Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शेतकऱ्यांच्या मुलांशी बेईमानी: आमदार बच्चू कडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारखी यंत्रणा असताना पदभरतीसाठी महापरीक्षा पोर्टल म्हणजे खासगीकरणाचा आधार घेतल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. अशा प्रकारची यंत्रणा आणून सरकारने बेईमानी केली, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पवित्र असायला हवे, असेही ते म्हणाले.

'द ज्ञानप्रबोधिनी अकॅडमी', स्वराज्य प्रतिष्ठाणतर्फे 'स्पर्धा परीक्षेची संभ्रम अवस्था' विषयावर ते मार्गदर्शन करत होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या कार्यक्रमाच्या मंचावर समाधान दौंड, किरण खरे, कल्पना निळ, स्वराज्य प्रतिष्ठाणचे समाधान जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार कडू म्हणाले, राज्य आयोग असताना खासगीकरणातून पदभरतीची प्रक्रिया केली जाते आहे. यामध्ये पैशांची मोठी उलाढाल होत आहे. सत्तेत आल्यानंतर 'आपल्या' लोकांना नोकरीत स्थान देण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. असे घोटाळे होत असतील, तर मुख्यमंत्र्यांना ते दिसत नाहीत का? त्यांनी या प्रकरणात पवित्र असायला हवे. या प्रकरणात राज्यपातळीवर एकत्र येत लढा उभारण्याची गरज आहे, असे आमदार कडू म्हणाले.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांची मुले आहेत. डोळ्यात तेल घालून चार-पाच वर्षे हे विद्यार्थी अभ्यास करतात आणि पात्रतेच्या यादीत २५ ते ३० नावे मंत्री, खासदार, आमदार अधिकाऱ्यांच्याच पोरांची येतात. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मेहनीवर पाणी फेरण्यासारखे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येत आहे, असे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान जाधव यांनी केले.

\Bखासदार दानवेंनी केले दोनशे कोटी खर्च\B

साडेचार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, सरकारचं धोरण इंचभरही बदलेलं नाही. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना बदनाम केले जाते. लग्नात मोठे खर्च म्हणून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. खासदार रावसाहेब दानवे यांनी लग्नाला २०० कोटी रुपये खर्च केले; त्यांनी कोठे आत्महत्या केली. विशेष म्हणजे नोटबंदीच्या काळात हे लग्न केलं. नवरदेवाला घोड्यावर काय हत्तीवर नेले असे आमदार बच्चू कडू म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेकडून सेक्ससाठी दबाव; तरुणाची आत्महत्या

$
0
0

परभणी

पुरुषांकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्याविरोधात बॉलिवूडमध्ये 'मीटू' मोहिम सुरू असतानाच एका महिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिटकरी असे या तरुणाचे नाव आहे.

परभणी-वसमत रोडवरील ब्रम्हा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सचिन मिटकरी या तरुणाने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिनने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून आत्महत्येला महिलेला जबाबदार धरले आहे. या महिलेने माझे आयुष्य बरबाद केले आहे. तिने माझ्याकडे सतत शरीरसुखाची मागणी केलीय. ते करण्यासाठी सतत माझ्यावर दबाव टाकला. तिचे अजून दोन-तीन मुलांसोबत अनैतिक संबंध आहेत.

माझ्या आत्महत्येला तिच जबाबदार असून तिनं माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, या सर्व त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय, असं सचिननं सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. दरम्यान, आरोपी महिलेने पाच दिवसांपूर्वी मृत तरुणावर ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्करुग्णांवर मायेची सुरेल फुंकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याच्या मातीत जन्मलेल्या आणि वऱ्हाडकार (कै.) लक्ष्मण देशपांडे यांनी अजरामर केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या अतिशय लोकप्रिय नाट्यकृतीच्या एकापेक्षा एक दमदार नाट्यप्रवेशांनी, तर काळजाचा ठाव घेणाऱ्या गीत-संगीताने नटलेली 'मायेची फुंकर' ही मैफल कर्करुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी खरोखर मायेची फुंकर ठरली. सुमित राघवन, चिन्मई सुमित व संदीप पाठक या ख्यातनाम कलावंतांनी ही मैफल संस्मरणीय केली.

'वर्ल्ड होस्पाइस डे' व 'वर्ल्ड पॅलिएटिव्ह केअर डे'निमित्त ही मैफल कर्करुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी सोमवारी (१५ ऑक्टोबर) ही मैफल घाटीच्या महात्मा गांधी सभागृहात झाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानिमित्त विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार इम्तियाज जलील, आमदार सतीश चव्हाण, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता पाटील, पॅलिएटिव्ह केअर विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा देशमुख, डॉ. अर्चना राठोड, डॉ. जीवन राजपूत आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या प्रसंगी हरिभाऊ बागडे यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करीत, कर्करुग्णांनी हिमतीने कर्करोगाशी झुंज दिली पाहिजे, हिमतीने झुंज दिली तरच सावता येऊ शकते, असेही मत व्यक्त केले. शरीराला कॅन्सर होऊ शकतो, मनाला नाही, असे सांगत कर्कग्णांवर मायेची फुंकर घालताना मलाही खूप प्रेरणा मिळाल्याचे चिन्मई राघवन म्हणाल्या.

कर्करुग्णांचा 'लढवय्ये' असा उल्लेख करीत कर्करुग्णालयामध्ये मिळणाऱ्या सुविधांचा संदीप पाठक यांनी गौरव केला व पाठक यांनीच सादर केलेल्या 'वऱ्हाड'च्या काही नाट्यप्रवेशांना भरभरून दाद मिळाली. सुमित राघवन यांनी कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांना सलाम करीत कर्करुग्णालयामध्ये मिळणाऱ्या सुविधांचा गौरव केला. या वेळी डॉ. वर्षा देशमुख व डॉ. अर्चना राठोड यांनी पॅलिएटिव्ह केअर विभागाची सविस्तर माहिती दिली. त्याचवेळी केवळ एक वर्षात ५०० पेक्षा जास्त कर्करुग्णांवर उपचार झालेल्या कॅन्सर हॉस्पिटलच्या पॅलिएटिव्ह विभागाची नोंद वेबसाईटवर झाली असून, कॅन्सर हॉस्पिटलला मराठवाड्याचे 'टाटा हॉस्पिटल' करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मत डॉ. येळीकर यांनी व्यक्त केले. तसेच सिव्हिल हॉस्पिटल, एमयुएचएस व डेंटलची जागा मिळाली तर कॅन्सर हॉस्पिटलचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होऊ शकेल, असे डॉ. गायकवाड म्हणाले. डॉ. शुभांगी घुले-खेडकर व डॉ. सरिता कागदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

\Bमैफलीत गीतांची बरसात\B

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर 'मायेची फुंकर' ही सुरेल मैफल रंगत गेली. या प्रसंगी इतनी शक्ती हमे देना दाता, देवा काळजी रे, रुक जाना नही अशी सुमारे १० ते १२ सुरेल गीते दीपक गिरी, शुभम गोसावी, सविता पाटील, श्रावणी महाजन आदींनी सादर केली. विशेष म्हणजे सुमित राघवन यांनी गायलेल्या 'तुमसे मिल के ऐसा लगा'ने रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहलक्ष्मीचे दागिने गहाण ठेऊ पीक कर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा निसर्गाने केलेली अवकृपा, शिवाय पूर्वीच्या पीक कर्जाची परतफेड न झाल्याने यंदा नवीन पीक कर्जासाठी गृहलक्ष्मीच्या मंगळसूत्रांसह दागिने गहाण ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांनी यंदा बँक ऑफ बडोदातून गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट सोने तारण कर्ज घेतले आहे.

बँक ऑफ बडोदातर्फे विविध कृषी योजनांची माहिती देण्यासाठी 'बडोदा किसान अभियान' राबवण्यात आले. त्याची माहिती बँकेचे उपमहाव्यवस्थापक सुरेंद्र शर्मा, विभागीय व्यवस्थापक श्रीनिवास गवळी, नितीन जामनिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'एक ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात शेतकऱ्यांच्या विकासासाठी घेतलेल्या सभांमध्ये किसान क्रेडिट कार्ड, सोने तारण कर्ज योजना, क्रेडिट जोडणी याची माहिती देण्यात आली. शिवाय क्रेडिट डेअरी, ट्रॅक्टर, शेती उपकरणे, वाहन, सूक्ष्म सिंचन कर्ज, खाद्य, अग्रो प्रोसेसिंग युनिटसाठी ओव्हर ड्राफ्ट व कर्जाची माहिती देण्यात आली. हे अभियान कोपरगाव, परभणी, नांदेड, अंबाजोगाई, लातूर, उस्मानाबाद, भेंडे, उंडणगाव, औरंगाबाद आदी भागात राबवण्यात आले,' अशी माहिती उपमहाव्यवस्थापक शर्मा यांनी दिली. मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात कर्ज वाटरप जास्त असल्याचे गवळी यांनी सांगितले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देऊन सक्षम करण्याचा प्रयत्न बँक करत असल्याचा दावा शर्मा यांनी केला. दरम्यान, या अभियानाचा समारोप जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त मंगळवारी सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात होत आहे, असे सांगण्यात आले.

\B६० कोटींचे तारण कर्ज \B

या आर्थिक वर्षात २५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, आतापर्यंत २०२८ शेतकऱ्यांना ५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. याशिवाय शेतकऱ्यांनी पीक व शेतीसाठी ६० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याकरिता तारण दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दागिने तारण ठेवून कर्ज उचलण्याचे प्रमाण मागील वर्षापेक्षा दुप्पट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ कंत्राटदारांना कामे दिल्यास तुम्ही जबाबदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काळ्या यादीतील कंत्राटदारांना रस्त्यांची कामे दिल्यास त्याची जबाबदारी तुमची राहील, असा इशारा आमदार इम्तियाज जलील यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिला आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांना पत्र देखील दिले आहे.

आयुक्तांना दिलेल्या पत्रात आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने दिलेल्या शंभर कोटी रुपयांच्या अनुदानातून शहरात रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामांच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ज्या कंत्राटदाराची निविदा अंतिम झाली आहे त्यात काही कंत्राटदार काळ्या यादीमधील आहेत. कंत्राटदार काळ्या यादीमधील असल्याची कागदपत्रे सर्वत्र उपलब्ध आहेत. या कागदपत्रांची आपण व्यक्तीश: खात्री करून घ्यावी, असे जलील यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

\B...तर, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे उल्लंघन \B

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर नुकतीच बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत काळ्या यादीतील कंत्राटदारांना काम दिल्यास त्याची जबाबदारी आयुक्त म्हणून तुमच्यावर राहील, असे असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतरही काळ्या यादीमधील कंत्राटदारांना रस्त्यांचे काम दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे, ते उल्लंघन होईल, असे जलील यांनी पत्राच्या माध्यमातून आयुक्तांच्या लक्षात आणून दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटे शपथपत्र; तनवाणींना नोटीस

$
0
0

औरंगाबाद: महापालिकेच्या २०१५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळी वॉर्ड क्रमांक ४८ गुलमंडी येथून राजू तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला व नगरसेवक म्हणून निवडून आले. अर्जासोबत त्यांनी जोडलेले शपथपत्र खोटे आहे, असा आक्षेप सचिन लखासे यांनी घेतला आहे. त्यामुळे तनवाणी यांचे नगरसेवकपद रद्द करा, अशी मागणी केली आहे. शपथपत्राच्या संदर्भात सात दिवसांच्या आत अतिरिक्त आयुक्तांकडे आपले म्हणणे सादर करा, अशी नोटीस महापालिकेने तनवाणी यांना बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुन्हेगार बाळू पाटोळे स्थानबद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुख्यात गुन्हेगार बाळू वामन पाटोळे (वय ३४, रा. वडगाव कोल्हाटी) याला झोपडपट्टीदादा कायद्यानुसार एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी सोमवारी बजावला. त्याची लगेच जेलमध्ये रवानगी करण्यात आली. पाटोळे याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्र बाळगणे, दुखापत करून अतिक्रमण करणे, धाक दाखवणे, जबरी चोरी करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई, २००१ मध्ये हद्दपारी, २००४ मध्ये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच्या गुन्हेगारी कारवाया कमी झाल्या नसल्याने पुन्हा स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, ज्ञानेश्वर साबळे, जमादार द्वारकादास भांगे, इसाक पठाण, नाना हिवाळे, अजय आवले व बाळासाहेब आंधळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवाचालकाचा खून; तिघांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हायवाचालक नितीन ऊर्फ बाळू घुगे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी नील ऊर्फ सुनील काकासाहेब काकडे पाटील, शुभम कारभारी साळुंके व कैलास काशिनाथ खराते यांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत (१९ ऑक्टोबर) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी सोमवारी (१५ ऑक्टोबर) दिले.

फ्लॅटमधील पंखा व गोधडी चोरल्याच्या कारणावरून नील पाटीलने (३४, रा. बसय्येनगर, बायजीपुरा) मृत बाळूला लाकडी दांडा व लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. यात बाळू याचा मृत्यू झाला. २० सप्टेंबर रोजी हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी मनोज डव्हारेला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत नील पाटील व इतरांची नावे समोर आली होती. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना १० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती व कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत (१५ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आरोपींच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्यांच्या कोठडीमध्ये शुक्रवारपर्यंत वाड करण्याचे आदेश दिले. सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंगळसूत्र चोर पोलिसाकडून ११ तोळे सोने जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरात धुमाकूळ घालणारा मंगळसूत्र चोर पोलिस जवान योगेश शिनगारे याने नुकताच बदलीसाठी अर्ज दिला होता. गुन्हे केल्यानंतर त्याचा शहरातून कायमस्वरुपी निघून जाण्याचा मनसुबा होता, मात्र त्यापूर्वीच तो पकडला गेला. दरम्यान, त्याने चोरीचे विकलेले ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी दिली.

सातारा पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी भारत बटालीयनचा जवान योगेश शिनगारे याला मंगळसूत्र चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. अधिक चौकशीत आरोपी योगेशने आतापर्यंत आठ मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. पत्ते व मटक्याचे व्यसन लागल्याने योगेशवर चार लाख रुपयांचे कर्ज आहे. गेल्या काही महिन्यांपासून निर्जन ठिकाणी एकटी महिला हेरून दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या आरोपी योगेशने मंगळसूत्र चोरीचा सपाटा लावला होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याचे हे कृत्य सुरू होते. वर्तमानपत्रात सातत्याने सातारा परिसरातील मंगळसूत्र चोरीच्या बातम्या येत असल्याने शहरातून पोबारा करण्याचा विचार योगेशने केला होता. यासाठी त्याने काही दिवसांपूर्वीच औरंगाबादच्या कॅम्पमधून अकोला, नागपूर आदी ठिकाणी बदली करून घेण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी त्याने काही दिवसांपूर्वीच अर्ज देखील दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. योगेश पकडला जाण्यापूर्वीच शहरातून निघून गेला असता, तर त्याला पकडणे नंतर पोलिसांना अवघड गेले असते.

\Bआठ गुन्ह्यांची कबुली\B

योगेशने आठ मंगळसूत्र चोरीचे गुन्हे कबूल केले आहे. हे चोरीचे सोने त्याने सराफा व्यवसायिक, फायनांस कंपनीकडे तारण ठेवले होते. यापैकी ११ तोळे सोने जप्त करण्यात आले असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिले. ज्या महिलांचे हे सोने असणार आहे, त्यांना दिवाळीसणापूर्वी सौभाग्यलेण्याची भेट देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. रामदास गर्गे यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद : चाळीसगावचे माजी नगराध्यक्ष डॉ. रामदास नारायण उर्फ बापूसाहेब गर्गे (वय ९१) यांचे सोमवारी (१५ ऑक्टोबर) खडकेश्वर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी पुष्पनगरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे डॉ. प्रदीप, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रवींद्र निकम यांचे निलंबन रद्द

$
0
0

औरंगाबाद: महापालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम यांचे निलंबन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी रद्द केले. त्यामुळे निकम सोमवारी पालिकेत रुजू झाले. जयभवानीनगर येथील अतिक्रमण पाडण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून डॉ. विनायक यांनी निकम यांना तीन महिन्यांपूर्वी निलंबित केले होते. निलंबन रद्द करून कामावर घेण्याची मागणी त्यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्तांकडे केली होती. अखेर आयुक्तांनी त्यांना सोमवारी रुजू करून घेतले.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत पावलेल्या वारसांना वाढीव भरपाई

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

नगर - औरंगाबाद रस्त्यावर फॉर्च्युनर गाडीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या ग्यानसिंग राठोड यांच्या वारसांना दोन लाख ४३ हजार २५० रुपयांची वाढीव भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील कोतवाल यांनी दिले. या प्रकरणात नेवासा पोलिस ठाण्यात भादवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृताची पत्नी लताबाई, मुले अतुल व अमित, वडील लालू राठोड, आई सुंदरबाई यांनी टोयोटो कार मालक, चालक व विमा कंपनीविरुद्ध दावा दाखल केला होता. मोटार अपघात न्यायाधीकरणाने आठ लाख ३९ हजार २५० रुपये साडेसात टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले. याविरोधात खंडपीठात अपील केले असता खंडपीठाने दहा लाख ८२ हजार पाचशे रुपये देण्याचे आदेश दिले. वारसांची बाजू संदीप राजेभोसले यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी महापौरांना दोन तास ‘घेराओ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्यासाठी हनुमाननगरमधील महिलांनी सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांना त्यांच्याच दालनात घेराव घालत दोन तास ठिय्या आंदोलन केले. एक नोव्हेंबररोजी जलवाहिनी टाकण्यास सुरुवात करू, असे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

हनुमाननगर येथे पुंडलिकनगरच्या जलकुंभावरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हनुमाननगरमधील काही गल्ल्यांत पाणीपुरवठा होत नाही. जलवाहिन्या नसल्यामुळे या भागात पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. हे लक्षात घेवून काही दिवसांपूर्वी जलवाहिन्या टाकण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. पण, प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही. त्यामुळे हनुमाननगरातील महिला मोठ्या संख्येने सकाळी साडेदहा वाजता महापालिकेत दाखल झाल्या व महापौर घोडेले यांना घेराव घातला. जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे उद्घाटन झाले असले तरी अद्याप प्रत्यक्षात काम का सुरू झाले नाही, असा जाब त्यांनी विचारला. काम सुरू होण्याबद्दल ठोस आश्वासन मिळेपर्यंत दालनातून उठणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

महापौरांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना दालनात बोलाऊन जलवाहिनी टाकण्याचे काय झाले, अशी विचारणा केली. तेवढ्यात नगरसेवक आत्माराम पवार हे दालनात दाखल झाले. त्यांनीही भावना व्यक्त केल्या. जलवाहिनी टाका, अशी सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केली तेव्हा बिल थकल्यामुळे कंत्राटदार काम करीत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे महापौरांनी संबंधित कंत्राटदाराला फोन करून काम सुरू करा, असे सांगितले. मात्र, सुमारे दहा लाखांचे बिल थकलेले आहे, ते मिळाल्याशिवाय काम करता येणार नाही, असे कंत्राटदारांनी स्पष्ट केले. महापौरांनी लेखाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या कंत्राटदाराचे दहा लाखांचे बिल सायंकाळपर्यंत अदा करा, असे आदेश दिले. बिल मिळाल्यानंतर १५ दिवसांत पाइप खरेदी करून काम सुरू करू, असे कंत्राटदाराने महापौरांना सांगितले. त्यामुळे एक नोव्हेंबर रोजी जलवाहिनी टाकण्यास सुरुवात करू, असे आश्वासन महापौरांनी दिले.

\Bजबाबदारीत बदल \B

हनुमाननगरचा तो भाग नेटकवर्कमध्ये नाही, त्यामुळे काम करू शकत नाही, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी स्पष्ट केले. यामुळे महिला संतप्त झाल्या. परिणामी, महापौरांनी जलवाहिनी टाकण्याची जबाबदारी कोल्हे यांच्याकडून काढून घेऊन उपअभियंता सरताजसिंग चहेल यांना सोपवली.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कंत्राटदार काम करण्यास तयार होत नाहीत. अनेक ठिकाणी पाणी न येणे, दूषित पाणी येणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब गंभीर असून लवकरच संपूर्ण पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला जाईल.

-नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटलमध्ये आलो, पाय जमिनीवर आले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नट तीन तासांचा असतो, पण २१ तासांचे खरेखुरे सत्य आयुष्य बघायला मिळते ते हॉस्पिटलमध्येच. आज चिमुकल्या कर्करुग्णांना पाहून, भेटून आणि त्यांच्या सहवेदना जाणून घेतल्यानंतर तर सुन्न झाल्यासारखे वाटत आहे. सर्व काही गळून पडले. त्यांचा काय दोष होता ज्यामुळे त्यांना कॅन्सर झाला, हा प्रश्न सारखा सतावतो आहे...खरे म्हणजे त्यांच्यासाठी दुवा मागण्याची, प्रार्थना करण्याची खूप गरज आहे...अशा हॉस्पिटलला भेट दिलीच पाहिजे आणि पाय जमिनीवर राहण्यासाठी तर नक्कीच हॉस्पिटलमध्ये आले पाहिजे...आज खरोखर पाय जमिनीवर आल्यासारखे वाटते...अशा भावना आहेत प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन यांच्या.

'वर्ल्ड होस्पाईस डे' व 'वर्ल्ड पॅलिएटिव्ह केअर डे'निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि 'स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट' अर्थात शासकीय विभागीय कर्करुग्णालयाच्या वतीने सोमवारी (१५ ऑक्टोबर) 'मायेची फुंकर' हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सुमित राघवन यांच्यासह प्रसिद्ध अभेनेत्री-दिग्दर्शिका चिन्मई सुमित राघवन व प्रसिद्ध अभेनेते संदीप पाठक यांनी कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली व रुग्णांशी संवाद साधला. त्यानंतर तिन्ही कलावंतांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रसंगी सुमित राघवन यांनी हॉस्पिटलमध्ये कर्करुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांचा आणि त्यांना सेवा देणाऱ्या डॉक्टर-परिचारिका-कर्मचाऱ्यांचा शब्दसुमनांनी गौरव केला. तसेच कर्करुग्णांच्या सेवेसाठी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा हजर होण्याचीही ग्वाही दिली. डॉक्टर हे खरे म्हणजे ७० टक्के समुपदेशक, तर ३० टक्के डॉक्टर असतात, असे सांगताना चिन्मई यांनी औरंगाबाद शहराशी असलेली नाळ विषद करीत गतकाळातील स्मृतींना उजाळा दिला. वडील शासकीय अधिकारी होते, त्यामुळे कुटुंबातील सर्वांचे उपचार शासकीय रुग्णालयांमध्येच करण्याचा वडिलांचा दट्ट्या होता आणि सर्वोत्तम उपचार हे घाटीसारख्या शासकीय रुग्णालयांमध्येच मिळतात, यावर माझा विश्वास आहे व त्याचे खूप समाधानदेखील आहे. माझे स्वतः ऑपरेशन घाटीमध्ये झाले होते व घाटीच्या कँटीनमधील इडली मला आजही आठवते, असेही चिन्मई म्हणाल्या. या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता पाटील, पॅलिएटिव्ह केअर विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा देशमुख, डॉ. अर्चना राठोड, डॉ. अनघा वरुडकर, डॉ. बालाजी शेवाळकर आदींची उपस्थिती होती.

\B२० टक्के उत्पन्न समाजासाठी द्यावे

\Bमी बीडचा आणि औरंगाबादच्या स.भु.च्या नाट्यशास्त्र विभागामध्येच मी शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे वडिलांचा कॅन्सर आणि त्यांनी कॅन्सरला दिलेली झुंज खूप जवळून पाहिली आहे. त्यामुळेच कर्करुग्णांसाठी या ह़ॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल नक्कीच कौतुक वाटते. यापुढेही कधीही हक्काने सांगा, मी हजर असेल, असे सांगतानाच उत्पन्नाचे १० ते २० टक्के निधी समाजासाठी दिला पाहिजे, असेही मत संदीप पाठक यांनी व्यक्त केले.

\Bबीपी कमी होतो की नाही पाहा...

\Bमला स्वतःला हसायला आणि हसवायला खूप आवडते आणि हसणे हा दुःखावर एक रामबाण उपाय असल्याचे वाटते. आजच्या ताणतणावात तर हसण्याचा खूप चांगला परिणाम होतो. माझ्या नाटकाला येणाऱ्यांना बीपीचे मशीन लावा, बीपी कमी झाल्याचे नक्कीच जाणवेल, असाही हास्यटोला पाठक यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मी टू’ प्रकरणात महिला आयोग गप्प का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मी टू' प्रकरणात महिला आयोग गप्प का, असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचा जेव्हा जेव्हा विषय येतो, तेव्हा महिला आयोग मूग गिळून गप्प बसतो; काहीच भूमिका घेत नाही, असा आरोप त्यांनी केला.

शिवसेना महिला अघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमांसाठी आमदार मनीषा कायंदे सोमवारी आल्या असता 'मटा'ने त्यांच्याशी संवाद साधला. सध्या सुरू असलेल्या 'मी टू' मोहिमेबद्दल त्या म्हणाल्या की, ही महिलांच्या मनातील अनेक वर्षांची खदखद आहे. 'मी टू'च्या निमित्ताने महिलांना त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचे व्यासपीठ मिळाले आहे. अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पोलिस ठाणे, कायदा हे मार्ग आहेतच. परंतु, पोलिस तक्रार घेत नाहीत. 'मी टू' प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर थेट आरोप झाले. त्यानंतर सुषमा स्वराज, स्मृती इराणी काहीच बोलत नाहीत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत. मोदींनी आरोप असलेल्यांना मंत्रिमंडळातून बाजूला केले पाहिजे. महिला आयोग देखील या प्रकरणात गप्प आहे. भाजप नेत्यांचा विषय येतो तेव्हा महिला आयोग गप्प बसतो, असे लक्षात आले आहे. आमदार राम कदम यांच्या बाबतीतही महिला आयोगाची अशीच भूमिका होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा भाजप पदाधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आहेत का, असा प्रश्न कायंदे यांनी उपस्थित केला.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, नोटबंदीमुळे नागरिक त्रस्त आहेत, नागरिकांमध्ये भाजपबद्दल नाराजी वाढत आहे. दिल्लीत सत्तेवर येताना नरेंद्र मोदींनी लोकांच्या अपेक्षा खूप वाढवल्या. आता त्या पूर्ण होत नसल्याचा फटका येत्या निवडणूकीत भाजपला बसेल, असा दावा कायंदे यांनी केला.

आमदार कायंदे यांनी शहरात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्सची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. इंदिरानगरच्या अंगणवाडीला देखील भेट दिली. शिवसेना महिला आघाडीच्या रंजना कुलकर्णी यांनी शहरात महिलांसाठी आयोजित केलेल्या ४५ ठिकाणी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

\Bशिवसेनेकडे द्या गृहखाते \B

'राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असला पाहिजे,' अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपला गृहखाते झेपत नसेल, तर ते शिवसेनेकडे द्यावे. शिवसेना सक्षमपणे गृहखात्याचे काम करून दाखवेल, अशी ग्वाही आमदार कायंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदवी परीक्षेत कॉपीचा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पदवी परीक्षेच्या पहिल्या दिवशी कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांनी परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन आढावा घेतला. मात्र, सीसीटीव्हीची निगराणी व पोलिस बंदोबस्ताचा बोजवारा उडाल्याने ग्रामीण केंद्रांवर सर्रास कॉपीचे गैरप्रकार घडले. ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलण्याचा निर्णय घेतल्याने शेकडो विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेला सोमवारी सुरुवात झाली. पहिला पेपर इंग्रजीचा होता. परीक्षा व मूल्यमापन विभागाने ऐनवेळी काही परीक्षा केंद्रात बदल केले. परिणामी, बदल माहित नसलेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. शनिवारपर्यंत २१९ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. ही संख्या अखेरपर्यंत २२५ झाली. औरंगाबाद शहरातील एमजीएम जर्नालिझम कॉलेज, वसंतराव नाईक कॉलेज आणि पैठण, मोहाडी, आडूळ येथे केंद्र देण्यात आले. हा निर्णय अचानक का घेतला अशी विचारणा विद्यार्थ्यांनी केली. परीक्षा केंद्र बदलल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आणि व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी शहरातील चार केंद्रांना भेट दिली. मौलाना आझाद महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, सरस्वती भुवन महाविद्यालय आणि देवगिरी महाविद्यालयात दोघांनी परीक्षेचा आढावा घेतला. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी एकता महाविद्यालय, रामदास आठवले महाविद्यालय चौका, संत सावता महाराज महाविद्यालय आणि कोहिनूर महाविद्यालय येथे परीक्षेचा आढावा घेतला. ग्रामीण भागात सुरळीत परीक्षा सुरू असून वर्गात किंवा परिसरात कॉपी आढळली नाही, असे तेजनकर यांनी सांगितले. पण, तेजनकर सावंगीला असताना पुढील परीक्षा केंद्रावर निरोप पोहचले होते. त्यामुळे तेजनकर पोहचण्यापूर्वी 'आलबेल' चित्र तयार करण्यात आले. तेजनकर यांची पाठ फिरताच केंद्रावर कॉपीचा पाऊस पडला. परीक्षेसाठी वर्गात सीसीटीव्ही बंधनकारक असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले होते. बहुतेक महाविद्यालयांनी नियमाला केराची टोपली दाखवली. कॉपी सुरळीत करण्यासाठी सीसीटीव्हीला फाटा देण्यात आला. जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातही काही केंद्रांवर परीक्षेचे नियोजन कोलमडल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागातील केंद्रावर पोलिस बंदोबस्त नसल्यामुळे कॉप्यांचा उपद्रव वाढला आहे.

\Bमोहाडीची अजब तऱ्हा

\Bमोहाडी (ता. कन्नड) येथील वादग्रस्त ठरलेल्या सातपुडा विकास मंडळ संचलित कला वरिष्ठ महाविद्यालयाला कुलगुरू चोपडे यांनी विशेषाधिकारात २५ सप्टेंबर रोजी मान्यता दिली. परीक्षा अर्ज भरण्याची शेवटची मुदत २२ सप्टेंबर होती. २५ सप्टेंबरला मान्यता मिळालेल्या महाविद्यालयाला २७ सप्टेंबरला स्थगिती मिळाली. तर आठ ऑक्टोबरला स्थगिती रद्द करून समिती नेमण्यात आली. विशेष म्हणजे १० ऑक्टोबरला विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन १५ ऑक्टोबरला परीक्षा देण्याची परवानगी मिळाली. सध्या ६८ पैकी ३० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तासिका आणि अभ्यासक्रमाचा निर्णय धुडकावत परीक्षा घेतली जात आहे.

\Bपदवी परीक्षा

\Bविद्यार्थी - तीन लाख सात हजार

परीक्षा केंद्र - २२५

भरारी पथक - ३१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्रकावरील संकटाचीशास्त्रज्ञांकडून पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

अद्रकावर मर रोगाचा हल्लाबोल केल्याचे वृत्त या आठ ऑक्टोबर रोजी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची राज्याचा कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय संशोधन प्रकल्पाच्या कृषी शास्त्रज्ञांनी दखल घेतली आहे. मर रोगाने बाधित अद्रक पिकाच्या शेतीला नुकतीच भेट देऊन शास्त्रज्ञांनी उपाय योजना सुचविल्या.

शास्त्रज्ञांनी तालुकाभर फिरून शेतकऱ्यांन मार्गदर्शन केले. याबरोबरच कमी पाऊसमान व दमट हवामान यामुळे हुमणी या अळीचा प्रार्दुभाव वाढल्याने उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन केले. तीन वर्षांनतंर अद्रक पिकाच्या शेतीमध्ये मर, कंदसड व मुळकूज या रोगांचा प्रार्दुभाव दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसाची उघडी असतानाही शेतातील अद्रक पिकावर मर, पिकांची वाढ खुंटून पाने गुंडाळणे या रोगाचा परिणाम झाला. यासाठी कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या औरंगाबाद येथील राष्ट्रीय संशोधन प्रकल्पातील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. बी. जी. जगताप व किटक शास्त्रज्ञ डॉ. एन. आर. पतंगे, तालुका कृषी अधिकारी एस. एम. पेंडभाजे, कृषी सहाय्यक अतुल हिंगणे, बारामती अॅग्रोचे बबनराव वाळुंजे यांनी तालुक्यातील हतनूर, निमडोंगरी, चिकलठाण, वडाळी, जैतखेडा, भारंबा तांडा, हिवरखेडा, कोळंबी, वाकद, चिंचोली (लिंबाजी) या गावशिवारातील बाधित पीक शेतीला भेटी दिल्या. त्यांनी जीवाणूजन्य मर रोगग्रस्त अद्रक पिकाचे नमुने घेतले. जीवाणूंना पोषक वातावरण व इतर कारणांमुळे रॅलस्टोनिया सोलॅबोसिरम या सूक्ष्म जीवाणूमुळे मर रोग, कंदसड होत आहे. यासाठी कृषी शास्त्रज्ञ यांनी उपाय योजना सुचविल्या आहेत.

ऊस पिकातील हुमणी अळीचा प्रभाव कमी पाऊस असल्याने व पिकास पुरेसे पाणी मिळाले नसल्याने होत आहे. यासाठी उपाय सुचवण्यात आले. हतनूर येथे पाहणी करतेवेळी नितीन डोळस, सचिन काळे, मंगेश ढोबळे, रामेश्वर मालोदे, नानासाहेब गवळी, संदीप जाधव, मनोज काळे, गणेश अकोलकर, किरण खंडागळे, रमेश शहरवाले आदीं शेतकरी उपस्थित होते.

अद्रक पिकासाठी दर्जेदार बेणे वापरावे. यावर योग्य प्रक्रिया करणे, लागवडीनतंर पाऊस व आद्रतेनुसार ड्रेचिंग (आळवणी) करणे, स्ट्रेप्टोसायक्लीन एक ग्रॅम व कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम १० द्रावण तयार करून ड्रेचिंग करावे. मररोग नियंत्रणात येतो, निमटोडसाठी योग्य बुरशीनाशकाचा वापर करावा.

- डॉ. जी. पी. जगताप, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद

कन्नड तालुक्यात अद्रक पिकावर मर, तर ऊस पिकावर हुमणीचा प्रार्दुभाव आढळून आला आहे. या पिकावरील रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाधित गावांना भेटी देऊन कृषी शास्त्रज्ञांमार्फत उपाय योजना सुचवण्यात येत आहेत. पिकावरील रोगाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

- एस. एम. पेंडभाजे, तालुका कृषी अधिकारी, कन्नड

ऊस पिकात हुमणी या अळीचा प्रार्दुभाव कमी पाऊस व कमी पाण्यामुळे दिसून येत आहे. हुमणी नियत्रंणासाठी नैसर्गिक, जैविक साधनांचा वापर करावा. बाधित क्षेत्रासह पिकास दहा लिटर द्रावणासाठी २५ मिली लिटर क्लोरोपायरिफॉस या किडनाशकाची ड्रेचिंग करावी.

- डॉ. एन. आर. पतंगे, किटक शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएच. डी. याद्यांसाठी निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पेट' व 'आरआरसी' पात्र विद्यार्थ्यांना तत्काळ तात्पुरते पत्र देऊन मार्गदर्शक द्या, अशी मागणी करीत स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाने विद्यापीठात आंदोलन केले. निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासकीय अधिकारी हजर नसल्यामुळे दगडाला निवेदन देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच. डी. प्रक्रिया रखडली आहे. मागील सव्वा दोन वर्षांपासून प्रक्रिया सुरू आहे. 'आरआरसी'ला महिना उलटला तरी पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली नाही. या गलथान प्रकाराचा निषेध करीत 'एसएफआय'ने प्रशासकीय इमारतीसमोर सोमवारी दुपारी जोरदार आंदोलन केले. 'पेट' व 'आरआरसी' पात्र विद्यार्थ्यांना तत्काळ प्रोव्हिजनल पत्र देऊन मार्गदर्शक उपलब्ध करा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनाची पूर्वकल्पना असूनही कुलगुरू, कुलसचिव, प्र- कुलगुरू किंवा इतर प्रशासकीय अधिकारी विद्यापीठात उपस्थित नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या नावाने दगडाला निवेदन दिले. सात दिवसांत मागण्या सोडवाव्यात, अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला. या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष सुनील राठोड, नितीन वाव्हळे, सत्यजित मस्के, अभिमान भोसले, प्राजक्ता शेटे, समाधान बारगळ, रवी खंदारे, मिलिंद वाव्हळ, राहुल साठे, आकाश देशातवाड आदी सहभागी झाले.

\Bअधिष्ठातांची बैठक आज

\Bपीएच. डी. याद्यांच्या मुद्द्यांवर अधिष्ठाता मंडळाची मंगळवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. पात्र संशोधक विद्यार्थ्यांची यादी तत्काळ जाहीर करून संशोधकांबाबत आढावा घेण्यात येईल असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राफेल’वर रविवारी प्रवक्ते पात्रांचे व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा युवक विकास मंडळाच्या वतीने आयोजित स्व. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेत रविवारी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारपासून ही व्याख्यानमाला सुरू होणार आहे, अशी माहिती सोमवारी मंडळाचे सचिव व्यंकटेश कमळू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

व्याख्यानमालेचे हे १९ वे वर्ष असून, पहिले पुष्प शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) कॅप्टन स्मिता गायकवाड गुंफणार आहेत. त्या 'शहरी नक्षलवाद - राष्ट्रीय सुरक्षेला धोका' या विषयावर बोलणार आहे. शनिवारी हैदराबाद येथील इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य जयंत कुलकर्णी हे 'राष्ट्रवादाची वैचारिक लढाई' या विषयावर विचार मांडतील. व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प रविवारी गुंफले जाईल. यात 'राफेल -सच्चाई एवंम् समिक्षा' या विषयावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे विचार मांडणार आहेत. पत्रकार परिषदेला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, अध्यक्ष मनोज शेवाळे, सहसचिव राम बुधवंत आदी उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेचे आयोजन तापडिया नाट्यमंदिर येथे करण्यात आले असून, रोज सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम सुरू होईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

\Bअसे रंगणार पुष्प

\B- कॅप्टन स्मिता गायकवाड - शुक्रवार

(विषय : शहरी नक्षलवाद - राष्ट्रीय सुरक्षेला धोका)

- जयवंत कुलकर्णी - शनिवार

(विषय : राष्ट्रवादाची वैचारिक लढाई)

- संबित पात्रा - रविवार

(विषय : राफेल -सच्चाई एवंम् समीक्षा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील निवासी डॉक्टर पुन्हा गेले संपावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये निवासी डॉक्टर; तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना रविवारी (१४ ऑक्टोबर) रात्री व सोमवारी (१५ ऑक्टोबर) दुपारी घडली. दोन्ही घटनांमध्ये रुग्णाच्या मृत्युनंतर नातेवाईक आधी निवासी डॉक्टरांच्या अंगावर धावून गेल्याचे समोर येत आहे.

पहिली घटना रविवारी रात्री घडली. यात पुरुष रुग्णाच्या मृत्युनंतर नातेवाईकांनी एका महिला निवासी डॉक्टरला व एका पुरुष निवासी डॉक्टरला धक्काबुक्की तसेच मारहाण केली. ही घटना मेडिसिन वॉर्डात घडल्यानंतर अधिष्ठातांसह वैद्यकीय अधीक्षकांपर्यंत विविध अधिकाऱ्यांनी घनास्थळी धाव घेतली. दुसरी घटना सोमवारी दुपारी घडली. यामध्ये स्वाइन फ्लू संशयित महिला रुग्णाच्या मृत्युनंतर तिच्या पती व दिराने निवासी डॉक्टरवर खुर्ची उगारल्यानंतर सात ते आठ निवासी डॉक्टरांनी एकत्र येऊन पती व दिराला धक्काबुक्की व मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन्ही बाजुंकडून पोलिसांत तक्रारी देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, घाटीतील रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टर सोमवारी रात्रीपासून सामूहिक रजेवर गेले आहेत. हे सामूहिक रजा आंदोलन २४ तासांसाठी राहील, असे निवासी डॉक्टरांनी कळविले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images