Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वृक्षतोडीच्या गुन्हास टाळाटाळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्णपुरा परिसरातील किमान २० ते २५ वर्षांचे भले मोठे झालेले झाड केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि कुठल्याही परवानगीशिवाय सहा ऑक्टोबर रोजी परस्पर तोडून टाकण्यात आले. त्यानंतर या वृक्षतोडीची तक्रार उशिरा का होईना छावणी परिषदेकडून छावणी पोलिस ठाण्यात देण्यात आली खरी, परंतु अजूनही छावणी पोलिस ठाण्यात यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. घटनेच्या तब्बल दोन आठवड्यानंतरही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यास हेतुपुरस्सर टाळ‍ाटाळ केली जात असल्याचा आरोप होत आहे.

कर्णपुरा यात्रा जिथे भरते, त्या परिसरातील हे मोठे झाड अचानक तोडण्यात आले आणि या संबंधी 'मटा'ने ठ‍ळक वृत्त प्रकाशित केले होते. मोठ्या वृक्षाच्या तोडीनंतरही छावणी परिषदेकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप झाल्यानंतर व परिषदेवर दबाव वाढल्यानंतर परिषदेने छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अर्थात, तक्रार देऊनही अनेक दिवस लोटले असून, वृक्षतोडीच्या घटनेला १५ दिवस पूर्ण झाले आहे. त्यानंतरही ना वृक्ष तोडणाऱ्याविरुद्ध काही कारवाई झाली आहे, ना या प्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्णपुरा यात्रेचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारानेच हे झाड तोडले आहे. मात्र या प्रकाराविरुद्ध कारवाई करण्याऐवजी हा गुन्हा दडपला जात असल्याचाही आरोप होत आहे. हितसंबंधांमुळ‍े या प्रकारावरच पांघरुण घातले जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांना विचारले असता, 'या विषयीची तक्रार पोलिस ठाण्यात आलेली आहे व याबाबत कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, यासाठी वन विभागाचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यातही आले. लवकरच याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल.'

\Bपरिषदेकडूनही टोलवाटोलवी\B

छावणी परिषदेकडून पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्याआधी ही तक्रार कोणी द्यायची, यावरूनही परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी सुरू होती. लिपिक; तसेच स्वच्छता निरीक्षकामध्ये ही टोलवाटोलवी सुरू होती. परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र काढल्यानंतरच ही तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आल्याचे समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गल्लेबोरगावात जुगार अड्ड्यावर धाड

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

गल्लेबोरगाव येथे टाकळी रोडवरील एलोरा हॉटेलशेजारी तिर्रट जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री एक वाजता पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांनी पथकासह छापा टाकला. यावेळी चार जणांना अटक करून सुमारे ७७ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हॉटेलच्या मागील भिंतीला बल्बच्या उजेडात झाडाखाली हा अड्डा सुरू होता. अनिल मन्सुब आहेर (वय ३२, टाकळी ता. कन्नड), गणेश अंबादास पवार (वय ३० केसापुरी, ता. कन्नड), दीपक रामदास खिलारे (वय ३५, रा. टाकळी ता. कन्नड), शाम विठ्ठल उगले (वय ४०, गल्लेबोरगाव ता. खुलताबाद) यांना जुगार खेळताना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १७ हजार ९१० रुपये रोख, एक मोटारसायकल व चार मोबाइल, असा ७७ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल, पत्याचा एक कॅट जप्त करण्यात आला. या चौघांविरोधात खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिस नाईक वाल्मिक कांबळे, शरद सोनवणे, श्रीकांत चेळेकर, किशोर महेर, पोलिस शिपाई रवी साबळे, भावसिंग जारवाल, गणेश लिपणे, हनुमंत सातपुते यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यध्यापकाकडून शिक्षिकेचा विनयभंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यध्यापकाकडून शाळेतील सहशिक्षिकेला सबंध ठेवण्याची मागणी करीत विनयभंग करण्यात आला. हा प्रकार तीन जुलै ते १७ ऑक्टोबर दरम्यान घडला. याप्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरून मुख्यध्यापकाविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ३४ वर्षांच्या शिक्षिकेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्या सहा वर्षांपासून भावसिंगपुऱ्यातील एका शाळेत कार्यरत आहेत. तीन महिन्यांपासून मुख्यध्यापक संशयित आरोपी अंकुश आसाराम लोखंडे (रा. जुना भावसिंगपुरा) यांने शिक्षिकेचे वेतन बंद केले आहे. लोखंडेने तीन जुलै रोजी या शिक्षिकेशी अश्लील संभाषण करीत विनयभंग केला. या शिक्षिकेने सुटका करून घेतल्यानंतर लोखंडे यांनी वेतन बंद करण्याची धमकी दिली होती. तसेच बुधवारी या शिक्षिकेचा पाठलाग करून लोखंडे याने तू साक्ष का देतेस साक्ष मागे घे, नाहीतर ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली. या प्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मुख्याध्यापक अंकुश लोखंडे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bमहिलेसह पतीविरुद्ध गुन्हा

\B

दरम्यान या प्रकरणात मुख्याध्यापक अंकुश लोखंडे यांच्या तक्रारीवरून शिक्षिका तसेच तिच्या पतीविरुद्ध देखील छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार लोखंडे यांच्या घरी घडला. माझ्या पत्नीची वेतनवाढ का रोखली या कारणावरून शिक्षिकेच्या पतीने मारहाण करीत ४० हजार रुपये घेतल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात उपनिरीक्षक मुळे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांची आज बैठक

0
0

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मेंढेगिरी समितीच्या अहवालाप्रमाणे देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक सोमवारी होणार आहे. निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिरात सोमवारी दुपारी दोन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदार, महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांना आमंत्रित करण्यात आले आहे. जायकवाडी धरणात नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करीत या बैठकीचे आयोजक आमदार प्रशांत बंब यांनी केली असून, सर्व आमदारांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण-रोजगारासाठी मानवी साखळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण व रोजगारावर नियंत्रण असणारे सरकार या प्रश्नांवर अत्यंत असंवेदनशील आहे. महागडे शिक्षण आणि पात्रता असूनही रोजगार मिळत नसल्याने देशात अस्वस्थता वाढली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. शेकडो विद्यार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मानवी साखळीत सहभागी होत शासकीय उदासीनतेचा धिक्कार केला.

शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावर सरकारला जागे करण्यासाठी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. पैठण गेट ते क्रांती चौक येथे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता साखळी आंदोलन झाले. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. वाढती बेरोजगारी व सर्वांना शिक्षणाच्या समान संधी या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण मोफत, रोजगाराभिमुख आणि कौशल्याधिष्ठीत असावे, वैज्ञानिक दृष्टिकोनावर शिक्षण आधारीत हवे, मराठी विषय सर्व माध्यमांना बारावीपर्यंत अनिवार्य करावा, शहरी रोजगार हमी योजना सुरू करावी आणि तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार काम द्यावे. सुशिक्षित बेकारांना दरमहा पाच हजार रुपये द्यावे, रोजगाराचा मूलभूत हक्का कायदा करावा या मागण्या करण्यात आल्या. तसेच आउटसोर्सिंग, कंत्राटीकरण आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुनर्भरती बंद करा. तसेच राज्य व केंद्र सरकारने सर्व रिक्त सरकारी पदे त्वरित भरावीत अशी प्रमुख मागणी करण्यात आली. या आंदोलनात समन्वयक कॉ. श्रीकांत फोपसे, कॉ. उद्धव भवलकर, प्रा. उमाकांत राठोड, कॉ. सुनिता लोंढे, कॉ. भगवान भोजने, प्रा. पंडीत मुंढे, कॉ. सुनील राठोड, कॉ. रखमाजी कांबळे, कॉ. नितीन वाव्हळे, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. निशाद शेख, कॉ. मधुकर खिल्लारे, लोकेश कांबळे, वीरा राठोड, सुनील राठोड, अंकिता रंधे, प्राजक्ता शेटे, सत्यजित म्हस्के यांच्यासह शेकडो विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी सोडण्यास अधिकाऱ्यांची दिरंगाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्या जायकवाडी धरणात नगर-नाशिक जिल्ह्यातील पाणी सोडणे कायद्यानुसार बंधनकारक आहे, मात्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी केला आहे. पाणी सोडण्याबाबत अधिकारी मोघम विधाने करीत असल्याचे पुरंदरे यांनी म्हटले आहे.

जायकवाडी धरणात समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार सात अब्जघनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात येणार आहे. ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करण्याऐवजी अधिकारी संभ्रम निर्माण करीत आहेत. कधी व किती पाणी कसे सोडणार याबाबत ठोस माहिती देण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी टीका केली. पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी जायकवाडी प्रकल्पाच्या पाणी वापराचे अवकाळी फेरनियोजन करुन संभ्रम वाढवत आहेत असे पुरंदरे यांनी म्हटले आहे. नाशिक-नगरमधील राजकारण्यांना पाण्यावरुन राजकारण करण्याची तसेच न्यायालयात जाण्याची संधी मिळावी म्हणून किती पाणी सोडणार हे जाहीर करणे, पण पाणी कधी सोडणार याबाबत मोघम विधाने करीत आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे आदेश स्पष्ट असताना पाणी सोडण्याबाबत परत 'मजनिप्रा'ने मार्गदर्शन करावे अशी भूमिका घेत दिरंगाई करण्यासाठी 'मजनिप्रा' या अर्धन्यायिक व्यासपीठाचा गैरवापर करण्यात येत असल्याची टीका पुरंदरे यांनी केली आहे. याबाबत 'मजनिप्रा'चे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी यांना पत्र लिहून त्यांनी लक्ष वेधले आहे.

\Bकारवाई आवश्यक

\Bमजनिप्राच्या १९ सप्टेंबर २०१४ च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी अनावश्यक स्पष्टीकरणे मागत तब्बल पाच आठवडे वेळकाढूपणा करण्याचा प्रकार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पूर्वी केला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. 'मजनिप्रा'ने त्यावेळी अधिकाऱ्यांवर कारवाई केली असती, तर आदेशाच्या अंमलबजावणीत टाळाटाळ करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी परत केले नसते, असे पुरंदरे यांनी पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हमसफर’ला प्रवाशांची प्रतिक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड ते जम्मूतवी ही रेल्वे हमसफर रेल्वे मोठ्या दिमाखात अकोलामार्गे सुरू करण्यात आली आहे. नांदेडहून १९ आक्टोबरला जम्मू तवीकडे जाणाऱ्या या रेल्वेमध्ये तब्बल ७५ टक्के सीट रिकामे होते; तसेच आगामी काळात जाणाऱ्या या हमसफर रेल्वेचेही बुकिंग कमीच असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. औरंगाबादहून जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसला चार महिन्यांची वेटिंग आजही कायम असून, मुंबईकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेलाही दिवाळीत प्रवाशांना वेटिंगवर राहावे लागत आहे.

यंदाच्या दिवाळीत पुन्हा औरंगाबाद रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवाशांवर गैरसोयीत प्रवास करण्याची वेळ आलेली आहे. औरंगाबादमार्गे जाणाऱ्या संचखंड एक्स्प्रेसमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत प्रवाशांना वेटिंगवरील तिकीट घ्यावे लागत आहे. देवगिरी एक्स्प्रेस आणि नंदिग्राम एक्स्प्रेसमध्ये प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना ३० नोव्हेंबरपर्यंत वेटिंग करावी लागणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये तीन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर या काळात प्रवाशांना वेटिंगवर प्रवाशांना लागणार आहे. तपोवन आणि जनशताब्दी या दोन्ही रेल्वेमध्ये पुरेशा जागा सध्या उपलब्ध आहेत, मात्र मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना रात्री प्रवास केल्यानंतर दिवसा मुंबईत काम करता यावे. यासाठी रात्रीच्या रेल्वेने अनेक जण प्रवास करीत असतात. यामुळे देवगिरी आणि नंदीग्राम या रेल्वेमध्ये प्रवाशांकडून मागणी असते. यामुळे मुंबईकडे जाण्यासाठी दिवाळीच्या काळात विशेष रेल्वेची मागणी केली जात आहे.

नांदेड रेल्वे विभागाने हमसफर ही साप्ताहिक रेल्वे सुरू केली आहे. नांदेड ते जम्मूतवी रेल्वे ही रेल्वे वातानुकूलित आहे. या रेल्वेत प्रवास करण्यासाठी किमान दोन हजार २८५ रुपये, तर कमाल तीन हजार ३८२ रुपये मोजावे लागतात. १९ ऑक्टोबरला ही रेल्वे नांदेड येथून रवाना झाली. या रेल्वेत आरक्षण करून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची संख्या फक्त २५ टक्के होती. ही रेल्वे ७५ टक्के रिकामी धावली असून, या रेल्वेत ५९९ बर्थ अखेरपर्यंत रिकामेच राहिले. ही रेल्वे अकोलामार्गे सुरू आहे. औरंगाबाद रेल्वे मार्गावरील प्रतिसादाचा विचार करून या रेल्वेची एक फेरी औरंगाबादमार्गे, तर एक फेरी अकोलामार्गे केल्यास सचखंड एक्स्प्रेसवर पडणारा ताणही कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रवाशांना आणखी एक रेल्वे उपलब्ध होईल.

…………

\Bनांदेडऐवजी मनमाडच \B

औरंगाबाद रेल्वे मार्गावरील जालना, औरंगाबाद या भागातील नागरिक दिल्लीचा प्रवास करण्यासाठी नांदेडकडे न जाता, ते मनमाडकडे जात असतात. अनेक जण औरंगाबाद ते मनमाड असा नियमित रेल्वेचा प्रवास करून दिल्लीकडे जातात. नांदेडहून आता पाच रेल्वे अकोलामार्गे दिल्लीकडे जाण्यासाठी सुरू आहेत. औरंगाबाद किंवा जालन्याचे रेल्वे प्रवासी दिल्लीला जाण्यासाठी नांदेडकडे न जाता मनमाडकडे जात असल्याची माहिती औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दशकांची प्रतीक्षा संपली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अखेर दोन दशकानंतर रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजुचा साइड रस्ता मिळाला आहे. दीड महिन्यापूर्वी रेल्वे विभागाने उड्डाणपुलाच्या साइड रोडसाठी रेल्वे क्वॉर्टर्ससमोरील रस्ता महापालिकेकडे दिला असून, दीड महिन्यापासून या रस्त्याच्या विकासासाठी महापालिकेकडे वेळ नसल्याची माहिती समोर येत आहे.

रेल्वे स्टेशन चौकातून पैठणला जाण्यासाठी रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी १९९८मध्ये करण्यात आली होती. हा पूल तयार होत असताना रेल्वे विभागाकडून उड्डाणपुलासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे उड्डाणपुलासाठी एका बाजुचा (साइड) रस्ता तयार करून पुलाची निर्मिती करण्यात आली होती. राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या काळात या पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आले होते. पुलाची उभारणी केल्यानंतर एकात्मिक रस्ते विकास योजनेची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत शहरात उड्डाणपूल तयार करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता.

रेल्वे स्टेशनचा उड्डाणपुल तयार करताना जालान नगरकडे जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकच रस्ता तयार करण्यात आला होता. एका बाजुचाच रस्ता असल्याने या उड्डाणपुलाखाली गेल्याकाही वर्षांपासून वाहतूक कोडीं होत होती. दुसरा साइड रस्ता असावा, यासाठी महापालिकेने रेल्वे विभागाकडे रस्त्याच्या जागेसाठी पैसे भरले. रेल्वे विभागाने रेल्वे क्वॉर्टर्ससमोरील जागा रस्त्यासाठी दिली आहे. रेल्वेने क्वॉर्टर्स भिंती बांधून रस्त्यासाठी जागा मोकळी करून दिली आहे.

साइड रोडसाठी जागा दिल्यानंतर याबाबत अधिकृत पत्रही महापालिकेकडे पाठविण्यात आले आहे, मात्र अद्यापही रस्ता तयार करण्याबाबत महापालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही; तसेच महापालिकेनेही रेल्वे विभागाला जागा ताब्यात घेण्यात आल्याचे साधे पत्रही दिलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. दोन दशकानंतर उड्डाणपुलाला मिळालेल्या साइड रोड तयार करण्याची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

…………

\Bवाहतूक कोंडी सुटणार\B

रेल्वे स्टेशनच्या चौकातून जालाननगरकडे जाण्यासाठी अनेक वाहने रॉग साइडने जाण्याचा प्रयत्न करीत असतात. यामुळे रेल्वे स्टेशनच्या उड्डाणपुलासमोरच वाहतूक कोंडी होत असते. दुसऱ्या बाजुचा रस्ता सुरू झाल्यास निश्चितच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पासवर्ड लिहून ठेवणे पडले ४४ हजारांत

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एटीएम कार्डच्या कव्हरवर पासवर्ड लिहून ठेवणे कार्डधारकाला चांगलेच महागात पडले. चोरट्याने एटीएम कार्ड चोरून ४४ हजारांची रक्कम एटीएममधून लंपास केली. हा प्रकार भोईवाडा भागात घडला. या प्रकरणी आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

भोईवाडा भागातून चोरट्याने उघड्या घरात लटकवलेल्या पँटच्या खिशातून दोन पाकिटे लंपास केली होती. या पाकिटातील एटीएमचा वापर करून आरोपीने एटीएम सेंटरमधून रक्कम काढली होती. हा आरोपी मध्यवर्ती बसस्टँडसमोर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पेालिसांनी सापळा रचून संशयित आरोपी निलेश दशरथ कोड्यांल उर्फ अब्दुल समद (वय २३, रा. जालना, सध्या रा. शांग्रीला लॉज, बसस्टँड समोर) याला ताब्यात घेतले. निलेशची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत त्याने दोन पाकिटे लांबवल्याची कबुली दिली. या पाकिटामध्ये वेगवेगळ्या एटीएम कार्डमध्ये असलेल्या कव्हरमध्ये त्याचा पासवर्ड लिहिलेल्या चिठ्या होत्या. या पासवर्डचा वापर करीत आरोपीने एका एटीएममधून पाचशे रुपये व दुसऱ्या एटीएममधून पाच वेळा एकूण ४३ हजार पाचशे रुपये काढल्याची कबुली दिली. आरोपी निलेशला अटक करत क्रांतीचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय अजबसिंग जारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय पवार, जमादार मछिंद्र ससाणे, किरण गावंडे, विजय पिंपळे, गोविंद पचरंडे, दत्ता ढंगारे, भाऊसिंग चव्हाण, संदीप बिडकर, रवींद्र दाभाडे व रमेश सातपुते यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवनाथ महायज्ञास गडकरींची उपस्थिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिटमिटा येथील स्वामी मच्छिन्द्रनाथ मंदिरात आयोजित नवनाथ महायज्ञ व अतिरूद्र स्वाहाकार कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सहकुटुंब उपस्थिती लावली. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सद्गुरू प. पु. डॉ. मंगलनाथ महाराज विद्यमान अधिपती, श्री संस्थान चित्रकूट) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सोमवारी सकाळी दहा वाजता यज्ञस्थळी आगमन झाले. त्यांनी स्वाहाकार यज्ञ, स्वामी मच्छिन्द्रनाथ यांचे दर्शन घेऊन नाथांची गाथा व दासबोध ग्रंथाचे पूजन केले. त्यानंतर गडकरी व कुटुंबियांचा आयोजक रंभाजी पाटील धोंडरे, काकासाहेब पाटील धोंडरे, वेदांत रत्नपारखी, डॉ. पार्थ रत्नपारखी, प्राची रानपारखी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गडकरी यांच्यासोबत मुलगा, सून, जावई, व्याही हे होते. डॉ. मंगलनाथ महाराज यांनी यज्ञाची माहिती दिली. नीला पानसरे-गोखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, संजय सिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले हे मंचावर उपस्थित होते. राम भोगले, विजय वाघचौरे, बाळासाहेब गायकवाड, दीपक बनकर आदींची उपस्थिती होती.

\B२५ रोजी पुर्णाहुती \B

हा धार्मिक कार्यक्रम १६ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून २५ ऑक्टोबर रोजी पूर्णाहुतीने समारोप होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहून यज्ञ व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एन ६ स्मशानभूमीसमोर विजेच्या तारा तुटल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन ६ स्मशानभूमी समोरील वीज खांबावरील तारा सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक तुटून पडल्या. या तारा एका घरावर पडल्याची माहिती मिळाली आहे.

जकात नाका ते आझाद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्मशानभूमी आहे. या रस्त्यावरील वीजखांबावरील तारा अचानक तुटला. या तारा एक घर व एका रिक्षावर पडल्याची माहिती या भागातील नागरिकांनी दिली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी महावितरण व पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिडको पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. येथे रात्री उशिरापर्यंत वीज तारा दुरुस्तीचे काम करण्यात आले, अशी माहिती महावितरणमधून देण्यात आली. काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर एका मिनी ट्रकने वीज खांबाला धडक दिली होती. त्यावेळी विजेच्या तारा तुटल्या होत्या. त्यानंतर खांबांवर नवीन तारा ओढण्यात आल्या होत्या. परंतु, हे काम संपल्यानंतर ही घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ३१ हजार मजुरांना रोहयोवर काम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने अनेक मजुरांना शेतात काम उपलब्ध नाही. मात्र, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील ३१ हजारांपेक्षा जास्त मजुरांना काम देण्यात आले आहे. जिल्ह्यातील गंगापूर आणि पैठण तालुक्यात सर्वाधिक कामे सुरू आहेत. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात रोहयोची १४९९ कामे सुरू असून, त्यावर ३१ हजार ३०५ मजूर राबत आहेत.

जिल्ह्यातील टंचाईमुळे रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी मागणी वाढू लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभांच्या कामांवर अधिक भर दिला जात आहे. यात सिंचन विहीर, शेततळे, शौचालय बांधणे, जनावरांसाठी गोठा, फळबाग लागवड, वृक्षारोपण, तुती लागवड, गांडूळ खतनिर्मिती, रोपवाटिका आदी विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. रोहयोचा आराखडा तयार करताना ६५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे ही जल व मृदसंधारणाची व उर्वरित ३५ टक्के इतर कामे घेण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेतील सिंचन आणि बांधकाम विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी, लघुपाटबंधारे स्थानिक स्तर आणि रेशीम उद्योग विभाग या विभागांमार्फत सध्या रोहयोची कामे हाती घेतली जात आहेत.

\Bजिल्ह्याची स्थिती\B

तालुका.............. मजूर उपस्थिती

औरंगाबाद.................३०६४

गंगापूर.................... ७२९२

पैठण........................६०४८

फुलंब्री........................४७३२

कन्नड........................४६६४

वैजापूर.......................३६१४

सिल्लोड.......................३६९

सोयगाव........................९२८

खुलताबाद.......................५९४

------------------------------.

एकूण.............................३१३०५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून; पतीस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दगडाने ठेचून खून करणारा पती व आरोपी अशोक जाधव याला शुक्रवारपर्यंत (२६ ऑक्टोबर) पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

आरोपी अशोक जाधव याने चारित्र्याचा संशयावरुन कविता उर्फ सोनी अशोक जाधव (३३, रा. हर्सूल) हिचा शुक्रवारी रात्री डोक्यात दगड टाकून निर्घृण खून केला होता. घटनेनंतर अशोक हा फरार झाला होता व अशोकचे सासरे रावसाहेब खरात यांनी कविताचा खून हा अशोकने केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त केला होता. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला लासूर स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली होती. त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, खून करण्यामागचा काय हेतू होता, याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहनवाज यांनी कर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचा विनयभंग, जामीन फेटाळळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात घुसून शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी धम्मपाल रावसाहेब चौथमल (वय (२७, रा. एकतानगर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी सोमवारी (२२ ऑक्टोबर) फेटाळला.

याप्रकरणी पीडित १२ वर्षीय मुलीने हर्सूल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. १६ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी एकच्या सुमारास मुलगी घरासमोर भांडी घासत असताना चौथमलने विनयभंग केला. मुलीने आरडाओरड केल्यामुळे तो पळून गेला होता. या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामीन मंजूर केल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, तसेच गुन्ह्याचा तपास बाकी असल्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरपूर पॅटर्ननुसार पाणी जिरवणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिरपूर पॅटर्ननुसार महापालिकेच्या क्षेत्रात चार ठिकाणी पाणी आडवा आणि पाणी जिरवाचे काम येत्या काळात केले जाणार आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल २९ ऑक्टोबर रोजी सादर केला जाणार असून, त्याला मान्यता मिळाल्यावर सातारा परिसरात पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून पहिल्या प्रकल्पाचे काम सुरू केले जाईल.

औरंगाबादच्या पाणी पुरवठ्याची भिस्त सध्या फक्त जायकवाडी धरणावर आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे अन्य नैसर्गिक स्त्रोतही असले पाहिजेत असा विचार पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी केला आणि शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांच्याबरोबर चर्चा केली. पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याबरोबर देखील खानापूरकर, वैद्य आणि अन्य संबंधितांची बैठक झाली. त्यानंतर हर्सूल, सावंगी आणि सातारा येथील दोन साइटवर शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर पाणी आडवण्याचे व पाणी जिरवण्याचे काम करण्याचा निर्णय घेतल्याचे वैद्य यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले. औरंगाबादची लोकसंख्या सुमारे पंधरा लाख आहे. शहराला रोज २७१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्या तुलनेत सध्या १२० दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यातील गळती वाया जाता नव्वद ते शंभर दशलक्ष लिटर पाणीच मिळते. जायकवाडी औरंगाबाद शहरापेक्षा १०० मीटरहून जास्त उंच आहे. त्यामुळे पाणी उचलण्यासाठी दरवर्षी सुमारे ३५ कोटी खर्च येतो. शिरपूर पॅटर्नने काम केल्यास हा खर्च कमी होईल, शिवाय नैसर्गिक स्त्रोतानुसार पाणी मिळेल असे वैद्य म्हणाले. या कामासाठी प्रमोद खैरनार, डॉ. अशोक तेजनकर, संजय कापसे, प्रदीप पाटील सहकार्य करीत आहेत असा उल्लेख त्यांनी केला.

\Bपाणलोटाचे नाव एकूण पाणी साठा लागणारा खर्च

हर्सूल तलाव ३३.८५ दलघमी ३०२ कोटी

सावंगी तलाव १९.६२ दलघमी १६९ कोटी

सातारा परिसर १३.२ दलघमी १२५ कोटी

सातारा परिसर २१.०२ दलघमी ३१ कोटी

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्धव ठाकरे आज शहरात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी (२३ ऑक्टोबर) औरंगाबाद शहरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता शहानूरवाडी येथील श्रीहरी पॅव्हेलियन येथे गटप्रमुख, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा मेळावा होणार आहे. मेळाव्यास शिवसेनानेते खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख आमदार मनिषा कायंदे यांची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मेळाव्याचे निमंत्रक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयगाव तालुक्यात पाहणी

0
0

फर्दापूर: पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी सोयगाव तालुक्यात दुष्काळाची पाहणी केली. त्यांनी जंगला तांडा येथे सांडू चव्हाण आणि सोयगांव येथील सुधाकर सोहनी यांच्या शेतात कापूस, मका, ज्वारी, बाजरीची पाहणी केली. त्यानंतर बचत भवनमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, नगराध्यक्ष प्रतिभा बोडखे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे, गोपी जाधव, पंचायत समिती सभापती धरमसिंग चव्हाण, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबा काळे आदी उपस्थित होते. तहसीलदार प्रवीण पांडे यांनी तालुक्यातील पाणी टंचाई, पीक परिस्थिती, पावसाची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काच्या पाण्यासाठी ‘सीएम’ना भेटणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार उर्ध्व भागातील धरणात ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असल्यामुळे जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणी असणे अपेक्षित आहे. मराठवाड्याचे हक्काचे ११ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी बुधवारी (२४ ऑक्टोबर) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्याचा एकमुखी निर्णय सर्वपक्षीय आमदारांनी घेतला. नवीन तीन योजनांसाठी अर्थसंकल्पात २० हजार कोटी रुपये मंजूर करून घेऊ, असे आमदार प्रशांत बंब यांनी जाहीर केले.

नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात ११ टीएमसी पाणी सोडण्याच्या आग्रही मागणीसाठी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सोमवारी समन्यायी पाणी वाटप परिषद घेतली. तापडिया नाट्यमंदिरात आयोजित परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सु. भि. वराडे यांनी केले. यावेळी मंचावर अॅड. प्रदीप देशमुख, जलतज्ज्ञ या. रा. जाधव, शंकरराव नागरे, प्रा. एच. एम. देसरडा उपस्थित होते. या परिषदेला मराठवाड्यातील १६ आमदार उपस्थित होते. यात 'एमआयएम'चे इम्तियाज जलील, शिवसेनेचे संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, जयप्रकाश मुंदडा, राहुल पाटील, हेमंत पाटील, सुभाष साबणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, बाबाजानी दुर्राणी, काँग्रेसचे सुभाष झांबड, अब्दुल सत्तार, भाजपचे आमदार प्रशांत बंब, अतुल सावे, नारायण कुचे, लक्ष्मण पवार उपस्थित होते. शिवाय महापौर नंदकुमार घोडेले, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांनी परिषदेला हजेरी लावली. मराठवाड्यातील पाण्याच्या सद्यस्थितीवर आमदार बंब यांनी भाष्य केले. 'नगर-नाशिक जिल्हे आणि मराठवाड्याची पाणी वापराची गरज पाहून लवादाने वाटणी केली. जायकवाडी धरणातील पाणीसाठा निश्चित आहे. कायद्यानुसार सद्यस्थितीत जायकवाडीत ६५ टक्के पाणी आवश्यक आहे. उर्ध्व भागातील धरणात ७९ ते ८८ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या होण्यामागे सिंचनाचा अभाव हेच कारण आहे. ११ टीएमसी पाणी सोडल्यास धरणात सात टीएमसी पाणी पोहचेल. त्यामुळे ११ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करू' असे बंब म्हणाले.

मराठवाड्यासाठी असलेल्या भाम, भावली, मुकणे, वाकी धरणाच्या पाण्यावर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आरक्षण टाकले. शहापूर तालुक्यात अनेक धरणे भरलेली असताना दुष्काळी भागातील पाणी का पळवता, असा सवाल आमदार सतीश चव्हाण यांनी केला. मराठवाड्यातील आमदारांनी एकजुटीने राज्य सरकारवर दबाव निर्माण केल्याशिवाय पाणीप्रश्न सुटणार नाही, असा मुद्दा आमदारांनी मांडला. सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर हस्तक्षेप अर्ज

0
0

औरंगाबाद : पार्किंगच्या जागा रिकाम्या करा, अन्यथा हायकोर्टात हस्तक्षेप अर्ज दाखल करू असा इशारा शिवसेनेच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिला. पार्किंगच्या जागांबद्दल हायकोर्टाने १९९९ - २००० या वर्षी महापालिकेला आदेश दिले व पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्यास सांगितले, पण महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. असेच चालत राहिले तर आपण स्वत: या संदर्भात हायकोर्टात हस्तक्षेप अर्ज दाखल करू असा इशारा वाडकर यांनी दिला. त्यानंतर पार्किंगच्या जागांवर केलेल्या कारवाईचा अहवाल स्थायी समितीच्या पुढील बैठकीत सादर करा असे आदेश सभापती रेणुकादास वैद्य यांनी प्रशासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसूल झालेला कर वॉर्डातच खर्च करा

0
0

औरंगाबाद : वॉर्डातून वसूल झालेली मालमत्ता कराची रक्कम वॉर्डातील विकास कामांसाठी खर्च करण्याची परवानगी द्या, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक ऋषिकेश खैरे यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली. ते म्हणाले, वॉर्डातील विविध कामांचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, पण प्रत्यक्षात सहा महिन्यात दहा लाखांचे काम देखील झाले नाही. समर्थनगर वॉर्डातून मालमत्ता कराची वसुली शंभर टक्के आहे. सुमारे चाळीस टक्के नागरिक अॅडव्हान्स कर भरतात. या वॉर्डातून जमा होणारा कर विकास कामांसाठी वॉर्डातच वापरण्याची परवानगी द्या, असे खैरे म्हणाले. वॉर्डातील अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मोकाट कुत्र्यांचा विषय देखील त्यांनी मांडला, तेव्हा रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत कुत्रे पकडण्याचे काम करा, असे आदेश सभापती रेणुकादास वैद्य यांनी प्रशासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images