Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भाजपच्या बहिष्कारावर शिवसेनेचे कुरघोडी

0
0
विकास कामे होत नाहीत, धोरणात्मक निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नाही असे म्हणत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. क्रिकेट स्पर्धेला मदत देण्याचा प्रस्ताव रद्द करीत शिवसेनेने भाजपच्या बहिष्कारावर कुरघोडी केली.

नववर्षाच्या जल्लोषात अनेक जणांचा बेरंग

0
0
मंगळवारी रात्री नववर्षाचे स्वागत करताना केलेल्या जल्लोषामध्ये मद्यपानामुळे अनेकांचा बेरंग झाला आहे. किरकोळ अपघात, मारामारी व अतिमद्यपान केलेल्या ८० नागरिकांनी रात्री हॉस्पीटलमध्ये उपचार घेतले. पोलिसांनी केलेल्या ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहिमेमध्ये ५० मद्यपी वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

जकात नाका-एसबीआय कॉर्नर रस्त्यासाठी आंदोलन इशारा

0
0
सिडको भागातील जकात नाका ते एसबीआय कॉर्नर रस्ता दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी यासाठी आता ‌या भागातील लोकच पुढाकार घेणार असून भीक मांगो आंदोलन करून येणाऱ्या पैशातून रस्त्यावर मरूम टाकला जाईल, अशी माहिती एमआयएमचे अज्जू भाई यांनी दिली.

ग्रीव्हज कॉटनच्या कामगारांना दरमहा भरघोस पगारवाढ

0
0
आयटक प्रणित ग्रीव्हज एम्प्लॉइज अॅण्ड स्टाफ युनियन व ग्रीव्हज कॉटन कंपनी यांच्यात नुकत्याच झालेल्या करारानुसार कामगारांना दरमहा ६,४०० रुपयांची भरघोस पगारवाढ मिळाली आहे. कामगार उपायुक्त मेश्राम यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

मी तक्रार केल्यास राज्यात खळबळ उडेल

0
0
संजय केनेकर यांच्या विरोधात जर मी पोलिसात तक्रार केली, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडेल, असा इशारा खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिला. आमच्या बाजूने हा विषय संपला आहे.

वनक्षेत्रपालास लाच घेताना अटक

0
0
सॉ मिलच्या नूतनीकरणासाठी पंधरा हजाराची लाच घेणाऱ्या खुलताबाद येथील वनक्षेत्रपालास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

सरकारी यंत्रणाच स्वयंरोजगाराच्या मुळावर

0
0
औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या रेडिमेड गारमेंट प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली, मात्र सरकारी यंत्रणेच्या असहकार्यामुळे हा प्रकल्प गेल्या सहा वर्षांपासून रखडला आहे.

खरेदी-विक्रीत ‘कॅश’ला लगाम

0
0
मालमत्तांच्या सरकारी मूल्यात (रेडिरेकनर) सरकारने सरासरी सुमारे ३० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे मालमत्तेचे रेडिरेकनर दर आणि बाजार मूल्य यांच्यातील तफावत कमी झाल्यामुळे व्यवहारात आता रोख रक्कमचे महत्व कमी होणार आहे. त्याचबरोबर रेडीरेकनरच्या प्रभावक्षेत्रातील १२ गावांसाठी स्टँप ड्युटीमध्ये एक टक्का वाढ करण्यात आली आहे.

ठिगळपट्टीचे एक तप

0
0
मदनीचौक मार्गे जाफरगेटला जाणाऱ्या रस्त्यावर एक तपापासून केवळ पॅचवर्कचेच काम केले जात आहे. त्यामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा आपले डोके वर काढतात आणि नागरिकांना त्याचा अतोनात त्रास होऊ लागला आहे. मदनी चौकातील रस्ता पालिकेने डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्याच्या एकाच बाजूवर वारंवार डांबरीकरण करण्यात आले.

दर वाढल्याने रिक्षाचालक हैराण

0
0
विनाअनुदानित गॅस सिलिंडर २२० रूपयाची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा फटका एलपीजी गॅसवर चालणाऱ्या रिक्षा चालकांनाही बसला. शहरात तीन हजार रिक्षा एलपीजी रिक्षा असून अचानक झालेल्या दरवाढीमुळे रिक्षा चालकांना प्रतीलिटरच्या मागे ११ रूपये जास्तीचे मोजावे लागले.

‘इगो’मुळे युतीमध्ये होतेय सुंदोपसुंदी

0
0
राज्य पातळीवर गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीला स्थानिक पातळीवर मात्र ‘इगो’मुळे ग्रहण लागले आहे.

मराठी मुस्लिम साहित्यिकांकडे दुर्लक्ष

0
0
सासवड येथे शुक्रवारपासून ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यातील मुस्लिम मराठी साहित्यिकांना साधी निमंत्रणपत्रिकाही नाही अन् एकाही कार्यक्रमात सामावून घेतलेले नाही. या प्रकारावर नाराजी व्यक्त करीत मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळाने तीव्र निषेध केला आहे.

नाण्यांचा खजिना

0
0
उंदीरगाव.श्रीरामपूर जवळच्या हारेगाव जवळच आमचे गाव. कुस्ती खेळणे मनापासून आवडायचे व त्या निमित्ताने फिरणे व्हायचे. जवळपास ८० साली औरंगाबादला आलो. वॉचमन म्हणूनच कामाला सुरूवात केली. ऐतिहासिक शहरात काम करताना इथे वेगवेगळी नाणी जमवायचा छंद कधी लागला कळलेच नाही.

सुलाखेंचे ते गाणे...

0
0
लता मंगेशकरांचे पटदीप रागातील गाणं रेडिओवर ऐकतांना किंवा टी.व्ही. वर पाहतांना माझ्या डोळ्यांच्या कडा आजही ओलावतात.

‘क्लासिकल व्हॉइस ऑफ इंडिया’त घुमला मानसीचा आवाज

0
0
स्वरांवर कमालीची हुकूमत, रागदारीचा सखोल अभ्यास आणि लहान वयातच घडवलेला आवाज या जोरावर शहरातील मानसी मुकुंद कुलकर्णी या मुलीने देश पातळीवर औरंगाबादचे नाव उज्ज्वल केले आहे.

पिक्चर अभी बाकी है...

अद्रकाला ‘आला’ पाच हजारांचा भाव

0
0
सध्या आल्याला (अद्रक) प्रति क्विंटल ४५०० ते ५००० रुपये भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी अद्रकची काढणी सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून भाव नसला तरी अद्रकचे पीक घेणे सुरू ठेवलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी लाभ होणार आहे.

हमीभाव जाहीर करण्याची कांदा उत्पादकांची मागणी

0
0
कांद्याचे निर्यातमूल्य प्रतिटन आठशे डॉलरवरून दीडशे डॉलरपर्यंत कमी करूनही कांदा दरात कमालीची घट होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने उस, कापूस, सोयाबीन आदी पिकांप्रमाणेच कांद्यालाही हमी भाव घोषित करण्याची मागणी होत आहे.

विकास कसा असतो, ते दाखविणार

0
0
नगरपालिका निवडणूक प्रचाराची राळ चांगलीच उठली असून, काँग्रेस व भाजपने एकमेकांवर हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना डबघाईस आणल्याचा आरोप करून भाजपची पिसे काढली आहेत.

मार्डच्या संपाचा अंशतः परिणाम

0
0
सोलापूरमध्ये निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ‘घाटी’च्या निवासी डॉक्टरांनी गुरुवारी संप पुकारला. या संपाचा गुरुवारी हॉस्पिटलच्या ओपीडीसह इतर शस्त्रक्रियेवर अंशतः परिणाम झाला. मार्ड डॉक्टरांच्या संपाचा परिणाम रुग्णांवर होऊ नये, यासाठी प्राध्यापक डॉक्टर तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images