Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मटा राउंड टेबल: कारणे नकोत, जनतेला पाहिजे पाणी

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

\Bनागरिकांना कोणतेही कारणे नकोत, त्यांना पाणी हवे आहे. महापालिकेने कारणांची जंत्री न मांडता पाणी पुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा भावना 'मटा राउंड टेबल'मध्ये व्यक्त झाल्या. शहरातील अभूतपूर्व पाणीबाणीमुळे जनता त्रस्त झाली असून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'मटा राउंड टेबल'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर भगवान घडमोडे, माजी सभापती व विद्यमान नगरसेवक राजू शिंदे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, अजीम खान, 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी, माजी नगरसेवक समीर राजूरकर, रवी कावडे, लायन्स क्लबचे शेख अहेमद, कामगार नेते कृष्णा बनकर, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किरण धांडे हे उपस्थित होते. पाणीप्रश्नावर त्यांनी आपापली बाजू मांडली. \B

\Bमहापालिका नियोजनात कमी पडते \B

पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात महापालिका कमी पडत आहे, हे मान्य करावेच लागेल. अधिकाऱ्यांची आपसातील भांडणे देखील त्याला कारणीभूत आहेत. कर्मचाऱ्यांवर होत असलेले हल्ले ही चिंतेची बाब आहे. हल्ल्यांमुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मनोधैर्य कमी होते. सध्या शहरात पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. पोलिस बंदोबस्तात काम करणे भूषणावह नाही. सर्वच वॉर्ड पाण्याच्या कमतरेमुळे त्रस्त आहेत. सिडको एन ५च्या जलकुंभावर पाणी नसणे, ही आत्मपरिक्षणाची बाब आहे. सिडको एन ५ व एन ७च्या जलकुंभावरून होणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी विशेष अधिकारी असला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याबद्दल आयुक्तांना पत्र देखील देणार आहे. कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले, पाण्यासाठी नगरसेवकांना करावे लागणारे उपोषण यातून मार्ग काढावा लागेल. नक्षत्रवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत आणि शहर ते सिडको एन ५पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल याचा अभ्यास करण्याचे डॉ. राजेंद्र होलानी यांना सांगण्यात येईल. या संदर्भात आयुक्त हे डॉ. होलानी यांना योग्य त्या सूचना देतील. पाण्याचे संकट ऐन सणात आले आहे. सर्वांनाच पाणी मिळाले पाहिजे. काही नागरिक तुपाशी तर काही उपाशी, असे नको. नक्षत्रवाडी येथे १२५ एमएलडी पाणी येते, हे पाणी पुढे कोठे मुरते हे तपासायला सांगितले आहे. आवश्यक अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करून देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. हर्सूल तलावातून रोज पाच एमएलडी, तर नहरींमधून दीड एमएलडी पाणी मिळत होते. पाण्याचे हे दोन्हीही स्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे जायकवाडीच्या पाण्यावरचा भार वाढत आहे. एक्स्प्रेस जलवाहिनीवरून एक दिवस पूर्णपणे सिडको-हडको भागाला पाणीपुरवठा करण्याचा व दुसऱ्या दिवशी अन्य भागाला पाणी पुरवठा करण्याचा विचार करता येईल.

-नंदकुमार घोडेले, महापौर

\Bमहापालिकेचा नियोजन शून्य कारभार\B

नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. जनता पाण्यासाठी त्रस्त आहे. पाणी पुरवठ्याच्या वेळा निश्चित नाहीत. लोकांना पाणी हवे आहे, कारणे नकोत. शहरासाठी येणारे पाणी जाते कोठे हेच कळत नाही. वॉशिंग सेंटर, सर्व्हिस सेंटर्स, हॉटेल्सला होणारा पाणी पुरवठा तपासला पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एक्स्प्रेस जलवाहिनीवरून पाणी घेतले जात असल्याने सिडको- हडकोला सर्वात जास्त गॅप आहे. नक्षत्रवाडी येथील एमबीआर (संतुलित टाकी) भरला जात नाही. एमबीआर भरला, तर सर्वांना मुबलक पाणी मिळेल. महापालिकेत मोठ्या प्रमाणावर आउट सोर्सिंगचे कर्मचारी आहेत. त्यातील बहुतेक कर्मचारी हे अधिकाऱ्यांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे ते काहीच काम करीत नाहीत. महापालिका प्रशासनाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही. शहरातील काही वॉर्डामध्ये दोन दिवसाआड, काही वॉर्डांत तीन दिवसांआड, तर काही वॉर्डांमध्ये सात-सात दिवस पाणी मिळत नाही. बिल्डर्सच्या वसाहतींना पाणी मिळते. त्यांना मुख्य जलवाहिनीवरून कनेक्शन दिले जाते. सर्वसामान्यांच्या वसाहतींना मात्र पाणी मिळत नाही. आपले शहर चांगले आहे, ते चांगलेच राहिले पाहिजे. समांतर जलवाहिनीची योजना चांगली आहे. पण त्या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्या मानवनिर्मित जीर्ण झाल्या आहेत. एमआयडीसीची जलवाहिनी त्याच काळात तयार करण्यात आली, ती जलवाहिनी चांगली आहे आणि महापालिकेच्या जलवाहिन्या इतक्या जीर्ण कशा झाल्या याचाही विचार झाला पाहीजे.

-भगवान घडमोडे, माजी महापौर

\Bसमांतर जलवाहिनी शिवाय पर्याय नाही \B

औरंगाबाद शहरासाठी जायकवाडीहून टाकलेल्या दोन्हीही जलवाहिन्यांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. काहींना वाटते समांतर जलवाहिनीसाठी पाण्याची ओरड सुरू आहे. समांतर जलवाहिनीची योजना करणे गरजेचे आहेच. कुणाच्या माध्यमातूनही समांतरची योजना करावी, अशी आमची भूमिका आहे. शहरात ७० किलोमीटरची पाइपलाइन जास्तीची टाकण्यात आली आहे, ती टाकताना पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे पाणी देता येत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. समांतर जलवाहिनीशिवाय शहराची तहान भागणार नाही. अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत आणि शहर वाढत आहे, त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे.

-कृष्णा बनकर, कामगार नेते

\Bसमांतर जलवाहिनीचे नाव बदला \B

समांतर जलवाहिनी हा शब्द बदनाम झाला आहे, असे वाटते. त्यामुळे समांतर जलवाहिनी हा शब्द बदलून 'नवीन जलवाहिनी योजना' असे नाव करा आणि हे काम लवकर पूर्ण करा. महापालिकेत मधल्याकाळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी अनागोंदी पद्धतीने पाइपलाइन टाकल्या. या पाइपलाइन टाकल्यामुळे पाणीपुरवठा योजनेवर प्रशासनाचे नियंत्रण राहिले नाही. नियंत्रणाबाहेर ही यंत्रणा गेली आहे, शिवाय पाणीपुरवठा विभागाला कर्मचारी कमी आहेत. शहरात येणारे पाणी वाढत नाही तोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव प्रशासनानेच मांडला होता. तो रद्द करण्याचा प्रस्ताव देखील प्रशासनाने मांडला होता. समांतर जलवाहिनीचे काम होणे गरजेचे आहे. कुणालाही या योजनेचे काम द्या पण समांतर जलवाहिनीचे काम लवकर करून घ्या. हे काम करताना जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत प्राधान्याने काम करण्यात यावे. मिटरने पाणी घेण्याची मानसिकता लोकांनी केली पाहिजे. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प मंजूर होऊन दहा वर्षे झाली, आता किती दिवस या प्रकल्पाची वाट पहायची.

-समीर राजूरकर, माजी नगरसेवक

\Bनागरिक वेठीस धरले जातात\B

लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून नागरिकांना वेठीस धरतात. नागरिकांना सोयी-सुविधा हव्या असतात. त्या त्यांना मिळत नाहीत. आजही अनेक भागात टँकर बंद आहेत. मागणी करूनही नागरिकांना टँकर मिळत नाहीत. नगरसेवक अधिकाऱ्यांना बळी पडतात. शहरात निर्माण झालेल्या पाणीबाणीला अधिकारी जितके जबाबदार आहेत तितकेच नगरसेवक देखील जबाबदार आहेत. शहरासाठी समांतर जलवाहिनी गरजेची आहे, पण त्यात जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे मूळ काम सोडून शहरातील पाणीपट्टी वसुलीचे काम त्या कंपनीला देण्यात आले. त्यामुळे सगळे गणित बिघडले. समांतर जलवाहिनी ही योजना झाली तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. कोणाच्याही माध्यमातून या योजनेचे काम करा.

-शेख अहेमद, सदस्य, लायन्स क्लब

\Bसोळाशे ठिकाणी वेल्डिंग\B

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत सध्या अस्तित्वातील जलवाहिनींना सोळाशे ठिकाणी वेल्डिंग करण्यात आले आहे. जलवाहिन्या शरपंजरी पडल्या आहेत. दर माणसी १३५ लिटर पाणी मिळाले पाहिजे, सध्याच्या स्थितीत तेवढे पाणी मिळत नाही. पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढीचा मुद्दा आणि समांतर जलवाहिनीचा मुद्दा यांच्यात परस्पर काही संबंध नाही. उपविधींमुळे पाणीपट्टीत दहा टक्के वाढ नंतर करण्यात आली. शहरात येणाऱ्या पाण्यात तब्बल ३० टक्के गळती आहे. सुमारे ५० टक्के लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याची यंत्रणा सुधारली पाहिजे. पाणी किती येते आणि पाण्याचे किती वाटप होते, याचा हिशेब ठेवला गेला पाहिजे. मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन्स घेतल्यामुळे जलकुंभ भरत नाहीत. त्यामुळे नागरिकांना ग्रॅव्हिटीने (गुरूत्वाकर्षणाने) पाणी देता येत नाही. पाणीपुरवठा यंत्रणेवर प्रशासनाचे योग्य प्रकारे नियंत्रण असले पाहिजे.

-राजेंद्र जंजाळ, नगरसेवक

\Bयंत्रणा सुधारणे गरजेचे\B

पाणी पुरवठ्याची यंत्रणा सुधारणे गरजेचे आहे. शहराला २७८ एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात १२५ एमएलडीच पाणी मिळते. १२५ एमएलडीतून एक दिवसाआड पाणी देणे शक्य आहे. त्यादृष्टीने नियोजन झाले पाहिजे. सिडको-हडको भागासाठी ३० ते ३२ एमएलडी पाण्याची गरज आहे, पण तेवढे पाणी मिळत नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कर्मचारी कमी आहेत. आठ ते नऊ उपअभियंते, ४० शाखा अभियंत्यांची गरज आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्याबद्दल विचार करताना कर्मचारी भरतीचाही विचार झाला पाहिजे. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प चांगला होता. बारकाईने अभ्यास केल्यानंतर या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्यात नंतर बदल होत गेले. समांतरच्या कंपनीकडून अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे काम करून घेतले नाही. कंपनीच्या काळात शहरात १३०० किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात आली. यापैकी एकही पाइप हायड्रॉलिक पद्धतीने टाकण्यात आला नाही. विस्कळीत पाणी पुरवठ्याचा विचार करताना समांतर जलवाहिनीचा विचार करावाच लागतो. कारण सध्या ३० टक्के पाणी गळती आहे. एकूणच पाणी पुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे असून यंत्रणेत सुधारणा होणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा व्यवस्था सुधारायची असेल तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम केलेल्या व करणाऱ्या आजी-माजी अधिकाऱ्यांची बैठक घेतली पाहिजे. त्यांच्या सूचना लक्षात घेऊन नियोजन केले पाहीजे.

-राजू शिंदे, नगरसेवक

\Bनियोजनाचा अभाव \B

पाणीपुरवठा यंत्रणेत नियोजनाचा अभाव आहे. पूर्वी पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत होता आताच त्यात अडचणी कशा काय निर्माण होत आहेत याचा सखोल विचार केला पाहिजे. नियोजन बिघडलेले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहराची लोकसंख्या, शहरात येणारे पाणी याचा विचार करून योग्य प्रकारे नियोजन केले पाहिजे. शहागंज येथील जलकुंभावर भीषण स्थिती आहे. या टाकीवरून १७ वॉर्डांना पाणीपुरवठा केला जातो. सर्वच वॉर्ड पाणी पुरवठ्याबद्दल असमाधानी आहेत. समांतर जलवाहिनीसाठी नेमलेल्या कंपनीने आपल्या मर्जीनुसार काम केल्यामुळे ही स्थिती निर्माण झालीआहे. खासगीकरणातून काहीही साध्य झालेले नाही.

-नासेर सिद्दिकी, गटनेता, एमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नशेच्या गोळ्या विक्री करणारा बबलूला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परराज्यातून पार्सलद्वारे आणलेल्या नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी जवळ बाळगणारा आरोपी शेख बबलु शेख बन्न (३५, रा. संजयनगर, बायजीपुरा) याला पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता १२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी मंगळवारी दिले.

या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक राजगोपाल मुलचंद बजाज यांनी तक्रार दिली. नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या शेख बबलू शेख मुन्ना हा अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधारे त्यांनी पोलिसांनी जालना रोडवरील एसएफएस शाळेसमोर सापळा रचून शेख बबलू याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांचे पार्सल सापडले. ते पार्सल त्याने कर्नाटक महामंडळाच्या बसमधून नुकतेच घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दुचाकी, दोन मोबाइल, नशेच्या गोळ्या असा एकूण ५० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष सहायक सरकारी वकील नितीन जाधव यांनी आरोपीने कर्नाटक राज्यातील साथीदाराकडून नशेच्या गोळ्या मागविल्या. त्या साथीदाराचा शोध घेणे आहे. आरोपी शहरात कोणाला नशेच्या गोळ्या विक्री करणार होता याचा तपास करणे आहे. नशेच्या गोळ्या विक्री करण्यासंबंधी आरोपीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. तसेच नशेच्या गोळ्याचे पार्सल हके कर्नाटक राज्यातील लोकापूर बसस्थानकावरील हुबळी-औरंगाबाद बसमध्ये टाकण्यात आल्याने, पार्सल टाकरणार्‍याचा शोध घेऊन त्याला अटक करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात मराठवाड्यातील ६८ मंडळांचा समावेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसामुळे राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सरकारने आणखी २५८ महसुली मंडळांचा समावेश केला असून यामध्ये मराठवाड्यातील ६८ मंडळांचा समावेश आहे. या मंडळांमध्येही आता दुष्काळी परिस्थितीमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलती देण्यात येणार आहेत. या संदर्भात मंगळवारी अध्यादेश जारी करण्यात आला.

दुष्काळग्रस्त मंडळांच्या यादीत लातूर जिल्ह्यातील ४२, नांदेड १४, परभणी ८, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी २ मंडळांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी, पांगरी या मंडळांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील लातूर, बाभुळगाव, हरंगुळ, मुरूड, गातेगाव, तांदूळजा, चिंचोली., औसा तालुक्यातील लामजना, औसा, मातोळा, भादा, बेलकुंड, किन्नीथोट, किल्लारी., अहमदपूर तालुक्यातील खंडाळी, अहमदपूर, आंदोरी, शिरूर, हाडोळती., निलंगा तालुक्यातील पानचिंचोली, औराद, अंबुलगा, मदनसुरी, कासारशिरसी., उदगीर तालुक्यातील उदगीर, नागलगाव, नळगीर, मोघा, हेर, देवर्जन., चाकूर तालुक्यातील चाकूर, नळेगाव, वडवळ, शेळगाव, झरी., रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, कारेपूर., देवणी तालुक्यातील देवणी, बोरोळ, वलांडी तर जळकोट तालुक्यातील जळकोट आणि घोणसी मंडळाचा समावेश झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील १४ मंडळांमध्ये बिलोली तालुक्यातील बिलोली, सगरोळी, कुंडलवाडी, आदमपूर., लोहा तालुक्यातील लोहा मंडळ., हदगाव तालुक्यातील मनाठा., किनवट तालुक्यातील इस्लामपूर, जलधरा, शिवणी., नायगाव तालुक्यातील कुंटूर, नरसी, मांजरम., धर्माबाद तालुक्यातील करखेली, जारीकोट तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माहातपुरी, माखणी, राणीसावरगाव, जिंतूर तालुक्यातील जिंतूर मंडळ, बोरी, आडगाव, चारठाणा., पूर्णा तालुक्यातील लिमला. तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव आणि टेंभूर्णी मंडळाचा समोवश करण्यात आला आहे.

सवलती मिळणार

दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुका तसेच महसुली मंडळांमध्ये शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सवलती लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाच्या वीज जोडणी खंडित न करणे आदी सवलती देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुलंद छावा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

0
0

औरंगाबाद : बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या १४व्या दिवाळी विशेषांक २०१८चे बद्रीनारायण खराद यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रभाकर मते, प्रदेश सचिव सुरेश वाकडे, प्रदेश उपाध्यक्ष सतीश वेताळ, प्रशांत शेळके यांची यावेळी उपस्थिती होती. बुलंद छावा मराठा युवा परिषदेतर्फे १३ वर्षांपासून दिवाळी अंक व दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येते. या कार्यक्रमास बुलंद छावाचे प्रदेश संघटक मनोज गायके, संघटक ज्ञानेश्वर बोरूडे, साहेबराव मुळे, ज्ञानेश्वर जाधव, के. बी. येळीकर, विलास उबाळे, धृपत निकम, रामेश्वर राजगुरे, मिलिंद साखळे, देविदास काळे, योगेश देशमुख, प्रदीप हारदे, संदीप शेळके, कृष्‍णा बोरसे, दिलीप जाधव, शिवाजी पळसकर, रतन काळे, गिरीश झाल्टे, श्रीकांत गाडेकर, जनार्दन निकम, जयवंत मोटे, महेश वाकडे, उमेश वाकडे आदींच उप‌िस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये?

0
0

Vijay.deulgaonkar@timesgroup.com

'असा गेलो आहे बाळा पुरा अडकून

हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून

असा कसा बाबा देव लेकराला देतो

लवकर जातो आणि उशिरा येतो

तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ?

मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?

सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ?

असे प्रत्येक पोलिसाला वाटत असेल, नाही का? सण नाही, वार नाही. घरात आनंदाचा कुठला क्षण साजरा करणे माहित नाही. घरातून निघतात तेव्हा लेकरं घरात नसतात, किंवा झोपलेली असतात. मग त्यांच्या विचार करणार कोण...हा प्रश्न त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना विचारला तर ते फक्त तुमचा आनंद आमचा आनंद म्हणतात...

'आमच्यासाठी पोलिस व्हॅनवरील लुकलुकणारा दिवा म्हणजे आकाश कंदील....आमच्यासाठी पोलिस व्हॅनचे वाजणारे सायरन म्हणजे फटाके...आमच्यासाठी तुमचा सण म्हणजेच आमचा सण...' सध्या हा मेसेज व्हॉटस् अपवर येऊन धडकतो आहे. आणि आपल्या डोळ्यांच्या कडा आपल्याही नकळत पाणावतात...खरंच चोवीस तास बंदोबस्त...होळी, ईद, गणेशोत्सव, नवरात्र, नाताळ वर्षभर कुठलाही सण असो की उत्सव. त्यांना कुटुंबासमवेत एकत्र दिवस घालवणे शक्यच नाही. दिवाळी हा तर वर्षातील सर्वात मोठा सण. पोलिस दल वगळता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना या काळात सुट्या असतात. खासगी औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी देखील या काळात सुटीवर असतात. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांना सणाचा आनंद लुटणे सहजासहजी शक्य होत नाही. इतर कुटुंबीयाप्रमाणे पोलिसांच्या कुटुंबीयाला देखील आपण पती, मुलासोबत सहकुटुंब सण साजरा करावा वाटणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांना ते शक्य नसते. याबाबत पोलिसांच्या कुटुंबीयासमवेश संवाद साधला. तेव्हा त्यांची घालमेल दिसून आली. एकीकडे कुणाचे बाबा, कुणाचे पती घरात नसतात तेव्हा आनंदाची उधळण होते. याची त्यांना खंत वाटतेच. सोबत त्यांच्यामुळे अख्खे शहर बिनधास्त सण साजरा करते, याचा त्यांना आनंदही वाटतो.

\Bचित्रपट, नाटक, नाहीच!

\Bदिवाळीच्या सुट्यात हमखास एखादा चित्रपट पाहायचे ठरते. सगळे कुटुंबीय एकत्र असतात. मात्र, घरातले बाबाच सोबत नसतात. असेच इतर अनेक बाबतीत घडते. खरे तर त्यांचे असून नसणे खूप बोचणारे असते. शाळेतली एखादी पालक मिटिंग असो, की बक्षीस मिळाल्यानंतर त्यांची उपस्थिती असणे असो. ते कायम नसतात. मात्र, मनान ते कायम सोबत असतात, अशी भावना पोलिस कुटुंबातील मुलांनी बोलून दाखवली.

\Bपोलिस कुटुंबीय म्हणतात...

\B

सहकुटुंब पती, मुलासह सण साजरा करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र पोलिस खात्यात ही बाब बंदोबस्तामुळे शक्य नाही. या बंदोबस्तामुळे शहरातील नागरिक सुरक्षित सण साजरा करतात. आपले पती त्याचा एक भाग आहेत. याचे मनापासून समाधान वाटते.

- अरुणा दादासाहेब झारगड

पोलिस खात्यातील सेवा म्हणजे देशसेवेचा एक भाग आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस कटिबद्ध आहेत. प्रत्येक सण एकत्रित साजरा होत नाही, असे कधी घडत नाही. सणाच्या वेळी बंदोबस्त असला तरी कर्तव्याला प्रथम मान देऊन सणाचा आनंद साजरा करण्यात येतो.

- वृषाली जगदीश सालेसा

सणाच्या आनंदापेक्षा कर्तव्याला प्राधान्य आहे. एखादा सण बंदोबस्तामुळे एकत्र सहकुटुंब साजरा करता आला नाही, तरी त्याची उणीव पुढील सणाच्या वेळेस भरून काढता येते. आमच्या पतीच्या नोकरीमुळे इतर बिनधास्त असतात. याचा आनंदही आम्हाला खूप मोठा आहे.

- सीमा गणेश वाघ

पतीच्या पोलिस बंदोबस्ताची आता सवय झाली आहे. पोलिस दलात ही सवय अंगवळणी पडायला हवी. मुलांना देखील याची सवय लागते. सुटीच्या दिवशी कुटुंबासोबत आनंदाचे सण साजरे करण्यात येतात. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलिस बंदोबस्त देखील महत्वाचा आहे.

- आशा विनोद सातदिवे

वडिलांना अनेक वेळा सणाच्या वेळी बंदोबस्ताला जावे लागते. लहान असताना ही गोष्ट समजत नव्हती. पोलिस बंदोबस्तामुळेच अनेक वेळा सणाच्या काळात अनुचित घटनांवर अंकुश निर्माण होतो. आपल्या वडिलांचा देखील या बंदोबस्तात सहभाग असल्याचे पाहून चांगले वाटते.

- सुमित राजेंद्र साळुंके

विवाहानंतर पतीची पोलिसांची ड्युटी काय असते याची प्रचिती आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असलेल्या या खात्यात सणावाराला बंदोबस्त असणारच. पती बंदोबस्तात असले तरी त्यांच्यामुळे इतर नागरिक सुरक्षित सण साजरा करतात याचा अभिमान वाटतो.

- सोनाली महेश उगले

पोलिस खाते म्हटले की कर्तव्य प्रथम करणे भाग आहे. सणावाराच्या काळातही हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचारी बंदोबस्तामध्ये उतरतो. यावेळी पोलिसांच्या पत्नींनी पुढाकार घेऊन सहकुटुंब सण साजरा करून पतीला कर्तव्यात मदत करणे अपेक्षित आहे.

- शिवज्योती विक्रम वाघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुन्हेगार प्रविण साबळे स्थानबध्द

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार प्रविण उर्फ पऱ्या सोपान साबळे (वय ३१ रा. गौतमनगर, आंबेडकरनगर) याला झोपडपट्टी दादा कायद्यानुसार एका वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी या संदर्भात आदेश जारी केले.

पऱ्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सिडको पोलिस ठाण्यात पोलिसांवर हल्ला करणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दंगल करणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे आदी कलमानुसार विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी त्याच्यावर यापुर्वी २००९ साली हद्दपारीची कारवाई तसेच २०१२ आणि २०१६ साली झोपडपट्टी दादा कायदानुसार स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्याच्यावर पुन्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, निर्मला परदेशी, पीएसआय भारत पाचोळे, जमादार द्वारकादास भांगे, नाना हिवाळे व अजय आवले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी दिव्यांतून लाखो रुपयांचा व्यवसाय

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस महासंचालकांनी सुरू केलेल्या 'होय आम्ही पोलिस कुटुंबीय' उपक्रमांतर्गत एकलव्य कर्ज योजना सुरू केली आहे. या कर्ज योजनेतून शहर पोलिस दलातील ३४ पोलिसांच्या पत्नीला प्रत्येकी दहा हजारांचे कर्ज देण्यात आले होते. या बिनव्याजी मिळालेल्या कर्जासोबत त्यांना एलईडी लाइट बनवण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले होते. या प्रशिक्षणातून महिलांनी एलईडी दिव्यांच्या माळा बनवत गेल्या चार महिन्यांत दोन लाखांचा व्यवसाय केला आहे.

संत तुकाराम नाट्यगृह येथे नुकत्याच झालेल्या प्रदर्शनात या महिलांनी तयार केलेल्या एलईडी दिव्यांच्या माळांची विक्री देखील करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सेंट फ्रान्सीस येथे देखील नुकत्याच भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात देखील या महिलांनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणामध्ये निर्मला महादेव सोळुंके, मंगला रमेश भरते, शांताबाई रेसवाल, चैताली बोरडे, वर्षा लबडे, भाग्यश्री मतलवार, मनिषा यंगुपटला; तसेच इतर महिलांनी माळा विक्री करून दर महिन्याला दहा ते पंधरा हजारांचा व्यवसाय केला आहे. त्याचप्रमाणे वर्षा लबडे आणि चैताली बोरडे यांना ५० हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज वाढवून देण्यात आले आहे. या महिलांनी मिलकॉर्नर, टीव्ही सेंटर; तसेच क्रांतीचौक पोलिस कॉलनीतील महिलांचे तीन गट तयार केले असून, त्या माध्यमातून एलईडी दिव्यांच्या माळांचा व्यवसाय करीत आहेत. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी यासंदर्भात महिलांना मार्गदर्शन करीत पाठपुरावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदनचोर ‘हर्सूल’मध्ये शिरले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल जेलच्या आवारातील उपमहानिरीक्षकाच्या बंगल्यासमोरील चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरून नेली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्सूल जेलच्या आवारात कारागृह उपमहानिरीक्षकाचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोरील बाजूस चंदनाचे झाड होते. सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवारी पहाटे सहा यादरम्यान चंदनचोरांनी कारागृहाच्या परिसरात प्रवेश केला. तीन हजार रुपयाचे हे चंदनाचे झाड बुडापासून तोडून त्यांनी चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी सकाळी सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी विशाल रमेश कटारे या जेल कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध चंदन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bपोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि हर्सूल जेल\B

औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षांपासून चंदनचोरांनी धुमाकूळ घातला आहे. चार वर्षांपूर्वी चक्क तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या बंगल्याच्या आवारात शिरून चंदनाचे झाड चोरून नेण्यात आले होते. चार महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या शासकीय बंगल्यात शिरकाव करून चंदनाचे झाड पळवण्यात आले होते. या गुन्ह्यातील टोळीला गुन्हे शाखेने पकडले होते. पोलिस आयुक्तालयाच्या बंगल्यासमोरील महावितरणच्या कार्यालयाच्या आवारातील चंदनाचे झाड देखील चोरट्यांनी पळवले आहे. यानंतर थेट कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या हर्सूल कारागृहाच्या आवारात शिरून चंदनाचे झाड पळवत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरट्यांची दिवाळीत हातसफाई सुरूच

0
0

(चोरट्याचे कार्टून वापरावे)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना चोरट्यांचा फटका बसत आहे. खरेदीसाठी आलेल्या दोन महिलांच्या पर्स लांबवण्यात आल्या. तसेच दोन घरफोड्यात ५० हजारांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पर्स पळविण्याची पहिली घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता सिटीचौक भागातील फॅशन कलेक्शन दुकानासमोर घडली. येथे एक महिला ग्राहक भावासोबत खरेदीसाठी आले होते. स्कुटीच्या हँडलला खरेदी केलेले सामान तसेच सोन्याच्या दागिन्याची पर्स लटकवेली होती. चोरट्यांनी ही पर्स लंपास केली. यामध्ये ५७ हजारांचे दागिने आणि इतर सामान असा एकूण सत्तर हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्स चोरीचा दुसरा प्रकार मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजता रॉक्सी टॉकीज ते तापडिया नाट्य मंदिराच्या रस्त्यावर घडला. मोहम्मद वसीम हैदर कलीम उल्ला त्यांच्या पत्नीसोबत दुचाकीवर जात होते. यावेळी पाठीमागून दुचाकीवर एक तरुण त्यांच्या जवळ आला. मोहम्मद वसीम यांच्या पत्नीच्या जवळ असलेली पर्स नकळत काढून घेऊन गेला. या पर्समध्ये सात हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची तिसरी घटना सोमवारी रात्री गांधीपुतळा, सराफा रोड भागात घडली. या ठिकाणी हबीब इक्रमोद्दीन मनियार हे राजस्थानी बांगडी विक्रेते राहतात. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारत आतमध्ये प्रवेश केला. घरातील बेडरुममध्ये ठेवलेले दोन मोबाईल, मंगळसूत्र, रोख रक्कम असा साडेबावीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट

फुले पडली २५ हजारात

रुमचा दरवाजा ओढून घेत देवासाठी फुले आणण्यासाठी गेलेल्या नागरिकाच्या घरात शिरून चोरट्यानी हँडसेट आणि लॅपटॉप असा २५ हजारांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान एकदंत अपार्टमेंट, श्रेयनगर, उस्मानपुरा येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी पवनकुमार ओमप्रकाश बियानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयशर ट्रकने मामा-भाचीला चिरडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळी साजरी करण्यासाठी गावाकडे भाचीसह जाणाऱ्या मामाला बुधवारी सकाळी एका भरधाव आयशर ट्रकने चिरडले. हा अपघात बुधवारी सकाळी वाळूज एमआयडीसी परिसरातील खोजेवाडी फाट्याजवळ झाला. या अपघातात दीपक पुनमचंद महेर (वय १८, रा. बेंदेवाडी ता. वैजापूर) हा जागीच ठार झाला असून भाची वैष्णवी गंभीर जखमी आहे. तिच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक महेर यांची बहीण जोगेश्वरीमध्ये राहते. दीपक तीन दिवसांपूर्वी दिवाळीनिमित्त बहिणीकडे आला होता. दिवाळीनिमित्त तो बुधवारी सकाळी भाची वैष्णवी हिला दुचाकीवरून घेऊन गावाकडे जात होता. मुंबई-नागपूर महामार्गावरून बेंदेवाडीकडे जाताना खोजेवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दीपक जागीच ठार झाला असून वैष्णवी गंभीर जखमी झाली. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी धाव घेऊन वाळूज एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. सहाय्यक फौजदार वडगावकर, सोनाजी बुट्टे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दीपकला मृत घोषित केले, तर वैष्णवीवर उपचार सुरू आहेत. मृत दीपकचा भाऊ कचरू महेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फौजदार लक्ष्मण उंबरे हे तपास करीत आहेत.

\Bबेंदेवाडीवर शोककळा \B

अपघातानंतर आयशर चालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला आहे. ऐन दिवाळीत तरुणाचे अपघाती निधन झाल्याने वैजापूर तालुक्यातील बेंदेवाडीवर शोककळा पसरली आहे. शिवाय मुंबई-नागपूर महामार्गावरील अनियंत्रित वाहतुकीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या २७ शाळांमध्ये स्वच्छतागृह

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी प्राधिकरणाच्या 'सीएसआर' फंडातून सत्तावीस शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या ७२ शाळा आहेत. त्यापैकी बहुतांश शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे. स्वच्छतागृह नसल्यामुळे प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि शिक्षिकांची कुचंबना होत आहे. महापालिकेकडे स्वच्छतागृह बांधण्यासाठी स्वतंत्र निधी नसल्यामुळे आर्थिक तरतूद करण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. ही बाब लक्षात घेवून सीएसआर फंडातून स्वच्छता गृह बांधण्याचा निर्णय पालिकेतर्फे घेण्यात आला. यासाठी विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क साधल्यावर प्राधिकरणाने 'सीएसआर' फंडातून निधी देण्याचे मान्य केले. विमानतळ प्राधिकरणाकडून महापालिकेला ८३ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. यापैकी ५४ लाख रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. विमानतळ प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या निधीतून २७ शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. 'सीएसआर' फंडातून बांधल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहांबद्दल महिला बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. माधुरी अदवंत यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा चार शाळेत काम पूर्ण झाले आहे. नऊ शाळांमध्ये काम प्रगतीपथावर आहे असे उत्तर कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांनी दिले.

\Bकाम वादात सापडणार

\Bअॅड. अदवंत यांनी सिडको एन ७ येथील शाळेत बांधण्यात येत असलेल्या स्वच्छतागृहाचे उदाहरण दिले. या ठिकाणच्या स्वच्छतागृहाचा उपयोग स्टोअर रुमसाठी केला जात असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. अन्य ठिकाणी देखील दर्जेदार काम होत नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. या आक्षेपाबद्दल अधिकाऱ्यांनी समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे हे स्वच्छतागृह येत्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

एखादी बाहेरची संस्था महापालिकेला एखाद्या विशिष्ट कामासाठी पैसा देते, तेव्हा त्या पैशाचा उपयोग योग्य प्रकारेच झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. जेवढा खर्च दाखवला जात आहे, तेवढा झालेलाच नसावा, अशी आमची धारणा आहे.

- अॅड. माधुरी अदवंत, सभापती, महिला बालकल्याण समिती, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त कामगारांच्या भेटीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्त कामगार, कर्मचाऱ्यांच्या भेटीला गेले. दिवाळीनिमित्त त्यांनी कामगार, कर्मचाऱ्यांना सहकुटुंब मिठाईचे वाटप केले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील विविध झोन कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना मिठाई दिली.

दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस आम्ही पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कामगार, कर्मचारी, साफसफाईचे काम करणारे कामगार यांच्यासोबत साजरा करणार आहोत, असे आयुक्त व महापौरांनी जाहीर केले होते. त्यानुसार आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा यादरम्यान विविध वॉर्डांमध्ये जाऊन कामगारांना मिठाईचे वाटप केले. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी डॉ. निधी विनायक, दोन मुले, स्वीयसहाय्यक सुनील ढेकळे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे होते. सुमारे २० वॉर्डांमध्ये जाऊन आयुक्तांनी कामगारांना सहकुटुंब मिठाईचे वाटप केले. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एखादा आयुक्त दिवाळीच्या सणात मिठाई घेऊन आल्यामुळे कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी विविध झोन कार्यालयात जाऊन कामगार, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप केले. आपले शहर, आपली महापालिका, असे मानून काम करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे आवाहन त्यांनी केले. स्थायी समितीचे सभापती रेणुकादास वैद्य यांनी संघर्षनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप केले.

\B'... कुणाला पैसे देऊ नका'

\Bअनेकांनी आयुक्तांबरोबर सेल्फी देखील काढला. काही कर्मचारी पालिकेच्या सेवेत अद्यापही कायम झाले नाहीत. त्यांनी याबद्दलची आपली व्यथा आयुक्तांकडे बोलून दाखवली. आयुक्तांनी त्यांना धीर दिला, 'तुम्ही सेवेत कायम व्हाल. त्याची चिंता करून नका, पण सेवेच कायम होण्यासाठी कुणाला पैसेही देऊ नका,' असे आवाहन त्यांनी कामगार, कर्मचाऱ्यांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलिप्रतिपदा, पाडवा!

0
0

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळाचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय, असे मानाले जाते. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त. 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस.

आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतात. या वह्या सुरू करण्यापूर्वी त्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. अनेक ठिकाणी नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते. यालाच दिवाळसण म्हणतात, अशी माहिती पुरोहित रामकृष्ण बारहाते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीडब्ल्यूडी’च्या निधीत ३० टक्के कपात?

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बजेटमधील कामांच्या निधीत ३० टक्के कपात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत ही कपात फक्त 'पीडब्ल्यूडी'मध्ये झाली असली तरी पुढच्या काही महिन्यात इतर विभागातही याची अंमलबजावणी होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

राज्यभरातील रस्ते बांधणी, दुरुस्ती, पूल दुरुस्तीसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. वर्षभरात महसुली विभागांतर्गत येणाऱ्या 'पीडब्ल्यूडी' विभागाला यंदा सहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यात 'पीडब्ल्यूडी'च्या लेखाशीर्षानुसार चार हजार ५४ तसेच याच हेडअंतर्गत तीन व चार मध्ये निधीचे नियोजन करण्यात येते. त्यातून प्रमुख राज्य रस्ते मार्ग दुरुस्ती, पूल दुरुस्ती, रस्ते बांधणीची कामे केली जातात. राज्यभरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव संकलित करून त्यासाठी एकत्र बजेटची तरतूद केली जाते.

वर्ष २०१८-१९ मध्ये रस्ते बांधणी, दुरुस्ती व पूल दुरुस्तीसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात मार्चमध्ये मंजूर बजेटच्या ७० टक्के निधी देण्यात येतो. जुलै महिन्यात २० टक्के, तर उर्वरित दहा टक्के डिसेंबरमध्ये वितरित केला जातो. पुरवणी मागण्यांमध्ये वाढलेल्या योजनांना निधी देण्याचा निर्णय घेतला जातो. एकट्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठी ६५ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी ३५ कोटींचा पहिला हप्ता दिला गेला. त्यानंतर १५ कोटी रुपये या हेड अंतर्गत दिले गेले.

तिसऱ्या टप्प्यांच्या कामांचे नियोजन 'पीडब्लूडी'मध्ये करण्यात आले. १५ कोटी रुपयांच्या कामातून दोन्ही जिल्ह्यातील रस्त्यांची कामे अपेक्षित होती.

यंदा राज्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यभरातील बहुतांश जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. राज्य सरकारने केंद्राकडे सर्वेक्षणाचा अहवाल पाठविल्यानंतर दुष्काळ जाहीर झाला. दुष्काळी कामांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पीडब्ल्यूडीच्या बजेटची ३० टक्के कपात केली जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

\Bकेंद्राची मदत झाली तरच…\B

राज्य सरकारने केंद्राकडे दुष्काळ निवारणासाठी सात हजार कोटी रुपये मागितले आहेत. हा निधी जर राज्याला मिळाला तरच विविध विभागांची नियोजित कामे पूर्ण होणार आहेत. अन्यथा ३० टक्क्यांपर्यंतची कपात आणखी वाढू शकते, अशी शक्यता या सूत्रांनी वर्तविली.

\Bलेखाशीर्ष ४०५४ कशासाठी?\B

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते, पूल दुरुस्ती, नवी राज्य मार्गांची बांधणी केली जाते. त्यासाठी लेखाशीर्ष चार हजार ५४ आहे. त्यात तीन व चार उपशीर्ष असून त्यासाठी विभागनिहाय सर्वेक्षण करून कामे निश्चित केली जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाय. के. बिल्डर्सच्या भागीदारांना एक वर्षाचा कारावास

0
0

ग्राहक मंच आणि खंडपीठाच्या आदेशाचे पालन नाही

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच आणि ग्राहक तक्रार निवारण मंचाने औरंगाबाद राज्य खंडपीठाच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर करणाऱ्या तिघा बांधकाम भागीदार व्यावसायिकांना ग्राहक संरक्षण कायदा कायद्यान्वये दोषी ठरवून एक वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तिघांना जिल्हा ग्राहक तक्रार निवाराण मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य किरण ठोले व संध्या बारलिंगे यांनी अडीच हजार रूपये दंड ग्राहक संजीव जगन्नाथ जाधव यांना देण्याचे निर्देश दिले आहेत.

सिडको एन-८ नवभारत हाऊसिंग सोसायटी येथील संजीव जाधव यांनी मे. वाय. के. बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स अॅण्ड गाझी कन्स्ट्रक्शन अमन प्लाझा शहीद भगतसिंह रोड बेरीबाग कॉलनी हर्सूल गट नं. १७२:५ औरंगाबाद यांच्याकडे फ्लॅटसाठी नोंदणी करून रक्कम जमा केली होती. या गृहप्रकल्पात शमीम बानो हसन अली चाऊस (रा. गोल्डन बेकरी जवळ रोशनगेट), मोहम्मद युसुफ सज्जाद खान (रा. फाजलपुरा जिल्हाधिकारी कार्यालय रोड औरंगाबाद) व गाझी खनीत अहसान गाझी अशीर अहमद ( मंजूरपुरा तोटी की मस्जिद समोर औरंगाबाद ) तिघे भागिदार आहेत. अर्जदार संजीव जाधव यांनी वेळेत ताबा दिला जात नसल्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव गेतली होती. मंचाने बांधकाम प्रकल्पासह तिघा भागिदारांना अर्जदारांचा फ्लॅट राहण्यास योग्य करून देण्यात यावा. तक्रारदाराने गैरअर्जदारास ३९ हजार ९०० रुपये फ्लॅटच्या ताब्यावेळी राष्ट्रीयकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे अदा करावी, गैरअर्जदारांनी ताब्याप्रसंगी उर्वरित रक्कम घेताना व्याज अथवा कुठलीही अतिरिक्त रक्कम वसूल करू नयेत. नुकसान भरपाई म्हणून ४० हजार तर खर्चापोटी दहा हजार निकालापासून एक महिन्याच्या आत बँक डीडीद्वारे देण्यात यावे. याविरोधात गैरअर्जदराने राज्य ग्राहक मंचाच्या औरंगाबाद खंडपीठात आपिल केले. खंडपीठाने गैरअर्जदारास प्रतिमाह पाच हजार रुपये भाडे स्वरुपात ग्राहकास सप्टेंबर २०१३ पासून फ्लॅटचा ताबा देण्यात येईपर्यंत द्यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही आदेशांचे संबंधितांनी पालन केले नसल्याने अर्जदाराने जिल्हा तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर गैरअर्जदारांनी १८ जून २०१६ रोजीचा जिल्हा ग्राहक मंचाचा आदेश आणि ३० जून २०१७ रोजीचा राज्य ग्राहक मंच औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचे पालन केले नाही. यामुळे तिघे आरोपी शिक्षेस पात्र असल्याच्या निष्कर्ष मंचाने काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टंचाई आराखड्यात निम्मा खर्च टँकरसाठी

0
0

(टँकरचा फोटो वापरावा)

(ग्रामीण पान मेनलीड करणे)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या मराठवाड्यातील सात जिल्ह्यांनी तब्बल १०८ कोटी ४३ लाख रुपयांचे टंचाई आराखडे विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर केले असून यात ६७ कोटी २७ लाख रुपये खर्च केवळ टँकरसाठी लागणार आहेत.

हिंगोली वगळता सर्व जिल्ह्यांनी डिसेंबर अखेरपर्यंतचे टंचाई आराखड्याचे नियोजन केले असून या संदर्भातील सर्व अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मराठवाड्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेता विभागीय प्रशासनाने सर्व जिल्ह्यांना टंचाई कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश ४ ऑक्टोबर रोजी दिले होते, ऑक्टोबर अखेरीस सर्व आराखडे विभागीय प्रशासनाकडे देण्यात आले होते. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात फारशी टंचाईस्थिती नसल्यामुळे आराखड्यामध्ये तीन महिन्यात टंचाई आराखड्यात निधीची आवश्यकता नसल्याचे जिल्हाप्रशासनाने कळविले आहे.

१०८ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्यामध्ये नवीन विंधन विहीर घेण्यासाठी ४ कोटी १० लाख, प्रादेशिक नळ योजनांची विशेष दुरुस्तीसाठी १६ कोटी ४१ लाख, विंधन विहीरींची विषेश दुरुस्तीसाठी २३ लाख, तात्पुरत्या पूरक नळ योजनेसाठी ५ कोटी ९५ लाख, टँकर तसेच बैलगाडीने पाणी पुरवठ्यासाठी ६७ कोटी २७ लाख, विहीर तसेच विंधन विहीरींचे अधिग्रहणासाठी १३ कोटी ५३ लाख, विहीरी खोल तसेच गाळ काढण्यासाठी ९२ लाख रुपये अशा मराठवाड्यातील एकूण ६ हजार ४३३ योजना ३ हजार ९०६ गावे व ९१७ वाड्यांमध्ये राबवण्याचा प्रस्ताव आहे. मराठवाड्यात सध्या अडीचशेवर टँकर सुरू असून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाणीटंचाई आहे.

---.

जिल्हानिहाय पाणीटंचाई कृती आराखडा (३१ डिसेंबरपर्यंत)

जिल्हा................................. खर्च

औरंगाबाद...........................६३ कोटी ३० लाख २७ हजार

जालना.................................. ११ कोटी ५४ लाख ७१

परभणी................................१ कोटी ३५ लाख ३६ हजार

हिंगोली..................................००

नांदेड..................................१ कोटी १८ लाख ८६ हजार

लातूर..................................५ कोटी ६१ लाख ६४ हजार

बीड...................................२४ कोटी १३ लाख ४२ हजार

उस्मानाबाद...........................१ कोटी २९ लाख ०६ हजार

---------------------------------------------------.

एकूण................................१०८ कोटी ४३ लाख ३२ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्साहाची आतषबजी, लक्ष्मीपूजन उत्साहात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिव्यांचा, प्रकाशाचा आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी. दीपोत्सवातील या मंगलमय वातावरणात बुधवारी (सात नोव्हेंबर) घरोघरी, व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये यश, कीर्ती आणि धनलाभाची आराधना करत लक्ष्मीची मनोभावे पूजा करण्यात आली. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी प्रकाशाच्या उत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला सायंकाळपासून सुरू झालेल्या रंगीबेरंगी नयनरम्य आतषबाजीने रात्री उशिरापर्यंत सारा आसमंत उजळून निघाला.

झेंडूच्या फुलांची तोरणे, लक्ष्मीपूजेसाठीची आकर्षक सजावट, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि सायंकाळच्या मांगल्य आणि भक्तिभावाच्या सुगंधी वातावरणात घराघरांत, कार्यालयांत; तसेच उद्योग-व्यवसायाच्या ठिकाणी वैभव, सुख-समृद्धी, भरभराटीचे दान देणाऱ्या श्री लक्ष्मीचे स्वागत करण्यात आले आणि मनोभावे पूजन करण्यात आले.

लक्ष्मीपूजनानिमित्त बुधवारी शहरात सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. सकाळपासून घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये लक्ष्मीपूजनाची धामधूम सुरू होती, अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये पूजेची तयारी केली जात होती. शहरातील गुलमंडी, गारखेडा परिसर, टीव्ही सेंटर परिसर, हर्सूल, सिडको, शिवाजीनगर, चिकलठाणा, पीर बाजार, अविष्कार चौक, औरंगपुरा आदी मोठ्या बाजारपेठांमध्ये लक्ष्मीपूजनासाठी लागणारी झेंडूची फुले, फळे, विड्याची पाने, लक्ष्मीची मूर्ती, फोटो आदी वस्तुंची खरेदी करण्यासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. सायंकाळी मुहूर्तावर घरोघरी मनोभावे लक्ष्मीपूजन केल्यानंतर संपूर्ण आसंमत फटाक्यांच्या आवाजाने निनादून गेला होता. गेल्या काही वर्षांपासून फटाके आणि ध्वनीप्रदूषणाबाबत विविध शाळा, सरकारी कार्यालयांमधून संदेश देण्यात येत असले, तरी शहरात मनसोक्त फटाके उडवण्यात आले. लक्ष्मीपूजनानंतर उडवण्यात आलेल्या फटाक्याच्या आवाजाने आणि शोभेच्या फटाक्यामुळे शहरातील वातावरून दुमदुमून गेले होते. व्यापारी प्रतिष्ठानांमघ्ये लक्ष्मीपूजनाच्यावेळी व्यापाऱ्यांनी वहीखात्याची पूजा केली. लखलखत्या दिवाळीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी लक्ष्मीपूजनानंतर अनेकांनी मित्र, नातेवाईक, शेजारी; तसेच सहकाऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी सणाच्यानिमित्त भेटवस्तु देऊन शुभेच्छा दिल्या.

\Bमोबाइलवरून शुभेच्छांचा वर्षाव\B

प्रत्यक्ष भेटून; तसेच ज्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही अशांनी शुभेच्छा संदेश देण्यासाठी मोबाइलचा वापर केला, कुणी लिखित संदेश, तर अनेकांनी सकाळपासूनच व्हॉट्स अॅपवर नव्याने आलेल्या 'बीटा व्हर्जन'वरील खास दिवाळी शुभेच्छांचे स्टीकर्स व्हायरल झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चॉइस नंबरची ऑनलाइन विक्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

आरटीओ कार्यालयाचा कारभार ऑनलाइन करण्यात आला आहे. या कारभारात आता चॉइस नंबर विक्रीच्या कामाचाही लवकरच समावेश करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून आगामी महिन्याभरात ही सुविधा ऑनलाइन करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सध्या नवीन वाहन मालिका सुरू झाल्यानंतर चॉइस नंबरसाठी शासकीय शुल्काचा डीडी भरावा लागतो. एका क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आल्यास, अशा नोंदणी क्रमांकाचा लिलाव करण्यात येतो. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक वेळा वाद निर्माण झाला होता. हा वाद टाळण्यासाठी आरटीओ विभागाने चॉइस नंबरची ऑनलाइन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात नवीन वाहन मालिका सुरू झाल्यानंतर ज्या व्यक्तीला जो नंबर पाहिजे आहे तो थेट ऑनलाइनवरून नेट बॅकिंगद्वारे पैसे भरून घेता येणार आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रस्ताव मुंबई परिवहन आयुक्तालयाला पाठविण्यात आला आहे. एनआयसीद्वारे वाहन २ सॉफ्टवेअरमध्ये ही नवीन व्यवस्था अपडेट करण्यात येणार आहे.

ऑनलाइन चॉइस नंबर विक्रीचा प्रस्ताव औरंगाबाद कार्यालयाकडून परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.

- रमेशचंद्र खराडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाका मार्केटने घेतली शेवटच्या दिवशी उसळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या दोन दिवसांपासून संथ असलेल्या फटाका मार्केटमध्ये बुधवारी ग्राहकांनी गर्दी केली. यामुळे ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची खरेदी ग्राहकांनी टाळत फॅन्सी, कमी आवाजाच्या फटाक्याच्या खरेदीवर भर दिला असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

शहरातील आयोध्यानगर, टीव्ही सेंटर, बीड बायपास, कलाग्राम आदी ठिकाणी फटाका मार्केट थाटण्यात आले आहे. रविवारपासून या मार्केटला सुरुवात झाली होती. सोमवारी, मंगळवारी या दिवशी ग्राहकांची मार्केटमध्ये गर्दी होईल, अशी विक्रेत्यांना अपेक्षा होती, मात्र ग्राहकांनी या दोन दिवसांत फटाका मार्केटकडे पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यात चिंतेचे वातावरण होते. बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागरीकांनी फटाका खरेदीवर भर दिला. यामुळे मार्केटमध्ये गर्दी झाली होती. विक्री अभावी व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची भिती होती, मात्र बुधवारी ग्राहकांनी केलेल्या गर्दीमुळे विक्रेत्यांना काही अंशी तरी दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात रब्बीचा केवळ साडेसात टक्के पेरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी टंचाईचा मोठा फटका रब्बी हंगामावर होत आहे. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ ७.३६ टक्के क्षेत्रावरच रब्बीची लागवड झाली आहे. पाणीअभावी बहुतेक शेतकऱ्यांनी रब्बीकडे पूर्णत: पाठ फिरवली.

अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मका, मूग, उडीदसह अन्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्या पाठोपाठ आता रब्बी हंगाम हातचा गेल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. पाणीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी रब्बी लागवडीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

मराठवाडा विभागातील रब्बीचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र हे १८ लाख ८६ हजार५४० हेक्टर आहे. त्यापैकी केवळ १ लाख ३८ हजार ९०० हेक्टरवर म्हणजेच केवळ ७.३६ टक्के क्षेत्रावरच रब्बीचा पेरा झाला आहे.

यात औरंगाबाद जिल्ह्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र २ लाख ८ हजार हेक्टर असून त्यापैकी केवळ ८ हजार ३५८ हेक्टरवर (४.०१ टक्के) पेरणी झाली. जालन्यात १ लाख ४१ हेक्टर पैकी १० हजार ३१९ हेक्टरवर (७.३० टक्के) पेरणी झाली आहे. बीडमध्ये १०.४२ टक्के, लातूरमध्ये ३.०८ टक्के पेरणी झाली आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात तर एक टक्काही पेरणी झालेली नाही. सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ३ लाख ३१ हजार हेक्टर असताना केवळ २ हजार ३११ हेक्टर क्षेत्रावर येथे पेरणी झाली. नांदेड जिल्ह्यात पेरणीची परिस्थिती तुलनेत चांगली असून २१ टक्के पेरा झाला आहे. तर परभणीत ११.९४ टक्के, हिंगोलीत १.७५ टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषी खात्याच्या रब्बी हंगाम पीक पेरणी अहवालात नमूद करण्यात आली आहे.

पीक - सर्वसाधारण क्षेत्र - प्रत्यक्ष झालेली पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये ) - टक्के

ज्वारी - ९,४९,७७३ - ७२,६८९ (७.६५ टक्के)

गहू - २,६६,०८७ - ३,९२० (१.४७ टक्के)

इतर तृणधान्य - ६,१२२ - ४६० (०.७५ टक्के)

हरभरा - ५,१४,०६६ - ५७,१३९ (११.१२ टक्के)

इतर कडधान्य - २,३२४ - २,५४० (१०९.३२ टक्के)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images