Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीप्रमाणे तब्बल ७० फूट खोल विहिरीत पडलेल्या बैलाला जीवंत बाहेर काढण्यात आले. शेतकरी आणि गावकऱ्यांनी तत्परता दाखवल्यामुळे बैलाचे प्राण वाचले.

तालुक्यातील गणोरी येथील शेतकरी कारभारी पाटीलबा उबाळे यांचा बैल ऐन पोळ्यादिवशीच दुसर्या बैलासोबत चरताना असतांना बांधलेल्या अवस्थेत झुंजतांना रविवारी दुपारी एक वाजता विहिरीत पडला. बैल जोडी नेहमीच्या ठिकाणी गोठ्यासमोर वेगवेगळ्या चऱ्हाटाने बांधली होती. मात्र त्याचे दुसऱ्या बैलासोबत बिनसले व त्यावेळी त्यांच्यात चांगलीच झुंज झाली. विहिरीत २५ फूट पाणी असल्याने बैलास काही ईजा झाली नाही. थोड्या वेळाने शेतकरी उबाळे तिथे आले असता बैल विहिरीत पडलेला दिसला. त्यांनी ताबडतोब गावात फोन केला. ही माहिती समजताच शेकडो गावकरी विहिरीजवळ जमा झाले. यावेळी राजू हरिभाऊ उबाळे व गणपत तांदळे यांनी विहिरीत उतरून बैलास दोरखंडाने बांधले, त्यानंतर गावकऱ्यांनी बैलास वर खेचून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कन्नड येथे उद्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये मराठी विभागातर्फे मंगळवारी लोकनेते सहकारमहर्षी बाळासाहेब पवार राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष आहे. 'समाज परिवर्तनात सोशल मीडियाची भूमिका' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सात हजार रुपये, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय पारितोषिक पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासोबतच अकराशे रुपयांची प्रत्येकी दोन उत्तेजानार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता डॉ. अशोक देशमाने, मराठी विभागप्रमुख (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. डी. शिंदे राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त तैनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी विविध राजकीय पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला असून राजकीय पक्षांनी शांततेत बंद पाळण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी केले.

शहरात बंदच्या काळात काही अनूचित घटना घडू नये म्हणून पोलिस यंत्रणा सजग तयारीत आहे. सोमवारच्या बंदोबस्तासाठी एक राज्य राखीव दलाची कंपनी, सात दंगा काबू पथक, दोन क्विक रिसपाँस टीम, दहा स्ट्रायकिंग फोर्सचा समावेश आहे. सबंधित पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना देखील त्यांच्या हद्दीत सतर्क राहण्याचे तसेच पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा व विशेष शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील या बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहे.

नागरिकांनी बंद शांततेत पाळावा. कोणत्याही अफवेला बळी पडू नये. कोणतीही अनूचित घटना आपल्याकडून होणार नाही याची दक्षता बाळगावी. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे. अनूचित प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

-डॉ. दीपाली धाटे घाडगे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

पोळा सणामुळे बैल धुण्यासाठी गेलेला १४ वर्षीय मुलगा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास खुलताबाद तालुक्यातील कनकशीळ येथे घडली. राहुल आबाराव म्हस्के (रा. म्हस्के वस्ती) असे या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे कनकशीळ गावावर शोककळा पसरली. राहुल हा मित्रांसोबत कनकशीळ येथील गट नंबर २३५ मधील विश्वास काशीनाथ कामठे यांच्या शेतातील पाझर तलावात बैल धुण्यासाठी गेला होता. या पाझर तलावात विहीर असून विहिरीच्या खोलीचा अंदाज न आल्याने राहुल तलावातील पाण्यात बुडाला. ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेत त्याला तलावातून बाहेर काढले. त्याला बेशुद्धावस्थेत औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोळ्यानिमित्त आज गणोरीत कुस्त्यांची दंगल

$
0
0

फुलंब्री : तालुक्यातील गणोरी येथे दरवर्षीप्रमाणे पोळा आणि पाडव्यानिमित्त सोमवारी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. ही दंगल गणोरी येथील सोनगडावर होणार आहे. कुस्त्यांची सुरुवात सकाळी दहा वाजता होऊन सायंकाळी सहा पर्यंत स्पर्धा होणार आहेत. यावेळी महिलांच्याही कुस्त्या खेळवण्यात येणार आहेत, असे कळवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन खासदारांचे ‘एमआयएम’चे लक्ष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनुसूचित जाती, मुस्लिम आणि इतर समाजाला सोबत घेऊन आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातून दोन खासदार निवडून आणणे एमआयएमला शक्य आहे. त्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांनी परिश्रम करावे, असे आवाहन एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरूद्दिन ओवेसी यांनी केले.

महाराष्ट्रातील पक्षाच्या नगरसेवकांची हैदराबाद येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार वारिस पठाण, आमदार इम्तियाज जलील, पक्षाचे वरिष्ठ नेते अहेमद पाशा कादरी यांच्यासह ११२ पैकी १०५ नगरसेवक उपस्थित होते. यावेळी आमदार ओवेसी यांनी एमआयएमच्या हैदराबादमधील कामकाजाची माहिती दिली. सामाजिक एकता, सेवा व सामाजिक विकासानंतर एमआयएमच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकावर राजकारण आहे. यानुसार नगरसेवकांनी कार्य केले तर पक्ष वाढीस हातभार लागेल, असे ते म्हणाले. मित्र पक्षांच्या मदतीने येत्या काळात महाराष्ट्रात दोन खासदार, १० ते १५ आमदार, पाचशे पेक्षा जास्त नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आणणे कठीण नाही. याच कार्यपद्धतीनुसार बिहार आणि उत्तरप्रदेशातही विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुढील महिन्यात महाराष्ट्रात घेण्यात येणार असल्याचे संकेत खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी दिले.

…………

\Bखासदारांनी टोचले कान

\B

दुसऱ्या सत्रात खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी औरंगाबादचे नगरसेवक सय्यद मतीन यांचा उल्लेख न करता पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, 'टीआरपी' मिळविण्यासाठी केलेले काम हे जास्त काळ टिकत नाही, या शब्दात कान टोचले. पक्षाच्या कार्यपद्धतीविरोधात काम केल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरळ शिवारात तरूण बुडाला

$
0
0

वैजापूर: तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी गंगापूर तालुक्यातील येरळ शिवारात घडली. संकेत नंदकिशोर निमोणे (वय १८) असे मृताचे नाव आहे. तो दुपारी दोन वाजेच्या सुमारास येरळ शिवारातील धरणात पाण्यात बुडाला. त्याला लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ऐन पोळ्याच्या सणाला घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या बंदला मनसे, डाव्यांचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसेच अन्य डाव्या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेंसतर्फे विविध पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात येणार आहेत.

बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हा व्यापारी महासंघ, विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी, पेट्रोलपंप चालकांची भेट घेतली. पंप चालकांनी सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंद शंभर टक्के यशस्वी होणार असल्याचा दावा शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांनी केला.

\Bएसटीचे सावध पाऊल \B

देशव्यापी बंदमुळे सोमवारी औरंगाबादेतून एसटी महामंडळाच्या बस पोलिस सरंक्षणात सोडण्यात येणार आहेत. सरंक्षण न मिळाल्यास सकाळी काही प्रमाणात बससेवा रद्द होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बैल धुताना अंबाडी प्रकल्पात बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील अंधानेर येथील तरुणाचा बैल धुताना अंबाडी प्रकल्पातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. कैलास भावराव बावीस्कर ( वय २४) असे या तरुणाचे नाव आहे.

कैलास बावीस्कर हा पोळ्याच्या सणानिमित्त रविवारी सकाळी आठ वाजता गावानजिक असलेल्या अंबाडी प्रकल्पात सहकाऱ्यांसोबत बैल धुण्यासाठी गेला होता. मयताचे नातेवाईक व घटनास्थळी उपस्थित तरुणांनी बावीस्कर यांना पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. मयत कैलास बावीस्कर यांच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, पत्नी, दोन मुले व एक महिन्याची मुलगी, असा परिवार आहे. कन्नड ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टेम करण्यात येऊन दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरूणसागरजींच्या कडव्या प्रवचनाची देशाला गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जैन मुनी तरूणसागरजी यांनी 'कमीत कमी घेणे, अधिकाधिक देणे आणि श्रेष्ठ जीवन जगणे हे जीवनाचे खरे मूल्य आहे,'

असा संदेश दिला आहे. देशाला तरूणसागरजी महाराजांच्या प्रवचनांची गरज आहे, असा सूर रविवारी (९ सप्टेंबर) सर्वधर्मीय विनयांजली धर्मसभेत निघाला. यावेळी उपस्थित साधु-संत व विविध पदाधिकाऱ्यांनी तरूणसागरजी महाराजांच्या जीवनावर उद्बोधन केले.

खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत राजाबजार, गुरूâ परिवार तसेच सकल जैन समाज, आचार्य विशुद्धसागर महाराज वर्षायोग समिती, पुलक जन चेतना मंच यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीकारी राष्ट्रसंत तरूâणसागरजी महाराज यांच्या समाधी निर्वाण निमित्ताने सर्वधर्मीय विनयांजली धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी तरूâणसागरजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.

यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, पंचायत अध्यक्ष ललीत पाटणी, गुरू परिवार अध्यक्ष निलेश सेठी, जगन्नाथजी काळे, लक्ष्मीनारायण राठी, सरदार हरिसिंग, अजयभाई शहा, मिठालाल कांकरिया, मनीष आंचलिया, सुनील राका, नरेंद्र गेलडा, सुधीर साहुजी, दिगंबरराव क्षीरसागर, महावीर पाटणी, डी. बी. कासलीवाल, डॉ. प्रकाश झांबड, पंकज फुलफगर, विलास साहुजी, संजय संचेती, रवी मुगदिया, मदनलाल आच्छा, चांदमल सुराणा, वृषभ कासलीवाल, विनोद बोकडिया, भारती बागरेचा, अजय शहा आदींची उपस्थिती होती.

यावेळी दर्डा यांनी मुनिश्रीना विनयांजली वाहतांना २००८च्या चातुर्मास आठवणींना उजाळा दिला. तसेच मुनिश्रींचे कडवे प्रवचन जे अंगीकृत करतील तोच पुढे मोठा होईल, असे सांगितले. यावेळी महापौर नंदकुमार घोडले म्हणाले की, हे महाराज जैनांचे नव्हे, तर समस्त भारतवासीयांचे होते. त्यांचे विचार जगामध्ये अस्तित्वात असावे यासाठी सेव्हन हिल चौकाला क्रांतीकारी राष्ट्रसंत तरूणसागरजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेत मंजूर झाल्याचे सांगितले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद ते दिल्ली दरम्यान सुरू होणाऱ्या नवीन रेल्वेला तरूâणसागरजी एक्स्प्रेस हे नाव देण्यात यावे यासाठी समितीसमोर प्रस्ताव मांडणार असल्याचे सांगितले. यावेळी निलेश सेठी यांनीही विनयांजली वाहताना मनोगत व्यक्त केले.

कार्यकम यशस्वी करण्यासाठी सुनील सेठी, अनुज दगडा, पवन पाटणी, अशोक अजमेरा, सावन चुडीवाल, प्रीतम पाटणी, प्रमोद पहाडे, निलेश गंगवाल, राहुल पांडे, जितेद्र गंगवाल, विजय चांदीवाल, महिला सदस्या अभिलाषा गंगवाल, शोभा बाकलीवाल, डॉ. सपना जैन, उषा सेठी, करâणा साहुजी, अनुपमा दगडा, रश्मी पहाडे, सीमा पहाडे, भारती सेठी आदींनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोअरवेलचा ट्रक उलटून एक ठार

$
0
0

वाळूज महानगर: गंगापूर तालुक्यातील कमळापूर जवळ बोअरवेलचा ट्रक उलटल्याने एका वीस वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सात वाजता घडली. किसन पोयाम (रा़ झारखंड), असे मृत कामगाराचे नाव आहे. कमळापूर येथे बोअर पाडून ट्रक (पी एन ०७, एफ ३०९९) दुसरीकडे जात होता. तो हरीसिद्धी लॉन्सजवळ समोरून आलेल्या वाहनाला रस्ता देत असताना रस्त्याच्या खाली उतरल्याने उलटला. यावेळी ट्रकवर चालक आबा आगडे, संतोष बजील, किसन पोयाम (रा. झारखंड) मुकेश धुर्वे (रा़ मध्यप्रदेश), असे चौघे होते. ट्रक उलटल्याने किसन पोयाम खाली पडून त्याच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला. त्याला सहाय्यक फौजदार आर. डी. वडगावकर यानी उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार आर. जे. साळवे हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणूक कार्यशाळेचे आज आयोजन

$
0
0

औरंगाबाद: प्रसिद्ध शेअर मार्केट तज्ज्ञ किरण जाधव यांची आज सोमवारी (१० सप्टेंबर) गुंतवणूक मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सायंकाळी सात वाजता क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावरील हॉटेल कीज येथे होणार आहे. हे आयोजन टाइम्स ऑफ इंडिया व महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यशाळेत शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या सोप्या पद्धती, तांत्रिक मार्गदर्शन, बाजारातील चढ-उतार याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा कसा कमवावा, यावर भर देण्यात येणार आहे. ही कार्यशाळा गुंतवणूक करू इच्छिणारे, सध्याचे गुंतवणूकदार, व्यापारी, शेअर ब्रोकर, महिलांसाठी उपयोगी आहे. या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईची सेवा हीच श्रेष्ठ सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आज जगात कुठेही देशाला माता म्हटले जात नाही. मात्र आपल्या देशाला आदराने आपण भारतमाता असे म्हणतो. त्यामुळे आईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आई जगातील सर्वात श्रेष्ठ शिक्षक असून आईची सेवा हीच श्रेष्ठ सेवा आहे,' असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

निराला बाजार येथील तापडिया नाट्यगृहात मातृदिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल'च्या संयुक्त विद्यमाने रविवारी (९ सप्टेंबर) 'गौरव मातृत्वाचा' सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, 'आयसीडी'चे संचालक प्रफुल्ल मिरजगावकर, 'लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल'च्या (नागेश्वरवाडी) मुख्याध्यापिका योगिता शास्त्री, संचालक योगेश शास्‍त्री यांची उप‌िस्थिती होती. या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष बागडे, विभागीय आयुक्त डॉ. भापकर तसेच मिरजगावकर यांच्या हस्ते दहा कर्तृत्ववान मुलांच्या माता-पित्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर त्यांच्या मातु:श्री केसरबाई व वडील निवृत्ती भापकर, गझलकार डॉ. शेख इकबाल मिन्ने व त्यांच्या मातु:श्री दौलतबी मिन्ने, गायक राजेश सरकटे व त्यांच्या मातु:श्री हंसादेवी सरकटे, उद्योजक विजय शक्करवार व त्यांच्या मातु:श्री विजयालक्ष्मी शक्करवार, शिल्पकार बलराज मडिलगेकर व त्यांच्या मातु:श्री संगीता मडिलगेकर, विहम ऍग्रोटेकच्या नेहा कांदलगावकर यांच्या मातु:श्री निर्मला कांदलगावकर, गिर्यारोहक मनीषा वाघमारे व त्यांच्या काकू सुनीला बेलकर, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम यांच्या मातु:श्री विमल कदम, तसेच 'आपली मुलं' संस्थेचे शामसुंदर कणके, शहीद जवान संदीप जाधव यांच्या वडिलांचा गौरव करण्यात आला. संदीप जाधव यांचे वडील पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आले तेव्हा सभागृहातील सर्वांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. 'गौरव मातृत्वाचा' सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे.

यावेळी बागडे म्हणाले की, आई-वडिलांचा आपण कितीही गौरव केला तरी ते कमीच असते. आईचे महत्त्व हे विशाल आहे. आईच आपल्याला बोलायला शिकवते. आपल्यावर संस्कार करते. जगातील सर्वात मोठे शिक्षण हे आई देते. आई-वडिलांच्या प्रेमातूनच व्यक्ती कर्तृत्ववान होतो. आज मुलगा किंवा मुलगी परदेशी स्थायिक असतील, तर आई-वडिलांना सांभाळण्यासाठी अडचणींमध्ये भर पडते. मुले आपल्या आई-वडिलांना विदेशात घेऊन जाण्यासाठी उत्‍सूक असतात, मात्र आई-वडील भारतात राहण्यास पसंती देतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. आज आपण भारतमाता म्हणून आपण देशाची तुलना आईसोबत करतो. यावरूनच आईचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. शेवटपर्यंत आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. आईच्या सेवेसोबतच राष्ट्रसेवा घडावी, असे मत बागडे यांनी व्यक्त केले. प्रफुल्ल मिरजगावकर म्हणाले की, आई-वडिलांना सांभाळणे महत्त्वाचे आहे. आपल्या आई-वडिलांचा आदर्श तसेच त्यांचा सन्मान पुढील पिढीमध्ये रुजवता आला पाहिजे. त्यांच्यासोबत आपल्याला एकत्र राहता आले पाहिजे.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर 'लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल'च्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, तसेच जयदेवा गणराया या गाण्यावर नृत्य केले. कार्यक्रमात गौरवण्यात आलेल्या मातांनी तसेच मुलांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. अधिक कदम यांनी व्हीडिओ संदेशाद्वारे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश अचिंतलवार, प्रास्ताविक शिल्पा तसरे यांनी केले, तर आभार रॉकी फ्रान्सिस यांनी मानले.

\Bमातेला देवाच्याही पुढचे स्थान: डॉ. पुरुषोत्तम भापकर\B

मातेला देवाच्याही पुढचे स्थान आहे. पृथ्वी आणि देवाशी तुलना करण्याची आईची ताकद असल्याचे सांगत पैसे, बंगला गाडी नसले तरी चालेल पण 'मेरे पास माँ है' या चित्रपटाच्या डायलॉगचाही उल्लेख करत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आईचे महत्त्व विषद केले. आईचा मुलांच्या जडण घडणीमध्ये मोलाचा वाटा असतो, आपली मुले चांगले नागरिक व्हावे असे सर्वच पालकांना वाटते. आई-वडील अडचणीत राहतात, पण आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करतात, असे सांगत त्यांनी आईच्या आठवणी सांगितल्या. लिहिता वाचता न येणाऱ्या आईने उच्च शिक्षित मुले घडवली. घरामध्ये दोन आय.ए.एस. अधिकारी, दोन डॉक्टर, दोन वकील घडवणे सोपं काम नाही. आई हे विद्यापीठ आहे. मुलांनी शिकून मोठे व्हावे, तसेच उत्तम माणूस म्हणून घडवण्याचा आईचा आग्रह होता. वडिलांनीही शेती सांभाळून मोलाचा हातभार लावला. कवितेकडे वळण्याचे श्रेयही भापकर यांनी आईलाच दिले. लहानपणी पहाटे जात्यावरील ओव्या कानावर पडत होत्या. आईने अनेक ओव्या रचल्यामुळे लहानपणापासूनच साहित्याचे बाळकडू मिळाले, असे डॉ. भापकर यांनी सांगितले. माता मजबूत असेल, तर बालके मजबूत होतील व पर्यायाने समाज मजबूत होईल, त्यामुळे मातांचा आहार, आरोग्याकडे लक्ष देण्याची आपली जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची ७० हजारांची फसवणूक

$
0
0

औरंगाबाद: एका २७ वर्षांच्या महिलेची अज्ञात भामट्याने ७० हजारांची फसवणूक केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीड वाजता अदालत रोडवरील अॅक्सिस बँकेजवळ घडला. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी दीड वाजता या महिलेने बँकेतून रक्कम काढली. यावेळी तिला एका अनोळखी व्यक्तीने पैसे मोजून देतो, असे सांगितले. यानंतर त्याने ही रक्कम घेऊन पोबारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळाशेजारील म्हाडा कॉलनी येथे राहणाऱ्या अभियांत्रिकीच्या २३ वर्षांच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (९ सप्टेंबर) दुपारी चार वाजता उघडकीस आली. सूरज दौलत झरे (वय २३,रा. म्हाडा कॉलनी) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, सूरज हा म्हाडा कॉलनीत आई-वडील आणि दोन भावंडासह राहतो. रविवारी दुपारी त्याची आई स्वयंपाक घरात काम करीत होती, तर अन्य नातेवाईक घराबाहेर होते. यावेळी त्याने खोली आतून बंद करून पंख्याला गळफास घेतला. यानंतर त्याला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. तो एका खासगी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यात पोळ्याला आठ जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

पोळा सणानिमित्त आपल्या 'सर्जा-राजा'नदीमध्ये धुण्यासाठी गेलेल्या आठ जणांचा विविध घटनांत मराठवाड्यात मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, कन्नड, वैजापूर, गंगापूर तालुक्यांसह उस्मानाबाद जिल्ह्यातील औसा व हिंगोली जिल्ह्यात या घटना घडल्या.

वैजापूरमध्ये दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

वैजापूर तालुक्यातील वीरगाव येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली. ऋषिकेश रमेश रायते (वय २०) व अमोल रमेश रायते (वय १७) अशी या दोन भावांची नावे आहेत.

कन्नडमध्ये तिघांवर काळाचा घाला

कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे बैल धुताना अंबाडी प्रकल्पातील पाण्यात बुडून कैलास भावराव बावीस्कर (वय २४) याचा मृत्यू झाला. तर कन्नड तालुक्यातील चांभारवाडी येथील शेतकऱ्याच्या एकुलत्या एक मुलाचा बैल धुताना मृत्यू झाला. नवनाथ ग‌वळी असे या मुलाचे नाव आहे. हिवरखेड्यात बैल चारण्यासाठी गेलेले काशीनाथ सोनवणे पाय घसरून पाण्यात पडल्याने मरण पावले.

खुलताबाद, गंगापूरमध्ये दोघांचा मृत्यू

पोळ्यानिमित्त बैल धुवायला गेलेल्या कनकशीळ येथील १४ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. राहुल म्हस्के असे त्याचे नाव आहे. तर गंगापूर तालुक्यातील येरळ शिवारात तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला. संकेत निमोणे असे या तरुणाचे नाव आहे.

वसमत, औसात दोघे बुडाले

हिंगोली : वसमत तालुक्यातील माळवटा येथील आसना नदीच्या पात्रात पोळा सणाच्या निमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या विशाल ठोंबरे (१७) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (९ सप्टेंबर) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मयत विशाल ठोंबरे हा वसमत तालुक्यातील रांजोना येथील मूळ रहिवासी असून तो माळवटा येथे मामाच्या घरी राहत होता. आज सर्वत्र पोळ्याची धामधूम असल्यामुळे शेतकऱ्यांकडुन बैल धुण्याची लगबग सुरू होती. माळवटा येथील आसना नदीच्या पात्रात विशाल ठोंबरे हा देखील बैल धुण्यासाठी गेला होता. मात्र, नदीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेप्रकरणी नोंद करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.

औसा तालुक्यातील उंबडगा (खु.) येथील तरुण मुलगा बैल धुण्यासाठी खदानीत गेला असता पाय घसरून त्याचा अंत झाल्याची घटना घडली. उंबडगा येथील सुशांत शहाजीराव वाघमारे (वय १७) हा तरुण पोळ्याचा सण असल्याने बदामे यांच्या खदानीत बैल धूत असताना त्याचा पाय घसरून पाण्यात बुडून अडीच वाजता त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल बस महागणार

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्कूल बसचे भाडेही येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. सध्या डिझेलचे दर वाढत असल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकांना दररोज तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे स्कूल बसच्या दरात प्रती विद्यार्थी १५ ते २० टक्के वाढ लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती स्कूल बस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. जून महिन्यात शाळा सुरू झाल्या. त्यावेळी दहा जून २०१८ रोजी डिझेलचे दर ७३ रुपये ५८ पैसे प्रतीलिटर होते. जून ते नऊ सप्टेंबर या कालावधीत या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या ७८ रुपये १२ पैसे दराने डिझेलची खरेदी करावी लागत आहे. चार महिन्यांत दरामध्ये सुमारे सहा रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. डिझेलच्या किंमती वाढल्याचा ताण स्वत:च्या स्कूल बस असलेल्या शाळांवर आणि त्याशिवाय भाडेतत्त्वावर स्कूल बस चालविणाऱ्या बस चालकांवरही ताण पडत आहे.

भाडेतत्त्वावर असलेल्या बससाठी जूनमध्ये दर निश्चित करण्यात आले होते. स्कूल बसचे दर निश्चित करताना त्यावेळी असलेले डिझेलचे दर विचारात घेण्यात आले होते. स्कूल बस भाड्याचा पालकांवर जास्त ताण येऊ नये म्हणून शाळा प्रशासनाकडूनही वाजवी दरानुसार भाडे आकारणी करावी, असा आग्रह असतो. यामुळे सध्याचे दर पालकांना परवडणारे असले, तरी स्कूल बस चालकांसाठी विद्यार्थी वाहतूक तोट्याची ठरत आहे. डिझेल महाग होण्याबरोबर बसची 'मेन्टेनन्स कॉस्ट' वाढलेली आहे. चांगल्या बस विद्यार्थीसाठी असाव्यात म्हणून नवीन बसमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेकांना या स्कूल बसचा मासिक हफ्ता फेडण्यासाठी पैसे जमा होत नाही, अशी माहिती स्कूल बस चालक असोसिएशनकडून देण्यात आली.

……

\Bनिर्णय घ्यावाच लागेल\B

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांसाठी सध्याचा काळ हा कठीण आहे. डिझेलचे दर सातत्याने वाढल्याचा फटका स्कूल बस चालकांना सोसावा लागत आहे. पूर्वी पदरात काही पैसे जमायचे, मात्र आता डिझेलच्या खर्चातच सर्व पैसे जात आहेत. चालकाच्या वेतनासह बँकेचे हफ्ते फेडणेही अवघड झाले आहे. यामुळे १५ ते २० टक्के दर वाढ करावी लागणार आहे. याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असे विद्यार्थी वाहतूक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ए. डी. पाटील यांनी सांगितले.

\Bजिल्ह्यात १७०० स्कूल बस\B

औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे एक हजार ७०० स्कूल बस आहेत. त्यापैकी बहुतांश स्कूल बस औरंगाबाद शहरात आहेत. या बसमधून सुमारे एक लाखावर विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. औरंगाबाद शहरालगत असलेल्या शाळांत स्कूल बसच्या माध्यमातून ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात. स्कूल बसच्या भाडेवाढीमुळे आता पालकांवरील भार वाढणार आहे.

\Bएसटीला रोज साडेचार लाखांचा फटका

\Bऔरंगाबाद : सध्या प्रवासी नसल्याने एसटीचे उत्पन्न कमी झालेले आहे. यात आता डिझेल दरवाढीने अधिकच भर टाकला आहे. औरंगाबाद एसटी विभागाला डिझेल दरवाढीमुळे प्रतीलिटर १२ रुपये २२ पैसे तोटा सहन करावा लागत आहे. दिवसभरात एसटीला साडेचार लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.

औरंगाबाद विभागातून राज्यभरात; तसेच राज्याबाहेर अनेक महत्त्वाच्या शहरांसाठी एसटी बसची सेवा सुरू आहे. साडेचारशेपेक्षा अधिक एसटी बस, ४८ शिवशाही बसच्या माध्यमातून महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रवासी वाहतुकीचे काम एसटी विभागाला करावे लागत आहे. ही प्रवासी वाहतूक औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकासह सिडको, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, वैजापूर, पैठण आणि कन्नड येथून करण्यात येते. दररोज एसटीचा प्रवास एक लाख ५० हजार किलोमीटर होत आहे. प्रवासी वाहतुकीसाठी एसटीला दररोज ३६ हजार लिटर डिझेलची गरज भासते. गेल्या आठ महिन्यांपासून डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच डिझेलच्या किंमती वाढल्याने एसटीला प्रती लिटर १२ रुपये २२ पैसे असा तोटा होत आहे. यामुळे दररोज चार लाख ५६ हजारांचा तोटा औरंगाबाद विभागाला सहन करावा लागत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

\Bसुटे भागही महाग\B

डिझेल दरवाढीबरोबर बसचे सुटे भागही (स्पेअर पार्ट) महागल्याचा फटका एसटी विभागाला सहन करावा लागत आहे. सप्टेंबर महिन्यातील दरवाढ कायम राहिल्यास, एसटी विभागाला हिवाळी हंगाम सुरू होण्याआधी पुन्हा एकदा दरवाढीचा कठीण निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

डिझेलच्या दरामुळे एसटीचा तोटा वाढला आहे, यात शंका नाही. सध्या प्रतिलिटर १२ रुपये २० पैसे तोटा होत आहे. महामंडळाने या तोट्याचा भार प्रवाशांवर टाकलेला नाही. एसटीची सेवा अविरत सुरू आहे.

- प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

डिझेल दराचा चढता आलेख

८ सप्टेंबर २०१०......४१.७७

१६ सप्टेंबर २०११......४४.९९

१४ सप्टेंबर २०१२....५३.४९

१ सप्टेंबर २०१३......६०.१०

३१ ऑगस्ट २०१४.....६८.६९

१ सप्टेंबर २०१५.......५०.६०

१ सप्टेंबर २०१६......५८.९८

८ सप्टेंबर २०१७.......६२.३३

९ सप्टेंबर २०१८........७८.२३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईराज गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

$
0
0

सिल्लोड: साईराज प्रतिष्ठाण गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नगरसेविका सरिता कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष कमलेश कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल फुकटे, कार्याध्यक्ष सुधाकर गिऱ्हे, स्वागताध्यक्ष अजय माहूरकर, तर कोषाध्यक्षपदी दिनेश ओस्तवाल यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: सचिव शिवाजी गाढवे, सचिन अंबेकर, गणेश चव्हाण, युवराज सोनवणे, गुलशन कटारिया, महेश देसाई, नियोजन समिती हरिश कटारिया, राकेश कटारिया, राज बजाज, अमित प्रशाद, जितेंद्र पाडवे, सांस्कृतिक कार्यक्रम समिती किरण मंगरूळकर, जयंत कटारिया, मयूर कटारिया, जगदीश झवर, मिली कटारिया, उपाध्यक्ष विलास अंबेकर, कैलास पवार, राजेंद्र जोशी, महेश गोमटे, सुमित कटारिया, सागर कुलकर्णी, सहकार्याध्यक्ष डॉ. संतोष साळवे, डॉ. संजय देशपांडे, निलेश दुसाद, कृष्णा रोहरा, अश्विन पवार, सहकोषाध्यक्ष हितेश रोहरा, मनोज साळवे, गणेश सनान्से, कुमार छाबरिया, कमलेश नवरंगानी, सहस्वागताध्यक्ष एस. एम.पाटील, संतोष वाघ, गजेन्द्र चौतमाल, स्वप्निल अंबेकर, हर्शल कटारिया, सहसचिव संजय करमाळकर, महेश खैरे, अक्षय राजपूत, रामकृष्ण सोनवणे, रवी रोहरा, संपर्क समिती गजानन माळकरी, संतोष बोराडे, सुनील आरके, नितेश गवळे, प्रतिक कुलकर्णी, सोशल मीडिया सूरज दुधानी, राहुल डिकेकर, अक्षय सोनवणे, वैभव गिऱ्हे, नीतेश खंडेलवाल, स्पर्धा प्रमुख शुभम पालोदे, विजय माळकरी, गजानन राऊत, राजू सपकाळ, सुनील मेहता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद लोकसभेत ‘राष्ट्रवादी’ला संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयाची संधी आहे. त्यामुळे काँग्रेससोबत चर्चा करून हा मतदारसंघ पक्षासाठी सोडवून घ्यावा, अशी विनंती करणारे पत्र औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे शहराध्यक्ष इलियास किरमानी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवले आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून २० वर्षांपासून शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. या कार्यकाळात शहर व जिल्ह्याचा विकास थांबला आहे. उत्तम रस्ते, शिक्षण, उद्योग-व्यवसायासाठी मुलभूत सुविधांची वाणवा आहे. शहरातील रस्त्यांवर खड्डे असून कचऱ्याची समस्या सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. भूमिगत गटार योजनेतील भ्रष्ट्राचार गाजत आहे. रेल्वे व विमान सेवेत शहर पिछाडीवर असून शहरातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. एकेकाळी आशिया खंडात सर्वाधिक वेगाने प्रगती करणाऱ्या या शहराची परिस्थिती सध्या बिकट आहे, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यावा, असे या पत्रात म्हटले आहे.

सध्या शहरासह ग्रामीण भागात सत्ताधारी पक्षाविरुद्ध मतदारांत राग आहे. व्यावसायिक, शासकीय कर्मचारी, शेतकरी तसेच सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त आहे. मराठा, मुस्लिम, अनुसूचित जाती, ओबीसी मतदारांची एकजूट केल्यास पक्ष ही जागा जिंकू शकतो, असे या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्त गोळेगाव आता पाणीदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

'गाव करी ते राव न करी' अशी एक म्हण आहे. उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करणारा टँकरग्रस्त खुलताबाद तालुका पाणीदार होत आहे. याची प्रचिती तालुक्यातील गोळेगाव, गदाना, बोरवाडी, महंमदपूर, कानडगाव या गावात येते. येथील ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत सहभाग घेऊन केलेल्या प्रयत्नामुळे या गावांचे शिवार जलमय झाले आहे.

तालुक्यातील गोळेगाव हे गाव सतत दुष्काळाच्या छायेत असते. गावाला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी सरपंच संतोष जोशी आणि ग्रामस्थांनी २०१७ च्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी घेतला. ग्रामस्थांनी दोन वर्षातील स्पर्धेच्या काळात दीड महिना दिवसरात्र मेहनत घेतली. शास्त्रशुद्ध पद्धतीने कामे करताना तज्ज्ञांचे मागर्दशन घेतले. तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण कामांमुळे गोळेगावचे शिवार पहिल्याच पावसाने पाणीदार झाले आहे. टंचाईग्रस्त म्हणून ओळखले जाणारे हे गाव नेहमीच पाणीटंचाईमुळे त्रस्त असते. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न केले. आमदार प्रशांत बंब यांनी सुरवातीपासून मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. भारतीय जैन संघटनेने जेसीबीच्या साह्याने मदतीचा हात पुढे केला. ग्रामस्थांनी श्रमदानातून परिसरात नाला खोलीकरण, शेततळे, सीसीटी, सलग समतलचर, कंपार्टमेंट बंडिग, मातीनाला बांधा, कटुंर बांध आदी विविध जलसंधारणाची कामे केली. कामे झाल्यानंतर ग्रामस्थांना पावसाची प्रतीक्षा होती. अलिकडेच परिसरात जोरदार पाऊस झाला आणि प्रत्येक कामांमध्ये जलसाठा झाला. याचा आनंद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. त्यांनी जलसंधारणाच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आनंद साजरा केला.

वाल्मी येथील प्रशिक्षणा दरम्यान जल संपदा व जलसंधारणचे विविध जिल्ह्यातील अभियंते यांनी अभ्यास दौऱ्यासाठी गोळेगावला भेट दिली. गांवकऱ्यांनी श्रमदानातून केलेले काम पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गोळेगावाला स्वच्छता व इतर कामांसाठी शासनाकडून वेळोवेळी गौरविण्यात आले आहे.

\Bकाळा छापा डोंगर हिरवागार \B

काळा छापा नावाने ओळखला जाणारा डोंगर हिरवागार झाला आहे. या डोंगरावर १३ ऑगस्ट २०१७ रोजी १२ हजार पाचशे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. त्यांची नीट संगोपन करण्यात आले. गोळेगाव शिवारात कुऱ्हाड बंदी व चराई बंदी करण्यात आली. हे नियम तोडणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. उन्हाळ्यात झाडे जगविण्यासाठी टँकरने पाणी दिले. बाष्पीभवन थांबविण्यासाठी झाडांच्या बुंद्याला स्थानिक गवताचे आच्छादन करण्यात आले. त्यामुळे सत्तर टक्के झाडे जीवंत आहेत. दरम्यान याच डोंगरावर यंदा १९ ऑगस्ट रोजी देव संस्कृती विद्यालय शांतिकुंज हरिद्वार येथील डॉ. चिन्मय पंड्याजी यांच्या उपस्थितीत महावृक्ष लागवड अभियान राबवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images