Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘आप’च्या कार्यकारिणी बैठकीत गदारोळ

$
0
0
आम आदमी पक्षाची लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी बोलाविलेल्या पहिल्याच बैठकीत अपेक्षित, उपेक्षीतांनी गोंधळ करुन आपची दिशा काय असेल हे दाखवून दिले. तीन वेळा बैठक तहकुब करुन शेवटी कार्यकारिणी निश्चित करण्यात आली.

माजी खासदार गुंडेवार यांचे निधन

$
0
0
माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विलास नागनाथराव गुंडेवार (वय ६५) यांचे पुणे येथे निधन झाले. सोमवारी हिंगोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रोगराईपेक्षाही अपघातामुळे जीवीत हानीचे प्रमाण जास्त

$
0
0
दररोज एखादया रस्त्यावरही एखादा अपघात होतो. या अपघातात मरणाऱ्यांची संख्याही एखादया रोगराईपेक्षा जास्त आहे. यामूळे गाडी चालविताना प्रत्येकांची खबरदारी आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालक करण्याचे आवाहन ब्रिगेडीअर मनोजकुमार यांनी केले.

उस्मानाबाद शहरातील व्यापाऱ्यांचा मूक मोर्चा

$
0
0
उस्मानाबाद शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवारी प्रतिष्ठाने बंद ठेवून मूक मोर्चा काढला. उस्मानाबाद नगर‌पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून तेथील सत्ताधाऱ्यांकडून व्यापाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्हा व्यापारी संघ व व्यापरी संकूल कृती समितीने ही भूमिका घेतली.

रोटेगाव-पुणतांबा मार्ग अवघडच

$
0
0
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा सारखा भाग जोडणाऱ्या रोटेगाव पुणतांबा २६ किलोमीटर प्रस्तावित रेल्वे मार्ग अडचणीत सापडला आहे. मागील अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी यंदाही अपूर्ण राहणार असून या मार्गावरून रेल्वेला नफा नसल्याने हा मार्ग तुर्तास रद्द करण्यात आला आहे;

चोरीच्या आरोपामुळे गवंड्याची आत्महत्या

$
0
0
मुकुंदवाडी संजयनगर भागात एका गवंडी चकाम करणाऱ्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. मुकुंदवाडी पोलिसांनी त्याची चोरीच्या आरोपावरून चौकशी केली होती.

१५ हजाराचा माल दुकान फोडून लंपास

$
0
0
उल्कानगरी भागात चोरट्यानी किराणा दुकान फोडून ड्रायफुटसहीत पंधरा हजाराचा ऐवज पळवला. रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असून या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणुकीतून माघारीचा पवारांनी फेरविचार करावा

$
0
0
पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांना एवढी चांगली संधी चालून आलेली असताना ते लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहेत. या निर्णयाचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर विपरित परीणाम होऊ शकतो.

बीडसाठी ३४ कोटीचा टंचाई आराखडा तयार

$
0
0
बीड जिल्ह्यातील निम्या भागात या वर्षी समाधानकारक पाऊस पडला आहे. मात्र काही तालुक्यात पडलेल्या कमी पावसामुळे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून टंचाई परिस्थिति उदभवण्याची शक्यता आहे.

अनेक शाळा पडल्या ओस

$
0
0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अधिवेशन वाई (ता. सातारा) येथे सुरू आहे. अधिवेशनात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक गेल्याने अनेक शाळा ओस पडल्या आहेत.

दुरुस्तीच्या निधीवरून बिघडले ‘आरोग्य’

$
0
0
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून (डीपीसी) आलेल्या निधीचे समान वाटप व्हावे की गरजेनुसार यावरून आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे आरोग्य बिघडले आहे.

वाळूजमधील कामांना वेग

$
0
0
सिडकोने वाळूज महानगर - १ कडे लक्ष पुरविण्यास सुरुवात केली असून रस्ते मजबुतीकरण, अपूर्ण रस्ते बांधकाम, पाणीपुरवठा व मलनिःसारण वाहिन्या बदलण्याची कामे हाती घेतली आहेत. तब्बल पंधरा वर्षानंतर १३ कोटी १७ लाख ९४,७९२ कोटी रूपयांची कामे करण्यात येत आहेत.

शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

$
0
0
शस्त्रक्रियेनंतर पेशंट महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी त्रिमूर्ती चौक परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये घडला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला असून, जवाहरनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे.

गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी आंबेडकरनगर भागात घडला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उंची वाढविणार का, ४ दिवसांत सांगा

$
0
0
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवणार आहात का, वाढवणार असला तर किती दिवसांत हे काम पूर्ण कराल, याचे उत्तर चार दिवसांत द्या, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत देशमुख यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

धोकादायक पुलाने रोखला सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग

$
0
0
बारापुल्ला गेटच्या धोकादायक पुलाने सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग रोखला आहे. त्यामुळे छावणी-भीमनगर-भावसिंगपुरा या भागातील नागरिकांची शहरांतर्गत प्रवास करताना ससेहोलपट होत आहे. त्यातच बारापुल्ला गेटपासूनच खराब झालेला रस्ता नागरिकांचे आरोग्य बिघडविणारा ठरू लागला आहे.

मुलांची आई सापडली

$
0
0
पती सांभाळत नाही, त्यात रोजीरोटीचा प्रश्न गंभीर असल्याने मुलांना मुकुंदनगर येथे आजीकडे (पतीची आई) सोडले होते, असा दावा पाच चिमुरड्यांना रुळावर सोडून देणाऱ्या मातेने केला आहे. आजी व मुलांच्या वडिलांचा शोध सुरू आहे.

एसटीच्या धडकेत बालक मृत्युमुखी

$
0
0
बसने एका सहा वर्षीय बालकास चिरडले. अंबड तालुक्यातील झिरपी फाटा (जि. जालना) येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. विलास कांबळे असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. तो आईसोबत जात असताना, जळगाव-परळी बसची त्याला जोरदार धडक बसली.

अजिंठ्यात येणारे पर्यटक 'अंडर स्कॅनर'

$
0
0
सुरक्षेसाठी अजिंठ्यातील प्रत्येक लेणीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. याशिवाय कोणतेही सामान लेणीत नेण्यापूर्वी त्याची लेणीच्या प्रवेशद्वारावर त्याचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी स्कॅनर आणि मेटल डिटेक्टर बसविण्यात येणार आहे.

ATM फोडण्याचा प्रयत्न फसला

$
0
0
मिलकॉर्नर भागातील आयसीआयसीआय बँकचे अेटीएम फोडण्याचा प्रयत्न जागरूक नागरिकामुळे सोमवारी पहाटे फसला. या नागरिकाने पोलिसांना कळविल्याने पोलिस वेळीच घटनास्थळी पोहोचू शकले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images