Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ब्राह्मण संघटनांतर्फे आज कोजागरी कार्यक्रम

$
0
0

औरंगाबाद : ब्रह्मवृंद मित्रमंडळ, ब्राह्मण महिला मंच आणि ब्राह्मण बिझनेस नेटवर्क यांच्यातर्फे कोजागरीनिमित्ताने गुरुवारी सायंकाळी हैदराबाद येथील सुप्रसिद्ध गायक रघुनाथ कामतकर यांच्या नाट्यसंगीत, भावगीत, भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित आला आहे. समर्थनगर परिसरातील वरद गणेश मंदिर सभागृहात सायंकाळी सहा ते साडेनऊ दरम्यान हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मध्यम दुष्काळामुळे कन्नडमध्ये रोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

शासनाच्या जाहीर केलेल्या तालुक्यांच्या यादीत कन्नड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ दाखवण्यात आल्यामुळे शिवेसनेने गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना देण्यात आले.

तालुक्यात भीषण दुष्काळ असून खारी खामगाव प्रकल्प, शिवना-टाकळी मध्यम प्रकल्प, औराळा, मुंगसापूर, चापानेर, देवळाणा, देवगांव (रंगारी), जेहुर, कळंकी, वडनेर हे साठवण तलाव शंभर टक्के कोरडे आहेत. गेल्या पाच वर्षांत हे प्रकल्प भरलेले नाही. चिंचोली (लिंबाजी), नाचनवेल या विभागातील पीक अत्यल्प पावसामुळे वाया गेले आहे. त्यानंतरही मध्यम स्वरुपाचा

दुष्काळ जाहीर करून अन्याय केला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी व नागरिकांना सवलती द्याव्यात, चारा छावण्या, मजुरांना काम, पाणीपुरवठा आदी सुविधा द्याव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. आण्णासाहेब शिंदे, शहराध्यक्ष सुनील पवार, तालुकाध्यक्ष केतन काजे, देवगाव रंगारी पंचायत समिती सदस्य गोकुळ गोरे, सन्मती ठोले, उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, लक्ष्मण केरे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे प्रमुख राज ठाकरे आज शहरात

$
0
0

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवारी शहरात येत आहेत. ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजता सिंदखेडराजा येथील दौरा आटोपून कारने ठाकरे शहरात दाखल होणार आहेत. चिकलठाणा विमानतळाजवळ त्यांचे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर विमानाने राज ठाकरे मुंबईला रवाना होणार आहेत. ठाकरे यांच्या स्वागताला मनसेच्या सर्व अंगिकृत संघटनांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर व जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण रोडवर अवजड वाहन बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण रोडवरील बाऱ्हाळे हॉस्पिटल टी पॉइंट ते नाथ व्हॅली स्कूलपर्यंतचा मार्ग अवजड वाहनांकरिता प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात आला आहे. हा बंदी आदेश २५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या काळात लागू राहणार आहे.

पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी हा आदेश जारी केला आहे. या रस्त्यावर सहा शाळा, लॉ विद्यापीठ तसेच इतर वाहतूक सुरू असते. तसेच अर्ध्या भागात रस्त्याचे सिमेंट क्राँकिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

\Bपर्यायी मार्ग\B

- बीडकडून येणारी अवजड वाहने नगर किंवा धुळ्याकडे जाण्यासाठी व येण्यासाठी बीड बायपास रोडचा वापर करतील.

- पैठणकडून येणारी अवजड वाहने धुळे किंवा नाशिककडे जाण्यासाठी व येण्यासाठी पैठण लिंक रोड व बीड बायपास रोडचा वापर करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांना कंपनीने सामाऊन घ्यावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा संकलन व वाहतूक करणाऱ्या कंपनीने साफसफाईच्या कामावरील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे, नवीन नोकर भरती करू नये, अशी मागणी कामगार शक्ती संघटनेने केली आहे.

कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी याबद्दल पत्रकार परिषदेत संघटनेची भूमिका स्पष्ट केली. कचरा संकलन व वाहतुकीसाठी पालिकेने नियुक्त केलेल्या कंपनीने उपकंत्राटदार नेमू नये. सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना पे-रोलवर घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. कचरा संकलन व वाहतुकीच्या कामाचे खासगीकरण पालिकेने केले असले तरी हा प्रयोग म्हणजे दुसरी 'रॅमकी' होईल, असा इशारा त्यांनी दिला. कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी केली.

\Bकंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनसची मागणी \B

महापालिकेत महाराणा एजन्सी, गॅलेक्सी एजन्सी व जय बजरंग एजन्सीच्या माध्यमातून १२०० ते १३०० कंत्राटी कर्मचारी पुरवले आहेत. या तिन्ही एजन्सीच्या कामाबद्दल खरात यांनी आरोप केले. पालिकेच्या कामगार विभागात शासनाकडून प्रतिनियुक्तीवर कायमस्वरुपी अधिकारी तत्काळ नियुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. कंत्राटी कर्मचारी व महिला बचत गटाच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार बोनस द्यावा, अशीही मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी यंत्रणा सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समुहातील जलाशयांमधील पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडण्याचा निर्णय झाला असून, कोणत्याही क्षणी पाणी जायकवाडीकडे झेपावेल. निर्णयाचे पालन होण्यासाठी व सोडलेला विसर्ग जायकवाडी धरणामध्ये नियंत्रितपणे येण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, यासाठी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे.

पाण्याचे संनियंत्रण तसेच नियोजनासंदर्भात लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक एस. पी. भर्गोदेव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन निर्देश देण्यात आले. कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी उर्ध्व भागातील धरणातून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून, जायकवाडीकडे पाणी कोणत्याही क्षणी झेपाऊ शकते. या अनुषंगाने भर्गोदेव यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या. पाणी सोडण्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ज्या धरणांमधून पाणी जायकवाडीकडे येणार आहे, त्या प्रत्येक धरणावर चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पथकाच्या माध्यमातून प्रत्येक तासाला पाण्याची पातळी, विसर्गाचे मोजमाप ठेवण्यात येणार असल्याची माहिती भर्गोदेव यांनी दिली.

नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक सरितामापन केंद्र, विअर, को. प. बंधारा, धरण इत्यादी ठिकाणचे दिवसातून चार वेळेस गेज व विसर्ग याची माहिती घेण्यात येणार आहे. पथकाने मुळा, प्रवरा, गोदावरी नदीवरील को. प. बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यापूर्वी असलेल्या पाण्याची पातळी, पाणीसाठा याची नोंद घेऊन प्रत्येक बंधाऱ्याचे फोटोग्राफही काढण्यात येणार आहेत. या बैठकीसाठी जायकवाडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

\B...असे सुटणार पाणी!

\Bजायकवाडी धरणामध्ये मुळा धरण समुहामधून १.९० टीएमसी, गंगापूर धरण समुहामधून ३.८५ टीएमसी, गंगापूर धरण समुहामधून ०.६० टीएमसी, गोदावरी दारणा धरण समुहामधून २.०४ टीएमसी, तर पालखेड धरण समुहामधून ०.६० टीएमसी पाणी सोडण्याबाबतचा निर्णय झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री घेणार पालिकेच्या कामांचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे महापालिकेच्या कामांचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक होण्याची शक्यता आहे. आढावा बैठकीनंतर ते त्याचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत.

समांतर पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांची कामे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, नव्याने बांधण्यात येणारे चार संशोधन केंद्र, तीन पुलांचे बांधकाम या विषयांवर पालकमंत्री डॉ. सावंत हे महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. येत्या काळात शहरात रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. ही कामे सुरू होण्यापूर्वी रस्त्यावर सध्या अस्तित्वात असलेले विजेचे खांब व डीपी हटविणे गरजेचे आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १५ कोटी रुपये देण्याची मागणी महापालिका पालकमंत्र्यांकडे करणार आहे. त्याशिवाय तीन पूल आणि चार संशोधन केंद्रांसाठी शासनाचा निधी मिळावा यासाठी पालकमंत्र्यांना विनंती केली जाणार आहे.

\Bसंपर्कनेत्यांची चर्चा \B

शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी पालिकेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेता विकास जैन यांच्याशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाची नोटीस देणाऱ्या पोलिसाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

न्यायालयाची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसाला वकिलासह काही जणांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी नौगाजी बाबा दर्गा परिसरात घडली. याप्रकरणी वकील व महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वैजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस संदीप बळीराम चव्हाण हे सोमवारी दुपारी तिहेरी तलाक प्रकरणातील फिर्यादी महिला शबाना जावेद पठाण (रा. चाळीसगाव) यांना प्रथम वर्ग न्यायालयाने बजावलेली नोटीस देण्यासाठी गेले होते. शबाना जावेद पठाण या वडिलांसह नौगजाबाबा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चव्हाण हे नोटीस तामील करण्यासाठी तेथे गेले. नोटीस घेऊन दुय्यम प्रतीवर सही द्या, असे शबाना व त्यांच्या वडिलांना सांगितले. त्यावर आमचे वकील इफ्तियार पठाण यांना बोलावून घेतो व ते आल्यानंतर आम्ही सही करू, असे त्यांनी सांगितले. थोड्या वेळाने इफ्तियार पठाण हे एका महिलेसह तेथे आले. मला विचारल्याशिवाय कुठल्याही कागदपत्रावर सही करू नका, असे म्हणत त्यांनी पोलिस कर्मचारी चव्हाण यांना मारहाण केली. त्यानंतर शबाना व तिच्या आई-वडिलांसह इतरांनी चव्हाण यांना मारहाण केली, अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यावरून सहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थांबा... क्ष-किरणे जीवघेणेही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुठलीही काळजी न घेता आणि नियमांचे काटेकोरपणे पालन न करता विविध प्रकारच्या क्ष-किरणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तसेच कमी किंवा अधिक प्रमाणात सामोरे जाणे हे नपुंसकतेपासून कर्करोगापर्यंत अनेक व्याधींना आमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे गरजेइतक्याच प्रमाणात व नियमांचे पालन करीत एक्स-रे, सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफीच्या चाचण्या करा आणि स्वतःचा बचाव करा, असे आवाहन घाटीच्या क्ष-किरण विभागातर्फे बुधवारपासून (२४ ऑक्टोबर) सुरू झालेल्या 'रेडिओइल्युमिनॅटी फेस्ट'अंतर्गत पोस्टर प्रदर्शनातून देण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) बाह्यरुग्ण विभागात सुरू झालेल्या पोस्टर प्रदर्शनातून सामान्यांना सजग करण्याचा प्रयत्न होत आहे. एक्स-रे, सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफीचा शोध, विस्ताराचा आढावा घेत विविध प्रकारच्या क्ष-किरणांपासून स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबाबतही महत्वपूर्ण सूचना पोस्टरद्वारे करण्यात आल्या आहेत. जिथे सिटीस्कॅन, एक्स-रे, एमआरआय होते त्या परिसरात थांबू नका व एमआरआयच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये लोखंडी वस्तू नेऊ नका. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष क्ष-किरणांशी संपर्क आल्यास त्वचेवर व्रण तयार होऊन कॅन्सर, हाडांच्या मज्जापेशी विकृत होऊन रक्ताचा कॅन्सर, त्वचेचे विकार, डोळ्यांचे विकार, स्त्री-पुरुषांत नपुंसकता, गर्भवतींच्या गर्भपेशी विकृत होऊन संततीत व्यंगता येऊ शकते, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. कुठल्या तपासणीत किती क्ष-किरणांचा मारा होतो, यावरही प्रकाश झोत टाकण्यात आला आहे.

\B'क्लिन-ग्रीन जीएमसी'ची संकल्पना

\Bस्वच्छ घाटी, सुंदर घाटी ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना असून, शुक्रवारी स्वच्छतेचा ड्राईव्ह घेण्यात येणार आहे. त्याचवेळी 'रेडिओलॉजी क्विझ' व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गुरुवारी होणार आहे. उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास झिने, डॉ. अजय वरे,

डॉ. प्रशांत तितरे, डॉ. अंजली पवार, डॉ. सौरभ जोशी आदींच्या उपस्थितीत महोत्सवाचे बुधवारी उद्घाटन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड बँक घोटाळ्यात आरोपपत्र दाखल करण्यात अपयशी

$
0
0

तपासावर औरंगाबाद खंडपीठाचे ताशेरे

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १४१ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाविरुद्ध (एस.आय.टी) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. औरंगाबादच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी २६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ते कोर्टात आले नाही तर त्यांच्याविरुद्ध योग्य तो आदेश दिला जाईल, असे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी आदेशात म्हटले आहे.

साडोळा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य हरिभाऊ भगवानराव सोळंके यांनी याचिका केली आहे. बीड शहर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात १३१ गुन्हे दाखल दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात एकाही आरोपीला अटक झाली नाही. या गुन्ह्यात अडकलेल्या बँकेच्या संचालकांची चौकशी पूर्ण झाली आहे. तरीही वसुलीसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. तपासी यंत्रणा काम करत नव्हती म्हणून एस.आय.टी.ची स्थापना करण्यात आली होती, पण त्यांनीही केलेला तपास असमाधानकारक असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. याचिकाकर्त्याची बाजू बी. आर. साबळे, के. एस. सदावर्ते यांनी तर शासनाची बाजू महेंद्र नेर्लीकर यांनी मांडली. बँकेतर्फे डी. जे.चौधरी, अन्य प्रतिवादीतर्फे आर. आर. मंत्री, नंदकुमार खंदारे, बी. बी. भिसे यांनी काम पाहिले.

तपास अधिकाऱ्यांनी न घाबरता, धाडस दाखविणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा कोर्टाने याआधी व्यक्त केली होती. या आर्थिक घोटाळ्याच्या तपासात प्रगती दिसत नाही, असे मत कोर्टाने व्यक्त केले. या सर्व गुन्ह्याचा तपास एस. आय. टी. देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. औरंगाबादच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी या घोटाळ्याच्या तपासावर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे, अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली होती. त्यांनाही नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा ठपका कोर्टाने ठेवला आहे. पोलिस महासंचालकांनी या प्रकरणाच्या तपासात लक्ष द्यावे, असे कोर्टाने आदेशात म्हटले आहे.

विविध गुन्ह्यात अडकलेले राजकीय नेते

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, आमदार भिमराव धोंडे, पंडित मुंडे, माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचे बंधू धैर्यशील सोळंके, बीडच्या खासदार रजनी पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, रमेश आडसकर, रमेश पोकळे, राजाभाऊ मुंडे, मंगला मोरे, सुभाष सारडा, मंगला मुंडे, साहेबराव दरेकर, लता सानप, दिनकर कदम, रामराव आघाव, रामकृष्ण बांगर, मधुकर ढाकणे, अशोक पालवे, जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे, दिलीप हंबर्डे, विजयकुमार गंडले, विलास सोनवणे, अॅड.अनिल सोळंके, किरण इंगळे, जालिंदर पिसाळ, मंगल मुंडे आणि प्रियंका पाटील, माजी एम. डी. अरुण कुलकर्णी, बाबासाहेब देशमुख.

एकूण गुन्हे : १३१

अपहाराची रक्कम : १ अब्ज ४१ कोटी ९७ लाख ३० हजार ५५२ रुपये

आरोपीची संख्या : २०५

अटक आरोपींची संख्या : १८६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाका परवाना एसडीएम कार्यालयात

$
0
0

औरंगाबाद,

दिवाळी उत्सवासाठी तात्पुरता फटाका परवाना देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने उपविभागीय अधिकारी कार्यालयास अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार तात्पुरता फटाका परवाना पाहिजे, असेल अशा अर्जदारांनी सदर परवानासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी औरंगाबाद कार्यालयास अर्ज सादर करावा. तसेच तात्पुरता फटाका परवाना हा या कार्यालयातूनच देण्यात येईल, असे औरंगाबाद उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बचत गटांचे पालिकेसमोर उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारिद्र्य रेषेखालील १५ महिला बचत गटांचे काम 'जैसे थे' ठेवण्याची मागणी दारिद्र्य रेषेखालील सर्व महिला बचत गटांच्या संघर्ष कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी बचत गटाच्या सदस्यांनी महापालितकेसमोर बेमुदच उपोषण सुरू केले आहे.

या मागण्यांच्या संदर्भात आयुक्तांच्या नावे दिलेल्या निवेदनात बचत गटाच्या सदस्यांनी म्हटले आहे की, १५ महिला बचतगटांचे काम २००९ पासून बचतगट चार टक्के मानधनावर करीत आहेत. बचत गटांचे काम काढून घेण्याचा घाट पालिकेचे प्रशासन घालत आहे. बचत गटांचे काम काढून घेऊ नये अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. सिडको-हडको, सातारा परिसरातील काम व अतिरिक्त मजुराचे काम महिला बचत गटाकडे कायम ठेवावे, महापालिका मजुरांचे पगार तीन ते चार महिने उशिरा देते, त्यामुळे पीएफ आणि इएसआयसीचे दंड-व्याज पालिकेने भरावे, मानधन चार टक्क्यांवरून दहा टक्के करावे, ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंतचा तीन महिन्यांचा पगार दिवाळीपूर्वी द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर जयश्री रगडे, विमल शेजवळ, भारती हिवराळे, लता बनकर, सुशीला वाघ, लिलाबाई गंगावणे, आशाबाई जाधव आदींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइनच्या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन हालले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हायकोर्टाच्या दट्ट्यानंतर महापालिकेत महापौरांसह प्रशासन हालले आहे. रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे जाऊ नये यासाठी या सर्वांमध्ये धडपड सुरू झाली असून, आयुक्तांनी 'ओके' केलेल्या ४८ कोटींच्या रस्त्यांची निविदा तत्काळ स्थायी समितीच्या समोर सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

शासनाकडून मिळालेल्या शंभर कोटी रुपयांच्या विशेष अनुदानातून शहरात ३१ रस्त्यांची कामे केली जाणार आहे. या रस्त्यांचे वर्गीकरण महापालिकेने पॅकेज १, पॅकेज २, पॅकेज ३ आणि पॅकेज ४ असे चार टप्प्यात केले आहे. त्यापैकी पॅकेज १ आणि पॅकज ३ मधील रस्त्यांच्या निविदांना आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी हिरवा कंदील दाखवला. पॅकेज २ आणि पॅकेज ४ मधील रस्त्यांच्या निविदा ज्या कंत्राटदारांच्या स्वीकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्या कंत्राटदारांवर काळ्या यादीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आयुक्तांनी 'जीएनआय' आणि 'मस्कट कन्स्ट्रक्शन' या कंत्राटदारांकडून खुलासा मागवला आहे. त्यांनी तो पालिका प्रशासनाकडे सुपूर्दही केला आहे. हा खुलासा ग्राह्य धरून चारही पॅकेजच्या एकत्रित निविदा स्थायी समितीसमोर आणण्याचा घाट पालिकेत घातला जाता होता. मात्र, दरम्यानच्या काळात बुधवारी हायकोर्टाने रस्त्यांच्या कामांबद्दल दोन नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा ही कामे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्याबाबत विचार केला जाईल, असा इशारा दिला. त्यानंतर सायंकाळी महापौरांसह पालिकेचे प्रशासन हालले. रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे जाऊ नये यासाठी आयुक्तांनी ज्या दोन पॅकेजला हिरवा कंदील दाखवला आहे, त्या पॅकेजच्या निविदा तात्काळ स्थायी समितीसमोर ठेवण्याचे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. सूर्यास्त होईपर्यंत या निविदा स्थायी समितीकडे पाठवा, असे ते म्हणाले. ज्या दोन कंत्राटदारांचे काळ्या यादीबद्दल खुलासे प्राप्त झाले आहेत, ते खुलासे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासमोर सादर करण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे दोन नोव्हेंबरपूर्वी ४८ कोटी रुपये किमतीच्या १८ रस्त्यांची कामे स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी महिलांचा टाहो

$
0
0

वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी येथील छत्रपतीनगरात पाणीटंचाई असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर बुधवारी सकाळी मोर्चा काढला. संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावून ठिय्या आंदोलन केले.

येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा अर्ज केले होते, काही दिवसांपूर्वी महिलांनी आंदोलनही केले. मात्र त्याकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात कोणीही जबाबदार पदाधिकारी नसल्याने महिलानी कार्यालयाला टाळे लावले. पाणी मिळत नाही तो पर्यंत येथून जाणार नाही, अशी भूमिका घेत रस्ता अडवून ठिय्या आंदोलन केले़ छत्रपतीनगरात जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने योग्य प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. येथील नागरिकांना पाणी खरेदी करावे लागत आहे. ते पाणीसुद्धा अशुद्ध मिळत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे़ यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश साळे यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर महिलानी आंदोलन मागे घेतले. तसेच एक नोव्हेंबरपर्यंत पाणी मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळी सुनीता जाधव, मनीषा राजपूत, सुनीता मगर, पुष्पा तोडकर, राधा मिरगे, सुनीता पवार, अपेक्षा पाटील, जयश्री घुले, योगिता गोडबोले, पुष्पा राठोड, अश्विन जाधव, माधुरी सपाटे, सुनंदा खंदारे, अलका खताळ, श्रद्धा आडे, राधा आहेरे, कांता म्हस्के, नर्मदा सांळुके आदी महिलांची उपस्थिती होती़

अंतर्गत जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदारासोबत पत्रव्यवहार करूनही काम करत नाही. येथील पाणी प्रश्न महत्त्वाचा असून दोन दिवसांत कंत्राटदाराने काम सुरू केले नाही, तर नोव्हेंबरमध्ये ग्रामपंचायत जलवाहिनीचे काम करेल.

-उषा एकनाथ साळे,सरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता निरीक्षक लाच घेताना अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कन्नड नगर पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला २३ हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई बुधवारी दुपारी कन्नड नगर पालिकेच्या कार्यालयात करण्यात आली. नंदकिशोर बापुराव चव्हाण (वय ४२ रा. सिल्लोड), असे स्वच्छता निरीक्षकाचे नाव असून कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घंटा गाडीवर कामगार पुरवणाऱ्या कंत्राटदाराने तक्रार दाखल केली होती. या कंत्राटदाराचे कामगारांचे चार महिन्याचे वेतन थकलेले होते. हे वेतन देयक मंजुरीसाठी स्वच्छता निरीक्षक चव्हाण यांच्याकडे आले होते. हे देयक मंजुरीसाठी मुख्याधिकाऱ्याकडे सादर केले होते. हे देयक मंजुरीसाठी स्वच्छता निरीक्षकाने बिलाच्या पाच टक्के रक्कम लाच म्हणून मागितली हेाती. एकूण ७३ हजारापैकी पहिला हप्ता २३ हजार रुपये बुधवारी घेतला होता. हा हप्ता स्वीकारताना पथकाने चव्हाणला अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन गवळी, रवींद्र देशमुख, गोपाल बरंडवाल, रवींद्र अंबेकर, संतोष जोशी व संदीप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंचनासाठी पाणी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परभणी जिल्ह्याचे सिंचनासाठीचे ४२० दलघमी पाणी कपात करण्याचा निर्णय तत्काळ रद्द करा, समन्यायी पाणी वाटपाच्या तत्वानुसार उर्ध्व धरणातून १२ टीएमसी पाणी सोडा यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, परभणी जिल्हा कमेटी सदस्य तसेच शेतकऱ्यांनी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयात निवेदन दिले.

२०१४पासून परभणी जिल्हा दुष्काळात होरपळून निघाला आहे. १२ सप्टेंबर २०१८ रोजी पाणीवाटपाचे फेर नियोजन करून दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचे सिंचनाचे पाणी कपात करण्याच्या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील १६५ गावांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. या सर्व गावातील नागरिकांनी १२ सप्टेंबरचे पाणीवाटपाचे फेरनियोजन रद्द करण्याचे ग्रामसभा ठराव घेतले असून, ते निवेदनासोबत जोडण्यात आले. यावेळी परभणी जिल्ह्यातील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या पीकांसाठी चार पाणी पाळ्या व उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने सोडण्याचीही मागणी करण्यात आली. मराठवाड्यातील तसेच नगर व नाशिक लाभ क्षेत्रातील कालवे दुरुस्त करा, पाण्याचे काटेकोर नियोजन करा, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत. निवेदनावर विलास बाबर, लिंबाजी कचरे, लक्ष्मन साक्रुडकर, दीपक लिपने, रामकिशन खवळे, अनंतराव कच्छवे, अंकुश तवर, राजेभाऊ सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कडा’त घोटाळ‍ा, लिपिकाची शिक्षा कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कडा'तील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रामध्ये ८४,१०० रुपयांचा अपहार करून राज्य सरकारची फसवणूक करणारा लिपिक सूर्यकांत काशिनाथ यन्नावार याला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व अपहार केलेल्या रकमेचा भरणा करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी १९ सप्टेंबर २०११ रोजी दिले होते. त्याविरुद्ध जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. दिग्रसकर यांनी अपिल फेटाळत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांची शिक्षा कायम केली.

याप्रकरणी कडा कार्यालयातील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रकाश अनंतराव देशपांडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, आरोपी लिपिक सूर्यकांत काशिनाथ यन्नावार याच्याकडे कॅश बुक लिहिणे व रकमेचा बँकेत भरणा करण्याची जबाबदारी होती. दोन फेब्रुवारी १९९६ ते १५ जून १९९८ दरम्यान आरोपीने कॅश बुकमध्ये खोट्या नोंदी करून त्या खऱ्या असल्याचे भासवत बँकेत रक्कम भरल्याचे दाखवले. मात्र त्याने प्रत्यक्षात रक्कम भरली नाही व ८४,१०० रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा भादंवि ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ कलमान्वये जवाहरनगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाला होता. खटल्यावेळी, मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीला १६ सप्टेंबर २०११ रोजी भादंवि ४०९ कलमान्वये दोन वर्षांची, तर भादंवि ४७७ (अ) कलमान्वये दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. तसेच अपहार केलेली ८४,१०० रुपयांची रक्कम भरणा करण्याचे आदेशही दिले होते.

\Bवयाचा विचार करूनच शिक्षा कमी

\Bखालच्या कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेविरुद्ध आरोपीने जिल्हा कोर्टात अपील केले होते. यात अपहाराची रक्कम आरोपीच्या पेन्शनमधून वळती करण्यात आली आहे व आरोपीचे वय ७० असल्यामुळे गुन्ह्यातून मुक्त करावे, अशी विनंती बचावात केली. त्याला विरोध करीत, आरोपीच्या वयाचा विचार करूनच मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनावलेली शिक्षा कमी आहे आणि जी शिक्षा सुनावण्यात आली आहे ती कमी करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी केली. कोर्टाने आरोपीचे अपील फेटा‍ळत खालच्या कोर्टाने ठोठावलेली शिक्षा कायम केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वल्लभभाईंच्या पुतळ्याचे ३१ रोजी पूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन त्यांच्या जन्मदिनी ३१ ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. शहागंज येथील चमनमध्ये वल्लभभाई पटेलूयांचा अर्धाकृती पुतळा आहे. हा पुतळा पुर्णाकृती करण्यात यावा, अशी मागणी होती. त्यानुसार २०१२ या वर्षापासून पुतळा पुर्णाकृती करण्याचे काम सुरू करण्यात आले. शिल्पकार मडिलगेकर यांना महापालिकेने पुतळा तयार करण्याचे काम दिले आहे. पुतळा तयार झाला असून तो चमन मधील नियोजित जागेवर बसवण्याचे काम देखील केले जाणार आहे. पुतळ्याचे वजन पेलणारा चौथरा तयार करावा लागणार आहे. ते काम येत्या काही दिवसात पूर्ण झाल्यानंतर पुतळा बसविण्यात येणार आहे. दरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी मडिलगेकर यांच्या कारखान्यातील वल्लभभाई पटेल यांचा पुर्णाकृती पुतळा चमनमध्ये आणून त्याचे पूजन करण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात चमनच्या परिसराचे सुशोभीकरण करून वृक्षारोपण केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीपूर्वी लागणार साताऱ्यात पथदिवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा भागात दिवाळीपूर्वी किमान दीडशे पथदिवे सुरू केले जाणार आहेत. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे. सातारा, देवळाई भागात एक हजार पथदिवे लावण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यापैकी पाचशे पथदिवे सातारा, तर पाचशे देवळाई वॉर्डात लावण्यात येणार आहेत. पथदिवे लावण्यासाठी विजेच्या खांबावर विशिष्ट प्रकारची तार ओढावी लागते. ती ओढण्यासाठी पालिकेने महावितरणकडे पैसे जमा केले आहेत. महावितरणने आतापर्यंत दीडशे खांबांवर तार ओढली असल्याने त्या खांबांवर पथदिवे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी दीडशे पथदिवे सुरू केले जातील, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. उर्वरित पथदिवे तार ओढण्याचे काम केल्यानंतर टप्प्या टप्प्याने लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन एमएलडी पाणी वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शटडाउननंतर शहरात येणाऱ्या पाण्यात दोन 'एमएलडी'ने वाढ होईल, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

जायकवाडी येथील पंपहाउसजवळील वीज पुरवठ्याच्या उपकेंद्रात दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यासाठी महावितरण व महापारेषण या कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच असा सात तासांचा शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. यामुळे औरंगाबादला पाणीपुरवठा करणाऱ्या ५६ एमएलडी आणि शंभर एमएलडी क्षमतेच्या दोन्हीही जलवाहिन्या बंद राहणार आहेत. शहराचा पाणीपुरवठा खंडीत केला जाणार आहे. याच काळात जायकवाडी येथील पंपहाउस जवळ लावलेले ट्रान्सफार्मर सुरू करणे, मुख्य जलवाहिनीवरील तीन मोठ्या गळत्या बंद करणे, जायकवाडी व फारोळा येथील पंपांची दुरुस्ती करणे, ढोरकीन येथे एअर व्हॉल्व्ह बदलणे अशी कामेही केली जाणार आहेत. या सर्व कामांचा आढावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी घेतला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक, धांडे उपस्थित होते. शटडाउननंतर शहरात येणाऱ्या पाण्यात दोन एमएलडीने वाढ होईल, असे कोल्हे यांनी सांगितले. शटडाउनच्या काळात नागरिकांना पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपयायोजना करण्याचे आदेश महापौरांनी दिले. सर्व टँकर, जलकुंभ पाण्याने भरून ठेवा असे महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images