Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कर्णपुरा यात्रेच्या टेंडर प्रक्रियेमुळे असंतोष

0
0

औरंगाबाद: कर्णपुरा यात्रेच्या शुक्रवारी (५ ऑक्टोबर) पार पडलेल्या टेंडर प्रक्रियेत क्षुल्लक कारणामुळे अपात्र ठरवण्यात आल्यामुळे असंतोषाचे वातावरण आहे. एकूण आठ संस्था-व्यक्तींनी निविदा भरल्या होत्या. मात्र दोन वर्षांचा आणि विशेषतः दसऱ्याच्या यात्रेचा अनुभव नसल्याचे कारण देत पाच व्यक्ती तसेच संस्थांना छावणी परिषदेने अपात्र ठरवले, तर तिघांपैकी उदयसिंग राजपूर यांची निविदा मान्य करण्यात आली. वस्तुतः ६२ लाखांची सर्वांत जास्त निविदा नाकारत ३६ लाख ११ हजार १११ रुपयांची निविदा मान्य करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अपात्र ठरवण्यात आलेल्या पाच संस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाकडे हे काम देण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याविरुद्ध अपात्र संस्था कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचेही समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वॉर्ड अधिकाऱ्याला लिपिकाची शिवीगाळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कामावर उशीरा आल्यामुळे वॉर्ड अधिकाऱ्याने गैरहजेरी टाकली. त्याचा राग आल्यामुळे लिपिकाने वॉर्ड अधिकाऱ्यावर खुर्ची उगारून शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी वॉर्ड - क कार्यालयात घडली. या घटनेचा सर्वच वॉर्ड अधिकाऱ्यांनी निषेध केला आहे व संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संतोष सुरे हे महापालिकेच्या वॉर्ड - क कार्यालयात लिपीक म्हणून काम करतात. शुक्रवारी ते निर्धारित वेळेपेक्षा उशारा आले. त्यामुळे वॉर्ड अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी सुरे यांची गैरहजेरी लावली. याची माहिती सुरे यांना कार्यालयात आल्यावर कळाली. त्यामुळे ते संतापले. त्यांनी कुलकर्णी यांच्या दिशेने धाव घेत त्यांच्या अंगावर खुर्ची उगारली आणि शिवीगाळ देखील केली. यामुळे कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनेची माहिती पालिकेच्या मुख्यालयासह सर्व वॉर्ड कार्यालयात पसरली. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलकर्णी यांनी सुरेंच्या विरोधात आयुक्तांकडे तक्रार दाखल केली नाही, असे असले तरी शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा कारवाई करण्याची मागणी वॉर्ड अधिकाऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्ण योजना तत्काळ पूर्ण करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विभागात शासनाच्या वतीने सुरू असलेली विविध योजनांची अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी शुक्रवारी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मराठवाड्यात सुरू असलेले विविध प्रकल्प व विकास योजना याबाबतची आढावा बैठक महसूल प्रशिक्षण प्रबोधनी येथे गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुवठा विभाग, पोलिस खात्याच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. विकासकामांचा आढावा घेताना गोयल म्हणाले, विभागात अपूर्ण असलेल्या योजना तत्काळ पूर्ण कराव्यात. शासनाने दिलेला निधी विविध विकासकामासाठी खर्च करून ती कामे तत्काळ पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यांनी पुढाकार घ्यावा. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गंत घरकुलाची कामे पूर्ण करून लाभार्थ्यांना घरकुले तत्काळ उपलब्ध करून द्यावी. ज्या जिल्ह्यांकडे विविध कामासाठी निधी नाही, त्यांनी निधीची मागणी करावी. त्यांना त्वरित निधी देण्यात येईल.' डॉ. भापकर म्हणाले, 'अत्यल्प पावसामुळे विभागातील पिकांची‌ स्थिती बाबतची माहिती शासनाला द्यावी. उपलब्ध पाणीसाठ्याचा नियोजनपूर्वक वापर करून पाणीसाठा राखीव ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत निवडलेल्या गावांची सद्यस्थिती आणि झालेली कामे तसेच दिलेले उद्दिष्ट यांची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.'

\Bकायदा, सुव्यवस्था राखा

\Bगोयल म्हणाले, 'नवरात्रोत्सव तसेच येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने पोलिस तसेच प्रशासकीय यंत्रनेने अधिक सजग राहावे. विभागातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चांगला जनसंपर्क निर्माण करावा. आगामी काळात साजरी होणारी तुळजापूर देवी यात्रा तसेच इतर सण हे शांततेने साजरे व्हावे. यासाठी पोलिस यंत्रणेने सुरक्षेचा आढावा घेऊन जनजागृती करावी.'

\B

पाणीपुरवठ्याच्या २३३७ योजना अपूर्ण

\Bनवीन योजनांच्या प्रस्तावाऐवजी अपूर्ण कामे पूर्ण करण्याची शासनाची प्राथमिकता असून, त्या दृष्टिने प्रशासन कामाला लागले आहे. या बैठकीमध्ये अपूर्ण योजनांबाबतही चर्चा करण्यात आली. मराठवाड्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये पाणीपुरवठ्याच्या तब्बल २३३७ योजना अपूर्ण आहेत. निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे अधिकारी खासगीत सांगत असले तरी योजना मात्र जैसे थे आहेत. मराठवाड्यात सध्या काम सुरू असलेल्या १४६ योजना अपूर्ण आहेत. कार्यान्वित झालेल्या मात्र व्यवहार्य नसलेल्या ६४१ योजना असून इतर दीड हजार योजना अपूर्ण आहेत. यातील बहुतांश योजना या जिल्हा परिषद अंतर्गत आहेत. गेल्या एक ते पाच वर्षांच्या कालावधीपासून या योजना अपूर्ण असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आरोग्य तपासणी

0
0

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) मानसोपचार विभागाच्या वतीने मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त घाटी रुग्णालयात मानसिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात ७० ते ८० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णांना औषधोपचार करण्यात आला व नातेवाईकांचे आरोग्य शिक्षण व समुपदेशन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरासाठी डॉ. संजय घुगे व वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर दाम्पत्याला चौदा लाखांचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेडिकल दुकानाच्या व्यवहारात फार्मासिस्टने डॉक्टर दाम्पत्याची चौदा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार जानेवारी २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या काळात गारखेडा भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध कोर्टाच्या आदेशाने गुरुवारी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीमधील फिर्यादी महिलेचे पती डॉ. नंदकुमार नीळ व फार्मासिस्ट असलेला संशयित आरोपी स्वप्नील पंडित बुटले (वय ३०, रा. देवरवाडी, अरणी चिखली, जि. यवतमाळ) याच्यासोबत २०१५मध्ये मैत्री झाली होती. या मैत्रीतून दोघांनी औषधी होलसेल व रिटेल विक्री करण्याचे ठरवले. गारखेडा, उल्कानगरी भागात त्यांनी अष्टविनायक मेडिकल नावाने दुकान टाकले. जानेवारी २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत डॉ. नीळ यांनी बुटले याला रोख व बँकेमार्फत वेळोवेळी चौदा लाखांची रक्कम दिली. या रकमेचा कोणताही हिशेब बुटले याने दिला नाही. डॉ. नीळ यांनी पाठपुरावा केला असता बुटले याने उडवाउडवीची उत्तरे देत आत्महत्येची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने डॉ. नीळ यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार संशयित आरोपी स्वप्नील बुटले याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमादार बडगुजर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी जाणीव जागृती कार्यशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बालवयातच मुलांवर संस्कार व्हावेत व विद्यार्थी व शिक्षकाचे नाते अधिक चांगले व्हावे यासाठी सात ऑक्टोबर रोजी शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लिंगभाव जाणीव जागृती व महिला बाल अत्याचार विरोधी कायदे कार्यशाळेचे विषय आहेत. क्लोव्हरडेल हायस्कूल (सिडको, एन-सहा) येथे सकाळी दहा ते दुपारी पाच कार्यशाळा घेण्यात येईल, अशी माहिती डॉ. यशस्विनी तुपकरी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

राज्य महिला आयोग व पुष्कराज शिक्षण परसारक मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किशोरवयीन व तरुण, पालक यांच्याविषयी काम करणारी संवाद सेतू प्रतिष्ठान ही संस्था रिसोर्स ऑर्गनायझेशन म्हणून कार्यशाळेत सहभागी झाली आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. विभागीय आयुक्त पुरषोत्तम भापकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. बी. बी.चव्हाण व शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी (महापालिका) उपस्थित असतील. पत्रपरिषदेला पुष्कराजच्या अध्यक्ष साधना सुरडकर, संवाद सेतूच्या अध्यक्ष डॉ. यशस्विनी तुपकरी, सचिव मनिषा कोकीळ, माधुरी धोंड, डॉ. सुनिता डोईबळे, सत्यप्रभा अष्टपुत्रे, कल्पना देशपांडे उपस्थित होत्या.

डॉ. तुपकरी पुढे म्हणाल्या, 'संवाद सेतूने आजवर विविध शाळांतील १३ हजार मुला-मुलींशी विविध उपक्रम, शिबिरे, स्कीट या माध्यमातून संवाद साधला. किशोरवयीन मुला-मुलींसाठी संवाद सेतूने व्यासपीठ निर्माण केले व मुलांची वृत्ती आणि वर्तनात सकारात्मक परिणाम झाला. यातूनच शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आजच्या अस्वस्थ समाजव्यवस्थेत सोशल मीडिया, न्युक्लिअर कुटुंबव्यवस्था, माहितीचा प्रचंड वेग आवरणे कठीण जाते. अशावेळी बालवयातच मुलांवर संस्कार व्हावे व समुपदेशनातून पर्याय पुढे यावे म्हणून शाळांना सहभागी करून घेणे आवश्यक होते.'

शालेय जीवनापासून स्त्रीचा आदर, पौगंडावस्थेतील संभ्रम दूर करणे,स्त्री सुरक्षा,महिला व बाल अत्याचार विरोधी कायदे, मुलांचा भावनांचा व बुद्ध्यांक वाढवून संवाद कौशल्ये विकसित करणे कार्यशाळेचा उद्देश आहे. अशा नाजूक विषयांवर शिक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असेही डॉ. तुपकरी म्हणाल्या. कार्यशाळेत डॉ. स्वाती शिरडकर, सुनिता पिंप्रीकर, डॉ. यशस्विनी तुपकरी मार्गदर्शन करतील. संबंधित शाळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरीसह पथनाट्यातून रक्तदानाचे जनजागरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) विभागीय रक्तपेढीच्या वतीने रक्तदान पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी (पाच ऑक्टोबर) शहरातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीसह सादर करण्यात आलेल्या पथनाट्यातून रक्तदानाविषयी जनजागरण करण्यात आले. यानिमित्त देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी लक्ष वेधले.

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळ‍ीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू, विभागीय रक्तपेढीप्रमुख डॉ. सुरेश गवई, मंगेश गायकवाड आदींच्या उपस्थितीत फेरीला प्रारंभ झाला. या फेरीत शासकीय रक्तपेढी, औरंगाबाद रक्तपेढी, दत्ताजी भाले रक्तपेढी, लायन्स रक्तपेढी, आदर्श रक्तपेढी, लोकमान्य रक्तपेढी, जमात-ए-इस्लामी हिंद महिला महाविद्यालयासह शासकीय परिचर्या महाविद्यालय, विजेयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय, विद्यापीठाचे समाजकार्य महाविद्यालय, फोस्टर डेव्हलपमेंट डीएमएलटी महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी लक्ष वेधण्यात आले. या वेळी रक्तदानाच्या घोषवाक्यांनीही लक्ष वेधले. यानिमित्त दोन्ही समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रांतीचौक, पैठणगेट परिसरात पथनाट्य सादर केले. औरंगपुऱ्यात फेरीचा समारोप झाला. फेरीसाठी शासकीय रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी सुनिता बनकर, हनुमान रुळे, डॉ. महेश पालेकर, दैवकुमार तायडे, श्यामराव सोनवणे आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला जाळणाऱ्या पतीला सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

पंधरा महिन्याच्या पोटच्या मुलीला जीवे मारून टाकतो, असे म्हणताच पत्नीने मला मारून टाक म्हटल्यावर तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या पती रामेश्वर तात्याराव खुर्दे यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

कन्नड तालुक्यातील रामनगर येथे राहणारा रामेश्वर तात्याराव खुर्दे याचे फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथे राहणाऱ्या गीतासोबत जून २०१५मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर रामेश्वर आणि गीता हे दोघे कामधंद्यासाठी शहरात आले. खासगी कारखान्यात काम करू लागले. एक वर्षानंतर रामेश्वर आजारी पडल्यामुळे गावाकडे शेती करण्यासाठी आले. १३ ऑगस्ट २०१७ रोजी गीता शेतातून काम करून घरी परत आल्यावर पतीला स्वंयपाक करण्यासाठी सामान आणायला सांगितले. पतीने सामान आणून दिले. मात्र, तो नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत होता. त्याने भांडण उकरून काढले. त्या दोघांना १५ महिन्याची मुलगी होती. त्याने मुलीला जीवे मारून टाकतो, असे म्हणताच गीताने तिला कशाला मारता मलाच मारून टका, असे म्हणताच संतापलेल्या रामेश्वरने लाकडी दांड्याने गीतास बेदम मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये गीता गंभीररित्या भाजली. तिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यात आला. पतीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले असल्याचे तिने जबाबात म्हटले होते. उपचार सुरू असताना १८ ऑगस्ट २०१५ रोजी गीताची प्राणज्योत मालवली. गीताच्या जबाबावरुन पिशोर पोलिस ठाण्यात रामेश्वरविरोधात भादंवि ३०२, ३०७, ३२४, ५०४ आणि २०१ नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी रामेश्वरला अटक केली.

मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांच्या समोर अंतिम सुनावणी झाली असता सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी नऊ साक्षीदार तपासले. न्यायालयाने मृत गीताचा मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरून भादंवि ३०४ भाग दोननुसार दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजूरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी सुनावली. देशपांडे यांना सिद्धार्थ वाघ यांनी सहाकार्य केले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राध्यापकांचा भरतीसाठी हल्लाबोल!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात रखडलेली प्राध्यापक भरती त्वरित करा, सातवा वेतन आयोग लागू करा आणि सीएचबी प्राध्यापकांना समान काम समान वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनांनी शनिवारी विद्यापीठावर मोर्चा काढला. हा मोर्चा केवळ आर्थिक मुद्द्यावर नसून हक्काच्या मागणीसाठी असल्याचे प्राध्यापकांनी सांगितले.

राज्यात प्राध्यापक भरती करा, सातवा वेतन आयोग व जुनी पेन्शन योजना लागू करा, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना समान काम समान वेतन लागू करा या मागणीसाठी प्राध्यापक संघटनांनी मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना (बामुक्टो), एम. फुक्टो, ए.आय. फुक्टो यांनी मोर्चात सहभाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज दुपारी कुलगुरू बंगला ते मुख्य इमारतीपर्यंत मोर्चा निघाला. या मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला. मोर्चात प्राध्यापकांची संख्या लक्षणीय होती. मोर्चा मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ पोहचल्यानंतर प्रमुख प्राध्यापकांनी भाषणे केली. राज्यातील शिक्षण क्षेत्राच्या अडचणी लवकर सोडविण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.

प्राध्यापकांना २०१८-१९साठी १५ किरकोळ रजेबाबत ताबडतोब परिपत्रक काढा, विद्यापीठ परीक्षेच्या विविध कामाचे मानधन वाढवा, परीक्षा केंद्रावर डिफॉल्टेड अंडरस्टडीची संख्या दोन असावी, महाविद्यालयांना उत्तरपत्रिका पोहचवण्यासाठी पुरेसा निधी द्यावा, परीक्षेच्या कार्यालयीन खर्चासाठी तरतूद वाढवा आणि प्रश्नपत्रिकेतील गंभीर चुका दुरुस्त करा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. डॉ. विक्रम खिलारे यांनी शैक्षणिक दर्जाचा मुद्दा मांडला. 'पदवी व पदव्युत्तर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गेल्या काही वर्षात गंभीर चुका आहेत. या चुकांच्या मुद्द्यावर विद्यार्थी कोर्टात गेल्यास त्यांना उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. त्यामुळे काही प्रश्न निर्माण होतील. गणित, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र विषयात सतत चुका होत आहेत. यात प्रशासकीय सुधारणा आणून विद्यापीठाची प्रतिष्ठा जपावी' असे खिलारे म्हणाले. यावेळी डॉ. बी. आर. माडजे, डॉ. महेश कुलथे, श्रीमती एस. एल. पाटणकर, गीता कावळे, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. मारोती तेगमपुरे, प्रा. नितीन वाव्हळे यांच्यासह शेकडो प्राध्यापक उपस्थित होते. दरम्यान, प्र-कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

खोडसाळ प्रचार चुकीचा

राज्यात अनेक वर्षे प्राध्यापक भरती रखडली आहे. सीएचबी तत्त्वावर अपुऱ्या मानधनात प्राध्यापक काम करीत आहेत. वाढती महागाई आणि कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेतल्यास त्यांच्या जीवनमानाचा गंभीर प्रश्न लक्षात येतो. शासनाने त्वरित प्राध्यापक भरती करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. केंद्र सरकारने जाहीर केलेले नियम व अधिकार लागू करण्यासाठी मोर्चा आहे. प्राध्यापकांच्या आर्थिक हितासाठीच मोर्चा असल्याचा खोडसाळ प्रचार चूक आहे असे प्राध्यापकांनी ठणकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिल्मी स्टाइलने ट्रक चालकाला लुटले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना येथून ट्रकमध्ये दहा टन लोखंडी सळई घेऊन चांदवडला जाणाऱ्या ट्रक चालकाच्या समोर फिल्मी स्टाइलने कार आडवी लावून जवळपास आठ दरोडेखोरांनी चालकाचे अपहरण करून मारहाण केली. त्यानंतर हातपाय बांधून त्यास लासूर स्टेशन येथे सोडून चार लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळई, ट्रकसह सात लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. ही घटना शुक्रवारी (५ ऑक्टोबर) मध्यरात्री औरंगाबद जालना रस्त्यावर घडली. जुबेर अहेमद रफिक अहेमद (वय ४७, रा. मालेगाव, जि. नाशिक) असे मारहाणीत जखमी झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

घटनेबाबत चिकलठाणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ट्रकचालक जुबेर हा नाशिक जिल्ह्यातील नाईम अहेमद यांच्याकडे कामाला आहे. तो शुक्रवारी जालना एमआयडीसीमधून ट्रकमध्ये (एमएच १८ एम ४४७३) दहा टन लोखंडी सळई घेऊन औरंगाबादमार्गे नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे निघाला होता. मध्यरात्री शेंद्रा एमआयडीसीजवळ येताच एक कार भरधाव वेगात येऊन ट्रक समोर आडवी झाली. चालकाला काही समजण्याच्या आत त्यामधून चार ते पाच दरोडेखोर उतरले व ते किन्नर आणि चालक अशा दोन्ही बाजूनी ट्रकमध्ये घुसले. त्यांनी जुबेर यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये रोख मोबाइल हिसकावले व मोबाइलमधील सिम कार्ड काढून ते जुबेर यांना परत करून त्यांचे हात पाय, बांधून डोळ्यावर पट्टी बांधली व चार किलोमीटर अंतरावर गेल्यावर ट्रकमधून खाली उतरवत इतर साथीदारांच्या चारचाकीमध्ये बसविले.

त्यांना पुन्हा मारहाण करून लासूर स्टेशन येथील एका निर्जनस्थळी शेतात सोडून चार लाख रुपये किमतीच्या सळई व तीन लाख रुपये किमतीची ट्रक, रोख रक्कम आणि मोबाइल असा सात लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला. जुबेर अहेमद हे हात पाय बांधलेल्या अवस्थेत तसेच अर्धा किलोमीटर अंतरावर गेले असता तेथे काही शेतकरी त्यांना दिसले. त्या शेतकऱ्यांनी जुबेर यांची सुटका केली व याबाबत पोलिसांना माहिती. लासूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा औषधोपचार करून प्रकरण चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग केले. चालक जुबेर यांच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात दरोडेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरंग रास दांडियात यंदा पैठणीचे बक्षीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे आयोजित नवरंग रास दांडियामध्ये यंदा पैठणीचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय रोज पंचेवीस ते शंभर बक्षिसांची लयलूट करण्याची संधी महिलांना मिळेल, अशी माहिती प्रमुख संयोजक व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेच्या मैदानावर दरवर्षी नवरात्रोत्सवात नवरंग रास दांडियाचे आयोजन केले जाते. यंदाचे आठवे वर्ष आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जतन करीत संबळाच्या निनादाने भवानीमातेच्या मूर्तीची स्थापना आणि घटस्थापना केली जाणार आहे. दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या महिला - पुरुषांचे हळदी - कुंकू आणि गंधाचा टिळा लाऊन स्वागत केले जाईल. नऊ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार देखील नवरात्रोत्सवाच्या दरम्यान केला जाणार आहे. या उत्सवात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांमधून पंचेवीस ते शंभर बक्षीसे दिली जाणार आहेत. दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांची दररोज नोंदणी केली जाणार आहे. नोंदणी केलेल्या महिलांना शेवटच्या दिवशी सोडत काढून तिघींना पैठणी साड्या बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत. अष्टमीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे, असे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, गोपाळ कुलकर्णी, सुनीता देव, प्रतिभा जगताप, राजू दानवे आदी उपस्थित होते.

\Bमतदार नोंदणी कक्ष

\Bदिव्यांगांना तीन चाकी सायकलींचे वाटप, दोनशे रिक्षाचालकांना गणवेशाचे वाटप, अंध - अपंग - अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे विविध उपक्रम देखील या दरम्यान राबवण्यात येणार आहेत. नवरंग रास दांडियाच्या प्रवेशिका ओळखपत्र दाखवल्याशिवाय मिळणार नाहीत. नवरंग रास दांडियामध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून मतदारांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. आवश्यक ते पुरावे तपासून ही नोंदणी केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिन्याला हजार कुत्र्यांची नसबंदी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरमहिन्याला एक हजार मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करा, रात्रंदिवस कुत्रे पकडण्याचे काम करा असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहेत.

मोकाट कुत्रे पकडण्याच्या कामाचे पालिकेने खासगीकरण करून ते ब्ल्यू क्रॉस संस्थेला दिले आहे. या संस्थेचे प्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक महापौरांनी शनिवारी घेतली. संस्थेने पाच महिन्यात १००४ कुत्रे पकडून त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याचे यावेळी सांगण्यात आले. संस्थेच्या या कामगिरीवर महापौरांनी नाराजी व्यक्त केली. एक महिन्यात किमान एक हजार मोकाट कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया झालीच पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी संस्थेने कामातील काही अडचणी सांगितल्या. कुत्रे पकडण्यासाठी जास्तीच्या गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी संस्थेच्या प्रतिनिधींनी केली. इतके दिवस सुविधा मिळत नव्हत्या, आता सुविधा मिळू लागल्या आहेत. त्यामुळे आता कुत्रे पकडण्याचे व शस्त्रक्रिया करण्याचे काम गतीने केले जाईल अशी ग्वाही संस्थेकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेत टोलवाटोलवीला चाप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अतिक्रमण आणि नगररचना विभागाच्या हद्दीत शहरवासीयांची होणारी टोलवाटोलवी प्रशासनाकडून बंद व्हावी यासाठी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी या दोन्ही विभागाचे एकत्रिकरण करण्याचा रामबाण उपाय शोधला आहे.

महापालिकेत अतिक्रमण हटाव आणि नगररचना असे दोन स्वतंत्र विभाग आहेत. एखाद्या नागरिकाने अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तक्रार दिली, तर अतिक्रमण हटाव विभाग ती तक्रार पडताळणीसाठी नगररचना विभागाकडे पाठवत असे. दोन्ही विभागात समन्वय नसल्यामुळे महिनो न महिने तक्रारी निकाली निघत नव्हत्या. शिवाय अधिकारी - कर्मचारी वर्षानुवर्षे त्याच त्या विभागात ठाण मांडून होते. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी दोन्हीही विभाग एकत्र करण्याचा निर्णय घेतला व शनिवारी तसे आदेश काढले. प्रत्येक झोनमध्ये नगररचना विभागातील एक शाखा अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण हटाव विभागातील एक इमारत निरीक्षक यांची नियुक्ती आयुक्तांनी केली आहे. नगररचना विभागामार्फत झोननिहाय वेगवेगळ्या परवानग्या देणे, अनधिकृत इमारतींवर कारवाई करणे याची जबाबदारी यासर्वांवर देण्यात आली आहे.

\Bअधिकाऱ्यांची नियुक्ती

\Bअनधिकृत व अतिक्रमीत इमारतींवर कारवाई करण्यासाठी झोननिहाय पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील आयुक्तांनी केली आहे. झोन १, २, ३ साठी एस. एस. कुलकर्णी, झोन ४, ५, ६ साठी वामन कांबळे यांची तर झोन ७, ८ , ९ साठी पी. डी. पाठक यांनी पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगररचना विभागाचे उपअभियंता ए. बी. देशमुख यांच्याकडे अतिक्रमण हटाव विभागाचे विभागप्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार देखील देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता कर वसुली फक्त दहा टक्के

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सहा महिन्यात मालमत्ता कराची वसुली फक्त दहा टक्के झाल्यामुळे आता झोन कार्यालयनिहाय कर अदालतीचे आयोजन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिली कर अदालत नवरात्रोत्सवात होण्याची शक्यता आहे.

मालमत्ता कर वसुलीचे यंदाचे टार्गेट ४५० कोटींचे आहे. अपेक्षित कर वसुली होत नसल्यामुळे शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील आठवड्यापासून वॉर्डनिहाय कर वसुलीसाठी शिबिरांचे आयोजन करा, त्याचे नियोजन तत्काळ सुरू करा, अशा सूचना देत वॉर्ड कार्यालयनिहाय कर अदालतींचे आयोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. पहिली कर अदालत नवरात्रोत्सवाच्या दरम्यान घ्या, त्यात कर वसुलीबद्दलची वादग्रस्त प्रकरणे निकाली काढा असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. शुक्रवारी साठ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला. हे प्रमाण फारच कमी आहे. रोजच्या वसुलीत वाढ झाली पाहिजे, असे महापौरांनी बजावले.

मालमत्ता कर वसुलीसाठी झोन कार्यालयनिहाय पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्याशिवाय केंद्रीय पथक देखील कार्यरत आहे. झोननिहाय पथकांमध्ये काही कर्मचारी पालिकेत कायमस्वरुपी नोकरीत असलेले, तर काही कर्मचारी कंत्राटावरचे आहेत. सुमारे १३४ कर्मचारी वसुलीच्या कामासाठी नियुक्त केले आहेत. विभाग प्रमुखांना विशेष वसुली अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिपब्लिकन पक्षांना सोबत का घेत नाही ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'वंचित बहुजन आघाडी करून तुम्ही एमआयएमसारख्या पक्षाला तुम्ही जवळ करता. मात्र, दलित समाजातील रिपब्लिकन पक्षांना या आघाडीत सोबत का घेत नाही,' असा थेट सवाल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी शनिवारी अॅड. प्रकाश आंबेडकरांना केला आहे.

वक्फ सुधार समितीच्या सदस्यपदावर असलेले कवाडे आज वक्फ कार्यालयाच्या समस्यांबाबत औरंगाबाद आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कवाडे म्हणाले, 'भारतीय जनता पक्ष जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) जोखडातून मुक्त होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास संभव नाही. आगामी काळात मोदी मुक्त भारत करण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येत भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्याची गरज आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये 'एमआयएम'ला सोबत घेण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. या आघाडीमुळे धर्मनिरपेक्ष मते फुटणार नाहीत, याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी 'एमआयएम'ला सोबत घेतले. त्यांची कॉँग्रेससोबतही बोलणी सुरू आहे. मागील निवडणुकीच्या वेळीही अॅड. आंबेडकरांनी लोकशाही आघाडीची स्थापना केली. मात्र, तेव्हाही आणि आताही रिपब्लिकन पक्षांना सोबत घेतले नाही. अॅड. आंबेडकरांना आघाडीत सर्वजण चालतात. मग, रिपब्लिकन पक्षांना सोबत घेण्यात नेमकी काय अडचण आहे,' असा सवालही यावेळी कवाडे यांनी व्यक्त केला. जेव्हा हाजी मस्तानने इतर समाजासोबत अल्पसंख्यांक आघाडीची स्थापना केली होती. तेव्हा अॅड. प्रकाश आंबेडकरांचे तत्कालीन पीए अर्जुन डांगळे यांनी माझ्यावर टीका केली होती,' याचेही दु:ख कवाडे यांनी यावेळी व्यक्त केले. ……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागतिक दर्जाचे फूड पार्क सज्ज!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या फूड पार्क योजनेअंतर्गत पैठण रोडवरील धनगाव येथे १०० एकरावर उभारलेल्या पैठण मेगा फूड पार्क प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नाथ ग्रुप या फूड पार्कचे मुख्य प्रवर्तक असून जागतिक दर्जाच्या सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेला हा राज्यातील सर्वात मोठा फूड पार्क आहे. या पार्कचा उद्घाटन सोहळा लवकरच आयोजित केला जाईल,' अशी माहिती शनिवारी संचालक आकाश कागलीवाल यांनी पत्रकारांना दिली.

पत्रकार परिषदेला सीएफओ विजय साबू, व्हाइस प्रेसिडेंट संतोष जोशी, जनरल मॅनेजर तानाजी घाडगे उपस्थित होते. कागलीवाल म्हणाले, 'शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत जाईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळेच शेतमालावर प्रक्रिया करून त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देणे ही फूड पार्कची संकल्पना आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी फूड पार्क महत्वाची भूमिका बजावेल.'

जोशी म्हणाले, 'आतापर्यंत ५०० शेतकरी फूड पार्कशी प्रत्यक्षपणे जोडले गेले असून, त्यांच्या माध्यमातून ५०० एकरावर मधू मका पिकाची तंत्रशुध्द लागवड केली आहे व हा माल फूड पार्कमध्ये प्रक्रियेसाठी येत आहे. फूड पार्कमध्ये एक अद्ययावत मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र आहे. याशिवाय तीन प्राथमिक प्रक्रिया केंद्रे अनुक्रमे इसारवाडी, कन्नड आणि आळेफाटा येथे आहेत. शेतकऱ्यांच्या शेताजवळच अनेक संकलन केंद्रे देखील आहेत. या माध्यमातून शेतमाल फूड पार्क पर्यंत पोहचवला जातो. फूड पार्कमध्ये फूड टेस्टिंग लॅब, फ्रोझन व कोल्ड स्टोअरेजेस, मॉडर्न वेअर हाऊस, सॉर्टग व ग्रेडिंग लाइन्स, टेट्रापैक (UHT) दूध प्रक्रिया व दुग्ध पदार्थ तसेच IQFआदी सुविधा उपलब्ध आहेत.'

घाडगे म्हणाले, 'अन प्रक्रिया उद्योगामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा फूड पार्क एक उत्तम संधी आहे. या फूड पार्कमध्ये गुंतवणूक केल्यास राज्य व केंद्र सरकारकडून अनेक आर्थिक सवलती व फायदे मिळतील. त्यामध्ये मुख्यत्वे भांडवली गुंतवणुकीवर ५० टक्के पर्यंत सवलत, मुदती कर्जावर ४.५० टक्केपर्यंत आकर्षक व्याजदर, आयकर व स्टॅम्प ड्युटीमध्ये सूटचा एसजीएसटी परतावा, वीजदरामध्ये सवलत आदींचा समावेश आहे.'

\Bमोठ्या उद्योगांची गुंतवणूक

\Bफूड पार्कमध्ये दोन ते वीस हजार चौरस मीटर आकाराचे औद्योगिक भूखंड रास्त दरात उपलब्ध आहेत. नव्यान गुंतवणूकदारांसाठी सर्व प्रकारचे तांत्रिक सहाय्य, आवश्यक परवाने व आर्थिक पतपुरवठा संबंधी मार्गदर्शन सुद्धा फूड पार्क कडून केले जाते. आतापर्यंत पाच ते सहा उद्योजकांनी फूड पार्कमध्ये गुंतवणूक केली असून इतर काही उद्योजक सक्रिय आहेत, तसेच काही मोठे उद्योग समूह सुद्धा फूड पार्कमध्ये गुंतवणुकीसाठी इच्छुक असल्याचे पार्कतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको सुविधांची जबाबदारी पालिकेची

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

सिडको परिसरातील सोयी सुविधा आणि अन्य त्रुटीच्या निवारणाबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली. या संबंधी सिडकोने शपथपत्र दाखल केले. शपथपत्रात सिडकोने हस्तांतरणानंतरची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगितले. २००६मध्ये सेवा हस्तांतरणानंतर बऱ्याच त्रुटींची पूर्तता केल्याचे नमूद केले. पालिकेस दोन आठवड्यांची मुदत शपथपत्र दाखल करण्यासाठी देण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी न्या. संजय गंगापूरवाला व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्यासमोर झाली.

सिडको परिसरातील विविध समस्यांसाठी १९८६मध्ये किशनराव हिवाळे यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. ड्रेनेज, रस्ते, पाणी, उद्याने, खुल्या जागा, नाट्यगृह, सार्वजनिक वापराच्या सोयी सुविधा आणि अन्य सुविधा सिडको प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या नसल्याचे सांगण्यात आले होते. यासंदर्भात वेळोवेळी आदेशित करूनही अनेक समस्यांचे समाधान झाले नाही. न्यायालयाच्या आदेशाने २२ हजार अतिक्रमणे पाडण्यात आली. सिडकोने नाट्यगृह बांधायचे टाळले होते, परंतु खंडपीठाच्या आदेशामुळे त्यांना नाट्यगृह बांधावे लागले. प्रथम त्रुटी दूर करूनच सिडकोकडील सेवा पालिकेकडे हस्तांतरित करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. अॅड. प्रदीप देशमुख यांच्या समितीने सर्व सोयी - सुविधांची पाहणी केली. तसेच असंख्य त्रुटींवर आणि नागरिकांनी दिलेल्या गैरव्यवहारांच्या पुराव्यासह सविस्तर म्हणणे न्यायालयात सादर केले होते. आता सिडकोने उत्तर दाखल केले असून, पालिकेच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. सिडकोतर्फे अनिल बजाज, पालिकेतर्फे जयंत शहा यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीची छेड काढली; एक वर्षाची शिक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीची परीक्षा देण्यासाठी पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा दुचाकीवरून पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या शेख शमीम शेख कमरुद्दीन यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश पौर्णिमा कर्णिक यांनी एक वर्षे शिक्षा दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दहावीची परीक्षा असल्यामुळे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी २४ मार्च २०१४ रोजी सिल्लेखान्यातून देवगिरी हायस्कलकडे पायी येत असताना भरधाव वेगात दुचाकीवरून दलालवाडी येथे राहणारा शेख शमीम शेख कमरुद्दीन आणि शेख इरफान शेख यूसूफ हे दोघे आले. शेख शमीमने निर्माण भारतीच्या मोकळ्या जागेत मुलीसमोर दुचाकी आडवी लावून दुचाकीवर बस नाही, तर दुपारी घरी जाणार नाही अशी धमकी देत तिचा हात धरून ओढला. पाठीमागे बसलेला शेख इरफाने ओढणी ओढून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून शेख शमीम आणि शेख इरफान या दोघांविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात भादंवि ३५४ ब, ड, ३४१,५०६ बाल लौगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ११ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालय दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पोर्णीमा कर्णिक यांच्या समोर झाली. सहायक लोकअभियोक्ता उल्हास मारोती पवार यांनी पाच साक्षीदार तपासले. न्यायालयाने शेख शमीम यास दोषी ठरवून भादंवि ३५४ कलमान्वये एक वर्ष शिक्षा, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली. भादंवि ५०६ कलमान्वये सहा महिने साधा कारावास, ३४१ कलमान्वये १५ दिवस साधी कैâदेची शिक्षा सुनावली. शेख इरफान यास सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेसीबीने फोडली जलवाहिनी

0
0

औरंगाबादमध्ये सिडको बसस्टँड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान गरवारे कंपनीसमोर एका जेसीबीने जलवाहिनी फोडली. जेसीबीच्या माध्यमातून रस्त्याच्या बाजूला खोदकाम सुरू होते. हे काम सुरू असतानाच जेसीबीचा धक्का जलवाहिनीला लागला आणि ती फुटली. यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णपुऱ्यात वृक्षतोड

0
0

औरंगाबादमधील कर्णपुरा परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात येत आहे. अनेकवर्ष जुने वृक्ष तोडले जात आहेत. या संदर्भात महापालिकेकडे चौकशी केली. तेव्हा कर्णपुरा परिसर छावणी बोर्डाच्या अंर्तगत येत असल्यामुळे वृक्षतोडीची जबाबदारी छावणी बोर्डाची असल्याचे सांगण्यात आले. महापालिका आणि छावणी बोर्ड यांच्या टोलवाटोलवीत झाडांची मात्र कत्तल होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images