Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात गैरसोयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू नाही. केंद्राची पाहणी करुन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी सूचना केल्या. विद्यार्थी व डॉक्टर यांच्यातील संवाद कायम ठेवून आरोग्य सुविधा वाढवण्याची मागणी करण्यात आली.

विद्यापीठातील आरोग्य केंद्राच्या समस्या वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. विदयार्थ्यांना आरोग्य समस्या सोडविण्यासाठी केंद्राचा उपयोग होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, पुरेशी दखल घेतली नाही. याप्रश्नी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी शुक्रवारी दुपारी आरोग्य केंद्राची पाहणी केली. आरोग्य केंद्रात पूर्णवेळ महिला आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, सोयीसुविधा वाढवाव्या, सुरक्षारक्षक नेमावा आणि स्वतंत्र रुग्णवाहिका ठेवा अशा सूचना काळे यांनी केल्या. तसेच डॉक्टर-विद्यार्थी संवाद ठेवण्याची अपेक्षा आरोग्य अधिकाऱ्यांकडे व्यक्त करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे दीपक बहिर, विकास थाले, मंगेश शेवाळे, दिक्षा पवार, दादाराव कांबळे, साजिद शेख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देणे नऊशे कोटी, वसुली सत्तर कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देणे नऊशे कोटींचे आणि वसुली फक्त सत्तर कोटी असे पालिकेच्या अर्थव्यवस्थेचे व्यस्त प्रमाण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या काळात विविध वॉर्डांमधील विकास कामांवर परिणाम होईल, असे मानले जात आहे.

पालिकेची आर्थिक भिस्त मालमत्ता कराच्या वसुलीवर आहे. नेमके याकडेच पालिकेच्या प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अपुरा कर्मचारीवर्ग, वसुलीसाठीच्या अपुऱ्या सुविधा याचे कारण वसुलीचे प्रमाण कमी असल्याबद्दल सांगितले जाते. पालिका प्रशासनाने स्थायी समितीला २०१८ - २०१९चा अर्थसंकल्प सादर केला. त्यात मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट ३०० कोटी असल्याचे नमूद केले. स्थायी समितीने त्यात पन्नास कोटींची वाढ करून कर हे उद्दिष्ट ३५० कोटी आखून दिले. सर्वसाधारण सभेने त्यात शंभर कोटींची भर टाकून ४५० कोटी रुपये मालमत्ता कराच्या माध्यमातून वसूल करा असे प्रशासनाला सांगितले. ४५० कोटींच्या तुलनेत आतापर्यंत सत्तर कोटींची वसुली झाली आहे. २०१७-१८ या वर्षात पालिका प्रशासनासमोर मालमत्ता कर वसुलीचे ३७० कोटींचे उद्दिष्ट होते. त्याच्या तुलनेत जेमतेम सुमारे ९८ कोटी वसूल झाले. ३७० कोटींचे उद्दिष्ट असताना प्रशासनाने मात्र १२१ कोटी रुपये वसूल होतील, असे अर्थसंकल्पात स्पष्ट केले होते. यंदा ४५० कोटींचे उद्दिष्ट असताना प्रशासन वसुलीचा कितीचा टप्पा पार करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान कर वसुलीच्या संदर्भात स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी आयुक्तांच्या नावे पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, 'लेखा विभागाकडे छोट्या मोठ्या कंत्राटदारांचे सुमारे १५० कोटी रुपयांची बिले पडून आहेत. भूमिगत गटार योजना, एसटीपीचे विद्युत बिल, पथदिव्याचे बिल, एलइडी लाइटच्या कंत्राटदाराचे पेमेंट यासर्वांचे पेमेंट सोळा महिन्यांपासून प्रलंबित आहे. या सर्वांचा विचार करता सद्दस्थितीत सुमारे २५० कोटींची देणी पालिकेवर आहेत. वॉर्ड क्रमांक १ ते ११५ मधील सहाशे कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. त्याशिवाय पन्नास कोटींची अंदाजपत्रके तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात ८५० ते ९०० कोटी रुपयांची देणी महापालिकेला द्यावी लागणार आहेत. ही बाब लक्षात घेता कर वसुलीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. वसुलीच्या कामाचे खासगीकरण करा किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून प्रभावीपणे वसुलीचे काम करून घ्या,' असे वैद्य यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

\Bकंत्राटदारांचा काम बंदचा इशारा

\Bलेखा विभागाकडे सुमारे दीडशे कोटींची बिले प्रलंबित असल्यामुळे काही कंत्राटदारांनी शनिवारी मुख्य लेखाधिकाऱ्यांची भेट घेतली. येत्या दोन दिवसात थकीत बिल देण्याबद्दल निर्णय न झाल्यास काम बंद करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी बंडू कांबळे, बबन हिवाळे, बाळू गायकवाड, अब्रार, फईम, ईश्वर बारवाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीः शाळेत मुलांचे गुप्तांग मांजाने बांधले

$
0
0

औरंगाबादः

परभणीतील एका शाळेत तीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. श्री गणेश वेद पाठशाळेत वेदशास्त्र शिकणाऱ्या तीन मुलांवर हे अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी पाठशाळेचे संचालक सुधीर कुलकर्णी आणि इतर दोघांविरोधात नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. तर दोन विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलं आहे.

श्री गणेश वेद पाठशाळेच्या संस्थाचालकांच्या नात्यातील मुलांनी हे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचार करणारे दोन विद्यार्थी त्याच शाळेतले आहेत. जेवणावेळी श्लोकचा उच्चार नीट करता येत नसल्याच्या कारणावरून या विद्यार्थ्यांनी तिघांना मारहाण केली. तसंच त्यांचे गुप्तांग मांजाने बांधले. ज्या तीन मुलांवर अत्याचार झाले त्यांच्या पालकांनी थेट परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्यय यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी अत्याचारांची माहिती त्यांना दिली.

मुलांना पाइपने मारहाण करणं, त्यांना नग्न करून उलटं टांगणं आणि गुप्तांगाला मांजा बांधून ओढणं असे विकृत प्रकार झाले. पीडित मुलं ही ९ ते १० वर्षाची आहेत. गेल्या महिन्याभरापासून या मुलांवर अत्याचार होत होते. गुप्तांगाला बांधलेला मांजा सकाळपर्यंत सोडायचा नाही, अशी धमकी त्यांना दिली गेली होती. यामुळे त्यांच्या गुप्तांगाला सूज आली होती आणि जखमाही झाल्या होत्या. ही लक्षात गोष्ट आल्यानंतर पालक संतप्त झाले. त्यांनी मुलांना घेऊन हॉस्पिटल गाठलं. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास मंडळाचे शासनदरबारी अडीच हजार कोटींचे प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा विकास मंडळाने गेल्या अडीच महिन्यांमध्ये तब्बल २८ बैठका घेतल्या असून या बैठकांमधून शासनदरबादी तब्बल २ हजार ६७५ कोटी रुपयांचे प्रस्ताव पाठवले आहेत. ही माहिती मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अध्यक्षपदाची जबाबदारी आल्यापासून मराठवाड्याच्या विकासासाठी सिंचन, रस्ते, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण अशा विविध क्षेत्रातील २८ बैठका घेतल्या असून सदस्य सचिवांमार्फत प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये कोरडवाहू शेतीपूरक उद्यागासाठी २५० कोटी, सूक्ष्मसिंचन विषेश ‌निधी ३५० कोटी, सिंचन अनुषेश निधी तसेच सिंचनासाठीचा इतर निधी मिळून ५०० कोटी, नांदेड येथे पॅरामेडिकल वैद्यकीय तंत्रज्ञान महाविद्यालयासाठी १०० कोटी, किनवट येथे आरोग्य सेवा, नवीन नर्सिंग यंत्रणा सुरू करण्यासाठी १५ कोटी, वैतरणेचे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठी २९ कोटी, मराठवाड्यातील विविध प्रकल्पांमधुन गाळ काढण्यासाठी १०० कोटी, कृषी पंपांना वीजपुरवठा करण्यासाठी ८१ कोटी, शेतकऱ्यांना वीज जोडणी पुरवण्यासाठी १३०० कोटी तर मृद व जलसंधारण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १८७ कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. तसेच मराठवाडा विकास मंडळाचा बंद करण्यात आलेला निधी पुन्हा सुरू करण्यात येऊन २५० कोटी रुपये देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तज्‍ज्ञ सदस्य शंकरराव नागरे यांनी मराठवाड्यातील सिंचनाचा अनुषेश व पाण्याबाबतची स्थितीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, मराठवाड्याचा ७० टक्के भाग अवर्षणप्रवण आहे, आपली धरणे भरत नाही, वरच्या भागामध्ये अधिक धरणे बांधण्यात आली आहेत, मराठवाड्याला पाणी मिळावे यासाठी वैतरणेचे पाणी आणावे लागेल, सरकारने २०१० मध्ये सिंचनाचा अनुषेश निघाला असल्याचे सांगितले मात्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने साडेपाच हजार कोटी रुपयांचा अनुषेश काढला या शिवाय रस्ते २६०० कोटी, इमारतींचा १२०० कोटी रुपयांचा अनुषेश असल्याचे नागरे यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष घेणार बैठक

मराठवाड्याच्या विकासासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्यात आल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या प्रश्नी संबंधित विभागाचे मंत्री तसेच अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशी आपण विनंती केली होती, ही विनंती बागडे यांनी मान्य केली असून लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृताच्या नावावरील जमीन हडप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आजारी असलेल्या व नंतर मरण पावलेल्या व्यक्तिच्या जमिनीची बनावट कागदपत्र तयार करून खुलताबाद तालुक्यातील राजेराय टाकळी येथील जमीन बळकावण्याचा प्रकार घडला. हा प्रकार जुलै १९९१ ते जानेवारी २०१२ च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी मसूद मोहम्मद ईस्माईल पटेल (वय ६८, रा. राजेराय टाकळी) यांनी तक्रार दाखल केली आहे. मसूद पटेल यांचे काका मजीद पटेल यांची राजाराय टाकळी गट क्रमांक ६१० मध्ये तीन एकर जमीन होती. मजीद पटेल यांना मुलबाळ नसल्याने तसेच ते आजारी असल्याने त्यांना हॉस्पिटल बाहेर जाण्यास परवानगी नव्हती. याचा फायदा संशयित आरोपींनी घेतला. या जमिनीवर त्यांनी अतिक्रमण केले. मजीद यांचा २५ मे १९९१ रोजी मृत्यू झाल्यानंतर चार जुलै १९९१ ते सहा जानेवारी २०१२ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच स्टँप व्हेंडर शेख हुसैन याच्या दुकानात बनावट इसार पावती, भरणा पावती तसेच मृत्यूपत्र तयार करून त्यावर मजीद यांच्या बनावट सह्या केल्या. ही बनावट कागदपत्रे निबंधक कार्यालय औरंगाबाद व खुलताबाद न्यायालयात खरी असल्याचे भासवत, ती सादर करीत शासन तसेच फिर्यादीची फसवणूक करत तीस लाखांचे नुकसान केले. या आरोपावरून संशयित आरोपी अब्दुल सत्तार कादर पटेल, नबीखान मोहम्मदखान, अब्दुल रज्जाक हसन पटेल, जिलानी अमीर पटेल, शेख हुसैन शेख ईसाक, धरमचंद हरलाल दगडा, नेपालसिंग तुलजासिंग ठाकूर, देविदास रामराव जोशी व हुसैन गुलाब शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी उपनिरीक्षक सतीश पंडित तपास करीत आहेत.

\Bतीन आरोपी मयत\B

या गुन्ह्याचा कालावधी १९९१ ते २०१२ म्हणजे तब्बल २१ वर्षांचा आहे. या कालावधीत संशयित आरोपींच्या यादीतील नबीखान मोहम्मद, जिलानी अमीर पटेल, नेपालसिंग ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारी श्री. विश्वकर्मा महापूजा महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपास रोडवरील श्री. गणेश विश्वकर्मा मंदिरात सोमवारी श्री. विश्वकर्मा महापूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. गणेश विश्वकर्मा मंडळाच्या विश्वस्तांनी दिली.

१९९३ पासून मंडळातर्फे दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी श्री. विश्वकर्मा महापूजा महोत्सवाचे आयोजन केल्या जाते. यंदा बाळापूर प्रवेशद्वार परिसरात असलेल्या श्री. विश्वकर्मा मंदिरात महोत्सव होणार आहे. सकाळी ९ वाजता धार्मिक विधी, पूजा होणार असून दुपारी १२ वाजेनंतर सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा ग्रामपंचायतींचा पाटोद्यात अभ्यास दौरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन संस्था व जनजागृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श गाव असलेल्या पाटोदा येथे नुकताच अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पळशी, बकापूर, आडगाव माहुली, आडगाव सरक, डोणवाडा, लामकाना, वडखा, मुरूमखेडा, नायगव्हाण, अंजनडोह या दहा ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, संस्थेचे सर्व ग्रामप्रेरक, गावकरी व संस्थेचे पदाधिकारी, असे एकूण ७५ जण दौऱ्यात सहभागी झाले होते. पाटोदा गावापासून जवळच असलेले व्ही. एस. टी. एम. अंतर्गत मौजे खंडेवाडी-नायगव्हाण या गावास त्यांनी सकाळी भेट दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) पूनम क्षीरसागर यांनी देखील या गावास भेट देत गावातील विकास कामांचा आढावा घेतला. डिजिटल अंगणवाडी, ठिकठिकाणी धोबीघाट इत्यादी विकास कामे पाहून सर्व मंडळी प्रभावित झाली. त्यानंतर पाटोदा या गावास भेट देण्यात आली.

कर भरणाऱ्यांना वर्षभर मोफत दळण उपक्रम, शुद्ध पिण्याचे पाणी, गरम पाणी, प्रत्येक कुटुंबाने केलेले शोषखड्डे, नळास लावलेले मीटर आदी कामांची पाहणी यावेळी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे, भास्करराव पेरे पाटील यांनी गावाचा विकास कसा करावा, गावामध्ये करावयाच्या विकासकामांमध्ये लोकांचा सहभाग कसा मिळेल याबद्दल मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ मुत्तवल्लींनाही हवीय मतदानाची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या दोन सदस्यपदांची निवडणूक घेण्यात येणार आहे. ही निवड मूत्तवल्ली वर्गातून केली जाणार आहे. या मतदानावर महाराष्ट्र औकाफ को ऑर्डिनेशन समितीने आक्षेप नोंदविला असून मुत्ततवल्लींची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकाली लाऊन वैध मूत्तवल्लींनाही मतदान प्रक्रियेत सामावून घ्यावे. अशी मागणी समितीने केली. समितीचे शेख फहिमोद्दीन शेख पियाजोद्दीन यांनी यासंदर्भात बोर्डाला पत्र दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुक्तिसंग्रामाचा इतिहास अडगळीत

$
0
0

मटा विशेष

Tushar.bodkhe@timesgroup.com

औरंगाबाद - सत्तर वर्षांत हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा समग्र इतिहास लिहिला गेला नाही. हा बहुपदरी लढा जगभरात इंग्रजी भाषेत पोहचवण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने २० वर्षांपूर्वी लेखन प्रकल्प हाती घेतला होता. मात्र, कुलगुरुंनी स्वारस्य दाखवले नसल्यामुळे प्रकल्प अडगळीत गेला. मराठवाड्यातील दोन विद्यापीठांनी एकत्रित हा इतिहास प्रकल्प पूर्ण करावा असे संशोधकांनी सांगितले.

निजामाच्या जोखडातून १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाले. देशातील इतर विभागाच्या तुलनेत एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य अनुभवलेल्या मराठवाड्याचा लढा अलौकिक होता. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या काही पैलूंवर प्रकाश टाकणारे इतिहास लेखन झाले. मात्र, मुक्तिसंग्रामाचा समग्र इतिहास लिहिला गेला नाही. इतिहास लेखनाच्या दुर्लक्षाबाबत काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ विचारवंत व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी खंत व्यक्त केली होती. भारतीय स्वातंत्र्यलढा राजकीय स्वातंत्र्यासाठी असल्यामुळे एकपदरी होता. हैदराबाद मुक्तिसंग्राम सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि भाषिक असा बहुपदरी होता. या लढ्याचे महत्त्व ओळखून समग्र इतिहास लेखन आवश्यक आहे, असे वाघमारे म्हणाले होते. मुक्तिसंग्रामाच्या सत्तरीत पुन्हा एकदा इतिहास लेखनाचा मुद्दा चर्चेत आला आहे. आ. कृ. वाघमारे, स. मा. गर्गे, सेतू माधवराव पगडी, द. पं. जोशी, नरेंद्र गायकवाड, रझवी जावेद, अनंत भालेराव यांनी इतिहास लेखन केले. पण, मुक्तिसंग्रामाची समग्र मांडणी झाली नाही. जगभरात इतिहास पोहचवण्यासाठी इंग्रजी भाषेत लेखन आवश्यक असल्याचे प्रकर्षाने जाणवले. डॉ. जनार्दन वाघमारे यांनी १९९४ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारल्यानंतर इतिहास लेखनाचा प्रकल्प सुरू केला. मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्याचा विद्यापीठात पायंडा पाडला. स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यसैनिकांची प्रातिनिधिक समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या मार्गदर्शनाखाली तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकातील स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीचे दोन ग्रंथ हिंदी-इंग्रजी व मराठी भाषेत प्रकाशित करण्यात आले. इतिहास लेखन मंडळाची स्थापना करुन जुने संदर्भ ग्रंथ आणि इतर साहित्य जमा करण्यात आले. हिंदी, इंग्रजी, मराठी, कन्नड, उर्दू पुस्तकं हैदराबादेतून मागवण्यात आली. पाकिस्तानात स्थायिक झालेल्या चळवळीशी संबंधित व्यक्तींच्या आठवणी एकत्रित करण्यात आल्या. संदर्भ साहित्य जमा झाल्यानंतर संपादकीय मंडळाची स्थापना करणे आणि प्रत्यक्ष लेखनाचे काम सुरू होणार होते. मात्र, डॉ. वाघमारे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. विशेष म्हणजे वाघमारे यांच्यानंतर आलेल्या कुलगुरुंनी प्रकल्पात स्वारस्य दाखवले नाही. परिणामी, मुक्तिसंग्रामाचा समग्र लेखन प्रकल्प २० वर्षांपासून रखडला आहे. अनेकदा पाठपुरावा करुनही विद्यापीठाने काम सुरू केले नाही अशी खंत वाघमारे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना व्यक्त केली. शेकडो संदर्भ ग्रंथ आणि माहिती एकत्रित असूनही केवळ अनास्थेमुळे समग्र लेखन होऊ शकले नाही.

इतिहास लेखनाचे वावडे

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी १८ सदस्यांची समिती नेमली होती. मात्र, प्रत्यक्षात काम झाले नाही. या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिले होते. लवकरच विद्यापीठाला आश्वासनाचा विसर पडला. या विभागाच्या लढ्याचा इतिहास मांडण्यासाठी दोन्ही विद्यापीठांनी एकत्रित प्रकल्प राबविण्याची गरज संशोधकांना वाटत आहे. सध्या तरी विद्यापीठांना लेखनाचे वावडे आहे.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी दोन्ही विद्यापीठांनी आव्हान स्वीकारण्याची गरज आहे. साधने उपलब्ध असताना लेखन होत नसल्याची खंत वाटते. हा अभूतपूर्व लढा लेखनातूनच जगासमोर जाऊ शकतो.

डॉ. जनार्दन वाघमारे, ज्येष्ठ विचारवंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या दुर्लक्षमुळे निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेल्या निशा सक्सेना या आरोग्य सहाय्यिकेचे दहा सप्टेंबर रोजी निधन झाले. जिल्हा परिषदेने सेवानिवृत्तीची रक्कम न दिल्याने उपचार करता आला नाही, परिणामी त्यांचा मृत्यू झाल्या आरोप जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने केला आहे. यापूर्वी सुद्धा सोनवणे या आरोग्य सहाय्यक महिलेचा याच प्रकारे मृत्यू झाल्याचाही आरोप करण्यात आला.

निशा सक्सेना या सात ते आठ महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या निवृत्तीवेतनातून जिल्हा परिषद प्रशासनाने जास्तीची प्रदान झालेली रक्कम जवळपास तीन लाख वसूल करून घेतली. परंतु, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांच्याकडून वसूल केलेली रक्कम महिन्याच्या आत परत करा, असे आदेश जिल्हा परिषदेला दिलेले आहेत. त्यालाही सहा महिने झाले. परंतु, प्रशासनाने रक्कम परत केलेली नाही. अनेकवेळा प्रशासनास विनंती करूनही वसूल केलेली रक्कम परत करण्यात आली नाही. त्यामुळे उपचारासाठी एक पैसाही शिल्लक राहिला नाही, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष बी. एफ. बैनाडे, जिल्हा सरचिटणीस प्रमिला कुंभारे यांनी केला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या त्वरित मान्य करा, अशी मागणी केली. दरम्यान, याप्रकरणी अधिक माहिती घेऊन भाष्य करता येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसीबी’ ने पकडलेल्या दुबेचा सासरा पालिकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर करण्यात आलेल्या नोकर भरतीत अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची वर्णी लावण्यात आली असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नुकत्याच केलेल्या कारवाईवरून उघड झाले आहे. लाचखोरीच्या प्रकरणात ज्या कंत्राटी कर्मचाऱ्याला पकडण्यात आले त्या कर्मचाऱ्याचा सासरा महापालिकेतच अतिक्रमण हटाव विभागात इमारत निरीक्षक आहे.

सातारा - देवळाई परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली व बांधकामाचे साहित्य जप्त केले. जप्त केलेले बांधकाम साहित्य परत करून पुन्हा बांधकाम करू देण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारताना पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे अधिकारी सी. एम. अभंग आणि कंत्राटी कर्मचारी सचिन दुबे या दोघांना रंगेहात पकडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन दुबे यांचे सासरे अतिक्रमण हटाव विभागातच इमारत निरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विभागाचा जावई म्हणून दुबे याचा नेहमी उल्लेख केला जात होता. लाच प्रकरणात जावई पकडलागेल्यावर सासरा - जावाईबद्दल आता पालिकेत उघड चर्चा सुरू झाली आहे.

पालिकेत सुमारे १२५ कर्मचारी कंत्राटीपद्धतीवर नियुक्त करण्यात आले आहेत. त्यातील ७० टक्के पेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी - कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहेत. अतिक्रमण हटाव विभागातील अन्य एका कंत्राटी कर्मचाऱ्याची बहीण कामगार विभागात पालिकेची कायमस्वरुपी कर्मचारी आहे. एका 'सक्रीय' शिक्षकाचा मुलगा अतिक्रमण हटाव विभागात कंत्राटी पद्धतीवर इमारत निरिक्षक आहे. एका राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या वाहनचालकाच्या शिफारशीने एकाची नियुक्ती इमारत निरिक्षक म्हणून कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात आली आहे. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी पालिकेत स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात पालिकेत वर्षानुवर्षे इमारत निरिक्षक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची मुलगी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्यात आली आहे.

पालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी पालिकेतच विविध विभागात काम करणारे अधिकारी - कर्मचारी नातेवाईकांच्या रुपाने असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कृत्यांवर पडदा पाडला जातो अशीही पालिकेच्या वर्तुळात चर्चा आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर पालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही किंवा थातूरमातूर कारवाई केली तर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल, असेही बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ सचिन’ च्या हालचालीत सुधारणा, आहारही वाढला

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केअरटेकर्सच्या प्रयत्नांमुळे महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील सचिन या पांढऱ्या वाघाची प्रकृती सुधारत असून त्याच्या हालचाली देखील वाढल्या आहेत. त्याच्या आहारात फरक पडला असल्याचे सांगितले जात आहे.

सचिन २० ऑगस्टपासून आजारी आहे. प्राणिसंग्रहालयातील दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी.एस. नाईकवाडे व कार्यालय अधिक्षक संजय नंदन यांच्या सूचनेनुसार सचिनवर उपचार केले जात आहेत. सचिनची स्थिती चिंताजनक होती तेव्हा पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या सूचनेवरून पुणे येथील प्राणिसंग्रहालयाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. या डॉक्टरांनी सचिनला तपासले तेव्हा त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. सचिनचे मागचे दोन्हीही पाय अर्धांगवायूच्या झटक्यामुळे लुळे पडले होते. या दोन्हीही पायांना व कंबरेला मालिश करण्याची सूचना त्या डॉक्टरांनी केली. तेव्हापासून सचिनवर मालीशच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत. प्रविण बत्तीसे, जयसिंग चव्हाण, मोहम्मद जिया हे केअर टेकर्स सचिनला मालिश करीत आहेत. प्रत्येका वेळ वाटून देण्यात आला आहे. एक - एक तासांनी मालीश केली जात असल्यामुळे सचिनच्या हालचालीत सुधारणा झाली आहे. प्रखर विद्यूत झोत देऊन मालिश केली जाते, या उपचाराच्या पद्धतीला शेक देणे, असेही म्हणतात. याशिवाय सकाळ - सायंकाळी सलाईन, इजक्शन देखील सचिनला दिले जात आहेत. उपचाराला साथ देणाऱ्या सचिनचा आहार देखील वाढला आहे. सुमारे साडेतीन किलो खाद्य तो खातो आणि त्याला ते पचते असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगोळी कार्यशाळेचे आयोजन

$
0
0

औरंगाबाद - यशवंत कला महाविद्यालयाच्या वतीने तीन दिवसांची रांगोळी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रसिद्ध रंगावलीकार प्रमोद आर्वी (पुणे) मुख्य मार्गदर्शक आहेत. २० ते २२ सप्टेंबर या कालावधीत महाविद्यालयाच्या कलादालनात कार्यशाळा होईल. अधिक माहितीसाठी प्राचार्य रवींद्र तोरवणे, प्रा. सरिता उंबरकर, राहुल कासार व विशाल घुगे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णपुऱ्यातील सिद्धीविनायक

$
0
0

औरंगाबाद शहरामध्ये तुळजाभवानीचे उपस्थान असलेल्या कर्णपुऱ्यात भविक नवरात्रोत्सवात लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. यासोबतच देवीच्या मंदिराशेजारीच सिद्धीविनायक गणेशाचे मंदिर असून, अत्‍यंत भव्य असलेल्या या मंदिरावर गणेशोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सरदार करणसिंहांनी स्थापन केलेल्या कर्णपुऱ्यामध्ये देवीच्या मंदीराच्या शेजारीत गणपतीची लहानशी मूर्ती होती. त्यावेळी सर्वांच्या प्रयत्नांनी गणपतीच्या लहानशा मंदिराची स्थापना करण्यात आली. या परिसरामध्ये गणपतीचे स्वतंत्र मंदिर असावे या संकल्पनेतून १९८८मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली. येथे भव्य मंदिर उभारण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन ट्रस्टची स्थापना करण्यात आली, त्यांच्या या परिश्रमामुळेच आज सिद्धीविनायकाचे मोठे मंदिर उभे राहिले आहे.

कर्णपुरा देवीच्या मंदिराच्या अगदी समोर असलेले सिद्धीविनायक मंदिर निसर्गाच्या सानिध्यात उभे आहे. संपूर्ण शेंदूरवर्णीय तीन फूट उंचीची गणपतीची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीचा प्रसन्न भाव, आकर्षक डोळे भक्तांना आध्यात्मिक समाधान देतात. गणपती मंदिराच्या समोरच्या भागामध्ये काळ्या पाषाणाची उंदराची सुबक मूर्ती आहे. भाकडे कुटुंबीयांकडे मंदिराच्या पूजेची जबाबदारी असून, मंदिरामध्ये दररोज सकाळी व रात्री आरती करण्यात येते. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये होम; तसेच इतर पूजा करण्यात येतात. सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीबांच्या मंगल कार्यासाठी मदतही करण्यात येते. गेल्या काही वर्षांमध्ये शहर; तसेच परिसरामधील भक्तांचे श्रद्धास्थान झाले आहे. त्यामुळे या मंदिरामध्ये गणेशचतुर्थी, गणेश जयंती, संकष्टी चतुर्थी या दिवशी दर्शनासाठी भक्तांची रांग लागलेली असते.

\Bचांदीच्या सिंहासनाची तयारी

\Bसिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून येत्या सहा महिन्यांमध्ये गणपतीसाठी चांदीचे सिंहासन उभारण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यामध्ये २० किलो, तर त्यानंतरच्या टप्प्यात २० किलो असे एकूण ४० किलो चांदीचे सिंहासन लाडक्या गणपतीसाठी तयार करण्यात येणार आहे. याचे कामही सुरू करण्यात आले आहे. सिद्धीविनायक मंदिर संस्थानच्या संकल्पित भविष्यकालीन योजना असून, यामध्ये साधू-संत, वारकऱ्यांसाठी निवारा व रात्रीच्या भोजनाची मोफत व्यवस्था करणे, ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवणे त्याकरिता आधुनिक यंत्रसामुग्री व तज्‍ज्ञ डॉक्टरसह फिरते रुग्णालय अल्पदरात सुरू करणे, हिंदू संस्कृती संवर्धनाकरिता प्रयत्नशील राहणे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भयभीत विद्यार्थी; गाफील प्रशासन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पसमध्ये पथदिवे आणि सीसीटीव्ही नसल्यामुळे उपद्रव वाढला आहे. विद्यार्थिनींची छेडछाड, चोरी, वेगात वाहन चालवण्याचे प्रकार घडत आहेत. या मुद्यावर व्यवस्थापन परिषद बैठकीत जोरदार चर्चा झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आठ दिवसांत सीसीटीव्ही लावण्यात येईल असे प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी सांगितले. सौर पथदिव्यांच्या चार लाख रुपयांच्या बॅटरीची चोरी झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे.

विद्यापीठ कॅम्पसमधील वसतीगृहाच्या समस्या कायम आहेत. अत्यंत बकाल अवस्थेतील वसतीगृहात शेकडो विद्यार्थी राहतात. पथदिवे नसल्यामुळे रात्री गैरसोय होते. अभ्यासिकेतून रात्री अकरानंतर परतणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्तासुद्धा दिसत नाही. पथदिवे लावण्याची मागणी करुनही प्रश्न सुटला नाही. दिवसा फोटोसेशनसाठी बाहेरील तरुणांची गर्दी असते. विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात फोटो काढताना हुल्लडबाजी वाढली आहे. भर रस्त्यात वाहने उभी करुन हा गोंधळ सुरू असतो. मागील आठवड्यात एका वेगवान कारने विद्यार्थिनीला धडक दिली. हा प्रकार पाहिल्यानंतर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे मदतीला धावले. सुरक्षारक्षकांना तात्काळ बोलावण्यात आले. किरकोळ दुखापत झालेल्या विद्यार्थिनीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या निमित्ताने विद्यापीठातील सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. बहुतेक पथदिवे बंद असून सीसीटीव्ही नाहीत. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा मुद्दा डॉ. करपे यांनी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्यासमोर मांडला. तसेच व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. बाहेरील विद्यार्थ्यांकडून घडणारे छेडछाडीचे प्रकार, चोरीच्या घटना, अनियंत्रित वाहने रोखण्यासाठी पाऊल उचलण्यात येईल असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले. तसेच आठ दिवसात सीसीटीव्ही लावण्यात येतील असे पांडे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्याचा मोबाइल हिसकावला

विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज वसतीगृहात राहणाऱ्या डिगंबर सोळुंके या विद्यार्थ्याचा मोबाइल बंदुकीचा धाक दाखवून हिसकावण्यात आला. ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता घडली. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. बास्केटबॉल मैदानासमोर संबंधित विद्यार्थी मोबाइलवर बोलत होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या अनोळखी व्यक्तीने विद्यार्थ्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून मोबाईल हिसकावला. या घटनेनंतर वसतीगृहातील विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

चार लाखांची बॅटरी चोरी

विद्यापीठ कॅम्पसमधील १४३ सौर पथदिव्यांपैकी ५३ पथदिव्यांची बॅटरी चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कुलसचिवांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. स्थावर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चोरी झालेल्या पथदिव्यांच्या बॅटरी क्रमांकासह यादी सादर केली आहे. एका बॅटरीची किंमत सात हजार ८१६ रुपये असून एकूण चार लाख १४ हजार २४८ रुपये किमतीच्या बॅटरीची चोरी झाली आहे. सुरक्षेची जबाबदारी असलेल्या संबंधित एजन्सीकडून नुकसान भरपाई वसूल करावी आणि कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. पथदिवे आणि सीसीटीव्ही लावण्याबाबत पाठपुरावा केला आहे. ते कार्यान्वित होईपर्यंत लक्ष देणार आहे.

डॉ. राजेश करपे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘वैखरी’

$
0
0

औरंगाबाद - प्रसिद्ध नृत्यांगना व महागामी संस्थेच्या संचालक पार्वती दत्ता यांच्या कलात्मक प्रवासावर आधारीत वैखरी माहितीपटाची पाँडेचरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. येत्या २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत महोत्सव होणार आहे. चित्रपट निर्माता लुब्धक चटर्जी यांनी चित्रपटात पढंत या विषयाला केंद्रस्थानी ठेवले आहे. पढंत म्हणजे पठण. ही स्मृती सहाय्यक अक्षरांची माला भारतीय नृत्य आणि वादनात सहाय्यक ठरते. चटर्जी यांनी दत्ता यांच्या कलात्मक प्रवासातून 'वैखरी' माहितीपटाची निर्मिती केली आहे. या माहितीपटाचे चित्रीकरण महागामी परिसर आणि वेरुळ लेणी येथे झाले आहे. ओपन फ्रेम फेस्टिव्हल (दिल्ली) आणि वुडपेकर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'वैखरी' दाखवला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकला स्पर्धा आज

$
0
0

औरंगाबाद - खडकेश्वर येथील किडझी स्कूलच्या वतीने गणपती रंगवा चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी बारा ते दोन वाजता स्पर्धा होईल. बालगट, प्राथमिक आणि हायस्कूल अशा तीन गटात स्पर्धा होणार आहे. विद्यार्थ्यांनी साहित्य सोबत आणायचे आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन गिरीश धुंदे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुझ्या गुणांचा नाद रंगतो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गणेशोत्सवाचा उत्साह वाढवण्यासाठी दोन नवीन अल्बम प्रदर्शित झाले आहेत. रवींद्र खोमणे यांचा 'गजानना' आणि पंकज मोरे यांचा 'तुझ्या गुणांचा नाद' रसिकांसाठी पर्वणी ठरले आहेत. मूळ बाज जपत नावीन्यपूर्ण भक्तिगीते देण्याचा यशस्वी प्रयत्न दोघा कलावंतांनी केला आहे.

दरवर्षी गणेशोत्सवात भाविकांसाठी नवीन भक्तिगीते सादर होतात. काही भक्तिगीते रसिकांच्या कायम स्मरणात राहतात. तर काही उत्सवापुरतेच मर्यादित राहतात. तरीसुद्धा नवीन अल्बमची परंपरा खंडीत झाली नाही. औरंगाबाद शहरात प्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे, संगीतकार पंकज मोरे यांचे स्वतंत्र अल्बम दाखल झाले आहेत. रवींद्र यांचा अल्बम रविवारी यू-ट्यूबवर प्रदर्शित झाला. 'गजानना लंबोदरा देवा गजानना' गाणे रवींद्र खोमणे यांनी तन्मयतेने गायले आहे. गीतलेखन श्रद्धा देवचक्के-खोमणे यांनी केले असून संगीत आकाश मिसाळ यांचे आहे. नवीन अल्बमला यू-ट्यूबवर रसिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 'गणेशोत्सवासाठी नवीन गाणी करण्याचा विचार होता. केवळ दहा दिवसांपुरते गाणी नसावे. गाण्याचे महत्त्व सदोदित टिकावे म्हणून विशेष मेहनत घेतली' असे रवींद्र यांनी सांगितले. मालिका, चित्रपटासाठी पार्श्वगायन केलेल्या रवींद्र यांचा अल्बम रसिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. शहरातील गीतकार-संगीतकार पंकज मोरे यांचा नवीन अल्बम 'तुझ्या गुणांचा नाद रंगतो' हा अल्बम सोमवारी प्रदर्शित होणार आहे. हे गीत डॉ. अमोघ जोशी यांनी गायले आहे. या अल्बमच्या निर्मिती प्रक्रियेत रवींद्र मुठे, प्रबोध हिंगणे, रागेश्री हिंगणे, दीपक भावे, संजीवनी भावे आणि नकुल दायमा यांनी सहभाग घेतला. पंकज संगीत क्षेत्रात कार्यरत असून 'विठ्ठल माझा विठ्ठल', 'महादेवा तुझ्या नामाचा', 'मिलोनी तेरी सूरत' हे अल्बम लवकरच येणार आहेत. तसेच पंकज यांनी संगीतबद्ध केलेले तीन मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

'तुझ्या गुणांचा नाद रंगतो' भक्तिगीत सुश्राव्य झाले आहे. गणेशोत्सवाच्या आनंदात भर घालणारे ठरणार असून नवीन पद्धतीने प्रदर्शित करीत आहोत.

- पंकज मोरे, संगीतकार

गीतकार आणि संगीतकाराचा हा पहिलाच प्रयोग आहे. गायनासोबतच संगीत संयोजक म्हणूनही मला काम करता आले. हे गीत रसिकांना निश्चित आवडेल.

- रवींद्र खोमणे, गायक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोरगरीबांच्या घाटीला ‘सीएसआर’चा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय निधीअभावी अनेक कामे तसेच उपक्रम खोळंबलेल्या गोरगरीबांच्या घाटीला वेगवेग‍ळ्या संस्था व कंपन्यांच्या वतीने सीएसआय फंडाचा मोठ्या प्रमाणावर आधार मिळत असून, अगदी अल्पावधीत ५० लाखांपेक्षा जास्त निधीतून घाटीमध्ये विविध उपक्रम मार्गी लागले आहेत. त्याचवेळी आणखी काही उपक्रम लवकरच मार्गी लागण्याचटी चिन्हे आहेत. अर्थात, घाटीमध्ये आणखी काही उपक्रम मार्गी लागणे अपेक्षित आहेत आणि त्यासाठी आणखी काही संस्था-कंपन्या पुढे आल्या तर गोरगरीबांच्या घाटीमध्ये निदान औषधांसारखे महत्त्वाचे प्रश्न तरी काही प्रमाणात सोडवणे शक्य होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

तब्बल १० ते १२ जिल्ह्यातून दररोज काही हजार रुग्ण निदान-उपचारासाठी येणाऱ्या शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) गेल्या वर्षापासून औषधींचा तसेच वैद्यकीय साहित्याचा गंभीर तुटवडा आहेच; शिवाय इतर अनेक उपक्रमही निधीअभावी रखडले आहेत. शासनाच्या तुटपुंज्या निधीमुळे घाटीला भेडसावणारे अनेक प्रश्न एका बाजुला आहेच, पण तरीही 'सीएसआर' फंडातून काही सकारात्मक कामे होत आहेत आणि ही सध्याच्या घडीला दिलासादायक बाब ठरत आहे. मागच्या काही महिन्यांपासून काही मोठ्या संस्था तसेच कंपन्या 'सीएसआर'मधून घाटीमध्ये विविध उपक्रम मार्गी लावण्यासाठी पुढे येत आहेत. त्याचाच भाग म्हणून गोरगरीब रुग्णांची गरज ओळखून 'हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड'मार्फत (एचपीसीएल) 'मेडिसिन बिल्डिंग'मागे महिला-पुरुषांसाठी सुलभ शौच्चालयाची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे २६ लाख खर्चून या ठिकाणी महिलांसाठी दोन बेसिन, तीन स्नानगृह, तर चार स्वच्छतागृह उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील एक स्वतंत्र स्वच्छतागृह अपंग महिलेसाठी आहे. तसेच पुरुषांसाठी पाच मुतारींसह पाच स्वच्छतागृह व पाच स्नानगृह उपलब्ध करण्यात आले आहेत व अपंग पुरुषासाठीही स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. नाममात्र शुल्कात ही सेवा मिळणार आहे व कंत्राटदारामार्फत त्याची देखभाल व स्वच्छताही होणार आहे. 'मालयन' कंपनीनेही रक्तदान उपक्रमांसाठी उपयुक्त ठरणारी १५ लाखांची रुग्णवाहिकाही घाटीला नुकतीच दिली आहे. त्याचबरोबर 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या वतीने तीन लाख रुपये खर्चून घाटी परिसरात सुमारे दीडशे दिशादर्शक फलकेही लवकरच लावली जाणार आहेत. घाटी परिसरात रुग्णांबरोबरच मृतदेहदेखील स्ट्रेचरवर नेण्याची दुर्दैवी वेळ येते, ही बाब लक्षात घेऊनच 'एलआयसी'च्या वतीने ७ लाख रुपये खर्चून बॅटरीवर चालणारी शववाहिनीदेखील घाटीला लवकरच दिली जाणार आहे. त्याशिवाय अपघात विभागाच्या सोयी-सुविधांसह सौंदर्यीकरणासाठीही काही लाखांचा निधी मिलिंद दाभाडे यांच्या वतीने दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

'क्ष-किरण'तर्फे तयार होत आहे बगीचा

घाटी परिसरातील उरोशल्य चिकित्सा आणि हृदयरोग अतिचिकित्सा विभागाच्या (सीव्हीटीएस) समोर छोटा बगीचा तयार केला जात असून, हा बगीचा क्ष-किरण (रेडिओलॉजी) विभागाच्या वतीने तयार केला जात आहे. विशेष म्हणजे या विभागाच्या सर्व डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पैशातून जमा केलेल्या निधीतून हा बगीचा तयार केला जात आहे. या बगिच्यात बाहेरुन मोठे वृक्ष, तर आतून विविध प्रकारची फुलझाडे लावली जात आहेत. डोळ्यांना गारवा देणारा बगीचा लवकरच आकाराला येणार आहे.

'सीएसआर' फंडातून विविध संस्था-कंपन्या पुढे येत आहे, ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. एखाद-दुसऱ्या संस्थेने किचनचा संपूर्ण खर्च प्रायोजित केला तर किचनवरील संपूर्ण खर्च औषधींसाठी वापरला जाऊ शकतो, याचाही संस्था-कंपन्यांनी विचार करुन पुढे यावे, असे वाटते.

- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हैसमाळचे तंबू रिसॉर्ट सुरू होणार

$
0
0

विजय चौधरी, खुलताबाद

म्हैसमाळ येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 'निसर्ग पर्यटनस्थळ विकास योजने'तून उभारलेला आणि तीन-चार वर्षांपासून रखडलेला वातानुकूलित तंबू रिसॉर्ट प्रकल्प सुरू करण्यासाठी आता विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. हा प्रकल्प सुरू करण्याबाबत काय कार्यवाही करता येईल यासाठी वनविभागाने १८ सप्टेंबरपर्यंत याविषयीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश डॉ.भापकर यांनी म्हैसमाळ दौऱ्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची दुरावस्था पाहून विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'मटा'ने तंबू रिसोर्ट सुरू होण्यासाठी शासनाचे लक्ष वेधून सातत्याने प्रकाश टाकला. 'निसर्ग पर्यटनस्थळ विकास योजनें'तर्गत म्हैसमाळ (ता. खुलताबाद) येथे वातानुकूलित तंबू रिसॉर्ट प्रकल्प सुरू करण्यात आला. तत्कालिन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी प्रकल्पाला जिल्हा नियोजन समितीद्वारे एक कोटी १३ लाख रुपये निधी मंजूर केला होता. देश-विदेशातील पर्यटकांसाठी निवासव्यवस्था करून स्थानिकांना रोजगार देणे हा मुख्य उद्देश आहे. म्हैसमाळ वनपरिक्षेत्रात निसर्ग पर्यटनासाठी दोन हजार हेक्टर क्षेत्र असून, संयुक्त वन व्यवस्थापन समितीला प्रकल्पाचा फायदा अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी ७० लाख रुपये निधी खर्च करण्यात आला असून, ११ तंबू उभारले आहेत. प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता असताना 'पीपीपी' (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्त्वावर काम करणारे कंत्राटदार सुनीत आठल्ये आणि वन अधिकाऱ्यात वादाची ठिणगी पडली. मागील दोन-तीन वर्षे हा प्रकल्प वादात आहे.

वन कायद्यानुसार प्रकल्प पर्यावरणपूरक नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आणला गेला; तसेच वातानुकूलित तंबूसाठी वीजपुरवठा नसल्यामुळे काम रखडले होते. वीजपुरवठा सुरू करण्याबाबत तत्कालीन उपवनसंरक्षक अशोक गिऱ्हेपुजे यांनी २४ सप्टेंबर २०१५ रोजी महावितरणला पत्र दिले होते. त्यावेळी मुख्य वनसंरक्षक ए. आर. मंडे यांच्यासह पाहणी करून प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची सूचना केली होती, मात्र त्यानंतर वन विभागाने अचानक त्रुटी दाखवून प्रकल्प बंद पाडण्याच्या हालचाली सुरू केल्याने आश्चर्य वाटते,' असे सुनीत आठल्ये यांनी 'मटा'ला सांगितले. तीन मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्या समितीने नियमानुसार प्रकल्प मंजूर केला आहे. त्यामुळे राज्य शासनाचे धोरण वन विभागाला लागू होत नसल्याचा दावा तथ्यहीन असल्याचे आठल्ये म्हणाले. दुसरीकडे वन कायद्यानुसार प्रकल्प अवैध असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. पर्यटन सचिव वल्सा नायर-सिंग, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्याकडे आठल्ये यांनी दाद मागितली होती. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी १३ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ९५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी ७२ लाख रुपये खर्च झाले असून, प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. विद्युतपुरवठा मिळताच हा प्रकल्प सुरू होण्याच्या तयारीत असतानाच वनविभागाने काम बंद केले आहे. तत्कालीन उपवनसंरक्षक अजित भोसले यांच्या लक्षात ही बाब कशी आली नाही. तब्बल ७२ लाखांचा निधी खर्च होऊन गेल्यावरच कसे लक्षात आले. आमदार प्रशांत बंब व तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार, उपवनसंरक्षक अजित भोसले यांच्या प्रयत्नाने म्हैसमाळ येथे वातानुकूलित तंबू उभारण्यात आले. सद्यस्थितीत म्हैसमाळ येथे सात निवासी तंबू, एक स्वागत कक्ष, दोन प्रशिक्षण कक्ष वापराविना भग्नावस्थेत पडले आहेत.

वातानुकूलित तंबू इकोफ्रेंडलीच आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही अशाचप्रकारे तंबू उभारण्यात आले आहेत. हा उपक्रम वनविभागाचाच असल्याने वनविभागाने हा प्रकल्प सुरू करायला काहीच अडचण नाही.

- सुनीत आठल्ये, हिरण्य रिसॉर्ट

\Bपंखे गायब\B

म्हैसमाळ येथे उभारण्यात आलेल्या तंबू रिसोर्ट योजनेला घरघर लागली असून, उदघाटन होण्याआधीच या तंबूत चोरी झालेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चोरांनी नळाच्या तोट्या, बेड, खुर्ची आदी साहित्याचा मोह धरला नाही. तंबूचे फायबरचे दरवाजे तोडून दोन पंखे चोरीस गेले आहेत. दरम्यान, रिसोर्ट सुरू होण्याआधीच येथील वस्तू गायब कशा झाल्या, हा खरा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images