Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घाटीला औषधींसाठी मिळाले ५.५७ कोटी

$
0
0

औरंगाबाद : घाटीच्या औषधी, वैद्यकीय साहित्य व उपकरणांच्या वार्षिक देखभालीसाठी पावसाळी अधिवेशनात मागणी करण्यात आलेल्या ३१ कोटी ४४ लाखांच्या निधीपैकी ५ कोटी ५७ लाखांचा निधी घाटीच्या खात्यावर (बीडीएस) जमा झाला आहे. त्यामुळे निदान काही प्रमाणात औषधी व साहित्याचा प्रश्न मिटू शकतो आणि बंद पडलेले व्हेंटिलेटर व सिटी स्कॅन यासारखी महत्त्वाची उपकरणे सुरू होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकशाही रक्षणासाठी गांधी विचारांची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जागतिक पातळीवर आणि देशभरात साम्राज्यवादी, वर्चस्ववादी शक्तींनी धुमाकूळ घातला असून समाजजीवन कधी नव्हे एवढे अस्थिर झाले आहे. त्यामुळे लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी महात्मा गांधी यांचे कार्य पुढे नेण्याची गरज कधी नव्हे एवढी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन समाजवादी जनपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांनी केले.

समर्थनगर येथील महात्मा गांधी भवन येथे पक्षातर्फे आयोजित गांधी अभिवादन सभेत ते बोलत हते. यावेळी मंचावर के. ई. हरिदास, गांधी भवनचे व्यवस्थापक प्रा. गोरडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अॅड. ढोबळे म्हणाले की, जाती-धर्मातील एकोपा, सामंजस्य कमी होत असून हिंसा व असहिष्णुता माजवणाऱ्या शक्तींना राजाश्रय लाभल्याने या शक्ती मुजोर बनल्या आहेत. जनतेचे जीवनमान अधिक कष्टप्रद बनवणाऱ्या भाजप-सेनेसारख्या शक्तींना पराभूत करण्यासाठी प्राप्त परिस्थितीत महाराष्ट्रातील जाणत्या नेतृत्वाने राजकीय आव्हानाचे भान ठेऊन विचार विनिमय करण्याची गरज आहे. अन्यथा साम्राज्यवाद विरोधी लढा, गांधी विचार आणि न्याय व समतेच्या समाजनिर्मितीची भाषा अर्थहीन व भविष्य अंधकारमय ठरेल, असे भाष्य त्यांनी केले. बाबुराव सोनवणे यांनी सूत्रसंचलन केले, तर प्रा. गोरडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारताची जागतिक ओळख गांधींमुळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जगामध्ये भारताची ओळख महात्मा गांधी यांचे नाव घेऊनच सांगावी लागते. त्यामुळे आज सत्तेत असलेल्या गांधी विरोधकांनाही त्यांचे नाव घेणे अपरिहार्य आहे,' असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा समन्वयक डॉ. उमाकांत राठोड यांनी केले.

महात्मा गांधी स्मारक निधीतर्फे समर्थनगर येथील गांधी भवनमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर प्रा. उल्हास उढाण, गांधी भवनचे व्यवस्थापक डॉ. एम. एस. गोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. राठोड यांचे 'गांधीजी आणि शास्त्रीजी' या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. राठोड यांनी या दोन महापुरुषांच्या कार्याचा व्याख्यानातून सविस्तर परिचय करून दिला. महात्मा गांधी यांचा खून करूनही त्यांचा विचार संपवता आला नाही. त्यांच्या विरोधी विचारसरणीचे राज्यकर्ते परदेशात जातात, तेव्हा त्यांना गांधींचेच नाव घ्यावे लागते. गांधी विचार सर्वव्यापी आहे. लालबहादूर शास्री हे गांधींचे शिष्य. अत्यंत नाजूक प्रकृतीचा हा सालस माणूस भारताचा पंतप्रधान झाला. ते मरण पावले तेव्हा त्यांच्या खात्यावर एकही रुपया नव्हता. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नावावरील वाहनकर्ज फेडले. अशी साधी माणसे राजकारणातून दुरापास्त झाली आहेत, अशी खंत डॉ. राठोड यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका रेखा जैस्वाल, विवेक जैस्वाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूच्या धाकाने रक्कम लुबाडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दारूड्याने मित्राच्या मदतीने मारहाण करत तरुणाचे बावीसशे रुपये लुबाडले. सोमवारी दुपारी दोन वाजता पिसादेवी रोडवर भक्तीनगर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश गवणाजी म्हस्के (वय ३८, रा. भक्तीनगर) याने याप्रकरणी तक्रार दाखल केली. म्हस्के याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी दुपारी संशयित आरोपी किशोर कसारे (वय ३०, रा. मिसारवाडी) याने व त्याच्या दोन साथीदारांनी म्हस्के यांना अडवले. आरोपींनी त्याला दारू पाजण्याची मागणी केली. म्हस्के याने नकार दिल्यानंतर त्याला चापट, बुक्क्याने मारहाण केली. चाकूचा धाक दाखवत खिशातील बावीसशे रुपये काढून घेतले. यापैकी एका आरोपीने दगडाने म्हस्के यांना मारहाण केली. याप्रकरणी म्हस्केच्या तक्रारीवरून तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय भारत पाचोळे तपास करीत आहेत.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुजराती’च्या ५१ व्या वक्तृत्व स्पर्धेत ९२ विद्यार्थ्यांचा सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरातील खाराकुँआ परिसरातील श्री गुजराती विद्यामंदिर शाळेच्या वतीने सलग ५१ व्या वर्षी सोमवारी व मंगळवारी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत ६८ शहरी, तर २४ ग्रामीण अशा ९२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

दोन दिवस चाललेल्या स्पर्धेसाठी स्वातंत्र्यसैनिक डॉ. नवनीतभाई श्रॉफ यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे व राज्य सहआयुक्त हेमलाल आसाराम बाखरे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिकांचे वितरण झाले. यानिमित्त स्वगुणांची ओळख करून घेत सहकार्याने ध्येय गाठा, असे आवाहन घुगे यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच सातत्य, ध्येय निश्चिती व परिश्रमाने यशाचा मार्ग सहज होईल, असे मत बाखरे यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापक एस. एम. शाह यांनी प्रास्ताविकात स्पर्धेच्या वैशिष्ट्यपूर्ण व गौरवशाली परंपरेची माहिती दिली. दुसऱ्या सत्रात कोषाध्यक्ष ललितमोहन पारीख, मंजुळाबेन गढिया, दिव्यलता गुजराती, रवींद्र वाळणीकर यांची उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षण वैशाली रामटेके, आकाशवाणी केंद्राच्या उद्घोषिका वैजयंती नांदगागवकर व संघमित्रा गावंडे यांनी केले. श्रीमती सुलताने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शहरी स्पर्धेत रेणुका धुमाळ व तेजस्विनी यादव यांनी फिरती ढाल पटकाविली. तसेच प्रतीक प्रवीण पांडव, रेणुका विनोद धुमाळ, आदित्य अशोक देशमुख, खुशी राजेश निंबेकर यांनी प्रथम ते उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविली. ग्रामीण स्पर्धेत साक्षी विठ्ठलराव शिंदे, पर्णिका शरद देवरे, तेजस वसंत नेहाले व कोमल ठोंबरे यांनी पारितोषिके पटकाविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे नागरिक मित्र पथक कार्यान्वित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेची नऊ नागरिक मित्र पथके गांधी जयंतीच्या दिनी मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आली. एका पथकामध्ये नऊ माजी सैनिकांचा समावेश असणार आहे. नऊ झोनमध्ये ८१ माजी सैनिक या पथकांच्या माध्यमातून काम करणार आहेत.

रस्त्यांवर, दुभाजकांवर, मोकळ्या जागेवर कचरा टाकणे, हॉटेल्स-खानावळीतील अन्न नाल्यांमध्ये फेकणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी व नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही पथके स्थापन करण्यात आली आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी हिरवी झेंडी दाखवून नऊ पथके कार्यान्वित केली. यावेळी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. झोन कार्यालयांच्या क्षेत्रात ही पथके फिरणार आहेत व लोकांमध्ये जागृती निर्माण करणार आहेत. पथकाच्या सोबत व्हिडिओ चित्रीकरणासाठी कॅमेरामन असणार आहे. पथकाने केलेल्या कारवाईचे चित्रीकरण केले जाणार असून फोटो देखील काढण्यात येणार आहेत. नऊ पथकांवर वर्षभरात २ कोटी २१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांनी ज्ञान, अनुभवाचा लाभ समाजासाठी करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्येष्ठ नागरिक हे तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध व वयोवृद्ध आहेत. त्यांच्या ज्ञानाचा तसेच अनुभवाचा उपयोग हा समाजाला होईल, असे कार्य ज्येष्ठांनी करावे. तसेच सकारात्मक विचार करून उर्वरित आयुष्य आनंदात घालवावे, असे आवाहन अमरावती येथील शासकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अविनाश देशपांडे हे होते. कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांचे 'चला जगू या ऐसे जीवन' या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाल्या, वृक्ष पूर्ण वाढल्यावर फुले-फळांनी बहरतो आणि त्यामुळेच त्याच्या फांद्या वाकतात, नम्र होतात. त्याचप्रमाणे ज्येष्ठांनीही अनुभवाच्या संचिताने विनम्र होऊन समाज कार्य करावे. जे काय करायचे राहून गेले त्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करून घ्याव्यात. साहित्य वाचन, कला, संगीत यात मन रिझवावे आणि समृद्ध जीवन जगावे. परिस्थितीवर मात करून आणि दैवाला दोष न देता उर्वरित आयुष्य आनंदात घालवावे. आरोग्याची काळजी घ्यावी. मरणाची भीती न बाळगता मन स्थिर व आनंदी ठेवावे. वाणी सात्विक व दुसऱ्याला न दुखावणारी असावी, असेही आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले.

प्रारंभी संस्थेच्या वतीने सूर्यकांत जोग, गंगाधरराव देशपांडे, कुसुम कल्याणीकर या अतिज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अविनाश देशपांडे, तर सूत्रसंचालन सचिव अनिल चौधरी यांनी केले. शशिकांत शास्त्री यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रकाश कुलकर्णी, बाबासाहेब देशपांडे, अशोक भालगावकर, स्मिता गानू, कलावती उबाळे आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परतीचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा असताना उन्हाच्या तडाख्याने औरंगाबादकर हैराण झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, सप्टेंबर महिन्यातच 'ऑक्टोबर हिट'चे चटके शहरवासीयांना सोसावे लागले. सप्टेंबरमध्ये तिशीच्या पार असलेले कमाल तापमान दोन ऑक्टोबर रोजी ३४.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते.

शहरात मंगळवारीही (गोन सप्टेंबर) उन्हाचा तडाखा जाणवला. दिवसभरात शहरात उन्हाळ्याप्रमाणेच कडक ऊन पडले होते. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार गायब झालेला पावसाचा येत्या काही दिवसात बरसण्याची शक्यता असली तरी अद्याप पावसाचे वातावरण निर्माण न झाल्याने उन्हाचे तीव्र चटके बसणे सुरूच आहे. सप्टेंबर महिन्यात औरंगाबाद शहराचे तापमान ३० अंश असते, मात्र यंदा हे तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. सप्टेंबर अखेर तर कमाल तापमानाने ३५ अंश सेल्सिअसही पार केले होते. गेल्या दोन आठवड्याभरापासून शहरामध्ये दररोज उन्हाचे चटके जाणवत असून, प्रचंड उकाड्यामुळे शहरवासीय घामाघूम होत आहेत. मंगळवारीही शहराची अशीच अवस्था होती. वाढत्या वर्दळीचे रस्तेही ओस पडले होते. रस्त्यावर असलेले वाहनधारक चेहरा झाकून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होते, तर पादचाऱ्यांनी छत्र्यांचा आधार घेतला.

\Bयेणारा आठवडाही 'ताप'दायक

\Bसप्टेंबरपासूनच सुरू झालेली 'ऑक्टोबर हिट' येणाऱ्या आठवड्यात आणखी तीव्र होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन ते आठ ऑक्टोबरदरम्यान शहराच्या तापमानात आणखी वाढ होऊन, कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. याशिवाय सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत किमान तापमानामध्येही दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून, येणाऱ्या आठवड्यामध्ये किमान तापमान २२ अंश राहण्याचा अंदाज आहे.

\Bअसे होते तापमान\B

दिनांक................ कमाल तापमान

१ ऑक्टोबर.............३४.८

३० सप्टेंबर..............३५.०

२९ सप्टेंबर..............३४.४

२८ सप्टेंबर.............३४.४

२७ सप्टेंबर.............३०.४

२६ सप्टेंबर.............३३.७

२५ सप्टेंबर.............३३.६

(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यावर खोदून केला बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर चारी खोदून रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद केल्याचा प्रकार सातारा शिवारातील गट क्रमांक ५७ येथे ३१ जुलै ते एक ऑक्टोबरच्या दरम्यान घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सय्यद जमशीद सय्यद अजमेर (रा. शरीफ कॉलनी) या पालिकाच्या निरीक्षकांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा शिवारात महाराष्ट्र्र राज्य वखार महामंडळाच्या लगत २४ मीटरचा रस्ता आहे. पालिकेच्या मंजूर आराखड्यामध्ये हा रस्ता असून तो पालिकेला हस्तांतरीत देखील करण्यात आला. हा रस्ता अज्ञात व्यक्तीने खोदून रस्त्याच्या तीन ठिकाणी चारी तयार केल्या आहेत. या कारणामुळे या रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे. या प्रकरणी सय्यद जमशीद यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार बऱ्हाटे तपास करीत आहेत.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाचे आमिष दाखवून १५ हजारांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फायनान्स कंपनीचा बनावट ई-मेल आयडी तयार करत तरुणाला कर्जाचे आमिष दाखवत १५ हजारांची फसवणूक करण्यात आली. जुलै ते सप्टेंबर २०१८ या काळात गारखेडा भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंदन किशोर पाटील (वय ३३, रा. सोमवारपेठ, नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. पाटील यांच्या बँकेचे उज्जीवन फायनान्स प्रा. ली. डॉट कॉम नावाने आरोपींनी बनावट ई-मेल आयडी तयार केला. या मेलद्वारे त्यांनी अस्तिवात नसलेले कर्ज योजना तयार केल्या. यानंतर बँकेचे खाते व आयएफसी कोड तयार करून त्यांनी बँकेच्या ग्राहकांना कर्जाचे आमिष दाखवले. यासाठी पाटील यांच्याकडून 'जीएसटी'चे दहा हजार रुपये व कामाचे पाच हजार रुपये असे पंधरा हजार रुपये घेतले. यानंतर पाटील यांनी पाठपुरावा केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राजेश व अनुष्का शर्मा (पूर्ण नाव व पत्ते माहित नाहीत) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक इंगळे याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन आरोपींचा गुंगारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हायवा चालक बाळू उर्फ नितीन घुगेच्या निर्घृण खुनाला बारा दिवस उलटले. यातील आरोपी निष्पन्न होऊनही पोलिसांना एकाच आरोपीला पकडण्यात यश आले, तर उर्वरित तीन आरोपी गुंगारा देण्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळे हा तपास थंडावल्याचे दिसून येत आहे.

कचऱ्याच्या हायवावरील चालक बाळू उर्फ नितीन घुगे याचा २० सप्टेंबर रोजी बेदम मारहाणीत मृत्यू झाला आहे. फॅन चोरल्याचा ठपका ठेवत त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी नील काकासाहेब पाटील व साथीदारांनी मारहाण केली होती. यामध्ये उपचारादरम्यान बाळूचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आरोपी नील पाटील, मनोज डव्हारे-पाटील, शुभम पाटील व दत्ता भांगे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अगदी सहज हाती आलेल्या मनोज पाटील याला त्याच दिवशी अटक केली. प्रमुख आरोपी नील पाटीलसह इतर तिघे मात्र पसार झाले आहेत.

\Bबायपास, जालन्यात तळ

\Bगुन्हा घडल्यानंतर आरोपी नील पाटील बीड बायपासवरील एका हॉटेलमध्ये थांबून पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. त्यानंतर जालना शहरात देखील तो थांबला असल्याची चर्चा आहे. गुन्हा दाखल होऊन तब्बल बारा दिवस उलटले आहेत. पोलिसांना आरोपींची नावे निष्पन्न झाली आहे. त्यांच्या शोधासाठी मात्र कोणतेही ठोस प्रयत्न सिडको पोलिस ठाणे किंवा गुन्हे शाखेकडून होताना दिसून येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचे आज खैरे यांच्या हस्ते भुमिपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या परिसरात बांधावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राच्ये भूमीपूजन बुधवारी (३ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता शिवसेनेचे नेते, खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते होणार आहे. लेबर कॉलनी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदकुमार घोडेले राहणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, खासदार राजकुमार धूत, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेवरच बहिष्काराचा प्राचार्यांचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मानधन वाढ, परीक्षेच्या पद्धतीत दुरुस्त्या केल्या नाहीत, तर आगामी मार्च महिन्यातील परीक्षेवर आम्ही बहिष्कार टाकू, असा इशारा प्राचार्य आणि प्रतिनिधींनी विद्यापीठ प्रशासनाला दिला. येत्या १५ ऑक्टोबरपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पदवी परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून, यासाठी सलग्न महाविद्यालातील प्राचार्यांची बैठक बुधवारी (तीन सप्टेंबर) बोलावण्यात आली होती. याबैठकीत प्राचार्य आणि त्यांच्या प्रतिनिधींनी विद्यापीठ प्रशासनाचे वाभाडे काढले.

विद्यापीठाने सलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या बोलावलेल्या बैठकीला प्राचार्य किंवा त्यांच्या प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. संजय सोळुंके, डॉ. संजिवनी मुळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. हरिदास विधाते, डॉ. दिगंबर नेटके यांची उपस्थिती होती. या बैठकीत डॉ. तेजनकर यांनी परीक्षेच्या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन करत महाविद्यालयांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले.

प्राचार्यांनी प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे वाभाडे काढले. प्रतिविद्यार्थी देण्यात येणारा तीन रुपये देण्यात येणारा निधी तोकडा असल्याचे सांगत यामध्ये झेरॉक्स, शाई, स्टेपलर आदींचा खर्च जास्त आहे. हा खर्च प्राध्यापक, प्राचार्यांना खिशातून द्यावा लागतो, तासिका तत्वावरचे प्राध्यापक, पूर्णवेळ प्राध्यापकांना परीक्षेला केलेल्या कामाचा मोबदला मिळत नाही, हा खर्च विद्यापीठाने द्यावा, असे सांगत परीक्षा शुल्काच्या माध्यमातून किती कोटी रुपये जमा होतात, त्या तुलनेत विद्यापीठ परीक्षेसाठी किती खर्च करते याची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी काही प्राचार्यांनी प्रती विद्यार्थी पैसे वाढविण्याची आग्रही मागणी केली, तर काहींनी महाविद्यालयाची क्षमता आणि परीक्षेसाठी देण्यात येत असलेल्या विद्यार्थीसंख्येवरही आक्षेप घेतला. प्रशासन केवळ समित्या स्थापन करते. निर्णय काही घेत नाही. आता निर्णय घेतला नाही, तर परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी काही प्राचार्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिनी घाटी’कडून घाटीला १४ प्रकारची औषधे प्राप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औषधांपासून उपकरणांपर्यंत वेगवेगळ्या समस्यांवर सोमवारी (१ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी तसेच तीन आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात 'मिनी घाटी'ने घाटी रुग्णालयाला विविध प्रकारची १४ औषधे तसेच वैद्यकीय साहित्य सुपूर्द केले. त्याचवेळी गरजेनुसार आणखी औषधी देण्याची तयारीदेखील दर्शविली आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या 'सिटी स्कॅन मृतप्राय; घाटी खड्ड्यात' या वृत्ताची दखल घेत खंडपीठाने स्वतःहून याचिका दखल करून घेतली. याच प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी 'घाटीला घरघर' ही मालिकाही 'मटा'नेही २६ सप्टेंबरपासून प्रसिद्ध केली. याची दखल घेत आमदार जलील यांनी शुक्रवारी (२८ सप्टेंबर) घाटीच्या अधिष्ठातांची भेट घेत जिल्हाधिकाऱ्यांना घाटीतील स्थितीची जाणीव करून दिली होती. त्यानंतर आमदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे व आमदार संजय शिरसाठ यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक झाली. या बैठकीत घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी, घाटीतील बहुतांश औषधी साठा संपल्याची, तर ३४ व्हेंटिलेटर व दोन्ही सिटी स्कॅन नादुरुस्त असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध औषधी व महापालिकेच्या आरोग्य विभागातील एआरव्ही इंजेक्शन घाटीला देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार, जिल्हा सामान्य रुग्णालयातून घाटीला १४ विविध प्रकारची औषधी सुपूर्द करण्यात आली. यामध्ये सलाईनच्या बाटल्यांसह वेदनाशामक औषधे, प्रतिजैविके, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे. पुढच्या आठ दिवसांत आणखी औषधी उपलब्ध झाल्यानंतर गरजेनुसार घाटीला औषधी देता येईल. तसेच स्वाइन फ्लू वॉर्डासाठी आणखी पाच व्हेंटिलेटर देऊ शकतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी 'मटा'ला सांगितले.

घाटीत होणार व्हीआरडीएल लॅब

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अॅण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) सुरू होण्याचा मार्ग मोकळ‍ा झाला आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी हा निर्णय झाला. या प्रयोगशाळेत स्वाइन फ्लू, डेंगी आदी साथरोगांचे निदान होऊ शकेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील सिटी स्कॅन मशीन झाले सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीत गेल्या कित्येक दिवसांपासून बंद पडलेल्या दोन्ही सिटी स्कॅन मशीनपैकी एका सिक्स स्लाइस सिटी स्कॅन मशीनची दुरुस्ती करण्यात आली आहे. हे उपकरण बुधवारी रुग्णसेवेत दाखल झाले. या मशीनच्या ट्यूबची वॉरंटी संपली असल्याने अत्यावश्यक रुग्णांचीच तपासणी या उपकरणावर होणार असून, तज्ज्ञांनी सल्ला दिल्यानंतरच ही तपासणी होणार आहे; तसेच बंद पडलेल्या सिक्स्टीफोर स्लाइस मशीनऐवजी नवीन मशीन लवकरच उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुंडलिकनगरमधून सिडकोला पाणी द्यायला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुंडलिकनगर जलकुंभावरून सिडको एन ३, एन ४ भागाला पाणी दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा गजानननगर वॉर्डाचे शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी महापौर व आयुक्तांना पत्र दिले असून जलकुंभावरून पाणी देणे थांबवा अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्याचे आश्वासन महापौरांनी दिले आहे.

महापौर व आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आत्माराम पवार यांनी म्हटले आहे की, पुंडलिकनगर जलकुंभावरून सिडको एन ३, एन ४ भागाला पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासन नागरिकांचा विरोध डावलून काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यू हनुमाननगर, पुंडलिकनगर, बाळकृष्णनगर, गुरूदत्तनगर या भागातील सर्व नागरिक जलकुंभावरून पाणी न देण्यासाठी आंदोलन करीत आहेत. असे असताना देखील प्रशासन जलकुंभापासून सिडको भागात जलवाहिनी टाकण्याचे काम करीत आहे, त्याचे गंभीर परिणाम होतील. या संदर्भात आपल्यास्तरावर निर्णय घेण्यात यावा. महापौर नंदकुमार घोडेले यांनी पवार यांना शुक्रवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान या प्रकरणात बोलताना भाजपचे गटनेते प्रमोद राठोड म्हणाले, पाणी द्यायचे की नाही, पाणी द्यायचे असेल, तर कोणत्या जलकुंभावरून द्यायचे हे नगरसेवक ठरवू शकत नाही. प्रशासनच या संदर्भात निर्णय घेऊ शकते. कारण तांत्रिक जाण प्रशासनातील अधिकाऱ्यांना आहे. सिडको एन ३, एन ४ भागाला पाणी द्या अशी आमची भूमिका आहे. येथूनच पाणी द्या असा आमचा आग्रह नाही. पाणी मिळाले पाहीजे असे आमचे म्हणणे आहे, त्यावर आम्ही ठाम आहोत, असा उल्लेख राठोड यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी महाराज लॉन्समध्ये पालिकेचे कार्यालय सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हडको, एन ११ येथील छत्रपती संभाजी महाराज लॉन्स (कै. पुंडलिकराव ताठे मंगल कार्यालय) येथे मंगल कार्यालय बंद करून महापालिकेचे वॉर्ड कार्यालय सुरू करावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विभाग संघटक संगीता बोरसे व अन्य कार्यकर्त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले आहे. मंगल कार्यालयात लग्न लावली जातात. यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्याचा त्रास आजुबाजुच्या नागरिकांना होतो. फटाक्यांची आतषबाजी, वाजंत्री यामुळे शांतता भंग पावते, विद्यार्थ्यी अभ्यास करू शकत नाहीत. त्यामुळे या ठिकाणीचे मंगल कार्यालय बंद करून पालिकेचे कार्यालय सुरू करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर बोरसे यांच्यासह वंदना इधाटे, संपदा जोशी, लता गवळे, अनिता सदभावे, प्रज्ञा निळ, नम्रता घायाळ आदींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विम्याचे पैसे देण्याचे आदेश, चोलामंडलम कंपनीला दणका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

हृदयविकाराच्या उपचारासाठी झालेल्या खर्चाचे दोन लाख ३२ हजार ५३७ रुपये १० टक्के व्याजासह एक महिन्यात तक्रारदारास देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य किरण आर. ठोले आणि संध्या बारलिंगे यांनी चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत. तसेच तक्रारीचा खर्च आणि मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये तक्रारदारास द्यावेत असेही आदेश देण्यात आले आहेत.

तक्रारदारांनी प्रतिवादी विमा कंपनीकडून तीन लाखांची ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. १३ डिसेंबर २०१७ रोजी सुधीर देशपांडे यांना अस्वस्थतेसोबत छातीत वेदना होत असल्यामुळे दवाखान्यात नेले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अ‍ॅन्जीओप्लास्टी करून 'स्टेन्ट' टाकण्यात आला. त्याचा एकूण खर्च दोन लाख ३२ हजार ५३७ रुपये झाला. देशपांडे यांनी विमा कंपनीकडे त्या रकमेचा दावा दाखल केला असता तक्रारदार हे विमा पॉलिसी घेण्यापूर्वीपासूनच उच्च रक्तदाबाने आजारी होते. त्यांनी ही बाब पॉलिसी घेताना लपविली. त्यांनी पॉलिसीच्या शर्तींचा भंग केल्याचे कारण दर्शवीत विमा कंपनीने तक्रारदाराचा दावा नामंज़ूर केला. तक्रारदार देशपांडे हे दोन वर्षांपासून उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते, असा कोणताही अधिकृत पुरावा विमा कंपनीने सादर केला नाही. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यायोग्य नसल्याचही मंचाने आदेशात म्हटले आहे. सबळ कारणाशिवाय तक्रारदाराचा दावा नाकारणे ही प्रतिवादींची सेवेतील त्रुटी असल्याचा निष्कर्ष काढत मंचाने तक्रारदारास न्याय दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार करून महिलेला विकण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिलेला लॉजवर नेऊन बलात्कार केल्यानंतर तिचे फोटो काढून तिला पाच लाख रुपयांमध्ये विकण्याचा प्रयत्न केला. पीडितेने स्वत:ची सुटका करून घेत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ओळखीच्या महिलेसोबत तिच्या सांगण्यावरून पीडित महिला २८ सप्टेंबर २०१८ रोजी कामासाठी गेली होती. या महिलेने पीडितेला गणेश बालाजी आर्दड (रा. जालना) याच्या ताब्यात दिले. आर्दडने त्या महिलेला तिच्या लहान मुलासह लॉजवर नेले. या मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. पीडितेचा मोबाइलवरून फोटो काढला. तो दुसऱ्या व्यक्तीला पाठविला. समोरच्या व्यक्तीकडे मुलगी दिसायला सुंदर आहे. तिचे पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. पीडित महिला एक ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी सातपर्यंत या लोकांसोबत होती. महिलेने त्यांच्या ताब्यातून स्वत:ची सुटका केली व दोन ऑक्टोबर रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. पीडितेच्या फिर्यादीवरून गणेश बालाजी आर्दडविरुद्ध जालना व महिला आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यामुळे पक्षी धडकल्याची चौकशी करू : महापौर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विमानाला पक्षी धडकल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यामुळे विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले. विमानतळाबाहेर रस्त्यालगत कचरा साचलेला असतो. त्यामुळे पक्षी येतात आणि विमानाची सुरक्षा धोक्यात येते, असा आरोप होत आहे. याबद्दल महापौर नंदकुमार घोडेले यांना विचारले असता ते म्हणाले, 'कचरा असतो तेथे पक्षी येत नाहीत, असा अनुभव आहे. विशिष्ट प्रकारचे पक्षीच कचऱ्यावर बसतात. त्यात गिधाड वगैरे मोठ्या पक्ष्यांचा समावेश असतो. या उपरही कचऱ्यामुळे पक्षी तेथे येतात आणि त्यामुळे विमानांना धोका निर्माण होतो, असे संबंधित यंत्रणेचे म्हणणे असेल, तर त्याची चौकशी केली जाईल. या प्रकाराची जबाबदारी महापालिका स्वीकारते. विमानाला पक्षी धडकण्याची घटना कचऱ्यामुळे झाली असेल तर त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, दोषींवर कारवाई केली जाईल.'

विमानाला 'पक्षा'घात...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images