Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कुलगुरूंचे दणके व्हायरल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कंत्राटी कामगारांचे आंदोलन पोलिसांना बोलावून संपवा, 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांना दणके देऊन बाहेर ओढले,' असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचे संतापजनक वक्तव्य असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. पाण्यासाठी रात्री आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींच्या आंदोलनाची कुलगुरुंनी 'हौशा-गवशांचे आंदोलन' म्हणत हेटाळणी केली आहे. ही क्लिप पसरल्यानंतर विद्यापीठ वर्तुळात संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नवनवीन घोषणांनी नेहमी चर्चेत राहणारे कुलगुरू डॉ. चोपडे ऑडिओ क्लिपने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. व्यवस्थापन परिषदेची बैठक झाल्यानंतर मंगळवारी निकटवर्तीयांशी चर्चा करताना चोपडे यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये कथित क्लिपमध्ये आहेत. यावेळी कुलगुरू चोपडे यांच्यासोबत विजय, शंकर नावाच्या व्यक्ती व एक महिला आहे. या चौघांचा संवाद ऑडिओ क्लिपद्वारे बाहेर आला. 'विद्यापीठातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन पोलिस आयुक्तांशी चर्चा करून संपवा. संबंधित कर्मचारी विद्यापीठाचे नसून त्यांच्या मागण्या नियमबाह्य आहेत. त्यांना अटक करून जेलमध्ये टाका,' असे चोपडे फोनवर सांगत आहेत. या वक्तव्याचे कामगारांमध्ये तीव्र पडसाद उमटले. 'लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही कुलगुरू आंदोलन उधळण्याची भाषा करतात हे दुर्दैव आहे. आंदोलन मोडीत काढणे ही हिटलरशाही आहे,' असे उपोषणार्थी कामगार किरणराज पंडित यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी वसतिगृहातील विद्यार्थिनींनी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनावर चोपडे यांनी शेलक्या शब्दात नाराजी व्यक्त केली. 'अशा आंदोलनात हौशे-गवशे-नवशे लोक येतात अन् फोटो काढतात. या ठिकाणी काहीही चाललेले असते,' असे चोपडे म्हटल्याचे ऑडिओ क्लिमध्ये स्पष्टपणे ऐकू येते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वसतिगृहातील समस्यांवर कुलगुरूंच्या दालनात आंदोलन केले होते. यावेळी आंबेडकरवादी संघटना आणि अभाविप यांच्यात वाद झाला होता. याबाबत बोलताना कुलगुरुंनी 'सचिनने त्यांना दणके दिले, बाहेर ओढले,' असे वक्तव्य केले; तसेच काही कार्यकर्त्यांच्या हिमतीचे कौतुक केले आहे. या वक्तव्याचा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला असून, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली आहे.

प्रभारी परीक्षा व मूल्यमापन संचालक दिगंबर नेटके यांचा काही दिवसांपूर्वीच पदभार काढण्यात आला. 'नेटके यांना पुराव्यात पकडले. त्यामुळे ते मान वर करू शकत नाही,' असे चोपडे म्हणतात. शिवाय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कॅरिऑनच्या निर्णयावर निंबाळकर 'आडवे' झाल्याचे सांगत चोपडे खळखळून हसतात. तेजनकर यांनी निंबाळकरांना अडचणीत आणल्याचे चोपडे यांनी म्हटले आहे. सध्या चोपडे यांची ऑडिओ क्लिप शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

\Bगांधी सन्मान मार्चची खिल्ली

\Bविद्यापीठ प्रशासनाने दोन ऑक्टोबरची गांधी जयंतीची सुटी रद्द करून अभिवादनाचा कार्यक्रम घेतला नव्हता. या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी विद्यापीठात गांधी सन्मान मार्च काढण्यात आला होता. आंदोलकांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना गांधीजींची प्रतिमा भेट दिली. 'हे महात्मा गांधी आहेत. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे मोठे योगदान होते,' असे सांगत डॉ. उल्हास उढाण यांनी प्रतिमा दिल्यानंतर चोपडे यांचा चेहरा उतरला, मात्र सायंकाळी आपल्या वर्तुळात बोलताना ते गांधी मार्चची खिल्ली उडवताना दिसले. यावेळी उपस्थित महिलेने,'गांधी मार्च क्रांती चौकातून का नाही काढला? व्हाय विद्यापीठ गेट?' असा उपहासात्मक प्रश्न उपस्थित केल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते.

माझी भूमिका संयमाची आणि न्यायाची आहे. सर्व विद्यार्थी माझ्यासाठी समान असताना कुणाची बाजू कशी घेणार? कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर चर्चा सुरू असून, आंदोलनाबाबत टोकाचा निर्णय घेतला नाही.

- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

विद्यापीठाचे वातावरण दूषित करण्याचा अधिकार कुणालाही नाही. ऑडिओ क्लिप राज्य सरकारकडे देणार असून, तपास करण्यात येईल. सहभागी दोषी व्यक्तींवर कारवाईची मागणी करणार आहे.

- डॉ. गजानन सानप, समन्वयक, विद्यापीठ विकास मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चुकीच्या नंबरप्लेटमुळे दुचाकीस्वाराला मनस्ताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाधववाडी चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सलग दोन दिवशी दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकाच क्रमांकाच्या दुचाकीवर दिसून आल्या होत्या. या क्रमांकावरील वाहनधारकाला दंडाची पावती पाठवण्यात आली असता या क्रमांकाची दुसरीच दुचाकी त्याच्याजवळ दिसून आली. सुरुवातीला हा चोरीचा प्रकार वाटला, नंतर मात्र चुकीच्या नंबरप्लेटमुळे हा प्रकार घडल्याचे गुन्हे शाखेने तपासात स्पष्ट करीत गैरसमज दूर केला.

एक ऑगस्ट व दोन ऑगस्ट रोजी जाधववाडी चौकात स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्रमांक एमएच २० बीएच ३३२९) या दुचाकीवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी सिग्नल तोडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले होते. वाहतूक शाखेने या दुचाकी क्रमांकाच्या मालकाला दंडाची पावती पाठवली. यावेळी या क्रमांकाची त्याच्याकडे दुसरीच दुचाकी असल्याचे आढळले. यामुळे संशय निर्माण झाला होता. पोलिसांनी या दुचाकीवरील व्यक्तीचा शोध घेतला. ही व्यक्ती जितेंद्र बजरंग गडपकर (वय ३२, रा. सुरेवाडी, हर्सूल) असल्याचे निष्पन्न झाले. गडपकर यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी हा फोटो आपलाच असल्याचे मान्य करीत ही दुचाकी त्यांचे मित्र विनोद गायकवाड यांच्याकडून काही दिवसासाठी वापरण्याकरिता घेतल्याची माहिती दिली. त्यांच्या मूळ दुचाकीचा (क्रमांक एमएच २० बीएच ३३८९) असा आहे मात्र आकड्याचा रंग उडाल्याने आठऐवजी ३ दिसत असल्याचे सांगितले. यामुळे गैरसमज होऊन हा क्रमांक ३३२९ दिसत होता. त्यांच्या या माहितीनंतर ही दुचाकी चोरीची नसल्याचे स्पष्ट झाले. गडपकर यांनी दोन्ही फोटोत आपण असल्याची माहिती देत दंडाची रक्कम भरत असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी नागनाथ कोडे, निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय पवार, जमादार मच्छींद्र ससाणे, किरण गावंडे, विजय पिंपळे, गोविंद परचंडे, दत्ता ढंगारे, रविंद्र दाभाडे व रमेश सातपुते यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांच्या काचा फोडून कार टेप केले लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अज्ञात चोरट्यांनी सात कारच्या काचा फोडत कारटेप; तसेच गोळ्या, बिस्किटांची पाकिटे लंपास केली. चिश्तिया कॉलनी, एन सहा भागात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद कामील अन्सारी (वय ४५, रा. चिश्तिया कॉलनी) यांनी तक्रार दिली. यामध्ये अज्ञात चोरट्याने तेथील मैदानात उभ्या असलेल्या सात जीप व कारला लक्ष्य केले. दगडाने त्यांच्या काचा फोडून कारमधील टेप, बॅटरी आदी १७ हजारांचे साहित्य लंपास केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’च्या कंपनीशी तुम्हीच चर्चा करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीशी तुम्हीच चर्चा करा आणि योग्य तो निर्णय घ्या. जास्तीच्या खर्चाचे आम्ही पाहू. पाणीपुरवठा योजनेला पैसा कमी पडू देणार नाही,' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी महापालिका आयुक्त, महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांशी महापालिकेच्या विविध विषयांवर चर्चा केली.

विविध कार्यालयांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी महापालिकेमार्फत केल्या जात असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी सुमारे दीड तास महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेते विकास जैन, सभापती रेणुकादास वैद्य, विरोधीपक्ष नेता जमीर कादरी, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील देखील उपस्थित होते.

'भूमिगत गटार योजनेचे काम लवकर संपवा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या योजनेचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून १२ टक्के काम शिल्लक आहे. या योजनेचे काम लवकर संपवा. योजनेसाठी शासनाने दिलेल्या निधीवर २४ कोटी रुपयांचे व्याज जमा झाले आहे. व्याजाची रक्कम योजनेतील महापालिकेचा हिस्सा म्हणून वापरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे,' अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. केंब्रिज शाळा ते नगर नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करायचे आहे. रुंदीकरणांर्तगत जलवाहिन्या, ड्रेनेज लाइन, विजेचे खांब हटवावे लागणार आहेत. या सर्व कामांचा डीपीआर तयार करून तो पाठवा, शासन त्याला मदत करेल असे मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबद्दल महापालिका स्तरावर निर्णय घ्या, कारण तो महापालिकेचा अधिकार आहे. परंतु, बांधकामे अधिकृत करताना फार कमी शुल्क दंडाच्या स्वरुपात आकारू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. कचरा निर्मूलनाच्या कामात महापालिकेची प्रगती चांगली आहे, पण अजून काम करा, असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

\B'कर्जासाठी राष्ट्रीय महामार्गाचे निकष पाळा' \B

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीशी तुम्ही तुमच्यास्तरावर चर्चा करून योग्य तो निर्णय घ्या आणि तो आमच्याकडे पाठवा. तुम्ही घेतलेल्या निर्णयाला मान्यता दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. जलवाहिनीच्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जास्तीच्या खर्चासाठी राज्य शासन महापालिकेला मदत करील, असे ते म्हणाले. जलवाहिनी टाकण्यासाठी पाइप बदलण्याच्या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता घ्या आणि एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार करता येते का, याबद्दल विधी सल्लागारांचे मत घ्या, अशी सूचना त्यांनी केली. कंपनीच्या कर्ज प्रकरणासाठी जागा तारण ठेवण्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे निकष अंमलात आणा, असेही ते म्हणाले.

\Bमहापौर: आमदार जलील यांच्यात शाब्दिक चकमक

\B

रस्त्यांच्या कामांवरून महापौर नंदकुमार घोडेले आणि आमदार इम्तियाज जलील यांच्यात मुख्यमंत्र्यांसमोरच शाब्दिक चकमक उडाली. काळ्या यादीतील कंत्राटदारांना रस्त्यांची कामे दिली जात आहेत, असा आरोप आमदार जलील यांनी केला व रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घ्या, अशी मागणी केली. त्यामुळे महापौर संतापले. महापालिकेच्या कामावर अविश्वास कसा काय दाखवता, असा सवाल त्यांनी केला. कंत्राटदारांच्या निविदा स्वीकारणे, नाकारणे हे सर्वस्वी प्रशासनाचे काम आहे. प्रशासन योग्य तोच निर्णय घेईल, असे महापौर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दोघांच्या वादात हस्तक्षेप केला. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्याचे निवेदन सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हैदराबाद, विशाखापट्टणसाठी शिर्डीतून ट्रू जेटची विमानसेवा

$
0
0

औरंगाबाद : हैदराबाद ते औरंगाबाद अशी विमान सेवा चालविणाऱ्या ट्रू जेट विमान कंपनीने शिर्डी आणि विशाखापट्टणम या दोन शहरांसाठी विमान सुरू करण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या विमान सेवा २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

ट्रू जेट कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार;, हैदराबाद ते शिर्डी, आणि हैदराबाद ते विशाखापट्टणम ही दोन्ही विमाने नियमित असणार आहेत. हैदराबादहून शिर्डीसाठी विमान दुपारी १२ वाजता निघेल. शिर्डीहून हैदराबादकडे जाण्यासाठी विमान हे दुपारी दोन वाजता जाणार आहे. हैदराबाद ते विशाखापट्टणम हे विमान दिवसातून दोन वेळेस उड्डाण करणार आहे. हैदराबादहून दुपारी चार वाजून ३५ मिनिटांनी आणि रात्री आठ वाजता विशाखापट्टणमकडे निघणार आहे. हैदराबाद ते शिर्डीसाठी दोन हजार ४९९ रुपये तिकीट असेल. हैदराबाद ते विशाखापट्टणम प्रवासासाठी एक ९९९ रुपये तिकीट असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ४० हजार मातीनमुन्यांची तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी माती परीक्षण करून, मातीतील उपलब्ध घटकांनुसार पिकांची निवड, खतांचे प्रमाण ठरवावे लागते. गेल्या काही महिन्यांत माती परीक्षणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षासाठी ८४ हजार ८२२ मृद नमुन्यांचे तपासणी करण्याचे टार्गेट देण्यात आलेले असून, एकूण १ लाख ८० हजार पात्रिकांचे वाटप होणार आहे. आतापर्यंत ४० हजार ५९० नमुन्यांचे विश्लेषण पूर्ण पात्रिकाचे वाटप सुरू झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

शेतजमिनीचा पोत नेमका कसा आहे, याची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, जमिनीत कोणत्या घटकांची कमतरता आहे, कोणत्या घटकांची आवश्यकता आहे. त्यानुसार खते देण्यासह पेरणीसाठी बियाण्याची निवड करण्याचे धोरण अंगीकारणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने मृदा आरोग्य पत्रिका वितरण अभियान हाती घेतले आहे. जमिनीचे आरोग्य जाणून घेत त्याप्रमाणे पुढील नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल ही वाढला आहे. जिल्ह्यातून ८४ हजार ८२२ मृद नमुने जमा करण्यात आले असून, मृद सर्वेक्षण व चाचणी प्रयोगशाळेत ७४ हजार ३३९ नमुने प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत ४० हजार ५९० मृद नमुन्यांचे विश्लेषण पूर्ण करण्यात आले असून, शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकांचे वाटप सुरू झाले आहेत. या मोहिमेत एकूण एक लाख ८० हजार मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

\B

या घटकांची होते तपासणी\B

मृदेतील सामू (पीएच), क्षारता, पालाश, सेंद्रीय कर्ब, नत्र, स्फुरद, गंधक, लोह, जस्त, मॅगनिज, बोरॉन आदी घटकांची मात्रा किती प्रमाणात आहे, यांची तपासणी येथील प्रयोग शाळेत तज्ज्ञांमार्फत केली जाते. त्याच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना पीक नियोजन व पिकांना दिल्या जाणाऱ्या खतांचे प्रमाण याबाबत कृषी अधिकारी मार्गदर्शन करतात व मृदा आरोग्य पत्रिकात यात सविस्तर माहिती दिली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतूर किल्ल्यात चला भटकायला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किल्ले अंतूर आणि जंगलात भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधा वन विभाग उपलब्ध करून देणार आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी वन क्षेत्र परिसरात विविध विकासकामे हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती उप वनसंरक्षक सतीश वडस्कर यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

म्हैसमाळ, खुलताबाद व सुलीभंजन वन क्षेत्रावर वन खात्याने लक्ष केंद्रीत करून सव्वादोन कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यापाठोपाठ कन्नड तालुक्यातील अंतूर किल्ला येथील वन क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खात्याने प्रयत्न सुरू केले आहेत. गौताळा अभयारण्यामध्ये अंतूर किल्ला असल्यामुळे हा किल्ला दुर्ग भटकंती करणाऱ्यांसाठी एक चांगली संधी असते. त्यातून पर्यटनाला अधिक चालना मिळ‌ावी, याकडे लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे वडस्कर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या समवेत वन अधिकाऱ्यांनी अंतूर किल्ला व परिसराची नुकतीच पाहणी केली. या परिसरात करण्यात येणाऱ्या कामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत.

दरम्यान, वाहनतळ व्यवस्था, पायवटीचे नूतनीकरण करणे, वाहनतळ ते किल्ला (वन क्षेत्र हद्दीपर्यंत) रस्त्याचे खडीकरण करणे, व्ह्यू पॉइंट सुशोभिकरण, पॅगोडा नूतनीकरण आदी कामे हाती घेण्यात येणार आहे. आर्किटेक प्रदीप देशपांडे हे कामांचे अंदाजपत्रक तयार करत येत्या आठवडाभरात ते पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती वडस्कर यांनी दिली. या सर्व कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी २५ लाख रुपयांचा निधी वन खात्याला मिळणार आहे.

\Bनिरीक्षण कुटीचे नूतनीकरण

\Bअंतुर किल्ल्याजवळच वन खात्याचे निरीक्षण कुटी आहे. यात पर्यटकांची राहण्याची सोय असून त्यासाठी खास दोन सुट उभारण्यात आले आहेत. या कुटीचे नूतनीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी पात लाख रुपये खर्च येईल, अशी माहिती वडस्कर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाची धग

$
0
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा परिणाम कामकाजावर झाला आहे. सेवेत कायम करण्याची मागणी पूर्ण होत नसल्याने कामगार मागण्यांवर ठाम आहेत. तर प्रशासन भरती प्रक्रियेतील कायदेशीर अडचणींचा मुद्दा उपस्थित करीत आहे.

Tushar.bodkhe@timesgroup.com

\Bप्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते

\Bरोजंदारी कामगारांचे नेते किरणराज पंडित यांचा आरोप

- विद्यापीठात रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन का पुकारले?

- मागील १८ वर्षांपासून ४८८ रोजंदारी कामगार विद्यापीठात काम करतात. या कामगारांना सेवेत कायम करण्यात आले नाही. शिवाय, कामगार म्हणून त्यांचे अधिकार डावलले गेले आहेत. प्रशासनाशी अनेकदा पत्रव्यवहार केला, पण सकारात्मक पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात सगळे रोजंदारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार रोजंदारी कामगारांना सेवेत सामावून घ्या, २०१० ते २०१२ या कार्यकाळातील थकित पीएफ व्याजासह द्या, कार्यरत कामगारांऐवजी इतर भरती करू नका, थकित महागाई भत्ता द्या आणि वेतनातील फरक रक्कम द्या या प्रमुख मागण्या आहेत. प्रशासनाने प्रतिसाद दिला नसल्यामुळे आंदोलन सुरू आहे.

- दैनंदिन कामासाठी कंत्राट दिले आहे. कामगारांच्या मागण्यांचा संबंध कंत्राटदाराशी असल्याचा दावा प्रशासन करीत आहे…..

- विद्यापीठ प्रशासनाने २०१२नंतर कामासाठी कंत्राट दिले. तोपर्यंत कुलगुरू कार्यालयामार्फत कामगारांचे प्रश्न सोडवले जात होते. दर तीन महिन्यानंतर कामगारांच्या सेवेचा करार कायम करण्यात आला, मात्र कामगारांच्या मागण्यात अंगलट येण्याची शक्यता वाटल्यामुळे कंत्राट देण्यात आले. विद्यापीठाने जाहीरात देऊन कंत्राटदार नियुक्त केला, पण २०१५मध्ये झालेल्या आंदोलनात संबंधित कंत्राटदाराने विद्यापीठाला पत्र दिले. कामगारांची नियुक्ती विद्यापीठाने केली असल्यामुळे त्यांनी प्रश्न सोडवावा. माझा संबंध फक्त वेतन देण्यापुरता आहे, असे पत्रात नमूद केले होते. आता विद्यापीठ हात झटकत आहे. कामगारांचा संबंध कंत्राटदाराशी असेल तर विद्यापीठाने परस्पर 'पीएफ' कपात का केली याचे उत्तर द्यावे.

- प्रशासनाने उपस्थित केलेला कुशल-अकुशल कामगारांचा मुद्दा योग्य आहे का?

- कंत्राटी कामगारात ८० टक्के कामगार अकुशल आहेत. अशिक्षित किंवा अर्धशिक्षित कामगारांचा मुद्दा उपस्थित करून विद्यापीठ जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. मागील १८ वर्षांपासून या कामगारांनीच विद्यापीठात काम केले ना? पदवीधर कामगार २०१२नंतर भरती करण्यात आले. डेटा एन्ट्री ऑपरेटर, क्लार्क, शिपाई अशा पदांचा त्यात समावेश आहे. काही कामगारांनी स्वतंत्र आंदोलन करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला, पण राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्या आंदोलनात भीमशक्ती रोजंदारी कामगार युनियनचा सहभागी नव्हती. आम्ही कामगारांच्या प्रश्नांसाठी लढत आहोत. राज्य सरकारच्या वतीने विद्यापीठाने कामगारांच्या प्रश्नांची दखल घेणे भाग आहे.

\Bप्रशासन नियमानुसार भरती करणार

\Bप्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांची भूमिका

- कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर प्रशासनाची भूमिका काय आहे?

- कंत्राटी कामगार अनेक वर्षांपासून विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांच्या कामाबद्दल आणि आंदोलनाबद्दल सहानुभूती आहे, मात्र कामगारांच्या काही मागण्या अतार्किक आहेत. या मागण्या कायद्याच्या कक्षेत न बसणाऱ्या आहेत. प्रमुख पाच मागण्या असून, तीन मागण्या पूर्ण करण्यात येणार आहेत. इतर मागण्या राज्य सरकारच्या अधिकारातील आहेत. सध्या कामगारांना २५० रुपये हजेरीप्रमाणे २६ दिवसांचे वेतन मिळते. सुटीच्या दिवसाचे वेतन देण्याची मागणी आहे. हा विषय संबंधित कंत्राटदाराने दूर करावा. दोन वर्षे कपात केलेला 'पीएफ' संबंधित कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. कागदपत्रांवर स्वाक्षरी केली असून, लेखाधिकाऱ्यांनी प्रक्रिया केल्यानंतर आठ दिवसात 'पीएफ' जमा होईल. संप करण्यापूर्वीच प्रशासनाने कामगार कार्यालयाकडून कोष्टक मागविले होते. त्यानुसार महागाई भत्ता दिला जाणार आहे.

- कोणत्या मागण्या प्रशासनासाठी अडचणीच्या ठरत आहेत?

- सध्या कार्यरत कामगारांशिवाय इतर कुणाचीही भरती जाहिरात काढून करू नये ही मागणी योग्य नाही. विद्यापीठ परस्पर भरती करू शकत नाही. भरती केल्यास राज्य सरकार संबंधित कामगारांच्या वेतनाची जबाबदारी घेणार नाही. सध्या विद्यापीठ फंडातून वेतन दिले जात आहे. जाहिरातीशिवाय भरती कशी होईल? ते नियमांचे उल्लंघन ठरेल. शिवाय कामगारांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा आहे. ज्येष्ठ आणि नवीन अशी स्वतंत्र यादी करून पात्रतेचे निकष ठरवावे लागतील. कुशल व अकुशल हा मुद्दासुद्धा आहे. अशिक्षित कामगारांना उद्यान किंवा इतर कामे सोपवली जातील. या प्रक्रियेला अधिक वेळ लागणार आहे.

- कामगाराच्या मागण्यांवर प्रशासन कायमस्वरुपी तोडगा का काढत नाही?

- कामगारांना टप्प्याटप्प्यांने सेवेत घेण्याचा प्रशासनाचा विचार आहे. ही प्रक्रिया कायदेशीर सल्ला घेऊन केली जाईल. सध्या निंबाळकर समिती विद्यापीठ फंडाचा आढावा घेत आहे. या माध्यमातून काही करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. कंत्राटदार व कामगारांचा वाद लक्षात घेऊन कंत्राटदाराला त्याचे कमिशन देऊन कामगारांचे वेतन थेट कामगाराच्या बँक खात्यात जमा करण्याचाही प्रस्ताव आहे. नियमानुसारच हा निर्णय घेण्यात येईल. कामगार १५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून सेवेत आहेत. काही कुटुंबातील चार-पाच सदस्य विद्यापीठात कार्यरत असल्याने त्यांचा अंतर्गत वादसुद्धा अडसर ठरत आहे. या स्थितीत प्रशासन योग्य तोडगा निश्चित काढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीताफळाची आवक वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाण्यास रुचकर आणि आरोग्यवर्धक असलेल्या सीताफळांची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी १८ क्विंटल आवक झाली. खुलताबाद, कन्नडसह बीड जिल्ह्यातून आवक होत असून, उच्च प्रतीच्या सीताफळाला क्विंटलमागे साडेचार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. किरकोळ बाजारात ६० ते १०० रुपये प्रती किलोदराने त्यांची विक्री होत आहे.

रसाळ व मधूर फळ असलेले सीताफळाला नॅचरल आइसक्रिम म्हणून ओळखले जाते. मागील पंधरवड्यापासून सीताफळाची आवक वाढू लागली आहे. सीताफळाची आवक दौलताबाद, कसाबखेडा, कन्नडसह बीड आदी भागातून होत असून, स्थानिक; तसेच जिल्ह्यातील बाजारपेठेतून सीताफळाच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याने दरात तेजी आहे. मंगळवारी १८ क्विंटल सीताफळ जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समितीत दाखल झालेत. त्यास किमान भाव दीड हडार रुपये, तर दर्जानुसार कमाल भाव चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला, अशी माहिती फळेभाजीपाला विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तीन ऑक्टोबर रोजी ठोक बाजारात सीताफळाला क्विंटल मागे साडेचार हजार रुपये भाव मिळाला असून, आवक अधिक वाढल्यास दर कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, किरकोळ बाजारात दर्जानुसार ५० ते १०० रुपये प्रती किलो या दराने सीताफळांची विक्री होत असल्याचे फळविक्रेते इस्माईल खान यांनी सांगितले. बाजारात मोसंबीची आवकही वाढली असून, मंगळवारी ४८ क्विंटल आवक झाली असून, क्विंटलमागे सरासरी दर अडीच हजार रुपये मिळाला. आरोग्यास पौष्टिक असलेले सफरचंदची आवकही तेजीत असून, नवरात्रोत्सवामुळे उपवास फराळबरोबरच आरोग्यवर्धक व पौष्टिक असलेल्या या फळांनाही मागणी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवानिवृत्त अधिकाऱ्याला साडेसोळा लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेवानिवृत्त अधिकाऱ्याला विविध विमा कंपनीच्या नावाखाली पॉलिसी काढण्याचे; तसेच बोनसचे आमिष दाखवून साडेसोळा लाखांचा गंडा घालण्यात आला. डिसेंबर २०१५ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी २० आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मोहन कडुबा सोनवणे (वय ६०, रा. शहानूरवाडी) यांनी तक्रार दाखल केली. सोनवणे हे जलसंपदा खात्यातून निवृत्त झाले आहेत. डिसेंबर महिन्यात त्यांना एका तरुणीचा फोन आला होता. बजाज लाइफ इंन्शुरंस कंपनीमधून बोलत असल्याचे सांगत या तरुणीने 'तुमची पॉलिसीची रक्कम व कमीशन परत मिळेल, तुम्ही आणखी एक पॉलिसी काढा', असे सांगितले. या दुसऱ्या पॉलिसीसाठी एजंटने त्यांच्याकडून २५ हजारांचा धनादेशही नेला. यानंतर हे सत्र सुरूच झाले. त्यांना बजाज लाइफ इंन्शुरंस, बजाज अलियांझ लाइफ लाँग इंन्शुरंस, रिलायंस इंन्शुरंस, बजाज फिनसर्व्ह इन्शुरन्स, गुजरात आदी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून वेगवेगळे आमिष दाखविण्यात आले. सोनवणे यांच्याकडून तब्बल १५ लाख ५४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले, मात्र ठरल्याप्रमाणे त्यांना पॉलिसीची रक्कम किंवा बोनस देण्यात आला नाही. या भामट्यानी पाठवलेले चेकही बँकेत वटले नाही. याप्रकरणी सोनवणे यांच्या तक्रारीवरून विक्रम पाटील, रवींद्र कजारे, एकनाथ पाटील, सूर्यकांत दीक्षित, चिराग पटेल, पंकज मोरे, सौरभसिंह, राजू शर्मा, राजेंद्र पालांडे, सागर भोईर, जुल्फीकार शेख; तसेच इतर महिला आरोपी व बँक मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक इंगळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बससाठी एस. टी. महामंडळासोबत करार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि एस. टी. महामंडळ यांच्यात सिटी बस चालविण्यासंदर्भात बुधवारी (१० ऑक्टोबर) राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बस उपलब्ध करून देणार असून ही सेवा एस. टी. महामंडळ पाच वर्षे चालवणार आहे. या पद्धतीचा अभिनव प्रयोग राज्यात प्रथमच औरंगाबादमध्ये होत आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हा सामंजस्य करार करण्यात आला. या निमित्त स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी, महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक व महापौर नंदकुमार घोडेले यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे स्वागत केले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन, सभापती रेणुकादास वैद्य, एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देवोल व इतर अधिकारी उपस्थित होते. रावते यांनी पत्रकारांना कराराची माहिती दिली.

'कायद्यानुसार, सिटी बस चालवण्याचा अधिकार एस. टी. महामंडळाला नाही. मात्र, खासदार खैरे यांच्या आग्रहामुळे आतापर्यंत औरंगाबाद शहरात महामंडळामार्फत सिटी बस सेवा चालवण्यात येत आहे. मध्यतंरी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादला भेट दिली व 'बेस्ट'च्या धर्तीवर सिटी बस सुरू करण्याचे वचन दिले. त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता आम्ही करीत आहोत,' असे रावते यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यानच्या काळात स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने या प्रकल्पासाठी नोकरभरती केली, तर स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा रावते यांनी व्यक्त केली.

महामंडळ देणार ट्रायमॅक्स यंत्रणा

'सिटी बस प्रकल्पाची मालकी स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची राहणार असून एस. टी. महामंडळ सहयोगी म्हणून त्यांच्यासोबत काम करणार आहे. बस थांबे बांधण्याची जबाबदारी स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन राहणार आहे. तिकीटासाठी एस. टी. महामंडळ ट्रायमॅक्स यंत्रणा उपलब्ध करून देणार आहे,' अशी माहिती परिवहनमंत्री रावते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवानबाबांच्या जन्मगावी दसरा मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे यंदाही १८ ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाई ज्ञानोबा मुंढे, डॉ. कांचन चाटे, जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्ह्यातून २५ ते ३० हजार भाविक या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. या संदर्भात सोमवारी (१५ ऑक्टोबर) सायंकाळी पाचला शहरातील सिडको एन ४ परिसरातील वंजारी मंगल कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने बुधवारी (१० ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत करण्यात आले. गेल्या वर्षी या मेळाव्याला लाखो भाविक उपस्थित होते व यंदाच्या मेळाव्यातही भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सरच्या जनजागरणासाठी ‘स्त्रीरोग’कडून पोस्टर प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कॅन्सरच्या जनजागरणासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेच्या वतीने शहरातील 'संस्कृती रासदांडिया'च्या तापडिया-कासलीवाल मैदानावर पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले असून, या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (१० ऑक्टोबर) झाले. 'मटा'च्या सहकार्याने हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, प्रदर्शनाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात तरुणाईमध्ये कर्करोगाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला नगरसेवक ऋषिकेश खैरे, आशुतोष डंख, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, 'मटा'चे सिनिअर असिस्टंट एडिटर प्रमोद माने, स्त्रीरोग संघटनेचे शहराध्यक्ष डॉ. वर्षा देशमुख, सचिव मनिषा काकडे, 'फोग्सी'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंग परदेशी, ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना अशोक मोहगावकर, डॉ. अंजली वरे, डॉ. विनायक खेडकर, डॉ. आशा गायकवाड, डॉ. अनुराधा अपसिंगेकर, डॉ. गुरुप्रित संधू, डॉ. श्रद्धा परीटकर, डॉ. संगीता चव्हाण, डॉ. भाग्यश्री रांजणगावकर आदींची उपस्थिती होती. 'मटा'च्या सहाय्याने भरविण्यात आलेल्या प्रदर्शनातून महिला तसेच पुरुषांमध्ये होणारे विविध प्रकार कर्करोग, त्यांची कारणे, लक्षणे, उपाययोजना आदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. देवीच्या वेगवेगळ्या रंगांमध्ये हे पोस्टर तयार करण्यात आले असून, वेगवेगळ्या कर्करोगांपासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याचीही माहिती देण्यात आली आहे. रास दांडियामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांनी, तरुणींनी तसेच महिला-पुरुषांनी वाढत्या कर्करोगांबाबत जाणून घ्यावे आणि कर्करोगापासून दूर राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा व्यापक संदेश प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरात्र उत्सावानिमित्त कार्यशाळांचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवरात्र म्हणताच वेगळा सर्वत्र उत्साह संचारला. सगळ कसं पुन्हा नवं भासू लागते. यावेळी नवे काही शिकायला मिळेल का या संधीच्या शोधात अनेक जण असतात. त्यांच्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'व गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या वतीने महिला व तरुंणींसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे उपक्रम गरवारे कम्युनिटी सेंटर, सिडको एन ७ येथे होणार आहेत.

या कार्यशाळेची सुरुवात महिलांचा आवडता विषय साडी ड्रेपिंग व मेकअप कार्यशाळेने होणार आहे. ही कार्यशाळा गुरुवारी (११ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजता होणार आहे. नवरात्रीमध्ये छान दिसायला मदत म्हणून हा खास उपक्रम आयोजित केला आहे. शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजता पाककला कार्यशाळेत उपवासाचे पदार्थ शिकवले जाणार आहेत. शनिवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी अडीच वाजता कॅन्सरवर मार्गदर्शन केले जाणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सर्व वयोगटातील महिला व तरुणींसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम नि:शुल्क राहणार आहेत. या उपक्रमात नाव नोंदवण्यासाठी गरवारे कम्युनिटी सेंटर, सिडको एन ७ येथे किंवा ०२४०-२४८४७९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

----

\Bमहोत्सवाचे कार्यक्रम\B

स्थळ: गरवारे कम्युनिटी सेंटर, सिडको एन ७

११ ऑक्टोबर- साडी ड्रेपिंग व मेकअप कार्यशाळा दुपारी २

१२ ऑक्टोबर-उपवास कार्यशाळा दुपारी २

१३ ऑक्टोबर- कॅन्सरवर मार्गदर्शन दुपारी २.३०

१४ ऑक्टोबर- सकाळी ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल, दुचाकी चोरीचे गुन्हे गांर्भीयाने घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइल, दुचाकी चोरी या सर्वसामान्यांच्या समस्या आहे. हे गुन्हे गांर्भीयाने घेऊन त्याचा तपास करा, मुद्देमाल तक्रारदाराला सुपूर्त करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर व ग्रामीण पोलिसांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी बुधवारी कायदा व सुवस्थतेची आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी दोषसिद्धी, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण आदी जाणून घेतले. यावेळी दोषसिद्धी प्रमाणात औरंगाबाद ग्रामीण पोलिस दल राज्यात पहिल्या चार शहरात असल्याबद्दल कौतुकही केले.

शहर व ग्रामीण पोलिस दलातील पोलिस ठाण्यामधील दोषसिद्धी प्रमाण, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण; तसेच महिला अत्याचार विषयांच्या गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत आढावा घेतला. यावेळी ज्या पोलिस ठाण्याचे प्रमाण कमी होते. अशा पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकाला उठवून मुख्यमंत्र्यांनी कारणे जाणून घेतली; तसेच काय उपाययोजना करणार आहात याची देखील विचारणा केली.

बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोबाइल, दुचाकी चोरीच्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी गांर्भीयाने काम करावे, या गुन्ह्याच्या तपासावर भर दिला पाहिजे, अशी सूचना केल्याचे सांगितले. गुन्ह्याच्या दोषसिद्धीसंदर्भात ग्रामीण पोलिस दलाचे काम कौतुकास्पद असून, राज्यातील पहिल्या चार शहरात समावेश असल्याचे नमूद केले. आपण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून, क्वालिटी तपासावर भर देण्याच्या सूचना केल्याची माहिती मुख्यमंत्र फडणवीस यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनचोराकडे पिस्टल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विदेशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी बाळगणाऱ्या वाहनचोराला सिडको गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले. सायंकाळी स्वामी विवेकानंद गार्डन, एन-१२ येथे मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून एक पिस्टल; तसेच दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये एक संशयित पिस्टल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांना मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे प्रकटीकरण पथकाने या ठिकाणी सापळा रचला. यावेळी त्या ठिकाणी आलेला संशयित आरोपी मोहम्मद चाऊस अस्लम चाऊस (वय ३०, रा. रशीदपुरा) याला ताब्यात घेण्यात आले. चाऊसची झडती घेतली असता त्याच्या कंबरेजवळ काळ्या कपड्यात गुंडाळलेले पिस्टल व पँटच्या खिशात दोन काडतुसे आढळली. 'मेड इन यूएसए' असे लिहिलेले ७.५५ बोअरचे हे पिस्टल आहे. पोलिसांनी पिस्टल व काडतुसे जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त निकेश घाटमोडे, एसीपी गुणाजी सावंत पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सी. व्ही. ठुबे, जमादार दिनेश बन, संतोष मुदीराज, ईरफानखान, राजू सुरे व लोधवाल यांनी केली.

\Bवाहनचोरीचा गुन्हा\B

आरोपी मोहम्मद चाऊस याने राहता पोलिस ठाण्यातून चारचाकी वाहन चोरी केल्याबद्दल त्याच्यावर गुन्ह्याची नोंद आहे. या आरोपींनी यापूर्वी शहरात पिस्टल विक्री केली आहे का; तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्याबाबत सिडको पोलिस तपास करीत आहेत.

\Bशहरात शस्त्रांचे फुटले पेव

\Bशहरात गेल्या काही महिन्यापासून शस्त्र पकडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. २८ एप्रील रोजी गुन्हे शाखेने ऑनलाइन खेळण्याच्या नावाखाली मागवलेल्या ३२ तलवारी कुरियर कंपनीच्या कार्यालयातून; तसेच विविध ग्राहकांकडून जप्त केल्या होत्या. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. फ्लिपकार्टने नंतर ऑनलाइन शस्त्रांची विक्री बंद केली. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात देखील गुन्हे शाखेने हर्सूल जहांगीर कॉलनी भागात विक्रीसाठी आणलेल्या तब्बल १९ धारदार तलवारी जप्त केल्या होत्या. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी देखील पिस्टल विक्रीसाठी आणलेल्या विष्णू सानप नावाच्या आरोपीला गेल्या आठवड्यात गजाआड केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्री केलेल्या कारची पुन्हा विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विक्री केलेल्या कारची पुन्हा विक्री केल्याप्रकरणी सहारा मोटर्सच्या तिघांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोर्टाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला. एक जून २०१३ रोजी एपीआय कॉर्नर भागात हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी काझी सय्यद सल्लाऊदीन काझी सय्यद नझरुल हसन (वय ६५, रा. हिमायतबाग) यांनी तक्रार दाखल केली. काझी यांनी यांनी सहारा मोटर्स येथून मुलाच्या नावावर सहा लाख पंधरा हजारांत कार विकत घेतली होती. ही कार बंद पडल्याने त्यांनी कार दुरुस्तीसाठी शोरूममध्ये नेली. यावेळी त्या ठिकाणी त्यांना ही कार १५ सप्टेंबर २०१२ रोजीच संजय दत्तात्रय नावाच्या व्यक्तीला विकल्याची माहिती मिळाली. ही कार जुनी असताना देखील तिला नवीन भासवून तिची विक्री काझी यांना केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी काझी यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून मंगळवारी संशयित आरोपी आषीश भोपकर, अमीरबान सेन गुप्ता, अविनाश सूर्यवंशी (सर्व रा. सहारा मोटर्स, एपीआय कॉर्नर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक फौजदार शिंदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयभवानीनगरात घर पेटवण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुडबुद्धीने मंडप व्यवसायिकाचे घर पेटवण्याचा प्रयत्न जयभवानीनगरात करण्यात आला. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संदीप दामोदर पगारे (वय ३३, रा. एसटी कॉलनी, एन दोन) यांचे जयभवानीनगरातील गल्ली क्रमांक दहा येथे घर आहे. या ठिकाणी त्यांच्या मंडपाचे सामान; तसेच काम करणारी मुले राहतात. सोमवारी त्याच परिसरात राहणारा नितीन विलास डुकले हा कारण नसताना काम करणाऱ्या मुलांना शिवीगाळ करीत होता. पगारे यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता डुकले याने रात्री तुमचे मंडपाचे साहित्यच जाळून टाकतो, अशी धमकी देत निघून गेला. पगारे यांच्या कामगार मुलांनी मंगळवारी रात्री डुकले याने रात्री घराची खिडकी पेट्रोल टाकून पेटवल्याची माहिती दिली. ही मुले त्याला पकडण्यासाठी गेली असता आरोपी डुकले पसार झाला. यावेळी खिडकीजवळ प्लॅस्टिक बाटलीमध्ये पेट्रोल आढळले. याप्रकरणी पगारे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी डुकलेविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जमादार आहेरकर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी’: मुख्यमंत्र्यांना निवेदन

$
0
0

औरंगाबाद: दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता औरंगाबादेत तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी, अशी मागणी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मराठवाडा हा राज्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होऊन त्यात विविध मागण्या व विकासप्रश्नांवर चर्चा होते आणि बऱ्याच मागण्या मान्य होतात, असेही त्यांनी नमूद करत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याचा विकास होत असून दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता औरंगाबादेत तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळ विस्तार होणार: मुख्यमंत्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे की नाही? या शनिवारी विस्तार होणार काय?, असे विचारले असता,'मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पण कधी हे मात्र आताच सांगणार नाही,'असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी सांगितले. मात्र, कधी विस्तार होईल हे आता सांगणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी 'पुढचा मुख्यमंत्री मीच,' असे वक्तव्य केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका करताना 'राज्यात दुष्काळ असताना या गोष्टी बोलणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री अजून झोपेत आहेत,' असे म्हटले होते. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, की अजितदादांना सध्या तेवढेच काम उरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images