Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांचे निधन

0
0

लातूर :

भारतीय अभिजात संगीताची मोठी परंपरा निर्माण करणारे पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांचे आज पहाटे लातूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. अंकोली शिवारीतील त्यांच्या शेतात सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील खैनूर गावी १५ एप्रिल १९३९ रोजी पंडित शांताराम चिगरी गुरुजींचा जन्म झाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना अंधत्व आले. दादरच्या अंधशाळेत त्यांचे शिक्षण झाले. पं. नारायण व्यास, पं. विनायक पटवर्धन, पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी तबलावादनाचे धडेही घेतले.

१९५४ मध्ये त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रात नोकरी केली. त्यावेळी त्यांचा मंगेशकर कुटुंबीयांशी संबंध आला आणि त्यांच्यासोबत ते तबला-ढोलकीची साथसंगत करू लागले. लातूरमध्ये १९७३ साली त्यांनी सूरतार संगीत विद्यालयाची स्थापना केली. २०१७ मध्ये राज्य सरकारने सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवडीच्या राजाचे जल्लोषात आगमन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजाबाजार येथील देवडी गणेश मंडळाच्या गणरायाचे सोमवारी उत्साहात वाजत गाजत आगमन झाले. औरंगपुरा येथून काढलेल्या मिरवणुकीचा समारोप राजाबाजार येथे करण्यात आला. राजाबाजार भागातील गेल्या चाळीस वर्षांपासून सुभाष गणेश मंडळ नावाने हे मंडळ कार्यरत होते. यंदाच्या वर्षी राजाबाजार भागातील सर्व नागरिक व आठ मंडळे एकत्र आली. त्यानंतर या मंडळाचे देवडी गणेश मंडळ असे नामकरण करण्यात आले. गेल्या आठ महिन्यापासून औरंगपुरा येथील मूर्तीकार सूर्या जावळे यांच्याकडे मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. या मूर्तीची उंची १३ फूट असून मुकुट चार फुटाचा आहे. हातात शस्त्र असलेली ही मूर्ती अत्यंत मनमोहक आहे. मुंबईतील गणरायाप्रमाणे या मूर्तीचे आगमन देखील पूर्वीच करण्यात आले. सोमवारी औरंगपुरा महात्मा फुले चौकातून या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मिरवणुकीत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट कुत्र्यांसाठी श्वानगृह, स्मशानभूमी होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोकाट कुत्र्यांसाठी परिपूर्ण श्वानगृह तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कुत्र्यांच्या स्वतंत्र स्मशानभूमीकरिता जागा शोधण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

नवी मुंबई महापालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात 'इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स' ही संस्था काम करते. संस्थेतर्फे करण्यात येत असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आयुक्त डॉ. विनायक यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना नवी मुंबईला पाठवले होते. मुंबईहून परतल्यानंतर भालसिंग यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर नवीन मुंबईत भर देण्यात आला आहे. तेथे सुमारे ६० टक्के कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातही कुत्र्यांवरील निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी परिपूर्ण श्वानगृह बांधण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यात दहा ते बारा कुत्र्यांसाठी १२० चौरस फूट जागा, दवाखाना, कुत्र्यांच्या खाण्या-पिण्याची सोय, शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. यासाठी जागा शोधण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. जागा निश्चित होऊन श्वानगृहाचे बांधकाम होईपर्यंत मध्यवर्ती जकात नाका येथील गोदाम वापरण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सम्यक विद्यार्थी संघटनेचा मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कमी पटसंख्येअभावी बंद केलेल्या शाळा तत्काळ सुरू कराव्यात, यूजीसी बरखास्त करू नये, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीमध्ये दुप्पट वाढ करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

या मोर्चाची सुरुवात क्रांती चौकातून झाली. हा मोर्चा पैठण गेट, गुलमंडी, शहागंजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. विविध मागण्यांच्या घोषणा देत, फलक हाती घेऊन विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते. एससी, एसटी, ओबीसी, ईबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, मौलाना आझाद फेलाशिपसाठी लावण्यात आलेली नेट-सेटची अट रद्द करावी, प्राध्यापक भरती करावी, शिक्षण भत्त्यात दुप्पट वाढ करावी, मंजूर करण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, स्वाधार योजनेतील उपस्थितीची अट रद्द करावी, सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमाह सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी महेश भारतीय, प्रकाश इंगळे, राहुल खंदारे, नागसेन वानखडे, अमोल घुगे, पवन साळवे, अण्णासाहेब सोनाने, अनिल दिपके, अविनाश सावंत, सिद्धार्थ मोरे, राहुल कांबळे, नागेश हिंगोले, सुनील वाघमारे, रामेश्वर गोरे, रितेश जोशी, विजय धनगर, युवराज सुतार, सिद्धार्थ गायकवाड, भीमराव वाघमारे, विश्वदीप घुगे, रोहित जोगदंड, रुपाली सावे, किशोरी वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवंताबाई निकम यांचे निधन

0
0

औरंगाबाद : संजयनगर येथील रहिवासी शेवंताबाई बाळासाहेब निकम (वय ८६ वर्षे) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर संध्याकाळी कैलासनगर येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष कैलाश बाळासाहेब निकम याच्या त्या मातोश्री होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रिया यंत्राची मायो वेसल्सला वर्कऑर्डर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा प्रक्रिया यंत्रांसाठी महापालिकेने मायो वेसल्स या कंपनीला वर्कऑर्डर दिली आहे. कचरा संकलन व वाहतूक करण्यासंदर्भात पालिका आयुक्तांनी पी. गोपीनाथ राव या बेंगरुळू येथील कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर वाटाघाटी केल्या. संकलन व वाहतुकीसाठी या कंपनीची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

चिकलठाणा आणि पडेगाव येथे प्रत्येकी १५० टन प्रति दिवस क्षमतेचे कचरा प्रक्रिया यंत्र बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून निविदा प्रक्रिया करून मायो वेसल्स या कंपनीची निवड करण्यात आली. परंतु, या कंपनीच्या कामकाजाबद्दल काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. ही कंपनी ब्लॅकलिस्टेड असल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत खुलासा केला होता. खुलाशानंतर स्थायी समितीत या कंपनीला यंत्र पुरवणे व पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देण्याचे मान्य करण्यात आले. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर दोन दिवसांनी स्थायी समितीच्याच १३ सदस्यांनी सभापती, आयुक्तांना पत्र देऊन या कंपनीला काम देण्यास विरोध दर्शवला. परंतु, आवश्यक पडताळणी झाल्याचे सांगत पालिका प्रशासनाने कंपनीला वर्कऑर्डर दिली. याला अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दुजोरा दिला आहे. चिकलठाणा आणि पडेगाव येथील बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया यंत्र लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

\Bतुलनेने कमी दर \B

कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी बेंगरुळू येथील पी. गोपीनाथ राव या कंपनीची निविदा तुलनेने कमी दराची असल्याने मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी या कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर वाटाघाटीची चर्चा केली.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेचे उपहासात्मक आंदोलन

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी विविध राजकीय पक्षांच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी झाली होती. सोमवारी सकाळी क्रांतीचौक येथे मनसेच्या वतीने शासनाविरुद्ध उपहासात्मक आंदोलन करण्यात आले होते.

क्रांतीचौकात मनसेच्या वतीने मोदीसेठ महागडे पेट्रोल डिझेल विक्री केंद्र थाटण्यात आले होते. या ठिकाणी बाटल्यामध्ये पेट्रोलची विक्री करण्यात आली. तसेच या ठिकाणी पेट्रोल डिझेल दरवाढ केल्याबद्दल अशा ओळी लिहून सेल्फी पाँइंट देखील उभारण्यात आला होता. अनेक आंदोलकांनी यावेळी मोबाइलमध्ये सेल्फी फोटो काढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, जिल्हा संघटक संदिप कुलकर्णी, वैभव मिटकर, बिपीन नाईक, सतनामसिंग गुलाटी, आशीष सुरडकर, राजू जावळीकर, अमोल खडसे, अॅड. निनाद खोचे, किशोर पांडे, चेतन पाटील, प्रविण मोहिते, विशाल आहेर, मंगेश साळवे, नुतन जैस्वाल, लिला राजपूत, सपना ढगे, अनिता लोमटे, डॉ. संकेत देशमुख, पूजा पाटील, शुभम नवले, यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'भूमिगत'चा कंत्राटदारच भूमिगत, पळून जाण्याच्या तयारीत ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगरोत्‍थान उपक्रमातून मंजूर केलेल्या भूमिगत गटार योजनेचा कंत्राटदारच भूमिगत असून तो पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय सोमवारी (१० सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

शहरात ५४४ किलोमीटर लांबीच्या भूमिगत गटार योजनेचे काम ८८ टक्के पूर्ण झणले आहे. मात्र, निधी मिळत नसल्याचे कारण देत गेल्या चार महिन्यांपासून या योजनेचा कंत्राटदारच गायब झाला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. ३३२ कोटी ३७ लाख रुपयांची देयके मिळाल्यानंतरही कंत्राटदार पळून जाण्याच्या तयारीत आहे, त्याच्याकडून कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करून घ्यावे, अशा सूचना यावेळी खासदार खैरे यांनी दिल्या. ४८ महिन्यांपासून योजनेचे काम सुरू असून मात्र या योजनेचा लाभ नागरिकांना कधी होणार असा प्रश्न असताना ४ महिन्यांपासून कंत्राटदार सापडत नाही. कंत्राटदार कुठे आहे, याबाबत काही बोलू शकत नाही. ३२० कोटी रुपये आजवर कंत्राटदार कंपनीला अदा केले असल्याचे योजनेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी शहरात ८५ ‌किलोमीटरपर्यंत मलनि:स्सारण वाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भूमिगत गटार योजनेचे सुधारित अंदाजपत्रक ४१८ कोटी रुपये आहे. या योजनेत विविध व्यासाच्या ५४४ किलोमीटर लांबीच्या मलनि:स्सारण वाहिन्या टाकणे अपेक्षित होते. ६० किलोमीटर लांबीच्या मुख्य मलनि:स्सारण वाहिन्या तसेच २१६ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे मल प्रक्रिया केंद्र चार ठिकाणी उभे करण्याची तरतूद या योजनेत होती. यातील झाल्टा, पडेगाव, गोलवाडी व वार्ड क्रमांक ९८ मध्ये मलप्रक्रीया केंद्राची उभारणी पूर्ण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेखाली चिरडून दोन भावांचा अंत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आत्महत्या करणारा मोठा भाऊ व त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा लहान भाऊ, असे दोघे जण रेल्वेखाली चिरडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (९ सप्टेंबर) रात्री नऊ वाजता घडली. ही घटना मुकुंदवाडी रेल्वे गेट क्रमांक ५६ जवळ घडली. जयेश मिलिंद बागुल (वय २५) आणि आकाश मिलिंद बागुल (वय २०, दोघे रा. राजनगर) अशी या दोघांची नावे आहेत.

जयेश व आकाश हे दोन भाऊ एकत्र राहत होते. जयेश हा विवाहित असून त्याला पत्नी व नऊ महिन्यांचा मुलगा आहे. जयेश मजुरी, तर रिक्षा चालवून आकाश उदरनिर्वाह करत होता. जयेशचा पत्नीसोबत वाद असल्याने ती माहेरी राहते. तिने महिला तक्रार निवारण केंद्रातही तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसापासून जयेशला दारूचे व्यसन लागले होते. दरम्यान, रविवारी रात्री घरगुती कारणावरून जयेश व आकाश यांच्यात वाद झाला. हा वाद वाढून संतापलेला जयेश आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे गेला. त्यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर रेल्वे रुळ आहे. मात्र, जयेशची समजूत काढण्यासाठी आकाश त्याच्यामागे धावला. याचवेळी जालन्याकडून रेल्वे येत होती. या रेल्वेचा धक्का लागून दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती परिसरातील नागरिकांकडून मिळाल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवले. या दोघांचे सोमवारी पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून सहाय्यक फौजदार साहेबराव गवारे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटल नव्हे अट्टल भाजप

0
0

औरंगाबाद : मोठ्या मोठ्या थापा मारणारे भाजप हे अटल नव्हे तर अट्टल भाजप आहे, अशी टिका कॉग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारचे दिवस भरले आहेत, असा आरोपही त्यांनी करत ते सत्तेत येणार नाही, असा टोला मारताना शिवसेनेवरही तोफ डागली.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदनिमित्ताने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, डॉ. पवन डोंगरे, मिलिंद पाटील उपस्थित होते.

पेट्रोल डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले आहे, जनतेत या दरवाढीने संताप व्यक्‍त केला जात आहे. तरीही पुन्हा केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल डिझेलची दरवाढ केली असून हे सरकार संवेदनाशून्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जुमलेबाजी आता जनतेच्या जीवावर उठली आहे. मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्‍वासने आठवा. हे अटल भाजप नव्हे तर अट्टल भाजप आहे, अशी टिका सावंत यांनी केली.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारलेला हा बंद सविनय होता. यामुळे धाकदपटशा झालेला नाही. हा बंद कोणा एका विशिष्ट पक्षाचा नव्हे तर हा जनतेचा बंद असल्याचे त्यांनी सांगत पेट्रोल डिझेलचा जीएसटीअंतर्गत समावेश करावा, अशी मागणी केली. शिवसेनेचा बंदमध्ये सहभाग नसल्याबद्दल त्यांनी शिवसेनेचा विरोध हा दिखाव्यापुरता असतो. आता त्यांनी शिवसेनेचा आशावाद, चला देऊ मोदीला साथ ' असा नारा द्यावा असा सल्ला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचशेची लाच घेताना पोलिस आयुक्तालयातील बाबू जाळ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घर घेण्यासाठी दिलेला अर्ज पुढे पुटअप करण्यासाठी ५०० रुपयाची लाच घेणाऱ्या पोलिस आयुक्तलयातील लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सोमवारी दुपारी आयुक्तालयातील आस्थापना शाखेत ही कारवाई करण्यात आली. गंगाधर नामदेव डहाळे असे या लिपिकाचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार शहर पोलिस शाखेत कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्याचे स्वत:चे घर नसल्याने त्याने नविन घर खरेदी करण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या नावाने अर्ज केला होता. यासाठी ते लिपिक डहाळे याला भेटले होते. डहाळे याने परवानगीचा अर्ज पुटअप करून परवानगी मिळवण्यासाठी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली हेाती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून सोमवारी पोलिस आयुक्तालयात सापळा रचण्यात आला. आस्थापना शाखेत ५०० रुपयांची लाच घेताना संशयित आरोपी गंगाधर नामदेव डहाळे (वय ३८, रा. सिडको तेरावी योजना, एन २, सिडको) याला घटनास्थळी पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधिक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक बाळा कुंभार, पोलिस निरीक्षक गणेश ढोकरट, विजय बाम्हंदे, गोपाल बरंडवाल, सुनील पाटील व चालक राजपूत यांनी केली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसएफआय’ जत्था आज औरंगाबादमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया'चे (एसएफआय) अखिल भारतीय अधिवेशन हिमाचल प्रदेशात होणार आहे. त्यासाठी संघटनेने चार ते १६ सप्टेंबर दरम्यान, अखिल भारतीय जत्था चार ठिकाणाहून काढला आहे. यापैकी मध्यप्रदेशातून सुरू झालेला जत्था मंगळवारी औरंगाबादमध्ये येत आहे.

'भेदभाव विरहित गुणवत्तापूर्ण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणाऱ्या शिक्षणाची रचना' करण्यात यावी हा उद्देश समोर ठेऊन सरकार राबवत असलेल्या विद्यार्थी विरोधी, शिक्षण विरोधी धोरणाबाबत विद्यार्थ्यांना संघटित करण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न या जत्थाद्वारे करण्यात येत आहे. जत्था आगमनावेळी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव डॉ. विक्रमसिंग, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रमेश कोट्टा, दत्ता चव्हाण, मंजुश्री कबाडे, राज्याध्यक्ष मोहन जाधव, राज्य सचिव बालाजी कलेटवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटवर जत्थाचे स्वागत सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष सुनील राठोड, जिल्हाध्यक्ष सत्यजित म्हस्के, सचिव लोकेश कांबळे, राज्य कमिटी सदस्य नितीन वाव्हळ, सहसचिव स्टालिन आडे, उपाध्यक्ष प्राजक्ता शेठे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केम्ब्रिजपर्यंतचा १५ कि.मी. रस्त्याचा डीपीआर तयार

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रस्त्याची झालेली दुरवस्था, खड्ड्याची डागडुजी करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या समोर सोमवारी सुनावणीस आली. महानगर पालिकेने १५० कोटींमध्ये कोणते रस्ता होणार, केव्हा पूर्ण करणार याची सर्व माहिती तीन आठवड्यानंतर सादर करणार असल्याचे म्हटले आहे.

महानगर पालिकेच्या वतीने २०१४ मध्ये २१ रस्त्याच्या दुरुस्ती कार्यारंभ काढण्यात आला होता. त्या रस्त्याचे काम देखील पूर्ण झाले. मात्र, ते काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे रस्त्यावर पुन्हा खड्ड पडले असल्याचे याचिकाकर्ते पार्टी इन पर्सन अ‍ॅड. रुपेश जैस्वाल यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर सोमवारी खंडपीठासमोर सुनावणी झाली असता नॅशनल हायवे अ‍ॅथारटीच्या वतीने मनिष नावंदर यांनी नगर - जालना रस्त्यावरील केम्ब्रीजपर्यंतचा १५ कि.मी.रस्त्याचा डीपीआर तयार करण्यात आलेला आहे. डीपीआर मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

गोलवाडी उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गासाठी १९ कोटी ६८ लाख रुपये राज्य सरकारने जमा केले. मात्र, त्या कामाच्या किमतीत वाढ झाल्याने ५ कोटी ३२ लाख रुपये अतिरिक्त लागणार आहे. रेल्वेने या पैशांची मागणी केली नसल्याचे सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

क्रांतीचौक उड्डाणपुलाची दुरवस्था झाली असून त्याची दुरुस्तीकडे मनपा आणि महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ दुर्लक्ष करत असल्याचे पार्टी इनपर्सन अ‍ॅड. जैस्वाल यांनी निदर्शनास आणून दिले. हा पूल कोणाच्या ताब्यात आहे, याची माहिती पुढील तारखेस सादर करण्यात येईल, असे गिरासे यांनी खंडपीठात सांगितले. या जनहित याचिकेवर तीन आठवड्यानंतर पुढील सुनावणी अपेक्षित आहे. पार्टी इन पर्सन अ‍ॅड. रुपेश जैस्वाल, शासनाच्या वतीने अमरजितसिंग गिरासे, पालिकेच्या वतीने राजेंद्र देशमुख, रेल्वेच्या वतीने मनिष नावंदर तर एमएसआरडीसीच्या वतीने श्रीकांत अदंवत यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज लोकराज्य वाचक अभियान

0
0

औरंगाबाद,

जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबादच्या वतीने मंगळवारी (११ सप्टेंबर) 'लोकराज्य वाचक अभियानाचे' आयोजन करण्यात आले आहे.

विवेकानंद महाविद्यालयात सकाळी साडेअकरा वाजता लोकराज्य वाचक अभियानाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. शिरसाठ यांची उपस्थिती राहणार आहे. लोकराज्य वाचक मेळाव्यात विद्यार्थ्यांना वाचनसंस्कृती, प्रभावी व्यक्तीमत्वामध्ये वाचनाचे महत्त्व, शासन योजनांची माहिती, लोकराज्य मासिका बद्दलची माहिती यासह मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लोकराज्य मासिकाच्या विशेष अंकाचे, प्रदर्शन, लोकराज्य वर्गणीदारांची नोंदणी यावेळी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएमए’मध्ये आज कार्यशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी (१० सप्टेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासाठी रुबेला मिझल व्हॅक्सिनचा वापर संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी बालविकास अधिकारी प्रकल्प डॉ. भांबरे, डॉ. वंदना तिखे, डॉ. आर. एन. चिमदरे यांनी प्रशिक्षण दिले. या वेळी सुमारे १५० अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची उपस्थिती होती. अजून ३ बॅचेसच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी (११ सप्टेंबर) दुपारी ३ ते ५ या वेळेमध्ये आयएमए हॉल येथे आरएम व्हॅक्सिनबाबत कार्यशाळा घेण्यात येणार असून, डॉ. मोजिब सय्यद मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा साचल्याने खंडपीठ नाराज

0
0

औरंगाबाद : शहरात कचऱ्याचे ढीग साचले असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. या याचिकेची सुनावणी १८ सप्टेंबर रोजी होणार आहे.

जालना रोडवरील दोन पंचतारांकित हॉटेल समोर कचरा टाकल्याबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. पर्यटकांच्या शहरातील राहण्याच्या ठिकाणापासून मकबरापर्यंत कचऱ्याचे ढीग साचलेले त्यांना दिसतात, ही बाब खेदजनक असल्याचे खंडपीठाने म्हटले. कचऱ्यामुळे सर्वसामान्यांना रोगराईला तोंड द्यावे लागत आहे, याचा विचार महापालिकेने करणे जरुरी आहे, असेही खंडपीठाने म्हटले. अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी हर्सूल येथील जवळपास ३०० झाडे तोडल्याचे, नहरे अंबरी फोडल्यामुळे पाणी दूषित झाल्याचे आणि विहिरींतील पाणी काळे झाल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. महापालिकेतर्फे राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैरे- घोडेलेंसमोरच अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपास रस्त्यावर चार वर्षात १०० जणांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाला पाझर फुटलेला नाही. स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाने अवघ्या पाच किलोमीटरच्या रस्त्यावरून सोमवारी (१० सप्टेंबर) जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्याऐवजी केवळ खल करण्यात वेळ घालविला. बीड बायपास रस्त्याची जबाबदारी घेण्यावरून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकून टोलवाटोलवीच केली. खासदार चंद्रकांत खैरे आणि महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासमोरच हा सर्व प्रकार घडला.

जड वाहनांची नेहमीच होत असलेली गर्दी तसेच वाहनांच्या वेगाला आळा घालण्यात पोलिस प्रशासन सपशेल अपयशी ठरले असताना 'रस्ता माझा की तुझा, आम्ही किती काम करायचे आणि तुम्ही किती काम करणार' या वादामध्ये महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गुरफटून एकमेकांवर टोलवाटोलवी करण्याचे चित्र जिल्हा सुरक्षा समिती बैठकीत दिसले. गेल्या काही दिवसांत बीड बायपास रस्त्यावर अपघाती मृत्यूच्या अनेक घटना घडल्या. एमआयडीसी चौक, देवळाई चौक या भागात मोठ्या प्रमाणावर व्यापारी प्रतिष्ठाने, मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल, शैक्षणिक संस्था यामुळे या भागात वाहनांची सतत गर्दी असते. यातील अनेक भागांमध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्याप्रमाणावर अतिक्रमणही झाले आहे. याकडे महापालिका, पोलिस खाते, आरटीओ यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अपघात होऊ नये म्हणून अतिक्रमण हटविण्यात यावे तसेच नियम मोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केल्या.

या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्या उपाययोजना केल्या असा प्रश्न खासदार खैरे यांनी अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना केला. यावर चव्हाण यांनी तत्कालिक उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत माहिती दिली.

सर्व्हिस रोडबाबत हात वर

बीड बायपास रस्त्याला स‌र्व्हिस रोड तयार करण्यात यावा, अशी मागणी सातारा परिसर तसेच बीड बायपास भागात असलेल्या वसाहतीमधील नागरिकांची आहे. मात्र, नियमानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला हे सर्व्हिस रोड करण्याचे अधिकार नसल्याचे म्हणत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतुल चव्हाण यांनी स्पष्ट करत महापालिकेकडे बोट दाखवले. यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी यामध्ये महापालिकेचा मर्यादित भुमिका असल्याचे सांगत कोणतीही गोष्ट स्पष्ट केली नाही व रस्ता कुणाचा याविषयी बोलण्याऐवजी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आपण सर्व मिळून एकत्र बसून अडचण सोडवू, असे म्हणत चर्चेवर तूर्त पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

२०० कोटीत ७ लेन, ३ उड्डाणपुलाची चर्चा

वन टाईम इम्प्रुव्हमेंटमध्ये मिळणाऱ्या २०० कोटींमध्ये बीड बायपास रस्त्यावर महानुभाव आश्रम चौक ते देवळाईचौकापर्यंत ७ लेन तयार करणे तसेच तीन उड्डाणपूल करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली, रस्त्यावरील एक लेन फक्त जड वाहतुकीसाठी असावी अशीही चर्चा यावेळी करण्यात आली.

ट्रिपल सीटची परवानगी दिली काय?

शहरात दर चार-पाच वाहनांनंतर एक वाहनधारक ट्रिपल सीट असते. आरटीओंनी ट्रिपल सीटची परवानगी दिली आहे काय? असा सवाल खासदार खैरे यांनी केला. यानंतर वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरटीओ कार्यालयासोबत राबविलेल्या अभियानाची तसेच ट्रिपल सीट प्रकरणात वसूल झालेल्या दंडाबाबत माहिती दिली. यावर दंड वसूल करू नका, वाहनांच्या चाकाची हवा सोडून गांधीगिरी करा, अशा सूचना खैरे यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंटाची तस्करी; दोघांना बुधवारपर्यंत कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उंटाची तस्करी करून हैदराबाद येथील कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या दोन परप्रांतियांना अटक करून रविवारी (९ सप्टेंबर) कोर्टात हजर केले असता, त्यांना बुधवारपर्यंत (१२ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी दिले.

उंटाची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक बीड बायपास रस्त्यावर थांबल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोन ट्रक पकडले. दोन्ही ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये प्रत्येकी १४ असे २८ उंट आढळले. त्यापैकी दोन मादींचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी रशीद जुम्मा (वय २७, रा. हरियाणा) व सब्बू अब्दुल सलाम (वय २२ रा. उत्तरप्रदेश) यांना अटक केली. त्यांना रविवारी कोर्टात हजर केले असता, त्या दोघांनी उंट कुठून आणले होते, कुठे विक्री करणार होते, याची चौकशी करावयाची आहे, ट्रक चालक-मालकाचा शोध घ्यावायाचा असल्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील शोभा विजय सेनानी यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी (१० सप्टेंबर) सिडको येथील वसंतराव नाईक चौकामध्ये निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष काशिनाथ कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

देशात भाजपची सत्ता आल्यापासून विविध आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले असून नागरिकांचा फक्त अपव्यय केला जात आहे, एकही विकास कार्य अद्याप पूर्ण झाले नसल्याचे यावेळी युवक शहर अध्यक्ष दत्ता भांगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी शेख कय्युम, मेहराज पटेल, मोतिलाल जगताप, विजय साळवे, अभिषेक देशमुख, सलिम पटेल वाहेगावकर, राजेश पवार, राजेंद्र नवगिरे, अय्युब खान, अमोल दांडगे, मुन्नाभाई, विलास ढंगारे, कैलस कुंठे पाटील, शेख मेहबुब, धनंजय मिसाळ, अमोल साळवे, अनिल डोंगरे, कन्हैय्यालाल मिसाळ, राहुल येडे, किरण गवई, सोहेल सिद्दीकी, मंजूषा पवार, शम्मा बेगम, शकीला बेगम, संध्या शिरसाठ, पुष्पा जाधव, आश्रफ पटेल, प्रशांत जगताप, दिनेश नवगिरे, राहुल बनकर, शोभाताई गायकवाड, भगत, शेख रफीक आदींची यावेळी उपस्थित असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची ठिकठिकाणी निदर्शने

0
0

औरंगाबाद :

इंधन दरवाढ, महागाईच्या विरोधात व भाजप सरकारच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेसने पुकारलेल्या बंदला शहर परिसरात अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. या बंदला मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या पक्ष संघटना, रिपब्लिनक पार्टी ऑफ इंडियाच्या गवई आणि कवाडे गटांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान, काँग्रेसतर्फे बीड बायपासवर रास्ता रोको करण्यात आला. प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तर १२ पेट्रोल पंपांवर निदर्शने करण्यात आले. शहरात ७५ टक्के बंद यशस्वी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

पेट्रोलपंपचालकांनी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत पंप केले होते. या दरम्यान क्रांतीचौक, महावीर चौक यासह शहरातील १२ पेट्रोलपंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. रेल्वे स्टेशन रोड आणि बीड बायपासवरील झाल्टा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. झाल्टा फाटा येथील आंदोलनादरम्यान प्रदेश प्रवक्ते सचिन सावंतसह अन्य पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.

सोनू तुला मोदींवर भरवसा नाय काय

मुकुंदवाडी येथील पेट्रोल पंपासमोर आंदोलन करताना कार्यकर्ते बैलगाडीतून आले होते. 'कहां गए अच्छे दिन, वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल, इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे', अशा घोषणांबाजी करत परिसर दणाणून सोडला होते. सोनू तुला मोदींवर भरवसा नाय काय, नाय काय, असे गाणेही कार्यकर्त्यांनी म्हणत भाजपचा निषेध केला. प्रवक्‍ते सावंत, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, गटनेते भाऊसाहेब जगताप, बाळूलाल गुजर डॉ. पवन डोंगरे, बाबा तायडे आदी उपस्थित होते. तर एपीआय कॉर्नर येथे रेड्यासमोर बिन वाजवत आंदोलन केले. काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

७५ टक्क्यांचा दावा

काँग्रेसने पुकारलेल्या बंदचा शहरात कुठेही फारसा परिणाम झाला नाही. अपवाद वगळता बहुतेक व्यापारी प्रतिष्ठाने सुरू होती. बाजारपेठ गजबजलेली होती. नियमितपणे व्यवहार सुरू होते. जनजीवन सुरळीत सुरू असल्याने शहरात बंदचा परिणाम झाला नाही. बाजार समिती आवारातही नेहमी प्रमाणे शेतीनियमित मालाची आवक झाल्याचे समितीने सांगितले. तर हा बंद सविनय होता, यामुळे धाकदपटशा झालेला नाही. कोणा एका विशिष्ट पक्षाचा नव्हे तर हा जनतेचा बंद असल्याचे कॉग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी सांगत बंदला ७५ टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images