Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तुळजाभवानीचे घटोत्थापन

0
0

तुळजापूर : तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाची नवव्या माळेस घटोत्थापनेने सांगता झाली. पहाटे सीमोल्लंघनानंतर देवीचा निद्राकाल प्रारंभ होणार आहे. आई राजा उदो उदोच्या गजरात खंडेनवमीनिमित्त गुरुवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता मंदिरातील होमकुंडावर पारंपारिक पद्धतीने धार्मिक विधी पार पडला.

सकाळी देवीची नित्योपचार अभिषेक पूजा करण्यात आल्या. त्यानंतर होमकुंडावर पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी पार पडला. यावेळी भोपे, पुजारी, सेवेधारी यांच्यासह भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. देवीची आरती होऊन आई राजा उदो उदोच्या गजरात मंदिरातील सिंहगाभाऱ्यातील घटाचे उत्थापन करण्यात आले. यावेळी मंदिर संस्थान अध्यक्ष, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पाळीचे भोपे पुजारी प्रशांत बापूसाहेब पाटील, अतुल मलबा, महंत तुकोजीबुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, नवे मंदिर व्यवस्थापक (प्रशासन), तहसीलदार योगिता कोल्हे, दिलीप नाईकवाडी, सिद्धेश्वर इंतुले, भोपे पुजारी, पाळीकर पुजारी, सेवेधारी आदींची उपस्थिती होती.

तुळजाभवानी मंदीरातील घटोत्थापन झाल्यानंतर मंदिरातील मातंगीदेवी, यमाई आदी उपदेवतांचे घटोत्थापन पार पडले. यानंतर घरोघरी प्रतिष्ठापित घट उठविण्यात आले. देवीस नैवद्य दाखविण्यासाठी शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुरुवारी सायंकाळपर्यंत नगर येथील मानाची पलंग, पालखी शहरात दाखल होणार असून, शुक्रवारी पहाटे वाजत गाजत त्या मंदिरात दाखल होणार आहेत. तुळजाभवानी देवीची मूर्ती सिंहासनावरून काढून मानाच्या पालखीतून मंदिर प्रदक्षिणा करत देवीचे सीमोल्लंघन होणार आहे. त्यानंतर नगर येथून आलेल्या पलंगावर देवीचा पाच दिवसांचा निद्राकाल प्रारंभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दसऱ्याला बाजाराची कोटींची उड्डाणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीनिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी गुरुवारी बाजारात ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. रिअल इस्टेट, वाहन बाजार, सोने -चांदी मार्केट, इलेक्ट्रॉनिक, कापड बाजारात ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने व्यापारीवर्गात आनंदाचे वातावरण असून सूमारे १०० कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

दसऱ्याच्या मुहूर्तावर एखादी तरी नवीन वस्तूची खरेदी करणे शुभ मानले जाते. हे ओळखून हा सण कॅश करण्यासाठी व्यापाऱ्यांनी गेल्या महिन्याभरापासूनच जोमाने तयारी केली होती. त्यात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने व्यापारीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.

दसऱ्यानिमित्त सराफा बाजारातही उत्साही वातावरण होते. या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यास अनन्यसाधारण महत्त्व असते. दरम्यान, सोन्याच्या भावात गेल्या तीन दिवसाच्या तुलनेत तोळ्यामागे साडे तीनशे रुपयांची वाढ झाली. गुरुवारी सोन्याचा भाव प्रती तोळा ३२ हजार ६०० रुपये एवढा होतो. तर चांदीचा भाव किलोमागे ४० हजार रुपयांच्या घरात होता. यंदा प्रामुख्याने चैन, मंगळसूत्र आदी दागिन्यांसह, निरंजन, आपट्यांची पानांना चांगली मागणी झाली. यासह भेटवस्तू देण्यासाठी म्हणून चांदीचे नाण्यासह अन्य वस्तूंना मोठी डिमांड होती, अशी माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली. दिवसभरात सुमारे १५ ते २० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल सराफा मार्केट झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, कपडा व्यवसाय, गृहोपयोगी वस्तू, चांगली मागणी असून गुलमंडी, निराला बाजार तसेच मॉलमध्येही ग्राहकांची गर्दी होत आहे. बुकिंग करण्यापेक्षा थेट वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल अलीकडे वाढला आहे. एकूण मार्केटचा विचार करता सुमारे १०० कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राज्य प्रतिनिधी अजय शाह यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला. तर इलेक्ट्रॉनिक्स बाजारात चैतन्याचे वातावरण असून एलसीडी, एलइडी, थ्री -डी टिव्ही, प्लाझ्मा, वॉशिंग मशीन आदींना मोठी मागणी असून दिवाळीत यापेक्षा अधिक चांगला व्यवयास होईल, अशी शक्यता विक्रेते अरुण जाधव यांनी व्यक्त केली आहे. मोबाइल मार्केटमध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे विक्रेते ज्ञानेश्वर खर्डे यांनी सांगत दिवाळी सणादरम्यान यापेक्षा अधिक प्रतिसाद लाभेल, अशी आशा व्यक्त केली.

झेंडूला भाव घसरला

झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने फूल उत्पादकांना अपेक्षित भाव मिळाला नाही. बुधवारी सायंकाळपर्यंत ४० ते ५० रुपये असा दर होता पण, गुरुवारी मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने किरकोळ बाजारात दुपारपर्यंत १० रुपये प्रती किलो दराने त्याची विक्री झाली. विक्री न झाल्याने अनेक विक्रेत्यांना सायंकाळी फुले तशीच टाकून द्यावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे अस्मिता तुपलोंढेच्या नावे मुदतठेव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिडको एन ८ येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालयात नवरात्रोत्सवाच्या निमित्याने उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. याच रुग्णालयात ४ ऑक्टोबर २०१८ रोजी जन्मलेल्या अस्मिता सुमीत तुपलोंढे या मुलीच्या नावे प्रतिष्ठानतर्फे २१०० रुपये मुदत ठेव म्हणून ठेवण्यात आले. मुदतठेवीचे प्रमाणपत्र पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राजु वैद्य यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश भाले व अन्य उपस्थित होते.

...........

महापालिकेत बंद पडलेली मिनाताई ठाकरे कन्या सुरक्षा मुदत ठेव योजना कायमस्वरुपी सुरू करण्याचे आश्वासन यावेळी वैद्य यांनी दिले. ही योजना प्राजक्ता मंगेश भाले पालिकेत महिला बालकल्याण समितीच्या सभापती असताना सुरू करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबल गळ्यात अडकल्याने दुचाकीवरील चौघे जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यावरील केबल वायर काढताना ती गळ्यात अडकल्याने दुचाकी घसरून चौघे जखमी झाले. शुक्रवारी दुपारी हडकोतील बळीराम पाटील शाळेजवळ हा प्रकार घडला. या जखमीमध्ये एका चिमुकलीचा समावेश आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील पथदिव्यांवरील केबल वायर काढण्याची मोहीम सुरू आहे. दुपारी महापालिका व महावितरणचे कर्मचारी बळीराम पाटील शाळेजवळील पथदिव्यांवरील केबल काढत होते. यावेळी वाहनधारकांना अडथळा होऊ नये म्हणून या ठिकाणी वाहने थांबवने किंवा बॅरिकेटस लावणे आवश्यक होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वतीने तसेच केबल कापण्याचे काम सुरू होते. कापलेली एक केबल लोंबकळत होती. यावेळी नितीन म्हस्के (वय २१) हे दुचाकीवरून दुर्गा म्हस्के (वय १८), आरती सचिन म्हस्के (वय १९) आणि सृष्टी सचिन म्हस्के (वय १) यांच्यासोबत जात होते. यावेळी लोंबकळत असलेल्या वायरचा फास नितीनच्या गळ्याला बसला. त्यामुळे त्यांचा तोल गेल्याने दुचाकी घसरली. दुचाकीवरील चौघेही जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर रुपयांची लाच घेताना सोसायटी सचिवाला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहेगाव (ता. गंगापूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवला शंभर रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पीक कर्जासाठी लागणाऱ्या बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती. राजू कारभारी चव्हाण (वय ४५ रा. वाहेगाव) असे या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार शेतकऱ्याला पीक कर्ज घ्यायचे होते. यासाठी त्याला बेबाकी प्रमाणपत्र लागत होते. या प्रमाणपत्राकरिता त्याने सोसायटीचे सचिव राजू चव्हाण यांच्याशी संपर्क साधला होता. हे प्रमाणपत्र देण्यासाठी चव्हाण यांनी शंभर रुपयांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने या शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. चव्हाण याने शुक्रवारी लाचेची रक्कम घेऊन शेतकऱ्याला घरी बोलावले होते. या ठिकाणी लाचेची रक्कम घेताना चव्हाणला अटक करण्यात आली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गवळी, अश्वलींग होनराव, बाळासाहेब राठोड,संतोष जोशी, राजपूत यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारखेड्यातील जागेला नऊ कोटींचा प्रस्ताव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी (२० ऑक्टोबर) होत आहे. गारखेडा भागातील एका भूखंडासाठी नऊ कोटी २९ लाख ३९ हजार ३४८ रुपये मोबदला देणे व अधिकाऱ्यांसाठी २३ नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव सभेत ठेवण्यात आलेला आहे.

गारखेडा येथील नगर भूमापन क्रमांक १५७३५-३१ येथे आरक्षण क्रमांक २६६-बी हे उद्यानाचे आरक्षण आहे. या जागेचे मालक योगेशकुमार झवेरी यांनी तीन नोव्हेंबर २०१४ रोजी खरेदी सूचना दिली. त्यानुसार विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी २२४८.१७ चौरस मीटर जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव सादर केला. या संदर्भात झवेरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने एक वर्षात मोबदला देण्याचे आदेश दिले. त्यानुसार नऊ कोटी २९ लाख ३९ हजार ३४८ रुपये भूसंपादनापोटी देण्याचा प्रस्ताव आहे. या रक्कमेच्या ३० टक्के रक्कम म्हणजे दोन कोटी ७८ लाख ८१ हजार ८०४ रुपये झवेरी यांच्या कार्यालयात तत्काळ जमा करावे लागणार आहेत. महापालिका अधिकाऱ्यांसाठी २३ नवीन वाहने खरेदीकरिता एक कोटी ३८ लाख १० हजार ३९० रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

याचिकाकर्त्याला २५ हजार दंड

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

बीड जिल्ह्यातील गेवराईचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याविरुद्ध दाखल याचिका ही 'जनहित याचिका' नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. मंगेश पाटील यांनी ती याचिका फेटाळली. याचिकाकर्त्याने जनहित याचिकेपोटी अनामत म्हणून जमा केलेले २५ हजार रुपये खंडपीठाने दंड म्हणून जप्त केले. ही रक्कम खंडपीठातील विधी सेवा उपसमितीच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याचे आदेशात म्हटले आहे.

शेख पाशा शेख जमाल यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल करुन गेवराईचे तत्कालीन तहसीलदार शेळके यांनी बाग पिंपळगाव, तागडगाव, राज पिंपरी आणि रांझणी येथील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालय, निवासस्थानांची बांधकामे पूर्ण न करता 'पूर्णत्व प्रमाणपत्रे' दिली. त्यामुळे या कामांचे ४६ लाख ३४ हजार रुपयांचे कंत्राटदाराचे बील मंजूर झाले. यासंदर्भात शेळके यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली होती.

\Bआकसापोटी याचिका केल्याचा युक्तिवाद\B

सुनावणीदरम्यान सहायक सरकारी वकील ज्ञानेश्वर आर. काळे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, शेळके हे २०१२ ते २०१५दरम्यान गेवराईला तहसीलदार होते. ही कामे त्यापूर्वी झाली आहेत. शेळके यांनी त्या कामांचे पूर्णत्व प्रमाणपत्र दिले नाही किंवा एकाही रुपयाचे बिल मंजूर केले नाही. २०१४मध्ये शेळके यांनी याचिकाकर्त्याविरुद्ध एका प्रकरणात त्याच्याविरुद्ध निकाल दिला होता. म्हणून वैयक्तिक आकसापोटी त्यांनी शेळके यांच्याविरुद्ध हे जनहित याचिका दाखल केली आहे. काळे यांनी 'त्या' निकालाची प्रत खंडपीठात सादर केली. सुनावणीअंती या याचिकेत जनहित नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे खंडपीठाने याचिकाकर्त्याला दंड ठोठावला .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोजागरीच्या कार्यक्रमाला कलेचे कोंदण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजस्थानी संस्कृती आम्हाला प्रिय आहे. राजस्थानी असल्याचा आम्हाला अभिमानही आहे, असा नारा बुलंद करत माहेश्वरी महिला संघटनेने शुक्रवारी कोजागरी पौर्णिमा साजरी केली. यावेळी विविध स्पर्धा आणि पारंपरिक राजस्थानी नृत्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

माहेश्वरी महिला मंडळाच्या विविध प्रभागांनी मिळून ज्योतीनगरमध्ये कोजागरी उत्सवाचे आयोजन केले होते. प्रमिला चांडक, पुष्पा बाहेती, प्रमिला काबरा, रेखा राठी प्रमुख पाहुण्या होत्या. माहेश्वरी जिल्हा संघटना, प्रगती मंडळ, नई दिशाए आणि माहेश्वरी बहू मंडळ यांनी मिळून समाजातील जवळपास ५०० महिलांना एकत्र आणले. यावेळी मीना नावंदर, सुधा खटोड, बबिता करवा, पुष्पा लढ्ढा, माधुरी धुप्पड, स्वाती मुंदडा, प्रेरणा मंत्री, अर्चना नावंदर उपस्थित होत्या. ढोलच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत झाल्यावर राजस्थानी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. पारंपरिक राजस्थानी गाणी आणि वेशभूषा यामध्ये पाहायला मिळाली.

\Bमिसेस राजस्थानी

\Bमहिलांचा उत्साह वाढवण्यासाठी मिसेस कोजागरी आणि मिसेस राजस्थानी असे पुरस्कार जाहीर करण्यात आले. संपूर्ण शहरातील माहेश्वरी समाजातील महिलांचे या कार्यक्रमाकडे लक्ष असते. एकाच व्यासपीठावर विविध मंडळांनी महिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न पाहून दरवर्षी या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढत आहे. नंदा नावंदर, सरोज पल्लोड, राजश्री करवा, स्वाती खटोड,ममता कलंत्री, पद्मा झंवर, अर्पिता दरख व कल्पना भुतडा या कार्यक्रमाच्या प्रकल्पप्रमुख होत्या. प्रीती भानुशाली आणि माधुरी सांची परीक्षक होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५ लाखांची फसवणूक; दोघांच्या कोठडीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिल्लोड येथील डी.एड. महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून शासनाची २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी असगरी बेगम सय्यद मोहंमदअली व आरोपी शेख मुबीन शेख शोएब यांच्या पोलिस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत (२० ऑक्टोबर) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी शुक्रवारी दिले.

या प्रकरणात कैसर कॉलनी येथील अलमोबीन शिक्षणसंस्थेच्या अलअसगरी उर्दू हायस्कुलच्या अध्यक्षा असगरी बेगम (५३, रा. कटकटगेट), उपाध्यक्ष नूरजहां बेगम वलिओद्दिन, सचिव शेख मुबीन शेख शोएब (३६, रा. कटकटगेट), सहसचिव अक्तर खान हुसेन खान, कोषाध्यक्ष शेख मोहसीन शेख शोएब, सदस्य शेख नाजिमोद्दिन निहालोद्दिन व इम्रान खान फारूक खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींना शुक्रवारवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांच्या पोलिस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले. विशेष सहायक सरकारी वकील जी. बी. कदम यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोडशेडिंग विरोधाात ‘एमआयएम’चे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणतर्फे शहराच्या काही भागातच लोडशेडिंग होत असल्याचा आरोप करीत 'एमआयएम'ने शुक्रवारी महावितरण कार्यालयात आक्रोश आंदोलन केले. लोडशेडिंगला विरोध नसून शहरात समप्रमाणात लोडशेडिग करावे, अशी मागणी 'एमआयएम'ने केली आहे.

शहरात काही दिवसांपासून सुरू केलेल्या लोडशेडिंगचा त्रास नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना होत आहे. त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. आमदार इम्तियाज जलील यांनी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन समप्रमाणात लोडशेडिंग करण्याची मागणी केली. यावेळी डॉ. गफार कादरी, नासेर सिद्धिकी, जमीर अहेमद कादरी, अज्जू नाईकवाडी, मुन्शी पटेल, गंगाधर ढगे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. यापूर्वीच्या आंदोलनावेळी महावितरण कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. ते लक्षात घेऊन यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत बटालियनमध्ये जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरातील भारत बटालियन राज्य राखीव पोलिस दलातील जवानाने इलेक्ट्रिक वायर हातात धरून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी समादेशकाच्या केबिनच्या बाजुला घडला. आनंदा पाटील असे या जवानाचे नाव असून, त्याच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पाटील हे कॅम्पमध्ये कुटुंबासह राहतात. शुक्रवारी समादेशकांना भेटल्यानंतर पाटील हे बाजूला असलेल्या 'डीवायएसपीं'च्या केबिनमध्ये गेले. त्यांनी दरवाजा आतून बंद करून त्यांनी इलेक्ट्रिक केटलीचे वायर तोडून हातात पकडले. पायात बूट असल्यामुळे त्यांना झटका बसून ते फेकले गेले. इतर जवानांनी त्यांना दरवाजा उघडून तातडीने सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना जवानांनी भेटू दिले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कविता महोत्सवाच्या अध्यक्षपदी वर्जेश सोळंकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कविता महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी वर्जेश सोळंकी यांची निवड करण्यात आली. या एकदिवसीय महोत्सवात परिसंवाद, कविसंमेलन होणार आहे अशी माहिती निमंत्रक राजेश भारुका व रमेश रावळकर यांनी दिली.

सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि बाबूराव काळे महाविद्यालय, अजिंठा यांच्या वतीने कविता महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात रविवारी दुपारी एक ते सहा या वेळेत महोत्सव होईल. महोत्सवाचे उद्घाटन रंगनाथ काळे करणार आहेत. यावेळी अध्यक्ष वर्जेश सोळंकी, 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. मीना पाटील व प्रा. सोमनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी दोन वाजता 'नवे जग नवी कविता' विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादात डॉ. कैलास अंभुरे, अॅड. नीलिमा कुलकर्णी आणि प्रा. ऋषिकेश देशमुख विचार मांडणार आहेत. दुपारी तीन वाजता श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. या संमेलनात तुकाराम धांडे, प्रशांत मोरे, बालाजी सुतार, सत्यपाल राजपूत, नामदेव कोळी, महेश लीला पंडीत, दिशा शेख, गौरवी भारुका, आशा डांगे, हिमांशू गुप्ता, गणेश घुले, रमेश ठोंबरे, सुनील उबाळे, सुदर्शन पोटभरे, सीमा ढगे सहभागी होणार आहेत. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या उपस्थितीत सायंकाळी महोत्सवाचा समारोप होईल. रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगावकरांचे ‘रास्ता रोको’

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

जालना जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यात चार जानेवारी २०१७ रोजी समाविष्ट केलेल्या तळेगावचे महसूलसह अन्य विभागात ऑनलाइन मॅपिंग झालेल नसल्यामुळे गावातील विकास कामे थांबली आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनी शुक्रवारी 'रास्ता रोको' आंदोलन केले.

औरंगाबाद जिल्हा प्रशासन फुलंब्री तहसीलला वारंवार पत्रव्यवहार करूनही तळेगाव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एमआरईजीएस, पंचायत विभाग, कृषी विभाग आदी विभागांमध्ये गाव दिसत नसल्यामुळे वैयक्तिक लाभासह, रोजगार हमीचे कामे, मंजूर असलेले घरकुलााची कामे, सिंचन विहीर, शेतकऱ्यांचे सातबारा दुरुस्ती यासारखी कामे दीड वर्षापासून बंद झाल्यामुळे तळेगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) सकाळी साडेनऊपासून राजूर - फुलंब्री मार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा तब्बल दोन तास वाहतूक बंद झाली होती. दहा वाजता पदवी शाखेच्या विद्यार्थ्यांचा पेपर असल्यामुळे आंदोलकांनी परीक्षार्थींना रस्ता मोकळा करून दिला. आंदोलनात वडोदबाजार सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, गावातील नागरिक, महिला, विद्यार्थी आदींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन स्थगित करण्यास नकार दिल्यामुळे तहसील कार्यालय फुलंब्री तहसीलदार संगिता चव्हाण यांनी आंदोलनास भेट देऊन ग्रामस्थांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. तहसीलदार यांनी आंदोलकांना यांच्या मागण्यांबाबत मार्गदर्शन केल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. यावेळी हसनाबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण बिडवे अन्य पोलिस कर्मचारी, तलाठी भरत दुतोंडे, मंडळ अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीवर केला पत्नीने चाकूहल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराच्या मालकी हक्कावरून पत्नीने पतीचा गळा दाबत चाकुने वार करून जखमी केले. हा प्रकार बुधवारी दुपारी १२ वाजता सातारा परिसरात घडला. याप्रकरणी पत्नीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी कुलदीप तेजराव जाधव (वय ३५, रा. सातारा परिसर) याने तक्रार दाखल केली. कुलदीप हा बुधवारी त्याच्या वडिलांच्या नावावर असलेल्या घरी गेला होता. यावेळी त्या ठिकाणी त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत वाद घातला. 'हे घर तुझ्या बापाचे नाही, तू या घरात यायचे नाही. माझ्याकडे कोर्टाचे आदेश आहेत,' असे म्हणत शिवीगाळ केली; तसेच कुलदीपचा गळा दाबत नखाने ओरबडले. यानंतर त्याच्या पत्नीने कांदा कापण्याच्या सुरीने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये उजव्या हातावर वार लागल्याने कुलदीप जखमी झाला. यावेळी, 'तुझ्या आई-वडिलांना व तुला बरबाद करून टाकेन,' अशी धमकी पत्नीने दिली. या प्रकरणी कुलदीपच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार बऱ्हाटे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटधारी चोरट्यांकडून तीन मंगळसूत्र लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात पुन्हा एकदा मंगळसूत्र चोर सक्रिय झाले असून, शुक्रवारी हेल्मेटधारी चोरट्यांनी तीन मंगळसूत्र चोरून पोबारा केला. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

मंगळसूत्र चोरीची पहिली घटना सकाळी साडेसात वाजता हडको एम दोन भागात घडली. ललिता विठ्ठलराव नागे (वय ५८) या आपल्या मैत्रिणीसोबत स्वाध्यायाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या पायी घराकडे परतत होत्या. यावेळी दुचाकीवर दोन हेल्मेटधारी तरुण त्यांच्या जवळून गेले. या तरुणांनी दुचाकी पुन्हा वळवून आणत नागे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झाले. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बजरंग चौकाकडे वळवला. या ठिकाणी आशा देवळे ही महिला अंगण झाडत असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. या दोन्ही प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. मंगळसूत्र चोरीचा तिसरा प्रकार गोदावरी शाळेजवळ एन बारा परिसरात घडला. येथील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न दुचाकीस्वार चोरट्यांनी केला. मात्र मंगळसूत्र तुटून मणी खाली पडले, तर मंगळसूत्र महिलेच्या हातातच राहिल्याने ते वाचले. या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली नाही.

\Bसीसीटीव्हीत कैद

\Bललिता नागे यांचे मंगळसूत्र ज्या ठिकाणी हिसकावण्यात आले, त्या ठिकाणी एका घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे. या कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला आहे. या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’ पुनरुज्जीवनात मूळ करार कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनी कराराच्या पुनरुज्जीवनात कंपनीबरोबर केलेला मूळ करार कायम राहील, असे महापालिकेतर्फे शुक्रवारच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. कंपनीच्या प्रतिनिधींनी मात्र पुनरुज्जीवनात एसएल ग्रुपला मुख्य भागीदार करा, असा हट्ट कायम ठेवला. याबाबत २६ ऑक्टोबर रोजी पुन्हा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आजच्या बैठकीकडे पालिकेतील भाजपच्या सदस्यांनी पाठ फिरवली.

'समांतर'च्या कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय पालिकेच्या चार सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेतल्यानंतर कंपनीने पालिकेला आपले म्हणणे लेखी स्वरुपात सादर केले. यावर चर्चा करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सभागृहनेता विकास जैन, सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, विरोधीपक्षनेते जमीर कादरी, 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी, शिवसेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप उपस्थित होते. कंपनीतर्फे एसएल इन्फ्राचे विजयश गुप्ता, स्मार्ट युटिलिटीजचे प्रकल्प संचालक जीवन सोनवणे बैठकीत सहभागी झाले.

'समांतर'च्या मूळ करारात कोणताही बदल होणार नाही, करारात ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्याचा स्वतंत्र सामंजस्य करार पालिका आणि कंपनीमध्ये केला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. प्रकल्पासाठी काढावे लागणारे कर्ज, त्यासाठी तारण ठेवायच्या जागा, मूळ करारात एसपीएमएल (सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमीटेड) या कंपनीचा सहभाग आहे. या कंपनीला करारातून काढून त्याच्या जागी एसएल ग्रुपला प्रमुख भागीदार करणे, राष्ट्रीयकृत बँकेचा आग्रह न धरणे या मुद्यांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, मुख्यलेखाधिकारी सुरेश केंद्रे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि विधी सल्लागार अपर्णा थेटे यांचा समावेश असेल. कंपनीच्या प्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करताना एसएल ग्रुपला मुख्य भागीदार केल्याशिवाय बँकेचे कर्ज प्रकरण होणार नाही, त्यामुळे एसएल ग्रुपला मुख्य भागीदार करण्याबाबत निर्णय घ्या असे बजावले. पालिकेकडे सुमारे पन्नास कोटी थकबाकी आहे. ही रक्कम मिळाल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही. पेमेंट केल्याशिवाय जुने कंत्राटदार काम करणार नाहीत. जायकवाडीपासून जलवाहिनी टाकण्याच्या मार्गात काही ठिकाणी वन विभागाची जागा आहे, या जागेबद्दल वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र पालिकेनेच मिळवून द्यावे असा मुद्दाही कंपनीच्या प्रतिनिधींनी मांडला.

\Bजायकवाडी ते नक्षत्रवाडीसाठी स्वतंत्र प्रकल्प अहवाल

\Bजायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान पहिल्या टप्प्यात मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत या बद्दल शपथपत्र करा, अशा सूचना महापौरांनी दिल्या. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प पीपीपीतत्वावरचा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पात आम्ही वीस टक्के गुंतवणूक करणार आहोत. उर्वरित ऐंशी टक्के गुंतवणूक सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना करावी लागेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ पुनरुज्जीवनात मूळ करार कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनी कराराच्या पुनरुज्जीवनात कंपनीबरोबर केलेला मूळ करार कायम राहील, असे महापालिकेतर्फे शुक्रवारच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. कंपनीच्या प्रतिनिधींनी मात्र पुनरुज्जीवनात एस्सेएल ग्रुपला मुख्य भागीदार करा, असा हट्ट कायम ठेवला. याबाबत २६ ऑक्टोबर रोजी पुन्हा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आजच्या बैठकीकडे पालिकेतील भाजपच्या सदस्यांनी पाठ फिरवली.

'समांतर'च्या कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय पालिकेच्या चार सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेतल्यानंतर कंपनीने पालिकेला आपले म्हणणे लेखी स्वरुपात सादर केले. यावर चर्चा करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सभागृहनेता विकास जैन, सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, विरोधीपक्षनेते जमीर कादरी, 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी, शिवसेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप उपस्थित होते. कंपनीतर्फे एस्सेएल इन्फ्राचे विजयश गुप्ता, स्मार्ट युटिलिटीजचे प्रकल्प संचालक जीवन सोनवणे बैठकीत सहभागी झाले.

'समांतर'च्या मूळ करारात कोणताही बदल होणार नाही, करारात ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्याचा स्वतंत्र सामंजस्य करार पालिका आणि कंपनीमध्ये केला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. प्रकल्पासाठी काढावे लागणारे कर्ज, त्यासाठी तारण ठेवायच्या जागा, मूळ करारात एसपीएमएल (सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड) या कंपनीचा सहभाग आहे. या कंपनीला करारातून काढून त्याच्या जागी एस्सेएल ग्रुपला प्रमुख भागीदार करणे, राष्ट्रीयकृत बँकेचा आग्रह न धरणे या मुद्यांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, मुख्यलेखाधिकारी सुरेश केंद्रे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि विधी सल्लागार अपर्णा थेटे यांचा समावेश असेल. कंपनीच्या प्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करताना एस्सेएल ग्रुपला मुख्य भागीदार केल्याशिवाय बँकेचे कर्ज प्रकरण होणार नाही, त्यामुळे एस्सेएल ग्रुपला मुख्य भागीदार करण्याबाबत निर्णय घ्या असे बजावले. पालिकेकडे सुमारे पन्नास कोटी थकबाकी आहे. ही रक्कम मिळाल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही. पेमेंट केल्याशिवाय जुने कंत्राटदार काम करणार नाहीत. जायकवाडीपासून जलवाहिनी टाकण्याच्या मार्गात काही ठिकाणी वन विभागाची जागा आहे, या जागेबद्दल वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र पालिकेनेच मिळवून द्यावे असा मुद्दाही कंपनीच्या प्रतिनिधींनी मांडला.

जायकवाडी ते नक्षत्रवाडीसाठी स्वतंत्र प्रकल्प अहवाल

जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान पहिल्या टप्प्यात मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत या बद्दल शपथपत्र करा, अशा सूचना महापौरांनी दिल्या. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प पीपीपीतत्वावरचा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पात आम्ही वीस टक्के गुंतवणूक करणार आहोत. उर्वरित ऐंशी टक्के गुंतवणूक सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना करावी लागेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

0
0

औरंगाबाद : प्रत्येक गावात पैसेवारी सर्वेक्षण करून औरंगाबाद जिल्ह्यात त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली आहे. यावर्षी कमी पाऊस असल्यामुळे खरीप व रब्बी पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. पाणी व चारा टंचाई निर्माण झाली असून, तात्काळ उपाययोजना करावी, असे जिल्हाध्यक्ष छाया जंगले पाटील, मेहराज पटेल, प्रतिभा वैद्य, विणा खरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काम न मिळाल्याने ग्रामपंचायतीला टाळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

यंदा दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील धानोरा या गावातील नागरिकांनी रोजगार हमी योजनेंतर्गत गावातील मजुरांना कामे मिळवण्याची मागणी पंचायत समितीकडे केली होती. यासाठी लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांनी धारेवर धरले होते. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, तहसीलदार संगीता चव्हाण, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, सरपंच शामराव साळुंके यांच्या उपस्थितीत १९० मजुरांना शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) रोजगार हमी योजनेचे काम देण्यात आले, मात्र काम न मिळालेल्या ९० मजुरांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले गटविकास अधिकाारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर टाळे उघडण्यात आले.

फुलंब्री तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. शेतात बी-बियाणे, रासायनिक खतांसाठी झालेला खर्च निघणे देखील अवघड झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी धानोरा गावातील नागरिकांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींना रोजगार हमी योजनेंतर्गत कामे मिळवण्यासाठी धारेवर धरले होते. लोकप्रतिनिधींच्या गाड्यांना आडवून काम मिळेपर्यंत त्यांना परिसरात फिरण्यास मनाई केली होती. शिवाय जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, धानोरा गावचे सरपंच श्यामराव साळुंके व रोजगार सेवक यांनी (एक ऑक्टोबर २०१८) फुलंब्री पंचायत समितीकडे रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरू करण्याची रितसर मागणी केली होती.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोंणगावकर, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, सभापती सर्जेराव मेटे, गटविकास अधिकारी अशोक दांडगे यांच्यासह अन्य अधिकारी लोकप्रतिनिधींनी तालुक्यात दौरा करून धानोरा गावातील नागरिकांची मागणी शासनापर्यंत पोचवली असल्याची माहिती दिली होती.

त्यामुळे शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य बलांडे, तहसीलदार संगीता चव्हाण यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता धानोरा गावात हमी योजनेच्या अकुशल कामाची सुरुवात धानोरा ते धानोरा गायरान या दीड किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर झाली. दरम्यान २८० नागरिक कामावर आले. त्यापैकी ९० मजुरांकडे जॉब कार्ड नसल्यामुळे त्यांना कामावरून परत करण्यात आले. कामावरून परतवून लावलेल्या ९० मजुरांनी धानोरा ग्रामपंचायतीला टाळे लावले. गट विकास अधिकारी अशोक दांडगे यांनी सोमवारपर्यंत (२२ ऑक्टोबर) उर्वरित मजुरांच्या जॉब कार्डची नोंदणी करून त्यांना सोमवारी कामावर घेण्याचे आश्वासन दिल्या नंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे टाळे उघडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसतोड मुकादम हर्सूलमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिद्धेश्वर कारखान्याच्या धनादेश अनादर प्रकरणात आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस तोडणीसाठी मजूर पुरवणाऱ्या मुकादमांना दिलेल्या उचल रकमेची परतफेड न केल्याने औरंगाबाद, बीड, जालना भागातील ऊसतोड मुकादमावर त्यांनी दिलेले धनादेश अनादर झाल्याप्रकरणी सिल्लोड न्यायालयात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

या प्रकरणाची माहिती अशी की, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामार्फत प्रत्येक वर्षी गाळप हंगामामध्ये ऊसतोडीसाठी मजुरांची आवश्यकता असते. त्यासाठी दरवर्षी ऊसतोड मुकदमांसोबत करार करण्यात येतो व त्यांना सिद्धेश्वर सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून उचल रक्कम देण्यात येते. त्या अनुषंगाने मुकादम हे ऊसतोड मजूर पुरवतात व ऊसतोडीच्या पैशातून ते उचल रकमेची परतफेड करतात, परंतु सिल्लोड तालुका हा अवर्षणग्रस्त असल्याने माग मागील तीन ते चार वर्षांपासून कारखाना बंद आहे. कारखाना चालू असल्या काळातील उचल घेतलेल्या रकमेची ऊसतोड मुकादम आणि परतफेड न केल्यामुळे त्यांच्याकडे बाकी असलेल्या रकमेसाठी त्यांनी मागणी केल्यावर सिद्धेश्वर सेवाभावी ट्रस्टच्या नावाने धनादेश दिले होते, परंतु त्यांनी रकमेची परतफेड न केल्यामुळे त्यांच्याविरोधात सिल्लोड येथील न्यायालयात कलम १३८ प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे.

या प्रकरणात हजर होऊन जामीन दिल्यानंतर कित्येक वर्षांनंतर आरोपी हा तारखेवर हजर राहत नसल्याने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले होते. अटक वारंटची बजावणी होऊन आरोपीस अटक करून नुकतेच न्यायालयासमोर हजर केले असता न्या. आर. पी. थोरे यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

\Bधनादेश वटला नाही\B

सखाराम जाधव (रा. धारसावळी, ता. वडवणी, जि. बीड) यांनी कारखान्याकडून २०००-०१या वर्षासाठी २४ मजूर पुरवण्याचा करार २७ जुलै २००० रोजी केला. त्यानुसार; त्यांनी एक लाख ६० हजार रुपये उचल घेतली, परंतु जाधव यांनी मजूर तर पुरवलेच नाही व कारखान्याकडून उचल घेतलेली रक्कम सुद्धा परत केली नाही. त्यामुळे कारखान्यामार्फत त्यांना वेळोवेळी विनंती केल्यावर त्यांनी कारखान्याकडून उचल घेतली रक्कम व त्यावरील व्याजापोटी एक लाख ९८ हजार ४०० रुपयांचा धनादेश दिला होता, परंतु हा धनादेश त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो न वटता परत आला. त्यामुळे त्यांच्याविरोधात सिल्लोड न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images