Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गंगाप्रसादांचे जीवन संघर्षशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गंगाप्रसाद अग्रवाल यांचे जीवन संघर्षशील होते. मूल्य, विचारांसाठी त्यांचा संघर्ष होता, अशा भावना शनिवारी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आल्या.

सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ना. वि. देशपांडे होते. ज्ञानप्रकाश मोदाणी म्हणाले, गंगाप्रसाद अग्रवाल भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आणि हैदराबाद मुक्ती संग्रमात सक्रिय होते. त्यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. ते व्रतस्थ जीवन जगले. श्रीराम जाधव यांनी गंगाप्रसाद अग्रवाल यांचा उल्लेख सकारात्मक भूमिका असलेला माणूस असा केला. सेंद्रीय शेती, पर्यावरणाच्या संदर्भात ते गंभीर होते. त्यागावर आधारित त्यांचे जीवन होते. तसलीम पठाण यांनी अग्रवाल यांच्याबद्दल बोलताना ते स्थितप्रज्ञ आयुष्य जगले, ते निर्मोही होते असे सांगितले. ऐंशीच्या दशकानंतर त्यांच्या सारखा माणूस सापडणार नाही. जातीचे बंधन त्यांच्या आचरणात, विचारात कधीच नव्हते. सुभाष लोमटे म्हणाले, गंगाप्रसाद अग्रवाल यांनी भारतीय संविधानाचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे व्यक्तिमत्व संघर्षशील होते. न्या. डी.आर. शेळके, प्रा. आर. एम. राठी, प्राचार्य प्रताप बोराडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ना. वि. देशपांडे यांनी अध्यक्षीस समारोप केला.

\Bअध्यासन केंद्र स्थापन करा

\Bगंगाप्रसाद अग्रवाल यांच्या नावाने अध्यासन केंद्र स्थापन करा, अशी सूचना श्रीराम जाधव यांनी केली. पर्यावरण, शेती या क्षेत्रात अग्रवाल यांचे काम होते. त्यादृष्टीने आपण कृती केली पाहिजे असे ते म्हणाले. जाधव यांच्या सूचनेला तसलीम पठाण यांनी अनुमोदन दिले. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेण्यापेक्षा अग्रवाल यांच्या नावे नेमके काय करायचे, हे ठरविण्यासाठी महिना - पंधरा दिवसात बैठक घेवून ठरवा, असे सुभाष लोमटे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लॉटिंगच्या वादातून भर दिवसा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्हाट्स अॅप ग्रुपवरील मेसेज आणि प्लॉटिंगच्या वादातून व्यावसायिक तरुणाचा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनसह त्याच्या २० ते २५ साथीदारांनी तलवार, चाकू, दांडक्यांनी हल्ला चढवून खून केल्याची घटना रविवारी दुपारी हर्सूल येथील फातेमानगर भागात घडली. मोईन मेहमूद पठाण (३५, रा. पटेल नगर, जामा मशिदीजवळ, हर्सूल) असे मृताचे नाव आहे.

हर्सूल परिसरात मोईन पठाण हा विवाहित तरुण प्लॉटिंगचा व्यवसाय करीत होता. तो रविवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी चारच्या सुमारास घरी होता. त्याला काही ओळखीच्या लोकांनी आपल्यासोबत दुचाकीवरून नेले. फातेमानगरातील सीमा डेअरीजवळ त्यांना दुचाकीवरून खाली पाडल्यानंतर विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन शेख लाल रसूल पटेल (३८, रा. पटेलनगर, हर्सूल) बाबा रहीम उर्फ बाबा पटेल (४८) आणि बाबा नूर पटेल यांनी,'व्हाट्स अॅप ग्रुपवर आमच्या विरोधात मेसेज का टाकतो आणि प्लॉटिंगच्या व्यवसायातून तू माघार घे,' असे म्हणत त्यांच्यावर अचानक दगड फेकत तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवला.

त्यांचा भाचा इरफान शेख रहीम (२४, रा. बेरीबाग) हा वाचविण्यासाठी गेला. तेव्हा त्याच्यावरही टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात इरफानच्या डोक्यावर जबर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना देखील टोळक्याची मारहाण सुरूच होती. यानंतर टोळक्यांनी अवघ्या ५० मीटरवर असलेल्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्या दहशतीमुळे भांडण सोडविण्यास कोणीही धजावले नाही. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील तरुणांनी गंभीर जखमी मोईन यांना तात्काळ घाटीत नेले; तसेच घटनेची माहिती हर्सूल पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली.

\B

चार महिन्याचा मुलगा झाला अनाथ

\Bमृत मोईनचे वडील अपंग आहेत. मोईन हा विवाहित असून, त्याला तीन मुली, दोन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा चार महिन्यांचा आहे. मोईन हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्यावर कुटुंबाचा सगळा भार असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

\Bप्लॉट विक्रीचे होते भांडण

\Bहर्सूल गावातील एका प्लॉटच्या विक्रीतून शेख लालसोबत मोईन यांचे भांडण होते. मोईन यांनी तो प्लॉट ग्राहकाला विकला होता. तोच प्लॉट शेख लाल याला ग्राहकाला विकायचा होता. त्यांचा हा वाद व्हाट्स अॅप ग्रुपवर देखील सुरू होता. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच मोईन याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर मोईन हा रस्त्यावर जवळपास दहा मिनिटे पडून होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गर्भाशय मुख कर्करोगावर लसीने करा मात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय महिलांमध्ये आजही सर्वाधिक प्रमाणात आढळून येणाऱ्या आणि जगभरात तिसऱ्या स्थानी असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र संघटनेच्या वतीने भरविण्यात आलेल्या प्रदर्शनातून व्यापक व वेधक दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. बहुमोल अशा शास्त्रीय माहितीद्वारे समस्त महिलांना सजग करण्याचा प्रभावी प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे याच गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी अलीकडे 'एचपीव्ही' लस उपलब्ध झाली असून, तिच्याबद्दलही सविस्तर माहिती प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे.

अदालत रोडवरील तापडिया-कासलीवाल मैदानावर आयोजित 'संस्कृती रास दांडिया'च्या गरब्यानिमित्त पोस्टर प्रदर्शनाद्वारे कर्करोग जनजागरण केले जात आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या सहकार्याने आणि स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र संघटनेच्या वतीने नरात्रोत्सवानिमित्त हे प्रदर्शन भरविले आहे. यानिमित्त विविधरंगी पोस्टरद्वारे विविध प्रकारच्या कर्करोगांबाबत शास्त्रीय माहिती सादर करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये दोन पोस्टर हे गर्भाशय मुख कर्करोगाबाबतचे आहेत. यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आशा गायकवाड-उनवणे यांनी गर्भाशय मुख कर्करोगाची कारणे-लक्षणांवर सविस्तर चर्चा केली आहे. 'ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' (एचपीव्ही) हेच या कर्करोगामागचे ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कारण असून, कमी वयात लग्न करणे व लैंगिक संबंध ठेवणे, एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणे, इतर लैंगिक आजार असणे, अनेकवेळा गर्भधारणा होणे, अनेक वर्षे गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणे, रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे आदी महत्त्वाच्या कारणांमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो. तसेच योगीमार्गातून पांढरा किंवा रक्तमिश्रित दुर्गंधीयुक्त स्त्राव जाणे, मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव व जास्त दिवस रक्तस्त्राव होणे, लैंगिक संबंधांच्या वेळेस त्रास होणे, पोट दुखणे, लघवी व शौचामध्ये रक्त जाणे ही या रोगाची लक्षणे आहे. हा कर्करोग टाळण्यासाठी वर्षातून एकदा तरी तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या. वयाच्या ३० ते ६५ वर्षांपर्यंत दर तीन वर्षांनी गर्भाशय मुखाची पॅपस्मिअर तपासणी करून घ्या, असे आवाहन डॉ. गायकवाड यांनी पोस्टरच्या माध्यमातून केले आहे.

\B८० टक्क्यांपर्यंत सुरक्षितता शक्य \B

जगात तिसऱ्या स्थानी असलेल्या गर्भाशय मुख कर्करोगाचा एचपीव्ही लसीने बचाव होऊ शकतो. नऊ ते २६ या वयोगटांत ही लस घेता येऊ शकते. शून्य, दोन, व सहाव्या महिन्याला या लसीचे तीन डोस घ्यावे लागतात आणि एचपीव्ही विषाणुंमुळे होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून एचपीव्ही लसीने पाच ते दहा वर्षांपर्यंत सुरक्षिततता मिळू शकते. या लसीमुळे ७० टक्के गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा, ८० टक्के गुदद्वाराच्या कर्करोगाचा, तर काही तोंडाच्या कर्करोगांचाही बचाव होऊ शकतो, याकडे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रद्धा परीटकर यांनी लक्ष वेधले आहे. शाळेतील मुलींना लस देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही आवाहन डॉ. परिटकर यांनी पालकांसह शिक्षकांना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णपुरा यात्रेतून दोन मंगळसूत्रांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्णपुरा यात्रेत दर्शनासाठी आलेल्या महिलांना मंगळसूत्र चोरट्यांचा चांगलाच फटका बसला आहे. चोरांनी गर्दीमध्ये शनिवारी सायंकाळी दोन महिलांची मंगळसूत्रे लंपास केली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्णपुरा यात्रेत शुक्रवार, शनिवार व रविवार सुटीचे दिवस आल्याने गर्दी झाली आहे. याचा फायदा मंगळसूत्र चोरांना चांगलाच होत आहे. मंगळसूत्र चोरीची पहिली घटना शनिवारी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी या महिलेच्या गळ्यातील वीस हजारांचे मंगळसूत्र लंपास केले. यानंतर मंगळसूत्र चोरीची दुसरी घटना सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान पुन्हा घडली. आणखी एका महिलेचे दहा हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार लक्षात येताच महिलांनी जवळच असलेल्या पोलिस मदत केंद्रामध्ये धाव घेतली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bपोलिसांना आव्हान\B

कर्णपुरा यात्रेनिमित्त जय्यत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुन्हे शाखा व विशेष शाखेची पथके देखील बंदोबस्तासाठी नेमली आहेत. एवढा बंदोबस्त असताना देखील मंगळसूत्र चोरट्यांनी मंगळसूत्र चोरून पोलिसांना आव्हान दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका अधिकाऱ्यांसाठी नव्या वाहनांचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना अधिकाऱ्यांसाठी तब्बल २३ नवीन चारचाकी वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. त्याकरिता दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाहन खरेदीचा निर्णय गुरुवारी (२० ऑक्टोबर)होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी, वॉर्ड अधिकारी यांच्यासाठी नवीन चारचाकी वाहने खरेदीसाठी एक कोटी ३८ लाख रुपये मंजूर करावेत, अशी विनंती सर्वसाधारण सभेला करण्यात आली आहे. सध्या महापालिकेत अधिकाऱ्यांसाठी ३२ वाहने असून १७ अधिकारी खासगी वाहने वापरतात. खासगी वाहने वापरणाऱ्या अधिकाऱ्यांना महापालिकेतर्फे दरमहा विशिष्ट रक्कम दिली जाते. ३२ वाहनांपैकी १४ वाहनांचे आयुष्यमान संपले आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली, घनकचरा व्यवस्थापन, वॉर्ड अधिकारी यांना वाहन असणे गरजेचे आहे.

\B२३ वाहनांची गरज \B

वॉर्ड अधिकारी व सुरक्षा अधिकारी यांच्यासाठी दहा टाटा सुमो, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी १३ कार खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूत्रबद्ध मांडणीवर विज्ञानाचा विश्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नैसर्गिक गोष्टीत किमान हस्तक्षेप केल्यास सत्याच्या जवळ जाता येते. जे दुसऱ्याला सूत्रबद्ध पद्धतीने सांगता येत नाही त्याच्यावर विज्ञान विश्वास ठेवत नाही. त्यामुळे विज्ञान सांगता आले पाहिजे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित न. शे. पोहनेरकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानमालेचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. 'पदार्थ विज्ञान आणि कथात्म साहित्य निर्मिती' या विषयावर रंगनाथ पठारे यांनी विचार मांडले. यावेळी मंचावर 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

'तुमचे आजचे अस्तित्व भ‌विष्यकाळावर प्रभाव टाकते. आजच्या अस्तित्वावर भूतकाळाचा प्रभाव असतो. मात्र, कवी क्षणकाळ बाहेर जगतो. इतर वाड्मय प्रकारात ते शक्य नाही. अध्यात्मात शिरण्यासाठी विज्ञान उपयुक्त ठरते. कारण ते तुम्हाला डोळसपणे विचार करायला लावते. अध्यात्म ही वैयक्तिक अनुभवाची सुंदर गोष्ट आहे. इथे समतोल ढळला की अंधश्रद्धेकडे माणूस वळतो. शिवाय कुणीही उठला आणि आधुनिक झाला असे घडत नाही. सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परंपरेचा अर्थ लावून त्या परंपरेत स्वत:चे स्थान निर्माण केल्याशिवाय आधुनिक होता येत नाही,' असे पठारे म्हणाले. डॉ. कैलास इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी साहित्य रसिक उपस्थित होते.

\Bविज्ञानात भाषेचा अडसर\B

'एखाद्या भाषेची सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला शब्द दुसऱ्या भाषेत सहजासहजी नेता येत नाही. आपण फिजिक्स मराठीत शिकतो. पण, ते मराठीत लिहित नाही. इंग्रजीत असल्याने भाषेचा अडसर ठरतो आणि लोक ज्ञानापासून दुरावतात,' असे पठारे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंच्या वक्तव्याची राज्यपालांकडे तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्यपाल कार्यालयात तक्रार केली. कथित ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर चोपडे यांचा 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यामागे व आंदोलन दडपण्यामागे हात असल्याची शंका येते, असे तक्रारीत म्हटले आहे. या 'ऑडिओ क्लिप'ची न्यायिक चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रतिकात्मक आंदोलन केले होते. मात्र, विद्यार्थी संघटनांच्या दोन गटात वाद होऊन 'अभाविप'च्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या घटनेचा उलगडा करणारे कुलगुरुंचे वक्तव्य ऑडिओ क्लिपने चव्हाट्यावर आले. संबंधित कार्यकर्त्यांना दणके दिल्याचे कुलगुरू क्लिपमध्ये सांगतात. या वक्तव्याने संतापलेल्या संघटनेने राज्यपाल कार्यालयाकडे तक्रार केली. क्लिपमध्ये कुलगुरू चोपडे यांची भाषा अत्यंत खेदजनक व निंदनीय आहे. आठ महिन्यांपासून 'अभाविप' वसतिगृह समस्येवर आंदोलन करीत आहे. प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे २४ सप्टेंबरला कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्रयस्थ व्यक्तींनी कुलगुरूंच्या दालनात शिरकाव करून आंदोलन चिरडले. कुलगुरूंसमोर कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, असे संघटनेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच पोलिसांनी 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. ऑडिओ क्लिपमधील संभाषणावरून कुलगुरूंचा मारहाण व आंदोलन दडपण्यामागे हात असल्याची शंका येते, असा आरोप संघटनेने केला आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांना 'आडवे' पाडल्याची भाषा कुलगुरूसारख्या पदावरील शोभत नाहीत. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे 'अभाविप'चे शिवा देखणे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

दरम्यान, विद्यार्थिनींच्या आंदोलनाची व गांधी सन्मान मार्चची खिल्ली उडवल्यामुळे कुलगुरूंवर टीकेचा भडीमार सुरू आहे. वसतिगृहांच्या समस्या सोडवण्यात चार वर्षे अपयशी ठरलेले कुलगुरू आंदोलनाची थट्टा करतात हा प्रकार संतापजनक असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.

\B'ऑडिओ क्लिप' तपासा\B

'ऑडिओ क्लिप'ची न्यायिक कक्षेत सत्यता तपासून शिक्षण क्षेत्रास न्याय द्यावा, विद्यापीठातील वसतिगृह व इतर समस्यांवर उच्चस्तरीय समिती नेमून विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, कंत्राटी कामगारांच्या आंदोलनातील मागण्यांचा विचार करून योग्य न्याय द्यावा, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. सध्या 'ऑडिओ क्लिप'चा मुद्दा तापला असून कुलगुरू चोपडे यांच्यासोबत चर्चेत उपस्थित असलेल्या व्यक्तीने संभाषण रेकॉर्ड केल्याचा संशय आहे. मात्र, कुणी रेकॉर्डिंग केले याचा उलगडा झाला नसल्याने हा विद्यापीठ वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचनाचे अमृतकण वेचणारी पिढी

$
0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com

औरंगाबाद : वाचनापासून परावृत्त विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याचे दिशादर्शक काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक युवराज माने करतात. 'अमृतकण', 'शिदोरी', 'अभिवाचन' उपक्रमातून शेकडो विद्यार्थ्यांची पुस्तकांशी गट्टी जमली. वाचनातून सजग झालेले विद्यार्थी स्पर्धेत बाजी मारतील असा उत्साही आशावाद माने यांचा आहे.

पारडी (ता. सेलू) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जेवणाची सुटी होते. २० मिनिटांत विद्यार्थी जेवण करतात. कारण त्यांना वेध लागलेले असते नवीन पुस्तकाचे. शिक्षक युवराज माने मनमोकळा संवाद साधत अभिवाचन करतात अन् विद्यार्थी वाचनात रमतात. हा वाचन उपक्रम अखंड सुरू असून, शेकडो विद्यार्थ्यांना वाचनातून जगाचे भान देत आहे. गोंदिया जिल्ह्यात ११ वर्षे नोकरीनिमित्त असताना माने यांनी उपक्रम सुरू केला. दोन वर्षांपूर्वी पारडी येथील शाळेत बदली झाल्यानंतर विद्यार्थी पुस्तकांच्या दुनियेत बागडत आहेत. 'मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी अगोदर वाचून दाखवले. भरपूर चर्चा करून त्यांना बोलते केले. नंतर मुलांना पुस्तके वाचायला लावली. वाचलेल्या पुस्तकांवर परीक्षण लिहायला लावले. पुस्तकातील भावलेला आशय विद्यार्थी नेमकेपणाने लिहू लागली,' असा चकित करणारा अनुभव माने यांनी सांगितला. वाचन व्यवहार व्यापक करण्यासाठी 'अमृतकण' उपक्रम सुरू केला. प्रत्येक विद्यार्थ्याला एक वही देण्यात आली. वाचनावेळी एखादे प्रेरणादायी वाक्य किंवा प्रसंग विद्यार्थी वहीत लिहू लागले. या संकलनातून आशयसंपन्न साहित्याचे संकलन झाले. याचा फायदा निबंध लेखन आणि भाषणासाठी झाला. 'शिदोरी' उपक्रमाने विद्यार्थ्यांना परीक्षण लिहिण्यात तरबेज केले. आतापर्यंत ४० पुस्तकांचे परीक्षण विद्यार्थ्यांनी लिहिले. विशेष म्हणजे पारडीच्या शाळेत बहुतांश विद्यार्थी बंजारा आहेत. मराठी कविता समजून घेत विद्यार्थी आता बंजारा भाषेतसुद्धा कविता मांडतात. राज्यभरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींशी विद्यार्थी पत्राद्वारे संवाद साधत आहेत. ग्रामीण भागात वाचनाची गोडी लावण्याचा आदर्श पायंडा अनेकांसाठी मार्गदर्शक ठरला आहे.

\Bबोराडे यांनी पाठवले पत्र

\Bज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या 'पोपट उडाला भुर्र' पुस्तकावर परीक्षण लिहून विद्यार्थ्यांनी बोराडे यांना पाठवले. परीक्षणे आवडल्याने बोराडे यांनी मुलांना पत्र आणि पुस्तके पाठवली. आबा महाजन यांच्या पुस्तकांवरही विद्यार्थ्यांनी परीक्षण लिहिले. मान्यवर लेखकांनी माने यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

विद्यार्थी अभिव्यक्त होत नाहीत तोपर्यंत शिक्षण पूर्ण झाले असे मानत नाही. अभिव्यक्त होण्यासाठी वाचन महत्त्वाचा भाग आहे. वाचनाच्या व्यासंगातून विद्यार्थी परिपक्व होतात.

युवराज माने, शिक्षक, पारडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पारंपरिक खेळांचा लुटला आनंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उखाणे, बकेट बॉल, फोर कॉर्नर, चमचा लिंबू यांसह पारंपरिक खेळांचा आनंद महिलांनी रविवारी लुटला. निमित्त होते 'महाराष्ट्र टाइम्स' आणि आदिशक्ती नारी विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित 'साज पैठणीचा' या अनोख्या उपक्रमाचे. या उपक्रमाची सुरुवात सम्राट कॉलनीतून करण्यात आली. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी सोनाली पंदुरे आणि सुप्रिया दुबे या पैठणी साडीच्या विजेत्या ठरल्या. महिलांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अर्थात स्त्रीशक्तीचा सन्मान व्हावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात सहभागी विजेत्या महिलांना पैठणी साडी, ट्रॅव्हलिंग बॅग, गालिचा, क्वाइन अशा भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळाली.

'आदिशक्ती नारी विकास प्रतिष्ठान'च्या संचालिका, नागेश्वरवाडी येथील नगरसेविका कीर्ती महेंद्र शिंदे आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांच्यातर्फे आयोजित 'साज पैठणीचा' या आगळ्यावेगळ्या उपक्रमात शहरातील सर्वच वॉर्डातील महिलांना विविध भेटवस्तू, पैठणी साडी, ट्रॅव्हलिंग बॅग, सुंदर गालिचा, क्वाइन जिंकण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक ठिकाणी तीन अशा नऊ विजेत्या स्पर्धकांची एकत्रित एक स्पर्धा होईल व त्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी बक्षिसे देण्यात येत असून प्रत्येक विजेत्या स्पर्धकाला क्वाइन भेट स्वरूपात मिळणार आहे. दररोज शहरातील प्रत्येक वार्डात तीन ठिकाणी महिलांचे विविध खेळ, स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत आहे. इतकेच नव्हे तर प्रेक्षक महिलांना देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसे जिंकता येत आहे. प्रत्येक वार्डात तीन ठिकाणी 'साज पैठणीचा' कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यक्रमांसाठी नॉलेज पार्टनर 'लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल', हेल्थ पार्टनर 'गेटवेल कॅन्सर क्लिनिक' सक्सेस पार्टनर डॉ. शिवकुमार गोरे यांचे 'सुखायु सुश्रुत हॉस्पिटल्र व 'शिंदे प्रॉपर्टीज' यांचे सहकार्य लाभले आहे. जास्तीत जास्त महिलांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवाहन संयोजिका कीर्ती शिंदे यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९०२१६५९३९४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात स्पर्धेत सहभागी महिलांना पासिंग द पास (वस्तू एकमेकींकडे देणे), बकेट बॉल (ठराविक अंतरावरून बकेटमध्ये चेंडू टाकणे), फोर कॉर्नर, चमचा लिंबू आणि उखाणे यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय पारंपरिक खेळ देखील खेळण्यात आले. निकिता मांजरमकर व शैलेश कोरडे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.

\Bस्पर्धेतील विजेते\B

सम्राट कॉलनी

प्रथम : अनिता दहिभाते

द्वितीय : अर्चना चांडक

तृतीय : आशा तांबारे

लकी ड्रॉ विजेत्या (क्वाइन) : सुवर्णा अमृतकर, पल्लवी दलाल, सोनाली महाजन

धनमंडी बाग

प्रथम : राणी एकुंडे

द्वितीय : सोनाली पंदुरे

तृतीय : सारिका विटोरे

लकी ड्रॉ विजेत्या (क्वाइन) : कविता लोखंडे, रामकौर मोढेरे, सुरेखा दिवेकर-मोरे

पावन गणेश मंदिर (नारळीबाग)

प्रथम : सिंधू वाघचौरे

द्वितीय : सोनिया वारे

तृतीय : पूनम पाटील

लकी ड्रॉ विजेत्या (क्वाइन) : वर्षा अतकरे, सुनीता घोडके, सरिता अतकरे

तिन्ही गटातून फायनल विजेते

प्रथम : पैठणी साडी : सोनाली पंदुरे

द्वितीय : ट्रॅव्हलिंग बॅग : आशा तांबारे

तृतीय : गालिचा : पूनम पाटील

\Bसायंकाळचे सत्र

\Bपारधीपुरा

प्रथम : सीमा ताजने

द्वितीय : रोशनी रायपुरे

तृतीय : निलावती बोंबले

लकी ड्रॉ विजेत्या (क्वाइन) : रुकसाना बेगम, शालिनी निकम, निशा पतंगे

\Bभोईवाडा

\Bप्रथम : जया पाटील

द्वितीय : मंगल बिडगर

तृतीय : रिता मुळे

लकी ड्रॉ विजेत्या (क्वाइन) : कोमल महाले, रुची तायडे, नेहा हरणे

नागेश्वरवाडी

प्रथम : सोनी देवतकर

द्वितीय : गयाबाई यादव

तृतीय : सुप्रिया दुबे

लकी ड्रॉ विजेत्या (क्वाइन) : कुमुदिनी निकम, अर्चना कुलकर्णी, ज्योत्स्ना लचुरे

तिन्ही गटातून फायनल विजेते

प्रथम : पैठणी साडी सुप्रिया दुबे

द्वितीय : ट्रॅव्हलिंग बॅग मंगल बिडगर

तृतीय : गालिचा रोशनी रायपुरे

\Bआज याठिकाणी रंगणार स्पर्धा

\Bसोमवार, १५ ऑक्टोबर २०१८

सकाळचे सत्र (औरंगपुरा वार्ड)

१०.३० : इंटक ऑफिस कामगार कॉलनी

११.३० : एसीबी कॉलनी, ओंकारेश्वर मंदिराजवळ

१२.३० : जनता बाजार पार्किंग, औरंगपुरा

सायंकाळचे सत्र (समर्थनगर वार्ड)

दुपारी चार : शिवशक्ती हॉल, पुष्पनगरी

दुपारी पाच : काळा राम मंदिर, आसा पुरा, उदय कॉलनी

दुपारी सहा : समर्थ गणेश मंडळ, ओपन स्पेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ सर्वेक्षणात सेवांचा स्तर उंचावावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर सेवेचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करा,' असे आवाहन स्वच्छ सर्वेक्षण पथकाच्या विभागीय प्रमुख स्नेहा नायर यांनी केले. महापालिकेतर्फे 'माझा कचरा, माझी जबाबदारी' या विषयावर मौलाना आझाद संशोधन केंद्रात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. नायर यांनी 'स्वच्छ सर्वेक्षण २०१९', 'माझा कचरा, माझी जबाबदारी' आणि 'आपले हक्क-जबाबदारी' या विषयावर सादरीकरण केले. स्वच्छ सर्वेक्षणाचे चार प्रमुख निकष आहेत. त्यात सेवा स्तर उंचावण्याचा मुद्या महत्त्वाचा आहे, त्यावर लक्ष द्या. हागणदारीमुक्त शहर, कचऱ्याचे वर्गीकरण, स्वच्छते संदर्भात नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद या मुद्यांचा समावेश आहे. या सर्व मुद्यांवर लक्ष केंद्रीत करून येत्या काळात काम करा, असे आवाहन नायर यांनी केले.

महापौरांनी सध्याच्या कचरा वर्गीकरण कामाबद्दल समाधान व्यक्त केले. २०१७ या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबादचा क्रमांक २९९ वा होता. गतवर्षी १२८ वा क्रमांक आला. यंदा पहिल्या दहामध्ये आपले शहर आले पाहिजे या दृष्टीने आपण सर्व मिळून काम करू, असे आवाहन त्यांनी केले.

प्रशिक्षण कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, महावीर पाटणी, वर्ल्ड टॉयलेटचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा, व्यवस्थापक स्मिता सिंग, महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरिक्षक, जवान, नागरिक मित्र पथकाचे सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम फोडून सात लाख चोरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

देवगाव (रंगारी) येथे बसस्थानका जवळील व गल्ले बोरगाव रोडवरील इंडिया वन या कंपनीचे एटीएम मशीन रविवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने तोडफोड करून एटीएममधील सात लाख ४० हजार ६०० रुपये चोरट्यांनी लंपास केले. एटीएम मशीन रूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड करण्यात आली असून चलनातील शंभर व पाचशे रुपयाच्या काही नोटा जळालेल्या स्थितीत आढळून आल्या आहेत.

या घटनेमुळे देवगाव व परिसरात घबराट पसरली आहे. एटीएममध्ये चोरी झाल्याची बाब सकाळी फिरण्यासाठी बाहेर गेलेल्या काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी देवगाव पोलिस ठाण्यास ही माहिती कळविली. पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्ना शहापूरकर, पोलिस नाईक जावेद शेख, संतोष धाटबळे, दादासाहेब चेळेकर, विजय धुमाळ, ऋषिकेश पैठणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली; तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, भगतसिंह दुलत, रतन वारे यांच्यासह, श्वान पथक, दहशतवाद विरोधी पथक यांनी भेट देऊन माग काढण्याचा प्रयत्न केला. एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा नसल्याने चोरट्यांचे फावल्याचे बोलले जात आहे, इंडिया वन एटीएमचे औरंगाबाद येथील झोनल ऑपरेशन मॅनेजर जयदीपसिंह अजमानी यांच्या फिर्यादीवरून देवगाव (रंगारी) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चशिक्षित महिला बनली कुशल शेतकरी

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com

Tweet : @RavindraTMT

औरंगाबाद : शेती हा जोखमीचा व्यवसाय. कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी शेती मालाला भाव नाही. या फेऱ्यामुळे शेतकरी कायम चिंतेत. अशा परिस्थितीत पारंपरिक शेती व्यवसायाला रेशीम शेती व फूल शेतीची जोड देत, मेहनत व अभ्यास पूर्ण नियोजन करत शेती ही फायदेशीर असल्याचे सांजुळा येथील उमा जाधव यांनी दाखवून दिले आहे.

औरंगाबाद शहरापासून २२ किलो मीटर फुलंब्री तालुक्यात असलेल्या सांजुळा गावातील उमा योगेश्वर जाधव या महिलेने शेती व्यवसायात पती योगेश्वर जाधव यांना साथ देऊन शेती फुलविली आहे. 'बीए'ची पदवीधर असलेल्या उमा यांचे माहेर बिल्डा. माहेरी शेती हेज उपजीविकेचे साधन. त्यामुळे शेतीची गोडी त्यांना लागली. त्यांचा २००९मध्ये योगेश्वर जाधव यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्या पतीला शेतीच्या कामात मदत करू लागल्या. पती, दोन लहान मुले, सासू, सासरे, दीर असे त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. गाव शिवारातच त्यांची अवघी तीन एकर शेती आहे. लगत एक मध्यम प्रकल्प असून, विहिरीत बऱ्यापैकी पाणी असते.

उमा यांचे पती सुरुवातीला थोडाबहुत भाजीपाल्यासह अलं व प्रामुख्याने ऊस लागवड करत, पण वाढता खर्च आणि पाणी टंचाई यांमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. परिणामी कुटुंबाची ओढाताण होत असे. ही बाब लक्षात घेत उमा यांनी कमी पाण्यात, कमी खर्चात शाश्वत उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेशीम शेतीचा पर्याय सुचवला.

रेशीम शेतीचा अभ्यासासाठी पुस्तक वाचली, नंणंदेच्या घरी तूती लागवड केली जाते. त्यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली. पत्नीच्या प्रयत्नांना पतीला योगेश्वर यांनी साथ देत कृषी विभागाकडून रेशीम शेतीचे प्रशिक्षण ही घेतले. त्यांनी डिसेंबर २०१६मध्ये शेतात दहा गुठ्ठ्यांत नर्सरी उभारून रोपटी तयार केली. जून २०१७पासून तुती लागवड सुरू केली. सुरुवातीस दुष्काळी परिस्थिती व नवीन प्रयोग असल्याने फारसे उत्पादन झाले नाही, तसा तोटाही झाला नाही. उमा यांनी पुढे नेटाने रेशीम शेतीला गती देत त्याचा विस्तार केला आणि ५० गुंठ्ठ्यांत तुती लागवड सुरू केली. आजघडीला शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने मेहनतीला खऱ्याअर्थाने फळ आल्याचे उमा यांनी सांगितले. सुरुवात माल विक्रीस कर्नाटक जावे लागत होते. आता जालन्यातही बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाने तुती लागवडीसाठी दिलेले प्रोत्साहन अनुदानातून शेड उभारण्यात येत आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रक्कम जमा होईल; तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तुती लागवडीसाठी मोठी मदत होत असल्याचे त्यांनी नमूद करून, कमी खर्चात शाश्वत उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले.

\Bपाण्याचा काटकसरीने वापर\B

हे यश सहजासहजी मिळाले नाही, त्यासाठी उमा व योगेश्वर यांना अपार कष्ट घ्यावे लागले. उमा यांच्या प्रयोगशील वृत्ती, चिकाटी आणि मेहनतीमुळेच शेतीला आकार आलाय, अशी भावना योगेश्वर जाधव यांनी व्यक्त केली. रेशीमशेतीसह भाजीपाला लागवड व फुल शेतीही त्यांनी फुलवली असून, पाण्याचा काटकसरीने वापरा करण्यासाठी ठिबक सिंचन ही करून घेतले आहे. उमा यांनी राबविलेला शेतीच हा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय बनल असून, ही शेती पाहण्यासाठी अनेकजण भेटी देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिसेस औरंगाबाद’साठी रहा सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र टाइम्सच्या 'मटा श्रावणक्वीन' स्पर्धेने औरंगाबादच्या तरुणींमध्ये जबरदस्त क्रेझ निर्माण केली. आहे. या स्पर्धेप्रमाणेच गेल्यावर्षी 'मटा'ने विवाहित महिलांसाठी 'मिसेस औरंगाबाद' ही अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. यंदाही महिलांसाठी 'मिसेस औरंगाबाद' ही स्पर्धा 'मटा' घेऊन आला आहे. तेव्हा सज्ज व्हा, 'मिसेस औरंगाबाद'चा मुकुट पटकावण्यासाठी.

गृहिणींनो तुमचे सौंदर्य आणि तुमची अदाकारी अर्थात तुमच्यातील कलागुण अन् बुद्धिमत्ता यांची कसोटी ही स्पर्धा घेणार आहे. अर्थात तुमच्यातील आत्मविश्वासाच्या जोरावर आणि पूर्ण तयारी करून या कसोटीत तुम्ही खऱ्या उतरालच यात शंका नाही. तुमच्यातील कलाकाराला जागं करा आणि सज्ज व्हा 'मिसेस औरंगाबाद' बनण्यासाठी. महिलांच्या तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र टाइम्सची 'मिसेस औरंगाबाद' ही स्पर्धा १८ ते ३५, ३६ ते ५० आणि ५० वर्षांवरील महिलांसाठी अशा तीन गटांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८ ऑक्टोबर २०१८ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे तातडीने आपले नाव 'मटा'कडे नोंदवा आणि स्पर्धेत एन्ट्री घेऊन निश्चित व्हा. आणि हो स्पर्धेच्या तयारीलाही लागा. कारण गेल्यावर्षी स्पर्धा खूपच अटीतटीची झाली होती, हे तुम्ही पाहिल आहेच. यंदाही 'मिसेस औरंगाबाद' स्पर्धेचा मुकुट घालण्यासाठी चुरशीची स्पर्धा होणार, यात शंका नाही. श्रावणात आपल्या मुलींची स्पर्धा बघण्यासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात. आता या स्पर्धेत सहभागी होऊन 'हम भी कुछ कम नही' दाखवून द्यायला सज्ज व्हा.

\Bअशी करा नोंदणी\B

'मिसेस औरंगाबाद' स्पर्धेतील सहभागासाठी आपण महाराष्ट्र टाइम्सच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात येऊन स्पर्धेचा फॉर्म भरून देऊ शकता. किंवा नदीम यांच्याकडे ९८२२६३०५५५ या मोबाइलवर फोन करून नाव नोंदणी करू शकता. अथवा 'हर्षा अॅण्ड संजय' १२, सिडको, टाऊन सेंटर, इंडियन एअरलाइन्स ऑफिसच्या मागे, सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ येथेही आपली नाव नोंदणी करू शकता. स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी १८ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे.

\Bमहिलांच्या आग्रहावरून\B

मटा आयोजित करीत असलेल्या या स्पर्धेत गेल्यावर्षी १८ ते ३५ आणि ३६ ते ५० अशा दोन गटांतच स्पर्धा झाली होती. या स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र, ५० वर्षांवरील महिलांनी 'आमच्यासाठीही ही स्पर्धा हवी,' असे सांगत '५० वर्षांपुढील महिलांचाही एक गट पुढच्या वर्षी ठेवावा', अशी आग्रही मागणी केली होती. महिलांचा उत्साह आणि त्यांच्या मागणीचा विचार करात महाराष्ट्र टाइम्सने यंदा ५० वर्षांपुढील गटाचाही या स्पर्धेत समावेश केला आहे.

\Bअशी होईल स्पर्धा\B

ही स्पर्धा १८ ते ३५, ३६ ते ५० आणि ५० वर्षांवरील महिलांसाठी अशा तीन गटांमध्ये होणार आहे. या स्पर्धकांना चार राउंडची परीक्षा द्यावी लागणार आहे. यात इंट्रोडक्शन राऊंड, रॅम्पवॉक, कोणताही एक कलाप्रकार तीन मिनिटांत सादर करणे व त्यानंतर प्रशोनत्तराचा राउंड होईल. त्यातून परीक्षक विविध पारितोषिकांसाठी विजेत्यांची निवड करतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकल मारवाडी समाजाला सोबत घेणारे मंडळ

$
0
0

सकल मारवाडी समाजातील महिलांना सोबत घेत २०१७ मध्ये मारवाडी मिडटाउन शाखेची स्थापना करण्यात आली. पदार्पणातच समाजाच नव्हे, तर कुटुंबालाही सोबत घेणाऱ्या मंडळाने सामाजिक कार्य, शिक्षण आणि एकत्रित कुटुंबपद्धतीला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम घेतले आहेत. सुप्रिया सुराणा या मंचच्या संस्थापक अध्यक्ष असून पहिल्याच वर्षी शाखेने देशपातळीवरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मारवाडी समाजात स्वर्णसीडी पूजेचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये पणतुंकडून पणजोबा-पणजी यांची पूजा केली जाते. हा जवळपास एका लग्नासारखाच कौतुक सोहळा असतो. परिस्थितीअभावी प्रत्येकाला विधी करणे अशक्य असते. त्यामुळे मिडटाउन शाखेने हा सामुदायिक उपक्रम घेतला. तो देशातील पहिलाच उपक्रम ठरला. प्रसिद्ध पाककला तज्ज्ञ डिंपल यांची डिझायनर कॉफीची कार्यशाळा खूप गाजली. सुपर कॉर्न क्लब कार्यशाळेलाही चांगला प्रतिसाद मिळाला.

मारवाडी समाजातील महिलांच्या सुप्तगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठवाड्यात प्रथमच मिसेस मारवाडी टॅलेंट आयकॉन स्पर्धा आयोजित केली. महेशनवमीच्या कार्यक्रमात शीतपेय वाटप केले. नवरात्रात गेल्या वर्षी कुमारिका पूजन म्हणून मेघालयीन मुलींच्या वसतिगृहाला मदत केली. या उपक्रमांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. धुळे इथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत शाखेला विशिष्ट कार्यगौरव पुरस्कार देण्यात आला. सिलीगचडी येथील अधिवेशनातही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

\Bशालेय साहित्य वाटप \B

मिडटाउन शाखेच्या गेल्या वर्षीपासून 'आओ पढाए एक हाथ आगे बढ़ाए' हा शालेय साहित्य मदतीचा उपक्रम घेण्यात येतो. या उपक्रमात इंदिरानगर येथील मनपाच्या प्रियदर्शनी शाळेस अॅम्लिफायर, साउंड बॉक्स स्टँड, माइक व कॉर्डलेस माइक व शालेय साहित्य भेट देण्यात आले. यंदा चौराहा येथील मराठा हायस्कूलला मदत करण्यात आली.

\Bकार्यकारिणी\B

संस्थापक अध्यक्ष सुप्रिया सुराणा, अध्यक्ष रिंकु उपाध्याय, सचिव भक्ती संकलेचा, उपाध्यक्ष भारती तोतला व वर्षा तोडवाल, कोषाध्यक्ष अलका अग्रवाल, संघटनमंत्री पूनम सारडा, वर्षा मंत्री, चंचला करवा, संगीता ओसवाल, प्रीती लखोटिया, माया मुथा, सोनल सारडा, ललिता करवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंढेंचा दसरा मेळावा सावरगाव घाटावर

$
0
0

औरंगाबाद :

भगवान गडावर दसऱ्याच्या वेळी राजकीय भाषण नको, अशी भूमिका घेतली गेल्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली व सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आयोजित केला. यंदाचाही दसरा मेळावा सावरगाव घाट येथेच घेतला जाणार आहे. यावर्षी या ठिकाणी भगवान बाबांच्या २५ फुटांच्या मूर्तीचीही स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती दसरा मेळावा कृती समितीच्या संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. दसरा मेळावा कृती समितीचे उद्धव ढाकणे, गणेश आव्हाड, इंदुमती आघाव, सविताताई घुले, ज्ञानेश्वर ढाकणे, बाळासाहेब चौधर यांची यावेळी उपस्थिती होती.

उद्धव ढाकणे यांनी सांगितले की, गेल्यावर्षीच्या दसरा मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाही सावरगाव घाट येथेच हा मेळावा घेतला जाणार आहे. यावर्षी घाटावर भगवान बाबांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. ही मूर्ती १६ ऑक्टोबरलाच नगरहून सावरगाव घाटाकडे नेली जाणार आहे. कार्यक्रमासाठी दहा लाख लोक येणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केली. या समितीच्या प्रदेशाध्यक्ष सविताबाई घुले यांनी काही वाचाळवीर सोशल मीडियावरून पंकजाताईंच्या विरोधात वक्तव्य करीत असल्याचा आरोप केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसात तक्रार दिल्याने घरात घुसून विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पतीने पेालिस ठाण्यात गृहनिर्माण संस्थेच्या सभासदाच्या फसवणुकीची तक्रार दिल्याने आरोपींनी बुरखाधारी तरुणांसह घरात घुसून महिलेला मारहाण करीत विनयभंग केला. हा प्रकार गुरुवारी दुपारी सातारा परिसरात घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या पतीने चिकलठाणा पोलिस ठाण्यात पिसादेवी येथील गृहनिर्माण संस्थेमधील सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रदीप बालाजी मोटरवार (रा. उल्कानगरी, खिंवसरा पार्क ) याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या गोष्टीचा राग मोटरवार याला आला होता. गुरुवारी दुपारी ही महिला एकटी घरात होती. यावेळी आरोपी मोटरवार, मोसीन आणि त्यांच्यासोबत तीन बुरखाधारी महिला व पुरूष घराच्या दरवाजावर थापा मारून त्यांच्या घरात घुसले. घरात शिरल्यानंतर आरोपींनी महिलेच्या घरातील सामान फेकण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने अडवले असता आरोपी मोसीनने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मोटरवार, मोसीन व इतर बुरखाधारी आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय डोईफोडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीतील टोळी मुकुंदवाडीत जेरबंद

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींच्या टोळीला मुकुंदवाडी पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी पहाटे तीन वाजता पायलटबाबा नगरी येथे करण्यात आली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दरोड्याच्या प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकुंदवाडी परिसरातील पायलटबाबा नगरी येथे काही संशयित आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने पायलटबाबानगरीत छापा टाकला. यावेळी सम्राट हॉटेलच्या वॉलकंपाउंड जवळ एका अॅपेरिक्षामध्ये काही संशयित आढळले. पोलिसांनी सापळा रचून आरोपी अनिल रावसाहेब हिवाळे (रा. लोकशाही कॉलनी), दत्ता गणपत रोकडे (रा. शहानगर), कृष्णा भास्करराव पवार (रा. संजयनगर), सचिन भगवान धुमाळ (रा. राजनगर), मुकेश महिंद्र साळवे (रा. मुकुंदवाडी) आणि किरण शिवाजी तारू (रा. राजनगर) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून, सुरा, टॉमी, फायटर, दोरी, मिरचीच पूड, लोखंडी रॉड आदी साहित्य झडतीमध्ये सापडले. आरोपींविरुद्ध सहायक फौजदार कौतीक गोरे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पीएसआय संजय बनसोड याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांआधारे मालमत्तेची विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खरेदी केलेल्या मालमत्तेची बनावट कागदपत्र तयार करून तिची पुन्हा विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला. १३ जून २०१८ ते १२ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून स्टार वायर इंडिया विद्युत कंपनीच्या संचालक मंडळासह सहा जणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अमित विनायकराव बोरसे (वय ३२, रा. सिडको एन तीन) यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार; बोरसे यांनी टाउन सेंटर येथील एलोरा कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरील दोन हॉल अनिल जगदीश अग्रवाल यांच्याकडून ७० लाख रुपयांत कायमस्वरुपी नोंदणी खरेदीखताच्या आधारे खरेदी केले. या दोन्ही हॉलची बनावट कागदपत्रे आरोपींनी तयार केली. ही कागदपत्रे दुय्यम सहनिबंधक कार्यालयात सादर करून या मालमत्तेची पुन्हा खरेदी-विक्री केली.

हा प्रकार समजल्यानंतर बोरसे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी बोरसे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी स्टार वायर इंडिया विद्युत प्रा. लि.चे संचालक मंडळ (या कंपनीचे पूर्वीचे नाव पारितोष मार्केटिंग होते.) अश्विनीकुमार मल्होत्रा, शंकरलाल गोविंदराम गुणवानी, अश्वीन गोविंद पटेल चौधरी, दिनेश गोकुळ पटेल चौधरी व दामजी गोकुळ पटेल चौधरी यांच्याविरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, कट रचणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय नागरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजळवून देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबवले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दागिने स्वच्छ करण्याचे आमिष दाखवत महिलेचे एक लाख १२ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हातचलाखीने लंपास केले. हा प्रकार गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता समर्थनगर भागात घडला. याप्रकरणी शनिवारी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही महिला गुरुवारी दुपारी मुलीसह घरामध्ये एकटी होती. यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. त्यांनी दागिने उजळवून देणाऱ्या पावडरचे विक्रेते असल्याचे सांगितले. त्यांचे साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र स्वच्छ करून देतो, असे आमिष त्यांनी महिलेला दाखवले. या महिलेने मंगळसूत्र दिल्यानंतर ते मंगळसूत्र पावडरचे पाणी असलेल्या एका लहान डब्यात ठेवण्याचे नाटक करीत हातचलाखीने मंगळसूत्र लंपास केले. यानंतर महिलेला डबा देत यामध्ये मंगळसूत्र आहे. थोड्या वेळाने काढा, असे सांगत दोघेही पसार झाले. महिलेने थोड्या वेळाने डबा उघडून पाहिले असता मंगळसूत्र त्यामध्ये आढळले नाही. आरोपींनी मंगळसूत्र लंपास केल्याचे तिच्या लक्षात आले.

दरम्यान, या महिलेचे पती बाहेरगावी गेलेले असल्याने शनिवारी पती आल्यानंतर तिने पोलिस ठाणे गाठले. महिलेच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात अपहार करणे, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएसआय पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे आजपासून नवरात्री होम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या औरंगाबाद शहर शाखेच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून (१५ ऑक्टोबर) रेल्वेस्टेशन रोडवरील टकसाळी लॉन्स येथे नवरात्री होमचे आयोजन करण्यात आले आहे. यात गौ पूजन, कन्या पूजन, अन्नदान आदी उपक्रमांसह विविध नवरात्री होम होणार आहेत.

या उत्सवामध्ये सोमवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत महागणपती होम, नवग्रह होम व चंडी होम होणार आहे. मंगळ‍वारी (१६ ऑक्टोबर) सकाळी ७ ते १० या वेळेत महारुद्र होम, तर सायंकाळी ५ ते रात्री ९ या वे‍ळेत महासुदर्शन होम व चंडी होम होणार आहे. बुधवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत नवचंडी होम होणार आहे. या उपक्रमामध्ये मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना सहभागी करुन घेतले जाणार असून, त्यांच्या भोजनाची सोयही केली जाणार आहे. तसेच शहरातील तीन अनाथाश्रमातील २ ते ११ वयोगटातील १५१ मुलींनाही उपक्रमात सहभागी करुन घेत त्यांचे कन्या पूजन केले जाणार आहे. नागरिकांनी या तीन दिवसीय नवरात्रोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन बंगळुरुस्थित आश्रमातील स्वामी प्रणवानंद, शिवशंकर रमणी, प्रभंजन महातोले, देवेन लड्डा, नंदकिशोर औटी यांनी रविवारी (१४ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images