Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अविनाश डोळस यांचं निधन

$
0
0

औरंगाबाद:

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य व प्रकाशन समितीचे माजी सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

नंदनवन कॉलनी येथे राहत्या घरी आज पहाटे ६ वाजता प्रा. अविनाश डोळस यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी ४ वाजता भीमनगर, भावसिंगपुरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात मराठी विषयाचे ते प्राध्यापक होते. मराठी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात त्यांचा पुढाकार होता. भारतीय रिपब्लिकन पक्ष- बहुजन महासंघाचे नेते असलेले डोळस हे दलित, कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी लेखणीही समर्थपणे चालवणारे साहित्यिक होते. जानेवारी १९९० मध्ये नांदेड येथे भरलेल्या पाचव्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. जानेवारी २०११मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे भरलेल्या १२ व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.

डोळस यांची साहित्य संपदा

>> आधारस्तंभ : प्राचार्य ल.बा. रायमाने

>> आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ

>> आंबेडकरी विचार आणि साहित्य

>> महासंगर (कथासंग्रह)

>> सम्यकदृष्टीतून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वत:चे सरण रचून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

नांदेड:

सततची नापिकी व यंदा पडलेला दुष्काळ या पार्श्वभूमीवर कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या एका ६० वर्षीय शेतकऱ्याने स्वत: सरण रचून जाळून घेतले. उमरी तालुक्यातल्या तुराटी येथील घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

उमरी तालुक्यातल्या तुराटी येथील शेतकरी पोतन्ना रामन्ना बोम्पीलवार यांना स्वत:ची ७ एकर जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाचा फटका त्यांना बसला. यंदा तर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने अपेक्षित उत्पन्न झालेच नाही. कर्ज कसे फेडावे तसेच मुलींचे लग्न कसे करावे या विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून होते. यंदा लेकरांना कपडे घेणे झाले नाही याची खंत त्यांना होती.स्टेट बँक ऑफ हैदराबाद व नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज त्यांच्यावर होते. भाऊबीजेच्या निमित्ताने सर्व परिवार घरी असताना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ते शेतात गेले. स्वत:ची चिता रचून त्यांनी त्याला अग्नी दिला व त्यातच उडी मारून मृत्यूला कवटाळले. रात्री उशिरा हा प्रकार लक्षात आला. उमरी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नांदेड जिल्ह्यात केवळ मुखेड आणि देगलूर या दोनच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. वास्तविक अनेक ठिकाणी दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना शासन मात्र दुष्काळाच्या विषयावरही राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजुरावर चाकूहल्ला; दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तरुण मजुरावर चाकूहल्ला करुन गंभीर जखमी करणारे शेख आमेर शेख शफीक व शेख करीम शेख इसाक या संशयित आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले असता, त्यांना सोमवारपर्यंत (१२ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले.

याप्रकरणी मजुरीकाम करणारे निहालखान अन्वरखान (वय १९, किराडपुरा) यांनी फिर्याद दिली होती. चार नोव्हेंबर रोजी ते किराडपुरा परिसरातील मशिदीमध्ये नमाज अदा करून बाहेर येत असताना संशयित आरोपी शेख करीम शेख इसाक (वय २८, रा. किराडपुरा) याने मागून लाथ मारल्यामुळे ते खाली पडले. त्याचा जबाब विचारला असता, संशयित आरोपी शेख आमेर शेख शफीक (वय २२, रा. किराडपुरा) याने निहालखान यांना मागून पकडले व शेख करीम याने त्यांच्या छातीवर चाकूने वार केला. त्यामुळे निहालखान खाली कोसळले. त्यानंतर निहालखान यांचे वडील व भावाने त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी निहालखान यांच्या तक्रारीवरून भादंवि ३२६, ३२३, ५०४, ३४ कलमान्वये जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केले असता, गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करायचा आहे, हल्ल्यामागचा उद्देश काय व आरोपींच्या साथीदारांचा शोध घ्यावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी केली. ही विनंती मान्य करण्यात आली.

\Bअगोदरही केली होती मारहाण

\Bआरोपी हे गल्लीमध्ये जोरजोरात दुचाकी चालवतात व निहालखान यांना नेहमी कट मारतात; म्हणून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींनी निहालखान यांना अगोदरही शिविगाळ व मारहाण केली होती. याच कारणावरुन चाकूहल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचे छापे, आठ हजारांची दारू जप्त

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाईची मोहीम राबवली. यामध्ये नऊ जणांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे आठ हजारांची अवैध दारू जप्त केली असून आरोपींविरुद्ध सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले.

पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन आणि विश्रांतीनगर भागात कारवाई केली. यामध्ये संशयित आरोपी तुकाराम भाऊलाल माने (वय २६ रा. विश्रांतीनगर) याच्या ताब्यातून साडेबाराशे रुपयाची दारू जप्त केली. दुसऱ्या कारवाईत संतोष गोकुळ विंचुरकर (वय ४९ रा. जयभवानीनगर) याच्या ताब्यातून एक हजार चाळीस रुपयाची दारू जप्त केली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता विठ्ठल मंदिराजवळ कारवाई केली. येथे रामस्वरुप हिरासिंग पिंपळे (वय ३२ रा. टेंभापुरी, ता. गंगापुर) याला अटक करून सव्वासहाशे रुपयाची अवैध दारू जप्त केली. मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी जयभवानीनगर भागात कारवाई करत गणेश रावन आहिरे (वय २४ रा. विश्रांतीनगर) याच्या ताब्यातून सातशे ऐंशी रुपयाची दारू जप्त केली. उस्मानपुरा पोलिसांनी शुक्रवारी रात्री नागसेननगर, उस्मानपुऱ्यात कारवाई करत प्रवीण म्हसुजी वाहूळ (वय ३५ रा. नागसेननगर) याच्या ताब्यातून साडेअकराशे रुपयाची दारू जप्त केली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री चिकलठाण्यात गणेश संभाजी बनकर (वय ४५ रा. चिकलठाणा) आणि उसेशसिंग श्रीसुखसेनसिंग धुर्वे (वय २४ रा. शेंद्रा) या दोघांच्या ताब्यातून दीड हजार रुपयांची अवैध दारू जप्त केली. सातारा पोलिसांनी शुक्रवारी ईटखेड्यात महिलेवर कारवाई करत ५७२ रुपयांची अवैध दारू जप्त केली. वाळूज पोलिसांनी केलेल्या कारवाईत आसाराम परभत रोकडे (वय ३९ रा. बकवालनगर) याच्याकडून साडेनऊशे रुपयाची अवैध दारु जप्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखनेत विदेशी पाहुण्यांची लगबग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निसर्ग मित्रमंडळ व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना आयोजित संपूर्ण महाराष्ट्रातील पक्षी उत्सव कार्यक्रमांतर्गत स्थानिक; तसेच परदेशी पक्षांच्या नोंदी घेण्यात येत आहेत. सुखना जलाशयात शुक्रवारी (नऊ सप्टेंबर) पक्षी निरीक्षणात यंदा बार हेडेड, फ्लेमिंगो, ब्लॅक स्टोर्क आदी पक्षीही आढळले असल्याची माहिती किशोर गठडी यांनी दिली.

सुखना जलाशयात आयोजित पक्षी निरीक्षणात पक्षीमित्र किशोर गठडी, केदार चौधरी, नागेश देशपांडे, मोहन शिखरे यांच्यासह अन्य पक्षीप्रेमींनी सहभाग नोंदविला. शहरापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुखना मध्यम प्रकल्पात दरवर्षी निसर्ग मित्र मंडळातर्फे पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात येत असतात. या वर्षी प्रथमच काही परदेशी पक्षी लवकर आल्याच्या; तसेच काही पक्षी काही वर्षांनंतर प्रथमच आल्याची माहिती पक्षी मित्रांनी दिली.

\Bसुखना जलाशयात आलेले परदेशीशी पाहुणे\B

रोहित (अग्नीपंख), चक्रवाक, चमचा (दर्विमुख), ब्लॅक स्टॉर्क (काळा करकोचा) बार हेडेड घुस, पट्टकादंब (पट्टेरी राजहंस), स्पॉट बीलड डक (राखी बदक), पेनटेल डक (तलवार बदक), ग्रीन बी इटर (वेडा राघू), सी गुल (कुरव पक्षी), व्हाइट ब्रिस्टेड वेदरहेन (पांढऱ्या छातीची पाणकोंबडी), व्हॉइट ब्रिस्टेड किंगफिशर (खंड्या), वुड श्रीक (काष्ठ खाटिक), (ब्लॉक डोंग्रो (कोतवाल), रिव्हर ट्रीम (नदीसुरय), ग्रे हेरोन (राखी बगळा), ब्लॉक विंग्ड काईट (कापशी घार), गप्पीदास, ठिपक्यांचा होला, शेकाट्या, पिवळा धोबी, उघड्या चोचीचा करकोचा, रंगीत करकोचा, मोठा वटवट्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीत दुकानाला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

येथील सेंट्रल बँके शेजारच्या चप्पल- बुटाच्या दुकानाला शॉटसर्किटमुळे गुरुवारी आग लागली. या आगीत दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला. या घटनेत दुकानदारांचे तीन लाखांचे नुकसान झाले असून तलाठी बाविस्कर यांनी पंचनामा केला.

शहरातील मेन रोडवर विश्वनाथ बाजीराव संकपाळे यांचे साईकृपा बूट हाउस हे दुकान आहे. दिवाळीनिमित्त त्यांनी १५ दिवसांपूर्वी नवीन माल भरला होता. दरम्यान संकपाळे हे गुरुवारी दिवसभर व्यवसाय करून सायंकाळी सातच्या सुमारास घरी गेले. थोड्याच वेळाने दुकानास शॉटसर्किटने आग लागली. या आगीत सर्व चप्पल-बुटांची राख झाली. याचबरोबर सर्व फर्निचर जळून खाक झाले. शेजारील नागरिकांनी ही आग विझविण्यासाठी मदत केल्यामुळे इतर दुकाने वाचली. तलाठीो बाविस्कर यांनी या घटनेचा पंचनामा करून दुकानात एकूण तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दर्शविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याचे काम अडवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम मुर्शिदाबाद वाडी (गणोरी फाटा) परिसरातील काही शेतकऱ्यांनी जमिनीचा मावेजा द्या नंतरच काम करा या मागणीसाठी अडविण्यात आले आहे. या मागणीसाठी आधी सविस्तर निवेदने दिलेली आहेत. यासर्व जमिनीमालकांना काहीही न विचारता हे काम सुरू करून जमिनीचा ताबा घेण्यात येत आहे. यावर कंत्राटदाराने पोलिस संरक्षणात काम करू, अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांना दम भरला आहे.

महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, त्यांची संमती, सूचना व कायदेशीर नोटीस न देता रस्त्याचे काम चालू केलेले आहे. या रस्त्यात मुर्शिदाबादवाडी येथील शेतकऱ्यांची जमीन जात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर निवेदने दिली आहेत. यात काही दिवस काम बंद होते. मात्र, शनिवारी रात्री कंत्राटदाराने काम सुरू केले. हे काम संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडले. जमिनीचा मावेजा मिळेपर्यंत काम होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना या शेतकऱ्यांनी रितसर निवेदन दिले. यानंतर देखील या मार्गावरील अधिकारी धमक्याच देत आहेत, दोन-तीन वेळेस कामावर पोलिस आणून शेतकऱ्यांना पळविण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांनी केला. राज्यभर रस्त्याचे कामे सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी मोबदला दिल्यानंतरच काम सुरू केले. मात्र, या रस्त्यावर मोबदला, तर दूरच मात्र कुठलीही सूचना अथवा नोटीस न देता शेतामध्ये या रुंदीकरणाचे काम सुरू केल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. यावर तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा कुटुंबासह आत्महत्या करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

\Bसरपंचांनी मांडली बाजू \B

शेतकरी काम करू देत नसल्यामुळे कंत्राटदाराने पोलिस बंदोबस्त मागविला. परंतु, सरपंच सदाशिव विटेकर यांनी शेतकऱ्यांची हकिकत पोलिसांसमोर मांडली. त्यानंतर या शेतकऱ्यांनी पोलिस ठाणे गाठून मावेजा बाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आमच्या शेतात काम करू नये, असे निवेदन फुलंब्री पोलिसांत दिले आहे. या निवेदनावर कडुबाई विटेकर, श्रीधर विटेकर, सुदाम विटेकर, भानुदास विटेकर, सोमीनाथ निकम, रमेश विटेकर, हरीदास मोरे, काशीनाथ विटेकर यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्स्ट पर्सन - दलित थिएटरचा आधारस्तंभ

$
0
0

प्रकाश त्रिभुवन, नाटककार

औरंगाबाद शहरात 'दलित थिएटर' स्थापन करण्यात प्रा. अविनाश डोळस यांनी पुढाकार घेतला होता. 'गाव नसलेला गाव' या एकांकिकेने कामाला सुरुवात केली. या एकांकिकेचे ठिकठिकाणी प्रयोग केले. नंतर मी लिहिलेल्या 'थांबा रामराज्य येतंय' या नाटकाचे डोळस यांनी दिग्दर्शन केले. कामगार नाट्य स्पर्धेत त्यांना दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले होते. त्यांनी विद्यार्थीदशेत 'युगयात्रा' या म. भि. चिटणीस यांच्या नाटकाचा प्रवास अनुभवला होता. तेव्हा मिलिंद महाविद्यालयाचे वातावरण चळवळीला पोषक होते. या प्रेरणेतूनच १९७६-७७ मध्ये 'दलित थिएटर' सक्रिय झाले. रंगभूमीकडे पाहण्याचा त्यांचा व्यापक दृष्टिकोन होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांना नाटकाचे माध्यम महत्त्वाचे वाटले. नाटकाकडे वळण्यापूर्वी ते कथाकार म्हणून सर्वपरिचित झाले होते. दलित युवक आघाडीच्या माध्यमातून सामाजिक चळवळीतही अग्रेसर राहिले. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर आपले विचार निर्भिडपणे मांडले होते. सतत कार्यरत राहणे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. नाट्यशास्त्र आणि पत्रकारिता या दोन अभ्यासक्रमात मी त्यांचा वर्गमित्र होतो. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर रंगभूमीवरील त्यांचा वावर कमी झाला. मात्र, नाटकाशी असलेली नाळ शेवटपर्यंत टिकवून होते. मी 'बौद्ध रंगभूमी' स्थापन केल्यानंतर आस्थेने विचारपूस केली होती. रंगभूमीवर नवीन काय सुरू आहे आणि काय केले पाहिजे याविषयी त्यांना नेहमीच उत्सुकता वाटायची. प्रा. डोळस यांचे अकाली जाणे मनाला चटका लावणारे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वधू-वर परिचय मेळाव्यात अनुरुप जोडीदाराला पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दशनाम गोसावी समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात मुलामुलींनी जोडीदाराची निवड करताना शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देत जोडीदार हा उच्चशिक्षित, निर्व्यसनी तसेच एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणारा असावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

रविवारी (११ नोव्हेंबर) दशनाम गोसावी समाजाच्या पहिल्याच वधू-वर परिचय मेळाव्यात राज्यभरातील सुमारे चारशे मुला-मुलींनी आपल्या पालकासह हजेरी लावली. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यामध्ये मुला मुलींच्या पालकांनीही हजेरी लावली होती. प्रारंभी उद्घाटन सत्रासाठी अखिल भारतीय दशनाम गोसावी महासभा दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष सच्चिदानंद गिरी यांची उपस्थिती होती. यावेळी दुर्गादास गिरी, योगीराज भारती, महंत दयानंदगिरी, कृष्‍णकांतजी गिरी, महंत रामभाऊ दुर्गा गिरी, पी. एल. भारती, प्रा. सुरेश पुरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे यांनीही भेट देऊन कार्यक्रमाबद्दल कौतुक केले.

परिचय मेळाव्यासाठी राज्यातील विविध शहरामधून सहभागी झालेल्या समाजाच्या उच्च शिक्षीत मुला- मुलींची गेल्या दोन महिन्यांपासून नोंदणी सुरू होती. मेळाव्यासाठी एकूण चारशेवर मुला-मुलींनी नोंदणी केली असल्याचे आयोजक सोनाची गिरी यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये प्रथम टोकन क्रमांकानुसार मुला-मुलीने स्टेजवर येऊन आपला संपूर्ण परिचय करून दिला, यावेळी मुला-मुलींनी आपले शिक्षण व कौटूंबिक माहिती देऊन आपल्या जोडीदाराबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी बहुतांश मुला-मुलींनी आपल्याला समजून घेणारा अनुरुप जोडीदाची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये उत्तम गिरी, कृष्‍णा बन, चंदत गिरी, प्रसाद गिरी, कृष्‍णा भारती, मंगेश गिरी यांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेख - माझा मित्र

$
0
0

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

आयुष्यात खूप माणसे भेटतात. प्रसंगी जवळही येतात. पण त्यापैकी फार थोडे मित्र होतात. हे मित्रही आयुष्यभर टिकतात असे नाही. कुठल्या तरी कारणाने काहींशी मतभेद होतात. हे मतभेद कधी वैचारिक असतात तर पुष्कळदा वैयक्तिकही असतात. काही मित्रांचा मात्र फार कटू अनुभव येतो. ते समोर गोड बोलतात आणि पाठ फिरली की, निंदा करायला लागतात. कटकारस्थानेही करतात. ते दूरही जातात. त्यांच्याशी मैत्री केल्याचा पश्चात्ताप करावा लागतो. (अर्थात तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते) फार कमी मित्र असे असतात की, ज्यांच्याशी मैत्री असल्यामुळे कधीच पश्चात्ताप होत नाही. उलट आनंद द्विगुणित होत जातो. अशा फार कमी मित्रांमध्ये अविनाश डोळस यांचा मी समावेश करेन. सतत आनंदी राहणारे, मिस्कील बोलणारे, बोलता बोलता सहज टोप्या उडवणारे माझे मित्र अविनाश डोळस हे फार उदार हृदयी आहेत. त्यांचा सगळ्यात मोठा गुण कोणता असेल तर त्यांना कधी कोणाल मत्सर वाटत नाही. संत तुकारामांनी 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर' असे म्हटले आहे. संत तुकारामांच्या कल्पनेतला माणूस कोण? असे विचारले तर 'अविनाश डोळस' असे उत्तर देईन. याचा अर्थ अविनाश डोळस यांना जीवनात त्रास झाला नाही, असे नाही. अनेक वेळा अनेक ठिकाणी त्यांना डावलण्यातही आले आहे. तरीही ते कधी कटू बोलत नाहीत. कोणाचा मत्सर करीत नाहीत. सतत चेहऱ्यावर हास्यच असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य काय असा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर म्हणजे ते डॉ. बाबासाहेत आंबेडकरांच्या विचारांचे सच्चे पाईक आहेत. पुष्कळ लोक बाबासाहेबांकडे एक वैयक्तिक फायद्याची गोष्ट म्हणून पाहतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचे नाव वापरत राहतात. अविनाश डोळस हे असे कधी करणार नाहीत. समाजात शांतपणे काम करीत राहणे, सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरोधात सतत संघर्ष करीत राहणे हाच डॉ. आंबेडकरांच्या शिकवणुकीचा खराखुरा अर्थ आहे, हे अविनाश डोळस पक्के जाणून आहेत. म्हणून वैयक्तिक आयुष्यातील करिअरपेक्षा, प्रसिद्धीपेक्षा सामाजिक कार्य त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. समाजात समता निर्माण करणारे विचार पेरीत राहणे अधिक महत्त्वाचे वाटते. आणि ते ते सातत्याने करीत राहतात. याच संदर्भात आणखी एका गोष्टीचा निर्देश केला पाहिजे. ते नाशिकहून आलेले आहेत. म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कर्मभूमीतून आलेले आहेत. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळी महाराष्ट्रातील समतेच्या लढ्याचे केंद्र नाशिक होते. पुढे दादासाहेबांनी समतेचा लढा अधिक व्यापक केला. ते भूमिहीनांच्या प्रश्नाला भिडले आणि त्याचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रव्यापी झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील ते एक अग्रणी नेते होते. अविनाश डोळस यांच्या व्यक्तिमत्त्वावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे आणि नाशिकला झालेल्या समता संघर्षाचे दाट संस्कार आहेत. म्हणजे नाशिकचे संस्कार आणि दादासाहेब गायकवाड यांच्याशी बांधीलकी घेऊन ते औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयात शिकायला आले.

मिलिंद महाविद्यालय म्हणजे समाज परिवर्तनाची प्रयोगशाळा. या प्रयोगशाळेत ते तावूनसुलाखून बाहेर पडले. एक वैचारिक बैठक त्यांना प्राप्त झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य आणि जीवन यांचा त्यांनी जवळून मनःपूर्वक अभ्यास केला. या सगळ्यांमधून अविनाश डोळस हे निर्मत्सरी, आनंदी अणि आपल्या भूमिकेवर ठाम असणारे व्यक्तिमत्त्व घडले. म्हणूनच अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर ते समतोल भूमिका मांडू शकतात. एका प्रकारे सामाजिक प्रश्नांवर, दलित प्रश्नांवर वैचारिक भूमिका मांडणारे तटस्थ विचारवंत आहेत. म्हणूनच दलितांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या चळवळीचे ने वैचारिक भाष्यकार आहेत. म्हणूनच त्यांचे अशा प्रश्नांसबंधीचे विवेचन गळे वेगळे असते. समंजस असते. ते कधी आक्रस्ताळेपणा करीत नाहीत की मळ भमिकाही सोडीत नाहीत. त्याचे कारण त्यांना स्वत:पेक्षा समाज मोठा वाटतो. म्हणूनच समाजातील वेगवेगळ्या विचारधारा समजून घेणे, त्यातील संवादी विचारधारांशी संवाद करणे महत्त्वाचे वाटते. त्या दृष्टीने डावी विचारसरणी त्यांना महत्त्वाची वाटते. डाव्या विचारांच्या केंद्रस्थानी कार्ल मार्क्स आहे. परंतु पुष्कळदा मार्क्सचे नाव काढले की अनेकांना त्रास होतो. तसे अविनाश डोळस यांचे नाही. शेवटी डावे समाजातल्या शोषणांसंबंधीच बोलतात आणि कृती करतात. भारतातील जटिल जातिव्यवस्था डाव्यांना कळली नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. कळली नाही, असे मी म्हणणार नाही पण जातिप्रश्नांपेक्षा ते आर्थिक प्रश्न महत्त्वाचे मानतात. आर्थिक समता आली की, सर्व प्रश्न सुटतील असे डाव्यांना वाटते. डावे जेव्हा आर्थिक समतेबद्दल बोलतात, तेव्हा ते समाजातील शोषणाबद्दलच बोलत असतात. दलित चळवळी याही शोषणमुक्तीचा विचार करतात. समतेसाठीच संघर्ष करतात. म्हणजे 'शोषणमुक्ती' हा दोन्ही चळवळींना जोडणारा दुवा आहे. हा दुवा अधिक घट्ट झाला पाहिजे असे अविनाश डोळस यांना वाटते. त्या दृष्टीने ते डाव्या चळवळींकडे पाहतात. डावे आणि दलित जवळ येणे ही काळाचीही गरज आहे. नाहीतर भांडवलशाही सर्वच शोषितांना उद्ध्वस्त करायला तयारच आहे. मग डावे आणि दलित चळवळी जवळ का येत नाहीत हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचे उत्तर इतिहासामध्ये सापडते. असे अविनाश डोळस यांचे म्हणणे आहे. इतिहासामध्ये डाव्या चळवळीकडूनही जशा चुका झाल्या तशाच दलित चळवळीकडून झाल्या. शेवटी चुकांवरती मात करणे हेच आपल्या हाती असते. ती काळाची गरज असते. ही काळाची खेळी ओळखणारे आणि दोन्ही चळवळी जवळ आल्या पाहिजेत असे म्हणणारे अति हे एक विचारवंत आहेत.

नाटक, कथा, समीक्षा या क्षेत्रात त्यांनी लक्षणीय लेखन केले आहे त्याच कारण म्हणजे त्याची वैचारिक भूमिका. किंबहुना आंबेडकरवादाची भक्कम बैठक असल्यामुळेच त्यांना जीवनाकडे आणि साहित्याकडे पाहण्याची एक मर्मग्राही अन्वेषणदृष्टी प्राप्त झालेली आहे. ही मर्मग्राही अन्वेषण दृष्टी त्यांच्या ललितलेखनातून जशी व्यक्त होते, त्याचप्रमाणे त्यांच्या समीक्षा लेखनातूनही व्यक्त होते. परंतु त्यांच्या वैचारिक भूमिकेचा ठळक आविष्कार झाला आहे तो त्यांच्या वैचारिक लेखनातून.

लेखकाची वैचारिक बैठक पक्की असली की, त्या लेखकाचे सगळेच लेखन वेगळे आणि महत्त्वाचे होते. अविनाश डोळस यांच्या बाबतीत हेच म्हणता येईल. अर्थात ही भूमिका तयार होण्यामध्ये आंबेडकरवादाचा आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कर्तृत्वाचा जो ठसा त्यांच्यावर उमटला त्याचा आहे. याचा निर्देश पूर्वी केलेलाच आहे. पण आणखी एका गोष्टीचा निर्देश केला पाहिजे. ती गोष्ट म्हणजे मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या ते अतिशय जवळचे आहेत. दोघांमध्ये एक वैचारिक देवघेव होत असते.

महाराष्ट्राच्या राजकारणातील बाळासाहेब आंबेडकर हे एक सुसंस्कृत राजकारणी आहेत. फायदा होवो किंवा तोटा होवो, वैचारिक भूमिका सोडायची नाही हे त्यांचे तत्त्व आहे. त्यामुळे डाव्या पक्षांपासून सर्व परिवर्तनवादी चळवळींना ते हवे असतात. केवढ्याही धकाधकीचा असो, बाळासाहेब सतत नवे नवे वाचत असतात. त्यावर चिंतन करीत असतात. त्यावर चर्चा करीत असतात. वाचन करणारे नेते राजकारणामध्ये अतिशय दुर्मिळ आहेत. पं. जवाहरलाल नेहरू, नंबुद्रीपाद, रफिक झकेरीया, यशवंतराव चव्हाण, प्रभाकर संझगिरी, कॉ. डांगे अशी वाचन करणाच्या पुढा-यांची सहज आठवलेली नावे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तर उल्लेख करावाच लागेल. बाळासाहेब आंबेडकर हे परंपरेमध्ये बसणारे नेतृत्व आहे. अशा चिंतनशील व्यक्तिमत्त्वाच्या जवळ अविनाश डोळस आहेत. त्यामुळेही त्यांच्या भूमिका पक्क्या होत गेल्या. आणि त्या भूमिकांच्या साह्यानेच ते जीवनातल्या जटील प्रश्नांकडे पाहतात. समाजपरिवर्तनाकडे आणि साहित्याकडेही पाहतात.

महाविद्यालयातील शिकविणे आणि सारी कामे सांभाळून अविनाश डोळस आणि त्यांचे सहकारी हे सारे करीत. रात्ररात्र प्रवास करून परत येत आणि थकण्याची पर्वा न करता महाविद्यालयात वेळेवर हजर होत. त्यांचे विभागप्रमुख ल. बा. रायमाने आणि महाविद्यालयातील त्यांचे इतर सहकारी त्यांना समजून घेत. प्रा. रायमाने अविनाश डोळस याचे शिक्षक, पण घरोबा एवढा जवळचा की शिक्षक-विद्यार्थी नाते संपून ते मित्र होऊन गेलेले. प्रा. रायमाने आणि इतर शिक्षक त्यांना समजून घेत. विद्यार्थ्यांना तर त्यांच्याविषयी प्रेम आणि आदरच वाटत होता. आजही डॉ. महेंद्र भवरे, राम दुतोंडे यांच्यासारखे त्यांचे जुने विद्यार्थी प्रा. रायमाने व प्रा. अविनाश डोळस यांच्यावर नितांत प्रेम करतात.

आपले जीवन दलितांच्या आणि शोषितांच्या चळवळीसाठी आहे, हे त्यांनी पक्के ठरविलेले आहे. परिणामी काही संधी त्यांनी स्वतःहून नाकारल्या. १९८२-८३ मधील गोष्ट असेल. तेव्हा अविनाश डोळस एक विद्यार्थिप्रिय आणि समंजस शिक्षक म्हणून नावारूपाला आलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधे त्यांनी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालकाचे पद स्वीकारावे, अशी अनेकांची इच्छा होती. पण ती त्यांनी विनम्रपणे नाकारली. मला ही गोष्ट महत्त्वाची वाटते. । मित्रांबाबत मात्र ते कमालीचे हळवे आहेत. त्यांच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. कुणाशी मतभेद झाले तरी ते त्याच्याबद्दल कटू कधी बोलत नाहीत. असा एक प्रसंग मला माहीत आहे. जवळच्या एका मित्राचा (जो रोज घरी यायचा) काही कारण नसताना गैरसमज झाला. ते मित्र सतत प्रा. अविनाश डोळस यांच्यासंबंधी वाईटसाईट बोलत असत. माझ्याहीजवळ त्यांनी त्यांची निंदा केली. मी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हते. या उलट प्रा. अविनाश डोळस यांचे वर्तन होते. त्यांनी कधीही त्या मित्राबद्दल कटू उद्गार काढले नाहीत. उलट ते कसे चांगले लेखक आहेत, हेच सांगत. ही घटना महत्त्वाची वाटते. कधी काळी आपण मित्र होतो, तो काळ आनंदाचा होता याचे कायम स्मरण ठेवणे हा प्रा. डोळस यांचा स्वभाव आहे. ही त्यांच्या स्वभावातील उदारता हा सगळ्यात मोठा गुण आहे.

(प्रा. अविनाश डोळस यांच्या डोळस या गौरव ग्रंथातील लेखाचा संपादित भाग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनबोर्ड तिकीट सेवेपासून नांदेड विभाग वंचित

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्या दिवाळीच्या सणासाठी अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करीत आहेत. ऐनवेळी निघालेल्या प्रवाशांना वेटींगवर प्रवास करावा लागत आहे. रेल्वे विभागाने ऑनबोर्ड कन्फर्मेशनची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद येथे ऑनबोर्ड कन्फर्मेशनची सुविधा देण्यात आली असून, आतापर्यंत नांदेड विभागाला ही सुविधा देण्यात आली नसल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.

रेल्वे विभागाने ऑनबोर्ड कन्फर्मेशनची सुविधा जाहीर केली होती. या अंतर्गत रेल्वे आरक्षणाची यादी (चार्ट) तयार झाल्यानंतर रिकाम्या सिट प्रवाशांना कन्फर्म करता येऊ शकतात. यामुळे रेल्वेने प्रवास सुरू केल्यानंतर पुढच्या स्थनकांवरील प्रवाशांना आपले तिकीट कन्फर्म करण्याची संधी मिळते. आरामदायी प्रवास व्हावा, अशी रेल्वेची यामागील भूमिका होती. दक्षिण मध्य रेल्वेने सिकंदराबाद येथून निघणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेंसाठी ऑनबोर्ड रेल्वे तिकीट योजना सुरू केली आहे. नांदेड येथू दहा ते १२ रेल्वे विविध शहरांसाठी सुटतात. या रेल्वे मार्गावरून दिवसभरात ८१ रेल्वे धावत असतात. नांदेड येथून दिल्ली, मुंबई, बंगळुरू, जम्मू तवी, विशाखापट्टनम्; तसेच अन्य मार्गावर रेल्वे सुरू आहेत.

या महत्त्वाच्या शहरांना जाण्यासाठी अनेक प्रवासी नांदेडहून तिकीट बुक करतात. अनेक वेळा वेटिंगवर असलेले तिकीट देण्यात येते. अनेकदा ऐनवेळी या शहराकडे निघालेल्या प्रवाशांला जनरल तिकिटावर प्रवास करावा लागतो. रेल्वे विभागाच्या घोषणेनंतर ऑनबोर्ड तिकीट बुकिंग सुविधा सिकंदराबाद येथे देण्यात आली आहे. यासाठी रेल्वे विभागाने विशेष अॅपही तयार केले. यात ऑनबार्ड तिकीट किंवा ऑनबोर्ड खाद्य पदार्थ मागविण्याची सुविधा देण्यात आली होती. सिकंदराबादनंतर ऑनबोर्ड तिकिटाची व्यवस्था नांदेड विभागाला देण्यात आलेली नाही, अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली. ऑनबोर्ड तिकिटाची व्यवस्था झाली नसल्याचा फटका दिवाळीत प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

…………

\Bअशीही आहे व्यवस्था…\B

नांदेड निझामोद्दिन एक्स्प्रेस या रेल्वेतून अकोला किंवा हिंगोली भागाच्या प्रवाशाला प्रवास करायचा असेल आणि ऑनबोर्ड तिकीट व्यवस्थेंतर्गत रेल्वेतील रिकाम्या असल्यास, यांना तिकीटाची खरेदी ऑनबोर्ड करता येणार आहे. त्यासाठी मात्र प्रवाशांना नांदेडपासूनच्या प्रवासाचे पैले भरावे लागतील. त्यांना बोर्डिंग अकोला किंवा हिंगोलीत करावे लागणार आहे.

\Bऐनवेळी होणाऱ्या तिकीट विक्रीवर परिणाम शक्य\B

ऑनबोर्ड तिकीट विक्रीची सुविधा नांदेड विभागात सुरू केल्यानंतर थेट तिकीट घेण्याची सोय होणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान तिकीट निरीक्षकांना असे तिकीट विकता येणार नाही. यामुळे ऑनबोर्ड तिकीट व्यवस्था सुरू केल्यास ऐनवेळी तिकीट विक्रीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित विभागाकडूनच ही सुविधा नांदेडमध्ये सुरू होऊ नये, असे प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियंत्याला फावड्याने मारहाण, आरोपीस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनधिकृत नळ जोडणी घेणाऱ्यांचे फोटो काढणाऱ्या महापालिका शाखा अभियंत्याला शिविगाळ करून फावड्याने मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी सय्यद मेहराज सय्यद रफिक या आरोपीला अटक करून कोर्टात हजर केले असता, त्याला सोमवारपर्यंत (१२ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले.

याप्रकरणी महापालिका झोन तीनचे शाखा अभियंता अरुण शेकुजी मोरे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, दोन नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास ते दुचाकीवरून रोशनगेटमार्गे सेंट्रल नाक्याकडे जात होते. त्यावेळी मदनी चौकात पाच ते सहा व्यक्ती मेन पाइपलाइनवर खड्डा खोदून नळ कनेक्शन घेत होते. त्यांच्याकडे नळ कनेक्शनची परवानगी आहे का, असे विचारत ते फोटो काढत असताना त्यांना शिविगाळ करून मारहाण करण्यात आली. एकाने फावड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले, यावेळी फिर्यादी बेशुद्ध पडले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी सय्यद मेहराज सय्यद रफिक (२७, रा. बारी कॉलनी) याला अटक करून कोर्टात हजर केले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले फावडे जप्त करायचे आहे, अनधिकृत नळाचे कनेक्शन घेण्याचे काम करणारा कंत्राटदार व पसार अरोपींचा शोध घ्यायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री,अधिकाऱ्यांना पोत्यात घालून हाणा!

$
0
0

खासदार राजू शेट्टी यांचे वक्तव्य

म. टा. प्रतिनिधी, बीड

पंतप्रधान पीक विमा योजनेसह विविध शेतकरी योजनेत ‛राफेल विमान खरेदी घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा झाला आहे. यातील घोटाळेबाजांना सरकार अभय देत आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफी, दूध दर, ऊस भाव वाढ या मागण्यांसाठी यापुढे रस्त्यावर उतरावे असे आवाहन करत वेळप्रसंगी मंत्री व अधिकाऱ्यांचे कपडे काढून, पोत्यात घालून हाणावे. तुमच्यासोबत आम्ही आहोत, असे वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित दुष्काळ निवारण व ऊस उत्पादक शेतकरी परिषद केज तालुक्यातील जवळबन येथे पार पडली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे विविध शेतकरी प्रश्नावर कडाडले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निष्क्रीयतेचा आरोप केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला मात्र, निवारण केले नाही. राज्य सरकारने दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान त्वरीत द्यावे. चारा लावणीला न देता जनावरांच्या दावणीला द्यावा, अशा विविध मागण्या यावेळी खासदार शेट्टी यांनी केल्या.

'राम मंदिर नाही झाले तरी चालेल'

हक्काच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर यावे, आपण अखेरपर्यंत साथ देऊ असा शब्द रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी ते म्हणाले, प्रभू रामाचा आदर आहे. राम मंदिर दोन महिन्यांनी झाले तरी चालेल. मात्र, सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान त्वरीत द्यावे, अशी मागणी करत संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी लढा उभारण्याचे आवाहन तुपकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणमध्ये दारुड्यांसाठी लकी ड्रॉ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी वेगवेगळ्या स्किम व ऑफर देतात. यात कोणतीही नावीन्यपूर्ण गोष्ट राहिलेली नाही. मात्र, पैठणमध्ये देशी दारू दुकानदाराने चक्क देशी दारूची बाटलीच्या खरेदी वर दारुड्यांसाठी लकी ड्रॉ व दिवाळी साहित्य बक्षिस म्हणून जाहीर केले होते. यामुळे, ऐन दिवाळीत या दारूच्या दुकानात देशी दारू खरेदी करणासाठी दारुड्यांची झुंबड उडाली होती.

शहरात गरजेपेक्षा जास्त म्हणजेच सहा देशी दारूची दुकाने आहे. यामुळे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या दुकानदारांत नेहमीच स्पर्धा लागलेली असते. सध्या, शहरातील देशी दारू दुकानामध्ये दारू पिणाऱ्यासाठी थंड पाणी, कुलर, दारू देण्यासाठी वेटर आदी सुविधा पुरवण्यात येतात. दिवाळीनिमित्त, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील भाजी मार्केट परिसरातील एका देशी दारू विक्रेत्याने लक्की ड्रॉ ची भन्नाट कल्पना लढवली. या देशी दारूच्या दुकानदाराने प्रत्येक दारूच्या बाटलीवर लकी ड्रॉ चे तिकीट देण्याचे जाहीर केले. यामध्ये विजेत्या क्रमांकाना दिवाळीसाठी किराणा सामान, कपडे, मोबाइल असे बक्षिस जाहीर केले होते.

ऐन दिवाळीच्या तोंडावर, देशी दारूच्या बाटली खरेदीवर किराणा, कपडे व मोबाइल यासारखी बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत असल्याने शहरातील सर्व दारुड्यांनी या देशी दारूच्या दुकानात देशी दारू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती.

\Bदारुड्यांच्या बायका दु:खी \B

लक्की ड्रॉ विषयी बोलताना, एका दारुड्याने सांगितले, मी रोज एक देशी दारूची बाटली खरेदी करतो, मात्र, भाजी मार्केट परिसरातील देशी दारू विक्रेत्याने देशाच्या खरेदीवर लकी ड्रॉ व यात दिवाळी साहित्य बक्षिसे म्हणून देत असल्याने मी दिवाळीच्या काळात रोज दोन देशाच्या बाटल्या खरेदी केल्या. दरम्यान, देशी दारू विक्रेत्याच्या या लक्की ड्रॉ मुळे बहुतांशी दारू पिणाऱ्यांच्या बायका दुःखी दिसल्या. दररोज शंभर रुपयाची दारू पिणारे आमचे नवरे आता लकी ड्रॉच्या नादात दररोज दुप्पट पैशाची दारू पित असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले.

\Bदेशी दारू दुकान २४ तास सुरू\B

पैठण शहरात सध्या गरजेपेक्षा जास्त म्हणजेच सहा देशी दारूची दुकाने आहे. यामुळे नेहमीच या दुकानामध्ये स्पर्धा सुरू असते. नियमानुसार देशी दारू दुकान सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत सुरू असावीत, असा नियम आहे. मात्र, ग्राहकांना सुविधा देण्यासाठी शहरातील बहुतांशी दारूची दुकाने सकाळी पाच ते रात्री बारापर्यंत सुरू असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणीत डेंगी; अनेकांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्याच वर्षी छावणी परिसरामध्ये गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्यानंतर आता छावणी परिसरामध्ये डेंगी वाढत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत अनेकांना डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच उपाययोजना वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मागच्या वर्षी गॅस्ट्रो भोगलेल्या छावणीवासियांना पुन्हा आता डेंगीचा फटका बसत आहे. सध्या छावणी परिसरात किमान डझनभर डेंगीच्या केसेस असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे नागरिकांमध्ये काहिसे भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे छावणीच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलासदेखील डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे. त्यानंतर परिषदेची यंत्रणा काहीअंशी जागी झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. या संदर्भात परिषदेचे उपाध्यक्ष प्रशांत तारगे यांना छेडले असता ते म्हणाले, छावणीत डेंगीच्या मोजक्याच केसेस आढळून आल्या असून, फवारणीसह विविध उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी नेमकी काळजी कशी घ्यावी, याची माहिती 'डोअर टू डोअर' देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि तशी माहिती पत्रकेही वाटण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असेही आवाहन तारगे यांनी केले आहे. मात्र, वाढत्या डेंगी आजाराच्या पार्श्वभूमीवर उपायययोजना फारच कमी आहेत व या उपाययोजना तातडीने वाढवण्यात याव्यात, अशीही मागणी नागरिकांमधून होत आहे.

\Bव्हॉटस्अॅप ग्रुपवर जागरण

\Bछावणी परिसरातील नागरिकांच्या विविध व्हॉटस्अॅप ग्रुपवर डेंगीबाबत काळजी घेण्याचे आवाहन करणारे मेसेज शनिवारपासून जोरात सुरू आहेत. यातील एक मेसेज तर एका नगरसेवकानेच पाठवल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे छावणीत डेंगी संदर्भात जोरात चर्चा सुरू झाल्याचेही समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जैस्वाल सोशल ग्रुपचे १८ नोव्हेंबर रोजी परिचय संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या १८ नोव्हेंबर रोजी रविवारी जैस्वाल सोशल ग्रुप आणि माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या वतीने द्वितीय जैस्वाल परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको एन पाच येथील संत तुकाराम नाट्यगृहामध्ये हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रथमच जैस्वाल परिचय संमेलन घेण्यात आले होते. यामध्ये राज्यातील साडेतीन हजार समाजबांधवानी सहभाग घेतला होता. यामध्ये ६४५ तरुण तरुणींनी स्वतंत्र परिचय दिला. यातून २२ जणांचे विवाह जुळले होते. या संमेलनासाठी सुरुवातीला ज्या पाच मुली नोंदणी करणार आहेत त्या पाच मुलींना प्रमुख पाहूणे म्हणून सन्मान देऊन त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या संमेलनासाठी यावर्षी पाच हजार समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था जैस्वाल सोशल ग्रुपच्या वतीने नि:शुल्क करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला पंकज जैस्वाल, प्रितेश जैस्वाल, मनीष जैस्वाल, प्रशांत जैस्वाल, सचिन जैस्वाल यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीबीटी’ विरोधात रेशन दुकानदार आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सार्वजनिक वितरण व्यवस्थेखालील रॉकेल व अन्नधान्यावर देण्यात येणारे अनुदान पात्र लाभार्थींपर्यंत पोचावे म्हणून राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या पसंतीनुसार थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रकल्पाची प्राथमिक स्तरावर अंमलबजावणी करण्याच्या निर्णय घेण्यात आला, मात्र राज्य शासनाच्या योजनेला देशभरातील स्वस्त धान्य दुकानदार, रॉकेल परवानाधारक महासंघाने तीव्र विरोध केला असून, यासाठी महासंघ आता राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी दिली.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पात्र लाभार्थींना दिले जाणारे धान्य हे 'एईपीडीएस' योजनेंतर्गत लागू करण्यात आले असून, याची अंमलबजावणी राज्यभर सुरब आहे, मात्र आता राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकाला देण्यात येणारे धान्य किंवा निर्धारित होणारे अनुदान त्याच्या पसंतीनुसार घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. शिधापत्रिकाधारकाने रोख अनुदान स्वीकारण्याचा पर्याय निवडल्यास हे अनुदान शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिला कुटुंबप्रमुखाच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

या निर्णयाला विरोध करण्यासाठी १५ नोव्हेंबरपासून आंदोनल करण्यात येणार आहे. १५ रोजी बुलडाणा व गोंदिया येथे २२ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर, २९ नोव्हेंबरला अमरावती, चार डिसेंबर औरंगाबाद, पाच डिसेंबर जळगाव, सात डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद येथे क्रांतीचौक येथून मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

\Bकमिशनवर परिणामाची भीती\B

या योजनेमुळे रेशन दुकानांमधून मिळणारे धान्य जादा दराने मिळणार असल्यामुळे रेशन दुकानांमधून लाभधारक धान्य खरेदी करणार नाहीत. त्यामुळे रेशन दुकानदारांच्या कमिशनवर परिणाम होणार असल्यामुळे या योजनेला स्वस्त धान्य दुकानदारांनी विरोध केला आहे. राज्यभरातील शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्‍ध करून द्यावे, बंद करण्यात आलेले रॉकेल पुन्हा सुरू करण्यात यावे, देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना कमीत कमी ३० हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात यावे, अशा मागण्या महासंघाने तेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उल्कावर्षाव पाहण्याची येत्या शनिवारी संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आकाशातील सिंह राशीतील उल्कावर्षावाच्या आतिषबाजीचा नजारा पाहण्याची संधी औरंगाबादकारांना मिळणार आहे. शनिवारी (१७ नोव्हेंबर) मध्यरात्रीपासून ते रविवारी (१८ नोव्हेंबर) पहाटेपर्यंत नभांगणात सिंह राशीत आणि मघा नक्षत्राजवळून उल्कावर्षाव होताना पहायला मिळणार आहे. नवमीची रात्र असल्याने चंद्र मध्यरात्री पश्चिम आकाशात मावळेल व नंतरच्या काळोखात हा उल्का वर्षाव नयनरम्य दिसणार आहे. जे एरवी आपल्याला ढग वाटतात ती म्हणजे 'मिल्की वे' (आकाशगंगा) देखील पहाटे साडेतीनच्या सुमारास पाहण्याची संधी मिळणार आहे.

औरंगाबाद येथील 'एमजीएम'च्या एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रातर्फे दिनांक १७ नोव्हेंबर रोजी रात्री खास आकाश दर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आकाशातील दीप अथवा तारे, नक्षत्रे यांची ओळख करून दिली जाणार असल्याची माहिती केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

शनिवारी आकाश दर्शनाच्या कार्यक्रमात सायंकाळी पाच वाजता सूर्यास्तापासून दुसऱ्यादिवशी १८ नोव्हेंबर रोजी सूर्योदयापर्यंत आकाशाची तोंड ओळख करून देण्यात येणार आहे. यासाठी १७ नोव्हेंबरच्या आकाश दर्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्व नाव नोंदणी दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दुपार पर्यंत करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी 'एमजीएम'च्या एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रात (गेट नंबर सहा जवळ, एमजीएम परिसर , सिडको, औरंगाबाद) प्रत्यक्ष येऊन करावी लागणार आहे.

\Bउल्कावर्षावाच्या नोंदी घेणार\B

आकाशदर्शनाचा या सत्रात दोन मोठ्या दुर्बिणींद्वारे (न्यूटोनियन व गॅलिलीयन) नवमीची चंद्र कोर पहायला मिळणार आहे. यात चंद्र पृष्ठभागावरील अनेक पर्वत, वाळवंट; तसेच विवरे अतिशय जवळून पहाण्याची संधी मिळणार आहे; तसेच मंगळ ग्रह, शनी आणि त्याचे कडे, शनीचे चंद्र, आकाशगंगेच्या जवळची देवयानी आकाशगंगादेखील यादरम्यान पाहायला मिळणार आहे. या उल्का वर्षावाची नोंद जर्मनीतील आंतरराष्ट्रीय उल्का संघटनाचा निर्देशाप्रमाणे केली जाणार असून, यावेळेस घेण्यात येणार्या सर्व नोंदी जर्मनीतील आंतरराष्ट्रीय उल्का संघटनेला पाठवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारवंत प्रा. अविनाश डोळस कालवश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते, साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर छावणी स्मशानभूमीत सायंकाळी साडेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. डोळस यांच्या पश्चात पत्नी जॅकलिन डोळस, एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे.

नंदनवन कॉलनी येथील निवासस्थानी रविवारी पहाटे छातीत दुखत असल्यामुळे प्रा. डोळस यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचे निधन झाले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद कला महाविद्यालयात १९७४ ते २००८ अशी ३४ वर्षे प्रा. डोळस यांनी मराठी विषयाचे अध्यापन केले. औरंगाबाद शहरात 'दलित थिएटर'ची स्थापना करुन 'गाव नसलेला गाव', 'थांबा रामराज्य येतंय' अशा गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शन केले. 'महासंगर', 'आंबेडकर विचार आणि साहित्य', 'आंबेडकर चळवळ - परिवर्तनाचे संदर्भ', 'सम्यक दृष्टितून' या महत्त्वाच्या ग्रंथांचे लेखन केले. नाटक आणि लेखनासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. नंतरच्या काळात भारिप बहुजन महासंघाचे सक्रिय नेते म्हणून ते महाराष्ट्राला परिचित झाले. पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी त्यांनी काम केले. १९९८ मध्ये डोळस यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. सामाजिक चळवळ, साहित्य, राजकारण, रंगभूमी या क्षेत्रात ते कार्यरत राहिले. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर ते काम करीत होते. प्रा. डोळस यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर अंत्यदर्शनासाठी दिवसभर कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. सायंकाळी साडेपाच वाजता छावणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आमदार इम्तियाज जलील, आमदार सुभाष झांबड, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व चाहते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्री दहा नंतर फटाके फोडणाऱ्या बारा जणांवर गुन्हे

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रात्री दहा वाजेनंतर फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करीत विविध ठिकाणी रात्री दहा वाजेनंतर फटाके फोडण्याचे प्रकार घडले. या प्रकरणी सबंधीत पोलिस ठाण्यात बारा अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

सुप्रीम कोर्टाने दिवाळीच्या काळात रात्री आठ ते दहा या कालावधीत फटाके उडवण्याची परवानगी दिली होती. या अनुषंगाने रात्री दहा वाजेनंतर फटाके उडवणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दिला होता. बुधवारी लक्ष्मीपूजन या महत्त्वाच्या दिवशी फटाके उडविण्यात येतात. यानंतर पाडवा तसेच भाऊबीजेला देखील फटाके उडविण्यात येतात. मात्र याचे प्रमाण कमी असते. शहरात रात्री दहा वाजेनंतर देखील फटाके उडविण्याचे प्रकार घडले. याची गंभीर दखल पोलिसांच्या वतीने घेण्यात आली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच छावणी, सिटीचौक, हर्सूल, सिडको, एमआयडीसी सिडको, जिन्सी आणि सातारा पोलिस ठाणे हद्दीत देखील रात्री उशिरा फटाके उडवण्याचे प्रकार घडले. या प्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात कलम १८८ नुसार प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट

काय आहे कलम १८८

कलम १८८ म्हणजे लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे असे स्वरुप आहे. यामध्ये दोनशे रुपये दंड किंवा आठ दिवसाचा कारावास अशी तरतूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images