Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिवा ट्रस्टने कर चुकवल्याचे उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवा ट्रस्टने डोनेशनमधून मिळालेल्या सुमारे १८ कोटींच्या रकमेवरील कर चुकल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. प्राप्तिकर विभागाने शिवा ट्रस्ट आणि महाविद्यालयासह एकूण सात ठिकाणांची तीन दिवसांपासून सुरू केलेली कारवाई गुरुवारी रात्री पूर्ण झाली. तपासात सुमारे ३८ लाखांची बेहिशेबी रोकड सापडल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवा ट्रस्टच्या औरंगाबादमधील सेव्हन हिल्स्, बीड बायपास रोडवरील निपाणी भालगावसह नगर जिल्ह्यातील वडाळा महादेव येथील शैक्षणिक संस्था, कार्यालय अशा विविध ठिकाणी पथकाने ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह प्राचार्यांचा जबाब नोंदविला. संस्थेला विविध प्रकारचे डोनेशन मिळते. त्यापैकी काही डोनेशन करप्राप्त असते. अशाच करप्राप्त डोनेशनच्या माध्यमातून मिळालेल्या सुमारे अठरा कोटींच्या रकमेवर कर अदा केला गेल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. ही रक्कम गेल्या पाच वर्षांच्या कालवधीतील आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच संबंधितांनी कर भरण्याची तयारी दर्शविल्याचेही त्यांनी नमूद केले. प्राप्तिकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त संदीपकुमार साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू असून, त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. या प्रकरणाच्या तपासासाठी किमान दोन महिन्यांचा कालवधी लागेल, असे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रब्बी क्षेत्रात वाढीचे दुष्काळात नियोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाचा खंड, अपुरा पाऊस यामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला असतानाच रब्बी हंगामासाठी लागवड क्षेत्रात वाढीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेते औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या क्षेत्रात ७.११ टक्के क्षेत्रात वाढ होईल, असे नियोजन आहे.

औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या तिन्ही जिल्ह्यातील एकूण लागवड क्षेत्र २३ लाख ६४ हजार हेक्टर असून त्यापैकी रब्बीचे सरासरी पेरणी क्षेत्र सहा लाख ५२ हजार हेक्टर आहे. २०१७-१८ च्या हंगामात प्रत्यक्ष पेरणी सात लाख एक हेक्टरवर झाली आहे. यंदा त्यात वाढ करत सात लाख ७५ हजार पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. पावसाचा मोठा खंड व अपुरा पाऊस यामुळे खरीप पिकांना फटका आहे. या परिस्थितीत रब्बी पिकांवर त्याचा परिणाम होईल अशी भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पैठण रोड येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प केंद्राच्या सभागृहात नुकतीच रब्बी विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्ला समितीची बैठक झाली. त्यातही यावर चिंता व्यक्त केली. प्रत्येकाने आपले उपयुक्तता सिद्ध करून विविध उपाययोजना कशा करता येईल, यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते.

\Bगव्हाच्या क्षेत्रात घट

\B

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत गव्हाचे एकूण सरासरी क्षेत्र एक लाख १० हजार हेक्टर आहे. २०१७-१८ हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त म्हणजे एक लाख ३० हजार हेक्टरवर गव्हाचा पेरणी झाली होता. यंदा एक लाख १७ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित केली आहे. गत हंगामाच्या तुलनेते यात दहा टक्क्यांची घट होईल, असे गृहित धरण्यात आले आहे.

\Bपीकनिहाय पेरणी नियोजन

(क्षेत्र लाख हेक्टर मध्ये)\B

पीक - प्रस्तावित क्षेत्र - गतवर्षीच्या तुलनेत वाढ-घट (टक्के)

रब्बी ज्वारी - ३.३४ - ११.७१

गहू - १.१७ - -१०

हरभरा - २.६३ - ७.७९

करडई - ०.०५ - २५

मका - ०.५५ - १३९.१३

इतर पिके - ०.०१३ - ३०

एकूण - ७.५५ - १०.६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी बिल भरा, मग रोहित्र बदलू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

ऐन पिकांना पाणी देण्याच्या काळात तालुक्यातील अनेक गावात रोहित्र (डीपी) जळाले आहेत. रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी शेतकरी महावितरण कार्यालयात खेट्या घातल आहेत. मात्र, वीज थकबाकी भरा, त्यानंतरच रोहित्र घेऊन जा, असा पावित्रा महावितरणने घेतल्याने पिके वाळण्याची शक्यता आहे.

पावसाने तालुक्याकडे एक महिन्यापासून पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिके पाण्याअभावी सुकत आहेत. विहिरींना पाणी असलेले शेतकरी पिकांना पाणी घालण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. परंतु, तालुक्यातील अनेक गावांत अनेक ठिकाणी रोहित्र जळालेले आहे. ते दुरुस्त करून घेण्यासाठी महावितरण कार्यालयात जाणाऱ्या शेतकऱ्यांना अजब अनुभव येत आहे. गेल्या वर्षी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती; यंदा देखील जेमतेम पाऊस पडला आहे. सध्या खरीप हंगामातील पिकांचा भरवसा राहिलेला नाही, तर रब्बी पिकांचा विचार करणे दूरच. थोडे फार पाणी असलेल्या शेतकऱ्यांकडे महावितरणे थकबाकी भरण्याचा तगादा लावला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत वीजबिल कसे भरावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

तालुक्यातील अनेक गावांत कृषी पंपाचे रोहित्र जळालेले आहे. सध्या पिकांना पाण्याची नितांत आवशकता आहे. मात्र जळालेले रोहित्र बदलून देण्याऐवजी महावितरण थकबाकीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. ही पिळवणुू थांबवावी आणि तत्काळ रोहित्र बदलून द्यावे.

-आबाराव सोनवणे, चेअरमन खरेदी विक्री संघ

ज्या शेतकऱ्यांकडे पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी वीजबिल थकलेली आहे त्या शेतकऱ्यांना तीन हजार रुपये बिल भरायचे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त बिल थकलेले आहे त्या शेतकऱ्यांना किमान पाच हजार रुपये बिल भरणे आवश्यक आहे.

-अरुण गायकवाड उपअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड बाजार समितीला ८१ लाखांचा नफा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

'शेतकरी लुबाडला जावू नये, शेतमालास योग्य तो भाव, विक्रीनंतर लगेच रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्याचे रक्षण करणारी संस्था म्हणजे बाजार समिती आहे. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीला ८१ लाख ४४ हजार ६४ रुपये एवढा नफा झाला आहे,' अशी माहिती बाजार समिती व सभेचे अध्यक्ष रामदास पालोदकर यांनी सभेत दिली.

सिल्लोड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा गुरुवारी घेण्यात आली. या सभेत ते बोलत होते. 'बाजार समिती शेतमाल तारण कर्ज योजना राबवित असून गरजू शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. शासन कोणत्या वेळी कोणत्या मालाला अनुदान देईल हे सांगता येत नाही. त्याकरिता तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा. शेतमालाचा हिशेब व्यापाऱ्यांकडून हिशेब पावतीवरच घ्यावा, जेणे करून अनुदानाची रक्कम मिळणे सोईस्कर होईल,' असे आवाहन पालोदकर यांनी केले.

विषय सूचीचे वाचन बाजार समिती सचिव विश्वास पाटील यांनी केले. या सभेला माजी सभापती काशीनाथ जंजाळ, पुंडलिक लोंखडे, उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक केशवराव तायडे, नरसिंगराव चव्हाण, दामोधर गव्हाणे, सुनीलकूमार पाटणी, अर्जून गाढे, ईश्वर जाधव, हरिदास दिवटे, रघुनाथ मोरे, लिलाबाई मिसाळ, अनुसयाबाई मोरे, भीमराव काळे, संजय गौर, शंकर फुले, सतीश ताठे, ठगनराव भागवत, रामू मिरगे, उत्तमराव जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पीक फॉर इंडिया’ आज ‘देवगिरी’मध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भोवतालच्या विषयांवर व्यक्त होण्याच्या उद्देशाने कॉलेज विद्यार्थ्यांसाठी चपखल व्यासपीठ असलेल्या 'स्पीक फॉर इंडिया'चा औरंगाबाद, जालना व बीड जिल्हा पातळीवरील उपक्रम शुक्रवारी (२८ सप्टेंबर) दुपारी एक वाजता देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम विजेत्याला दीड लाख रुपये रोख बक्षीस व उच्च शिक्षणासाठी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच अंतिम विजेत्या विद्यार्थ्याच्या कॉलेजला २५ हजार रुपये रोख बक्षीस मिळेल, तर उपविजेत्या स्पर्धकास एक लाख रुपये रोख व त्याच्या कॉलेजला २५ हजार रुपये रोख बक्षीस मिळेल. अंतिम फेरीतील प्रत्येक स्पर्धकाला २५ हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार यांनी मोदींना क्लिनचीट दिलीच नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तारिक अन्वर यांचा काही तरी गैरसमज झाला असावा. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना क्लिनचिट दिलेली नाही. ताबडतोब क्लिनचीट देण्याचे काम केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतात, असे सांगत तारिक अन्वर यांची आम्ही समजूत काढू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री, समता परिषदेचे सर्वेसर्वा छगन भुजबळ यांनी दर्शवला.

औरंगाबादमध्ये शुक्रवारी (२८ सप्टेंबर) छगन भुजबळ मुक्कामी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन केली पाहिजे अशी मागणी होते यावरूनच या प्रकरणात शंका निर्माण झाल्याचे स्पष्‍ट होते. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय एकही पान हलत नाही, मग एवढी मोठी विमाने इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडं कुणाच्‍या ऑर्डरने झाली असणार?

तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यावर भुजबळ म्हणाले की, त्यांनी गैरसमजुतीतून राजीनामा दिला आहे असे मला वाटते. आम्ही त्यांची समजूत काढू.

आरक्षणाच्या प्रश्नावर उद्या बोलतो

मोदी आणि शरद पवार या विषयावर बोलल्यानंतर भुजबळ यांना मराठा आरक्षणाबद्दल भूमिका काय, असा प्रश्न विचारला असता,'त्यावर मी उद्या बोलतो,' असे म्हणत त्यांनी चर्चा ‌थांबविली व आरक्षणावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राँगसाईड, ट्रिपलसीट वाहनधारकांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राँगसाइड, ट्रिपलसीट व भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनधारकांवर आता वाहतूक शाखेतर्फे दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गेल्या आठ दिवसांत चार वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल झालेल्या वाहनधारकांना पासपोर्ट सारखी सुविधा घेताना अडचणी येणार आहेत.

शहरातील वाहनधारकांना शिस्त लागावी या हेतूने वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका वाहतूक शाखेने घेतली आहे. यामध्ये दंडात्मक कारवाईसोबतच दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे ठरवण्यात आले आहे. या मोहिमेत राँगसाइड, ट्रिपलसीट तसेच भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गेल्या आठ दिवसांत वाहतूक शाखेने पुंडलिकनगर, वेदांतनगर, उस्मानपुरा व सातारा पोलिस ठाण्यात वाहनधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पुंडलिकनगर व वेदांतनगर पोलिस ठाण्यात भरधाव वेगाने रिक्षा व काळी पिवळी चालवणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल झाले. तसेच सातारा पोलिस ठाण्यात धोकादायक पद्धतीने हातगाडी उभी करणारा संजय बनकर याच्यावर तसेच उस्मानपुरा येथे राँगसाइड जाणारा बुलेटस्वार शेख मुजीब शेख हमीद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bपासपोर्ट मिळवताना येणार अडचण

\B

वाहनधारकांवर गंभीर गुन्हे दाखल झाल्यास त्यांना पासपोर्ट काढताना तसेच इतर सरकारी सुविधा घेण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनधारकानी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने चालवण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाळू वाहतूक; मटका अड्ड्यावर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार हायवा, तसेच कन्नड शहरातील मटका अड्डयावर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी छापा टाकला. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कन्नड येथील पिशोर नाका व मोंढा गेट परिसरात मटका अड्डा सुरू झाल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. त्यावरून येथे एकाच वेळी छापे मारून दहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून रोख ४४ हजार रुपयांसह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला,

अंबड येथून वाळूची चोरटी वाहतूक शहरात करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून गुरुवारी रात्री झाल्टा फाटा येथील अंबिका हॉटेलजवळ सापळा रचला. यावेळी चार हायवाचालकांना पोलिसांनी अटक केली. त्यात समीर सुभान शेख (रा. गोंदी, ता. अंबड), भीमराव मोहन काकडे (रा. निपाणी, ता. औरंगाबाद), आसीम निजाम शेख (रा. पिंपळवाडी, ता. पैठण) व सोहेल सलीम शेख (रा. पैठण) यांचा समावेश आहे. यांच्याविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे एपीआय मनोहर वानखेडे, योगेश खमाट, सुधीर वाघ, अभिजित डहाळे व रोहित पगडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


... आणि ‘जेट’ने चुकवला काळजाचा ठोका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वातावरणात एखादा पट्टा अचानकपणे तयार झाला की तेथे नैसर्गिक वातावरण राहत नाही. त्याचा अनुभव शुक्रवारी मुंबई - औरंगाबाद जेट विमानातील प्रवाशांनी घेतला. दोन वेळा एअर पॉकेट तयार झाल्याने विमान झटक्यात काही फूट खाली आले. सुदैवाने काही दुर्घटना घडली नाही. मात्र प्रवाशांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला.

जेटच्या या विमानातून शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, खासदार प्रीतम मुंडे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, काँग्रेसचे डॉ. जितेंद्र देहाडे आदी प्रवास करत होते. मुंबई औरंगाबाद विमान नियोजित वेळेत मुंबईहून निघाले. साधारणपणे २० मिनिटानंतर पायलटने बाहेर वातावरण खराब असल्याची घोषणा केली आणि काही क्षणातच प्रवशांना झटका जाणवला आणि विमान काही फूट खाली आहे. यामुळे प्रवासी घाबरले आणि आरडाओरड झाली. काहींच्या खुर्च्यासमोरील टेबलवर ठेवलेले अन्न खाली पडले. विमान लगेचच सुरळीत आपल्या कक्षेत पोचले. काही वेळाने पुन्हा एकदा प्रवाशांनी एअर पॉकेटचा अनुभव घेतला. औरंगाबाद विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. विमानात जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे, आमदार संतोष दानवे, कोलिन यांच्यासह प्रवासी होते.

वातावरणातील दोषामुळे शुक्रवारी दुपारी मुंबईहून औरंगाबादला येणारे जेटचे विमान अचानकपणे काही फूट खाली आले. पायलटने पूर्वकल्पना दिली होती. तरीही एखाद्या खड्ड्यातून आपली गाडी गेल्यानंतर जशी जाणीव होते. त्यापेक्षा भयानक अनुभव यामुळे आला.

- डॉ. भागवत कराड, अध्यक्ष वैधानिक विकास मंडळ

कमी वायुदाबाचा पट्टा निर्माण झाला की उडणारे विमान एकाएकी काही फूट आली येते. त्याला एअर पॉकेट म्हणतात. यापूर्वी एका परदेश दौऱ्यात मी याचा अनुभव घेतला होता. अचानकपणे झालेल्या प्रकाराने काही प्रवासी घाबरून गेले होते.

- डॉ. जितेंद्र देहाडे, प्रदेश प्रतिनिधी, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी महिलांचा रास्तारोको; कार्यालयाला कुलूप ठोकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्यासाठी हनुमाननगरच्या महिलांनी शुक्रवारी तब्बल दोन तास रास्तारोको केला, तर सिडको एन सहा येथील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.

हनुमाननगरला पुंडलिकनगरच्या टाकीवरून पाणीपुरवठा केला जातो. दोन्हीही भागात एकाच टप्प्यात पाणीपुरवठा होत असल्यामुळे काही गल्ल्यांना पाणीच येत नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे दोन टप्पे करून पुंडलिकनगरला एका टप्प्यात पाणी पुरवठा करा आणि हनुमाननगरला दुसऱ्या टप्प्यात स्वतंत्रपणे पाणीपुरवठा करा अशी मागणी करत या भागातील महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के. एम. फालक नागरिकांशी चर्चा करण्यासाठी आले. तेव्हा नागरिकांनी त्यांना घेरावो घातला. वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढतो, असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

सिडको एन सहा भागातील दोनशे घरांना पाणीच येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सिडको एन सात येथील पालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयाला कुलूप लावले. नगरसेवक शिवाजी दांडगे नागरिकांबरोबर या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उप अभियंता सरताजसिंग चहेल यांच्याशी संपर्क साधला व आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर चहेल आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आले. या भागात पाइप टाकण्याचे काम लगेचच सुरू केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. चार पाइप टाकले तर सुमारे दोनशे घरांचा पाणीपुरवठा सुरू होणार आहे. शनिवारी सकाळपासून काम सुरू होईल, असे ते म्हणाले. त्यानंतर नागरिकांनी कार्यालयाचे कुलूप काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कष्टकऱ्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशात कष्टकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळत नाही. असंघटित कामगारांची स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. विषमता पराकोटीला गेली. त्यामुळेच कष्टकऱ्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे,' अशी माहिती हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

आढाव म्हणाले, 'हमाल, मापाडी, कष्टकरी, वृद्धांच्या प्रश्‍नाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. माथाडी हमाल इतर श्रमजीवी कष्टकरी, अंगमेहनती कायदा १९६९मध्ये करण्यात आला. या कायद्याला पन्नास वर्ष पूर्ण होत असताना कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. या विरोधात कष्टकऱ्यांचा जाहीरनामा करण्याच्या उद्देशाने राज्यव्यापी दौरा सुरू करण्यात आला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करतानाच सरकारला पर्यायही देण्यात येतील,' असेही आढाव यांनी स्पष्ट केले.

'खासगीकरणाच्या धोरणानंतर देशात प्रचंड विषमता निर्माण झाली. संघटित कामगार कमी होऊन, असंघटित कामगारांची संख्या पन्नास कोटीवर पोहचली आहे. कष्टाचे दाम मिळत नाही. दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग दिला जातो. असंघटित कामगारांची अवस्था तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मारा अशी झाली आहे. कायदा प्रभावीपणे राबवावा ही साधी मागणी सरकार पूर्ण करत नाही. योजना राबवण्याएवेजी योजनांचे नावे बदलून त्या पुन्हा जाहीर केल्या जात आहेत,' असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेत शुकशुकाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वॉलमार्ट व फ्लिपकार्ट या दोन कंपन्याच्या करारास; तसेच शासनाने १०० टक्के थेट परकी गुंतवणुकीला (एफडीआय) दिलेल्या परवानगीच्या विरोधात व्यापारी एकवटलेल्या व्यापाऱ्यांनी शुक्रवार केलेल्या 'बंद'च्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. हा बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा जिल्हा व्यापारी महासंघाने केला आहे. गुलमंडी, सिटीचौक, सिडकोसह शहर व परिसरातील बाजारपेठेत यामुळे शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक विचार न केल्यास आंदोलनाची धार अधिक तीक्ष्ण केली जाईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) देशव्यापी बंदच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा व्यापारी महासंघ व त्यांच्याशी संलग्न ७२ संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. शहागंज येथील गांधी पुतळ्यास सकाळी अभिवादन केल्यानंतर व्यापारी 'बंद'चे आवाहन करण्यासाठी निघाले. महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, 'कॅट'चे राज्य प्रतिनिधी अजय शाह, महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष सरदार हरिसिंग आनंद भारुका, कचरू वेळंजकर, गुलाम हक्कानी, विजय जैस्वाल, दिपक पहाडे, जयंत देवळाणकर, राकेश सोनी, प्रवीण पाटील यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनी सिटी चौक, गुलमंडी, पैठण गेट यासह अन्य भागात फेरी काढत दुकाने, आस्थापना बंद करण्याचे आवाहन केले. बंदनिमित्ताने बहुतेक दुकाने आधीच बंद होती, पण जे काही तुरळक प्रमाणात सुरू होती. त्या व्यापाऱ्यांनीही महासंघाच्या प्रतिनिधींना प्रतिसाद देत दुकाने बंद करून आंदोलनात सहभागी झाले. सराफा बाजार, चेलीपुरा, सिडको, टीव्ही सेंटर चौक, गजानन महाराज मंदिर, निराला बाजार आदी शहराच्या विविध भागांतही व्यापाऱ्यांनी वाहनफेरी काढून 'बंद'चे आवाहन करत होते आणि त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.

\Bजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

\B'बंद'ला शहर व जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याचे लक्षात येताच दुपारी तीन वाजता व्यापारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. 'वॉलमार्ट गो बॅक', 'देश व्यापारी करे पुकार, रद्द करो ये करार' आदी घोषणाबाजी करत व्यापाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आले. मागण्यांबाबत सकारात्मक विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह ज्ञानेश्वर खर्डे, दीपक पहाडे, सुभाष दरक, तनसुख झांबड, राजेंद्र मुंडलिक, सोपान मुंडलिक, सुधाकर टाक यांच्यासह व्यापारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

\Bव्यापाऱ्यांच्या मागण्या\B

- वॉलमार्ट व फ्लिपकार्च करार रद्द करा

- ऑनलाइन व किरकोळ व्यापारातील विदेशी गुंतवणूक त्वरित रद्द करा

- जीएसटीचे दोन स्तर करण्यात यावेत आणि दंडाची रक्कम दहा हजारांपेक्षा जास्त असू नये; तसेच तुरंगवासाच्या शिक्षेची तरतूद त्वरित रद्द करा

- व्यापाऱ्यांना व्यापारासाठी कमी व्याज दरावर कर्ज उपलब्ध व्हावे

- कलम ४११,४१२ अंतर्गत सराफा व्यापाऱ्यांना अटक करणारा जाचक कायदा त्वरित रद्द करा

- डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट बँकींगला लागणारे अतिरिक्त शुल्क माफ करा

- किरकोळ व्यापारासाठी एक स्वतंत्र राष्ट्रीय व्यापारी धोरण जाहीर करण्यात यावे.

- औषधांची ऑनलाइन विक्री तात्काळ बंद करा.

बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न असल्याने त्यास आज रस्त्यावर उतरावे लागले. सरकारने मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. व्यापार क्षेत्रावर देशातील कोट्यावधी लोकांचे कुटुंब चालते, याचा विचार करावा. मात्र, तसे न झाल्यास आंदोलन टप्प्या टप्प्याने अधिक तीव्र होत जाईल.

जगन्नाथ काळे, अध्यक्ष जिल्हा व्यापारी महासंघ

बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात देशपातळीवर जनजागृती यात्रा ही काढण्यात आलेली आहे. विविध राज्यातून निघालेली ही यात्रा ११ ऑक्टोबरला शहरात दाखल होत आहे. तोपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करुच. यासह १६ डिसेंबरला दिल्लीत व्यापाऱ्यांचे विशाल अधिवेशनात पुढील रुपरेषा ठरविले जाईल.

- अजय शाह, राज्य प्रतिनिधी, कॅट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्व वैमनस्यातून वाळूज येथे भरदुपारी खून

$
0
0

वाळूज महानगर: वाळूज येथे एका ३८ वर्षीय व्यक्तिचा पूर्व वैमनस्यातून शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास खून झाला. रामा जगताप काळे (रा़ भारतनगर, वाळूज), असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा पूर्व वैमनस्यातून प्रदीप संभाजी काळे (रा़ शिवराई, ता़ गंगापूर) याने चाकुचे वार करून खून केला. रामा हा दुपारी घरात टीव्ही पाहत असताना प्रदीप याने चाकूहल्ला केला. ओरडण्याचा आवाज आल्याने बाजुलाच असलेली रामाच्या पत्नीने येऊन बघितले असता रामाच्या नरड्यावर तसेच छातीवर चाकूचे वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला़ यावेळी त्यांची मुलगी दुकानातून सामान घेवून येताना तिला प्रदीप हा पळून जाताना दिसला. या घटनेची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली असून संशयित आरोपी प्रदीप स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला आहे़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध विक्रेत्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन औषध विक्री व ई पोर्टलसंदर्भात सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेच्या विरोधात औरंगाबाद केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या 'बंद'ला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील तीन हजार ३००पैकी केवळ १८० मेडिकल स्टोअर्स सुरू होते. अन्न व औषध प्रशासन विभागानेही त्यास दुजोरा दिला. दरम्यान, रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापन केले होते.

औषधी भवन येथून सकाळी अकरा वाजता वाहनफेरी काढण्यात आली. पैठण गेट, गुलमंडी, नौबत दरवाजमार्गे ही फेरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. तेथे जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर शहागंज, सिटी चौक,मार्गे औषध विक्रेते औरंगपुरा येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयावर धडकले. असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर, उपाध्यक्ष शैलेद्र रावत, सचिव दिलीप ठोळे-जैन, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष शेखर गाडे यांनी मागण्यांचे निवेदन 'एफडीए'चे सह आयुक्त संजय काळे यांना दिले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा ही त्यांनी दिला. कपील टिबडीवाला, वल्लभ भंडारी, किरण जोशी, रितेश छाजेड, प्रविण अग्रवाल यांच्यासह अन्य औषध विक्रेते यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद भगतसिंह जयंती साजरी

$
0
0

वाळूज महानगर : शहीद भगतसिंह हायस्कूल, शहीद भगतसिंह प्राथमिक शाळा, शहीद भगतसिंह इंग्लिश स्कूल आणि शहीद भगतसिंह प्राथमिक शाळा सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी शहीद भगतसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी साडे आठ वाजता दीड हजार विद्यार्थ्यांची बजाजनगर परिसरातून फेरी व सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर शाळेतील मैदानात कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष उद्धव भवलकर होते. यावेळी माजी खासदार उत्तमसिह पवार, आमदार संजय सिरसाठ, यूबी ग्रुपचे स्वरुपचंद बॅनर्जी, बप्पा दळवी, सचिन गरड, सुनील काळे, श्रीकृष्ण भोळे, राम पाटोळे, आदिक पाटील, गौतम शिंदे, नितीन देशमुख, अनामिका गोरे, मनीषा मानकापे याची प्रमुख उपस्थिती होती. मिरवणुकीत शहीद भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळी परिस्थितीवर प्रशासकीय खल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपूर्ण पावसाळा जवळपास कोरडाच गेल्याने मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोन मोठ्या खंडामुळे खरिपातून काय मिळणार, असा प्रश्न बळीराजासमोर आहे. विभागातील लहान मोठे प्रकल्पही तळाला जात असून यासह इतर विषयांवर विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत विभागतील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (२८ सप्टेंबर) चर्चा केली. या बैठकीत दुष्काळावरील उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

मोसमात अत्यल्प पडलेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागले होते. हमखास परतीच्या पावसाचा प्रदेश असलेल्या मराठवाड्यात यंदा मात्र पावसाने हुलकावणी दिली. यामुळे टंचाईचे मळभ आहे. आतापर्यंत विभागात वार्षिक सरासरीच्या तुलेनेत ६४ टक्के पाऊस पडला असला, तरी बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, परभणी, लातूर या सहा जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे. हिंगोली आणि नांदेडमध्ये पावसाने गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे स्थिती तुलनेत चांगली आहे. यंदा सर्वाधिक चिंता औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि पैठण या तीन तालुक्यांमध्ये आहे. या तालुक्यांमध्ये टंचाई आराखड्यानंतरही टँकर थांबलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्याची वाटचाल दुष्काळाकडे होत असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही विरोधी पक्षांकडून होत आहे. याच अनुषंघाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली. ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. बैठकीत विभागातील पीक परिस्थिती, पाऊस, पाणी-चाराटंचाई, उपलब्ध पाणी, आगामी पावसाळा डोळ्यासमोर ठेवून होणारी वृक्षलागवड, महसूल वसूली आदी विविध विषयावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमदाटीनंतरही ६५ पैकी फक्त पाच फाइल मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी पुरवठ्याच्या प्रलंबित फायली निकाली काढण्यासाठी उपमहापौरांनी उपअभियंत्याला दमदाटी केल्याच्या घटनेचा कोणताही परिणाम पालिका प्रशासनावर झालेला नाही. ६५ प्रलंबित फायलींपैकी फक्त पाच फाइल निविदा काढण्यासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत.

वॉर्डांमध्ये जलवाहिनी टाकण्याच्या फाइल पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून निकाली काढण्यात येत नाहीत या कारणावरून उपमहापौर विजय औताडे यांनी सर्वसाधारण सभेच्या सभागृहातील अँटीचेंबरमध्ये उपअभियंता सरताजसिंग चहेल यांना दमदाटी केली होती. सुमारे ६५ फाइल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. वारंवार सूचना करूनही त्या निकाली काढण्यात येत नाहीत, असा आरोप उपमहापौरांनी केला होता. चहल यांना केलेल्या दमदाटीनंतर प्रलंबित फायली निकाली निघतील, असे मानले जात होते. मार्त, महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६५ फाइल प्रलंबित होत्या. त्यापैकी पाच फाइल प्रशासनाने मंजूर केल्या आहेत. बारा फाइल एजन्सी फिस्किंगसाठी आयुक्तांकडे पाठवल्या, तर बावीस फाइल फेरनिविदेसाठी देण्यात आल्या आहेत. तर तीन फाइल तांत्रिक छाननीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविल्या आहेत. मंजूर पाच कामांची वर्कऑर्डर अद्याप दिलेली नाही, असे महापौरांनी सांगितले. यावरून उपमहापौरांच्या दमदाटीनंतरही फाइल निकाली निघण्याचा वेग फारच कमी असल्याचे दिसते. आवश्यक त्या सर्व बाबी तपासून प्रशासन मंजुरीचा निर्णय घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन बांधकाम परवानगी येत्या महिन्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑक्टोबरच्या मध्यापासून नागरिकांना महापालिकेकडून ऑनलाइन बांधकाम परवानगी मिळणार आहे. यासाठी सध्या नगररचना विभागातील अभियंत्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. बांधकाम परवानगी ऑनलाइन मिळण्यास सुरुवात झाल्यास नागरिकांचा त्रास कमी होईल, असे मानले जात आहे.

नागरिकांशी निगडित कामे ऑनलाइन करावीत याबद्दल शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना आदेश दिले आहेत. या पद्धतीने काम करणे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला बंधनकारक आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण देण्यासाठी शासन नियुक्त संस्थेचे प्रतिनिधी शुक्रवारी पालिकेत दाखल झाले. त्यांनी काही अभियंत्यांना प्रशिक्षण दिले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन बांधकाम परवानगीचे काम दोन ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार होते, पण नगररचना विभागात फक्त दोनच संगणक आहेत. आणखी चार ते पाच संगणकांची मागणी करण्यात आली आहे. ऑनलाइन परवानगीसाठी शासनाने सॉफ्टवेअर तयार केले असून ते अद्याप प्राप्त झाले नाही. याची पूर्तता झाल्यानंतर व अभियंत्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ऑक्टोबरच्या मध्यापासून बांधकाम परवानगी ऑनलाइन देणे सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकल्पना मारली जाणे प्रगतीसाठी घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एखादी संकल्पना दुर्लक्ष केल्यामुळे वाया गेली, तर पुढच्या अनुषंगिक हजारो आयडिया मारल्या जातात. आयडिया मारली जाणे हे प्रगतीच्या दृष्टीने घातक आहे,' असे मत बजाज अॅटो समुहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष कैलास झांजरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित इनोव्हेशन लेन प्रदर्शनाचे उद्घाटन झांजरी यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम, विनोदराय इंजिनिअरिंगचे सुनील रायठठ्ठा, सीएमआयचे उपाध्यक्ष कमलेश धूत, जेएनईसीचे प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, अक्षय जाधव यांची विशेष उपस्थिती होती. प्रदर्शनाच्या आयोजनासाठी धूत ट्रान्समिशनचे राहुल धूत यांनी सहकार्य केले. कैलास झांजरी म्हणाले, 'एक छोटीशी आयडिया लक्षावधींच्या व्यवसायाला कारणीभूत ठरते. त्यामुळे अभिनव आयडियांचे नेहमीच स्वागत केले पाहिजे. नाविण्यपूर्ण कल्पना नेहमीच प्रगतिशील असतात. नाविण्यपूर्ण कल्पना रातोरात घडून येत नाहीत. त्यासाठी ज्ञानाचे अधिष्ठान लागते. अशा कल्पनांमधून कौशल्य जन्म घेते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा कल्पनांच्या संवर्धनाकडे लक्ष दिले पाहिजे,' असे आवाहन झांजरी यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे यांनी केले. अंकुशराव कदम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी टेड एक्स जेएनईसी या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. इनोव्हेशन लेन प्रदर्शनात वीस निवडक संकल्पनांना स्थान देण्यात आले आहे. हे प्रदर्शन दोन दिवस चालणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र सूर्यवंशी यांनी केले, तर आभार अक्षय जाधव यांनी मानले. यावेळी एमजीएमचे विश्वस्त प्रताप बोराडे, उपप्राचार्य डॉ. विजय मुसांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

\Bअभियंत्यांच्या योगदानाची गरज

\Bसुनील रायठठ्ठा म्हणाले, 'नाविण्यपूर्ण कल्पना केवळ उत्पादनांमध्येच नव्हे, तर आपल्या दैनंदिन व्यवहारात देखील आणल्या जाऊ शकतात.' कमलेश धूत म्हणाले, 'डीएमआयसीमुळे आपल्या विभागात औद्योगिक गतीशिलता उदयाला येत आहे. उद्योगांच्या वाढीसाठी नवनवीन संकल्पनांची गरज भासू लागली आहे. त्यासाठी अभियंत्यांच्या योगदानाची गरज आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीनशे कोटींची उलाढाल थांबली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन व किरकोळ व्यापारातील विदेशी गुंतवणूक त्वरित रद्द करण्यासह अन्य मागण्यांसाठी व्यापाऱ्यांच्या बंदमुळे शुक्रवारी शहरातील प्रमुख बाजारपेठामध्ये शुकशुकाट जाणवत होता. या बंदमुळे तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांची उलाढाल थाबल्याची माहिती व्यापारी क्षेत्रातील अभ्यासकांनी दिली.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) देशव्यापी बंदची हाक दिल्यानंतर व्यापारी महासंघ व त्यांच्या संलग्न ७२ संघटना गेल्या महिनाभरापासून बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत होते. ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन, जनजागृती फेरी काढून पदाधिकाऱ्यांनी बंद मागील भूमिका विशद करत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या प्रयत्नांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे 'बंद'दरम्यान दिसून आल्याचे महासंघाने नमूद केले.

इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी वस्तू विक्रेते, भांडी मार्केट व्यापारी, कपडा मार्केट व्यापारी हार्डवेअर, प्लायवूड, खाद्यतेल विक्रेते, प्लास्टिक विक्रेत यांसह विविध क्षेत्रातील व्यापारी, विक्रेते बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेत. त्यामुळे ग्राहकांची वर्दळ असलेली रंगार गल्ली, सराफा बाजार, शहागंज, चेलीपुरा, निराला बाजार, सिटी चौक, टिळकपथ यासह प्रमुख बाजारपेठेतील दुकाने, प्रतिष्ठाने बंद होती. परिणामी, बाजारपेठेतील सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांवर उलाढाल थांबली, अशी माहिती व्यापार क्षेत्रातील सूत्रांनी दिली. दरम्यान,जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवारात सकाळी भाजीपाला मार्केट वगळता उर्वरित धान्य मार्केट, किराणा व शॉपिंग सेंटर परिसरात दिवसभर शुकशुकाट होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images