Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दीड दिवसांच्या विसर्जनाचा विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील भाविकांच्या घरांमधील दीड दिवसांच्या गणरायाचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. हडको एन १२ येथे विसर्जन विहिरीच्या ठिकाणी काहीच व्यवस्था नसल्याने भाविकांना मूर्ती तेथे ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. ही माहिती समजल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करीत मनपा प्रशासनाला विसर्जनाची व्यवस्था करण्यास भाग पाडले. दरम्यान, जिल्हा परिषद मैदानावरील विहिरीच्या ठिकाणीही सुयोग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याने गेल्या वर्षीच्याच पाण्यात विसर्जन करण्यात आले.

गणेशोत्सवात अनेक भाविकांच्या घरी दीड दिवसाचा गणपती बसवण्याची प्रथा आहे. हडको, सिडको भागातील अनेकांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसवण्यात आला होता. गणेश विसर्जनासाठी एन १२ येथील विसर्जन विहिरीजवळ भाविकांची गर्दी झाली. मात्र, या विहिरीची स्वच्छता करण्यात आली नव्हती. विहिरीतील पाण्याची दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे या पाण्यात विसर्जन कसे करावे हा प्रश्न भाविकांना पडल्याने ते मूर्ती विहिरीजवळ ठेऊन निघून जात होते. हा प्रकार मनसेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी येथे धाव घेतली. तेथे ठेवलेल्या मूर्ती डोक्यावर घेऊन ठिय्या आंदोलन केले. मनपाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पालिका अधिकारी येऊन विसर्जनाची व्यवस्था करत नाहीत, तोपर्यंत ठिय्या मांडण्याचा इशारा दिला.

या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर मनपाचे अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळ गाठून कार्यकर्त्यांसह चर्चा केली. यावेळी संतप्त नागरिकांनी गर्दी केली होती. चर्चेनंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी पाण्याच्या टाकीची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. या टाक्यांत टँकरद्वारे पाणी भरण्यात आले. त्यानंतर गणरायांची आरती करून विधीवत विसर्जन करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, बिपीन नाईक, सतनामसिंग गुलाटी, आशीष सुरडकर, चेतन पाटील, अॅड. निनाद खोचे, राजीव जावळीकर, मंगेश साळवे, अविनाश पोफळे, कार्तिक फरकाडे, संतोष कुटे, दीपक पवार, बाबुराव जाधव, हेमंत जोजारे, किरण जोगदंड, रोहित कार्ले, रितेश देवरे, राहुल कुबेर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेश महासंघातर्फे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा गणेश महासंघातर्फे गणेशोत्सवानिमित्त शुक्रवारी बेगमपुरा येथील मनपा शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व क्रीडापटुंचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समिती अध्यक्ष डी. एन. पाटील, नगरसेवक सचिन खैरे, माजी नगरसेवक गणू पांडे, देवा सलामपुरे, संजय फतेलष्कर, सतीश पाटील, अण्णा पवार, संजय चौधरी, रवींद्र जाधव, मुख्याध्यापक विजय कोल्हे, संजय डोंगरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणू पांडे यांनी केले. यावेळी बास्केटबॉल खेळाडू संजना जगताप, कुस्तीपटू अर्जुन बर्डिये, मीनल पठारे, पूजा शेळके, श्रद्धा कचरे, काजल गवळी हे गुणवंत, शाळेतील शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन दिग्विजय पाटील, अनिकेत पवार, गणेश पेरे, राजेंद्र खंडागळे, हरीश शिंदे, धीरज पाटील, रवी जाधव, अमोल झळके, सतीश पाटील, धीरज गुजर यांनी केले होते. सुरेखा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचोरांचा शहरात धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीचे सात गुन्हे गुरुवारी विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले.

जवाहरनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, सय्यद रियाज मकसूद सय्यद (वय ५१ रा. शिवशंकर हौसिंग सोसायटी) यांची दुचाकी बुधवारी मध्यरात्री घरासमोरून चोरीस गेली. दुसरी घटना सोमवारी रात्री मिसारवाडीत घडली. संदीप गोरख कांबळे (वय २४) यांचीही दुचाकी घरासमोरून चोरीस गेली. याप्रकरणी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तिसरा गुन्हा गुरुवारी दुपारी सेंट्रल नाका स्मशानभूमी समोर घडला. येथून मिलिंद रामचंद्र गवळी (वय ४८ रा. अजिंक्यनगर, गारखेडा परिसर) यांची दुचाकी चोरांनी पळवली. यासह दुसऱ्या घटनेत अभिषेक काकासो पाटील (वय २६ रा. विपुल अपार्टमेंट, अपेक्स हॉस्पिटलजवळ, बायजीपुरा) याची दुचाकी घरासमोरून बुधवारी चोरीस गेल्याचा गुन्हा जिन्सी पोलिसांत दाखल झाला आहे. पाचवी दुचाकी चोरी गुरुवारी पहाटे धामोरी शिवार, गंगापूर येथून झाली. दादा वसंत पिंपळे यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चार सप्टेंबर रोजी सावित्रीनगर, चिकलठाणा येथून कृष्णा भीमराव निकाळजे यांची दुचाकी चोरीस गेल्याचा गुन्हा सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

\Bपार्किंग कर्मचाऱ्यावर गुन्हा\B

बुलेट चोरीस गेल्याप्रकरणी एमजीएम हॉस्पिटलचा पार्किंगचालक व अज्ञात चोराविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल दिलीप रत्नपारखे (वय २४ रा. संजयनगर, बायजीपुरा) यांच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांनी सोमवारी सायंकाळी हॉस्पिटलच्या पार्किंग क्रमांक आठमध्ये बुलेट पार्किंग केली होती. तिच्या चोरीच्या आरोपावरून पार्किंगचे कर्मचारी अश्फाक कय्युम पठाण (वय १९ रा. गारखेडा) व शफीक शेख कदीर (वय २३ रा. रोशन गेट, बारी कॉलनी) या दोघांसह चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी अपघातात तेलवाडीजवळ एक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

औरंगाबाद-धुळे महामार्गावरील तेलवाडी गावाजवळ शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोन दुचाकीच्या अपघातात अंधानेर येथील किशोर सुनील पवार (वय २१) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये इतर चार जण जखमी झाले आहेत. यातील दोन्ही दुचाकी (क्रमांक एमएच २० सीपी ३७४८ व एमएच २० डी ४७११ ) कन्नडकडून चाळीसगावकडे जात असताना हा अपघात घडला. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान किशोर सुनील पवार या युवकाचा मृत्यू झाला. अपघातातील जखमी किशोर मधुकर सातपुते, रितेश गंगाधर गायकवाड, अजय दादाराव साठे, सुनील विश्वनाथ नागे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगबाद येथे हलविण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली आहे. या घटनेचा तपास कन्नड शहर पोलिस करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज महानगरात ५८२ गुन्हेगार पायबंद

$
0
0

वाळूज महानगर: गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत ५८२ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या गुन्हेगारांवर विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत़

वाळूज महानगरमधील मागील काही घटनांचा आलेख बघता गणेशोत्सव शांतेत पार पडावा यासाठी पोलिस गुन्हेगारांवर नजर ठेऊन आहेत. यापूर्वी एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव व ९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाच्या बंद दरम्यान उपद्रवी घटकांचा सर्वसामान्यांसह पोलिसांनाही त्रास झाला. त्यामुळे गणेशोत्सवात मूर्ती व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गर्दीत महिला व तरुणींची छेड रोखण्याकरिता साध्या वेषात पोलिस तैनात राहणार आहेत. पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्ड, विशेष पोलिस अधिकारी, तसेच गणेश मंडळाचे स्वयंसेवक राहणार आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, सविता तांबे, राजू मोरे, राजेश वाघ, वसंत शेळके, रामदास गाडेकर, प्रकाश गायकवाड, मुरलीमनोहर कोलिमी, शैलेंद्र अडियाल, बंडू गोरे, बाळासाहेब आंधळे आदींच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. नागिरकांना विविध आजार होऊ लागले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी करणारे निवेदन पँथर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी यांना देण्यात आले. खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर नानासाहेब म्हस्के, राज चौथमल,अमोल तायडे,श्याम खिल्लारे, अनिल रगडे, दीपक हिवाळे, राहुल नवतुरे, अजय धनेधर आदींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारिप आणि एमआयएमची युती

$
0
0

औरंगाबाद:

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएममध्ये युती झाली असून दोघांनीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीची घोषणा गांधी जयंती दिनी येत्या २ ऑक्टोबर रोजी एका जाहीर सभेद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे या नव्या समीकरणामुळे राज्यातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता बळावल्याचं सूत्रांनी सांगितलं.

भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम दरम्यान युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या युतीबाबत प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी बैठक झाली होती. दोन बैठकांमध्ये युतीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. २ ऑक्टोबरला प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी औरंगाबाद येथील जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली जाहीर सभा होणार आहे.

केवळ विधानसभाच नव्हे तर लोकसभा आणि महापालिका निवडणुकाही एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी सांगितलं. दरम्यान, या युतीच्या निमित्ताने तब्बल ३० वर्षानंतर राज्यात पुन्हा एकदा दलित-मुस्लिम समाज राजकीयदृष्ट्या एकत्र येत आहे. यापूर्वी पीआरपीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी हाजी मस्तान यांच्याशी युती केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलसंपदा’ खर्चात अनियमितता

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

जलसंपदा खात्यातील वैद्यकीय खर्चाची एक लाखांपेक्षा अधिकची देयके मंजूर करून अनियमितता करण्यात आली आहे असा आक्षेप घेणाऱ्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. मंगेश एस. पाटील यांनी सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे.

गोपालकिशन पुजारी यांनी सदर याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, त्यांनी माहितीच्या अधिकारात याविषयीची माहिती मागतिली असता, एक लाखांच्या वैद्यकीय खर्चाला मान्यता देण्याचा अधिकार असताना अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंत्यांनी पावणे पाच लाखांपर्यंत वैद्यकीय देयके मंजूर केल्याचे समोर आले आहे. विशिष्ट कर्मचाऱ्यांना पावणे पाच लाखांपर्यंतची वैदयकीय देयके मंजूर करण्यात आली आहेत. वास्तविक, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना एक लाखांच्या वरील वैदयकीय खर्चाला मंजुरी देता येते. मात्र, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंत्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करत, लाखोंच्या बिलांना मंजुरी दिली. त्याविरोधात याचिकाकर्त्याने १८ डिसेंबर २०१५ रोजी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, प्रधान सचिव, कार्यकारी संचालकांकडे निवेदन दिले.

आठ ऑक्टोबरला सुनावणी

सदर प्रकरणात अनियमितता झाल्याचे मान्य करत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांना अहवाल सादर करण्याचे सरकारने आदेश दिले. त्यांनी 'कडा'च्या मुख्य अभियंत्यांना व जायकवाडी प्रकल्प मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांना चौकशी करण्यास सांगितले होते. मात्र, अद्यापही याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली नाही. याचिकाकर्त्यातर्फे श्रीकृष्ण साळुंके यांनी काम पाहिले. या याचिकेची सुनावणी आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काळ्या पाषणातील भक्ती गणेश!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको, एन वन येथील भक्ती गणेश. काळा पाषाणात कोरलेला गणपती, ही त्याची ख्याती. सध्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून बाप्पांच्या चरणी भाविकांची गर्दी वाढली आहे.

शहराचा औद्योगिक विकास पाहात शासनाने ३० नोव्हेंबर १९७२च्या अधिसूचनेन्वये नवीन औरंगाबाद प्रकल्पाच्या १२६२.५० हेक्टर क्षेत्रासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. अपेक्षेप्रमाणे काही वर्षातच नियोजित असे नवीन शहर साकारले गेले. औद्योगिक विकास झपाट्याने होत असतानाच सिडको परिसरात अनेक वसाहती उभ्या राहिल्या. विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवितानाच मंदिर असावे, अशी कल्पना त्यावेळी काही नागरिकांनी मांडली. त्यानुसार १९८३-८४ मध्ये भक्ती ट्रस्टची नोंदणी झाली आणि सिडको प्रशासनाकडे मंदिरासाठी रितसर अर्ज करण्यात आला. त्यास प्रतिसाद देत पाच हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध झाली. १९८७साली सुरुवातीला गणरायाचे छोटेखानी मंदिर उभारले. त्यासमोर एक पत्राचे शेड होते. तामिळनाडू राज्यातील महाबलीपुरम येथील हस्तकला केंद्रातून काळ्या पाषाणातील सुबक अशी अडीच फुटांची मूर्ती आणण्यात आली. परिसर विस्तारला आणि बाप्पाची ख्याती सर्वदूर पसरत गेली. २०१०मध्ये विश्वस्त मंडळ आणि भक्तांनी एकत्र येत मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. भक्त आणि दानशूरच्या मदतीने अवघ्या दोन वर्षांत या अष्टकोनी मंदिराचे व त्यासमोरील सभामंडपाचे काम पूर्ण झाले. सोबत शेजारीच भव्य अशी तीन मजली इमारत उभारली. गाभाऱ्यात चांदीचा वर्क करण्यात आला असून, मंदिर परिसरात मार्बल लावण्यात आले आहे. इमारतीत तीन सभागृह असून विविध धार्मिक कार्यक्रमासह योगसन, भरतनाट्यमसह अन्य प्रशिक्षणवर्ग येथे नियमित घेतले जातात. परिसरातील नागरिकांना छोट्याखानी कार्यक्रमासाठी नाममात्र दरावर सभागृह दिले जाते, अशी माहिती मंडळाचे सचिव श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली.

\Bसुरक्षेला प्राधान्य

\Bभाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या गणरायच्या दर्शनासाठी येथे नेहमी गर्दी होते. सुरक्षेच्या दृष्टीने विश्वस्त मंडळाने खास उपाययोजना केल्या असून, मंदिर परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. येथे २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असतात. मंदिर व परिसरात हवा खेळती राहावी, यासाठी खास आराखडा तयार करत उपाययोजना आखल्या आहे, अशी माहितीही श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारती घोडे यांची उलटतपासणी पूर्ण

$
0
0

म. टा.प्रतिनिधी ,औरंगाबाद

वर्धन घोडे खून खटल्यात शनिवारी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयामध्ये फिर्यादी भारती घोडे यांची उलटतपासणी पूर्ण झाली. तसेच इतर साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. इतर साक्षीदारांचे जबाब पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी नोंदविण्यात येणार आहेत.

शनिवारी वर्धनच्या आईसह त्याचा मित्र सचिन पवार या दोघांनी उलट तपासणी पूर्ण झाली. वर्धनच्या हत्येपूर्वी त्याच्यासोबत कोण होते याच्या अनुषंगाने साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. हत्येच्या आदल्या दिवशी आरोपी अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे तसेच वर्धन घोडे आणि त्याचा मित्र सचिन पवार हे गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी गेले होते, हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. त्याअनुषंगानेही साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. नाशिक येथील अजय मिसर यांनी सरकारतर्फे तर फिर्यादीतर्फे डी. ए. खंडागळे आणि विजय काळे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वर्षे ‘कॅरीऑन’ बंद !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन देण्यात येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. व्यवस्थापन परिषदेच्या शनिवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत कॅरीऑनबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, विधी व फार्मसी शाखेच्या विद्यार्थ्यांनीही कॅरीऑनची मागणी केल्यामुळे विद्यापीठाने नमती भूमिका घेतली. पुढील पाच वर्षे कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन देऊ नये असा निर्णय झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची कॅरीऑनच्या मुद्यावर बैठक झाली. या बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी कॅरीऑनची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक घेण्यात आली. राज्यपाल कार्यालयाने कॅरीऑन देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पण, विशेष अधिकारात प्रशासन कॅरीऑन देण्याच्या तयारीत होते. काही दिवसांपूर्वी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी कॅरीऑनची मागणी केली होती. जवळपास ७० टक्के विद्यार्थी नापास झाल्यामुळे विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी उपोषण केले होते. यावेळी विद्यापीठाने राज्यपाल कार्यालयाकडे मार्गदर्शन मागण्यात येईल असे लेखी पत्र दिले होते. दोन बैठकीत यावर चर्चा झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी शनिवारी विद्यापीठाकडे कॅरीऑनची जोरदार मागणी केली. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन दिल्यास राज्यपाल कार्यालयाकडे तक्रार करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. शिवाय, फार्मसीच्या विद्यार्थ्यांनीही कॅरीऑनची मागणी केली होती. प्रत्येक शाखेचे विद्यार्थी कॅरीऑन मागण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने अखेर अभियांत्रिकीच्या कॅरीऑनचा निर्णय रद्द केला. तसेच पुढील पाच वर्षे कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन देण्यात येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी कॅरीऑन देण्याची पद्धत बंद करावी, अशी मागणी सदस्य डॉ. राजेश करपे यांनी केली होती.

\Bकॉलेजांचा दबाव ?

\Bमागील वर्षी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन देण्यात आले होते. यावर्षीसुद्धा कॅरीऑनची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालये रसद पुरवत असल्याची चर्चा आहे. महाविद्यालांच्या दबावाखाली प्रशासनाने तातडीने बैठक घेतली. पण, इतर शाखेच्या विद्यार्थ्यांनी दबाव वाढवताच कॅरीऑनचा निर्णय गुंडाळण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्मलदादा यांना साश्रूनयनांनी निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन ७ येथील मुकुल मंदिर शाळेचे संस्थापक निर्मलदादा ग्यानाणी यांना शनिवारी सकाळी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. निर्मलदादा यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले होते. त्यांनी मरणोत्तरदेहदान केल्यामुळे त्यांचे पार्थीव स्काऊट - गाइडच्या झेंड्यात लपेटून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालयाच्या स्वाधीन करण्यात आले.

वृद्धापकाळामुळे व अल्पशा आजारामुळे निर्मलदादा यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शुक्रवारी रात्रीच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी आठ ते नऊ यावेळात त्यांचे पार्थिव मुकुल मंदिर शाळेच्या परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने आले होते. मुकुल मंदिर शाळेचे आजी - माजी विद्यार्थी, शिक्षक देखील उपस्थित होते. विद्यार्थी आणि शिक्षकांना निर्मलदादांचे अंत्यदर्शन घेताना हुंदके अनावर झाले . अंत्यदर्शनानंतर त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालयाच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी त्यांचे भाऊ उत्तमभाई ग्यानाणी आणि वहिनी यांच्यासह पन्नालाल सुराणा, आमदार अतुल सावे, मुकुल मंदिरचे शाळेचे अध्यक्ष कमांडर अनिल सावे, शिक्षणाधिकारी चव्हाण, पक्षीमित्र दिलीप यार्दी, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, मुख्याध्यापक हेमंत चौधरी, सुरेश परदेशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा गणेश महासंघातर्फे आज कुस्त्यांची दंगल

$
0
0

औरंगाबाद : जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांअंतर्गत श्री गणेशोत्सव लोकसहभागातून साजरा करण्यात येत असून, यानिमित्ताने रविवारी क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात येईल. रविवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य कुस्त्यांची दंगल होणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तर उद्‌घाटक म्हणून खा. चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी दिली. महासंघाच्या वतीने आयेाजित या कार्यक्रमास उपस्थिातीत राहण्याचे आवाहन महासंघाचे कार्याध्यक्ष पंकज फुलफगर, राजेंद्र जंजाळ, संजय केणेकर, अनिल मानकापे, ऋषिकेश खैरे, संदीप शेळके यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार, आरोपीला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याप्रकरणात आरोपी कुंडलिक शाहू चव्हाण याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. तक्रारीनुसार, कोतवालपुऱ्यातील पीडितेची आरोपीच्या पत्नीसोबत एका बचत गटाच्या कार्यक्रमात भेट झाली. तिने आरोपीची भेट घालून दिली. आरोपीने तिला नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अनेकदा त्याने तिच्याशी मोबाइलवर संपर्क साधत तिचा विश्वास संपादन केला. यावर्षी नऊ जुलै रोजी आरोपीने तिला सकाळी साडेनऊ वाजता संपर्क साधला व किल्लेअर्क येथील कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानंतर तिला बळजबरीने दुचाकीवर बसवत सावंगी येथील एका शेतात नेले. याठिकाणी साहेब भेटतील असे सांगत तिला शरबत दिले. गुंगीत असताना, तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत व बदनाम करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान तिला गर्भधारणा झाल्याने, तिने लग्न करण्याची गळ घातली असता, आरोपीने नकार दिला. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे. फिर्यादी व आरोपीची डीएनए तपासणी करायची आहे. सखोल तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन विहीर स्वच्छता; ५५ लाखांचा येणार खर्च

$
0
0

औरंगाबाद : गणेश विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेसाठी महापालिका यंदा ५५ लाख ४७ हजार ६९८ रुपये खर्च करणार आहे. विविध झोन कार्यालयांच्या अंतर्गत तेरा विहिरींची स्वच्छता केली जाणार आहे.

शहराचा विस्तार लक्षात घेता पालिकेने शहराच्या विविध भागात गणेश विसर्जन विहिरींची व्यवस्था केली आहे. भावसिंगपुरा, औरंगपुरा, स्वामी विवेकानंदनगर, सिडको ए १२, हर्सूल येथील स्मृतिवन उद्यान, चिकलठाणा, संतोषी मातानगर, मुकुंदवाडी, संघर्षनगर, शिवाजीनगर, सातारा परिसर, देवळाई तलाव, जालाननगर आणि ज्योतीनगर या ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व विहिरींच्या स्वच्छतेसाठी पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने ५५ लाख ४७ हजार ६९८ रुपयांचे अंदाजपत्रक तयारकेले असून, या अंदाजपत्रकानुसार काम देखील सुरू करण्यात आले आहे. विहिरींच्या स्वच्छतेच्या कामाचा आढावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी घेतला. येत्या पाच दिवसांत सर्व विहिरी स्वच्छ करा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. विहिरीजवळ आवश्यक ती सर्व तयारी करा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दीड दिवसाच्या गणपतींच्या विसर्जनावेळी सिडको एन १२ येथील विहीर स्वच्छ केलेली नव्हती. याबद्दल महापौरांनी गणेशभक्तांची माफी मागितली. विहीर स्वच्छ नसणे हा प्रकार निंदनीय आहे असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वकिलांच्या मुलभूत हक्कावर गदा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्वोच्च न्यायालयाने कृष्णकांतविरुद्ध मध्यप्रदेश या प्रकरणात २८ मार्च २०१८ रोजी दिलेल्या निर्णयामुळे वकिलांच्या मुलभूत हक्कावर गदा येत आहे. त्यांना वकिली करणे अशक्यप्राय झाले आहे, असे विचार मांडून जिल्हा वकील संघाने शनिवारी निर्णयाचा एकमुखी जाहीर निषेध केला.

भारतीय वकील परिषदेने वरील निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाकडे अपील किंवा पुनर्विलोकन अर्ज दाखल करावा, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.

अ‍ॅडव्होकेटस् अ‍ॅक्टमधील कलम ३४ रद्दबातल ठरवावे, हायर एज्युकेशन कमिशन बिल मागे घ्यावे, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय पद देऊ नये, सर्वोच्च आणि उच्च न्यायालय तसेच जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राज्य वकील परिषदेचा सल्ला घ्यावा. वकील बंधू-भगिनींच्या कल्याणासाठी 'अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन अ‍ॅक्ट' मंजूर करून त्यात फक्त वकिलांच्या कल्याणकारी योजनांचाच समावेश करावा. असे ठराव सभेत पारित करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी बी. एच. गायकवाड होते. एन. एम. कापडिया, एन. डी. झिंजुर्डे पाटील, एन. एन. कापडिया आणि जी. एम. पटेल आणि वकील संघाचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष सतीश सोनोने यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिव संतोष चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले, तर सहसचिव नागेश सोनुने यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरोघरी शाडू मातीचे गणराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविकांचा कल असल्यामुळे विधायक उपक्रमांची संख्या वाढली आहे. बाजारातून गणेशमूर्ती खरेदी करण्याऐवजी अनेक कुटुंबात घरीच शाडू मातीची मूर्ती तयार करण्याचा पायंडा पडला आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे जतन करण्याचा संदेश दिला जात आहे.

गणेशोत्सवाची व्यापकता उत्साहात भर घालणारी असली तरी पर्यावरणाचे प्रश्न निर्माण करीत आहे. दरवर्षी ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण यांनी नागरिक जेरीस येत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन वेगवेगळ्या पातळीवर करण्यात येत आहे. मात्र, त्याचा अवलंब करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा वाढल्या आहेत. या मातीपासून तयार केलेली मूर्ती काही वेळात पाण्यात विरघळते. तर 'पीओपी'ची मूर्ती पाण्यात न विरघळता प्रदूषण वाढवते. हा फरक लक्षात आल्यानंतर बाजारात शाडू मूर्तीची मागणी वाढली. तुलनेने किंमत जास्त असूनही शेकडो कुटुंबात शाडू मूर्ती घेतली गेली. या मूर्तीचे घरी विसर्जन करण्यात येणार आहे. मागील पाच वर्षांपासून पद्मपुरा परिसरातील शिंदे कुटुंबाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा अवलंब केला. शाडू मातीपासून विविध रंग व आकाराच्या तब्बल ५१ मूर्ती शिंदे यांनी घरी तयार केल्या आहेत. मेकॅनिकल अभियंता आकाश शिंदे यांनी हा पायंडा पाडला. नोकरीतून वेळ काढून मूर्ती तयार करताना कुटुंबातील सदस्य सहकार्य करतात. यावर्षी दहा दिवसात ५१ आकर्षक मूर्ती आकाश यांनी घडवल्या. या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून दहा मनोभावे पूजा-अर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात पत्नी डॉ. अर्चना शिंदे, आशिष शिंदे, सुनीता शिंदे, कैलास शिंदे यांनी सहभाग घेतला. परिसरातील नागरिक आवर्जून शिंदे यांच्या घरी गणेशाच्या मूर्ती पाहण्यासाठी जात आहेत.

\B

घरोघरी शाडूच्या मूर्ती

\Bयंदा शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे. अनेक वसाहतीत घरी गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मूर्तीचे घरीच विसर्जन करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संयोजकपदी साळ‌वे

$
0
0

औरंगाबाद : 'आम आदमी पार्टी'च्या औरंगाबाद पश्चिम विधानसभेच्या संयोजकपदी रवींद्र साळवे यांची निवड करण्यात आली आहे.

साळवे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच 'आप'मध्ये प्रवेश घेतला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात साळ‌वे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी सिल्लोड निरीक्षक अजबराव मानकर, औरंगाबाद पश्चिमचे माजी संयोजक प्रकाश जाधव, डॉ. माणिक वाघमारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडांच्या कत्तलप्रकरणी ‘सार्वजनिक बांधकाम’ला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण रोडवर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. यासाठी परवानगी न घेतल्यामुळे महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस बजावली आहे.

पैठण रोडवर पंच्याहत्तर ते शंभर वर्ष जुनी वडाची झाडे आहेत. या झाडांच्या घटदाट सावलीमुळे अल्हाददायक वातावरण निर्माण होते, शिवाय झाडांमुळे पैठण रोडवर ऑस्किजन हब देखील तयार झाला आहे. असे असताना रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू केली आहे. कोणत्याही कारणासाठी वृक्ष तोडण्याची कार्यवाही करायची असेल, तर त्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र, पैठण रोडवर वृक्ष तोडीची कार्यवाही करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेच्या वृक्ष प्राधिकारणाची परवानगी घेतली नाही. त्यामुळे पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंत्याच्या नावे नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, 'दहा सप्टेबर रोजी सकाळी नऊ वाजता पैठण रोडवरील वृक्ष तोडण्यात असल्याचे निदर्शनास आले. वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेता वृक्ष तोडण्यात येत आहेत. महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष जतन कायदा क्रमांक एक्स एल आय व्ही १९७५ चे कलम ८ (१) चे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊनये याचा खुलासा करावा.'

पैठणरोडवर जुनी वडाची झाडे आहेत. सध्या जी झाडे तोडण्यात येत आहेत, त्या झाडांचा आणि रस्ता रुंदीकरणाचा तसा काही संबंध नाही. वृक्ष प्राधिकरणाची मान्यता न घेता झाडे तोडण्याचे काम केले जात आहे ही गंभीर बाब आहे. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. लोकप्रतिनिधींनी अशा कृत्यांना पाठिशी घालू नये.

- डॉ.किशोर पाठक, सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी सोन्या-चांदीच्या पावलाने आली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\B'लक्ष्मी कशाने आली,

लक्ष्मी लेकराबाळाने आली

लक्ष्मी कशाने आली,

लक्ष्मी हिऱ्या माणकांनी आली,

लक्ष्मी कशाने आली,

लक्ष्मी सोन्या-चांदीच्या पावलाने आली...'

\B

शहरातील घराघरातून निघणारे हे आशादायी आवाज. घरात कुंकवाचे घेतलेले हातवे. आणि सायंकाळी झालेले महालक्ष्मीचे आगमन यामुळे शनिवारी मरावाड्यात सगळीकडे आनंददायी वातावरण होते.

समृद्धीचे प्रतीक असलेल्या महालक्ष्मीचे अनुराधा नक्षत्रावर घरोघरी उत्साहात आगमन झाले. रविवारी दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र आहे. त्यामुळे कुळाचाराप्रमाणे पूजन व महानैवेद्य होईल. पार्वतीचे स्वरूप असलेली महालक्ष्मी म्हणजेच गौरी गणरायापाठोपाठ विराजमान झाली आहे. शहरातील अनेक भागात महालक्ष्मीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्त साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. गौरीला मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणून संबोधले जाते. घरात समृद्धी स्थिर रहावी म्हणून महालक्ष्मीची आराधना करण्याची जुनी परंपरा आहे. शाडू किंवा पितळेचे मुखवटे असलेल्या महालक्ष्मीला विविध अलंकार चढवले जातात. तसेच, सभोवताली उत्तम आरास केली जाते. ही आरास करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून गृहिणींची लगबग सुरू होती. अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन झाले. आज रविवारी दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र आहे. त्यामुळे कुळाचाराप्रमाणे पूजन व महानैवेद्य होईल. तर सोमवारी हा विसर्जनाचा दिवस आहे, अशी माहिती पुरोहित रामकृष्ण बारहाते यांनी दिली.

\Bफुले महागली; बाजारात गर्दी\B

महालक्ष्मीच्या खरेदीसाठी शनिवारी सकाळपासून गुलमंडी, औरंगपुरा, मच्छलीखडक, कासारीबाजार भागात नागरिकांनी आणि विशेषत: महिलांनी तुफान गर्दी केली होती. दुपारपर्यंत ही गर्दी कायम होती. सजावटीचे साहित्य, वेगवेगळ्या प्रकारची लाइटिंग, फुलांना विशेष मागणी होती. अनेक ग्राहकांनी महालक्ष्मीसाठी साड्या आणि खेळांचीही मोठ्या उत्साहात खरेदी केली. शुक्रवार प्रमाणेच शनिवारीही फुलांचे दर महागडे होते. झेंडू चाळीस रुपयांना तर गुलाब व शेवंती प्रत्येकी दीडशे रुपये किलोने विकले गेले. महालक्ष्मीच्या पूजेला गुलाबाचे हार लागतात. त्यामुळे हाराच्या किमतीही जास्त होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images