Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अवैध फटाका विकल्याने गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैधरित्या फटाका विक्री करणाऱ्या दोन जणांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. गेल्या दोन दिवसांत मुकुंदवाडी पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई आहे. आरोपींच्या ताब्यातून १६ हजार रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले.

अवैध फटाकाविक्रीची पहिली कारवाई जयभवानीनगर रेल्वे स्टेशन रोडवर करण्यात आली. येथील परिवर्तन कंम्प्युटरसमोर संशयित आरोपी शुभम बबन घुसळकर (वय १९, रा. विश्रांतीनगर) हा फटाक्याची दुकान थाटून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून या दुकानातून सात हजार रुपयांचे फटाके जप्त केले. याप्रकरणी प्रकाश सोनवणे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध फटाका विक्रीची दुसरी कारवाई संजयनगर भागात मंगळवारी दुपारी करण्यात आली. याठिकाणी आरकेश बाबुराव पगारे (वय २७, रा. संजयनगर) याने थाटलेल्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणावरून नऊ हजार रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले. याप्रकरणी कॉन्स्टेबल विजय चौधरी यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीची विक्री ,सबलपुराव्याभावी आईसह चौघांची मुक्तता

$
0
0

मुलीच्या विक्री प्रकरणी सबलपुराव्याभावी आईसह चौघांची मुक्तता

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोटच्या गोळ्यांची विक्री केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात सबळ पुराव्याअभावी आईसह चौघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. डिग्रसकर यांनी दिले.

या प्रकरणात सिस्टर व्हिसेन टिना कॉस्टा यांनी तक्रार दिली होती. रुख्मिणीबाई अशोक राशनकर हिच्या दोन मुली कॉस्टा यांच्या छावणी परिसरातील बालगृहात शिक्षण घेत होत्या. राशनकर व नितीन सुधाकर रोकडे या दोघांनी उन्हाळ्याच्या सुट्टी दरम्यान त्या दोन्ही मुलींना घरी आणले होते. त्यानंतर त्या मुलींना ठाणे येथील लोकमान्य नगरात राहणाऱ्या सरला उर्फ पूजा रामसिंग कजंर व सविता उर्फ उषा लक्ष्मण जाधव यांच्याकडे आणले. तेथे सरला उर्फ पूजा कंजर हिच्या नातेवाईकाला एक मुलगी विक्री करण्यात आली. ती मुलगी राजस्थान येथील रेड लाईट वस्तीत सापडली. या प्रकरणात राशनकर, नितीन, सरला व सविता या चौघांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीवेळी चारही आरोपींतर्फे प्रकाश उंटवाल यांनी युक्तीवाद केला. सुनावणीअंती न्यायालयाने सबळपुराव्या अभावी चौघांची निर्दोष मुक्तता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फराळवाटपासून समाजिक बांधिलकीचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मटा' च्या माध्यमातून माणुसकीचा झरा वाहतो. सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्या फराळ वाटपाच्या कार्यक्रमातून मिळतो, असे प्रतिपादन महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (सात नोव्हेंबर) येथे केले.

शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 'मटा' कार्यालयात दिवाळीचा फराळ जमा करण्यात आला होता. जमा झालेल्या फराळाचे वाटप बुधवारी श्री भगवानबाबा बालिकाश्रम आणि मातोश्री वृद्धाश्रमात करण्यात आले. मातोश्री वृद्धाश्रमातील कार्यक्रमात महापौर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते सतीष निकम, मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोटे यांची विशेष उपस्थिती होती.

महापौर घोडेले म्हणाले,'तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. तुमचे जीवन प्रकाशमान व्हावे हा या मागचा उद्देश आहे. महापौरपदाच्या दुसऱ्या वर्षाची सुरुवात अशा चांगल्या उपक्रमाने होत आहे, याचे समाधान आहे. वृद्धाश्रमात आलो म्हणून खचून जाऊ नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत.'

श्री भगवानबाबा बालिकाश्रमात फराळ वाटपाच्या कार्यक्रमाला प्रोझोन मॉलचे सेंटर हेड मोहम्मद अर्शद, आकाश जोशी, बालिकाश्रमाच्या संचालिका कविता घुगे-वाघ यांची विशेष उपस्थिती होती. फराळ वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी होता आले याबद्दल मोहम्मद अर्शद यांनी समाधान व्यक्त केले. 'आता यापुढचा प्रत्येक सण आपण बालिकाश्रमातील मुलींसोबत साजरा करणार आहोत,' असे त्यांनी जाहीर केले. 'अनाथ मुलींसाठी बालिकाश्रम चालवणे हे कठीण काम आहे,' असा उल्लेख त्यांनी केला. प्रोझोन येथील चित्रपटगृहात एखादा चांगला चित्रपट लागल्यावर बालिकाश्रमातील सर्व मुलींना तो चित्रपट दाखवणार असल्याचा शब्द त्यांनी दिली. कविता घुगे-वाघ यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सलग सहा वर्षे 'मटा'तर्फे फराळ वाटपाचा कार्यक्रम होत असल्याबद्दल त्यांनी 'मटा'चे आभार मानले. महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.

'मटा'तर्फे दिवाळीनिमित्त बालिकाश्रमातील मुलींना फराळाचे वाटप केले जाते, हा उपक्रम आमच्यासाठी फार मोठी मदत देऊन जाणारा आहे. फराळ महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची भावना देखील तेवढीच त्त्त्वाची आहे. 'मटा'ने ही भावना जपली आहे. हा समाजासाठी चांगला संदेश आहे.

- कविता घुगे-वाघ, संचालिका, श्री भगवानबाबा बालिकाश्रम

'मटा'ने आम्हाला दिवाळीचा फराळ आणून दिला, आम्हाला खूप छान वाटले. या आश्रमात मी आले तेव्हा मला वाटले आपल्याला कुणीच नाही, पण आता ही उणीव राहिलेली नाही.

- अश्विनी काटकर, श्री भगवानबाबा बालिकाश्रम

आश्रमात आम्ही आनंदी आहोत. 'मटा'ची आम्हाला साथ आहे. 'मटा'प्रत्येक दिवाळीत आमच्यासाठी खाऊ घेऊन येतो तेव्हा आम्हाला फार आनंद होतो. इतरांसारखीच आमची दिवाळी आहे, असे आम्हाला वाटते.

- प्रतीक्षा बोर्डे, श्री भगवानबाबा बालिकाश्रम

फराळ वाटपाच्या 'मटा'च्या उपक्रमाबद्दल आनंद वाटला. खूप छान वाटले. समाजात आपले कुणीतरी आहे याची जाणीव झाली. सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम आहे.

- भुजंगराव जाधव, ज्येष्ठ नागरिक, मातोश्री वृद्धाश्रम

फराळ वाटपासारखा उपक्रम जीवन जगण्यासाठी उर्मी निर्माण करतो. आपली नाळ समाजाशी आहे याची प्रचिती अशा उपक्रमातून येते. एखादे वृत्तपत्र अशा उपक्रमात आहे, ही फार मोठी आणि महत्त्वाची बाब आहे.

- अॅड. ललीत जोशी, ज्येष्ठ नागरिक, मातोश्री वृद्धाश्रम

'मटा'ने दिवाळीनिमित्तने आम्हाला फराळ आणून दिला, आम्हाला खूप छान वाटले. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जाते, यातून आम्हाला मोठा धीर मिळाला आहे. मातोश्री वृद्धाश्रमत खूप चांगले वातावरण आहे.

- मालती जोशी, ज्येष्ठ नागरिक, मातोश्री वृद्धाश्रम

फराळ वाटपाचा हा उपक्रम खुप चांगला आहे. समाजिक भान जपणारा हा उपक्रम आहे. सण-उत्सवाच्या आनंदात सर्वांना सामावून घेणारा हा उपक्रम आहे.

- यशोदा खैरनार, ज्येष्ठ नागरिक, मातोश्री वृद्धाश्रम

उपेक्षित समाजासाठी आपण काही केले पाहिजे हा संदेश देणारा 'मटा'चा फराळ वाटपाचा उपक्रम आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो हा संदेश अशा उपक्रमातून मिळतो. हा संदेश सर्वत्र गेला पाहीजे आणि त्याची जाणीव सर्वांना झाली पाहीजे. 'मटा'चा उपक्रम अप्रतीम आहे.

- अरुण मेढेकर, शालेय समिती अध्यक्ष, स.भु. प्रशाला)

आपल्या घासातला घास दुसऱ्याला देण्याचा संस्कार 'मटा'च्या या उपक्रमातून मिळतो. अनाथ मुलांसाठी राबवला जाणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा आहे. या उपक्रमासाठी आयोजकांचे अभिनंदनच करावे लागेल.

- शिरीष मोरे, मुख्याध्यापक, स.भु. प्रशाला

अनाथ मुलांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्याचा 'मटा'चा उपक्रम स्तुत्य आहे. असे उपक्रम सर्व संस्थांनी राबवले पाहिजेत. सर्व संस्था, संघटना, व्यक्तींनी याचे अनुकरण केले पाहिजे. सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा हा उपक्रम आहे.

- सुनील शिंदे, एसबीओए शाळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकखाली दबल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

$
0
0

बीड:

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर आज ट्रक पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. ट्रकखाली दबून या चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर हा अपघात झाला. या अपघातात दयानंद गणेश सोळंके (४८), संगीता दयानंद सोळंके (४२), राजनंदनी दयानंद सोळंके (१२), प्रतीक दयानंद सोळंके (९) यांचा मृत्यू झाला तर बब्बू नामक तरुण जखमी झाला आहे.

या अपघाताबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्यातून साखरेचे पोती घेऊन जाणारा ट्रक दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी निघाला. पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर ट्रक रस्त्यावर पलटी झाला. समोरून दुचाकीवरून येणाऱ्या सोळंके कुटुंबीय या ट्रकखाली दबले गेले. सोळंके कुटुंबातील चौघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला. दरम्यान, जखमी बब्बूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्यावर सध्या उपचार सरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-सेनेची युती व्हावी ही विरोधकांचीच इच्छा: दानवे

$
0
0

जालना:

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होईलच, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. भाजप-शिवसेनेनं एकत्र येऊन निवडणूक लढवावी ही विरोधकांची इच्छा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

जालन्यात दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात दानवे बोलत होते. शिवसेना-भाजपमधील संबंधांमध्ये काही काजळी निर्माण झाली आहे. पण हे ढगही दूर होऊन वातावरण स्वच्छ होईल. तुम्ही चिंता करू नका. भाजप आणि शिवसेनेची युती निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप-शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी विरोधकांचीच इच्छा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आपण सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन बैठका घेत आहोत. तिथे अनेक शिवसैनिक भेटतात. काही करा पण युती कराच असं ते आम्हाला सांगतात, असा दावाही दानवे यांनी केला. यावेळी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश जेथलिया, राष्ट्रवादीचे नेते इकबाल पाशा, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुश्राव्य गायनाची ‘दिवाळी पहाट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुश्राव्य हिंदी-मराठी गीतांनी 'आलाप' दिवाळी पहाट कार्यक्रम श्रवणीय ठरला. लोकप्रिय गाण्यांचे सरस सादरीकरण दिवाळीचा आनंद द्विगुणित करुन गेले. रसिकांनी गीतांना भरभरून प्रतिसाद दिला.

दिवाळीनिमित्त अभिजित शिंदे यांनी 'आलाप'च्या माध्यमातून 'दिवाळी पहाट' कार्यक्रम सादर केला. तापडिया नाट्यमंदिरात बुधवारी सकाळी कार्यक्रम झाला. गायिका सरला शिंदे, रवींद्र खोमणे, निशांत घाटे व अंतरा शिंदे यांनी बहारदार गाणी सादर करून दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित केला. सरला शिंदे यांनी 'जिवलगा कधी रे येशील तू', 'बाई माझी करंगळी मोडली', 'मोसे छल किये जाय' अशी सरस गाणी गायली. 'काळ देहासी आला', 'तुला पाहिले मी', 'मधुबन मे राधिका नाचे रे', 'देवाक काळजी रे', 'मनमंदिरात तेजाने', 'अलबेला सजन आयो' अशी सुश्राव्य गाणी निशांत, रवींद्र यांनी सादर केली. अंतरा यांनी गायलेल्या 'केव्हा तरी पहाटे' या भावगीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली. 'कान्हा सो जा जरा', 'घुमर' या गीतांना 'वन्स मोअर' मिळाला. 'धन्यभाग सेवा का अवसर पाया' या गीताने सांगता झाली. या कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ, अतुल सावे, महावितरणचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह रसिक उपस्थित होते.

\B...अशी पाखरे येती

\Bज्येष्ठ गीतकार व संगीतकार यशवंत देव यांचे नुकतेच निधन झाले. देव यांची गाणी सादर करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. 'अशी पाखरे येती' या गाण्याने अवघे वातावरण भावुक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगर समाजाचा मंगळवारी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धनगर समाजाला त्वरित अनुसुचित जमातीच्या सवलती लागू करा, यासह अन्य मागण्यांसाठी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्यतर्फे मंगळवारी विभागीय आयुक्तालयावर 'पिवळं वादळ धडक मोर्चा' काढण्यात येणार आहे, अशी माहिती मनजित कोळेकर यांनी दिली.

सत्तेत आल्यावर धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी काढू, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. मात्र, चार वर्ष झाल्यानंतरही दिलेला शब्द न पाळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात धनगर समाजाचा रोष वाढत असल्याचे संघटनेने पत्रकात नमूद केले आहे. हा संताप व्यक्त करण्यासाठी व आरक्षण प्रश्न तातडीन मार्गी लागावा यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी (१३ नोव्हेंबर) कोकणवाडी येथील अहिल्यादेवी होळकर चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. क्रांती चौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौकमार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकणार आहे. मोर्चाच्या तयारीसाठी आमदार रामराव वडकुते, सुरेश कांबळे, जगन्नाथ रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप आग्रहाकर, संतोष कोल्हे, मनजित कोळेकर, शिवाजी वैद्य, संजय फटाकडे, दिलीप रिठे, अण्णासाहेब कोल्हे, मोहन जानकर, कैलास रिठे यांच्यासह अन्य समन्वयकांनी मराठवाडा दौरे केले आहेत. विविध ठिकाणी बैठका घेतल्या असून, विभागातून लाखोच्या संख्येने समाजबांधव मोर्चात सहभागी होणार असल्याचे कोळेकर यांनी नमूद केले.

\Bआंदोलकाच्या मागण्या

\B- धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण द्यावे

- आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी

- मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत

- धनगर आरक्षण आंदोलकांवरील व मेंढपाळावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भौतिक सुविधांसाठी ‘रूसा’चा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाअंतर्गत (रूसा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भौतिक सुविधा उभारणीसाठी एक कोटी ३१ लाख रुपये निधी मिळणार आहे. भौतिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांची सतत सुरू असलेली आंदोलने पाहता विद्यापीठ प्रशासन तातडीने विकासकामे हाती घेण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाअंतर्गत (रूसा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि मुंबई विद्यापीठ यांना १८ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या निधीत केंद्राचा हिस्सा ६० टक्के आणि राज्याचा हिस्सा ४० टक्के आहे. यानुसार राज्य सरकारने सहा कोटी ६२ लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढले आहेत. या निधीतून संबंधित विद्यापीठांनी भौतिक सुविधा उभारणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधन व नियमित अभ्यासासाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी निधी वापरला जाणार आहे. देशभरातील विद्यापीठांना 'रूसा' भौतिक सुविधांसाठी निधी देणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पत्रानुसार 'रूसा'ने भौतिक सुविधांसाठी केंद्र हिश्शापोटी १८ कोटी रुपये निधी उपलब्ध केला होता. या निधीच्या प्रमाणात राज्य सरकारचा १२ कोटी रुपये निधी वितरित होणे आवश्यक होते. मात्र, पूर्ण निधी विद्यापीठांना मिळाला नव्हता. लेखाशिर्षात तरतूद नसल्यामुळे शिल्लक असलेली पाच कोटी ३८ लाख रुपये रक्कम देण्यात आली. २०१७-१८ या आर्थिक वर्षातील राज्य सरकारच्या हिश्शाची रक्कम पूर्ण करण्यासाठी सहा कोटी ६२ लाख रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भौतिक सुविधांची प्रचंड वानवा आहे. वसतिगृहांची दूरवस्था झाली असून दर आठवड्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. पिण्याचे पाणी, सुसज्ज वर्गखोल्या, लॅब, संगणक कक्ष, माफक दरात जेवण असलेले कँटीन या सुविधा देण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. वसतीगृहाच्या मुद्द्यावर विद्यापीठ प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचा अनुभव आहे. सध्या 'नॅक'च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ कॅम्पसमध्ये सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहे. शिवाय इमारतींची डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यात येत आहे. 'रूसा'चा निधी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

\Bनिधीची गरज

\Bडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्राचा हिस्सा सहा कोटी रुपये मिळाला आहे. राज्य सरकारने ४० टक्क्यांनुसार चार कोटी रुपये देणे अपेक्षित होते. त्यानुसार मागील वर्षी दोन कोटी ६९ लाख रुपये देण्यात आले होते. उरलेले एक कोटी ३१ लाख रुपये यावर्षी देण्यात येणार आहे. या माध्यमातून भौतिक सुविधा उभारण्याचे काम सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा हुलकावणी ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होणार आहे, अशी जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भाजपमधील इच्छुकांनी मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, भाजपच्या प्रदेशाध्यक्षासह ज्येष्ठांनीही यापूर्वी दोन ते तीन विस्तार होणारच असे सांगत इच्छुकांना हुलकावणी दिली होती. त्यामुळ‌े यंदा पुन्हा तेच होणार की खरेच मुहूर्त लागणार, हे काळच ठरवेल.

गेल्या अनेक महिन्यापासून होणार - होणार अशी चर्चा असलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. मागे संधी मिळाली नाही. यंदा तरी मिळेल, अशी आशा धरत अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्यात विस्ताराची शक्यता होती, पण आता येत्या वीस दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता भाजपच्या प्रदेशस्तरावरील नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'मटा'शी बोलताना व्यक्त केली. मंत्रिमंडळात सध्या शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या कोट्यातील चार जागा रिक्त आहेत. मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा असून आगामी निवडणुका, प्रादेशिक समतोल यासर्वांचा विचार करूनच कोणाची वर्णी लागणार, यावर पक्षश्रेष्ठी विचार करतील, असेही त्यांनी नमूद केले.

मराठवाड्यातील कोणाची वर्णी ?

भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मराठवाड्यातीलच पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर तसेच संभाजी पाटील निलंगेकर या तिघांकडे कॅबिनेट मंत्रिपद असून प्रगतीपुस्तक चांगले असल्याने यात कोणताही बदल होण्याची चिन्ह नाही. यांच्यासह मराठवाड्यातील आणखी एका आमदाराची वर्णी मंत्रिमंडळात लागेल. यात प्रामुख्याने औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल सावे यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींची खास पसंती असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासह उस्मानबादचे विधानपरिषद सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, हिंगोलीचे तानाजी मुटकुळे यांची नावे चर्चेत होत आहे. मात्र, शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला यंदा संधी मिळेल, अशी जोरदार चर्चा असून शेवटी श्रेष्ठी कोणच्या पारड्यात वजन टाकतात, हेच महत्वाचे ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगाराचे पलायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चक्क पोलिस आयुक्तालयातून गुन्हे शाखेच्या पोलिसांना चुकवून एका सराईत गुन्हेगाराने पळ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही माहिती दडविण्याचा प्रयत्न झाला. याबाबत तब्बल बारा तासानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यातही पोलिस आयुक्तालयातून पलायन केल्याचा उल्लेख टाळण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सराईत गुन्हेगार शेख चांद पाशा (वय ३५) याला गुरुवारी (८ नोव्हेंबर) गस्तीवरील गुन्हे शाखेच्या पथकाने सेंट्रल नाका भागातून ताब्यात घेतले होते. रात्रभर आयुक्तालयात गुन्हेशाखेच्या ताब्यात ठेवण्यात आले. शुक्रवारी (९ नोव्हेंबर) सकाळी ड्युटी बदलायच्या वेळेत संधी साधत चांद पाशा पोलिस आयुक्तालयातून हातावर रूमाल बांधून पळ काढल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एक तुटलेली हातकडी सापडली. त्यानंतर शेख चांद पाशा या गुन्हे शाखेच्या ताब्यातील आरोपीने पलायन केल्याची निष्पन्न झाले. मात्र, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. कारण पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो मध्यवर्ती बसस्थानकातून पळून गेल्याचे म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तशीच तक्रारही नोंदविली आहे. या तक्रारीनुसार, शिवाजी एकनाथ भोसले या गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला गुप्त बातमीदाराकडून शेख चांद पाशा मध्यवर्ती बस स्थानकाजवळ आल्याचे कळाले होते. त्यामुळे भोसले आणि कर्मचारी शुक्रवारी (९ नोव्हेंबर) सकाळी आठ ते साडेआठच्या बसस्थानक परिसरात आले. त्यांनी तडीपार आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने हाताला झटका देऊन पळ काढला, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात शिवाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी पळाल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल बारा तासानंतर गुन्हा नोंदविल्याची माहिती समोर येत आहे

\Bड्युटी चेंजमध्ये पसार

\Bशेख चांद पाशा शहरातील सराईत पाकिटमार आणि साखळीचोर आहे. त्याच्या विरोधात चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. काही गुन्ह्यांमध्ये तो जामिनावर सुटला होता. मात्र, न्यायालयात एकदाही हजर न झाल्याने त्याच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट इश्‍यू करण्यात आले होते. याप्रकरणात त्याला गुरुवारी गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. मात्र पोलिसांच्या ड्युटी चेंजमध्ये पोलिस आयुक्तालयातून तो पसार झाला. त्यामुळे पोलिस आयुक्तालयाच्या बंदोबस्तावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

\Bअटक केलेली नव्हतीच

\Bसराईत गुन्हेगार शेख चांद पाशा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून पळाल्याची माहिती समोर आल्यानंतर याबाबत पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना विचारले असता, त्यांनी ते राज्याबाहेर असल्याचे सांगितले. मात्र, जी माहिती त्यांना कळाली. त्या आधारावर सदर आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. त्याला ताब्यात घेण्यात आलेले नव्हते. जी हथकडी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापडली. ती आरोपीला अटक करण्यासाठी धावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून खाली पडली असावी, असा प्राथमिक संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेडी ऑफिसरने पाठलाग करून लुटारूंना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपासवर पेट्रोल टँकर चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करून लुटणाऱ्या चौघांना महिला पोलिस उपनिरीक्षक सुशीला खरात यांच्यासह तीन बहादूर पोलिस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्री एक किलोमीटर पाठलाग करून बेड्या ठोकल्या. या कर्तव्यदक्ष पोलिसांच्या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भांडेगाव (जि. यवतमाळ) येथील रहिवासी राजेश हे पेट्रोल टँकर चालक म्हणून काम करतात. कारंजा ते मुंबई दरम्यान पेट्रोल टँकर चालवित असताना शुक्रवारी (९ नोव्हेंबर) रात्री एकच्या सुमारास ते टँकर घेऊन बीड बायपासवरून मुंबईच्या दिशेने जात होते. यावेळी रेणुकामाता कमानीजवळ चौघांनी टँकर अडवून राजेश यास रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. त्यांच्या खिशातून बळजबरीने एक हजार ६०० रुपये काढून घेतले. घटनास्थळापासून पुढे पाच मिनिटाच्या अंतरावर सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस नाकाबंदीवर होते. ट्रॅँकर चालक राजेश घाबरलेल्या अवस्थेत पुढे आला. त्याला पोलिस कर्मचारी दिसले. त्याने टँकर थांबवून घडलेला प्रकार सांगितला. घटनास्थळ जवळच असल्याने पोलिस उपनिरीक्षक सुशीला खरात, कर्मचारी मरकड, व्ही. एन. सनान्से, एस. बी. चव्हाण, एच. के. बहुरे यांनी पाहणी केली असता चौघे अंधारात पळताना दिसून आले. त्यांनी त्यांचा पाठलाग करून लुटारूंना पकडले. त्यांना ट्रक चालकानेही ओळखले. पकडलेल्या आरोपींमध्ये राजू सुधाकर सोनवणे (वय ३१, रा. अर्थनगर), वृद्धेश्वर मधुकर गिरी (वय १९, रा. संग्रामनगर), नजीर निजामोद्दीन शेख (वय २४, रा. संग्रामनगर), संदीप जयसिंग बरथुने (वय २७, रा. हायकोर्ट कॉलनी) यांचा समावेश. त्यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस अधिकारी सुशीला खरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या कर्तबगारीबद्दल पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेडछाडीविरोधात तृतीयपंथी पोलिस ठाण्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आलेल्या तृतीयपंथीयाची तेथील खबऱ्याने छेड काढली. त्यामुळे संबंधितावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तृतीपंथीयांच्या जमावाने बुधवारी रात्री (७ नोव्हेंबर) उशिरापर्यंत ठाण्यातच ठिय्या मांडला. तब्बल पाऊण तास हा गोंधळ सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रकरणात एका रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या चालकाना भेटण्यासाठी एक तृतीयपंथीय ठाण्यात आला. तेव्हा पोलिस ठाण्यात साफसफाई करण्यासाठी ठेवलेल्या एका खबऱ्याने त्याची छेड काढली. त्यामुळे तृतीय पंथीयाचा राग अनावर झाला. त्याने याबाबत संबंधित पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे त्याने अन्य तृतीय पंथीयांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत हा गोंधळ सुरू होता. संबंधित खबऱ्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी तृतीयपंथीयांनी लावून धरली. त्यांचा गोंधळ वाढल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणणे अवघड झाले. तशातच छेड काढणारा खबरी भितींवरून पळून गेला. भिंतीवरून खाली उडी मारताना एका कारचेही या खबऱ्याने नुकसान केले. या गोंधळामुळे काही काळ पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिसांनाही पोलिस ठाण्याबाहेर येऊन उभे राहावे लागले. अखेर काही ज्येष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांनी समजूत काढून या तृतीयपंथीयांना पोलिस ठाण्याबाहेर नेले. या प्रकरणात पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी शहादेव पालवे याच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, छेड काढणाऱ्या खबऱ्याविरोधात आतापर्यंत कारवाई झालेली नव्हती.

...……………\Bअसा वाढला वाद?

\Bउस्मानपुरा पोलिस ठाण्यात आलेल्या तृतीयपंथीयाची खबऱ्याने छेड काढली. त्यानंतर तृतीयपंथी एक पोलिस हवालदार तसेच संबंधित कर्मचाऱ्याकडे गेला. त्यांनी सदर प्रकरण सांगितले. या प्रकरणात वेळीच संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी दखल घेऊन खबऱ्यावर कारवाई केली असती, तर पोलिस ठाण्यात गोंधळ झालाच नसता. हा वाद वाढल्यानंतर हवालदारालाही पोलिस ठाण्याबाहेर जावे लागल्याची माहिती उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली. ……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’च्या दिवाळी पहाटला सेना – भाजप नेत्यांची हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. त्यामुळे उपस्थितांना निवडणुकीच्या आगमनाची चाहुल आपसुक लागली. दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावता येते आणि त्याच बरोबर नागरिकांच्याही भेटीगाठी होतात असा मनसुभा या नेत्यांनी रचल्याची चर्चा होती.

'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे यंदा शहरात बऱ्याच ठिकाणी विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींकडून आयोजन करण्यात आले होते. काही वर्षांपासून राजकीय नेते देखील अशा कार्यक्रमाच्या आयोजनात उतरल्या आहेत. हे नेते सहसा दुसऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जात नसल्याचा अनुभव आहे. आपलाच कार्यक्रम कसा सरस ठरतो याकडे त्यांचे लक्ष असते. यंदा मात्र थोडे वेगळे चित्र पाहण्यास मिळाले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अतुल सावे यांनी दिवाळी पहाटचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी हजेरी लावली. वैद्य यांच्या नावाची चर्चा याच मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अशी आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी जगदगुरू संत तुकाराम नाट्यगृहात 'म्युझिकल दिवाळी पहाट'चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रियांका बर्वे, अनिरुद्ध जोशी, राजेश अय्यर, कविता राम यांनी विविध गीतांचा नजराणा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. संकर्षण कऱ्हाडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले. यावेळी पं. विश्वनाथ ओक आणि पं. माधुरी ओक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर नंदकुमार घोडेले, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी आवर्जून हजेरी लावली. हे दोघेही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. सुरुवातीला वैद्य यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यानंतर भाजप आमदार अतुल सावे 'म्युझिकल दिवाळी पहाट' पाहण्यासाठी आले. त्यांच्या पाठोपाठ महापौरांचे आगमन झाले. या तिघांनीही अर्धा - पाऊण तास कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. आमदार चव्हाण यांनी या तिन्हीही नेत्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचा सत्कार केला. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सेना - भाजपच्या लोकप्रतिनिधींना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

\Bतुटलेल्या खुर्च्या आणि संतापलेले रसिक

\Bसेना - भाजप लोकप्रतिनिधींचा सत्कार झाल्यावर कार्यक्रमात काही मिनीटांचा गॅप पडला. निवेदकाने हा गॅप भरून काढला. रसिकांना उद्देशून निवेदक म्हणाला, या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काही बोलायचे आहे का ? निवेदकाला प्रतिसाद देत काही काही ज्येष्ठ नागरिक उठून उभे राहीले. आमदार, महापौर, सभापतींना उद्देशून ते म्हणाले, नाट्यगृहातल्या तुटलेल्या खुर्च्यांकडे जरा लक्ष द्या. आम्ही मोठ्या अपेक्षेने कार्यक्रमाला येते आणि येथील दूरवस्था पाहिल्यावर अपेक्षाभंग होते. ज्येष्ठ नागरिकांची ही तक्रार ऐकून घ्यायला मात्र ते लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. सत्कार झाल्यावर ते पुढील कार्यक्रमाला निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्‍यामुळे भाजले अठरा जण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळीत फटाक्‍यांसह पणती लावताना व फराळाचे पदार्थ तळताना भाजलेल्या अठरा जणांवर घाटीसह विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

शासकीय वैदयकीय रुग्णालयात (घाटी) फटाक्‍यांनी भाजलेल्या सहा जणांनी जळीतरुग्ण विभागात उपचार घेतले. त्यात लहान मुले आणि युवकांचा समावेश होता. यात प्रामुख्याने फटाक्‍यांनी दुखापत झालेल्या रुग्णांचा समावेश होता, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी सांगितले. याशिवाय प्लॉस्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे यांच्या रुग्णालयात सात रुग्णांना दिवाळीच्या काळात दाखल करण्यात आले. त्यात एक महिला पणतीमुळे साडीने पेट घेतल्यामुळे भाजली. तर एक रुग्ण तळताना भाजला गेला. डॉ. रमाकांत बेंबडे यांच्या रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत पाच जणांनी उपचार घेतल्याचे त्यांनी सांगितले. शंकर मधुकर सुरंडकर (वय ३३, रा. कैलासनगर) हे पत्नी आणि दोन मुलांसह नऊ नोव्हेंबर रोजी सहाच्या दरम्यान कर्णपुरा देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडत असताना काही अनोखळी मुलांनी हातात सुतळी बॉम्ब घेऊन दोन्ही मुलांच्या अंगावर फेकला. यामुळे मुलाचे उजवे पाय भाजले. शंकर सुरंडकर व त्यांची पत्नी संबंधितांना बोलण्यासाठी गेल्या असता, अनोळखी मुलाने शिवीगाळ करण्याची धमकी दिली. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवाबपुऱ्यात भरला रेड्यांचा 'सगर'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळी पाडव्यानिमित्त नवाबपुरा येथे शुक्रवारी रेड्यांचा सगर भरविण्यात आला. शहरातील गवळी बांधवांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात हजेरी लावली.

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, माजी सभापती मोहन मेघावाले, पृथ्वीराज पवार, नगरसेवक सचिन खैरे, यांची उपस्थिती होती. यावेळी रेड्यांच्या व म्हशींच्या शिंगाना रंग देऊन त्यांच्या अंगावर झुलदार नक्षी काढण्यात आली होती. मानेभवती मोरपंखाचे मोठे पिसारे आणि गळ्यात रंगीत दोरीसह गोंडे आणि पायात पितळी पैंजण बांधलेले रेडे सगरीचे आकर्षण ठरले. गवळीपुरा, रेंगडीपुरा भागातील अरुंद गल्लीबोळातून सजवलेल्या रेड्यांची सगर सकाळी नऊ वाजेपासून सुरू झाली. यावेळी परिसरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला, घराच्या गच्चीवर व गॅलरीत बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. रेड्यांच्या सगरीत शहरातील नंदवंशी अहिर गवळी समाज, यादव गवळी समाज, वीरशैव लिंगायत समाज व मुस्लिम बांधवासह अन्य समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सगर संयोजन समितीच्या कार्यकारिणीसह अशोक सायन्ना, मोहन मेघावाले, किशोर तुलसिबागवाले, सूरजलाल मेघावाले, गणेश लोखंडे, वसूरकर साहेब, जगदीश सिद्ध, हंसराज पहेलवान डोंगरे, प्रवीण कडपे, कमलाकर देवगिरीकर यांची उपस्थिती होती.

\Bरेड्यांनी दिली सलामी\B

सगरदरम्यान मान्यवरांना सलामी देण्याची पद्धत असते. त्यानुसार वाजत गाजत आलेल्या रेड्यांना समोरील दोन्ही पायांच्या गुडघ्यावर बसायला लावत होते. याशिवाय मागील दोन्ही पायावर उभे करून त्यांनी उपस्थित मान्यवरांना सलामी दिली. त्यानंतर रेड्याच्या मालकाचा फुलहार देऊन सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिजोरीत खडखडाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तिजोरीत खडखडाट असल्यामुळे महापालिकेने सोमवारपासून (१२ नोव्हेंबर) विशेष वसुली व नियमितीकरण सप्ताहाचे आयोजन केले आहे. या मोहिमेत सर्व पदाधिकारी, नगरसेवक असे सुमारे दीड हजारावर अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. नऊ झोन कार्यालयांना रोज एक कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे.

वसुलीचे प्रमाण घटल्यामुळे पालिकेची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्याचा परिणाम विकास कामांवर होऊ लागला आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज, दिवाबत्ती अशी अत्यावश्यक कामे रखडली आहेत. या कामांना गती देण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढाकार घेत विशेष वसुली व नियमितीकरण सप्ताहाचे आयोजन केले आहे. यासंदर्भात त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. महापौर म्हणाले, महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. उत्पन्न वाढले नाही, तर हा गाडा पुढे नेणे अवघड आहे. त्यामुळे विशेष वसुली सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १९ नोव्हेंबर दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रत्येक झोन कार्यालयाच्या अंतर्गत ही मोहीम राबवली जाणार आहे. मालमत्ता कराची वसुली, अनधिकृत नळ जोडण्या अधिकृत करणे, अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी नाममात्र शुल्क भरून घेवून नागरिकांकडून फाइल जमा करून घेणे या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. या मोहिमेत सर्वच्या सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी - कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती महापौरांनी दिली.

\Bसात दिवस मोहीम

\Bदीड हजार कर्मचारी सात दिवस कर वसुलीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. त्यात शिक्षक, आशा वर्कर्स, आरोग्य विभागाचे कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांचाही समावेश असणार आहे. झोन कार्यालय निहाय वसुलीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक झोन कार्यालयाने रोज किमान एक कोटी रुपयांची कर वसुली करावी असे टार्गेट देण्यात आले आहे. झोन क्रमांक १ मध्ये सोमवारी सकाळी अकरा वाजता मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे. यावेळी सर्व पदाधिकारी, नगरसेवक, आयुक्त व अधिकारी उपस्थित राहतील.

\Bमालमत्ता कराची थकबाकी

\B- १९ कोटी शैक्षणिक संस्था

- २३ कोटी ७१ लाख मोबाइल टॉवर्स

- १३ कोटी १७ लाख राज्य शासन कार्यालये

- ४ कोटी ९७ लाख केंद्र सरकार कार्यालये

- ४५० कोटींचे वसुली उद्दीष्ट

- २०० कोटी नगररचनाचे वसुली उद्दीष्ट

- ३३ कोटी ऑक्टोबर अखेरची वसुली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बस, रस्ते कामाला ८ डिसेंबरला शुभारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर बस आणि रस्ते कामाचा शुभारंभ महापालिकेच्या वर्धापन दिनी (८ डिसेंबर) करण्याचे संकेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहेत. दरम्यानच्या काळात आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण होतील, असा दावा त्यांनी केला.

स्मार्टसिटी मिशनच्या माध्यमातून शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात शंभर बस सुरू करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी पन्नास बस डिसेंबर महिन्यात टाटा कंपनीकडून प्राप्त होणार आहेत. ३२ आसनक्षमता असलेल्या बस अत्याधुनिक असणार आहे. हायड्रॉलिक दरवाजा, आरामदायक सिटस् , बसमध्ये एलईडी स्क्रिन अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पन्नास पैकी काही बस दिवाळीच्या मुहुर्तावर सुरू व्हाव्यात असा पालिकेचा प्रयत्न होता. मात्र, बस बांधणीच्या कामाला उशीर लागत असल्यामुळे हा मुहूर्त हुकला आहे. आता आठ डिसेंबरचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. या दिवशी शहरात पन्नास शहर बस सुरू व्हाव्यात असा प्रयत्न केला जाणार आहे. राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले आहे. या अनुदानातून ३१ रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यांच्या कामाच्या निविदा पालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केल्या आहेत. येत्या आठवड्यात संबंधित कंत्राटदारांकडून सुरक्षा अनामत भरून घेवून कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. डिफेक्ट लायब्लिटी पिरेडबद्दलचा करार देखील करून घेतला जाणार आहे. यासर्व प्रक्रियेला पंधरा ते वीस दिवस लागण्याची शक्यता आहे.

\Bमुख्यमंत्री येणार

\Bप्राप्त होणाऱ्या शहर बस आणि रस्त्यांची कामे सुरू होण्यासाठी लागणारा आणखी पंधरा ते वीस दिवसांचा अवधी लक्षात घेता या दोन्हीही कामांचा शुभारंभ महापालिका वर्धापन दिनाच्या निमित्याने करू असे महापौर घोडेले म्हणाले. शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केले जाणार आहे. रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांबरोबर करार झाल्यावर आणि त्यांना कार्यारंभ आदेश दिल्यावर नेत्यांना निमंत्रण देण्यासाठी मुंबईला जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हास्यफराळ’ उद्या

$
0
0

औरंगाबाद - दिवाळीनिमित्त 'हास्यफराळ' हा विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात १२ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल. यावेळी 'वरकडी'कार संजय वरकड, हास्यकवी डॉ. विष्णू सुरासे, डॉ. डी. एस. काटे आणि वात्रटिकाकार विलास फुटाणे कविता सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागडे, खैरेंच्या घरासमोर कष्टकऱ्यांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांच्यासह सर्व अंगमेहनती कष्टकऱ्यांसाठी हक्काचा पेन्शन कायदा तयार करावा यासह अन्य मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियनने ऐन दिवाळीत शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसेच शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन केले.

महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाने आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या न्यू उस्मानपुरा येथील निवासस्थानासमोर सकाळी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आंदोलन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन सादर केले. या प्रसंगी विधानसभा अध्यक्षांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असून व्यक्तिश: प्रयत्न करेल. मात्र, सरकारच्या पेन्शन योजनेचा लाभ हमाल व अन्य असंघटित कष्टकऱ्यांना देण्यासाठी बाजार समितीने या कामी पुढाकार घ्यावा, असे सूचविल्याचे युनियनचे सरचिटणीस देविदास कीर्तीशाही यांनी सांगितले.

दरम्यान, सकाळी ११ वाजता शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरासमोर कामगारांनी निदर्शने केली. हक्काची पेन्शन मिळालीच पाहिजे, यासह अन्य घोषणा देत संपूर्ण परिसर त्यांनी दणाणून सोडला. कचरा वेचकाच्या थकित पगाराचा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. खासदार खैरे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना त्वरित संपर्क साधत प्रश्न मार्गी लावा, अशा सूचना दिल्या. कष्टकरी कामगारांच्या प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन दिले, अशी माहिती कीर्तीशाही यांनी दिली. आंदोलनाला छगन गवळी, अली खान, देवचंद आल्हाट, कैलास लोखंडे, शेथ रफिक, कासम भाई, भरत गायकवाड, संजय पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या नियुक्तीस न्यायालयाची मान्यता

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

मराठवाड्यासह खान्देशमधील शिक्षकांची याचिका अंतिम निकाली काढून आणि शिक्षकांच्या नियुक्तीस वैयक्तिक मान्यता देऊन वेतनाची देयके काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी दिले आहेत.

शिक्षकांच्या बिंदुनामावली जाहिरातीस पूर्व परवानगी नाही. पात्र उमेदवारांची यादी मागितली नाही. जिह्यात अतिरिक्त शिक्षक समायोजन शिल्लक आहे. बंदी काळात शिक्षकांची भरती करण्यात आली. अशी कारणे देत शिक्षकांच्या नियुक्तीला शिक्षणाधिकारी व उपसंचालकांनी मान्यता नाकारली होती. त्याविरोधात अनिलकुमार बोईवार, गजानन शिंपाळे, उमेश एस. बोरसे, चंद्रकांत भामरे यांच्यासह अनेक शिक्षकांनी याचिका दाखल केली होती. अनेक शिक्षक हे इंग्रजी, विज्ञान व गणित विषय शिकवतात. काही शिक्षकांची नियुक्ती ही मागासवर्गीय विशेष भरती मोहिमेतंर्गत करण्यात आलेली आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील नियुक्तीही महाराष्ट्र खासगी कर्मचारी (सेवाशर्ती) अधिनियमातील तरतुदीनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरू असल्याचे कारण देऊन नियुक्ती नाकारता येणार नाही, असे म्हणणे मांडण्यात आले. याचिकाकर्त्यां शिक्षकांतर्फे विलास पानपट्टे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images