Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेल्वेसमोर दोघांची आत्महत्या

$
0
0
गारखेडा परिसरातील तरुणाने व अल्पवयीन तरुणीने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. शिवाजीनगर ते शहानूरवाडी दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर हा प्रकार घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सिडकोतील रस्ते मातीत

$
0
0
सिडकोच्या पालिकेकडे झालेल्या हस्तांतरानंतर गेल्या सात वर्षांत पालिकेने सिडको भागातील रस्त्यांवर दमडीही खर्च केलेला नाही. त्यामुळे या भागातील जवळपास सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे.

गांजा बाळगणा-या २ जणांना अटक

$
0
0
शहरात विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून तेरा किलो गांजा जप्त करण्यात आला असून, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समस्यांची तक्रार करायचीय, नंबर फिरवा

$
0
0
विविध समस्यांनी ग्रासलेल्या नांदेडच्या जनतेला महापालिकेने नवी वर्षाची गिफ्ट दिली असून, समस्या सोडविण्यासाठी २४ तास उपलब्ध असणारे तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

हिंगोलीत संस्थाचालकांची विद्यार्थ्यांना मारहाण

$
0
0
जेवणाबद्दल तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थाचालकांनी बेदम मारहाण केली. यामध्ये सहा विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी एकत्रित संस्थाचालकाच्या गाडीवर दगडफेक केली.हिंगोली जिल्ह्यातील लोहगावात आदिवासी आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत आठवी ते बारावीचे वर्ग असून, शासनाकडून पूर्ण अनुदान मिळते.

कचरा फेकणा-यांवर नांदेडमध्ये कारवाई

$
0
0
खाद्यपदार्थांचा कचरा नाली आणि रस्त्यावर फेकणाऱ्या चार खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून महापालिकेने आठ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. स्वच्छता व आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी ही कारवाई केली.

उस्मानाबादमध्ये व्यापा-यांचा ‘बंद’

$
0
0
सर्वत्र नववर्षाचे स्वागत उत्साहाने होत असताना, उस्मानाबाद शहरातील नगरपालिका व्यापारी संकुलातील सुमारे चारशे व्यापाऱ्यांनी एक जानेवारीला ‘बंद’ पाळला. नगरपालिकेने एकतर्फी भाडेवाढ आणि डिपॉझिटमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

ग्रामविकास अधिका-यासह लिपिकाला अटक

$
0
0
गॅस कंपनीचे जप्त केलेले गॅस सिलिंडर सोडवण्यासाठी सत्तर हजाराची लाच घेणाऱ्या रांजणगाव शेणपुंजीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला व लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मंगळवारी दुपारी रांजणगाव ये‌थील ग्रामपंचातीच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

‘मार्ड’चे आजपासून ‘मास बंक’

$
0
0
सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन दिवसांपूर्वी एका निवासी डॉक्टरला पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) निवासी डॉक्टर गुरुवारपासून बेमुदत सामुदायिक पलायन (संप) करणार आहेत.

जायकवाडीतून सिंचनासाठी पहिले रोटेशन

$
0
0
मंगळवारी जायकवाडी धरणातून सिंचनासाठी पहिला रोटेशन देण्यास सुरुवात करण्यात आली. धरणाच्या डाव्या कालव्यातून तीनशे क्युसेक प्रतितास याप्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे.

विसरून जाऊ ‘वय’ सारे

$
0
0
‘थर्टी फर्स्ट’ म्हटले की साऱ्या जगात उत्साहाला उधाण आले होते. आबालवृद्ध ते तरुणाईने नवीन वर्षाचे स्वागत आपापल्या स्टाइलने केले. जिकडे तिकडे ‘हॅपी न्यू इअर’चा जल्लोष सुरू असताना, ‘मातोश्री’ वृद्धाश्रमातही ‘हम भी कुछ कम नही,’ या अविर्भावात नवीन वर्षाचे स्वागत झाले.

विभागीय ‌महोत्सवात विद्यापीठाची भरारी

$
0
0
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सहा ‌पारितोषिके पटकाविली. महोत्सवात विद्यापीठाच्या ‘दिव्य’ एकांकिकेला दुसरे पारितोषिक मिळाले.

छोट्या-मोठ्यांचा धुमधडाका

$
0
0
बेभान बॉलीवूड डान्स आणि गायकांच्या आर्त सुरांनी ‘झेप’ स्पर्धेचा समारोप संस्मरणीय ठरला. अंतिम फेरीसाठी सादरीकरण असल्यामुळे स्पर्धकांमध्ये विशेष चुरस रंगली होती. सायंकाळी विजेत्यांना बक्षीस वितरण करून स्पर्धेचा जल्लोषात समारोप झाला.

ऑनलाइनच्या जमान्यातही पत्रांतून मैत्री

$
0
0
ऑनलाईनच्या जमान्यात आजकाल पत्र लिहिण्यासाठी कोणाकडे वेळ आहे, असा प्रश्न सर्वजण करतील. मात्र, खरं सांगायचं आपण कितीही ऑनलाईन झालो तरी प्रत्यक्ष पत्र लिहिण्यात जो आनंद आहे तो काही आगळाच.

‘इनोव्हेशन सेल’तून संशोधनाला नवी दिशा

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती जागविण्यासाठी तसेच महाविद्यालयीन पातळीवर संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) च्या वतीने इनोव्हेशन सेलची स्थापना केली जाणार आहे. सात जानेवारी रोजी सिडको नाट्यगृहात आयोजित ‘इनोव्हेशन समिट २०१४’चे आयोजन करण्यात आले आहे.

ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0
केंब्रिज स्कूलजवळ झालेल्या अपघात प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले होते.

तहकूब सभेत दोन विषय मंजूर

$
0
0
जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दोन विषय गडबडीत मंजूर करण्यात आले. वास्तविक या विषयांवर सदस्यांना बोलावयाचे होते, पण बजेट मंजुरीसाठी ३१ डिसेंबर शेवटची तारीख असल्याने प्रशासनाला हे प्रस्ताव मान्य करून घेणे भाग होते.

६९ लाखांची चोरी : संशयित पोलिसांच्या ताब्यात

$
0
0
रजिस्ट्री कार्यालयातून पळवण्यात आलेल्या ६९ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या परप्रांतीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीला कोर्टात उभे केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ६ जानेवारीपासून संप

$
0
0
राज्य सरकारने पेन्शन व इतर मागण्यांबद्दल दिलेले आश्वासन पाळले नसल्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचारी ६ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यातील विविध संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

डॉ. भालचंद्र कानगो यांना श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार

$
0
0
ज्येष्ठ कामगार नेते व भाकपचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांना बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनतर्फे दिला जाणारा कॉ. श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार जाहीर झाला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images