Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून रोजगार निर्मितीकडे लक्ष द्या

$
0
0

शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांचे आवाहन

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून रोजगार निर्मितीकडे लक्ष द्या, दुष्काळ निर्मूलनाच्या कामातही हातभार लावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळातर्फे बिझनेस एक्स्पोच्या अंतर्गत 'महा एक्स्पो' या व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गुरुवारी झाले, तेव्हा त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. पशुसंवर्धन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, माजी अध्यक्ष रंगनाथ काळे, प्रदीप सोळुंके, अंबादास दानवे, व्दारकादास पाथ्रीकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिन मुळे यांची यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

'व्यवसाय हा महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रातील जनता व्यवसायात जास्त नाही. बीव्हीजी कंपनीचे उदाहरण देताना त्यांनी या कंपनीने महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीत फडकवला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे सुप्रिया यांनी सांगितले. मनावर घेतले तर मराठी माणूस चांगला व्यवसाय करू शकतो, असा उल्लेख त्यांनी केला. मराठी माणसाचे पाऊल बाकी ठिकाणी पुढे असते, व्यवसायात देखील ते पुढेच पडले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जीएसटीमध्ये केल्या जाणाऱ्या सततच्या बदलाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बदलांमुळे व्यावसायिकांना त्रास होत आहे, असे सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा संदर्भ त्यांनी भाषणात दिला. राजस्थानच्या मुख्यमंत्री राजस्थानीच साडी नेसतात, हा त्यांचा मार्केटिंगचा मुद्दा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या राज्यात टेक्सटाईल इंडस्ट्रीचा विकास झाला पाहिजे, अशी सूचना सुळे यांनी अर्जुन खोतकर यांना केली. निवडणुकीत टोकाचा विरोध करा, पण त्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करा, असे त्या म्हणाल्या. अर्जुन खोतकर, राजेश टोपे यांची यावेळी भाषणे झाली. हरिभाऊ बागडे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. गणेश शिंदे यांनी केले. पुष्पा काळे, राम पवार, प्रदीप सोळुंके यांचीही यावेळी भाषणे झाली. 'महा एक्स्पो' या प्रदर्शनात १४० स्टॉल्स आहेत आणि हे प्रदर्शन शहानुरवाडी येथील श्रीहरी पॅव्हेलियनच्या परिसरात २८ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पथकाच्या भितीने आरटीओत सामसूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीओ कार्यालयांमध्ये रिजेक्टेड वाहनांची परस्पर विक्री करण्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणानंतर बीड उपप्रादेशिक कार्यालयातून बुधवारी (२४ ऑक्टोबर) आठ एजंटांना अटक करण्यात आली. हे पथक गुरुवारी (२५ ऑक्टोबर) औरंगाबादला येणार असल्याने आरटीओ कार्यालयात शुकशुकाट जाणवला.

एका वाहन कंपनीची रिजेक्‍ट केलेली काही वाहने परस्पर विकून त्याची नोंदणी केल्याची प्रकरणे राज्यात समोर आली होती. त्याचा दक्षता पथकाकडून तपास केला जात आहे. परिवहन आयुक्तांच्या आदेशावरून दक्षता पथकाचे उपाधीक्षक प्रशांत कोलवडकर हे दोन दिवसांपासून मराठवाड्यात तळ ठोकून आहेत. त्यांनी बीड येथे बुधवारी आठ दलालांना अटक केली. हे पथक गुरुवारी औरंगाबादेत येणार असल्याची चर्चा असल्याने दिवसभर आरटीओ कार्यालयातील गर्दी ओसरली. अपॉइटमेंट घेऊन लर्निंग लायसन्स आणि पक्के लायसन्स तयार करण्यासाठी आलेले उमेदवार वगळता इतरांची गर्दी कमी होती. हे पथक शुक्रवारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

……………चोरीच्या ट्रकविक्री प्रकरणात धुळ्यातून एकाला अटक झाली होती. त्या प्रकरणाच्या तपासात स्क्रॅप वाहनांचे क्रमांक वापरून नोंदणी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रिजेक्ट वाहनांसोबत स्क्रॅप वाहनांचाही तपास होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी सोडण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

$
0
0

(मेनलीड पॅकेजमधील चौकट)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याचे हक्काचे पाणी सोडण्यास टाळाटाळ करणाऱ्या नगर-नाशिक येथील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - डेमोक्रेटीक गटाचे प्रदेश अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सदर अधिकारी हे लोकप्रतिनिधींना न्यायालयात जाण्यासाठी वेळ देत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. या प्रकरणी नाशिक येथील मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता राजेश मोरे आणि अहमदनगरच्या अधिकारी अलका आहेरराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कडा’चे पथक रवाना

$
0
0

(मेनलीड पॅकेजमधील बातमी)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. भंडारदरा धरणातून पाणी सोडले असून पाणी सोडण्यात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील धरणांची पाहणी करण्यासाठी 'कडा' कार्यालयाचे पथक रवाना झाले आहे.

नगर-नाशिक विरूद्ध मराठवाडा पाणीसंघर्ष कायम आहे. जायकवाडी धरणात ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून नगर-नाशिक जिल्ह्यातील धरण समूहात ७९ ते ८८ टक्के पाणीसाठा आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाची तूट निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणातून शुक्रवारी पाणी सोडण्याची शक्यता आहे. पाणी सोडण्यात येणाऱ्या धरणांची स्थिती पाहण्यासाठी कडा कार्यलयाने चार पथके पाठवली आहेत. ही पथके गुरुवारी सायंकाळी रवाना झाली, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. गोदापात्रात पाणी येणार असल्यामुळे 'कडा'ने पूर्ण क्षमतेने कक्ष कार्यान्वित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागावाटपाच्या चर्चेत मी नसतो: शरद पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. काही जागांच्या आदलाबदलीबद्दलही चर्चा केली जात आहे. याबद्दल पत्रकारांनी पवार यांना विचारले असता ते म्हणाले, 'जागा वाटपाच्या चर्चेत मी नसतो. प्रदेशाध्यक्ष व काही नेत्यांवर बोलणीची जबाबदारी सोपवली आहे. ४८ जागांपैकी ५० टक्के जागांसाठी आमचा आग्रह आहे. ४०-४२ जागांबद्दल मतभेद नाहीत. दोन - चार जागांबद्दल मतभेद शिल्लक राहिले तर काँग्रेसचे अध्यक्ष व मी त्याबद्दल काय ते बघून घेऊ.'

लोकसभेच्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाहीत, पण त्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असाव्यात असे लोकांचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने पुणे मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू आहे. औरंगाबादची जागा काही वर्षांपासून काँग्रेसकडे आहे, पण काँग्रेसला यश आले नाही. या जागेतही बदल करण्याचे नियोजन आहे. औरंगाबादच्या बदल्यात दुसरी जागा काँग्रेसला देऊ. बदल झाल्यावर लाभ होण्याची शक्यता आहे, असे पवार म्हणाले. काही वर्षांपूर्वी साहेबराव पाटील डोणगावकर यांना लोकसभेवर निवडून आणले होते. आताही आमच्याकडे उमेदवार आहेत. सतीश चव्हाण देखील आहेत, असा उल्लेख पवार यांनी केला.

पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी

सीबीआयमध्ये सध्या सुरू असलेल्या वादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. सीबीआय ही यंत्रणा पंतप्रधानांच्या आखत्यारित येते. अर्थमंत्र्यांच्या आखत्यारित येत नाही. शिवाय ज्या दोन अधिकाऱ्यांबद्दल वाद सुरू आहे त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील पंतप्रधानांनी केली आहे. निवड तुम्ही केलीत, उत्तर तुम्हीच द्या, असे पवार मोदी यांना उद्देशून म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धाक दाखवून चोरली दुचाकी; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंपनीतून घरी जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून चाकुचा धाक दाखवत दुचाकी लांबविणाऱ्या तिघा आरोपींपैकी आरोपी कुंदन भारत गायकवाड याला बुधवारी (२४ ऑक्टोबर) अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (२६ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांनी दिले.

या प्रकरणी योगेश श्रीकृष्णराव कुलकर्णी (वय २८, रा. वसंतराव नाईक बालकाश्रमजवळ) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २९ सप्टेंबर रोजी फिर्यादी वडगाव कोल्हाटी येथून रात्री साडेनऊच्या सुमारास घरी परतत असताना आरोपी कुंदन भारत गायकवाड (वय २५, रा. स्वराज्यनगर, मुकुंदवाडी) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीची दुचाकी अडवली व चाकुचा धाक दाखवून दुचाकी लांबविली. फिर्यादीच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी कुंदन याला अटक करून कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक सरकारी वकील एस. एल. दास (जोशी) यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर वसुलीसाठी महापौर उतरणार रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिका आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी करून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढवण्यासाठी दिवाळीनंतर आपण स्वत: रस्त्यावर उतरणार आहोत,' अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

महापौर म्हणाले, 'मालमत्ता कर, पाणीपट्टीसाठी अभय योजना राबवली. अनधिकृत मालमत्ता अधिकृत करण्यासाठी दंड माफ केला, परंतु नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. नागरिक आणि महापालिका यांच्यात दुरावा आहे असे यातून लक्षात येते. हा दुरावा कमी व्हावा व कर वसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी नागरिकांना विनंती करण्यासाठी आपण दिवाळीच्या नंतर रस्त्यावर उतरणार आहोत. अधिकारी - पदाधिकारी मिळून एकत्रितपणे कर वसुलीचे काम करू. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून पदाधिकारी, नगरसेवकांनी विविध पर्याय सुचविले. मात्र, प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी देखील विविध प्रयोग केले, पण त्यालाही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्चाचे प्रमाण जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून १७० कोटींची बिले लेखा विभागाकडे प्रलंबित आहेत.'

\Bपदाधिकारी सोबत घेणार

\Bमहापालिकेला बिकट आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महापौरांनी कंबर कसली असून, 'दिवाळीनंतर आपण स्वत: कर वसुलीसाठी अधिकाऱ्यांबरोबर रस्त्यावर उतरणार आहोत,' असे सांगितले. 'पदाधिकारी देखील यावेळी सोबत असतील. प्रभावीपणे कर वसुली केली जाईल,' असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेडिओलॉजी क्विझ’च्या विजेत्यांना बक्षीसे प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) क्ष-किरण विभागाच्या वतीने बुधवारपासून सुरू झालेल्या 'रेडिओइल्युमिनॅटी फेस्ट'अंतर्गत गुरुवारी (२५ ऑक्टोबर) रेडिओलॉजी विषयाशी संबंधित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. १६ टीमच्या प्राथमिक फेरीतून सहा टीमची निवड झाली. त्यातील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या विजेत्या टीमला पोलिस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या हस्ते गुरुवारी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या वेळी प्रेक्षकांमधूनही काही पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी, डॉ. परोपकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, डॉ. जैन, डॉ. प्रभा खैरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे पदवी, पदव्युत्तर तसेच आंतरवासिता विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्राह्मी सर्व लिपींची जननी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भारतात विविध बोलीभाषा व लिपी आढळतात. ब्राह्मी लिपीचे सर्वात महत्त्वाचे स्थान असून ती भारतातील सर्व लिपींची जननी आहे,' असे प्रतिपादन डॉ. धम्मपाल माशाळकर यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभाग व स्कूल ऑफ लिबरल आर्टसच्या वतीने ब्राह्मी व खरोष्टी लिपीची कार्यशाळा घेण्यात आली. या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन कादंबरीकार प्रदीप म्हैसेकर यांनी केले. यावेळी मंचावर इतिहास विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड यांची उपस्थिती होती. ब्राह्मी लिपीच्या इतिहासावर माशाळकर यांनी भाष्य केले. 'सम्राट अशोकाने आपल्या राजाज्ञा या लिपीच्या शिलालेखाद्वारे केल्या आहेत. लिपीचा समग्र अभ्यास होणे आवश्यक आहे,' असे माशाळकर म्हणाले. या कार्यशाळेत ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ब्राह्मी लिपीचे धडे गिरवले. संजय पाईकराव यांनी प्रास्ताविक केले आणि सुनीता सावरकर यांनी आभार मानले. यावेळी सुधीर बलखंडे, डॉ. अमोल कुलकर्णी, कुमार भवर, सोनाली म्हस्के, रवी खिल्लारे, बळीराम पाईकराव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिडीआर घोटाळ्यात माजी नगरसेवक सिकंदर साजेद यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महानगर पालिकेमध्ये टिडीआर स्वरुपात मोबदला घेतला असताना देखील पुन्हा मोबदला घेणाऱ्या माजी नगरसेवक अब्दुल सिकंदर अब्दुज साजीद (रा. रऊफ पॅलेस, चेलिपुरा) यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मनपाने सिकंदर साजेद यांच्या विरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत.

मनपाचे शाखा अभियंता प्रभाकर पाठक यांनी या प्रकरणी ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सिकंदर साजेद यांनी तीन प्रकरणात टिडीआर मोबदला घेतला असताना देखील बनावट प्रस्ताव सादर करीत टिडीआर प्रमाणपत्र मिळवत मनपाची फसवणूक केली होती. सराफा रोड येथील टिडीआर प्रमाणपत्र त्यांनी आदित्य कन्स्ट्रक्शनला १८ लाख ९० हजारात विक्री केले होते. तसेच चेलीपुरा आणि मंजूरपुरा भागातील जागेबाबतही त्यांनी बनावट प्रस्ताव सादर करीत मनपाची दिशाभूल करीत फसवणूक केली होती. सिटीचौक पोलिस ठाण्यात हे तीन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणी शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिकंदर साजेद यांना चेलिपुरा भागात अटक केली.

'मटा' ने उघडकीस आणला होता टिडीआर घोटाळा

माजी नगरसेवक सिकंदर साजेद यांना टिडीआरच्या ज्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली तो टिडीआर घोटाळा महाराष्ट्र टाइम्सने उघडकीस आणला होता. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या आदेशाने या प्रकरणात पोलिसात तक्रार देण्यात आली होती.

मंजूरपुरा, सराफा आणि चेलिपुरा येथील टिडीआरच्या प्रकरणात घोटाळा असल्याचे 'मटा' ने उघड केले होते. मंजूरपुरा प्रकरणात टिडीआरमध्ये डबलगेम झाल्याच्या प्रकरणाचा देखील भांडाफोड करण्यात आला होता. ४ सप्टेंबर २०१६ रोजी याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या टिडीआर घोटाळ्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते किशोर राजपूत यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा झाल्यावर तत्कालीन आयुक्तांच्या आदेशाने सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यातआली होती. तक्रारीच्या आधारे अखेर सिकंदर साजेद यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी नाही सोडल्यास छावा पुढाकार घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणात नाशिक व नगर जिल्ह्यातील पाणी सोडण्यास विरोध होत आहे. मराठवाड्याचे हक्काचे पाणी ३१ ऑक्टोबरपर्यंत न सोडल्यास छावा धरणावर जाऊन पाणी सोडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरणात येणारे पाणी नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणात बेकायदेशीर अडविले आहे. त्यामुळे आम्हाला हक्काचे पाणी मिळत नाही, वास्तविक ऑक्टोबर सुरू होईपर्यंत वरील धरणसाठ्यात कायद्याने व न्यायिक धारणेने ३५ टक्के साठा साठवून जास्तीचे सर्व पाणी, खालील धरणात सोडणे बंधनकारक तसेच मानवी सहिष्णुतेचे आहे, पण राजकीय हस्तक्षेपामुळे व महत्त्वाकांक्षेमुळे विनाकारण आडमुठी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. परिणामी आम्हाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवीत आहेत. काही विघ्नसंतोषी लोक आम्हाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवीत आहेत, परंतु छावा संघटना हे खपवून घेणार नाही. हक्काच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी छावाचे सर्व मावळे ३१ आक्टोबरनंतर कधीही वरील धरणसाठ्यातून पाणी फोडून घेऊ, असा इशारा प्रा. चंद्रकांत भराट यांनी दिला. नगर, नाशिक व मराठवाड्यातील सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन पाणी प्रश्न सामंजस्याने सोडवावा, आसे आवाहन छावा मराठा युवा संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, प्रा. संतोष तांबे, प्रा. नितीन देशमुख, दिलीप तौर, रवींद्र बोडखे, राजेंद्र गोरे, सुभाष कोळकर, जालना, अॅड प्रवीण जोगदंड, प्रकाश तावडे, उस्मानाबाद, संजय गिराम, गंगाधर काळकुटे, बीड, अरुण शिंदे लातूर यांनी औरंगाबाद येथे बैठक घेऊन केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी बैठका

$
0
0

औरंगाबाद: जनसंघर्ष यात्रेच्या पूर्वतयारीसाठी औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी मार्गदर्शन केले.

प्रदेश काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा ३० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात येत आहे. ३० रोजी दुपारी दोन वाजता फुलंब्री येथे सभा, एक नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर मराठवाड्यातील यात्रेचा समारोप होणार आहे. यानिमित्त जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. डॉ. काळे यांनी शुक्रवारी पळशी, सावंगी, चौका, लाडसावंगी, करमाड, शेकटा, गोलटगाव, आडगाव बुद्रुक, वरुड काजी या पंचायत समिती गणनिहाय बैठका घेतल्या आणि यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तालुकाध्यक्ष रामराव शेळके, मार्केट कमिटीचे माजी सभापती संजय औताडे, पंचायत समितीचे माजी सभापती मनोज शेजवळ, पंचायत समितीचे माजी सदस्य गजानन मते, आत्माराम पळसकर, सुभाष भालेराव, संजय पळसकर, साहेबराव वाळके,राजू जगदाळे, जमील पटेल, बबन कुंडारे, ताराचंद जारवाल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावता ट्रक सोडून चालकाचे पलायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

पोलिसांना पाहून अवैध वाळुने भरलेला हायवा सोडून चालकाने पळ काढला. त्यामुळे रस्त्याकडेला जाऊन ट्रक उलटला. ही घटना गुरुवारी रात्री एक वाजता बाजारसावंगी येथे घडली. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजारसावंगी येथे पोलिस कर्मचारी योगेश नाडे, संदीप जाधव गुरुवारी रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी एम एच १८ बी जी ७१७७ क्रमांकाचा वाळुने भरलेला हायवा ट्रक घेऊन येत होता. त्याला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिस पाठलाग करत असल्याने हायवा चालकाने वेगाने वाहन चालवत त्यातून उडी मारून पळ काढला. उतार असल्याने हायवा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. अंधाराचा फायदा घेऊन चालक पळून गेला. पोलिसांनी शोध घेऊनही चालक सापडला नाही. पोलिसांनी एक हायवा ट्रकसह वाळू, असा दहा लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक यतीन कुलकर्णी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्तात सोन्याचे आमिष; ८५ हजार लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून दरोडेखोरांच्या टोळीने एका महिलेचे ८५ हजार रुपये लुबाडले. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी पाचोड जवळील जिनिंगनजिक घडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व पाचोड पोलिसांनी तपास करीत आठ तासांत दरोडेखोरांच्या सात जणांच्या टोळीला जेरबंद केले.

या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली. ही ४० वर्षांची महिला गारखेडा, गजानननगर भागातील रहिवासी आहे. या महिलेची तीन महिन्यांपूर्वी गजानन भाटकर (रा. मुकुंदवाडी) याच्यासोबत ओळख झाली होती. महिलेवर कर्ज असल्याने तिने ही अडचण भाटकरला सांगितली होती. भाटकरने तिला १५ दिवसांपूर्वी त्याचा कांताराव गिरी नावाचा मित्र असून तो स्वस्तात सोने देतो असे सांगितले. तुम्ही स्वस्तात सोने घेऊन ते विकून लोकांचे कर्ज फेडा, असा सल्ला दिला. ८५ हजारांत पाच तोळे सोने मिळेल, असे आमिषही भाटकरने दाखवले. त्याला बळी पडून या महिलेने मैत्रिणीकडून ८५ हजार रुपये उसने घेतले. ती व सोबतचा एक व्यक्ती असे दोघे गुरुवारी दुपारी चिकलठाण्यात भाटकर याला भेटले. यानंतर दुचाकीवरून सर्वजण आधी आडूळ व नंतर पाचोड येथे गेले. भाटकर याला समोरिल व्यक्तिने पाचोडच्या पुढे पाच किलोमीटर अतंरावरील जीनिंगनजिक बोलावले. यावेळी सायंकाळचे सहा वाजले होते. येथे एक व्यक्ती त्यांना घेण्यासाठी आली. वाहने रस्त्यावरच लावण्याचे सांगत त्यांना पायी दोनशे फुटापर्यंत चालत नेले. यावेळी या महिलेसह इतरांवर हल्ला करीत तेथील आरोपींनी ८५ हजार रुपयांची पिशवी हिसकावून घेतली. घाबरलेल्या या महिलेसह इतरांनी तेथून पळ काढला व पाचोड पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. स्थानिक गुन्हे शाखा व पाचोड पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन महिलेला आमिष दाखवणारा गजानन भाटकर याला ताब्यात घेतले. त्याने कांतराव गिरी याची माहिती दिल्यानंतर गिरीला देखील अटक करण्यात आली. या दोघांनी इतरांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरतीसिंह, अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर, डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, एपीआय अभिजित मोरे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, गोरक्ष खरड, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, गणेश मुळे, संजय काळे, शेख नदीम, गणेश गांगवे, उमेश बकले, सुधीर ओव्हळ, जगन्नाथ उबाळे, नरेंद्र अंधारे, नुसरत शेख, रामदास राख आणि हनुमान धन्वे आदींनी केली.

\B८४ हजार जप्त \B

शिकूर पण्या पवार, लुकेश पण्या पवार (दोघे रा. चन्नापुरी, ता. अंबड), केदार संभाजी काळे (रा. तवलवाडी ता. आष्टी, जि. बीड), रामेश्वर बाबासाहेब काळे आणि सचिन जयनारायण चव्हाण (रा. टाकळी शिंपी, ता. औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून लुबाडलेले रोख ८४ हजार रुपये व दुचाकी जप्त करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’ने महावितरणला घेरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणकडून जाणूनबुजून मोजक्या भागात भारनियमन करण्यात येत आहे, असा आरोप करत शुक्रवारी 'एमआयएम' आमदार इम्तियाज जलील यांनी महावितरण कार्यालयात मुख्य अभियंत्यासमोरच ठिय्या आंदोलन केले.

शहरात महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या भारनियमनाला नागरिकांचा विरोध आहे. चार दिवसांपूर्वी मदनी चौकात महावितरणच्या कार्यालयावर संतप्त जमावाकडून हल्ला झाला होता. शुक्रवारी सायंकाळी 'एमआयएम' शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यालय गाठले. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांना यावेळी घेराव घालण्यात आला. ज्या भागात वीज चोरी करण्यात येत आहे, त्या भागात भारनियमन करावे, वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करावी, बिल भरणाऱ्या ग्राहकांसह सर्वांना वेठीस धरू नये अशी मागणी शिष्टमंडळाने केली. 'वीजचोरी करणाऱ्या नागरिकांवर महावितरणने कारवाई करावी, त्यांना एमआयएमचे लोकप्रतिनिधी त्यांच्या वॉर्डात मदत करतील,' असे आश्वासन देखील आमदार जलील यांनी गणेशकर यांना दिले. यावेळी नगरसेवक जमीर कादरी, नासेरखान, नासेर सिद्धिकी, अजीमखान, शेख अहेमद, गंगाधर ढगे, रफीक चित्ता, मुन्शी पटेल यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विरोधीपक्षनेत्याने थाटले लेखा विभागात कार्यालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे विरोधीपक्ष नेते जमीर कादरी यांनी गटनेत्यासह शुक्रवारी लेखा विभागातच आपले कार्यालय थाटून लेखा विभागानेकडे लेखाजोखा देण्याची मागणी केली. मात्र, मुख्यलेखाधिकाऱ्यांनी एका तासात माहिती देतो म्हणून काढता पाय घेतला, ते सायंकाळपर्यंत माहिती दिली नाही.

महापालिकेत सध्या आर्थिकमुद्यांवरून ओढाताण सुरू आहे. निधीच नसल्यामुळे तब्बल १७० कोटींची बिले थकल्याची कबुली मुख्य लेखाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत दिली होती. थकलेली बिले मिळावीत म्हणून कंत्राटदार दररोज पालिकेत चकरा मारत आहेत. लेखा विभागातील अधिकारी भेटत नसल्यामुळे कंत्राटदार थेट पदाधिकाऱ्यांच्या दालनात धडक मारत आहेत. विरोधीपक्ष नेत्याच्या दालनातही कंत्राटदारांची गर्दी होते. कंत्राटदारांच्या तगाद्यामुळे त्रस्त झालेले विरोधीपक्षनेते जमीर कादरी व 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी यांनी शुक्रवारी थेट लेखा विभागातच आपले कार्यालय थाटले. बिलांसाठी आलेल्या कंत्राटदाराला ते या विभागात बोलावून घेत होते, पण अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे काहीच तोडगा निघत नव्हता. मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे कार्यालयात नव्हते. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. शेवटी त्यांचा फोन लागला, त्यांना लेखा विभागात येण्यास सांगण्यात आले. थोड्या वेळात येतो असे सांगून केंद्रे दोन तासांनी लेखा विभागात दाखल झाले. जमीर कादरी आणि नासेर सिद्दिकी यांनी कंत्राटदारांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि जमा - खर्चाचा लेखाजोखा देण्याची मागणी केली. एका तासात ही माहिती देतो असे सांगून केंद्रे निघून गेले आणि पुन्हा फिरकलेच नाहीत.

\Bआवाज उठवणार

\B'मटा' प्रतिनिधीने नासेर सिद्दिकी यांच्याशी संपर्क साधला असता 'सायंकाळी सहा वाजेपर्यंत केंद्रे यांनी कोणतीच माहिती दिली नाही,' असे त्यांनी सांगितले. 'लेखा विभागातील अनागोंदी कारभाराबद्दल आपण आवाज उठवणार आहोत,' अशा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा दगडाने खून; पतीच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीचा दगडाने खून करणारा आरोपी पती अशोक पंडित जाधव याच्या पोलिस कोठडीमध्ये रविवारपर्यंत (२८ ऑक्टोबर) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी शुक्रवारी दिले.

चारित्र्याच्या संशयावरून आरोपी पती अशोक पंडित जाधव (वय ४२, रा. गोळेगाव गदाना, ता. खुलताबाद) हा पत्नी कविता (मृत) हिला नेहमी शिवीगाळ तसेच मारहाण करत होता. १९ ऑक्टोबर २०१८ रोजी आरोपी दारू पिऊन घरी आला आणि चारित्र्यावर संशय घेत मध्यरात्री साडेबाराला पत्नी कविताच्या डोक्यात घालून खून केला. या प्रकरणी रावसाहेब खंडू खरात यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला २१ ऑक्टोबर रोजी अटक करून हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला शुक्रवारी कोर्टात हजर केले. मृत कविताचा मोबाइल हस्तगत करणे बाकी असून, प्रकरणाचा सखोल तपास करावयाचा असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करावी, अशी विनंती सहायक सरकारी वकील सय्यद शेहनाझ यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये रविवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी हॉस्पिलटमध्ये स्वच्छता मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) 'रेडिओइल्युमिनॅटी फेस्ट'अंतर्गत क्ष-किरण विभागाच्या सर्व डॉक्टर, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी घाटी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यानिमित्त विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, उपअधीक्षक डॉ. अनिल पुंगळे तसेच संपूर्ण क्ष-किरण विभाग रस्त्यावर उतरून कचरा गोळा करताना दिसून आले. त्याचवेळी फलकांसह ध्वनिक्षेपकावरून संदेश देत स्वच्छतेबद्दल जागृती करण्यात आली.

घाटीच्या क्ष-किरण विभागाचा 'रेडिओइल्युमिनॅटी फेस्ट' हा महोत्सव बुधवारपासून सुरू झाला. पहिल्या दिवशी पोस्टर प्रदर्शनाद्वारे क्ष-किरणांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. नियम न पाळण्यामुळे एक्स-रे, सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी यासारख्या उपकरणांच्या क्ष-किरणांमुळे कोणते गंभीर व घातक परिणाम होऊ शकतात, याचा वेध प्रदर्शानातून घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी रेडिओलॉजीसंबंधी प्रश्नमंजुषा घेऊन विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तिसऱ्या दिवशी शुक्रवारी संपूर्ण घाटी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. घाटीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुक्रे, वैद्यकीय डॉ. झिने, उपअधीक्षक डॉ. पुंगळे, विभागप्रमुख डॉ. रोटे यांच्या उपस्थितीत मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त क्ष-किरण विभागाचे सर्व डॉक्टर, निवासी डॉक्टर, बीपीएमटी विद्यार्थी, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांनी घाटी परिसराची स्वच्छता केली.

\Bस्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार

\Bया निमित्त घाटीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा डॉ. रोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 'घाटी रुग्णालयाची स्वच्छता ठेव‍ण्याची मोठी व महत्त्वाची जबाबदारी स्वच्छता कर्मचारी पार पाडतात, त्यांच्याबद्दल नेहमी आदर वाटतो', अशा शब्दांत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव करीत डॉ. रोटे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमात डॉ. अंजली पवार, डॉ. अजय वरे, डॉ. प्रशांत तितरे, डॉ. सौरभ जोशी, डॉ. कल्याणी जेथलिया, डॉ. चेन मोरे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वादोन दलघमी पाण्याची रोज वाफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे पावसाने दिलेली हुलकावणी आणि दुसरीकडे सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचे चटके जाणवू लागल्याचा फटका मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्याला बसला आहे. उन्हाच्या या तडाख्यामुळे मराठवाड्यातील दहा मोठ्या प्रकल्पांमधून रोज २.३६९० दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ होत आहे. सध्या विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये १६७८. ८० दशलक्ष घनमीटर (३२.६४ टक्के) पाणीसाठा असला, तरी हा पाणीसाठा बाष्पीभवनामुळे झपाट्याने कमी होत आहे. सर्वात मोठ्या असलेल्या जायकवाडी धरणामध्ये सुमारे एक दलघमी पाण्याची वाफ होत आहे.

----

प्रकल्पानिहाय बाष्पीभवन

---

जायकवाडी......... ०.९०७०

येलदरी................०.०९३०

सिद्धेश्वर...............०.११४०

माजलगाव.............०.१३३०

मांजरा...................०.०७१०

उर्ध्व पैनगंगा............०.४८७०

निम्न तेरणा............०.०५४०

विष्‍णुपुरी..............०.०७००

निम्न दुधना..........०.४०००

सिना कोळेगाव.......०.०४००

---

एकूण...................२.३६९०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या उपस्थितीत रस्ते निविदांवर फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यांच्या निविदांवर महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या उपस्थितीत फैसला केला जाणार आहे. त्यामुळे हायकोर्टाने ठरवून दिलेली दोन नोव्हेंबरच्या डेडलाइनपर्यंत फैसला होणार की नाही, याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

रस्ते कामासाठी राज्य शासनाने पालिकेला शंभर कोटींचे अनुदान दिले. त्यातून ३१ रस्त्यांचे काँक्रिटिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रस्त्यांची विभागणी चार पॅकेजमध्ये केली. त्यापैकी पॅकेज १ आणि ३ मधील रस्त्यांच्या कामांच्या निविदांना आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या दोन्हीही पॅकेजमध्ये मिळून ४८ कोटींची कामे केली जाणार आहेत. उर्वरित दोन पॅकेजमधील कंत्राटदारांकडून डॉ. निपुण विनायक यांनी खुलासा मागवला आहे. सध्या आयुक्त रजेवर गेल्यामुळे ४८ कोटींच्या निविदा स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येतील असे मानले जात होते. मात्र, सर्वच्या सर्व शंभर कोटींच्या निविदा एकत्रितपणे स्थायी समितीच्या समोर याव्यात असा प्रयत्न काही पदाधिकारी करीत आहेत. आयुक्त २९ ऑक्टोबर रोजी रजेवरून परतणार आहेत. ते रुजू झाल्यावर उर्वरित निविदांना त्यांनी हिरवा कंदील दाखवावा यासाठी गळ घातली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांच्या निविदांवर आयुक्तांच्या उपस्थितीतच फैसला होईल असे सांगितले जात आहे. कंत्राटदारांच्या खुलाशावर आयुक्त आडून राहिले तर हायकोर्टाने दिलेली दोन नोव्हेंबरची डेडलाइन टळू शकते असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images