास्त्र विषयातील पदवीधारकांनाच मिळावा

- पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी प्रत्येक कंपनीत पर्यावरण अधिकारी नेमावा

- भूगोल, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांचे शिक्षक पर्यावरणशास्त्र विषय शिकवतात. या धर्तीवर पर्यावरणशास्त्राच्या उमेदवारांना वरील विषय शिकविण्याची परवानगी द्यावी

- उच्च शिक्षण संचालनालयाने पर्यावरणशास्त्र विषय ई-लर्निंगद्वारे शिकवण्याबाबत काढलेले परिपत्रक तात्काळ रद्द करावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाचे आमिष दाखवून शोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे आमिष दाखवून बावीस वर्षांच्या तरुणीचे गेल्या चार वर्षांपासून लैंगिक शोषण केले. तसेच गोळ्या खावू घालून अवैधरित्या गर्भपात केला. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात बलात्कार व अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका बावीस वर्षांच्या तरुणीची चार वर्षापूर्वी संशयित आरोपी उद्दल राजपूत (वय २५, रा. वैजापूर) याच्यासोबत ओळख झाली होती. या ओळखीतून राजपूत याने तिच्याशी परिचय वाढवला. लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी शोषण केले. ही तरुणी गर्भवती राहिली असता राजपूतने तिला गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्तीने खाऊ घातल्या. तिचा अवैधरित्या गर्भपात करत तिला ठार मारण्याची तसेच बदनामीची धमकी दिली. याप्रकरणी रविवारी पीडित तरुणीने अखेर सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी उद्दल राजपूत याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात बलात्कार करणे, मारहाण, गर्भपात करणे व अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीपी गुणाजी सावंत या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंगीच्या गोळ्यांची एमआयडीसीत दामदुपटीने विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुंगीच्या औषधांचा साठा बाळगणारा आरोपी सय्यद नबीने नाशिकवरून हा साठा आणल्याची कबुली दिली आहे. तो दाम दुपटीने या गोळयांची विक्री एमआयडीसी परिसरातील रिक्षाचालकांना करीत होता.

आरोपी नबीला दहशतवाद विरोधी पथक व विशेष शाखेने सोमवारी रांजणगाव परिसरात अटक केली आहे. सय्यद नबी उर्फ सय्यद लाल (वय ३२, रा. भारतनगर रांजणगाव) याच्या घरावर सोमवारी पथकांनी छापा टाकला. यावेळी त्याच्या ताब्यातून गुंगी व नशा येणाऱ्या औषधी गोळ्यांचा अठ्ठावीस हजारांचा साठा तसेच तीन तलवारी जप्त केल्या. नबीला पोलिस आयुक्तालयात आणत त्याची चौकशी केली. यामध्ये त्याने हा साठा नाशिक येथून आणल्याची माहिती दिली. इतक्या मोठ्या प्रमाणात बिल नसताना हा साठा नबीला कसा काय दिला याबद्दल पोलिसांनाही नवल वाटत आहे. या साठ्यामध्ये दहा गोळ्यांची एक स्ट्रीप आहे. मेडिकल चालक विना प्रिस्किप्शन या गोळ्या देत नाहीत. त्यामुळे नबी या गोळ्यांची नशेबाजांना दामदुपटीने विक्री करीत होता. वाळूज एमआयडीसी परिसरातील रिक्षाचालक त्याचे मोठ्या प्रमाणात ग्राहक असल्याचीही माहिती त्याने पोलिसांना दिली. अधिक तपासासाठी नबीला वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

\Bस्वत: घेतो ४५ गोळ्यांचा डोस

\Bआरोपी नबीला पकडल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासमोर त्याला हजर करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. नबीला स्वत: किती गोळ्या दररोज घेतो अशी विचारणा करण्यात आली. यावेळी त्याने दिवसभरातून तब्बल पंचेचाळीस गोळ्यांचा दररोजचा डोस असल्याची कबुली दिली. यामध्ये सकाळ दुपार व संध्याकाळ त्याला प्रत्येकी पंधरा गोळ्या घेतल्याशिवाय जमत नसल्याचे त्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोचिंग क्लासचालकांना पोलिसांच्या सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्तालयात मंगळवारी कोचिंग क्लासेस चालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये पार्किंगची सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरा, विद्यार्थिनी छेडछाड या विषयावर चर्चा करण्यात आली.

शहरात अनेक कोचिंग क्लासेसच्या बाहेर बेशिस्तपणे त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहनांची पार्किंग केली जाते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच कोचिंग क्लासेसच्या बाहेर टवाळखोरांकडून छेडछाडीचे प्रकार होत असल्याचे दिसून आले. या प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. या अनुषंगाने वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील कोचिंग क्लासेस चालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीला शहरातील ८५ क्लास चालकांची उपस्थिती होती. यावेळी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पार्किंगची सुविधा करावी, क्लासबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, विद्यार्थिनीला छेडछाड होत असल्यास तक्रारीसाठी आयुक्तालयातील व्हॉटस् अप क्रमांक देखील क्लासचालकांना देण्यात आले. यावेळी एसीपी हनुमंत भापकर, निरीक्षक भारत काकडे, मुकुंद देशमुख आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनींच्या कामावरून सेना नगरसेवकानी डागली तोफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

वॉर्डांमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे काम होत नाही, वारंवार पाठपुरावा केला तरी अधिकारी चालढकलपणा करतात, असे असताना पदाधिकारी मात्र मस्त आहेत. त्यांना नगरसेवकांशी काही देणे घेणे नाही, असा आरोप शिवसेनेच्याच नगरसेवकाने करीत आपल्याच पदाधिकाऱ्यांवर तोफ डागली. यामुळे व्यथित झालेल्या सभागृहनेत्यांनी अधिकाऱ्यांकडून शिवसेनास्टाईल काम करून घेऊ, असा इशारा दिला, पण त्यांचा हा इशारा सर्वसाधारण सभा संपवून महापौरांनी गुंडाळून ठेवला.

समांतर जलवाहिनीच्या काराराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांनी त्यांच्या वॉर्डात जलवाहिनी टाकण्यात येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, सातारा - देवळाई भागाला समांतर जलवाहिनीचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही, पण त्याच बरोबर आमच्याही वॉर्डात जलवाहिन्या टाकण्याचे काम झाले पाहिजे. एक - दीड वर्षापासून आम्ही फाइल घेऊन फिरत आहोत, पण अधिकारी दाद देत नाहीत. फिरवाफिरवी करतात. दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांच्या अशा तक्रारींकडे पदाधिकारी लक्ष देत नाहीत. पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या फक्त बैठका घेतात आणि आपले इस्पित साध्य करून घेतात. त्यांना नगरसेवकांशी काही देणे घेणे नाही. अधिकारीही त्यांचे ऐकत नाहीत, असे सीताराम सुरे तावातावाने म्हणाले. त्यातच भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी देखील जलवाहिनीच्या कामाच्या समस्या मांडल्या. त्यामुळे सुरे - वानखेडे यांच्यात शाब्दिक चकमक देखील उडाली.

तेवढ्यात सभागृहनेते विकास जैन आक्रमक झाले. नगरसेवकांचे काम अधिकारी ऐकत नसतील तर शिवसेना स्टाईलने त्यांच्याकडून काम करून घ्यावे लागेल, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी भूमिगत गटार योजना आणि एलईडीच्या कामाचा उल्लेख केला. जैन बोलत असताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी हस्तक्षेप केला. आजची सभा समांतर जलवाहिनीबद्दल आहे. त्यामुळे दुसरे विषय चर्चेला नको, असे म्हणत त्यांनी राष्ट्रगीत पुकारले, परंतु संतापलेल्या जैन यांनी राष्ट्रगीताची सीडी लावणाऱ्या इलेक्ट्रिशीयनला थांबण्याची सूचना केली. आताच राष्ट्रगीत सुरू करू नका, असे ते म्हणाले, पण तोपर्यंत सभागृहातील नगरसेवक राष्ट्रगीतासाठी उभे राहिले होते व सीडीवर राष्ट्रगीत देखील सुरू झाले होते. त्यामुळे जैन यांना गप्प उभे रहावे लागले. सभा संपल्यावर त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना एकत्र करून आयुक्तांना घेराव घातला. यावेळी महापौर कानाडोळा करून निघून गेले.

भाजप नगरसेवकही निघून गेले

शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यावर भाजप नगरसेवकांनी काही वेळ त्याचा 'आनंद' घेतला. त्यानंतर ते सभागृहाच्या बाहेर निघून गेले. सभागृहात फक्त शिवसेनेचेच नगरसेवक व पदाधिकारी शिल्लक राहिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग: वॉर्ड बॉयचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीत शस्त्रक्रियेनंतर स्ट्रेचरवर ठेवलेल्या २० वर्षीय तरुणीचा विनयभंग करणारा घाटीचा वॉर्ड बॉय व आरोपी राजू रामकुमार शिरस्वाल याचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी मंगळवारी (४ सप्टेंबर) फेटाळला.

या प्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, एक सप्टेंबर २०१८ रोजी पीडित तरुणीवर घाटीमध्ये शस्त्रक्रिया झाली आणि शस्त्रक्रियेनंतर तरुणीला स्ट्रेचरवर ठेवले होते. त्यावेळी आरोपी राजू रामकुमार शिरस्वाल (वय ३६) याने तिचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने दिल्यावरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंवि ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला सोमवारी (३ सप्टेंबर) अटक करून मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आरोपीने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, गुन्हा करण्यामागचे नेमके कारण काय, यासह घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करणे बाकी आहे. तसेच आरोपीला जामीन मंजूर केल्यास आरोपी साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो किंवा पुरावा नष्ट करू शकतो. त्यामुळे आरोपीचा निममित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे पाटील यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाई चौकात होणार उड्डाणपूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

देवळाई चौकातील होणारे अपघात थांबविण्यासाठी शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग तसेच या मार्गावर देवळाई चौकात उड्डाणपूल तयार करण्याचा प्रस्ताव द्या, या उड्डाणपुलाच्या कामासाठी खर्चाची आर्थिक तरतूद करून देण्यात येईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी धरणे आंदोलनात केली.

देवळाई चौकात उड्डाणपूल व भुयारी मार्ग करावा यासाठी बुधवारी (५ सप्टेंबर) धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विनायक हिवाळे पाटील यांनी केले. या आंदोलनात माजी महापौर तथा नगरसेवक राजु शिंदे, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे पाटील, नगरसेवक गोकुळ मलके यांच्यासह मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, लक्ष्मण देशमुख, मीराताई काळे, वैभव राठोड, बाजीराव हिवाळे, आकाश बिराजदार, अप्पासाहेब शिंदे, सरीता रणवीर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

अनेक वर्षांपासून नागरिकांची भुयारी मार्ग करावा, अशी मागणी आहे. एनएचआयच्या माध्यमातून उड्डाणपूल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तो प्रकल्पही आता रखडला आहे. यामुळे देवळाई चौकात भुयारी मार्ग करा किंवा उड्डाणपूल करण्याची मागणी विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासमोरही मागणी ठेवण्यात आली. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना धरणे आंदोलनात बोलावून घेतले. चौकातील अपघातात कोणाचाही जीव जाऊ नये यासाठी शिवाजीनगर येथे रेल्वे विभागासमोर भुयारी रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी निधीची तरतूद करावी, तसेच देवळाई चौकात उड्डाणपूल तयार करण्यासाठी संबंधीत विभागाने प्रस्ताव तयार करून मुंबईला पाठवावा, हा प्रस्ताव मान्य करून यासाठी विशेष निधी देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असा शब्द विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिला. त्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले.

………………

साइड रस्ते करा …

बीडबायपास रोडवर अनेक समस्या कायम आहेत. बीडबायपास रोडच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेवर डांबरीकरण केल्यास, या रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडी कमी होईल. डावीकडे जाणाऱ्या वाहनांना तसेच ट्रक निघून जाण्यासाठी रस्ता तयार होईल. याशिवाय रस्त्यावरून पाणी जाण्यासाठी नाल्या करणे, तसेच वेगवान गाड्यांना वेगमर्यादा लागू करून स्पीड लिमीटचे बोर्ड लावण्यात यावे, अशीही सूचना हरिभाऊ बागडे यांनी केली.

..................

अपघात रोखण्यासाठी कृतीची पावले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपास रोडवर सातत्याने होत असलेल्या अपघातांची मालिका थांबविण्याच्या दृष्टीने आज काही कृतीची पावले पडण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी या मार्गावरील सिग्लल व्यवस्थेत बदल करून आकाशवाणी, अमरप्रीत चौकात सुरू असलेल्या व्यवस्थेप्रमाणे समोरासमोर असलेली दोन बाजूंची वाहने जाण्याची व्यवस्था कार्यान्वित केली. त्याचवेळी पोलिसांनी नागरिकांची बैठक घेत त्यांच्या सूचनाही जाणून घेतल्या. दुसरीकडे शिवाजीनगरहून देवळाईकडे जाण्याऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्ग करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलन केले. आंदोलकांना भेट दिलेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भुयारी मार्ग व उड्डाणपुलाचा प्रस्ताव द्या, निधीची व्यवस्था शासन करील, असा शब्द आंदोलकांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images