Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पुंडलिकनगर जलकुंभावरील तांत्रिक बाजू तपासणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पुंडलिकनगरच्या जलकुंभावरून सिडको एन ३, एन ४ भागाला पाणीपुरवठा करण्याच्यासाठी जलवाहिनी टाकण्याच्या कामाची तांत्रिक बाजू तपासून अहवाल सादर करा,' असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

पुंडलिकनगर जलकुंभावरून सिडको एन ३, एन ४ भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र, या कामासाठी पुंडलिकनगर, हनुमाननगरच्या नागरिकांचा व नगरसेवकांचा विरोध आहे. स्वतंत्र जलवाहिनी टाकल्यास पुंडलिकनगर - हनुमाननगर व परिरसाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल, अशी या भागातील नागरिकांची भीती आहे. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याच्या मुद्यावरून दोन - तीन वेळा संघर्षाचे प्रसंग या भागात निर्माण झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी हनुमाननगरात नागरिकांची बैठक घेवून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यास विरोधही केला. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याचा मुद्दा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुंडलिकनगर, हनुमाननगरसह सिडको एन ३, एन ४ भागातील नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. बैठकीला आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह अठरा नगरसेवकांची उपस्थिती होती. पुंडलिकनगरच्या जलकुंभावरून सिडकोसाठी जलवाहिनी टाकणे तांत्रिकदृष्ट्या कितपत योग्य आहे, याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी महापौरांनी महापालिकेचे पाणीपुरवठा विषयीचे तज्ज्ञ सल्लागार राजेंद्र होलानी यांना दिले. होलानी यांचा अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तोपर्यंत दोन्ही बाजूचे नगरसेवक व नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...टीवी पे ब्रेकिंग न्यूज हाय रे मेरा घागरा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\B'हाय बगदाद से लेके

दिल्ली वाया आगरा

टीवी पे ब्रेकिंग न्यूज

हाय रे मेरा घागरा...'

\Bलाखो रसिकांची दिल की धडकन माधुरी दीक्षित आणि रणवीर कपूरच्या या गाण्यावर थिरकण्यासाठी नवरात्रोत्सवात तरुणाई सज्ज झाली असून, मुलींसाठी काठेवाडी पॅटर्न, कच्छी पॅटर्न तर मुलांसाठी काठेवाडी कुर्ते, फेटा, धोती, थ्री-पीसला मागणी वाढली आहे.

नवरात्रीमध्ये दंडियाचा धमाल अनुभव घेण्याचे वेध युवावर्गाला लागले आहेत. त्याची तयारी म्हणून पोशाष खरेदीसाठी गुलमंडी, टिळकपथ येथील कापड दुकानात चांगली गर्दी होत आहे. अनेक दुकानांमध्ये राजस्थानी पेहराव, दागिने दुकानाच्या दर्शनीय भागात लावण्यात आले आहेत. त्यात मुलींसाठी घागरा, चनिया चोली याबरोबरच जि‌मी, सनेडा, लाचा, काठेवाडी पॅटर्न, कच्छी पॅटर्न असे प्रकार उपलब्ध आहेत. मुलांसाठी केडिया ड्रेस, कुर्ता पायजमा, धोती पँट, झब्बा, जॅकेट, थ्री-पीस असे प्रकार आहेत. घागरा ओढणी ३५० रुपयापासून ते दोन हजार ५०० रुपयांपर्यंत, तर केडिया ड्रेस साइजनुसार साडेतीनशे ते दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. विविध प्रकारच्या दागिने खरेदीसाठीही दुकानात गर्दी होत आहे.

\B'पद्मावत'ची जादू...

\B'पद्मावत' चित्रपटात दीपिका पदुकोनने घागरा घालून केलेले घूमर नृत्य अजूनही रसिकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे या घागऱ्याला मुलींमध्ये जोरदार मागणी आहे,' अशी माहिती टिळकपथ येथील विक्रेते नीमेश ठक्कर यांनी दिली. 'बाजारात असे पोषाख भाडेतत्त्वावरही देण्यात येतात. त्यासाठी अनेकांनी आत्तापासून अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून ठेवली आहे,' अशी माहिती व्यावसायिक योगेश मालाणी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारीचा धाक दाखविणारे मोक्का कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घे, असे म्हणत तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण करत धक्का-बुक्की करणाऱ्या चौघांनाना जिन्सी पोलिसांनी मोक्का कलमांतर्गत अटक केली. त्या टोळीला मोक्काचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या समोर हजर करण्यात आले असता त्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत मोक्काची कोठडी सुनावली.

किरडपुरा भागात राहणाऱ्या मुस्मीन खानम अन्वर यांच्या पतीस दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यामुळे त्यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यावेळी इरशाद व त्याच्या साथीदाराने प्राणघातक हल्ला केला होता. या इरशाद विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, ही तक्रार मागे घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत १२ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शेख इरशाद शेख इब्राहिम (२५, बाबर कॉलनी) महमद खलील उर्फ शेरू महमद शफी (२४, बारी कॉलनी) शेख अजहर उर्फ मच्छी शेख मजहर (२१, किराडपुरा) शेख एजाज शेख इब्राहीम (२५, कटकटगेट) यांच्यासह आठ ते दहा जणांनी घरात शिरून तलवार, चाकू, चॉपरचा धाक दाखवित शिवीगाळ करून धक्का-बुक्की केली होती. या टोळक्याच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत होते.

या गुन्ह्याचा तपास करताना इरशाद हा गँग चालवित असल्याचे लक्षात आल्यावर त्या दिशेने सहायक पोलिस आयुक्त गुणाजी सावंत यांनी त्या टोळीच्या विरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्याची परवानगी न्यायालयास मागितली. न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर सावंत यांनी त्या चौघांना ताब्यात घेऊन, त्याची चौकशी करून मोक्काच्या विशेष न्यायालया समोर हजर केले.

\B'आरोपींकडून हत्यारे जप्त'\B

मोक्काचे विशेष सरकारी वकिल राजू पहाडिया यांनी, आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, त्यांनी परिसरामध्ये तलवार, चाकू चॉपर, हॉकी स्टिकचा वापर करीन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. इरशादचे अन्य साथीदारांचा शोध घ्यायचा आहे, त्यांनी या गुन्हेगारीच्या पैसावर चल-अचल मलमत्ता जमा केली आहे का, याचा तपास करायचा असल्यामुळे मोक्काची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती केली. न्यायालयाने ही विनंती ग्राह्य धरून त्या टोळीला १४ ऑक्टोबरपर्यंत मोक्काची कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑक्टोबर हिट’ला लोडशेडिंगचा तडका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढत असताना राज्यातील वीज निर्मिती घटल्याने महावितरणने लोडशेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सोमवारी (८ ऑक्टोबर) शहरातील जी १, जी २ व जी ३ गटातील फिडरवर पावणे आठ ते नऊ तासांच लोडशेडिंग करण्यात आले. याचा फटका सुमारे ६९ हजार वीज ग्राहकांना बसला. या शिवाय ग्रामीण भागातही लोडशेडिंग करण्यात येत आहे.

कोळशाअभावी गेल्या वर्षी वीजनिर्मिती घटल्याने लोडशेडिंग करावे लागले होते. सध्या मागणीच्या तुलनेत वीज पुरवठा होत नसल्याने महावितरणने अचानक लोडशेडिंगचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरपासून ऊन वाढत असल्याने कुलर व पंख्याचा वापर वाढला आहे. या काळात महावितरणने अचानक लोडशेडिंगचा निर्णय घेतल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. शिवाय पाऊस नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी ग्रामीण भागातूनही विजेची मागणी वाढली आहे. ग्रामीणमध्ये गावठाणमध्ये लोडशेडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

.....................

……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्डा चालविणारा वैजापूरमध्ये अटक

$
0
0

वैजापूर : कल्याण मटका जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गणेश शांतीलाल राजपूत (रा. कादरीनगर, वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे. येथील आठवडी बाजारात, सोमवारी तो अड्डा चालवत होता. याप्रकरणी हवालदार विजय खोकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजपूत याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक चव्हाण हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफ न भरल्यामुळे दोन कंपन्यांवर गुन्हे

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील दोन कंपन्यांनी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरला नसल्याने पीएफ कार्यालयाने कंपनी मालक व व्यवस्थापकाविरुद्ध सोमवारी (आठ ऑक्टोबर) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सिद्धी इंजिनीयरिंग (प्लॉट क्रमांक एम ४८, वाळूज एमआयडीसी) या कंपनीने त्यांच्याकडील ४५ कामगारांचा मे २०१६ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत जमा झालेला तीन ९३ हजार ४४० रुपये भरला नाही; तसेच नारगोलकर प्रेस (प्लॉट क्रमांक ए १०) या कंपनीने ऑगस्ट २०१७ ते ऑगस्ट २०१८ या काळातील १४ कामगारांचा ३ लाख ६३ हजार १२ रुपये भविष्य निर्वाह निधी भरला नाही़ या दोन्ही कंपन्यांच्या विरोधात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे़ कंपनीने कामगारांच्या पगारातून कपात केलेला १२ टक्के व कंपनीचा हिस्सा असा मिळून दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलानद्वारे भरणे गरजेचे आहे़ याविषयी सिद्धी इंजिनीयरिंग कंपनीला पीएफ भरण्यासाठी कार्यालयाकडून नऊ जुलै रोजी नोटीस देण्यात आली होती. नारगोलकर प्रेस या कंपनीला २४ एप्रिल रोजी लेखी नोटीस देण्यात आली होती़ या दोन्ही कंपन्याना वारंवार लेखी; तसेच तोंडी सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र त्यानी याकडे दुर्लक्ष करून पीएफचा भरणा केला नाही चौकशी केल्यावर तसे निष्पन्न झाल्याने, त्यांनी कामगारांची फसवणूक केली आहे़ यासंदर्भात पीएफ कार्यालयाचे अधिकारी मुक्तेशवर गौरीशंकर व्यास यांच्या तक्रारीवरून सिद्धी इंजिनीयरिंग कंपनीचे मालक अनुपमा संजय पाटील (रा़ श्रेयनगर, औरंगाबाद) व व्यवस्थापक संजय झीप्रू पाटील व नारगोलकर प्रेस कंपनीचे मालक अमोल प्रमोद नारगोलकर (रा़ पुणे) यांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान १ चौकटी - २८६ महसूली मंडळांवर दुष्काळाची छाया

$
0
0

\Bमराठवाड्यातील पाऊस\B

एकूण मंडळे ४२१

८१ मंडळांत २५ ते ५० टक्के पाऊस

२०४ मंडळांत ५० ते ७५ टक्के पाऊस

१०३ मंडळांत ७५ ते १०० टक्के पाऊस

३२ मंडळांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस

-औरंगाबाद जिल्ह्यातील २२, बीड जिल्ह्यातील २५, जालना जिल्‍ह्यातील ९ मंडळांत निम्म्यापेक्षा कमी पाऊस

बीड जिल्ह्यातील एका मंडळात २५ टक्क्यापेक्षा कमी पाऊस पडला आहे.

.....

\Bप्रकल्पातील पाणीसाठा \B

मोठे प्रकल्प (११) १९२२.२३ दलघमी (३७.३८ टक्के)

मध्यम प्रकल्प (७५) २१३.४०६ दलघमी (२२.७२ टक्के)

लघु प्रकल्प (७४५) ३६१.७७२ दलघमी (२२.१३ टक्के)

एकूण प्रकल्प ८६४, २६२८.०७ दलघमी पाणीसाठा (३२.८५ टक्के)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सळईचा ट्रक पळवणारी टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना रोडवरून चालकाला मारहाण करून सळईचा ट्रक पळवण्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दरोडा टाकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, हा ट्रक जप्त करण्यात आला आहे.

या घटनेत ट्रकचालक जुबेर अहेमद रफीक अहेमद (रा. मालेगाव) हा जालना येथून सळईचा माल घेऊन नाशिककडे जात होता. यावेळी रात्री पावणेबाराच्या सुमारास शेंद्रा शिवारातील घराना फर्निचरसमोर ट्रकच्या पुढे आरोपींनी जाप आडवी लावली होती. चालक जुबेरला ट्रकमध्ये शिरून मारहाण करण्यात आली. त्याच्या ताब्यातील रोख पाच हजार रुपये व मोबाइल काढून घेण्यात आला. हा ट्रक पळवून जुबेरला लासूर स्टेशन शिवारात फेकून देण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके युद्धपातळीवर तपास करीत होती.

या गुन्ह्यामध्ये साबेरखान शब्बीरखान पठाण (वय २७, रा. रसुलपुरा, ता. खुलताबाद) याने साथीदाराच्या मदतीने केला असल्याची माहिती पथकांना मिळाली. हडको येथील एका बियरबारमधून साबेरखानला ताब्यात घेण्यात आले. साबेरखानने या गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची माहिती दिली. पोलिसांनी शोध घेत इतर आरोपी शेख सलीम शेख बाबू (वय ३५, रा. रोजेबाग), सोहेल सत्तार तांबोळी (वय २७, रा. लोटाकारंजा), नासेरखान शब्बीरखान पठाण (वय २४, रा. रसूलपुरा), शेख जफर शेख सिकंदर (वय २९, रा. रोजेबाग) व अमित प्रकाश देशमुख (वय ३७, रा. सुंदरवाडी ता. औरंगाबाद) यांना अटक केली. आरोपींनी बीड हायवेवर सोडून दिलेला सळईचा ट्रक देखील जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर, डीवायएसपी अशोक आमले, जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय सचिन कापुरे, भगतसिंग दुलत, विवेक जाधव, गणेश जाधव, वसंत लटपटे, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, गणेश मुळे, संजय काळे, विठ्ठल राख, बाळू पाथरीकर, शेख नदीम, सागर पाटील, किरण गोरे, संजय भोसले, बाबासाहेब नवले, विनोद तांगडे, योगेश तरमळे, ज्ञानेश्वर मेटे व संजय तांदळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन बिल्डरांना एका वर्षाचा कारावास

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने तीन बिल्डरांना दोषी ठरवून त्यांना एक वर्ष साधा कारावास, अडीच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य किरण ठोले व संध्या बारलिंगे यांनी दिला. शमीम बानो हसन अली चाऊस, मोहम्मद युसूफ सज्जाद खान आणि गाझी खनीत अहसान गाझी अशीर अहेमद अशी बिल्डरांची नावे आहेत.

ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २७ नुसार फौजदारी कारवाई करण्यासाठी संजीव जगन्नाथ जाधव यांनी मंचामध्ये अर्ज दाखल केला होता. भगतसिंगनगरमधील अमन प्लाझामधील फ्लॅट क्र. १० हा रहाण्यास सर्व दृष्टीने योग्य आहे. याचा ताबा तक्रारदारास द्यावा आणि तक्रारदाराने फ्लॅटचा ताबा घेतेवेळी ३९ हजार ९०० रुपये डिमांड ड्राफ्टने बिल्डरांना अदा करावी, असे निर्देश राज्य आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने ३० जून २०१७ रोजी दिले होते. या बिल्डरांनी तक्रारदारास ४० हजार रुपये नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च म्हणून दहा हजार रुपये देण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. आरोपींनी आदेशाचे पालन केले नाही किंवा आदेशाचे पालन करण्याबाबत तयारीही दर्शविली नाही, असे मत मंचाने व्यक्त केले. त्यामुळेच हे तिन्ही आरोपी शिक्षेस पात्र आहेत. आरोपी हे सराईत गुन्हेगार नाहीत. त्यामुळे त्यांना दया दाखवावी आणि कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती आरोपीचे वकील ए. एम. मामीडवार यांनी केली. आरोपींनी आजपर्यंत आदेशाची पूर्तता केली नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्याचे आदेश मंचाने दिले. तक्रारदाराची बाजू राहुल जोशी यांनी मांडली.

अर्ज नामंजूर

या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने मंचाने या तीन बिल्डर आरोपींविरुद्ध समन्स जारी केले. आरोपींनी जिल्हा मंचात हजर राहून जामीन घेतला. मंचाने या आरोपींचा उलटतपासणीचा हक्क काढून घेण्याचा आदेश दिला. आरोपींनी दोन जणांना साक्षीदार म्हणून तपासणीची परवानगी द्यावी, असा अर्ज दिला होता. हा अर्जही मंचाने नामंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारला धडक देणाऱ्यास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

वाहतूक सिग्नल उभ्या असलेल्या कारला पाठीमागून धडक देऊन नुकसान करणाऱ्या वाहनचालकास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी आज सोमवारी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली.

कासलीवाल मार्बल येथे राहणारे प्रकाशसिंह कच्छवाह हे दहा जून २०१४ रोजी सायंकाळी चार वाजता कारने क्रांतीचौकाकडे निघाले. बाबा पेट्रोल पंपाकडून क्रांतीचौकाकडे जाण्यासाठी अदालत रोडच्या वाहतूक सिग्नलवर ते थांबले होते. त्यावेळी पाठीमागून राजकुमार ट्रॅव्हल्सची बस वेगात आली. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने समोर उभी असलेल्या कारल धडक दिली. कच्छवाह यांच्या तक्रारीवरून वाहनचालक नंदकिशोर त्र्यंबक भालेराव (४०, रेल्वे स्टेशन) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांच्यासमोर झाली असता सरकारी वकील योगेश शिवाजी तुपे यांनी तीन साक्षीदार तपासले. न्यायलयाने भारतीय दंड संहितेच्या २७९ कलमान्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, भारतीय दंड संहितेच्या ४२७ कलमान्वये कोर्ट उठपर्यंत शिक्षा, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्हा बँकेचे संचालक अडचणीत

$
0
0

म. टा . प्रतिनिधी ,औरंगाबाद

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या साडेआठ कोटींच्या कर्जमाफी प्रकरणात कोर्टात करण्यात आलेला सी-समरी अहवाल मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एन. पाटील यांनी नामंजूर केला. यामुळे बँकेचे संचालक अडचणीत आले आहेत. तक्रारदार सदाशिव गायके यांच्या मदतीने पुन्हा चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

कर्ज निर्लेखित करण्यासंदर्भातील गाइड लाइन्स पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आठ जून रोजी १३२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदाशिव अंबादास गायके दिलेल्या तक्रारीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध सहकारी संस्थांना आठ कोटी ५२ लाखांचे कर्ज वाटप केले होते. हे कर्ज २०११ ते २०१४ या कालावधीत संचालक मंडळाने बँकेचे विधी अधिकारी व चार्टर्ड अकाउंटंटशी संगनमत करून कर्ज माफ केल्याचा त्यांचा आरोप आहे. बँकेचे संचालक, विधी अधिकारी, सीए आणि सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, विद्यमान आमदार अब्दुल्ल सत्तार, संदीपान भुमरे यांचा त्यांच्यात समावेश आहे. पोलिसांनी संचालक मंडळाचे जबाब नोंदवले आहेत.

तक्रारदार गायके यांनी औरंगाबाद खंडपीठात हे प्रकरण सीआयडीकडे सोपवावे यासाठी धाव घेतली. या गुन्ह्यांत चौकशी अधिकारी श्रीकांत नवले यांनी घाईघाईने कोर्टात सी-समरी दाखल केली होती. गायके यांनी याला आव्हान दिले होते. कोर्टाने दुसऱ्यांदा सी-समरी अहवाल फेटाळून लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरासह ग्रामीणमध्येही लोडशेडिंग सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणने लोडशेडिंग सुरू केल्यामुळे ऐन ऑक्टोबर हिटमध्ये नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार आहे. ऐन सणांच्या काळात जी १, जी २ व जी ३ गटातील फिडरवर पावणे आठ ते नऊ तासांचे लोडशेडिंग होणार असल्याने व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तिन्ही गटात छावणी, पॉवर हाऊस, शहागंज, क्रांतीचौक, चिकलठाणा आणि सिडको भागातील २६ फिडरचा समावेश आहे.

शहरातील जी १ गटातील फिडरवर सोमवारी सात तास ४५ मिनिटांचे लोडशेडिंग करण्यात आले. जी २ फिडर साडे आठ तास, तर जी ३ फिडरवर सव्वा नऊ तासांचे लोडशेडिंग करण्यात आले. ग्रामीण भागातील गावठाणात लोडशेडिंगसाठी जी १ ते जी ३ मध्ये ए आणि बी अशी वर्गवारी केली आहे. जी १ ए आणि बी मध्ये दिवसाला पावणे आठ तास, जी २ ए आणि बी मध्ये पावणे नऊ तास, जी ३ ए आणि बी मध्ये सव्वा नऊ सातांचे लोडशेडिंग करण्यात येत आहे.

………

\Bलोडशेडिंगचे वेळापत्रक \B

\Bशहर\B

जी १ - सकाळी ६ ते १०, दुपारी ३.४५ ते ७. ३०

जी २ - सकाळी ६ ते १०.३०, दुपारी ३.३० ते ७.३०

जी ३- सकाळी ६ ते १०.४५, दुपारी ३ ते ७.३०

\Bग्रामीण \B

जी १ ए- पहाटे ५.३० ते ८.१५, दुपारी १२ ते ३, सायं ६ ते रात्री ८.३०

जी १ बी- सकाळी ८.३० ते ११.१५, दुपारी २ ते ५, सायं ७ ते ९

जी २ ए- सकाळी ५.१५ ते ८.१५, सकाळी ११ ते दुपारी २, सायं. ६.३० ते रात्री ९

जी २ बी- सकाळी ७.३० ते १०.३०, दुपारी १ ते ४, सायं ७ ते रात्री ९.३०

जी ३ ए- पहाटे ५ ते सकाळी ८, सकाळी १०.३० ते दुपारी १.४५, सायं. ६.३० ते ९.३०

जी ३ बी- सकाळी ६.३० ते ९.३०, दुपारी १२.३० ते २.४५, सायं. ७ ते रात्री १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईप्रश्नी आयुक्त घेणार विभागनिहाय आढावा

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात अत्यल्प पावसामुळे काही जिल्ह्यांत टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने उपाययोजना व आढावा घेण्यासाठी गुरुवारपासून (११ ऑक्टोबर) विभागनिहाय बैठका घेणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

'दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. येत्या काही दिवसांत सिंचन, कृषी, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आदी विभागांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षातील माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. धरणातून पाणीचोरी आदींचा आढावा घेण्यात येणार आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये विविध विभागांच्या घेण्यात येणाऱ्या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची तसेच पिकांची स्थिती, पाऊस खंड आदींचा आढावा घेऊन अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी काही दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयात टंचाई निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाच्या माध्यमातून मराठवाड्यातील पावसाचा खंड, दुष्काळ घोषित करण्याच्या कार्यपद्धतीच्या तरतुदीनुसार सप्टेंबर २०१८ अखेर पर्यजन्यमान, वनस्पती निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण यांचा अहवाल जिल्हास्तरीय समितीकडून प्राप्त करून शासनास सादर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरमध्ये गतिमंद मुलीवर परप्रांतीयाचा बलात्कार

$
0
0

लातूर

गुजरातमध्ये १४ महिन्यांच्या एका चिमुरडीवर बलात्कार झाल्यानंतर उत्तर भारतीयांविरुद्ध हिंसा उसळली असतानाच लातूरमध्ये एका गतिमंद मुलीवर परप्रांतीय व्यक्तीनं बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

लातूरमधील शिरुरअनंतपाळ तालुक्यातील शिराळा वांजरवाडा या ठिकाणी गतिमंद मुलीवर परप्रांतीय व्यक्तीनं बलात्कार केला. आरोपी महंमद कुरेशी (वय २४) ला पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील अलिगडचा रहिवासी आहे. तो या ठिकाणी मिक्सर विकण्याचं काम करतो. महंमद कुरेशी मिक्सर विकण्यासाठी शिराळा वांजरवाडा वस्तीवर आला होता. घरात मुलगी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत त्यानं पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. घरात कोणी नाही हे पाहून त्यानं घरात एकट्या गतिमंद मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. मुलीने हा सर्व प्रकार पालकांना सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे.

पालकाने मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले व घडलेला सर्व प्रसंग पोलिसांना सांगितला. पोलिसांनी थोडाही वेळ न दवडता लगेच सूत्रे हलवली. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात आले. आरोपीला पीडित मुलीसमोर आणल्यानंतर तिनं आरोपीला ओळखले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी महंमद कुरेशीला तासाभरातच अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरात्रौत्सवानिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बुधवारपासून शहरात नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. कर्णपुरा येथील यात्रेला देखील प्रारंभ होणार आहे. या काळात महिला व तरुणीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या बंदोबस्तामध्ये २ उपायुक्त, सात एसीपी, ३४ पोलिस निरीक्षक, ८४ एपीआय, पीएसआय, दोन हजार ६२९ पुरुष कर्मचारी, १९४ महिला कर्मचारी, ३०० पुरुष होमगार्ड, ५० महिला होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन प्लॅटून, साध्या वेशातील ३४ कर्मचारी, गुन्हेशाखा व विशेष शाखेचे ८० कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच कर्णपुरा यात्रेच्या ठिकाणी दोन वॉच टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरे व अग्निशमन दलाची दोन वाहने तैनात करण्यात आली आहेत. विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पसार आरोपी २० दिवसानंतर पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0

मोठी सिंगल

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

हायवाचालक नितीन उर्फ बाळू घुगे खून प्रकरणातील पसार प्रमुख आरोपी नील पाटीलसह त्याच्या दोन साथीदारांना सिडको पोलिसांनी अटक केली. २० सप्टेंबर रोजी काल्डा कॉर्नर भागात फॅन चोरल्याच्या कारणावरून बाळूला बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सिडको पोलिसांनी एका आरोपीला याआधीच अटक केली आहे.

जाधववाडी भागातील बाळू घुगे हा तरूण मनोज डव्हारे याच्या मनपाच्या कचरा उचलणाऱ्या हायवा वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. बाळू हा काही दिवस मनोजचा मित्र निळकंठ पाटील याच्या काल्डा कॉर्नर फ्लॅटमध्ये राहत होता. त्यानंतर त्याने फ्लॅट सोडला होता. दरम्यान, २० सप्टेंबर रोजी बाळू घुगेला मनोजने कारमध्ये काल्डा कॉर्नर येथील फ्लॅटमध्ये नेले. फॅन चोरल्याच्या कारणावरून नील पाटीलने बाळूला बेदम मारहाण केली. यानंतर रात्रीच त्याला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी चोरट्यांनी मारल्याचा बनाव मनोजने केला होता. मात्र बाळूच्या भावाने याप्रकरणी घातपाताची शंका व्यक्त केली होती. गुन्हे शाखेने मनोज डव्हारेला अटक केल्यानंतर त्याने बाळूचा मारहाणीत मृत्यू झाल्याची कबुली दिली. या घटनेनंतर नील पाटील, मनोज डव्हारे त्यांचे साथीदार शुभम पाटील व दत्ता भांगे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गेल्या २० दिवसांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. हे आरोपी पुण्याला असल्याची माहिती सिडको गुन्हे प्रकटीकरण पथकाला प्राप्त झाली होती. मंगळवारी पहाटे नील पाटील, शुभम पाटील व दत्ता भांगे उर्फ कैलास सटारे यांना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टसिटी मिशनमधून स्मार्ट पाणी पुरवठा करा

$
0
0

'स्थायी'च्या बैठकीत नगरसेवकाची सूचना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्टसिटी मिशनमधून स्मार्ट पाणी पुरवठा करा, अशी सूचना स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेविका राखी देसरडा यांनी केली. ग्रीनफिल्डच्या निधीतून हे काम करणे शक्य आहे, असे त्या म्हणाल्या.

राखी देसरडा म्हणाल्या, स्मार्टसिटी मिशनमधील ग्रीनफिल्डचा निधी पॅनसिटीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रीनफिल्डचा पैसा ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी खर्च केला जाणार असल्याचे समजले आहे. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाले तरी ते काम तीन वर्ष पूर्ण होणार नाही. त्यामुळे पाण्याची समस्या क्रमांक एकची समस्या आहे. ऐतिहासिक वास्तूंसाठी खर्च केले जाणारे ३०० कोटी रुपये समांतर जलवाहिनीच्या कामात वळवा आणि स्मार्ट पाणी पुरवठा करा, अशी मागणी त्यांनी केली.

सभापती रेणुकादास वैद्य म्हणाले, 'ग्रीनफिल्डचा निधी वळवला जाणार नाही. तशी तरतूद देखील नाही. स्मार्ट पाणी पुरवठ्याची तुमची सूचना योग्य आहे. स्मार्टसिटीचे काही पैसे पाणी पुरवठ्यासाठी वळवता येतील का याबद्दल एसपीव्हीच्या बैठकीत सूचना केली जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबसचा लोगो सोमवारी ठरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्मार्टसिटी मिशन'च्या सिटी बसचा लोगो सोमवारी ठरणार आहे. लोगो ठरविण्याबद्दल मंगळवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आरटीओ आणि एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. लोगो ठरविण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत ३५० पेक्षा जास्त स्पर्धकांचे डिझाइन प्राप्त झाले आहेत. त्यांचे परीक्षण करून शासकीय कला महाविद्यालयाच्या शिक्षकांनी दहा चित्रे निवडली. त्यापैकी एक डिझाइन सोमवारी अंतिम केले जाणार असून त्यासाठी समितीची बैठक होणार आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक शहराचे प्रतिबिंब उमटणारे डिझाइन स्वीकारले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीचा टक्का घसरल्याने अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

मालमत्ता कर वसुलीचा टक्का घसरल्यामुळे व केवळ तीन-चार टक्के वसुली झाल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वसुलीसाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात नगरसचिव डी. डी. सूर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहेमद आणि अस्थापना विभागाचे जक्कल यांच्या वसुलीचे प्रमाण तीन - चार टक्केच असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या तिन्हीही अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. वॉर्ड अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर खुर्ची उगारणारे लिपिक सुरे यांना निलंबित का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज घटस्थापना; घटस्थापनेचा मुहुर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. पहाटे पाचपासून दुपारी एक वाजून ३६ मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येईल, अशी माहिती पुरोहित रामकृष्ण बारहाते यांनी दिली. सकाळी सात वाजून २६ मिनिटांनी प्रतिपदा समाप्ती होत असली तरी दुपारी एक वाजून ३६ मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कर्णपुरा येथील मंदिरात पहाटे तीन वाजता महापूजा, महाआरती, सकाळी साडेसात वाजता परंपरेनुसार दानवे कुटुंबियांच्या हस्ते घटस्थापना होईल, अशी माहिती कर्णपुरा नवरात्र उत्सव महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images