Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महावाद्यपूजन उत्साहात

0
0

औरंगाबाद - श्रीराम म्युझिकल फाऊंडेशनच्या विद्यार्थी संयोजन समितीने विजयादशमीनिमित्त महावाद्यपूजन केले. या उपक्रमात ३५ प्रकारच्या ८० वाद्यांचे पूजन करण्यात आले. सतार, व्हायोलिन, हेमराज तानपुरा, बुलबुलतरंग, काष्ठतरंग, स्वरमंडल, सिंगिंग स्टिक, कि-बोर्ड, पखवाज, डमरू अशा वाद्यांचे पूजन करण्यात आले. फाउंडेशनच्या लहान संगीत साधकांनी पुजेत सहभाग घेतला. शहरातील संगीत रसिकांसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत पूजा खुली असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डायलिसिस मशीनचे ‘दहिफळे’त लोकार्पण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धर्मादाय आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुंबई येथील आनंदपूर ट्रस्ट व प्रयागधाम ट्रस्टच्या वतीने गरीब व निर्धन रुग्णांवरील डायलिसिस उपचारांसाठी शहरातील डॉ. दहिफळे हॉस्पिटलला एक डायलिसिस मशीन देणगी स्वरुपात प्रदान करण्यात आली. या मशिनचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले. या मशीनवर किमान ५० टक्के रुग्णांवर निःशुल्क किंवा सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

डायलिसिस मशीनच्या लोकार्पण सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, औरंगाबाद विभागाचे धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली घाटे घाडगे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे, धर्मादाय उपायुक्त विवेक सोनुने, डॉ. विजय दहिफळे, डॉ. उज्ज्वला दहिफळे आदींची उपस्थिती होती. या मशीनवर किमान ५० टक्के रुग्णांवर निःशुल्क किंवा सवलतीच्या दरात उपचार होणार आहेत, असे धर्मादाय सहआयुक्त भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णांनाही योजनेअंतर्गत निःशुल्क डायलिसिसचे उपचार मिळतील, असे डॉ. दहिफळे यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फत गेल्या तीन ते साडेतीन वर्षांत सुमारे १५ लाख रुग्णांवर साडेचार हजार कोटी रुपयांचे उपचार झाल्याचे शेटे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी ते शहरापर्यंत १५ टक्के पाणी गळती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आणताना तब्बल १५ टक्के पाण्याची गळती होते. वास्तविक पाहता ही गळती दोन टक्के ग्राह्य धरता येते. पाण्याची गळती १३ टक्क्यांनी जास्त असल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या अहवालानंतर महापालिका आता गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करणार आहे.

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणेसाठी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तज्ज्ञांनी नियुक्ती केली आहे. त्या तज्ज्ञांनी अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनेचा अभ्यास करून सुधारणांची शिफारस महापालिकेला करायची आहे. समांतर जलवाहिनीचे काम सुरू होऊन संपेपर्यंत किमान तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या योजनेच्या माध्यमातूनच पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्था तज्ज्ञ डॉ. राजेंद्र होलानी यांची नियुक्ती सुधारणा सुचविण्यासाठी एक महिन्यापूर्वी केली आहे. या एक महिन्याच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची माहिती डॉ. निपुण विनायक यांनी दिली.

पाणीपुरवठा योजनेवर वीज समस्याही जास्त आहेत. लोडशेडिंगमुळे पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम, वारंवार बदलाव्या लागणाऱ्या रिंग आणि वायर याच्यावर देखील गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. पर्यायी व्यवस्थेचा विचार काही दिवसात केला जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तब्बल १५ टक्के गळती होत असल्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या एकूण कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

\B...तर, ३० टक्के पाणी वाढेल \B

डॉ. विनायक म्हणाले, जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान डॉ. होलानी यांनी पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली असता सुमारे १५ टक्के गळती असल्याचे लक्षात आले आहे. जास्तीत जास्त दोन टक्के गळती ग्राह्य धरता येते. त्यामुळे गळतीचे प्रमाण १३ टक्के जास्त आहे. गळती थांबवण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान असलेल्या मोठ्या गळत्या बंद कराव्या लागणार आहेत. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असे डॉ. विनायक म्हणाले. मोठ्या गळत्या बंद केल्यानंतर शहरात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिकांसाठी पालिकेची स्वच्छ संस्था स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत महापालिकेने शहरातील व्यावसायिकांसाठी स्वच्छ संस्था स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेत शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, शासकीय-निमशासकीय कार्यालय, मंगल कार्यालय या संस्थांना सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेच्या संदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, पालिकेचे घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे, अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेचा उद्देश नागरिकांमध्ये 'माझा कचरा माझी जबाबदारी' ही मानसिकता निर्माण करणे व स्वच्छतेच्या कामात लोकसहभाग वाढवणे हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बैठकीची सांगता महापौरांच्या भाषणाने झाली. ते म्हणाले, शहरातील कचरा समस्या अंतिम टप्प्यात आली आहे. शहर लवकरच कचरामुक्त होईल. यासाठी नागरिक, शैक्षणिक संस्था विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. मंगल कार्यालयांनी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे युनिट आपापल्या मंगल कार्यालयात लावावे. अन्यथा मंगल कार्यालयांवर कारवाई करावी लागेल, असा इशारा महापौरांनी दिला. आयुक्त डॉ. निपुण विनायक म्हणाले, या स्पर्धेमुळे शहरातील कचरा प्रश्न लवकरात लवकर सोडवणे शक्य होईल. स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा एक नोव्हेंबर रोजी केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. बैठकीचे प्रास्ताविक नंदकिशोर भोंबे यांनी केले.

\Bस्पर्धेचे निकष \B

-संस्थेच्या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचे उपक्रम

-परिसर स्वच्छता

-कंपोस्टिंग सिस्टीम

-थुंकण्यासाठी कचरापेटी

-कार्यालयाची स्वच्छता

-महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणार्थींची प्रकृती खालावली

0
0

औरंगाबाद - औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या विद्यार्थिनींचे कॅरिऑनसाठी दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थिनी उपोषण करीत आहेत. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चर्चा केली नसल्यामुळे उपोषण सुरू आहे. तिसऱ्या दिवशी मयुरी काळे व निकिता मुळे या विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. तसेच महिला सुरक्षा कर्मचारी नेमला नसल्यामुळे विद्यार्थिनी संतप्त झाल्या आहेत. फार्मसीच्या कॅरिऑनबाबत ठोस तोडगा निघाला नसल्याने विद्यार्थिनी उपोषणावर ठाम आहेत. या उपोषणात भारती राजपूत, स्नेहल कांबळे, तृप्ती वैराट आदी सहभागी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांनी दुष्काळी दौऱ्यात दुर्लक्ष केल्याचा आरोप

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्याऐवजी दुसरीकडेच फिरून दौरा आटोपला, असा आरोप करत जिरी (ता. वैजापूर) येथील ग्रामस्थांनी उपोषण करून रावतेंच्या दोऱ्याचा निषेध केला. शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळ मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तालुक्यातील जिरी, बिरोळा, वळण, मनोली, आंचलगाव या भागातील ग्रामस्थांनी मंत्र्यांविरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसले. या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिके नष्ट झाली असून, पिण्यासाठी पाणी व जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली आहे, मात्र परिवहन मंत्री इकडे न फिरकल्याने ग्रामस्थांनी उपोषण केले. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अतिबाधित गावांना तात्काळ मदत द्यावी, मनरेगामधून रोजगार द्यावा, चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करावे आदी मागण्या पंचायत समिती सदस्य योगिता निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुजरेगिरी करणाऱ्यांना शिवसेनेत महत्व

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेत हुजरेगिरी करणाऱ्यांना महत्त्व आहे, असा आरोप शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे प्रमुख आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी केला. पक्षाच्या मुख्य प्रचार कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी खासदारकी टिकविण्यासाठी शहरातील दंगल घडवून आणल्याचाही आरोप त्यांनी केला.

व्यासपीठावर वाकी संस्थानचे सुखदेव महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह करणी सेनेचे देविसिंह बारवाल, मुस्लिम विकास परिषदचे लतीफ पटेल, पंचायत समितीच्या मीना मोकाशे, आर. एस. पवार, संजना जाधव, आदित्यवर्धन जाधव, प्रा. बिहारे यांची उपस्थिती होती. प्रारंभी पक्षाच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन वाकी संस्थानचे सुखदेव महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार जाधव म्हणाले, पक्ष शिस्तीच्या नावाखाली शिवसेनेचे वाटोळे व्हायला आले. मराठा आरक्षणासाठी शिवसेनेने सत्तेला मारण्याची भूमिका घ्यायला हवी होती. पण शिवसेनेने ही भूमिका घेतली नाही, कारण शिवसेनेला सत्ता प्रिय होती, असा आरोप त्यांनी केली.

\Bखासदार खैरेंनी दंगल घडविली\B

खासदारकी टिकविण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शहरात दंगल घडवून आणली, असा आरोप आमदार जाधव यांनी केला. शहरात कचरा, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याकडे लक्ष न देता हिंदुत्व पुढे केले जाते आहे. लोकसभेत काही न करता इकडे हिंदुत्वाचे राजकारण करण्यावर त्यांचा भर असतो. ढमे, चौथी नापास खासदार, अशा शब्दात खैरे यांचा उल्लेख करत जिल्ह्यातील जनता त्यांना माफ करणार नाही, असे ते म्हणाले.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी,लातूर

पोस्टाच्या मराठवाडा विभागातील सहाव्या पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते दसऱ्यांच्या मुहूर्तावर करण्यात आले. अर्ज केल्यानंतर नागरिकांना आठ दिवसांत पासपोर्ट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर हज यात्रेसाठी लातूर येथून विमान सुरू करण्याचाही प्रयत्न आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन महापौर सुरेश पवार, पासपोर्ट कार्यालयाचे विभागीय अधिकारी अनंत ताकवाले, पोस्टाचे विभागीय अधिकारी बी. अरमुगम, लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, जिल्हापोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, नगरसेवक प्रवीण अंबुलगे,अॅड. संतोष गिल्डा, अरविंद रेड्डी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर तात्काळ कामकाजास सुरुवात झाली. यावेळी पोस्टाचे बी. आरमुगम यांनी सांगितल की, लातूर येथे सहावे पासपोर्ट कार्यालय सुरू होत आहे. लवकरच उस्मानाबाद, हिंगोली, परभणी येथेही पासपोर्ट कार्यालये सुरू होणार आहेत. गेल्या काही दिवसांत सुरू झालेल्या पाच कार्यालयातून ३२ हजार ४० नागरिकांनी पासपोर्ट काढून घेतले आहेत.

विभागीय पासपोर्ट अधिकारी आनंद ताकवले यांनी सांगितल की, सध्या लातूरच्या कार्यालयात दररोज २५ नागरिकांना वेळ दिली जाणार असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. ती संख्या शंभरावर गेल्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याचीही नियुक्ती येथे केली जाणार आहे. सध्या पुणे येथून मंजुरी मिळणार असली तरी अर्ज दाखल केल्यापासून आठ दिवसांत नागरिकांना नागरिकांना मिळणार आहे. पासपोर्ट हे जगमान्य ओळखपत्र असून ते काढण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ झाली आहे.

खासदार डॉ. गायकवाड म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांत लातूरच्या खासदारांनी जी विकास कामे केली नाहीत, ती मी साडेचार वर्षांत केली आहेत. नव्या २० नव्या रेल्वे सुरू केल्या आहेत. माझ्या विकासकामांबाबत कोणाला चर्चा करायची असेल, तर मी चर्चेला तयार आहे. पासपोर्ट कार्यालयानंतर आता उडाण योजनेच्या माध्यमातून हज यात्रेला जाणाऱ्या हजयात्रेकरूंसाठी लातूर येथूनच स्वतंत्र विमान सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी हवाई उड्डाण मंत्र्याकडे मी पाठपुरावा करीत आहे.

पासपोर्ट कार्यालय सुरू केल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, पासपोर्ट काढण्यासाठी पूर्वी नागपूर किंवा सोलापूरला जावे लागत असे. आता तो खर्च वाचणार असल्याचे शिक्षक असलेले सुरेश राजुरे यांनी सांगितले. अजय गुणाले म्हणाले की, पासपोर्ट काढण्यासाठी वेळही वाचणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. डॉ सय्यद तजमुल यांनी सांगितल की, विदेशात नोकरीची संधी मिळू शकते, त्याची तयारी असावी म्हणून पासपोर्ट असणे आवश्यक आहे. लातूरातच पासपोर्ट मिळण ही आनंदाची बाब आहे. त्याबद्दल मी सरकारचे आभार व्यक्त करतो. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने जिल्हाधिकारी जी श्रीकांत, महपौर सुरेश पवार, बालाजी पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढदिवसः डॉ. श्रीकांत दहिभाते

बालाजी रथयात्रेने कर्णपुऱ्यात सिमोल्लंघन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील ग्रामदैवत कर्णपुरा येथे विजयादशमीनिमित्त पारंपारिक पद्धतीने बालाजीच्या रथाची मिरवणूक काढून सिमोल्लंघन करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता या रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात पंचवटी चौकापर्यंत हा रथ ओढण्यात आल्यानंतर पुन्हा बालाजी मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली.

कर्णपुरा येथील कर्णिका माता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नवरात्रीमध्ये या काळात येथे मोठी यात्रा भरते. विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी बालाजीच्या मूर्तीची रथयात्रा काढून सिमोल्लंघन करण्यात येते. गेल्या साडेतीनशे वर्षापासून ही परंपरा कायम आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजता देवीची महापूजा करण्यात आली. यानंतर सकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली. यानंतर सायंकाळी साडेसात वाजता बालाजीच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, कर्णपुरा मंदिराचे पुजारी अंबादास दानवे, राजू दानवे, संतोष दानवे, राजू राजपूत, बालाजी मंदिराचे विश्वस्त पुजारी, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी आदींची उपस्थिती होती. यानंतर भाविकांनी हा रथ पंचवटी चौकापर्यंत ओढत नेला. पंचवटी चौकापासून पुन्हा हा रथ माघारी बालाजी मंदिरात आणल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. हा रथ ओढण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय श्रीराम’ च्या जयघोषात रावण दहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको परिसरातील एन ७ येथील रामलीला मैदानावर उत्तर भारत संघातर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात आमदार अतुल सावे यांच्या हस्ते रावणदहन करण्यात आले. रावणदहन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

विजयादशमीनिमित्त उत्तर भारतीय संघातर्फे रावनदहनाची परंपरा १९८२पासून सुरू करण्यात आली आहे. रावण दहनाचे हे ३७ वे वर्ष होते. दरम्यान, कार्यक्रमास सुरुवातीला कलाकरांनी प्रभू श्रीराम व रावण यांचे युद्ध सादर करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. आमदार सावे, काशीनाथ कोकाटे, एन. के. गुप्ता, नगरसेवक मकरंद कुलकर्णी, सुरेखा खरात, अनिल शर्मा, उत्तर संघाचे संस्थापक सी. के. दीक्षित, रावण दहन कार्यक्रमाचे अध्यक्ष एल. एन. शर्मा, उपाध्यक्ष बच्चूसिंग, कोषाध्यक्ष ओमीराम पटेल, सचिव विनोदकुमार दीक्षित, मुकेश शर्मा, गणेश जोशी, अनिल शर्मा आदी उपस्थित होते. रावण दहनाच्या वेळी 'जय श्रीराम'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…रेल्वे तिकीट विक्रीत ७७ लाखांचा अपहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय असलेल्या शहरातील रेल्वे स्टेशनवरच तिकीट विक्रीच्या रकमेत ७७ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नांदेडच्या वाणिज्यिक निरिक्षकासह पाच रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांना २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

नांदेड रेल्वे स्टेशन येथे तिकीट विक्री रकमेच्या अपहारप्रकरणी करुणाकर जी. व्ही. राव गोगाटी (वय ४७) मोहम्मद इमरान मोहम्मद हरुन (वय २८) मोहम्मद अब्दुल फरीस (वय ३४) सुनील कुमार नारायणा खंडला (वय २९) आणि सत्यजितदास दिना बांधवादास (वय ४० सर्व रा. नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे. रेल्वेचे सहाय्यक वाणिज्यिक व्यवस्थापक जॉन बरहुना यांनी व्यवहाराची तपासणी केली. त्यात रेकॉर्डमध्ये नोंदविलेली रक्कम आणि बँकेत भरणा केलेली रक्कम यात तफावत आढळली. त्यावरून जॉन बरहुना यांनी तिकीट विक्रीचे मागील रेकॉर्डची तपासणी केली असता, सात ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान विकलेल्या तिकिटाच्या रकमेचा भरणा संबंधितांनी बँकेत केला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी बँकेतही तपासणी केली. त्यात एक कोटी २३ लाख रुपयांचा अपहार असल्याचे समोर आले होती. मात्र, पुन्हा एकदा तपासणी केल्यानंतर हा अपहार ७७ लाख २३ हजार रुपयांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून पाच रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

त्यांना गुरुवारी (१८ ऑक्टोबर) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. ए. पठाण यांच्यासमोर हजर केले असता कोर्टाने सोमवारपर्यंत (२२ ऑक्टोबर) पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणाचा तपास नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक जाधव हे करत आहेत.

\Bया कारणासाठी कोठडी\B

…अपहाराची रक्कम जप्त करणे, तिकीट विभागातील नोंदीच्या रजिस्टराची तपासणी करणे, बँक स्टेटमेटचा तपास करणे, तिकीट खिडकी बाहेरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तसेच या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे की नाही, याची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी मागण्यात आली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पृथा सिंगल बातम्या

0
0

\Bमेघालयाच्या हॉस्टेलला मदत\B

औरंगाबाद: नवरात्रातील अष्टमीला कन्या पूजन होते. यानिमित्ताने मारवाडी मिडटाउन शाखेने मेघालयाच्या मुलींच्या वसतिगृहाला मदत करण्यात आली. या पूजेमध्ये अन्नदान महत्त्वाचे असल्याने हॉस्टेलला धान्याची मदत करण्यात आली.

.......

\Bगरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये शनिवारी महाभोंडला\B

औरंगाबाद: गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे २० ऑक्टोबर रोजी महाभोंडला आयोजित करण्यात आला आहे. दुपारी तीन वाजता कार्यक्रमास सुरूवात होईल. यासाठी पारंपरिक वेशभूषेत यावे, कार्यक्रम सर्व महिला व युवतींसाठी खुला आहे, असे संचालक सुनील सुतवणे आणि महिला विभाग प्रमुख सुलभा जोशी यांनी कळवले आहे.

----

\Bमराठा समाजाचा वधु-वर पालक मेळावा\B

औरंगाबाद: मराठा पाटील समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे २५ नोव्हेंबर रोजी अंमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याला अन्नपूर्णा मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता सुरुवात होईल. मेळाव्यामध्ये हुंडा, साखरपुडा, गुण, कुंडली, मंगळ, गावराव, मानपान या रूढींवर प्रबोधन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातून ५०० जणांची नोंदणी झाली आहे. एक हजार वधु-वरांची सूची पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिनिधींमार्फत जिल्हा व तालुका स्तरावर वधु-वरांची नावनोंदणी ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू आहे. उच्चशिक्षितांसह शेतकरी, व्यावसायिक, विदूर, अपंग, विधवा, घटस्फोटितांनीही नावनोंदणी करावी, असे आवाहन संतोष सूर्यवंशी, नाना पाटील, एस. एम. पाटील, कविता पाटील यांनी केले आहे.

----

\Bशिवनगरमध्ये विद्युत खांबाचे उद्घाटन\B

औरंगाबाद: मयूरबन कॉलनीतील शिवनगरमध्ये विद्युत खांब बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली. नवरात्राच्या निमित्ताने नगरसेविका स्मिता घोगरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी गारखेडा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जमधडे, सहाय्यक अभियंता डोंगरे उपस्थित होते.

------

\Bगुप्ता यांना फेलोशिप\B

औरंगाबाद: ओमजी ट्रेनर्स व प्लेसमेंट कन्सल्टंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज गुप्ता यांना नुकतीच फेलोशिप प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट व दर्जेदार सेवा तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मँनेजमेंटच्या (एनआयपीएम) विकासात प्रोत्साहन म्हणून एनआयपीएमच्या वतीने फेलोशिप देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ कार्यालयात महिलांची कुचंबणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) महिला स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. महिलांच्या गैरसोयीची दखल घेत जागृती महिला मंचने या विभागाला स्वच्छतागृह बांधण्याचे निवेदन दिले.

प्रादेशिक परिवहन विभागात स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांना त्रासातून जावे लागते. पुरुषांचे स्वच्छतागृह उघड्यावर आहे, तर महिलांसाठी सोयच नाही. कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या महिलांची अडचण होते. महिला स्वच्छतागृहासारख्या संवेदनशील विषयावर आरटीओने लक्ष दिले नाही. याविषयी जातीने लक्ष देऊन लवकरच लवकर अद्ययावत स्वच्छतागृह बांधावे, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर अध्यक्ष प्रा. भारती भांडेकर, सचिव सविता कुलकर्णी, अॅड. अंजली कुलकर्णी, भारती पवार, डॉ. अर्चना वैद्य आदींच्या स्वाक्षरी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अष्टमी पूजा सिडकोत उत्साहात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवरात्रातील अष्टमी पूजा यंदाही उत्साहात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही सिडको एन १मध्ये अष्टमी पूजेला अत्यंत देखणी सजावट करण्यात आली.

नवरात्रात घटस्थापनेसोबतच काही घरांत अष्टमीला महालक्ष्मीपूजनाची पद्धत आहे. त्यासाठी कोणी पानाचा फुलोरा बांधतात, तर कोठे सोजीचा नैवेद्य दाखवतात. सिडको एन १मध्ये अष्टमी पूजेला सामुदायिक रूप आले आहे. जवळपास ४० महिलांच्या संस्कृती संवर्धन मंडळातर्फे अष्टमी पूजा केली जाते. प्रत्येक वर्षी एका कुटुंबाला अष्टमी पूजेचा मान दिला जातो. त्या कुटुंबातील सदस्य आपल्या हौशीने पूजेचा देखावा निवडतात. संस्कृती संवर्धन मंडळ त्या कुटुंबात जावून श्रीसुक्त पठण म्हणतात. यावर्षी कविता विष्णू गुप्ता यांच्या घरी अष्टमी पूजा करण्यात आली. यावेळी शोभा हातोळकर यांनी पूजा मांडली होती. काचेच्या बांगड्यांचा थर करून त्यावर अष्टभुजेची मुखवटे ठेवण्यात आली. सकाळी होम झाल्यानंतर सायंकाळी संस्कृती संवर्धन मंडळाच्या ४० सदस्यांनी देवीची आराधना केली. श्रीसुक्त पाठ, मार्कंडेय स्त्रोत्र, अर्गला स्त्रोत्र, देवीची १०८ नामावलीनंतर आरती व महाप्रसादाने कार्मक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लातूरमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी,लातूर

पोस्टाच्या मराठवाडा विभागातील सहाव्या पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते दसऱ्यांच्या मुहूर्तावर करण्यात आले. अर्ज केल्यानंतर नागरिकांना आठ दिवसांत पासपोर्ट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर हज यात्रेसाठी लातूर येथून विमान सुरू करण्याचाही प्रयत्न आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन महापौर सुरेश पवार, पासपोर्ट कार्यालयाचे विभागीय अधिकारी अनंत ताकवाले, पोस्टाचे विभागीय अधिकारी बी. अरमुगम, लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, जिल्हापोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, नगरसेवक प्रवीण अंबुलगे,अॅड. संतोष गिल्डा, अरविंद रेड्डी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर तात्काळ कामकाजास सुरुवात झाली. यावेळी पोस्टाचे बी. आरमुगम यांनी सांगितल की, लातूर येथे सहावे पासपोर्ट कार्यालय सुरू होत आहे. लवकरच उस्मानाबाद, हिंगोली, परभणी येथेही पासपोर्ट कार्यालये सुरू होणार आहेत. गेल्या काही दिवसांत सुरू झालेल्या पाच कार्यालयातून ३२ हजार ४० नागरिकांनी पासपोर्ट काढून घेतले आहेत.

विभागीय पासपोर्ट अधिकारी आनंद ताकवले यांनी सांगितल की, सध्या लातूरच्या कार्यालयात दररोज २५ नागरिकांना वेळ दिली जाणार असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. ती संख्या शंभरावर गेल्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याचीही नियुक्ती येथे केली जाणार आहे. सध्या पुणे येथून मंजुरी मिळणार असली तरी अर्ज दाखल केल्यापासून आठ दिवसांत नागरिकांना नागरिकांना मिळणार आहे. पासपोर्ट हे जगमान्य ओळखपत्र असून ते काढण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ झाली आहे.

खासदार डॉ. गायकवाड म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांत लातूरच्या खासदारांनी जी विकास कामे केली नाहीत, ती मी साडेचार वर्षांत केली आहेत. नव्या २० नव्या रेल्वे सुरू केल्या आहेत. माझ्या विकासकामांबाबत कोणाला चर्चा करायची असेल, तर मी चर्चेला तयार आहे. पासपोर्ट कार्यालयानंतर आता उडाण योजनेच्या माध्यमातून हज यात्रेला जाणाऱ्या हजयात्रेकरूंसाठी लातूर येथूनच स्वतंत्र विमान सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी हवाई उड्डाण मंत्र्याकडे मी पाठपुरावा करीत आहे.

पासपोर्ट कार्यालय सुरू केल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, पासपोर्ट काढण्यासाठी पूर्वी नागपूर किंवा सोलापूरला जावे लागत असे. आता तो खर्च वाचणार असल्याचे शिक्षक असलेले सुरेश राजुरे यांनी सांगितले. अजय गुणाले म्हणाले की, पासपोर्ट काढण्यासाठी वेळही वाचणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. डॉ सय्यद तजमुल यांनी सांगितल की, विदेशात नोकरीची संधी मिळू शकते, त्याची तयारी असावी म्हणून पासपोर्ट असणे आवश्यक आहे. लातूरातच पासपोर्ट मिळण ही आनंदाची बाब आहे. त्याबद्दल मी सरकारचे आभार व्यक्त करतो. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने जिल्हाधिकारी जी श्रीकांत, महपौर सुरेश पवार, बालाजी पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तालयात शस्त्रपूजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिस मुख्यालय तसेच ग्रामीण पोलिस मुख्यालयात विजयादशमी निमीत्त सकाळी शस्त्र व वाहन पूजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे पारंपारिक पद्धतीने सकाळी विधीवत पद्धतीने शस्त्रपूजनाला प्रारंभ करण्यात आला. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या हस्ते पोलिस दलातील सर्व प्रकारच्या शस्त्राचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, राखीव पोलिस निरीक्षक राजेंद्र कत्तूल यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर आज बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर उद्या शुक्रवारी महापालिकेत बैठक होणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यावेळी पालिकेचे पदाधिकारी, गटनेते व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

समांतर जलवाहिनीच्या पीपीपीतत्वावरील कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला. सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाने कंपनीला पाठवला. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कंपनीने पालिका आयुक्तांच्या नावे आपले म्हणणे पाठवले. त्यात कंपनीने मुख्य भागीदार एसएल ग्रुपला करा, असे कळविले आहे. याशिवाय अन्यही मुद्दे कंपनीने उपस्थित केले आहेत.

कंपनीबरोबर तुम्हीच चर्चा करा आणि निर्णय घ्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर व आयुक्तांना सांगितले आहे. त्यानुसार महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्र देऊन चर्चेसाठी कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावले आहे. या प्रतिनिधींबरोबर शुक्रवारी सकाळी ११ वाजता चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हा आता भगवान भक्तीगड’

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

'कष्टकरी समाजासोबत दसरा साजरा करण्याची शिकवण मला भगवानबाबा व गोपीनाथ मुंडे यांनी दिली आहे. दसरा मेळव्यानिमित्त भगवान बाबा आज नगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात सीमोलंघन करून सावरगाव येथे दाखल झाले आहेत,' असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. आता सावरगावचे स्मारक 'भगवान भक्तीगड' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

सावरगाव येथील दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, आज स्टेजवर डाव्या बाजूला लोकनेते आणि उजव्या बाजूला संत-महंत बसले आहेत. एवढी शक्ती माझ्यासोबत आहे की, शंकराचार्य, शिवाचार्य, संत तुकाराम महाराजांचे वंशज, नामदेव महाराजांचे वंशज, वारकरी संतपीठाचे प्रकाश महाराज बोधले हे स्मारकाच्या निमित्ताने आशीर्वाद देण्यासाठी सावरगाव येथे आले आहेत. माझ्या जीवनात शब्दाला महत्त्व आहे. मागच्या वर्षी तुमच्या साक्षीने मी सांगितले होते की, भगवान बाबांच्या स्मारकाची एका वर्षात उभारणी करेल. तेंव्हा काही लोकांनी टीका केली. प्रश्न निर्माण केले की, ताई सावरगाव येथे कशामुळे स्मारक करत आहेत? मी सांगितले की धौम्य गडावर ज्याला भगवानगड म्हणून ओळखले जाते तिथे भगवान बाबा राहत होते ती त्यांची कर्मभूमी आहे. त्यांची जन्मभूमी सावरगाव आहे. भगवान बाबांच्या शिष्यानी बनवलेला हा भगवान भक्तीगड आहे. आता सावरगावचे स्मारक 'भगवान भक्तीगड' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. दरवर्षी भगवानभक्ती गडावर यायचे. मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत तिला घेऊन यायचे आणि एक धागा तिच्या हातात बांधायचा. दर दसऱ्याला भक्तीचा धागा बांधण्यासाठी इथे यायचे. इथून आपली पुढील दिशा ठरणार आहे, असे त्या म्हणाल्या.

'मी आज तुमच्यामुळे सरकारमध्ये मंत्री आहे. तुमच्यामुळे मी ग्रामविकास मंत्री म्हणून विकासाची गंगा आणत आहे. सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवार योजना सुरू केली. त्यामधून मधून हजारो टँकर बंद केले. दोन वर्षात अडीच लाख लोकांना घरे दिली. एवढा निधी कधीच मिळाला नाही. प्रत्येक गावात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ग्रामपंचायत कार्यालय दिले. एक रुपया न घेता शिक्षकांना बदल्या करून दिल्या,' असे त्या म्हणाल्या. संत नामदेव महाराजांचे वंशज महादेव महाराज नामदार यांनी त्यांच्या आशिर्वादपर भाषणात पंकजा मुंडे राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात, असे आशीर्वाद दिले. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. पदावर बसण्यापेक्षा आपल्या विचाराचे सरकार आणणे महत्त्वाचे आहे. पदावर बसणाऱ्या व्यक्तीमागे पंकजाचेही योगदान असावे असे वाटते, असे त्या म्हणाल्या. संतपीठाचे प्रकाश महाराज बोधले यांनी सावरगावचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पंकजा मुंडे यांचे नाव लिहिले जाईल, असे मत व्यक्त केले.

.....

\Bमाणसे पाहून उमेदवारी \B

भाजपचे आमदार आणि खासदार यांच्या कामगिरीच्या सर्वेक्षणात बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची जागा धोक्याची दाखवण्यात आल्याचे वृत्त माध्यमात आले. मात्र कुठल्याही निवडणुकीची उमेदवारी ही सर्वेक्षणाच्या निष्कर्षावर दिली जात नाही, तर माणूस पाहून दिली जाते. आमच्यामागे लोकांचा पाठिंबा हा घटक महत्त्वाचा आहे. सर्वेक्षण कुणाला पहायचा असेल, तर आज येथे पाहा, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाकडे निर्देश केला. आमच्यासाठी कोणतीही धोक्याची घंटा नाही, तर २०१९ मध्ये पुन्हा आम्हीच विजयाची घंटा वाजवणार. देशात आणि राज्यात पुन्हा भाजपची सत्ता स्थापना करण्याची भगवान बाबांच्या जन्मस्थळ शपथ घेत आहे, असे त्या म्हणाल्या.

.....

\Bस्वागतासाठी नियत चांगली लागते: खा. मुंडे

\B

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्या म्हणाल्या की, वर्षभर या दिवसाची वाट पंकजाताई काय सांगणार यासाठी पाहिली जाते. यावर्षी भगवान बाबांची देखणी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मेळाव्यास देशाच्या विविध भागातून भाविक आले. यापूर्वी हा दसरा मेळाव्याचा मान नगर जिल्ह्याला मिळत होता. तो आता बीड जिल्ह्याला मिळाला आहे. बीडची खासदार म्हणून उपस्थित भाविकांचे मी स्वागत करते. भगवान बाबांच्या शिकवणीवर चालण्यासाठी आठवण करून देणारा हा दिवस आहे. नेते मंडळी घोषणा करतात पण त्याचे पालन अनेकदा करीत नाही. पण पंकजाताईंनी स्मारकाचा शब्द दिला आणि स्मारकाचे काम पूर्णत्वास नेले आहे. मी या स्मारकासाठी गोपीनाथगडावरील गुलाबाची फुले भगवान बाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी घेऊन आले आहे. सावरगावकरांनी गेल्यावर्षीपासून मुंडे साहेबांच्या कन्या म्हणून आमचे स्वागत केले. स्वागत करण्यासाठी ऐपत नाही, तर नियत चांगली लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूर मधमेश्वरचे पाणी पेटणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर-गंगापूर तालुक्यांसाठी वरदान असलेला नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या हक्काच्या पाण्याचे आरक्षण, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, अपूर्ण पोटचाऱ्यांची कामे, आवर्तनाचे नियोजन, भूसंपादनाचा मोबदला उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, गट शेती, शेती पूरक व्यवसाय, शेतीमाल प्रक्रिया प्रकल्प; तसेच शेतीमाल वितरण व विक्री व्यवस्था हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करून रविवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी चार वाजता डेपो रोड येथे शेतकरी परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कृषी क्षेत्रात उल्लेखनिय काम करज्रे अनेक तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

वैजापूर-गंगापूर तालुक्यांतील शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा असलेला नांदूर मधमेश्वर प्रकल्प संकटात सापडला असल्याने हक्काचे पाणी, आवर्तन, भूसंपादनाचा मोबदला, अपूर्ण शेत चाऱ्यांची कामे, या विषयी अनेक ठराव या परिषदेत घेण्यात येणार आहेत. हे ठराव शासनास सादर करून त्याबाबतीत शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडण्यात येणार आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. तो शेतकऱ्यांना लवकरात-लवकर देण्यात यावा ही मागणी करण्यात येणार आहे.

नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्पावर अत्याधुनिक जलमापक यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. कालव्यासाठी असलेल्या भाम, भावली, वाकी, मुकणे या धरणांचे व्यवस्थापन मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास करणे गरजेचे आहे. या परिषदेत वैजापूर-गंगापूर तालुक्यातील सिंचनाच्या संबंधित प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या परिषदेस जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक डॉ. राजीव डोंगरे, पंडितराव शिंदे यांनी केले आहे.

\B१०० गावांना पाणी देण्याची मागणी\B

कालव्यावर सुमारे ४४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे, परंतु गेल्या १५ वर्षांत ५० टक्क्यांपेक्षा कमी लाभर्थींना त्याचा लाभ झालेला आहे. येत्या काळामध्ये संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन करावे लागेल. अपूर्ण शेतचाऱ्याचे कामे पूर्ण करणे; तसेच पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. चाऱ्याची व कालव्याची दुरुस्ती, देखभाल करणे गरजेचे आहे. पाण्याचे आवर्तन शेतकऱ्याच्या पिकाच्या गरजेनुसार दिल्यास शेतकऱ्यांना याचा अधिकाधिक फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आवर्तन करणे गरजेचे आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील व परिसरातील सुमारे १०० गावांसाठी नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून पिण्याचे पाणी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images