Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

माळेगावला यंदा जातपंचायत नाही

0
0
राज्यामध्ये नुकत्याच लागू झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या पार्श्वभूमीवर, यंदा माळेगावमध्ये जातपंचायत होणार नाही. या यात्रेत जात पंचायत बसणार नसल्याचे जातपंचायत प्रमुख पंच दुर्गा चव्हाण यांनी सांगितले असून, हा निर्णय समाज परिवर्तनाची नांदी समजली जात आहे.

कैद्यांना फरार करणारा ‘पीआय’ निलंबित

0
0
पॅरोलवर असणाऱ्या कैद्यांना पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आणि त्यांची शेतजमीन कवडीमोल भावाने विकत असल्याचा आरोप असलेल्या देविदास ढोले या पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

आवळेंची लातूरमधून माघार

0
0
स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्याकरीता, आगामी लोकसभा निवडणूक लातूर मतदारसंघातून न लढविण्याचा निर्णय खासदार जयवंतराव आवळे यांनी घेतला आहे. त्यांनी बुधवारी या निर्णयाची घोषणा केली.

मागास क्षेत्रासाठी २७ कोटींचा निधी

0
0
मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत २०१३-१४ या वर्षात औरंगाबाद जिल्ह्यासाठी पहिला हप्त्याचा २७ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना हा निधी वर्ग करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चौधरी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे यांनी पंचायत समित्यांना दिले आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीने ‘रिपाइं’ गटांना पोसले

0
0
‘रिपाइं गट स्थानिक आमदार, खासदारांच्या बूथ कमिट्या झाला असून, ते या गटांना पाच वर्षे पोसतात व निवडणुकीत मतदान करवून घेतात,’ अशी टीका बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी केली आहे.

ग्रामीण पोलींसांच्या हद्दीत महिला अत्याचारांत वाढ

0
0
ग्रामीण पोलिस अधीक्षक हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच महिलावरील अत्याचारांच्या घटनांमध्येही २०१२ च्या तलुनेते २०१३ साली वाढ झाली आहे. नोव्हेंबर अखेर बलात्काराच्या ३३ घटनांची नोंद झाली असून विनयभंगाच्या १४१ गुन्हे ग्रामीण हद्दीत घडले आहे.

कामगार कलाकारांनी गाजवला रंगमंच

0
0
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६१ व्या कामगार नाट्य महोत्सवाची औरंगाबाद केंद्रावरील प्राथमिक फेरी सुरू आहे. कामगारांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी स्पर्धा ही आहे. विशेष म्हणजे शहर परिसरातील औद्योगिक वसाहतीतील कामगार नाटक पाहण्यासाठी उपस्थित असतात.

‘आयआयए’ औरंगाबादला ‘बेस्ट ऑफ रन-अप’ पुरस्कार

0
0
‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीने औरंगाबाद सेंटरचा २०१३ च्या ‘बेस्ट ऑफ रनरअप’ पुरस्काराने गौरविले आहे. चेन्नई येथे २७ डिसेंबर २०१३ रोजी झालेल्या आयआयए नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये औरंगाबाद सेंटरचा गौरव करण्यात आला.

हर्षनगर भागात जीप पेटविली

0
0
हर्षनगर भागात अज्ञात माथेफीरूने जीप जाळल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेत दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षनगर भागातील संजय लिंबाजी मगरे हे बुधवारी रात्री अकरा वाजता अंबाजोगाई येथून परत आले होते.

पाससाठी विद्यार्थ्यांना आता सिडकोचा फेरा

0
0
एसटी महामंडळाने सिटी बसची संख्या करून शहरवासीयांना रिक्षाच्या खार्चिक प्रवासाकडे ढकलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातच दर महिन्याला पास घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी शहरातील तीन ठिकाणी असलेले पास केंद्र बंद करण्याचा घाट एसटी विभागाने घातला आहे.

‘जाऊ नकोस वेगाने, जाशील चिरडून चाकाने’

0
0
‘जाऊ नकोस तू वेगाने जाशील, चिरडून चाकाने’ या व अशा अनेक जनजागृती करणाऱ्या घोष वाक्यांनी क्रांती चौक ते पोलिस आयुक्तालय मार्ग दणाणून गेला होता. वाह‌तूक सुरक्षा पंधरवड्यानिमित्त या रॅलीचे आयोजन बुधवारी सकाळी करण्यात आले. यामध्ये अनेक शालेय विध्यार्थ्यांचा सहभाग होता.

माहितीपटाद्वारे कॉलेजात जागर

0
0
रस्त्यांवर अपघात का होतात? या अपघातामुळे होणारे नुकसान किंवा हे अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचा कसा उपयोग होतो, याची माहिती देणारे माहितीपट आरटीओ विभागाकडून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना देण्यात येणार आहे.

सहायक पोलिस निरीक्षकास सहा हजाराची लाच घेताना अटक

0
0
चोरीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी न घेण्यासाठी आरोपीकडून सहा हजाराची लाच सिल्लोड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षकाला अटक करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत ‌प्रतिबंधक विभागाने सिल्लोड पोलिस ठाण्यात ही कारवाई केली.

पाच हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक गजाआड

0
0
जप्त केलेल्या ट्रकमधील सामान देण्यासाठी पाच हजाराची लाच घेत असलेल्या सोयगाव पोलिस ठाण्याच्या पीएसआयला गुरुवारी सायंकाळी फर्दापूर येथे रंगेहाथ पकडण्यात आले. जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

साहित्य संमेलनात सरकटे यांचे गायन

0
0
सासवड येथील ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शुक्रवार, तीन जानेवारी रोजी शहरातील प्रसिद्ध गायक प्रा. राजेश सरकटे यांचे गायन होणार आहे.

खैरेसाहेब, आपली जबाबदारी ओळखा

0
0
शिर्डीचा रस्ता खराब असल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री मुनियप्पा यांना उशीर झाला. डीएमआयसी परिसरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला विनंती करावी अशी बोचरी टीका खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाषणात केली. तर सगळा दोष राज्य सरकारला न देता आपली जबाबदारी ओळखून काम करावे लागणार आहे.

राडाप्रकरणी समेटाच्या हालचाली

0
0
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत खासदार चंद्रकांत खैरे व पालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय केनेकर यांच्यात झालेल्या राडाप्रकरणी समेट घडवून आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुवारी (दोन जानेवारी) यासंदर्भात खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती, पण ही बैठक पुढे ढकलण्यात आली.

महसूल कर्मचाऱ्यांना नव्या वर्षाची भेट

0
0
महसूल कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदारपदी प्रमोशन देण्याच्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नाशिक, अमरावती आणि नागपूर विभागात हा बदल लागू करण्यात आला असून, उर्वरित तीन विभागातील प्रमोशनचे प्रमाण येत्या एक जुलै २०१४ पासून वाढविण्यात येणार आहे.

ठेकेदाराने फिरवली पाठ, रस्त्याची लागली वाट

0
0
ठेकेदाराने पाठ फिरवल्यामुळे गांधीपुतळा ते किराणाचावडी या रस्त्याची पुरती दुर्दशा झाली आहे. वर्षभरापूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण होणे अपेक्षित असताना अद्याप डांबरीकरण करण्यात आलेले नाही, त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत.

पारधी कुटुंबाची वडीगोद्रीमधून हद्दपारी!

0
0
अंबड (जि. जालना) तालुक्यातील वडीगोर्दी येथील पारधी समाजाच्या दोन कुटुंबांना गावातून हद्दपार करावे, असा ठराव गुरुवारी (दोन जानेवारी) ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. दरम्यान, कोणालाही गावातून हद्दपार करण्याचा अधिकार ग्रामसभेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images