Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शून्य सुविधांचे ‘डे केअर सेंटर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अर्धदशकापेक्षाही जास्त कालावधीपासून ज्या रुग्णालयाची प्रतीक्षा आहे ते जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात मिनी घाटी अजूनही पूर्णक्षमतेने सुरू झाले नसले तरी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) हा काही महिन्यांपूर्वी, तर हिमोफिलिया, थॅलेसेमिया व सिकल सेलच्या उपचारांसाठीचे 'डे केअर सेंटर' हे काही दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. याच केंद्राचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला खरा; परंतु या केंद्रामध्ये अजूनही कोणत्याही उपचारांच्या सोयी-सुविधा नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे तिन्ही आजारांसाठी लागणारी औषधी-साहित्य या केंद्रामध्ये सध्यातरी नाही आणि ते नेहमीसाठी कधी उपलब्ध होईल, याविषयीही वेगवेगळ्या शंका घेतल्या जात आहेत.

मागच्या किमान वर्षापासून 'मिनी घाटी'च्या उद्घाटनाची नुसतीच चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्येक वेळी उद्घाटनाला बगल देण्यात येत असून, अजूनही उद्घाटन नेमके कधी होणार, याविषयी अधिकृतपणे कोणीही बोलण्यास तयार नाही. अर्थात, रुग्णालय पूर्णक्षमेतेने सुरू करण्यासाठी लागणारी विविध प्रकारची महत्वाची उपकरणे, औषधी-साहित्य याची प्रतीक्षा काही संपलेली नाही. एकीकडे अशी स्थिती असताना, दुसरीकडे हिमोफिलिया, थॅलेसेमिया व सिकल सेलच्या रुग्णांसाठी असलेल्या 'डे केअर सेंटर'चे मोठ्या थाटात उद्घाटनही झाले. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर स्वतंत्र केंद्र कार्यान्वित करण्यात आले व पहिल्याच दिवशी हिमोफिलियाच्या ७० पेक्षा जास्त रुग्णांना लागणारे फॅक्टर तज्ज्ञांच्या उपस्थितीत देण्यात आले. मात्र उद्घाटनासाठी उपलब्ध करण्यात आलेले सर्व फॅक्टर हे त्याच दिवशी संपले. त्यामुळे आता 'डे केअर सेंटर'मध्ये कोणतेही फॅक्टर उपलब्ध नसल्याचे बुधवारी (५ सप्टेंबर) स्पष्ट झाले. केवळ हिमोफिलिया रुग्णांना लागणारे फॅक्टरच नव्हे, तर थॅलेसेमिया रुग्णांना नेहमीसाठी लागणारे 'आयर्न चिलेशन'सह इतर औषधी-गोळ्याही केंद्रामध्ये उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. सिकल सेलच्या रुग्णांबाबतही वेगळी स्थिती नाही. रक्त व रक्तघटक हीदेखील या रुग्णांची मोठी गरज असून, त्यासाठी स्वतंत्र रक्तपेढी 'मिनी घाटी'मध्ये नियोजित आहे. मात्र रक्तपेढी सुरू झालेली नाही व ती कार्यान्वित होण्यासाठी सध्यातरी कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू नसल्याचे स्पष्ट होत आहे. रुग्णालयासाठी बहुतांश मनुष्यबळाची निर्मिती झाली असली तरी औषधी-साहित्याची कायमस्वरुपी तजवीज करण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.

रुग्णसंख्या पाच हजारांवर

संपूर्ण मराठवाडा तसेच खान्देश व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकल सेलचे पाच हजारांवर रुग्ण आहेत आणि या सर्व रुग्णांना या केंद्रामध्ये सर्व प्रकारचे उपचार मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये तातडीच्या व आपत्कालिन आरोग्य सेवाही केंद्रात मिळणे अपेक्षित आहेत. मात्र मोठ्या प्रमाणातील रुग्णसंख्येला लागणारी औषधी-साहित्याची सोय कशी केली जाणार, याविषयी संभ्रम निर्माण व्हावा, अशी एकंदरीत स्थिती आहे.

कक्षसेवकांची १८ पदे रिक्त

सद्यस्थितीत रुग्णालयामध्ये वर्ग एक ते चार अशी सुमारे २३० पदे भरलेली आहेत. यामध्ये वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञ डॉक्टरांसह तंत्रज्ञ, परिचारिका, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र थेट रुग्णसेवा देणाऱ्या ४२ कक्षसेवकांपैकी २४ सेवकांची नियुक्ती झालेली आहे, तर तब्बल १८ पदे रिक्त आहेत. रुग्णालय जेव्हा पूर्णक्षमतेने सुरू होईल तेव्हा या रिक्त पदांचा थेट रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

हिमोफिलियाच्या रुग्णांना लागणारे ७, ८ व ९ फॅक्टर लवकरच उपलपब्ध होतील. २५ लाखांची औषधी-साहित्यही लवकरच रुग्णालयात उपलब्ध होईल आणि संपूर्ण रुग्णालय पूर्णक्षमतेने सुरू होण्याच्या दृष्टीनेही वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न सुरू आहेत. केंद्रामध्येही अधिकाधिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

हिमोफिलिया रुग्णांना कधीही तातडीने उपचार लागू शकतात आणि या उपचारांमध्ये विविध प्रकारचे फॅक्टर हे खूप महत्वाचे ठरतात आणि या फॅक्टरचा खर्च खूप मोठा आहे. त्यामुळे केंद्रामध्ये नेहमीसाठी फॅक्टर उपलब्ध राहतील आणि यासाठी राज्य सरकार योग्य ती पावले उचलेल, अशी आमची अपेक्षा आहे.

- अशोक मानकर, सचिव, हिमोफिलिया सोसायटी (शहर शाखा)

थॅलेसेमियाच्या रुग्णांना नेहमीच रक्त द्यावे लागते. रुग्णालयात रक्तपेढी सुरू झाली नसल्यामुळे केंद्रामध्ये निदान 'आयर्न चिलेशन'सह इतर महत्वाची औषधी मिळावी. 'चिलेशन' व इतर औषधांचा खर्च खूप जास्त आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही केंद्रात सध्या थॅलेसेमिया रुग्णांसाठी कोणत्याच सोयी-सुविधा नाहीत.

- अनिल दिवेकर, सचिव, थॅलेसेमिया सोसायटी (शहर शाखा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीड बायपासवर बळीचे शतक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मृत्यूचा सापळा म्हणून कुप्रसिद्ध होत असलेल्या बीड बायपास रोडवर गुरुवारी सकाळी अपघातात आणखी एक बळी गेला. सहारा सिटीजवळ स्कॉर्पियोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मजूर ठार झाला. भगवान गंगाधर शेळके (वय ५५, रा. शिवशाहीनगर) असे या मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या मृत्यूनंतर बायपासवरील अपघाताच्या बळींनी शतक गाठले आहे.

सकाळी नऊ वाजता शेळके त्यांच्या दुचाकीवरून जात होते. रस्ता ओलांडून शेळके रस्त्याच्या खाली उतरले होते. यावेळी जालन्याकडून देवळाई चौकाकडे एक स्कॉर्पियो जीप वेगात येत होती. या जीपने शेळके यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत जीपने त्यांना रस्त्याच्या खाली असलेल्या एका कंपनीच्या प्रवेशद्वाराच्या गट्टूपर्यंत फरफटत नेले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तेथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी धाव घेत शेळके यांचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवला. अपघातानंतर जीप चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. सिडको एमआयडीसी पोलिसांनी जीप जप्त केली असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

महिनाभरातील पाचवा बळी

बीड बायपास रोड हा दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. गेल्या महिन्याभरात अपघातात ठार झालेला हा पाचवा बळी आहे. गेल्या १४ वर्षांत या मार्गावर अनेक अपघात घडले असून, शेळके यांच्या मृत्यूनंतर बळीचे शतक झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रहाटकरांनी तत्काळ राजीनामा द्यावा

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, औरंगाबाद

'तरुणींना पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजप आमदार राम कदमच्या मुसक्या आवळण्याची गरज असून, हा राम नव्हे हा तर राम नव्हे हा तर दु:शासन आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही मुलगी आहे. मुलीचा बाप म्हणून तरी त्यांनी कदम यांचे निलंबन करावे. बघ्याची भूमिका घेणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी शुक्रवारी राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रदेशअध्यक्ष सुक्षणा सलगर यांनी केली.

सलगर म्हणाल्या, 'एखाद्या चित्रपटात महिलांचा अवमान झाला असेल, तर भाजपचे नेते मोठा आरडाओरड करून चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घालण्याची मागणी करतात. कदम यांच्या विधानानंतर राज्यभर तीव्र आंदोलन होत असताना महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे गप्प का, भाजपचा नारा बेटी पढाओ असा आहे, की बेटी भगाओ आहे हे मुंडे यांनी स्पष्ट करावे. बिनकामाच्या असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा व घरात बसावे,' असे म्हणत सलगर यांनी भाजपच्या इतर वाचाळवीर नेत्यांचाही समाचार घेतला. 'भाजप म्हणजे वाचाळवीरांचे घर झाले असून खोटं बोल, पण रेटून बोल अशी पक्षाची वृत्ती आहे. सैराट झालेल्या भाजपने झिंगाट झालेल्या कदम यांना तिकीटही देऊ नये. आता जनतेमध्ये भाजपविरुद्ध प्रचंड रोष असून, सरकारविरोधी भावना निर्माण झाली आहे. राम कदम यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी १२ सप्‍टेंबर रोजी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, पक्ष म्हणून नाही तर एकूणच मुलींच्या व महिलांच्या भावना जाणून घेऊन कदम यांचे निलंबन करून पक्षातून हकालपट्टी करा,' अशी मागणी करणार असल्याचे सलगर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकारणामुळेच आंदोलनांना दंगलीचे स्वरूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांनी मूकमोर्चे, शांतीमोर्चे काढले, मात्र आजकालच्या मूकमोर्चांमध्ये शिट्या वाजवल्या जातात, जाळपोळ करण्यात येते. आता या आंदोलनांना दंगलीचे स्वरुप येत आहे. आपल्या समाजातील राजकारण आणि लोकांमध्ये गांधीजींनी दिलेल्या विचाांना कालबाह्य केल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे परखड मत विद्यार्थ्यांनी मांडले.

सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालयात दोन दिवसांच्या स.भु. करंडक राजयस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला शुक्रवारी (सात सप्टेंबर) सुरुवात झाली. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांचा विचार कालबाह्य झाला आहे. हा विषय देण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना सात मिनिटांमध्ये आपापली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. आजही नेत्यांना स्वत:चे स्थान बळकट ठेवण्यासाठी गांधीजींच्या विचारांचा आधार घ्यावा लागतो. कोणतीही गोष्ट हिंसेने मिळवण्या ऐवजी तीच गोष्ट शांततेनेही मिळवता येऊ शकते. त्यामुळे मोठे नेते गांधीजींच्या विचारांचे पांघरूण घेत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाने समाजामध्ये, राजकीय पटलावर ओठात एक आणि पोटात दुसरेच अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत गांधीजींचा सर्वधर्म समभाव लोक विसरले आहेत. त्यांचे कोणतेही तत्व आत्मसात करत नाहीत. महिला अत्याचारासह विविध मुद्द्यांवर काढण्यात आलेल्या मोर्चांवर हिंसक वळण लागत आहे. मग कुठे आहे गांधीजींचे विचार? केवळ नोटांपुरतीच गांधीजींची प्रतिमा राहिली आहे काय? असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांनी आपली बाजू मांडली.

या स्पर्धेचे उद्घाटन अनिकेत सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. अॅड. दिनेश वकील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्राचार्य डॉ. जगदीश खैरनार, उपप्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर, डॉ. ऋषिकेश कांबळे, एल. एम. गोरडे, एस. एम. ठोंबरे यांची उपस्थिती होती. डॉ. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वृंदा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गोरडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूचा धाक दाखवून लुबाडणारी टोळी जेरबंद

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुबाडणाऱ्या तीन जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बाळू किसन मेटे (वय ४२, रा. शेंद्राबन ता. औरंगाबाद) हे सोमवारी पहाटे दुचाकीवरून सुंदरवाडी शिवारातून जात होते. यावेळी तिघांनी चाकूचा धाक दाखवला. रोख रक्कम व मोबाइल हिसकावून पसार झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट घेत तपास सुरू केला. या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी मंगेश भगवान निकाळजे (वय २०, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) याचा हात असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. या माहितीवरून मंगेशला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. अॅपेरिक्षामध्ये त्याने त्याचे साथीदार मयूर सुभाष ठोंबरे (रा. म्हाडा कॉलनी, मूर्तीजापूर) तसेच संदीप रमेश अंबिलढगे (रा. झाल्टा गावासमोरील झोपडपट्टी) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून चिकलठाणा पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय भगतसिंग दुलत, जमादार विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, गणेश गांगवे व रामेश्वर थापसे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृहात सुविधांची अभाविपची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात ठरवून दिलेल्या सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, याकडे लक्षवेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्तांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले.

आयुक्त मिलिंद शंभरकर यांची भेट प्रदेशमंत्री अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली. स्वाधार योजना, अनुसूचित जाती-जमाती बरोबरच व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी, ईबीसी विद्यार्थ्यांचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर शहरातील मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी काही दिवसांपासून अनेक समस्यांना तोंड देत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे, निकृष्ठ दर्जाचे जेवण, विद्यार्थ्यांना दिला जाणारा मासिक भत्ता वेळेवर दिला जावा, तो शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात यावा अशी मागणी केली. धोक्याच्या इमारतीमध्ये वसतिगृह सुरू आहे. इमारतीवर मोबाइल कंपन्यांचे मनोरे असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला. वसतिगृहांमध्ये किती जागा रिक्त आहेत याचा तपशील, गृहपालाने पूर्णवेळ वसतिगृहात उपस्थित रहावे, अशा मागण्याही मांडण्यात आल्या. यावेळी अभाविपचे महानगरमंत्री शिवा देखणे, जिल्हासंयोजक विवेक पवार, महानगर वसतिगृह प्रमुख रामेश्वर काळे, निखिल आठवले, शिवाजी वरपे, शुभम स्नेही, अमोल कालाडकर आदींची उपस्थिती होती.

इमारत बदलण्याचे आदेश

वसतिगृहाशी संबंधित समस्या तात्काळ सोडवण्याचे समाजकल्याण आयुक्तांनी आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. वसतिगृहावर मोबाइलचे मनोरे असलेली इमारत तात्काळ बदलण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळांना आता ऑनलाइन परवाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गणेश मंडळाना आता पोलिस प्रशासनाच्या परवानगीसाठी खेट्या मारण्याची गरज राहणार नसून, त्यांना ऑनलाइन परवाने देण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दिली.

गणेश मंडळाना ऑनलाइन परवान्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाइटवर गेल्यावर गणेश मंडळाची नोंदणी हा पर्याय दिसेल. त्यावर किंवा थेट http://www.mhpolice.maharashtra.gov.in/citizen/MH/index.aspx या सिटीझन पोर्टलवर जाऊन लॉग इन आयडी व पासवर्ड तयार करावा. त्यावर मंडळाची माहिती विचारणारा फॉर्म समोर येईल. त्यात मंडळाच्या स्थापनेपासून विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनापर्यंतची माहिती भरावी लागेल. महापालिका, महावितरण तसेच इतर विभागाचे आवश्यक ते परवाने घेतले असल्यास ते लगेच अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतर अर्ज सबमिट करावा. त्यानंतर तो अर्ज सबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पाहायला मिळणार आहे. ऑनलाइन पद्धतीने मिळालेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पोलिसांकडून लगेचच कार्यकर्त्यांच्या ई मेलवर परवाना पाठवला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इम्रान मेहंदी अपहरण, जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुख्यात गँगस्टर इम्रान मेहंदीचे कोर्टातून अपहरण करण्याचा कट रचून त्यात सहभागी झालेला आरोपी शेख यासेर याचा नियमित जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी शुक्रवारी (७ सप्टेंबर) फेटाळला.

गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या पथकाने २७ ऑगस्ट रोजी सापळा रचून शेख यासेर शेख कादर (२३ चौसार पार्क, नारेगाव) यास अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कठोडीत आहे. त्याने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, गुन्हा गंभीर आहे व आरोपी कटात सहभागी असल्यामुळे त्याला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव अणू शकतो. त्यामुळे त्यास जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील उदय पांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीविषयी बैठक

$
0
0

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक विषयक मार्गदर्शन बैठक राष्ट्रवादी भवन येथे नुकतीच घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष सक्षना सलगर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागील १५ वर्षे सत्तेत असताना केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोचवण्याचे काम करावे असे आवाहन केले.

या बैठकीत पक्षाचे शहर अध्यक्ष काशीनाथ कोकाटे यांनी पक्ष संघटना बळकट करून वार्डावार्डांत संघटना वाढवण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. बैठकीसाठी सुरजीतसिंग खुंगर, आयुब भाई, मुन्ना भाई, राजेंद्र नवगिरे, मोहम्मद हबीब, दत्ता भांगे, विलास ढंगारे, राजेश पवार, इसाक पटेल, कन्हैय्यालाल मिसाळ, अनिल डोंगरे महिला जिल्हाअध्यक्षा डॉ. अनुपमा पाथ्रीकर, शहर अध्यक्षा मेहराज पटेल, सलमा बानो, शारदा चव्हाण, शोभा गायकवाड, मेहरुन्निसा बेगम, यशस्विनी वाघमारे आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायन, वादन, नृत्य या तिन्ही कला श्रेष्ठः ओक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कलेमध्ये गायन, वादन, नृत्य या तिन्ही कला तितक्याच श्रेष्ठ आहेत,' असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीतकार पं. विश्वनाथ ओक यांनी 'मधुश्रवण'तर्फे करण्यात आलेल्या सत्काराप्रसंगी केले. पं. ओक यांनी वयाच्या ७५ व्या वर्षांत पदार्पण केल्यानिमित्त त्यांचा सिल्व्हर ओक स्टुडिओत सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी चित्रपट संगीत रसिक बाहुबली फुरसुले, डॉ. अनिल बोराळकर, प्रसाद साडेकर, सुधीर सेवेकर, मीना पांडे, अजय पुरोहित यांनी पं. ओक यांच्याविषयी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना पं. ओक म्हणाले, 'मी लहानपणापासून गाणं ऐकत गेलो. बुलबुलतरतंग या तंतुवाद्यापासून संगीत शिकण्यास सुरुवात केली. आपण जन्माला आल्यापासून संगीत हे आपल्या बरोबर असते. संगीत क्षेत्रातील तरुण गायकांनी हेमंतकुमार तसेच जगजितसिंग यांच्या आवाजाचा आवर्जून अभ्यास करावा,' असेही त्यांनी या निमित्त आवाहन केले. 'मधुश्रवण'च्या ध्वनिमुद्रणावर आधारित मासिक संगीत सभेत 'हवाईन गिटार' या वाद्याचा चित्रपट संगीतकारांनी कसा वापर केला, हेही त्यांनी सप्रयोग सादर केले. याच कार्यक्रमात मजबूर, लोहार, ढोलक, नवजीवन, पेईंग गेस्ट, शरारत, किचकवध, नवरंग या चित्रपटांत हवाईन गिटार या तंतुवाद्याचा वापर केलेली चित्रपट गीतेही सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला अॅड. श्रीकांत गोसावी, डॉ. मधुकर सासवडे, जे. चंद्रकांतन, सूर्यकांत खोंडे, प्रकाश देशपांडे, अंजली कोल्हटकर, वंदना सराफ, स्मीता देशपांडे, गुरुनाथ परांजपे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू इंद्रनील ओक, अमित ओक, तृष्णा ओक यांनी सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचा विनयभंग, वेल्डरला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिचा विनयभंग करणारा वेल्डर रवींद्र जगन्नाथ शार्दुल याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावली.

या प्रकरणी १३ वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २९ जुलै २०१६ रोजी पीडित मुलीची आई तिच्या लहान मुलीला सायंकाळी शैचास घेऊन गेली होती. त्यावेळी १३ वर्षीय पीडित मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून वेल्डींगचे काम करणारा आरोपी रवींद्र जगन्नाथ शार्दुल (वय २६) हा घरात शिरला व तिचा विनयभंग करून पळून गेला. पीडिताच्या आईने घराबाहेर पळून जाणाऱ्या आरोपीला पाहिले आणि ती धावत घरात आली. त्यावेळी पीडित मुलगी घाबरलेल्या अवस्थेत रडत बसलेली दिसली. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर फिर्यादीने तक्रार दिल्यावरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात पीडिता व तिच्या लहान भावाची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यात्रून कोर्टाने आरोपीला भादंवि ३५४ (ड) कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, भादंवि ४५२ कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावास, तर पोक्सो कायद्यान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील ट्रॉमा विभाग बधिरीकरण विभागाकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) सर्जरी विभागाच्या अखत्यारित असलेला ट्रॉमा केअर युनिट विभाग आता बधिरीकरणशास्त्र विभागाअंतर्गत आला आहे. घाटीतील ट्रॉमा केअर युनिट मध्ये ११ खाटा असून ऑपरेशन थिएटर क्रमांक तीन शेजारी असलेल्या 'पीआयसीयू'च्या तीन खाटांचे नियंत्रण लवकरच बधिरीकरणशास्त्र विभागाकडे जाणार आहेत. त्याचवेळी गंभीर आजारी रुग्णांसाठी दोन खाटा सर्जरी विभाग व दोन खाटा बालरोग विभागाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात असलेल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये असलेल्या ट्रॉमा विभाग हा बधिरीकरणशास्त्र विभागाकडेच आहे. मात्र, आतापर्यंत हा विभाग शल्यचिकित्साशास्त्र विभागाअंतर्गत होता. त्यामुळेच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी हा विभाग बधिरीकरणशास्त्र विभागाअंतर्गत आणण्याची निर्णय घेतल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या १२८२ जागा रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक भरतीबाबत सरकारी पातळीवरून पुरेसे प्रयत्न होत नाहीत. त्याचवेळी दुसरीकडे रिक्त शिक्षकांचा आकडा मोठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आजघडीला १२८१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया २०१०पासून रखडलेली आहे. यंदापासून शिक्षक भरतीची प्रक्रिया 'पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टिचर रिक्रुटमेंट' (पवित्र) पोर्टल सुरू करण्यात आले. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून माहितीही भरून घेण्यात आली, मात्र पुढची प्रक्रिया सुरू झालेली नाही. संस्थांचालकांकडून रिक्त जागांची माहिती भरून घेतली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. अद्यापही रिक्त शिक्षकांचा आकडा मोठा असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातच सरकारी शाळांमधील रिक्त शिक्षकांचा आकडा तेराच्या घरात आहे. हा रिक्त जागांचा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयाने गुरुवारी जाहीर केला. या सर्व रिक्त जागा या केवळ सरकारी शाळांमधील असून खासगी स्तरावरील शाळांमधील रिक्त जागांचा अहवाल शिक्षण विभागाने जाहीर केलेले आहे. शिक्षकांच्या रिक्त जागांमध्ये औरंगाबादचाही वरचा क्रमांक आहे. या रिक्त जागा केव्हा भरणार असा प्रश्न डीटीएड, बीएडधारकांनी उपस्थित केला जात आहे.

\B'प्राथमिक'ची संख्या मोठी\B

रिक्त जागांमध्ये प्राथमिक शिक्षकांची संख्या मोठी आहे. त्यापाठोपाठ माध्यमिकचा क्रमांक लागतो. शारीरिक शिक्षक, चित्रकला शिक्षक, हस्तकला शिक्षकांचाही रिक्त जागांमध्ये समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या २१०० एवढी आहे. त्यामध्ये सरळ सेवेतून मंजूर शिक्षकांची पदे नऊ हजार १६४ एवढी आहेत, तर पदोन्नतीद्वारे भरल्या जाणाऱ्या शिक्षकांची मंजूर पदे ८१० एवढी आहेत. त्यापैकी १२८१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामध्ये अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक पदे ही रिक्त आहेत. १८ मुख्याध्यापक हे केंद्र प्रमुख पदावर कार्यरत आहेत. पदोन्नतीतूनही रिक्त असलेल्या शिक्षकांची संख्या ५८ एवढी आहे. पूर्णवेळ शिक्षकांची पदे न भरल्याने त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत असल्याची ओरडही होते आहे. तर, दुसरीकडे रिक्त पदे तात्काळ भरली जावीत यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.

\Bशिक्षकांच्या रिक्त जागा

\Bपद.................... रिक्त जागा

प्राथमिक शिक्षक... ११३६

केंद्रप्रमुख............. ५१

माध्यमिक शिक्षक... ७१

शारीरिक शिक्षण शिक्षक......९

चित्रकला शिक्षक.....२३

हस्तकला शिक्षक.....३४

पदोन्नतीतून मुख्याध्यापक.....५४

शिक्षकांच्या रिक्त जागा भरा, अशी मागणी आम्ही वारंवार शासनाकडे करतो आहोत. आठ-दहा वर्षांपासून भरती प्रक्रिया नसल्याने आम्हा बेरोजगारांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत याबाबत आम्ही आकडेवारीही शासनाला दाखवितो आहोत, मात्र त्यांच्याकडून केवळ आश्वासन मिळते आहे. 'पवित्र'ची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी आमची मागणी आहे.

- संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिमीच्या दहशतवाद्यांनी केला विजयचा आफताब

$
0
0

Vijay.deulgaonkar@timesgroup.com

Tweet : @vijaydeulMT

औरंगाबाद : सिमी संघटनेंच्या औरंगाबादला पकडलेल्या दहशतवाद्यानी मेहंदीच्या सुटकेसाठी आलेल्या विजय चौधरीचे मतपरिवर्तन करून त्याला आफताब बनविले. विजय चौधरी हा मुळचा हिंदू जाट समाजाचा आहे. नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांनी नशेची सवय लावून त्याचे मतपरिवर्तन केले. यानंतर नाशिक कारागृहातच आफताब मेहंदी गँगच्या संपर्कात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इम्रान मेहंदीच्या सुटकेसाठी २७ ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील टोळी आली होती. या टोळीसोबत आग्रा येथील कुख्यात गुन्हेगार विजयकुमार रामप्रसाद चौधरी उर्फ आफताब (वय ३६, रा. बालकेश्वरी, ता. करवली, जि. आग्रा,उत्तर प्रदेश) हा देखील आला होता. पोलिसांनी या टोळीला पकडले तेव्हा आफताब पसार झाला होता. त्यानंतर विजय उर्फ आफताब आणि अबु चाऊस उर्फ मुसा याला ३० ऑगस्ट रोजी कोलठाणवाडी येथे गुन्हे शाखेने पिस्टलसह अटक केली. आरोपी विजय उर्फ आफताब हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर आग्रा आणि मुंबई येथे खुनाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यामध्ये तो १६ वर्षे कारागृहात होता. मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात सुरुवातीची काही वर्षे काढल्यानंतर त्याची जेलबदली नाशिक कारागृहात करण्यात आली. २६ मार्च २०१२ रोजी हिमायतबाग येथे सिमी संघटनेच्या दहशतवाद्यासोबत एटीएसच्या पथकाची चकमक झाली होती. यामध्ये अझहर कुरेशी हा दहशतवादी ठार झाला होता. अबरारखान, जखमी खलील खिल्जी, नंतर जफर कुरेशी यांना अटक करण्यात आली होती. काही दिवस हर्सूल कारागृहात ठेवल्यानंतर सिमीच्या दहशतवाद्यांची देखील नाशिक कारागृहात जेलबदली करण्यात आली होती. या ठिकाणी अंडा सेलमध्ये विजय उर्फ आफताब हा देखील शिक्षा भोगत होता. या ठिकाणी त्यांची ओळख झाली. या दहशतवाद्यानी विजयचे मतपरिवर्तन करणे सुरू केले. त्याला जेलमध्येच गांजाच्या नशेची सवय लावण्यात आली. त्याला मुस्लिम धर्माची शिकवण देखील देण्यात आली. या ठिकाणीच त्याचे आफताब नामकरण करण्यात आले.

दरम्यान, मेहंदी गँगची देखील नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या ठिकाणी मेहंदीचा चुलत भाऊ खालेद याच्याशी आफताबची ओळख झाली. एक वर्षापूर्वी आफताबची हर्सूल कारागृहात जेलबदली करण्यात आली. हर्सूल जेलमध्ये मेहंदी गँगच्या सदस्यासोबत त्याचा घनिष्ठ परिचय झाला. चार महिन्यांपूर्वी हर्सूल कारागृहातून आफताबची मुक्तता करण्यात आली. आफताबच्या पाहुणचाराची व्यवस्था खालेदचा नातेवाइक अबू चाऊस उर्फ मुसाकडे देण्यात आली होती. हर्सूल कारागृहातून बाहेर पडल्यानंतर आफताबच्या एका दिवसांसाठी राहण्याची व्यवस्था कटकटगेट येथील मेहंदीच्या वॉशिंग सेंटर समोरील एका घरात करण्यात आली. या ठिकाणी एक मुक्काम केल्यानंतर आफताब रेल्वेने गावाकडे रवाना झाला होता. दरम्यान, इम्रान मेहंदीची जेलमधून सुटका करण्यासाठी खालेदने आफताबशी संपर्क साधत २६ ऑगस्ट रोजी औरंगाबादला बोलावून घेतले होते.

\Bमोठ्या कामासाठी होणार होता वापर\B

विजय उर्फ आफताबला सिमीच्या दहशतवाद्यांनी पूर्णपणे जाळ्यात ओढत नशेखोर बनवले आहे. थंड डोक्याचा विजय उर्फ आफताब कुख्यात गुन्हेगार आहे. आफताबला जिहादी बनवून त्याचा दहशतवादी कारवायासाठी वापर करण्याचा प्रयत्न या दहशतवाद्यांचा असल्याची शक्यता विश्वासनीय सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण विभाग प्रमुखाला लाच घेतना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा प्रमुख छबुलाल अभंग व दुय्यम आवेक्षक सचिन दुबे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. महापालिका कार्यालयात शुक्रवारी दुपारी ५० हजारांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले बांधकाम साहित्य परत करण्यासाठी बांधकाम पुढे चालू ठेवण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती.

बीड बायपास रोडवरील शहानगर येथे एका तरुणीने महापालिकेची परवागनी न घेता घराचे बांधकाम सुरू केले होते. अभंग आणि दुबे यांनी बांधकामाच्या ठिकाणी जात बांधकामासाठी लागणारे साहित्य जप्त केले होते. या तरुणीच्या वडिलांनी साहित्य परत करण्यासाठी अभंग व दुबे यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी दोघांनी साहित्य परत करण्यासाठी; तसेच हे बांधकाम पुढे चालू ठेवण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला होता. दरम्यान, शुक्रवारी या लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी अभंग यांनी तडजोडीअंती ही रक्कम ५० हजार ठरवत ही रक्कम सचिन दुबे याच्याकडे देण्यास सांगितली. ही रक्कम स्वीकारताना दुबे याला पकडण्यात आले. यानंतर पोलिसांनी छबुलाल म्हाताराजी अभंग (वय ५५) आणि सचिन श्रीरंग दुबे (वय ३२) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक वर्षाराणी पाटील, नितीन देशमुख, विजय बाम्ह्रंदे, रवींद्र देशमुख, गोपाल बरंडवाल, दिगंबर पाठक, चालक संदीप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसे चित्रपट सेनेच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची बैठक गुरुवारी सिडको एन १ येथे घेण्यात आली. या बैठकीला राज्य उपाध्यक्ष व सिने कलाकार रमेश परदेशी यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत येत्या नोव्हेंबर महिन्यात मराठवाड्यातील कलावंतासाठी मोफत कार्यशाळा घेण्याचे निश्चित करण्यात आले.

हॉटेल क्रेझी बाईट येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परदेशी यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नाट्यगृह सुधारण्यासाठी चित्रपट सेना मैदानात उतरणार असल्याचे परदेशी यांनी स्पष्ट केले. या बैठकीला मराठवाडा संघटक आशिष सुरडकर, युवराज गवई, सुधीर देऊळगावकर, संकेश शेटे, सागर खंडाळे, कृष्णा मुगटकर, श्रीपाद पदे, सुमीत खांबेकर आदींची उपस्थीती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएससी परीक्षेदरम्यान केंद्रात मनाई आदेश जारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवारी शहरातील चार परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी मनाई आदेश जारी केले आहेत.

किलेअर्क येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, रोजेबाग येथील मौलाना आझाद कॉलेज व औरंगपुरा येथील सरस्वती भुवन मुलांची शाळा या केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात केंद्राच्या आजूबाजूला मोठया प्रमाणावर विद्यार्थ्याचे पालक, मित्र गर्दी करतात. यामुळे परीक्षा केंद्रावर शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशामध्ये केंद्राच्या शंभर मीटर अंतरापर्यंत परीक्षार्थी, विद्यार्थी, परीक्षेसंदर्भात काम करणारे शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या शिवाय अन्य व्यक्तीस प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. केंद्राच्या शंभर मीटर अंतरापर्यंत बाहेरील आवारातील झेरॉक्स मशीन दुकाने, सार्वजनिक टेलिफोन, फॅक्स बूथ व ध्वनीक्षेपक बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षार्थींना केंद्रात येताना सोबत कॅल्क्युलेटर, मोबाइल फोन किंवा कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधन आणता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात शस्त्र अन् जमावबंदीचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात येत्या काही दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टिकोनातून ७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या काळात शस्त्र व जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी हे आदेश दिले.

शहरात रविवारी पोळा सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच ११ सप्टेंबरपासून मुस्लिम नूतन वर्षारंभ होत आहे. १२ सप्टेंबर रोजी हरतालिकेचा सण आहे. १३ तारखेपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. २० सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवाचा मोहर्रम सण आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार या कालावधीत कोणतेही शस्त्र, लाठ्या काठ्या, बंदुका किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू बाळगता येणार नाहीत. कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा, प्रेत अथवा आकृत्या यांचे प्रदर्शन करता येणार नाही.

\Bमोर्चा, निदर्शनास मनाई

\Bसार्वजनिक शांतता भंग होणार नाही असे ध्वनीक्षेपण करण्यास तसेच प्रक्षोभक भाषण करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रीत येऊन धरणे, निदर्शने, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशामधून अंत्यविधी, विवाह समारंभ तसेच कर्तव्यावरील शासकीय तसेच पोलिस अधिकारी कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करण्याविरुद्ध् कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम नव्हे हा तर दुष्यासन

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, औरंगाबाद

'तरुणींना पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजप आमदार राम कदमच्या मुसक्या आवळण्याची गरज असून हा राम नव्हे हा तर दुष्यासन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मुलगी आहे, मुलीचा बाप म्हणून तरी त्यांनी कदम यांचे निलंबन करावे' अशी मागणी करत १२ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष सक्षना सलगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी सलगर पुढे म्हणाल्या, 'एखाद्या चित्रपटात महिलांचा अवमान झाला असेल तर भाजपचे नेते मोठा आरडाओरड करून चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घालतात. कदम यांच्या विधानानंतर राज्यभर तीव्र आंदोलने होत असताना महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे गप्प का, भाजपचा नारा बेटी पढओ असा आहे की बेटी भगाओ आहे हे मुंडे यांनी स्पष्ट करावे.' बिनकामाच्या असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा व घरात बसावे, असे म्हणत सलगर यांनी भाजपच्या इतर वाचाळवीर नेत्यांचाही समाचार घेतला.

भाजप म्हणजे वाचाळविरांचे घर झाले असून खोटं बोल पण रेटून बोल अशी पक्षाची वृत्ती आहे, सैराट झालेल्या भाजपने झिंगाट झालेल्या कदम यांना तिकटही देऊ नये, आता जनतेमध्ये भाजप विरुद्ध प्रचंड रोष असून सरकार विरोधी भावना निर्माण झाली आहे. राम कदम यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी १२ सप्‍टेंबर रोजी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून पक्ष म्हणून नाही तर एकूणच मुलींच्या व महिलांच्या भावना जाणून घेऊन कदम यांचे निलंबन करून पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी करणार असल्याचे सलगर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ३८० मतदान केंद्र वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणूक होत असून जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील मतदानकेंद्रांच्या सुसूत्रीकरणाअंतर्गत ९ विधानसभा मतदारसंघामध्ये आता २८० शहरी तर १४४ ग्रामीण अशा एकूण ३८० मतदान केंद्रात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. जिल्ह्यात यापूर्वी २५७७ मतदान केंद्र होती, आता ही संख्या २९५७ झाली आहे.

मुख्य निवडणुक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून या अनुषंघाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांमध्ये जिल्हा प्रशासनाची तयारी, तसेच संक्षित्प पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती तसेच प्रारुम मतदार यादीबाबत माहिती दिली. निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ५ हजार ७४३ बॅलेट युनिट (बीयू)तर ३ हजार ३३९ कंट्रोल युनिट (सीयू) मिळाल्या असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणुक प्रशांत शेळके यांचीही उपस्थिती होती.

२७ हजार ४०० मतदार दुबार, मयत, कायमस्वरुपी स्थलांतरीत

जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २७,४०० मतदार दुबार, मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत झाल्याचे आढळून आल्याने सदरील नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये ५ हजार १८६ मयत, १४ हजार ४२९ दुबार तर ७ हजार ७८५ मतदार कायमस्वरुपी स्थलांतरीत झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यादीत नाव असल्याची खात्री करा

जिल्ह्यातील नागरीकांनी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याबाबतची खात्री करावी, मतदार यादीतील नावांमध्ये अद्यावतपणा, दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे, वगळणे आदी प्रक्रीया करण्याची कार्यवाही सुरु असून प्रारुप मतदार यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्‍ध आहे, ती यादी तपासून मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा, याबाबत दावे, हरकती स्वीकारण्याचा कालावधीत ३१ ऑक्टोबरपर्यंत आहे, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

मतदार संघ मतदान केंद्रातील वाढ एकूण मतदान केंद्र

औरंगाबाद पश्चिम विधानसभा ८० ३३६

सिल्लोड ६६ ३५६

कन्नड ३० ३५१,

फुलंब्री ३१ ३४३

औरंगाबाद मध्य ६७ ३१२

औरंगाबाद पूर्व ५२ २९२

पैठण १७ ३२२

गंगापूर १३ २९९

वैजापूर २४ ३४६

जिल्ह्यातील मतदार

(१ सप्टेंबर २०१८ या आर्हता दिनांकानुसार)

पुरुष

१४ लाख ६ हजार १६ पुरुष

महिला

१२ लाख ४३ हजार ६०७

तृतीयपंथी

१८

सैन्य दल मतदार

२ हजार २३

एकूण

२६ लाख ५१ हजार ६६४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images