Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अनुशेष दूर करण्याासाठी सर्वांचा रेटा महत्त्वाचा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय होत असून, अनुशेष दूर होण्याऐवजी वाढत आहे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी सर्वांचा रेटा महत्त्वाचा असल्यामुळे अधिवेशन काळात विधानभवनात मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात येणार असून, यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सहमती दर्शवली आहे,' अशी माहिती मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली.

शुक्रवारी मराठवाडा विकास मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, सदस्य सचिव डी. एम. मुगळीकर यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. म्हणाले, 'मराठवाड्यात सिंचन क्षेत्र कमी असून ते जास्तीत जास्त कसे मिळवता येईल, तसेच अपूर्ण पडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास १४ हजार ५०० कोटींची गरज आहे. त्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.' बैठकीमध्ये मराठवाड्यात वैतरणेचे १० टीएमसी पाणी आणण्याचा विषयावर मराठवाडा विकास मंडळात चर्चा करण्यात आली.

\Bअजिंठ्यात रोप-वे अन् हेलिकॉप्टर सेवा

\Bबैठकीमध्ये जिल्ह्यातील पर्यटन विकासाबाबतही चर्चा करण्यात आली. अजिंठा व्ह्यू पॉइंट ते लेणी असा रोप-वे तयार करण्याचा प्रस्ताव असून या शिवाय औरंगाबाद लेणी, हनुमान टेकडी, गणपती टेकडी या ठिकाणी रोप-वे व्यवहार्य आहे का, याचीही तपासणी करण्यात येणार आहे. अजिंठा येथे हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किडनी रुग्णांसाठी व्यापक व्हावी अवयवदान चळवळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे प्रमाण वाढावे व प्रत्यारोपणातील अडथळे दूर व्हावेत, याच उद्देशाने केंद्र सरकारकडून सकारात्मक पावले टाकली जात आहेत. मात्र त्याचबरोबर अवयवदान चळवळदेखील व्यापक व्हायला पाहिजे. याच चळवळीतून मूत्रपिंडाच्या रुग्णांना मूत्रपिंड मिळण्याचा मार्ग मोठ्या प्रमाणावर मोकळा होईल आणि म्हणूनच अवयवदानासाठी जनजागृती वाढली पाहिजे,' असे मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 'पेरिटोनिअल डायलिसिस'च्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

हॉटेल ताजच्या 'विवांटा' येथे शुक्रवारी परिषदेचे उद्घाटन झाले. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले, परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास बावीकर, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. ऋषिकेश देशपांडे, डॉ. तरुण जेलोका, डॉ. बाल सुब्रमण्यम आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बागडे म्हणाले, मी स्वतःच्या कुटुंबातील अनेक किडनी रुग्ण जवळून पाहिले आहेत आणि त्यामुळे त्यांचा त्रास आणि त्यातील अडचणीही माहीत आहेत. पूर्वीच्या तुलनेत प्रत्यारोपणातील अडथळे कमी होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. अलीकडे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतही प्रत्यारोपण व डायलिसिस होत आहेत. त्यामुळ‍े रुग्णांना मोठा आधार मिळतो. डायलिसिस केंद्र सुरू होण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे येत असतील तर ती बाब नक्कीच स्वागतार्ह बाब आहे, असेही बागडे म्हणाले. कमीत कमी शुल्कात रुग्णांच्या 'डायलिसिस'साठी संस्था पुढे येत आहेत, ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे, असे महापौर घोडेले म्हणाले. आतापर्यंत ११३० किडनी प्रत्यारोपण करणारे डॉ. बावीकर यांचे योगदान नक्कीच विक्रमी आहे, असेही घोडेले म्हणाले.

\B'पीडी'ला आधार मिळावा

\B'हिमोडायलिसिस' (एचडी) इतकेच प्रभावी असलेल्या 'पेरिटोनिअल डायलिसिस'ला (पीडी) कोणतीही यंत्रणा किंवा मूत्रपिंडविकारतज्ज्ञ किंवा मशीन लागत नाही व रुग्ण स्वतः करू शकतो; परंतु आर्थिक कारणांमुळे रुग्ण 'पीडी'ची सेवा घेऊ शकत नाही. त्यामुळे 'एचडी'प्रमाणेच 'पीडी'लाही सरकारी योजनेत आधार मिळावा, अशी अपेक्षा डॉ. जेलोका यांनी व्यक्त केली. तर, २२ लाख रुग्णांना 'पीडी'चा आधार मिळू शकतो व सरकारने त्याचा विचार करावा, असे डॉ. बावीकर, डॉ. देशपांडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळाचा मृत्यूनंतर आई गेली पळून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) प्रसूती झालेल्या महिलेच्या बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला एनआयसीयू वॉर्डात भरती करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला व त्याची माहिती मिळताच संबंधित महिलेने तेथून धूम ठोकली. ही घटना बेगमपुरा पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली. बाळाचे वडील अंध असल्याने त्यांची मात्र या घटनेने मोठी फरफट झाली. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास त्याच महिलेने पतीला फोन करून घरी आल्याचे सांगितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मातृदिना'च्या निमित्ताने रविवारी होणार 'गौरव मातृत्वाचा'

0
0

मटा इव्हेंट

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मातृदिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'लिटील एंजल्स इंग्लिश स्कूल'च्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ सप्टेंबर (रविवार) रोजी सकाळी १० वाजता निराला बझार येथील तापडिया नाट्यगृहात 'गौरव मातृत्वाचा' सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 'गौरव मातृत्वाचा' सोहळ्याचे हे चौथे वर्ष असणार आहे.

मराठी कालदर्शिकेनुसार श्रावण वद्य अमावस्येला मातृत्व दिन साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीत मातृत्व दिनाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. हे एकप्रकारचे व्रत असून आजच्या धावपळीच्या युगातही हे व्रत माता आपल्या संततीच्या उत्तम आरोग्य, प्रगती, कल्याणासाठी करते. मातेचे ऋण कोणीच, कधीच फेडू शकत नाही असे म्हणतात... आपल्या आनंदात स्वतः चा आनंद पाहणाऱ्या मातांचा गौरव व्हावा या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

'मातृदिना'च्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्तुंग यश आणि कीर्ती मिळविणाऱ्या मान्यवरांच्या मातांना गौरविण्यात येईल. श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी सर्वत्र 'मातृदिन' साजरा करण्यात येतो. यंदा ९ सप्टेंबर या दिवशी 'मातृदिन' येत आहे. आपल्या आईबद्दल आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस 'गौरव मातृत्वाचा' च्या रूपाने साजरा होणार आहे.'गौरव मातृत्वाचा' सोहळ्यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. एमजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे आयसीडीचे संचालक प्रफुल्ल मिरजगावकर यांचीही यावेळी उपस्थिती राहील. यावेळी विविध क्षेत्रात यशोशिखर पादाक्रांत करणाऱ्या शहरातील गुणवंतांच्या मातांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिक्षण, कला, क्रीडा, सिनेमा, फॅशन, स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय, सामाजिक कार्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करून यश संपादन करणाऱ्या प्रतिमांच्या मातांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. या सोहळ्याला जास्तीत जास्त शहरवासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन 'लिटील एंजल्स इंग्लिश स्कूल'च्या (नागेश्वरवाडी) मुख्याध्यापिका योगिता शास्त्री यांनी केले आहे.

सत्कारमूर्ती

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'लिटील एंजल्स इंग्लिश स्कूल'च्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'गौरव मातृत्वाचा' सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या मातोश्री केसरबाई भापकर, शहीद संदीप जाधव यांच्या मातोश्री विमल जाधव, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम यांच्या मातोश्री विमल कदम, प्रसिद्ध शिल्पकार बलराज मडिलगेकर यांच्या मातोश्री संगीता मडिलगेकर, गझलकार डॉ. शेख इकबाल मिन्ने यांच्या मातोश्री दौलतबी मिन्ने, प्रसिद्ध गायक राजेश सरकटे यांच्या मातोश्री हंसादेवी सरकटे, उद्योजक विजय सक्करवार यांच्या मातोश्री विजयालक्ष्मी सक्करवार, विहम ऍग्रोटेकच्या नेहा कांदलगावकर यांच्या मातोश्री निर्मला कांदलगावकर, गिर्यारोहक मनीषा वाघमारे यांच्या मातोश्री सुमन वाघमारे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर 'आपली मुलं' संस्थेच्या श्यामसुंदर कणके यांचाही सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'लिटील एंजल्स इंग्लिश स्कूल'च्या संयुक्त विद्यमाने आम्ही मातृदिनी मातांचा सन्मान सोहळा आयोजित करत आहोत. यंदा या सोहळ्याचे चौथे वर्ष असून दरवर्षी 'गौरव मातृत्वाचा' या सोहळ्याची कीर्ती वाढत आहे.

- योगिता शास्त्री, मुख्याध्यापिका, लिटील एंजल्स इंग्लिश स्कूल, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारी 'फ्री इन्व्हेस्टमेंट सेमिनार'चे आयोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टाइम्स ऑफ इंडिया व महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने येत्या सोमवारी (१० सप्टेंबर) 'मेक मनी फॉर्म स्टॉक मार्केट' या विषयावर आधारित सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेमिनार रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल कीज येथे सोमवारी सायंकाळी ७ वाजता ठेवण्यात आला आहे. स्टॉक मार्केट एक्स्पर्ट किरण जाधव यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली जावी याची माहिती यावेळी देण्यात येईल. आज बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आणि वस्तू मार्केट, सरकारी आणि खासगी बाँड्स असे अनेक पर्याय उपलब्ध असून या सेमिनारमध्ये नवोदित गुंतवणूकदार, नियमित गुंतवणूकदार, ट्रेडर्स, ब्रोकर्स, घरबसल्या शेअर खरेदी-विक्री करणाऱ्या अशा सर्वांसाठी स्टॉक मार्केट एक्स्पर्ट किरण जाधव मार्गदर्शन करतील. या सेमिनारमध्ये 'पढ कर, समझ कर, निवेश कर' या ब्रिदवाक्यानिशी उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या सेमिनारमध्ये प्रवेशासाठी ९८२३३३६५२४ या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत विद्यार्थी, रक्षकात वाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) एमबीबीएसचा शेवटच्या वर्षातील विद्यार्थी व एमएसएफ जवानात बाचाबाची झाल्याची घटना घाटीच्या मेडिसिन विभागासमोर शुक्रवारी (७ सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. वाद विकोपाला गेल्यानंतर तक्रार करायला गेलेल्या विद्यार्थ्यांची उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी समजूत काढली व वादावर एकदाचा पडला पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण विभाग प्रमुखाला लाच घेतना पकडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा प्रमुख छबुलाल अभंग व दुय्यम आवेक्षक सचिन दुबे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. महापालिका कार्यालयात शुक्रवारी दुपारी ५० हजारांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले बांधकाम साहित्य परत करण्यासाठी बांधकाम पुढे चालू ठेवण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती.

बीड बायपास रोडवरील शहानगर येथे एका तरुणीने महापालिकेची परवागनी न घेता घराचे बांधकाम सुरू केले होते. अभंग आणि दुबे यांनी बांधकामाच्या ठिकाणी जात बांधकामासाठी लागणारे साहित्य जप्त केले होते. या तरुणीच्या वडिलांनी साहित्य परत करण्यासाठी अभंग व दुबे यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी दोघांनी साहित्य परत करण्यासाठी; तसेच हे बांधकाम पुढे चालू ठेवण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला होता. दरम्यान, शुक्रवारी या लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी अभंग यांनी तडजोडीअंती ही रक्कम ५० हजार ठरवत ही रक्कम सचिन दुबे याच्याकडे देण्यास सांगितली. ही रक्कम स्वीकारताना दुबे याला पकडण्यात आले. यानंतर पोलिसांनी छबुलाल म्हाताराजी अभंग (वय ५५) आणि सचिन श्रीरंग दुबे (वय ३२) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक वर्षाराणी पाटील, नितीन देशमुख, विजय बाम्ह्रंदे, रवींद्र देशमुख, गोपाल बरंडवाल, दिगंबर पाठक, चालक संदीप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई; अधिकारी निलंबित

0
0

बीड

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या साखर कारखान्यात ८ डिसेंबर २०१७ रोजी स्फोट झाला होता व त्यात ७ कामगारांचा मृत्यू झाला होता. कारखान्यात त्रूटी आढळल्याने या कारखान्याचा परवाना संबधित अधिकाऱ्याने रद्द केला होता.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील रसाच्या टाकीचा स्फोट झाला होता. या स्फोटात ७ कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारखान्याची पडताळणी करण्यात आली. या तपासणीत कारखान्यात अनेक त्रुटी आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अभिमन्यू केरुरे यांनी कारखान्याचा परवाना रद्द केला होता. कारखान्याला परवाना देण्याचे काम एफडीएच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. सहाय्यक आयुक्त अभिमन्यू केरुरे यांनी अधिकाराचा गैरवापर केला असा ठपका ठेवून एफडीएने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केल्यानंतर कारखान्याचा परवाना पूर्ववत करण्यात आला आहे.

या स्फोटात मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कारखान्याकडून ३ लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख आणि कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांच्याकडून वैयक्तिकरित्या १ लाख रुपये असे एकूण ६ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती तसेच जखमींना दीड लाख रुपयांची घोषणा पंकजा मुंडेंनी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेहरूभवन पाडून व्यापारी संकुल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनेक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे साक्षीदार असलेली नेहरूभवनची इमारत पाडून आता त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला आहे.

नेहरूभवनची इमारत औरंगाबादच्या जडणघडणीचा इतिहास आहे. पालिकेचे संत एकनाथ रंगमंदिर नव्हते तेव्हा आणि संत एकनाथ रंगमंदिर झाल्यावर देखील विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेहरूभवन केंद्र होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नहरूभवन अडगळीला पडले होते. लग्नकार्याशिवाय अन्य कार्यक्रम या ठिकाणी होत नव्हते. नेहरूभवनातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा देखभाल दुरुस्तीवरच पालिकेचा जास्त खर्च होऊ लागला. त्यामुळे नेहरूभवनची इमारत पाडून त्या ठिकाणी प्रेक्षागृह, समारंभ हॉल व व्यापारी संकुल तयार करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने मांडला आहे. नेहरुभवनची जागा चार हजार ५० चौरस मीटर आहे. त्यात २६ दुकाने, २४ कार्यालये, प्रेक्षागृह, मेजवानी हॉल, वाहनतळ याचा विकास केला जाणार आहे. व्यापारी संकुलातील दुकाने तीस वर्षांसाठी भाडेपट्टीवर दिली जाणार आहेत. याच्या बांधकामासाठी तेरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मरणाच्या दारातून १३ उंटांची सुटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबादच्या कत्तलखाण्यात १४ उंटांना घेऊन जाणारे दोन ट्रक पोलिसांनी पकडले. यातल्या एका उंटाचा गुदमरून मृत्यू झाला असून, तीन उंट गंभीर जखमी झाले आहेत.

राजस्थान येथून उंटानी भरलेला ट्रक औरंगाबाद मार्गे हैद्राबादच्या कत्तलखाण्यात जाणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. यावरून गोरक्षा विभागाचे प्रमुख राजेश जैन, शहर समिती प्रमुख श्रीनिवास धुप्पड, रोहित विजय वर्गीय, धर्मा भाई, अनुज धुप्पड, कन्हैया यांनी वाळूज पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. यावरून वाळूज पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अडीच वाजता सापळा रचून हा ट्रक (एच. आर. ७४ ए ९९५४) अडवला. तेव्हा एका चालकाने ट्रक सोडून पळ काढला. तर उंटाने भरलेला दुसरा ट्रक दुसऱ्या चालकाने लासूरच्या दिशेने वळवला. सातारा पोलिस यांची हद्द असल्याने वाळूज पोलिसांनी हा उंटांचा ट्रक सातारा पोलिसांच्या स्वाधीन केला.

बेगमपुरा गोशाळेत व्यवस्था

विश्व हिंदू परिषदेचे राजेश जैन यांनी सातारा पोलिसांच्या मदतीने उंटाने भरलेला ट्रक बेगमपुरा येथील गुरू गणेश गोशाळेत आणला. उंटाना बाहेर काढले असता त्यात एक उंटाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे दिसले, तर तीन उंट हे अस्वस्थ झाले होते. जैन यांनी जनावरांच्या डाक्टरांना बोलावून त्यांचावर प्राथमिक उपचार सुरू केले. तसेच तीन दिवस उंटाच्या चारापाणीची व्यवस्था करून त्यांना सोमवारी राजस्थान येथील पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा खोळंबा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणात मुबलक साठा असूनही, शहरात पुन्हा एकदा पाणी पुरवठ्याने नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहेत. अनेक भागात चक्क पाचव्या दिवशी पाणी येत असल्याने शहरवासीयांमध्य संतापाची लाट आहे.

पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकावरून गेल्या महिन्यात राजकीय कुरघोड्या पाहण्यास मिळाल्या. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला दोन दिवसांआड पाणी पुरवठा करण्यास भाग पाडले, तर भाजप आणि 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी समान पाणी वाटपाच्या मुद्यावरून पालिका प्रशासनाला तीन दिवसांआड पाणी पुरवठा करण्यास भाग पाडले. त्यातच अधिकाऱ्यांनी देखील दोन दिवसांआड पाणी पुरवठा करण्यास नकार दिला व तीन दिवसांआड पाणी पुरवठा करणे शक्य आहे, असे निवेदन त्यांनी केले. त्यामुळे सध्या दर चौथ्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे. चौथ्या दिवशी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन देखील काही दिवसांपासून शहरात पाण्याची ओरड सुरू झाली आहे. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडल्यामुळे अनेक भागांमध्ये पाचव्या दिवशी पाणी पुरवठा होऊ लागला आहे. प्रामुख्याने चिकलठाणा, मुकुंदवाडी, सिडको आणि गारखेड्याच्या काही भागात पाचव्या दिवशी पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. तीन दिवसांआड म्हणजे चौथ्या दिवशी पाणी येणार असे नागरिकांनी गृहित धरलेले असताना एकदम पाचव्या दिवशी पाणी येऊ लागल्यामुळे पाणी साठवून ठेवण्याची समस्या नागरिकांच्या समोर निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची तयारी दाखवलेली असताना त्यांचेही नियोजन फोल ठरल्याची चर्चा आहे. जायकवाडी धरणाने पाणी साठ्याची टक्केवारी चाळीसीपार केलेली असताना शहरातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. दुष्काळ असतानाही तेच आणि मुबलक पाणी असतानाही तीच रड यामुळे शहरवासीय संतापले आहेत. एकीकडे कचऱ्याने नागरिकांचे जगणे हैराण केले आहे. आत त्यात पाणी समस्येची भर पडली आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वी जायकवाडी येथील पंपहाउस आणि फोराळा येथील जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी विद्युत उपकरणांमध्ये तांत्रिक बिगाड झाला. त्याच्या दुरूस्तीचे काम आताही सुरू आहे, त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसांनी पुढे ढकलण्यात आले आहे. दिल्लीगेट आणि शहागंज येथील जलकुंभावरून पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत, लवकरच या अडचणी दूर होतील.

- हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा

\Bयेथे वाजले नियोजनाचे तेरा

\B- सिडको

- गारखेडा

- मुकुंदवाडी

- चिकलठाणा

\Bआता वाजले की बारा

शिवसेना : २ दिवसाआंड पाणी द्या

भाजप : ३ दिवसांआड पाणी द्या\B

\Bअधिकारी : ४ थ्या पाणी मिळेल\B

\Bसद्यस्थिती : ५ व्या दिवशी पाणी\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकअदालतमध्ये ८०४ प्रकरणांत तडजोड

0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये ३७१ प्रलंबित व ४३३ दाखलपूर्व अशी ८०४ प्रकरणात तडजोड करण्यात आली. दोन कोटी १७ लाख ८४ हजार ९३८ रुपये वसूल करण्यात आले.

लोकअदालतचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश प्रकाश माळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विविध वित्तीय संस्थेचे अनादर झालेल्या १४२ धनादेशाच्या प्रकरणात नुकसान भरपाई देण्यासंदर्भात तडजोड करण्यात आली. भूसंपादनातील २१ प्रकरणांचा निकाल लावून त्या शेतकऱ्यांना दिलास देण्यात आला आहे. विविध ठिकाणी झालेल्या अपघातात मृत आणि जखमी झालेल्याच्या वारसांना नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश १७ प्रकरणांमध्ये दिले. या लोकअदालतमध्ये ३३ दिवाणी प्रकरणातील पक्षकारांनी आप आपले मतभेद मिटवले. कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणातील २४ कुटुंबांचे संबध पूर्ववत झाले. ३७१ प्रलंबित व ४३३ दाखलपूर्व असे ८०४ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. प्रलंबित प्रकरणामध्ये ३ कोटी ६६ लाख ६१ हजार ५०५ तर वादपूर्व प्रकरणामध्ये २ कोटी १७ लाख ८४ हजार ९३८ रुपये वसूल करण्यात आले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी, व्ही. व्ही. पाटील, एस. डी. दिग्रसकर, एच. एस. महाजन, एस. डी. इंदूलकर यांनी प्रयत्न केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी, पी. पी. कर्णीक, एस. एस. भीष्मा, व्ही. एच. पाटवदकर, एच. के. भालेराव, दिवाणी न्यायाधीश आर. एम. शिंदे, आर. एस. भोसले, एम. बी. अत्तर, ए. बी. शेख, ए. एम. हुसेन, व्ही. एस. खांडबहाळे, आर. आर. मावतवाल, ए. वाय. एच.मोहम्मद, एच. एस. पुराडउपाध्ये, डी. एस. वमने, एस. ए. राठोड, के. के. कुरंदळे, रुहिना अंजूम मोहम्मद यूनुस, एस. एस. दहातोंडे, जी. आर. तिवारी, एस. पी. पांडव, एम. ए. हुसैन यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा सरकारवर निषेध बाण!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने शनिवारी वाढत्या इंधन दराविरोधात पेट्रोल पंपावर निषेधाची पोस्टरबाजी करून सरकारला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला.

सप्टेंबर महिन्यात इंधनाचे दर रोज वाढत आहेत. त्यामुळे जनतेत संतापाची लाट आहे. या लाटेवर विराजमान होण्यासाठी शिवसेनेच्या वतीने क्रांती चौकातील सुपर हिंद पेट्रोल पंपावर आंदोलन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, नगरसेवक राजू जंजाळ, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, संतोष जेजूरकर यांच्यासह शिवसेना तसेच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पेट्रोल पंपावर आलेल्या वाहनधारकांशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली. जोरदार घोषणाबाजी करत 'हेच का अच्छे दिन' असा सवाल केला. तसेच २०१५ आणि २०१८मधील इंधन दराचे तुलनात्मक पोस्टर लावले. शहराती बाबा पेट्रोल पंप, राज पेट्रोल पंपावर ही असे पोस्टर लावण्यात आले.

१४ तासांत तीन वेळा बदलले दर

शिवसेनेने सकाळी ११ वाजता आंदोलन सुरू केले. त्यापूर्वी १४ तास आधी आंदोलनाचे नियोजन सुरू करण्यात केले होते. मात्र, या वेळेत तीन वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी हे दर हाताने लिहून बोर्डावर लावण्याची सोय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना करावी लागली. …………

\Bशिवसेनेने दाखवला आरसा

\B प्रकार - २०१५ - २०१८

- पेट्रोल - ६४.६० - ८८.७९

- डिझेल - ५२.९९ - ७८.००

- गॅस - ५७२.५० - ७६४.५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत आयुक्तांपेक्षा अधिकाऱ्यांची साखळी किती भक्कम आहे याची प्रचिती पुन्हा एकदा येत आहे. त्याचे कारण म्हणजे प्राणिसंग्रहालयातील केअरटेकर्सच्या नियुक्तीबद्दल आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली. इतकंच नाही, तर केअरटेकर्सच्या बदल्या रद्द करण्याचे आदेशही लालफितीत गुंडाळून ठेवले आहेत. त्यामुळे प्राण्यांची हेळसांड सुरू आहे.

महापालिकेचे प्राणिसंग्रहालय १९८४-८५मध्ये सुरू झाले. तेव्हापासून प्राण्यांची काळजी घेण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. वर्षानुवर्षे प्राणी आणि केअरटेकर्स एकत्र असल्यामुळे त्यांच्यात एकमेकांबद्द्ल जिव्हाळा निर्माण झाला. प्राण्यांच्या सवयी केअरटेकर्सच्या लक्षात आल्या. प्राण्यांना कोणत्यावेळी काय खायला दिले पाहिजे, त्यांची निगा कशी राखली गेली पाहिजे, याची माहिती केअरटेकर्सला योग्य प्रकारे आहे असे मानले जाते. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील हिंस्त्र प्राणीदेखील केअरटेकर्सच्या सांगण्यापुढे नाहीत. मात्र, काही दिवसांपूर्वी प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने काही केअरटेकर्सच्या बदल्या केल्या. त्यातच सचिन हा पांढरा वाघ आजारी पडला. त्याची आताही मृत्यूशी झुंज सुरूच आहे. अन्यही काही प्राण्यांची अवस्था बिकट झाली आहे. प्राणिसंग्रहालयातील प्राणी वर्षानुवर्षे ज्या केअरटेकर्सच्या अंगाखांद्यावर खेळून मोठे झाले, त्या केअरटेकर्सची बदली रद्द करून पुन्हा त्यांना प्राणिसंग्रहालयात काम देण्याची शिफारस महापौर नंदकुमार घोडेले यांनी 'सचिन' च्या प्रकृतीची पाहणी केल्यानंतर आयुक्तांना केली. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या उठाठेवीमुळे एकीकडे महापौरांच्या मागणीला खो तर दुसरीकडे आयुक्तांच्या आदेशालाही चाप लागल्यात जमा आहे.

\Bहितसंबंध कुणाचे?

\Bसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापौरांची शिफारस मान्य करून केअरटेकर्सच्या बदल्या रद्द केल्या. मात्र, प्राणिसंग्रहालयासह पालिका मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या साखळीने आयुक्तांनी बदली रद्द करण्याचे आदेश लालफितीत बंद करून ठेवले आहेत. आयुक्त केअरटेकर्सशी स्वत: चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. असे करण्यात काही अधिकाऱ्यांना स्वत:चे हितसंबंध गुंतल्याचे बोलले जात आहे. आयुक्त आणि महापौरांच्या आदेशानंतरही सामान्य केअरटेकर्सची बदली अधिकाऱ्यांच्या साखळीने रोखली असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालुका पातळीवरही स्वच्छ ग्राम गौरव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील पहिल्या क्रमांकाच्या राज्यस्तरीय पुरस्काराने हिवरेबाजार (ता. जि. नगर) ग्रामपंचायतीचा शनिवारी गौरव करण्यात आला. आता यापुढे तालुका पातळीवरील ग्रामपंचायतींचाही गौरव करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, हिवरे बाजारचे पोपटराव पवार, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर उपस्थित होते.

यावेळी बागडे म्हणाले, 'ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत केवळ पुरस्कारप्राप्त गावांनी बक्षीस मिळेपर्यंतच कार्य न करता त्यात सातत्य ठेवावे. गावाचे आकर्षण स्वच्छतेवरून ठरते. म्हणून प्रत्येकाने यासाठी धडपड करावी.' लोणीकर म्हणाले, 'राज्याने स्वच्छता अभियानांतर्गत देशात प्रशंसनीय कार्य केले आहे. यापुढे तालुका पातळीवरील ग्रामपंचायतींचाही गौरव करण्यात येईल. प्रत्येक ग्रापंचायतींच्या उत्कृष्ट प्रभागास (वॉर्ड) दहा हजार रुपयांचे बक्षीस ठेवल्याने प्रत्येक गावातील कुटुंबांची स्वच्छता वाढेल. स्वच्छतेची चळवळ व्यापक होईल. गेल्या चार वर्षांत विविध पाणीपुरवठा योजना व शौचालय निर्मितीसाठी सरकारने २० हजार ४३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी गावात स्वच्छता व आरोग्य विषयक जनजागृती केल्याबद्दल महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नागरिकांचे अभिप्राय नोंदविणे यामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या जिल्ह्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये अनुक्रमे नाशिक, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर विभागस्तरावर औरंगाबाद विभागातून उस्मानाबाद, अमरावतीतून बुलढाणा, नागपूरमधून चंद्रपूर, कोकण विभागातून रायगड, नाशिक विभागातून अहमदनगर तर पुणे विभागातून कोल्हापूर जिल्ह्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाणी व सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रातील कार्यासाठी अवनखेड (ता. दिंडोरी, जि. नाशिक) ग्रामपंचायतीला वसंतराव नाईक पुरस्कार, कुटुंब कल्याण क्षेत्रासाठी स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार देवगाव (ता. अचलपूर जि. अमरावती) ग्रामपंचायतीला आणि सामाजिक एकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पांगरखेड (ता. मेहकर, जि. बुलढाणा) ग्रामपंचायतीला मिळाला.

विभागस्तरावरील पुरस्कार

औरंगाबाद विभागात प्रथम धामनगाव (ता. शिरुर, जि. लातूर), द्वितीय शेळगाव गौरी (ता. नायगाव, जि. नांदेड), अमरावती विभागात प्रथम पांगरखेड (ता. मेहकर, जि. बुलढाणा), द्वितीय देवगाव (ता. अचलपूर, जि. अमरावती), नागपूर विभागात प्रथम शिवनी (मो) (ता. लाखणी, जि. भंडारा), द्वितीय राजगड (ता. मूल जि. चंद्रपूर), नाशिक विभाग प्रथम हिवरेबाजार (ता. जि. नगर), द्वितीय अवनखेड (ता. दिंडोरी, जि. नाशिक), पुणे विभाग प्रथम मन्याची वाडी (ता. पाटण, जि. सातारा), द्वितीय चाकण (ता. खेड, जि. पुणे), कोकण विभाग प्रथम धाटाव (ता. रोहा जि. रायगड), द्वितीय आंदुर्ले (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार

- प्रथम (२५ लाख) - हिवरेबाजार (जि. नगर)

- व्दितीय (१० लाख) - मन्याचीवाडी (जि. सातारा)

- द्वितीय (१० लाख) - शेळगाव गौरी (जि. नांदेड)

- तृतीय (साडेसात लाख) - धाटाव (ता. जि. रायगड)

- तृतीय - (साडेसात लाख) - राजगड (ता. मूल, जि. चंद्रपूर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घुसखोर विद्यार्थ्यांना नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधन वसतिगृहात अनेक वर्षे ठाण मांडलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. मुदत संपलेल्या विद्यार्थ्यांना खोलीचा ताबा प्रशासनाकडे देण्यास बजावण्यात आले आहे. अन्यथा, नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने ठोस भूमिका घेतल्यामुळे नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विद्यापीठातील जुन्या वसतीगृहांची प्रवेश क्षमता कमी असल्यामुळे नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची गैरसोय झाली आहे. वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची कुचंबणा सुरू आहे. संशोधक विद्यार्थ्यांच्या सिद्धार्थ वसतीगृहातील अनधिकृत ताब्याचा मुद्दा चर्चेत आहे. वसतीगृहात राहण्याची आणि संशोधनाची मुदत संपलेली असूनही काही विद्यार्थ्यांनी ताबा सोडला नाही. काही विद्यार्थी चक्क दहा वर्षांपासून वसतीगृहात ठाण मांडून आहेत. नोकरीला असूनही त्यांनी खोलीचा ताबा सोडलेला नाही. यावर्षी संशोधन प्रक्रिया सुरू झाल्यामुळे वसतिगृहातील प्रवेश क्षमतेचा प्रश्न प्रशासनासमोर आला. अंतिम पात्रता यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केला. वसतिगृहात जागा नसल्याचे कारण सांगण्यात आले. अनधिकृत ताबा घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यास सांगा अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांची घुसखोरी' (एक सप्टेंबर) हे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. चार सप्टेंबरला विद्यापीठ प्रशासनाने अनधिकृतरित्या राहत असलेल्या विद्यार्थ्यांना नोटीस बजावली आहे. वसतिगृह नियमानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त कालावाधी झालेले विद्यार्थी, वसतिगृहाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले विद्यार्थी, संशोधन प्रबंध सादर केलेले आणि नोकरी करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ वसतिगृह सोडावे, अशी सूचना करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी लेखा विभागात राहिलेले शुल्क भरून खोलीचा ताबा वसतिगृह कार्यालयास द्यावा. अन्यथा, नियमानुसार कारवाई करुन ताबा घेण्यात येईल असे विद्यार्थी विकास संचालकांनी नोटीशीद्वारे कळवले आहे. या कारवाईमुळे संशोधक विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे सोपे होणार आहे.

पात्रतेनुसार प्रवेश देणार

वसतिगृह प्रवेशात विद्यार्थी संघटना आणि राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असतो. या पाठबळावर काही विद्यार्थी अनेक वर्षे मुक्काम ठोकून आहेत. नवीन विद्यार्थी वसतिगृहात जागा नसल्यामुळे बेगमपुरा परिसरात खोली भाड्याने घेऊन राहतात. या राजकीय हस्तक्षेपाला प्रशासनाने विरोध केला नसल्यामुळे गैरप्रकार वाढले आहेत. मात्र, यावर्षी पात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्यात येतील. अवैधरित्या राहत असलेल्या विद्यार्थ्यांना थारा देण्यात येणार नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या वसतीगृहाच्या मुद्यावरुन प्रशासन व विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर परिसरात सर्जा-राजाच्या मिरवणुका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बळीराजाचा मानाचा सण पोळा शहरासह परिसरातील हर्सूल, चिकलठाणा, तीसगाव, मुकुंदवाडी, देवळाई येथे उत्साहात साजरा करण्यात आला. पोळ्यानिमित्त मानाच्या बैलजोडीचे पूजन करण्यात आले.

औरंगाबाद शहर परिसरात हर्सूल, देवळाई, वळदगाव, चिकलठाणा, झाल्टा, शेंद्रा, मुकुंदवाडी, तीसगाव, वाळूज, पिसादेवी आदी भागात शेतकऱ्यांनी बळीराजाला सजवून मिरवणुका काढल्या. हर्सूल येथील हनुमान मंदिराजवळ सायंकाळी पंरपरेनुसार पोळा फुटला. या ठिकाणी सुरुवातीला अश्वाचे नृत्य सादर करण्यात आले. यानंतर ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुकांना सुरुवात झाली. पंचक्रोशीतील शेतकरी या सोहळ्याला बैलजोडी घेऊन आले होते. नगरसेवक पूनम बमने, पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर, उपमहापौर विजय औताडे यांच्या हस्ते मानाच्या बैलांचे पूजन करण्यात आले. यावेळी रंगनाथ राठोड, शेख लाल पटेल, स्वामी दुबे, भीकन बकले, माधव वाणी, दादासाहेब औताडे, साईनाथ हरणे, मच्छिंद्र दुबे, रंगनाथ हरणे यांच्यासह हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

\Bवाहतूक जाम

\B

हर्सूल भागात मुख्य रस्त्यालगत पोळा फुटत असल्याने हजारो नागरिकांची गर्दी झाली. याचा परिणाम वाहतुकीवर जाणवला. गर्दीमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना तातडीने वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेसाठी भाजपची प्रभारी क्लस्टर योजना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकसभा प्रभारी क्लस्टर योजना आखली आहे. भाजपचा खासदार नसलेल्या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

येत्या लोकसभा निनवडणुकीसाठी भाजपने बुथस्तरापर्यंत सुक्ष्म नियोजन केले आहे. राज्यातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडे लोकसभा प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते एमटीडीसीचे माजी चेअरमन श्रीकांत देशपांडे हे प्रभारी आहेत. प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्याकडे हिंगोली, जालना प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, परभणी डॉ. अजित गोपछडे, लातूर अॅड. मिलिंद पाटील, नांदेड आमदार निलप नाईक, बीड प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, तर प्रदेश चिटणीस मनोज पांगारकर यांना उस्मानबाद प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. पक्षपातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निम्न पातळीवर काम होत आहे किंवा नाही, यावर नजर ठेवणे, पक्ष बांधणी व प्रभावी यंत्रणा राबविण्याची जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राज्यात एकूण आठ क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते, मंत्र्यांकडे तीन ते चार लोकसभा मतदारसंघाची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. अन्य राज्यातील मंत्री, तसेच केंद्रातील पदाधिकारी, मंत्री यांच्याकडेही काही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पद्धतीने तिहेरी यंत्रणा राबविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

\Bअसे आहे क्लस्टर \B

मराठवाडा क्लस्टर १ मध्ये औरंगाबाद, जालना परभणी व हिंगोली, मराठवाडा क्लस्टर २ मध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबई १ मध्ये उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व मुंबई, मुंबई २ क्लस्टरमध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, ठाणे क्लस्टरमध्ये भिवंडी, कल्याण, पालघर, कोकण क्लस्टरमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णसेवा करायची नसेल, तर बदली करून घ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

'वैजापूर येथे शंभर खाटांचे नामांकित उपजिल्हा रुग्णालय आहे. पण डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांकडून रुग्णसेवा मिळत नसल्याच्या तक्रारी व नागरिकांचा रोष वाढला आहे. त्यामुळे रुग्णसेवा करायची नसेल तर बदली करून घ्या, पण निष्कारण रुग्णांच्या जीवाशी खेळू नका. अन्यथा कडक कारवाई केली जाईल,' असा इशारा मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिला.

मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय अधीक्षकांचा पदभार स्वीकारण्यापासून ते रुग्णसेवेपर्यंतचा कारभार ढेपाळला आहे. या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, उपसंचालक डॉ. विनायक भटकर, भाजप जिल्हा सरचिटणिस मोहन आहेर, पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत, डॉ. अभिजित अन्नदाते, प्रभाकर गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कराड यांनी रुग्णालयातील प्रत्येक विभाग, ट्रॉमा केअर सेंटरची पाहणी करून रुग्ण कल्याण समितीची बैठक घेण्याची सूचना केली. बैठकीत वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के. मुंढे, डॉ. कुलकर्णी व परिचारिका प्रमुख खंडागळे यांच्याशी चर्चा केली. डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्या, सफाई कामगार, औरंगाबाद येथून अप-डाउन करणारे डॉक्टर, वैजापूर येथे राहणारे डॉक्टर याची माहिती घेतली. १९ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी १७ डॉक्टर नियुक्ती असून ते फक्त कागदावरच असल्यासारखी स्थिती आहे. बायोमेट्रिक मशीन बंद आहे, पेशंटचे निदान न करता रेफर केले जाते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतात अशा स्वरुपाच्या तक्रारी मंगेश भागवत, नगरसेवक दशरथ बनकर, ज्ञानेश्वर घोडके, दिनेश राजपूत, सय्यद हिकमत यांनी केल्या. याप्रसंगी नगरसेवक गणेश खैरे, शैलेश चव्हाण, प्रशांत कंगले, फेरोज पठाण, हमीद जिलानी, सुनील गायकवाड, शिवाजी थेटे, आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन विभाग, बिबट्यात लपाछपीचा खेळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

एका शेतकऱ्याला मारल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या दोन पथकातील चाळीस कर्मचारी व तज्ज्ञ दिवसरात्र त्याच्या मागावर आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून बिबट्या पथकाला गुंगारा देत असून शहरासह तालुक्यातील वीस गावांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

सुरुवातीला शेतकऱ्यांच्या जनावरांची शिकार करणाऱ्या बिबट्याने गुरुवारी तालुक्यातील ५६ वर्षीय शेतकरी भारत ठेणगे यांना ठार मारले. या घटनेमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील जवळपास वीस गावांत प्रचंड भीतीचे वातावरण आहे. गावकरी व शेतकऱ्यांमध्ये वन विभागाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दबाव निर्माण झाला आहे. वन विभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी गुरुवारपासूनच सर्व यंत्रणा कामाला लावली आहे.

'सध्या वन विभागाच्या दोन पथकांतील चाळीस कर्मचारी व बंदुकीद्वारे गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करणारी तज्ज्ञांची टीम तीन दिवसांपासून बिबट्याच्या मागावर आहेत. मात्र, बिबट्या सतत ठिकाण बदलून पथकाला गुंगारा देत आहे. तो शनिवारी दिवसभर बिबट्या आपेगाव शिवारात होता. मात्र, शनिवारी रात्रीपासून अचानक तेथून गायब झाला. रविवारी दिवसभर त्यांचा माग लागला नाही. यामुळे, सध्या दोन्ही पथके आनंदपूर शिवारात तळ ठोकून आहेत,' अशी माहिती वन विभागाचे शेषराव तांबे व वैद्य यांनी दिली.

बिबट्याने शेतकऱ्याला ठार मारल्याच्या घटनेनंतर, तालुक्याच्या पूर्व भागातील जवळपास वीस गावांतील गावकरी व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून या गावातील शेतकरी व शेतमजूर शेतात जायला घाबरत आहेत. गावकरी अंधार पडायच्या आत घरी जात आहेत.

\Bजोरदार अफवा

\B

बिबट्याचा वावर सध्या आनंदपूर व आपेगाव शिवारात असला तरी शहरासह संपूर्ण तालुक्यात अफवांचे पेव फुटले आहे. शनिवारी रात्री हा बिबट्या आखतवाडा मार्गावर, शहराजवळील पाचोड फाट्यावर व जायकवाडी धरण परिसरात दिसल्याची अफवा पसरली होती. यामुळे पैठण शहरासह पाचोड रोड वरील गावांमधील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

\Bबैलांची आंघोळ घरीच \B

बैलपोळ्याला तालुक्यातील गणथडी भागातील शेतकरी त्यांच्या बैलांना गोदावरी नदीत स्नानासाठी नेतात. मात्र, रविवारी बैलपोळ्याच्या दिवशी बिबट्यांच्या भीतीमुळे गणथडी भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या बैलांना नदीवर न नेताच घरीच अंघोळ घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images