Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन

$
0
0

हिंगोली:

हैदराबाद मुक्ती संग्राम आंदोलनातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदय परंपरेचे अग्रणी म्हणून ओळखले जाणारे डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे आज वसमत (जि. हिंगोली) येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.

वसमत येथे १९२३ मध्ये जन्मलेल्या गंगाप्रसाद अग्रवाल यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतले व त्यानंतर वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. याच दरम्यान त्यांच्यावर महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आदिशक्ती नारी विकास’तर्फे ‘'साज पैठणीचा’चे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील 'आदिशक्ती नारी विकास प्रतिष्ठान' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांच्यातर्फे १४ ऑक्टोबरपासून 'साज पैठणीचा' या अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन खास महिलांसाठी करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात तीन ठिकाणी महिलांचे विविध खेळ, स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवून देण्यात येत आहे.

'आदिशक्ती नारी विकास प्रतिष्ठान'च्या संचालिका, नागेश्वरवाडी येथील नगरसेविका कीर्ती महेंद्र शिंदे यांच्या सौजन्याने आयोजित 'साज पैठणीचा' या आगळ्यावेगळ्या उपक्रमात शहरातील सर्वच वॉर्डातील महिलांना विविध भेटवस्तू, पैठणी साडी, ट्रॅव्हलिंग बॅग, गालिचा, क्वाइन जिंकण्याची संधी मिळणार आहे. इतकेच नव्हे तर प्रेक्षक महिलांना देखील 'लकी ड्रॉ'च्या माध्यमातून बक्षिसे जिंकण्याची संधी असेल. प्रत्येक वॉर्डात तीन ठिकाणी 'साज पैठणीचा' कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. प्रत्येक ठिकाणी तीन अशा नऊ विजेत्या स्पर्धकांची एकत्रित एक स्पर्धा होईल व त्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी बक्षिसे देण्यात येतील. विशेष म्हणजे प्रत्येक सहभागी स्पर्धकाला क्वाइन भेट स्वरूपात मिळणार आहे.

सध्या सर्वत्र नवरात्राची धूम सुरू असून, नारीशक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी 'साज पैठणीचा' हा कार्यक्रम नवचैतन्य आणणार असल्याचा विश्वास संयोजिका कीर्ती शिंदे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमांसाठी नॉलेज पार्टनर 'लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल', हेल्थ पार्टनर 'गेटवेल कॅन्सर क्लिनिक', सक्सेस पार्टनर डॉ. शिवकुमार गोरे यांचे 'सुखायु सुश्रुत' व 'शिंदे रॉक वूड' यांचे योगदान लाभले आहे. जास्तीत जास्त महिलांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची शनिवारी दुष्काळ आढावा बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची बैठक शनिवारी गारखेडा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता बैठक सुरू होईल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वरिष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते तर मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व इतर प्रमुख नेते देखील उपस्थित राहतील. या बैठकीमध्ये संबंधित जिल्ह्यांमधील नेत्यांकडून दुष्काळी परिस्थितीची माहिती घेऊन त्यासंदर्भात करायच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली जाईल.

\Bआश्वासनांचा घेणार आढावा

\Bयापूर्वी शेतकऱ्यांवर आलेल्या विविध संकटांच्या वेळी भाजप-शिवसेना सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचाही यावेळी आढावा घेतला जाणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही तातडीने दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसून येते. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार दिरंगाई करीत असल्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी दौरा करण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुदृढ जीवनशैली कॅन्सरमुक्तीची गुरुकिल्ली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शरीराच्या कोणत्याही भागात कोणत्याही अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो, तरीही सुदृढ जीवनशैलीद्वारे कॅन्सरला दूर ठेवणे शक्य आहे आणि कॅन्सर झाला असला तरी योग्य जीवनशैलीसह वेळीच केलेल्या योग्य औषधोपचारांनी कॅन्सरवर मात करणेही शक्य आहे. कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी योग्य आहार, विहार, व्यायाम, योगाभ्यास खूप उपयुक्त ठरतो आणि याबाबत व्यापक जनजागरण करण्याचा प्रयत्न स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र संघटनेच्या वतीने भरवण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनातून प्रभावीपणे होत आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या सहकार्याने आणि स्त्रीरोग संघटनेच्या वतीने अदालत रोडवरील तापडिया-कासलीवाल मैदानावर सुरू असलेल्या 'संस्कृती रास दांडिया'च्या माध्यमातून हे पोस्टर प्रदर्शन दांडियामध्ये सहभागी होण्यासाठी येत असलेल्या समस्त नागरिकांसाठी तसेच तरुणाईसाठी बहुमोल संदेश देणारे ठरत आहे. वेगवेगळ्या रंगांमध्ये तयार करण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (१० ऑक्टोबर) झाले. या ठिकाणी विविध स्त्रीरोगतज्ज्ञांनी विविध पोस्टरच्या माध्यमातून वेगवेगळ्या कर्करोगांबाबत सविस्तर व शास्त्रीय माहिती दिली आहे. यातील निळ्या रंगाच्या पोस्टरद्वारे संघटनेच्या अध्यक्षा व शासकीय कर्करुग्णालयाच्या विभागप्रमुख डॉ. वर्षा देशमुख यांनी 'कॅन्सर म्हणजे कॅन्सल नाही' असा महत्वाचा संदेश देत, कॅन्सर होऊच नये म्हणून वेगवेग‍ळ्या शास्त्रीय सूचनाही केल्या आहेत. मुळात स्वतःचे वजन आटोक्यात ठेवा, जेवणाच्या वेळा पाळा व पौष्टिक आहाराचे सेवन करा, नियमित योगाभ्यास, व्यायाम व प्राणायाम करा, डॉक्टरांकडून नियमित शारीरिक तपासण्या करुन घ्या, सणावारांसाठी कधीच मनासिक पाळी पुढे ढकलू नका, धुम्रपानासह कोणतेही व्यसन करू नका, शरीरात होणाऱ्या बदलांबाबत सजग राहा, विनाकारण थकवा येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मुख्य म्हणजे आपल्या शरीराचा आवाज ऐका, असाही मार्मिक संदेश डॉ. देशमुख यांनी दिला आहे. याच श्रृंखलेत शहरी महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात असलेल्या स्तनाच्या कर्करोगाच्या अनुषंगाने स्तनांची स्वपरीक्षा नेमकी कशी करायची, याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ व बदनापूर येथील मेडिकल कॉलेजच्या प्रा. डॉ. भाग्यश्री रांजवण यांनी महिला-तरुणींना अचूक व शास्त्रीय मार्गदर्शन केले आहे. मासिक पाळीनंतरच्या तीन ते चार दिवसांत ही स्वपरीक्षा करावी. मासिक पाळी नियमित नसेल किंवा अधून-मधून पाळी चुकत असेल तर ही परीक्षा दर महिन्याच्या एका ठराविक दिवशी करावी. वयाच्या २० वर्षानंतर प्रत्येक महिलेने आपल्या स्तनातील गाठ किंवा इतर कोणत्याही स्वरुपातील बदलांबाबत जागरुक राहिले पाहिजे, असेही डॉ. रांजवण यांनी पोस्टरच्या माध्यमातून नमूद केले आहे.

\Bअशी करा स्तनांची स्वरपरीक्षा

\Bमहिलांनी आंघोळीवेळी किंवा शॉवर घेताना दोन्ही स्तनावरून गोलाकार बोटे फिरवावी. गाठ, कडक भाग किंवा सूज असल्यासारखे वाटते का हे आवर्जून तपासावे. दोन्ही हात कंबरेवर ठेऊन आरशासमोर उभे राहून स्तनांकडे बघावे. शरीर वाकवून स्तनांचे निरीक्षण करावे. हात डोक्यावर ठेऊन कुठे खड्डा पडतो का, फुगवटा जाणवतो का आणि विशेषतः खालच्या बाजुने खड्डा-फुगवटा जाणवतो का, हे बघावे. दोन्ही स्तनांमध्ये सारख्या आकाराचे खड्डे एकाच वे‍ळेला पडणे सामान्य व हानीकारक नसल्याचे लक्षण आहे. तसेच डोक्यावरुन हात उचला आणि स्तनाग्रांचेही निरीक्षण करा आणि कोणतेही वेगळ‍े-विचित्र बदल जाणवले तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या, अशीही सूचना डॉ. रांजवण यांनी पोस्टरमधून केली आहे.

गरब्यासोबतच कर्करोगाबाबत प्रबोधन व्हावे आणि तरुणांनी कर्करोगाबाबत सजग होऊन कॅन्सरपासून दूर राहावे, हाच या प्रदर्शनामागचा उद्देश आहे. तरुणांनी या सूचनांचा आवर्जून विचार करावा.

\B- ऋषिकेश खैरे\B, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठलाग करून अटक

$
0
0

चिश्तिया कॉलनी परिसरातील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून बॅटरी, टेप आणि गोळ्या बिस्किटांची पाकिटे, असा १७ हजारांचा ऐवज पळवला होता. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यात सुलतानपूर, नारेगाव येथील आरोपीचा हात असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. त्यावरून पथक सुलतानपूर येथे गेले असता शेख आमेर शेख नजीर हा पळून जाऊ लागला. त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, एसीपी गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सी. व्ही. ठुबे, जमादार दिनेश बन, संतोष मुदिराज, ईरफानखान व राजू सुरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रेकिंग बॅगमधून देशी दारूची तस्करी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रेकिंग बॅगमध्ये देशी दारूच्या बाटल्या लपवून ढाबाचालकांना पुरवठा करणाऱ्या संशयित आरोपीला सिडको गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी बारा वाजता आंबेडकर चौकात करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून दुचाकीसह दारूच्या १४४ बाटल्या जप्त केल्या असून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकुंदवाडी भागातून देशी दारू खरेदी करून एक तरूण ती हर्सूल परिसरातील ढाबाचालकांना विकत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांना दिली होती. विशेष म्हणजे हा तरूण ट्रेकिंग बॅग घेऊन गिर्यारोहकासारखा फिरतो, अशी माहिती मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचून संशयित आरोपी उमेश भागाजी नागोडे (वय ३२, रा. शिवाजीनगर, रेणुकानगर, गारखेडा परिसर) याला आंबेडकर चौकात दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता बॅगमध्ये देशी दारूच्या १४४ बाटल्या सापडल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत पाचोळे, जमादार नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, किशोर गाढे व स्वप्नील रत्नपारखी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोडशेडिंग विरोधात आंदोलन करू : जलील

$
0
0

औरंगाबाद : सणासुदीच्याच काळात सुरू केलेले लोडशेडिंग त्वरित बंद करा. अन्यथा 'एमआयएम'तर्फे आंदोलन करण्याचा इशारा आमदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. एआयएमआयएमचे आमदार जलील यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून हा इशारा दिला आहे. महावितरण विभागाने वसुलीच्या आधारे लोडशेडिंगची वर्गवारी करण्यात आलेली आहे. ही वर्गवारीत नियमित वीज बील भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होत आहे. एखाद्या भागातून वीज बिलाची वसुली कमी होत असेल, तर त्याची जबाबदारी महावितरण विभागाची आहे. महावितरणाला वीज वसुली मोहिमेत 'एमआयएम'ने मदत केली. यानंतरही वसुली मोहिमेत पिछाडी असल्याचे सांगून पुन्हा लोडशेडिंग करण्यात येत आहे.

औरंगाबाद विभागीय महसूल कार्यालय असलेले शहर आहे. या शहरातील लोडशेडिंग थांबवा अन्यथा कायदा हातात घेऊन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आमदार जलील यांनी दिला आहे. यापूर्वी झालेल्या 'एमआयएम'ने लोडशेडिंगविरोधात केलेल्या आंदोलनात महावितरण कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोखंडी रॉडने मारहाण; एक वर्षाची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण करुन तरुणाला गंभीर जखमी करणारा आरोपी करण नरसी तुसबंळ याला एक वर्ष सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रधान न्यायाधीश प्रकाश माळी यांनी ठोठावली.

याप्रकरणी अभिजीत रोहिदास कुमावत (२५, रा. पदमपुरा) याने फिर्याद दिली होती. ते मित्रासोबत १२ डिसेंबर २०१४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात गेले होते. तेथे आरोपी करण नरसी तसुबंळ (वय २२, रा. मिलिंदनगर) हा आला आणि त्याने दारूसाठी फिर्यादीकडे पैसे मागितले. पैसे देण्यास नकार देताच करण याने लोखंडी रॉडने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील अजित अंकुश यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला भादंवि ३२४ कलमान्वये एक महिना सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास ठोठावला. तसेच दंडातील दहा हजार रुपये फिर्यादीला नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेशही कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू, बसचालकास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निष्काळजीपणे भरधाव खासगी बस चालवून तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल बसचालक मोहम्मद जलील मोहम्मद पाशुमियाँ याला एक वर्ष सक्तमजुरी व साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ठोठावली. नुकसान भरपाईपोटी दंडाच्या रकमेपैकी तीन हजार रुपये मृत तरुणाच्या बहिणीला देण्याचे आदेशही कोर्टाने बजावले आहेत.

याप्रकरणी दीपा सदाशिव टाक (रा. शिवशंकर कॉलनी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, त्यांचा मृत भाऊ मुकुंद (मधूसुदन) सदाशिव टाक (वय १७) हे २९ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी शहानूरमियाँ दर्गा रोडवरील एका खासगी रुग्णालयासमोर भरधाव आलेल्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसने मुकुंदच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात मुकुंदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना घाटीत डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बसचालक मोहम्मद जलील मोहम्मद पाशुमियाँ (वय ५१, रा. शंभुनगर, गारखेडा परिसर) याच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी सहायक सरकरी वकील सुनील जोंधळे यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंचे युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपी बसचालकाला भादंवि ३०४ (अ) कलमान्वे एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, तर कलम २७९ कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ निवारणासाठी संघ, भाजपचे प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळ निवारणासाठी संघटना, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुढाकार विविध उपाययोजना करण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या प्रल्हाद भवन येथे गुरुवारी आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.

संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संघाचे प्रमुख पदाधिकारी व भाजपचे औरंगाबाद तसेच जालना येथील लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. परिस्थिती गंभीर असून, निवारणासाठी राजकीय व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एकत्रित काय नियोजन करता येईल, यावर बैठकीत चर्चा झाली असून, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे प्रचार प्रमुख रोहित सर्वज्ञ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादच्या विकासात क्रेडाईचा मोठा वाठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेगाने होत असलेला विकास, अनेक नवीन उद्योगांचे आगमन, महामार्गांचे जाळे अशा विकासाच्या, सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वेगवान वाटचाल करत असलेले औरंगाबाद हे आजघडीला राहण्याकरिता आणि गुंतवणुकीकरिताही आदर्श शहर आहे. पर्यटनाची राजधानी,असलेल्या या शहराची वाढ गेल्या काही वर्षांत मोठ्या वेगाने होत असून, या विकासामध्ये 'क्रेडाई'च्या सभासद बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या भव्य गृहप्रकल्पांचा खूप वाटा आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.

बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईतर्फे क्रांती चौकातील हॉटेल मॅनोर लॉन्स येथे आयोजित 'ड्रीम होम २०१८' या गृहप्रकल्पांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी भापकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. क्रेडाई राज्य उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, क्रेडाई औरंगाबादचे अध्यक्ष रवी वट्टमवार, सचिव आशुतोष नावंदर, ड्रीम होम प्रदर्शन २०१८चे प्रकल्प प्रमुख संग्राम पटारे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना भापकर यांनी,'ड्रीम होम प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना अत्यंत माफक दरात, सर्व सोयींनी युक्त आणि खरोखरच आपल्या स्वप्नातील घरे उपलब्ध करून देणाऱ्या क्रेडाईचा हा 'प्रॉपर्टी एक्स्पो' उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय असल्याचे सांगितले. शहर विकासाला त्यामुळेच मोठी गती मिळाली आहे. मराठवाड्यावर प्रेम करणाऱ्या, औरंगाबादमध्ये स्वतःचे घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा,' असे आवाहन केले.

क्रेडाईचे अध्यक्ष वट्टमवार यांनी,'बांधकाम व्यवसायामध्ये आलेली तत्कालीन मंदी आता ओसरली असून, हा व्यवसाय पुन्हा वेग घेतो आहे. रेरा आणि जीएसटीमुळे या उद्योगात पारदर्शकता, सुसूत्रता आली आहे, मात्र नजिकच्या काळात रेरा आणि जीएसटीप्रमाणेच टायटल इन्शुरन्स येणार आहे. त्यामुळे मालमत्तांच्या किमती या दोनशे ते अडीचशे रुपये प्रति चौरस फूट वाढणार असल्याने घर खरेदी करू इच्छिणारांनी लवकरात लवकर घर खरेदी करावी आणि कमी किमतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या गृहप्रदर्शनात विविध वित्तीय संस्थांच्या सहभागामुळे एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्पांच्या पर्यायांबरोबरच आपल्याला किती, कसे कर्ज मिळू शकते, योजना काय आहेत याचीही माहिती लगेचच येथे उपलब्ध होत आहे. शहर विकास आणि सौदर्यीकरणाच्या कार्यामध्ये क्रेडाई आपली भूमिका नक्कीच पार पाडेल, असेही त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनामध्ये ७०हून अधिक दालने असून, बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या ३००हून अधिक गृहप्रकल्प सादर केले आहेत. याशिवाय विविध वित्तीय संस्थांचीही प्रदर्शनाला भेट देणाऱ्या भाग्यवंत नागरिकाला आयोजकांतर्फे भेटवस्तू देण्यात येणार आहे. प्रदर्शनाला प्रवेश मोफत आहे. जुगलकिशोर तापडिया, रमेश नागपाल, जितेंद्र मुथा, देवानंद कोटगिरे, पापालाल गोयल, सुनील पाटील, नरेंद्रसिंग जबिंदा, नितीन बगाडिया, विकास चौधरी, भास्कर चौधरी यांच्यासह क्रेडाईचे सदस्य उपस्थित होते.

प्रदर्शन रविवारपर्यंत सर्वांसाठी खुले

क्रांती चौकातील हॉटेल मॅनोर लॉन्स येथे ड्रीम होम २०१८ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत या कालावधीत प्रदर्शन नागरिकांसाठी खुला असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रम्हरंग रास दांडीयाचे आज उदघाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्रह्मरागिणी महिला संघ व ब्रह्मस्त्र वाद्य पथक यांच्या संयुक्त विद्यामाने ब्रह्मरंग रास दांडीयाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून तीन दिवस हा रास दांडीया एन आठ भागातील राणा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता या दांडीयाचे उदघाटन आमदार अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष बोराळकर, लक्ष्मीकांत थेटे, आशिष सुरडकर व अॅड. निनाद खोचे यांची उपस्थिती असणार आहे. ब्रह्मरागिणी तसेच ब्रह्मास्त्र मंडळाच्या गीता आचार्य, मेघा थेटे, नेहाली खोचे, अंजली गोरे, वर्षा कल्याणकर, रंजना देशपांडे, मंदार देसाई, आदित्य पिळदे, कृष्णा निंभोरकर, श्रीकांत इनामदार, अभिषेक कादी, श्रीनिवास देव आदींनी या दांडीयाचे आयोजन केले असल्याची माहिती नेहाली खोचे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१९ केंद्रावर पदवी परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदवी परीक्षा १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. चार जिल्ह्यात २१९ केंद्रांवर तीन लाख ३० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त राहणार असून 'सीसीटीव्ही' बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून हॉलतिकीट देण्यात येणार आहेत.

पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा चार दिवसांवर आली असून, आतापर्यंत विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळालेले नाही. परीक्षा विभाग परीक्षा केंद्र, हॉलतिकीट आणि बंदोबस्ताचे नियोजन करीत आहे. त्यामुळे हॉलतिकीट मिळण्यास उशीर झाला आहे. विद्यार्थी आणि प्राचार्यांनी वारंवार विचारणा केल्यानंतर विभागाने गुरुवारी सायंकाळपर्यंत हॉलतिकीट मिळतील, असे सांगितले. नव्या आणि जुन्या परीक्षा केंद्रांचा आढावा घेऊन परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले.

सध्या २१९ केंद्र निश्चित झाले असून, एकूण तीन लाख ३० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण व शहरी ८० परीक्षा केंद्र असून, जालना ३०, बीड ६३ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३० केंद्र आहेत. उत्तरपत्रिका तपासणी केंद्राची पाहणी करण्यात येत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त राहणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात 'सीसीटीव्ही' बंधनकारक करण्यात आले आहे. काही प्राचार्यांनी 'सीसीटीव्ही' लावण्यास सहमती दाखवली, मात्र ग्रामीण भागातील अनेक केंद्रावर पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पाडणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

दरम्यान, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डॉ. गणेश मंझा यांनी राजीनामा दिला आहे. ते पुन्हा 'बामू'त उपकुलसचिवपदी रुजू झाले आहेत.

\Bसमितीवर नियुक्ती

\Bपरीक्षा मंडळ समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांची निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली; तसेच परीक्षा केंद्र वाटपप्रमुख म्हणूनही ते काम करणार आहेत. या समितीत गोविंद काळे, नवनाथ आघाव, डॉ. मजहर फारुकी यांचा समावेश आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. समितीवर निमंत्रित सदस्य घेण्याची विद्यापीठ कायद्यात तरतूद आहे का, असा सवाल अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांची तोडफोड; आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडकोतील चिश्तिया कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड तसेच कार टेपसह विविध वस्तुंच्या चोरीप्रकरणातील संशयित आरोपी शेख आमेर शेख नजीर याला अटक करून गुरुवारी (११ ऑक्टोबर) कोर्टात हजर करण्यात आले. त्याला सोमवारपर्यंत (१५ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

याप्रकरणी मोहम्मद कलीम अन्सारी (वय ४५, रा. चिश्तिया कॉलनी, एन ६) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, चिश्तिया कॉलनीत मंगळवारी (नऊ ऑक्टोबर) रात्री एका माथेफिरूने सहा वाहनांची तोडफोड करून कार टेप, गोळ्या-बिस्किटे तसेच बॅटऱ्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी संशयित आरोपी शेख आमेर शेख नजीर (वय १९, रा. नारेगाव) याला अटक करून त्याच्या ताब्यातून १७ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याला गुरुवारी कोर्टात हजर केले असता तोडफोडीमागचे नेमके कारण काय, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का, असे प्रकार यापूर्वी केले आहेत का याचा तपास करावयाचा असल्यामुळे पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधींसाठी घाटीत ‘भीक माँगो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी हॉस्पिटलमध्ये औषधाची वानवा असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. या औषधीं खरेदीसाठी निधी जमविण्याकरिता मनविसेतर्फे गुरुवारी घाटी हॉस्पिटल परिसरात 'भीक माँगो आंदोलन' करण्यात आले. यावेळी जमा झालेले ४६८ रुपये घाटी हॉस्पिटल प्रशासनाच्या सुपूर्त करण्यात आले.

घाटी हॉस्पिटल हे मराठवाडा तसेच खान्देशातील सर्वात मोठे शासकीय हॉस्पिटल आहे. दररोज हजारो गोर-गरीब रुग्ण उपचारासाठी घाटीमध्ये येतात. सध्या घाटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना देण्यासाठी औषधींचा साठा नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना औषधे खरेदी करून आणावे, असे सांगण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ मनविसेतर्फे 'भीक माँगो आंदोलन' करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आनंद भिसे, रियाज पटेल, संकेत शेटे, विशाल आमराव, सुशांत भुजंग, विशाल विराळे पाटील, सागर जाधव, गणेश ढगे, शिवम लिंगायत, शिवनाथ पेरकर, सोहेल पठाण, मयूर जैस्वाल, सूरज आगे, पांडुरंग साबळे, रोहित बुट्टे, आशितोष सांगोले पाटील यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुत्र्यांच्या भांडणात दुचाकीस्वाराचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील मोकाट कुत्र्यांनी आणखी एकाचा बळी घेतला आहे. एकमेंकांवर धाऊन जाणारे मोकाट कुत्र्यांचे टोळके अचानक दुचाकीसमोर आल्याने बीड बायपासवर दुचाकीवरून मंगळवारी (९ ऑक्टोबर) बाप-लेकांपैकी वडिलांचे गुरुवारी (११ ऑक्टोबर) उपचार सुरू असताना निधन झाले. अशोक हरिनाथ जाधव (वय ५५, मूळ रा. वालसावंगी, ता. भोकरदन), असे मृताचे नाव आहे. जाधव कुटुंबीयांनी या अपघाताला महापालिकेला जबाबदार धरले आहे.

मृत अशोक जाधव हे ऑर्गनवादक, तसेच कथाकार होते. आजारी असल्यामुळे ते मंगळवारी सकाळी मुलगा सागर सोबत दुचाकीवरून रुग्णालयात गेले होते. तेथून परत येत असताना बीड बायपास रोडवरील सिद्धीविनायक अपार्टमेंटसमोर एकमेकांवर भुंकणारे कुत्र्यांचे टोळके अचानक दुचाकीसमोर आले. यामुळे तोल जाऊन सागर व त्यांचे वडील अशोक हे एका तार कंपाउंडवर आदळले. खाली पडल्याने अशोक यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. घरी गेल्यानंतर मात्र त्यांना अचानक घेरी आल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डोक्याला आतून गंभीर दुखापत झाल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते. त्यांचा गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून सहाय्यक फौजदार नारायण बऱ्हाटय्हे तपास करीत आहेत.

\Bपालिका जबाबदार\B

बीड बायपासवरील सतत मोकाट कुत्रे घोळक्याने भटकत असतात. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मोकाट कुत्र्यांमुळेच दुचाकीला अपघात झाला. या अपघाताला महापालिकाच जबाबदार आहे, असा आरोप मृताचा मुलगा सागर जाधव यांनी केला आहे.

\Bदररोज २० जणांना चावा

\B

शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून घाटी हॉस्पिटलमध्ये दररोज किमान २० जण कुत्रा चावल्याने उपचारासाठी येतात, असे नोंदीवरून स्पष्ट होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्चअखेर एसटी बस ‘ऑनलाइन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

मार्च २०१९अखेरपर्यंत राज्यातील सर्व १७ हजारांवर एसटी बस ऑनलाइन करण्यात येणार आहेत, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक, महामंडळाचे उपाध्यक्ष रणजित सिंह देओल यांनी पत्रकारांना दिली.

एसटी अधिकाऱ्यांची गुरुवारी (११ ऑक्टोबर) वाल्मी येथे बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की, एसटी बसचे आयुष्य १५ वर्षे करण्यात आले आहे. यासाठी लाल बसची फेरबांधणी बंद करून, त्याऐवजी नवीन बस कोडप्रमाणे 'एमएस बॉडी'च्या बस तयार केले जात आहेत. त्याचे काम मध्यवर्ती कार्यशाळेत सुरू आहे. डिझेलच्या वाढत्या दराबाबत एसटीची हंगामात दहा टक्के दरवाढ ही योग्य उपाय योजना असल्याचे सांगितले. सिडको बस स्थानकात बसपोर्ट उभारणार आहे; तसेच सीबीएस बस स्थानकाची फेरबांधणी केली जाईल.

एसटी बस ऑनलाइन करण्याबाबत देओल यांनी सांगितले की, सध्या नाशिक येथे एसटी बस ऑनलाइन करण्याचे पायलट प्रकल्प सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी होताच राज्यातील सर्व बस गाड्या ऑनलाइन करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. आगामी मार्च २०१९पर्यंत या गाड्या ऑनलाइन होतील.

\Bस्लीपर बसबाबत फेरविचार सुरू

एसटी महामंडळात सध्या स्लीपर बस तयार करण्याचा प्रयोग सुरू आहे. स्लीपर बसचे भाडे, साध्या सिटिंग बसपेक्षा दीडपट अधिक आहे. यामुळे याचा फेरविचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिवशाही आता एसटीचा ब्रँड

शिवशाही बस एसटी महामंडळाचा ब्रँड तयार झाली आहे. हा ब्रँड अधिक यशस्वी करण्यासाठी, चालकांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. खासगी किंवा एसटीचे चालकांना प्रशिक्षण शिवाय शिवशाही देण्यात येऊ नये, असे आदेश आहेत. 'शिवशाही'त टायर आणि बसमध्ये तांत्रिक दोष आढळले होते. तेही दूर करण्यात आले असल्याचे देओल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नागरी मित्रां’वरून वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने नेमलेल्या नागरी मित्र पथकामधील सदस्यांच्या अधिकारावरून वॉर्डातील कर्मचाऱ्यांशी वादावादी होत आहे. पालिकेने मानधनावर नेमलेल्या पथकातील सदस्यांना कर्मचाऱ्यांची हजेरी तपासणीचे अधिकार दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे, तर अनेक कर्मचारी दांडीबहाद्दर असल्याचे मित्र पथकाने नोंदी केल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. कचरा, प्लास्टिक, अतिक्रमणबाबत दंडात्मक कारवाई करण्यासाठी हे पथक नेमण्यात आले आहे.

शहरात कचऱ्याची स्थिती गंभीर आहे. कचऱ्याचे वर्गीकरण योग्य प्रकारे न करता तशाच प्रकारे रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. अनेक भागांमध्ये नियमितपणे स्वच्छता होत नाही. प्लास्टिक बंदी, विना परवानगी बांधकाम यासाठी पालिकेने 'नागरी मित्र पथक' नेमले. यातील सदस्यांना मानधनावर नेमण्यात आले असून, बहुतांशी कर्मचारी माजी सैनिक आहेत. या पथकाला वॉर्डात कर्मचारी, सफाई कर्मचारी येतात का याचाही आढावा घेण्याच्या सूचना आहेत. अनेक स्वच्छता कर्मचारी गैरहजर असतात, याबाबत नोंदी पथकाने केल्या. त्यावरून कायम कर्मचारी व पथकातील कर्मचारी वाद समोर आला आहे. महापौरांसमोर गुरुवारी अशा प्रकारचा वाद झाल्याने संघर्ष समोर आला. त्यानंतर गुरुवारी वार्ड अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. वाद टाळण्यासाठी प्रमोद जाधव यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

\Bपथकाने ४५ हजारांची दंड वसुली

\Bशहरातील रस्त्यांवर, दुभाजकांवर कचरा टाकणे, प्लास्टिक बंदी असतानाही त्याचा वापर करणे, रस्त्यावर थुंकणे याबाबत पथकाने नऊ विभागात आजपर्यंत ४५ हजाराचा दंड ठोठावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्षात कचऱ्याबाबत नेमका किती दंड करण्यात पथक यशस्वी ठरले याबाबत पालिकेकडेही आकडेवारी नाही. पथकात ४० जण आहेत. एका पथकात चार सदस्य असून, ते विविध भागात गस्त घालून दंड वसूल करत असल्याचे पालिकेने सांगितले. पथकातील सदस्य विविध वॉर्डातील कचऱ्याच्या समस्येसह अतिक्रमण, विना परवाने बांधकामे याबाबत दररोज पालिकेला अहवाल देतात. यासह साफसफाई कर्मचाऱ्यांना हँडग्लोज नसणे, त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याबाबतही कळविल्याचे सांगण्यात आले. पालिकेत ८१ जणांना मानधनावर नेमले आहे. त्यातील ४१ जण इतर विभागांमध्ये कार्यरत आहेत. पालिकेने अशा प्रकारची पथके नेमल्यानंतरही अनेक भागात दुभाजाकांमध्ये कचरा दिसतोच आहे. कचरा रस्त्यावर टाकण्याचे प्रमाण ही कमी न झाल्याचे चित्र आहे. दंड आकारणीबाबतही पथक मागे असल्याची चर्चा आहे.

पालिकेचे सफाई कर्मचारी...२७००

पथकातील कर्मचारी............४०

नागरी मित्र पथकांची व्याप्ती वाढवली आहे. त्यांनी केलेल्या नोंदीही आमच्याकडे आहेत. कर्मचाऱ्यांनाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार त्यांचे काम सुरू आहे. याबाबत वॉर्ड अधिकाऱ्यांची बैठक घेत दोघांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम होईल.

- नंदकुमार घोडेले, महापौर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीवादी स्वातंत्र्यसैनिकाचे स्मरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गांधीवादी विचारवंत व स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांचे वसमत येथे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. गांधीवादी कार्यकर्ते म्हणून अग्रवाल यांचे महनीय कार्य आहे. त्यांच्या लढ्याला आणि कार्याला मान्यवरांनी उजाळा दिला.

स्वातंत्र्यसैनिक गंगाप्रसाद अग्रवाल प्रखर गांधीवादी होते. साधी राहणी असलेले अग्रवालजी पायी प्रवास करीत असत. त्यांची भाषणे अजूनही स्मरणात आहेत.

-डॉ. मच्छिंद्रनाथ गोर्डे, पदाधिकारी, महात्मा गांधी भवन

गंगाप्रसादजी अग्रवाल यांची भाषणे आजही आठवतात व प्रेरणा देतात. प्रवासाला निघाले की दोन पिशव्या खांद्यावर असायच्या, ज्यात गांधीजींनी लिहिलेली व गांधी विचारांची इतर पुस्तके असत. त्यांच्या निधनाने गांधीवादी विचार व संस्थेचे मोठे नुकसान झाले.

-दगडू लोमटे, सामाजिक कार्यकर्ते

स्वातंत्र्यसंग्रामापासून ते हैदराबाद मुक्ती आंदोलन असो की अगदी काही वर्षांपर्यंत गंगाप्रसाद अग्रवाल यांनी सामाजिक कार्यामध्ये विविध जाती-धर्मांसाठी दिलेले योगदान हे न विसरता येण्यासारखे आहे. त्यांचे जीवनकार्य हे सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सामाजिक विचारधारेचा आधारस्तंभ हरवला आहे.

-राजीव सातव, खासदार हिंगोली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ गांधीवादी नेते गंगाप्रसादजी अग्रवाल कालवश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबाद मुक्तीसंग्राम आंदोलनातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सर्वोदय परंपरेचे अग्रणी, गांधीवादी नेते डॉ. गंगाप्रसादजी अग्रवाल (वय ९६) यांनी गुरुवारी (११ ऑक्टोबर) वसमत (जि. हिंगोली) येथे दुपारी एक वाजता राहत्‍या घरी अखेरचा श्वास घेतला. त्‍यांच्‍या पार्थिवावर शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता वसमत येथील वैकुंठधाम स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्यात येणार आहेत.

डॉ. अग्रवाल आजारी हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे दिवसांपूर्वी त्‍यांना नांदेड येथील खासगी रुग्‍णालयात दाखल केले होते. पण, प्रकृती ढासळत असल्‍याने मंगळवारी (९ ऑक्टोबर) रात्री वसमत येथे आणले होते. त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. डॉ. अग्रवाल यांचा वसमत येथे १९२३ मध्ये जन्म झाला. त्यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी विद्यालयात दहावीपर्यंत व वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. याच दरम्यान त्यांच्यावर महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव पडला. वर्धा येथे शिक्षण घेताना स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध आला. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामात सक्रिय सहभाग नोंदविला. ते दिवंगत गोविंदभाई श्रॉफ व अनंतराव भालेराव यांचे सहकारी होते.

\Bअखेरपर्यंत कार्यरत \B

गंगाप्रसादजी अग्रवाल हे १९५३ मध्ये वसमत नगर पालिकेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. तसेच सन् २०००मध्ये वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. स्वातंत्र्योत्तर भारतात गांधींच्या कल्पनेतील स्वराज्य निर्माण करण्यासाठी झेंडा सत्याग्रह, जंगलतोड सत्याग्रह, १९६२ व ६५च्या युद्धावेळी शांतिसेनेचे कार्य, जयप्रकाश नारायण यांच्यासोबत आंदोलन, आणीबाणीच्या काळात तुरुंगवास, विनोबांच्या भूदान चळवळीत आघाडीचे योगदान, मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी संघर्ष, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या काळात हिंदू-मुस्लीम ऐक्य व शांतता प्रस्थापना कार्य, जंगल-जल-जमीन यांचे ग्रामसभेला अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन आदी विविध कार्यात ते अखेरपर्यंत सक्रिय राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images