Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महावितरणचा शॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर आणि महागाईमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या जनतेसाठी अजून एक धक्कादायक बातमी. आता ऑक्टोबरपासून महावितरणच्या वीज बिलातही चक्क एक-दोन नव्हे, तर वीस टक्के दरवाढ होणार असून, या जबर तडाख्याने सर्वसामान्यांचे महिनाकाठचे बजेट पुन्हा एकदा कोलमडणार आहे.

महावितरण कंपनीतर्फे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला होता. आयोगाने १२ सप्टेंबर रोजी याबाबतचा आदेश पारित केला. त्यात पाच ते सहा टक्के दरवाढ असल्याचे सांगितले गेले. विशेष म्हणजे एक सप्टेंबरपासून ही नवी दरवाढ लागू केल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ही दरवाढ पंधरा ते वीस टक्के असल्याचे दिसून येत आहे. पॉवर फॅक्टरबाबत केलेल्या बदलामुळे ही दरवाढ झाली आहे. महावितरण महागड्या दरात वीज खरेदी करते आणि जनतेला स्वस्तात विकल्याचा दावा करते. मात्र, वीज बिलात पॉवर फॅक्टरच्या नावाखाली दंड आकारून वीज खरेदी आणि विक्रीत होणारे नुकसान महावितरणे मोठ्या चलाखीने भरून काढली आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील उद्योजकांनाही याचा जबर फटका बसणार आहे. ऑक्टोबरचे वीज बिल हातात पडल्यानंतर हा दणका किती मोठा असेल, ते समजणार आहे. विशेष म्हणजे महावितरणतर्फे कोणतीही पूर्वसूचना न देता ही वाढ केल्याचा आरोप आता होत आहे.

\Bउद्योगांना झटका

\Bशेजारच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात यापूर्वीच २५ टक्के अधिक दराने वीज पुरवठा करण्यात येतो. त्यात आता ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांसह उद्योग जगताला जबर झटका बसणार आहे. विशेषत: विजेचा अधिक वापर करणारे धातू, प्लास्टिक, यंत्रमाग, औरंगाबादमधील विविध वाहनांचे पार्ट निर्मिती तयार करणारे लघुउद्योग यांच्यावर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्योग जगताने या दरवाढीला तीव्र विरोध करण्याचे संकेत दिले आहेत.

महावितरणतर्फे पाच टक्के दरवाढ करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात पंधरा ते वीस टक्के दरवाढ झाल्याचे समोर येत आहे. ऊर्जा मंचतर्फे या दरवाढीचा प्राथमिक अभ्यास केल्यानंतर ही दरवाढ आयोगाने जाहीर केलेल्या दरवाढीपेक्षा जास्त असल्याचे दिसते आहे. वीज बिल हातात आल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास करून या बाबतीत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

- हेमंत कपाडिया, सचिव, ऊर्जा मंच

\Bअसे वाढले बिल

\B- ५ टक्के वाढणार होते

- २० टक्के वाढले

- १२ सप्टेंबर रोजी निर्णय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धनगर आरक्षणासाठी आता शेवटची लढाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'टीस' संस्थेकडून अहवाल आल्यानंतर राज्यशासनाकडून धनगर समाजाच्या नावात दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. 'टीस'चा अहवाल ३१ ऑगस्टला आला. मात्र, धनगर आरक्षणावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत विभागीय आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे,' असा इशारा रविवारी आमदार रामराव वडकुते यांनी दिला.

धनगर आरक्षणासाठी मराठवाड्यातील विविध संघटनांची बैठक आमदार वडकुते यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन येथे झाली. बैठकीत सुरेश कांबळे, दिलीप अग्रहाकर, जगन्नाथ रिठे, डॉ. शिवाजी राऊ, मनोज श्रीराम, बळीराम खटके, राजू शिंदे, भीमराव शिंगारे, प्रकाश रिठे, गणेश कोल्हे, राहिंज महादेव, शिवाजी वैद्य, बाळासाहेब तायडे, मनजित कोळेकर, दिलीप रिठे, राजू पोकळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण अंमलबजावणी समितीची स्थापना करण्यात आली.

पत्रकार परिषदेत आमदार वडकुते म्हणाले, 'बारामतीच्या सभेत देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे जाहीर केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही २८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत 'टीस'च्या अहवालानंतर प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. हा अहवाल ३१ ऑगस्ट रोजी आला. अहवाल येऊन एक महिना झाला आहे. मात्र, अजूनही जातीच्या नावाच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. शासनाला जागे करण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद शहरात अहिल्याबाई होळकर चौकातून विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा क्रांती चौक, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक मार्गे विभागीय आयुक्तालयावर जाणार आहे. या मोर्चानंतरही शासनाने धनगर समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याबाबत समिती अंतिम निर्णय घेणार आहे,' असा इशारा वडकुते यांनी दिला.

\Bदोन जागांची केली मागणी

\B'राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी होत असताना आगामी लोकसभेत धनगर समाजाला राज्यात दोन जागा द्याव्यात, अशी मागणी पक्षप्रमुखांकडे केली आहे. बीड, म्हाडा, सोलापूर आणि परभणी येथे धनगर बहुल भाग आहे. या जागेवर किंवा महाराष्ट्रात अन्य जागेवर धनगर समाजाच्या प्रतिनिधीला लोकसभेच्या निवडणुकीसाठी दोन जागेची मागणी आम्ही केली आहे,' अशी माहिती वडकुते यांनी दिली.

………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचपूरच्या शाळेत वर्ग धोकादायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

चिंचपूर (ता. सिल्लोड) येथील जिल्हा परीषद शाळेच्या चार वर्ग खोल्या अतिशय धोकादायक स्थितीमध्ये उभ्या असून, शिक्षक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे. असे असताना व्यवस्थापन समिती व ग्रामसंसद कार्यालयाने वर्षभरापासून संबधित वर्गखोल्या पाडून नवीन वर्गखोल्या मंजुरीबाबत दाखल केलेला प्रस्ताव मात्र जिल्हा परिषद प्रशासनाकडे धूळखात पडून असल्याने पालकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

चिंचपूर येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यत वर्ग असून, ऑफिससह सात वर्गखोल्या आहेत. त्यापैकी चार वर्गखोल्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. तडे गेलेल्या भिंती, तुटलेली पत्रे, गंजलेल्या खिडक्या यामुळे पावसाळ्यात शाळेमध्ये पाणी येते. शिवाय वर्गखोल्यांची अशी अवस्था असल्याने त्या कधी कोसळतील याचा नेम नाही. त्यामुळे ग्रामसंसद कार्यालयाने वर्षभरापूर्वीच संबधित वर्गखोल्या पाडणे आणि नवीन वर्गखोल्या मंजुरीबाबत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे, परंतु जिल्हा परिषदेकडून अद्याप कसलीच कार्यवाही करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यामुळे अपघात होण्यआधी संबधित वर्गखोल्या पाडून नवीन वर्गखोल्यांने तात्काळ मंजुरी द्यावी, अशी पालक व ग्रामस्थांची मागणी आहे

चिंचपूर येथील शालेय वर्गखोल्यांची अवस्था पाहून व संभाव्य धोका लक्षात घेऊन आम्ही ग्रामसभेच्या ठरावाद्वारे नवीन वर्गखोल्या मंजुरीसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालया मार्फत रितसर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवून एक वर्ष झाले आहे, परंतु अद्याप कसलीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे पालकांमध्ये संताप असून, एखादी वर्ग खोली कोसळून अघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदाली जिल्हा परिषद प्रशासनाची असणार आहे

- प्रियंका जंजाळ, सरपंच ग्रामपंचायत, चिंचपूर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मा गांधी सन्मान मार्च उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी केली नाही. तसेच राष्ट्रीय सुटी रद्द करून कामकाज सुरू ठेवले. प्रशासनाच्या कृतीच्या निषेधार्थ मंगळवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी सन्मान मार्च काढण्यात येणार आहे. या मोर्चात विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

महात्मा गांधी यांची १५० वे जन्म वर्ष जगभर साजरे केले जात आहेत. विद्यापीठाने गांधी जयंतीची सुटी रद्द केली. तसेच गांधीजींना अभिवादन करणारा एकही कार्यक्रम घेतला नाही. या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी सन्मान मार्च काढण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रवेशद्वार ते मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत हा मार्च निघेल. मार्चमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एनएसयूआय, मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंटस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, एसएफआय, एआयएसएफ, मराठवाडा युवक संघर्ष समिती, युवक काँग्रेस, सम्यक विद्यार्थी आंदोलन आदी संघटना सहभागी होणार आहेत. विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राजेश मुंढे, डॉ. उल्हास उढाण, प्राजक्ता शेटे, दीक्षा पवार, अमित कुटे, अक्षर जेवरीकर, सुनील चंदनशिवे, भगवंत वायबसे, सचिन शिंदे, भारत चव्हाण यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रेडाई’चे ड्रीम होम प्रदर्शन गुरुवारपासून

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, औरंगाबाद

'क्रेडाई' औरंगाबादतर्फे यंदा नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर 'ड्रिम होम-२०१८' या प्रॉपट्री एक्‍स्पोचे गुरुवारपासून आयोजन करण्यात आले आहे. क्रांती चौक येथील मॅनोर लॉन्स येथे आयोजित या एक्‍स्पोचे उद्घाटन विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्‍ते होणार आहे, अशी माहिती क्रेडाई औरंगाबादचे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी रविवारी दिली.

भारतीय परंपरेमध्ये नवरात्र-दसरा हा नवीन वास्तू खरेदीसाठी अत्यंत शुभयोग मानला जातो. संपूर्ण वर्षातील सुमारे ६० टक्के नवीन वास्तू याच शुभमुहूर्तावर खरेदी केल्या जातात. त्या अनुषंगाने शहर परिसरातील मान्यवर बांधकाम व्यावसायिकांच्या अनेक नवीन गृहप्रकल्पाचे शुभारंभ होणार असून, यावेळी बांधकाम व्यावसायिकांतर्फे विविध सवलती, योजनांची घोषणा करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत शहरातील नागरिकांना ड्रिम होम - २०१८ ला भेट देता येणार असून, या एक्‍स्पोमध्ये शहराच्या सर्व भागातील गृहप्रकल्प, ऑफिस, दुकाने, निवासी तथा व्यावसायिक भूखंड आदींची माहिती घेऊन योग्य घराची निवड करता येणार आहे. या शिवाय 'क्रेडाई'मधील बांधकाम व्यावसायिकांच्या इतर शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांसंदर्भातही विचारणा करता येणार आहे. या एक्‍स्पोमध्ये २५० प्रोजेक्ट, ५२ बांधकाम व्यावसायिकांचे १० लाखांपासून ते दोन कोटी रुपयांपर्यंतचे घर उपलब्‍ध राहणार आहेत. या शिवाय एक्‍स्पोमध्ये शहरातील मान्यवर वित्तीय संस्था, बँक तसेच डोअर, इले‌क्ट्रिकल्स-इलेक्ट्रॉनिक्स, किचन ट्रॉलिज, इंटेरिअर डिझायनरर्स इत्यादी दालनेही या प्रदर्शनात एकाच छताखाली राहणार आहेत. प्रदर्शनास भेट देणाऱ्या भाग्यवंत नागरिकांना ड्रिम होम २०१८आयोजन समितीतर्फे भेट वस्तूही देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेसाठी आशु‌तोष नावंदर, संग्राम पटारे, प्रमोद खैरनार, राजेंद्रसिंग जबिंदा, विकास चौधरी, देवानंद कोटगिरे यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती.

\Bटायटल इन्‍शुरन्समुळे घरांच्या किमती वाढणार

\B'येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन घर खरेदी करताना टायटल इन्‍शुरन्सचा नियम लागू होणार आहे. घराच्या संपूर्ण किमतीच्या दोन ते अडीच टक्के रक्कम टायटल इन्‍शुरन्स अंतर्गत द्यावी लागणार असल्याने हा नियम लागू झाल्यानंतर घराच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे,' असे वट्टमवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन गंड्यातला पैसा मिळाला परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइलवर फोन करून, विविध आमिष दाखवून ग्रामीण भागात अनेकांना गंडा घालण्यात येतो. या लुटीतला पैसा तक्रारदात्यांना परत मिळवून देण्याचे काम ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर सेलने यशस्वीपणे केले आहे. आतापर्यंत सात लाख ८८१ रुपये आठ तक्रारदात्यांना परत करण्यात आले.

गेल्या दहा महिन्याच्या काळात आकाश परसराम जाधव (रा. वरखेड ता. गंगापूर, १०,०००), सारंगधर भानुदास आहेर (३०,०००), श्यामसुंदर गोपाळराव पोंदे (रा. वैजापूर, ४१,५४८), भागाजी शंकरराव पवार (रा. हिवरखेडा, कन्नड, २,३३३), उत्तम चंपत खेडके (रा. खुलताबाद, ७०,०००), रामदास दगडू जाधव, (रा. कापूसवाडगाव, ता. वैजापूर, ४,७५,०००), मंगेश प्रल्हाद वाघ (रा. फुलंब्री, ५,०००), अप्पासाहेब बाळासाहेब जाधव (रा. लोणी खुर्द, ता. वैजापूर, ६७,०००) या तक्रारदात्यांना ऑनलाइन गंडा घालून लुटण्यात आले होते. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. मात्र, पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती नव्हती. मात्र, सायबर सेलच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी २४ तासांच्या आत मिळालेल्या या तक्रारीत विशेष कामगिरी करत आठ तक्रारदात्यांचे सात लाख ८८१ रुपये तक्रारदात्यांना परत मिळवून दिले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात अप्पर पोलिस अधीक्षक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक गिरी, एम. एम. सय्यद, पोलिस कर्मचारी कैलास कामठे, रवींद्र लोखंडे, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, जीवन घोलप, गजानन बनसोड यांनी केली.

……………

\Bसायबर सेलकडून जनजागृती

\Bमोबाइलवर फोन करून आपले एटीएम कार्ड बंद होणार आहे, आपले क्रेडिट कार्ड सुरू करून घ्या असे कारण सांगून एटीएम/क्रेडिट कार्डचा नंबर व ओटीपी हस्तगत करून खात्यातील रोख रक्कम पळविली जाते. या बरोबरच कमी व्याजदारामध्ये कर्ज मिळेल, जॉब मिळेल, लॉटरी लागेल, असे आमिष दाखवून सर्वसामान्यांना फसविण्याचे प्रकार आढळून येत आहेत. यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर सेलच्या वतीने जनजागृती सुरू करण्यात आल्याची माहिती, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे.

………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकाल भिंतीवर तरुणांनी चढवला साज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अस्वच्छतेमुळे बकालपण आलेल्या अनेक भिंती आपल्याला शहरात पहायला मिळतात. अशाच भिंतींला नवं रूप देण्याचे काम शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी रविवारी केले. त्यामुळे कॉलेजच्या बकाल भिंतीचे रूपडे पालटले आहे. या भिंतीवर विद्यार्थ्यांनी 'डिजिटल इंडिया'चे महत्त्व, 'साक्षरता हवी' इथपासून ते 'आपलं औरंगाबाद, आपली जबाबदारी' असे संदेश देत बदलत्या स्मार्ट औरंगाबादचं रूपही रेखाटलं आहे.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कॉलेजचे विद्यार्थी एक महिना विविध उपक्रम राबवितात. त्याच दरम्यान काही विद्यार्थ्यांनी ही कल्पना इतरांसमोर मांडली अन् संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तयारी सुरू झाली. भिंतीला लागून कचरा पडलेला होता. त्यासह त्यावर पोस्टर चिकटले होते, तर काही जणांनी भिंतीलगतच्या जागेचा पार्किंगसाठी उपयोग केला होता. त्यामुळे विद्रुपीकरण झाले होते. विद्यार्थ्यांनी परिसराची व भिंतीची साफसफाई करत ती रंगवण्याची प्रक्रिया सुरू केली. रंगवलेल्या भिंतीवर सामाजिक संदेश देणारी चित्रे कोणती असावीत याबाबत आधी ठरवले व नंतर त्याची तयारी केली. या उपक्रमासाठी कॉलेज प्रशासनाकडूनही मदत मिळाली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून रंगरंगोटीसह सामाजिक संदेशाची चित्र रेखाटण्याची किमयाही झाली. त्यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला. या रस्त्यावरून जाणाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या कामाचे कौतुक केले. तर काहींनी शब्बासकीची थापही दिली. सामाजिक संदेशामध्ये विद्यार्थ्यांनी 'आपलं औरंगाबाद'सह शहरात कचऱ्याच्या प्रश्नावर लक्ष वेधत 'स्वच्छता राखा' असा संदेश दिला. त्यासह 'बदलते स्मार्ट औरंगाबाद' हे विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्र बोलके आहे. 'डिजिटल इंडिया' या थीमवर तंत्रज्ञानातील बदलाचे महत्त्व सांगणारे चित्र साकारले आहे. यामध्ये आदिमानवापासून आजची परिस्थिती मांडले आहे. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारे चित रेखाटून सामाजिक संदेश दिला आहे. आपल्या कल्पनेतून आकर्षक रंगरंगोटी, सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रांनी भिंतीची सजावट करत विद्यार्थ्यांनी कौतुकाची थाप मिळविली. या उपक्रमासाठी सुमारे ४० विद्यार्थ्यांनी काम करत आहेत.

आम्ही स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला. यामध्ये बकाल झालेल्या भिंतीला पुन्हा नवे रूप देऊ, असा विचार करत ही रंगरगोटी केली. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पूनम जाधव

..

या प्रकारचे काम करण्याचा अनुभव चांगला होता. प्रत्येकाचा सहभाग अन् वेगळे काही करतोय याचा अनुभव आला. भिंत रंगवताना सामाजिक संदेश देऊ शकलो याचा आनंद अधिक आहे.

संकेत सकपाळ

..

अभियांत्रिकीचे विद्यार्थी अभ्यासातच नाहीतर, सामाजिक प्रश्नांबाबतही अतिशय सजग असतात. स्वच्छतेबाबत प्रत्येकाने जागरूक असायला हवे असे आम्ही चित्रांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आदर्श मालपेद्दीवार

..

दोन-तीन दिवसांपासून आम्ही याबाबतची तयारी करत होतो. रविवारी आम्ही पूर्ण दिवस रंगरंगोटी आणि चित्र रेखाटण्यासाठी दिला. प्रत्येकाला त्यासाठी जबाबदारी वाटून देण्यात आली होती.

निर्मल यशवंते

..

आज आपण 'डिजिटल इंडिया' म्हणतो अशावेळी काय काय बदलातून आपण गेलो हे चित्रातून मांडले. आपण ज्या शहरात राहतो त्या शहराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी आपलीही आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.

दिव्यकांत त्रिवेदी

..

केवळ साफसफाई, रंगरंगोटी करून आम्ही नाही थांबणार. या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही यासाठी बाजूने वृक्षारोपणही करण्याचा आमचा विचार आहे. त्यामुळे अधिक आकर्षक वाटेल.

विजयसिंग माने

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड पॅसेंजरचे इंजिनमध्ये ऑइल गळती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काचीगुडा-मनमाड पॅसेंजरच्या इंजिनमध्ये जोराचा आवाज येऊन ऑइल गळती होण्याचा प्रकार घडला. हे ऑइल इंजिनमागील दोन डब्यांवर पसरले. ऑइल गळती होऊन पेडगाव ते परभणी दरम्यान रेल्वे थांबवावी लागली. रेल्वेचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत. इंजिन नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना सुमारे दोन तासापेक्षा जास्त वेळ रेल्वेत ताटकळावे लागले, शिवाय नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसला सुद्धा एक तास उशीर झाला.

काचीगुडा ते मनमाड पॅसेंजर नांदेड मार्गे परभणी येथे दुपारी चारच्या दरम्यान पोहोचली. परभणी येथून निघाल्यानंतर पेडगाव दरम्यान इंजिनमध्ये जोराचा आवाज आला. त्यानंतर अचानक रेल्वेचा वेग कमी होत गेला. काही वेळात काळसर ऑइल सारखा पदार्थ रेल्वे इंजिनमधून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. चालकांने इंजिन बंद करून तपासणी असता इंजिनचे ऑइल गळत असल्याचे लक्षात आले. काही प्रवाशांनी हे डिझेल असल्याचे सांगितले. या गळतीमुळे इंजिनचा रंग पूर्ण काळा झाला, तर इंजिन मागील दोन डबेही काळे झाले. या घटनेची माहिती नांदेड येथील विभागीय कार्यालयास देण्यात आली. औरंगाबादहून नांदेडकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस मानवत रोड येथे थांबवून तिचे इंजिन परभणी ते पेडगाव दरम्यान थांबलेल्या पॅसेंजरला रेल्वे रूळावरून हटवण्यासाठी पाठवण्यात आले. या इंजिनने पॅसेंजर पेडगावच्या साइड ट्रॅकवर लावली. त्यानंतर तपोवन एक्स्प्रेस नांदेडकडे गेली. तपोवन एक्स्प्रेस गेल्यानंतर पॅसेंजरकरिता नांदेडहून इंजिन पाठवण्यात आल्याचे रेल्वे विभागातून सांगण्यात आले.

……………

\Bपॅसेंजरकडे दुर्लक्ष \B

इंजिन नादुरुस्त झाल्यामुळे ताटकळलेल्या प्रवाशांना दक्षिण मध्य रेल्वेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या विभागातील पॅसेंजर रेल्वेकडे सतत दुर्लक्ष केले जाते. मनमाडऐवजी आंध्र प्रदेशात जाणारी रेल्वे असती, तर इंजिनची व्यवस्था लवकर केली असती, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पारंपरिक कॉलेजांची चलती?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पारंपरिक अभ्यासक्रमातून रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना मान्यता देत नवीन महाविद्यालये सुरू होणार आहेत. बृहत आराखड्यानुसार प्रस्तावित पारंपरिक महाविद्यालयांची संख्या जास्त आहे. या महाविद्यालयांना मान्यतेची शक्यता कमी असल्यामुळे ग्रामीण भागातील दर्जाहीन शिक्षणाला आळा बसणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पारंपरिक महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे. विद्यापीठ प्रशासनाने २०१८-१९ यावर्षीसाठी राज्य सरकारला सादर केलेल्या बृहत आराखड्यानुसार ५७ पारंपरिक महाविद्यालये प्रस्तावित आहेत. समाजकार्य महाविद्यालये चार, महिला महाविद्यालये तीन, हॉटेल मॅनेजमेंट तीन, अशी इतर शाखानिहाय प्रस्तावित महाविद्यालये आहेत. यावर्षी उद्योग क्षेत्राची मागणी व नवीन रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन बृहत आराखडा तयार करण्यात आला. व्यापार, उद्योग, शेती, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील तब्बल दहा हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. आपल्या भागातील अभ्यासक्रमाची गरज आणि संबंधित भागाचे वेगळेपण या अनुषंगाने सर्वेक्षण झाले. विद्यार्थी, पालक यांनी सर्वेक्षणात महत्त्वाची मते नोंदविली. या पार्श्वभूमीवर बृहत आराखडा तयार करण्यात आला. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांची संख्या अतिरिक्त आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांऐवजी रोजगाराच्या संधी असलेल्या नवीन अभ्यासक्रमांना उच्च शिक्षण विभाग मान्यता देत आहे. औद्योगिक क्षेत्राची मागणी लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रमांचे प्रस्ताव आहे. या महाविद्यालयांना अधिक मागणी आहे. पारंपरिक महाविद्यालये केवळ पदवीधारकांची संख्या वाढवत आहे. तुलनेने नोकरी किंवा व्यवसायाची संधी कमी आहे. प्रस्तावित उद्योग आणि नवीन संधी लक्षात घेऊन पारंपरिक महाविद्यालये नाकारण्यात येत आहेत.

दरम्यान, बृहत आराखड्यानुसार सर्वाधिक ५७ प्रस्ताव पारंपरिक अभ्यासक्रमांचे आहेत. पण, त्यांना मान्यता मिळण्याची शक्यता कमी आहे. जेमतेम पाच ते सात महाविद्यालये मंजूर होऊ शकतील. इतर शाखेच्या महाविद्यालयांना मान्यतेच्या संधी आहेत. प्रस्तावित महाविद्यालय सुरू करण्याच्या गावातीच लोकसंख्या, मागणी आणि १५ किलोमीटरच्या अंतराचा नियम, असे अनेक निकष लक्षात घेऊनच मान्यता दिली जाते. त्यामुळे प्रस्तावित पारंपरिक महाविद्यालयांची संख्या जास्त असली तरी मान्यता मिळणे दुरापास्त असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

\Bप्रस्तावित महाविद्यालये\B

प्रस्तावित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांची संख्या भरमसाठ आहे. वैजापूर तालुक्यात जुनी तीन महाविद्यालये असताना नवीन एका महाविद्यलायाच प्रस्ताव आहे. खुलताबाद तीन, गंगापूर चार, पैठण चार, औरंगाबाद चार, सिल्लोड दोन, कन्नड सहा, फुलंब्री दोन अशी तालुकानिहाय प्रस्तावित महाविद्यालयांची संख्या आहे. सध्या कार्यरत असलेल्या महाविद्यालयांचा विचार करता ही संख्या अतिरिक्त आहे. किमान रोजगाराभिमुख महाविद्यालये सुरू करण्याची मागणी आहे.

मागील वर्षी प्रस्तावित १२३ बिंदू असताना फक्त १३ महाविद्यालयांना मान्यता मिळाली. त्यामुळे यावर्षी ५७ पारंपरिक महाविद्यालये असली तरी सर्वांनाच मान्यता मिळेल असे नाही. रोजगाराभिमुख महाविद्यालयांना मान्यता देण्यावर शासनाचा भर आहे.

डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यपदार्थांतील भेसळ गुलदस्त्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सणासुदीच्या दिवसांमध्ये तपासणी मोहिमेंतर्गत खाद्यपदार्थांच्या ५७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. गणेशोत्सवापासून या कारवायांना सुरुवात झाली. मिठाई, खाद्य तेल, खवा-मावा अशा पदार्थांचा यात समावेश आहे. नमुने घेण्याची प्रक्रिया महिनाभरापासून सुरू आहे, मात्र तपासणी अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे.

सणासुदींमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात बाहेरून मिठाईसाठी येणारा खवा, मावासह खाद्यतेल अशा वस्तु येतात. अशावेळी शिजवलेले अन्न, मिठाई, वस्तुंची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विविध दुकानांमध्ये जाऊन अशा वस्तुंचे नमुने ताब्यात घेत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. औरंगाबादसह नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना या जिल्ह्यांमधून हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये १५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. खाद्यतेलासह, मिठाई, खवा, रवा अशा वस्तू, पदार्थांचा समावेश आहे. हे सगळे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. विभागाकडून तपासणीसाठी खाद्यपदार्थांची नमुने घेण्याची प्रक्रिया सुरूच आहे, मात्र अद्याप तपासणीचा अहवाल न आल्याने विभागाला पुढील कारवाई करता आलेली नाही. तपासणीत काही आढळले तर अशा दुकानांना दंड ठोठावण्यात येतो. खाद्यपदार्थाच्या तपासणीत शरीराला अपायकारक मोठे घटक आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येतो. अद्याप ५७ तपासणीचा अहवालच न आल्याने विभागाच्या कारवाईची प्रक्रिया करता आली नाही. अहवाल आल्यानंतरच कारवाईची प्रक्रिया होईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

\Bदुग्धजन्य पदार्थांबाबत अधिक काळजी\B

दुधाच्या पदार्थाबाबत अधिक काळजी घेतली जायला हवी, मात्र अनेक हॉटेलांमध्ये त्याबाबत काळजी घेतली जात नाही. दुधाचे तयार केलेले पदार्थ काही तासांत वापरले जाणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा पदार्थामधून विषबाधा होऊ नये, यासाठी अशा पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यावर भर असणार आहे. शहरातील विविध भागांमध्ये हे नमुने तपासणीसाठी घेतले आणि यापुढे घेतले जातील, असे सूत्रांनी सांगितले.

एकूण तपासणीसाठीचे नमुने : ५७

औरंगाबादमध्ये घेतलेल नमुने : १५

खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्यप्रदार्थ चांगले असावेत, त्यात काही भेसळ नसावी या हेतूने नमुने घेतले जात आहेत. नमुने घेतलेले आहेत, मात्र तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. तोही आठवडाभरात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर कारवाईची प्रक्रिया होईल.

- मिलिंद शहा, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकवर अश्लील पोस्ट; पत्रकाराविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फेसबुकवर महिलांना लज्जा वाटेल; तसेच दोन समाजात तेढ निर्माण होणारा मजकूर टाकल्याबद्दल दिव्य मराठीचा वृत्तसंपादक सुरेश पाटील याच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाटील याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांनी, महिलांनी केली आहे. सोमवारी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची भेट ही मागणी करण्यात आली यावेळी आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

फेसबुकवर टाकण्यात आलेल्या या आक्षेपार्ह पोस्टमुळे ब्राह्मण समाजात संतापाची लाट पसरली आहे. पाटील यांच्यावर कठोर कलमानुसार गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करण्यात यावी, त्यांचे फेसबुक अकाउंट बंद करण्यात यावे आदी मागण्या ब्राह्मण समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या. याप्रकरणी क्रांतीचौक आणि सेलू (जि. परभणी) येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. निवेदन देताना आनंद तांदुळवाडीकर, आशीष सुरडकर, मिलिंद एकबोटे, गीता आचार्य, नेहाली खोचे, सुरेखा पारवेकर, वनीता पत्की, स्मीता जोशी, स्मिता दंडवते, अंजली गोरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला आरोग्य अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फुलंब्रीला आरोग्य अधिकारी असलेल्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी पहाटे उल्कानगरी भागात घडला. डॉ. शलाका रमेश पाटील (वय ३८ रा. फ्लॅट क्रमांक १६, सिंहगड अपार्टमेंट, तिरुपती एक्झिक्युटीव्ह सोसायटी, उल्कानगरी) असे या डॉक्टर महिलेचे नाव आहे. त्या घटस्फोटीत आहेत. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डॉ. पाटील यांच्या पतीचे लातूरला हॉस्पिटल आहे. पतीसोबत पटत नसल्याने त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्या ११ वर्षांच्या मुलासह उल्कानगरीत राहत होत्या. रविवारी रात्री त्या मुलासोबत झोपलेल्या होत्या. पहाटे त्यांच्या मुलाला जाग आली असता आई जवळ दिसली नाही. त्याने स्वच्छतागृहात जाऊन पाहीले असता स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून बंद होता. मुलाने खालच्या मजल्यावर असलेल्या आजी-आजोबांना उठवून हा प्रकार सांगितला. आजी, आजोबांनी वर येऊन स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडला. यावेळी डॉ. पाटील यांनी आतमध्ये शॉवरच्या पाइपला गळफासे घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला. जवाहरनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून, डॉ. पाटील यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुष्काळ जाहीर करा’

$
0
0

औरंगाबाद: मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्ज माफ करावे, अशी मागणी मराठवाडा विकास सेनेने केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाडा निवेदन देण्यात आले. यंदा शेतमालाला भाव नाही, दूध उत्पादकांना जनावरे सांभाळणे कठीण होत आहे, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या उपस्थितीत आज संविधान बचाओ

$
0
0

औरंगाबाद : गेल्या काही वर्षामध्ये देशात झालेल्या विविध घटनांमुळे आपले मुलभूत संवैधानिक अधिकार धोक्यात आले असल्याची भावना नागरिकांमध्ये झाली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला आघाडीने देशभरात संविधान बचाओ, देश बचाओ ही मोहीम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरात मंगळवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जगदगुरू संत तुकाराम नाट्यगृह येथे सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या या मेळाव्यासाठी पक्षाचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, डॉ. पद्मसिंह पाटील, डॉ. फौजिया खान, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, जयप्रकाश दांडेगावकर, राणा जगजितसिंह पाटील, कमल किशोर कदम तसेच मराठवाड्यातील आजी माजी आमदार, सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला नेते यांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यानंतर दुपारी साडेचार वाजता अजित पवार यांच्या हस्ते विविध विष्‍णूनगर वार्डातील विविध विकास कामांचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत अजून ४० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी भरती केल्यामुळे अजून ४० कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून, यात वाढ होण्याची भीती आहे.

पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नगररचना आणि अतिक्रमण हटाव विभागाचे एकत्रिकरण केले. त्यामुळे अतिक्रमण हटाव विभागातील चार कंत्राटी इमारत निरीक्षकांना तात्काळ काढून टाकण्यात आले. हे इमारत निरीक्षक अतिरिक्त ठरत होते. पालिका प्रशासनाने गांधी जयंतीच्या दिवशी नऊ झोनसाठी नऊ नागरिक मित्र पथक स्थापन केले. एका पथकात नऊ माजी सैनिकांचा समावेश करण्यात आला. नऊ पथकांसाठी ८१ माजी सैनिक एक वर्षासाठी नियुक्त करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा सैनिक कल्याण मंडळाशी संपर्क साधून ८१ माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली. ८१ पैकी चाळीस माजी सैनिकांना सुरक्षारक्षक म्हणून नेमले आहे. त्यामुळे खासगी संस्थेच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेले चाळीस सुरक्षारक्षक काढून टाकण्यात आले आहेत. पालिकेच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुमारे एक हजार कर्मचारी कंत्राटीपद्धतीवर आहेत. नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी काही अधिकारी, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नात्यातील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लागेबांध्याची चर्चा देखील होऊ लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक कंत्राटी कर्मचारी आयुक्तांच्या रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’साठी एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) ऐवजी एस्सेल ग्रुप ऑफ कंपनीला मुख्य भागीदार करा, असे नमूद केलेले पत्र औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने आयुक्तांच्या नावे दिले आहे. याशिवाय बँक हमीसाठी राष्ट्रीयकृत बँकेची सक्ती न करता शेड्युल बँकेमार्फत देण्यात येणारी हमी मान्य करावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

समांतर जलवाहिनीच्या 'पीपीपी'तत्वावरील कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या ४ सप्टेबरच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. पालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी हा मंजूर प्रस्ताव राज्य शासन आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पाठवला होता. त्यानंतर कंपनीने पालिका आयुक्तांना पत्र पाठवून भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, 'एसपीएमएल' ऐवजी एस्सेल ग्रुप ऑफ कंपनीला मुख्य भागीदार करा. एस्सेल ग्रुप या प्रकल्पासाठी मुख्य कंपनी म्हणून काम करेल. पालिकेने जलवाहिनीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून जागा मोकळी करून द्यावी. त्यात प्रामुख्याने जलवाहिनी टाकण्यासाठीची जागा ताब्यात घेणे, त्या जागेवरील झाडे आणि विजेचे खांब हटविणे, वन विभागाच्या ताब्यातील जागा मिळवून देणे ही कामे महापालिकेने करून द्यावीत.'

\Bएचडीपीई पाइप वापरणार \B

एचडीपीई पाइप वापरण्याची परवानगी कंपनीने मागितली आहे. हे पाइप अंथरण्यासाठी सोपे असतात, त्यांची किंमतही तुलनेने कमी असते आणि आयुष्य जास्त असते, असे कंपनीने पत्रात नमूद केले आहे. कंपनीने उपस्थित केलेल्या या विविध मुद्द्यांबाबत आयुक्त आणि पदाधिकारी काय भूमिका घेतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरपूर पॅटर्नचे खानापूरकर यांची पालिकेस भेट

$
0
0

औरंगाबाद : शिरपूर पॅटर्नचे जनक जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांनी सोमवारी महापालिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी स्थायी समितीचे सभापती रेणुकादास वैद्य यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची भेट घेतली. औरंगाबादला जायकवाडीच्या नाथसागरातून पाणीपुरवठा केला जातो. केवळ जायकवाडीवर अवलंबून न राहता पाण्याचे अन्य स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे, असे खानापूरकर यांनी आयुक्तांना सांगितले. यावेळी प्रदीप पाटील, प्रमोद खैरनार, किशोर शितोळे, प्रदीप देशपांडे, संजय कापसे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता सरताजसिंग चहल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरगाव घाट येथे पंकजांचा दसरा मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संत भगवानबाबा यांचे जन्मगाव सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. यानिमित्ताने भगवानबाबा यांच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात येत असून लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत महंतासह बीडच्या पालकमंत्री पकंजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे यांच्या संकल्पनेतून सावरगाव येथे तीन एकर परिसरात संत भगवानबाबा यांचे स्मारक तयार केले आहे. यात एक मोठा जलकुंभ बांधला असून त्याच्या मध्यभागी भगवानबाबांची ज्ञानेश्वरी वाचत असलेली मूर्ती बसविण्यात येणार आहे. दसऱ्याला (१८ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता या स्मारकाचे लोकार्पण व त्यानंतर दसरा मेळाव्यास प्रारंभ होणार आहे. सोहळ्यानिमित्त पैठण, नाशिकसह विविध तीर्थस्थळांतून कलश आणण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी विविध ठिकाणचे संत, महंतांना आमंत्रित केले आहे. गेल्या वर्षीच्या दसऱ्या मेळाव्याला नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. यंदाही औरंगाबाद, मराठवाड्यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून भाविक येणार आहेत, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली. या मेळाव्याला डॉ. नामदेव शास्त्री महाराज हे येणार नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यावेळी हेमंत खेडकर, राजू सानप, मिठूशेठ सानप, मोहन आघाव, राम बुधवंत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णपुऱ्यातील खेळणीला फिटनेस प्रमाणपत्र सक्तीचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्णपुरा येथे नवरात्रौत्सवानिमीत्त बुधवारपासून मोठ्या यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेमध्ये मुलांसाठी यांत्रिक खेळणी मोठ्या प्रमाणावर येते. सुरक्षिततेच्या दृष्टीने या खेळण्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागणार असून, यानंतर पोलिस प्रशासन या खेळण्यांना परवानगी देणार आहे.

कर्णपुरा मैदानावर नवरात्रामध्ये पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा भरवण्यात येते. दहा दिवसांत सुमारे लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी सहकुटुंब गर्दी करतात. यात्रेमध्ये मोठे रहाट पाळणे, ब्रेक डान्स झुला, जंबो झुला. मेरी गो राउंड, टॉय ट्रेन आदी यांत्रिक खेळणी येतात. शहरातील टीव्ही सेंटर भागात दोन वर्षांपूर्वी टॉय ट्रेनच्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शहरात आनंदनगरी व कर्णपुरा यात्रेत येणाऱ्या यांत्रिक खेळण्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यंदाच्या यात्रेतील यांत्रिक खेळण्यांना देखील फिटनेस प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. छावणी पोलिसांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या यांत्रिक खेळण्याची पूर्णपणे तपासणी केल्यानंतर ती खेळणी चालवण्यासाठी योग्य आहे का नाही, याचे प्रमाणपत्र देतील. हे प्रमाणपत्र छावणी पोलिसांना दिल्यानंतर त्यांच्याकडून ही खेळणी सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकवर अश्लील पोस्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फेसबुकवर महिलांना लज्जा वाटेल; तसेच दोन समाजात तेढ निर्माण होणारा मजकूर टाकल्याबद्दल पत्रकार सुरेश पाटील याच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाटील याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांनी, महिलांनी केली आहे. सोमवारी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची भेट ही मागणी करण्यात आली यावेळी आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

फेसबुकवर टाकण्यात आलेल्या या आक्षेपार्ह पोस्टमुळे ब्राह्मण समाजात संतापाची लाट पसरली आहे. पाटील यांच्यावर कठोर कलमानुसार गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करण्यात यावी, त्यांचे फेसबुक अकाउंट बंद करण्यात यावे आदी मागण्या ब्राह्मण समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या. विविध संघटनांचे प्रतिनिधी; तसेच महिला मोठ्या प्रमाणावर आयुक्तालयात जमा झाल्या होत्या. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी केबिनच्या बाहेर येत शिष्टमंडळाची भेट घेत निवेदन स्वीकारले. यावेळी आनंद तांदुळवाडीकर, आशीष सुरडकर, मिलिंद एकबोटे, सचिन वाडे पाटील, पंकज पाठक, अभिषेक कादी, सुधीर नाईक, मिलिंद पिंपळे, अनिरुद्ध गावपांडे, आकाश हर्सूलकर, गीता आचार्य, नेहाली खोचे, सुरेखा पारवेकर, वनीता पत्की, स्मीता जोशी, स्मिता दंडवते, अंजली गोरे, केदार डांगे, मंदार देसाई, कुणाल वैद्य, सुरेश देशमुख, अनिल पैठणकर, श्रीरंग जोशी, अनिल मुळे, उल्हास अकोलकर, प्रमोद कुलकर्णी, मोरेश्वर सदावर्ते यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images