Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दुचाकी चोर सिडको एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. या आरोपींनी घरफोडीचे देखील गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सिडको एमआयडीसी परिसरातील आयडिया कॉल सेंटरजवळ दोन तरुण चोरीची दुचाकी घेऊन येणार असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. यावेळी चोरीची दुचाकी घेऊन आलेले संशयित आरोपी अर्शद हुसैन सय्यद (वय २४, रा. नारेगाव) यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. तसेच या आरोपींनी घरफोडीच्या गुन्ह्याची देखील कबुल देत चोरी केलेले मोबाइल व पितळी हंडे पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय के. पी. अन्नलदास, जमादार मुनीर पठाण, अर्शद शेख, राठोड, शाहेद शेख, गणेश राजपूत, शिंदे आणि सुंदर्डे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लिहिणे म्हणजे लिस्टवर येणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सध्या कुणाला नजरकैदेत ठेवले जाईल, कुणाच्या मुसक्या आवळल्या जातील ठावूक नाही. कुणाच्या बाजूने लिहायचे आणि डब्यात जेवायला काय न्यायचे हेसुद्धा ठरवले जात आहे. संभ्रमात सापडलेल्या माणसांची दयनीय अवस्था आहे. कारण लिहिणे म्हणजे लिस्टवर येणे ठरत आहे,' असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी वर्जेश सोलंकी यांनी केले. ते कविता महोत्सवात बोलत होते.

सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि बाबूराव काळे महाविद्यालय, अजिंठा यांच्यातर्फे कविता महोत्सव घेण्यात आला. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात रविवारी दुपारी या महोत्सवाचे रंगनाथ काळे यांनी उद्घाटन केले. यावेळी अध्यक्ष वर्जेश सोळंकी, 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. मीना पाटील, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, विलास काबरा, शिवाजी बनकर व प्रा. सोमनाथ वाघमारे उपस्थित होते. वर्जेश सोलंकी यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले. 'सर्जनशील माणसाला नेहमीच काही गमवावे लागले. एका भिल्लाने अंगठा गमावला, तस्लिमा नसरीनला निर्वासित व्हावे लागले, चित्रकार एम. एफ हुसैन यांना देश सोडावा लागला. पेरुमल मुरुगनला स्वत:तील लेखक मेल्याचे जाहीर करावे लागले. दाभोलकर ते गौरी लंकेश यांची उदाहरणे समोर आहेत. त्यामुळे लिहिणे म्हणजे लिस्टवर येणे आहे का?' असे सोलंकी म्हणाले. समकालीन संदर्भावर कवीने लेखन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

'सोशल मीडियातील हेवेदावे रस्त्यावर उतरत आहेत. त्यातून सांस्कृतिक दारिद्र्य वाढत आहे. अविवेकी पिढी घडणे अस्वस्थ करणारे आहे,' असे कवी पी. विठ्ठल म्हणाले. 'जुने कवी वाचताना पूर्वसुरी व समकालीन कवितांचे वाचन दिसते. आता कविता वाचताना हे अंतर जाणवते,' असे ठाले पाटील म्हणाले. उद्घाटन सत्रानंतर 'नवे जग नवी कविता' या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादात डॉ. कैलास अंभुरे, अॅड. नीलिमा कुलकर्णी आणि प्रा. ऋषिकेश देशमुख यांनी विचार मांडले. नंतरच्या सत्रात श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. या संमेलनात तुकाराम धांडे, प्रशांत मोरे, बालाजी सुतार, सत्यपाल राजपूत, नामदेव कोळी, महेश लीला पंडित, दिशा शेख, गौरवी भारुका, आशा डांगे, हिमांशू गुप्ता, गणेश घुले, रमेश ठोंबरे, सुनील उबाळे, सुदर्शन पोटभरे, सीमा ढगे यांनी कविता सादर केल्या. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या उपस्थितीत सायंकाळी महोत्सवाचा समारोप करण्यात आला. रमेश रावळकर यांनी प्रास्ताविक केले. मोहन बाभूळगावकर यांनी सूत्रसंचालन केले आणि कैलास गाडेकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यामुळे आणीबाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था विस्कळीत झाली असून, आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी कबुली खुद्द महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील तज्ज्ञ अधिकारी द्या, अशी विनवणी महापालिकेने पाणीपुरवठा मंत्र्यांकडे पत्रद्वारे केली आहे.

कचऱ्या पाठोपाठ शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात अनेक भागामध्ये आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. निश्चित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, शहरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याची कबुली महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांना तातडीने लिहिलेल्या पत्रात त्यांनी हे मान्य केले. त्यांनी पत्रात म्हटले की, शहरातील पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. शहरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थ सुरळीतपणे चालविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील काही तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी एका महिन्यासाठी द्यावेत.

\Bयापूर्वी झाली चर्चा

\Bशहराचा पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले, मात्र त्याचे वेळापत्रकही पाळण्यात येत नाही. मुख्य शहर, सिडको-हडकोसह नव्याने महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या सातारा परिसरातही पाण्याचे नियोजन करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. त्यात नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. शहरात नऊ वॉर्ड कार्यालयांतर्गत असलेल्या ४० जलकुंभातून पाणीपुरवठण्याची प्रक्रिया होते. त्यासाठी २० कर्मचारी पालिकेकडे आहेत. वाढती मागणी, कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या त्यामुळे व्यवस्थेवरील ताण वाढत गेला. त्यात मागील काही वर्षात परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यामुळे पालिकेने हात टेकल्याचे समोर आले. पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांना लिहिलेल्या पत्रात महापौरांनी आणीबाणीची परिस्थितीच असल्याचे मान्य केल्याची पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकाचा पाण्यासाठी ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निश्चित वेळापत्रकाप्रमाणे वॉर्डात पाणीपुरवठा होत नसल्याने आंदोलन करण्याची वेळ पालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन चित्ते यांच्यावर आली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अन् आज वाढदिवस असतानाही त्यांनी तो रद्द करून जलकुभांच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.

सिडकोतील पवननगर वॉर्डात पाणीपुरवठ्यात वारंवार खंड पडत आहे. सात दिवसानंतर शनिवारी पाणीपुरवठा करण्यात आला. त्यातही काही भागामध्ये पुरवठा झाला नाही. अधिकाऱ्यांना चौकशी केल्यानंतर योग्य उत्तरे दिली जात नाहीत. वॉर्डातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागल्याने रविवारी वाढदिवस असताना नगरसेवक नितीन चित्ते यांनी थेट एन-पाचचे जलकुंभ गाठले. सकाळपासून आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यामुळे जलकुंभावरून पाण्याचे टँकर अडकून पडले. आंदोलनापूर्वी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस दिली होती, मात्र चित्ते यांनी आंदोलन सुरू केले. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आंदोलनानंतर पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता हेमंत कोल्हे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. लेखी आश्वासनानंतर त्यांनी दुपारी आंदोलन मागे घेतले.

\Bमहापौर, आमदारांनी घेतली भेट\B

चित्ते यांनी जलकुंभाच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी सहापासून आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाची माहिती कळताच महापौर नंदुकुमार घोडेले यांनी त्यांची भेट घेतली. अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भाजपचे आमदार अतुल सावे, माजी महापौर बापू घडमोडे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, बालाजी मुंडे, माधुरी अदवंत, महेश माळवतकर यांनी भेट दिली. यावेळी भाजप पदाधिकारी, नगरसेवक आक्रमक झाले.

तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक आहे, मात्र प्रत्यक्षात सात-सात दिवस पाणीपुरवठा केला जात नाही. अधिकाऱ्यांना विचारले असता,उत्तरे दिली जात नाहीत. ऐन दिवाळीच्या सणामध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय राहीला नाही.

- नितीन चित्ते, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिकाम्या खुर्च्या पाहून मंत्री नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना-भाजपने तिसरा आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिव्हल पुरस्कृत केल्याच्या कथित प्रचारामुळे महोत्सवाला जेमतेम प्रतिसाद मिळाला. रिकाम्या खुर्च्या पाहून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व समाजकल्याण राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी भाषणात नाराजी व्यक्त केली. आयोजक भंते धम्मज्योती थेरो यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतले. 'धम्माचे असे प्रदर्शन औरंगाबाद शहरासाठी भूषणावह नाही. या मैदानावर लवकरच रिपाइंचा लाखोंच्या गर्दीचा मेळावा घेऊन दाखवतो' या शब्दात आठवले यांनी विरोधकांना आव्हान दिले.

तिसरा इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल जबिंदा लॉन्स येथे रविवारी पार पडला. महोत्सव शिवसेना-भाजपने पुरस्कृत केल्याचा आरोप झाला. बौद्ध उपासक महासंघाने महोत्सवावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. आरोप-प्रत्यारोपांचा परिणाम होऊन महोत्सवाला जेमतेम प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच्या समारोपाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, समाजकल्याण राज्यमंत्री राजकुमार बडोले, पशूसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार संजय शिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले, थायलंडचे धम्म प्रसारक नताकी, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष बाबूराव कदम उपस्थित होते. 'धम्म महोत्सवाच्या विरोधकांनी नीच पातळी गाठली आहे. बडोले यांनी महोत्सवाला १६ कोटी रुपये दिल्याचा आरोप झाला. आम्ही वेरुळजवळ बुद्ध विहारासाठी आमदार संजय शिरसाठ यांच्या मध्यस्थीने कमी किमतीत दोन एकर जमीन खरेदी केली. या विहारासाठी बडोले यांच्याकडून निधी घेऊ' असे आयोजक भंते धम्मज्योती थेरो म्हणाले.

'महोत्सवाला कमी गर्दी आहे, ही धम्म वाढल्याची लक्षणे आहेत. कारण पक्ष वाढताना एकमेकांचे पाय ओढण्याची स्पर्धा लागते. ही स्पर्धा धम्मात पहिल्यांदाच दिसली. पण, टिकेकडे दुर्लक्ष करुन पुढील वर्षीसुद्धा महोत्सव घ्या. मंत्री राहिल्यास १६ कोटीपेक्षा जास्त निधी देईल' असे बडोले यांनी जाहीर केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी मांडली. 'धम्माने माणसे जोडायला सांगितले. माणसं तोडणे धम्माच्या विचारात नाही. कोणत्याही पक्षाचा माणूस असला तरी जोडावा. धम्म परिषद भाजप-सेनेची नसून जय भीमवाल्यांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसोबत असलो तरी आंबेडकरी विचारांशी प्रतारणा केली नाही. पंतप्रधान बुद्ध आणि आंबेडकरी विचारांना पाठिंबा देतात. म्हणून त्यांना पाठिंबा दिला. दरवेळी पवारांनाच का पाठिंबा द्यायचा? तरीपण मी भाजपमध्ये जाणार नाही. रिपाइंचा निळा झेंडा घेऊन ठामपणे उभा आहे' असे आठवले म्हणाले.

यावेळी डॉ. अभिजीत वाडेकर, एम. आर. पिंपरे, शांताबाई रत्नपारखी, प्रमोद दुधडे, मंगेश वानखेडे, डॉ. मानव पगारे, विकास सरोदे, व्ही. के. वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या महोत्सवात सकाळी धम्म ध्वजारोहण, धम्म प्रवचन, भोजनदान, धम्मदेसणा झाले. भदन्त प्राचार्य डॉ. खेम्मधम्मो महाथेरो, कुसला महाथेरो, भदन्त विनयबोधी थेरो, भदन्त अनालयो थेरो, भदन्त चंद्रबोधी महाथेरो, भदन्त धम्मज्योती थेरो, भंते बोधीरत्न, भंते संघरत्न, भंते रत्नबोधी, भंते विजयानंद आदी उपस्थित होते. प्रफुल्ल ढेपे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी एस. आर. बोदडे, विजय मगरे, चंद्रकांत हिवराळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

याच मैदानावर गर्दी जमवतो

बुद्धिस्ट फेस्टिव्हलला कमी गर्दी असल्याचा धागा पकडत रामदास आठवले यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. 'या मैदानावर काही लोकांनी मेळावा घेतला. घेतला तर घेऊ द्या. मीसुद्धा लवकरच रिपाइंचा मेळावा घेऊन गर्दी जमवणार आहे. त्यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी मला फायदा होतो. माझी भूमिका जाहीर झाली तर त्यांचा तोटा होतो. माझ्या राजकीय प्रवासात औरंगाबदने नेहमीच पाठिंबा दिला. पण, आज औरंगाबादला गर्दी नसणे भूषणावह नाही' असे आठवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाम फोडून लाखोंचे टीव्ही लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोडी शिवारातील इलेक्ट्रॉनिक्स सामानाचे गोदाम फोडून चोरांनी लाखो रुपयांचे टीव्ही लंपास केल्याची घटना दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिळकनगर येथील रहिवासी गौरव पारसमल सुराणा यांचे दौलताबाद पोलिस ठाण्याचा हद्दीत इलेक्ट्रानिक्स साहित्याचे गोदाम आहे. या गोदामाचे शटर शुक्रवारी रात्री उचकटून चोरांनी प्रवेश केला. गोदामातून टीव्ही लंपास केले. पोलीस निरीक्षक विवेक सराफ यांनी प्राथमिक टीव्ही लंपास झाल्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. स्टॉक रजिस्टर तपासल्यानंतर किती रकमेची चोरी झाली, हे निष्पन्न होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतर्कता जागरुकता फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी शहर व परिसरातून सतर्कता जागरुकता फेरी काढत जनजागृती केली. केंद्रीय सतर्कता आयोगातर्फे २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान सतर्कता जागरुकता सप्ताह साजरा केला जातो.

सप्ताहानिमित्त टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फेरी काढली. या फेरीला शहागंज येथील गांधी पुतळा येथून सुरुवात झाली. 'भ्रष्टाचार मिटोओ, नया भारत बनाओ', अशी घोषणा देत कर्मचाऱ्यांनी संपूर्ण फेरी मार्ग दणाणून सोडला होता. सिटीचौक मार्गे काढण्यात आलेल्या या फेरीची सांगता जुना बाजार येथील मुख्य डाकघर कार्यालय येथे करण्यात आली. याप्रसंगी भ्रष्टाचार विरोधात लढण्याची व आपल्या कर्तव्याचे पालन प्रामणिकपणे तसेच भय अथवा पक्षपात न करता करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. टपाल विभागाचे प्रवर अधीक्षक राहुल बी. के., असदुल्ला शेख यांनी यावेळी मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी अनिल साळुंके, ए. एफ. दांडगे, राजेश नेहरकर, सुनील काकड, सौरभ मेनन आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंनी कामगारांना झिडकारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी अग्रिम रक्कम व भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न अजूनही कायम आहे. दिवाळीसाठी एका महिन्याची अग्रिम रक्कम देण्याची कामगारांची मागणी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी फेटाळली. कामगारांनी शनिवारी दिवसभर कुलगुरू व कुलसचिव यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी भेट नाकारल्याने कामगार संतापले आहेत.

विद्यापीठात ४८८ कंत्राटी कामगारांनी दिवाळीसाठी एका महिन्याची अग्रिम रक्कम प्रशासनाला मागितली आहे. याबाबत भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियन निवेदने देऊन पाठपुरावा करीत आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे नेपाळच्या दौऱ्यावर असल्यामुळे शनिवारपर्यंत थांबा, असे कामगारांना सांगण्यात आले होते. कुलगुरू चोपडे व कुलसचिव डॉ. साधना पांडे शुक्रवारी शहरात दाखल झाले, तर शनिवारी कामगारांनी दोघांना भेटून समस्या सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी भेटण्यास नकार दिला. कामगार कुलगुरूंच्या दालनाबाहेर वाट पाहत ताटकळले होते. 'तुम्ही कुलसचिवांना भेटा' असे सांगून चोपडे यांनी बोलण्यास नकार दिला. तर कुलसचिव पांडे दालनात नसल्यामुळे कामगारांची निराशा झाली.

\Bकामगारांची पिळवणूक \B

दिवाळीसाठी हक्काचे पैसे मागूनही प्रशासन देत नसल्यामुळे युनियनचे अध्यक्ष किरणराज पंडित यांनी निषेध नोंदवला. सध्या विद्यापीठाकडे कामगारांच्या हक्काच्या 'पीएफ'चे पैसे अडकले आहेत. हे पैसेसुद्धा प्रशासन देत नसून कामगारांची पिळवणूक करीत असल्याची टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फळबाग योजना यंदा रखडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालय क्षेत्रातून तब्बल ५४ हजार २८५ शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी यांची निवड करण्यात आली आहे, परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसमोर फळबाग लागवडीचा प्रश्न उभा राहिला आहे. परिणामी, यंदा ही योजना रखडण्याची शक्यता निर्माण झाला आहे.

राज्यात १९९०पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना राबविल्यामुळे सुमारे १६ लाख हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आलेले आहे. केंद्र सरकारने २००५पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केल्यानंतर या योजनेतून राज्य सरकारने फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय देण्याचे निश्चित केलेले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जॉब कार्डधारण करणारे अल्प व अत्यअल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीसाठी, दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत, परंतु केवळ जॉब कार्ड नसल्याने अनेक शेतकरी योजनेसाठी पात्र ठरत नव्हते. ही बाब लक्षात घेत अशा शेतकऱ्यांसाठी नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय २० जून २०१८ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फळबाग लागवड योजना या खरीप हंगामापासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ मिळावा म्हणून औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून १५ हजार ९८३, बीड जिल्ह्यातून १४ हजार १०६, तर जालन्यातून २४ हजार २७० असे एकूण ५४ हजार ३७९ शेतकऱ्यांची फळबाग योजनेसाठी निवड केली आहेत. त्यातून सोडत पद्धतीने अर्जदारांची निवड करण्यात आली. त्यांना वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे, परंतु यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पाठोपाठ रब्बी हंगामावर परिणाम झाला. पाणी टंचाईमुळे आहे त्या फळबागा वाचविणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत या योजनेसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांसमोर फळबाग लागवड कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. परिणामी, यंदा योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होणे अवघड ठरले, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

\Bअसा दिला जातो लाभ\B

आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच विकसित जाती, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी; तसेच अंजिर, नारळ रोपे बाणावली, नार‌ळ रोपे टी-डी आदींचा यायोजनेत समावेश आहेत. फळबाग लागवडीसाठी तीन वर्षांच्या कालावधीत प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षी अनुक्रमे ५० टक्के, ३० आणि २० टक्के अर्थसाह्य दिले जाते. फळबाग लागवडीसाठी कोकणात कमाल दहा हेक्टर, तर उर्वरित महाराष्ट्रात कमाल सहा हेक्टरपर्यंत लाभ दिला जातो.

\Bयोजनेचे लाभार्थी\B

औरंगाबाद : १५०००

जालना : २४२७०

बीड : १४१०६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आली दिवाळी: मोबाइल विक्रेत्यांची ऑनलाइनला टक्कर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक बाजारपेठेत मोठे बदल होत आहेत. ग्राहक प्रत्यक्ष बाजारात जाण्याऐवजी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. ऐन सनासुदीत ई-कॉमर्स कंपन्यांच्या मोठ्या ऑफर्समुळे शहरातील मोबाइल बाजाराला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र या दिवाळीत ऑनलाइन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी, तसेच ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी शहरातील मोबाइल विक्रेत्यांनी शक्कल लढवत विविध ऑफर्स दिल्या आहेत.

शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढत आहे. ब्रॅँडेड माल मिळत असल्याने आणि पैसे देण्याचे विविध पर्याय असल्याने घरबसल्या खरेदीचा प्रकार लोकप्रिय होत आहे. मात्र, यामुळे पारंपरिक बाजारातील दुकानदारांचा व्यापार झाला आहे. शहरातील मोबाइल बाजारामध्ये दसऱ्यानिमित्त फारसा व्यवसाय झाला नसल्याचे दुकानदार सांगतात. मात्र, दिवाळीत मोबाइल तसेच गॅझेट विक्रेत्यांनी स्क्रिनगार्ड, आकर्षक मोबाइल कव्हर, मेमरीकार्ड तसेच इतर भेटवस्तू देण्याचा प्रयोग केला आहे. या माध्यमातून व्यापार वाढेल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. शहरात मोबाइल, टॅबलेट विकणारी लहान मोठी सुमारे ५०० दुकाने आहेत. त्यापैकी अनेक दुकानदारांनी ऑनलाइन खरेदीकडे वळणाऱ्या ग्राहकाला दुकानात खेचून आणण्यासाठी विविधऑफर्स देणे सुरू केले आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाइटवरून खरेदी करण्यात येणाऱ्या मोबाइलला मोठा डिस्काउंट देण्यात येतो, त्याच धर्तीवर दुकानदारांना ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

---.

\Bग्राहकांना हवा मोबाइल स्लिम आणि अपडेट

\Bसध्या बाजारामध्ये १० ते २० हजार रुपयांपर्यंतच्या मोबाइलची अधिक विक्री होते. ग्राहकांची पाचे ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या मोबाइललाही पसंती आहे. मात्र ग्राहक अपडेट व्हर्जन तसेच स्लिम मोबाइलला अधिक पसंती देतात. या शिवाय मोबाइलचे प्रोसेसर, रॅम, स्क्रिन साइज, इंटरनल मेमरी, कॅमेरा परफॉर्मन्स, वॉटर तसेच डस्ट रजिस्टंट, फिंगरप्रिंट स्कॅनरसारख्या सुविधाही मोबाइलमध्ये ग्राहक शोधत असतात.

----.

यंदाही मोबाइल विक्रीवर ऑनलाइन कंपन्यांचे सावट आहे. मात्र यंदा मोबाइल विक्रेत्यांनीही ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्याची तयारी केली आहे. उत्कृष्ट सेवा, सुविधा देण्याचे काम दुकानदारच अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. विविध कंपन्यांच्या मोबाइल खरेदीला ईएमआयची सुविधा आहे. शिवाय यंदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइलशी संबंधित असलेल्या वस्तू भेट स्वरुपात देत आहोत.

-ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, उपाध्यक्ष, औरंगाबाद मोबाइल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षित दिवाळी साजरी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळीची लगबग सुरू झाली असून यानिमित्त रोषणाई केली जाते. शिवाय विजेचा वापरही वाढतो. त्यामुळे दिवाळी साजरी करताना सुरक्षा उपायांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, असे आवाहन महावितरणने केले आहे.

दिवाळीनिमित्त होणारी सजावट, रोषणाई, आतषबाजी यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे आनंदावर विरझण पडते. केवळ आर्थिकच नव्हे तर जीवितहानीसुद्धा होते. सुरक्षेची खबरदारी केल्याने त्या टाळता येऊ शकतात. फटाके उडवतानाही काळजी न घेतल्याने दुर्घटना घडतात. घराची उजळवण्यासाठी मोकळ्या जागेतच दिवे लावावेत, पडदे, बिछान्यापासून ते लांब ठेवावेत. मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर आणि उंचीवर तसेच पंखे, विजतारांपासून दूर ठेवावेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा. तुटलेल्या वीज तारा वापरू नयेत, जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशनची टेप वापरावी, तुटलेले सॉकेट्स वापरू नयेत, घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत, असे आवाहन केले आहे.

\Bफटाके फोडताना ही काळजी घ्या \B

- मोकळ्या मैदानात फटाके उडवावेत

- वीज तारांजवळ फटाके उडवू नयेत

- विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नयेत

- विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये

- रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे, त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात.

- फटाक्यांचा कचरा वीज यंत्रणेजवळ फेकू नका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात ढगाळ वातावरण

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐन पावसाळ्यात गायब झालेला पाऊस आणि वाढलेल्या उकाड्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीय त्रस्त झाले असताना रविवारी (४ नोव्हेंबर) सकाळी शहरवासीयांना ढगाळ वातावरण अनुभवण्यास मिळाले. दरम्यान, सिडकोमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्यामुळेही वातावरणात गारवा निर्माण झाला.

गेल्या काही दिवसांपासून शहरात दिवसा उनाचा तडखा, पहाटे व संध्याकाळी थंड बोचरा वारा वाहत आहे. त्यातच रविवारी ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये तापमानाचा पारा घसणार असल्याने थंडीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पाच ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये औरंगाबाद शहराचे किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्यिसस असे राहण्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस लाख पळवणाऱ्या आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजआधारे शोध सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एपीआय कॉर्नर भागात व्यापाऱ्याचे ३० लाख रुपये कारमधून पळवल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. या भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून दुचाकीवर असलेल्या दोन संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. वाळूज येथून या संशयितांनी कारचा पाठलाग केल्याची शंका पोलिसांना वाटत आहे.

मनोज बाजीराव गटकाळ (वय ४८, रा. पाचोड) यांनी शनिवारी दुपारी एएस क्लबजवळून अशोक तुपे यांच्याकडून ३० लाख रुपयांची रक्कम घेतली होती. ही रक्कम त्यांनी कारमधील गियर बॉक्सजवळील कप्प्यात ठेवली होती. दुपारी अडीच वाजता ते भारत बाजार येथील त्यांच्या कार्यालयात आले होते. कारमध्ये रक्कम तशीच ठेऊन त्यांनी कार मेरिडीयन कोर्ट हॉटेलच्या भिंतीजवळ उभी केली होती. चोरट्यांनी कारची काच फोडून आतील रक्कम लंपास केली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये एका दुचाकीवर दोन संशयित आरोपी आढळून आले. या संशयित आरोपींनी एएस क्लबपासूनच गटकाळ यांचा पाठलाग केल्याचा संशय आहे. या संशयितांच्या दुचाकीला नंबलप्लेट देखील नसल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळी पाडव्यानिमित्तम्युझिकल दिवाळी पहाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळी पाडव्यानिमित्त गुरुवारी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी मराठी, हिंदी गाणी पूर्णच होऊ शकणार नाहीत अशी वाद्य व वाद्यवृंदांसह गीत संगीताची म्युझिकल दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुरुवारी (८ नोव्हेंबर) पहाटे पावणेसहा वाजता हा कार्यक्रम सिडको येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृह येथे होणार आहे. यंदा म्युझिकल पहाटमध्ये सेक्सोफोन, ट्रम्पेट, साइड रिदम, व्हायोलिन, सिंथेसायझर आणि अकॉर्डियन या वाद्यांची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे. कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे, सूर नवा ध्यास नवा या पर्वातील विजेता अनिरुद्ध जोशी; तसेच गायक राजेश अय्यर, कमिता राम आदी गायक यावेळी गाणी सादर करणार आहेत. राज्यातील घराघरात गेलेला कसदार अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या रंगतदार कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे.

कार्यक्रमाविषयी आमदार चव्हाण म्हणाले की, दिवाळी पाडव्याची पहाट अधि‌काधिक रंगतदार आणि मंगलमय व्हावी या उद्देशाने गेल्या १२ वर्षांपासून शहरात सुरू केलेली ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. दिवाळीनिमित्त सर्वांनी एकत्र जमावे, शुभेच्छा द्याव्यात हाच एकमेव हेतू कार्यक्रमामागे आहे. यंदा नवीन प्रयोग करत असून मराठवाड्यात सहसा न दिसणारी वाद्ये आणि वादकांनाही या दिवाळी पहाटला आमंत्रित केले आहे. यामध्ये नंदकुमार आंबतकर (सेक्सोफोन), राहुल नाईक (ट्रम्पेट), संतोष दिवेकर (साईड रिदम), जितू ठाकुर (व्हायोलिन), देवा बंगेरा (सिंथसाइझर), अनिल गोडे (अॅकॉर्डियन) आदी कलाकारांची जुगलबंदी रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून, याच्या प्रवेशिका आमदार चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

\Bपंडित ओक दांम्पत्याचा\B

दिवाळी पहाट कार्यक्रमात शास्‍त्रीय व सुगम संगीत क्षेत्रात दिलेल्या उल्लेनीय योगदानाबद्दल पंडित विश्वनाथ ओक व पंडित माधुरी ओक या दांम्पत्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. अशा भरगच्च कार्यक्रमासाठी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीसाठी बाजारात हजारोंची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने बाजारात खरेदीसाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. पैठणगेट, औरंगपुरा भागात गर्दीमुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले होते. ऑनलाइन खरेदीमुळे यावर्षी कापड व्यापाऱ्यांना मात्र मोठा फटका बसल्याचे दिसून आले.

वर्षातील महत्त्वाच्या दिवाळी सणाची लगबग सध्या सर्वत्र सुरू आहे. कपडा मार्केट म्हणून शहरातील पैठणगेट, टिळकपथ, सिटीचौक, गुलमंडी, निराला बाजार, मछली खडक ही बाजारपेठ प्रसिद्ध आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार हे तीन दिवस सलग सुटीचे आल्याने नागरिकांनी या भागात खरेदीसाठी गर्दी केली होती. रविवारी सकाळपासून पैठणगेट, औरंगपुरा ही बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली होती. रेडिमेड कपड्यांच्या दालनाकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर कल होता. विशेषत: लहान मुलांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी गर्दी केली होती.

ऑनलाइन खरेदीचा फटका

सध्या विविध कंपन्याच्या वतीने ऑनलाइन खरेदीवर मोठ्या प्रमाणवर सूट देण्यात येत आहे. चोखंदळ ग्राहकांचा देखील ऑनलाइन खरेदीकडे ओढा वाढला आहे. यंदा कपडा मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसून येत असली तरी ऑनलाइन खरेदीचा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसल्याची माहिती कपड्याचे व्यापारी युसूफ मुखाती यांनी दिली. दरवर्षी कपडा मार्केटमध्ये दिवाळीच्या काळात १०० कोटींची उलाढाल होते. यंदा मात्र याचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता देखील मुखाती यांनी व्यक्त केली.

रस्ते बंद

पैठणगेट ते सिटीचौक परिसरात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणवर कोलमडली. वाहनांचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने या भागातील वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. पैठणगेट, महात्मा फुले चौक, बाराभाई ताजिया चौक, सिटी चौक आदी भागात बॅरिकेटस टाकून या मार्गाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.

पार्किंगची अडचण

रविवारी खरेदीसाठी हजारो नागरिकांची गर्दी पैठणगेट, औरंगपुरा भागात झाली. विविध भागातून नागरिक खरेदीसाठी आले होते. पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना वाहने उभे करण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या. पैठणगेट येथील सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था तोकडी पडली. नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीचा बाह्यरुग्‍ण विभाग येत्या शुक्रवारी बंद

$
0
0

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय शुक्रवारी (नऊ नोव्हेंबर) भाऊबीजेनिमित्त व ११ नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे बंद राहणार आहे. त्याचबरोबर दहा व १२ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही दिनात ११ तक्रारी

$
0
0

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (पाच नोव्हेंबर) झालेल्या लोकशाही दिनात ११ तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये जिल्हा परिषद एक, महसूल विभागाच्या पाच, जलसंपदा विभाग एक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण एक, पोलिस दोन; तसेच इतर विभागाची एक अशा एकूण ११ तक्रारी दाखल झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रिया मशीन चाचणी यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या श्रेडिंग, बेलिंग आणि स्क्रिनिंग मशीनची सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. या मशीनच्या माध्यमातून चिकलठाणा येथील साइटवर रोज १८ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी प्राप्त झालेल्या या मशीन शेवटी कार्यान्वित झाल्या.

कचराकोंडी फोडण्यासाठी शासनाच्या मदतीने महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. या अहवालात नमूद केल्यानुसार कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी झोन कार्यालयनिहाय श्रेडिंग, बेलिंग आणि स्क्रिनिंग मशीन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या तीन मशीन एका झोन कार्यालयात बसवण्यात येणार आहे. मशीनचा पहिला सेट दीड महिन्यापूर्वी महापालिकेला प्राप्त झाला. आवश्यक ते बांधकाम करून मशीन सुरू करण्यासाठी सोमवारचा दिवस उजाडला.

महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या उपस्थितीत या तिन्ही मशीनची चाचणी घेण्यात आली. यावेळी स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, सभागृहनेते विकास जैन, विरोधी पक्षनेते जमीर कादरी, नगरसेवक राजू शिंदे, मकरंद कुलकर्णी, गोकळसिंह मलके, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह वॉर्ड अधिकारी उपस्थित होते.

तिन्ही मशीन्सच्या माध्यमातून दररोज १८ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, तर सुक्या कचऱ्याच्या लाद्या बांधून त्यांची विक्री केली जाणार आहे. हर्सूल येथील साइटवर शेड बांधण्याचे काम सुरू आहे. पडेगाव येथील साइटवर शेड बांधण्यासाठी उद्या कंत्राटदारांना मार्कआउट दिले जाणार आहे, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. महापौरांनी मशीनबद्दल समाधान व्यक्त केले. कंत्राटदाराचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी सुहास दाशरथे, पप्पू व्यास, अनिल पोलकर उपस्थित होते.

मटा भूमिका

\Bकचराकोंडी फुटू लागली\B

तब्बल नऊ महिन्यांनंतर कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. नऊ महिन्यांत केवळ 'माझे काय?' या वृत्तीमुळे मशीन खरेदीची प्रक्रिया आडली होती. औरंगाबाद खंडपीठाने वारंवार आदेश देऊनही महापालिकेचे प्रशासन अंमलबजावणी करण्यात कमी पडले, ही बाब शरमेची आहे. कोर्टाचे आदेश ते मानत नव्हते. नारेगावचा कचरा डेपो बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर औरंगाबाद शहरात कचराकोंडी निर्माण झाली. १६ फेब्रुवारीपासून ही कोंडी सुटत नव्हती. आता मशीन सुरू झाल्यामुळे ती सुटण्यास सुरुवात झाली आहे. कंम्पोस्ट पिटवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला, परंतु यश मिळाले नाही. कचरा प्रश्न सुरू झाल्यापासून दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे बळी गेले. तरीही हा प्रश्न सुटला नाही. मुख्यमंत्र्यांनीही आदेश देऊनही पालिकेचे प्रशासन हालले नाही. तीन दशकांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेचे हे अपयश होते. त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना औरंगाबादकरांची माफी मागावी लागली. या माफीनंतरही शिवसेनेचे पदाधिकारी हालले नाहीत. प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मशीन खरेदी झाली. आता औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न लवकर सुटण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

$
0
0

औरंगाबाद

नेहरू युवा केंद्राच्यावतीने दरवर्षी युवा, महिला, क्रीडा मंडळाला जिल्हा युवा मंडळ पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी युवा मंडळांनी २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक अरुणा कोचुरे यांनी केले आहे.

१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात युवा मंडळाने युवा विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये व सन्मानपत्र असे आहे.

अर्जाबरोबर मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र, घटना, आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा पुरावा, लेखापरिक्षण अहवाल व ग्रामपंचायत कार्यालयाच्या शिफारशीसह सर्व सदस्यांचे आधारकार्ड व जन्मतारीख पुराव्यासह अर्जासोबत सादर करावेत. पूर्ण भरलेले अर्ज नेहरू युवा केंद्र, युथ हॉस्टेल इमारत, स्टेशन रोड, बाबा पेट्रोल पंपजवळ, औरंगाबाद, येथे स्वत जमा करावेत, या संधीचा युवक, क्रीडा मंडळानी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकावरून येणारा धोकादायक औषधीचा साठा जप्त, एकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मानवी शरीरास धोकादायक असलेल्या औषधी व गोळ्यांचा साठा कर्नाटकावरुन मागवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. सोमवारी पहाटे आकाशवाणी चौकात ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून निट्राझेपम टॅबलेटसच्या चौदाशे गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी पहाटे एका संशयित आरोपीने कनार्टकावरून धोकादायक औषधीचा साठा मागवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून आकाशवाणी चौकातील एसएफएस शाळेजवळ सापळा रचण्यात आला होता. साडेसहा हुबळी औरंगाबाद बस आकाशवाणी चौकात आली. यावेळी यामाहा दुचाकीवर आलेल्या संशयित आरोपीने औषधींचे पार्सल ताब्यात घेतले. पार्सल ताब्यात घेताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. या संशयित आरोपीचे नाव बबलू शेख बन्ना (वय ३५, रा. संजयनगर, बायजीपुरा) असल्याची माहिती चौकशीत समोर आली. आरोपीच्या ताब्यातून दुचाकीसह १४०० गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घनश्याम सोनवणे, अन्न व औषधी निरीक्षक राजगोपाल मूलचंद बजाज, पोलिस नाईक विजयानंद गवळी, सचिन नागरे, अविनाश जोशी, सुखानंद पगारे, समाधान काळे, अर्चना पवार आणि मनिषा जगताप यांच्या पथकाने केली.

चौकट

रेकॉर्डवरील गुन्हेगार

आरोपी बबलू हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर जिन्सी, छावणी आणि जवाहरनगर पोलिस ठाण्यात विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या औषधीची विक्री तो कोठे करणार होता याची चौकशी पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images