Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

छावा श्रमिक संघटनेची निदर्शने

$
0
0

औरंगाबाद : महामंडळाने जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी छावा श्रमिक संघटनेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.

महामंडळात केलेले अर्ज लाभा‌र्थी संख्या जवळपास २४०० असून, त्यात केवळ २५ जणांचे अर्ज निकाली काढले आहेत. अर्जदाराने केलेले अर्ज निकालात निघत नाही, कारण बँक व्यवस्थापक कर्जासाठी तारण व सरकारी नोकरदार जामीनदार मागतात. या दोन्ही गोष्टी अर्जदार पूर्ण करू शकत नाही, अर्जदार हाच आर्थिकदृष्ट्या कमककुवत असून तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कर्जाची मागणी करतो व त्याच्याकडे आपल्या महामंडळासाठी तारण देण्यासाठी कुठलीही प्रॉपर्टी नसते. तसेच तो जामीनदारही देऊ शकत नाही. त्यामुळे या दोन जाचक अटी रद्द करून नवीन परिपत्रक तयार करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शैलेश भिसे, ज्ञानेश्वर गायकवाड, विजय घोगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निदर्शनामध्ये गणेश थोरात, नीलेश धस, राज ठाकूर, लहू राठोड, सुनील पाटील, सागर वाघमारे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आ. कदमांच्या पुतळ्याला मारले जोडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी महोत्सवामध्ये तरुणीला पळवून नेण्याची गुंडगीरीची भाषा वापरली, त्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस व महिला काँग्रेसने बुधवारी कदम यांच्या पुतळ्यास साडी नेसवून, बांगड्या घालून जोडे मारो आंदोलन केले.

मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यानंतर महिलांबद्दल जर कुणी अपमानास्पद बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्याला महाराष्ट्रामध्ये फिरू दिले जाणार नाही. राम कदम यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा भाजपच्या कोणत्याही नेत्याला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी राष्‍ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर, जिल्हाध्यक्षा अनुपमा पाथ्रीकर, महिला शहर अध्यक्षा मेहराज पटेल तसेच प्रतिभा वैद्य, अमोल दांडगे, दीपक बहीर, दिनेश नवगिरे, धनंजय मिसाळ, अमोल साळवे, जुबेर खान, अब्रार पटेल, आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूचोरीमुळे जिल्हाधिकारी हतबल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहेत. चोरट्या मार्गाने वाळू उपशाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासूनचा आहे. आता यात आपण काय करणार, थेट समोर जाऊन कारवाई कशी करणार. यासाठी डोक्याने काम करावे लागणार आहे, असे हताश उद्गार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना काढले.

जिल्ह्यात वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासनाचे सर्व उपाय फसले आहेत. ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीसाठी जिल्ह्यात ३१ वाळूपट्ट्यांची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, यातील केवळ दोन लहान वाळूपट्ट्यांना प्रतिसाद मिळाला. उर्वरित पट्ट्यातून वाळू उपसा करण्याची परवानगी नसताना औरंगाबाद तसेच जालना जिल्ह्यातून चोरी करून वाळू सर्रास शहरात आणली जात आहे. शिवाय महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडाला आहे. यावर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आपण यावर लवकरच कारवाई करणार असल्याचे सांगितले. ठेकेदार वाळूपट्ट्यांना प्रतिसाद देत नाही, काय करावे ते कळत नाही. महसुलाचे टार्गेट पूर्ण होत असले, तरी येणाऱ्या कालावधीत वाळूचोरांची थेट वाहने जप्त करून दंड आकारणे तसेच दोन वेळेस पकडलेल्या वाहनांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खदानीतील उपसा आणि वाळूचोरी वर्षभरात बंद होईल. त्यानंतर १० वर्ष त्याचा परिणाम राहील असा दावा चौधरी यांनी केला.

\Bखदानी, वाळू ठेक्यांच्या नकाशांचे काम 'एमआरसॅट'कडे

\Bजिल्ह्यामधील खदानींचा नकाशा तयार करण्याचे काम एमआरसॅककडे (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन) देण्यात आले आहे. त्याचा मसुदा तयार झाला आहे. महिन्याभरात नकाशे अंतीम होतील. कोणत्या खदानीतून किती दगड (गौणखनिज) उपसा व्हावा, खदानीत दगड आहे की नाही, याची माहिती त्या मॅपमुळे समजेल. वाळू ठेक्यांसाठी या प्रणालीचा उपयोग पुढील वर्षांपासूनच्या लिलावापासून होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नकाशे करून घेण्याबाबत २०११च्या सूचना आहेत. त्या मात्र आजवर निर्णय झाला नसल्याचे सांगत आजवरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौधरी यांनी लक्ष्य केले. 'एमआरसॅक'कडून नकाशांचे काम पूर्ण झाल्यानंतर दर तीन महिन्यांनी खदानींची मोजणी होईल. त्यामध्ये सर्व्हे नंबर, गावनिहाय गौणखनिजाची माहिती समोर येईल. गौणखनिज उपसा करण्याची मागणी आल्यास नकाशांच्या आधारे कुठे किती खनिज आहे, किती परवानगी द्यायची याचा निर्णय तत्काळ होईल असेही त्यांनी सांगितले.

\Bसात महिन्यांनी कारवाईबाबत विचारा

\Bजिल्ह्यात सर्रास सुरू असलेल्या चोरटी वाळू वाहतूक कशी थांबवता येईल, तसेच एमपीडीएसारख्या कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, सिस्टीममध्ये परिवर्तन आणावे लागेल. सात ते आठ महिन्यांनी वाळूचोरीबाबत विचारा, निश्चितपणे बदल झालेला दिसेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत पेट्रोल @ ८८.०५

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराने गुरुवारी (६ सप्टेंबर) पुन्हा नवा उच्चांक गाठला. गुरुवारी शहरात पेट्रोलचे दर लिटरमागे ८८. ०५ रुपये, तर डिझेलचे दर ७७ रुपये १० पैसे असे होते. सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे अवमूल्यान पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. राज्यात परभणीत पेट्रोल सर्वात महाग विकले जात आहे. गुरुवारी परभणीत ८८ रुपये ७७ पैसे दर राहिले. मराठवाड्यात परभणी पाठोपाठ नांदेडला ८८ रुपये ५८ पैसे दराने पेट्रोल विकण्यात आले आहे. तर औरंगाबाद शहराचा क्रमांक मराठवाड्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिला. औरंगाबादेत ८८. ०५ रुपये प्रतीलिटर पेट्रोलची विक्री झाली. या शिवाय अमरावती, बुलढाणा येथे पेट्रोलचे दर ८८ रूपयांपर्यंत पोहोचले आहे.

पेट्रोलसह डिझेलचे दरही वाढत चालले आहेत. राज्यात अमरावती येथे ७७ रुपये ३० पैसे प्रतीलिटर दराने डिझेल विकण्यात आले आहे. तर दुसरा क्रमांक औरंगाबादला लागला असून ७७ रुपये १० पैसे दराने डिझेल विकण्यात आले. परभणीत ७६.५९ आणि नांदेड येथे ७६ रुपये ४३ पैसे प्रतीलिटर दराने डिझेलची विक्री झाली.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका हा सर्वसामान्य दुचाकी वाहनधारकांसह तीन चाकी सह चार चाकी वाहनचालकांना सोसावा लागत आहे.

………

रिक्षाचालकही त्रस्त

औरंगाबाद शहरात पेट्रोल रिक्षांची संख्या अधिक आहे. या रिक्षांमध्ये पेट्रोलसोबत ऑइल टाकावे लागते. आईलसह पेट्रोल घेणाऱ्या रिक्षा चालकांना ८८.०५ रुपये पेट्रोल व १५ रुपये ऑइलसाठी द्यावे लागत आहेत. यामुळे रिक्षा चालकांसाठी पेट्रोलचे दर १०३ रुपये प्रतीलिटर पर्यंत पोहोचले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करून लुटले, तिघांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्याने पायी जात असताना घरी सोडतो असे सांगत बळजबरी रिक्षात बसवून म्हाडा कॉलनी परिसरात मारहाण करुन लुटणारे इम्रान खान हाजीखान, अमजद खान हमद खान व शेख रफिक शेख गुलाम अली यांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी गुरुवारी (६ सप्टेंबर) ठोठावली.

या प्रकरणी नामदेव विठ्ठल जायभाये (रा. तोरणागड, म्हाडा कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २८ मे २०१४ रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास फिर्यादी पायी निघाला असता, इम्रान खान हाजीखान (वय २९), अमजद खान हमद खान (वय २२) व शेख रफिक शेख गुलाम अली (३४, तिघे रा. जालना) हे आरोपी रिक्षात बसून आले आणि घरी सोडतो म्हणून त्यांनी फिर्यादीला बळजबरी रिक्षात बसवले. म्हाडा कॉलनी परिसरात फिर्यादीशी झटापट करीत त्याच्याकडे असलेले ८०० रुपये काढून घेतले आणि आरोपी पळून गेले. फिर्यादीच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात भादंवि ३९२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील सुनील जोंधळ‍े यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. साक्षीदारांचे जबाब व पुराव्यांच्या आधारे कोर्टाने तिन्ही आरोपींना भादंवि ३९२ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी एक महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी दोन हजार रुपये फिर्यादीला देण्याचे आदेशही कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरी, कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रविवारच्या आठवडी बाजारातून दुचाकी चोरी केल्याच्या प्रकरणातील आरोपी शेख अनिस शेख युसुफ याच्या पोलिस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत (१० सप्टेंबर) वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एन. पाटील यांनी गुरुवारी (६ सप्टेंबर) दिले.

या प्रकरणी शेख गुलाबशहा (४०, रा. बिल्डा, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, दोन सप्टेंबर रोजी फिर्यादीने आठवडी बाजाराच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावली होती व दुचाकीची चोरी झाल्यानंतर तक्रार दिल्यावरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आरोपी शेख अनिस शेख युसुफ (२५, रा. बायजीपुरा) याला तीन सप्टेंबर रोजी अटक करून कोर्टाच्या आदेशाने गुरुवारपर्यंत (६ सप्टेंबर) पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून दोन दुचाकी व एक रिक्षा जप्त करण्यात आली असून, आणखी काही गुन्हे केले आहेत का, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का आदींचा तपास करावयाचा असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी पक्षाकडून करण्यात आली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅडव्हांटा’चे बियाणे निघाले बोगस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

अॅडव्हांटा बायोसीडस् कंपनीचे मक्याचे ७५१ वाण बोगस निघाल्याची तक्रार तालुक्यातील वडोद कान्होबा येथील दादासाहेब नीळ, दशरथ नीळ या शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी पेरलेल्या मका पिकाला फक्त चार कणसे लागली असून, त्यात एकही दाणा नाही. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

एकीकडे पावसाने फिरवलेली पाठ, कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव या संकटातून शेतकरी जात आहे. तर आता दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणेच बोगस निघाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. वडोद कान्होबा येथील संकेत कृषी सेवा केंद्र व सुल्तानपूर येथील जय गजानन अॅग्रो या दुकानदारांमार्फत नीळ बंधूंनी अॅडव्हांटा बायोसीडस् कंपनीचे मक्याचे ७५१ वाण खरेदी केले होते. जून महिन्यात त्यांनी मका पिकाची लागवड केली. ७५१ वाणाचे तीन बॅग बियाणे आपल्या शेतात पेरले. मात्र, तुरळक ठिकाणी पीक उगवले. त्यांनी ही बाब दुकानदाराला सांगितली. मात्र, त्यांनी नुकसानभरपाई देण्याबाबत व पाहणी करण्यास टाळाटाळ केली. परिणामी झालेले आर्थिक नुकसान भरून द्यावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे वडोद कान्होबा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनीही याच बियाणाचे पीक घेतले असून, त्यामुळे त्यांचेही नुकसान होण्याची भीती आहे.

मी यंदा कर्ज व उसनवारी करून शेती करत आहे. पावसानेही चांगली साथ दिली नाही. अॅडव्हांटा बायोसीडस् कंपनीचे मक्याचे ७५१ वाण पेरले. मात्र, ते बोगस निघाले आहे. त्यामुळे आम्हा भावांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

- दादासाहेब नीळ, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाकडी दांड्याने मित्राचा हात मोडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भांडण झाल्यानंतर सूड उगवण्यासाठी गल्ली पेटवण्याची भाषा करणाऱ्या तरुणाला मित्राने मदत केली नाही. यामुळे संतापलेल्या आरोपीने मित्राचा लाकडी दांड्याने मारहाण करून हात मोडला. २६ ऑगस्ट रोजी मुकुंदवाडी भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी राहुल गौतम लोणे (वय २० रा. राजनगर, मुकुंदवाडी) याने तक्रार दाखल केली. राहुल हा २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता मुकुंदवाडी भागातील जगताप शाळेजवळील झेंड्याजवळ बसला होता. यावेळी प्रशांत हिवाळे (रा. राजनगर) हा त्याच्या ओळखीचा तरुण त्या ठिकाणी आला. हिवाळे याच्या बोलण्यातून त्याचे नुकतेच कोणाशी तरी भांडण झाल्याचे राहुलच्या लक्षात आले. हिवाळेने संपूर्ण गल्ली पेट्रोलने जाळून टाकू असे म्हणत राहुलला पैशाची मागणी केली. यावेळी राहुलने पेट्रोलसाठी माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितले. यामुळे संतापलेल्या गौतमने राहुलला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यामध्ये राहुलचा डावा हात तीन ठिकाणी फॅक्चर झाला असून, त्यामध्ये रॉड टाकावा लागला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार गवारे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वॉटरग्रीडचे काम सहा महिन्यांत सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 'मराठवाडा वॉटर ग्रीड योजना' ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाने हाती घेतली आहे. येत्या चार महिन्यांमध्ये इस्‍त्रायलच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण अहवाल प्राप्त होईल, तर सहा महिन्यांमध्ये वॉटरग्रीडच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यासाठी गुरुवारी (सहा सप्टेंबर) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पिण्याच्या पाणी पुरवठ्यासोबतच शेतीसाठी व उद्योगासाठीही पाणीपुरवठा करण्यासाठी एकत्रित वॉटर ग्रीडची निर्मिती करण्यात येत असून, यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी २२ कोटी रुपयांचा करार झाला आहे. यामध्ये सात अहवाल तयार करण्यात येतील. यातील पहिला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला असून, दुसरा अहवाल एक - दोन दिवसांत सादर करण्यात येणार आहे. चार महिन्यांमध्ये इतर सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर करण्यात येतील, तर सहा ते सात महिन्यांमध्ये वॉटरग्रीडच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.

दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली होती. मराठवाड्यातील जायकवाडीसह १३ मोठी धरणे वॉटरग्रीडद्वारे जोडायची व त्याद्वारे मराठवाड्यातील मोठी शहरे, गाव-वाड्यांना पिण्याचे पाणी; तसेच शेती व उद्योगांसाठीही पाणीपुरवठा करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. वॉटरग्रीड योजनेची पाहणी करण्यासाठी आपण गुजरात वॉटर ग्रीड, तेलंगणा वॉटर ग्रीड व श्रीलंका येथील वॉटर ग्रीडला विभागातील तज्ज्ञांच्या शिष्टमंडळासह प्रत्यक्ष भेट दिल्या असल्याचेही लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘सवेरा प्रमोटर्स’ने भरला सव्वालाखाचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणीच्या टोलनाक्यांवर अतिरिक्त शुल्क वसुली केली जात असल्याचे परिषदेच्या तपास पथकाने मारलेल्या धाडीत स्पष्ट झाल्यानंतर टोलनाक्यांचे कंत्राट असलेल्या 'सवेरा प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स'ला एक लाख २० हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र कंत्राटदाराने दंड भरण्यास टाळाटाळ केल्यानंतर विषय छावणी परिषदेच्या सभेत गाजला व कंत्राटदाराला दंड भरावाच लागेल, असे अध्यक्षांनीही सभेत स्पष्ट केल्यानंतर उशिरा का होईना 'सवेरा'ने एकदाचा दंड भरल्याचे स्पष्ट झाले.

छावणी परिसरातील सहा टोलनाक्यांवर अतिरिक्त शुल्क वसुली होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. या संदर्भात छावणी परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही वेळोवेळी जोरदार चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पात्रा यांनी सीईओंना थेट कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत चार टोलनाक्यांवर तीन-तीन पावत्या देऊन अतिरिक्त शुल्क वसुली केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे कंत्राटदाराला एक लाख २० हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, दंड ठोठावण्यात आल्यानंतरही कंत्राटदाराकडून दंड भरण्यात आला नव्हता. दरम्यान, परिषदेच्या सभेत अध्यक्षांनी कंत्राटदाराला दंड भरावाच लागेल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर कंत्राटदाराने अलीकडेच दंड भरल्याचे सीईओंनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राँगसाइड दुचाकी; अपघातात दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राँगसाइडने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने दोन्ही दुचाकीचा अपघात होऊन दोघांचाही मृत्यू झाला. बुधवारी रात्री बीड रोडवरील आपद भालगावच्या उ‌ड्डाणपुलावर ही घटना घडली. विजय शांतीलाल फुतपुरे (वय ३०, रा. कचनेर) व वासुदेव कल्याण बोंगाणे (वय २८, रा. लायगाव) अशी मृत्यू पडलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय हा दुचाकीवर त्याची आई सखुबाईसोबत पुलावरून राँगसाइड जात होता. याच वेळी समोरून वासुदेव हा दुचाकीवर येत होता. अंधारात दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी वासुदेवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर विजयचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. विजयची आई सखुबाई देखील गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जमादार लहू थोटे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिमोटद्वारे वीजचोरी; चार ग्राहकांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणने एक सप्टेंबरपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेला यश आले आहे. औरंगाबाद व वैजापूर शहरात रिमोटद्वारे मीटर बंद करून जवळपास पाच लाख रुपयांची वीजचोरी केल्याची दोन प्रकरणे उघडकीस आली आहेत. या प्रकरणी वीजचोरी करणाऱ्यांसह रिमोट पुरवणाऱ्या चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आहे.

महावितरणच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत औरंगाबाद शहरातील जुनाबाजार भागात महावितरणचे पथक तपासणी करत होते. त्यावेळी अजीम कॉलनीत राहणारे वीजग्राहक नजीमोद्दिन सिद्दीकी यांचे मीटर बंद असल्याचे आढळले. हे मीटर सिद्दिकी मोहंमद मुजफ्फरुद्दिन वापरत होते. याबाबत मुजफ्फरुद्दिन यांना विचारले असता त्यांनी बाजूच्या खोलीतून लाल रंगाचे रिमोट आणून बंद असलेले मीटर चालू केले. अशा प्रकारे या ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या ग्राहकाने आपल्या किराणा व भुसार मालाच्या दुकानाचा व्यावसायिक वीजजोडणीचा भारही घरगुती जोडणीवर टाकला होता. दोनमजली घरासह दुकानातील ९ ट्यूब, ६ फॅन, २ रेफ्रिजरेटर, २ गिझर, २ वॉशिंग मशीन, १ डीप फ्रीझर, १ एअरकंडिशनर, १ इंडक्शन हीटर (शेगडी) व १ टीव्ही या उपकरणांचा वापर चोरीच्या विजेवर सुरू असल्याचे या कारवाईत निष्पन्न झाले. या प्रकरणात तब्बल २४ हजार ७०३ युनिट वीजचोरी केली असून, ही रक्कम ४ लाख ४६ हजार ७०० रुपये इतकी आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bगंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार

\Bदुसऱ्या एका कारवाईत वैजापूर शहरात फुलेवाडी रोडवर अशाच रिमोटद्वारे वीजचोरीचे प्रकरण उघडकीस आले. शिक्षक कॉलनीतील किसन सोनवणे या वीजग्राहकाने घरगुती जोडणीच्या वीजमीटरमध्ये फेरफार करून मीटर रीडिंग बंद करण्याचे किट बसवले होते. हा ग्राहक त्या किटच्या साह्याने रिमोटद्वारे वीजचोरी करीत असल्याचे महावितरणच्या पथकास आढळले. सोनवणे यांनी २७२८ युनिटची वीजचोरी केली असून, ही रक्कम ४३ हजार ५२८ रुपये इतकी होते. दरम्यान, या वीजग्राहकास वीजचोरीसाठी वैजापूरमधील मुळे गल्लीत राहणाऱ्या सुधीर लाळे याने रिमोट विकले होते. या दोघांवरही गंगापूर पोलिस ठाण्यात विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bमाहिती देणाऱ्यास दहा टक्के रक्कम बक्षीस

\Bरिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रक्कमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरूपात बक्षीस म्हणून देण्यात येते. तसेच अशी माहिती देणाऱ्याचे नाव देखील गुप्त ठेवण्यात येते. त्यामुळे अशा वीजचोरीची माहिती देण्याचे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे, जेणेकरून औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील वीजचोरीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.

…………………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाचा खून; आई, मावशी, बहिणीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या तरुण मुलाचा गळा आवळून खून केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी व मुलाची आई कमलाबाई दिलीप बनसोडे, मावशी खिरणाबाई जगन्नाथ गायकवाड व मावस बहीण सुनिता राजू साळवे यांना गुरुवारपर्यंत (१३ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी गुरुवारी (६ सप्टेंबर) दिले.

दरम्यान, या प्रकरणी वरील तिघांसह रिक्षाचालक इंद्रजित हरिसिंग निकाळजे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन वरील तिघांना अटक करून गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींनी ज्या ब्लाऊजने राहुलचे हात-पाय बांधले व ज्या दोरीने त्याचा गळा आवळून खून केला, ते जप्त करणे बाकी आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करावयाची आहे. खुनाचा नेमका उद्देश काय, याचाही तपास करावयाचे आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने तिघांना १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिवरेबाजार ग्रामपंचायतीस २५ लाखांचा पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यस्तरावर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वच्छ ग्राम स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीस २५ लाख रुपये रकमेचा प्रथम पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी घोषणा गुरुवारी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली.

स्पर्धेमध्ये हिवरेबाजार (ता. जि. अहमदनगर) ग्रामपंचायतीने प्रथम, मान्याची वाडी (ता. पाटण. जि. सातारा) व शेळगाव गौरी (ता. नायगाव. जि. नांदेड) या ग्रामपंचायतींना विभागून द्वितीय तर धाटाव (ता. रोहा. जि. रायगड) व राजगड (ता. मूल. जि. चंद्रपूर) या ग्रामपंचायतींना तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी विशेष पुरस्कारांचीही घोषणा केली. लोणीकर यांनी स्वच्छता अभियानांतर्गत राज्यात ६० लाख शौचालय बांधण्याचे काम २०१९च्या मुदतीपूर्वी पूर्ण केल्याचे सांगितले.

\Bआठ सप्टेंबर रोजी वितरण

\Bसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत पुरस्कार प्राप्त राज्यातील १०२ ग्रामपंचायतींना आठ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. शहरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात सकाळी ११ वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्‍यक्षतेखाली राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा होणार असून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर तसेच पालकमंत्री दीपक सावंत तसेच राज्यमंत्री सदाशिव खोत यांची तसेच महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांचीही या कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवाचे वर्ष ९४ वे तर संस्थापक ६९ वर्षांचे कसे ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहरातील गणेश उत्सवाला ९४ वर्षे झालेली असताना ६९ वर्षांचे पृथ्वीराज भाऊ पवार संस्थापक अध्यक्ष कसे,' अशी गुगली टाकत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पवार यांची विकेट घेतली. यावर पवार यांनी देखील 'मी उत्सव समितीचा संस्थापक अध्यक्ष असल्याचे सांगत,' बागडे यांच्यावर पलटवार केला.

गुरुवारी सायंकाळी खेळीमेळीच्या वातावरणात समर्थनगर येथे गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उदघाटन पार पडले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, महापौर नंदकुमार घोडेले, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समिती अध्यक्ष डी. एन. पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी 'कायद्याचे पालन करून सर्वांनी उत्सवाचा आनंद साजरा करावा,' असे आवाहन केले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी 'औरंगाबादमध्ये गौरी गणपतीची मिरवणूक काढण्याची प्रथा नाही. महालक्ष्मीचा सण झाल्यानंतर नागरिक देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे शेवटचे चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी द्याव,' अशी मागणी केली.

\Bपवारांकडून परतफेड

\Bविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देखील आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी संस्थापक अध्यक्ष पवार यांची फिरकी घेतली. 'उत्सवाला ९४ वर्षे झाली असताना तुम्ही ६९ वर्षाचे संस्थापक अध्यक्ष कसे असा सवाल पत्रकारांना पडतो,' असा सवाल उपस्थित केला. यावेळी पवार यांनी सव्याज परतफेड केली. 'महासंघ उत्सव समिती १९७० साली स्थापन झाली असून, आपण त्याचे संस्थापक अध्यक्ष आहोत,' असे स्पष्ट केले. यावर हरिभाऊ बागडे यांनी 'पुन्हा तशी दुरुस्ती करुन घ्या, पुढील पिढीला याची माहिती असणे आवश्यक आहे,' अशी सूचना केली. कार्यक्रमासाठी माजी अध्यक्ष राजू शिंदे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, गजानन बारवाल, कीर्ती शिंदे, अनिकेत पवार, संदीप शेळके, नारायण कानकाटे, धीरज पवार, शिवाजी शिंदे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सरकार’ न्यायालयात!

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

सत्या, रंगीला, कंपनी, रक्तचरित्र आणि सरकार असे एकाहून एक सरस चित्रपट देणारा दिग्दर्शक रामगोपाल वर्माला गुरुवारी कॉपी राइट कलमाखाली दाखल तक्रारीच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हा न्यायालयात हजेरी लावावी लागली.

वर्मा यांचा २००९मध्ये 'अज्ञात' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, या सिनेमाची कथा आपली असून, ती वर्मांनी चोरल्याचा आक्षेप तक्रारकर्ते नूतन कॉलनीतील रहिवासी मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांनी केला होता. मुश्ताक यांच्या तक्रारीनुसार त्यांनी 'जंगल में मंगल' नावाची कथा लिहिली होती. त्या कथेवर रामगोपाल वर्मा यांनी 'अज्ञात' चित्रपट तयार केला. त्यामुळे कलम ५१ प्रमाणे कॉपी राइट कायद्याचा भंग झाला. याप्रकरणी कलम ६३नुसार शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. दरम्यान २००९मध्ये 'अज्ञात' चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर मुश्ताक यांनी २०१० मध्ये दावा दाखल केला. याप्रकरणी रामगोपाल वर्मा व रॉनी स्क्रुवाला यांना प्रतिवादी करण्यात आले होते. यापूर्वी वर्मा यांनी जामीन मिळवला होता. त्यानंतर ते हजेरी माफीचा अर्ज देत होते. १२ जून २०१८ रोजी न्यायालयात वर्मा यांच्याकडून दाखल हजेरी माफीचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. न्यायालयाने रामगोपाल वर्मा व रॉनी स्क्रुवाला यांना हजर राहण्यासाठी वॉरंट बजावले होते.

गुरुवारी रामगोपाल वर्मा व रॉनी स्क्रुवाला हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांच्या न्यायालयात हजर झाले. याप्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑक्टोबर रोजी अपेक्षित आहे. या प्रकरणात रामगोपाल वर्मा यांच्यावतीने दुजेंद्रकुमार शर्मा, दिलीप खंडागळे, विजय सपकाळ, आशीष सूर्यवंशी, प्रतीक शर्मा यांनी तर फिर्यादीकडून वाळूजकर यांनी काम पाहिले.

\Bकथेचे श्रेय गिरकर, गांधीला

\B'अज्ञात' सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी मोहसिन यांनी त्यांची स्क्रिप्ट रामगोपाल वर्मांना दिली होती. काही दिवसांनी चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र मोहसिनला कथेचे श्रेय न देता वर्मा यांनी सिनेमात नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांना दिले होते. त्यानंतर मोहसिन यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

मी ही कथा राम गोपाल वर्मा यांना पाठवली होती. नंतर त्यांचे काहीच उत्तर आले नाही, पण काही दिवसांनी अज्ञात सिनेमा पाहिला तेव्हा तो संपूर्ण सिनेमा माझ्याच कथेवर असल्याचे मला समजले. त्यामुळेच मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

- मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकीय कार्यकर्ते रडारवर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांसोबत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर आहेत. अशा समाजकंटकाविरुद्ध कारवाई होण्याची लवकरच शक्यता आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी कोंम्बिंग ऑपरेशन दरम्यान १३० जणांची उचलबांगडी केली. यामध्ये हद्दपार आरोपी, हिस्ट्रीशीटर आदींचा समावेश होता. पोलिसांचे यापुढील लक्ष्य गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पूर्वीचे गंभीर गुन्हे दाखल केलेले, हद्दपारीची कारवाई झालेल्या गुन्हेगारांचा देखील यात समावेश आहे. अशा ५५ जणांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. यामध्ये चार प्रमुख संशयितांचा समावेश आहे. या गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गेल्या वर्षभरात शहरात अनेक ठिकाणी दंगलीचे प्रकार घडले आहेत. या दंगलीमध्ये अटक झालेले व जामीनावर सुटलेल्या आरोपींवर देखील पोलिसांचे लक्ष आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राजकीय पक्षाचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांवर देखील पोलिसांची नजर आहे. या आरोपींवर देखील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

डॉ. दीपाली धाटे घाडगे - पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

$
0
0

पैठण : आनंदपूर शिवारात (ता. पैठण) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. भारत मुरलीधर ठेंणगे (वय ५६) हे सायंकाळी शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते घरी परत आले नाहीत, म्हणून त्यांचे कुटुंबीय शेतात गेले असता. त्यांना त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरताली नागरिक जमले. त्यावेळी बिबट्याने त्यांचा मृतदेह ओढून नेला. या घटनेची माहिती वन विभागाला कळविण्यात आली आहे. मे महिन्यात या परिसरात बिबट्या दिसला होता. साधारणपणे महिनाभर त्याचा वावर होता, असे परिसरातील नगारिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तस्कर मस्त, प्रशासन सुस्त!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील ३१ पैकी केवळ दोन घाटांमध्ये वाळू उपशाला परवानगी असताना शहरात इतर घाटांमधूनही वाळूची बिनदिक्कत चोरी सुरू असून गेल्या चार महिन्यांमध्ये गौणखणिज, अवैध उत्‍खनन तसेच वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या १२५ थातूरमातूर कारवायामधून एक कोटी ४७ लाखांचा दंड आकारला. यातील एक कोटी चार लाख रुपयांची वसुली करून प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये नवीन वाळू लिलाव प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यासाठी यंदाही वाळू लिलावातून ४० कोटी रुपयांचेच महसुली उद्दिष्ट आहे. सरत्या वर्षामध्ये केवळ दोनच वाळुपट्ट्यांना प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्याचा मोठा महसूल बुडाला. अवैध उत्‍खनन तसेच वाहतुकीतून केलेल्या कारवायांमध्ये सर्वाधिक ५५ प्रकरणे पैठण-फुलंब्री उपविभागीय अधिकारी कार्यालयाची आहेत, तर सर्वात कमी केवळ तीन प्रकरणे सिल्लोड कार्यालयाअंतर्गत येतात. वाळू लिलावामध्ये सहभागी न होता चिरीमिरी देऊन वाळू तस्कर सर्रास शहरात वाळू विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र औरंगाबादमध्ये आहे. यावर जिल्हाधिकारी हतबल होऊन 'आपण काय करणार? प्रत्येक ठिकाणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी जाऊ शकत नाही. थेट कारवाईमुळे प्रश्न सुटणार नाही,' असे हताश उद्गार काढत आहेत. त्यामुळे आगामी वर्षातही वाळूचे त्रांगडे होणार हे स्पष्ट आहे. जिल्ह्यात केवळ दोन वाळू घाटातून उत्‍खननाला परवानगी असताना शहरातील सर्रास बांधकामे होतात कशी, त्यांना वाळू मिळते कुठून, या प्रश्नावर मात्र प्रशासनाचे तोंडावर बोट आहे. जिल्ह्यात सर्रास होत असलेल्या वाळूचोरीला लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लिलावात प्रतिसाद न मिळालेल्या पट्ट्यांमध्ये किती वाळू शिल्लक आहे, याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही.

\B१२५ प्रकरणात २३ गुन्हे

\Bएप्रिल ते जुलै २०१८ कालावधीमध्ये जिल्ह्यात अवैध उत्‍खनन तसेच वाहतुकीच्या १२५ प्रकरणात केवळ २३ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, तर २७ आरोपींना अटक केली. सर्वाधिक १२ गुन्हे पैठण तहसील कार्यालयाअंतर्गत दाखल आहेत. यामध्ये वैजापूर, अपर तहसीलदार औरंगाबाद, फुलंब्रीमध्ये प्रत्येकी केवळ एक गुन्हा दाखल आहे तर गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड व सोयगावमध्ये एकही गुन्हा दाखल नाही. कन्नडमध्ये ६, पैठणमध्ये १२ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये वैजापूरमध्ये १, फुलंब्रीमध्ये २ तर पैठणमधील प्रकरणांमध्ये २६ जणांना अटक केल्याचा महसूल विभागाचा अहवाल असून, कारवाईमध्ये १६ वाहनेही जप्त केली आहेत.

येत्या काही दिवसात वाळू लिलाव प्रक्रियेंतर्गत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना बारकोड लावण्यात येईल. या सिस्टीमअंतर्गत बारकोडच्या पावत्या वाळूपट्टा घेणाऱ्या कंत्राटदारांमार्फत संबंधित वाहनचालकाला दिल्या जातील. या माध्यमातून सिस्टीममध्ये वाहनाचा क्रमांक, किती ब्रास वाळू भरली, किती वाजता निघाला, कुठे जाणार आदी सर्व माहिती असेल. तपासणी पथकाने कारवाईदरम्यान पावतीवरील बारकोड त्यांच्या मोबाईलद्वारे स्कॅन केल्यास तत्काळ नमूद केलेली माहिती त्यांना दिसेल. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीला चाप बसेल.

\B- उदय चौधरी, जिल्हाधिकारी\B

\Bअशी केली दंड आकारणी

\B- \Bएकूण \B- १ कोटी ४ लाख ५७ हजार ७९९

- \Bवैजापूर \B- १३ लाख ५३ हजार २००

- \Bऔरंगाबाद \B- ३९ लाख ६० हजार ४००

- \Bकन्नड \B- १३ लाख ७२ हजार

-\B सिल्लोड\B - ४ लाख १५ हजार

- \Bपैठण-फुलंब्री \B- ३३ लाख ५७ हजार १९९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावरील कचखडीने वाहनधारक झाले त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रोझोन मॉलसमोर शनिवारी दुचाकी घसरून दोन तरुण जखमी झाले. रस्त्यावरील कचखडीमुळे हा अपघात घडला आहे. खड्डे बुजवण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या उपाययोजनेमुळे वाहनधारक मात्र त्रस्त झाले आहेत. ही खडी बाजूला करून रस्ता मोकळा करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

औरंगाबाद शहरातील सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्याची कायमस्वरूपी डागडुजी करण्याऐवजी थातूरमातूर कामे करून हे खड्डे बुजवण्यात येतात. मनपाच्या वतीने मध्यंतरी अशाच खड्ड्यामध्ये कचखडी भरून हे खड्डे बुजवण्यात आले. जालना रोड, अदालत रोड, कॅनाट प्लेस, निराला बाजार आदी भागात अशा पध्दतीने खड्डे बुजवण्याची तात्पुरती मोहिम राबवली. मात्र पावसामुळे मनपाचे हे पितळ उघडे पडले. ही कचखडी रस्त्याबाहेर येऊन सर्व रोडवर पसरली आहे. बारीक असलेल्या या कचखडीमुळे यावरुन दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे किरकोळ अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. दुर्घटनेस कारणीभूत ठरत असलेली ही कचखडी रस्त्यावरून हटवावी अशी मागणी वाहनधारकांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

रस्त्यावर टाकण्यात आलेली ही कचखडी धोकादायक ठरत आहे. कचखडीवर अचानक ब्रेक मारल्यास वाहने घसरत आहे. ही कचखडी तातडीने रस्त्यावरून हटवण्याची गरज आहे.

युवराज चव्हाण

खड्डे बुजवण्यासाठी सबंधीत प्रशासनाने ही थातूर मातूर कारवाई केली आहे. मात्र, पावसामुळे हे पितळ उघडे पडले आहे. कायमस्वरुपी रस्ते दुरूस्त करण्याची गरज असताना अशी तात्पुरती कामे करण्यात येऊ नये.

महेश डोंगरे

बारिक कचखडी रस्त्यावर सर्वत्र पसरलेली असल्यामुळे किरकोळ अपघात घडत आहे. पाठीमागून एखादे मोठे वाहन आल्यास जिवघेणा अपघात देखील घडण्याची शक्यता नाकरता येत नाही. याबाबत पोलिस प्रशासनाने देखील लक्ष देण्याची गरज आहे.

तुषार नरोडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images